Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

बांधकाम कामगारांची नोंदणी न केल्यास आंदोलन

0
0

फोटो आहे

कोल्हापूर टाइम्स टीम

'कोल्हापूर महापालिका क्षेत्रात बांधकाम कामगारांची नोंदणी व नुतनीकरणाचे काम अनागोंदी कारभारामुळे बंद पडले आहे. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे कामगारांना सरकारच्या अनेक योजनांपासून वंचित राहावे लागते. एक फेब्रुवारीपासून नोंदणी दाखल देण्यास सुरुवात न केल्यास महापालिकेसमोर चुली पेटवून आंदोलन करण्याचा इशारा आरपीआय कामगार आघाडीच्यावतीने सोमवारी आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांना निवेदनाद्वारे दिला.

निवेदनात म्हटले आहे, 'महापालिका क्षेत्रात रहिवास असलेल्या बांधकाम कामगारांना महापालिकेच्या विभागीय कार्यालयाकडून दाखला देण्यात येतो. महापालिकेच्या दाखल्यानंतर बांधकाम कामगार महामंडळाकडून २७ प्रकारच्या योजनांचा लाभ मिळतो. कोणतेही संरक्षण नसलेल्या आणि मोलमजुरी करणाऱ्या कामगारांना महामंडळाच्या योजनेचा चांगला लाभ होतो. पण महापालिका प्रशासनाकडून दाखले मिळत नसल्याने त्यांना लाभाच्या योजनेपासून वंचित रहावे लागत आहे. महामंडळाच्या योजनाचा लाभ घेण्यासाठी दाखले देण्यास सुरुवात करावी. दोन दिवसांत दाखले देण्यास सुरुवात न झाल्यास एक फेब्रुवारी रोजी महापालिकेसमोर चुली पेटवून आंदोलन करू.'शिष्टमंडळात अध्यक्ष गुणवंत नागटिळे, प्रदीप मस्के, अशोक कांबळे, अरुण दबडे, सुनील मस्के, अनिल जाधव, जीवन वाघमारे आदींचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विवेकानंदमध्ये रंगला सांस्कृतिक कार्यक्रम

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून येथील विवेकानंद कॉलेजतर्फे आयोजित सांस्कृतिक महोत्सवात विविध कलागुणांची उधळण झाली. लोकनृत्य, गायन, वादन आणि एकांकिका स्पर्धा रंगल्या. सांगली, सातारा, कोल्हापूर, रायगड, सिंधुदुर्ग, रायगड, सोलापूर, पुणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या विविध शाखांतील एक हजार विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला. संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या हस्ते व संस्थेच्या सचिव प्राचार्या शुभांगी गावडे, संस्थेचे सहसचिव प्राचार्य युवराज भोसले, शाहीर कुंतिनाथ करके, प्राचार्य डॉ. आर. व्ही. शेजवळ, माजी सहसचिव आर. के. भोसले यांच्या उपस्थितीत महोत्सवचे उद्घाटन झाले.

लोकनृत्य स्पर्धेत पूर्व प्राथमिक गटामध्ये नवी मुंबई वाशी इंग्रजी माध्यम स्कूल, प्राथमिक गटात श्री कात्रेश्वर हायस्कूल कातरखटाव, माध्यमिक गटात महर्षी शिंदे विद्यामंदिर व उच्च माध्यमिक गटात भवानी विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेजने प्रथम क्रमांक पटकावला. गायन स्पर्धेत पूर्व प्राथमिक गटात सातारा येथील नूतन मराठी विद्यालयची विद्यार्थिनी मानसी कांबळे, प्राथमिक गटात येथील राजर्षी शाहू महाराज हायस्कूलची विद्यार्थिनी तनाझ नाईकवडी प्रथम आली. माध्यमिक गटाच याच हायस्कूलचा विद्यार्थी प्रथमेश पाटील व उच्च माध्यमिक गटात न्यू इंग्लिश स्कूल ज्युनिअर कॉलेज, जोहेची विद्यार्थिनी सायली पाटील प्रथम आली. विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविले. कला व सांस्कृतितक महोत्सवाचे अध्यक्ष प्राचार्य बी. एन. माळी यांनी प्रास्ताविक केले. विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस. वाय. होनगेकर यांनी स्वागत केले. प्रा. समीक्षा फराकटे, राजश्री पाटील यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. ए. एस. महात यांनी आभार मानले.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे

वादन स्पर्धेत पूर्व प्राथमिक गटात तासगाव येथील केतकी मोहिते, प्राथमिक गटात राजर्षी छत्रपती शाहू महाराज हायस्कूलचा विद्यार्थी प्रतिक हजारे, माध्यमिक गटात न्यू इंग्लिश स्कूल, म्हसळा येथील विद्यार्थी आविष्कार सुतार आणि उच्च माध्यमिक गटात नवी मुंबई ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी अजय निकम विजेते ठरले. एकांकिका स्पर्धेत पूर्व प्राथमिक गटात न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल, रेंदाळने प्रथम क्रमांक पटकावला.अन्य गटात न्यू इंग्लिश स्कूल जोहे, पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल लोणीकाळभोर आणि न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज जोहे विजेते ठरले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांचे अभिनंदन

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्याचा बहूचर्चित टोल प्रश्न मंगळवारी निकालात निघाला. राज्य सरकारने शहर रस्ते विकास प्रकल्पाचे उर्वरित ७३ कोटी ३७ लाख आयआरबी कंपनीला देण्याचे आदेश दिले. त्यामुळे कोल्हापूर शहरावरील टोलचे भूत कायमचे गाडले गेले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरातून टोल हद्दपार केला असल्याचे गौरवोद्गार भाजपच्या पदाधिकारी बैठकीत विविध वक्त्यांनी काढले. जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव, जिल्हा सरचिटणीस अशोक देसाई, विजय जाधव, सुभाष रामुगडे, दिलीप मेत्राणी, संतोष भिवटे, राहुल चिकोडे, आर. डी. पाटील, जिल्हा उपाध्यक्ष अमोल पालोजी, हेमंत आराध्ये, गणेश देसाई, मारुती भागोजी, सुरेश जरग, चंद्रकांत घाटगे, राजू मोरे, हर्षद कुंभोजकर, बाबा इंदूलकर, तौफिक बागवान, नचिकेत भुर्के आदी उपस्थित होते.

०००००००००

जिल्हाध्यक्ष संदीप देसाई म्हणाले, 'अश्वासन देणार सरकार नसून अश्वासन माळणारे सरकार असल्याचे निर्णयातून स्पष्ट होते. जिल्ह्याला वेठीस धरून शहरांतर्गत रस्ते करण्याचे ढोंग रचून प्रकल्प शहवासियांचा माथी मारला. प्रकल्पाचे ५० टक्के काम पूर्ण झालेले नसताना तत्कालीन गृहराज्य मंत्र्यांनी टोल नाक्यावर स्वत:च टोलची पावती फाडून वासियांमध्ये संभ्रम निर्माण केला. परंतू पालकमंत्री पाटील यांनी टोल हद्दपार करण्याचे अश्वासन दिले. त्याची आज पूर्तता झाली.'

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव म्हणाले, 'काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असताना जिल्ह्यात काही प्रकल्प आणण्यात आले, हे प्रकल्प चाचणी स्वरूपामध्ये राबवण्याचा प्रयत्न झाला. रस्ते प्रकल्पाची बनवेगिरी पुढे आल्यानंतर जनआंदोलन उभे राहिल. पालकमंत्री पाटील यांनी आंदोलनात सहभागी होत भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर टोलचे भूत गाडण्याचे अश्वासन दिले. त्याची पूर्तताही केली. पण काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते संभ्रम निर्माण करत होते. मंत्री पाटील यांनी टोल कायदेशीर पूर्तता करून कायमचा हद्दपार केला. ढपला संस्कृती मध्ये धन्यता माणनाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या तथाकथित पुढाऱ्यांनी आत्मचिंतन करावे.' असा टोलाही त्यांनी लगावला.

यावेळी जिल्हा सरचिटणीस अशोक देसाई, विजय जाधव, सुभाष रामुगडे, दिलीप मेत्राणी, संतोष भिवटे, राहुल चिकोडे, आर. डी. पाटील, जिल्हा उपाध्यक्ष अमोल पालोजी, हेमंत आराध्ये, गणेश देसाई, मारुती भागोजी, सुरेश जरग, चंद्रकांत घाटगे, राजू मोरे, हर्षद कुंभोजकर, बाबा इंदूलकर, तौफिक बागवान, नचिकेत भुर्के आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सलग चार किलोमीटर सायकल चालविण्याचा विक्रम

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

हुबळी येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त १२३५ सायकलस्वारांनी चार किलोमीटरच्या एका रांगेत सायकल चालविण्यासह सर्वांत लांब रांग करण्याचा विश्वविक्रम केला. यामध्ये कोल्हापुरातील मोटार वाहन निरीक्षक सुभाष देसाई, रवींद्र चव्हाण यांच्यासह अतुल संकपाळ व प्रकाश पाटील यांनी सहभाग घेतला. याची 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्'मध्ये नोंद झाली. हुबळी सायकलिंग क्लबतर्फे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

२०१६ साली बांग्लादेशातील ११६८ सायकलस्वारांनी केलेल्या ३.२ किलोमीटरच्या लांब रांगेच्या विक्रमाची नोंद 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये होती. तो विक्रम यावेळी मोडण्यात आला. सायकलस्वारांची ही जगातील सर्वांत मोठी रांग ठरली. सायकल चालविण्यातून मिळणाऱ्या आरोग्य व पर्यावरणीय फायद्यांबाबत जागृतता निर्माण करण्याचा उद्देशातून ही रांग तयार करण्यात आली होती. यामध्ये कर्नाटकसह, महाराष्ट्र, दिल्ली, जम्मू-काश्मीर, गोवा आदी राज्यांतून सायकलस्वार सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘रुसा’चे सायबरला पाच कोटी अनुदान

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

छत्रपती शाहू इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस एज्युकेशन अँड रिसर्स (सायबर) या संस्थेने व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अंगी कौशल्ये विकसित निर्माण केली. संस्थेच्या या शैक्षणिक कार्याचा व गुणवत्तेचा सन्मान म्हणून 'रुसा'ने पाच कोटी रुपयांचे अनुदान मंजूर केल्याची माहिती संस्थेचे संचालक एम. एम. अली व विश्वस्त डॉ. व्ही. एम. हिलगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

अली म्हणाले, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन फेब्रुवारीला दिल्लीमधून एकाचवेळी ७३ संस्थांमध्ये डिजिटल उपक्रमाचे उद्घाटन करणार आहेत. देशातील १५ स्वायत्त संस्थांमध्ये उद्योजकता, रोजगारभिमुखता व करिअर केंद्रांपैकी सायबर ही प्रमुख संस्था आहे. रुसाकडून उपलब्ध निधीच्या माध्यमातून संस्थेत विद्यार्थीकेंद्रित पायाभूत सुविधा, मल्टिपर्पज हॉल, सभागृह, शिक्षणात नवतंत्रज्ञानाचा अवलंब होणार आहे.'

विश्वस्त डॉ. हिलगे म्हणाले, 'संस्थेत सध्या विविध अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ११०० हून अधिक आहे. संस्थेचे सचिव डॉ. रणजित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर, सांगली, गडहिंग्लज, गिजवणे येथे सात शैक्षणिक संकुले कार्यरत आहेत.'

राष्ट्रीय उच्च शिक्षण अभियानचे समन्वयक डॉ. सी. एस. दळवी म्हणाले, 'रुसाच्या अनुदानामुळे विद्यार्थीकेंद्रित उपक्रमांना चालना मिळणार आहे. पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील. संस्थेने यापूर्वीच पंधरा लाख रुपये खर्चून डिजिटल लायब्ररी तयार केली आहे.'

पत्रकार परिषदेला डॉ. दिपक भोसले, प्रा. सचिन जगताप, प्रा. श्रद्धा कुलकर्णी, मृणालिणी शिंगे आदी उपस्थित होते.

०००

रविवारपासून कार्यक्रम, आंतरमहाविद्यालयीन महोत्सव

संस्थेचे संस्थापक प्रा. ए. डी. शिंदे यांच्या स्मृतिदिनानिमित्त तीन ते पाच फेब्रुवारीअखेर विविध कार्यक्रम होणार आहेत. रविवारी (ता.३) सकाळी ९.४५ वाजता प्रा. शिंदे यांच्या स्मृतिशिल्पास अभिवादन करण्यात येईल. याच दिवशी सकाळी दहा वाजता ग्रंथ प्रदर्शन व त्यानंतर रक्तदान शिबिराचे उद्घाटन होईल. सकाळी ११ वाजता राजकीय विश्लेषक डॉ. अशोक चौसाळकर यांचे 'महात्मा गांधी : काल आणि आज' या विषयावर व्याख्यान होणार आहे. दरम्यान, सोमवारी व मंगळवारी आंतरमहाविद्यालयीन महोत्सव होणार आहे.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोकसभेची अंतिम मतदार यादी आज प्रसिद्ध होणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राबविलेल्या मतदारयादी अद्ययावतीकरण मोहिमेत एक लाख ३८२ मतदार वाढले आहेत. त्यामुळे जिल्ह्याचे ३० लाख ७९ हजार मतदार झाले. दरम्यान, उद्या (गुरुवारी) ३३२१ मतदान केंद्रांवर ही अंतिम यादी प्रसिद्ध होईल. यादी प्रसिद्ध झाल्यानंतर वेबसाइटवर जाऊन यादीत नाव असल्याची खात्री मतदारांना करता येणार आहे.

जिल्हा निवडणूक प्रशासनातर्फे चार महिन्यांपासून मतदार यादी अद्ययावतीकरण करण्याचे काम सुरू आहे. नविन मतदार नोंदणी, मृत, स्थलांतरीत मतदारांची नावे वगळणे, नाव, पत्यात दुरुस्तीसाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन अर्ज स्वीकारण्यात आले. कॉलेज, महाविद्यालयांत जाऊन जागृती केल्याने १८ ते १९ वयोगटातील मतदारांनी मोठ्या संख्येने अर्ज केले. परिणामी राज्यातील सर्वच जिल्ह्यातून अर्जांची संख्या अधिक राहिली. यामुळे छाननी, पडताळणीसाठी विलंब लागला. तीनवेळा यादी प्रसिद्धीची तारीख लांबणीवर पडली होती. २०१४च्या लोकसभा मतदारयादीच्या तुलनेत आतच्या यादीत नविन मतदारांची भर पडली आहे. मात्र नाव नोंदणीसाठीचे आवश्यक पुरावे नसल्याने तृतीयपंथीय मतदारांची नोंदणी कमी झाली. फक्त सात तृतीयपंथीय मतदार वाढले आहेत.

यादी कशी पहाल?

इंटरनेटवर जाऊन https://www.nvsp.in/ या निवडणूक विभागाच्या वेबसाईटवर जाऊन मतदारांना आपले नाव पाहण्याची सुविधा आहे. ऑनलाइन किंवा मतदान केंद्रांवर लावण्यात आलेल्या यादीतही नाव पाहता येणार आहे. सर्व नव्या मतदारांना मतदान ओळखपत्र फेब्रुवारीअखेरपर्यंत देण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे.

३०,७९,०००

एकूण मतदार

१५,८५,०००

पुरुष मतदार

१४,९१,०००

स्त्री मतदार

७६

तृतीयपंथी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरासाठी जमीन द्या,डवरी समाजाचा मोर्चा

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

येथील सायबर चौकाजवळील डवरी समाजाने लहान मुलांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर बुधवारी मोर्चा काढला. समाजाच्या यशवंत गृहनिर्माण संस्थेतर्फे नियोजित घरासाठी पुरेशा प्रमाणात जमीन द्यावी, या मागणीसाठी बहुजन परिवर्तन पार्टीप्रणित महिला बचाव समितीच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला.

१८ दिवसांच्या बेमुदत उपोषणानंतर समाजाला १५ गुंठे जमीन मिळाली. मात्र, सातबारावर नोंदही झाली. प्रत्यक्षात ती जमीन ७ ते ८ गुंठेच आहे. या जमिनीत बांधकामासाठी खोदकाम केल्यानंतर मोठी ड्रेनेजची पाइप असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे गृहनिर्माण प्रकल्प बांधणे शक्य होत नाही. त्यामुळे सोयीची जमीन द्यावी, अशी मागणी प्रशासनाकडे वारंवार केली.

प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. त्याच्या निषेधार्थ डवरी समाजाने लहान मुले, महिलांना घेऊन दसरा चौकातून मोर्चा काढला. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर मोर्चाची सांगता झाली. यावेळी प्रशासनाकडून न्याय न मिळाल्यास २० फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषणाचा इशाराही देण्यात आला. मोर्चात मनीषा नाईक, निशा रसाळ, भगवान दाभाडे, आदी सहभागी झाले होते.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्णबधिर २० मुलांवर होणार मुंबईत शस्त्रक्रिया

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा व अंगणवाडीत शिकणाऱ्या २० विद्यार्थ्यांमध्ये कर्णबधिरत्व आढळले असून, त्यांच्यावर मुंबईत मोफत शस्त्रक्रिया होणार आहे. सर्व शिक्षा अभियानांतर्गत जिल्हा परिषदेने जून महिन्यात आरोग्य तपासणी केली होती. तपासणीदरम्यान वेगवेगळ्या विकारांनी त्रस्त मुलांवर 'क्लॉक्लिअर इम्प्लॉट' शस्त्रक्रिया होणार आहे. २० मुलांसाठी दोन कोटी रुपयांहून अधिक वैद्यकीय खर्च येणार आहे. शस्त्रक्रियेपूर्व तपासणी व उपचारासाठी मुले शुक्रवारी (ता.१) मुंबईकडे रवाना होणार आहेत.

पालकमंत्री पाटील यांच्या वैद्यकीय सहाय कक्षामार्फत वैद्यकीय खर्च करण्यात येणार आहे. शालेय मुलांना वैद्यकीय उपचारासाठी मदत मिळावी म्हणून शिक्षण समिती सभापती अंबरीश घाटगे यांनी पालकमंत्र्याकडे पाठपुरावा केला होता. वरळी येथील एसआरसीसी हॉस्पिटल येथे शस्त्रक्रिया होणार आहे. शिक्षण विभागातर्फे जून महिन्यात आरोग्य तपासणी केली होती. त्यामध्ये २८ मुलांमध्ये कर्णदोष आढळला होता. तीव्र ते अतितीव्र कर्णबधिरत्व असलेल्या मुलांमध्ये क्लॉक्लिअर इंम्प्लॉट ही शस्त्रक्रिया केली जाते.

या शस्त्रक्रियेसाठी प्रत्येक मुलाला अंदाजे १० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. २० मुलांनी वैद्यकीय उपचारासाठी सहमती दर्शविली आहे. ग्रामीण भागातील पालकांना हा वैद्यकीय खर्च परवडणारा नसल्यामुळे स्वयंसेवी संस्था व लोकसहभागातून उपचाराची सुविधा निर्माण कराव्यात, असे सभापती घाटगे यांनी शिक्षण विभागाला सुचविले होते. सीईओ अमन मित्तल यांच्या मार्गदर्शनानुसार शिक्षणाधिकारी आशा उबाळे, उपशिक्षणाधिकारी जयश्री जाधव, मारुती जाधव यांनी प्रयत्न केले. सदस्य प्रसाद खोबरे यांचेही याकामी सहकार्य मिळाले.

०००

कर्णबधिर मुलांवरील वैद्यकीय उपचारासाठी पालकमंत्री पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यांच्या वैद्यकीय सहाय कक्षामार्फत त्या मुलांवर मोफत शस्त्रक्रिया होणार आहे. वैद्यकीय खर्चासह राहण्याची व भोजनाची व्यवस्था त्या कक्षामार्फत होणार आहे.

अंबरिश घाटगे, सभापती शिक्षण समिती

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जागा, इमारत हस्तांतराची प्रक्रिया सुरू

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर शहर एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पाची रक्कम राज्य सरकारने अदा करण्याची प्रक्रिया केल्यानंतर आयआरबी कंपनीकडे टेंबलाईवाडी येथे असलेली जागा व इमारत ताब्यात घेण्याची प्रक्रिया बुधवारपासून महापालिका प्रशासनाने सुरू केली. जागा व इमारतीचे मूल्यांकन केल्यानंतर स्टँपड्यूटी व नोंदणीशुल्क जाम करून इमारत ताब्यात घेतली जाईल. त्यामुळे गेल्या दहा वर्षांपासूनचा 'टोल' हा विषय पूर्णपणे निकालात निघाला.

सन २००८ मध्ये शहरांतर्गत रस्त्यांची बांधणी करण्यासाठी महापालिकेच्यावतीने ४९ किलोमीटरचा रस्ते विकास प्रकल्प 'बीओटी' तत्त्वावर राबविला. त्यासाठी आयआरबी कंपनीला काम देण्यात आले. २२० कोटी रुपयांच्या प्रकल्प खर्चातील तूट भरून काढण्यासाठी महापालिकेने करारावेळी टेंबलाईवाडी येथील ३० हजार चौरस मीटर जागा ९९ वर्षाच्या कराराने कंपनीला दिली होती. कंपनीने आर्यन हॉस्पिटॅलिटीसोबत करार करून अलिशान हॉटेल उभारणीस सुरुवात केली. सद्य:स्थितीत याचे बांधकाम पूर्णत्वाकडे जात असतानाच राज्य सरकारने कंपनीला प्रकल्प खर्चाची रक्कम देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी ४७३ कोटी ३७ लाखाची तरतूद केली.

प्रकल्प खर्चाच्या रकमेला मंजुरी देताना कंपनीला दिलेली जागा व इमारत ताब्यात घेण्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने यासंदर्भात दिलेल्या आदेशात नमूद केले आहे. त्यानुसार महापालिका प्रशासनाने इमारत ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. २०१६मध्ये मूल्यांकन समितीने जागा व इमारतीचे मूल्यांकन ७५ कोटी रुपये केले होते. सध्याच्या रेडिरेकनरच्या दरानुसार पाच टक्के स्टँप ड्यूटी व एक टक्के नोंदणीशुल्क देऊन ही जागा हस्तांतर करावी लागणार आहे. सरकारी मालमत्ता ताब्यात घेताना कोणताही कर नसल्याचा अध्यादेश आहे. मात्र ही इमारत कमर्शिअल असल्याने याबाबत प्रशासनाला विधी विभागाचा अभिप्राय अपेक्षीत आहे.

आयआरबीसोबतच्या मूळ करारामध्ये कंपनीने दर पाच वर्षांनी रस्त्यांची डागडुजी करण्याचा मुद्दा होता. तसेच वर्षाला देखभालीपोटी पाच कोटी रुपयांचा खर्च होणार होता. मात्र नंतर झालेल्या टोलविरोधी आंदोलनाने सर्व कामे ठप्प झाली. कंपनीने २५ कोटी रुपयांची अपुरी कामे केली आहेत. महापालिकेचे उत्पन्नाचे स्त्रोत पाहता प्रकल्पाची देखभाल-दुरुस्ती, उर्वरीत कामे पूर्ण करताना महापालिकेची चांगलीच दमछाक होणार आहे.

सात कोटी महामंडळाकडे

महापालिकेने २७ कोटी रुपयांची निगेटिव्ह ग्रँट स्वरुपात रस्ते विकास महामंडळाकडे दिले होते. महापालिकेने १९ किलोमीटरचे लिंक रोड करून त्यापैकी २० कोटी रुपये खर्च केले आहेत. त्यामुळे महामंडळाकडे असेलली सात कोटींची रक्कम मिळविण्यासाठी प्रशासनाला प्रयत्न करावे लागतील.

टोलविरोधातील घटनाक्रम

१ मार्च २००८ - आयआरबीला टेंडरला मंजुरी. आणि विरोधही.

जानेवारी २००९ - प्रत्यक्ष कामाला सुरुवात.

११ डिसेंबर २०११ - शाहू तरुण मंडळाच्यावतीने बीओटीविरोधात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन.

१७ डिसेंबर - राज्य सरकारकडून टोल वसुलीसंदर्भात गॅझेट प्रसिद्ध.

१८ डिसेंबर - सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीची स्थापना आणि टोलविरोधी फलकांचे अनावरण.

२७ डिसेंबर - फुलेवाडी, शिरोली, शिये टोलनाक्यांवर दगडफेक

२८ डिसेंबर - टोल वसुलीचे आयआरबीचे नियोजन, पण राज्यसरकारकडून वसुलीला स्थगिती.

९ जानेवारी २०१२ - पहिल्या टोलविरोधी मोर्चा आणि बंदला प्रचंड प्रतिसाद.

१३ मार्च - मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत टोलविरोधी बैठक आणि शामलकुमार मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना.

२२ डिसेंबर - टोलविरोधात महामार्ग रोको आंदोलन.

९ जानेवारी २०१३ - पहिल्या मोर्चाचा वाढदिवस आणि शिरोली येथे रास्ता रोको.

१८ जानेवारी - महिलांचा महालक्ष्मीला अभिषेक.

२७ एप्रिल - रात्री शिरोली टोलनाक्यावर मोर्चा, पोलिस आंदोलकांत धुमश्चक्री.

१ मे - २७ एप्रिलच्या घटनेच्या विरोधात कोल्हापूर बंद, मोठा प्रतिसाद.

८ जुलै - टोलविरोधातील बंद आणि महामोर्चात नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग.

८ ऑक्टोबर - टोलनाक्यांना संरक्षण पुरविण्याचे हायकोर्टाचे आदेश.

११ ऑक्टोबर - १७ ऑक्टोबरपासून टोलवसुली करण्यासंदर्भात आयआरबीचे महापालिकेला पत्र.

१७ ऑक्टोबर - आयआरबीकडून टोलवसुली, सर्व नाक्यांवर आंदोलन आणि पोलिस बंदोबस्त.

१८ ऑक्टोबर - टोलवसुली सुरळीत.

२० ऑक्टोबर - मुख्यमंत्र्यांसाबेत चर्चा आणि कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर मोर्चा.

१६ नोव्हेंबर - गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांच्या घरावर मोर्चा.

७ डिसेंबरला - टोलविरोधी कृती समितीची धरणे.

६ जानेवारी २०१४ - टोलविरोधी कृती समितीच्यावतीने बेमुदत उपोषण सुरू. बाबा इंदुलकर, दिलीप देसाई, माणिक पाटील, हंबीरराव मुळीक, जी. एस. पाटील, उदय लाड, जयदीप शेळके, उदय दुधाणे, आदी बारा कार्यकर्त्यांचा समावेश.

११ जानेवारी - एन. डी. पाटील यांचा उपोषणात सहभाग, रात्री ८ वाजता टोल नाके बंद करण्याची मुश्रीफ आणि सतेज पाटील यांची घोषणा. उपोषण मागे.

१२ जानेवारी - पहाटे टोल सुरू झाल्याने हिंसक आंदोलनानंतर टोल बंद.

५ फेब्रुवारी - पुन्हा टोलवसुली सुरू.

१२ फेब्रुवारी - चक्का जाम आंदोलन.

२७ फेब्रुवारी - टोलवसुलीला हायकोर्टाची स्थगिती.

९ एप्रिल - आयआरबी सुप्रीम कोर्टात.

फेब्रुवारी २०१६ - टोल बंदची घोषणा

डिसेंबर २०१८ - कंपनीला ४७३ कोटी रुपये देण्याचा मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय

जानेवारी २०१९ - ४७३ कोटीला कार्योत्तर मंजुरी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठा दाखल्यांसाठी लूट

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

दीर्घकाळ संघर्ष केल्यानंतर मराठा आरक्षण मिळविलेल्या समाजाला 'एसईबीसी'चा दाखल्यासाठी पैसे मोजावे लागत आहेत. ई-सेवा, आपले सरकार केंद्र, तहसील, प्रांत कार्यालयातील प्रशासकीय यंत्रणा आणि बाहेरचे लोकांचे रॅकेट तयार झाले आहे. यातून अपवाद वगळता बहुतांशी जणांना एका दाखल्यासाठी दोन हजार रुपये मोजावे लागत आहेत. दाखल्यासाठीच्या लुटीत शहरातील तीन आणि वडणगे, मुडशिंगीमधील प्रत्येकी एक ई-सेवा केंद्र आघाडीवर आहे.

सरकारने मराठा समाजाला नोकरी, शिक्षणात १६ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणी सुरू झाल्यामुळे 'एसईबीसी' (मराठा) दाखला काढण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात उमेदवारांची झुंबड उडाली आहे. दाखला मिळवण्यासाठी तलाठी, सर्कल, तहसीलदार कार्यालयाकडून विविध प्रकारचे दाखले आणि १९६७ पूर्वीचा महसुली पुरावा गोळा करताना प्रचंड दमछाक होत आहे. जुने पुरावे गोळा करण्यासाठी तहसील कार्यालयातील रेकॉर्ड रुममधील फेरफार उतारे घ्यावे लागत आहे. या कागदपत्रासाठी नियमित शुल्कासह चिरमिरी द्यावी लागत असल्याचे मराठा समाजातील तरुणांनी सांगितले.

आवश्यक सर्व कागदपत्रे मिळाल्यानंतर ई-सेवा किंवा आपले सरकार केंद्रात ऑनलाइन अर्ज भरावे लागते. त्यासाठी सरकारच्या नियमानुसार ३३ रुपये, ६० पैसे घेण्याची मुभा आहे. मात्र प्रत्यक्षात यापेक्षा दुप्पट, चौपट पैसे घेतले जात आहेत. ऑनलाइन दाखल झालेला अर्ज पडताळणीसाठी प्रथम नायब तहसीलदारांच्या ऑनलाइन पोर्टलवर जातो. त्यांच्याकडून तहसीलदार, प्रांताधिकाऱ्यांकडे जातो. शेवटी प्रांताधिकाऱ्यांची डिजिटल सही झाल्यानंतर पुन्हा ज्या ठिकाणी ऑनलाइन अर्ज भरलेला असतो, त्याच केंद्रातून दिला जातो.

दाखला देताना केंद्र चालक पुन्हा लॅमिनेशनच्या नावाखाली ५० ते १०० रुपये घेतात. अशाप्रकारे एका दाखल्यासाठी १५०० ते दोन हजार रुपये वसूल केले जात आहे. दाखला लवकर हवा असल्यास हा दर वाढत जातो. दाखला काढून देण्यासाठी दलालाचे रॅकेट तयार झाले आहे. या रॅकेटमधून गेल्यास यंत्रणा हलते. 'पैसे देणार नाही', अशी भूमिका घेतल्यास अडथळ्यांचा सामना करावा लागतो. शहरातील मंगळवार पेठेतील शिगोंशी मार्केट, राजारामपुरी, प्रतिभानगर, वडणगे, मुडशिंगी येथील सेवा केंद्रांतून सर्वाधिक लूट होत असल्याच्या तक्रारी आहेत.

..अन्यथा उद्रेक

सकल मराठा समाजाने शांततेत मोर्चे काढून आदर्श घालून दिला. त्यानंतर आरक्षणाचा निर्णय झाला. संघर्षातून मिळालेल्या आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी दाखले काढताना पैसे मोजावे लागत असतील तर जशास तसे उत्तर द्यावे लागेल असे मराठा संघटनांतील तरुणांचे म्हणणे आहे. दाखल्यांसाठी पैसे घेण्याचे प्रकार कमी झाले नाहीत तर ही केंद्रे या तरुणांकडून लक्ष्य होतील असा इशारा दिला आहे.

मराठा समाजातील अनेक तरुणांनी दिलेले बलिदान, तीव्र संघर्षातून मराठा समाजाला आरक्षण मिळाले आहे. यामुळे दाखल्यासाठी होणारी अडवणूक आणि लूट कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही. पैशाची मागणी होत असेल किंवा अडवणूक केली जात असल्यास सकल मराठा समाजाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नेत्यांशी संपर्क साधून तक्रार करावी. संबंधितांवर कडक कारवाई होईपर्यंत पाठपुरावा केले जाईल.

वसंतराव मुळीक, जिल्हा अध्यक्ष, अखिल भारतीय मराठा महासंघ

प्रांत कार्यालयनिहाय दिलेले दाखले

करवीर : १०८

पन्हाळा : ६९८

आजरा : ६१

गडहिंग्लज : १३

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मावळतीचे किरणे अंबाबाईच्या मानेपर्यंत

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

नव्या वर्षातील पहिला किरणोत्सव सोहळा बुधवारी सायंकाळी भाविकांच्या साक्षीने झाला. मावळतीची किरणे अंबाबाईच्या मानेपर्यंत पोहोचली. गेल्या वर्षीपासून किरणोत्सव सोहळा पाच दिवसांचा करण्यात आल्याने नियोजित कालावधीच्या पूर्वसंध्येला किरणोत्सवाचे दर्शन भाविकांनी घेतले. देवीच्या मानेपर्यंत पोहोचलेल्या किरणांनी गाभारा उजळून गेल्यानंतर आरती करण्यात आली.

सायंकाळी पाच वाजून २३ मिनिटांनी किरणे महाद्वाराच्या कमानीजवळ आली. त्यानंतर पाच वाजून ३२ मिनिटांनी किरणांनी गरुड मंडपातून आत प्रवेश केला. पाच वाजून ४८ मिनिटांनी किरणांची तिरीप गणपती चौकात पोहोचली. तर सहा वाजून चार मिनिटांनी किरणांनी पितळी उंबरा ओलांडला. सहा वाजून दहा मिनिटांनी किरणांचा चांदीच्या पायरीला स्पर्श केला. तर गाभाऱ्याच्या पायरीपर्यंत सहा वाजून ११ मिनिटांनी किरणे पोहोचली. सहा वाजून १३ मिनिटांनी मावळतीच्या किरणांनी देवीच्या चरणांना स्पर्श करताच गाभाऱ्यातील दिवे मालवण्यात आले. सव्वासहा वाजता किरणे देवीच्या पोटावरून वर सरकत सहा वाजून १७ मिनिटांनी मानेपर्यंत पोहोचली व खाली झुकली.

बुधवारी हवामान स्वच्छ असल्यामुळे किरणांची तीव्रता प्रखर होती. यावेळी सायंकाळी पाच वाजल्यापासूनच भाविकांनी गणपती चौकात गर्दी केली होती. तसेच पर्यटक भाविकांनीही किरणोत्सवाचे दर्शन घेतले. गुरूवारी पारंपारिक कालावधीनुसार किरणोत्सवाचा पहिला दिवस आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साखर जप्तीसाठी स्वाभिमानी आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

0
0

कोल्हापूर:

साखर कारखान्यांची साखर जप्त करून ऊस उत्पादकांना एफआरपीची रक्कम अदा करण्याचा आदेश साखर आयुक्तांनी दिला आहे. या आदेशाची अंमलबजावणी सुरू केली की नाही याची विचारणा करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालय व प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयावर धडक मारली. आठ दिवसात एफआरपीची रक्कम जमा न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.

साखर जप्तीचे आदेश मिळाले नसल्याचे उत्तर जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याने संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी साखर सहसंचालक कार्यालयात जाऊन याचा जाब विचारला. यानंतर पुन्हा कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेतली. निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी आदेश मिळाल्याची माहिती दिल्यानंतर कार्यकर्त्यांचा राग शांत झाला. मात्र, जिल्हाधिकारी खोटे बोलल्याचे सांगत कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचा निषेध केला. आठ दिवसात संबंधित साखर कारखान्यांवर जप्तीची कारवाई करून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर एकरकमी आणि व्याजासह एफआरपीची रक्कम जमा करावी, अन्यथा नवव्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून हिसकावून पैसे घेऊ असा इशारा स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांसह साखर सहसंचालक कार्यालय अधीक्षकांना दिला.

यावेळी संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी साखर सहसंचालक कार्यालयावर चाल केली होती. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून कार्यकर्त्यांना अडवले. यानंतर पोलिसांनीच मध्यस्थी करून निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांची भेट घडवल्याने कार्यकर्ते शांत झाले. दरम्यान, जिल्ह्यातील साखर कारखानदारांनीही गुरुवारी सकाळी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश सुभेदार यांची भेट घेतली. साखर कारखान्यांवर जप्तीची कारवाई केल्यास कारखाने बंद ठेवण्याचा इशारा कारखानदारांनी दिला आहे. एकीकडे साखर आयुक्तांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचा स्वाभिमानीचा आग्रह, तर दुसरीकडे कारखाने बंद ठेवण्याच्या कारखानदारांच्या भूमिकेमुळे जिल्हा प्रशासनाची गोची झाली आहे. हा तिढा आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बाला रफिक’ने केले सोनूला चितपट

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

हजारो कुस्ती शौकिनांच्या उपस्थितीत गुरुवारी राजर्षी शाहू खासबाग मैदानातील महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेखने डबल हिंदकेसरी सोनू हरयाणाला घिस्सा डावावर १९ व्या मिनिटांनी चितपट केले. तर द्वितीय क्रमांकाच्या लढतीत महान भारत केसरी माऊली जमदाडेने भारत केसरी पवन दलातवर तर तृतीय क्रमांकाच्या लढतीत सचिन घोगरेने संदीप दलालवर विजय मिळवला. 'पैलवान ग्रुप महाराष्ट्र राज्य कुस्तीप्रेमी संस्थे'च्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त हे कुस्तीमैदान झाले. कोल्हापूर जिल्हा व शहर राष्ट्रीय तालीम संघाच्या मान्यतेने मैदान पार पडले.

महाराष्ट्र केसरी बाला रफिक विरुद्ध हरियाणाचा डबल हिंदकेसरी सोनू यांच्यातील लढत लक्षवेधी ठरली. ९ वाजून ३५ मिनिटांनी अंतिम लढत सुरू झाली. सुरुवातीला दोन्ही मल्लांनी एकमेकांच्या ताकदीचा अंदाज आजमावला. काही वेळ खडाखडी झाल्यानंतर सोनूने एकेरी पटाचा प्रयत्न केला. मात्र, त्याला यश आले नाही. उलट बालाने चपळाईने त्याच्यावर ताबा मिळवला. बराच काळ बालाने घुटना मानेवर ठेवून सोनूला अक्षरश: झुंजवले. नंतर लांबत चाललेल्या डावात बालाने पोकळ घिस्सा डावावर सोनूला मात दिली.

द्वितीय क्रमांकाची लढत माऊली जमदाडे विरुद्ध पवन दलात यांच्यात झाली. चुरशीच्या ठरलेल्या कुस्तीत माऊलीने हप्ते डावावर कब्जा घेऊन पवनवर वर्चस्व गाजवण्याचा यशस्वी प्रयत्न केला. लगोलग त्याने चपळाईने बॅक थ्रोवर दलालला चारीमुंड्या चीत केले. तृतीय क्रमांकाच्या लढतीत सुरुवातीलाच संदीप दलालाने सचिन घोगरेला किल्ली केली. मात्र, सचिनने किल्ली तोडून मुसंडी मारत एकलंगी डावावर विजय मिळवला. सर्वाधिक लक्षवेधी ठरलेल्या लढतीत आंतरराष्ट्रीय मल्ल सोनबा गोंगाणेने दिल्लीच्या रवीकुमारला पाय घिस्सा डावावर नमवले. भारत मदने विरुद्ध कौतुक डाफळे यांच्या लढतीत मदनेला आपण विजयी झाल्याचा समज झाला. त्यामुळे त्याने मैदान सोडले. मात्र, नंतर पंचानी कौतुक डाफळेला विजयी घोषित केले. निवेदक म्हणून शंकर पुजारी, ईश्वरा पाटील, जोतीराम वांझे, कृष्णा चौगुलेने काम पाहिले.

विजयी मल्ल

राहुल गाजरे, वैभव बारणे, अमर गाडवे (गदेचे मानकरी), संग्राम जाधव, सागर सूर्यवंशी, करतार कांबळे, नयन निकम (न्यू मोतीबाग), दत्ता नरळे(गंगावेश), अक्षय माने (कळंबा), माणिक कारंडे (सावर्डे), हणमंत पुरी, रोहित कारले (पुणे), सरदार सावंत(आमशी), माऊली कोकाटे (कुर्डवाडी), महेश वरुटे, शिवाजी दड्डी, (मोतीबाग), संतोष सुतार (बेनापूर), हसन पटेल (शाहूपुरी), संग्राम पाटील (शाहू कुस्ती केंद्र).

नामवंत मल्लांची उपस्थिती

अनेक दिवसांनी खासबाग मैदानावर चटकदार कुस्त्या झाल्या. त्या पाहण्यासाठी शौकिनांचीही गर्दी झाली. हिंदकेसरी दीनानाथसिंह, ऑलम्पिकवीर बंडा पाटील-रेठरेकर, राष्ट्रकुल पदकविजेते राम सारंग, महाराष्ट्र केसरी संभाजी पाटील, अस्लम काझी, महाराष्ट्र चॅम्पियन मारुती जाधव, हनुमान केसरी अनिल बोरकर, उपमहाराष्ट्र केसरी संपत जाधव, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, हणमंत जाधव, डी. आर. जाधव, भाजप जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, अशोक देसाई उपस्थित होते.

दीनानाथ सिंह यांचा फेटफटका

दीर्घ आजारातून बरे झालेले हिंदकेसरी दीनानाथ सिंह यांनी मैदानावर फेरफटका मारला. यावेळी त्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. खूप दिवसांनी खासबागमध्ये मैदानावेळी जुन्या आठवणी जाग्या झाल्याचे त्यांनी मनोगतात सांगितले. 'आसमा की सितारोंकी रोशनी' ही शायरी त्यांनी पेश केली. यावेळी मैदानावर हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांचे लावलेले पोस्टर त्यांच्या अनुपस्थितीची जाणीव करून देत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यातील मतदार ३० लाखांवर

0
0

कोल्हापूर जिल्ह्यातील मतदारसंख्या ३० लाख ७५ हजार ७५१ झाली आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय मतदारसंख्या अशी : चंदगड (३,२०,१६१,), राधानगरी (३,२५,६७४), कागल (३,२०,५२८), कोल्हापूर दक्षिण (३,१९,१८२), करवीर (३,००,५१९), कोल्हापूर उत्तर (२,८२,१७१), शाहूवाडी (२,८५,७७६), हातकणंगले (३,१८,९५८),इचलकरंजी (२,९१,३२७) शिरोळ (३,११,४५५).

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निधन वृत्त....

0
0

राजेंद्र पतंगे

कोल्हापूर : आर.के. नगर येथील राजेंद्र रामकृष्ण पतंगे (वय ६७) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन शनिवारी (ता.२) सकाळी नऊ वाजता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


एफआरपी न देण्यात नेतेच आघाडीवर

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्यातील १८१ कारखान्यांची उसाची ५३२३ कोटी रुपयांची एकरकमी एफआरपी थकीत असून, त्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप या पक्षांच्या नेत्यांच्या ताब्यातील कारखान्यांची एफआरपी मोठ्या प्रमाणात थकीत असल्याची माहिती पुढे आली आहे. यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील मंत्री सुभाष देशमुख, माजी आमदार महादेवराव महाडिक, प्रशांत परिचारक, प्रकाश आवाडे, विनय कोरे, हसन मुश्रीफ यांच्यासह अनेक नेत्यांचा यामध्ये समावेश आहे.

सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या कारखान्याची १०४ कोटी, तर ग्रामविकास, महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या कारखान्याची ६४ कोटी रुपये एफआरपी थकीत आहे. राष्ट्रवादीच्या अजित पवार व पवार कुटुंबाच्या ताब्यातील कारखान्यांची २४५ कोटी रुपये एफआरपी थकीत आहे. आमदार जयंत पाटील यांच्या कारखान्याची १५४ कोटी, तर आमदार हसन मुश्रीफ यांच्या सेनापती संताजीराव घोरपडे कारखान्याची ९७ कोटी रुपयांची एफआरपी थकीत आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांच्या जवाहर साखर कारखान्याची १७९ कोटी, गणपतराव पाटील यांच्या दत्त कारखान्याची १२१ कोटी, तर माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कारखान्याची १४१ कोटी रुपये एफआरपी थकीत आहे.

राज्यात भाजपच्या ताब्यात ७३ साखर कारखाने असून, त्यांची १५०५ कोटी रुपये एफआरपी थकीत आहे. त्या खालोखाल राष्ट्रवादीच्या ताब्यातील ५३ कारखान्यांनी १५०२ कोटी रुपये एफआरपी दिलेली नाही. काँग्रेसकडे ४४ कारखाने असून, त्यांची १३४१ कोटी रुपयांची एफआरपी थकीत आहे. शिवसेनेकडे १२ कारखाने असून, त्यांची एफआरपी २८५ कोटी रुपये थकलेली आहे.

००००००

थकीत एफआरपी कारखाने (रक्कम कोटीत)

भाजप व सहकारी पक्ष

सुभाष देशमुख १०४.२६

पंकजा मुंडे ६४

नितीन गडकरी १७

रावसाहेब दानवे १८.४१

महादेवराव महाडिक ६४.७५

विनोद तावडे १३.१५

प्रशांत परिचारक २०.७४

पृथ्वीराज देशमुख ७१

अतुल भोसले ८०.२९

समरजित घाटगे ६४.०४

विनय कोरे ११६

एकनाथ खडसे १४.३२

०००

काँग्रेस, राष्ट्रवादी पक्ष

अजित पवार आणि कुटुंबीय २४५

जयंत पाटील १५९

हसन मुश्रीफ ९७

बबन शिंदे १०१

प्रकाश आवाडे १७९

गणपतराव पाटील १२१

हर्षवर्धन पाटील १४१

दिलीप देशमुख ६०

विखे पाटील ६८

अशोक चव्हाण २२

००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोकसभा निवडणुकीसाठीमतदार यादी जाहीर

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लोकसभा निवडणुकीसाठीची अंतिम मतदार यादी गुरुवारी जाहीर झाली. जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रावर ही यादी प्रसिद्ध करण्यात आली असून यावेळी एक लाख ३८२ मतदार वाढले आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारयादी अद्ययावत करण्यात आली. यासाठी गेले चार महिने काम सुरू होते. लोकसभेसाठी नवीन मतदारयादी निश्चित करण्यात आली. यामध्ये नव्याने लाखावर मतदारांची नोंद झाली. त्यात युवा मतदारांचा समावेश अधिक आहे. ही यादी जिल्ह्यातील ३३२१ मतदान केंद्रांवर सायंकाळी प्रसिद्ध झाली. चार वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीवेळी २९ लाख १७८२७ मतदार होते. यावेळी त्यांची संख्या तीस लाखांवर गेली आहे. याबाबतची अधिकृत आकडेवारी दोन दिवसांत निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जायंटस सेवार्थ दवाखान्याचे उद्घाटन

0
0

कोल्हापूर : जायंटस फाऊंडेशनतर्फे अल्पदरामध्ये रुग्णांना वैद्यकीय सुविधा मिळवून देण्यासाठी सरनाईक वसाहत येथे जायंटस सेवार्थ दवाखाना सुरू केला. उद्योगपती काकासाहेब चितळे यांच्या हस्ते दवाखान्याचे उद्घाटन झाले. फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रमोद शहा, डॉ. सतीश बापट, डॉ. अनिल माळी, रविंद्र उबेरॉय, नगरसेविका रुपाराणी निकम, वहिदा सौदागर, मंगला कुलकर्णी उपस्थित होते. गरजू रुग्णांसाठी शहरात ठिकठिकाणी दवाखाने सुरू करण्याचा मनोदय अध्यक्ष शहा यांनी व्यक्त केला. गतवर्षी राजेंद्रनगर येथील दवाखान्यात ६००० पेक्षा जास्त रुग्णांवर उपचार केल्याचे त्यांनी सांगितले. हा दवाखाना सुरू करण्यासाठी अय्याज बागवान, डॉ. शरद दिवाण, प्रभाकर नाईक, प्रकाश वर्णे, स्नेहल मणियार यांनी प्रयत्न केले. डॉ. राजकुमार पोळ यांनी सूत्रसंचालन केले. दिपक शहा शेंडूरकर यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अन्यथा कारखाने बंद ठेवू

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

एफआरपी थकवणाऱ्या साखर कारखान्यांवर कारवाईचे आदेश येताच साखर कारखानदारांची अस्वस्थता वाढली आहे. जिल्ह्यातील प्रमुख कारखान्यांच्या प्रतिनिधींनी गुरुवारी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी भेट घेऊन निवेदन दिले. साखर जप्तीची कारवाई केल्यास स्वत:हून कारखाने बंद ठेवू, अशी भूमिका कारखानदारांनी घेतली आहे.

ऊस हंगाम सुरू होऊन तीन महिने उलटले तरीही साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम दिलेली नाही. याविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने साखर आयुक्त कार्यालयावर आंदोलन केल्यानंतर आयुक्तांनी कारखान्यांची साखर आणि मालमत्ता जप्त करून एफआरपी देण्याचे आदेश दिले आहेत. बुधवारी रात्री आठ कारखान्यांवरील कारवाईचे आदेश येताच जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले असून, कारवाई झाल्यास स्वत:हून कारखाने बंद ठेवू, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. कारखानदारांच्या या भूमिकेमुळे एफआरपीचा प्रश्न आणखी जटील बनण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यावेळी आमदार हसन मुश्रीफ, माजी आमदार के. पी. पाटील, गणपतराव पाटील, माधवराव घाटगे, पी. जी. मेढे, आदी उपस्थित होते.

दरम्यान, कोल्हापूर विभागांतर्गत २३ कारखान्यांबाबत शुक्रवारी (ता. १) पुण्यात साखर आयुक्त कार्यालयात सुनावणी होणार आहे. जप्ती आदेश दिलेल्या कारखान्यांमध्ये केन अॅग्रो, विश्वास, निनाई-दालमिया, वसंतदादा पाटील-श्री दत्त इंडिया, महांकाली, श्री दत्त शिरोळ, जवाहर, वारणा, पंचगंगा, इको केन अॅग्रो, संताजी घोरपडे आणि गुरुदत्त शुगर्स टाकळीवाडी या कारखान्यांचा समावेश आहे.

या कारखान्यांची सुनावणी

उदगिरी शुगर, उदयसिंगराव गायकवाड-अथणी शुगर्स, सोनहिरा, सदगुरू शुगर्स, सदाशिवराव मंडलिक साखर कारखाना, सर्वोदय, राजारामबापू पाटील साखर कारखाना, मोहनराव शिंदे साखर, ओलम शुगर, रिलायबल शुगर्स, कुंभी-कासारी, क्रांतीअग्रणी जी. डी. बापू लाड साखर कारखाना, अथणी शुगर्स भुदरगड, हुतात्मा साखर, दूधगंगा वेदगंगा साखर, दालमिया भारत शुगर्स, डी. वाय. पाटील साखर, छत्रपती शाहू साखर, छत्रपती राजाराम, भोगावती, आप्पासाहेब नलवडे साखर आणि आजरा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कॉन्झर्वेशन’तर्फे शैक्षणिक साहित्य वाटप

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

'निसर्ग संवर्धनासाठी पर्यावरणपूरक उपक्रम अत्यावश्यक आहेत. छोट्या छोट्या गोष्टीतून पर्यावरणपूरक कार्य करता येऊ शकते हे कॉन्झर्वेशन फाऊंडेशन ऑफ इंडिया या संस्थांनी कृतीशील उपक्रमातून सिद्ध केल्याचे कौतुकोद्गार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी काढले.

दि कॉन्झर्वेशन फाऊंडेशन ऑफ इंडियातर्फे राजाराम कॉलेजमधील विद्यार्थी विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्य बॅग्जचे वाटप करण्यात आले. यामध्ये होस्टेलमध्ये राहणाऱ्या व ग्रामीण भागातील मुला,मुलींचा समावेश आहे. सीईओ मित्तल व गृह विभागाचे पोलिस उपअधीक्षक सतीश माने यांच्या हस्ते कार्यक्रम झाला. प्रा. डॉ. अंजली पाटील यांनी फाऊंडेशनचे पर्यावरणपूरक उपक्रम प्रेरणादायी आहे. शैक्षणिक साहित्य वाटपाच्या उपक्रमातून विद्यार्थ्यांना स्फूर्ती मिळेल, असे नमूद केले. सतीश माने यांना राष्ट्रपती पदक मिळाल्याबद्दल फाऊंडेशनतर्फे सत्कार करण्यात आला.

फाऊंडेशनचे अध्यक्ष आशिष घेवडे यांनी संस्थेच्या उपक्रमांची माहिती दिली. विद्यार्थ्यांनी संस्कार व संस्कृतीचे जतन करावे. निसर्ग संवर्धनाच्या कामात सक्रिय राहावे. ज्या कॉलेजमधून शिक्षण घेऊन बाहेर पडलो त्याच कॉलेजमधील विद्यार्थ्यांसाठी काम करण्याची संधी मिळाल्याचे समाधान असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. याप्रसंगी प्रा. संजय पाठारे, सतीश ठोंबरे, फाऊंडेशनचे विश्वजित सावंत, अमिर शेख, चैतन्य पोतदार, मितेष घेवडे, सुनील राठोड आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images