Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

सहा वर्गात केवळ ६८ विद्यार्थी

$
0
0

अप्पासाहेब माळी, कोल्हापूर:

'राजवाड्यातील शाळा'म्हणून नावाजलेल्या मेन राजाराम हायस्कूलची पटसंख्येअभावी दयनीय अवस्था बनली आहे. इयत्ता पहिली ते दहावी अशा वर्गात मिळून केवळ ६८ पटसंख्या आहे. पाचवी, सहावी आणि सातवीच्या वर्गात हाताच्या बोटावर मोजण्याइतपत विद्यार्थी संख्या आहे. दरवर्षी पटसंख्या घटत असल्यामुळे हायस्कूलच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. अपुरा विद्यार्थी पट आणि शिक्षक अतिरिक्त होण्याच्या प्रकारामुळे जिल्हा परिषद प्रशासन हडबडले आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी याप्रकरणी स्वत: लक्ष घातले आहे. मुलांना आकर्षित करुन घेण्यासाठी येत्या शैक्षणिक वर्षापासून सेमी इंग्लिशची सुविधा, मुलांच्या प्रवास खर्चाची सोय याबाबी कायमस्वरुपी करता येतील का, या संदर्भात त्यांनी प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना कृती आराखडा सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. मेन राजाराम हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज हे जिल्हा परिषदेच्या मालकीचे आहे. येथे प्रशस्त मैदान, प्रयोगशाळा, कम्प्युटर लॅब अशा सुविधा आहेत. मात्र अपुरी शिक्षक संख्या व अन्य कारणांमुळे गेल्या काही वर्षात हायस्कूलच्या पटसंख्येत कमालीची घसरण झाली आहे. सध्या पाचवीच्या वर्गात एक, सहावीमध्ये दोन तर सातवीच्या वर्गात आठ विद्यार्थी आहेत. आठवीमध्ये ११, नववीत २१ तर दहावीमध्ये २५ विद्यार्थी शिकत आहेत. पटसंख्या टिकवून ठेवण्यासाठी शिक्षकांनी एकत्र येऊन काही प्रमाणात विद्यार्थ्यांना युनिफॉर्म्स, शैक्षणिक व प्रवास खर्चाची जबाबदारी उचलली आहे. दरम्यान, प्रशासकीय पातळीवरुन शाळांसमोरील समस्या दूर करण्यात स्वारस्य न दाखविल्यामुळे हायस्कूलच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

'मेन राजाराम हायस्कूलमधील पटसंख्या वाढावी यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. सीइओ अमन मित्तल यांनी शालेय विकास व पटसंख्या वाढीसाठी अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. सेमी इंग्लिशची सुविधा, परिसरात पालक भेटी व कार्यशाळेद्वारे मुलांना आकर्षित करणे असे नियोजन आहे.
-आशा उबाळे, शिक्षणाधिकारी, प्राथमिक विभाग

ज्युनिअर कॉलेज फुल्ल
मेन राजाराम हायस्कूलला संलग्न ज्युनिअर कॉलेज आहे. येथे अकरावी व बारावीच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या अभ्यासक्रमाची सुविधा आहे. विज्ञान शाखेच्या अकरावी व बारावीच्या मिळून चार तुकड्या आहेत. कला आणि वाणिज्य अभ्यासक्रमाची प्रत्येकी एक तुकडी आहे. ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थी संख्या ७७८ आहे. सुसज्ज प्रयोगशाळा, कम्प्युटर लॅबच्या सुविधा आहेत. २००६ पासून बारावी सायन्सचा निकाल शंभर टक्के आहे.

पटसंख्यावाढीसाठी आवश्यक ....

सर्व विषय शिक्षकांच्या नियमित नियुक्त्या

सेमी इंग्रजी शिक्षणाची सुविधा

हायस्कूलच्या अवतीभवती संरक्षक भिंत

गरीब विद्यार्थ्यांचा शैक्षणिक व प्रवास खर्चाची सोय

शालेय वेळेत मैदानावरील पार्किंग बंद करणे

सुरक्षारक्षकाची नेमणूक करुन शाळाबाह्य उपद्रव थांबवणे

'मेन राजाराम हायस्कूलची पटसंख्या ७० वरुन ७०० पर्यंत पोहचली पाहिजे यादृष्टीने नियोजन करणार आहे. मार्चअखेर आवश्यक शिक्षकांच्या नियुक्त्या होतील. शाळेसाठी आवश्यक सगळ्या गोष्टींची पूर्तता केली जाईल. यासाठी स्वतंत्र अधिकारी नेमण्याचाही विचार आहे.
-अमन मित्तल, सीईओ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आदिवासी धनगर साहित्य संमेलन शुक्रवारी

$
0
0

आदिवासी धनगर साहित्य संमेलन शुक्रवारी

सोलापूर :

माण तालुक्यातील म्हसवड येथे तिसरे तीन दिवसीय आदिवासी धनगर साहित्य संमेलन शुक्रवारपासून सुरू होणार आहे. साहित्य संमेलनात ग्रंथदिंडीसह परिसंवाद, चर्चासत्रे आणि व्याख्यानांची मेजवानी रसिकांना मिळणार आहे, अशी माहिती संमेलनाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अभिमन्यू टकले यांनी दिली.

शुक्रवारी, १८ जानेवारी रोजी खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते ग्रंथदिंडीचे उद्घाटन होणार आहे. सहकारमंत्री सुभाष देशमुख आणि सद्गुरु कारखान्याचे चेअरमन एन. शेषगिरिराव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. शनिवारी, १८ जानेवारी रोजी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते आणि संमेलनाध्यक्ष डॉ. मुरहरी केळे यांच्या उपस्थितीत सुभेदार मल्हारराव होळकर साहित्य नगरीत संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. दुपारी ३ ते ६ या वेळेत सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. शनिवारी दुपारी धनगर धर्मपीठाची आवश्यकता आहे काय? या विषयावरील चर्चासत्रात बापूसाहेब हटकर, डॉ. अभिमन्यू टकले, विजय गावडे सहभागी होतील. त्या नंतर होळकरशाहीच्या इतिहासातून धनगर जमातीने काय शिकावे? या विषयावर डॉ. यशपाल भिंगे, डॉ. संगीता चित्रकोटी आणि रामभाऊ लांडे मार्गदर्शन करतील. महिलांचे सामाजिक, साहित्यिक व राजकीय योगदान या विषयावर होणाऱ्या परिसंवादात डॉ. उज्वला हाके, डॉ. उषा देशमुख, निहारिका खोदले, विजयमाला खरात सहभागी होणार आहेत. सायंकाळच्या चौथ्या सत्रात समकालीन पत्रकारितेत वंचित समाजाचे स्थान, या विषयावर पत्रकार मंडळी विचार मांडतील. रात्री यशवंतराव तांदळे खुले कवी संमेलन होईल.

रविवारी सकाळच्या सत्रात धनगर अनुसूचित जमातीचे आरक्षण वास्तव, या विषयावर राजा कांदळकर यांची प्रकट मुलाखत होणार आहे. त्या नंतर प्रा. डॉ. दत्ता डांगे धनगर जमातीच्या आदीम परंपरा व प्रायोगिक लोककला या विषयावर व्याख्यान देतील. आठव्या सत्रात धनगर समाजातील पारंपरिक व अपारंपरिक उद्योगांचा विकास या विषयावर परिसंवाद होईल. नवव्या सत्रात डॉ. महेश खरात आणि विजय गोफणे यांचे धनगर तरुणांसमोरील आव्हाने व वाटचाल, या विषयावर व्याख्यान होणार आहे. दहाव्या सत्रात धनगर जमातीचे प्रशासनातील स्थान काल, आज व उद्या या विषयावर परिसंवाद होणार आहे. शेवटच्या सत्रात धनगर समाजाची राजकीय वाटचाल, या विषयावर सुभाष बोन्द्रे यांचे व्याख्यान होणार आहे.

रविवारी खासदार सुप्रिया सुळे, माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील, खासदार राजू शेट्टी, भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि सातारा झेडपीचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संमेलनाचा समारोप होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बँक मित्र’ला कंत्राटी कंपन्यांकडून सुरूंग

$
0
0

Sachin.patil1@timesgroup.com

Tweet@sachinpMT

कोल्हापूर : सरकारने प्रधानमंत्री जनधन योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सुरू केलेल्या 'बँक मित्र' संकल्पनेला काही कंत्राटदार कंपन्या सुरुंग लावत आहेत. या योजनेमध्ये बँक मित्रांच्या अकाउंटवरून परस्पर ट्रांजेक्शन करून राष्ट्रीयीकृत बँकांना चुना लावण्याचे काम एक ठेकेदार कंपनी राजरोसपणे करत आहे. बँक मित्र योजनेतील सर्वच कंत्राटदार कंपन्यांच्या व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी बँक मित्रांकडून होत आहे.

प्रधानमंत्री जनधन योजनेंतर्गत 'बँक मित्र' मोहिमेद्वारे ग्रामीण भागात ज्या ठिकाणी बँकांची व्यवस्था, एटीएम यंत्रणा उपलब्ध नाही अशा ठिकाणी लोकांकडून व्यवहार करून घेण्यासाठी बँक मित्रांना नेमण्यात आले. यामध्ये बँकांची खाते उघडणे, पैसे काढणे व भरणे, लोन, विमा असे व्यवहार करून नागरिकांमध्ये अर्थसाक्षरता आणण्याची जबाबदारी बँक मित्रांवर सोपविण्यात आली. मात्र, बँक मित्र नेमण्याचे कंत्राट खासगी कंपन्यांना देण्यात आले आहे.

तुटपुंज्या वेतनावर राबणूक

जिल्ह्याचा बहुतांश भाग दुर्गम आहे. अशा भागांमध्ये बँक मित्र सक्रिय राहून काम करतात. राष्ट्रीयीकृत बँकांनी बँक मित्रांचे काम करण्यासाठी खासगी कंपन्यांशी करार केले आहेत. त्यातून खासगी कंपन्यांनी बँक मित्रांच्या नेमणुका केल्या. नेमणुका करत असताना बँक मित्रांना चांगला पगार देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते. यामध्ये बँक मित्रांना कंपनीकडून दरमहा २२५० रुपये वेतन व अधिकचा इन्सेंटिव्ह मिळेल असे कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले होते. मात्र, त्यानुसार बँक मित्रांना वेतन किंवा कमिशन दिले जात नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील बँक मित्र दरमहा १२५० रुपये इतक्या तुटपुंज्या वेतनावर काम करत आहेत. त्यातही सीमकार्ड रिचार्जसाठी दीडशे रुपये शुल्क बँक मित्रांच्या पगारामधून आकारले जाते. काही बँका बँक मित्रांना तीन ते चार हजार रुपयांपर्यंत वेतन देतात, तर काही बँका कमी पगारात राबवून घेतात.

असे होते परस्पर ट्रांजेक्शन

बँक मित्राला पगार मिळवण्यासाठी दर महिन्याला शंभर व्यवहार त्याच्या अकाउंटवरून करणे बंधनकारक असते. कंत्राटदार कंपनी बँक मित्राला संबंधित बँकेत त्याच्या नावाचे एक करंट अकाउंट तयार करून देते. तसेच काम करण्यासाठी त्याला एक ट्रांजेक्शन आयडी (टीआयडी) दिला जातो. त्यावर बँक मित्र सर्व व्यवहार करत असतो. ज्या बँक मित्रांचे १०० व्यवहार पूर्ण होत नाहीत, अशा बँक मित्रांना पगार मिळत नाही. मात्र, अशा बँक मित्रांचे टीआयडी व त्यांचे करंट अकाउंट वापरून कंत्राटदार कंपनी बँक मित्रांच्या परस्पर स्वतःच्या फायद्यासाठी त्यांचे १०० व्यवहार पूर्ण करते. हे व्यवहार बँक मित्रांना नेमून दिलेल्या ठिकाणाहून न करता भलत्याच ठिकाणाहून केले जातात. बँक मित्रांच्या परवानगीशिवाय त्याच्या वैयक्तिक बँक खात्याशी फेरफार करत राष्ट्रीयीकृत बँकांकडून कंपनी स्वतःच्या फायद्यासाठी केवळ पैसे मिळवण्याच्या हेतूने आर्थिक गैरव्यवहार करते. तसेच डिपॉझिट म्हणून बँक मित्रांकडून घेतलेली पाच हजार रुपये रक्कम नॉन रिफंडेबल असल्याचे काही कंपन्याकडून सांगण्यात आले आहे.

०००

कोट...

कॅशलेस इंडियाच्या नावाखाली बँक मित्रांचे शोषण होत आहे. त्यामुळे कंत्राटदार कंपन्यांच्या आर्थिक व्यवहाराची पारदर्शकपणे चौकशी व्हावी. त्यामुळे बँक मित्रांच्या नावावर खोटे व्यवहार करून बँकेची आर्थिक फसवणूक करणाऱ्या दोषींवर कायदेशीर कारवाई व्हावी.

सतीश नांगरे, बँक मित्र, अन्याय निवारण कृती समिती

०००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारी कार्यालयांतमतदार जागृती मंच

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

'जिल्ह्यातील सर्व सरकारी, निमसरकारी कार्यालयात मतदार जागृती मंच तयार करण्यात आला आहे. मंचव्दारे कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना मतदान प्रक्रियेत सहभागी करून घ्यावे,' असे आवाहन बुधवारी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी केले. मतदार जागृती मंच नोडल ऑफिसर प्रशिक्षण शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यक्रम झाला.

सुभेदार म्हणाले, 'मतदार जागृती मोहिमेत शिक्षित मतदारांना मतदान प्रक्रियेत सहभागी करून घेण्यात येत आहे. यामध्ये कार्यालयातील सर्वांनी आपले नाव मतदार यादीत आहे का? याची खात्री करून घ्यावी. नसल्यास मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडे नोंदणी करावी. आगामी लोकसभा निवडणुकीत सर्व मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी प्रयत्न करावे.'

यावेळी ईव्हीएम, व्हीव्हीपॅट यंत्राचे प्रशिक्षणही देण्यात आले. मतदानाची प्रतिज्ञा घेतली. निवडणूक उपजिल्हाधिकारी स्नेहल भोसले यांनी मतदार जागृती मंचबाबत माहिती दिली. अतिरिक्त जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्यासह सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार, नोडल अधिकारी उपस्थित होते. निवडणूक तहसीलदार शैलजा पाटील यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साठ प्रवचनकार करणार गावात प्रबोधन

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

जिल्हा परिषद आणि पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने २६ जानेवारी ते १० फेब्रुवारी या कालावधीत 'स्वच्छतेचा महाजागर' कार्यक्रम आयोजित केला आहे. जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छताविभागाच्या आढावा बैठकीत कार्यक्रमाचे नियोजन केले आहे. वारकऱ्यांच्या मदतीने किर्तनाच्या माध्यमातून प्रत्येक गावात स्वच्छतेविषयक प्रबोधन होणार आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शिनी मोरे, वारकरी साहित्य परिषदेच्या मालूश्री पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक झाली. राज्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्यमान उंचाविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना व स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छताविषयक कार्यक्रमांची अंमलबजावणी होणार आहे. यामध्ये स्वच्छताविषयक सुविधांचा नियमित वापर, ग्रामीण कुटुंबाकडून स्वच्छता सवयीचा अंगिकार, वैयक्तिक स्वच्छता, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन यासंदर्भात नागरिकांचे प्रबोधन होणार आहे. स्वच्छतेविषयक महाजागरसाठी ६० प्रवचनकारांची निवड झाली आहे. एक प्रवचनकार २४ गावांत प्रबोधन करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरच्याच गाडीची धडक, बालिकेचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

घरच्या कारचा हॉर्न ऐकून कारकडे झेपावलेल्या दोन वर्षाच्या बालिकेचा त्याच कारच्या धडकेत मृत्यू झाला. भक्ती दीपक वडणकर (रा. लोणार वसाहत, मार्केट यार्ड) असे तिचे नाव आहे. ही घटना बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास घडली.

शाहूपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक वडनकर व त्यांचे भाऊ दिनेश वडनकर लोणार वसाहतीत राहतात. दोघांचा ट्रक बॉडीचा व्यवसाय आहे. बुधवारी सकाळी दिनेश कार घेऊन बाहेर गेले. काही वेळानंतर ते परतले. त्या वेळी भक्ती ही आजीसोबत दारातच बसली होती. काका आल्याच्या आनंदात ती अचानक कारसमोर आली. यावेळी दिनेशना कार आवरता आली नाही. कारची तिला जोराची धडक बसली. यात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अचानक झालेल्या अपघाताने वडणकर कुटुंबीयी भांबावून गेले. त्यांनी कारमधून शाहूपुरीतील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाला.

आई ...ताई कुठे गेली गं
घरातील मोठ्या माणसांना बाहेर जाताना टाटा करण्यासाठी आणि बाहेरून आल्यानंतर त्यांना भेटण्यासाठी घरातील प्रत्येक लहान मुलाची धडपड सुरु असते. मायेने गळ्यात मिठी मारल्यावरचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसतो. बुधवारी सकाळी काका बाहेर जाताना ‘टाटा’ करुन गेल्यानंतर पुन्हा घरी आल्यानंतर त्यांना भेटण्यासाठी भक्तीची पावले झेपावली. मात्र तिच्या पावलाची चाहूल नियतीने लागू दिली नाही. धावत आलेली दोन वर्षांची भक्ती दीपक वडणकर हिचा गाडीखाली सापडून दुर्देवी अंत झाला. मार्केटयार्ड परिसरातील लोणार वसाहतही या घटनेने हळहळली. भक्तीच्या चार वर्षाच्या भावाने ‘आई, बाबा.. ताई कुठे गेली गं’.. असे विचारताच सारे कुटुंबियच हादरून गेले.

आजी, आई आणि वडिलांच्या समोरच भक्तीच्या चाकाखाली सापडून झालेल्या दुर्देवी मृत्यूचा वडणकर कुटुंबियांना प्रचंड मानसिक धक्का बसला. भक्ती खेळायला का आली नाही, असे विचारण्यासाठी लोणार वसाहतीमधील काही बालके त्यांच्या घरी आली, त्या वेळी आई वडिलांना केलेला आक्रोश हदय पिळवटून टाकणारा होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जैन साहित्यातून संस्कृती दर्शन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'मराठी जैन साहित्य हे केवळ एका समाजाचे साहित्य नसून, त्यातून संपूर्ण मराठी समाज आणि संस्कृतीचे दर्शन घडते. तत्कालीन समाजाच्या बोली भाषेत व्यक्त होणारे साहित्य भाषिकदृष्ट्याही महत्त्वाचे आहे,' असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांनी केले. प्रा. डॉ. गोमटेश्वर पाटील लिखित 'मराठी जैन साहित्य' या ग्रंथाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. शाहू स्मारक भवन येथे बुधवारी ग्रंथ प्रकाशन कार्यक्रम पार पडला.

विद्यापीठ अनुदान आयोगाने दिलेल्या शिष्यवृत्तीअंतर्गत महावीर कॉलेज येथील प्रा. डॉ. गोमटेश पाटील यांनी १८५० ते २००० या कालखंडातील मराठी जैन साहित्याचा अभ्यास केला. राज्यासह परराज्यातही जाऊन केलेल्या संशोधनाच्या आधारे मराठी जैन साहित्य हा ग्रंथ निर्माण झाला. नवी दिल्ली येथील भारतीय ज्ञानपीठ संस्थेने या ग्रंथाचे प्रकाशन केले, तर शिवाजी विद्यापीठातील मराठी विभागाने पुढाकार घेऊन प्रकाशन कार्यक्रमाचे आयोजन केले. ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या हस्ते, तसेच ज्ञानपीठ संस्थेचे प्रतिनिधी संजय दुबे यांच्या उपस्थितीत ग्रंथ प्रकाशन कार्यक्रम पार पडला.

डॉ. साळुंखे म्हणाले, 'अनेकांतवादानुसार सत्याच्या अनेक पैलूंचा शोध घेण्याचे काम जैन साहित्याने केले. संस्कृत भाषेतच साहित्यनिर्मिती करण्याचा प्रघात असलेल्या काळात जैन लेखकांनी जाणीवपूर्वक तत्कालीन बोली भाषांमध्ये लेखन केले. भाषिकदृष्ट्या जैन साहित्य महत्त्वाचे असून, त्याचा अभ्यास होण्याची गरज आहे.' शिवाजी विद्यापीठातील मराठी विभागप्रमुख डॉ. राजन गवस यांनी बोली आणि साहित्य याबाबत दुर्मिळ हस्तलिखितांचा अभ्यास व्हावा, असे मत व्यक्त केले.

ज्ञानपीठ संस्थेचे प्रतिनिधी दुबे म्हणाले, 'दुर्मिळ हस्तलिखितांना ग्रंथरूप देऊन ते वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ज्ञानपीठ संस्था नेहमीच पुढाकार घेते. संस्कृतशिवाय अन्य भाषांमध्ये तत्कालीन समाजजीवनाचे चित्र प्रकर्षाने दिसते, त्यामुळे प्राकृत, पाली, आदी भाषांच्या अभ्यासास प्रोत्साहन दिले जात आहे. डॉ. गोमटेश पाटील यांचा ग्रंथ विविध भाषांमधून देशासह परदेशातील ग्रंथालयांमध्येही पोहोचेल.' जैनबोधक नियतकालिकाचे संपादक महावीर शास्त्री आणि जैन साहित्याचे अभ्यासक महावीर कंडारकर यांनी मनोगत व्यक्त केले. ग्रंथलेखक गोमटेश पाटील यांनी प्रास्ताविकातून संशोधन आणि लेखनामागील हेतू स्पष्ट केला. डॉ. रणधीर शिंदे यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली. प्रकाशन कार्यक्रमासाठी साहित्यप्रेमींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. डॉ. शरद गायकवाड यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोकुळ करणार चीज निर्मिती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘आगामी काळात दुग्धजन्य पदार्थांची विक्री वाढवण्यावर गोकुळचा भर राहणार आहे. दुधासोबत इतर पदार्थांना चांगली मागणी असून आता गोकुळ चीज उत्पादनातही उतरणार आहे’, असे कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे (गोकुळ) नूतन चेअरमन रविंद्र आपटे यांनी सांगितले.
गोकुळच्या चेअरमनपदी निवड झाल्यानंतर आपटे यांनी बुधवारी ‘महाराष्ट्र टाइम्स’ च्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी दुग्ध व्यवसायातील सद्यस्थिती व गोकुळची आगामी वाटचाल स्पष्ट केली. ते म्हणाले, ‘उत्पादकांकडून घेतले जाणारे दूध अतिरिक्त ठरत असल्याने त्याची दूध पावडर केली जाते. आंतरराष्ट्रीय बाजारात पावडरचे दर कमी झाल्यामुळे त्याचा फटका गोकुळला बसत होता. सरकारने निर्यातीसाठी अनुदान देण्याचा निर्णय घेतल्याने आतापर्यंत शिल्लक असलेली पावडर संपण्यास मदत झाली आहे. त्यातून ८५० टन पावडर निर्यात केली आहे. ज्या दुधापासून पावडर तयार झाली, त्या दुधाचे पैसे गोकुळने उत्पादकांना दिले आहेत. पण निर्यातीसाठी जी पावडर पाठवली, त्यासाठी प्रथम निर्यातीचा प्रस्ताव द्या, त्यानंतर जिथे पाठवली तिथे पोहच झाल्याचा प्रस्ताव द्या असे सरकारकडून सांगितले. त्यामुळे १२ कोटीच्या आसपास अनुदान अडकले आहे. बटर मार्केटही घसरले आहे. त्याचाही फटका बसत आहे. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी दूध विक्रीपेक्षा दुग्धजन्य पदार्थांची विक्री वाढवण्याचे गोकुळने ठरवले आहे. त्यासाठी चीज उत्पादनात उतरणार असून स्वतंत्र प्लँट उभा करुन स्वत:बरोबर इतर ब्रँडची उत्पादने तयार करुन द्यायची की इतरांकडून उत्पादन तयार करुन घ्यायचे हे निश्चित केले जाणार आहे.’
मल्टीस्टेटच्या ठरावाबाबत आपटे म्हणाले, ‘गोकुळच्या सर्वसाधारण सभेत हा ठराव मंजूर झाला आहे. त्याच्या बाजूने २७०० ठराव आहेत. हा ठराव आता केंद्र सरकारकडे पाठवला आहे. तिथून कर्नाटक फेडरेशनच्या मंजुरीकडे जाईल. या ठरावातून अथणी, हुक्केरी, चिकोडी तालुक्यातीलच संस्थांचे दूध संकलित केले जाणार आहे. तिथे सध्या १२ बल्क कुलर असून सव्वा लाख लिटर दूध संकलित होते. तेथील उत्पादकांना सुविधा देण्यासाठी या ठरावाने मदत होणार आहे. राज्यात दुधाचा एकच ब्रँड तयार करण्याबाबतच्या विषयाला उशीर झाला आहे.’ यावेळी संचालक विश्वास जाधव, जनसंपर्क अधिकारी संजय दिंडे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कोरेगावच्या जवानाचा लेहमध्ये मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इस्लामपूर
वाळवा तालुक्यातील कोरेगाव येथील प्रदीप शिवाजी कुंभार यांचा जम्मू-काश्मीरमधील लेह येथे मृत्यू झाला. कुंभार हे वायरलेस ऑपरेटर कम ड्रायव्हर म्हणून कार्यरत होते. लेहमध्ये सुरू असलेल्या प्रचंड बर्फवृष्टीमुळे गेले आठ दिवस ते आजारी होते. त्यांना तीव्र तापही आला होता. यातच त्यांचा मृत्यू झाल्याचे त्यांच्या सहकाऱ्याने प्रदीप यांच्या घरी दूरध्वनीवरून बोलताना सांगितले. बुधवारी रात्री उशिरापर्यंत प्रदीपच्या वडिलांना या घटनेबाबत माहिती दिलेली नव्हती.
वाळवा विभागाचे प्रांताधिकारी नागेश पाटील म्हणाले, ‘प्रदीप यांच्या घरातून मिळालेल्या माहितीनुसार त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला असल्याचा संदेश कोरेगावच्या मंडल अधिकाऱ्यांनी कार्यालयाला दिला आहे.’
घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्याने प्रदीप दहा वर्षांपूर्वी सैन्यात भरती झाले होते. उत्तर प्रदेशातील बरेली येथून याच महिन्यात त्यांची लेह येथे बदली झाली होती. दीड वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला आहे. त्यांना सात महिन्यांची मुलगी आहे. प्रदीपचे वडील शिवाजी कुंभार आणि आई रत्नमाला यांचा वीटभट्टीचा छोटा व्यवसाय आहे. घरातील कर्ता मुलगा गमावल्याने कुंभार कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

५९ मिनिटांतएक कोटी कर्ज

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली

'सांगली जिल्ह्यातील सूक्ष्म, लघु व मध्यम व्यावसायिकांना एक कोटी रुपयांपर्यंत कर्ज योजना सुटसुटीत व पारदर्शक असून, योजनेला आतापर्यंत जिल्ह्यात चांगला प्रतिसाद आहे. विविध सरकारी विभागाचे अधिकारी व बँक अधिकारी यांच्यात समन्वय चांगला असून या योजनेचा फायदा व्यावसायिकांनी घ्यावा,' असे प्रतिपादन केंद्रीय जीएसटीचे सहायक आयुक्त दिनेश नानल यांनी विटा ये‍थे आयोजित चर्चासत्रात केले.

केंद्रीय जीएसटी, जिल्हा प्रशासन, जिल्हा उद्योग केंद्र, जिल्हा अग्रणी बँक तसेच विटा यंत्रमाग औद्योगिक सहकारी संघ यांच्या सहयोगाने चर्चासत्र झाले. यावेळी विटा यंत्रमाग औद्योगिक सहकारी संघाचे अध्यक्ष किरण तारळेकर, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक वसंत सराफ, केंद्रीय जीएसटी निरीक्षक राजेंद्र मेढेकर, बँक अधिकारी अनंत बिळगी, निखिल पाटील प्रमुख उपस्थित होते.

नानल म्हणाले, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ नोव्हेंबर २०१८ रोजी विविध योजनांची सुरुवात केली असून, सूक्ष्म, लघु व मध्यम व्यावसायिकांना ५९ मिनिटांत एक कोटी रुपयांपर्यंत कर्ज मिळविण्याची सुविधा काही अटींवर सुरू झाली आहे. देशपातळीवर ८० जिल्ह्यांत हा कार्यक्रम सुरू असून त्यात सांगली जिल्ह्याची निवड झाली आहे. जिल्ह्यातील अन्नप्रक्रिया क्षेत्रावर या योजनेचा भर राहणार आहे.'

किरण तारळेकर म्हणाले, 'ही योजना फायदेशीर असून उद्योजकांनी विशेष यंत्रमागधारकांनी याचा लाभ घ्यावा. तसेच या योजनेमध्ये व्याज अनुदान मिळण्याचा कालावधी निश्चित असला पाहिजे.'

वसंत सराफ म्हणाले, 'ही योजना सध्या सुरू असलेल्या व्यवसायांसाठी असून, जीएसटी नोंदणी, मागील तीन वर्षांचे इनकम टॅक्स विवरणपत्र व मागील सहा महिन्यांचे बँक स्टेटमेंट यांची पूर्तता करून व्यावसायिकांना या कर्ज योजनेचा लाभ घेता येईल.' यावेळी अनंत बीळगी, निखिल पाटील आदींची भाषणे झाली

केंद्रीय जीएसटी कार्यालयाचे निरीक्षक राजेंद्र मेढेकर यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी वैभव मेत्रे, प्रकाश यादव, पांडुरंग डोंबे, आदींसह उद्योजक, व्यावसायिक उपस्थित होते.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खंडपीठाचा निर्णय तातडीने घ्या

$
0
0

फोटो...

म. टा. वृत्तसेवा गडहिंग्लज

कोल्हापुरात उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे, या मागणीसाठी गेली अनेक वर्षे आंदोलने सुरू आहेत. उच्च न्यायालयाला पत्र देण्यास मुख्यमंत्री टाळाटाळ करीत आहेत. वकील संघटनेला मिळालेल्या आश्वासनाची पूर्तता होत नसल्याने सरकारने खंडपीठासंदर्भात तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी करत गडहिंग्लज तालुका वकील संघटनेमार्फत प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून राज्य सरकारचा निषेध करण्यात आला.

मोर्चात गडहिंग्लजमधील सर्व वकील व अनेक पक्ष संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. कडगाव रोडवरील सत्र न्यायालयापासून मोर्चाला सुरुवात झाली. गडहिंग्लज बाजारपेठ आणि मुख्य रस्त्यावरून मोर्चा प्रांत कार्यालयासमोर आला. खंडपीठ झालेच पाहिजे, खंडपीठ आमच्या हक्काचे अशा घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले. प्रांत कार्यालयासमोर आल्यानंतर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले.

वकील संघटनेचे अध्यक्ष एस. एम. गुरव म्हणाले, 'खंडपीठासंदर्भात पत्रव्यवहार करण्यात मुख्यमंत्र्यांनी तीनवेळा आश्वासन दिले, पण ते पाळले नाही. इतकेच नव्हे तर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ११०० कोटी निधीची तरतूद केली आहे व शेंडा पार्कमधील जागा निश्चित केली आहे अशा खोट्या थापा मारून सर्वांनाच फसविले आहे.'

अॅड. श्रीपतराव शिंदे म्हणाले, 'खंडपीठाबाबत आतापर्यंतची सर्वच सत्ताधारी मंडळी वकील आणि पक्षकारांना फसवत आली आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खंडपीठप्रश्नी गांभीर्याने लक्ष घालून हा प्रश्न तातडीने सोडवावा.'

खंडपीठाचा प्रश्न केवळ वकिलांपुरताच मर्यादित नाही. पक्षकारांना पुण्या-मुंबईला जाणे परवडत नाही. त्यामुळे सामान्यांच्या हितासाठी कोल्हापूरला खंडपीठ होणे गरजेचे आहे. २६ जानेवारीपर्यंत प्रश्न न सुटल्यास महामोर्चा काढू, प्रसंगी बार असोसिएशनच्या आदेशाप्रमाणे सनदेचा त्यागही करू, असा निर्धार वकिलांनी केला.

यावेळी नगराध्यक्ष स्वाती कोरी, शिवसेनेचे दिलीप माने, मनसेचे नागेश चौगुले, राष्ट्रवादीचे किरण कदम, रमजान अत्तार, ज्येष्ठ वकील अर्जुन रेडेकर, बी. के. देसाई, संजय देसाई, आदींची भाषणे झाली. आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नगरसेवक बसवराज खणगावे, श्रद्धा शिंत्रे, नाझ खलिफा, बाळासाहेब गुरव, उज्ज्वला दळवी, शर्मिली पोतदार, बाळेश नाईक, आदी उपस्थित होते. वकील संघटनेचे सचिव एम. ए. नेलीऀकर यांनी आभार मानले.

००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वाभिमानीचा आज मोर्चा

$
0
0

चंदगड : कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा करणे, जळीत ऊस नुकसानभरपाई लवकरात लवकर मिळावी, नवीन मीटर, वीज जोडणी मिळावी, धोकादायक जुने खांब, डीपी त्वरित बदलाव्यात या सर्व मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेमार्फत वितरण कपंनीच्या हलकर्णी फाटा (ता. चंदगड) येथील कार्यालयावर शुक्रवारी (ता.१८) मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रा. दीपक पाटील यांनी दिली. हलकर्णी फाटा येथे तालुक्यातील शेतकऱ्यांनी दुपारी १२ वाजता मोठ्या सख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्रा. पाटील यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सायबर रोडवर अनुभवा हॅपी स्ट्रीटची धमाल

$
0
0

फाइल फोटो

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पारंपरिक खेळातील मौज, रस्सीखेच आणि दोरीवरील उड्या, टायर पळविण्याचा आनंद, मर्दानी खेळातील थरार आणि विविध कलाविष्कारांची धमाल येत्या रविवारी (ता. २०) सायबर रोडवर अनुभवता येणार आहे. 'महाराष्ट्र टाइम्स'च्या 'हॅपी स्ट्रीट'विषयी नागरिकांमध्ये उत्कंठा शिगेस पाहोचली आहे. रविवारी सकाळी सात वाजल्यापासून हा जल्लोषी कार्यक्रम रंगणार आहे.

जानेवारी महिन्यातील रविवारची सुट्टी आणि 'हॅपी स्ट्रीट' असे जणू समीकरण बनले आहे. आबालवृद्धांसाठी मनोरंजनाचे मुक्त व्यासपीठ अशी ओळख बनली आहे. लहान मुलांपापासून यंग सिनीअर्सपर्यंत सगळ्या वयोगटातील नागरिक या ठिकाणी पारंपरिक खेळाचा मनसोक्त आनंद लुटतात. सहकुटुंब सहभागी होऊन कार्यक्रमांचा आस्वाद लुटणाऱ्यांची संख्या वाढली आहे. 'हॅपी स्ट्रीट'मध्ये गीत, नृत्य, पारंपरिक खेळ, साहसी खेळाचा समावेश आहे.

जानेवारी महिन्यातील तिसऱ्या रविवारी सायबर रोड ते एनसीसी भवनपर्यंतच्या मार्गावर पुन्हा 'हॅपी स्ट्रीट'ची धमाल रंगणार आहे. याप्रसंगी सामाजिक स्वास्थ जपण्यासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या समाजातील विविध घटकातील मान्यवरांचा सत्कार होणार आहे. 'हॅपी स्ट्रीट'चे टायटल प्रायोजक फ्रू स्टार...फ्रूटड्रिंक-संजय घोडावत ग्रुप, पॉवर्ड बाय स्पॉन्सर दि आयडियल कन्स्ट्रक्शन, ट्रॅव्हल पार्टनर श्री ट्रॅव्हल्स, फिटनेस पार्टनर एफ थ्री जीम, लगेज पार्टनर कॅरी बॅग ट्रॅव्हल बॅग ऑन रेंट हे आहेत.

...

सर्वांसाठी खुला....हर एक प्रकारचे खेळ

बालपणातील खेळाचा मनमुराद आनंद लुटायला प्रत्येकालाच आवडते. हॅपी स्ट्रीटमध्ये पारपंरिक खेळांची रेलचेल आहे. यामध्ये लगोरी, रस्सीखेच, दोरीवरील उड्या, टायर पळविणे, पोत्यात पाय घालून पळणे, विटीदांडू, लेझीम पथक अशा विविध खेळ आणि कलाप्रकारांचे सादरीकरण करता येते. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. त्यामध्ये सहभाग नोंदविण्यासाठी शुल्क नाही. अंगभूत कलागुणांच्या सादरीकरणाला उत्तम व्यासपीठ म्हणून हॅपी स्ट्रीटला प्रत्येकांची पसंती मिळत आहे. गीत, नृत्य, मिमिक्री, नकला, समूहनृत्य, लोकनृत्य अशा विविध कलाप्रकारांचे धमाकेदार सादरीकरण होत असल्याने नागरिकांची उत्सुकता वाढली आहे. अनेक संस्था, संघटना यामध्ये सहभाग नोंदवित आहेत.

...

धोकादायक ई कचरा जमा करता येणार

सध्या शहरात घनकचऱ्याबरोबर ई कचऱ्याचा धोका वाढत चालला आहे. हा कचरा भंगारवाल्यांकडे दिला जात असून त्याची अशास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावली जात असल्याने त्यातून शहरवासीयांना धोका होऊ शकतो. यासाठी हॅपी स्ट्रीटमध्ये येस बँक व कॉन्झर्व्हेशन फाउंडेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ई कचरा संकलन केला जाणार आहे. येत्या रविवारी (२० जानेवारी) सायबर रोडवर तर २७ जानेवारीला सर्किट हाऊस रोडवरील हॅपी स्ट्रीटवर असलेल्या स्टॉलवर नागरिकांना ई कचरा जमा करता येणार आहे. कोणत्या प्रकारचा कचरा जमा करता येईल, यासाठी यतीश शहा (९८२२३३५२६६) व आशिष घेवडे (९८२२६५५४५६) यांच्याशी संपर्क साधावा.

.......................

सहभागी संस्था

कोल्हापूर डान्स असोसिएशन

अखिल भारतीय भूलतज्ज्ञ संस्था

शिवसंस्कार प्रतिष्ठान : मर्दानी खेळ

आम्ही कोल्हापूरकर वाद्यपथक : ढोल पथक

एफ ३ जीम : फिटनेस एरिना

वनिता ढवळे : बचपन गल्ली

गो बियाँड द लिमिटस : पारंपरिक खेळ

एस. के. रोलर स्केटिंग अॅकॅडमी : स्केटिंग एरिना

कोल्हापूर आर्ट फाऊंडेशन व विविध कला संस्था : आर्ट एरिना

शाकंभरी नेल्स अँड ब्युटी : मेहंदी व नेल आर्ट

विजयकुमार सोनी : माइंड गेम्स

वुशू असोसिएशन : महिला संरक्षण

व्हाइट आर्मी : आपत्कालीन मार्गदर्शन व रस्ता सुरक्षा

सायबर समाजकार्य विभाग : 'आजची स्त्री'विषयावर पथनाट्य

रोहन कालेकर : टॅटू

प्रसाद इव्हेंट्स : सेल्फी पॉईंट व कार्टून्स

राजेंद्र हंकारे : कॅलिग्राफी

बॅग पॅक, रॅम्प वॉक, रन विथ बॅग : कॅरी बॅग-ट्रॅव्हल बॅग ऑन रेंट

..........

कोटा की .. पान १

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचेउद्या विभागीय अधिवेशन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेतर्फे शनिवारी (ता.१९) विभागीय अधिवेशनाचे आयोजन केले आहे. नागाळा पार्क येथील बाळकृष्ण हवेली हॉलमध्ये दुपारी अडीच वाजता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते उद्घाटन होईल, अशी माहिती संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रमेश भोसले यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

भोसले म्हणाले, 'अनुकंपा तत्त्वावरील सेवा भरती विनाअट करावी, सेवानिवृत्त चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याच्या एका पाल्यास सेवेत विनाअट सामावून घ्यावे, कंत्राटी नियुक्तीचे धोरण रद्द करावे, गणवेशाऐवजी २५०० रूपये द्यावेत, पूर्वीची पेन्शन योजना सुरू करावी, कोतवालांना चतुर्थश्रेणीचा दर्जा द्यावा, चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांना शैक्षणिक पात्रतेनुसार तलाठी पदावर पदोन्नती द्यावी, या मागण्यासंबंधी पुढील आंदोलनाची दिशा अधिवेशनात स्पष्ट करण्यात येणार आहे. प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी २९, ३० जानेवारीला जिल्ह्यातील सर्व चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी काम बंद करून संपावर जाणार आहेत. त्यानंतरही सरकारने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल.' यावेळी स्वाती खोत, महेश पाटील, शिवाजी निकम, गणेश आसगावकर, कृष्णा नाईक आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातारा

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि साताऱ्याचे माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे प्रदीर्घ आजाराने गुरुवारी सकाळी सात वाजता मुंबईत निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. पार्किन्सन आजारामुळे त्यांच्यावर सध्या मुंबईतील जसलोक रुग्णालयात उपचार सुरू होते.

त्यांच्या मागे पत्नी सुमन, आमदार मकरंद पाटील, मिलिंद पाटील आणि नितीन पाटील हे मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. पाटील यांच्या पार्थिवावर मूळ गाव बोपेगाव (ता. वाई) येथे शुक्रवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. स्वातंत्र्यसैनिक किसन वीर यांचे अनुयायी म्हणून लक्ष्मणराव पाटील ओळखले जाते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जवळच्या नेत्यांपैकी ते होते. २५ फेब्रुवारी १९३८ रोजी जन्मलेले लक्ष्मणतात्या १९९९ ते २००९ या काळात सातारा मतदारसंघाचे खासदार होते.

लक्ष्मणराव पाटील गेली काही वर्षे पार्किन्सन्स या दुर्धर आजाराने त्रस्त होते. साताऱ्यातील प्रतिभा हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईला नेण्यात आले होते. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच सातारा, वाई तालुक्यासह अवघ्या जिल्ह्यावर शोककळा पसरली.कार्यकर्त्यांना ही बातमी समजताच वाई-खंडाळा-महाबळेश्वरसह सातारा, कोरेगाव येथील कार्यकर्ते मुंबईला मोठ्या प्रमाणात रवाना झाले. शरद पवार यांनी पाटील यांच्या विकासनगर येथील निवासस्थानी सायंकाळी सहा वाजता त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.

लक्ष्मणतात्यांचा जीवनपट

तात्या नावाने परिचित असणारे लक्ष्मणराव पाटील १९६० साली बोपेगावचे सरपंच झाले. वाई पंचायत समितीचे सभापती म्हणून त्यांनी १० वर्षे यशस्वीपणे काम केले. सन १९८० साली लक्ष्मणतात्या जिल्हा परिषदेवर निवडून गेले. सलग ११ वर्षे त्यांनी जिल्हा परिषदेचा गाडा समर्थपणे हाकला होता. सन १९९९ साली शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यानंतर जिल्ह्यात सर्वप्रथम तात्यांनीच राष्ट्रवादीचा झेंडा खांद्यावर घेतला. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे पहिले जिल्हाध्यक्ष झाले. सरपंच, तालुका पंचायत समिती सभापती, खरेदी विक्री संघ सभापती, कारखान्याचे चेअरमन, खासदार अशा विविध पदांवर काम करत असताना तात्यांनी कार्यकर्त्यांची मोट बांधली होती. रोखठोक आणि हजरजबाबीपणा हे तात्यांचे स्वभाव वैशिष्ट्य होते.

जुन्या पिढीतील दुवा निखळला - पवार

यशवंतराव चव्हाण आणि किसन वीर यांच्या विचारांनी समाजाला मार्गदर्शन व काम करणारा जुन्या पिढीतील राजकीय दुवा निखळला आहे. बोपेगाव ते नवी दिल्ली संसद असा राजकीय प्रवासात लक्ष्मणराव पाटील यांनी सर्वसामान्य माणसांचे हित जोपासण्याचे हित आयुष्यभर समोर ठेवले होते. किसन वीर चौकटीच्या बाहेर जाऊन कोणतीही भूमिका घेत नसत. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली लक्ष्मणतात्यांची वाटचाल झाली. तात्यांनीही शेवटपर्यंत चौकटीबाहेरची भूमिका घेतली नाही.

सामान्यांत मिसळणारा नेता : श्रीनिवास पाटील

लक्ष्णराव पाटील म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासूनचे शेलारमामा होते. आज महाराष्ट्रात सातारा जिल्हा म्हणजे राष्ट्रवादी आणि शरद पवार हे समीकरण प्रस्थापित होण्यासाठी लक्ष्मणतात्यांसारख्यांचे परिश्रम कारणीभूत होते. तात्या आज आपल्यात नाहीत याचे मनस्वी दुःख मला होत आहे. खऱ्या अर्थाने सामान्य माणसात मिसळणारा आणि जिल्हा परिषदेत अध्यक्ष म्हणून काम करून सातारा जिल्ह्यातील सर्वांचा विश्वास त्यांनी संपादन केला.

राजकारणापलीकडचे नाते - मदन भोसले

तात्यांना मी माझ्या वयाच्या १८व्या वर्षांपासून ओळखतो. आजपर्यंतच्या वाटचालीत कधी त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केले तर कधी समोरासमोर उभे ठाकावे लागले. काँग्रेसचे कार्यकर्ते असणारे तात्या राष्ट्रवादीत प्रवेशकर्ते झाल्यानंतर आमच्या वेगळ्या राजकीय वाटा गडद झाल्या. मात्र राजकीय मतभिन्नतेत त्यांनी मनभिन्नता कधीच येऊ दिली नाही. भासले आणि पाटील परिवारांतील राजकारणापलीकडचे नाते टिकवण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.

=================================

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


निधनवृत्त...

$
0
0

उमादेवी खापणे

कोल्हापूर : कसबा बावडा धनगर गल्ली येथील उमादेवी उमेशचंद्र खापणे (वय ४९) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

००००

अनंतराव घोरपडे

कोल्हापूर : मंगळवार पेठेतील अनंतराव शंकरराव घोरपडे (वय ७२) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

०००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुभंगलेली मने जुळणार का ?

$
0
0

खासदार महाडिक ... सतेज पाटील मनोमिलन झाल्यास राजकारणाला नवे वळण

मुन्ना.. बंटी फोटो

Gurubal.Mali@timesgroup.com

gurubalmaliMT

कोल्हापूर

दोस्तीचे आयडॉल असणाऱ्या दोन मित्रांत राजकारणाने दुरावा निर्माण केला. पहिल्या टप्प्यातील राजकीय दुराव्याने नंतर मनेही दुंभगली. राजकीय गरज म्हणून आता खासदार धनंजय महाडिक यांनी आमदार सतेज पाटील यांच्याकडे सहकार्यासाठी हात पुढे केला आहे. पण गेल्या दहा वर्षात केवळ नेतेच नव्हे तर कार्यकर्त्यांच्यापर्यंत सर्वांचीच जी मने दुंभगली आहेत, त्यावरून सध्या तरी पुन्हा मैत्रीचे वारे वाहणे अशक्य दिसत आहे. पण राजकीय गरज म्हणून तडजोड झालीच तर जिल्ह्यात आगामी राजकारणाला नवे वळण लागणार आहे.

लोकसभा निवडणुकीत दोन्ही काँग्रेसची आघाडी झाली आहे. आघाडीचे उमेदवार म्हणून खासदार महाडिक यांचे नाव निश्चित आहे. त्यांना सहकार्य करणार नाही, अशी उघड भूमिका आमदार सतेज पाटील यांनी मांडली. त्या पार्श्वभूमीवर मदतीसाठी त्यांना भेटण्याची तयारी खासदारांनी दाखवली. पाच वर्षापूर्वी अशाच भेटीने त्यांचा विजय सुकर झाला होता. पण नंतर विधानसभा निवडणुकीत घेतलेल्या भूमिकेने नवा संघर्ष सुरू झाला. महाडिक काका पुतण्यांच्या विरोधात खासदार राजू शेट्टी, आमदार हसन मुश्रीफ, प्रा.संजय मंडलिक, प्रकाश आवाडे यांना एकत्र आणण्यात आमदारांना यश आले. याउलट महादेवराव महाडिकांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी.एन. पाटील यांना सोबत घेत किल्ला लढवला. यामध्ये खासदार धनंजय महाडिक यांनी त्यांना साथ दिली. त्यामुळे काकांबरोबर असलेल्या संघर्षात नंतर खासदारही उतरल्याने सतेज _ धनंजय हा नवा वाद सुरू झाला.

गेल्या लोकसभा निवडणुकीत पाटील यांनी खासदारांचा प्रचार केला. वैर विसरून घरी गेल्याने दोघांची दोस्ती पुन्हा बहरेल असे वाटत असतानाच सहा महिन्यात विधानसभा निवडणुकीत सारेच फासे उलटले. पाच वर्षात या दोघांनी एकमेकांवर जोरदार आरोप प्रत्यारोप केले. अनेकदा खालच्या पातळीवर जाऊन केलेल्या टीकेमुळे दुरावा आणखी वाढला. लोकसभा निवडणुकीत दोन्ही काँग्रेसची आघाडी झाल्याने इतिहासाची पुनरावृत्ती होण्याची वेळ आली आहे.

नेत्यांनी आदेश दिला तर सतेज पाटील यांना भेटू, असे सांगत खासदारांनी मैत्रीचा हात पुढे केला आहे. आता त्यांना सहकार्याची गरज आहे. पक्षातील विरोध मावळला असताना काँग्रेसमधील एका गटाचा विरोध त्यांना त्रासदायक ठरणार आहे. यामुळेच एक पाऊल मागे घेऊन त्यांनी भेटीचा निर्णय घेतला. पण हे सांगताना त्यांनी टीकाटिप्पणी केली. ज्यांच्याकडे आपण मदत मागतोय, त्यांच्यावरच टोलबाजी केल्याने त्याचेही पडसाद उमटतील. दोघांत गेल्या काही वर्षात जो दुरावा निर्माण झाला आहे, तो केवळ राजकीय नाही. मनेही दुंभगली आहेत. ते त्यांच्या कार्यकर्त्यांपर्यंतही पाझरत गेले आहे. नेत्यांनी आदेश देऊन अथवा खिंडीत पकडून मनोमिलन होण्यासारखी परिस्थिती आता राहिली नाही. यामुळे महाडिक यांनी हात पुढे केला असला तरी समोरून किती प्रतिसाद मिळणार हा प्रश्न अनुत्तरित आहे.

लोकसभेला मदत केल्यास भविष्यकाळात मदत करू, असा शब्द आज महाडिक देत आहेत. पण दक्षिण मतदारसंघात पुन्हा अमल विरूध्द सतेज लढाई झाली तर ते कशी मदत करणार ? तेव्हा पाटील उत्तरेचा पर्याय निवडणार का, विधानपरिषदेचा त्यांचा मार्ग मोकळा करणार का ?, असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. जोपर्यंत या प्रश्नांची उत्तरे मिळणार नाहीत तोपर्यंत लोकसभेचा तिढा सुटणे अवघड आहे.

...............

चौकट

आघाडी धर्म पाळणार ?

ज्येष्ठ नेते शरद पवारांना एकेक खासदार महत्वाचा आहे. त्यामुळे दोन महिन्यात तीनवेळा कोल्हापुरात येऊन त्यांनी जुळवाजुळव केली. अजूनही शंभर टक्के जुळवाजुळव झालेली नाही. डॉ. डी.वाय. पाटील यांच्या हातात 'घड्याळ' बांधून आमदार पाटील यांच्यावर काही बंधने घातली. पवार त्यांना आदेशही देतील. पण मनापासून काही मदत होईल असे सध्याचे चित्र दिसत नाही. खासदारांनी एक पाऊल मागे घेतले तरी काकांची भूमिका विरोधाचीच राहण्याची चिन्हे आहेत. यामुळे हा मुद्दाही अडचणीचा ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर आघाडी धर्म पाळण्याची वेळ आमदार पाटील यांच्यावर आल्यास ते काय करणार हे महत्वाचे ठरणार आहे. टोकाचा विरोध कायम राहणार की शांत राहून 'धर्म' पाळत 'ध्येय' पूर्ण करणार हे दोन महिन्यात कळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चाऱ्यासाठी मागेल त्याला बियाणे

$
0
0

गुड न्यूज लोगो...

जिल्हा परिषदेचा लोगो वापरावा

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पशुधनासाठी आवश्यक चारानिर्मिती व दुष्काळी भागासाठी चारापुरवठा असा दुहेरी उद्देश ठेवून जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने मोहीम हाती घेतली आहे. यासाठी शंभर टक्के अनुदानावर मागेल त्याला बियाणे पुरवठा हे सूत्र ठरविले आहे. चारा साक्षरता अभियानांतर्गत चाऱ्याच्या योग्य नियोजनासह बियाणांच्या पुरवठ्याबाबत प्रबोधन होणार आहे. यंदा एक लाख २५ हजार ९२२ मेट्रिक टन चार उत्पादनासाठी प्रयत्न सुरू आहेत.

दुष्काळी जिल्हे व तालुक्यांतील पशुधनासाठी सुमारे ४५ हजार मेट्रिक टन चारा पाठविण्यासाठी जिल्ह्यात आवश्यक बियाणांची लागवड केली जाणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात गाय, म्हैस वर्गातील पशुधनांची संख्या ८ लाख ८८ हजार ८११ आहे. दरम्यान, यंदा कोल्हापूर जिल्ह्यातील २०१ दुष्काळी गावे म्हणून घोषित केली आहेत. दुसरीकडे जिल्ह्यात पशुधन मोठे आहे. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून घरोघरी दुग्धव्यवसाय केला जातो. जिल्ह्यात चाऱ्याचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनाने पावले उचलली आहेत.

जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडील विविध योजनांतर्गत १०० टक्के अनुदानावर आफ्रिकन टॉल मका, ज्वारी, बाजरी, न्यूट्रीफिड अशा वैरण पिकांचे ३९ हजार ८१३ किलोग्रॅम बियाणांचा पुरवठा केला आहे. त्याचा १५ हजार ५०१ शेतकऱ्यांना लाभ झाला आहे. जिल्ह्याच्या विविध भागात मिळून १५८८ हेक्टर क्षेत्रावर बियाणांची लागवड केली आहे. त्यापासून अंदाजे १ लाख २५ हजार ९२२ मेट्रिक टन वैरण उत्पादन होणार आहे.

जिल्हा परिषदेने २० लाख रुपयांची तरतूद केली होती. शिवाय ७५ किलो ज्वारी व ७५ किलो मका बियाणांचे वाटप केले आहे. चारा अभियानाला गती मिळावी म्हणून चारा साक्षरता अभियान सुरू केले आहे. प्रबोधन रथ गावोगावी जाऊन चारा लागवडीसाठी मोफत बियाणांचे वाटप केले जाणार आहे. चाऱ्याचे योग्य नियोजन, दूध उत्पादनातील वाढीसंदर्भात मार्गदर्शन व्हावे हा यामागील उद्देश आहे.

०००

वीस लाखांचा नव्याने प्रस्ताव

'चाराटंचाई निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनाने नियोजन केले आहे. तीन हजार हेक्टरवर चारा बियाणांची लागवड करण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पाला अर्थसाह्य मिळावे म्हणून जिल्हा नियोजन समितीकडे २० लाख रुपयांचा प्रस्ताव सादर केला आहे. चारानिर्मितीसाठी मागेल त्याला बियाणे वितरित करण्यात येत आहेत,' अशी माहिती पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी संजय शिंदे यांनी दिली.

००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालकमंत्र्यांच्या घरावरतीस जानेवारीला मोर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शेतमजुरांच्या विविध प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्याकडे भाजप सरकार दुर्लक्ष करत आहे. वारंवार पाठपुरावा करूनही सरकार दखल घेत नसल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन लाल बावटा व शिरोळ तालुका श्रमिक कष्टकरी शेतमजूर संघटना कृती समितीतर्फे ३० जानेवारीला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती युनियनचे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड भाऊसाहेब कसबे व कॉम्रेड चंद्रकांत यादव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कसबे म्हणाले, 'शेतमजुरांच्या प्रश्नांची सोडवणूक व्हावी म्हणून गेल्या चार वर्षांच्या कालावधीत वारंवार सरकार दरबारी प्रयत्न केले. तीन मंत्र्यांना भेटून निवेदने दिली. मात्र, राज्यकर्त्यांना कष्टकरी, कामगार, शेतमजुरांच्या प्रश्नांचे गांभीर्य नाही. शेतमजुरांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करावे, भूमिहीन शेतमजूर कुटुंबांसाठी जागा व घर बांधणीसाठी अनुदान मिळावे. शेतमजुरांना विनाअट अन्नसुरक्षा योजनेचा लाभ मिळावा, दोन लाखांपर्यंत वैद्यकीय खर्च मोफत मिळावा, वृद्ध निराधारांना महिन्याला २००० रुपयांचे अनुदान मिळावे, या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येणार आहे.'

पत्रकार परिषदेला युनियनचे जिल्हा सचिव अण्णासाहेब रड्डे, वत्सला भोसले, संजय टेके, अरुण मांजरे, शिवाजी कोळी, युनुस मुजावर, लक्ष्मण वायदंडे, आदी उपस्थित होते.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डी. डी. शिंदे स्मृती स्पर्धांचा बक्षीस वितरण

$
0
0

२ कॉ. फोटो...

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

विद्यापीठ शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष डी. डी. शिंदे सरकार स्मृती स्पर्धांचा बक्षीस वितरण संस्थेचे चेअरमन अॅड. धनंजय पठाडे यांच्या अध्यक्षतेखाली झाला. 'थोरामोठ्यांचा स्मृतिदिन हा त्यांच्या कार्यापासून स्फूर्ती घेण्यासाठी असतो,' अस मत अॅड. पठाडे यांनी व्यक्त केले. याप्रसंगी संस्थेचे सेक्रेटरी अॅड. प्रशांत चिटणीस यांची बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अॅड. पठाडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी 'नक्षत्रवल्ली' दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. सोसायटीचे अध्यक्ष विकास जोशी, उपाध्यक्ष विजयराज नगरशेठ, किरण रेडेकर, प्रदीप मगदूम, अजयसिंह चिले, आदी उपस्थित होते. यावेळी एस. बी. सोनार, बी. डी. कुंभार, के. एस. गावडे, प्रा. एस. वाय. कुंभार यांनी मनोगत व्यक्त केले.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images