Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

खेळांतून लुटला आनंद

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

हवीहवीशी वाटणारी थंडी, अल्हाददायक वातावरण, पारंपरिक, साहसी खेळांचे मांडलेले संच असा प्रचंड उत्साही माहोल रविवारी सकाळी येथील शासकीय विश्रामगृहाजवळील हॅपी स्ट्रीटमध्ये होता. महाराष्ट्र टाइम्सतर्फे आयोजित या उपक्रमात बालचमू, तरुणाई मोठ्या संख्येने सहभागी झाली. यावेळी अनेकांनी पारंपरिक, साहसी खेळांतून आनंद लुटला.

कलागुणांचा अविष्कार दाखवण्यासाठी आणि विस्मृतीमधील जुने खेळ खेळण्यासाठी सकाळी सातपासून शासकीय विश्रामगृह ते महासैनिक दरबार हॉलपर्यंत रस्त्यावर कोल्हापूरकर येऊ लागले. क्षणाक्षणाला गर्दी वाढत होती. युवक, युवती गटागटाने दाखल झाले. आठनंतर विक्रमी गर्दी झाली. गर्दीचा महापूर राहिला. सहभागी प्रत्येकजण बालपणीचे खेळ कुटुंबियासह खेळण्यात मग्न होते. शाळा, कॉलेज, महाविद्यालयातील विद्यार्थी, बालचमूंनी, भोवरा, रिंग, जिबली, गोठ्या, विटीदांडू खेळले. महिला, युवतींनी रिंग फिरवणे, दोरी उडीचा आनंद घेतला. त्यांना हे खेळ विशेष आवडल्याचे दिसत होते. मोबाइलच्या दुनियेतून काहीवेळा का असेना युवकांनी मनमुराद खेळात रंगले. बच्चे कंपनी, तरुणाई, सीनियर्संनी प्रत्येक खेळात आवडीने सहभाग घेतला.

तेजस हावळ यांच्या होर्मोनियम वादन ग्रुपने वेस्टर्न म्युझिकवर गाणी वाजवण्यास सुरुवात केल्यानंतर ऐकण्यासाठी अनेकांचे पाय थबकले. संपूर्ण गायन होईपर्यंत रसिकांचे पाय खिळून राहिले. सरस्वती चुनेकर विद्यामंदिरच्या विद्यार्थींनीने मानवी मनोऱ्याचे चित्तथरारक प्रात्यक्षिक करून उपस्थितांची मने जिंकली. जल्लोष ढोलताशा पथकाने ढोल, ताशांच्या कडकडाट करून अनेकांना थिरकायला लावले. गो बियाँड द लिमिटस ग्रुपने पारंपरिक खेळांचे साहित्य मांडले. त्यावर लहान मुलांनी मनमुराद आनंद लुटला. गर्दीतून जागा मिळवून हातात न मावणारा दोरखंड पकडण्यासाठीचा प्रयत्न, कसाबसा दोरखंड पकडून विरुद्ध बाजूला असलेल्यांकडून दोरी ओढण्यासाठी स्पर्धा अशा इर्षेत रस्सीखेच झाली. यामधून आपल्या दंडातील ताकद आजमावून घेताना दिसत होते. प्रसाद इव्हेंटतर्फे टॅट, सुपरमॅनसह सुपरसिटीतील कटआउट सेल्फी पाँईट ठरला. येथे सेल्फी काढण्यासाठी शेवटपर्यंत गर्दी राहिली.

सेवा रुग्णालयाच्यावतीने तपासणी

कसबा बावडा लाइन बझारमधील सेवा रूग्णालयातर्फे आरोग्य, आहारविषयक मार्गदर्शनाचे प्रदर्शन मांडले होते. तेथे शंभरावर जणांचे रक्तदाब आणि शुगरची तपासणी करण्यात आली. अधीक्षक डॉ. उमेश कदम, डॉ. सूदर्शन पाटील, डॉ. सुनेत्रा शिराळे, डॉ. सारिका पाटील, डॉ. अमित डोळे, डॉ. श्रीगणेश बंगे, डॉ. श्रृती भोला, डॉ. मोनाली लंबे, डॉ. शीतल सुतार, डॉ. प्रियंका किल्लेदार, डॉ. संदीप बाटे, संतोष माने यांनी आरोग्यपूर्ण जीवनासंबंधी माहिती दिली. आयुर्वेदिक, होमिओपॅथिक उपचार पद्धती विशद करण्यात आली.

स्वसंरक्षणाचे धडे

सार्वजनिक ठिकाणी किंवा इतरवेळी महिला, युवतींवर आपत्तकालीन परिस्थिती ओढवते. त्यावेळी आपले रक्षण कसे करावे, याच्या टीप्स वुशू असोसिएशन ऑफ कोल्हापूर डिक्स्ट्रीकचे प्रशिक्षक सतीश वडणगेकर, अविनाश पाटील यांनी धडे दिले. फाईट, हातात लांब शस्त्र घेऊन खेळणे, शस्त्र न घेता कसे खेळ खेळता येतात, त्याची माहिती दिली.

मर्दानी खेळांचा आखाडा

हिंद प्रतिष्ठानच्या २२ मुलांनी चित्तथरारक मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक करून दाखवले. लाठी, काठी फिरवली. प्रशिक्षक अवधूत घाटगे, श्रीकांत खोत यांनी मार्गदर्शन केले. शिवसंस्कार प्रतिष्ठानचे प्रा. राजेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कलाकारांनी ऐतिहासिक शिवकालीन खेळ, लेझीम, दांडपट्टाच्या सादरीकरण केले. जल्लोष ढोलताशांच्या पथकातील कलाकारांनी ढोल, ताशा वाजवून जल्लोष करायला लावले. स्वप्निल देसाई यांनी हँगिग गेमचे प्रात्यक्षिक करून दाखवले.

भूलशास्त्र संघटनेतर्फे टीप्स

धकाधकीच्या जीवनात आरोग्याकडे लक्ष देता येत नाही. यामुळे अनेकदा अचानक सार्वजनिक कार्यक्रमात व घरात रूग्ण चक्कर येऊन पडतात. हृदय विकाराचा झटकाही येतो. त्यावेळी सोबत असणारे व नातेवाईकांना काय करावे, सूचत नाही. घरगुती अशास्त्रीय उपाय केले जातात. म्हणून भूलशास्त्र संघटनेतर्फे प्रथमोपचारासंबंधी टीप्स देण्यात आल्या. संघटनेचे डॉ. शीतल देसाई, डॉ. अनिता कदम, डॉ. किरण भिगांर्डे, डॉ. महावीर चौगुले, डॉ. उल्हास मिसाळ, डॉ. संदीप कदम, डॉ. अनुपमा सहस्त्रबुद्धे यांनी प्रात्यक्षिके दाखविली.

मानवी मनोरे

दहीहंडीशिवाय इतर दिवशी मानवी मनोऱ्यांचा खेळ पाहयला मिळत नाही. मात्र सरस्वती चुनेकर विद्यामंदिरच्या ३० विद्यार्थ्यांनी तीन थरापर्यंत मानवी मनोरे रचून वाहवा मिळवली. शिक्षक रंगराव कुसाळे, सविता गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली मानवी मनोऱ्यातून विविध खेळांचे प्रात्यक्षिक करून दाखवले. शेवटच्या थरावरील विद्यार्थींनी तोल सावरून उभे राहत असताना अनेकांचा श्वास काही क्षण रोखला जात होता. दत्ता बाळ हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी रस्त्यावर हॉकी खेळले. शिक्षक संजय डोंगरे, बालाजी मुंडे यांनी मार्गदर्शन केले.

५० भोवरे वाटप

वनिता महेश ढवळे यांनी पारंपरिक खेळांचा पट मांडला होता. त्यांनी आणलेल्या रस्सी, दोरी, भोवरा, रिंग, जिबल्या, गोठ्या, विटीदांडू खेळण्यासाठी झाली होती. रस्सीखेचण्यासाठी झुंबड उडाली होती. विटीदांडू खेळताना अनेकांना बालपणीचे दिवस आठवले. मोबाइलमधील खेळांतून मुले बाहेर पडण्यासाठी महादेव मोरे यांनी ५० भोवऱ्यांचे वाटप केले. ते घेऊन भोवरे फिरवताना अनेकजण दिसत होते.

व्हाइट आर्मीतर्फे प्रशिक्षण

कोणतीही दुर्घटना, आपत्तीवेळी काय केले पाहिजे, याचे प्रशिक्षण व्हाइट आर्मीचे प्रशांत शेंडे, विनायक भाट, प्रतिक काशीद यांनी दिले. अपघात झाल्यानंतर रूग्णवाहिकेस पाचारण करणे, त्यानंतर प्रथमोपचार करण्यासाठीसंबंधी कमी वेळात मार्गदर्शन केले. स्थानिक साहित्याचा वापर करून बुडणाऱ्यांना वाचविण्याणे, आगीच्या दुर्घटनेतून बाहेर काढण्यासंबंधी प्रशिक्षण दिले. अॅस्टर, आयूर झोन कंपनीतर्फे आणलेल्या बाईक अँम्बुलन्सची माहिती डॉ. माणिकराव जाधव यांनी दिली.

इ - कचरा केंद्र

दि कॉन्झर्वेशन फाउंडेशन ऑफ इंडियाने इ कचरा केंद्र सुरू केले होते. त्यात नादुरूस्त संगणकासह इलेक्ट्रॉनिक जमा करण्यात आल्या. केंद्राचे अध्यक्ष आशिष घेवडे, अमीर शेख, चैतन्य पोतदार, मितेश घेवडे, यतिश शहा यांनी इ कचरामुळे पर्यावरण होणाऱ्या दुष्पपरिणामाची माहिती दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आजरा-चंदगड सीमेवर सात हत्तींचा कळप

$
0
0

फोटो...

म. टा. वृत्तसेवा, आजरा

गेले एक तपाहून अधिक काळ आजरा परिसरात हत्तींचा वावर आहे. यापूर्वी एक-दोन हत्तींचा वावर नागरिकांनी अनुभवला. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून आजरा-चंदगड तालुक्यांच्या सीमेवरील इब्राहिमपूर गावच्या जंगलात तब्बल सात हत्तींच्या कळपाचे पहिल्यांदाच दर्शन झाल्याने नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. टस्कर (नर हत्ती) व मादींचा हा मिलनकाळ असण्याची शक्यता आजरा वन परिक्षेत्र अधिकारी सुनील लाड यांनी व्यक्त केली.

वनविभाग आणि शेतकरी हत्तींच्या प्रतिबंधासाठी नेहमीच प्रयत्न करत असताना आतापर्यंत सात हत्ती कधीही एकत्र आले नव्हते. आता सात हत्ती एकत्र वावर आहेत. त्यांच्याकडून पिकांसह, काजू, केळी बागांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत या कळपाकडून नुकसानीचे वृत्त नाही. मात्र, आजरा-चंदगड परिसरात विविध भागात रहिवासाला असलेल्या हत्तींचे अचानकपणे एकत्र येणे, हा सर्वांच्या कुतूहलाचा आणि विशेषतः चिंतेचा विषय बनला आहे. दोन टस्कर, तीन मादी आणि दोन पिलांचा यात समावेश आहे. पण गेल्या वर्षात राधानगरी, गगनबावडा आदी परिसरात गेलेला टस्करसुद्धा यामध्ये समाविष्ट आहे. यापुढे त्यांचा रहिवास कोठे असेल, कोठे नुकसान होईल याबाबत आताच अंदाज व्यक्त करणे अशक्य असल्याचे लाड यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अन्यथा सरकार उलथवून टाकू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'नारायण राणे समितीच्या शिफारसींनुसार मराठा समाजाला राज्य सरकारने १६ टक्के आरक्षण जाहीर केले. औरंगाबाद खंडपीठाने मराठा व कुणबी या वेगवेगळ्या जाती असल्याचा निर्णय दिला आहे. सरकारने मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणामध्ये कुणबी समाजाचा समावेश आहे किंवा नाही याचा खुलासा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी करावा. लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देऊन ओबीसी समाजाच्या आरक्षणाचे सरकारने संरक्षण न केल्यास हे सरकार उलथवून टाकू' असा इशारा माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी रविवारी पत्रकार बैठकीत दिला.

माजी आमदार शेंडगे म्हणाले, 'मराठा-कुणबी समाजाला यापूर्वीच आरक्षण दिले आहे. त्यानंतर राणे समितीच्या शिफारसींनुसार मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण जाहीर केले. मात्र, शिफारसी कोणत्या निकषावर स्वीकारल्या? मराठा समाजाला आरक्षण देताना कुणबी समाजाला गृहीत धरले आहे का? गृहीत धरले असल्यास एकूण आरक्षण १६ टक्क्यांपेक्षा जास्त होणार. त्यामुळे ओबीसी समाजाच्या आरक्षणावर परिणाम होईल. ओबीसी समाजाच्या आरक्षणाचे संरक्षण न झाल्यास सरकार उलथवून टाकू. आरक्षण जाहीर झाल्यानंतर मेगा भरतीची घोषणा झाली. ओबीसी भरती आणि बढतीचा बॅकलॉग भरून काढल्याशिवाय मेगा भरती करु नये, अशी मागणी राज्यपालांकडे केली आहे.'

आमदार हरिभाऊ राठोड म्हणाले, 'महात्मा फुले व सावित्रीबाई फुले दाम्पत्याला भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी संविधान यात्रेतून केली. ग्रामसभा घेऊन पाच स्वाक्षऱ्यांचे निवेदन राष्ट्रपतींना दिले. या मागणीकडे सरकारने दुर्लक्ष केल्याने ओबीसी समाजात मोठी नाराजी आहे. सरकार घटनाच मानत नसल्याने वेगवेगळे निर्णय जाहीर करत आहे. तरीही समांतर व बढतीमध्ये आरक्षण आणि क्रिमिलीअरची अट शिथील करण्यासाठी लढा उभारणार आहे. मराठा समाजाची जनगणना न करता आरक्षण जाहीर केले. आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकणार नसून हा सामजिक भ्रष्टाचार आहे. सरकारच्या निर्णयाविरोधात सहा फेब्रुवारी रोजी कोर्टात याचिका दाखल करणार आहे. मराठा व कुणबी या दोन वेगळ्या जाती असून आठ टक्के लोकसंख्या असलेल्या मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण कसे? राज्य सरकारने मराठा-कुणबी एकच असल्याचा अध्यादेश २००४ मध्ये काढला. प्रत्यक्षात मराठा-कुणबी उल्लेख असलेले ७० ते ८० टक्के दाखले काढले आहेत. त्यामुळे सरकारचा २००४ चा अध्यादेश रद्द करण्याची मागणी करणार आहे.'

पत्रकार परिषदेस अरुण खरमाटे, नागोजीराव पांचाळ, अर्चना सुतार, एम. के. बाणारकर, चंद्रकांत बावकर, रफीक कुरेशी, बालाजी शिंदे, जी. डी. तांडेल, ज्ञानेश्वर गोरे, विलास काळे, टी. पी. मुंडे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दीडशे व्यापाऱ्यांची बँक खाती गोठवणार

$
0
0

Maruti.Patil@timesgroup.com

tweet: @MarutipatilMT

कोल्हापूर : एलबीटीची व्यापाऱ्यांकडील थकबाकी वसूल करण्यासाठी महापालिकेने १८०० व्यापाऱ्यांना डिमांड नोटिसा दिल्या होत्या. नोटिसींनंतरही थकबाकी जमा न केलेल्या १५० व्यापाऱ्यांची बँक खाती गोठविण्यात येणार आहेत. आतापर्यंत आठ व्यापाऱ्यांची खाती सील करण्यात आली आहेत.

जकात कर रद्द करून २०११पासून एलबीटी या नव्या कराच्या अंमलबजावणीस सुरुवात झाली. एलबीटीमुळे महापालिकेला भरघोस उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा असताना व्यापाऱ्यांनी या नव्या करप्रणालीला जोरदार विरोध केला. विरोधामुळेच शहरात १२ हजार व्यापारी असताना ८५०० व्यापाऱ्यांनी एलबीटीसाठी नोंद केली. उर्वरीत व्यापाऱ्यांनी नोंदच न केल्याने, महापालिकेच्या उत्पन्नावर, पर्यायाने विकासकामांवर परिणाम झाला. राज्यात भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१५मध्ये ज्या व्यापाऱ्यांची वार्षिक उलाढाल ५० लाखांपेक्षा कमी आहे, अशा व्यापाऱ्यांना एलबीटी माफ करण्याचा निर्णय घेतला. पण २०११ ते २०१५ यांदरम्यान ज्यांनी एलबीटी भरला नाही, अशा व्यापाऱ्यांना दंड व व्याजामध्ये सूट देत केवळ मूद्दल भरण्यासाठी अभय योजना सुरू केली. त्यानंतर महापालिकेने सहा चार्टर्ड अकांउटंटचे पॅनेल निर्माण केले. पॅनेलकडून व्यापाऱ्यांची पडताळणी अंतिम टप्प्यात आली असताना अभय योजनेत २२०० व्यापाऱ्यांनी नोंद केली. त्यापैकी १२०० व्यापाऱ्यांकडून एलबीटीपोटी १२ कोटींची मूद्दल वसूल झाली. मात्र, अभय योजनेत सहभागी झालेल्या ७०० व्यापाऱ्यांकडून अद्याप मुद्दल येणेबाकी आहे.

अभय योजनेमध्ये ४५०० व्यापाऱ्यांनी अर्जच केला नाही आणि तीन वर्षांत करही भरला नाही. अशा व्यापाऱ्यांचे काय करायचे? याबाबत महापालिकेने एक वर्षापूर्वी राज्य सरकारकडे अभिप्राय मागवला होता. मात्र, एक वर्षानंतही सरकारकडून याबाबतचा अभिप्राय अद्याप आलेला नाही. राज्यपातळीवर अशी स्थिती असली, तरी ज्या व्यापाऱ्यांनी अभय योजनेमध्ये सहभागासाठी अर्ज केला, त्यांच्याकडून केवळ मूद्दल वसूल केले जाईल. ज्यांनी योजनेसाठी अर्जच केलेला नाही, त्यांना मात्र दंड, व्याज माफ करू शकत नाही अशी भूमिका महापालिकेने घेतली. त्यामुळे महापालिकेने अशा व्यापाऱ्यांना सेल्फ असेसमेंटची कागदपत्रे जमा करण्याच्या सूचना केल्या. एलबीटी कायद्यातील तरतुदीनुसार थकबाकी ठरवण्याचा अधिकार महापालिकेला असल्याने कारवाईला सुरुवात झाली आहे. महापालिकेने आतापर्यंत १८०० व्यापाऱ्यांना डिमांड नोटिसा पाठविल्या आहेत. आठ व्यापाऱ्यांची बँक खाती गोठवण्यासाठी अतिरिक्त आयुक्तांकडे प्रस्ताव पाठवला असून आणखी १५० व्यापाऱ्यांची बँक खाती गोठवण्यात येणार आहेत.

'एलबीटी कायद्यानुसार जे व्यापारी कागदपत्रे घेऊन येत नाहीत, त्यांचा दंड, व्याज व थकीत रक्कम ठरविण्याचे अधिकार महापालिकेला आहेत. त्यानुसार व्यापाऱ्यांची रक्कम निश्चित करून बँक खाती गोठविण्याचा प्रस्ताव तयार केला आहे' असे महापालिकेच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

मार्च २०१८रोजी संपली मुदत

अभय योजनेमध्ये सहभागासाठी व्यापाऱ्यांना कागदपत्रे सादर करण्यासाठी महापालिकेने तीनवेळा मुदतवाढ दिली. मात्र, अनेक व्यापाऱ्यांनी कागदपत्रे दिली नाहीत. त्यामुळे पुन्हा राज्य सरकारकडे मुदतवाढीचा प्रस्ताव दिला. त्याचीही मुदत मार्च २०१८ मध्ये संपली. तरीही व्यापाऱ्यांनी नोंदणी न केल्याने महापालिकेने कारवाईस सुरुवात केली.

अभय योजनेंतर्गत जमा झालेली रक्कम

वर्ष रक्कम

२०१५-१६ ५७ कोटी

२०१६-१७ २३ कोटी

२०१७-१८ १४ कोटी

२०१८-१९ ४ कोटी ५० लाख

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पान ३ साठी

$
0
0

इंडियन अचिव्हर्सने

आँको लाइफचा गौरव

कोल्हापूर : शेंद्रे-सातारा येथील ऑको लाइफ कँन्सर सेंटरला बंगळूरु येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये 'महाराष्ट्रातील सर्वोत्तम कॅन्सर हॉस्पिटल' म्हणून 'इंडियन अचिव्हर्स' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रसिद्ध सिनेअभिनेत्री दिया मिर्झा यांच्या हस्ते रुग्णालयाचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक उदय देशमुख यांना मानचिन्ह व प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात आले. यावेळी रुग्णालयाचे वरिष्ठ सर्जन डॉ. मनोज लोखंडे उपस्थित होते.

हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या कॅन्सरवरील निदान व त्यावरील सर्व प्रकारचे उपचार होत असून रेडिएशनसाठी मशीन, पेट-सिटी व इतर सर्व मशिन्स उपलब्ध आहेत. सर्व उपचार हे महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत होत असून गरज पडल्यास रुग्णाला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पैसे आणण्यासाठी सुद्धा हॉस्पिटल मार्गदर्शन करते. याशिवाय याठिकाणी सर्व प्रकारच्या विमा योजना,कॅशलेस सुविधा उपलब्ध असून हॉस्पिटलला तीन पूर्णवेळ समुपदेशक आहेत. हा पुरस्कार मिळवण्यामागच्या यशाचे हेच गमक असल्याचे प्रतिपादन उदय देशमुख यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्याच दिवशी निलंबित करू

$
0
0

म. टा. प्रतिनधी, कोल्हापूर

'प्रत्येक कर्मचारी हा संचालकाच्या वशिल्यानेच भरती झाला आहे. पण अपहार, गैरव्यवहार आणि बेशिस्त वर्तन करणाऱ्यांसाठी वशिला लागू पडणार नाही. अशा कर्मचाऱ्यांना त्याच दिवशी निलंबित केले जाईल,' असा इशारा कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार हसन मुश्रीफ यांनी दिला. 'कारवाई करताना प्रसंगी चेअरमनपद सोडावे लागले तरी बेहत्तर,' अशी भूमिका त्यांनी घेतल्याने कर्मचाऱ्यांत मोठी खळबळ उडाली. बँकेच्या मुख्य कार्यालयात कर्मचारी कौतुक सोहळा व व्यवसाय वृत्ती मार्गदर्शनपर कार्यशाळेत ते बोलत होते.

अध्यक्ष मुश्रीफ म्हणाले, 'बँकेने गेल्या आर्थिक वर्षात ५८ कोटी रुपयांचा ढोबळ नफा मिळवित राज्यात प्रथम क्रमाक पटकावला. बँकेच्या यशात संचालक मंडळाबरोबरच कर्मचाऱ्यांचेही योगदान मोठे आहे. बँकेवर माझा संसार आणि माझे घरदार अवलंबून आहे, या भावनेने जोपर्यंत कर्मचारी वागत नाहीत, तोपर्यंत बँकेचा म्हणावा तसा उत्कर्ष होणार नाही. सात वर्षांच्या प्रशासकीय कारकिर्दीनंतर विद्यमान संचालक मंडळाने सत्ता हाती घेतल्यानंतर गेल्या पावणेचार वर्षात कर्मचाऱ्यांना बोनस, पगारी रजेसोबतच संस्थांना डिव्हिडंट व ग्रेडेशन, १०० कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करणे आदी सुविधा लागू केल्या आहेत. संचालक मंडळ बँकेकडून मिटिंग भत्ता, वाहन भत्ता काही घेत नाही. बँकेवर आम्ही एक रुपयासुद्धा खर्च पडू देत नाही. पारदर्शक कारभार करीत आहोत. त्याच पद्धतीने कर्मचाऱ्यांनी काम करावे.'

बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने, प्रशासन विभागाचे व्यवस्थापक जे. एम. शिंदे, शेती कर्ज विभागाचे व्यवस्थापक आर. बी. आरबोळे, ठेव विभागाचे व्यवस्थापक डी. एस. कालेकर, कायदा विभागाचे व्यवस्थापक आर. जे. पाटील, मार्केटिंग व्यवस्थापक रणविर चव्हाण यांचेही मार्गदर्शन झाले. रामराव इंगळे, प्रियांका पुजारी यांनी सूत्रसंचालन केले. विकास जगताप यांनी आभार मानले.

तर कर्जमंजुरी नाही

'जिल्ह्याच्या एकूण कर्ज पुरवठ्यापैकी शेतकऱ्यांना ८० टक्के कर्ज पुरवठा हा जिल्हा बँकेकडून होतो. त्यातून उत्पादित होणाऱ्या उसाचे सर्व पैसे आमच्या बँकेकडेच आले पाहिजेत. यापुढे असे झाले नाही तर संबंधित शेतकऱ्याचे कर्ज मंजूर होणार नाही,' असा इशारा अध्यक्ष मुश्रीफ यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुलतान रेडा, नाचणारा घोडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

येथील मेरी वेदर मैदानातील भीमा कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी तिसऱ्या दिवशी रविवारी सुट्टीमुळे उचांकी गर्दी झाली. १२ कोटींचा सुलतान रेडा आणि नाचणारा घोडा आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिला. तीन दिवसांत १० कोटींपर्यंत उलाढाल झाल्याचा संयोजकांनी दावा केला आहे. दरम्यान, सोमवारी (ता.२८) प्रदर्शनाची सांगता होईल. सायंकाळी चार वाजता कार्यक्रमाला प्रारंभ होईल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री सुनील तटकरे, विरोधी पक्षनेते आमदार धनंजय मुंडे यांची प्रमुख उपस्थिती राहील.

सकाळी दहापासूनच प्रदर्शन पाहण्यासाठी नागरिक येत असल्याने मैदान आणि परिसर गर्दीने फुलून गेला होता. सर्वच स्टॉलवर शेतकरी थांबून नवीन तंत्रज्ञान जाणून घेताना दिसत होते. महिला बचत गटांच्या स्टॉलवर खवय्यांची मांदियाळी राहिली. हरियाणातील कुरुक्षेत्र येथील कर्मवीर यांचा मुऱ्हा जातीचा सुलतान रेडा पाहण्यासाठी अक्षरश: रांग लागली होती. रेड्यासोबत सेल्फी काढून घेण्याचा मोह अनेकांना आवरला नाही. प्रत्येक वर्षी ५५ लाखांची कमाई करून देणारा हा रेडा १२ कोटी किंमतीचा आहे. २५ हून अधिक राष्ट्रीय पुरस्कार त्याने मिळवले आहेत, असे मालक कर्मवीर यांनी सांगितले.

बारामतीजवळील मेंढतमधील भोला नावाचा नंदीबैल १९ वर्षांचा आहे. त्याच्या कपाळावर साज, घंटी, माळी, तोडे, पिंपळपान आहे. उंची सहा फूट असून लांबी साडेसहा फूट आहे. हैदराबादमधून आणलेल्या १२० किलो वजनाच्या बोकडाने लक्ष वेधून घेतले. २० फुटांच्या कोल्हापुरी चप्पलजवळ थांबून सेल्फी काढून घेण्यासाठी तरुणाईची जणू स्पर्धाच दिसत होती. ६०० किलो वजनाचे हे चप्पल आहे. त्यासाठी २०० किलो लेदर वापरले आहे. त्यासाठी पावणेतीन लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत.

दरम्यान, शनिवारी धनंजय महाडिक युवाशक्ती महिला आघाडी प्रेरित भागीरथी महिला संस्थेतर्फे आयोजित महापथनाट्य स्पर्धात २६ संघ सहभागी झाले होते. यातील विजेत्या संघांना स्मृतिचिन्ह, दीड लाख रुपयांची बक्षिसे देण्यात आली.

प्रमुख आकर्षण

खिलारी बैल, देशी गाय, मोठा भोपळा, औषध फवारणी करणारा ड्रोन, दहा फाळांचा पल्टी नांगर, आजरा घनसाळ तांदूळ, जिरगा, इंद्रायणी तांदूळ, सेंद्रिय गूळ, आदर्श शेतीचे मॉडेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हॅपी स्ट्रीटवर जीवरक्षकांचा सत्कार

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

संकटसमयी जीव धोक्यात घालून जीव वाचवणाऱ्या व्यक्ती व संस्थांच्या प्रतिनिधींचा महाराष्ट्र टाइम्सच्या हॅपी स्ट्रीट उपक्रमात सत्कार करण्यात आला. या सत्काराने उपस्थित कोल्हापूरकर व तरुणाईला मदत करण्याची प्रेरणा मिळणार आहे.

हॅपी स्ट्रीटवर धमाल अनुभवतानाही हॅपीनेसचा इंडेक्स वाढवताना समाजातील चांगले काम करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करून सामाजिक बांधिलकीची वीण मटाने आणखीन घट्ट केली. क्लोरीन वायू गळती धाडसाने बंद करणाऱ्या महानगरपालिका अग्निशमन दलाचा कर्मचारी मंदार कांदळकरचा सत्कार आमदार डॉ. सुजित मिणचेकर व मधुरिमाराजे छत्रपती यांच्या हस्ते करण्यात आला. कळंबा फिल्टर हाऊस परिसरात अवजड वाहनाखाली जाणाऱ्या महिलेला वाचवणारे पोलिस कर्मचारी शशिकांत कामत यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला. आपत्कालीन घटनेते धाडसाने कार्यरत असलेल्या व्हाइट आर्मी, जीवन ज्योती संघटनेतील ओंकार कारंडेचा सत्कार निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे आणि गृह पोलिस उपअधीक्षक सतीश माने यांच्या हस्ते करण्यात आला.

१०५ वेळा रक्तदान करुन अनेकांचे प्राण वाचवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या आनंदा जाधव यांच सत्कार जीएसटी राज्य उपायुक्त सचिन जोशी यांच्या हस्ते करण्यात आला. तर सलग १४ वर्षे रक्तदान शिबिराचे आयोजन करुन सीपीआरमधील गरजू व गरीब रुग्णांना मदत करणाऱ्या कदमवाडी येथील गजराज मित्र मंडळ आणि कल्पवृत्त फाऊंडेशनचा सत्कार करण्यात आला. सुनील पाटील, शिवाजी वारके, शिरीष जाधव, संग्राम पाटील यांनी सत्कार स्वीकारला. राष्ट्रपती पदक विजेत्या गृह पोलिस उपअधीक्षक सतीश माने यांचाही यावेळी गौरव करण्यात आला. यावेळी प्राथमिक शिक्षण मंडळ समिती सभापती अशोक जाधव, नगरसेवक रत्नेश शिरोळकर, माजी महापौर स्वाती यवलुजे उमा इंगळे, अर्चना पागर, सविता भालकर आदी उपस्थित होते. मोफत रक्त तपासणी करण्याचा उपक्रम केल्याबद्दल कसबा बावडा येथील सेवा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. उमेश कदम यांचाही मटाच्यावतीने सत्कार करण्यात आला.

तरुणाईला आनंद लुटण्यासाठी व त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी महाराष्ट्र टाइम्सने जानेवारी हा उपक्रम सुरू केला त्याबद्दल अभिनंदन. सलग चार रविवारी हॅपी स्ट्रीटद्वारे चांगले व्यासपीठ मिळवून दिल्याने नागरिकांना आनंद मिळाला.

आमदार डॉ. सुजीत मिणचेकर

कोल्हापूर ही कला व क्रीडानगरी आहे. या दोन्हीचा एकत्रित संगम हॅपी स्ट्रीटमध्ये पहायला मिळत आहे. सलग तीन वर्षे मी या उपक्रमाला उपस्थित रहात असून दिवसेदिवस चांगला प्रतिसाद मिळत आहे.

मधुरिमा राजे, अध्यक्ष, राज्य महिला फुटबॉल असोसिएशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हॅपी स्ट्रीट हाऊसफुल्ल

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

रस्सीखेचसाठी चाललेली चढाओढ, मर्दानी खेळाच्या पथकाने आणलेली जान, दोरीवरील उड्यांची शर्यत, पोत्यात पाय घालून जिंकण्यासाठी चाललेली धडपड, चित्रकारांचे कॅनव्हासवरील फटकारे आणि स्टेजवरील शास्त्रीय, पारंपारिक आणि हॉलीवूड बॉलिवूड गाण्यावरील दिलखेचक नृत्याचा आनंद सर्किट हाऊस ते महासैनिक दरबार रस्त्यांवरील हॅपी स्ट्रीट उपक्रमात कोल्हापूरकरांनी लुटला. सळसळता उत्साह असणाऱ्या तरुणाई आणि कुटुंबातील सर्व सदस्यांनी हॅपी स्ट्रीटवर धम्माल मज्जा करत या उपक्रमाची सांगता केली.

'हॅपी स्ट्रीट'चे टायटल प्रायोजक फ्रुस्टार.. फ्रूटड्रिंक- संजय घोडावत ग्रुप, पावर्ड बाय स्पॉन्सर दि आयडियल कन्स्ट्रक्शन, ट्रॅव्हल पार्टनर श्री ट्रॅव्हल्स, फिटनेस पार्टनर एफ थ्री जीम, कॅरी बॅग ट्रॅव्हल्स बॅग ऑन रेंट हे होते. रविवारी सकाळी साडेसातच्या सुमारास आमदार डॉ. सुजित मिणचेकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, जीएसटी राज्यकर उपायुक्त सचिन जोशी, गृह पोलिस उपअधीक्षक सतीश माने, मधुरिमाराजे छत्रपती, प्राथमिक शिक्षण मंडळ सभापती अशोक जाधव, माजी महापौर स्वाती यवलुजे, नगरसेवक सुभाष बुचडे, रत्नेश शिरोळकर, नगरसेविका उमा इंगळे, सविता भालकर, अर्चना पागर, फ्रूस्टार संजय घोडावतचे आबु सुफियान चौधरी, फिटनेस पार्टनर एफ थ्री जीमचे युवराज कुंभार, लगेज पार्टनरचे जयेश पाटील आदी उपस्थित होते. महाराष्ट्र टाइम्सचे निवासी संपादक विजय जाधव, टाइम्स ऑफ इंडियाचे ब्युरो चिफ सत्यजित जोशी, रिस्पॉन्स सीनिअर मॅनेजर मधूर राठोड यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

थंडीतही हॅपी स्ट्रीट उपक्रमात सहभागी होण्यासाठी तरुणाईने मोठी गर्दी केली होती. प्रत्येक खेळात सहभागी होण्याबरोबर स्टेज परफॉर्म्सला दाद देण्यासाठी तरुणाईचा पुढाकार होता. शिट्ट्या, टाळ्यांनी कलाकारांना प्रोत्साहन दिले जात होते. तसेच उडत्या चालीवरील गाण्यावर कलाकारांना दाद देताना स्वत:ही नृत्य करत साथ दिल्याने हॅपी स्ट्रीटचा नृत्याचा अविष्कार टिपेला पोचला. अँकर अक्षय डोंगरेकडून मिळणाऱ्या प्रोत्साहानावर तरुणाई जाम खूष होत होती. लहान मुलापासून वयोवद्धांनी आपली कला पेश केली. क्लासिक आणि वेस्टर्न म्युझिकच्या फ्युजनवर मधुरा बाटेने शास्त्रीय नृत्य करत स्टेजवर मानवंदना दिली.

'अक्कड बक्कड बंबी बो', 'अस्सी नब्बे पुरो सौ', 'झांझरिया' या गाण्यासह रिमिक्स गाण्यावरील कलाकारांनी सादर केलेल्या परफॉर्म्सला उपस्थितांनी चांगलीच दाद दिली. चाटे इंग्लिश स्कूलने 'धनगरी पॉप' वर नृत्य सादर करताना 'काठी आणी घोगडं घेऊ द्या की' या गाण्यावर तर झीनत बोकारिया, श्रुती भोसले, जुही लांडगेने सादर केलेल्या 'ढगाला लागली कळं' या फ्युजनवर तरुणाई हॅपी स्ट्रीटवर चांगलीच थिरकली. समीक्षा लाडने 'अप्सरा आली' हे नृत्य सादर केले. 'खंडेराया माझी झाली दैना, तिच्यावाचून माझा जीव राहिना' या परफॉर्म्सला तरुणाईतून शिट्टीची दाद मिळाली. तनिष वाधवानी, सोहान वाधवानी या बहिण भावानी नृत्य सादर केले. स्पर्श डान्स ग्रुपच्या सुजय पाटील, देविका विभुते 'तुम मेरे इशारे पे' या गाण्यावरील नृत्याला चांगलीच दाद मिळाली.

०००००

नृत्यातून 'सेव्ह द बेबी'चा संदेश

संजीवन इंग्लिश मीडियम स्कूलने 'रक्तचरित्र' चित्रपटातील गाण्यावर 'सेव्ह द बेबी' हा संदेश दिला. मुलीवर होण्याऱ्या अत्याचाराला कंटाळून स्वत: मुलगीच हातात शस्त्र घेऊन समाजातील चुकीच्या प्रथा नष्ट करत 'मुलगी वाचवा' असा संदेश देते. या नृत्यातील लिसाचा अभिनय अप्रतिम झाला. निरंजन बाटे यांनी 'सेव्ह वॉटर, सेव्ह अर्थ' चा संदेश दिला. अक्षरा माने या शाळकरी मुलीने 'सेव्ह द बेबी'चा संदेश देताना 'अशा प्रथा कोल्हापूरात चालणार नाही' असा इशाराच दिला.

वंदे मातरम् चा जयघोष

प्रजासत्ताक दिनाच्या दुसऱ्या दिवशी हॅपी स्ट्रीट उपक्रमात अभिजित हिरवेने रेहमानच्या 'माँ तुझे सलाम...' गाण्याने देशभक्ती जागवली. अभिजतला टाळ्या वाजवून सर्वांनी साथ दिली. गाणे संपताच तरुणांनी उत्स्फूर्तपणे 'वंदे मारतम्'च्या घोषणा दिल्या.

'मटा'च्या हॅपी स्ट्रीटच्या उपक्रमातून तरुणाईना वेगळी उर्जा मिळते. तरुणाईच्या मन, मनगट आणि हृदयातील भावना हॅपी स्ट्रीटवर व्यक्त करण्याला संधी मिळते. एकीकडे तरुणाई गाण्यावर उत्स्फूर्तपण नाचत असताना दुसरीकडे 'माँ तुझे सलाम...' या गाण्यावर वंदे मारतरम् चा जयजयकार होतो हे फक्त कोल्हापुरात मटाच्या माध्यमातून साकारलेल्या हॅपी स्ट्रीट उपक्रमातून पहायला मिळते.

विश्वास नांगरे पाटील, विशेष पोलिस महानिरीक्षक

आमदार डॉ. मिणचेकर यांनी 'बादशाहो' या चित्रपटातील 'ऐसे लहरा के तू रुबरु आ गई, धडकने बेतहाशा तडपने लगी...' हे गीत सादर केले. गाणे गात आमदारांनी तरुणांना नृत्य करायला लावले.

काजोलच्या अदाकारीने तरुणाई घायाळ

झेस्ट डान्स अकॅडमीच्या मुंबईतील कलाकार काजलने 'ऐसे लहरा के तू रुबरु आ गई...'या गाण्यावर नृत्य सादर केले. तिच्या अदाकारीने तरुणाई घायाळ झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हॅपी स्ट्रीटवर जल्लोष

$
0
0

पारंपरिक खेळांबरोबरच विविध कलागुणांचा अविष्कार असलेल्या 'हॅपी स्ट्रीट' मध्ये कोल्हापूरकरांनी मनसोक्त आनंद लुटला. सर्किट हाउस ते महासैनिक दरबार हॉल रस्त्यावर झालेल्या उपक्रमाला करवीरकरांनी उदंड प्रतिसाद दिल्याने मोठी गर्दी झाली होती. तरुणाई आणि कुटुंबातील सर्व सदस्यांनी हॅपी स्ट्रीटवर धम्माल मज्जा करत या उपक्रमाची सांगता केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सिद्धार्थनगर’, ‘पद्मराजे उद्यान’ची आठवड्यात पोटनिवडणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्यातील विधानसभा मतदारसंघातील मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम पूर्ण झाले असल्याने आता सर्व महापालिकांतील रिक्त पदांच्या निवडणुका फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होणार आहेत. पक्षांतरबंदी कायद्यामुळे अपात्र ठरलेले येथील महापालिकेचे नगरसेवक अफजल पिरजादे यांच्या सिद्धार्थनगर आणि अजिंक्य चव्हाण यांच्या पद्मराजे उद्यान प्रभागातील निवडणुकही याच दरम्यान होईल. दरम्यान, अपात्रतेला स्थगिती देण्यासाठी दोघांनी दाखल केलेली याचिका शुक्रवारी सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावत त्यांचे पद अपात्र ठरवले.

महापालिकेच्या फेब्रुवारी २०१८मध्ये झालेल्या स्थायी समितीच्या सभापती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक चव्हाण आणि पिरजादे यांनी पक्षाचा व्हीप डावलून भाजप-ताराराणी आघाडीचे उमेदवार आशिष ढवळे यांना मतदान केले होते. या विरोधात राष्ट्रवादीचे गटनेते सुनील पाटील यांनी विभागीय आयुक्तांकडे दोघांचेही नगरसेवकपद अपात्र ठरण्याची मागणी केली. दहा डिसेंबर २०१८ रोजी झालेल्या महापौर निवडीपूर्वी दोघांना विभागीय आयुक्तांनी अपात्र ठरवले. या विरोधात दोन्ही नगरसेवकांनी मुंबई हायकोर्टात अपात्रतेला स्थगिती देण्यासाठी याचिका दाखल केली. कोर्टाने विभागीय आयुक्तांचा निर्णय कायम ठेवल्यानंतर महापालिका प्रशासनाने २३ डिसेंबर रोजी पोटनिवडणुकीच्या कार्यक्रमाबाबत राज्य निवडणूक आयोगाकडे पत्रव्यवहार केला. त्यामुळे एक महिन्यात दोन्ही प्रभागातील पोटनिवडणूक होण्याची शक्यता होती. दरम्यान मुंबई हायकोर्टाच्या निकालाला सुप्रीम कोर्टात दोन्ही नगरसेवकांनी याचिका दाखल केली. सुप्रीम कोर्टाने विभागीय आयुक्त आणि मुंबई हायकोर्टाचा अपात्रतेचा निर्णय कायम ठेवला.

राज्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघांतील मतदारयाद्या अद्ययावत करण्याचे काम सुरू असल्याने पोटनिवडणुकीबाबत निर्णय प्रलंबित होता. २५ जानेवारी रोजी मतदारयादी अद्ययावत करण्याचे काम पूर्ण झाले. त्यामुळे राज्यातील सर्वच महापालिकांतील रिक्त पदाच्या निवडणुका एकाचवेळी फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घेण्यात येणार आहेत. त्यामुळे सिद्धार्थनगर, पद्माराजे उद्यान या प्रभागांतील मोर्चेबांधणीला पुन्हा गती येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Laxman Dhoble: गडकरींच्या पाया पडणारे ढोबळे भाजपमध्ये

$
0
0


सूर्यकांत आसबे । सोलापूर

भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय नितीन गडकरी यांच्या पाया पडल्यानं वादात अडकलेले माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी अखेर सोमवारी जालना येथे कमळ हातात घेत भाजपमध्ये प्रवेश केला. आता ढोबळे यांना सोलापूर लोकसभा निवडणुकीत भाजपकडून तिकीट मिळणार की नाही ही चर्चा राजकीय वर्तुळात रंगते आहे.

लक्ष्मणराव ढोबळे एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रभावी नेते होते. पुढे त्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळही पडली. मंगळवेढा आणि मोहोळहून ते विधानसभेवर निवडूनही गेले आहेत. उस्मानाबादमधूनही त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती.

यंदा मोहोळमधून राष्ट्रवादीने ढोबळेंना तिकीट दिले नाही. तर त्यांचेच शिष्य आणि अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळ्यातील प्रमुख आरोपी रमेश कदम यांना उमेदवारी देऊन निवडून आणले. तिकीट न मिळाल्यानं ढोबळेंनी बंडखोरी केली. मोहोळमधून त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली पण या निवडणूकीत त्यांचा दारुण पराभव झाला होता.

ढोबळे अजित पवार यांच्यावर नाराज होते. सातत्याने डावलले जात असल्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून ढोबळे राष्ट्रवादीपासून दुरावले होते. याशिवाय मुंबईतील एका महिलेने त्यांच्यावर विनयभंगाचा आरोप केल्यानंतर त्यांची मोठी कोंडी झाली होती. या खटल्यात नुकतीच त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

मध्यंतरी त्यांनी भाजप नेत्यांशी जवळीक वाढवली होती. सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याशी ते संपर्कात होते. यामुळं ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चाही होती. मात्र, काही अडचणींमुळे त्यांच्या भाजप प्रवेशाला खो मिळत होता. काही महिन्यांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सोलापुरात आले होते. तेव्हा सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या निवासस्थानी लक्ष्मण ढोबळे यांनी गडकरी यांचे पाय धरल्याचे फोटो व्हायरल झाले होते. अखेर सोमवारचा मुहूर्त साधत त्यांनी जालना येथे भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

भाजपमध्ये मी सामान्य कार्यकर्ता आणि भाजपचा सदस्य म्हणून राहणार असल्याचं ढोबळे यांनी यापूर्वी अनेकदा सांगितलं आहे. पण शरद बनसोडे यांना पुन्हा खासदारकीची तिकीट मिळण्याची शक्यता खूपच कमी आहे. त्यामुळं ढोबळे यांना भाजप सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात तरी उतरविणार का, याबाबत तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

NCP: कागलः महाडिकांच्या भाषणात व्यत्यय; पक्षांतर्गत गटबाजी उघड

$
0
0

कागल (कोल्हापूर):

परिवर्तन झालंच पाहिजे, असा नारा देत एकत्र आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कागल येथील निर्धार परिवर्तन रॅलीच्या पहिल्याच सभेत पक्षातील गटबाजीचे दर्शन घडले. खासदार धनंजय महाडिक यांनी भाषणावेळी पक्षाचे नेते, आमदार हसन मुश्रीफ यांचे नाव न घेतल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालत महाडिक यांच्या भाषणावेळी गोंधळ घातला. त्यामुळे महाडिक यांना भाषण थांबवून खाली बसावे लागले. पक्षाचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या पुढ्यातच हा प्रकार घडला.

शहरात सकाळी पक्षातर्फे परिवर्तन रॅलीअंतर्गत पहिल्याच सभेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला अजित पवार, जयंत पाटील यांच्यासह पक्षाचे दिग्गज नेते उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान खासदार धनंजय महाडिक भाषणाला उभे राहिले. त्यांनी भाषणात आमदार मुश्रीफ यांचा उल्लेख केला नाही. हे लक्षात येताच व्यासपीठासमोरच असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू झाली. काही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. महाडिक यांनी उपस्थितांचे नावे घेताना कागलचे लाडके आमदार असा उल्लेख करून पुढे जयंत पाटील यांचे नाव घेतले. मुश्रीफ यांचे नाव त्यांनी न घेतल्याने कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे महाडिक हे माईकपासून लांब गेले.
यावेळी आमदार मुश्रीफ हे माईक घेऊन कार्यकर्त्यांनी संवाद साधण्यासाठी समोर आले. दरम्यान, महाडिक आपल्या आसनाकडे निघून गेले. त्यांना भाषण थांबवून बाजूला बसण्याची वेळ आली. गोंधळ वाढल्याने अजित पवार कार्यकर्त्यांना शांत करण्यासाठी जागेवरून पुढे आले. हे लक्षात येताच समोर आलेल्या मुश्रीफ यांनी, मी सांगतो, एकानेही आवाज करायचा नाही, असा दम कार्यकर्त्यांना दिला. निवडणुकीत मुन्ना महाडिकांनाच आपण शंभर टक्के मतं देऊन निवडून आणायचं आहे, अशी तंबीही मुश्रीफ यांनी केली. त्यानंतर महाडिक यांच्या आसनाजवळ जाऊन त्यांना पुन्हा भाषणाला उभे राहण्याची विनंती केली. महाडिक पुन्हा भाषण करण्यास राजी होत नव्हते. त्यावेळी बाजूला उभ्या असलेल्या कार्यकर्त्यांनी महाडिकांच्या हाताला धरून त्यांना माईकजवळ आणले.
नंतर भाषणावेळी महाडिक यांनी, तुमचे व आमचे नेते आमदार मुश्रीफ साहेब, असा उल्लेख केल्यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांमधून टाळ्यांचा कडकडाट झाला. भाषणात महाडिक यांनी भाजपच्या सरकारचा फसव्या योजनांचा समाचार घेतला. शेवटी गेल्या साडेचार वर्षांत माझ्याकडून राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बाबतीत काही मने दुखावली असल्यास जाहीरपणे दिलगिरी व्यक्त करतो, असे सांगत आपल्या भाषणाचा समारोप केला.

अजित पवार यांची हात जोडून विनंती

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाषणात कार्यकर्त्यांना भावनिक साद घातली. ते म्हणाले की, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे असतील, महिलांच्या असुरक्षिततेचे चित्र बदलायचे असेल तर आपल्याला आपल्या विचारांची माणसे शरद पवार यांच्यासोबत निवडून द्यावी लागतील. त्यामुळे मी सर्वांना हात जोडून विनंती करतो की, कोल्हापूरमध्ये जो उमेदवार असेल, मग ते धनंजय महाडिक जरी असतील तरी त्यांच्याच पाठीशी आपण ठाम राहून हे भाजपचे शेतकरीविरोधी सरकारला घालविण्यासाठी सर्वांनी राष्ट्रवादीलाच मदत करावी.

धुसफूस चव्हाट्यावर

पक्षाचे नेते अजित पवार, जयंत पाटील यांच्यासमोरच हा प्रकार घडल्याने अंतर्गत धुसफूस पुन्हा चव्हाट्यावर आली आहे. धनंजय महाडिक यांनी यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये पक्षविरोधी काम केल्याचे आरोप आमदार मुश्रीफ, के. पी. पाटील यांच्यासह अन्य नेत्यांनी पक्षाचे नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत केले होते. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांत खासदार महाडिक भाजप नेत्यांसोबत दिसले होते. तेव्हापासून मुश्रीफ आणि महाडिक यांच्यात वाद आहे. त्यातच लोकसभा निवडणुकीच्या तिकिटावरही मुश्रीफ यांनी दावा करत, महाडिक यांना पुन्हा संधी देण्यास विरोध केला होता. मात्र पक्षाध्यक्ष पवार यांनी मुश्रीफ यांची समजूत काढून महाडिक यांना हिरवा कंदील दाखविल्याचे सांगण्यात येते. महाडिकांनी एकीकडे पक्षविरोधी कामं केल्याचा आरोप करीत कोल्हापुरातील स्थानिक नेते नाराज आहेत. त्यातच मित्रपक्ष काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्याशीही धनंजय महाडिकांचं हाडवैर आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत महाडिक यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

होलीक्रॉस तोडफोडप्रकरणी १४ जणांना न्यायलयीन कोठडी

$
0
0

होलीक्रॉस तोडफोड; १४ जणांना न्यायलयीन कोठडी

कोल्हापूर : होलीक्रॉस कॉन्व्हेंट स्कूलमध्ये केलेल्या तोडफोड प्रकरणातील १४ जणांना कोर्टाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. या सर्वांची बिंदू चौक सबजेलमध्ये रवानगी करण्यात आली. शिवसेना युवासेनेचे चेतन शिंदे, किशोर घाटगे, रणजित जाधव, राजू काझी, सुनील जाधव, शाम जाधव, रोहन अतिग्रे, योगेश चौगुले, विश्वजित साळोखे, पीयुष चव्हाण, तुकाराम साळोखे, प्रकाश जगदाळे, अविनाश कामते, शैलेश साळोखे यांना २४ जानेवारी रोजी अटक केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खूनप्रकरणी पत्नीला न्यायालयीन कोठडी

$
0
0

कोल्हापूर

साकोली कॉर्नर येथील पतीच्या खूनप्रकरणी संशयित पत्नी निर्मला सागर बोडके (वय ३०) हिला कोर्टाने न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. त्यानंतर तिची सोमवारी बिंदू चौकात रवानगी करण्यात आली. कामधंदा न करता दारू पिऊन चारित्र्याच्या संशयावरून सतत मारहाण करीत असल्याच्या रागातून पती सागर नारायण बोडके (३२) याचा तिने खून केला होता. पतीच्या खुनानंतर निर्मलाला जुना राजवाडा पोलिसांनी अटक केल्यानंतर कोर्टाने तिला पोलिस कोठडीत ठेवले होते. सोमवारी पोलिस कोठडीची मुदत संपल्याने तिला कोर्टात हजर केले असता न्यायालयीन कोठडीसाठी कारागृहात रवानगी करण्याचे आदेश देण्यात आले. सीपीआरमध्ये वैद्यकीय तपासणी करुन तिला कारागृहात पाठवण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


निवडणुकीत परिवर्तन घडविणारच

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गारगोटी

'पाच मंत्रिपदांच्या तुकड्यांसाठी शिवसेना लाचार झाली आणि त्यांनी भाजपची युती केली. सत्तेत गेल्यानंतरही भाजप-शिवसेनेत आजही वाद सुरू आहे. येत्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत परिवर्तन घडविणारच असा निर्धार करा' असे आवाहन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले. मुदाळ (ता. भुदरगड) येथील प. बा. पाटील शिक्षण संकुलाच्या मैदानावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निर्धार परिवर्तन यात्रेत बोलत होते. 'सत्तेवर असलेल्या राज्यातील सरकारमधील १६ मंत्र्यांचे घोटाळे आम्ही पुराव्यानिशी बाहेर काढले. या भ्रष्टाचारी भाजपला घरी बसविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही' असेही त्यांनी सांगितले.

धनंजय मुंडे म्हणाले, 'भाजप सरकारने १२५ कोटी जनतेला खोटी स्वप्ने दाखवली. खात्यात १५ लाख रोखीचा भरणा करू अशी साडेचार वर्षे आमिषे दाखवत ते जनतेला फसवित आहे. महागाईचा निर्देशांक कमालीचा वाढला असून सामान्य जनतेला दिवसाढवळ्या लुटले जात आहे. नोकऱ्यांची खोटी आमिषे दाखवून तरुणांची घोर फसवणूक केली आहे. ५२६ कोटींचे राफेल विमान १६७० कोटी रुपयांना घेणाऱ्या भ्रष्टाचारी भाजप सरकारला घरी बसविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.'

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, 'नोटाबंदी, जीएसटी, कामगार व शेतकरी विरोधातील निर्णयाने सर्वच घटकात अस्वस्थता आहे. तरुणांचा भ्रमनिरास झाला आहे. शेतकरी विरोधातील सरकार असल्याने उसाची एफआरफी मिळत नाही. देशावर ८४ लाख कोटी रुपये कर्ज करणाऱ्या, शेतकऱ्यांच्या विरोधी असणाऱ्या व तरुणांना रोजगाराच गाजर दाखवणाऱ्या लबाड सरकारला उलथून टाकूया.'

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील म्हणाले, 'पाच राज्यात नामुष्कीजनक पराभव झाल्याने मोदी सरकारने भीतीपोटी सगळे सोडून शिल्लक राहिलेले १० टक्के आरक्षण संवर्णाना देण्याचे धाडस करून पराभवावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला. गेल्या साडेचार वर्षांत देशात व राज्यात प्रगतीची काडीमोड झाली. महागाईमुळे जनता ग्रासली असून या सत्तेला जनता कंटाळली आहे. आता राष्ट्रवादी व राष्ट्रीय काँग्रेसचे सरकार सत्तेवर येणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. '

खासदार धंनजय महाडीक यांचे भाषण झाले. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी स्वागत केले. माजी आमदार के. पी. पाटील यांनी प्रास्ताविक केले. आमदार संध्यादेवी कुपेकर, माजी आमदार नामदेवराव भोईटे, सारंग पाटील, धैर्यशिल पाटील, राधानगरी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष किसनराव चौगले, जयवंतराव शिंपी, मुकुंदराव देसाई, जयंतराव शिंपी, पंडित केणे, विश्वनाथ कुंभार, प्रविणसिंह पाटील, उदय पवार, विकास पाटील, रणजितसिंह पाटील, विकास पाटील, प्रविण भोसले आदी उपस्थित होते. पी. जी. पाटील यांनी सूत्रसंचलन केले. विश्वनाथ कुंभार यांनी आभार मानले.

फोटो

मुदाळ (ता. भुदरगड ) येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निर्धार परिवर्तन मेळाव्याप्रसंगी बोलताना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार. यावेळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री जयंत पाटील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन्ही काँग्रेसला आघाडी धर्म पाळावाच लागेल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'राष्ट्रवादीचे नेते शरद पवार कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी जो उमेदवार देतील तो निवडून आणण्यासाठी कसलीही साशंकता किंवा किंतु न बाळगता काम करावे लागेल. पक्षाचे कार्यकर्ते एक सैनिक या नात्याने नेत्यांचा आदेश शीरसावंद्य मानून काम करतील,' असा विश्वास माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसचा एक नेता उलटसुलट विधान करत असला तरी आघाडी धर्म म्हणून त्यांना राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार करावा लागेल, अशा शब्दांत पवार यांनी आमदार सतेज पाटील यांचे नाव न घेता सुनावले.

काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली आहे. भाजपला पराभूत करण्यासाठी तुटेपर्यंत ताणायचे नाही, ही दोन्ही काँग्रेसची भूमिका आहे, असे स्पष्ट करून पवार म्हणाले, 'लोकसभेच्या ४८ पैकी ४४ जागांचा निर्णय झाला आहे. पुणे, सिंधुदुर्ग-रत्नागिरी, जालना आणि औरंगाबाद या जागांबाबत थोडी धुसफूस आहे. डॉ. प्रकाश आंबेडकर यांची वंचित विकास आघाडी आमच्या आघाडीसोबत घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांनी बारा जागांची मागणी केली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ त्यांच्याशी चर्चा करत आहेत. हातकणंगलेची जागा मित्रपक्षाला देण्याबाबत चर्चा सुरू आहे. '

खासदार धनंजय महाडिक यांच्या उमेदवारीला मुंबई बैठकीतील विरोध आणि सोमवारी त्यांचे कागलमध्ये भाषण रोखल्याच्या घटनेसंबंधी पवार म्हणाले, 'शरद पवारांनी मुंबईत संबंधितांना पक्षाची भूमिका सांगितली आहे. सगळ्यांना ती मान्य आहे. साताऱ्यातही मनोमिलनचा प्रयत्न सुरू आहे. नेते आदेश देतील त्यानुसार कार्यकर्त्यांना काम करावे लागेल. निर्धारयात्रा संपल्यानंतर दोन्ही पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत राज्यभर दौरे आणि कार्यक्रम होतील. आघाडी धर्मानुसार ठरलेल्या उमेदवाराला निवडून आणण्याचे काम दोन्ही पक्षाला काम करावे लागेल. जिथे समविचारी पक्ष लढत आहे तेथे दोन्ही काँग्रेस त्या उमेदवाराच्या पाठीशी असतील.'

.. .. ..

कुणाच्याही पावत्या फाडू नका...

नारायण राणे यांना सिंधुदुर्ग मतदारसंघातून राष्ट्रवादीची उमेदवारीची मध्यंतरी चर्चा होती या प्रश्नावर बोलताना पवार यांनी, राष्ट्रवादीच्या नावावर कुणाच्याही पावत्या फाडू नका, असा टोला लगाविला. माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या भाजप प्रवेशावर त्यांनी शरद पवार यांनी ढोबळे यांना प्राध्यापकापासून आमदार, मंत्री केले, त्यांना ताकद दिली. त्यांच्यासाठी अजून काय करायचे होते? असा सवाल केला.

.. .. .. .. ..

सेना भाजप युती होणार

भाजप, शिवसेनेची युती हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. ते एकमेकांवर कितीही टीका करत असले तरी त्यांच्यात युती होणार आहे. एकत्र न आल्यास काय अवस्था होईल, याची दोघांनाही जाणीव आहे. राममंदिर, शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाला १०० कोटीचा निधी हे मुद्दे युती होणार असल्याचेच स्पष्ट करतात. असे असले तरी या निवडणुकीत दोन्ही काँग्रेसचाच विजय होणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

.. .. ..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्योजक मदन नाईक खून प्रकरणी तपास संथ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, हातकणंगले

रेंदाळ- कारदगा रस्त्यावरील कर्नाटक हद्दीत शुक्रवारी झालेल्या कोल्हापूरातील प्रसिद्ध उद्योजक मदन नाईक यांच्या निर्घृण खून प्रकरणी सदलगा पोलिसांचा तपास संथ गतीने सुरु असल्याने उद्योजकांतून नाराजीचा सूर उमटत आहे. पोलिसांना रेंदाळ परिसरात तपास करताना अनेक अडचणी निर्माण झाल्याने हा तपास कोल्हापूर पोलिसांकडे सोपवण्याची मागणी होत आहे.

सोमवारी प्रोबेशनरी डीवायएसपी एस. शंकर यांच्यासह चिकोडी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सदलगा पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी या खून प्रकरणी रेंदाळसह परिसरातील अनेक ठिकाणी चौकशी केली. पण त्यांना यश मिळाले नाही. कर्नाटक पोलिसांना या खून प्रकरणी तपास यंत्रणा राबवण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे हा तपास कोल्हापूर पोलिसांकडे देण्याची मागणी मोठ्या होत आहे. नाईक यांच्याबरोबर शेतातील फार्म हाऊसवर ये-जा असणाऱ्या तसेच फोनवर संभाषण केलेल्या मित्रमंडळींना चौकशीसाठी सदलगा पोलिस ठाण्यात बोलवण्यात आले आहे. गेल्या तीन दिवसांत खून प्रकरणी तपासात प्रगती झाली नसल्याने याचे गूढ वाढत चालले आहे. दरम्यान नाईक यांचे नातेवाईक व मित्रमंडळींनी कोल्हापूर जिल्हा पोलिसप्रमुखांकडे या खून प्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जातीयवादी, धर्मांध सरकार उलथवून टाका

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कागल

'नोटाबंदीपूर्वी तीन मोदी आले आणि होत्याचे नव्हते झाले. क्रिकेटमधील पैसा ललीत मोदीने नेला. पंजाब नॅशनल बँक लुबाडून निरव मोदी परदेशात गेला. नरेंद्र मोदी यांनी हजार, पाचशेच्या नोटा बंद करत सव्वाशे कोटी जनतेच्या हातातील पैसा काढून नेल्या. नोटाबंदीच्या काळात आरबीआयमध्ये जमा झालेल्या पंधरा लाख कोटी रुपयांत सर्वात मोठा भ्रष्टाचार दडला आहे. यातील नकली, काळा व पांढरा पैसा याबाबत काही सांगितले जात नाही' अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. कागल येथील बापूसाहेब महाराज चौकात आयोजित निर्धार परिवर्तन यात्रेच्या सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी वसंतराव धुरे होते. 'निवडणुका आल्या की भाजप-सेनेला राम आठवतो. जातीपातीत तेढ निर्माण करुन आणि दिशाभूल करुन निवडणूक जिंकण्यावर यांचा डोळा असतो. असे जातीयवादी धर्मांध सरकार उलथवा' असे आवाहन त्यांनी केले.

अजित पवार म्हणाले, 'भाजप सरकार आदिवासी, महिला, युवक, कामगार व शेतकरी विरोधी आहे. महिलांवरील अत्याचार वाढून कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा झाला आहे. सीबीआयपासून न्यायालयापर्यंत राजकीय हस्तक्षेप वाढला आहे. कुपोषण आणि महिलांवरील अत्याचारात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. भाजप-सेनेसारख्या जातीयवादी पक्षाला विरोध करण्यासाठी आम्ही सेक्युलर पक्ष एकत्र येऊन आघाडी करीत आहोत. प्रकाश आंबेडकर यांच्याशीही आमची चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादीच्या ४४ जागांचा निर्णय झाला आहे.'

अजित पवार म्हणाले, 'शेतकऱ्यांना पूर्णपणे एफआरपी मिळत नाही. सरकारने साखरेचा भाव ३४०० करावा, आम्ही ताबडतोब कारखानदारांना एफआरपी द्यायला सांगतो. मी अर्थमंत्री असताना पंधरा वर्षे राज्याची तिजोरी सांभाळली. जर राज्यकर्त्यांमध्ये धमक आणि ताकद असेल तर नडलेल्या माणसाला ताबडतोब मदत करता येते. पण यांना करायचेच नाही. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यापेक्षा आहे त्या मालाला दर द्या. सरकारची मुदत २०१९ ला संपताना २०२२ ला सर्वांना घरे देण्याची घोषणा करतात, यातच त्यांच्या भूलथापा दडल्या आहेत. मंत्रिमंडळातील अनेकांची शेती नाही. त्यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान होत आहे. केंद्रातही आपला कुणी वाली राहिलेला नाही म्हणून ही अवस्था आहे. प्रियांका गांधी राजकारणात आल्याने भाजपच्या पोटात दुखत आहे.'

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाषणात पंतप्राधन नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या ऑडिओ क्लिप ऐकवत लोकांशी संवाद साधला. 'पंधरा लाख जमा झाले का? कर्जमाफी व दोन कोटी रोजगार मिळाले का? महागाई कमी झाली का? महिला आणि सीमेवरील जवान सुरक्षित आहेत का? आणि तुम्ही भाजपाला मत देणार का?' अशी विचारणा त्यांनी केली. 'माझ्यासह देशातील जनतेला असाच अनुभव आला आहे. या सरकारने प्लॅनिंग कमिशन आणि न्याय व्यवस्था अडचणीत आणली आहे' असे त्यांनी सांगितले.

खासदार धनंजय महाडिक म्हणाले, 'माझ्यावर आरोप करणारे संजय मंडलिक बारा वाजता उठतात आणि रात्री सातनंतर नॉटरिचेबल असतात. त्यांची लाट आता ओसरली आहे. येत्या निवडणुकीत या सरकारला हद्दपार करण्याची गरज आहे.'

आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, 'आपली सत्ता नसलेल्या ठिकाणी या सरकारने निधीत कपात केली. त्यामुळेच आपला जिल्हा विकासापासून दूर राहिला आहे. अशा सरकारला त्यांची जागा दाखविण्याची हीच वेळ आहे.'

व्यासपीठापर जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, आर. के पोवार, प्रविणसिंह पाटील, राजश्री माने, संगीता खाडे, संग्राम कोते-पाटील, युवराज पाटील, भैय्या माने, नवीद मुश्रीफ, अनिल साळोखे आदी प्रमुख उपस्थित होते. शिवानंद माळी यांनी स्वागत केले. नगराध्यक्षा माणिक माळी यांनी आभार मानले.

पहिल्यांदा वडिलांचे स्मारक बांधा

अजित पवार म्हणाले, 'ज्या उद्धव ठाकरेंना गेल्या सहा वर्षात स्वत:च्या वडिलांचे स्मारक बांधता आले नाही, ते अयोध्येत जाऊन राममंदिर बांधण्याची भाषा करीत आहेत. लोकांची दिशाभूल करण्यासाठी हा आटापिटा आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सीसीटीव्हीचा सराफ संघाचा उत्कृष्ट उपक्रम’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'कोल्हापूर सराफ व्यापारी संघाने भेंडे गल्लीत बसविलेले सीसीटीव्ही हा एक उत्कृष्ट उपक्रम आहे,' असे प्रतिपादन संस्थेचे ज्येष्ठ सभासद शिवानंद पेडणेकर यांनी केले. सराफ संघाच्यावतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त भेंडे गल्लीत लोकवर्गणीतून सीसीटीव्ही बसविण्यात आले. त्याचे उदघाटन पेडणेकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

पेडणेकर म्हणाले, 'सध्या व्यवसायाच्या सुरक्षेतेच्या दृष्टीने पोलिस, सुरक्षा रक्षकांकडे आपण लक्ष देतोच. त्याशिवाय सीसीटीव्ही यंत्रणाही तितकीच महत्त्वपूर्ण झाली आहे. त्यादृष्टीने सराफ संघाने व्यावसायिकांच्या सुरक्षेसाठी केलेला हा उपक्रम स्तुत्य असून त्याचे मी मनापासून कौतुक करतो.' अध्यक्ष भरत ओसवाल यांनी सीसीटीव्ही बसविण्यामागील पार्श्वभूमी स्पष्ट केली. उपाध्यक्ष कुलदीप गायकवाड, सचिव विजय हावळ, संचालक शिवाजी पाटील, संजय चोडणकर, महेंद्र ओसवाल, अनिल पोतदार, सुरेश गायकवाड आदी उपस्थित होते.

दरम्यान, संघाच्या घाटी दरवाजा येथील इमारतीसमोर अध्यक्ष भरत ओसवाल यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. संघाचे संचालक, सभासद, नूतन आदर्श मराठी विद्यालयाचे शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images