Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

पाणीपुरवठ्याचा ‘मेकओव्हर’

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

शहराला काळम्मावाडी थेट पाइपलाइनद्वारे शुद्ध व मुबलक पाणीपुरवठ्याची योजना कार्यन्वित होत असताना शहरातील अंतर्गत वितरण व्यवस्था व पाणी साठवणूक करण्यासाठी उंच साठवण टाक्यांची बांधणी सुरू झाली आहे. अटल शहरी नूतनीकरण व परिवर्तन मिशन अंतर्गत (अमृत योजना) पाण्याची वितरण व्यवस्था बदलण्याचे काम महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून सुरू झाले आहे. त्यासाठी ११४ कोटी, ८१ लाखांचा निधी मिळाला आहे. योजनेतून ३९६.३३ किलोमीटरची नवी व जुनी वितरण व्यवस्था बदलण्यात येणार आहे.

कोल्हापूरची २०४९ ची लोकसंख्या गृहीत धरून शहराला २४ तास पाणीपुरवठा करण्यासाठी थेट पाइपलाइन योजनेचे काम अडथळ्यांची शर्यत पार करत सुरू आहे. थेट पाइपलाइन योजना डिसेंबर २०१९पर्यंत कार्यन्वित करण्याचा निर्धार केला जात असला, तरी योजना पूर्ण होण्यापूर्वी शहरातील जीर्ण झालेल्या आणि नवीन पाणीपुरवठा वितरण व्यवस्था निर्माण करण्याची आवश्यकता आहे. उंच साठवण टाक्यांची उभारणी आणि दुरुस्ती गरजेची आहे. त्यानुसार महापालिका आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने प्रकल्प अहवाल तयार केला. अहवालाला मंजुरी मिळाली. त्यानुसार ११४ कोटी ८१ लाखांच्या योजनेच्या कामाला सुरुवात झाली आहे.

थेट पाइपलाइन योजनेला पूरक अशी ३४९ किमीची नवी पाइपलाइन टाकण्यात येणार आहे. यामध्ये ११० ते ७५० मी. मी व्यासाची पाइपलाइन टाकण्यात येईल. शहराच्या जुन्या भागात पाइपलाइन टाकल्यापासून एकदाही बदललेली नाही. परिणामी सद्य:स्थितीत होणाऱ्या एकूण पाणी उपसापैकी ५० एमएलडी पाणी गळतीद्वारे गटारीमध्ये मिसळत आहे. त्यामुळे ४७.२६ किमी जुनी वितरण व्यवस्था बदलण्यात येणार आहे. वितरण व्यवस्थेबरोबर तीन ठिकाणी नव्याने पंप हाऊसची उभारणी करण्यात येणार आहे. तर आठ ते २० लाख लिटर क्षमतेच्या १२ ठिकाणी उंच टाक्या बांधण्यात येणार आहेत. शहरातील जुन्या व नवीन पाइपलाइनच्या कामाबरोबरच उंच टाक्या बांधणीच्या कामाला सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात नगरसेवकांच्या मागणीप्रमाणे पाइपलाइन टाकण्याच्या काम सुरू आहे. मात्र अनेकठिकाणी रस्त्याची दोनवेळा खोदाई होऊ नये, यासाठी ड्रेनेज व पाइपलाइनचे काम एकाचवेळी सुरू करण्याची मागणी पुढे येऊ लागली आहे.

हरित पट्ट्यामुळे ऑक्सिजनच्या प्रमाणात वाढ

अमृत योजनेंतर्गत शहरात ड्रेनेज व पाणीपुरवठा लाइनचे काम सुरू असताना हरित पट्टे विकसित करण्यात आले. त्यासाठी केंद्र सरकारकडून पाच कोटीचा निधी मिळाला. या निधीतून मंगेशकरनगर, कदमवाडी, संभाजीनगर व बलराम कॉलनी प्रभागात हरित पट्टे विकसीत करण्यात आले आहे. प्रदूषण रोखण्याबरोबर या योजनेमुळे ऑक्सिजनच्या प्रमाणात वाढ झाला असल्याचा दावा केला जात आहे.

प्रस्तावित उंच टाक्या

कदमवाडी, सम्राटनगर, ताराबाई पार्क, राजेंद्रनगर, बोंद्रेनगर, पुईखडी, शिवाजी पार्क, बावडा रॉ वॉटर, बावडा, राजारामपुरी सायबर, राजारामपुरी लकी बझार, आपटेनगर

नवीन वितरण व्यवस्था

३१८ किमी (११० ते २५०० मी.मी. व्यास)

३०.७६ किमी (३०० ते ७५० मी. मी व्यास)

जुनी वितरण बदलणारी व्यवस्था

४४. ४३ किमी (११० ते २५० मी. मी. व्यास)

२.८३ किमी (३०० ते ४५० मी. मी व्यास)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘रॉयल’मध्ये स्नेहसंमेलन

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

रॉयल इंग्लिश मीडियम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात झाले. विद्यार्थ्यांनी विविध कलाप्रकार सादर करत धमाल केली. खासदार धनंजय महाडिक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संसदरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. खासदार महाडिक यांनी शाळेचे शैक्षणिक उपक्रम स्त्युत्य आहेत. मोफत प्रवेश देणाऱ्या शाळा या मोजक्या असून याबद्दल शाळेचे कौतुक असल्याचे सांगितले. नगरसेविका रुपाराणी निकम यांनी वार्षिक स्नेहसंमेलनामुळे मुलांच्या कौशल्यामध्ये वाढ होते. तसेच सामान्य मुलांना इंग्रजी शिकता येण्यासाठी विविध शैक्षणिक उपक्रम राबविले जातात. मुलांच्या कला क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी मोफत प्रशिक्षण दिले जात असल्याचे सांगितले. प्राथमिक शिक्षण मंडळाचे सभापती अशोक जाधव यांनी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी नगरसेविका जयश्री जाधव, उमा इंगळे, सविता भालकर, जयसिंगराव निकम, विजया निकम, स्कूलचे संस्थापक संग्राम निकम, बाळासाहेब जाधव आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१६०० कोटी एफआरपी जमा

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

साखर जप्तीच्या आदेशानंतर कोल्हापूर विभागातील ३६ साखर कारखान्यांना जाग आली असून प्रतिटन २३०० रुपये दराने १६०० कोटी रुपये जमा झाले आहेत. आजवर २२०७ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर एफआरपी जमा झाली आहे. अजून १२०७ कोटी रुपयांची एफआरपी थकीत आहे. एकरकमी एफआरपी न दिल्याने कारखान्यांवर कारवाईचा बडगा साखर आयुक्तांनी केला असून जिल्ह्यातील २३ कारखान्यांची आज पुण्यात सुनावणी झाली.

एफआरपीचे तुकडे पाडून प्रतिटन २३०० रुपये कारखानदारांनी शेतकऱ्याच्या खात्यावर जमा केले. एफआरपीचे तुकडे पाडल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून त्यांनी रस्त्यावरील लढाई थांबवून कायदेशीर लढाई सुरू केली आहे. एफआरपी न देणाऱ्या कारखान्यांवर कारवाईची मागणी करत खासदार राजू शेट्टी यांनी पुण्यात गेल्या आठवड्यात पुण्यात साखर आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन केले. त्यानंतर साखर आयुक्तांनी राज्यातील ३७ कारखान्यांना नोटिसा बजावल्या. एफआरपी थकवणाऱ्या कारखान्यांची साखर व स्थावर, जंगम मालमत्ता जप्त करुन रक्कम अदा करावी, असे आदेश साखर आयुक्तांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. या आदेशानंतर जिल्हा प्रशासनाने एफआरपीचे थकबाकीदार असलेल्या आठ कारखान्यांच्या मालमत्तेच्या शोध घेऊन कार्यवाही करण्याचे आदेश तहसीलदारांना दिले आहेत.

कारखान्यांनी गेल्या आठवड्यापर्यंत ३० नोव्हेंबरपर्यंत गाळप झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर २३०० रुपयाप्रमाणे २५ कारखान्यांनी ५९७ कोटी, ५४ लाख रुपये जमा केले होते. थकीत एफआरपी जमा २०४५ कोटी रुपये होती. पण साखर आयुक्तांनी कारवाईचा बडगा उचलल्यानंतर ३६ कारखान्यांनी ३१ डिसेंबरपर्यंत गाळप केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर २३०० रुपयांचा हप्ता जमा केला. काही कारखान्यांनी तर १५ जानेवारीपर्यंत गाळप केलेल्या उसाचे बिल २३०० रुपयाप्रमाणे अदा केले आहे. गेल्या आठवड्यात तब्बल १६०० कोटी रुपये जमा केले आहेत. जिल्हा बँकेच्या संबधित आठ कारखान्यांनी २५० कोटी रुपये जमा केले आहेत. बिद्री दूधगंगा कारखान्याने १५ जानेवारीपर्यंत गाळप केलेल्या उसाचे बिल दिले आहे.

दरम्यान एकरकमी एफआरपी न दिलेल्या सर्व कारखान्यांना साखर जप्ती करण्यात का येऊ नये, अशी नोटीस पाठवली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील २३ कारखान्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आज सोमवारी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्यासमोर आपले म्हणणे मांडले. कारखान्यांना कर्ज देण्याची बँकाची मर्यादा संपली असल्याने २३०० रुपयांप्रमाणे पहिला हप्ता दिला असल्याचे लेखी म्हणणे कारखानदारांनी मांडले आहे. साखरेचा दर प्रतिक्विंटल २९०० रुपयावरुन ३४०० रुपये करावी अशी मागणी केली आहे.

एफआरपी जमा झालेले कारखाने (रक्कम कोटीत)

जवाहर: १९०

दत्त शिरोळ : १२६

दालमिया: ११५

नलवडे (गडहिंग्लज): ८३

शाहू कागल: ९८

घोरपडे साखर : ८२

दूधगंगा : ८३

हेमरस :९३

सदासाखर : ३०

शरद : ७०

राजाराम ६३

गुरुदत्त : ७७

कुंभी कासारी : ५६ कोटी

सोनहिरा : ११३

आर. बी. पाटील (साखराळे):९७

क्रांती (कुंडल) : ८५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृषीपंपधारकांची सरकारकडून फसवणूक

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

'इरिगेशन फेडरेशनच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशामुळे केवळ उच्चदाब ग्राहकांना लाभ झाला. कृषीपंप, लघूदाब वीज ग्राहकांना दिलेले अश्वासन पाळलेले नाही. सरकारचा निर्णय अमान्य असून दोन आठवड्यात दिलेल्या अश्वासनाप्रमाणे अध्यादेशामध्ये बदल करावा. अन्यथा शेतकरी पुन्हा रस्त्यावर उतरतील,' असा इशारा ज्येष्ठ नेते डॉ. एन. डी. पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार बैठकीत दिला.

डॉ. पाटील म्हणाले, 'गेल्या अनेकवर्षाच्या मागणीसाठी २१ जानेवारी रोजी इरिगेशन फेडरेशनने महामार्ग चक्काजाम आंदोलन केले. आंदोलना दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या स्वाक्षरीचे लेखी पत्र पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. पत्रामध्ये उच्चदाब, लघूदाब, तीन एचपी कृषीपंपांना १.१६ रुपयेप्रमाणे वीज आकारणी करण्याबरोबरच नोव्हेंबर २०१६ ते २०२० पर्यंत कृषीपंपांचे दर स्थिर ठेवू, तसेच सरकारी पाणीपट्टी सवलतीचा दर दहा वर्षे स्थिर ठेवण्याचे अश्वासन दिले. मात्र अध्यादेश काढताना केवळ उच्चदाब ग्राहकांचा विचार केला. त्यासाठी सरकारने १०७ कोटीची तरतूद केली. त्याद्वारे सरकारने फेडरेशनबरोबर शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे.'

'वीज सवलतीसाठी १८६ ते २०० कोटींची आवश्यकता होती. मात्र केलेली तरतूद कमी असल्याने बहुतांशी शेतकरी यापासून वंचित राहणार आहेत. राज्यात ४१ लाख शेतीपंप असून त्यांच्याकडे पोकळ थकबाकी आहे, त्याकडेही सरकारने दुर्लक्ष केले आहे. पालकमंत्री पाटील यांच्या अश्वासनानंतर आंदोलन स्थगित केले. पण सरकारने घेतलेला निर्णय मान्य नसून दोन आठवड्यात अध्यादेशामध्ये सुधारणा करावी. अन्यथा पुन्हा महामार्ग रोको आंदोलन केले जाईल.' असा इशारा त्यांनी दिला.

पत्रकार बैठकीस माजी आमदार संजय घाटगे, वीज तज्ज्ञ प्रताप होगाडे, इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष विक्रात पाटील, बाबासाहेब पाटील-भुयेकर, अरुण लाड, आर. जी. तांबे, रणजित पाटील, चंद्रकांत पाटील, आर. के. पाटील आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आपटेनगर येथे जलवाहिनीला गळती

0
0

कोल्हापूर: शहर पाणीपुरवठा विभागाच्या आपटेनगर पंपिंग स्टेशनकडे जाणाऱ्या जलवाहिनीला बटुकेश्वर मंदिराजवळ गुरुवारी गळती लागल्याने शहरात दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा झाला. शुक्रवारी गळतीचे काम पूर्ण झाले असले, तरी दोन दिवसांचा तुटवडा भरून काढण्यासाठी वेळ लागणार आहे. शनिवारी दुपारनंतर मात्र पाणीपुरवठा सुरळीत होण्याची शक्यता आहे. आपटेनगर पंपिंग स्टेशनमध्ये चार पंपाद्वारे पाणीपुरवठा केला जातो. गुरुवारी शिंगणापूर जवळील बटुकेश्वर मंदिराजवळ मुख्य जलवाहिनीला गळती सुरू झाली. त्यामुळे चारऐवजी तीन पंपांने पाणी उपसा केला. त्याचा परिणाम शहर पाणीपुरवठ्यावर झाला. गुरुवारसह शुक्रवारी कमी दाबाने पाणीपुरवठा झाला. शुक्रवारी गळतीचे काम पूर्ण झाले असून शनिवारी त्यावर काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. दुपारनंतर चारही पंप सुरू झाल्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यस्तरीय कबड्डीस्पर्धेचे आयोजन

0
0

राज्यस्तरीय कबड्डी

स्पर्धेचे आयोजन

कराड :

अतीत (ता. सातारा) येथील महाराजा प्रतिष्ठानच्या वतीने भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

येथील महाराजा प्रतिष्ठानचे संस्थापक निखिल राजेश चव्हाण यांनी अतीत येथेराज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले आहे.

स्पर्धेत प्रथम क्रमांक एकवीस हजार व सन्मानचिन्ह, व्दितीय क्रमांक पंधरा हजार व सन्मानचिन्ह, तिसरा क्रमांक दहा हजार व सन्मानचिन्ह असे ठेवण्यात आले आहे. सर्व वयोगटातील खेळाडूंना खेळण्याची संधी मिळणार आहे. नाव नोंदणीसाठी एक फेब्रुवारीपर्यंत ७६२०४९४९२२, ९६८९३७३२९८ या क्रमांकावर संपर्क साधावा. ही स्पर्धा १ फेब्रुवारी ते ३ फेब्रुवारी दरम्यान होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थेट पाइपलाइनमध्ये अडथळ्यांचे काटे

0
0

थेट पाइपलाइन

फोटो आहे

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहराच्यादृष्टीने महत्त्वाकांक्षी ठरलेल्या थेट पाइपलाइन योजनेची सुरुवात २०१४ मध्ये झाली. ४८८ कोटींची योजना आता ६०० कोटीपर्यंत पोहोचली. पण योजनेला अद्याप गती मिळालेली नाही. सोळांकूर ग्रामस्थांचा विरोध आणि वन विभाग क्षेत्रात पाइपलाइनला परवानगी नसल्याने जलवाहिनी टाकण्याचे काम रखडले आहे. नैसर्गिक अडथळ्यामुळे जॅकवेल उभारणीत अडचणी निर्माण होत असल्याने शहरवासीयांना थेट पाइपलाइनमधून पाणी मिळण्यासाठी किमान वर्षभर प्रतीक्षा करावी लागेल.

थेट पाइपलाइन योजना मंजूर होण्यासाठी अनेकांनी प्रयत्नही केले. पण त्याला यश आले नाही. मात्र तत्कालीन आघाडी सरकारने योजनेला मंजुरी दिली. विधानसभा निवडणुकीपूर्वी मंजुरी देऊन श्रेय लाटण्याचा प्रयत्नही झाला. मात्र श्रेयवादात अनेक इतर सरकारी खात्यांच्या परवानग्या मिळाल्या नाहीत. अत्यंत घाईगडबडीत निवडणुकीपूर्वी योजनेचा नारळ फोडला. ज्या वेगात योजनेचे उद्घाटन झाले त्याच वेगात योजना पूर्ण होऊ शकली नाही. ४२५ कोटी ४१ लाखाची मूळ योजना जादा निविदेने ४८८ कोटीपर्यंत गेली. मुदतीत काम न झाल्याने योजनेचा खर्च १५० कोटीने वाढला. कामात दिरंगाई केल्याबद्दल ठेकदार कंपनी जीकेसी कंपनीला दंड सुरू केला असून कन्सल्टंट कंपनीलाही दंड होण्याची शक्यता आहे. मात्र कंपनीला दंड झालेला असला तरी कामात अद्यापही गती मिळालेली नाही. जॅकवेलचे काम करण्यासाठी धरणातील पाणीसाठा कमी करण्यासाठी पाटबंधारे विभागाला पत्रव्यवहार केला. अद्याप त्यांच्याकडून प्रतिसाद मिळालेला नाही. धरणातील पाणी राज्यासह कर्नाटकातील शेतीसाठी वापर होत असल्याने त्याचे नियोजन पाटबंधारे विभागाला करावे लागणार आहे. त्यामुळे पाटबंधारे विभाग कसा प्रतिसाद देतो, यावरच जॅकवेलच्या कामाची दिशा स्पष्ट होणार आहे.

थेट पाइपलाइन योजनेची सुरुवात माथा ते पायथा म्हणजेच धरणापासून होण्याची आवश्यकता होती. पण जॅकवेल उभारणीपूर्वीच पाइपलाइन टाकण्यास सुरुवात केली. त्यातही प्रथम तीन गावांनी पाइपलाइन टाकण्यास विरोध केला. त्यातील दोन गावांचा विरोध मावळला असला तरी अद्याप सोळांकूरचा विरोध आहे. तसेच वन विभागातून जाणाऱ्या दहा किमी लाइनसाठी परवानगी मिळालेली नाही. परिणामी पाइपलाइनचे काम अनेक दिवसांपासून ८५ टक्क्यांवर लटकले आहे. योजना सुरु झाल्यापासून ४० किमी पाइपलाइन व जॅकवेलचा बेस तयार केला आहे. जॅकवेलचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांना यश आल्यास डिसेंबर २०१९ पर्यंत योजना पूर्ण होऊ शकेल. पण यामध्ये अपयश आल्यास थेट पाइपलाइनमधील पाण्यासाठी शहरवासियांना प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे.

. .. ..

योजनेची लवकरच पाहणी

थेट पाइपलाइन योजनेला २०१४ पासून सुरुवात झाली. पाइपलाइनला विविध ठिकाणी झालेली दिरंगाई आणि जॅकवेलच्या कामात निर्माण झालेल्या नैसर्गिक अडथळ्यांमुळे योजनेचे कामाची कासवगती आहे. त्यामुळेच नगरसेवकांनी महासभेत श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केली. पण योजनेबाबत सभागृहातही संभ्रमावस्था असल्याने सुकाणू समिती बैठक घेण्याचा निर्णय झाला. समितीची स्थापना झाल्यानंतर ही पहिलीच बैठक होती. समितीसह अन्य पदाधिकारी लवकरच योजनेची पाहणी करणार आहे.

........................

थेट पाइपलाइन योजना

योजना मंजूर : २७ डिसेंबर २०१३

योजनेला सुरुवात : २४ ऑगस्ट २०१४

योजनेचा मूळ आराखडा : ४२५ कोटी ४१ लाख

अंतिम निविदा रक्कम : ४८८ (१५.४८ टक्के जादा दर)

आतापर्यंतचा खर्च : २९७ कोटी

कामाची मुदत : २७ महिने

प्रथम मुदतवाढ - १८ महिने ( मे २०१८ पर्यंत)

दुसरी मुदतवाढ : डिसेंबर २०१९

जलवाहिनीचे ८५ तर संपूर्ण योजनेचे ६५ टक्के काम पूर्ण

.. .. . ..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘चाळीस हजार गावांत ड्रोनद्वारे गावठाण मोजणी’

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्यातील ४० हजार गावांतील गावठाण मोजणीचे काम ड्रोनच्या सहाय्याने पूर्ण करून नागरिकांना प्रॉपर्टी कार्डाद्वारे मालकी हक्क देण्याचा क्रांतिकारी निर्णय राज्य सरकारने घेतल्याची घोषणा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. शिवाजी विद्यापीठाच्या मैदानावर भूमिअभिलेख विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी राज्याचे जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम, आंतरराष्ट्रीय नेमबाज तेजस्विनी सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती. भूमिअभिलेख विभागाच्या राज्यातील सुमारे ४२५ खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग घेतला आहे.

पालकमंत्री पाटील म्हणाले, 'मोजणी करण्याच्या पद्धतीमध्ये वेळोवेळी सरकारने आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून सुधारणा केल्या आहेत. सध्या ड्रोनच्या सहाय्याने मोजणी केली जात आहे. यापुढील काळात लँड टायटल बिल आणून लोकांना मालकीहक्क देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. हा उपक्रम देशातील अभिनव उपक्रम ठरेल. भूमिअभिलेख विभागाच्या क्रीडा स्पर्धांसाठी यावर्षी एक कोटीची तरतूद केली जाईल.'

जिल्हा भूमिअभिलेख विभागाचे जिल्हा अधीक्षक वसंत निकम यांनी स्वागत केले. पुणे विभागाचे उपसंचालक किशोर तवरेज यांनी प्रास्ताविक केले. यावेळी पुणे विभागाचे भूमिअभिलेख उपसंचालक सतीश भोसले, कोकणचे उपसंचालक शाम खामकर, नागरपूरचे उपसंचालक बाळासाहेब काळे, नाशिकचे उपसंचालक मिलिंद चव्हाण, औरंगाबादचे उपसंचालक संजय ढिकळे, राज्य भूमिअभिलेख राज्यपत्रित अधिकारी संघटनेचे अध्यक्ष अनिल माने, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष प्रतापराव मोहिते, आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाटाकडील ‘अ’, पोलिस विजयी

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या राजेश चषक फुटबॉल स्पर्धेत पाटाकडील तालीम मंडळ अ, कोल्हापूर पोलिस संघांनी प्रतिस्पर्धी संघावर विजय मिळवत पुढील फेरीत प्रवेश केला. जुना बुधवार पेठ सेवाभावी संस्थेने स्पर्धेचे आयोजन केले आहे.

पाटाकडीलने ऋणमुक्तेश्वर तालीम मंडळावर १-० असा निसटता विजय मिळवला. उत्तरार्धात ५५ व्या मिनिटाला हृषिकेश मेथे-पाटील याने गोल नोंदवला. कोल्हापूर पोलिस संघाने खंडोबा तालीम मंडळावर २-१ अशी मात केली. पोलिसांकडून इंद्रजित मोंडलने दोन गोल केले. खंडोबाकडून ऋतुराज संकपाळने गोल केला. पूर्वार्धात खंडोबा १-० आघाडीवर होता. शनिवारी (ता.२) बालगोपाल तालीम मंडळ आणि शिवाजी तरुण मंडळ यांच्यात पहिला सामना दुपारी दोन वाजता होणार आहे. चार वाजता प्रॅक्टिस फुटबॉल क्लब अ विरुद्ध संयुक्त जुना बुधवार पेठ क्लब यांच्यात सामना होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हाधिकारी सुभेदार यांची बदली?

0
0

कोल्हापूर: जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांची बदली झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. त्यांनी राज्य सरकारकडे बदली करण्याची विनंती केली होती. त्यांची विनंती मान्य झाली असून मुंबईला बदली झाल्याचे समजते. त्यांच्या जागी कोणाची नियुक्ती होणार याकडे जिल्हा प्रशासनाचे लक्ष लागले आहे. गेली दोन वर्षे सुभेदार कोल्हापुरात कार्यरत आहेत. यापुर्वी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारीपदही भूषवले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अधिकाऱ्यांची उपस्थिती हवी

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

'स्थायी समितीच्या बैठकीला सर्व अधिकाऱ्यांनी उपस्थित राहिले पाहिजे. स्थायी समितीच्या बैठकीदिवशी इतर विभागाच्या बैठका किंवा अधिकाऱ्यांचा फिरती दौरा ठेवायच्या नाही. बैठकीत विचारलेल्या सर्व प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी स्वतंत्र नोंदणी ठेवा,' अशा सक्त सूचना सभापती शारंगधर देशमुख यांनी स्थायी समितीच्या बैठकीत शुक्रवारी दिल्या. सभापतिपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पहिलीच बैठक पार पडली.

सविता भालकर म्हणाल्या, 'मार्चअखेर जवळ आला असून अनेक विभागाची वसुली थांबली आहे. वसुली थांबल्यास त्याचा परिणाम विकासकामावर होईल. यावर घरफाळा विभागाला दिलेले ५७ कोटींचे उद्दिष्ठ पूर्ण करेल. इस्टेट विभागाला ३३ कोटींचे उद्दिष्ट असून गाळेधारक रेडिरेकनरप्रमाणे भाडे भरण्यास तयार नसल्यामुळे वसुलीवर परिणाम होत आहे. पाणीपुरवठा विभागाची ३७ कोटींची वसुली झालेली असून मार्चपर्यंत ९० टक्के उद्दिष्ट पूर्ण करू,' असे प्रशासनाच्यावतीने स्पष्ट केले.

अमृत योजनेतील पाणीपुरवठा लाइनचे काम कधी सुरू होणार? असा प्रश्न माधुरी लाड यांनी विचारला. '१३ किमीची पाइपलाइन आली आहे. ड्रेनेजचे काम सुरू आहे, तेथे पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू होणार आहे. संपूर्ण शहरात काम सुरू होण्यास १५ ते २० दिवस लागतील.

सभापती देशमुख म्हणाले, 'शहरात एलईडी बल्ब बसवण्याबाबत चार महिन्यापूर्वी ठराव झाला होता. अद्याप कामाला सुरुवात झेलेली नाही. प्रभागात नगरसेवकांना सोबत घेऊन सर्व्हे करून एलईडी बल्ब बसवावेत. ठेकेदाराला मनमानीप्रमाणे काम करू दिले जाणार नाही.' 'कंपनीला वर्कऑर्डर दिली असून काही ठिकाणी नगरसेवकांनी स्वनिधीतून एलईडी बसवले असून कंपनीकडून पुन्हा सर्व्हे सुरू आहे. सदस्यांना विश्वसात घेऊनच काम पूर्ण केले जाईल.' असे प्रशासनाने स्पष्ट केले.

पूजा नाईकनवरे यांनी शहरातील डीपी रोड ताब्यात घेण्याची मागणी केली. सत्यजित कदम यांनी 'लिशा हॉटेल येथील डिपी रोड जिल्हा परिषद कॉलनीच्या हद्दीतून जातो. जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी डिपी रोड रद्द करण्यासाठी पत्रव्यवहार केला आहे. या ठिकाणी बांधकाम परवानगी देता येता का?' असा प्रश्न विचारला. 'शहरातील मुख्य चौकात पुन्हा अतिक्रमण होत असून अतिक्रमण विभाग सक्षम करण्याची मागणी सदस्य संदीप कवाळे यांनी केली. सदस्य गीता गुरव, राजाराम गायकवाड यांनी बैठकीत विविध मुद्दे उपस्थित केले.

टिपर रिक्षाची प्रतीक्षा वाढली

शहरातील कचरा संकलित करण्यासाठी टिपर रिक्षा घेण्याचा ठराव मागील स्थायी समितीच्या बैठकीत झाला होता. मात्र हा ठराव अद्याप प्रशासनाला प्राप्त झालेला नाही. ठराव प्राप्त झाल्यानंतर ठेकेदारास वर्क ऑर्डर देण्यात येणार आहे. वर्क ऑर्डर मिळाल्यानंतर ९० दिवस टिपर रिक्षा मिळण्यासाठी लागणार आहेत. त्यामुळे कचरा संकलीत करण्यासाठी ताफ्यात येणाऱ्या गाड्यांची प्रतीक्षा वाढणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंढरपूर सोलापूर रोडवर भीषण अपघात, ६ ठार

0
0

पंढरपूर:

पंढरपूर-सोलापूर रोडवर आज सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडला. मुंबई येथील घाटकोपर परिसरात राहणाऱ्या सुरेश कोकणे हे आपल्या कुटुंबासह पंढरपूर येथे दर्शनाला येत असताना त्यांच्या मारुती इको कारने (क्र. MH-०३- AZ-३११६) एसटी बसला (क्र. ०७- C- ९०१७) दिलेल्या धडकेत सहा जणांचा मृत्यू झाला असून एक मुलगी गंभीर जखमी आहे. सुरेश कोकणे कुटुंब आज अक्कलकोट येथून पंढरपूरकडे दर्शनाला येत असताना दुपारी साडेचारच्या दरम्यान पंढरपूर जवळील ईश्वरवठार परिसरात हा भीषण अपघात झाला.

पंढरपूरकडून अक्कलकोटला निघालेल्या बसला कोकणे यांच्या कारने समोरून धडक दिल्याने त्यांची गाडी थेट बसमध्ये घुसून बसली होती . जोरदार आवाजाने जवळपासच्या ग्रामस्थांनी तातडीने मदत करीत पहिल्यांदा गाडीतील जखमींना बाहेर काढायचा प्रयत्न केला मात्र जागीच पाच जणांचा मृत्यू झाल्याचे दिसून आल्यावर यातील जखमी तरुण आणि तरुणीला तातडीने उपचारासाठी पंढरपूर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले . उपचार सुरु असताना यातील तरुणांचाही मृत्यू झाल्याने गंभीर अवस्थेतील जखमी तरुणीला उपचारासाठी सोलापुरात हलविण्यात आले आहे . या अपघातातील सुरेश कोकणे यांचा मुंबई येथे लक्ष्मी केटरर्स नावाने केटरिंगचा व्यवसाय आहे.

अपघातातील मृतांची नावे पुढीलप्रमाणे -

१) सुरेश रामचंद्र कोकणे ( ६८ )
२) सचिन सुरेश कोकणे ( ४० )
३) सविता सचिन कोकणे ( ३४ )
४) आर्यन सचिन कोकणे ( १२ )
५) श्रद्धा राजेश सावंत ( २० )
६) प्रथम राजेश सावंत ( १६ )

जखमी

१) धनश्री राजेश सावंत ( १९ )



67808091


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलगी झाली म्हणून डॉक्टर पत्नीचा छळ

0
0

मुलगी झाली म्हणून डॉक्टर पत्नीचा छळ

सातारा

डॉक्टर दाम्पत्याला मुलगी झाली म्हणून डॉक्टर पतीने पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ सुरू केला होता. मुलगा होण्यासाठी एका मांत्रिकाला घरात आणले होते. त्यामुळे सुशिक्षित असलेल्या डॉक्टर पत्नीने अखेर शाहुपुरी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी डॉक्टर पती सैफ तांबोळी (वय २६ राहणार शाहूपुरी) याला शहापुरी पोलिसांनी अटक केली. त्यांच्या आई व भावाला लवकरच अटक करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

सातारा तालुक्यातील शाहूपुरीतील तांबोळी दाम्पत्य डॉक्टर असून डॉक्टर सैफ तांबोळी एमबीबीएस आहेत. ते सध्या प्रतिभा हॉस्पिटल येथे वैद्यकीय सेवा करतात तर, पत्नी मेहजबीन या बीएएमएस आहेत. या दाम्पत्याला काही दिवसांपूर्वी पहिली मुलगी झाली म्हणून डॉक्टर सैफ तांबोळी पत्नीवर भडकले होते. मला मुलगाच हवा होता, असे म्हणत पत्नीला त्रास देत होते. सासू रेजिना तांबोळी यांनी डॉक्टर सुनेचा छळ सुरू केला. वारंवार माहेरून हॉस्पिटल काढण्यासाठी पैसे घेऊन ये, असा तगादा लावला होता. त्यांनी पत्नी डॉक्टर मेहजबीन हिच्या वडिलांना हॉस्पिटल करण्यासाठी दहा लाख रुपये द्या, म्हणून सांगितले होते. अडीच लाख रुपये दिले तरीही डॉक्टर पती व त्याची आई मारहाण करणे, मानसिक त्रास देत होते. सासू रेजिना तांबोळी या भोंदूबाबा रफिक बागवानला घेऊन घरात आल्या होत्या, तो २४ तास त्यांच्या घरात बसून नाना तरेचे उद्योग करीत असे. महेजबीन यांच्या तक्रारीनंतर सेफ ताबोळी याला अटक करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

३१ लाखाला गंडा

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गुंतवणूकदारांच्या खात्यावरील शेअर्सची (बिटकॉइन) परस्पर विक्री करुन संबंधितांना ३१ लाख ११ हजार ४३२ ला गंडा घालण्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी व्हेरिएबल टेक प्रा. लिमिटेड कंपनीच्या पाच संचालकांवर राजारामपुरी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा शुक्रवारी दाखल झाला. 'बिटकॉइन'मध्ये पैसे गुंतवणूक करुन दहा टक्के परतावा देण्याचे आमिषही गुंतवणूकदारांना दाखवण्यात आले.

याप्रकरणी कंपनीचा संशयित संचालक अमित महेंद्रकुमार भारद्वाज, अजय महेंद्रकुमार भारद्वाज (दोघे, रा. शालीमार बाग, नवी दिल्ली) महेश शहा (रा. बाबूजमाल रोड, कोल्हापूर), हेमंत चंद्रकांत भोपे, राहुल अरुण बोंगाळे (दोघे, रा. पुणे) अशी त्यांची नावे आहेत. या प्रकरणी सत्यजित भीमाशंकर बोधे (रा. रजनी विहार, राजारामपुरी ६वी गल्ली) यांनी फिर्याद दिली आहे. दरम्यान, या प्रकरणात फसवणुकीचा आकडा आणि गुंतवणूकदारांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

राजारामपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेअर मार्केटमध्ये कार्यरत असलेल्या या कंपनीने राजारामपुरी पहिली गल्ली येथील अमेय एम्पायर, चौथा मजला येथे कार्यालय सुरु केले होते. या कंपनीकडून गुंतवणुकीवर दहा टक्के परतावा देण्याचे आमिष दाखविण्यात आले. त्यासाठी काही ब्रोकर्स नेमणूकही करण्यात आली. भरघोस परतावा मिळणार असल्याच्या आमिषाने व्यापारी, डॉक्टर, सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बिटकॉईनच्या माध्यमातून लाखो रुपयांची गुंतवणूक केली. फिर्यादी सत्यजीत बोधे यांनाही प्रतिमहिना दहा टक्के परतावा देण्याचे आमिष दाखविले. त्यांचे २२.५ बिटकॉईन कंपनीमध्ये गुंतवण्यात आले. त्यांचे मित्र गिरीष मधुकर खोचीकर, श्रीहरी गोपाळ गुळवणी, पृथ्वीराज विलासराव पाटील, विशाल दत्तात्रय नकाते यांची एकत्रित मिळून ३१ लाख, ११ हजार ४३२ किमतीच्या शेअर्सची संशयितांनी परस्पर विक्री केली. फेब्रुवारीमध्ये परतावा मागण्यासाठी बोधे हे कंपनीच्या राजारामपुरी कार्यालयात गेले. त्यावेळी संचालकांनी त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांनी कागदपत्रांची छाननी केल्यांतर क्लाउड मायनिंग कराराचा भंग करुन फसवणूक केल्याचे लक्षात आले. फसवणुकीचा हा प्रकार ३१ ऑगस्ट २०१६ ते १५ एप्रिल २०१७ या कालावधीत घडला आहे. दरम्यान संशयितांवर महाराष्ट्र ठेवीदारांचे वित्तीय संस्थातील संरक्षण आणि अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला असून, प्रकरण आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे वर्ग करण्यात आले आहे.

.. .. ..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवाजी स्टेडियमवर रंगली ‘हास्यजत्रा’

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मराठी व हिंदी सिनेमातील गाजलेल्या गाण्यावर मराठी तारे तारकांची दिलखेचक नृत्ये,दैनंदिन जीवनातील घडामोडीवरील विनोदी किस्से, गमंती-जमतीची पेरणी यामुळे 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' पाहताना प्रेक्षकांची हसता हसता पुरेवाट झाली. मराठी कलाकारांचा गीत, नृत्य आणि विनोदी कार्यक्रमामुळे छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे जमलेल्या प्रेक्षकांचे मनोरंजन झाले.

येथील 'बी चॅनेल'च्या सतराव्या वर्धापनदिनानिमित्त दोन दिवसीय 'भीमा फेस्टिव्हल'ला शनिवारी प्रारंभ झाला. फेस्टिव्हलचा पहिला दिवस मराठी सिनेमा व मालिका कलाकारांच्या कलाविष्कारांनी फुलला. सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास महोत्सवाचे उद्घाटन झाले. करवीर निवासिनी अंबाबाई देवीला साकडे घालणारे भक्ती गीत व गोंधळ सादर करत कार्यक्रमाला प्रारंभ झाला. अभिनेत्री मृण्मयी देशपांडे व सहकलाकारांनी 'पिंजरा' सिनेमातील 'गं साजणी' या गाण्यावर ठसकेबाज नृत्य सादर करत प्रेक्षकांची वाहवा मिळवली.

अभिनेत्री प्राजक्ता माळीचे खुमासदार सूत्रसंचालन, अभिनेता अंशुमन विचारे, अरुण कदम, समीर चौगुले, पॅडी, प्रसाद खांडेकर, विशाखा सुभेदार यांच्या विनोदी किस्से, नात्यावर आधारित गमंतीजमतीने कार्यक्रमात रंगत भरली. गायक स्वप्निल बांदोडकर यांच्या गाण्यावर रसिक प्रेक्षकांनी फेर धरला. शिट्ट्या, टाळयांचा वर्षाव करत कलाकारांच्या गीत नृत्याला दाद दिली. अडीच तासांहून अधिक वेळ स्टेडियमवर रंगलेल्या मनोरंजनात्मक कार्यक्रमाचा प्रेक्षकांनी मनमुराद आस्वाद लुटला.

दरम्यान, पालकमंत्री चंद्रकांत पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या हस्ते महोत्सवचे उद्घाटन झाले. याप्रसंगी संसदरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल खासदार धनंजय महाडिक यांचा चांदीची गदा देऊन सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर आमदार अमल महाडिक, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक, गोकुळचे चेअरमन रवींद्र आपटे, देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार, भाजप महानगर जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, माजी महापौर सुनील कदम, सत्यजित कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रतिस्पर्ध्याला चितपट करण्याची शिकवण

'कोल्हापूरकरांनी दिलेल्या पाठबळामुळे सलग तीन वर्षे मला संसदरत्न पुरस्कार लाभला. काही जणांनी पुरस्कारावरुन टीका केली. मात्र मी कोल्हापूरचे प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीला प्राधान्य दिले. माझा नशीबावर नाही तर कर्तृत्वावर विश्वास आहे. लोकांचे प्रेम आणि सातत्याने काम करत राहण्याची वृत्ती यामुळे कोल्हापूरचे प्रश्न संसदेच्या पटलावर मांडू शकलो. प्रतिस्पर्धी पैलवानाला चितपट करुन त्याच्या छाताडावर बसण्याची आम्हाला शिकवण आहे' असा टोला खासदार धनंजय महाडिक यांनी विरोधकांना लावला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कचऱ्याचे होणार कॅपिंग

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरात दररोज जमा होणाऱ्या कचऱ्यांपासून वीज निर्मितीला महापालिकेने सुरुवात केली आहे. आता गेल्या अनेक वर्षांपासून साचलेल्या कचऱ्याचे कॅपिंग (जमीन भरणा क्षेत्र) लवकरच सुरुवात होणार आहे. कॅपिंगसाठी शुक्रवारी निविदा प्रसिद्ध केली असून सुमारे साडेतीन लाख टन कचऱ्याचे कॅपिंग करून आठ एकर जागेत लॉन डेव्हलप करण्यात येणार आहे. त्यामुळे कसबा बावडा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प स्थळावरील कचऱ्याची बऱ्यापैकी निर्गत होईल.

शहरात दैनंदिन १८० टन कचरा संकलीत होतो. घंटागाडीद्वारे ओल्या व सुक्या कचऱ्याचे संकलन केले जाते. सर्व कचरा कसबा बावडा येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पामध्ये टाकला जात आहे. एकाच ठिकाणी कचरा साचून कचऱ्यांचा डोंगर तयार झाला आहे. शिये येथील खणीमध्ये कचरा टाकण्यात येणार होता. पण न्यायालयीन वादामुळे कचरा टाकायचा कोठे? असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

यातून मार्ग काढण्यासाठी महापालिका प्रशासन विविध पर्यायांचा अवलंब करत आहे. गेल्या काही दिवसांपासून कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्प सुरू झाला आहे. त्यामुळे दैनंदिन सकंलीत होणाऱ्या कचऱ्यापैकी किरकोळ प्रमाणात कचरा साचून राहत आहे. वीज निर्मिती प्रकल्पाबरोबर साचून राहिलेल्या कचऱ्याचे कॅपिंग करण्यास सुरुवात होणार आहे. त्यासाठी राज्य सरकारकडून नऊ कोटी ५० लाखांचा निधी मिळाला आहे. या निधीतून प्रकल्पातील कचरा आहे, त्याच ठिकाणी कॅपिंग करण्यात येणार आहे. त्यासाठी शुक्रवारी निविदा प्रसिद्ध केली. अत्याधुनिक मशिनच्या सहाय्याने कचऱ्याचे तीन थरात कॅपिंग होईल. कॅपिंगनंतर त्यावर एचडीपीईचा प्लास्टिक कागदावर मातीचा लेयर देऊन लॉन तयार करण्यात येणार आहे. सुमारे आठ एकर परिसरातील सुमारे साडेतीन लाख टन कचऱ्याचे कॅपिंग होईल.

दुर्गंधी कमी होण्यास मदत

कसबा बावडा येथील कचऱ्याचा सर्वात जास्त त्रास लाइनबाजार व कसबा बावडा येथील रहिवाशांना होतो. आजुबाजूच्या नागरिकांना दररोज दुर्गंधीचा सामना करावा लागतो. परिणामी परिसरातील नागरिक सातत्याने कचऱ्याचा प्रश्न निकालात काढण्यासाठी महापालिकेकडे धाव घेत आहेत. या परिसरात पूर्व दिशेकडून वारे वाहू लागल्यानंतर कचऱ्याची दुर्गंधी ताराबाई पार्क, नागाळा पार्क परिसरापर्यंत पोहोचते.

- निविदेची अंतिम मुदत २५ फेब्रुवारी

- कॅपिंगसाठी नऊ कोटी ५० लाख निधी प्राप्त

- आठ एकर परिसरात होणार काम

- साडेतीन लाख टन कचऱ्याचे कॅपिंग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दरवाढीने 'संकेश्वरी'चा ठसका

0
0

बाजारभाव...

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वेळेत पाऊस न झाल्याने मिरचीचा दर वधारला असून, कोल्हापूरकरांच्या चटणीत हमखास समाविष्ट असलेल्या संकेश्वरी मिरचीच्या दराचा ठसका ग्राहकाला बसू लागला आहे. संकेश्वरी मिरचीचा दर प्रतिकिलो ६०० ते ८०० रुपये झाला आहे. लवंगी मिरची प्रतिकिलो १४० रुपये, तर ब्याडगीचा दर १७० ते २१० रुपये किलो झाला आहे.

संकेश्वरी मिरची चवीला तिखट असून, रंग व वासाला चांगली असल्याने कोल्हापूरकरांची या मिरचीला पसंती असते. दरवर्षी बाजारात संकेश्वरी मिरचीचा दर प्रतिकिलो ३०० ते ४०० रुपये असतो. यंदा मात्र सुरुवातीलाच दर प्रतिकिलो ६०० ते ८०० रुपये आहे. यंदा वेळेत पाऊस न झाल्याने मिरचीचे उत्पादन घटले आहे. याशिवाय आवकच कमी असल्याने दर वाढले आहेत. मटण, मासे, मसाल्याचे पदार्थ तयार करताना संकेश्वरी मिरची पावडरचा वापर केला जातो. त्यामुळे ग्राहकांची संकश्वरीला मोठी मागणी असते.

संकेश्वरीबरोबर लवंगी, ब्याडगी, कर्नाटक जवारी, गुंटूर मिरचीलाही मागणी आहे. कर्नाटक मिरचीचा प्रतिकिलो दर १५० ते १६० रुपये असून गुंटूरचा दर १३० ते १४० रुपये आहे. काश्मिरी मिरचीचा दर २६० रुपये किलो आहे. मारवाडी, गुजराती समाज काश्मिरी मिरचीला पसंती देतात. देठ काढलेल्या दंडीकेट ब्याडगी मिरचीचा दर २६० रुपये किलो आहे. याशिवाय ढब्बी ब्याडगी, रेशम पट्टा मिरच्याही बाजारात उपलब्ध आहेत.

मिरचीचे दर वाढले असले तरी धान्य, कडधान्याचे दर स्थिर आहेत. तूरडाळ, हरभरा डाळीच्या दरात दोन रुपयांनी वाढ झाली आहे.

००००

किराणा दर (प्रतिकलो रु.)

पोहे : ४५

साखर : ३५

शेंगदाणा : ९० ते १००

मैदा : ३२

आटा : ३२

रवा : ३२

गूळ : ४५ ते ५०

साबुदाणा : ५६

वरी : ७२ ते ८०

००००

डाळीचे दर (प्रतिकिलो रु.)

तूरडाळ : ८० ते ८४

मूगडाळ : ८४

उडीद डाळ : ८४

हरभरा डाळ : ७०

मसूर डाळ : ६४

मसूर : ७० ते १२०

चवळी : ८०

हिरवा वाटाणा : ९६

काळा वाटाणा : ६४

मूग ८०

मटकी : १००

छोले : १००

००००

ज्वारी दर (प्रतिकिलो रु.)

बार्शी शाळू : ४० ते ५०

गहू : ३० ते ३४

हायब्रीड ज्वारी : ३०

बाजरी : २८

नाचणी : ३६

००००

तेलाचे दर (प्रतिकलो रु.)

शेंगतेल : १२५

सरकी तेल : ९०

खोबरेल : २४०

सूर्यफूल : ९० ते १०५

०००

मसाले दर (प्रतिकलो रु.)

तीळ : १८०

जिरे :२८०

खसखस : ७००

खोबरे : १९०ते २००

वेलदोडे : २०००

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्रेटसाठी महिलेने डंपर अडवला

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकासोबत शनिवारी सकाळी महापालिका चौकात एका द्राक्ष विक्रेत्या महिलेने गोंधळ घातला. पथकाने द्राक्षांचे क्रेट ताब्यात घेतल्यानंतर ते परत मिळवण्यासाठी महिलेने चक्क डंपरच अडवला. डंपरच्या बॉनेटला लोंबकळत तिने पथकाला बराच वेळ अडवून ठेवले. महापालिकेच्या चौकातील या घटनेने चांगलीच खळबळ उडाली.

गेल्या दोन महिन्यांपासून शहरातील अतिक्रमणांवर महापालिकेच्या पथकाकडून कारवाई सुरू आहे. शहरातील अनेक महत्त्वाच्या रस्त्यांवर सातत्याने कारवाई करीत अतिक्रमणे हटविण्यात येत आहेत. सोमवार ते शुक्रवार ज्या भागात कारवाई होते, तेथे पुन्हा अतिक्रमणे होऊ नयेत यासाठी पथक फिरतीवर असते. त्यामुळे अतिक्रमणधारकांवर एकप्रकारे वचक आहे.

गेल्या आठवड्यात राजारामपुरी व पांजरपोळ येथे कारवाई सुरू असताना पथकासोबत वादवादी झाली. त्यामुळे अतिक्रमण विभागप्रमुख पंडित पोवार यांना रक्तदाबाचा त्रास होऊन त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते. त्यामुळे गेल्या आठवड्यापासून अतिक्रमण हटाल मोहीम थांबली आहे. मात्र पथक फिरती करत विक्रेते रस्त्यावर येणार नाहीत याची काळजी घेत आहे. अशीच फेरी शनिवारी सुरू होती. महाराणा प्रताप चौक ते महापालिका चौक, भाऊसिंगजी रोडवर गाजर, द्राक्ष विक्रेते रस्त्यावर बसले होते. या विक्रत्यांना हटवताना पथकाने त्यांचा माल ताब्यात घेतला. यावेळी झालेल्या झटापटीत एक विक्रेत्या महिलेची द्राक्षे रस्त्यावर पडली. तिच्याकडील क्रेट जप्त करण्यात आले. क्रेट जप्त करून डंपर जात असताना महिलेने तो अडवला. डंपरसमोर येऊन बॉनेटला लोंबकळत क्रेट परत देण्याची मागणी ती करू लागली. अन्य विक्रेतेही तिच्या मदतीला धावून आले. पथकातील कर्मचाऱ्यांनी महिलेला बाजूला करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना यश आले नोही. सुमारे दहा ते पंधरा मिनिटे गोंधळ सुरू होता. या गोंधळामुळे पथकाने अन्य ठिकाणी फिरतीच केली नाही. याबाबत शहर अभियंता व उपशहर अभियंता यांच्याशी संपर्क साधला पण त्यांचे फोन बंद होते.

अधिकारी फिरकले नाहीत

महासभेत चर्चा झाल्यानंतर अतिक्रमण निर्मूलन कारवाईला सुरुवात झाली. शुक्रवारी स्थायी समितीच्या बैठकीतही अतिक्रमणांवर कडक कारवाई करण्याची मागणी झाली. सभेत नगरसेवक जोरात मागणी करतात. त्यानुसार कर्मचारी कारवाईसाठी जातात. पण अधिकाऱ्यांचे त्यांना पाठबळ मिळत नाही. सकाळी मुख्य कार्यालयाच्या हाकेच्या अंतरावर विक्रेती महिला गोंधळ घालत असताना एकही अधिकारी घटनास्थळी दाखल झाला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रहार अपंग क्रांतीचेहलगीनाद आंदोलन

0
0

प्रहार अपंग क्रांतीचे

हलगीनाद आंदोलन

सोलापूर :

प्रहार अपंग क्रांतीच्या वतीने शुक्रवारी अपंग बांधवांच्या विविध मागण्यांसाठी संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्ष संजीवनी बरंगुळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हलगीनाद आंदोलन करण्यात आले.

गेल्या तीन महिन्यांपासून सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमधून ऑनलाइन प्रमाणपत्र देणे बंद झाले आहे. दिव्याग बांधवांना व्यवसायासाठी २०० स्क्वेअर फूट जागा देण्यात यावी. महापालिकेकडून व्यवसायासाठी स्टोल मिळावेत. बांधवांना सुशिक्षित बेरोजगार म्हणून नौकरीत सामावून घ्यावे. अपंग भवन बांधून मिळावे. पंडित दीनदयाल योजनेतून घरकूल मिळावे. शेतकरी असलेल्या अपंग बांधवांना त्यांच्या पिकास हमीभाव देण्यात यावा आदी मागण्या करण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाग्यश्री माने खूनप्रकरणीनाभिकांच्या बंदला प्रतिसाद

0
0

भाग्यश्री माने खूनप्रकरणी

नाभिकांच्या बंदला प्रतिसाद

कराड :

करपेवाडी (ता. पाटण) येथील भाग्यश्री माने या विद्यार्थिनीचा २२ जानेवारी रोजी खून झाला होता. या घटनेला आजअखेर अकरा दिवस उलटूनही आरोपी सापडत नाहीत. समाजाच्या उद्रेकामुळे पोलिसांनी खुनाच्या तपासास गती देत आरोपीस अटक करणे अपेक्षित होते. मात्र, पोलिस प्रशासनाच्या आश्वासनानंतरही तपासास गती न मिळाल्याने संतप्त नाभिक समाजाने शुक्रवारी सातारा जिल्हा बंदची हाक दिली होती. त्याला कराडमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images