Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

शहरात आज, उद्याअपुरा पाणीपुरवठा

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीची गळती काढण्याचे मंगळवारी रात्री काम पूर्ण झाले. मात्र त्याचवेली बालिंगा पंपिंग हाऊस येथील एका विद्युत पंपांत बिघाड झाल्याने शहराला गुरुवारी आणि शुक्रवारी अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. पंप दुरुस्तीचे काम गुरुवारपर्यंत सुरू राहणार आहे.

बालिंगा पंपिंग हाऊस व पाटणकर हायस्कूल येथील जलवाहिनीचे दुरुस्तीचे काम सोमवारपासून सुरू होते. दुरुस्तीमुळे निम्म्या शहराला टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होता. त्यामुळे पाणी न आलेल्या भागात नागरिकांची टँकरभोवती झुंबड उडत होती. मंगळवारी रात्री दुरुस्तीचे काम पूर्ण होऊन वितरण टाकी भरून घेतल्या जात त्यामुळे बुधवारी पाणीपुरवठा सुरळीत होईल, अशी शक्यता होती. मात्र बुधवारी पहाटे बालिंगा पंपिंग हाऊस येथील चारपैकी एका विद्युत पंपांत विद्युत प्रवाह वाढल्याने बिघाड झाला. त्यामुळे वितरण टाक्या केवळ तीन पंपिंगद्वारे भरून घेतल्या जात आहे. दुरुस्तीचे काम दिवसभरात पूर्ण होणार नसल्याने गुरुवारी व शुक्रवारी निम्म्या शहरात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. परिणामी नागरिकांना टँकरद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर अवलंबून राहावे लागेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


डी. डी. शिंदे सरकार कॉलेजमध्ये बक्षीस वितरण

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

'शिक्षण घेताना हार जीत असतेच, पण निराश न होता पुन्हा जोमाने प्रयत्न करून यशापर्यंत पोहचले पाहिजे. सुप्त गुणांचा विकास करुन स्वत:ला ओळखून प्रगती साधली पाहिजे.'असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी केले.

येथील डी. डी. शिंदे सरकार कॉलेजतर्फे आयोजित बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष चारुदत्त शिंदे यांच्या हस्ते प्रमुख काकडे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. प्रारंभी माजी प्राचार्य आबासाहेब शिंदे यांच्या प्रतिमेस प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.

कॉलेजचे प्राचार्य डॉ. पी. आर. शेवाळे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. ए. बी. पाटील यांनी वार्षिक अहवाल वाचन केले. कल्याणी मिरजकर, नेहा पाचंगे, स्वप्नाली पाटील यांनी सूत्रसंचालन केले. स्नेहा कुलकर्णी यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संजय गांधी योजनेतील लाभार्थ्यांना घरपोच पेन्शन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील पात्र वयोवृद्ध व अपंग लाभार्थ्यांना होणारा मानसिक, शारीरिक आणि आर्थिक त्रास पाहता आमदार सुरेश हाळवणकर यांच्या प्रयत्नाने इंडियन पोस्टल पे बँकेच्या माध्यमातून घरपोच पेन्शन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात सहाशे लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे.

पात्र लाभार्थ्यांना घरपोच पेन्शन देण्याची तयारी इंडियन पोस्टल पे बँकेने दर्शविली असून, या शासकीय बँकेचे अधिकारी लाभार्थ्यांच्या घरी जाऊन खाते उघडण्यास सहकार्य करतील आणि दर महिन्याला जमा होणारी पेन्शन लाभार्थ्याला घरपोच मिळणार आहे. त्यामुळे वृद्ध व अपंग लाभार्थ्यांना होणारा त्रास थांबणार आहे.

इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील अपंग, वृद्ध, निराधार प्रवर्गातील पात्र सहाशे लाभार्थी प्रकरणांना समितीचे अध्यक्ष विलास रानडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मंजुरी दिली आहे. परंतु या लाभार्थ्यांना पेन्शन मिळण्यामध्ये अनेक अडचणी येत होत्या. या संदर्भात समितीच्या वतीने ही बाब आमदार हाळवणकर, प्रांताधिकारी समीर शिंगटे आणि तहसीलदार सुधाकर भोसले यांच्या निदर्शनास आणून दिली.

आमदार हाळवणकर यांनी याप्रश्‍नी लक्ष घालून इंडियन पोस्टल पे बँकेतर्फे अशा लाभार्थ्यांना घरपोच पेन्शन मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला. त्याला यश येवून बँकेने तयारी दर्शवली आहे. या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सुकन्या’ योजनेत कोल्हापूर अव्वल

$
0
0

लोगो : राष्ट्रीय बालिका दिन विशेष

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मुलींचे शिक्षण व उज्ज्वल भवितव्यासाठी केंद्र सरकारने 'बेटी बचाओ, बेढी पढाओ' अभियान सुरू केले. या अभियानाचा एक भाग म्हणून पोस्ट विभागातर्फे सुकन्या समृद्धी ठेव योजना राबविण्यात आली. या योजनेतील गुंतवणुकीत कोल्हापूर जिल्हा राज्यामध्ये अव्वल स्थानावर आहे. गेल्या तीन वर्षात योजनेंतर्गत ६४ हजार ७०२ खाती उघडण्यात आली आहेत. गेल्या तीन वर्षांत योजनेत २ कोटी ३५ लाख ८१ हजार ८९२ रुपयांची गुंतवणूक झाली आहे.

सुकन्या समृद्धी ठेव योजनेला जानेवारी २०१५ मध्ये सुरुवात झाली. ज्या मुलींची उच्च शिक्षण घेण्याची इच्छा आहे, मात्र पैशाअभावी अडचणी येतात, त्या दूर व्हाव्यात असा योजनेचा उद्देश आहे. योजनेत मुलीच्या जन्मापासून दहाव्या वर्षापर्यंत गुंतवणूक करता येते. एका आर्थिक वर्षात किमान १००० ते कमाल दीड लाख रुपये गुंतवणुकीची सुविधा आहे. वयाच्या १८ व्या वर्षी उच्च शिक्षणासाठी ५० टक्के तर शिल्लक रक्कम मुलीच्या लग्नावेळी अथवा वयाच्या २१ वर्षानंतर काढता येतात. कोल्हापूर डाकघर विभागाने योजनेची सुरुवातीपासून प्रभावी अंमलबजावणी केली आहे.

याबाबत कोल्हापूर डाकघर विभागाचे सहायक अधीक्षक एन. टी. कुरळपकर म्हणाले, 'योजना अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न केले. जिल्हा परिषदेकडून शून्य ते दहा वर्षांच्या आतील मुलींची यादी घेतली. शहरातील ९६ व ग्रामीण भागात ४६७ अशी एकूण ५६३ पोस्ट कार्यालये जिल्ह्यात आहेत. कार्यालयातील कर्मचाऱ्यांमार्फत योजनेची माहिती लोकांपर्यंत पोहचवली. त्यामुळेच योजनेत कोल्हापूर डाकघर विभाग राज्यात प्रथम क्रमांकावर पोहोचला आहे.'

योजनेची वैशिष्ट्ये

- मुलीच्या जन्मापासून वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत गुंतवणुकीची सोय

- मुलीला १८ व्या वर्षी आणि २१ व्या वर्षी पैसे मिळणार

- खाते सुरू केल्यानंतर सलग १४ वर्षे पैसे भरावे लागणार

- आर्थिक वर्षात १००० ते दीड लाखांची गुंतवणूक शक्य

- खातेदारांना आयकर सवलत

कोल्हापूर विभागाची भरारी

उपविभाग खाती

गारगोटी १०४६५

कागल ०७३९३

गडहिंग्लज ०८१९०

कोल्हापूर पश्चिम १२०६०

कोल्हापूर उत्तर १३४७४

इचलकरंजी १३१२०

दरवर्षी खात्यांमध्ये वाढ

२०१५ ३५९४४

२०१६ ४७७४४

२०१७ ५६४६३

२०१८ ६४७०२

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शंकरराव तोरस्कर यांना आज अभिवादन

$
0
0

कोल्हापूर : संयुक्त महाराष्ट्र लढ्यातमध्ये शंकरराव दत्तात्रय तोरस्कर हौतात्म मिळाले. त्यांच्या हौतात्म्याला शुक्रवारी ६२ वर्षे पूर्ण होत आहे. त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी बिंदू चौक येथून शुक्रवारी (ता. २५) स्मृतीज्योत काढण्यात येणार आहे. अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांच्या हस्ते स्मृतिज्योत प्रज्वलीत करण्यात येईल. त्यांच्या प्रतिमेस महापौर सरिता मोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. यावेळी उपमहापौर भूपाल शेटे, आमदार राजेश क्षीरसगार, मधुरिमाराजे छत्रपती, अफजल पिरजादे, भाजप शहराध्यक्ष संदीप देसाई, दिनकरराव तोरस्कर, आनंदराव तोरस्कर, विलासराव तोरस्कर आदी उपस्थित राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘उमेदवारीचा निर्णय सर्व्स्वी पक्षच घेईल’

$
0
0

प्रतीक पाटील यांचा फोटो वापरणे....

म. टा. वृत्तसेवा, सांगली

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची स्थिती अतिशय उत्तम आहे. पक्ष मलाच उमेदवारी देईल असे म्हणता येणार नाही. कोणाला उमेदवारी द्यायची हा सर्वस्वी पक्षाचा निर्णय असेल, असे सांगत माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनी भाजप खासदार संजय पाटीलही काँग्रेसकडून इच्छुक असल्याची चर्चा कानावर आल्याचे सांगून टाकले.

एका कार्यक्रमाच्या निमित्ताने तासगावमध्ये आले असता प्रतीक पाटील यांना बुधवारी पत्रकारांनी गाठले. सध्या काँग्रेसची काय स्थिती आहे? असे पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले की, काँग्रेसची स्थिती उत्तम आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत पक्षाचा उमेदवार निश्चितपणे विजयी होईल. पक्षाकडून तुमची उमेदवारी फिक्स असेल असे पत्रकारांनी विचारताच ते म्हणाले, उमेदवारीबाबतचा निर्णय पक्षाचा आहे. पक्ष कोणाला उमेदवारी देईल तो उमेदवार निवडणुकीत विजयी होईल. याआधी पक्षाने मला दोनवेळा संधी दिली होती. खासदार आणि मंत्री म्हणून जिल्ह्यासाठी खूप भरीव काम केली आहे. गेल्या निवडणुकीत खासदार संजय पाटील यांचा विजय मोदी लाटेमुळे झाला.' संजय पाटील यांची उमेदवारी भाजपकडून फिक्स आहे, असे पत्रकारांनी सांगताच पाटील म्हणाले, 'तो त्यांच्या पक्षीय पातळीवरचा विषय आहे, पण त्यांनी काँग्रेसकडेही उमेदवारीची अपेक्षा धरल्याची चर्चा कानावर आली आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विवाहितेची आत्महत्या

$
0
0

गगनबावडा : आसगाव (ता. पन्हाळा) येथील अश्विनी मानसिंग भोसले (वय ३२) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी (ता.२२) रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली. घरातील सर्व मंडळी नातेवाइकांच्या उत्तरकार्याला गेले असता अश्विनीने लोखंडी हुकाला साडीने गळफास घेतला. पती मानसिंग भोसले घरी आले असता हा प्रकार लक्षात आला. त्यांनी कळे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. अश्विनीच्या पश्चात पती, मुलगी, मुलगा, सासू-सासरे असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ठेकेदार, कन्सल्टंटना तंबी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'वेळेत कामाची जबाबदारी ठेकेदार व कन्सलटंट कंपनीची आहे. मात्र, तुम्ही जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करीत आहात. त्यामुळे यापुढील कालावधीत दिरंगाईची कारणे सांगू नका. १५ मेपर्यंत जॅकवेलचे काम धरणातील पाणीपातळीपर्यंत न आल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील' असा दम आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी ठेकेदार व कन्सलटंट कंपनीला बुधवारी दिला. उपमहापौर भूपाल शेटे यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीच्या सभागृहात काळम्मावाडी थेट पाइपलाइन योजनेच्या सुकाणू समितीच्या बैठकीत ते बोलत होते. २०१७ नंतर प्रथम सुकाणू समितीची बैठक झाली.

बैठकीत जलअभियंता सुरेश कुलकर्णी यांनी योजनेचा आढावा घेतला. पुईखडी जलशुद्धीकरणाचे ७६ टक्के काम पूर्ण झाले असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी योजनेची अपूर्ण कामे कशी पूर्ण करणार याबाबत आराखडा सांगण्याची सूचना उपस्थितांनी केली. योजनेच्या आढावा घेताना ठेकेदार आणि कन्सल्टंट कंपनीकडून समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने आयुक्त संतप्त झाले. जॅकवेलचे काम १५ मेपर्यंत पूर्ण झाले पाहिजे. कामात हलगर्जीपणा झाल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील.'

ठेकेदार कंपनीच्यावतीने राजेंद्र माळी म्हणाले, 'जॅकवेलचे काम सुरू करण्यासाठी पाच विद्युतपंपांच्या मदतीने पाणीपातळी कमी केली जात आहे. १५ फेब्रुवारीपर्यंत काम सुरू करण्यासाठी आणखी तीन पंप वाढविण्यात येतील. दिवसाला दीड मीटर पाणीपातळी कमी होत आहे. मात्र, वन्यजीव क्षेत्रात रात्री आठ ते सकाळी नऊ वाजेपर्यंत काम करू दिले जात नाही. काही एनजीओ संस्थांनी तक्रारी केल्याने कर्मचाऱ्यांत भीतीचे वातावरण आहे.'

कन्सलटंट राजेंद्र आसबे म्हणाले, 'सद्यस्थितीत धरणात ६४६ मीटर पाणीसाठा आहे. जॅकवेलचे तीन मीटरचे काम शिल्लक असून काम सुरू करण्यास पाणीपातळी ६०३ मीटरपर्यंत कमी होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी कृती आराखडा तयार आहे.'

प्रा. जयंत पाटील म्हणाले, '१५ फेब्रुवारीपर्यंत पाणीपातळी कमी झाल्यास काम करण्यासाठी तीन महिन्यांचा अवधी मिळेल. पाणी काढण्यास विलंब झाल्यास पुन्हा जानेवारी २०२०पर्यंत वाट पाहावी लागेल. त्यासाठी धरणातील विसर्ग वाढवावा.'

योजनेचे समन्वयक भास्कर कुंभार यांनी राधानगरी व तुळशी धरणातील पाण्याचा विसर्ग कमी करून काळम्मावाडी धरणातील विसर्ग वाढवण्याबाबत पाटबंधारे विभागाशी पत्रव्यवहार केल्याचे स्पष्ट केले.

भाजपचे नगरसेवक विजय सूर्यवंशी म्हणाले, 'योजनेच्या कामाला चुकीच्या पद्धतीने सुरुवात झाली. परिणामी खर्चात वाढ झाली. भविष्यात योजनेला आणखी निधी लागल्यास त्याची तरतूद कशी करणार? महापालिकेची आर्थिक स्थिती पाहता त्याचे नियोजन करण्याची गरज आहे. दर पंधरवड्याला कामाचा आढावा घ्या.'

बैठकीस माजी महापौर हसिना फरास, काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख उपस्थित होते.

असहकार्याचे अडथळे

बैठकीत विविध सरकारी विभागांकडून योजनेच्या कामांत अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याचे उघड झाले. तर योजनेच्या वाढत चाललेल्या कामांसाठी अतिरिक्त निधीची तरतूद कशी करणार? असा प्रश्न आहे.

डिपॉजिट देऊनही 'महावितरण'कडून दिरंगाई

नरतवडे, राजापूर व ठिकपूर्ली येथे पोल शिप्टिंग करण्यासाठी महापालिकेने 'महावितरण'कडे ६७ लाख रुपये डिपॉजिट भरले आहेत. पण अद्याप शिफ्टिंगच्या कामाला सुरुवात झालेली नाही. सार्वजनिक बांधकाम विभाग व 'महावितरण'मधील समन्वयामुळे काम रखडल्याचे अधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून देताच आयुक्तांनी ठेकेदार, कन्सल्टंट कंपनीसह अधिकाऱ्यांना धारेवर धरले. अधिकाऱ्यांनाही, 'आपल्या बैठकीत यावर सविस्तर बोलू' असे खडे बोल सुनावले. उपमहापौर शेटे यांनी, पोल शिफ्टींगबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महावितरण या दोन्ही कार्यालयांसमोर सर्वपक्षीय आंदोलन करू असे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


राजर्षी शाहू महोत्सव आजपासून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अखिल भारतीय मराठा महासंघ, कोल्हापूर जिल्ह्यातर्फे आयोजित 'राजर्षी शाहू मराठा महोत्सव २०१९'ला गुरुवार (ता.२४) पासून सुरुवात होत आहे. महापौर सरिता मोरे व वीरमाता यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. दसरा चौक येथे आयोजित महोत्सव होत आहे. या ठिकाणी रायगड किल्ल्याच्या महादरवाजाची प्रतिकृती, शिवरायांचा अश्वारूढ पुतळा, शिवकालीन शस्त्र प्रदर्शन हे आकर्षण असणार आहे. व्यवसाय वृद्धीसाठी स्टॉल, ग्रंथ व खाद्यपदार्थांचे स्टॉल, मर्दानी खेळ, शाहिरी गाणी व सांस्कृतिक कार्यक्रमांचाा समावेश आहे.

सकाळी १०.३० वाजता महोत्सवाचे उद्घाटन होईल. दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सकाळी ११ वाजता 'समाजापुढील आव्हाने व भावी संकल्प' या विषयावर परिसंवाद होणार आहे. सातारा येथील चेतना सिन्हा यांचे 'महिला सबलीकरण' विषयावर दुपारी एक वाजता व्याख्यान होईल. बेळगाव येथील राजकुमार पाटील यांचे दुपारी तीन वाजता 'स्पर्धा परीक्षा' मार्गदर्शन होणार आहे. दुपारी चार वाजता मर्दानी खेळ, शाहिरी व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंत मुळीक यांनी केले आहे.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रोडरोमिओच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या

$
0
0

पंढरपूर:

शाळेत एका अनोळखी मुलाने चिठ्ठी दिल्याचा प्रयत्न केल्यानंतर दहावीत शिकणाऱ्या काजल पोरे या मुलीने घरी जाऊन गळफास घेत आत्महत्या केली. मुलीला चिठ्ठी देण्याचा प्रयत्न करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी वाखरी ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली. अखेर पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याबाबत रात्री उशिरा गुन्हा दाखल केला.

वखारी येथील माध्यमिक आश्रमशाळा व कनिष्ठ महाविद्यालयात काजल पोरे ही विद्यार्थीनी दहावीत शिकत होती. दोन दिवसापूर्वी शाळेत असताना तिला एका अज्ञात मुलाने एका लहान मुलाच्या हातून चिठ्ठी देण्याचा प्रयत्न केला होता. ही घटना शाळेतील शिक्षकांनी पाहिल्यावर त्यांनी ती चिठ्ठी ताब्यात घेतली. या चिठ्ठी प्रकरणी काजलच्या पालकांना बुधवारी शाळेत बोलावून त्यांना याची कल्पना दिली होती. शाळा सुटल्यानंतर काजलने घरी आल्यावर स्वत:ला एका खोलीत बंद करून घेतले. काजल दरवाजा उघड नसल्यामुळे तिच्या मोठ्या बहिणीने तातडीने बोलावून घेतले. दरवाजा तोडल्यानंतर काजलने गळफास घेतल्याचे दिसले. कुटुंबीयांनी काजलला ग्रामस्थांच्या मदतीने दवाखान्यात नेले. तिथे मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

गेल्या काही दिवसापासून मुलींच्या छेडछाडीचे प्रकार वाढू लागल्यानंतर पोलिसांच्या दामिनी पथकाची या परिसरात करडी नजर होती. आता काजलच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या रोडरोमिओंचा तपास पोलिसांना करावा लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंचकल्याण महोत्सवास शुक्रवारपासून प्रारंभ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गंगावेशीतील कसबा गेट परिसरातील श्री पार्श्वनाथ दिगंबर मानस्तंभ जिनमंदिरात शुक्रवारपासून (ता. २५) पंचकल्याण प्राणप्रतिष्ठा महामहोत्सव होणार आहे. महोत्सव २९ जानेवारीपर्यंत सुरू राहील. २७ जानेवारी रोजी दुपारी तीन ते सहा या वेळेत श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या उपस्थितीत तीर्थंकर राज्याभिषेक सोहळा होणार आहे.

महामहोत्सवाची तयारी पूर्ण झाली असून बुधवारी तीर्थंकर मातेची ओटी भरणी सोहळा आचार्य पद्मनंदी मुनी महाराजांच्या हस्ते झाला. मंदिराचे सचिव सुरेश मगदूम व डॉ. सम्मेद उपाध्ये यांच्या मार्गदर्शनाखाली महामहोत्सवातील धार्मिक कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.

महोत्सवांतर्गत पाच दिवस सकाळी साडेसात वाजल्यापासून विविध धार्मिक विधी होतील. आचार्य श्री १०८ पद्मनंदीजी मुनिमहाराज यांची ससंघ उपस्थिती असेल. स्वस्तिश्री डॉ. लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामींच्या नेतृत्वाखाली कार्यक्रम होतील. कसबा गेट येथील हे जिनमंदिर ११व्या शतकातील असून, इतिहासात याची नोंद ‘रुपनारायण जिनमंदिर’ अशी आहे. गंडरादित्याचा राजा निंबरसदेव यांनी ही वास्तू बांधली. मंदिराची रचना अर्धमंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी आहे. येथे भगवान पार्श्वनाथ तीर्थंकरांची उभी मूर्ती आहे. मंदिरात ३०० वर्षांपूर्वी सर्वप्रथम मानस्तंभ बांधल्याने मंदिराला ‘मानस्तंभ’ म्हणून ओळखले जाते. या प्राचीन मंदिराचा जीर्णोद्धार करून मूर्तींना वज्रलेप करण्यात आला आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने वज्रलेपित मूर्तींची पुन्हा पंचकल्याण प्राणप्रतिष्ठाही करण्यात येणार आहे.’

यावेळी अध्यक्ष सनतकुमार अथणे, उपाध्यक्ष राजू मिंच, अण्णासाहेब पाटील, अतुल पाटणे, दिलीप इंगळे, विजयराव कोगनोळे, प्रकाश हातगिने आदींनी संयोजन केले आहे.

महामहोत्सवातील कार्यक्रम

शुक्रवार (दि. २५) : इंद्र-इंद्राणी मिरवणूक, ध्वजारोहण, प्रवचन गर्भकल्याण
शनिवार (दि. २६) जन्मकल्याण महोत्सव व संस्कार, पाळणा
रविवार (दि. २७) : राज्याभिषेक, दीक्षाकल्याण संस्कार
सोमवार (दि. २८) : भ. पार्श्वनाथ मूर्ती प्रतिष्ठापना, श्रीविहार रथोत्सव
मंगळवार (दि. २९) : निर्वाण कल्याण महोत्सव, १००८ कलशाभिषेक, पूजा विसर्जन.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवस्मारकाच्या उंचीबाबत अपप्रचार : आमदार विनायक मेटे

$
0
0

कोल्हापूर:

अरबी समुद्रातील शिवस्मारकाची उंची कमी केलेली नाही. काही लोकांकडून उंची कमी केल्याचा अपप्रचार केला जात आहे. चबुतऱ्यासह शिवस्मारकाची उंची २१२ मीटर असेल, अशी माहिती शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी दिली. याशिवाय सुप्रीम कोर्टाने कामास दिलेली तोंडी स्थगिती पंधरा दिवसात उठेल आणि कामाला सुरुवात होईल, असा विश्वास मेटे यांनी व्यक्त केला. ते कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी बोलताना त्यांनी आगामी निवडणुकांबाबत शिवसंग्राम पक्षाची भूमिका मांडली. ते म्हणाले, गेल्या निवडणुकीत शिवसंग्राम पक्ष भाजप-शिवसेना युतीसोबत होता. याहीवेळी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. योग्य जागा मिळाल्यास आम्ही भाजपसोबत निवडणूक लढवू. काँग्रेस किंवा राष्ट्रवादीसोबत जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ९ फेब्रुवारीस औरंगाबाद येथे पक्षाचा निर्धार मेळावा होणार आहे. या मेळाव्यास भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनीही निमंत्रित केले आहे. सुशिक्षित बेरोजगार तरुणांना दरमहा पाच हजार रुपये भत्ता मिळावा, तरुणांना काम मिळावे असा कायदा व्हावा, दुष्काळावर उपाय म्हणून नदीजोड प्रकल्पाची अंमलबजावणी करावी, शेतकरी व शेतमजुरांना पेन्शन मिळावी. पिक विम्याची शंभर टक्के रक्कम सरकारने भरावी, बुलढाणा जिल्ह्याचे नाव बदलून 'राजमाता जिजाऊ नगर' असे करावे, आदी मागण्या मेळाव्यातून केल्या जाणार आहेत, अशी माहिती आमदार मेटे यांनी दिली. यावेळी नगरसेवक महेश सावंत, बाबा महाडिक आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर्किट हाऊस रोडवर फूल टू धमाल फायनल

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

कोल्हापूरकरांनी सलग तीन रविवारी दिलेल्या अभूतपूर्व प्रतिसादानंतर 'महाराष्ट्र टाइम्स'च्या चौथ्या 'हॅपी स्ट्रीट'ची धमाल रविवारी (ता. २७ जानेवारी) सर्किट हाऊस ते सैनिक दरबार हॉल रस्त्यावर अनुभवता येणार आहे. पारंपरिक रस्सीखेच, दोरीवरच्या उड्या या खेळांसह लाठीकाठीची मर्दानी प्रात्यक्षिके, संगीत, नृत्यासह मंचावर विविध कलागुणांचा आविष्कार सादर करण्याची संधी कलाकारांना मिळणार आहे. आबालवृद्धांसह सर्वांना सहकुटुंबांना आनंद लुटण्याची मेजवानी मिळणार आहे. रविवारी सकाळी सात वाजता उपक्रम सुरू होणार आहे.

'महाराष्ट्र टाइम्स'च्यावतीने यापूर्वी हॉकी स्टेडियम रोड, रंकाळा पदपथ आणि सायबर रोडवर झालेल्या हॅपी स्ट्रीटला तरुणाईसह सर्वांचा उदंड प्रतिसाद मिळाला. या उपक्रमाची सांगता सर्किट हाऊस ते महासैनिक दरबार हॉल मार्गावरील कार्यक्रमात होणार आहे. 'हॅपी स्ट्रीट'चे टायटल प्रायोजक फ्रुस्टार.. फ्रूटड्रिंक- संजय घोडावत ग्रुप, पावर्ड बाय स्पॉन्सर दि आयडियल कन्स्ट्रक्शन, ट्रॅव्हल पार्टनर श्री ट्रॅव्हल्स, फिटनेस पार्टनर एफ थ्री जीम, कॅरी बॅग ट्रॅव्हल्स बॅग ऑन रेंट हे आहेत. यावेळी 'सर्वाधिक वेळा रक्तदान करणाऱ्या व्यक्ती, संस्थांसह जीवरक्षकांचा सन्मान करण्यात येणार आहे.

सकाळी सात वाजता सुरू होणाऱ्या हॅपी स्ट्रीटमध्ये चित्रकार, शिल्पकारांकडूनही प्रात्यक्षिके सादर होतील. शिवाय, नकला, नाट्यप्रवेश, शास्त्रीय नृत्य, वादन या कलाप्रकारांचे सादरीकरण होईल. लगोरी, गोट्या, पोत्यात पाय घालून पळणे, दोरीवरील उड्या, टायर पळवणे, रस्सीखेच या खेळांचा आनंद लुटता येणार आहे. यासाठी नावनोंदणी अथवा प्रवेश शुल्क, वयाची अट नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जीवरक्षक कांदळकर, कामत यांचा होणार सन्मान

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

स्वत:चा जीव धोक्यात घालून संकटावेळी, आपत्तीत अडकलेल्या व्यक्तींचा जीव वाचविणाऱ्या अवलियांचा 'महाराष्ट्र टाइम्स'तर्फे रविवारी (दि. २७) शासकीय विश्रामगृह-कसबा बावडा रस्त्यावर आयोजित 'हॅपी स्ट्रीट'वर सन्मान करण्यात येणार आहे. सामाजिक बांधिलकी मानून 'मटा'तर्फे विविध उपक्रम राबवले जातात. याचा एक भाग म्हणून चांगले काम करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी दोन जीवरक्षकांचा सत्कार करण्यात येणार आहे.

महानगरपालिकेच्या अग्निशमन दलात मंदार बाळकृष्ण कांदळकर हे गेल्या सात वर्षापासून फायरमन म्हणून कार्यरत आहेत. २९ नोव्हेंबर २०१८ रोजी कणेरीतील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या जलशुद्धीकरण केंद्राजवळील क्लोरिनच्या टाकीला गळती लागली. परिसरातील रहिवाशांचा श्वास गुदमरू लागला. त्याची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. पथकातील मंदार यांनी जीवाची पर्वा न करता कृत्रिम ऑक्सिजनची नळकांडी लावून गळतीचे नेमके ठिकाण शोधले. उपलब्ध साधनांच्या सहाय्याने गळती बंद केली. जवळ राहणाऱ्या रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलवले. त्यामुळे ७० ते ८० जणांच्या जिविताचा धोका कमी झाला. जीवन प्राधिकरण विभागाच्या कर्मचाऱ्यांचेही प्राण वाचले.

दुसरे प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे शहर वाहतूक शाखेतील शशिकांत कामत. ८ जानेवारी २०१९ रोजी त्यांनी कळंबा फिल्टर हाऊस चौकातील मोटारसायकल घसरून पडलेल्या अनुराधा कुंभार यांना वाचविले. फिल्टर हाउस चौकात त्यादिवशी सकाळी साडेदहा वाजता वाहनांची गर्दी होती. तेथून सायबर कॉलेजकडे जाणाऱ्या चौकात सिग्नलच्या पुढील बाजूस टँकरमधील पाणी रस्त्यावर सांडले होते. परिणामी सिग्नल सुरू झाल्यावर तेथून कुंभार या मोपेडवरून जाण्याचा प्रयत्न करताच मोपेड घसरली. यावेळी कुंभार या रस्त्यावर पडल्या. पाठीमागून येणारा ट्रक त्यांच्या अंगावरून गेला असता. चौकात कार्यरत पोलिस कॉन्स्टेबल कामत यांनी कुंभार यांना मोठ्या कौशल्याने बाजूला घेतले. क्षणार्धात कामत यांनी दाखविलेल्या तत्परतेने कुंभार यांचा जीव वाचला. चौकात कार्यरत असलेले दुसरे पोलिस कॉन्स्टेबल आर. वाय. पाटील यांनीही त्यांना मदत केली होती. अशा सजग जीवरक्षकांचा हॅपी स्ट्रीटवर सन्मान होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोडोलीतील तरुण रशियातील दुर्घटनेत बेपत्ता

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, वारणानगर

रशियाच्या हद्दीतील समुद्रात दोन तेलवाहू जहाजांना लागलेल्या आगीच्या दुर्घटनेवेळी कोडोलीतील तरुण कामगारही बेपत्ता झाला आहे. अक्षय बबन जाधव असे त्याचे नाव आहे. या दुर्घटनेत १४ खलाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. २१ जानेवारीला ही दुर्घटना घडली. यामध्ये चौदाजण बेपत्ता असल्याचे रशियन सरकारने कळविले आहे. यात अक्षयचाही समावेश आहे. अक्षय मुंबईतील एका खासगी कंपनीमार्फत तुर्की मालवाहू जहाजावर नोकरी करीत होता. २५ जानेवारीला करार संपणार असल्याने तो घरी येणार होता. तसा फोनही त्याने गेल्या शुक्रवारी कुटुंबीयांना केला होता. घटना समजल्यानंतर अक्षयचे कुटुंबीय मुंबईला रवाना झाले आहेत. अक्षयचे वडील वारणा दूध संघात नोकरीला आहेत. जाधव कुटुंबीय कोडोलीच्या पांडुरंग तात्या कॉलनीत अनेक वर्षांपासून राहते.

.. .. .. .. .. ..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शाहू स्टेडियमप्रश्नी स्थगिती द्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

छत्रपती शाहू स्टेडियमसह सात एकर ३८ गुंठे जमिनीची मालकी सरकारकडे देण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्थगिती द्यावी, अशी मागणी शिवाजी व मंगळवार पेठेतील आजी-माजी फुटबॉल खेळाडू, संघटनांनी केली आहे. दोन्ही पेठांच्या स्वतंत्र बैठका झाल्या. त्यामध्ये जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार आणि प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेचे दिलीप देसाई यांचा तीव्र निषेध करण्यात आला. या निर्णयाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशाराही खेळाडूंनी दिला आहे.

मंगळवार पेठेतील फुटबॉलप्रेमींची बैठक मिरजकर तिकटी येथील विठ्ठल मंदिर परिसरात बालगोपाल तालीम मंडळाचे अध्यक्ष निवासराव साळोखे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी फुटबॉल खेळाडूंनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. शहरात स्पोर्टस् इंडस्ट्री वाढत असताना त्याला 'खो' घालण्याच्या प्रवृत्तीचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ज्येष्ठ फुटबॉलपटू बबन थोरात यांनी केली. शिवछत्रपती पुरस्कार विजेते हॉकी संघटक कुमार आगळगावकर म्हणाले, 'फुटबॉल, क्रिकेट, हॉकीसह सर्व खेळांची प्रेरणा शाहू स्टेडियम आहे. केएसएकडून स्टेडियमची योग्य देखभाल व फुटबॉलला प्रेरणा देण्याचे काम सुरू असताना जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाने क्रीडाक्षेत्राचे मोठे नुकसान होणार आहे.' माजी महापौर आर.के. पोवार म्हणाले, 'महापालिकेने विशेष सभा बोलावून शाहू स्टेडियम केएसएच्या मालकीचे व्हावे असा ठराव करावा. तसेच पालकमंत्री चंद्रकांत पाटील महसूलमंत्री असल्याने त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाला स्थगिती द्यावी.'

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी, प्रजासत्ताकचे दिलीप देसाई शिवाजी पूल, अंबाबाई मंदिर पुजारी, शाहू स्टेडियमच्या कामात आडवे आल्याची टीका केली. शाहू स्टेडियम कोणत्याही परिस्थितीत सरकार जमा होऊ देणार नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाला पालकमंत्री स्थगिती देतील, असा विश्वासही जाधव यांनी व्यक्त केला. यावेळी बाबा पार्टे, गणी आजरेकर, बाळासाहेब नचिते, एस. वाय. सरनाईक, दत्तात्रय मंडलिक, संभाजीराव मांगोरे-पाटील यांच्यासह आजी-माजी फुटबॉलपटू, पंच, संघटक उपस्थित होते.

शिवाजी पेठेतील फुटबॉल खेळाडूंच्या बैठकीतही जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाचा निषेध करण्यात आला. अध्यक्षीय भाषणात सुजित चव्हाण यांनी, प्रजासत्ताकच्या दिलीप देसाई यांच्या संपत्तीची प्राप्तिकर खात्याने चौकशी करण्याची मागणी केली. यावेळी नगरसेवक अजित ठाणेकर, भाजपचे सरचिटणीस अशोक देसाई यांनी देसाई यांच्यावर टीका केली. गणी आजरेकर यांनी, शाहू स्टेडियम सरकारकडे गेल्यास त्याची अवस्था शिवाजी स्टेडियमसारखी होऊन मैदानाचे रूपांतर पार्किंग स्पॉट होईल, अशी भीती व्यक्त केली.

यावेळी माजी नगरसेवक अजित राऊत, विक्रम जरग, लाला गायकवाड, सुहास साळोखे, सुरेश जरग यांनी शाहू स्टेडियम केएसएच्या मालकीचे राहावे, अशी मागणी केली. यावेळी कॉ. चंद्रकांत यादव, अॅड अशोकराव साळोखे, अजित खराडे, सदाशिव शिर्के यांच्यासह आजी-माजी खेळाडू उपस्थित होते.

००००००

शिवसेनेचाही विरोध

शाहू स्टेडियम सरकारजमा करण्याचा निर्णय रद्द करावा, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली. या निर्णयाने कोल्हापुरात संतापाची लाट उसळली आहे, असा निवेदनात उल्लेख आहे. जिल्हाप्रमुख विजय देवणे, संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.

०००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कळी उमलताना’कार्यक्रम

$
0
0

कोल्हापूर : 'मुलींनी शिक्षण, आरोग्य याकडे लक्ष देवून विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवावे.'असे आवाहन भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक यांनी केले. संस्थेच्यावतीने आयोजित 'कळी उमलताना' या प्रबोधनात्मक कार्यक्रमात त्या बोलत होत्या. मौजे सांगाव येथील स्वातंत्र्यसेनानी शिवाजी नाथाजी पाटील माध्यमिक विद्यालयात कार्यक्रम झाला. डॉ. रुपा कुलकर्णी यांनी किशोरवयीन विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक अशोक पाळेकर, संस्थेच्या समिती सदस्या संगिता पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष वाय. एस. पाटील, दिपाली पाटील, वैशाली पाटील, मनीषा पाटील, सुवर्णा कोळेकर आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हॅपी स्ट्रीटवर होणार रक्तदात्यांचा गौरव

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

रुग्णांना अत्यंत गरजेवेळी लागणाऱ्या रक्ताचा पुरवठा करण्यारे रक्तदाते व रक्तदान शिबिरांचे आयोजन करणाऱ्या संस्थांचा महाराष्ट्र टाइम्सच्या 'हॅपी स्ट्रीट'वर गौरव करण्यात येणार आहे. सरकारी दवाखान्यांमध्ये रुग्णांना रक्तपुरवठा कायम रहावा यासाठी अनेक रक्तदाते आणि खासगी संस्थांचे पदाधिकारी धडपड करीत असतात. त्यांचा सत्कार करुन 'रक्तदान, श्रेष्ठदान' हा संदेश 'हॅपी स्ट्रीट'च्या उपक्रमातून देण्यात येणार आहे.

आनंदा जाधव यांनी

केलेय १०५ वेळा रक्तदान

बालिंगा (ता. करवीर) येथील आनंदा जाधव हे अल्पभूधारक शेतकरी. ते सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. १३ फेब्रुवारी १९८५ मध्ये त्यांच्या बहिणीवर उपचार करताना रक्त मिळाले नाही. यावेळी समाजातील अनेक गरजुंना रक्त मिळवताना किती अडचणी येत असतील, अनेकांचे जीव कसे धोक्यात येत असतील याचा विचार करून जाधव यांनी रक्तदानाचा उपक्रम सुरू केला. मात्र, कोणत्याही राजकीय व्यक्तींच्या वाढदिवसासाठी आयोजित शिबिरांत रक्तदान न करता फक्त 'सीपीआर'मधील गरजू रुग्णांसाठी ते रक्तदान करतात. एका प्रसंगी तर कराड येथील एका महिलेला रक्ताची गरज आहे, याची टीव्हीवरून केलेले आवाहन पाहून त्यांनी तेथे जाऊन रक्तदान केले. या उपचारांनंतर बरी झालेली ती महिला घरी जाण्यापूर्वी जाधव यांना भेटायला कराडहून कोल्हापुरात आली होती. अपघातात जखमी झालेल्या एका पंजाबी सैनिकासाठी जाधव यांनी रक्तदान केल्यानंतर त्याने आपल्या मुलाचे नाव आनंदावरुन आनंदसिंग ठेवले आहे. जाधव यांनी कोल्हापूरसह कऱ्हाड, मिरज येथे गरजूंसाठी रक्तदान केले आहे. आजवर त्यांनी १०५ वेळा रक्तदान केले आहे.

सलग १४ वर्षे रक्तदानाची

'गजराज', 'कल्पवृक्ष'ची पाऊलवाट

व्यसनांच्या आहारी न जात तरुणांनी विधायक पाऊल उचलावे म्हणून सुरू झालेल्या कदमवाडी येथील गजराज मित्र मंडळ आणि कल्पवृक्ष फाउंडेशनच्यावतीने सलग १४ वर्षे रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जाते. सुरुवातीला प्रजासत्ताक दिनी, २६ जानेवारी रोजी शिबिर आयोजित केले जाते. नंतर दरवर्षी मे महिन्यात सीपीआर हॉस्पिटलला रक्ताचा तुटवडा भासत असल्याचे लक्षात आल्याने गेली पाच वर्षे महाराष्ट्र दिनी, १ मे रोजी शिबिरांचे आयोजन केले जाते. शिबिरांत १०० ते १२५ बॅग्ज रक्त जमा होते. शिवाय गणेशोत्सवातही मंडळ रक्तदान शिबिर आयोजित करते. गजराज मित्रमंडळाचे अनुकरण कदमवाडी, भोसलेवाडी, विचारेमाळ परिसरातील मंडळांनी केले आहे. शिबिरांत मंडळाचे कार्यकर्तेच रक्तदान करतात. ज्यावेळी सीपीआर हॉस्पिटलला रक्ताचा तुटवडा भासतो, तेव्हा मंडळाचे कार्यकर्ते ब्लड बँकेत रक्तदान करतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूर एमटीडीसी वाऱ्यावर

$
0
0

राष्ट्रीय पर्यटन दिन विशेष ... लोगो

Sachin.patil1@timesgroup.com

Tweet@sachinpMT

विपुल निसर्गसंपदा असलेला जिल्हा म्हणून कोल्हापूरची ओळख आहे. दरवर्षी चाळीस ते पन्नास लाख पर्यटक कोल्हापूरला आवर्जून भेट देतात. मात्र जिल्ह्याच्या पर्यटनवाढीत महत्त्वाची भूमिका असणाऱ्या महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या केवळ दोन कर्मचाऱ्यांवरच कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याचा भार आहे. महत्वाचे निर्णय घेण्यासाठी सक्षम अधिकारी नसल्याने जिल्ह्याच्या पर्यटनाला 'खो' बसत आहे. अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे शहरातील दोन ठिकाणी असलेल्या माहिती व आरक्षण केंद्रापैकी एक केंद्र वारंवार बंद ठेवावे लागते. अधिकारी व कर्मचारी संख्या वाढवून पर्यटकांना दर्जेदार सुविधा देण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

कोल्हापूरला ऐतिहासिक आणि धार्मिक परंपरा आहे. त्यामुळे जिल्ह्याला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविक उपस्थिती लावतात. ऐतिहासिक पुरातत्वीय महत्त्व असणाऱ्या जिल्ह्याच्या पर्यटनाची माहिती पर्यटकांपर्यंत पोचवण्याची जबाबदारी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळावर असते. मात्र पर्यटन विकास महामंडळाचे विभागीय कार्यालय शहरात नसल्याने केवळ दोन कर्मचाऱ्यांच्यावर कार्यालयाच्यावतीने पर्यटनवाढीचे काम केले जाते. यामध्ये अंबाबाई मंदिराजवळ दक्षिण दरवाजाजवळ व जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील उद्योग भवन येथे माहिती व आरक्षण केंद्र उपलब्ध आहे. तसेच या कर्मचाऱ्यारवर सांगली जिल्ह्याचा अतिरिक्त भार सोपवण्यात आला आहे. त्यामुळे बऱ्याचदा उद्योग भवनातील कार्यालय बंद अवस्थेत असल्याचे आढळते

शहरासह सांगली जिल्ह्यातील पर्यटनाची जबाबदारी केवळ दोन कर्मचाऱ्यांवर आहे. एमटीडीसीकडून सक्षम अधिकाऱ्याची नेमणूक नसल्याने जिल्ह्यातील सरकारच्या ताब्यातील असलेल्या प्रॉपर्टीविषयक न्यायालयीन कामकाजासाठी तसेच कोल्हापूर जिल्हा नियोजन मंडळ, वनखाते तसेच इतर तत्सम बैठकींसाठी एका कर्मचाऱ्याला उपस्थित राहावे लागते. साधारणत: महिन्यातून सात ते आठ वेळा पर्यटनविषयक बैठका होत असतात. त्यामुळे सातत्याने एक कर्मचारी या कामात व्यस्त राहतो. रोज हजारोंच्या संख्येने भाविक अंबाबाई च्या दर्शनाला येतात. त्यांना जिल्ह्यातील पर्यटन स्थळांविषयी तसेच प्रवास नियोजनाबाबत माहिती पुरवावी लागते. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे एका कार्यालयाला कायमचे कुलूप लागण्याची शक्यता आहे.

...

चौकट

प्रादेशिक कार्यालय सुरू करावे

जिल्ह्यातील वाढते पर्यटक पाहता एमटीडीसीचे प्रादेशिक कार्यालय पूर्ववत सुरू करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कार्यालय पूर्ववत करू असे आश्वासन दिले होते. मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली दिसत नाही. सध्या सरकारी पातळीवर त्याबाबत कोणतीही हालचाल होत नाही.

...

कोट

'एमटीडीसीचे विभागीय कार्यालय कोल्हापुरात सुरु झाल्यास शहराला कोकण, कर्नाटक, गोवा या भागाशी जोडण्यास मदत होईल. कोल्हापूरची पर्यटनवाढीतील वृद्धी लक्षात घेता सक्षम अधिकारी नेमून सरकारी पातळीवर त्यासाठी प्रयत्न व्हायला हवा. याकरिता मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करण्याची गरज आहे.

सिद्धार्थ लाटकर, सचिव, हॉटेल मालक संघ

.....

(मूळ कॉपी)

पर्यटनाचा भार केवळ २ कर्मचाऱ्यांवर

Sachin.patil1@timesgroup.com

Tweet@sachinpMT

विपुल निसर्गसंपदा असलेला जिल्हा म्हणून कोल्हापूरची ओळख आहे. दरवर्षी चाळीस ते पन्नास लाख पर्यटक कोल्हापूरला आवर्जून भेट देतात. जिल्ह्याच्या पर्यटन वाढीत महत्त्वाची भूमिका असणाऱ्या महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या दोन कर्मचाऱ्यांवर कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याचा भार आहे. महत्वाचे निर्णय घेण्यासाठी सक्षम अधिकारी नसल्याने जिल्ह्याच्या पर्यटनाला 'खो' बसत आहे. अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे शहरातील दोन ठिकाणी असलेल्या माहिती व आरक्षण केंद्रापैकी एक केंद्र वारंवार बंद ठेवावे लागते. अधिकारी व कर्मचारी संख्या वाढवून पर्यटकांना दर्जेदार सुविधा देण्याची मागणी नागरीकातून होत आहे.

कोल्हापूरला ऐतिहासिक आणि धार्मिक परंपरा आहे. त्यामुळे जिल्ह्याला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत दिवसेंदिवस होत आहे. शहरातील अंबाबाईच्या दर्शनासाठी लाखो भाविक उपस्थिती दर्शवतात. ऐतिहासिक पुरातत्वीय महत्त्व असणाऱ्या जिल्ह्याच्या पर्यटनाची माहिती पर्यटकांपर्यंत पोचवण्याची जबाबदारी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळावर असते. मात्र पर्यटन विकास महामंडळाचे विभागीय कार्यालय शहरात नसल्याने केवळ २ कर्मचाऱ्यांच्यावर कार्यालयाच्यावतीने पर्यटनवाढीचे काम केले जाते. यामध्ये अंबाबाई मंदिराजवळ दक्षिण दरवाजापाशी असलेल्या व जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील उद्योग भवन येते माहिती व आरक्षण केंद्र उपलब्ध आहे. तसेच या कर्मचाऱ्यारवर सांगली जिल्ह्याचा अतिरिक्त भार सोपवण्यात आला आहे. त्यामुळे बऱ्याचदा उद्योग भवनातील कार्यालय बंद अवस्थेत असल्याचे आढळते

कर्मचारी संख्या वाढवण्याची गरज

शहरासह सांगली जिल्ह्यातील पर्यटनाची जबाबदारी दोन कर्मचाऱ्यांवर आहे. एमटीडीसीकडून सक्षम अधिकाऱ्याची नेमणूक नसल्याने जिल्ह्यातील सरकारच्या ताब्यातील असलेल्या प्रॉपर्टी विषयक न्यायालयीन कामकाजासाठी तसेच कोल्हापूर जिल्हा नियोजन मंडळ, वनखाते तसेच इतर तत्सम बैठकींसाठी एका कर्मचाऱ्याला उपस्थित राहावे लागते. साधारणत: महिन्यातून सात ते आठ वेळा पर्यटनविषयक बैठका होत असतात. त्यामुळे सातत्याने एक कर्मचारी या कामात व्यस्त राहतो. रोज हजारोंच्या संख्येने भाविक अंबाबाई च्या दर्शनाला येतात. त्यांना जिल्ह्यातील पर्यटन स्थळाविषयी तसेच प्रवास नियोजनाबाबत माहिती पुरवावी लागते. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे एका कार्यालयाला कायमचा लॉक लागण्याची शक्यता उद्भवली आहे.

प्रादेशिक कार्यालय सुरू करावे

जिल्ह्यातील वाढते पर्यटक पाहता एमटीडीसीचे प्रादेशिक कार्यालय पूर्ववत सुरू करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कार्यालय पूर्ववत करू असे आश्वासन दिले होते. मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली दिसत नाही. सध्या सरकारी पातळीवर त्याबाबत कोणतीही हालचाल होत नाही. पर्यटन विकास महामंडळाने कोल्हापूरकडे पाहण्याचा संकुचित दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे.

कोट:::

एमटीडीसीचे विभागीय कार्यालय कोल्हापुरात सुरु झाल्यास शहराला कोकण, कर्नाटक, गोवा या भागाशी जोडण्यास मदत होईल. कोल्हापूरची पर्यटनवाढीतील वृद्धी लक्षात घेता सक्षम अधिकारी नेमून सरकारी पातळीवर त्यासाठी प्रयत्न व्हायला हवा. याकरिता मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करण्याची गरज आहे.

सिद्धार्थ लाटकर, सचिव, हॉटेल मालक संघ

कोट व इतर एक फोटो: अर्जुन टाकळकर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपअभियंत्यांना ठोकून काढू

$
0
0

शिवाजी पूल कृती समितीचा इशारा, कार्यकारी अभियंत्यांस घेराव

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

' येथील पंचगंगा पुलावरील पर्यायी शिवाजी पुलाच्या कामात जाणीवपूर्वक अडथळा आणणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपअभियंता संपत आबदार यांना जबाबदारीतून मुक्त करा, अन्यथा त्यांना ठोकून काढू', असा इशारा शिवाजी पूल सर्वपक्षीय कृती समितीने कार्यकारी अभियंता विजय कांडगावे यांना गुरूवारी दिला. शिवाजी पूल कामातून आबदार यांना मुक्त केल्याचे सांगितले होते. तरीही ते पुन्हा कामावर कसे , असा जाब विचारत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी कांडगावेंना घेराव घातला.

अनेक वर्षे रखडलेल्या पुलाचे काम जनरेट्यामुळे सुरू झाले. कामासाठी आतापर्यंत ठेकेदाराने ९० लाख रूपये खर्च केले आहेत. मात्र उपअभियंता आबदार यांनी केवळ ९ लाखांचे बिल मंजूर केल्याने ठेकेदाराने काम बंद केले आहे. यासंबंधीचा जाब विचारण्यासाठी कृती समितीचे पदाधिकारी कांडगावे यांच्याकडे दुपारी साडेबारा वाजता गेले. आबदारांना कार्यालयात बोलवून घेण्याची विनंती केली. त्यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. मात्र ते मोबाईल रिसीव्ह करीत नसल्याने पदाधिकारी आक्रमक झाले. त्यांनी आबदारांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. 'दोन रूपयाचा कडीपत्ता, आबदार झाला बेपत्ता' अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला.

शेवटी पोलिसांनी आबदारांशी संपर्क केल्यानंतर त्यांनी मोबाइल रिसीव्ह केला. मोबाइल कांडगावे यांच्याकडे देण्यात आला. त्यांनी कांडगावेंना 'मी येणार नाही, तुम्हाला काय करायचे, ते करा, असे सांगितले. यामुळे पदाधिकारी अधिकच संतप्त झाले. यापुढे आबदार यांच्याऐवजी कांडगावेंनी पुलाच्या कामाची देखरेख करावी, अशी मागणी करण्यात आली. आबदारांची खातेनिहाय चौकशी करावी, त्यांना कामावर हजर करून घेऊ नये, काम बंद होऊ नये, अशा सूचना शिष्टमंडळातर्फे करण्यात आल्या. यावेळी माजी महापौर आर. के. पोवार, बाबा पार्टे, रमेश मोरे, अशोक पोवार, नंदू गावडे, जयकुमार शिंदे, अशोक भंडारी, चंद्रकांत यादव, संभाजी जगदाळे, जहिदा मुजावर आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images