Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

महाडिक यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लोकसभेसाठी दावा करणारे आमदार हसन मुश्रीफ राज्यातच हवेत, असे सांगत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी धनंजय महाडिक यांच्या लोकसभा उमेदवारीचा मार्ग मोकळा केला, याच दरम्यान, लोकसभा आणि विधानसभेला जनता दलाची ताकद मिळणार असल्याचे संकेतही मिळाले. सर्वात महत्वाचे म्हणजे खासदार राजू शेट्टी यांची बाजू सांभाळत पवारांनी स्वाभिमानी संघटना आघाडीत सहभागी होणार असल्याच्या प्रक्रियेला पुष्टी दिली.

नोव्हेंबर, डिसेंबरनंतर सलग तिसऱ्या महिन्यात पवारांचा कोल्हापूर दौरा झाला. ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांचा सत्कार हा या दौऱ्यातील महत्वाचा कार्यक्रम. पण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय जुळवाजुळव करण्यास हा दौरा उपयोगी ठरला. आमदार मुश्रीफ यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे महाडिक यांच्या उमेदवारीवर पुन्हा प्रश्नचिन्ह उभे राहिले. पण पवारांच्या दौऱ्यात त्यावर पडदा पडला. मुश्रीफ यांची गरज राज्यात असल्याचे सांगत त्यांनी महाडिक यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा केला.

गडहिंग्लज परिसरात जनता दलाची ताकद आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ही ताकद राष्ट्रवादीसोबत रहावी यासाठी पवारांनी प्रयत्न केले. यामुळे त्याचा निश्चितच फायदा होणार आहे. नगराध्यक्ष स्वाती कोरी यांना राष्ट्रवादीत येण्याचे आमंत्रण देत पक्षाला आणखी ताकद मिळावी यासाठी पवारांनी पुढाकार घेतला आहे. तसे झाल्यास गडहिंग्लज भागात पक्षाला मोठी ताकद मिळणार आहे. त्यामुळे हा दौरा महत्वपूर्ण ठरणार आहे.

खासदार शेट्टी यांची ताकद दोन्ही काँग्रेस बरोबर रहावी यासाठी पवारांचे गेले अनेक महिने प्रयत्न सुरू आहेत. त्यांना आघाडीची उमेदवारी देण्याचे संकेत यापूर्वीच दिले आहेत. खासदार शेट्टी गेले काही दिवस साखर कारखानदारांविरोधात आंदोलन करत आहेत. त्यामुळे नेहमीप्रमाणे पवार त्यांना टोला मारतील अशी अपेक्षा होती. पण तसे न करता त्यांनी शेट्टींना सांभाळून घेतले. यावरून स्वाभिमानी लोकसभेला सोबत असणार हे स्पष्ट झाले. पवारांच्या कोल्हापूर दौऱ्याने त्यावर शिक्कामोर्तबच केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सहाशे कोटींची गुंतवणूक कर्नाटकात

$
0
0

Gurubal.mali@timesgroup.com

gurubalmaliMT

कोल्हापूर : औद्योगिक विजेची सातत्याने होणारी दरवाढ आणि राज्य सरकारच्या लालफितीच्या कारभाराला कंटाळलेल्या उद्योजकांनी विस्तारीकरणासाठी कर्नाटकाचा रस्ता धरला आहे. त्यामुळे सहाशे कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणार आहे. महाराष्ट्र सरकारने वीजदरवाढीने हैराण झालेल्या उद्योग जगताची तातडीने दखल घेतली नाही तर जिल्ह्यातील आणखी बरेच उद्योजक कर्नाटकात विस्तारीकरण करतील. त्यातून सुमारे दोन हजार कोटींची गुंतवणूक महाराष्ट्राबाहेर जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

कोल्हापूर, इचलकरंजी आणि सांगली परिसरात फाउंड्री उद्योग जोरात आहे. येथे तयार होणारे वाहनांचे सुटे भाग निर्यात होतात. अनेकांनी विस्तारीकरण करण्याचे नियोजन केले आहे. मात्र विजेच्या दरातील भरमसाठ वाढीमुळे अडचणींचा डोंगर वाढू लागला आहे. कर्नाटक, गोवा, गुजरातमध्ये कमी दरात वीज उपलब्ध होत असल्याने उत्पादन खर्चही कमी आहे. मात्र जिल्ह्यात विजेचा दर ११ रूपये २५ पैसे प्रति युनिट आहे. अन्य राज्यांच्या तुलनेत हा दर अडीच रूपयांनी जास्त आहे. त्यामुळे इचलकरंजी परिसरातील शंभरावर उद्योजक बोरगाव, माणकापूर येथे सहाशे कोटीची गुंतवणूक करणार आहेत.

वीजदरवाढ कमी करावी, यासाठी उद्योजकांनी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह मुख्यमंत्र्यांचीही भेट घेतली. मात्र आश्वासनाशिवाय काहीच मिळाले नाही. येत्या एप्रिलपासून आणखी वीस टक्के दर वाढवण्याचा करार केला आहे. त्यामुळे उद्योजक त्रस्त झाले आहेत. त्यातूनच कर्नाटकात विस्तारीकरणाची मानसिकता रुजत आहे. इचलकरंजीतील शंभरावर उद्योगांसाठी माणकापूर, बोरगाव तसेच चिकोडी येथे कर्नाटकने कमी दरात जागा, वीज व पाणी देण्याची ग्वाही दिली आहे. त्यानंतर कोल्हापूर व सांगली परिसरातील फाउंड्री, टेक्सस्टाइल आणि मशीन शॉप उद्योजकही त्या राज्यात गेल्यास या भागातील दोन हजार कोटीच्या गुंतवणुकीवर पाणी पडणार आहे. यामुळे राज्य सरकारने तातडीने यामध्ये लक्ष घालण्याची गरज आहे.

.. .. ..

वीजदरप्रश्नी सरकारदरबारी अनेकदा दाद मागूनही दुर्लक्ष करण्यात आले. या परिस्थितीत उद्योग सुरू ठेवणे कठीण आहे. यामुळे उद्योग स्थलांतरित करण्याऐवजी विस्तारीकरण करण्याचा निर्णय शंभरांवर उद्योजकांनी घेतला आहे.

शीतल केटकाळे, अध्यक्ष, 'स्लिमा,' इचलकरंजी

.. ..

विदर्भ व मराठवड्यात कमी दराने वीज देणाऱ्या सरकारला पश्चिम महाराष्ट्रातील उद्योग मोडीत काढायचे आहे, असे दिसते. उद्योगासाठी कर्नाटकातून सवलतींचा वर्षाव सुरू आहे. त्यामुळे उद्योजक तिकडे विस्तार करण्याच्या तयारीत आहेत.

गणेशप्रसाद भांबे, अध्यक्ष, उत्कर्ष उद्योजक संस्था

.. .. .

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थेट पाईपलाईनवरुन होणार महासभेत घमासान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहराच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या काळम्मावाडी थेट पाईपलाईनचे काम गेल्या पाच वर्षांपासून सुरू आहे. कामाच्या वस्तुस्थितीचा सभागृहात लेखाजोखा मांडण्यासाठी भाजप-ताराराणी आघाडीकडून सदस्य ठराव शुक्रवारी (ता.१८) होणाऱ्या महासभेत येणार आहे. श्वेतपत्रिका काढण्याची मागणी करण्यात आलेल्या ठरावामुळे महासभेत सत्तारुढ काँग्रेस-राष्ट्रवादी व विरोधी आघाडीत वादळी होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पंचगंगा नदी प्रदूषण रोखण्यासाठी शहरातील १२ नाले अडवण्यासाठी जागा आरक्षित करण्याच्या ठरावावर चर्चा होईल.

शहराला थेट पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी गेल्या पाच वर्षांपासून काळम्मावाडी योजनेचे काम सुरू आहे. योजनेला गती देण्यासाठी नुकतीच महापौर सरिता मोरे व उपमहापौर भूपाल शेटे यांनी बैठक घेऊन प्रशासनाला योजनेला गती देण्यासाठी सूचना केल्या होता. त्यानंतर होणाऱ्या सभेत श्वेत पत्रिका काढण्याचा सदस्य ठराव भाजप-ताराराणीकडून दाखल केला आहे. गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या कामाबाबत विरोधी आघाडीकडून सत्तारुढ गटाची कोंडी करण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यामुळे शुक्रवारची महासभेत घमासान होण्याची शक्यता आहे.

अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्यानुसार दर्शन मंडप बांधण्यासाठी रि. स. नं. ४६२ 'अ' मंजूर करण्यात आली होती. दर्शन मंडपासोबत वाहनतळासाठी जागा आरक्षित ठेवण्याचा निर्णय झाला होता. वाहन तळाऐवजी दर्शन मंडप कायम ठेवावा असा प्रस्ताव नगररचना विभाग महासभेत मांडणार आहे. याबरोबर कोळेकर तिकटी ते सणगर गल्ली व बोडके तालीम ते पद्माराजे हायस्कूल पर्यंतच्या रस्त्याला ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक यशवंत भालकर यांचे व पांजरपोळ रस्त्याला पै. साजिद गुलाबखान उस्ताद (मेस्त्री) यांचे नाव देण्यासाठी सदस्य ठराव महासभेत चर्चेला येणार आहे.

चौकट

दोन वर्षांपूर्वी बांधकाम परवाने एकाच ठिकाणाहून देण्यासाठी तत्कालीन आयुक्त पी. शिवशंकर यांनी विभागीय कार्यालयाकडून नगररचना विभागाला अधिकार दिले. गेल्या दोन वर्षांपासून सर्वप्रकारचे बांधकाम परवाने नगररचना विभागाकडून दिले जात आहेत. मात्र त्यामध्ये बदल करण्यासाठी २०० चौ. मीटर आतील बांधकामाना परवाना देण्याचा अधिकार विभागीय कार्यालयांना देण्यात यावा, या मागणीचा ठराव महासभेत येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

कोल्हापूर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात झाले. विद्यार्थ्यांनी शिवकालीन प्रसंगावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम, लोकनृत्ये, देशभक्तीपर गीत सादरीकरणाने धमाल केली.

भाजप महानगर अध्यक्ष संदीप देसाई, संस्थेचे उपाध्यक्ष एस.डी.बनछोडे, स्कूल कमिटीचे चेअरमन आर.एम.जौंदाळ, नगरसेविका उमा बनछोडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संस्थेचे सचिव पी. एस. वडगावकर, संस्था समन्वयक एम. एस. आवटे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यानंतर विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे सादरीकरण केले. विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांची उधळण करत पालकांची मने जिंकली.

मुख्याध्यापक व्ही. डी. हिरेमठ यांनी प्रास्ताविक केले. के. एस. जौंदाळ यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. शिक्षक एच. ए. वाघमारे, एस. एस. चव्हाण, व्ही. यू. माळकर यांनी सूत्रसंचालन केले. शिक्षिका एस. डी. लोंढे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला मुख्याध्यापिका गीता काळे, गिरीजा जोशी, सरदार पाटील, अर्चना पाटील, स्मिता पाटील,एस. ए. चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यावरण बालनाट्य स्पर्धा ११ फेब्रुवारीला

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

इकोफोक्स व्हेंचर्स, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि प्रतिज्ञा नाट्यरंग संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय माध्यमिक पर्यावरण बालनाट्य महोत्सव ११ फेब्रुवारी रोजी आयोजित केला आहे. राम गणेश गडकरी सभागृहात ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धेसाठी पर्यावरण रक्षण या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित नाटक सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

विद्यार्थी दशेतच मुला-मुलींमध्ये पर्यावरण रक्षणाविषयी जागरूकता निर्माण व्हावी तसेच अंगभूत अभिनयकलेला योग्य व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने हा महोत्सव आयोजित केला जातो. ग्रामीण व शहरी विभागासाठीची स्वतंत्र पारितोषिकांसह माध्यमिक शिक्षकांना पर्यावरणपर लेखन, दिग्दर्शनास प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून यावर्षी लेखन, दिग्दर्शन, सांघिक सर्वोत्कृष्ट बालनाट्य यांसाठी रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत.

सहभागी होण्यासाठी १०० रूपये प्रवेशमूल्य असून अर्ज करण्याची मुदत ५ फेब्रुवारीपर्यंत आहे. किमान १० तर कमाल १२ मिनिटांचा वेळ सादरीकरणासाठी देण्यात येणार आहे. ग्रामीण व शहरी अशा दोन विभागांमध्ये स्पर्धा होणार असून यासाठी शालेय संघांनाच सहभागी होता येणार आहे. मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेतून नाटक सादर करता येऊ शकते तसेच लेखन व दिग्दर्शन शाळेतील शिक्षकांनीच केलेले असावे अशी माहिती संयोजकांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासदार विजयसिंह मोहितेंचा अमृतमहोत्सवानिमित्त सत्कार

$
0
0

खासदार विजयसिंह मोहितेंचा

अमृतमहोत्सवानिमित्त सत्कार

सोलापूर :

माजी उपमुख्यमंत्री आणि खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त उत्तर सोलापूर तालुका गौरव समितीच्या वतीने सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी, १७ जानेवारी रोजी उत्तर सोलापूर तालुक्यातील तिऱ्हे येथे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते, सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख व महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सत्कार सोहळा होणार असल्याची माहिती गौरव समितीचे पदाधिकारी राजू सुपाते, भारत हरिभाऊ जाधव व राजू पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शाल, पुष्पहार, बुके आणि प्रतिमा असे अमृतमहोत्सवी सत्कार सोहळ्याचे स्वरूप आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सामाजिक उपक्रम म्हणून मुळेगाव येथील संस्कार संजीवनी फाउंडेशन संचलित आदिवासी पारधी विद्यार्थी आश्रम व सोलापुरातील दत्त चौकातील पाखर संकुल या दोन संस्थांना नित्योपयोगी साहित्य भेट देण्यात येणार आहे. पाच शेतकऱ्यांचाही सन्मानही केला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चाफळला सौभाग्याचा वसा घेण्यासाठी महिलांची गर्दी

$
0
0

ओळी

श्रीराम मंदिरात सीतामाईच्या दर्शनासाठी महिलांची झालेली गर्दी.

चाफळला सौभाग्याचा वसा घेण्यासाठी महिलांची गर्दी

म. टा. वृत्तसेवा, कराड

तीर्थक्षेत्र चाफळ येथील श्रीराम मंदिरात सीतामाईचे पूजन करून मंगळवारी हजारो महिलांनी अखंड सौभाग्याचा वसा घेतला. नऊवारी साड्यांच्या वेशभूषेत स्नेहपूर्वक एकत्र आलेल्या व हळदी-कुंकवाने लाल-पिवळ्या झालेल्या सुवासीनींनी 'तीळ नव्हे हलवा, येता-जाता बोलवा', 'तीळगुळ घ्या गोड बोला' असे म्हणत सीतामाईची यात्रा आणि संक्रांत मोठ्या श्रद्धेने साजरी केली.

मकर संक्रातीला सीतामाईचे दर्शन घेऊन तिच्याकडून अखंड सौभाग्याचा वसा घ्यायचा. यामुळे सौभाग्य अखंड टिकते, अशी श्रद्धा महिलांमधून जोपासली जाते. मंगळवारी सीतामाई यात्रेसाठी मंदिराच्या आवारात सकाळपासूनच महिलांनी गर्दी केली होती. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास महिलांच्या गर्दीत वाढ होत गेली. सुवासीनी मिळेल त्या ठिकाणी महिला विडे मांडून मनोभावे पूजा करीत होत्या. भरजरी काठांची साडी, सुवर्णालंकार, केसात फुलांनी माळलेले सुगंधी गजरे, अशा सजलेल्या वेशभूषेत अनेक महिलांनी ववसा व विडा घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. महिलांनी संक्रातीमध्ये (सुगडीमध्ये) तीळ, गाजर, गुळ, बोरे, ऊस, पावटा, गव्हाच्या लोंब्या, शेंगा, हरभरा, बिबी, घेवडा घेऊन श्रद्धापूर्वक सीतामाईचा वसा घेतला. सुवासिनीनी प्रथम सीतामाईस ओवाळले व नंतर दुसऱ्या सुवासिनींना ओवसले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अडगळीचा ‘सरकारी’ कारभार

$
0
0

Bhimgonda.Desai@timesgroup.com

Tweet : @bhimgondaMT

कोल्हापूर : येथील भवानी मंडपातील पागा बिल्डींगमधील जिल्हा कौशल्य विकास रोजगार, उद्योजकता मार्गदर्शक केंद्रासह विविध विभागांची चार सरकारी कार्यालये अडगळीच्या स्थितीत आहेत. करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी आलेले भाविक, या परिसरात आणि महाद्वार रोडवर खरेदीसाठी आलेले नागरीक दिवसभर कार्यालयासमोर, परिसरात आपली वाहने पार्क करतात. परिणामी अधिकारी, कर्मचाऱ्यांना वाहनेही लावता येत नाहीत अशी स्थिती असते. अनेकवेळा या परिसरात पादचाऱ्यांनाही अडथळ्यांशी सामना करावा लागतो.

शाहू कालीन पागा इमारतीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे विद्युत, शहर विद्युत निरीक्षक, राष्ट्रीय महामार्ग उपविभाग, कौशल्य केंद्राचे वाचनालय अशा चार विभागांची कार्यालये आहेत. गेल्या चार दशकांपासून ही कार्यालये तिथेच आहेत. विद्युत विभागाच्या कार्यालयातून शहर, जिल्ह्यातील सरकारी इमारतीमधील विद्युतीकरणाचे काम चालते. कौशल्य व रोजगार केंद्रातून नागरिकांमध्ये रोजगार, उद्योजकतेसाठी प्रोत्साहन, मार्गदर्शन केले जाते. या दोन्ही कार्यालयात दररोज मोठ्या संख्येने लोक येतात. रोजगार केंद्रात तरुणाईची वर्दळ अधिक असते. सरकारी कार्यालयांत कामासाठी येणारे अनेजण दुचाकीने येतात. त्यांनी आणि इतरांनी लावलेल्या दुचाकींनी हा परिसर व्यापलेला असतो. महाद्वार रोड अथवा भवानी मंडप परिसरात शॉपिंगसाठी येणाऱ्यांना दुचाकी वाहने येथे लावू नये, असे कर्मचाऱ्यांनी सांगितल्यानंतर वादावादीचे प्रसंग घडत आहेत. कोणीही, कुठेही आणि कसेही गाडीचे पार्किंग केल्याचे येथे दिसते.

पागा इमारतीमधील सर्वच कार्यालयांत जागा कमी असल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांना अडगळीत बसावे लागते. कार्यालयात फायली ठेवण्यासाठी जागा अपुरी आहे. खिडक्यांचे दरवाजे तुटले आहेत. एसींचे वायर जागोजागी लटकत आहेत. शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. स्वच्छतागृहांची नियमित स्वच्छता केली नसल्याने त्याची दुर्गंधी सुटलेली दिसते. कार्यालयात हवा खेळती राहत नसल्याचे एकप्रकारचा कुबट वास येतो. कामानिमित्त आलेल्यांसाठी येथे बसण्यासाठी आसन व्यवस्था नाही. बाहेर गोंगाट, परिसरातील कोंदट वातावरण, बाहेर बेशिस्त पार्किंग अशा स्थितीमध्ये अधिकारी, कर्मचारी काम करीत आहेत.

जप्त वाहनेही तिथेच

जुना राजवाडा पोलिसांनी जप्त केलेली अलिशान वाहनेही पागा इमारतीच्या आवारात एका बाजूला पार्क केलेली आहेत. या वाहनांवर धुळीचे ढीग साचले आहेत. येथे प्रचंड अस्वच्छता आहे. कार्यालयात कामानिमित्त आलेले लोक, अधिकारी, कर्मचारी वगळता इतरांच्या पार्किंगवर कारवाई करावी, अशी मागणी तेथील विद्युत निरीक्षक विभाग आणि उद्योजकता केंद्राच्या प्रशासनाने पोलिसांकडे केली. मात्र पोलिसांनी कारवाईकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे. पोलिसांनी जप्त केलेली वाहने तेथेच पार्क केल्याने कारवाई करण्याचे नैतिक धाडस त्यांच्यात नसल्याचा आरोप होत आहे.

दारूच्या पार्ट्या, कचऱ्याचे ढीग

येथे रोज परिसरातील कचरा वापराविना पडून असलेल्या मोठ्या पाइपमध्ये टाकून जाळला जातो. त्याचा धूर दिवसभर धुमसत असतो. या पाईपमध्येच बड्या कंपन्यांच्या दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच पडलेला दिसतो. त्यामुळे रात्रीच्यावेळत्या कार्यालयासमोर आणि परिसरात बसून काहींच्या दारूच्या पार्ट्या रंगत असल्याचे स्पष्ट होते. शहराच्या मध्यवस्तीत आणि जुना राजवाडा पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असे प्रकार चालत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.

कार्यालयासमोर आणि परिसरात दररोज मोठ्या संख्येने दुचाकी पार्क केल्या जातात. कार्यालयात येणाऱ्यांना या पार्किंगचा अडथळा ठरत आहे. जुना राजवाडा पोलिसांकडे यासंबंधीची तक्रार केली आहे. त्यांच्याकडून कारवाई होत नाही. उद्योग केंद्राचे कार्यालय दुसरीकडे स्थलांतरीत करण्यासाठी सरकारी इमारतींमध्ये जागेचा शोध सुरू आहे. मात्र आवश्यक जागा उपलब्ध नाही.

- ज. बा. करीम, सहायक संचालक, जिल्हा कौशल्य विकास रोजगार, उद्योजकता मार्गदर्शक केंद्र

लोगो : ऑन दी स्पॉट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जयसिंगपुरात फेब्रुवारीत राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने जयसिंगपुरात ३ ते ६ फेब्रुवारी या कालावधीत राज्यस्तरीय निमंत्रित व्यावसायिक पुरुष व महिला कबड्डी स्पर्धांचे आयोजन केले आहे. महाराष्ट्र व कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने दसरा चौकातील राजर्षी शाहू स्टेडियमध्ये स्पर्धा होणार आहेत. दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

जयसिंगपूर येथे शाहू स्टेडियममध्ये प्रथमच चार मॅट्सवर प्रकाशझोतात कबड्डी स्पर्धा होणार आहेत. स्पर्धेमध्ये एकूण ६०० खेळाडू सहभागी होत आहेत. पुरुष गटातील विजेत्या संघांना अनुक्रमे १ लाख ११ हजार, ७५ हजार, २५ हजार रुपयांची रोख बक्षीसे व चषक, सर्वोत्कृष्ट खेळाडू २१ हजार, उत्कृष्ट चढाई व उत्कृष्ट पकड प्रत्येकी ११ हजार अशी वैयक्तिक बक्षीसेही देण्यात येतील. महिला गटातील विजेत्यांना अनुक्रमे ५१ हजार, ३१ हजार, १५ हजार, सर्वोत्कृष्ट खेळाडू ११ हजार, उत्कृष्ट चढाई व उत्कृष्ट पकड प्रत्येकी ५ हजार व चषक अशी बक्षीसे देण्यात येणार आहेत.

स्पर्धेत पुरुष गटात एअर इंडिया (मुंबई), भारत पेट्रोलियम, महिंद्रा अँड महिंद्रा, मुंबई बंदर, नाशिक आर्मी, बीईजी पुणे (आर्मी), मुंबई पोलिस, महाराष्ट्र पोलिस, सेंट्रल रेल्वे, ठाणे पोलिस, युनियन बँक, देना बँक, बँक ऑफ इंडिया, महाडिक उद्योगसमूह, इन्कम टॅक्स (पुणे), जे. जे. हॉस्पिटल (मुंबई) हे संघ सहभागी होणार आहेत. महिलांच्या गटात शिवशक्ती (मुंबई), महालक्ष्मी (कोल्हापूर), मुंबई पोलिस जिमखाना, शिवतेज (ठाणे), स्वराज्य (मुंबई उपनगर), राजमाता जिजाऊ (पुणे), म. गांधी (मुंबई उपनगर), धर्मवीर (पुणे), कुर्लाई (पालघर), संघर्ष (मुंबई उपनगर), एमडी स्पोर्टस (पुणे), शिवाजी उदय (सातारा), जय हनुमान (बाचणी), डायनॅमिक (इचलकरंजी) हे संघ सहभागी होणार आहेत.

यावेळी राज्य कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष संभाजीराव पाटील, आंतरराष्ट्रीय पंच प्रा. रमेश भेंडीगिर, प्रा. आण्णासाहेब गावडे, सर्जेराव पवार, अमरसिंह निकम, मिलींद शिंदे, अशोक कोळेकर, योगेश पुजारी, दरगू गावडे, चंद्रकात जाधव, बाळासाहेब बनगे यांसह ट्रस्ट व क्रीडा मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

नामवंत खेळाडूंचा सहभाग

या कबड्डी स्पर्धेत रोहित राणा (यू मुम्बा), विशाल माने (दबंग दिल्ली), रिषांक देवाडिगा (यूपी योद्धा), गिरीश इरनाक (पुणेरी पलटण), नीलेश शिंदे (बंगाल वॉरिअर्स), मोनू गायल (हरियाणा स्टीलर्स), नीलेश साळुंखे (तेलुगू टायटन्स), सिद्धार्थ देसाई (यू मुम्बा), ऋतुराज कोरवी (गुजराथ फॉर्च्युन), तुषार पाटील (पटणा पायलट), महेश मगदूम (बेंगलोर बुल्स), आनंदा पाटील (दबंग दिल्ली) या नामवंत खेळाडूंच्या खेळाचा थरार अनुभवण्याची संधी क्रीडाप्रेमींना लाभणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॉमर्सच्या माजी विद्यार्थ्यांचीरविवारी मॉर्निंग रॅली

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

'देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्सच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. मेळाव्यात अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे यासाठी रविवारी (ता. २०) सकाळी ७.३० वाजता कॉमर्स कॉलेजपासून जनजागृती मॉर्निंग रॅली काढण्यात येणार आहे' अशी माहिती माजी विद्यार्थी संघटनेचे सचिव प्रमोद जगताप यांनी दिली.

सचिव जगताप म्हणाले, 'कॉमर्स कॉलेजची स्थापना १९५७ मध्ये झाली. कॉलेजमध्ये शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक व प्रशासन आदी क्षेत्रात उच्चपदांवर कार्यरत आहेत. अशा सर्व माजी विद्यार्थ्यांना एकत्र करुन जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी मेळाव्याचे आयोजन केले आहे. विद्यार्थी मेळाव्यासाठी स्थापनेपासून ते आतापर्यंतच्या विद्यार्थ्यांना सहभागाचे निमंत्रण देण्यात आले आहे. नऊ व दहा फेब्रुवारी असा दोन दिवस विद्यार्थी मेळावा होईल. नऊ फेब्रुवारी रोजी कॉमर्स कॉलेज येथे तर दहा रोजी मुस्कान लॉन येथे विविध कार्यक्रमांचे नियोजन केले आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांनी माजी विद्यार्थी संघटनेशी संपर्क साधून नावनोंदणी करण्यास सुरुवात केली आहे.'

जगताप म्हणाले, 'नावनोंदणीसाठी www.drkccpsdoaed.com या वेबसाइटवर कॉलेजमध्ये सकाळी दहा ते दुपारी तीनपर्यंत सुविधा निर्माण केली आहे. मेळाव्यास जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा सहभाग होण्यासाठी रविवारी मॉर्निंग रॅली काढण्यात येत आहे.'

पत्रकार परिषदेस गुंतवणूक तज्ज्ञ मनीष झंवर, प्रवीण गुहागरकर, अनिल भातले, रवींद्र खेडेकर, शिवा यादव, नरेंद्र काळे आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मत विभाजन टाळण्यासाठी समविचारी पक्षाने एकत्र यावे

$
0
0

मत विभाजन टाळण्यासाठी

समविचारी पक्षाने एकत्र यावे

रावसाहेब दानवे

सोलापूर

'समविचारी पक्षांनी एकत्र येऊन मतांचे विभाजन टाळले पाहिजे, हाच भाजपचा प्रयत्न आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला या मतविभागणीचा फायदा होऊ नये, याची काळजी घेतली पाहिजे,' असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केले. सोलापुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. निवडणूक जसजशा जवळ येतील तसतसे चित्र स्पष्ट होईल. राजकारणात कोणताही अल्टिमेटम नसतो उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत राजकीय हालचाली होऊ शकतात, असेही ते म्हणाले.

'भाजप मवाळ नाही. एनडीएने एकत्र राहावे आणि एकत्रित निवडणूक लढवाव्यात ही आमची भूमिका आहे. भाजप गरज पडेल तेथे मवाळ आणि गरज पडेल तेथे ताठर आहे. पाच वर्षांत राज्यात झालेल्या निवडणुकीत भाजप क्रमांक एकचा पक्ष बनला आहे. राज्यात १० हजार सरपंच, १८ मनपा, १० झेडपी, ९० नगरपालिका, २३ खासदार, १२३ आमदार आणि एक मुख्यमंत्री एवढे पाठबळ भाजपच्या पाठीशी आहे. या ताकतीचा जोरावरच आगामी २०१९ची निवडणूक भाजप जिंकेल,' असेही दानवे म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मच्छिमार करणार जलसमाधी आंदोलन

$
0
0

मच्छिमार करणार

जलसमाधी आंदोलन

सोलापूर :

उजनी धरणावरील स्थानिक मच्छिमार सोमवारी, २१ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता करमाळा येथील कोंढार चिंचोली डिकसळ पुलाजवळ जलसमाधी आंदोलन करणार आहेत. महाराष्ट्र राज्य मच्छिमार संघर्ष कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष सीताराम नगरे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

परराज्यातील मच्छिमारांवर शासन नियमाप्रमाणे बंदी असल्याने उजनी धरणातून त्यांना कायमस्वरूपी मच्छिमारी बंद करण्यात यावी, त्यांना उजनीवर आणणाऱ्या लोकांवर मोक्कांतर्गत गुन्हे दाखल करावेत, उजनी जलाशयाचा मासेमारीचा कोणत्याही प्रकारचा ठेका काढण्यात येऊ नये, छोटी मासळी मारल्याने मत्स्य उत्पत्तीत प्रचंड प्रमाणात घट झाल्याने छोटी मासळी मरणाऱ्यांवर व सुकविणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी यासह सौरऊर्जा प्रकल्प रद्द करण्यात यावा आदी मागण्यांसाठी आंदोलन करणार असल्याचे नगरे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दीन्क्षात समारंभ शनिवारी

$
0
0

दीन्क्षात समारंभ शनिवारी

सोलापूर :

सोलापूर विद्यापीठाचा चौदावा दीन्क्षात समारंभ शनिवारी, १९ जानेवारी रोजी सकाळी साडेदहा वाजता विद्यापीठाच्या दीन्क्षात मंडपात होणार आहे. या वेळी एकूण १२ हजार ८५६ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली. १३१ विद्यार्थ्यांना पीएच. डी पदवी, तर ५४ विद्यार्थ्यांना सुवर्णपदके देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या दीक्षांत सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद नवी दिल्लीचे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे उपस्थित राहणार आहेत. कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस अध्यक्षस्थानी असतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भांडणाचे पर्यवसान भाच्याचा खुनामध्ये

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, हडपसर

पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून मामाने भाच्याच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून केला. ही धक्कादायक घटना बुधवारी पहाटे पावणे दोन वाजण्याच्या सुमारास फुरसुंगी परिसरातील फडतरेमळा येथील लेबर कॅम्पमध्ये घडली. यानंतर आरोपी मामा त्याच्या पत्नीसह फरारी झाला आहे. हडपसर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस मामाचा शोध घेत आहेत.

संपतसिंह माणिकलाल (वय ५२, सध्या रा. फुरसुंगी, फडतरे मळा, लेबर कॅम्प, मूळ रा. मध्य प्रदेश) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मंगलसिंग माहुसिंग (वय ६०, रा. दिंडोरी, मध्य प्रदेश) असे खून करून फरारी झालेल्या मामाचे नाव आहे. हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील तांबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फुरसुंगी येथे रेल्वेच्या ट्रॅकचे काम चालू आहे. येथे कामासाठी मध्य प्रदेश येथून काही कामगार आले आहेत. यामध्ये संपतसिंह याचा मामा आरोपी मंगलसिंग हादेखील आहे. पूर्वी ते विजापूरला काम करत होते. तेव्हा त्यांच्यात काही कारणांवरून वाद झाले होते. यानंतर पुण्यात आल्यानंतरही वाद झाला. त्यामुळे पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून बुधवारी पहाटे पावणेदोन वाजण्याच्या सुमारास मंगलसिंगने संपतसिंहच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार करून खून केला. यामध्ये त्याच्या शेजारी झोपलेला कामगारही किरकोळ जखमी झाला. खून करून आरोपी मामा पत्नीला घेऊन रातोरात फरारी झाला आहे. घटनास्थळी पोलिस उपायुक्त प्रकाश गायकवाड, सहायक पोलिस आयुक्त सुनील देशमुख, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील तांबे यांनी भेट दिली. हडपसर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास गुन्हे पोलिस निरीक्षक हमराज कुंभार करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘महाद्वार’वरील अतिक्रमणे तिसऱ्यांदा हटविली

$
0
0

फोटो आहे

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेंतर्गत बुधवारी महाद्वार, ताराबाई व जोतिबा रोडवर तिसऱ्यांदा महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केली. कारवाईनंतरही वाहतुकीला अडथळा होईल, अशा पद्धतीने बसलेल्या फेरीवाल्यांवर पुन्हा कारवाई करण्यात आली. कारवाईदरम्यान हातगाड्या, लोखंडी कॉट जप्त करण्यात आले. महाद्वार व मिरजकर तिकटी येथील कारवाईदरम्यान वादाचे प्रसंग घडले.

महापालिकेच्या अतिक्रण विभागाच्यावतीने गेल्या वीस दिवसांपासून अतिक्रणविरोधी मोहीम सुरू आहे. शहराच्या सर्वच भागात कारवाई करत अनधिकृत व विनापरवाना जाहिरात फलक, होर्डिंग्ज हटवण्याबरोबरच बायोमेट्रिक कार्ड नसलेल्या फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. त्याचा धसका अनधिकृत फेरीवाल्यांनी घेतला असला, तरी काहीजण पथक जाताच पुन्हा वाहतुकीला अडथळा होईल अशा पद्धतीने व्यवसाय करत असल्याने प्रशासनाला तिसऱ्यांदा कारवाई करावी लागली.

बुधवारी सकाळी मिरजकर तिकटी येथून पथकाने अतिक्रमणे हटवण्यास सुरुवात केली. येथील एका हॉटेल व्यावसायिकाचा फूटपाथवरील बोर्ड ताब्यात घेताना पथकाबरोबर वादावादी झाली. परवाना न घेता फलक उभा केल्याने पथकाने विरोध मोडीत काढत बोर्ड ताब्यात घेतला. त्यानंतर बिनखांबी गणेश मंदिरपर्यंत पथकाने कारवाई केली. महाद्वार रोडवरील अतिक्रण हटवल्यानंतरही पुन्हा काही व्यापाऱ्यांनी पट्ट्याच्या बाहेर आपली दुकाने मांडली होती. पथकाने थेट त्यांचे साहित्य जप्त करण्यास सुरुवात केली. यावेळी काही फेरीवाले नेत्यांनी कारवाईला विरोध केला. त्यातून अधिकाऱ्यांसोबत त्यांची वादावादी झाली. मात्र बायमेट्रिक कार्ड नसलेल्या विक्रेत्यांवर कोणत्याही परिस्थितीत कारवाई करणार असा ठाम निर्धार करत त्यांचा विरोध मोडून काढला.

पथकाने महाद्वार, ताराबाई रोड, जोतिबा रोड व तटाकडील तालीम परिसरातील अतिक्रमणे हटवली. छत्रपती शिवाजी मार्केट विभागीय कार्यालयातंर्गत झालेल्या मोहिमेत ७५ स्टँडी, ५० डिजिटल बोर्ड व प्रत्येकी पाच हातगाड्या, लोखंडी कॉट, छपऱ्या हटवण्यात आल्या.

कारवाईवेळी शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, उपशहर अभियंता एस. के. माने, कनिष्ठ अभियंता राजेंद्र वेल्हाळ, निवास पोवार, सागर शिंदे यांच्यासह अतिक्रमण विभाग प्रमुख पंडित पोवार उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


२५ जानेवारीपासून भीमा कृषी प्रदर्शन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शेतकऱ्यांना शेतीविषयक तंत्रज्ञानाची उपयुक्त माहिती आणि शेतीसाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देणारे पश्चिम महाराष्ट्रातील मोठे 'भीमा कृषी व पशू प्रदर्शन' २५ ते २८ जानेवारी या कालावधीत मेरी वेदर मैदानावर होणार आहे. यंदाच्या प्रदर्शनात हरियाणा येथील १२ कोटी रुपये किमतीचा 'सुलतान' नावाचा रेडा, साडे सात फूट उंचीच्या 'काँकरेज' बैलासह ५०० पेक्षा विविध जातींची जनावरे प्रमुख आकर्षण असतील, अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली.

महाडिक म्हणाले, 'प्रदर्शनाचे यंदाचे १२ वे वर्ष आहे. यामध्ये देश-विदेशातील नामांकित कंपन्यांचा समावेश आहे. शिवाय पशुपक्ष्यांचे प्रदर्शन, सोबत तांदूळ महोत्सव, काजू व आंबा प्रदर्शन हे वेगळेपण राहील. मागील वर्षी प्रदर्शनात नऊ कोटीचा रेडा सर्वांचे आकर्षण ठरला होता. यंदा प्रदर्शनात दोन रेडे असतील. हरियाणातील सुलताना नावाचा रेडा हा प्रमुख आकर्षण असेल. त्याशिवाय निलीरावी जातीचा रेडा, काँकरेज जातीचा बैल, मुऱ्हा जातीच्या म्हशी, ४५ लिटर दूध देणारी जर्शी गाय, संकरित गाय, शंभर ते दीडशे किलो वजनाचे बोकड, पस्तीस किलो वजनाचे बटेर पक्षी, जातिवंत घोडे प्रदर्शनात असतील.'

शेतीतील नवे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध कंपन्यांच्या विविध उत्पादनांचे ६५० स्टॉल आहेत. भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक यांच्या नेतृत्वाखाली २०० महिला बचत गटांना मोफत स्टॉल देण्यात येणार आहेत. प्रदर्शनाच्या कालावधीत रोज दहा हजार शेतकऱ्यांना मोफत झुणका-भाकर वाटप करण्यात येणार आहे. २६ ते २८ जानेवारी या कालावधीत शेतीतज्ज्ञांची व्याख्याने आयोजित केली आहेत.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते २५ जानेवारीला दुपारी एक वाजता महोत्सवाचे उद्घाटन होईल. याप्रसंगी आमदार हसन मुश्रीफ, माजी आमदार महादेवराव महाडिक, आमदार अमल महाडिक, कणेरी मठाचे अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक उपस्थित राहणार आहेत. पत्रकार परिषदेला गोकुळचे संचालक रामराजे कुपेकर, रिलायन्स पॉलिमरचे सत्यजित भोसले, डॉ. सुनील काटकर, श्रीधर बिरंजे, कृषी विभागाचे अतुल जाधव, अशोक सिद्धनेर्ली, डॉ. अजित शिंदे, जे.पी.पाटील, क्रिएटिव्हचे सुजित चव्हाण, आदी उपस्थित होते.

०००

२० फुटी कोल्हापुरी चप्पल

कोल्हापूरची खासियत समजल्या जाणारे कोल्हापुरी चप्पलचे मार्केटिंग केले जाणार आहे. त्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून कृषी प्रदर्शनात २० फुटी भव्य कोल्हापुरी चप्पल ठेवले जाणार आहे. त्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद व्हावी यासाठी प्रयत्नशील असून, सध्या या चप्पलची निर्मिती सुरू असल्याचे धनंजय महाडिक युवा शक्तीचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज महाडिक यांनी सांगितले.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासदार महाडिक ‘संसदरत्न’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

खासदार धनंजय महाडिक यांना सलग तिसऱ्या वर्षी संसदरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. लोकसभेतील कामकाजाच्या सहभागावरुन हा पुरस्कार दिला जातो. पीआरएस, इंडिया, प्राइम पॉइंट फाउंडेशन, प्रो सेन्स आणि केंद्रीय संसदरत्न समितीच्यावतीने देशभरातील सर्व खासदारांच्या कामांचे मूल्यमापन करुन या संसद सदस्यांना हा पुरस्कार दिला जातो. सलग तिसऱ्या वर्षी महाडिक यांना हा पुरस्कार जाहीर झाला. तमिळनाडूचे राज्यपाल भंवारीलाल पुरोहित यांच्या हस्ते शनिवारी (ता.१९) चेन्नई येथील राजभवनात पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.

महाडिक यांनी आजअखेर संसदेत तारांकित, अतारांकित असे ११३३ प्रश्न उपस्थित केले आहेत. ६४ महत्त्वपूर्ण चर्चांमध्ये सहभाग घेतला. शिवाय तीन खासगी विधेयके सादर केली आहेत. प्रत्येकवर्षी देशातील पाच खासदारांना हा पुरस्कार दिला जातो.

गेल्या वर्षभरात खासदार महाडिक यांनी संसदेत महत्वपूर्ण प्रश्न उपस्थित करून ते सोडवण्यासाठी प्रशासकीय स्तरावर पाठपुरावाही केला आहे. त्यामुळे निधीची तरतूद होतानाच काही कामेही सुरू झाली. त्यांच्या या कामाची दखल केंद्रीय संसदरत्न समिती आणि पीआरएस इंडियाने यावर्षीही घेतली. चेन्नई येथील पुरस्कार वितरण सोहळ्यावेळी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर आणि केंद्रीय मंत्री अर्जुनराम मेघवाल आणि आनंदराव आडसूळ उपस्थित राहणार आहे.

.. .. .

'या पुरस्काराचे श्रेय मी कोल्हापूरच्या नागरिकांना देतो. पुरस्कारामुळे आणखी जोमाने काम करण्याची आणि देशात कोल्हापूर जिल्हा अव्वल बनविण्याची उर्मी मिळाली आहे.

खासदार धनंजय महाडिक

.. .. .

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘असर’च्या अहवालात जिल्हा बाराव्या स्थानी

$
0
0

कोल्हापूर : राज्यातील ग्रामीण भागातील शैक्षणिक स्थितीच्या अहवालानुसार कोल्हापूर जिल्हा बाराव्या क्रमांकावर असल्याचा अहवाल 'असर' संस्थेने नुकताच सादर केला आहे. वाचन व गणितीय क्षमता विचारात घेऊन हा अहवाल तयार केला आहे. राज्याच्या अहवालानुसार जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांची कामगिरी उत्तम असल्याचे अहवालात म्हटले आहे. 'असर-२०१८' च्या अहवालानुसार कोल्हापूर जिल्हा तिसरी ते पाचवी वाचनात चौथा, तर वजाबाकीमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे. सातवी ते आठवी गटात वाचनात सातवा, तर भागाकारात चौथ्या क्रमांकावर असल्याची माहिती समोर आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवृत्त शिक्षकांचा जीवन गौरव पुरस्कारांनी सन्मान

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

'निवृत्तीनंतरही सामाजिक कामासाठी योगदान देणाऱ्या प्राथमिक शिक्षकांचे कार्य प्रेरणादायी आहे. अशा शिक्षकांना जीवन गौरव पुरस्कारांनी सन्मानित करण्याचा महापालिका सेवानिवृत्त शिक्षक व कर्मचारी संघटनेचा उपक्रम स्तुत्य आहे' असे गौरवोद्गार शिक्षक संघटनेचे नेते प्रभाकर आरडे यांनी काढले. महापालिकेच्या निवृत्त प्राथमिक शिक्षक व कर्मचारी संघातर्फे सेवानिवृत्त शिक्षकांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.

शिक्षण समिती सभापती अशोक जाधव, निवृत्त सहायक शिक्षण संचालक संपतराव गायकवाड, महलक्ष्मी डिझेल्सचे रामचंद्र सुर्वे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण झाले. याप्रसंगी छबू जगन्नाथ कांबळे, प्रभावती प्रभाकर पाटील, निर्मला कलगोंडा पाटील, लीला विलास जाधव, रजनी रामचंद्र सुर्वे, प्रभावती हरी चव्हाण, चंद्रकला चंद्रकांत कारेकर, कमल यशवंत पाटील, सुचित्रा रमेश खटावकर, शैलजा शंकर तारिहाळ आणि सुलोचना ईश्वरचंद्र दलवाई यांना जीवनगौरव पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. शिवशाहीर राजू राऊत यांना डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाकडून डी. लिट मिळाल्याबद्दल सत्कार झाला. वसंतराव चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. संघटनेचे अध्यक्ष करीम मुजावर यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. विजया चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. आनंदराव पाटील यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंबेवाडीत मोर्चा

$
0
0

कुडित्रे : आंबेवाडी येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत शेतकऱ्यांना कर्ज प्रकरणे करून देण्यात होणारी टाळाटाळ, बँकेच्या शाखेतील ग्राहकांच्या गैरसोयींविरोधात करवीर तालुका शिवसेनेने बँकेवर मोर्चा काढून आंदोलन केले. महिन्याभरात बँकेतील कार्यपद्धतीत बदल झाला नाही तर ठोक मोर्चा काढण्याचा इशारा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख, माजी जि. प. सदस्य बाजीराव पाटील यांनी दिला. करवीर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी बँकेच्या कार्यपद्धतीविरोधात घोषणा देत बँकेवर मोर्चा काढत मॅनेजर परेश हतकर यांना घेराव घालून गैरसोयीबाबत जाब विचारला. करवीर तालुकाप्रमुख तानाजी आंग्रे, जिल्हा महिला संघटक शुभांगी पोवार, तालुका महिला संघटक सुजाता सुतार, सुनील पोवार, भीमराव पाटील, आप्पासाहेब कोळेकर, वंदना पाटील, सचिन पाटील, महेश सुतार, सूरज पाटील, प्रणव पाटील उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images