Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

पंढरपूर-सोलापूर रस्त्यावरील अपघातात सहा ठार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर

पंढरपूर-सोलापूर रस्त्यावर मारुती इको आणि एसटीची भीषण धडक होऊन झालेल्या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून, एक मुलगी गंभीर जखमी झाली आहे. दुपारी साडेचारच्या सुमारास पंढरपूरनजीकच्या ईश्वरपठार येथे ही घटना घडली.

मुंबईमधील घाटकोपर परिसरात राहणारे सुरेश कोकणे आपल्या कुटुंबीयांसह अक्कलकोट येथून पंढरपूर येथे दर्शनाला येत असताना दुपारी चार वाजता ईश्वरपठार येथे अपघात झाला. पंढरपूरकडून अक्कलकोटला निघालेल्या बसला त्यांच्या मारुती इको कारने एसटी बसला भीषण धडक दिली. कारने समोरून धडक दिल्याने त्यांची गाडी थेट बसमध्ये घुसली होती. जोरदार आवाजाने जवळपासच्या ग्रामस्थांनी तातडीने मदत करीत पहिल्यांदा गाडीतील जखमींना बाहेर काढायचा प्रयत्न केला. मात्र, जागीच पाच जणांचा जागीच मृत्यू झाला होता. जखमी तरुण आणि तरुणीला तातडीने उपचारासाठी पंढरपूर येथील सरकारी रुग्णालयात हलविण्यात आले. उपचार सुरु असताना तरुणांचाही मृत्यू झाला, तर गंभीर अवस्थेतील जखमी तरुणीला उपचारासाठी सोलापूरला हलविण्यात आले. या अपघातातील सुरेश कोकणे यांचे मुंबई येथे लक्ष्मी केटरर्स ही फर्म असून, अपघातात मृत आणि जखमी झालेल्यांची नावे अशी, सुरेश रामचंद्र कोकणे (६८), सचिन सुरेश कोकणे (४०), सविता सचिन कोकणे (३४), आर्यन सचिन कोकणे (१२), श्रद्धा राजेश सावंत (२०), प्रथम राजेश सावंत (१६) या सहा जणांचा मृत्यू झाला आहे, तर धनश्री राजेश सावंत (१९) गंभीर जखमी आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


किरणोत्सवाअभावी भाविकांची निराशा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

करवीरनिवासिनी अंबाबाई देवीच्या किरणोत्सवात शनिवारी ढगाळ वातावरणाचा अडथळा आला. दुपारपासून सूर्यकिरणे लुप्त झाल्याने पूर्ण किरणोत्सव होऊ शकला नाही. त्यामुळे किरणोत्सवाला आणि देवीच्या दर्शनासाठी जमलेल्या भाविकांची प्रचंड निराशा झाली.

गेल्या चार दिवसांपासून अंबाबाई देवीचा किरणोत्सवात तिसऱ्या दिवशी शुक्रवारी देवीच्या म्हाळुंगापर्यंत किरणे पोहोचली होती. त्यामुळे अखेरचे दोन दिवस पूर्ण किरणोत्सव होईल, अशी भाविकांची अपेक्षा होती. किरणोत्सव पाहण्यासाठी भाविकांनी गर्दीही केली होती. दुपारी एक वाजेपर्यंत प्रखर सूर्यकिरणे असल्याने किरणोत्सव पूर्ण होईल, अशी अपेक्षा भाविकांना होती. सायंकाळी पाच वाजता किरणे महाद्वारच्या पायरीजवळ आल्यानंतर किरणोत्सवाला सुरुवात झाली. पण सायंकाळी साडेचार वाजल्यापासूनच ढगाळ वातावरण तयार झाले. सायंकाळी सहापर्यंत वातावरण तसेच राहिल्याने किरणोत्सव होऊ शकला नाही. परिणामी भाविकांचा हिरमोड झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूर लोकसभेचा प्रस्ताव कायम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाची जागा काँग्रेसला मिळावा हा प्रस्ताव आजही पक्षाच्या प्रदेश पातळीवर कायम आहे. मात्र, आगामी लोकसभा निवडणुकीत दोन्ही काँग्रेस आघाडीचा जो उमेदवार असेल त्याच्या पाठीशी ठाम उभे राहू. कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात आघाडीचे उमेदवार शंभर टक्के विजयी होतील'असे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले. आघाडीच्या निर्णयानंतर ज्या-त्या वेळी संबंधीतांची नाराजी दूर होईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्या घोषणेनुसार काँग्रेस सत्तेत आल्यानंतर गरीबांसाठी किमान उत्पन्न योजनेची सुरूवात होणार असल्याचे त्यांनी सांगितले. आवाडे म्हणाले, 'वरिष्ठ पातळीवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह अन्य समविचारी पक्षांसोबत आघाडीची चर्चा सुरू आहे. कोल्हापूरची जागा राष्ट्रवादीला व हातकणंगलेची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडण्याबाबत चर्चा आहे. काँग्रेसच्या संघर्ष यात्रेत येथील स्थानिक नेत्यांनी कोल्हापूरच्या जागेवर दावा केला होता. ती मागणी आजही प्रदेश काँग्रेसकडे कायम आहे. अद्याप आघाडी झाल्याबाबत पक्षाचा आदेश नाही. मात्र दोन्ही काँग्रेसच्या आघाडी धर्मानुसार जो उमेदवार ठरेल, त्याच्या पाठीशी उभे राहू. काँग्रेस पक्ष हा दिलेला शब्द पाळणारा पक्ष आहे, तर भाजप केवळ आश्वासन देते.'

पत्रकार परिषदेला आमदार सतेज पाटील, प्रदेश सचिव प्रकाश सातपुते, शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, संध्या घोटणे, राहूल आवाडे, अॅड. सुरेश कुराडे उपस्थित होते.

आता आम्ही शहाणे झालो

'पक्षांतर्गत कुरबुरीमुळे नुकसान झाल्याची दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांना जाणीव झाली आहे. आम्ही आता शहाणे झालो आहेत. पक्षातंर्गत काही रुसवे, फुगवे, तक्रारी आहेत. त्या दूर होतील. नजीकच्या काळात काँग्रेसमध्ये अनेकांची 'घरवापसी' होईल' असे आवाडे म्हणाले. 'पक्षाची जिल्ह्यावरील ढिली झालेली पकड मजबूत करण्यासाठी जुन्या-नव्यांना एकत्र करुन संघटन बांधणी केली जाईल. लोकसभा व विधानसभेला चांगला रिझर्ल्ट देऊ. पक्षाच्या बांधणीसाठी दहा फेब्रुवारीनंतर तालुकानिहाय आढावा बैठका होणार आहेत. दौऱ्यात माझ्यासह आमदार सतेज पाटील, माजी खासदार जयवंतराव आवळे, माजी आमदार पी. एन. पाटील यांचा समावेश असेल' असे आवाडे यांनी सांगितले.

प्रदेशाध्यक्षांची इचलकरंतीत सभा

आवाडे म्हणाले, 'रविवारी (ता. ३) काँग्रेस कमिटीत तालुका पदाधिकारी, गेल्या विधानसभा, जिल्हा परिषद निवडणुकीतील पक्षाच्या उमेदवारांची बैठक बोलावली आहे. पश्चिम महाराष्ट्र काँग्रेस पदाधिकारी सोनम पटेल यांच्या उपस्थितीत सहा फेब्रुवारीला पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची नऊ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता इचलकरंजीतील शहापूर येथे जाहीर सभा होणार आहे.'

पी. एन., आवळे अनुपस्थित

काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील व माजी खासदार जयवंतराव आवळे उपस्थित नव्हते. त्यावर जिल्हाध्यक्ष आवाडे म्हणाले, 'दोघेही पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे बैठकीला अनुपस्थित आहेत. दोघांशीही आपले बोलणे झाले आहे. पी. एन. हे मतदारसंघातील कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी तर आवळे हे दिल्लीला गेले आहेत.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंडलिक-घाटगे एकत्र यावे ही जनभावना

$
0
0

फोटो...

म. टा. वृत्तसेवा, कागल

'दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिक आणि विक्रमसिंह घाटगे यांच्या पश्चात त्यांच्या वारसांनी एकत्र यावे ही जनभावना आहे आणि ती जपण्याचा प्रयत्न केला जाईल,' असे प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख प्रा. संजय मंडलिक यांनी केले. सिद्धनेर्ली (ता. कागल) येथे आयोजित सात कोटींच्या विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी पुणे म्हाडाचे अध्यक्ष समरजित घाटगे आणि आमदार प्रकाश आबिटकर प्रमुख उपस्थित होते.

प्रा. मंडलिक म्हणाले, 'वडिलांच्या निधनानंतर माझी आणि समरजित घाटगेंची वाटचाल रेल्वेच्या रूळांप्रमाणे सुरू आहे. आमच्या दोघांच्याही वडिलांनी जरी संघर्ष केला असला तरी त्यांचे वारस म्हणून आमच्यात कोणताही संघर्ष नाही, त्यामुळे रेल्वे रूळाला जंक्शन येतेच. तसे आम्ही एकत्र येण्याला विधायकता आणि समाजकारण कारणीभूत ठरेल. यापूर्वी ग्रामपंचायत निवडणुकीत आमच्या दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत यश संपादन केले. त्यामुळे मी व घाटगे एकत्र यावे ही अगोदरपासूनच जनभावना आहे. निवडणुकीतील युती, आघाड्या कशाही असू देत, पण विधायक कामात पाठिंबा देण्याची आमची कायमच भूमिका राहील.'

समरजित घाटगे म्हणाले, 'दिवंगत मंडलिक व राजे विक्रमसिंहांनी समोरासमोर संघर्ष केला, पाठीमागून वार कधी केले नाहीत. त्यांच्या निधनानंतर आम्ही एकाच विचारधारेने काम करतोय ते पाहता येत्या काळात मंडलिक-घाटगे या विचारधारेनेच काम केले पाहिजे. भूतकाळ विसरला पाहिजे. पक्षाचा जो निर्णय असेल तो पाळणारच, हे जरी खरे असले तरी विक्रमसिंह व मंडलिकांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता आपण एकत्र येऊया. मंडलिकांचे स्वप्न २०१९ च्या निवडणुकीत आपल्याला पूर्ण करायचे आहे आणि ती जबाबदारी माझ्यावर आली आहे.'

आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले, 'दिवंगत विक्रमसिंहराजे आणि मंडलिक यांनी जिल्ह्याला दिशा दिली. आता त्यांच्या दोन्ही वारसांकडून आम्हाला खूप अपेक्षा आहेत. त्यांना येत्या निवडणुकीत संधी देऊया.'

कार्यक्रमास शाहूचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, पंचायत समिती उपसभापती विजय भोसले, सरपंच सुरेखा पाटील, पंचायत समिती सदस्य पूनम मगदूम, राजे बँकेचे चेअरमन एम. पी. पाटील, आदी उपस्थित होते. दादासाहेब पाटील यांनी स्वागत केले. प्रा. सुनील मगदूम यांनी प्रास्ताविक केले. रमण पाटील यांनी आभार मानले.

००००००

एक तरी गाव सापडलं

'गेल्या काही दिवसांपासून मी पाचशे गावांचा दौरा केला. त्यातील एकाही गावाला विद्यमान खासदारांनी निधी दिल्याचे समजले नाही, परंतु सिद्धनेर्ली गावात खासदार निधी दिल्याचे समजले. मग ह्यांचा निधी जातो कुठे, असा प्रश्न पडतो. परंतु निधी दिल्याचे एक तरी गाव सापडले,' अशी प्रा. मंडलिक यांनी खिल्ली उडवली.

००००००

ऋणातून उतराई होऊ

प्रा. संजय मंडलिक म्हणाले, 'एका विधानसभेच्या निवडणुकीत घाटगे-मंडलिक संघर्ष होऊनसुद्धा दिवंगत राजे विक्रमसिंह घाटगे यांनी मला मनापासून पाठिंबा दिला होता. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत त्या ऋणातून उतराई होऊ.'

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माध्यमिक शिक्षक संघाचे धरणे आंदोलन

$
0
0

कोल्हापूर : सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीची कार्यवाही तातडीने करावी, अतिरिक्त शिक्षकांचे पूर्वीप्रमाणे जिल्हांतर्गत त्वरित समायोजन करावे यासह माध्यमिक शिक्षकांच्या २३ मागण्यांच्या पूर्ततेसाठी धरणे आंदोलन केले. कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघातर्फे जिल्हा परिषदेसमोर आंदोलन झाले. शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बी. एस. खामकर, सुरेश खोत, अनिल चव्हाण, संजय चोरमारे, जयसिंग देवकर, विलास साठे आणि सल्लागार बी. डी. पाटील यांचा आंदोलनात समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

९ कोटींच्या ठराव मंजुरीचे राजकारण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गेल्या आर्थिक वर्षातील ९ कोटी २२ लाख रुपयांच्या खर्चाच्या ठरावावर सही करण्यावरून जिल्हा परिषदेत पुन्हा राजकारण रंगले. सात डिसेंबरच्या सर्वसाधारण सभेत ठराव होऊनही त्यावर अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी सही केली नसल्याने विकासकामांवर परिणाम होत असल्याचा आरोप काँग्रेस व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सदस्यांनी केला. शनिवारी दुपारनंतर त्यांनी गटनेत्यांकडे याप्रश्नी जाब विचारत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. दिवसभराच्या घडामोडीनंतर सायंकाळी अध्यक्षा महाडिक यांनी ठरावावर यापूर्वीच सही केल्याचे सांगत प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

महिला व बालकल्याण समितीकडील एक कोटीहून अधिक रकमेच्या खर्चाचा प्रस्ताव फेरसादर करावा यासाठी वित्त विभागाने संबंधित कामांच्या फायली परत पाठवल्या. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता केव्हाही लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रस्तावित विकासकामे तत्काळ सुरू व्हावीत यासाठी सदस्य धावपळ करीत आहेत. पंचगंगा नदी प्रदूषणमुक्तीसाठी जादा रकमेची तरतूद केल्याचा आक्षेपही काही सदस्यांनी यापूर्वी घेतला होता. या पार्श्वभूमीवर डिसेंबरच्या सभेत सुधारित अंदाजपत्रकांत तरतूद केलेल्या खर्चाकडे त्यांच्या नजरा लागल्या आहेत. नंतर स्थायी समितीच्या दोन सभा होऊनही ठरावावर सही न झाल्याने सदस्यांत नाराजी भावना होती. महिला व बालकल्याण विभागासह सर्वच विभागातील विकासकामांच्या, वैयक्तिक लाभार्थ्यांचे प्रस्ताव रखडण्याची शक्यता निर्माण झाली होती.

महिला व बालकल्याण समिती सभापती वंदना मगदूम यांचे दीर राजू आणि जिल्हा परिषद सदस्या पद्मावती पाटील यांचे पती राजेंद्र यांनी नऊ कोटींच्या खर्चाच्या विकासकामांच्या ठरावावर अध्यक्षांच्या सहीला विलंब का? अशी विचारणा भाजप आघाडीचे गटनेते अरुण इंगवले यांच्याकडे केली. इंगवले यांनी यासंदर्भात चौकशी केल्यावर अध्यक्षांची सही झाली नसल्याची माहिती स्वीय सहायकांकडून मिळाली. त्यानंतर सदस्यांच्या नातेवाईकांनी उपमुख्य लेखाधिकारी राहुल कदम व किरण निकम यांचे कार्यालय गाठले. त्यांनी अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. ठरावाला विलंब होत असल्याने जिल्हा परिषदेसमोर सदस्य ठिय्या आंदोलन करतील असा इशारा दिला. त्यामुळे पदाधिकारी व अधिकारी हडबडले. सायंकाळ‌ी साडेसहा वाजत ठरावावर अध्यक्षांची सही झाल्याचा निरोप घेऊन अधिकाऱ्यांनी महिला व बालकल्याण विभाग गाठले.

९ कोटी २२ लाख रुपयांच्या खर्चाच्या ठरावावर यापूर्वीच सही केली आहे. विविध विकासकामे मुदतीत पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या आहेत. मात्र, काही लोकांना माहिती न घेता दंगा करण्याची सवय आहे.

- शौमिका महाडिक, अध्यक्षा

सर्वसाधारण सभा होऊन दीड-दोन महिने झाले तरी विकासकामांच्या खर्चाच्या ठरावावर सही होत नाही. सदस्य सातत्याने पाठपुरावा करुनही मागण्यांकडे दुर्लक्ष केले जाते. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांशी चर्चा करुन आंदोलनाचा निर्णय घेऊ.

- राहुल आवाडे सदस्य, काँग्रेस

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनुदानीत सिलिंडरचा भाव घसरला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गेल्या सहा महिन्यात सर्वात कमी घरगुती सिलिंडरचा दर या महिन्यात राहिला. नोव्हेंबरमध्ये सर्वाधिक ९२८वर गेलेल्या सिलिंडरचा दर आता ६७४ रुपये इतका झाला आहे. त्यामुळे ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला.

अनुदानीत सिलिंडरचा भाव आठ महिन्यापूर्वी ९०० वर गेला होता. गरीब, सामान्य कुटुंबांचे आर्थिक बजेट कोलमडले होते. आगामी काळात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. महागाईवर नाराज झालेल्या जनतेला दिलास देण्याचा प्रयत्न भाजप सरकारकडून होत आहे. यातूनच अनुदानीत सिलिंडरचा दर कमी करण्यात आले आहेत. १४ किलोच्या सिलिंडरच्या टाकीचा दर डिसेंबरमध्ये ७९४ तर जानेवारीत ६७६ रूपये राहिला. यामध्ये अनुदानाचे १७६ रूपये संबंधीताची बँक खात्यावर जमा होत आहे. यामुळे लाभार्थीस सिलिंडरसाठी ५०० रूपयेच खर्च होत आहेत.

दोन महिन्यांच्या तुलनेत या महिन्यात अचानकपणे दर कमी झाल्याने अनेकांना अनुदान वजा करूनच पूर्वीप्रमाणे पैसे घेतले जात आहेत, असा समज झाला. मात्र प्रत्यक्षात सिलिंडरची किंमतच कमी झाली आहे.

सिलिंडरचे दर असे : ऑगस्ट - ७७६, सप्टेंबर - ८०६, ऑक्टोबर - ८६४, नोव्हेंबर - ९२८, डिसेंबर - ७९४.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Rahul Gandhi: मोदींनंतर राहुल गांधी सोलापुरात येणार

$
0
0

सोलापूरः

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी येत्या १३ फेब्रुवारीला सोलापुर दौऱ्यावर येत आहेत. सोलापूर लोकसभेसाठी काँग्रेस पक्षाकडून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची उमेदवारी निश्चित झाली असून शिंदे यांनी मागील दोन महिन्यांपासूनच मतदार संघात प्रचाराच्या अनुशंगाने भेटीगाठी सुरु केल्या आहेत. यंदा सोलापुरात मोदी लाट ओसरली असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळं शिंदे यांना यंदाच्या निवडणुकीत सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे असं कार्यकर्त्यांचं मत आहे. दरम्यान सुशीलकुमार शिंदे यांनी जोरदार तयारी सुरु केली असून त्यांच्या प्रचारासाठी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची जाहीर सभा घेण्याचे निश्चित झाले आहे.

१३ फेब्रुवारी रोजी राहुल गांधी हे एका खासगी कार्यक्रमानिमित्त मुंबईत येत आहेत. याच दिवशी महाराष्ट्रात त्यांचे एकूण तीन कार्यक्रम होणार असून त्यापैकी एक कार्यक्रम सोलापुरात होणार आहे. काँग्रेसची महाराष्ट्रातील पहिली जाहीर सभा सोलापुरात घेण्यासाठी सुशीलकुमार शिंदे यांनी आपली ताकत पणाला लावली आहे. राहुल यांच्या सभेसाठी सोलापुरातील एकूण चार मैदानांची पाहणी करण्यात आली आहे. त्यापैकी पूर्व भागातील कुचन प्रशालेच्या मैदानावर सभा घेण्यावर शिक्कामोर्तब झाल्याचे सांगण्यात येते. राहुल यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सुद्धा सोलापुरातील सभेत उपस्थित असणार आहेत. आमदार सिद्धाराम म्हेत्रे, आमदार भारत भालके, आमदार प्रणिती शिंदे आणि माजी आमदार दिलीप माने यांच्यावर राहुल गांधींच्या सभेसाठी मैदान निश्चित करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी सुशीलकुमार शिंदे यांना उमेवारी देण्याबाबत शिक्कामोर्तब झाल्याच्या चर्चेनंतर शिंदे स्वतः कामाला लागले आहेत. त्यांनी आपल्या मतदार संघातील अनेक गावांना भेटी देऊन तसेच हुरडा पार्टीच्या माध्यमातून प्रचाराला सुरुवात केली आहे. दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, मंगळवेढा, उत्तर सोलापूर आणि सोलापूर शहरातील अल्पसंख्यांक परिसरातील काही भागांवर शिंदे यांची भिस्त आहे. भाजपकडून विद्यमान खासदार शरद बनसोडे कि राज्यसभेचे खासदार अमर साबळे यांपैकी कोणाचेही नाव निश्चित झाले नसले तरी बनसोडे यांचे तिकीट कापून साबळे यांना उमेदवारी देण्याबाबत वरिष्ठ पातळीवरून जोरदार चर्चा सुरु आहे. बनसोडे यांच्या उमेदवारीची भिस्त पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यावर आहे.

मागील निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद बनसोडे यांच्यासाठी सोलापुरात जाहीर सभा घेतली होती. तर यंदा शिंदे यांच्यासाठी स्वतः राहुल गांधी सोलापुरात जाहीर सभा घेत असल्याने शिंदे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


२५ वर्षे कोल्हापूरसाठी काय केले?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'ज्यांच्या घरात २५ वर्षे खासदारकी, आमदारकी आहे, त्यांनी त्या काळात कोल्हापूरसाठी काय केले? इतकी वर्षे सत्ता भोगूनही पदांचा किती हव्यास ठेवायचा. वडील खासदार म्हणून मुलांनी खासदार बनावे हे दिवस आता नाहीत, त्यासाठी समाजात मिसळून लोकांची कामे करावीत,' असा टोला खासदार धनंजय महाडिक यांनी भीमा फेस्टिव्हलच्या मंचावरून प्रा. संजय मंडलिक यांचे नाव न घेता लगावला.

छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे आयोजित भीमा फेस्टिव्हलच्या समारोपप्रसंगी बोलताना महाडिक म्हणाले, 'लोकसभेच्या निवडणुकीला दोन महिने उरलेत. प्रचाराला सुरुवात केली आहे. माझ्यावर ऊठसूट टीका करणाऱ्यांना नागरिकांनी यापूर्वीच्या निवडणुकीतून उत्तर दिले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत विरोधक कुणीही असो, विजय माझाच होणार आहे. जो धाडस करतो तोच समाजात प्रिय असतो. कोल्हापूरकरांच्या पाठबळावर तीन वेळा संसदरत्न झालो.'

महाडिक पुढे म्हणाले, 'समाजातील प्रत्येक घटकासाठी आपण कार्यरत आहे. लोकांचे मनोरंजन, कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे म्हणून पदरमोड करून वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. महाडिक कुटुंबीय नागरिकांच्या सेवेत आहे. आगामी लोकसभा निवडणूक लढविणार आहे, तुमची साथ महत्त्वाची आहे. तुमची साथ कायम राहूद्या.'

०००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिरोळमध्ये कॅन्सरचे १४०२ संशयित रुग्ण

$
0
0

जागतिक कर्करोग दिन विशेष ... लोगो

Appasaheb.Mali@timesgroup.com

Tweet:Appasaheb_MT

कोल्हापूर

बदलती जीवनशैली, तंबाखू सेवनाचे वाढते प्रमाण आणि महिलांतील आजाराची उकल होण्यास लागणारा विलंब यामुळे जिल्ह्यात कॅन्सर रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जिल्हा परिषदेच्या 'कॅन्सर रुग्ण शोध'मोहिमेंतर्गत गेल्या दोन महिन्यांतील सर्वेक्षणात शिरोळ तालुक्यात १४०२ संशयित रुग्ण आढळले आहेत. तर करवीर तालुक्यात गतवर्षी ३६ जण कॅन्सरबाधित असल्याचे सामोरे आले. दुसरीकडे शिरोळ तालुक्यातील कॅन्सरच्या वाढत्या समस्येवर संशोधन करण्यासाठी तेरा गावांची 'कॅन्सर रजिस्ट्री' बनवली आहे.

जिल्हा परिषद व टाटा मेमोरियल ट्रस्टतर्फे 'कॅन्सर रजिस्ट्री' हा कार्यक्रम हाती घेतला आहे. या संयुक्त उपक्रमांतर्गत तेरा गावातील गेल्या पाच वर्षांतील आकडेवारी उपलब्ध झाली आहे. शिरदवाड, शिवनाकवाडी, टाकळीवाडी, दानवाड, बुबनाळ, नृसिंहवाडी, अर्जुनवाड, चिपरी, कोंडिग्रे, कोथळी, यड्राव, धरणगुत्ती, कनवाड या गावांचा सर्व्हे केला आहे. २०१३ ते २०१८ या कालावधीत या तेरा गावामध्ये २१३ कॅन्सर रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ७८ रुग्ण दगावले आहेत. कॅन्सर होण्यामागील नेमकी कारणे, लक्षणे, मानवी आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास टाटा मेमोरियलकडून सुरू असल्याचे जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, जिल्हा परिषदेने 'कॅन्सर पूर्व लक्षणे व रुग्ण शोध मोहिम'सुरू केली आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक, तत्कालिन सीईओ कुणाल खेमनार यांच्या पुढाकारातून ही मोहिम सुरू झाली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीतून या मोहिमेसाठी २९ लाख रुपयांचा निधी मंजूर केला. या मोहिमेंतर्गत आढळलेल्या कॅन्सरग्रस्त रुग्णांना उपचाराला मदत म्हणून पंधरा हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. करवीर तालुक्यातील ३६ कॅन्सर रुग्णांना पाच लाख ४० हजार रुपयांचे अनुदान वितरित केले आहे.

जि.प.च्या आरोग्य विभागातर्फे ऑक्टोबर ते डिसेंबर २०१८ या कालावधीत शिरोळ तालुक्यात सर्वेक्षण झाले. आशा कर्मचाऱ्यांतर्फे जवळपास ६७ हजार कुटुंबीयांना प्रत्यक्ष भेटी देऊन माहिती संकलित केली आहे. आरोग्य विभागाने कॅन्सर रुग्ण शोधासाठी सोळा प्रश्नांचा फॉर्म बनविला आहे. या सर्वेक्षणात तालुक्यातील १४०२ जण संशयित रुग्ण आढळले आहेत. संशयित रुग्णांची प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी होणार आहे. अॅपल सरस्वती हॉस्पिटल आणि कोल्हापूर कॅन्सर सेंटर हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत संशयित रुग्णांची तपासणी होणार आहे. लवकरच प्राथमिक आरोग्य केंद्रात शिबिर होणार असल्याची माहिती शिरोळ तालुक्याचे आरोग्य अधिकारी पी. एस. दातार यांनी दिली.

.......................

करवीरमध्ये आढळले ३६ कॅन्सर रुग्ण

करवीर तालुक्यात २०१७-१८ मध्ये 'कॅन्सर रुग्ण शोध'मोहिम राबवली. आशा सेविकांनी गावोगावी फिरुन 'घर टू घर' सर्व्हेक्षण केले. यामध्ये २७१४ संशयित रुग्ण आढळले. भुये, हसूर दुमाला, कणेरी, शिरोली दुमाला, इस्पुर्ली, मुडशिंगीत तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली सहा शिबिरे झाली. या तपासणीत तालुक्यात ३६ कॅन्सर रुग्ण आढळले. काही रुग्णांत पोटात दुखणे, अंगातून रक्तस्त्राव, तोंडामध्ये व्रण, महिला रुग्णांत स्तनात गाठी अशी प्राथमिक लक्षणे आढळल्यानंतर उपचार झाले आहेत. दरम्यान, कॅन्सर रुग्णांना दिल्या जाणाऱ्या अनुदानात वाढ करण्याची नागरिकांची मागणी आहे.

...................

की... कोटा १, २

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फोटोग्राफर्स छायाचित्र प्रदर्शनाला प्रारंभ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर अॅमॅच्युअर फोटोग्राफर्स असोसिएशनतर्फे येथील शाहू स्मारक भवनात आयोजित छायाचित्र प्रदर्शनाचे उदघाटन रविवारी आमदार सतेज पाटील यांच्याहस्ते झाले. मलबार नेचर क्लबचे अध्यक्ष काका भिसे प्रमुख उपस्थित होते. उदघाटन कार्यक्रमात आमदार पाटील यांनी फोटोग्राफर्स असोसिएशनला सर्वतोपरी मदत केली जाईल, असे आश्वासन दिले. असोसिएशनचे संस्थापक ज्ञानेश्वर वैद्य, संतोष काळे, चेतन कोटक आदी उपस्थित होते.

गोवा येथील झुमइन फोटोग्राफी क्लब व पी. एम. पी. कोलकात यांच्यातर्फे देशपातळीवरील 'झुमइन नॅशनल डिजिटल सर्किट २०१८' नावाने ऑनलाईन छायाचित्र प्रदर्शन घेण्यात आले होते. त्या प्रदर्शनातील विजेते राजेंद्र डुमणे, नितीन सोनावने, दक्षा बापट, संतोष काळे, डॉ. दशावतार बडे, आप्पासाहेब चौगुले आदींचा विशेष मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. त्यांनी टिपलेली आणि मोनोप्रॉम, कलर, ट्रॅव्हल, अशा प्रकारची १०५ छायाचित्रे प्रदर्शनात आहेत. प्रदर्शन मंगळवारअखेर खुले राहणार आहे.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजप सत्तेतून जाईल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'तीन राज्यांत मतदारांनी चपराक दिल्यानंतर भाजप भानावर आला. पन्नास वर्षे सत्तेत राहू असे म्हणणाऱ्या अमित शहा यांची भाषा बदलली. त्यांना आता लोकसभेच्या २०० जागा जिंकू की नाही, असे वाटू लागले आहे. म्हणूनच शेतकऱ्यांना गोंजारण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. असेच चित्र राहिल्यास केंद्र, राज्यातून भाजपची सत्ता जाईल,' असा अंदाज ज्येष्ठ राजकीय विश्लेषक पत्रकार हेमंत देसाई यांनी व्यक्त केला.

संजय कात्रे लिखित 'नाइन इलेव्हन' पुस्तक प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. 'पाच राज्यांतील निवडणुकांचा अन्वयार्थ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुका' हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. रविवारी शाहू स्मारक भवनात कार्यक्रम झाला.

देसाई म्हणाले, 'कर्जमाफी केल्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा मिळणार नाही, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवातीला घेतली होती. दरम्यान, खासदार राजू शेट्टी यांनी आंदोलन तीव्र केले. देशपातळीवरील शेतकरी नेत्यांना एकत्र आणले. राष्ट्रीय किसान महासंघाच्या नेतृत्वाखाली शेतकरी संपावर गेले. शेती, शेतकऱ्यांचे प्रश्न ऐरणीवर आले. परिणामी मुख्यमंत्री फडणवीस यांना कर्जमाफीचा निर्णय घ्यावा लागला. नुकत्याच झालेल्या एका सर्व्हेनुसार मोदींची लोकप्रियता कमी होऊन राहुल गांधी यांची वाढत आहे. गेल्यापेक्षा येत्या लोकसभेला भाजपच्या जागा कमी येतील, असा निष्कर्ष आला आहे. यामुळे शेतकऱ्यांसाठी काहीतरी करीत आहोत, असे दाखविण्याची वेळ भाजपवर आली आहे.'

ते पुढे म्हणाले, 'भ्रष्टाचार, घोटाळ्यात सर्वपक्षीय नेते आहेत. खासगी व्यक्ती, कंपन्यांकडून निवडणूक फंड मिळवण्यात भाजप आघाडीवर राहिला. मर्जितील कंपन्यांना फायदा मिळवून देण्यासाठीचे धोरण, निर्णय घेतले. अशाप्रकारे भाजप घोटाळ्यात सहभागी आहे. अनेक पातळ्यांवर सत्ताधारी अपयशी ठरले. त्या विरोधात काँग्रेसने जितक्या प्रखरपणे आवाज उठवणे अपेक्षित आहे, तितका दिसत नाही. मात्र आता विरोधकांत बदल दिसत आहे. राहुल गांधी आक्रमक झाले आहेत. विरोधक सत्तेवर आल्यास आपल्या भानगडी बाहेर, येतील असे त्यांना वाटत आहे.'

जीवन जोशी यांनी स्वागत केले. हृषिकेश जाधव यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. सुनील पाटील यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आघाडी धर्मानुसार प्रचार करणार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, आजरा

'निवडणूक कोणतीही असो, काँग्रेस पक्षाचा आदेश हाच आजपर्यंत प्रमाण मानून काम केले आहे. काँग्रेसशी किंवा त्यांच्या आघाडीशी गद्दारी माझ्या रक्तातच नाही. त्यामुळे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी धर्माप्रमाणेच अधिकृत उमेदवारांचाच प्रचार करणार,' असे प्रतिपादन काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांनी आजरा येथे केले.

'गोकुळ'च्या अध्यक्षपदी रवींद्र आपटे यांची दुसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल येथील अण्णा-भाऊ सांस्कृतिक सभागृहात आयोजित आजरा तालुक्याच्या सर्वपक्षीय सत्कार समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी खासदार धनंजय महाडिक होते. यावेळी आपटे यांचा पाटील व खासदार महाडिक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

खासदार महाडिक म्हणाले,"पक्षीय भूमिका प्रत्येकाच्या वेगळ्या असतात. अशा स्थितीत सहकार व राजकारणात सर्वसमावेशक अशक्य असते. पण आपटे असे सर्वपक्षीय नेते-कार्यकर्त्यांमध्ये स्वीकारार्ह राहिले आहेत, ही बाब दुर्मिळ जाणवते. म्हणूनच त्यांना दुसऱ्यांदा गोकुळचे अध्यक्षपद मिळाले. शेतीमालाचे भाव कोसळत असताना देशात आणि राज्यात आत्महत्यांचे लोण वाढते आहे. पण कोल्हापूर जिल्हा यापासून अलिप्त आहे. याला प्रत्येक महिन्याच्या ३, १३ आणि २३ तारखेला 'गोकुळ'कडून अगदी नेमाने मिळणारे दुधाचे बिल कारणीभूत आहे.'

आपटे म्हणाले, 'गोकुळ'चे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक, पी. एन. पाटील व सर्व संचालकांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरविणार आहे.'

यावेळी माजी मंत्री भरमूअण्णा पाटील, आजरा कारखान्याचे अध्यक्ष अशोक चराटी, गोकुळचे संचालक अरुणकुमार डोंगळे, उमेश आपटे, डॉ. सागर देशपांडे, नामदेव नार्वेकर यांचीही भाषणे झाली. संजय सावंत यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सत्तारुढ आघाडीचा ‘सेफ’ गेम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जात वैधता प्रमाणपत्रामुळे कोणत्याही क्षणी नगरसेवक अपात्र ठरण्याची शक्यता असल्यामुळे सत्तारुढ आघाडीने स्थायी समितीचे सदस्य सचिन पाटील आणि दीपा मगदूम यांचा राजीनामा घेतला होता. आता निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्याने या दोन्ही सदस्यांची पुन्हा 'स्थायी'मध्ये वर्णी लागणार आहे. केवळ मतदानासाठी 'स्थायी'मध्ये सदस्यत्व दिलेले माधवी गवंडी आणि प्रवीण केसरकर हे राजीनामा देणार आहेत. त्यासाठी गुरुवारी (ता. ७) सकाळी ११.३० वाजता महापालिकेची विशेष सभा होईल. स्थायी समितीच्या सदस्यांसोबत परिवहन समिती सभापती राहुल चव्हाण हेही सभेत राजीनामा देतील. सभेत नव्या सदस्यांची निवड होईल. सत्तारुढ काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या या 'सेफगेम'ची चर्चा रंगली आहे.

सहा महिन्यांत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केलेल्या महापालिकेच्या १९ नगरसेवकांचे पद अपात्र ठरविण्यात आले. मात्र राज्य सरकारने पूर्वलक्ष्यी प्रभावाने निर्णय घेत प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत एक वर्षाने वाढवली. तरीही महापालिकेच्या पाच नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार होती. यामध्ये सत्तारुढ गटाचे चार सदस्य असून त्यापैकी दोघेजण स्थायी समितीचे सदस्य होते. महापौर निवडीवेळी अखेरपर्यंत पाच सदस्यांना अपात्र ठरवून सत्ता ताब्यात घेण्याचा भाजपचा मनसुबा होता. पण ऐनवेळी या प्रयत्नांना खीळ बसली. त्यानंतर अवघ्या दीड महिन्यांत झालेल्या स्थायी समितीच्या सभापती निवडीत पुन्हा हा धोका कायम होता. याची खबरदारी घेत सत्तारुढ गटाने पाटील व मगदूम यांचा राजीनामा घेऊन रिक्त जागेवर माधवी गवंडी व प्रवीण केसरकर यांची निवड केली.

भाजपने गेल्यावर्षी सभापती निवडीत राष्ट्रवादीच्या दोन नगरसेवकांना फोडून सत्ता काबीज केली. त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी सत्तारुढ गटाने पुरेपूर काळजी घेतली. आता स्थायी निवड प्रक्रिया पूर्ण होताच सेफ गेमसाठी सदस्यपदी वर्णी लावलेल्या दोघांचा राजीनामा घेण्यात येणार आहे. त्यासाठी गुरुवारी विशेष सभा होत आहे. सभेत गवंडी व केसरकर यांचे राजीनामे मंजूर करत त्यांच्या ठिकाणी पुन्हा पाटील व मगदूम यांची वर्णी लावण्यात येईल. या सेफगेमची चर्चा महापालिकेच्या वर्तुळात रंगली आहे.

अभिजित चव्हाण यांना संधी

'स्थायी'च्या दोन सदस्यांसोबत परिवहन समितीचे सभापती राहुल चव्हाण यांचाही राजीनामा घेऊन त्यांच्या ठिकाणी अभिजित चव्हाण यांची निवड करण्यात येणार आहे. निवडीनंतर चव्हाण यांची परिवहन सभापतीपदी निवड निश्चित मानली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चुकांमधूनच आयुष्याची जडणघडण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आयुष्यात होणाऱ्या चुका या आपल्या जडणघडणीच्या प्रक्रियेचा एक महत्वाचा भाग आहेत. या प्रक्रियेमध्ये अनेकवेळा द्विधा मन:स्थिती तयार होण्याची शक्यता असते. अशा अडचणीवेळी स्वतःला कसे सावरावे आणि कसे यशोशिखर गाठले, याचे अनुभवकथन विविध क्षेत्रातील दिग्गजांनी केले. त्यांच्या मनोगतातून प्रेरणा घेत सहभागी विद्यार्थ्यांना स्वत:मध्ये बदल करण्याची इच्छा व्यक्त केली. निमित्त होते कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ टेकनॉलॉजीच्या कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगच्यावतीने आयोजित 'टेडेक्स केआयटीसीओईके' आंतरराष्ट्रीय परिषदेचे.

हॉटेल सयाजी येथे रविवारी ही परिषद पार पाडली. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर, शैक्षणिक सल्लागार डॉ. एस. एस. इनामदार प्रमुख उपस्थित होते. जगाच्या नकाशावर कोल्हापूरचे नाव पोहोचवलेले डॉ. नारळीकर वयाच्या ८० वर्षी त्याच ऊर्मीने कार्यरत आहेत. त्यांनी ब्रह्मांडामध्ये जीवसृष्टीचा शोध आणि संशोधन या विषयावर प्रकाशझोत टाकला. पृथ्वीवर येणाऱ्या जीवाणुंच्या प्रवासावरील संशोधनातील गृहीतके आणि विचार मांडले. ध्येयापासून विचलित न होण्याचे आवाहन त्यांनी तरुणांना केले.

तरंगफळ (ता. माळशिसर, जि. सोलापूर) येथील पहिल्या तृतीयपंथी सरपंच ज्ञानेश्वर कांबळे यांनी तृतीयपंथीय ते सरपंचपद असा जीवनप्रवास उलगडला. जीवनात आलेल्या अडचणींवर कशी मात केली हे सांगत त्यांनी ध्येय निश्चित असल्यास यश हमखास मिळते असे उपस्थितांना सांगितले.

हरियाणा व पंजाब येथील शेतीतून निर्माण होणाऱ्या कचऱ्यापासून बायो डिग्रेडेबल वस्तूंची निर्मिती, पर्यावरणीय उपक्रम आणि ग्रामीण सशक्तीकरणाबाबत दिल्लीतील प्राचीर दत्ता यांनी आपले अनुभव विषद केले. संजय पाटील यांनी संकरित बी-बियाण्यांच्या वापरातून निर्माण होणाऱ्या शेतीविषयक समस्यांचा आढावा घेऊन स्वदेशी बियाणांच्या वापराचे फायदे अनुभवातून व्यक्त केले. शैक्षणिक सल्लागार म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. इनामदार यांनी शिक्षण व्यवस्था 'प्रकल्पाधारित' असावी अशी भूमिका मांडली.

चर्चेत वरुण देशपांडे, साजिद चौगले, चक्रवर्ती सुलिबिले व पंकज कोपार्डे यांनी सहभाग घेतला. परिषदेसाठी केआयटीचे अध्यक्ष भरत पाटील, उपाध्यक्ष सुनील कुलकर्णी, सचिव दीपक चौगुले, संचालक डॉ. व्ही. व्ही. कार्जीन्नी, डॉ. अक्षय थोरवत व समन्वयक डॉ. महेश शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. स्वरदा फडणीस व अरुंधती पाटील यांनी सूत्रसंचालन केले. सुजय हम्मण्णवर यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अध्यक्षपदी डॉ. उद्धव पाटील

$
0
0

कोल्हापूर : महाराष्ट्र प्लास्टिक सर्जन्स संघटनेच्या (मॅप्सकॉन) अध्यक्षपदी येथील लक्षकिरण लेसर सेंटरचे चेअरमन डॉ. उद्धव पाटील यांची निवड करण्यात आली. असोसिएशनची द्वैवार्षिक राज्यव्यापी परिषद मुंबईत झाली. परिषदेत डॉ. पाटील यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब झाले. दोन वर्षांसाठी ही निवड झाली. परिषदेच्या नियोजनसाठी कोल्हापूर, सांगली, मिरज, कराड आणि बेळगांव येथील सर्व प्लास्टिक सर्जन्सनी एकत्र येऊन डेक्कन असोसिएशन ऑफ प्लास्टिक सर्जन्स (डॅप्स) संघटनेची स्थापना केली आहे. डॅप्सच्या मानद सचिवपदी डॉ. महेश प्रभू, खजानिसपदी डॉ. अरुणकुमार देशमुख यांची निवड झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुजारी नियुक्तीसाठी प्रक्रिया सुरु

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात सरकारी पुजारी नियुक्तीसाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने प्रक्रिया सुरु केली आहे. समितीच्यावतीने पुजारी व सेवेकऱ्यांच्या भरतीसाठी १५ फेब्रुवारी ते २२ फेब्रुवारी या कालावधीत मुलाखती घेण्यात येणार आहेत.

कोल्हापुरात ९ जून २०१७ रोजी पुजाऱ्यांनी अंबाबाईला घागरा-चोली पेहराव नेसवल्यानंतर भाविकांत संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर पुजारी हटाओ संघर्ष समितीने मंदिरात सरकारी पुजारी नेमण्याची मागणी केली. पालकमंत्र्यांनी त्यास मान्यता दिली. त्यानंतर राज्य सरकारने सरकारी पुजारी नेमण्याबाबत पुढाकार घेतला. १० ऑगस्ट २०१७मध्ये विधी व न्याय मंत्र्यांनी विधानसभेत सरकारी पुजारी नियुक्तीसंदर्भातील कायद्याची घोषणा केली. त्यानंतर २८ मार्च २०१८ रोजी अंबाबाई मंदिरात सरकारी पुजारी नियुक्ती करण्याचे विधेयक मंजूर झाले. मात्र अद्याप याचा जाहीरनामा प्रसिद्ध झालेला नाही.

सरकारी पुजारी कायद्याची अंमलबजावणी करण्यापूर्वी सरकारी पुजाऱ्यांची नियुक्ती प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. यापूर्वी देवस्थान समितीने १९ जून ते २१ जून २०१८ या कालावधीत पुजारी व सेवेकऱ्यांसाठी मुलाखती घेतल्या. पण ही प्रक्रिया कायदेशीर नसल्याचा आक्षेप काही संघटना आणि कार्यकर्त्यांनी घेतला. त्यानंतर देवस्थान समितीने यासंदर्भात विधी व न्याय मंत्रालयाकडे मार्गदर्शन मागविले होते. त्यांनी पुजारी व सेवेकरी भरती करण्याबाबतचे पत्र दिले आहे. ३० जानेवारी रोजी देवस्थान समितीच्या बैठकीत भरती प्रक्रिया सुरू करण्यात मान्यता देण्यात आली. त्यानुसार जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

या प्रक्रियेनुसार, मंदिरातील दैनंदिन, धार्मिक कार्य करण्यासाठी तात्पुरते पुजारी व सेवेकरी नियुक्त करण्यात येणार आहे. दोन्ही पदांसाठी किमान दहावी उत्तीर्ण अशी शिक्षणाची अट आहे. धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे असणाऱ्या नोंदणीकृत वैदिक शाळा व संस्थेची पदवी आवश्यक असणार आहे. १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत अर्ज देण्याची अंतिम मुदत आहे. यापूर्वी देवस्थान समितीने राबविलेल्या मुलाखत प्रक्रियेतील उमेदवारांना पुन्हा मुलाखत द्यावी लागणार आहे. धार्मिक ज्ञान असलेल्या तिघांची समिती स्थापन केली जाईल. त्याद्वारे पुजारी नियुक्ती होईल. देवस्थान समितीचे पदाधिकारी, सदस्यांसमवेत त्रिसदस्यीय समिती पुजाऱ्यांची निवड करेल.

अंबाबाई मंदिरात सरकारी पुजारी नियुक्तीचा कायदा मंजूर झाला आहे. या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी विधी व न्याय विभागाच्या आदेशानुसार पुजारी व सेवेकऱ्यांची भरती केली जात आहे.

- महेश जाधव, अध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राहुल गांधी यांचीसोलापुरात १३ रोजी सभा

$
0
0

राहुल गांधी यांची

सोलापुरात १३ रोजी सभा

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

सोलापूर येथे १३ फेब्रुवारी रोजी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची जाहीर सभा होणार आहे. १३ फेब्रुवारी रोजी राहुल गांधी एका खासगी कार्यक्रमानिमित्त मुंबईत येणार आहेत. याच दिवशी महाराष्ट्रात त्यांचे एकूण तीन कार्यक्रम होणार असून, त्यापैकी पहिली जाहीर सभा सोलापुरात घेण्यासाठी सुशीलकुमार शिंदे यांनी आपली ताकत पणाला लावली आहे.

राहुल यांच्या सभेसाठी सोलापुरातील एकूण चार मैदानांची पाहणी करण्यात आली आहे. त्यापैकी पूर्व भागातील कुचन प्रशालेच्या मैदानावर सभा घेण्यावर शिक्कामोर्तब झाल्याचे सांगण्यात येते. राहुल यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार सभेच्या व्यासपीठावर येणार असल्याचे सांगण्यात आले. आमदार सिद्धाराम म्हेत्रे , आमदार भारत भालके, आमदार प्रणिती शिंदे आणि माजी आमदार दिलीप माने यांच्यावर राहुल गांधींच्या सभेसाठी मैदान निश्चित करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बॅडमिंटन कोर्ट नव्हे; भंगार गोदाम!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, अंबरनाथ

अंबरनाथ नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांसाठी कामानंतर विरंगुळा म्हणून नगरपालिकेच्याच आवारात एक बॅडमिंटन कोर्ट उभारण्यात आले होते. मात्र शहरात स्वच्छतेसाठी विविध उपक्रम राबविणाऱ्या नगरपालिकेचे स्वत:च्याच कार्यालयात दुर्लक्ष झाले आहे. अवघ्या सहा महिन्यांपूर्वी खेळासाठी सज्ज असलेल्या बॅडमिंटन कोर्टचे रूपांतर फेरीवाल्यांच्या कारवाई केलेल्या हातगाड्या आणि सामानामुळे पुन्हा एकदा गलिच्छ अशा गोदामामध्ये झाले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांसाठी संध्याकाळी कामानंतर विरंगुळ्याचे ठिकाण असलेल्या बॅडमिंटन कोर्टच्या दुरवस्थेमुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.

अंबरनाथ नगरपालिकेच्या इमारतीच्या आतील भागात आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानाच्या मागील बाजूस कर्मचाऱ्यांसाठी संध्याकाळी काम आटोपल्यानंतर विरंगुळ्यासाठी एक छोटेखानी बॅडमिंटन कोर्ट आणि कॅरम खेळण्याची सुविधा देण्यात आली होती. मात्र या ठिकाणी कालांतराने या बॅडमिंटन कोर्टची दुरवस्था झाली होती. मात्र गेल्या वर्षी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर यांनी या बॅडमिंटन कोर्टची दुरुस्ती करत पुन्हा या ठिकाणी बॅडमिंटन कोर्ट आणि कॅरम तसेच बुद्धिबळ यांसारख्या खेळांची सुविधा कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध केली होती. त्यामुळे काही महिने या ठिकाणी अतिशय चांगल्या वातावरणात संध्याकाळी कामानंतर विरंगुळा म्हणून कर्मचारी बॅडमिंटन आणि अन्य खेळांचा आनंद घेत थकवा घालवत होते. मात्र या बॅडमिंटन कोर्टची देखरेख राखण्यात नगरपालिका अपयशी ठरली आहे. अतिक्रमणविरोधी विभागाकडून कारवाई करण्यात येणारी फेरीवाल्यांची वाहने तसेच त्यांचे साहित्य या ठिकाणी मोठ्या प्रमाणात टाकण्यात आले आहे. त्यामुळे या बॅडमिंटन कोर्टच्या ठिकाणी सध्या फेरीवाल्यांच्या हातगाड्या आणि त्यांच्या साहित्याचा ढिगारा लागला आहे. बॅडमिंटन कोर्टचे रूपांतर एका गोदामामध्ये झाले आहे. मात्र या बॅडमिंटन कोर्टच्या हाकेच्या अंतरावर मुख्याधिकारी आणि नगराध्यक्षा यांचे कार्यालय असतानाही, त्यांच्याकडूनही या बॅडमिंटन कोर्टाकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे शहरभरात स्वच्छ भारत अभियानासाठी विविध उपक्रम राबवणारी नगरपालिका स्वत:च्याच परिसरात स्वच्छता राखण्यात अपयशी ठरत असल्याने नगरपालिकेत येणाऱ्या नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. याबाबत नगराध्यक्षा मनीषा वाळेकर यांना विचारले असता, शहरातील फेरीवाल्यांवर कारवाई केल्यानंतर त्यांची वाहने ठेवण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने बॅडमिंटन कोर्टाच्या परिसरात या गाड्या ठेवण्यात आल्या आहेत. परंतु लवकरच त्या गाड्या तेथून इतर ठिकाणी हलवण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेपत्ता मुलांचा छडा लावण्यात यश

$
0
0

बेपत्ता मुलांचा छडा लावण्यात यश

कराड

केसे (ता. कराड) येथून गेल्या ३१ जानेवारी रोजी तीन अल्पवयीन मुले संशयास्पदरित्या बेपत्ता झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी त्यांच्यापैकी एका मुलाचे वडील रोहिदास अंबादास पवार (वय ४०, मूळ रा. माणेपुरी, ता. घनसांगवी, जि. जालना, सध्या रा. केसे) यांनी येथील शहर पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्या नुसार येथील शहर पोलिसांनी तपास करून बेपत्ता अल्पवयीन मुलांचा छडा लावला. पोलिसांनी सदर मुलांना जालना परिसरातून ताब्यात घेऊन त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले आहे.

सध्या केसे येथे ऊसतोडणीसाठी त्यांच्या कुटुंबीयांसोबत आलेला दशरथ रोहिदास पवार (वय १४, रा. माणेपुरी ता. घनसांगवी), बारीक अशोक ठाकरे (वय ८) व गोरख बबन बर्गे (वय १०, दोघेही रा. पिंपरखेड, ता. घनसांगवी, जि. जालना) ही तीन अल्पवयीन मुले २९ जानेवारी रोजी संशयास्पदरित्या बेपत्ता झाली होती. या बाबत दशरथ पवार याचे वडील रोहिदास पवार यांनी मुलांचे अपहरण केल्याबाबतची तक्रार दाखल केली होती. त्या नुसार येथील शहर पोलिसांनी तत्काळ तपसास गती देत तीन दिवसांच्या आत सदरच्या तीनही मुलांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे.

............

सीमावासीयांच्या लढाईला महाराष्ट्राने बळ द्यावे

आमदार दिगंबर पाटील यांची अपेक्षा

म. टा. वृत्तसेवा, कराड

'भाषिक राज्य निर्मितीवेळी सीमाभागांतील मराठी जनतेला राजकीय स्वार्थासाठी कर्नाटकच्या दावणीला बांधले गेले. मातृभाषेच्या राज्यात जाण्यासाठी गेली ६३ वर्षे मराठी भाषिकांचा लढा चाललेला आहे. कर्नाटक सरकार मराठी भाषिकांची चाललेली चळवळ दडपशाही व अत्याचाराचा मार्ग अवलंबून मोडीत काढण्याचा प्रयत्न करीत आहे. माझ्यासारख्या लोकप्रतिनिधींना मराठी भाषेतून विधानसभेत शपथ घेऊ दिली जात नाही. कर्नाटकच्या जोखडातील सीमावासीयांच्या मराठी भाषिक रस्त्यावरच्या लढाईला महाराष्ट्राने बळ द्यावे,' अशी अपेक्षा सीमाभागातील मराठी लढ्याचे नेते व महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष आमदार दिगंबर पाटील यांनी रविवारी व्यक्त केली.

स्वातंत्र्य सैनिक स्व. बाळासाहेब उर्फ भडकबाबा पाटणकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त पाटण येथे आयोजित ग्रंथ महोत्सव व साहित्य संमेलनात रविवारी कै. भाई बाळासाहेब पाटणकर यांच्या जीवनकार्याचा परिचय करून देताना ते बोलत होते. या वेळी शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्रचे अध्यक्ष शंकरराव गोडसे, पुरूषोत्तम जाधव, स्वामी शिक्षण संस्थेचे सहसचिव अरविंद शेजवळ, प्राचार्य ए. वाय. मुल्ला, नितीन पाटील, शेखर मोहिते आदी उपस्थिती होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images