Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

खाशाबा जाधव पद्मविभूषणच्या प्रतीक्षेत

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

देशाला स्वातंत्र मिळाल्यानंतर झालेल्या ऑलिम्पिकमध्ये कुस्ती या क्रीडा प्रकारात खाशाबा जाधव यांनी वैयक्तिक प्रकारात ब्रॉन्झ तर के. डी. माणगावे यांनी चतुर्थ क्रमांक मिळवला. त्यांच्या या दैदिप्यमान कामगिरीने कोल्हापूरी कुस्तीचा डंका जगभर वाजला. गेल्या अनेक वर्षांपासून दोन्ही मल्लांना केंद्र सरकाचा पद्मविभूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्याची मागणी विशेषत: कुस्ती क्षेत्रातून होत आहे. मात्र, दोन्ही मल्लांचा आजही केंद्र सरकारने उचित सन्मान केलेला नाही. यंदा तरी प्रजासत्ताक दिनी (ता. २६) त्यांचा सन्मान होणार का? याकडे क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे.

संस्थानकाळात सुवर्णकाळ अनुभवणाऱ्या कोल्हापूरच्या कुस्ती क्षेत्राने स्वातंत्र्योत्तर काळातही अनेक जागतिक दर्जाचे मल्ल देशाला दिले. येथील अनेक मल्लांनी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर दैदिप्यमान कामगिरी केली. त्यामुळे येथील कुस्ती चांगलीच नावारुपाला आली. त्याचे पहिले श्रेय ऑलिम्पिक पदकविजेते खाशाबा जाधव आणि के. डी. माणगावे यांना जाते. कोणत्याही सुविधा नसताना या दोन्ही मल्लांनी कोल्हापूरसह देशाचे नावे ऑलिम्पिकमध्ये झळकवले. पण, आजही या दोन्ही मल्लांचा योग्य सन्मान झाला नाही. या मल्लांचा देश पातळीवरील पुरस्कारांनी सन्मान झाल्यास कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला जाणार असल्याने महानगरपालिकेने महासभेत सदस्य ठराव करून त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्याची मागणी केली आहे.

जाधव आणि माणगावे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कोल्हापुरात कुस्तीचे धडे गिरवले. १९५२ मध्ये झालेल्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये दोघेही सहभागी होते. जाधव यांनी आपल्या पहिल्याच ऑलिम्पिक स्पर्धेत मैदान मारताना ब्रॉन्झपदक मिळवले. वैयक्तिक क्रीडा प्रकारात पदक मिळवणारे ते पहिले भारतीय ठरले. तर माणगावे यांनी चतुर्थ क्रमांक पटकावला होता. त्यांना पदकाने थोडक्यात हुलकावणी दिली. पण, त्यांचे यश जाधव यांच्याइतकेच प्रेरणादायी आहे. खाशाबा जाधव यांचे ऑगस्ट १९८४ मध्ये निधन झाले. निधनानंतर तब्बल १६ वर्षांनी त्यांना मरणोत्तर अर्जुन पुरस्कार देण्यात आला.

जाधव यांच्यासोबत माणगावे ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी झाले. दुर्दैवाने त्यांना पदक मिळवता आले नाही. त्यांनी स्पर्धेत चौथा क्रमांक मिळवला होता. पदक मिळाले नसले, तरी त्यांनी देशासाठी अभिमानास्पद कामगिरी केली. महापालिकेने या दोन्ही मल्लांना पद्मविभूषण पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान व्हावा असा ठराव डिसेंबर २०१८ रोजी केला. त्याची पूर्तता प्रजासत्ताक दिनी व्हावी अशी अपेक्षा आहे.

केंद्र सरकारने आजवर जाधव आणि माणगावे यांच्या सन्मानाकडे दुर्लक्ष केले. कुस्तीत दोन्ही मल्लांनी अजरामर अशी कामगिरी केली. त्यांच्यानंतर अशी कामगिरी केलेल्या मल्लांना सन्मानीत करण्यात आलेले. मात्र या दोघांबाबतची प्रतीक्षा अद्याप संपलेली नाही. २६ जानेवारी रोजी त्यांना पद्मविभूषण दिले जावे अशी अपेक्षा आहे.

- शामराव जाधव (खाशाबा जाधव यांचे पुतणे)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मराठा भवनसाठी प्रसंगी जागा खरेदी करू

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

'मराठा भवनच्या उभारणीसाठी राज्य सरकारकडे सहा एकर जागेची मागणी केली आहे. ३५० पानांचा अहवाल महसूल विभागाकडे सुपूर्द केला आहे. राज्य सरकारने सकारात्मक भूमिका घेऊन त्वरित जागा उपलब्ध करून द्यावी. प्रसंगी जागा खरेदी करून मराठा भवन उभारु' असा संकल्प राजर्षी शाहू मराठा महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी करण्यात आला. अखिल भारतीय मराठा महासंघ, कोल्हापूर जिल्हा आणि मराठा समाज भवन ट्रस्टतर्फे आयोजित चार दिवसीय राजर्षी शाहू मराठा महोत्सवाला गुरुवारी दिमाखात प्रारंभ झाला. दसरा चौक महोत्सव सुरू आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळयाचे पूजन करुन महोत्सवाला सुरुवात झाली. वीरमाता लक्ष्मी जाधव, संयोगिता शिंदे, मनीषा सूर्यवंशी, छाया भोसले, आनंदी उलपे आणि वीरपत्नी कांचन चव्हाण यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन झाले. दसरा चौकातील मैदानावर महिला बचत गटांनी उत्पादित वस्तू, खाद्यपदार्थांचे स्टॉल आहेत. ग्रंथ प्रदर्शनही भरविले आहे. 'हा महोत्सव समाजाला दिशा देणारा ठरला आहे. समाजातील सर्वच घटकांना एकत्र आणण्याचा हा प्रयत्न आहे. बचत गटांच्या स्टॉल्समुळे नवीन रोजगार निर्मितीला चालना मिळेल. व्यवसाय वृद्धी व स्पर्धा परीक्षांविषयी व्याख्याने होणार असल्याने नागरिकांनी लाभ घ्यावा' असे आवाहन महासंघाचे जिल्हाध्यक्ष मुळीक व उद्योजक जाधव यांनी केले. दुपारी चेतना सिन्हा यांनी महिला सबलीकरण तर राजकुमार पाटील यांनी स्पर्धा परीक्षेसंबंधी मार्गदर्शन केले.

दरम्यान उद्घाटन कार्यक्रमानंतर मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंत मुळीक, उद्योजक चंद्रकांत जाधव, संग्राम पाटील, डॉ. भरतकुमार कोटकर, सतीश कडूकर, सुभाष जाधव, माजी महापौर शोभा बोंद्रे, शैलेजा भोसले, दीपा डोणे यांची बैठक झाली. बैठकीत मराठा भवनसंदर्भात चर्चा झाली. सरकारकडून मुदतीत जागा मिळाली नाही तर प्रसंगी मराठा महासंघ व मराठा स्वराज्य भवन ट्रस्टतर्फे जागा खरेदी करण्याचा निर्णय बैठकीत झाला.

शिवकालीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन

शस्त्र संग्राहक गिरिश जाधव यांनी शाहू स्मारक भवनात शिवकालीन शस्रास्रांचे प्रदर्शन भरविले आहे. यात मराठा, मुगल, ब्रिटीशकालीन तलवारींचा समावेश आहे. हत्तीच्या चामड्याच्या ढाली, माडू, मराठा कट्यार, मुगल कट्यार, इंग्लिश व युरोपियन कुऱ्हाडींचा समावेश आहे. शिवाय संगीत, गुर्ज, कुकरी, ढाल, शिरस्त्राण, वाघनखे, विविध प्रकारचे भाले अशा शस्त्रांचा समावेश आहे. शिवकालीन शस्रास्रांचे प्रदर्शन हे महोत्सवातील प्रमुख आकर्षण ठरले.

रांगोळी, लेझीम व झांजपथक ठरले आकर्षण

शाहू स्मारक भवनच्या प्रवेशद्वारालगत विविध विषयांवरील रांगोळया आकर्षण ठरल्या आहेत. श्वेता पाटील, शैलेजा गिरीगोसावी, अनिता गडकरी, सारिका मुरगडे यांनी रांगोळ्या काढल्या आहेत. रायगडावरील शिवाजी महाराजांची समाधी, राजमाता जिजाऊ, संध्यामठ, दीपोत्सव या विषयावरील कलाकृतींचा यात समावेश आहे. दरम्यान, वसंतराव देशमुख हायस्कूलच्या मुलींचे लेझीम पथक, संस्कार विद्यालयाच्या झांजपथकाच्या प्रात्यक्षिकांनी महोत्सवाची शोभा वाढली. महाराष्ट्र हायस्कूलच्या मुलांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर गीत सादर केले. शाहीर मिलिंद सावंत यांचे शाहू गौरव गीत सादर केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पन्हाळा अव्वल, मुख्यालय द्वितीय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषदेतर्फे आयोजित क्रीडा स्पर्धेत पन्हाळा पंचायत समितीने विविध गटांत वर्चस्व राखत सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. स्पर्धेत जिल्हा परिषद मुख्यालयने द्वितीय, तर भुदरगड पंचायत समितीने तृतीय क्रमांक पटकावला.

पोलिस मुख्यालय मैदानावर गेले तीन दिवस स्पर्धा रंगल्या. १००, २०० व ४०० मीटर धावणे, गोळाफेक, थाळीफेक, बॅडमिंटन, कॅरम अशा विविध प्रकारांत क्रीडा स्पर्धा झाल्या. स्पर्धेत २००० हून अधिक कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक, उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, शिक्षण समिती सभापती अंबरीश घाटगे, समाजकल्याण समिती सभापती विशांत महापुरे, सीईओ अमन मित्तल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आर. पी. शिवदास, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षीस समारंभ झाला.

याप्रसंगी करवीरचे सभापती राजेंद्र सूर्यवंशी, सदस्य अरुण इंगवले, प्रसाद खोबरे, राजवर्धन निंबाळकर उपस्थित होते. संचलनामध्ये गडहिंग्लज, करवीर व भुदरगड पंचायत समिती विजेते ठरले. विजेत्या संघाला चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविले.

००००

सांघिक स्पर्धा : पुरुष गट,पहिले तीन क्रमांक (पंचायत समिती )

क्रिकेट : शिरोळ, हातकणंगले, गडहिंग्लज. व्हॉलिबॉल : शिरोळ, पन्हाळा, गडहिंग्लज. कबड्डी : पन्हाळा, करवीर, आजरा. रिले : शाहूवाडी, राधानगरी, भुदरगड. खो-खो : शाहूवाडी, पन्हाळा पंचायत समिती आणि जिल्हा परिषद मुख्यालय.

०००

सांघिक स्पर्धा : महिला गट, पहिले तीन क्रमांक(पंचायत समिती)

क्रिकेट - पन्हाळा, गगनबावडा, चंदगड. व्हॉलीबॉल - राधानगरी, करवीर, जिल्हा परिषद मुख्यालय. कबड्डी - पन्हाळा,गगनबावडा, करवीर. रिले - भुदरगड, शाहूवाडी, चंदगड. खो-खो - भुदरगड, राधानगरी, चंदगड पंचायत समिती

००००

ग्रामसेवकाचा धिंगाणा

आजरा तालुक्यातील एका ग्रामसेवकाने क्रीडा स्पर्धा सुरू असतानाचा मद्यपान करून धिंगाणा घालण्याचा प्रकार गुरुवारी घडला. संबंधित ग्रामसेवकाकडून एक-दोन सामन्यादरम्यान अडथळे आणण्याचा प्रकार घडल्यावर पोलिसांनी त्याला बाजूला नेले. सीईओ अमन मित्तल यांनी त्याची चांगलीच कानउघाडणी केली. तसेच येत्या पंधरा दिवसात संपूर्ण परिसरातील ग्राम स्वच्छतेच्या कामाच्या सध्यस्थितीचा अहवाल देण्याच्या सूचना केल्या. या कालावधीत त्याने कामाची पूर्तता केली नाही तर कारवाईला सामोरे जावे लागेल अशा शब्दांत सुनावले.

०००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाहूवाडी, चंदगडमध्ये मुलींचे प्रमाण हजारावर

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

'लेक वाचवा' अभियानविषयी प्रबोधन, पीसीपीएनडीटी कायद्याविषयी जागरुकता आणि मुलीच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी प्रशासकीय स्तरावरील प्रोत्साहन योजना यामुळे मुलींच्या जन्मदरात वाढ होत असल्याचे सुखद चित्र आहे. जिल्हा परिषदेच्या डिसेंबर २०१८ अखेरच्या अहवालानुसार शून्य ते सहा वर्षे वयोगटातील बालकांमध्ये दर १००० मुलांमागे मुलींचे प्रमाण ९४४ इतके प्रमाण आहे. डोंगराळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहूवाडीत १०५७ तर चंदगड तालुक्यात १००० इतके मुलींचे प्रमाण आहे. मात्र, करवीर शिरोळ, राधानगरी आणि पन्हाळा हे तालुके मात्र 'लेक वाचवा' अभियानात मागासलेले असल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यात मुलींच्या प्रमाणात वाढ दिसत असली तरी सधन प्रदेश, ऊस, भाजीपाल्यासह बागायत शेती, सुधारलेल्या तालुक्यांत मानसिकता बदलासाठी आणखी प्रयत्न गरजेचे आहेत. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे दर महा महिला व पुरुष लिंग प्रमाण आढावा घेण्यात येतो. यात चंदगड आणि शाहूवाडी या डोंगराळ, मागास तालुक्यांत मुलींच्या जन्माचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्याच्या ठिकाणापासून लांब असलेल्या या तालुक्यांत आरोग्य सुविधाही तुटपुंज्या आहेत. शहरी भागातील आरोग्य सुविधा या नागरिकांपासून कोसो दूर आहेत. मात्र या तालुक्यांनी 'लेक वाचवा'मध्ये आघाडी घेतली आहे. तर करवीर आणि शिरोळ या तालुक्यांत उलट चित्र आहे. करवीर आणि राधानगरी तालुक्यात एक हजार मुलांमागे ९१३ तर शिरोळ तालुक्यात ९१७ इतके मुलींचे प्रमाण आहे. पन्हाळा तालुक्यात हजार मुलांमागे ९२० इतके मुलींचे प्रमाण आहे.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे म्हणाले, 'सामाजिकदृष्ट्या हा अतिशय संवेदनशील विषय आहे. त्यामुळे मुलींच्या जन्मदरात वाढ होण्यासाठी जिल्हा परिषद प्रयत्नशील आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्फे मुलीच्या जन्माचे स्वागत म्हणून मातांना विशेष भेट वस्तू दिल्या जातात. चौदाव्या वित्त आयोगातून प्रत्येक ग्रामपंचायतीला लेक वाचवा अभियानासाठी तरतूद करण्याच्या सूचना आहेत.'

सहा महिन्यांतील चित्र

जून २०१८ : १००० मुलांमागे ९३२ मुलींचे प्रमाण

ऑक्टोबर २०१८ : १००० मुलांमागे ९४२ मुलींचे प्रमाण

डिसेंबर २०१८ : १००० मुलांमागे ९४४ मुलींचे प्रमाण

प्रगत तालुके पिछाडीवर

डिसेंबर २०१८ च्या अहवालानुसार मुलींच्या जन्मदरात प्रगत तालुके पिछाडीवर आहेत. करवीर आणि राधानगरीमध्ये मुलींच्या जन्मदराचाा टक्का वाढावा यासाठी विशेष प्रयत्नांची आवश्यकता असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. दर १००० मुलांमागे मुलींच्या प्रमाणात शाहूवाडी तालुका आघाडीवर आहे. शाहूवाडी १०५७, चंदगड १०००, गगनबावडा ९८४, गडहिंग्लज ९८३, आजरा ९६२, हातकणंगले ९५५, कागल ९२३, पन्हाळा ९२०, भुदरगड ९१९, शिरोळ ९१७, करवीर आरणि राधानगरीत ९१३ असे मुलींचे प्रमाणे आहे.

'माझी कन्या भाग्यश्री'अंतर्गत चाळीस लाखांची ठेव

महिला आणि बालविकास विभागातर्फे 'माझी कन्या भाग्यश्री योजनेंतर्गत एका किंवा दोन मुलींवर कुटुंब नियाजन शस्त्रक्रिया करुन घेणाऱ्या १५९ दाम्पत्यांच्या नावावर चाळीस लाख रुपयांची ठेव ठेवली आहे. एक ऑगस्ट २०१७ मध्ये योजना कार्यान्वित झाली. एका मुलीवर शस्त्रक्रिया करुन घेणाऱ्यांना ५०,००० रुपयांची तर दोन मुलींवर शस्त्रक्रिया केलेल्या दाम्पत्यांच्या मुलींच्या नावावर प्रत्येकी २५००० रुपयांची ठेव ठेवली जाते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकरी संघातील अपहारप्रकरणी तिघे दोषी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शेतकरी सहकारी संघाच्या शिरोळ शाखेतील ३७ लाखांच्या अपहारप्रकरणी चौकशी समितीने शाखाधिकारी अमर गुरव, निरीक्षक शहाजी जाधव, प्रकाश काळे यांच्यावर ठपका ठेवला असून त्यांच्याकडून खुलासा मागितला आहे. त्यानंतर जिल्हा निबंधकाची परवानगी घेऊन फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. दरम्यान, मुख्य व्यवस्थापक आप्पासाहेब निर्मळ यांना कामावर पुन्हा हजर करुन घेतल्याबद्दल गुरूवारी झालेल्या संचालकांच्या बैठकीत चार संचालकांनी सभात्याग केला. जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून पाच कोटी रुपये कर्ज घेण्याच्या ठरावालाही विरोध करण्यात आला.

अपहाराची चौकशी करण्यासाठी ऑडिटर सी. जी. चौगुले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी पाच दिवस चौकशी करुन गुरव, जाधव, काळे यांना दोषी धरले. फौजदारी गुन्हा दाखल करण्यापूर्वी त्यांना म्हणणे मांडण्याची संधी दिली जाणार असून त्यासाठी नोटिस पाठवण्यात आली आहे. गुरव याने मिश्र खत तसेच साबणासह अन्य पदार्थांची परस्पर विक्री करुन ३७ लाख ७२ हजार २७२ रुपयांचा अपहार केल्याचे स्पष्ट झाले. तसेच अपहारणात दुर्लक्ष केल्याबद्दल निरीक्षक जाधव व काळे यांनाही दोषी धरण्यात आले आहे.

अपहारप्रकरणी संचालक मंडळाने तिघा संशयितांसह मुख्य व्यवस्थापक निर्मळ, दीपक देसाई यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते. पण अध्यक्ष अमरसिंह माने यांच्यासह काही संचालकांच्या आग्रहामुळे निर्मळ यांना बुधवारी पुन्हा कामावर घेण्यात आले. संचालक मंडळाच्या बैठकीत निर्मळ यांना कामावर परत घेताना संचालक मंडळाला अंधारात का ठेवले, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. अध्यक्ष अमरसिंह माने यांच्या खुलाशाने समाधान न झाल्याने संचालक शिवाजीराव कदम, शोभना शिंदे, माणिकराव जाधव, विजयादेवी राणे यांनी सभात्याग केला. शेतकरी संघाच्या व्यवसायासाठी पाच कोटी रुपयांचा कर्ज काढण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. या ठरावालाही या चार संचालकांनी विरोध केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हिंदू एकताची धरणे

$
0
0

कोल्हापूर

हिंदू एकता आंदोलनाच्यावतीने मशिदीवरील ध्वनीक्षेपक बंद करावेत, या मागणीसाठी शिवाजी चौकात धरणे धरण्यात आली. यावेळी अयोध्येत राम मंदिराची उभारणी करावी, अशी मागणी करण्यात आली. आंदोलनात दीपक मगदूम, लालासाहेब गायकवाड, अण्णा पोतदार, गजानन तोडकर, संजय साडविलकर, सुरेश काकडे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले . आंदोलनस्थळी आमदार राजेश क्षीरसागर, शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार, हिंदू महासभेचे संजय कुलकर्णी यांच्यासह हिंदुत्ववादी कायकर्त्यांनी भेट देऊन पाठिंबा दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हॉस्पिटल, बिल्डरवर प्राप्तिकर छापे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी प्राप्तिकर विभागाने गुरुवारी सकाळी शाहूपुरी तिसरी गल्ली येथील एक बँक, पतसंस्था, टाकाळा येथील हॉस्पिटल आणि टेंबलाईवाडी उड्डाण पुलाजवळील एका बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयावर छापा टाकून कागदपत्रे ताब्यात घेतली. या प्रकाराने बँकिंग आणि वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली. दुपारी एक वाजेपर्यंत संबंधितांच्या कार्यालयात प्राप्तिकर अधिकारी तळ ठोकून होते.

प्राप्तिकर विभागाने या ठिकाणी छापे टाकण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून बंदोबस्त मागविला. प्राप्तिकर विभागाचे २० कर्मचारी आणि २५ पोलिस कर्मचारी घेऊन गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास पथके चार ठिकाणी रवाना झाली. शाहूपुरी तिसरी गल्लीतील एक बँक आणि पतसंस्थेत दहा कर्मचारी दाखल झाले. थेट बँक व्यवस्थापकाच्या केबीनमध्ये जाऊन त्यांनी बँकेतील गेल्या सहा महिन्यांतील व्यवहाराची माहिती मागवली. मुदतबंद ठेवींची चौकशी केली. काही आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त केली. त्यानंतर त्याच गल्लीतील एका पतसंस्थेत पथकाने छापा टाकला. अचानक टाकलेल्या छाप्यामुळे पतसंस्थेचे संचालक हडबडून गेले. पथकाने संस्थेतील काही कागदपत्रांची तपासणी केली. या ठिकाणी छापा सुरु असताना एक पथक टेंबलाईवाडी उड्डाणपुलाजवळील बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात पोहोचले. या व्यावसायिकांची आर्थिक उलाढाल कोटीत असल्याची माहिती प्राप्तिकर विभागाला मिळाली होती. त्याच्या कार्यालयातील प्रकल्पाची माहिती, प्रकल्पाचे अकाउंट असलेल्या बँकेची पासबुके, नेटबँकिंग व्यवहार तपासण्यात आले. यामध्ये कोट्यवधींची बेहिशोबी उलाढाल असल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाल्याचे कळते. त्यानंतर टाकाळा येथील एका हॉस्पिटलच्या व्यवहाराचीही चौकशी करण्यात आली.

.. .. ..

माहिती देण्यास नकार

टाकाळा येथील संयुक्त आयकर निदेशक (अन्वेषण) विभागाच्या कार्यालयात अधिकारी डॉ. वैभव ढेरे यांच्या आदेशानुसार पथक तैनात होते. अन्वेषण अधिकाऱ्याच्या पथकात चार ते पाच कर्मचारी होते. दुपारी तीन वाजेपर्यंत सर्व अधिकारी छाप्यात जप्त केलेली कागदपत्रे घेऊन या ठिकाणी आले. मात्र छाप्याची अधिक माहिती देण्यास अधिकाऱ्यांनी नकार दिला.

.. .. ..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

होलीक्रॉस सुरू करण्याचे आदेश

$
0
0

उद्यापासून शाळा सुरू, दिवसभर शाळा परिसरात पोलिस बंदोबस्त

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

येथील होलीक्रॉस कॉन्व्हेंट स्कूल सोमवारपासून पूर्ववत सुरू करण्याचे आश्वासन मुख्याध्यापिका सिस्टर भारती पठारे यांच्यासह व्यवस्थापन सदस्यांनी गुरूवारी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना दिले. शनिवारपासून शाळा सुरू करण्याची ग्वाही त्यांनी दिली. दुपारी एक वाजता महानगरपालिका शिक्षण मंडळ प्रशासनाधिकारी एस. के. यादव यांनी दुपारी शाळेला भेट दिली. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी स्कूल त्वरित चालू करण्याचे लेखी आदेशही त्यांनी दिले.

इमारत फी वरून युवा सेना पदाधिकाऱ्यांनी २२ जानेवारीला स्कूलमधील मुख्याध्यापक कार्यालयाची मोठी तोडफोड केली. या प्रकरणातील सर्व दोषींवर कडक कारवाई होणार नाही, तोपर्यंत कॉन्व्हेंटसह दहावीपर्यंतचे सर्व वर्ग बंद ठेवण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला. तीन दिवस शाळा बंदच राहिली. पालक संघटनेनेही व्यवस्थापनला पाठिंबा देऊन तोडफोडीचा निषेध केला. शाळा बेमुदत बंद ठेवण्याची भूमिका घेतल्याने जिल्हाधिकारी सुभेदार यांनी स्कूलच्या मुख्याध्यापिका पठारे यांच्यासह व्यवस्थापनास निमंत्रित केले. त्यांच्यासोबत बैठक झाली.

बैठकीत सुभेदार म्हणाले, 'दोषींविरोधात पोलिस कारवाई करीत आहेत. आणखी सखोल चौकशी व्हावी, असे वाटत असल्यास जिल्हा पोलिस प्रमुखांची भेट घेऊन मागणी करावी. फार दिवस शाळा बंद ठेवणे योग्य नाही. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होईल. त्यामुळे त्वरित शाळा सुरू करावी.' यावर मुख्याध्यापिका पठारे यांनी सोमवारपासून शाळा पूर्ववत होईल, असे सांगितले. प्रशासन अधिकारी यादव यांनी शाळा त्वरित सुरू करण्याची लेखी सूचना दिली. दरम्यान, तोडफोड केलेल्या युवा सेनेचा निषेध आम आदमी पार्टीतर्फे करण्यात आला. यासंबंधीचे पत्रक 'आप'चे जिल्हा अध्यक्ष उत्तम पाटील, संदीप देसाई यांनी प्रसिध्दीस दिले. समस्त हिंदू संघटनेतर्फे इमारत निधीची चौकशी करण्याची मागणी प्रसिध्दी पत्रकातून केली आहे.

-----------

शिक्षिका, कर्मचाऱ्यांत भीती

तीन दिवसानंतरही कार्यालयात काचांचा खच होता. मोडलेल्या खुर्च्या अस्ताव्यस्त पडलेल्या होत्या. प्रशासन अधिकारी यादव यांच्या भेटीवेळी हे निदर्शनास आले. भेटीवेळी तेथील शिक्षिका, कर्मचारी भीतीच्या छायेखाली होते. अल्पसंख्याक असल्याने जाणीवपूर्वक आमच्या स्कूलला टार्गेट केल्याचे त्यांनी यादव यांना सांगितले. दिवसभर शाळा परिसरात पोलिस बंदोबस्तही होता.

----------

चौकट

तोडफोडी दिवशीच नोटीस

'होलीक्रॉस'कडून सक्तीने वसूल करण्यात येणाऱ्या इमारत फी विरोधात आमदार राजेश क्षीरसागर यांनी २१ जानेवारीला निवेदन देऊन शिक्षण उपसंचालकाकडे तक्रार केली होती. दुसऱ्या दिवशी याच विषयावरून युवा शिवसैनिकांनी तोडफोड केली. त्याच दिवशी महानगरपालिका शिक्षण प्रशासन अधिकारी यादव यांनी शाळेच्या मुख्याध्यापिकांना नोटीस काढली. पालकांकडून सक्तीने इमारत फी घेणे नियमबाह्य आहे. फी घेतल्याचे निदर्शनास आल्यास कारवाईसाठी वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठवला जाईल, असे नोटीसीमध्ये म्हटले आहे.

---

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चौकशीचे काम सहा महिने थांब

$
0
0

विद्यापीठाचा लोगो वापरावा...

पदवी प्रमाणपत्रावर घोळ प्रकरण अद्याप दोषनिश्चिती नाही

Appasaheb.mali@timesgroup.com

Tweet:Appasaheb_MT

कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठातर्फे यंदाच्या दीक्षांत समारंभाची तयारी सुरू झाली असताना दुसरीकडे गेल्या वर्षी पदवी प्रमाणपत्राच्या छपाईच्या घोळ प्रकरणी अद्यापही कुणावर दोष निश्चिती झालेली नाही. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीने तीन महिन्याचा अहवाल सादर करायचा होता. समितीची स्थापना करुन सहा महिन्याचा कालावधी उलटला, मात्र अद्याप चौकशी सुरू असल्याचे उत्तर प्रशासनाकडून व्यवस्थापन व सिनेट सदस्यांना दिले जाते. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चुकीच्या निर्णयामुळे विद्यापीठाला लाखो रुपयांना फटका बसला. त्याची जबाबदारी कुणावर, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे.

विद्यापीठातील वरिष्ठ अधिकारी या प्रकरणात सापडल्यामुळे चौकशी अहवालाला जाणूनबुजून विलंब केला जात असल्याचे सिनेट सदस्यांचे म्हणणे आहे. विद्यापीठाचा ५४ वा दीक्षांत समारंभ १८ मार्च २०१८ रोजी झाला. मात्र गतवर्षीचा पदवीदान समारंभ प्रमाणपत्रावरील सहीच्या प्रकरणाने गाजला. विद्यापीठातील अधिकाऱ्यांचे कुरघोडीचे राजकारण आणि काहीजणांचा अट्टाहास त्याला कारणीभूत ठरला. वास्तविक पदवी प्रमाणपत्रावर कुलगुरू आणि कुलसचिव या दोघांची स्वाक्षरी असते. गतवर्षी, केवळ कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या एकमेव स्वाक्षरीने प्रमाणपत्रांची निर्मिती झाली.

तब्बल २५००० प्रमाणपत्रे छापली. या प्रकार चव्हाट्यावर आल्यानंतर नामुष्की टाळण्यासाठी प्रशासनाने घाईगडबडीने एका रात्रीत प्रमाणपत्रांची छपाई केली. या गोंधळात प्रमाणपत्रांवर असंख्य चुका झाल्या. रंगीतऐवजी ब्लॅक अँड व्हाइटमध्ये प्रमाणपत्रे छापली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने १७ जुलै रोजी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत प्रवेश करुन प्रशासनाला जाब विचारला.'अभाविप'च्या आंदोलनानंतर पदवी प्रमाणपत्रावरील घोळाच्या चौकशीसाठी व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. डॉ. भारती पाटील यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती नेमली. यामध्ये व्यवस्थापन परिषद सदस्य अमित कुलकर्णी, प्राचार्य धनाजी कणसे यांचा समावेश आहे. समितीने १७ ऑक्टोबरपर्यंत अहवाल सादर करण्याचे ठरले होते.

...

अधिकाऱ्यांचे म्हणणे घेतले

मुदतीत अहवाल सादर करण्यात चौकशी समिती कुचकामी ठरली आहे. दरम्यानच्या कालावधीत समिती सदस्यांनी पदवी प्रमाणपत्रातील घोळासंबंधीची कागदपत्रे तपासली आहेत. तसेच कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्रकुलगुरू डी. टी. शिर्के, कुलसचिव विलास नांदवडेकर, परीक्षा नियंत्रक व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे यांचे स्वतंत्रपणे म्हणणे ऐकून घेतले. मात्र चौकशी अहवाल तयार झाला नाही. यासंदर्भात समिती प्रमुख डॉ. भारती पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होवू शकला नाही.

..........

कोट

'पदवी प्रमाणपत्रावरील सहीचा घोळ आणि पुन्हा प्रमाणपत्रे छपाईमुळे विद्यार्थ्याना मानसिक त्रास झाला. तसेच विद्यापीठाला लाखो रुपयांचा आर्थिक फटका बसला. काहीजणांच्या चुकीमुळे विद्यापीठाच्या निधीचा अपव्यय झाला, त्याची जबाबदारी कुणावर ? प्रशासनाकडून विविध प्रकारच्या चौकशीचा अहवाल दडपण्याचा खटाटोप सुरू आहे.

प्रा. डॉ. निलकंठ खंदारे, सिनेट सदस्य, 'सुटा'

.....................

'पदवी प्रमाणपत्रातील घोळप्रश्नी अभाविपने सातत्याने आवाज उठविला. चौकशी समितीचे तीन महिने उलटल्यानंतर प्रशासनाला स्मरण पत्र दिले आहे. दुबार छपाईसाठी जो खर्च झाला, तो संबंधित अधिकाऱ्यांकडून वसूल करावा. हा प्रश्न सुटेपर्यंत संघटना लढा देत राहील.

साधना वैराळे, महाराष्ट्र प्रदेश सहमंत्री, अभाविप

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'युतीच्या चर्चेची खबर माध्यमांना कळू देणार नाही'

$
0
0

पंढरपूरः गेल्या २५ वर्षांपासून शिवसेनेसोबत भाजपाची नैसर्गिक युती असून, गेल्या विधानसभेचा अपवाद वगळता आम्ही कायम एकत्र राहिलो आहोत. आता युतीच्या चर्चा सुरू झाल्याची माहिती माध्यमांना कळू देणार नसल्याचं वक्तव्य राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं. पंढरपूरमध्ये वनविभागाच्यावतीने सहा कोटी रुपये खर्चून उभारलेल्या तुळशीवृंदावन या संत उद्यानाच्या लोकार्पण सोहळ्यावेळी मुनगंटीवार बोलत होते.

केंद्रीयमंत्री नितीन गडकरी हे पंतप्रधानांच्या शर्यतीत असल्याबाबत बातम्या उठवल्या जात असून, खुद्द गडकरींच्या मनातही असा विचार नाही, अशी पुष्टीही मुनगंटीवार यांनी जोडली. शिवसेनेसोबतच्या युतीबाबत कोणीही काळजी करायचे कारण नसून, युती नक्की होणार, असा टोलाही त्यांनी लगावला.

राज्याच्या तिजोरीत खडखडाट असल्याची वक्तव्ये काही मंडळी मुद्दाम करीत असून, राज्य दुष्काळी जनतेला मदत करण्यासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याचं त्यांनी सांगितलं. सध्या राज्यात तीव्र दुष्काळी परिस्थिती असून, दुष्काळी मदतीसाठी ७ हजार कोटींची तयारी सरकारने केली आहे. याबाबत केंद्र सरकारला कळविण्यात आलं असून केंद्रदेखील मदत करण्याच्या तयारीत आहे. मात्र, आम्ही केंद्राच्या मदतीची वाट न पाहता टँकर आणि चार छावण्यासाठी मदत देण्यास सुरुवात केल्याचं त्यांनी नमूद केलं. टँकरच्या मागणीनंतरही प्रशासनाकडून टँकर सुरू होत नसतील, तर त्याची गंभीर दखल घेऊन तातडीने चौकशी केली जाईल, असं ते म्हणाले. यावेळी पालकमंत्री विजय देशमुख , आमदार भारत भालके, आमदार प्रशांत परिचारक आदी मान्यवर उपस्थित होते.

राज्याच्या तिजोरीत खडखडाट नसून, सरकारी कर्मचाऱ्यांना फेब्रुवारी महिन्याचा पगार सातव्या आयोगानुसार हाती पडेल, अशी स्पष्टोक्ती मुनगंटीवार यांनी केली. सातवा वेतन आयोग १ जानेवारी २०१६ पासून लागू केलेला असला तरी कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्यांचे १ रुपयाचंही नुकसान होणार नाही. १ फेब्रुवारीपर्यंत कर्मचाऱ्यांना याचा लाभ होईल, असं मुनगंटीवार यांनी सांगितलं.

नाशिक येथे नागरी वस्तीत बिबट्याने घातलेल्या धुमाकूळनंतर आता वन विभागाला बिबट्यांच्या हालचालीवर नियंत्रण आणण्याचे आदेश देण्यात आले असून, पुन्हा नागरी वस्त्यांत बिबट्याचा त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याचे आदेश मुनगंटीवार यांनी वनविभागाला दिले. नाशिक येथील बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या वाहिनीच्या पत्रकाराच्या उपचाराचा सर्व खर्च वनविभागाला करण्याच्या सूचनाही वनमंत्र्यांनी दिल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चंदगड, शाहूवाडीत लेकींचे स्वागत

$
0
0

लोागो: गुडन्यूज

कोल्हापूर टाइम्स टीम

'लेक वाचवा' अभियानविषयी प्रबोधन, पीसीपीएनडीटी कायद्याविषयी जागरुकता आणि मुलीच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी प्रशासकीय स्तरावरील प्रोत्साहन योजना यामुळे मुलींच्या जन्मदरात वाढ होत असल्याचे सुखद चित्र आहे. जिल्हा परिषदेच्या डिसेंबर २०१८ अखेरच्या अहवालानुसार शून्य ते सहा वर्षे वयोगटातील बालकांमध्ये दर १००० मुलांमागे मुलींचे प्रमाण ९४४ इतके प्रमाण आहे. डोंगराळ आणि दुर्गम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहूवाडीत १०५७ तर चंदगड तालुक्यात एक हजार इतके मुलींचे प्रमाण आहे. मात्र, करवीर शिरोळ, राधानगरी आणि पन्हाळा हे तालुके मात्र 'लेक वाचवा' अभियानात मागासलेले असल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यात मुलींच्या प्रमाणात वाढ दिसत असली तरी सधन प्रदेश, ऊस, भाजीपाल्यासह बागायत शेती, सुधारलेल्या तालुक्यांत मानसिकता बदलासाठी आणखी प्रयत्न गरजेचे आहेत. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे दर महा महिला व पुरुष लिंग प्रमाण आढावा घेण्यात येतो. यात चंदगड आणि शाहूवाडी या डोंगराळ, मागास तालुक्यांत मुलींच्या जन्माचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्याच्या ठिकाणापासून लांब असलेल्या या तालुक्यांत आरोग्य सुविधाही तुटपुंज्या आहेत. शहरी भागातील आरोग्य सुविधा या नागरिकांपासून कोसो दूर आहेत. मात्र या तालुक्यांनी 'लेक वाचवा'मध्ये आघाडी घेतली आहे. तर करवीर आणि शिरोळ या तालुक्यांत उलट चित्र आहे. करवीर आणि राधानगरी तालुक्यात एक हजार मुलांमागे ९१३ तर शिरोळ तालुक्यात ९१७ इतके मुलींचे प्रमाण आहे. पन्हाळा तालुक्यात हजार मुलांमागे ९२० इतके मुलींचे प्रमाण आहे.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे म्हणाले, 'दरहजारी मुलींचे प्रमाण हा सामाजिकदृष्ट्या अतिशय संवेदनशील विषय आहे. त्यामुळे मुलींच्या जन्मदरात वाढ होण्यासाठी जिल्हा परिषद प्रयत्नशील आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्फे मुलीच्या जन्माचे स्वागत म्हणून मातांना विशेष भेट वस्तू दिल्या जातात. चौदाव्या वित्त आयोगातून प्रत्येक ग्रामपंचायतीला लेक वाचवा अभियानासाठी तरतूद करण्याच्या सूचना आहेत.'

सहा महिन्यांतील चित्र

जून २०१८ : १००० मुलांमागे ९३२ मुलींचे प्रमाण

ऑक्टोबर २०१८ : १००० मुलांमागे ९४२ मुलींचे प्रमाण

डिसेंबर २०१८ : १००० मुलांमागे ९४४ मुलींचे प्रमाण

प्रगत तालुके पिछाडीवर

डिसेंबर २०१८ च्या अहवालानुसार मुलींच्या जन्मदरात प्रगत तालुके पिछाडीवर आहेत. करवीर आणि राधानगरीमध्ये मुलींच्या जन्मदराचाा टक्का वाढावा यासाठी विशेष प्रयत्नांची आवश्यकता असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. दर एक हजार मुलांमागे मुलींच्या प्रमाणात शाहूवाडी तालुका आघाडीवर आहे. शाहूवाडी १०५७, चंदगड १०००, गगनबावडा ९८४, गडहिंग्लज ९८३, आजरा ९६२, हातकणंगले ९५५, कागल ९२३, पन्हाळा ९२०, भुदरगड ९१९, शिरोळ ९१७, करवीर आरणि राधानगरीत ९१३ असे मुलींचे प्रमाणे आहे.

'माझी कन्या भाग्यश्री'अंतर्गत ४० लाखांची ठेव

महिला आणि बालविकास विभागातर्फे 'माझी कन्या भाग्यश्री योजनेंतर्गत एका किंवा दोन मुलींवर कुटुंब नियाजन शस्त्रक्रिया करुन घेणाऱ्या १५९ दाम्पत्यांच्या नावावर ४० लाख रुपयांची ठेव ठेवली आहे. एक ऑगस्ट २०१७ मध्ये योजना कार्यान्वित झाली. एका मुलीवर शस्त्रक्रिया करुन घेणाऱ्यांना ५० हजार रुपयांची तर दोन मुलींवर शस्त्रक्रिया केलेल्या दाम्पत्यांच्या मुलींच्या नावावर प्रत्येकी २५ हजार रुपयांची ठेव ठेवली जाते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘तुमचे मत तुमचा अधिकार’

$
0
0

\Bशहरात मतदार जागृती रॅली\B

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'तुमचे मत तुमचा अधिकार', 'एक मत एक मूल्य', 'मतदार असल्याचा अभिमान बाळगा' अशा विविध घोषणांनी मतदार जनजागृतीपर रॅली शहरातील प्रमुख चौकातून काढण्यात आली. जिल्हा निवडणूक प्रशासनातर्फे या रॅलीचे आयोजन केले होते.

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जनजागृतीसाठी विद्यार्थी, विद्यार्थींनींच्या रॅलीला बिंदू चौकातून सुरूवात झाली. कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते उदघाटन झाले. रॅलीदरम्यान मतदार जागृतीपर पथनाट्य सादर करण्यात आले. 'नव मतदारांना मतदार असल्याचा अभिमान, मतदानासाठी सज्ज' अशी घोषवाक्ये लिहिलेली बॅचेस प्रदान करण्यात आली. शिवाजी पुतळा, महानगरपालिका, दसरा चौक मार्गावरुन येऊन रॅलीची शाहू स्मारक भवनात सांगता झाली.

याप्रसंगी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार म्हणाले, 'लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राबवण्यात आलेल्या मतदार नोंदणी मोहिमेत जिल्ह्यात १ लाख ३० हजार नवमतदारांनी नोंदणी केली. या सर्व मतदारांनी निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावावा. प्रारूप मतदार यादीनुसार २९ लाख ६५ हजार मतदार होते. १ जानेवारी २०१९ रोजी १८ वर्ष पूर्ण होणाऱ्या ज्या मतदारांनी यादीतील नावात समावेशासाठी अर्ज केले आहेत, त्याची छाननी होऊन अंतिम मतदार यादी ३१ जानेवारीला प्रसिध्द होईल. त्यात १ लाख ३० हजार नवीन मतदार असतील. निवडणुकीत मतदारांनी कोणत्याही अमिषाला बळी न पडता निर्भयपणे हक्क बजावावा.'

यावेळी भरतनाट्यम नृत्यांगना, ब्रॅड ॲम्बेसिडर संयोगिता पाटील, अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहल भोसले यांनी मार्गदर्शन केले. वक्तृत्व, निबंध, चित्रकला स्पर्धेतील विजेते, चांगले काम केलेल्या अधिकाऱ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला, तसेच ईव्हीएम, व्हीव्हीपॅटची चित्रफित दाखविण्यात आली. याप्रसंगी आंतरराष्ट्रीय नेमबाज अनुष्का पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, निवडणूक विभागाच्या उपजिल्हाधिकारी स्नेहल भोसले, महानगरपालिका उपायुक्त मंगेश शिंदे यांच्यासह विद्यार्थी, विद्यार्थींनी उपस्थित होते. प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर्किट हाऊसजवळ लूटुया उद्या हॅपी स्ट्रीटचा आनंद

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

पारंपरिक खेळासह, संगीत, नृत्याची धमाल मेजवाणी येत्या रविवारी (ता. २७) सर्किट हाऊस ते महासैनिक दरबार हॉल रस्त्यांवर अनुभवता येणार आहे. 'महाराष्ट्र टाइम्स'च्या चौथ्या 'हॅपी स्ट्रीट'ची धमाल रविवारी सकाळी सात वाजल्यापासून सुरू होणार आहे.

हॅपी स्ट्रीटचे उद्घाटन आमदार सतेज पाटील, आमदार राजेश क्षीरसागर, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, मधुरिमाराजे, नगरसेवक सत्यजित कदम, सुनील कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

'महाराष्ट्र टाइम्स'च्यावतीने यापूर्वी हॉकी स्टेडियम रोड, रंकाळा पदपथ आणि सायबर रोडवर झालेल्या हॅपी स्ट्रीटला तरुणाईसह सर्वांचा उदंड प्रतिसाद मिळाला. या उपक्रमाची सांगता सर्किट हाऊस ते महासैनिक दरबार हॉल मार्गावरील कार्यक्रमात होणार आहे. 'हॅपी स्ट्रीट'चे टायटल प्रायोजक फ्रुस्टार.. फ्रूटड्रिंक- संजय घोडावत ग्रुप, पावर्ड बाय स्पॉन्सर दि आयडियल कन्स्ट्रक्शन, ट्रॅव्हल पार्टनर श्री ट्रॅव्हल्स, फिटनेस पार्टनर एफ थ्री जीम, कॅरी बॅग ट्रॅव्हल्स बॅग ऑन रेंट हे आहेत. यावेळी 'सर्वाधिक वेळा रक्तदान करणाऱ्या व्यक्ती, संस्थांसह जीवरक्षकांचा सन्मान करण्यात येणार आहे.

सकाळी सात वाजता सुरू होणाऱ्या हॅपी स्ट्रीटमध्ये चित्रकार, शिल्पकारांकडूनही प्रात्यक्षिके सादर होतील. शिवाय, नकला, नाट्यप्रवेश, शास्त्रीय नृत्य, वादन या कलाप्रकारांचे सादरीकरण होईल. लगोरी, गोट्या, पोत्यात पाय घालून पळणे, दोरीवरील उड्या, टायर पळवणे, रस्सीखेच या खेळांचा आनंद लुटता येणार आहे. यासाठी नावनोंदणी अथवा प्रवेश शुल्क, वयाची अट नाही.

सहभागी संस्था

कोल्हापूर डान्स असोसिएशन

अखिल भारतीय भूलतज्ज्ञ संस्था

शिवसंस्कार प्रतिष्ठान : मर्दानी खेळ

हिंद प्रतिष्ठान : मर्दानी खेळ

जल्लोष ढोलताशा पथक

एफ ३ जीम : फिटनेस एरिना

वनिता ढवळे : बचपन गल्ली

गो बियाँड द लिमिटस : पारंपरिक खेळ

एस. के. रोलर स्केटिंग अॅकॅडमी : स्केटिंग एरिना

कोल्हापूर आर्ट फाऊंडेशन व विविध कला संस्था : आर्ट एरिना

शाकंभरी नेल्स अँड ब्युटी : मेहंदी व नेल आर्ट

विजयकुमार सोनी : माइंड गेम्स

वुशू असोसिएशन : महिला संरक्षण

व्हाइट आर्मी : आपत्कालीन मार्गदर्शन व रस्ता सुरक्षा

रोहन कालेकर : टॅटू

प्रसाद इव्हेंट्स : सेल्फी पॉईंट व कार्टून्स

राजेंद्र हंकारे : कॅलिग्राफी

बॅग पॅक, रॅम्प वॉक, रन विथ बॅग : कॅरी बॅग-ट्रॅव्हल बॅग ऑन रेंट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रेम खासदारांवर, पण प्रचार सेनेचाच: चंद्रकांत पाटील

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'सैराट चित्रपटात लाडक्या मुलीचा खून तिचे नातेवाईक करतात, पण मला हा शेवट मान्य नाही. मी जर चित्रपट काढला असता तर झाले गेले विसरून मुलीला स्वीकारले असते. खासदार धनंजय महाडिक आमची लाडकी लेक आहे. त्यांनी राष्ट्रवादीचे तिकीट घेतले आहे. लेकीने मनाविरुद्ध लग्न केले तरी आम्ही तिचा खून करणार नाही. तिच्यावर जिवापाड प्रेम करतच राहू. आगामी लोकसभा निवडणूक भाजप-शिवसेना युतीमार्फत लढणार आहे. कोल्हापूरची जागा शिवसेनेकडे असल्याने आम्ही युतीच्या उमेदवाराचा प्रामाणिकपणे प्रचार करू,' अशा शब्दांत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी खासदार महाडिकांना शुभेच्छा दिल्या.

भीमा कृषी व पशुपक्षी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी सैराट चित्रपटाच्या 'द एंड'वरून पालकमंत्री पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी कोट्या केल्या. पालकमंत्री पाटील यांनी खासदार महाडिक यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिल्याचे सांगताना 'सैराट'च्या द एंडच्या खूनशी घटनेचा उल्लेख केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी महाडिक यांची उमेदवारी जाहीर केली नाही, पण थेट पालकमंत्र्यांनी राष्ट्रवादीचे लोकसभेचे उमेदवार असा उल्लेख करताना 'काळाच्या पोटात काय दडलंय हे ठाऊक नाही!' असे सांगून गुगलीही टाकली.

'खासदार महाडिक यांना पालकमंत्री आपली मुलगी असं का म्हटले हे कोडं सुटलेलं नाही', असे म्हणत माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी 'मुलीच्या लग्नाला सर्वजण येतील, मंगलाष्टका म्हणतील' असा विश्वास व्यक्त केला. 'खासदार महाडिकांविरोधात जे नाराज असतील त्यांनी स्वत:ला दुरुस्त करून घ्यावे. महाडिकांची झोळी मोठी आहे. आपण अनेकांना निवडून आणले आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत खासदार महाडिक उच्चांकी मतांनी निवडून येतील' असा विश्वास व्यक्त केला.

'मुलगी नाराज असली तरी तिला इम्पाला कार देऊन तिच्यावर प्रेम करू,' या पालकमंत्र्यांच्या वक्तव्याचा आधार घेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, 'मुलगी चांगली असल्याने अनेकांना मिरविण्याची इच्छा होत आहे, पण मुलीच्या माहेरच्या माणसाचे मन मोठे आहे. आजकाल मुलीच्या आया वेगळं राहण्याचा सल्ला देतात, पण आमच्या साध्याभोळ्या मुलगीला इम्पाला दिली नसली तरम्ती आनंदाने आमच्या बैलगाडीत बसेल. तिला इम्पालापेक्षा बैलगाडी मोठी वाटते.'

कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रदेशाध्यक्ष पाटील अनुपस्थित होते, तर पालकमंत्री पाटील हजर होते. यावर खुलासा करताना खासदार महाडिक म्हणाले, 'व्यासपीठावर भाजपची माणसे दिसतात म्हणून गैरसमज करू नये. जयंत पाटील व हसन मुश्रीफ मतदारसंघातील कार्यक्रमात गुंतले असल्याने वेळाने येणार आहेत'. खासदारांनी खुलासा केला असली तरी राष्ट्रवादीच्या जिल्हा महिला अध्यक्षा संगीता खाडे यांच्या व्यतिरिक्त पक्षाचा एकही नेता कार्यक्रमाला उपस्थित नव्हता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोखंड बाजारावर हातोडा

$
0
0

म टा. इम्पॅक्ट

कोल्हापूर टाइम्स टीम

शहर वाहतूक नियंत्रण शाखा आणि महानगरपालिकेने धडक कारवाई करत स्क्रॅप गाड्या हटवल्याने लक्ष्मीपुरीतील ८० फूट रुंदीचा जुना लोखंड बाजार रस्ता मोकळा झाला. प्रशासनाच्या कारवाईने विद्यार्थी, शिक्षक, वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.

लक्ष्मीपुरीतील धान्य बाजार विक्रम नगरातील बाजार समितीच्या नवीन बाजारात हलवल्याने अवजड वाहनांची वाहतूक थांबली आहे. धान्य बाजाराच्या रस्त्याने मोकळा श्वास घेतला असताना दुसरीकडे जुन्या लोखंड बाजारचा रस्ता स्क्रॅप व बंद पडलेल्या वाहनांनी अडवला होता. महाराष्ट्र टाइम्सने गुरुवारच्या (ता. २४) अंकात या समस्येकडे लक्ष वेधल्यावर पोलिस व महानगरपालिका प्रशासन जागे झाले. गुरुवारी व शुक्रवारी परिसरातील स्क्रॅप व बंद वाहने हटवण्याच्या कामाला वेग आला.

शहर वाहतूक नियंत्रण शाखेने थेट रस्त्यांवर बंद वाहने लावणाऱ्या दुकानदारांना नोटिसा पाठवल्या. तसेच वाहने जप्त करण्याचा इशारा दिला. त्यानंतर स्क्रॅप दुकानदारांनी बंद पडलेली वाहने स्वत:हून हलवली. तसेच रस्त्यांवर मांडलेले सुटे भाग पोलिसांनी जप्त करण्याचा इशारा दिल्यावर दुकानदारांनी काढून घेतले. स्क्रॅप झालेल्या दुचाकीही ताबडतोब हटवण्यात आल्या. या रस्त्यांवरील पन्नासहून अधिक बंद पडलेल्या चारचाकी वाहने व २५ हून अधिक दुचाकी हलवण्यात आल्या.

ज्यांनी वाहने हटवण्यात असहकार्य केले त्यांची वाहने वाहतूक शाखेचे निरीक्षक अनिल गुजर यांनी महानगरपालिकेची क्रेन मागवून हटवली. त्यामुळे परिसरातील प्रादेशिक साखर सहनिंबधक कार्यालय, विक्रमसिंह घाटगे सहकारी बँक, श्रमिक कार्यालय, हरिहर विद्यालय, जैन श्राविका श्रम आदी संस्था यांनी मोकळा श्वास घेतला. तसेच थेट रस्त्यांवर वाहने स्क्रॅप करू नये, अशी नोटीसही स्क्रॅप मर्चंटना बजावली जाणार आहे. स्क्रॅप मार्केट गाडी अड्ड्याजवळ हलवण्यात आल्याने इथली दुकानेही नागरी वस्तीतून हलवावीत अशी मागणीही जोर धरू लागली आहे. स्क्रॅपविक्रेते थेट रस्त्यांवरच वाहने तोडत असल्याने काचा, खिळे, नटबोल्ड उडून किरकोळ जखमी होण्याचे प्रमाण वाढले आहे. महानगरपालिकेने दुकानदारावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

लक्ष्मीपुरी धान्य बाजार आणि जुन्या लोखंड बाजारावर कारवाई केल्याने दोन्ही मोठे रस्ते वाहतुकीसाठी मोकळे झाले आहेत. लक्ष्मीपुरी धान्य बाजारातील वाहने पार्किंगसाठी व्यापाऱ्यांनी लावलेले दगडही पोलिसांनी बाजूला काढले आहेत. अवजड वाहनावरील बंदी आणि स्क्रॅप वाहनांवरील कारवाईने परिसरातील वाहतूक सुरळीत झाल्याने उमा टॉकिज ते फोर्ड कॉर्नर रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत झाली आहे.

हरिहर विद्यालयाजवळ महानगरपालिकेने दिव्यांगासाठी केबिन लावल्या आहेत. या ठिकाणी व्यवसाय होत नसल्याने त्या केबिन मोक्याच्या ठिकाणी लावाव्यात अशी मागणी होत आहे. महानगरपालिकेने कॉमर्सच्या संरक्षक भिंतीजवळ या केबिन लावल्यास त्यांना व्यवसाय व रोजगार उपलब्ध होऊ शकतो.

गणी आजरेकर, चेअरमन मुस्लिम बोर्डिंग

गेली अनेक वर्षे लोखंड बाजारामुळे नागरिक व पादचाऱ्यांना चालताना त्रास होत होता. पोलिस व महानगरपालिकेने कारवाई केल्याने रस्ता मोठा झाला आहे. अवजड वाहनांची बंदी आणल्याने धोका कमी झाला आहे.

पंकज पाटील, लक्ष्मीपुरी

जुन्या लोखंड बाजारातील वाहने हटवल्याने रस्ता मोठा झाला आहे. पण ज्या ठिकाणी वाहने पार्क केली होती तिथे कचरा व खरमाती साचली आहे. महानगरपालिकेने परिसरात स्वच्छता मोहीम राबवल्यास रस्त्याच्या दोन्ही बाजूने पादचाऱ्यांना चालण्याची सोय होईल.

एम. डी. मुळे, लक्ष्मीपुरी

रस्त्यांवरील काचा व खिळे विद्यार्थ्यांच्या पायात घुसण्याचे प्रकार सातत्याने घडतात. महानगरपालिका व पोलिसांनी रस्त्यांवर वाहने स्क्रॅप करण्यास बंदी आणावी. त्याचा परिणाम विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांना होत आहे.

रझाक मोमीन, भोई गल्ली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


करिअरविषयक कार्यशाळा

$
0
0

कोल्हापूर: येथील डी. डी. शिंदे सरकार कॉलेजमध्ये 'करिअर व आत्मविश्वास निर्मिती' या विषयावर कार्यशाळा झाली. संस्थेचे अध्यक्ष चारुदत्त शिंदे यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन झाले. स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शक जॉर्ज क्रूझ, शिवाजी निमट यांनी करिअर निवडीच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले. प्राचार्य पी. आर. शेवाळे यांनी प्रास्ताविक केले. कल्याणी मिरजकर, नेहा पाचंगे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. विजय पाटील यांनी आभार मानले.़

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाहू स्टेडियमप्रश्नी आज पालकमंत्र्याशी भेट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

श्री छत्रपती शाहू स्टेडियमच्या प्रश्नांवर शहरातील तालमी, मंडळे आणि क्रीडासंस्थांचे प्रतिनिधी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची शनिवारी (२६) त्यांच्या निवासस्थानी भेट घेणार आहेत. दरम्यान, शाहू स्टेडियम सरकारच्या ताब्यात घ्यावे यासाठी पुढाकार घेणाऱ्या प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांचा जुना बुधवार पेठ, उत्तरेश्वर पेठेसह शहरातील बारा फुटबॉल संघांनी निषेध केला आहे.

जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी शाहू स्टेडियम सरकारी मालकीचे केले आहे. या निर्णयाविरोधात शहरातील क्रीडाक्षेत्रात संतापाची लाट उसळली आहे. पालकमंत्री पाटील हे क्रीडाप्रेमी असून त्यांनी त्रुटी दुरुस्त करुन शाहू स्टेडियमवर पूर्वतत केएसएच्या मालकीचे करावे, अशी मागणी जुना बुधवार पेठेने एका पत्रकाद्वारे केली आहे. सरकारी नियंत्रणाखाली शिवाजी स्टेडियमची देखभाल होत नसताना नामवंत खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी व स्थानिक खेळाडूंना खेळण्यास संधी देणारे शाहू स्टेडियम नष्ट करण्याचा मोठा कट रचला जात आहे, असा आरोप पत्रकात करण्यात आला आहे. पत्रकावर माजी उपमहापौर दिगंबर फराकटे, माजी नगरसेवक धनंजय सावंत यांच्या सह्या आहेत.

उत्तरेश्वर प्रासादिक तालमीच्यावतीने जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाचा निषेध करण्यात आला. शाहू स्टेडियम सरकारी मालकीचे करण्याच्या निर्णयाला स्थगिती द्यावी, तसेच तक्रारदारांच्या संपत्तीची चौकशी करावी, अशी मागणी केली. बैठकीला अमित बाबर, दीपक घोडके, अर्जुन मोहिते, स्वप्नील जाधव, अविनाश पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते. कोल्हापूरच्या विकासात अडथळा आणणाऱ्या वृत्तीचा शहरातील प्रॅक्टिस, पाटाकडील, बालगोपाल, शिवाजी, फुलेवाडी, दिलबहार, खंडोबा, संयुक्त जुना बुधवार पेठ, ऋणमुक्तेश्वर, मंगळवार पेठ, उत्तरेश्वर, संध्यामठ तरुण मंडळ आदींनी एका पत्रकाद्वारे निषेध केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्योजक मदन नाईक यांचा खून

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, हातकणंगले

कोल्हापुरातील ज्येष्ठ उद्योजक आणि मालवाहतूक व्यावसायिक मदन वसंतराव नाईक (वय ६९, रा.शाहूपुरी) यांचा रेंदाळ-कारदगा रस्त्यावर कारदग्याजवळ निर्घृण खून करण्यात आला. नाईक यांचे हातपाय बांधून डोक्यात वर्मी घाव घालून खून करण्यात आला. त्यानंतर मृतदेह उसाच्या शेतात टाकला. ही घटना शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास उघडकीस आली. नाईक गेल्या दोन दिवसांपासून रेंदाळ येथून बेपत्ता होते. घटनेची नोंद सदलगा पोलिस ठाण्यात झाली आहे.

कोल्हापूर चेंबर्स ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष आणि प्रसिद्ध उद्योजक दिवंगत वसंतराव गोपाळ नाईक यांचे ते जेष्ठ पुत्र तर 'स्वामी'कार रणजीत देसाई यांचे जावई व लेखिका पारुताई नाईक यांचे ते पती होत.

नाईक यांचे मूळ गाव रेंदाळ आहे. त्यांची येथे सुमारे अकरा एकर शेती आहे. दोन दिवसांपूर्वी ते कोल्हापुरातून रेंदाळला आले होते. त्या दिवसापासून ते बेपत्ता होते. त्यांचा मोबाइल आणि कार शेतातील घरात असल्याने त्यांच्या वाटेकऱ्यांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु ते सापडले नाहीत. शुक्रवारी सकाळी रेंदाळपासून पाच ते सहा किलोमीटरवरील कारदगा रस्त्यावर संतोष बजंत्री यांच्या उसाच्या शेतात एक अनोळखी मृतदेह काहींनी पाहिला. हातपाय बांधलेल्या अवस्थेत मृतदेह पडल्याचे काही नागरिकांनी पाहिले. त्यांनी तत्काळ सदलगा पोलिसांना माहिती दिली.

सदलग्याचे पोलिस निरीक्षक संगमेश दिडगिनहाळ यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. निपाणी ग्रामीण रुग्णालयात नाईक यांच्या मृतदेहाचे विच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. या घटनेने हुपरी परिसरात खळबळ उडाली आहे. मृत नाईक यांचे शाहूपुरीत शिवशाहू ट्रान्सपोर्ट नावाने व्यवसाय आहे. हा व्यवसाय त्यांची मुले सांभाळतात. नाईक रेंदाळमधील शेती पाहत असत.

०००

न्यू इंग्लिश स्कूल उभारणीत मोठे योगदान

दिवंगत वसंतराव नाईक यांच्यानंतर मदन नाईक रेंदाळच्या स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या बांधकाम कमिटीवर सल्लागार होते. शाळेच्या उभारणीत नाईक कुटुंबीयांचे मोठे योगदान आहे.

० ००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ओबीसींची २५ ला विधानभवनावर धडक

$
0
0

फोटो आहे...

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'भाजप सरकारने ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावण्याचा निर्णय घेतला. त्याला विरोध करण्यासाठी राजर्षी शाहूंच्या आरक्षण भूमीतून प्रेरणा घेऊन लढ्याचे रणशिंग फुकले आहे. २५ फेब्रुवारीला आझाद मैदान येथून विधानभवनावर धडकणारा ओबीसींचा मोर्चा सरकार घास घेईल,' असे मत ओबीसी समाजाचे नेते माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी व्यक्त केले. ओबीसी, भटके विमुक्तांच्या एल्गार मोर्चानंतर महावीर कॉलेज येथील विद्यानंद संस्कृती भवनात झालेल्या एल्गार जनजागरण परिषदेत ते बोलत होते.

यावेळी आमदार हरिभाऊ राठोड प्रमुख उपस्थिती होते. शेंडगे म्हणाले, 'मराठा आरक्षण जाहीर करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा ईएसबीसीमध्ये समावेश केला. या निर्णयामुळे ओबीसी समाजावर अन्याय होणार असल्याने त्याला सर्वप्रथम विरोध केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत याबाबत माहिती दिल्यानंतर सर्वांनी पाठिंबा व्यक्त केला. मात्र, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी त्याचे समर्थन केले. सरकार आणि विरोधी पक्षाने हातमिळवणी करत ओबीसी आरक्षणाला धक्का दिला आहे. या निर्णयाला विरोध करताना सर्व ओबीसींचा लढा सरकारचा घास घेईल.'

आमदार हरिभाऊ राठोडे म्हणाले, '११७ वर्षांपूर्वी राजर्षी शाहूंनी आरक्षणाचा निर्णय घेतला. त्यानंतर मंडल आयोगाने ओबीसींना केंद्रात २७ टक्के आरक्षणाची तरतूद केली, पण या आरक्षणाचा ओबीसी समाजाला फायदा झाला का?, आरक्षण ओबीसी समाजाला तरी समजले का? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कलम १६.४ मध्ये बारा बलुतेदारांना स्वतंत्र आरक्षणाची तरतूद केली. त्यानंतर रेणके, इदाते व रोहिणी आयोगाची स्थापनी केली. पण अद्याप या आयोगाच्या अहवालाची अंमलबजावणी झालेली नाही. रोहिणी आयोगाच्या अहवालाची अंमलबजावणी करण्याबरोबर ज्या समाजाची लोकसंख्या ५२ टक्के आहे, त्या समाजाला ५२ टक्के आरक्षण दिले पाहिजे. त्यासाठी एल्गार मोर्चा आणि परिषदेचे आयोजन केले असून त्याची सुरुवात कोल्हापुरातून झाली आहे.'

तत्पूर्वी बिंदू चौक येथून मोर्चाला सुरुवात झाली. बिंदू चौक, आईसाहेब महाराज पुतळा, दसरा चौकमार्गे मोर्चा विद्यानंतर संस्कृती भवन येथे दाखल झाला. धनगरी ढोलांसह मोर्चाच्या अग्रभागी नंदीबैल सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. त्यानंतर परिषदेला सुरुवात झाली. परिषदेत अरुण खरमाटे, नागोजीराव पांचाळ, जे. के. माळी, कल्याण दळे, अर्चना सुतार, एम. के. बाणारकर, कलाप्पा गावडे, चंद्रकांत बावकर, रफीक कुरेशी, आदींनी यांनी मनोगतातून ओबीसी, भटक्या विमुक्तांच्या लढ्याबाबत भूमिका मांडली. प्राचार्य शिवाजीराव माळकर यांनी स्वागत केले. प्रा. दिगंबर लोहार यांनी प्रास्ताविक केले. ज्ञानेश्वर सुतार यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

००००

परिषदेतील ठराव...

मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करू नये

जातनिहाय जनगणना करावी

रोहिणी आयोगाची अंमलबाज‌वणी त्वरित करावी

बारा बलुतेदारांना स्वतंत्र आरक्षण मिळावे

फुले दाम्पत्यास भारतरत्न पुरस्कार द्यावा

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सभापती निवडीची फक्त औपचारिकता?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्या स्थायी समिती आणि महिला बालकल्याण समितीच्या सभापती निवडीची केवळ औपचारिकता शिल्लक उरली आहे. मंगळवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या निवडणुकीत सभारतीपदी शारंगधर देशमुख यांची निवड निश्चित आहे. यासह महिला व बालकल्याण समितीच्या सभापतिपदी अनुराधा खेडकर, गांधी मैदान विभागीय कार्यालय सभापतिपदी रिना कांबळे यांची निवड निश्चित मानली जात आहे. पिठासन अधिकारी अमन मित्तल यांच्या अध्यक्षस्थेखाली निवडी होतील.

सभापतिपदासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी सत्तारुढ आघाडीकडून शारंगधर देशमुख तर भाजप-ताराराणी आघाडीकडून राजाराम गायकवाड यांनी अर्ज दाखल केला आहे. महिला बालकल्याण समितीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनुराधा खेडकर तर विरोधी आघाडीकडून अश्विनी बारामते यांचा अर्ज आहे. विभागीय कार्यालय सभापतिपदासाठी रिना कांबळे यांचा एकमेव अर्ज आहे.

स्थायी व महिला बालकल्याण समितीमधील सत्तारुढ काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे संख्याबळ पाहता देशमुख व खेडकर यांची निवड निश्चित मानली जाते. तर कांबळे यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची निवड बिनविरोध होईल. गेल्यावर्षी झालेली सभापतीनिवड पाहता यंदा विरोधी आघाडीने फारशी जुळवाजुळव न केल्याने निवड एकतर्फी होण्याची अटकळ बांधली जात आहे. मात्र, नेहमी धक्कातंत्र देण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या भाजप-ताराराणी आघाडीकडून निवडीवेळी पत्ते खुले होण्याची शक्यता महापालिका वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images