Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

संततधार पावसाने चंदगडमध्ये धूळवाफ

$
0
0
मृग नक्षत्रादिवशीच मान्सूनची दमदार सुरवात झाल्याने पेरण्यांची धांदल उडाली आहे. मात्र गेल्या पाच-सहा दिवसापासून सलग सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे शेतामध्ये पाणी साचले असून संपूर्ण तालुक्यातील धूळवाफ पेरण्या खोळंबल्या आहेत.

सीरिअल किलर हा मनोरुग्णच

$
0
0
एकाच पध्दतीने सलग आठ खून करणारी व्यक्ती मानसिक रुग्णच असल्याचे मत मानसोपचार तज्ज्ञांनी व्यक्त केले. मुंबईत रामन राघवन नावाच्या व्यक्तीने अशा प्रकारचे कृत्य केल्याचे यापूर्वी उघडकीस आले आहे. अशा मानसिक रुग्णांना भास होत असतात.

विवाहित आत्महत्या : संश‌‌यित पोलिस फरारी

$
0
0
मुलगा पाहिजे या हट्टापायी विवाहितेचा छळ करुन तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणातील संश‌यित पोलिस सतीश मोरे हा फरारी असल्याचे करवीर पो‌लिसांनी रविवारी सांगितले.

एसटी बसची धडक, ३० जखमी

$
0
0
कल्याण- नगर महामार्गावर माळशेज घाटाजवळ दोन एसटी बसेसची समोरासमोर धडक होऊन ३० जण जखमी झाले त्यामध्ये दोन्ही बसच्या चालकांसह नऊ जण गंभीर आहेत. दुपारी चारच्या सुमारास हा अपघात घडला. पाऊस आणि धुक्यामुळे मदतकार्यात अडथळा निर्माण झाला होता.

नक्षलवादावर लष्कर पर्याय नाही

$
0
0
‘राज्यातील नक्षलग्रस्त भागात लष्कराचा वापर हा पर्याय नाही. तेथील भागाचा विकास होणे गरजेचे आहे. त्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करणार आहे.

पेशंटच्या जिवाशी खेळ

$
0
0
मोडके पंखे, काळवंडलेल्या ट्यूब, बंद असलेली लिफ्ट, शौचालयांची झालेली दुरवस्था आणि दुरुस्तीच्या नावाखाली लाखो रुपयांची करण्यात आलेली उधळपट्टी यामुळे सिव्हिल हॉस्पिटलच्या ‘बी ब्लॉक’ इमारतीचे तीन-तेरा वाजले आहेत.

काँग्रेस नेते पाच वर्षे कुठे होते

$
0
0
‘सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेच्या या निवडणुकीतच पुढे आलेले काँग्रेसचे नेते गेली पाच वर्षे कुठे होते. या काळात त्यांनी जनतेची विचारपूस करत विकासकामांतील चुका का दाखविल्या नाहीत,’ असा सवाल गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी उपस्थित केला.

‘येड्यांच्या जत्रे’त पोलिस हैराण

$
0
0
सीरिअल किलरचा शोध घेण्यासाठी शंभरावर पोलिसांनी शनिवारची आख्खी रात्र जागून काढली. रस्त्यावर फिरणाऱ्यांना चौकशीसाठी स्टेशनमध्ये आणले.

वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करावे

$
0
0
बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या धर्तीवर उत्पन्नवर आधारित टॅक्स लावून सरकारने वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना करावी, प्रसंगी विक्रेत्यांनी भविष्यात लढा देण्यास सज्ज रहावे असे आवाहन ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांनी केले.

स्वयंसिद्धा देणार नापासांना प्रशिक्षण

$
0
0
दहावी व बारावी नापास झालेल्या मुलींसाठी स्वयंसिध्दा महिला सेवा संस्थेच्या वतीने रोजगारभिमुख प्रशिक्षण दिले जाते. उत्तम उद्योजिका व परिपूर्ण गृहिणी बनवण्याच्या दृष्टीने संस्थेत प्रशिक्षण दिले जाते.

कोंदाटुनी गेल्या दिशा...

$
0
0
दहावी-बारावीच्या निकालानंतर गावागावांना शैक्षणिक जत्रेचे किंवा आठवडी बाजाराचे स्वरूप आले आहे. करिअरच्या दिशा दाखविण्याचा दावा करणारे शैक्षणिक दुकानदार आपापली डबडी वाजवून लक्ष वेधत आहेत.

वन बीएचकेची वाढती मागणी

$
0
0
विभागलेली कुटुंबे आणि टू बीएचकेच्या वाढलेल्या प्रचंड किमतींमुळे वन बीएचकेला मागणी वाढू लागल्याने ती आता शहरातही उपलब्ध होऊ लागली आहेत. त्याचे प्रमाण जवळपास २० टक्के आहे. बिल्डर्सनीही ग्राहकांची गरज ओळखून वन बीएचके फ्लॅट बांधकामाला प्राधान्य दिले आहे.

कोयना धरणात नऊ 'टीएमसी'ने वाढ

$
0
0
कराड शहरासह संपूर्ण जिल्ह्याला रविवारी रात्री व सोमवारी दुपारपर्यंत पावसाने झोडपून काढले. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी वृक्ष उन्माळल्याने व दरडी कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती.

सोलापूर-हैदराबाद रस्त्यावर तीन मृतदेह आढळले

$
0
0
सोलापूर-हैदराबाद रस्त्यावरील दहीटणे शिवारात सोमवारी सकाळी तीन अनोळखी मृतदेह आढळले. मृतांची ओळख पटू शकली नाही. तिघांच्या अंगावर कोयत्याने वार केल्याच्या खुना आहेत. एका मुलाचा हात तुटलेला आहे.

पहिल्याच दिवशी ७९०६ अर्जांची विक्री

$
0
0
अकरावीच्या प्रवेशाची केंद्रीय पद्धत, विविध शाखांचे अर्जाचे रंग, ओएमआर पद्धत नेमकी काय आहे, कोणत्या महाविद्यालयात प्रवेश मिळेल, कट ऑफ पॉईट किती असेल, प्रवेश अनुदानितमध्ये की विनाअनुदानित तुकडीत मिळेल, अशा प्रश्नांची मनात उजळणी करत प्रवेश प्रक्रियेला सोमवारी सुरूवात झाली.

सर्वाधिक सायन्सच्या ४४७२ अर्जांची विक्री

$
0
0
ज्युनिअर कॉलेजच्या प्रवेशासाठी पहिल्याच दिवशी ७९०७ अर्जाची विक्री झाली तर ५५३ अर्जाची स्वीकृती करण्यात आली. सर्वात अधिक सायन्स शाखेचे ४४७२ अर्जाची विक्री झाली. येत्या २१ जूनपर्यंत अर्जाची विक्री आणि स्वीकृती केंद्रावर सुरु राहणार आहे.

ई -मिटरला काँग्रेस-राष्ट्रवादीचा खोडा

$
0
0
ई- मिटर नको म्हणून आंदोलन झाले, मग सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन रिक्षा संघटनांना पैसे देण्याची घोषणा केली. मात्र सुरूवातीला जमलेले वीस लाख रूपये वगळता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर केलेले तीस लाख रूपये न दिल्याने ई मिटर बसविण्याच्या प्रक्रियेत खोडा बसला आहे.

सर्वेक्षणाचे तीन-तेरा

$
0
0
जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून करण्यात आलेले आर्थिक, सामाजिक, जातनिहाय सर्वेक्षण राज्यात सर्वांत अगोदर कोल्हापूर जिल्ह्यात पूर्ण झाले. मात्र, राज्यातील सर्वांचेच सर्वेक्षण चुकल्याने ते पुन्हा करण्याचे आदेश देण्यात आले.

मुसळधार पावसाने कोंडीत भर

$
0
0
मुसळधार पाऊस, सरकारी कामाचा पहिला दिवस आणि शाळा सुरू झाल्यामुळे शहरातील सोमवारचा दिवस ट्रॅफिक जामचा ठरला. वाहतुकीवर नियंत्रण ठेवताना पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. पाऊस थांबला की पटापट रस्त्यावर येणारी दुचाकी वाहने आणि नागरिकांमुळे या कोंडीत भरच पडली.

मुख्यमंत्र्याचे 'एलबीटी'वर एकतर्फी प्रेम

$
0
0
व्यापारी हा जन्मतःच आणि मोठा गुन्हेगार असल्यासारखी वागणूक सरकारकडून दिली जात आहे. विविध कर वसूल करणारे ३६६ विभाग व्यापाऱ्यांच्या मागे लावलेले आहेत. मुख्यमंत्री हे राजहट्टाचे शिकार झाले असून, त्यांचे 'एलबीटी'वर एकतर्फी प्रेम आहे.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images