Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

इचलकरंजीत आज यंत्रमाग कामगारांचा मोर्चा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

सहाय्यक कामगार आयुक्तांनी जाहीर केलेल्या सहा पैसे मजूरीवाढीची अंमलबजावणी करावी यासाठी लालबावटा जनरल कामगार युनियनच्यावतीने येथील कॉ. मलाबादे चौकात निदर्शने करण्यात आली. तर मंगळवारी (ता. ५ फेब्रुवारी) सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

सन २०१३च्या करारानुसार सहाय्यक कामगार आयुक्तांनी यंत्रमाग कामगारांसाठी जाहीर केलेली ५२ पिकाला ६ पैसे मजूरीवाढीची अंमलबजावणी करावी यासाठी २ फेब्रुवारीपासून लालबावटा जनरल कामगार युनियनच्यावतीने बेमुदत कामबंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. त्यानुसार आज येथील कॉ. मलाबादे चौकात निदर्शने करण्यात आली. यावेळी विविध मान्यवरांनी भाषणात सरकार विरोधात संताप व्यक्त केला. दरम्यान, मंगळवारी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. कॉ. दत्ता माने, आनंदराव चव्हाण, सदा मलाबादे, गोपाळ पोला, मंगेश वासुदेव, शोभा शिंदे, रामचंद्र पोला, सुभाष कांबळे, अमित कोरवी, बंडोपंत पाटील, दिनकर पाटील, साहेबलाल मुल्ला, राजेंद्र लाटणे, बाळनाथ रावळ आदींसह कामगार उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आर्थिक फसवणूक करणारा परदेशी नागरिक अटकेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सोळा कोटी रुपये किमतीचे परदेशी चलन देण्याचे आमिष दाखवून ६३ लाख रुपयांची मागणी करणाऱ्या केनियन भामट्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सोमवारी (ता. ४) अटक केली. मुथाय इसाह (वय ४५, रा. नैरोबी, केनिया) असे संशयिताचे नाव असून, त्याला दाभोलकर कॉर्नर येथील कोहिनूर हॉटेलमधून ताब्यात घेतले.

पोलिसांनी त्याच्याकडील २०० अमेरिकन डॉलर, ५०० युरोज व भारतीय चलनातील १३ हजार रुपये, पाच मोबाइल, केमिकल, नोटांच्या आकारांचे काळे कागद, लॉकर, असे साहित्य जप्त केले. या कारवाईमुळे परदेशी नोटा देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणारे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

इचलकरंजी येथील एका बांधकाम व्यावसायिकास मुथाय इसाह या केनियन नागरिकाचा फोन आला. 'आपल्याकडे २० मिलियन युरोज असून, ते व्यवसायात गुंतवायचे आहेत. नोटा तयार करून देण्यासाठी ६३ लाख रुपयांचा खर्च येईल. एवढे पैसे दिल्यास त्यापोटी तीन कोटी २० लाख रुपये देऊ, असे आमिष दाखवले.' बांधकाम व्यावसायिकाने तयारी दर्शवल्यानंतर मुथाय याने इचलकरंजीत जाऊन त्यांना नोटा तयार करण्याचे प्रात्यक्षिकही दाखवले. बनावट नोटांचा संशय येताच व्यावसायिकाने याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना दिली. पोलिस अधीक्षक देशमुख यांनी गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस तपास करण्याचे आदेश दिले.

संशयित मुथाय हा कोल्हापुरातील कोहिनूर हॉटेलमध्ये आल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सोमवारी सकाळी त्याला सापळा रचून अटक केली.

.. .. .. ..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीमाभागातून होतेय कोट्यवधीची गुटखा तस्करी

$
0
0

लोगो : मौखिक आरोग्य दिन विशेष

Satish.ghatage@timesgroup.com

Tweet:satishgMT

कोल्हापूर: महाराष्ट्रात गुटखा बंदी होऊन सात वर्षे होऊनही सीमाभागातून मोठ्या प्रमाणावर गुटख्याची तस्करी होत आहे. पुणे बेंगळुरु महामार्गावर छोट्या, मोठ्या वाहनाबरोबर कंटेनरमधून गुटख्याची तस्करी होत असून त्याला पोलिस व अन्न व औषध प्रशासनातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांचा आशीर्वाद असल्याची चर्चा आहे. गुटख्यामुळे कॅन्सर रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडून तस्करीकडे डोळेझाक केली जात आहे.

२०१२ मध्ये गुटखा बंदी करण्यात आली. पण प्रभावी अंमलबजावणी अभावी राजरोस खुलेआम गुटख्याची विक्री होत आहे. बंदीमुळे अधिकृत गुटख्याच्या ब्रँडनी राज्यातील कारखाने बंद केले. तर काहींनी गुजरात व कर्नाटकात कारखाने हलवले. कोल्हापूर जिल्हा कर्नाटक सीमेजवळ असल्याने सीमाभागात छोटे मोठे गुटख्याचे कारखाने सुरू झाले आहेत. इचलकरंजी, हुपरी, सांगली शहराला लागून सीमाभाग येत असल्याने त्या ठिकाणी गुप्तपणे गुटख्याचे कारखाने उभे केले आहेत. मुंबई, पुणे, नाशिकमधील व्यावसायिकांनी मोठी गुंतवणूक केली आहे. तयार झालेला गुटखा छोट्या, मोठ्या वाहनातून इचलकरंजी, गांधीनगर येथे आणला जातो. तिथून तो कोल्हापूर जिल्ह्यासह सांगली, सातारा कोकणात पाठवला जातो. मुंबई, पुणे, नाशिक या मोठ्या शहरांना कंटेनरमधून गुटख्याची तस्करी केली जाते.

गुटखा तयार करणारे कारखानदार, वितरक, विक्रेते यांनी समांतर यंत्रणा उभी केली आहे. गुटख्याच्या अनेक कंपन्या बनावट असून ५० पैसे किंमतीचा गुटखा पाच ते सात रुपयांनी विकला जातो. ब्रँडेड कंपन्यांच्या गुटख्याची किंमत १५ ते २५ रुपयाला विकला जातो. महाराष्ट्रात गुटखा तयार करणे, साठवणे, त्याची वाहतूक करणे, विक्री करण्यास बंदी आहे. पण हप्तेबाजीने यंत्रणा पोखरलेली असल्याने गुटख्याचे उत्पादन, वाहतूक, विक्री राजरोस सुरु आहे.

इचलकरंजी, गांधीनगरातून राज्यात वितरण

सीमाभागातून आलेला गुटखा इचलकरंजीतून संपूर्ण राज्यात वितरित जातो. तसेच गांधीनगरातही गुटख्याची गोडाऊन आहेत. इचलकरंजीतील 'राजू' हा गुटख्यातील डॉन होता. काही पोलिस अधिकाऱ्यांशी त्याच्यासोबत भागिदारीही होती. पण अन्न व औषध प्रशासनाच्या छाप्यानंतर 'राजू'चे या व्यवसायातील अस्तित्व कमी झाले. सांगली जिल्ह्यातील एक नगरसेवक गुटखा विक्रीत आघाडीवर आहे. गांधीनगरमधील काही व्यापाऱ्यांनीही गुटखा विक्रीची समांतर यंत्रणा उभी केली आहे. पुणे बेंगळुरू महामार्गावरून छोट्या, मोठ्या वाहनातून गुटख्याची मोठ्या प्रमाणात तस्करी होते. इचलकरंजी, गांधीनगर, कागल, जयसिंगपूर, शिरोली एमआयडीसी, पेठ वडगाव ठाण्यातील काही पोलिसांचे लागेबांधे आहेत. हप्ता पोचत असल्याने पोलिसांकडून गुटखा वाहतूक व विक्रीला सरंक्षण दिले जाते.

मुख्याध्यापक व प्राचार्यांना अधिकार

गुटखा बंदीची अंमलबजावणी अन्न व औषध प्रशासनाबरोबर पोलिसांना अधिकार दिले होते. तसेच शाळा कॉलेजच्या आवारात होणाऱ्या गुटखा विक्रीवर कारवाई करण्याचे अधिकार मुख्याध्यापक व प्राचार्यांना दिले आहेत. पण गुटखा विक्रीवर कारवाई करण्याचे धाडस मुख्याध्यापक व प्राचार्यांना दाखवता आलेले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

द्राक्ष उत्पादक वाचवा अभियान

$
0
0

सांगली :

द्राक्षाचे घटत चाललेले दर, दलालाकडून होणारी फसवणूक, व्यापाऱ्यांकडून घेण्यात येणारी तूट, बेदाणा उत्पादकांची अडत्याकडून होणाऱ्या लुटीच्या पार्शवभूमीवर द्राक्ष शेती टिकवा, द्राक्ष उत्पादक वाचवा, असे अभियान सहा फेब्रुवारी पासून सुरू होत असल्याची माहिती स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिली आहे.

मिरज तालुक्यातील बेडगपासून अभियानाला सुरुवात होत असून, सायंकाळी सात वाजता द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची पहिली बैठक होणार आहे. सांगली जिल्ह्यात दीड लाख एकरांवर द्राक्ष शेती केली जात आहे. यामध्ये तासगाव, मिरज पूर्व भाग, कवठेमहांकाळ, जत, पलूस आणि वाळवा या तालुक्यातील द्राक्ष शेतीचा समावेश आहे. शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी खरेदीसाठी येणाऱ्या व्यापाऱ्यांची बाजार समितीकडे नोंदणी असावी. नोंदणीच्या वेळी त्याच्याकडून किमान दहा लाखाचे डिपॉझिट ठेवणे बंधनकारक करावे, २० किलोला एक किलो तूट धरली जाते, ही एक प्रकारची लुटच आहे, तसेच बेदाणा उत्पादक शेतकाऱ्यांनाही लुटले जात आहे, अशा विविध समस्यांबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली जाणार असल्याचे खराडे यांनी सांगितले.

......

सुनावणी आज

सांगली :

बहुचर्चित अनिकेत कोथळे प्रकरणी सोमवारी होणारी सुनावणी आज, मंगळवारी होणार आहे. या प्रकरणातील संशयितांवर आरोप ठेवण्यात येणार असून, मंगळवारी कोर्टात या प्रक्रियेवर विशेष सरकारी वकील उज्वल निकम युक्तीवाद करणार आहेत. ही सुनावणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. सापटणेकर यांच्या कोर्टात होणार आहे.

.........

हिवरे प्रकरणाची सुनावणी सुरू

सांगली :

खानापूर तालुक्यातील हिवरे येथील तीन महिलांच्या खून खटल्याच्या सुनावणीत सोमवारी दोन्ही बाजूच्या वकिलांनी जोरदार युक्तीवाद केला. विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी नायब तहसीलदार पदावरील साक्षीदाराची फेरतपासणी घेण्याविषयी केलेल्या अर्जावर यावेळी सुनावणी झाली. सुनावणीनंतर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. पी. सातवलेकर यांनी मंगळवारी संबधित अर्जाबाबत निर्णय देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.

हिवरेतील तीन महिलांच्या खून खटल्यातील संशयितांची ओळखपरेड घेणारे नायब तहसीलदार यांची उलटतपासणी बचाव पक्षाचे वकील प्रमोद सुतार यांनी घेतली आहे. त्यावेळी सुतार यांनी विचारलेल्या प्रश्नांना साक्षीदाराने दिलेल्या उत्तरावरुन ओळख परेडच्या बाबतीत कायदेशीर बाबींची पूर्तता केली नसल्याचे समोर आले. त्या नंतर अॅड. निकम यांनी संबधित साक्षीदाराची फेरतपासणी घेण्यास परवानगी मिळावी, म्हणून न्यायालयात अर्ज केला होता.

...........

दारूड्याचा पत्नीवर हल्ला

सांगली :

दारू पिण्यास विरोध करणाऱ्या पत्नीवर पतीने कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. मिरज तालुक्यातील अंकली येथे वीटभट्टीवर असलेल्या झोपडपट्टीत रविवारी रात्री ही घटना घडली. कुऱ्हाडीचे गालावर, खांद्यावर आणि पाठीवर गंभीर स्वरुपाचे वार झाल्याने जखमी निलव्वा संगाप्पा कुंभार (वय ३३) या महिलेला सांगलीच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. विजापूर जिल्ह्यातील बसवान तालुक्यातील तळेवाडचे राहणारा संगाप्पा कुंभार आपल्या कुटुंबासह वीटभट्टीवरील कामाच्या निमित्ताने अंकलीत राहतो. रविवारी सायंकाळी झालेल्या वादानंतर कुऱ्हाडीने पत्नीवर हल्ला केला. हल्लेखोर पसार झाला आहे.

.....

४५ लाखांना गंडा

सांगली :

सौदी अरेबियाचा व्हिसा आणि विमानाचे जाण्या-येण्याचे तिकीट काढून देण्याचे अमीष दाखवून भिवंडीच्या तिघांनी सांगलीकरांना तब्बल ४५ लाख ८ हजार रुपयांना गंडा घातल्याचे समोर आले आहे. फेब्रुवारी २०१८पासून संबधितांनी सांगली जिल्ह्यातील विविध भागातील अनेक मुस्लिम बांधवाना सौदे अरेबियाचा व्हिसा मिळवून देण्याचे अमीष दाखवून बँकेच्या माध्यमातून ऑनलाइन रक्कम घेऊन फसवणूक केली आहे. या प्रकरणी दिलावर सिकंदर शेख (रा. बुधगाव) यांनी सांगली शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे.

चार जणावर कारवाई

सोलापूर :

माळशिरस तहसीलदार कार्यालय आणि सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने छापा टाकून लाच स्वीकारणाऱ्या चार जणांविरूद्ध कारवाई करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयातील कंत्राटी नायब तहसीलदार नरसिंह एकनाथ कुलकर्णी, लिपिक सलीम चॉंदसाब शेख यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. माळशिरस तालुक्यातील सेतू सुविधा केंद्रातील कोतवाल पवनकुमार महादेव चंदनशिवे आणि मुकुंद बलभीम साठे यांनाही लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रामपंचायतींचा निवडणूक जाहीर

$
0
0

कॉंग्रेसच्या विजयी उमेदवारांचा

मलकापुरात आज सत्कार

कराड :

मलकापूर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत २० जागांपैकी थेट नगराध्यक्षासह १४ जागांवर भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार विजय झाले आहेत. या सर्व नवनिर्वाचित विजयी उमेदवारांचा जाहीर सत्कार आज, मंगळवारी माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती व कॉंग्रेस नेते मनोहर शिंदे यांनी दिली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह आमदार सतेज पाटील, आनंदराव पाटील, जयकुमार गोरे, विश्वजित कदम, अॅड. उदयसिंह पाटील आदी उपस्थिती असणार आहेत. चव्हाण यांच्या दक्षिण कराड मतदारसंघात मलकापूर नगरपरिषद असल्याने या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागून होते. या विजयाच्या पार्श्वभूमीवर भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या सर्व उमेदवारांचा जाहीर सत्कार चव्हाण यांच्या हस्ते आज सायंकाळी पाच वाजता होणार आहे.

......

मनोहर शिंदे

............

ग्रामपंचायतींचा निवडणूक जाहीर

कराड :

कराड तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील या ग्रामपंचायती आहेत. लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर या निवडणुका होत असल्याने मोठी रंगत निर्माण झाली आहे. मसूर, वाण्याचीवाडी, यादववाडी, माळवाडी, वडोली भिकेश्वर, धनवडी, कचरेवाडी, पवारवाडी व राजमाची या गावांत निवडणूक होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाघ, सयाजी शिंदेंनादमाणी-पटेल पुरस्कार

$
0
0

सोलापूर : दमाणी-पटेल प्रतिष्ठानच्या कर्मयोगी पुरस्काराची घोषणा प्रतिष्ठानचे प्रमुख बिपिनभाई पटेल यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. साहित्य क्षेत्राचा कर्मयोगी पुरस्कार कवी डॉ. विठ्ठल वाघ तर कला क्षेत्राचा पुरस्कार अभिनेते सयाजी शिंदे यांना जाहीर झाला आहे. सन्मानचिन्ह, श्रीफळ, शाल आणि रोख ५१ हजार रुपये, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. रविवारी, १० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता निर्मलकुमार फडकुले सभागृहात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे. सोलापूरच्या सांस्कृतिक वैभवात योगदान देणाऱ्या उद्देशाने प्रेमरतन दमाणी आणि बिपिनभाई पटेल यांनी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिष्ठानची स्थापना केली आहे. डॉ. विठ्ठल वाघ मराठीतील एक नामवंत कवी आणि लेखक आहेत. त्यांचे काळ्या मातीत मातीत, पंगतीच्या वाटेवर, कपाशीची चंद्रफुले हे कवितासंग्रह गाजले आहेत. सयाजी शिंदे यांनी मराठी, चित्रपट व नाटके, तसेच कन्नड, तमिळ, मल्याळम, तेलगू आणि हिंदी भाषांतील चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इथेनॉल, सहवीज निर्मितीसाठी पुढाकार घ्यामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

$
0
0

इथेनॉल, सहवीज निर्मितीसाठी पुढाकार घ्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

म. टा. वृत्तसेवा, सातारा

'ऊस शाश्वत पीक असून या पुढे कारखान्याच्या विस्तारासाठी मागणी करणाऱ्यांना इथेनॉल तयार करण्याची अट टाकण्यात येईल. पेट्रोल-डिझेलला इथेनॉल पर्याय ठरले तर आपले परकीय चलन वाचेल. किसनवीर खंडाळा सहकारी साखर उद्योगाने घेतलेला पुढाकार इतरांसाठी अनुकरणीय आहे,' असे उद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.

किसन वीर खंडाळा सहकारी साखर उद्योगाच्या साखर पोती पूजन, सह वीजनिर्मिती लोकार्पण व शेतकरी मेळाव्या प्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. या वेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, सहकार मंत्री सुभाष देशमुख, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, किसन वीर साखर कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार मदन भोसले, उपाध्यक्ष माजी खासदार गजानन बाबर, किसन वीर खंडाळा सहकारी साखर उद्योगाचे चेअरमन शंकरराव गाढवे, आदी उपस्थित होते.

मदन भोसले यांनी पुढाकार घेऊन नवनवीन प्रकल्प अंमलात आणल्याबद्दल किसन वीर परिवाराचे अभिनंदन करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'भविष्यात हार्वेस्टरचा वापर मोठ्या प्रमाणात करावा लागेल. त्यासाठी ४० लाखांचे अनुदान देणारी योजना सरकारने तयार केली आहे. साखर उद्योग हा शाश्वत म्हणून ओळखला जातो. त्यासाठी बाजार त्यांच्या हातात हवा. राज्य सरकारच्या प्रयत्नातून ९९ टक्के एफआरपी शेतकऱ्यांना दिली आहे. तसेच कारखान्यांना विषेश पॅकेज दिले आहे. सहकारी बँकामार्फत कर्ज देण्यासाठी प्रयत्न केला गेला. केंद्र सरकारने अर्थ संकल्पात शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. साखर कारखाने व शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार भक्कमपणे उभे राहील. किसन वीर खंडाळा साखर कारखान्याला येत्या दोन दिवसांत ईथेनॉलबाबत परवानगी देण्यात येईल.' या वेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले.

फडणवीसांना मानपत्र

किसन वीर खंडाळा सहकारी साखर उद्योगाकडून माजी आमदार मदन भोसले, माजी खासदार गजानन बाबर, शंकरराव गाढवे यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. मानपत्राचे वाचन स्नेहल दामले यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी साखर कारखाना परिसरात गणपती मंदिर उभारणीच्या पायाभरणीचे भूमीपूजन फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. साखर कारखान्याच्या वतीने दोन हार्वेस्टर मुख्यमंत्र्याच्या हस्ते प्रदान करण्यात आले. सहवीज निर्मिती केंद्राचे लोकार्पण ही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.

............

मुख्यमंत्री उवाच...

गरजे पुरती साखर उत्पादन करून इथेनॉल निर्मितीसाठी प्रयत्न करावेत

हार्वेस्टिंगसाठी ४० लाखांचे अनुदान सरकार देणार

केंद्राने साखरेला प्रती किलो २९ रुपये किमान आधारभूत किंमत दिल्यामुळे उद्योगाला चालना

सरकारने दोन हजार कोटींचे पॅकेज दिले, केंद्राने १३ हजार कोटींची मदत दिली

बंद सिंचन प्रकल्प सुरू करून शेती सिंचनाखाली आणली.

जलयुक्त शिवार अभियानामुळे दुष्काळी भागाची सिंचन क्षमता वाढली

शेतीतील गुंतवणूक ६७ हजार कोटींपर्यंत गेली

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दमाणी-पटेल प्रतिष्ठानचे पुरस्कार विठ्ठल वाघ आणि सयाजी शिंदेंना जाहीर

$
0
0

दमाणी-पटेल प्रतिष्ठानचे पुरस्कार

विठ्ठल वाघ आणि सयाजी शिंदेंना जाहीर

सोलापूर

दमाणी-पटेल प्रतिष्ठानच्या कर्मयोगी पुरस्काराची घोषणा प्रतिष्ठानचे प्रमुख बिपिनभाई पटेल यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. साहित्य क्षेत्राचा कर्मयोगी पुरस्कार कवी डॉ. विठ्ठल वाघ तर कला क्षेत्राचा पुरस्कार अभिनेते सयाजी शिंदे यांना जाहीर झाला आहे. सन्मानचिन्ह, श्रीफळ, शाल आणि रोख ५१ हजार रुपये, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

रविवारी, १० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता निर्मलकुमार फडकुले सभागृहात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे. सोलापूरच्या सांस्कृतिक वैभवात योगदान देणाऱ्या उद्देशाने प्रेमरतन दमाणी आणि बिपिनभाई पटेल यांनी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिष्ठानची स्थापना केली आहे.

डॉ. विठ्ठल वाघ मराठीतील एक नामवंत कवी आणि लेखक आहेत. त्यांचे काळ्या मातीत मातीत, पंगतीच्या वाटेवर, कपाशीची चंद्रफुले हे कवितासंग्रह गाजले आहेत. सयाजी शिंदे यांनी मराठी, चित्रपट व नाटके, तसेच कन्नड, तमिळ, मल्याळम, तेलगू आणि हिंदी भाषांतील चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


'दौलत' निविदेचा निर्णय संचालकांच्या बैठकीत होणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत साखर कारखाना भाड्याने देण्यासाठी मागवण्यात आलेल्या दोन निविदा सोमवारी उघडण्यात आल्या. कारखाना भाड्याने कुणाला द्यायचा याचा निर्णय घेण्यासाठी संचालकांच्या बैठकीत निविदा ठेवण्यात येणार आहेत. चंदगड तालुका संघ आणि अथर्व ट्रेडर्स या दोन संस्थांनी निविदा भरल्या आहेत.

कारखाना भाड्याने देण्यासाठी जिल्हा बँकेने जाहिरात प्रसिद्ध केली होती. निविदा भरण्याची शनिवारी (ता. २) अंतिम मुदत होती. या कालावधीत दोनच निविदा आल्या. सोमवारी या निविदा उघण्यात आल्या. अथर्व ट्रेडर्सने बँकेच्या शर्ती व अटी मान्य करत ३९ वर्षे कारखाना चालवण्यासाठी तर चंदगड तालुका संघाने ४० वर्षे कारखाना भाड्याने घेण्याची तयारी दर्शवली आहे. यावर निर्णय घेण्यासाठी लवकरच संचालक मंडळाची बैठक बोलावण्यात येणार आहे. त्या बैठकीत याबाबत निर्णय होणार आहे.

यापूर्वी बँकेने न्यूट्रिएन्स कंपनीला ४५ वर्षे कराराने दौलत कारखाना भाड्याने दिला होता. पण कंपनीने अटी व शर्तीचा भंग केल्याने बँकेने कंपनीशी असलेला करार रद्द केला. तसेच कारखाना भाड्याने देण्यासाठी प्रक्रिया सुरु केली आहे. बँकेच्या कारवाईविरोधात न्यूट्रिएन्सने जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सोमवारी याचिकेवर सुनावणी होती. पण कोर्टाने गुरुवारी (ता. ७) सुनावणी ठेवली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकेची सर्वसाधारण सभा १२ फेब्रुवारी रोजी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर महापालिकेची सर्वसाधारण सभा मंगळवारी (ता. १२) सकाळी साडेअकरा वाजता राजर्षी शाहू सभागृहात होणार आहे. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर सरिता आहेत. सभेत प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थ्यांना वैयक्तिक स्वरुपात घरकुल बांधणीसाठी देण्यात येणाऱ्या आराखड्यावर चर्चा होणार आहे. तसेच अॅस्टर आधार हॉस्पिटलला अतिरिक्त जागा भाड्याने देण्याबाबत इस्टेट विभागाच्या प्रस्तावार सभागृहात चर्चा होईल.

अॅस्टर आधार हॉस्पिटलला महापालिकेने उद्यानासाठी आरक्षित जागेवर गार्डन विकसित करुन एसटीपी प्लांट उभारण्यासाठी भाड्याने जागा दिली आहे. जागेचा वापर गार्डनसाठी न करता पार्किंगसाठी केला जात असल्याचा आरोप जानेवारीमध्ये झालेल्या महासभेत नगरसेवकांनी केला होता. त्यामुळे हॉस्पिटलने अतिरिक्त जागेची केलेल्या मागणीचा ठराव रद्द करण्यात आला. ठराव रद्द करताना त्यामध्ये सभागृहाने उपसूचना सुचवल्या होत्या. त्यानुसार बुधवारी होणाऱ्या सभेत पुन्हा हा प्रस्ताव चर्चेला येणार आहे. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थ्यांना वैयक्तिक स्वरुपात घरकुल बांधणीसाठी चौथा प्रकल्प आराखडा तयार केला आहे. आराखडा राज्य सरकारला पाठवण्यात येणार आहे, तत्पूर्वी महासभेपुढे प्रस्ताव चर्चेला येणार आहे. २०१८-१९ मध्ये नागरी दलित वस्ती सुधारणा योजनेसाठी अतिरिक्त एक कोटी निधीची आवश्यकता आहे. अतिरिक्त निधीची मागणी केल्यानंतर कामाची निवड व निश्चिती होऊन कामाला सुरुवात करण्यासाठी महासभेची मंजुरी लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एकरकमी एफआरपी देण्यात अडचणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

एकरकमी एफआरपीच्या वसुलीसाठी साखर कारखान्यांना पाठवलेल्या नोटिशीसंदर्भात सोमवारी राज्य साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यांतील कारखानदारांनी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची भेट घेतली. कारखानदारांनी ८० टक्के एफआरपी जमा केली असून एकरकमी एफआरपी कायद्याची अंमलबजावणी करताना व्यवहार्य निर्णय घ्यावा, अशी विनंती यावेळी करण्यात आली.

साखर कारखान्यांकडील थकीत एफआरपीच्या वसुलीसाठी कोल्हापूर विभागातील बारा कारखान्यांना तहसीलदारांनी नोटिसा पाठवल्या आहेत. एफआरपी जमा न केल्यास साखरजप्तीची नामुष्की कारखान्यांवर ओढवणार आहे. यंदा कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील ३६ कारखान्यांनी एफआरपीचे तुकडे पाडताना प्रतिटन २३०० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा केली आहे. यावेळी कारखानदारांनी आपली बाजू आयुक्तांसमोर मांडली. बँकेकडून कारखान्यांना प्रतिक्विंटल सरासरी २६०० रुपये कर्ज दिले जाते. तोडणी ओढणी खर्च, कामगारांचा पगार, अन्य खर्च भगवून एकरकमी एफआरपी देण्यात अडचणी येत आहेत. साखरेचा स्टॉक दीड वर्षे पडून आहे. इथेनॉलचे बिल एक वर्षांनी मिळते. कारखानदार शेतकऱ्यांच्या बाजूचे आहेत. यापूर्वी अनेक कारखान्यांनी एफआरपीपेक्षा जादा रक्कम शेतकऱ्यांना दिली आहे. यंदाही एकरकमी एफआरपी देण्यासाठी कारखानदार प्रयत्न करत आहेत.

साखर उद्योगाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला असताना शेतकरी संघटनांच्या दडपणाला बळी न पडता साखर आयुक्तांनी व्यवहार्य निर्णय घ्यावा, अशी विनंती करण्यात आली. या शिष्टमंडळात आमदार हसन मुश्रीफ, माजी आमदार प्रकाश आवाडे यांच्यासह जिल्ह्यातील कारखान्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

...

सहा कारखान्यांची तीन टप्प्यात एफआरपी

राज्यातील सहा कारखान्यांनी तीन टप्प्यात एफआरपी देण्याचा शेतकऱ्यांशी करार केला आहे. पण राज्यातील बहुतांशी कारखान्यांनी ८० टक्के एफआरपी जमा केली आहे. तीन टप्प्यात एफआरपी देण्याचा निर्णय बहुतांशी कारखान्यांनी घेतलेला नाही. पण जर कारखान्यांना रक्कमच उपलब्ध झाली नाही तर कारखान्यांपुढे पर्याय राहणार नाही. कारखान्यांसमोर आलेल्या अडचणी शेतकरी समजून घेत आहेत, याकडेही कारखानदारांच्या शिष्टमंडळाने आयुक्तांचे लक्ष वेधले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

होसूर पाझर तलाव कामाची चौकशी सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

चंदगड तालुक्यातील होसूर पाझर तलाव कामातील गैरव्यवहारांची चौकशी करण्याचे आदेश पंचायत राज समितीचे अध्यक्ष आमदार सुधीर पारवे यांनी ग्रामविकास प्रशासनास दिले आहेत. यामुळे लघुपाटबंधारे प्रशासनात खळबळ उडाली आहे. झालेल्या गैरकारभारावर पडदा टाकून उर्वरित काम पूर्ण करण्याचा प्रशासनाचा डावही फसणार आहे.

जिल्हा नियोजन समितीमधून तलावासाठी ८० लाख निधींची तरतूद २०१२ मध्ये करण्यात आली. पाझर तलाव बांधकाम करण्यासाठी तांत्रिक यंत्रणा नसल्याने हे अनुदान जलसंधारणच्या लघुपाटबंधारे विभागाकडे वर्ग करण्यात आला. यानुसार १५ डिसेंबर २०१२ मध्ये मुख्य अभियंत्यांनी ७३ लाखांच्या कामांना अंतिम मान्यता दिली. मूळ नियोजनानुसार २२ शेतकऱ्यांची जमीन संपादीत करून तलाव बांधण्यास कोणाचा विरोध नव्हता आणि आताही नाही. मात्र ठेकेदाराने दादागिरी करीत तलावाची जागाच बदलली. केलेल्या कामाची चौकशी आणि वस्तुनिष्ठ पाहणी न करता ठेकेदाराला ३० लाखांचे बिल अदा करण्यात आले. सरकारच्या लेखापरीक्षकाने ही रक्कम वसूल करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार वसुली करावी, अशी मागणी तक्रारदार सुबराव पवार यांनी प्रशासनाकडे केली. त्यासाठी ते वारंवार पाठपुरावा करीत आहेत. पण लालफितीच्या कारभारामुळे नुकसानीची रक्कम वसूल करण्यातही टाळाटाळ होत असल्याचा आरोप पवार यांचा आहे. गंभीर तक्रारी असतानाही पुन्हा दाबून काम सुरू करण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. त्यास स्थानिक बाधीत शेतकऱ्यांचा विरोध होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्रॉसड्रेनसाठी रस्ता बंद

$
0
0

कोल्हापूर

ताराबाई रोड ते उभा मारुती चौक रस्त्यावरील क्रॉसड्रेनच्या कामाला बुधवारपासून (ता.६) सुरुवात होणार आहे. काम पूर्ण होणास तीन महिने लागणार असल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. रस्ता बंद काळात वाहनधारकांना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे. साकोली कॉर्नर येथील यादव महाराज मठापासून मोठ्या गटारातून सांडपाणी वाहत असते. पावसाळ्यामध्ये अनेकवेळा गटर तुंबून सांडपाणी रस्त्यावर येते.परिसरात दुर्गंधी पसरण्याबरोबर डासांची पैदास मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून येथे क्रॉसड्रेन करुन पाण्याचा निचरा करण्याची मागणी होत होती. या कामाला मंजुरी मिळून वर्कऑर्डर काढण्यात आली. त्यानुसार क्रॉसड्रेनच्या कामाला सुरुवात होणार आहे. ताराबाई रोड ते उभा मारुती चौकातील रस्त्यावर हे काम पाच एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे. परिणामी या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनधारकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे, आवाहन महापालिकेच्यावतीने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठा दाखल्यासाठी लुटणाऱ्यांवर कारवाई करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मराठा दाखल्यासाठी कमीत कमी ४०० ते ५०० रूपयांची लाच महा ई सेवा केंद्रचालक घेत आहेत. त्यांच्यावर त्वरित कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन शिवसेनेच्या शिष्टमंडळाव्दारे सोमवारी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्याकडे देण्यात आले. मनमानी पैसे घेण्याचे प्रकार बंद न झाल्यास ठोक मोर्चा काढू, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, जादा पैशासाठी अनेक ई- सेवा, आपलं सरकार केंद्र चालकांकडून दाखल्यासाठी अडवणुकीची भूमिका घेतली जात आहे. दाखल्यासाठी मनमानी पध्दतीने पैशाची मागणी केली जाते. पैसे न दिल्यास किरकोळ चुका दाखवून अडवणूक केली जाते. यामुळे केंद्र चालक, महसूल प्रशासनातील भ्रष्ट अधिकारी, कर्मचारी मालामाल होत आहेत. दाखल्यासाठी येणारा गरीब, सर्वसामान्य बेरोजगार आर्थिक अडचणीत येत आहे. आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातर्फे उद्योग, व्यवसायासाठी कर्ज मागणीसाठी गेल्यानंतर अनेक बँकातील अमराठी अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ होत आहे. अपमानास्पद वागणूक दिली जात आहे. यावेळी आण्णासाहेब पाटील महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार, जिल्हाप्रमुख विजय देवणे, शिवाजी पाटील, रवी चौगुले, राजू यादव आदी उपस्थित होते.

...

चौकट

कारवाई करण्याचे आश्वासन

'मराठा दाखल्यासाठी जादा पैसे आकारणाऱ्या केंद्र चालकांची नावे द्यावीत, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. या विषयावर केंद्र चालकांची स्वतंत्र बैठक बोलावली जाईल', असे जिल्हाधिकारी सुभेदार यांनी शिष्टमंडळाशी बोलताना सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इचलकरंजीत बहुचर्चित २७ दुकानगाळे सील

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

येथील शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पिछाडीस असलेल्या जागेतील नगरपालिका मालकीच्या जागेवर अतिक्रमण करून थाटलेले २७ दुकानगाळे सोमवारी पालिका प्रशासनाने कारवाई करून सील केले. या गाळेधारकांना भाडे वसुलीच्या नोटीसा लागू केल्याने नगरसेवकांकडून मध्यस्थी करून प्रकरण मिटवण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.

मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पसिरातील शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पिछाडीस दहा वर्षांपासून लहान दुकानगाळे बांधून काहींनी तेथे कब्जा केला. या दुकानगाळ्यांचा मालक कोण? भाडेकरू कोण? याचा काहीच थांगपत्ता पालिका प्रशासनाला लागलेला नाही. यासंदर्भात पालिकेकडे कसलेही रेकॉर्ड उपलब्ध नाही. परंतू गेली दहा वर्षे या २७ गाळेधारकांकडून दरमहा ३ हजार रुपयांप्रमाणे भाडे मात्र नियमितपणे वसूल केले जात होते. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी यासंदर्भात माहिती मागविली असता याठिकाणी सुरू असलेला गोंधळ उघडकीस आला. या संदर्भात इस्टेट विभागाकडे कसलीही नोंद अथवा माहिती नसल्याचा धक्कादायक खुलास करण्यात आला. नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेतही या विषयावर जोरदार चर्चा झाली.

त्यानंतर आता जागे झालेल्या प्रशासनाने तक्रारीची दखल घेत गाळे सील केले आहेत. सील काढून दुकानगाळे ताब्यात मिळावेत यासाठी काही गाळेधारकांनी कॉ. सदा मलाबदे यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेवर मोर्चा काढला. त्यांनी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, ताराराणीचे पक्षप्रतोद प्रकाश मोरबाळे आदींना साकडे घातले. यावेळी झालेल्या चर्चेत गेल्या १० वर्षांचे दरवर्षी एक हजार रुपयेप्रमाणे दहा हजार रुपये भाडे भरावे, नव्याने निघणार्‍या लिलावात भाग घ्यावा असे ठरले. पण मागील भाडे देण्यास काही गाळेधारकांनी असमर्थता दाखवल्याने पुन्हा हे भिजत घोंगडे पडणार आहे. त्यामुळे नगरपालिकेनेच कठोर भूमिका घेऊन अनेक वर्ष घरफाळा चुकवणार्‍या २७ गाळेधारकांवर दंडात्मक कठोर कारवाई करुन थकीत भाड्याची वसुली करावी अशी मागणी नागरीकांतून होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बांधकाम कामगारांची शुक्रवारी घरकुल हक्क परिषद

$
0
0

बांधकाम कामगारांची शुक्रवारी घरकुल हक्क परिषद

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

विविध प्रलंबित न्याय मागण्यांसाठी लालबावटा बांधकाम कामगार संघटनेच्यावतीने (सिटू) शुक्रवारी (ता.८ फेब्रुवारी) येथील श्रीमंत ना. बा. घोरपडे नाट्यगृहात दुपारी ३ वाजता घरकुल हक्क परिषदेचे आयोजन केले आहे. महाराष्ट्र बांधकाम कामगार समन्वय समितीचे कार्याध्यक्ष कॉ. भरमा कांबळे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

कांबळे म्हणाले, 'लालबावटा कामगार युनियनने घरकुलासाठी ५ लाख रुपये अनुदान देण्याची मागणी केली आहे. गेल्या पाच वर्षात दरवर्षी हजारो मोर्चे काढले. घरांसाठी १० लाख रुपये अनुदानाची मागणी केली. त्याद्वारे भाजप सरकारने १४ जानेवारी रोजी बांधकाम कामगारांना घरबांधणीसाठी दीड लाख रुपयांची योजना आणली. परंतु त्यामध्ये घर होणे शक्य नाही. आता हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील बांधकाम कामगारांना त्यांचा लाभ मिळवून देण्यासाठी घरकुल हक्क परिषद आयोजित केली आहे. परिषदेसाठी माजी आमदार कॉ. नरसय्या आडम यांची प्रमुख उपस्थिती असेल. यावेळी दीड लाखांपेक्षा वेगळा प्रस्ताव सरकार व मंडळासमोर मांडण्यात येणार आहे.'

यावेळी कॉ. शिवाजी मगदूम, परशुराम कांबळे, विजय कांबळे, कुमार कागले, आप्पासाहेब कोठावळे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गवे, टस्कर, बिबटे गावांच्या वेशीवर

$
0
0

गवे, टस्कर, बिबटे गावांच्या वेशीवर

जंगलांत पाणीटंचाईच्या झळा; मानवी वस्तीकडील आक्रमण चिंताजनक

सागर पाटील, गगनबावडा

जंगलातील नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत कमी होणे, जंगलातील झाडांची तोड, चाऱ्याची कमतरता आदी कारणांमुळे गवा, हत्तीनंतर आता बिबटेही जंगलातील नैसर्गिक आधिवास सोडून मानवी वस्तीकडे वळू लागले आहेत. वन्यप्राण्यांच्या आक्रमणामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान तर होत आहेच. पण हे वन्यप्राणी प्राणघातक हल्ले करीत असल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. केवळ तालुक्यातील गावे नव्हे तर कोल्हापूर शहरापर्यंत आणि कागल तालुक्यातही गव्यांचा उपद्रव जाणवू लागला आहे.

पश्चिम घाटमाथ्यावरील राधानगरी,दाजीपूर , चांदोली, सागरेश्वर ही अभयारण्य वन्यजीवांसाठी संरक्षित क्षेत्रे आहेत. शिवाय घाटमाथ्यावरील घनदाट जंगलात जंगली प्राण्यांचे वास्तव्य आहे. अलिकडील काही वर्षात वाढत्या वृक्षतोडीमुळे जंगल क्षेत्र विरळ होत चालले आहे. शिवाय तापमानवाढीमुळे जंगलातील पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत कमी झाले आहेत .परिणामी जंगलातील वन्यजीव अन्न व पाण्याच्या शोधार्थ शेतवडीत किंबहुना मानवी वस्तीकडे वळू लागले आहेत. अलिकडेच जिल्ह्यात गव्यांचे कळप पन्हाळा, गगनबावडा व शाहुवाडी तालुक्यातील जंगलाशेजारील गावाबरोबरच पारगाव, पुनाळ-माजनाळ, कंदलगांव, कणेरी या कोल्हापूर शहराशेजारील गावातही सहज गेले आहेत.

काही दिवसांपूर्वी शहरालगतच्या शेतवडीत आलेल्या गवांनी वनविभागाला घाम फोडला होता. आसुर्ले- पोर्ले , मल्हारपेठ,वाघुर्डे परिसरात बिबट्याचा वावर आहे. शाहूवाडी तालुक्यातील सौते परिसरात बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला होता. गगनबावडा तालुक्यात टस्करने तब्बल दोन महिने धुमाकूळ घालून ऊस, केळी, नारळ आदी पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान केले होते.

वन्यजीव विभागाने केलेल्या सर्वेक्षणात गेल्या आठ वर्षात गव्यांची संख्या सरासरी २७३ तर ३ बिबटे आहेत. टस्कर कायमस्वरुपी नसले तरी वर्षभरातील बराच काळ ते घाटमाथ्यावरील जंगल भागात होते. वनप्राण्यांची सरासरी पाहता त्यांची संख्या फार वाढलेली दिसत नाही. पण त्यांच्या नैसर्गिक आधिवासात पुरेसे अन्न पाणी मिळत नसल्यानेच ते जंगला शेजारील शेतावडीत उतरत असल्याचे समोर आले आहे. शिवाय जिल्ह्यात सर्वत्र मुबलक पाणी असल्याने जंगलतोड करून नवीन जमीन पिकाखाली आणण्यासाठी सपाटीकरण होत आहे. त्यामुळे मूळच्या जंगल क्षेत्रात अतिक्रमण होत आहे .ऊसाचे कोंब व वाढलेल्या ऊसातील गोडवा गवांना आकर्षित करीत आहे. ते कळपाने येऊन खातात कमी पण नासाडीच अधिक करतात. ते एकदा शिवारात उतरले की पिकांचा सुफडासाप करूनच जंगलात परततात. त्यामुळे शेतकरी वर्ग अक्षरक्ष : मेटाकुटीला आला आहे. शेळ्या- मेंढया, कोंबडी कुत्री अशा भक्ष्यांच्या शोधात बिबटे ही मानवी वस्तीकडे वळले आहेत.

दुसरीकडे वन विभाग मात्र प्राण्यांच्या बंदोबस्तासाठी फारसे प्रयत्न करताना दिसत नाही. वन्यजीवांना जंगलातच पुरेसा अन्न व पाणी साठा उपलब्ध करून देणे गरजेचे आहेत. वनतळी, गवताळ कुरणे, वृक्षतोड व चोरट्या शिकारीला पायबंद घालणे, वनक्षेत्राला तारेचे कुंपण घालणे आदी उपाययोजना करणे गरजेचे आहे.

...

कोट

'इतर पशूपक्ष्यांप्रमाणे वन्यजीवही अन्न, पाणी व गारवा या गरजा भागविण्यासाठी कोठेही फिरू शकतात. या गरजा त्यांना जंगलातच उपलब्ध होण्याकरिता कुरण, वनतळी अशा उपाययोजना केल्या आहेत. भविष्यात जंगलात पाण्याचे झरे असणाऱ्या ठिकाणी मक्याचे पीक घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लोकांनीही जंगल भागात अतिक्रमण करण्याचे टाळावे. '

- ए. एच. मुल्ला, सहाय्यक वनसंरक्षक, वन्यजीव विभाग

कोल्हापूर विभागातील गवे, बिबट्यांची संख्या

सन गवा बिबटे

२०१३ २६४ २

२०१४ ३४१ १

२०१५ १५५ १

२०१६ ३१७ ५

२०१७ ३०२ ४

२०१८ २५९9 ६

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खातेदारांचे पैसे खासगी चिटफंडात

$
0
0

खातेदारांचे पैसे खासगी चिटफंडात

चौकशी सुरू; सहाशे खातेदारांची आरडी, एफडी पासबुके ताब्यात

म. टा. वृत्तसेवा, हातकणंगले

यळगूड (ता. हातकणंगले) येथील पोष्टात कर्मचाऱ्यांनी गावातील एजंटांनी सर्वसामान्यांकडून आरडी व एफडीच्या नावाखाली गोळा केलेल्या पैशांत सुमारे चार कोटी रुपयांचा अपहार केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी तत्कालीन सब पोष्टमास्तर अनिल सोनुले व तुकाराम कांबळे या दोन कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू करण्यात आली. आतापर्यंत सहाशे खातेदारांची पासबुके ताब्यात घेण्यात आली आहेत. या अपहार प्रकरणाच्या चौकशीत गंभीर प्रकार उघडकीस आले आहेत. काही खातेदारांचे आर. डी. आणि एफ.डी.चे पैसे एका खासगी चीटफंड कंपनीकडे वर्ग करण्यात आल्याचे समोर आले आहे.

अनेक खातेदारांनी आरडी व एफडीमध्ये पैसे भरले. काहीचे पैसे अज्ञातांनी बोगस सहीने खासगी चीटफंड कंपनीकडे वर्ग केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे अपहाराच्या रक्कमेत भर पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आज खातेदारांनी यळगूड पोस्ट कार्यालय, पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील कार्यालय आणि पोस्टाच्या रमणमळा येथील कोल्हापूर मुख्य ऑफिसात धाव घेऊन आपली कैफियत मांडली. साखरवाले, पाटील, जोशी या तीन महिला एजंटांनी वारंवार पोष्टाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही कारवाई झाली नसल्याचे सांगण्यात आले.

यळगूड बसस्थानकाजवळ ग्रामपंचायतीत पोष्ट कार्यालय आहे. येथे तत्कालीन सब पोष्टमास्तर अनिल सोनुले व तुकाराम कांबळे हे दोघे कर्मचारी कार्यरत होते. गावातील अंगणवाडी सेविका साखरवाले, पाटील आणि जोशी या तीन महिला एजंटांनी परिसरातील चांदी कामगार, बेकरी कामगारांसह सर्वसामान्य महिला व अन्य अंदाजे ५८० खातेदारांकडून आर.डी.चे पैसे जमवून २०१३ पासून पोष्ट ऑफिसात भरले. या आर.डी.ची मुदत नोव्हेंबर २०१८ मध्ये संपली. त्यामुळे काही ग्राहकांनी पोष्ट ऑफिसमध्ये किती रक्कम जमली यासह खात्यांची चौकशी केली. यावेळी आरडीचे पैसे आधीच काढून घेतल्याचे निदर्शनास आले.

त्यामुळे संतापलेल्या ग्राहकांनी गोंधळ घातला. काहीजणांनी कोल्हापूर विभागीय पोष्ट कार्यालयात तक्रार केल्यानंतर तत्काळ चौकशी समिती नेमण्यात आली आहे. समितीने चौकशी करताना अनेक गंभीर बाबी उघडकीस येत असल्याचे संबधित अधिकाऱ्यांनी सांगितले. यामध्ये ५८० जणांच्या आरडीचे अंदाजे चार कोटी रुपये परस्पर उचलून अपहार झाल्याचे दिसून येत आहे. तत्कालीन सब पोष्टमास्तर सोनुले व कांबळे या दोघांनी अपहार केल्याची तक्रार खातेदारांनी केली आहे. कोल्हापूर विभागीय कार्यालयाकडून नियुक्त समितीने सोमवारी सहाशे खातेदारांची पासबुके ताब्यात घेऊन किती पैशांचा अपहार झाला, पासबुकांवर किती बोगस शिक्के आहेत याची माहिती घेतली. येत्या दोन दिवसांत चौकशी करून संबधित कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल होईल असे सूत्रांनी सांगितले. या रक्कमेच्या वसुलीचेही प्रयत्न सुरू आहेत.

त्रिस्तरीय समिती

यासंदर्भात कोल्हापूर मुख्य पोस्ट ऑफिसच्यावतीने चौकशीसाठी त्रिस्तरीय समिती नियुक्त केली आहे. समितीमार्फत संबंधीत कर्मचाऱ्यांचे जबाब, रेकॉर्ड तपासणी सुरू आहे. खातेदारांच्या तक्रारींचीही नोंद घेतली जात आहे. या कार्यालयातील अन्य खात्यांचीही तपासणी केली जाणार आहे असे सूत्रांनी सांगितले.

यळगूड पोष्ट कार्यालयातील अपहारास कारणीभूत असल्याप्रकरणी अनिल सोनुले व तुकाराम कांबळे यांची चौकशी सुरू आहे. दोन दिवसांत चौकशी करून कारवाई करण्यात येईल. संबंधीत दोषी आढळल्यास त्यांच्याकडून रक्कम वसूल केली जाईल. सर्व खातेदारांना चौकशीअंती पैसे परत केले जातील.

- आय. डी. पाटील, वरिष्ठ अधीक्षक, कोल्हापूर डाकघर

आम्ही चांदीची भरणी करुन, पोटाला चिमटा देऊन पै-पै जमवून आरडीचे पैसे भरले. अपहारामुळे आयुष्यभर केलेली कमाई वाया जाते की काय अशी भीती वाटत आहे. माझे पोष्टात एक लाख तर खासगी चीटफंडात चार लाख रुपये अडकले आहेत. या दोन्हीत साखरवाले याच एजंट आहेत.

- जयश्री घोरपडे, यळगूड

मुलीच्या लग्नासाठी पोष्टात अनेक वर्षांपासून पैसे भरले. आतापर्यंत एक लाख चाळीस हजार रुपये साठवले होते. याची मुदत संपूनदेखील संबधित तत्कालीन पोष्टमास्तर सोनूले व तुकाराम कांबळे हे पैसे देण्यास टाळाटाळ करत होते. वादावादी झाल्यावर दोघांनी आमच्याकडून पैसे खर्च झाल्याची कबुली दिली होती. त्यांनी मला पाच हप्त्यात पैसे परत केले आहेत.

- वसंत शिंदे, माजी ग्रामपंचायत सदस्य, यळगूड

फोटो

यळगुड पोष्टात झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या अपहाराने गावात खळबळ उडाली आहे. याबाबतचे वृत्त प्रसिद्ध होताच अनेक खातेदारांनी पोस्ट कार्यालयात धाव घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साखर जप्तीच्या नोटिसांचा ससेमिरा वाढणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

एफआरपीचे तुकडे करुन २३०० रुपयांचा भरणा करणाऱ्या कोल्हापूर विभागातील २४ कारखान्यांना साखर जप्तीच्या नोटिसा पाठवण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यापूर्वी १२ कारखान्यांना नोटिसा बजावण्यात आली असून त्यांना म्हणणे मांडण्यासाठी सात ते पंधरा दिवसाची मुदत दिली आहे.

साखर कारखान्यांकडील थकीत एफआरपीची वसुली करण्यासाठी यापूर्वी साखर आयुक्तांच्या आदेशानुसार १२ कारखान्यांची जंगम व स्थावर मालमत्ता जप्त करण्यााचे आदेश दिले आहेत. कोल्हापूर विभागातील बहुतांशी कारखान्यांनी एफआरपीचे तुकडे पाडून प्रतिटन २३०० रुपयांप्रमाणे उसाची बिले शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहेत. कारखान्यांनी एकरकमी एफआरपी देण्यास असमर्थता दर्शवल्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलनाची भूमिका घेतली. त्यानंतर साखर आयुक्तांनी कारखान्यांना नोटिस काढली आहे. कोल्हापूर विभागातील अन्य २४ कारखान्यांना पुढील काही दिवसांत नोटिस बजावण्याचे संकेत प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाने दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१४ दिवसांपासून सोलापूर मनपा परिवहनचा संप मिटला

$
0
0

१४ दिवसांपासून सोलापूर मनपा परिवहनचा संप मिटला

सोलापूर

न्यायप्रविष्ठ असलेला थकीत दहा महिन्यांचा आणि त्या नंतरच्या दोन महिन्यांचा पगार मिळावा या मागणीसाठी गेल्या १४ दिवसांपासून परिवहन कामगारांनी पुकारलेला संप मंगळवारी मागे घेतला. महापौर शोभा बनशेट्टी, काँग्रेस गटनेते चेतन नरोटे, परिवहन सभापती तुकाराम मस्के यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी यामध्ये लक्ष घातल्यानंतर मनपा आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी कामगारांना एक महिन्याचा पगार मंगळवारी रोखीने दिला तर दुसरा पगार बँकेत खात्यावर जमा करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने १४ दिवसानंतर संप मिटला.

दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून सात रस्ता डेपोत धक्याला लावण्यात आलेल्या बसेस मंगळवारी दुपार रस्त्यावर धावण्यासाठी बाहेर पडल्याने प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. मात्र, या १४ दिवसांच्या संपाच्या काळात परिवहनचे सुमारे २८ लाखांचे उत्पन्न बुडाले आहे. संपावर तत्काळ तोडगा काढला असता तर २८ लाख परिवहनच्या तिजोरीत येऊन त्यामुळे कामगारांच्या पगाराचा काही अंशी खर्च भागला असता, अशी चर्चा कामगारांमध्ये होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images