Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

निवडणुकीच्या डावपेचासाठी आपटेंना संधी

$
0
0

Satish.ghagtage@timesgroup.com

Tweet:@satishgMT

कोल्हापूर : लोकसभा आणि विधानसभा नजरेसमोर ठेऊन जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) अध्यक्षपदी रविंद्र आपटे यांची निवड झाली. आपटे यांच्यासमोर संघाचा रोजचा २५ लाख रुपयांचा तोटा भरून काढण्याचे मोठे आव्हान असणार आहे. 'अमूल'सह अन्य ब्रँडेड दूध कंपन्यांबरोबर स्पर्धा करताना मल्टिस्टेट ठरावावेळी दूध उत्पादकांत पसरलेली नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.

अध्यक्ष विश्वास पाटील यांच्याविरोधात १२ संचालकांनी केलेले बंड शमवण्यासाठी माजी आमदार महादेवराव महाडिक, पी. एन. पाटील यांनी पाटील यांचा राजीनामा घ्यावा लागला. राजीनाम्यानंतर आपटे यांच्यासह अरुण डोंगळे, रणजित पाटील, धैर्यशिल देसाई, पी. डी. धुंदरे यांची नावे चर्चेत होती. लोकसभा, विधानसभा आणि पुढील वर्षी गोकुळच्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी ज्येष्ठ संचालकांना संधीचा निर्णय नेत्यांनी घेतला. आपटे यांचे कार्यक्षेत्र आजरा, उत्तूर परिसरात आहे. उत्तूर हा जिल्हा परिषद मतदारसंघ कागल विधानसभा निवडणूक क्षेत्रात येतो. खासदार धनंजय महाडिक यांच्या उमेदवारीला आमदार हसन मुश्रीफ यांनी विरोध केला आहे. कागलच्या निवडणुकीत विजय आणि पराभवात फक्त अडीच हजार ते साडेचार हजार मतांचे अंतर असते. मुश्रीफ यांनी जर विरोध केला तर त्यांना विधानसभा निवडणूकीत उत्तूरमधून शह देण्यासाठी आपटे यांच्या मतांचा उपयोग होऊ शकतो अशी शक्यता लक्षात घेऊन त्यांच्या नावाला पसंती देण्यात आल्याची चर्चा आहे. आपटे यांना दिलेल्या संधीमुळे गडहिंग्लज, चंदगड, आजरा भागाला प्रतिनिधीत्व दिल्याचा संदेश गेला आहे. त्याचा फायदा लोकसभा निवडणुकीत महाडिक गटाला होण्याची शक्यता आहे.

अरुण डोंगळे यांनी राधानगरी मतदारसंघातून निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली आहे. त्यांना पी. एन. पाटील यांचा सुप्त विरोध आहे. त्यांना अध्यक्षपदाची संधी दिली आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात ते उतरले तर गोकुळकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. मल्टिस्टेटच्या ठरावाच्यावेळी डोंगळे यांनी जनमानसाचा विरोध कसा आहे, अशी स्पष्ट भूमिका मांडल्याने नेत्यांनी त्यांच्या नावावर फुली मारली. रणजितसिंह व त्यांचे बंधू प्रविणसिंह पाटील यांच्यात फाटाफूट झाल्याने त्यांची ताकद कमी झाल्याने त्यांचे नाव पहिल्याच टप्प्यातच बाहेर पडले. धैर्यशिल देसाई यांना दोन्ही नेत्यांची संमती होती. पण जेष्ठत्याचा मुद्दा आल्याने देसाई यांचे नाव अखेरच्या क्षणी मागे पडले. विश्वास पाटील हे पीएन गटाचे असल्याने पुन्हा त्यांनाच संधी देता येत नसल्याने धुंदरे यांच्या नावाचा विचार झाला नाही.

एकीकडे निवडणुकीचे राजकारण नेत्यांनी सांभाळले असले तरी अतिरिक्त गायीच्या दुधामुळे गोकुळला तीन वर्षात १८० कोटी रुपयांचा फटका बसला आहे. जिल्ह्यातील दूध उत्पादकांना फटका बसू नये म्हणून गोकुळच्यावतीने गायीचे दूध स्वीकारले जाते. त्यामुळे दिवसाला २४ ते २५ लाखांचा तोटा होत आहे. गायीच्या दुधापासून तयार केलेल्या पदार्थांना राज्य सरकारने पाच रुपयांचे अनुदान जाहीर केले आहे. पण त्यासाठी राज्य सरकारने कॅशलेसची अट घातली आहे. फक्त ३० टक्के ग्राहकांच्या खात्यावर थेट रक्कम जमा होत असल्याने कॅशलेसचे काम रखडले आहे. त्यामुळे गोकुळचे १२ कोटी रुपयांचे अनुदान थकले आहे. प्रत्येक दूध उत्पादकाच्या खात्यावर रक्कम जमा झाली तर प्रतिदिवशी गोकुळचा तोटा १५ लाख रुपयांनी कमी होऊ शकतो. गोकुळपुढील आव्हाने पार करण्यासाठी आपटे यांना संधी दिली आहे. बीएस्सी अॅग्रीकल्चरची पदवी असलेल्या आपटे यांचा मार्केटिंगमध्ये हातखंडा आहे. तसेच मल्टिस्टेटची मान्यता केंद्राकडून मिळवण्यासाठी त्यांना प्रयत्न करावे लागणार आहेत. अमूलशी स्पर्धा आणि मल्टिस्टेटमुळे दूध संस्था आणि उत्पादकांमध्ये संचालक व नेते मंडळींच्याविरोधात झालेली नकारात्मक कमी करण्याचे आव्हान आपटे यांच्यापुढे असणार आहे.

००००

(मूळ कॉपी)

निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन आपटेंना संधी

Satish.ghagtage@timesgroup.com

Tweet:satishgMT

लोकसभा आणि विधानसभा डोळयासमोर ठेऊन जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे (गोकुळ) अध्यक्षपदी रविंद्र आपटे यांची निवड करण्यात आली आहे. आपटे यांना राजकारणाबरोबर रोजचा २५ लाख रुपयांचा तोटा भरुन काढण्याचे मोठे आव्हान असणार आहे. अमूलसह अन्य ब्रँडेड दूध कंपन्याबरोबर स्पर्धा करताना मल्टिस्टेट ठरावाच्यावेळी दूध उत्पादकांत पसरलेली नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.

अध्यक्ष विश्वास पाटील यांच्याविरोधात १२ संचालकांनी केलेले बंड शमवण्यासाठी 'डिझास्टर मॅनेजमेंट' राबवताना माजी आमदार महादेवराव महाडिक, पी.एन. पाटील यांनी त्यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा घेतला. राजीनाम्यानंतर रविंद्र आपटे, अरुण डोंगळे, रणजित पाटील, धैर्यशिल देसाई, पी.डी. धुंदरे यांची नावे चर्चेत होती. लोकसभा, विधानसभा आणि पुढील पाच वर्षांनी गोकुळच्या निवडणूकीला सामोरे जाण्यासाठी ज्येष्ठ संचालकाला संधी देण्याचा निर्णय नेते मंडळींनी घेतला. आपटे यांचे कार्यक्षेत्र आजरा, उत्तूर परिसरात आहे. उत्तूर हा जिल्हा परिषद मतदार संघ कागल विधानसभा निवडणूक क्षेत्रात येतो. खासदार धनंजय महाडिक यांच्या उमेदवारीला आमदार हसन मुश्रीफ यांनी विरोध केला आहे. कागलच्या निवडणूकीत विजय आणि पराभवात फक्त अडीच ते साडेचार मतांचे अंतर असते. मुश्रीफ यांनी जर विरोध केला तर त्यांना विधानसभा निवडणूकीत उत्तूरमधून शह देण्यासाठी आपटे यांच्या मताचा उपयोग होऊ शकतो अशी शक्यता लक्षात घेऊन त्यांच्या नावाला पसंती देण्यात आल्याची चर्चा आहे. आपटे यांना दिलेली संधीमुळे गडहिंग्लज, चंदगड, आजरा भागाला प्रतिनिधीत्व दिल्याचा संदेश गेला आहे. त्याचा फायदा लोकसभा निवडणूकीत महाडिक गटाला होण्याची शक्यता आहे.

अरुण डोंगळेंनी राधानगरी मतदार संघातून निवडणूक लढण्याची तयारी सुरु केली आहे. डोंगळे यांना पीएन यांचा सुप्त विरोध आहे. तसेच त्यांना अध्यक्षपदाची संधी दिली आणि विधानसभेच्या निवडणूकीच्या रिंगणात उतरले तर गोकुळकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. मल्टिस्टेटच्या ठरावाच्यावेळी डोंगळे यांनी जनमानसाचा विरोध कसा आहे, अशी स्पष्ट भूमिका मांडल्याने नेते मंडळींनी त्यांच्या नावावर फुली मारली आहे. रणजितसिंह पाटील व त्यांचे बंधू प्रविणसिंह पाटील यांच्यात फाटाफूट झाल्याने त्यांची ताकद कमी झाल्याने त्यांचे नाव पहिल्याच टप्प्यातच बाहेर पडले. धैर्यशिल देसाई यांना दोन्ही नेत्यांची संमती होती. पण जेष्ठत्याचा मुद्दा आल्याने देसाई यांचे नाव अखेरच्याक्षणी मागे पडले. विश्वास पाटील हे पीएन गटाचे असल्याने पुन्हा पीएन गटाला संधी देता येत नसल्याने धुंदरे यांच्या नावावर विचार झाला नाही.

एकीकडे निवडणूकीचे राजकारण नेते मंडळींना सांभाळले असले तरी अतिरिक्त गायीच्या दुधामुळे गोकुळला तीन वर्षात १८० कोटी रुपयांचा फटका बसला आहे. जिल्ह्यातील दूध उत्पादकांना फटका बसू नये म्हणून गोकुळच्यावतीने गायीचे दूध स्वीकारले जाते. त्यामुळे दिवसाला २४ ते २५ लाखाचा तोटा होत आहे. गायीच्या दूधापासून तयार केलेल्या पदार्थांना राज्य सरकारने पाच रुपयांचे अनुदान जाहीर केले आहे. पण त्यासाठी राज्य सरकारने कॅशलेसची अट घातली आहे. फक्त ३० टक्के ग्राहकांच्या खात्यावर थेट रक्कम जमा होत असल्याने कॅशलेसचे काम रखडले आहे. त्यामुळे गोकुळचे १२ कोटी रुपयांचे अनुदान थकले आहे. प्रत्येक दूध उत्पादकाच्या खात्यावर रक्कम जमा झाली तर प्रतिदिवशी गोकुळचा तोटा १५ लाख रुपयांनी कमी होऊ शकतो. गोकुळपुढील आव्हाने पार करण्यासाठी आपटे यांना संधी दिली आहे. बीएस्सी अॅग्रीकल्चरची पदवी असलेल्या आपटे यांचा मार्केटिंगमध्ये मोठा हातखंडा आहे. तसेच मल्टिस्टेटची मान्यता केंद्राकडून मिळवण्यासाठी त्यांना प्रयत्न करावे लागणार आहेत. अमूलशी स्पर्धा आणि मल्टिस्टेटमुळे दूध संस्था आणि उत्पादकांमध्ये संचालक व नेते मंडळींच्याविरोधात झालेली नकारात्मक कमी करण्याचे आव्हान आपटे यांच्यापुढे असणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पानसरे हत्या प्रकरणी देगवेकरला पोलिस कोठडी

$
0
0

कोल्हापूर

ज्येष्ठ विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आठवा संशयित अमित रामचंद्र देगवेकरला कोर्टाने नऊ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. कोल्हापूर एसआयटीने त्याला बेंगळुरू येथून सोमवारी मध्यरात्री अटक केली. त्याला मंगळवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जी. जी. सोनी यांच्या कोर्टासमोर हजर केले.

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणात अमित देगवेकरने शस्त्रे पुरवणे, बेळगाव येथे झालेल्या कटाच्या बैठकीस उपस्थित राहणे. बेळगाव परिसरात झालेले बॉम्बस्फोट प्रशिक्षण आणि गोळीबाराच्या वेळी प्रत्यक्ष सहभागी असल्याचा आरोप विशेष सरकारी वकील अॅड. शिवाजीराव राणे यांनी केला. संशयित देवगेकरचे वकील अॅड. समीर पटवर्धन यांनी देवगेकरचा या प्रकरणाशी काहीही संबध नसल्याचा युक्तिवाद केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मंत्री, साखर आयुक्तांना ध्वज फडकवू देणार नाह’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'ऊस गाळपानंतर चौदा दिवसांत एकरकमी एफआरपी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा कायदा आहे. तरीही एफआरपी दोन टप्प्यांत देण्यावरून कायदा मोडण्याची चर्चा मंत्री, खासदार व आमदार करत आहेत, तर कायदा मोडणाऱ्यांवर अधिकारी कारवाई करत नाहीत. कायदा पायदळी तुडविण्याऱ्यांना प्रजासत्ताक दिन साजरा करण्याचा अधिकार नाही. त्यामुळे प्रजासत्ताक दिनी मंत्री व साखर आयुक्तांना ध्वज फडकवू देणार नाही,' असा इशारा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माणिक शिंदे यांनी एका पत्रकाद्वारे केला आहे.

पत्रकात म्हटले आहे की, शुगरकेन कंट्रोल ऑर्डर १९६६ नुसार ऊस गाळप झाल्यानंतर १४ दिवसांत एकरकमी एफआरपी देण्याचा कायदा आहे. ऊस गाळप होऊन तब्बल तीन महिने उलटूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर एकरकमी एफआरपी जमा झालेली नाही. एफआरपीचा कायदा पाळायला कारखानदार तयार नाहीत, तरीही सरकार त्यांच्यावर कारवाई करत नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपोषणाचा इशारा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पन्हाळा तालुक्यातील यवलूज ग्रामपंचायतीमध्ये सरकारी योजनांचा गैरवापर व अनियमित खर्चावरून दोषीवरील कारवाईस चालढकल होत असल्याच्या निषेधार्थ तक्रारदार आनंदराव मारती पाचाकटे यांनी २१ जानेवारीपासून जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. पंचायत समितीकडून झालेल्या चौकशीमध्ये तत्कालीन ग्रामसेवक शिवाजी पाटील व बाबासाहेब बच्चे हे दोषी आढळले होते. या दोघांची खातेनिहाय चौकशी करण्यात येईल असे पत्र ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव यांनी दिले होते. त्या दोघांची चौकशी होऊन कारवाईला प्रशासनाकडून चालढकल सुरू असल्याचा आरोप पाचाकटे यांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एनपीएतील वसुलीसाठी बँकांचा संघर्ष

$
0
0

टार्गेट वसुलीचे ... लोगो

.................

Satish.ghatage@timesgroup.com

Tweet:satishgMT

कोल्हापूर

राष्ट्रीय, खासगी, नागरी व सहकारी बँकाकडून एनपीएतील २० टक्के कर्ज वसुलीसाठी जोरदार प्रयत्न सुरु झाले आहेत. मालमत्ता जप्तीच्या वसुलीसाठी नोटिसा पाठवण्याची कामे युद्धपातळीवर सुरु आहेत. एनपीएचे प्रमाण पाच टक्के रहावे यासाठी बँकाचा आटापिटा सुरु आहे.

जिल्ह्यातील राष्ट्रीय, खासगी, नागरी व सहकारी ८२ बँकांनी २४ हजार ३७२ कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. कर्जाचे वाटप करताना बँकाकडून ठेवी वाढवण्याचे नियोजन केले जात आहे. या बँकांनी २२ हजार ३७३ कोटी रुपयांच्या ठेवी जमा केल्या आहेत. राष्ट्रीय बँकांनी १४ हजार ९५७ कोटी रुपयांचे वाटप केले आहे. खासगी बँकांनी ९७६२ कोटी रुपयांचे तर नागरी व सहकारी बँकांनी ५९९८ कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. जिल्हा बँकेने ३६९४ कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. त्यामध्ये सर्वाधिक १२१३ कोटी रुपयांचे पीक कर्ज आहे.

पगारदार व नोकरदारांकडून नियमित कर्जाची वसुली होते. तीन महिन्याचे कर्जाचे हप्ते थकले की त्यासाठी एनपीएची तरतूद केली जाते. बँकाही एनपीएची तरतूद करतात. पण एनपीएचे प्रमाणे १० टक्क्यांवर गेले तर रिझर्व्ह बँकेकडून बंधन घातले जाते. त्यामुळे एनपीएचे प्रमाण पाच टक्क्यांच्या आत राखण्यासाठी बँकांकडून वसुलीची मोठी मोहिम राबवली जात आहे. मोठे उद्योग व व्यावसायिकांची कर्जे थकीत आहेत. या कर्जाच्या वसुलीसाठी बँकांना मोठे प्रयत्न करावे लागत आहेत. एनपीएमधील कर्जाच्या वसुलीसाठी बँकाकडून नोटीसा पाठवल्या जात असून तारण दिलेल्या मालमत्तेच्या जाहीर नोटीस प्रसिद्ध करण्यात येत आहेत. त्यामुळे कर्जदारांकडून थकीत व्याजाचे हप्ते व मुद्दल भरुन कर्ज नियमित केले जात आहे. काही वेळा बँकाकडून थेट मालमत्तेचा लिलाव करुन कर्जाच्या वसुलीसाठी प्रयत्न केले जात आहेत.

जिल्हा बँकेचे एनपीएतील ४० कोटी रुपयांचे कर्ज आहे. गतवर्षी कर्जदारांच्या दारात जाऊन ढोल वाजवून कर्ज वसुलीसाठी प्रयत्न करण्यात आले. तसेच कर्ज घेतलेल्या संस्थेच्या संचालकांच्या मालमत्तेवर बोजा चढवला जात आहे. त्यामुळे गतवर्षी १८ कोटी रुपयांच्या कर्जाची वसुली झाली आहे. जिल्हा बँकेने वन टाईम सेटल योजनेद्वारे थकीत कर्जाचे दंड वसूल करुन व्याजाचे दर कमी करुन एनपीएतील कर्ज नियमित करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. राष्ट्रीय व सहकारी बँकांकडूनही एनपीएतील कर्जदारांच्या मालमत्तेवर बोजा चढवण्याची कार्यवाही सुरु केली आहे. राष्ट्रीय बँकेत एनपीचे प्रमाण वाढले असले तरी बँकेने केलेल्या व्यवसायातून एनपीए कर्जासाठी तरतूद केली जात आहे. एनपीएचे प्रमाण पाच टक्के रहावे यासाठी सर्वच बँकांची धडपड सुरु आहे.

...

ठेवी व व्याजांची आकडेवारी (कोटी)

बँक प्रकार संख्या शाखा ठेवी कर्ज

राष्ट्रीय २१ २५९ १४,९५७ ९७६२

खासगी ११ १४१ ५१७१ ३८८८

क्षेत्रिय ग्रामीण बँक १ ८ ४१ ३३

जिल्हा बँक १ १९१ ३५४३ ३६९४

नागरी व सहकारी बँका ४७ ४६७ ९५३० ५९९८

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कनेक्शन बंद असूनही पााणीबिल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

नागाळा पार्क येथील भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्राचा २०१३ पासून पाणीपुरवठा बंद आहे. पाणीपुरवठा बंद असूनही नियमित पाणीबिल येत असून आतापर्यंत ४४ हजार थकबाकी झाली आहे. केंद्राला पाणीपुरवठा बंद असल्याने पाणी कनेक्शन तोडण्यासाठी जलअभियंता सुरेश कुलकर्णी यांना पत्र दिले आहे. पण शहर पाणीपुरवठा विभागाने अद्याप कनेक्शन बंद केले नसून पाणी उपसा बंद असूनही पाणीबिल येत असल्याचा दावा पत्रात केला आहे.

जलअभियंता कुलकर्णी यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे, 'रि.स.नं. २५३ 'ख' मध्ये केंद्राची इमारत आहे. येथे कला प्रबोधिनी संचलित इंटरिअर डिझायनिंगचे महाविद्यालय व विविध सांस्कृतिक उपक्रमांतर्गत चित्रकला, गायन, वादन, नृत्य, चित्रपट व नाट्य अभिनयाचे वर्ग घेतले जातात. शिक्षणासाठी नियमित २०० ते २५० विद्यार्थी येतात. विद्यार्थी व अभ्यागतांच्या सोयीसाठी महापालिकेच्यावतीने २०१३ मध्ये पाणीपुरवठा घेतला. पाणी कनेक्शन घेतल्यापासून अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने वारंवार प्रशासनाला पत्रव्यवहार केला. पण पाणीपुरवठा सुरू होण्याऐवजी संपूर्ण बंद पडला.

'परिणामी केंद्राने स्वखर्चातून २०० फुटावरुन स्वतंत्र पाईपलाईन घातली. पण पाणीपुरवठा सुरळीत न झाल्याने ऑगस्ट २०१३ मध्ये प्रशासनाकडे पाणीपुरवठा कनेक्शन बंद करण्यासाठी अर्ज दिला. पण कनेक्शन बंद करण्याऐवजी नियमित बिले पाठवण्यात आली आहेत. तसेच मीटर केंद्राच्या बाहेर असताना मीटर रीडरने चुकीचे शेरे मारले आहेत. केंद्राने २०१३ पासून महापालिकेच्या पाण्याचा वापर केलेला नसल्याने पाणीबिल रद्द करण्याबरोबरच पाणी कनेक्शन त्वरीत बंद करावे,' अशी मागणी पत्राद्वारे केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हेरिटेज वास्तू होणार अतिक्रमणमुक्त

$
0
0

कोल्हापूर

शहरात अतिक्रमण निर्मूलन मोहीम तीव्र असताना आता ही मोहीम हेरिटेज वास्तूंजवळील अतिक्रमण हटवण्यासाठी राबवण्यात येणार आहे. त्याबाबत मंगळवारी कोल्हापूर हेरिटेज वास्तू कमिटी सदस्य व अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक झाली. या निर्णयाने शहरातील हेरिटेज वस्तू लवकरच अतिक्रमणमुक्त होण्याची शक्यता आहे. शहरातील अनेक हेरिटेज वास्तूंना अनधिकृत जाहिरात फलक व फेरीवाल्यांचा विळखा पडला आहे. या वास्तू मोकळ्या करण्यासाठी शहरवासियांनी अनेकवेळा मागणी केली आहे. अशा वास्तू अतिक्रमणमुक्त करण्यासाठी समिती सदस्यांसह अतिक्रमण विभागातील अधिकाऱ्यांची बैठक झाली. समितीकडून हेरिटेज वास्तूंच्या जागांचा तपशील प्राप्त झाल्यानंतर कारवाईला सुरुवात होणार असल्याचे अतिक्रमण विभागाच्यावतीने स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

६६८ थकबाकीदारांची पाणी कनेक्शन बंद

$
0
0

तीन महिन्यातील कारवाई, अद्याप ३०० रडारवर

Maruti.Patil

@timesgroup.com

tweet: @MarutipatilMT

कोल्हापूर :

महापालिकेच्या शहर पाणीपुरवठा विभागाकडे थकीत असलेल्या पाणीपट्टी बिलासाठी प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. थकबाकी जमा करण्यासाठी नोटीस, सुनावणी अशा मार्गाचा अवलंब करुनही रक्कम जमा न केलेल्या थकबाकीदारांचे थेट पाणी कनेक्शनच बंद केले आहे. तीन महिन्यात प्रशासनाने तब्बल ६६८ थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.

शहर पाणीपुरवठा विभागाकडे १,०१३ मिळकतधारकांची २५ कोटींची पाणीपट्टी थकीत आहे. यापैकी निम्मी थकबाकी सरकारी कार्यालयांकडे असली, तरी इतर थकबाकीदारांमध्ये राजकीय, बांधकाम व्यावसायिक व अन्य उच्चभ्रू लोकांचा समावेश आहे. ५० हजारांपासून पुढे थकबाकी असलेल्या थकबाकीदारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. प्रथम एक लाखापेक्षा जास्त थकबाकी असलेल्या ९८ थकबाकीदारांना नोटीस पाठवण्यात आली. आयुक्तांसमोर त्याबाबतची सुनावणीही घेण्यात आली. एकरकमी रक्कम भरण्यासाठी त्यांना आणखी काही दिवसांची मुदत देण्यात आली. पण या मुदतीतही थकीत रक्कम न भरल्याने ४५ थकबाकीदारांचे पाणी कनेक्शन बंद करण्यात आले आहे.

जाहिरात प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर पाणीपुरवठा विभागाने वसुली मोहीम तीव्र केली. ज्यांच्याकडून थकबाकी भरण्यास प्रतिसाद दिला जात नाही, त्यांची पाणी कनेक्शन थेट बंद करण्यात आली आहेत. त्यासाठी पाच स्वतंत्र पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. पथकाने एक हजारापासून ४९ हजार रुपयांपर्यंत थकबाकी असलेल्या मिळकतदारांची ६२३ तर एक लाखापेक्षा जास्त रक्कम असलेल्या ४५ थकबाकीदारांची पाणीपुरवठा कनेक्शन बंद केली आहेत.

८३० मिळकतधारकांकडे ५० हजारांपेक्षा जास्त थकीत रक्कम आहे. त्यापैकी ५० व्यक्तींना सुनावणीसाठी दहा जानेवारी रोजी पत्र पाठवले आहे. या सर्व थकबाकीदारांची सुनावणी अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर व जलअभियंता सुरेश कुलकर्णी यांच्यासमोर होणार आहे. सुनावणीदरम्यान एकरकमी थकबाकी जमा करण्यासाठी मुदतही दिली जाणार आहे. पण त्यानंतरही थकबाकी जमा न केल्यास पाणी कनेक्शन बंद करण्यात येणार आहे. पाणीपुरवठा विभागाने वसुली मोहीम तीव्र केल्याने थकबाकी रक्कम मोठ्याप्रमाणात जमा होऊ लागली आहे. मात्र मोठ्या थकबाकीदारांना प्रथम नोटीस आणि सुनावणी घेऊन पुन्हा वेळ दिला जात असल्याने बड्या थकबाकीदारांकडून रक्कम वसूल होण्यास आणखी विलंब लागण्याची शक्यता आहे.

...

चौकट

'निर्भय'ची कार्यवाही सुरू

थकीत पाणीपट्टी वसूल करण्यासाठी शहर पाणीपुरवाठा विभागाने निर्भय सवलत योजना सुरू करण्याचा प्रस्ताव तयार केला. प्रथम स्थायी व महासभेने या योजनेला मान्यता दिली. निर्भय योजनेंतर्गत थकीत रकमेवरील दंडाला पन्नास टक्के सवलत देण्यात येणार आहे. या सवलत योजनेमुळे थकीत पाणीपट्टी वसूल होण्यास मदत होणार आहे. महासभेने मंजुरी दिल्यानंतर थकीत रक्कमेचा ताळेबंद करण्यासाठी सॉफ्टवेअरमध्ये बदल करण्यास सुरुवात झाली आहे. आयुक्तांकडून कोणत्याही क्षणी त्याबाबतचे आदेश येणार असल्याने प्रशासन सॉफ्टवेअरमध्ये बदल करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे.

.......................................

.......................................

चंबुखडीतून दीड लाख लिटर डिस्चार्ज वाढणार

एअर व्हॉल्व व पंपिंग स्टेशनची गळती दूर

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बालिंगा पंपिंग स्टेशनसह चंबुखडी टाकी परिसरातील एअर व्हॉल्वमधील गळती काढण्यास पाणीपुरवठा विभागास यश आले. कसबा बावडा पंपिंग स्टेशनकडे जाणाऱ्या दुधाळी येथील पाइपलाइनची गळती काढण्यासाठी वर्कऑर्डर काढली आहे. गळती दूर झाल्यानंतर चंबुखडी टाकीतून दीड लाख लिटर डिस्चार्ज वाढणार आहे. त्यामुळे उंचावरील प्रभागांची एक महिन्यात पाणीपुरवठ्याची समस्या निकालात निघेल.

शहरात गणेशोत्सवापासून पाणीपुरवठा वितरणाची मोठी समस्या निर्माण झाली होती. ठिकठिकाणी असलेल्या गळतींमुळे अनेक भागात अपुरा व अनियमित पाणीपुरवठा होत होता. १४० एमएलडी पाणी उपशापैकी तब्बल ५० एमएलडी पाणी गळतीद्वारे वाहून जात असल्याने त्याचा पाणीपुरवठ्यावर विपरित परिणाम होत होता. मोठ्या लाईनवरील गळती काढल्यानंतर हळूहळू पाणीपुरवठा सुरुळीत होऊ लागला असला, तरी बालिंगा पंपिंग स्टेशनपासून चंबुखडी व चंबुखडी ते अपाटेनगरपर्यंतच्या अनेक एअर व्हॉल्वमधून पाणी गळती सुरू होती. बालिंगा पंपिंगसह चुंबखडी येथील मुख्य लाईनचे गळती काढण्यास शहर पाणीपुरवठा विभागाला यश आले आहे.

दुधाळी येथून कसबा बावडा जलशुद्धीकरण केंद्राकडे जाणाऱ्या पाइपलाइनला अनेक ठिकाणी गळती आहे. तसेच लाईनवरील एअरव्हॉल्व निकामी झाले आहेत. या संपूर्ण लाईनवरील व्हॉल्व दुरुस्तीसाठी वर्क ऑर्डर काढण्यात आली आहे. एक महिन्यात संपूर्ण काम पूर्ण होणार असून त्यामुळे सुमारे दीड लाख लिटर पाण्याचा डिस्चार्ज वाढणार आहे. त्यामुळे उंचावरील प्रभागातील अपुऱ्या दाबाने होणारा पाणीपुरवठा पूर्ण क्षमतेने होईल, असे पाणीपुरवठा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

...........................

कोट

'बालिंगा पंपिंग स्टेशन येथील व चंबुखडीपर्यंतच्या लाईनवरील सर्व गळती काढण्यात आली आहे. कसबा बावड्याकडे जाणाऱ्या दुधाळी येथील लाईनची दुरुस्ती करण्यासाठी वर्कऑर्डर काढली आहे. त्यामुळे उंचावरील प्रभागात पाणीपुरवठा लवकरच सुरळीत होईल.

सुरेश कुलकर्णी, जलअभियंता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ऊस ग्राफिक्स

$
0
0

त्रांगडे एफआरपीचे

एकरकमी एफआरपीवरून जिल्ह्यात कारखानदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेत संघर्ष सुरू आहे. एफआरपीसाठी कारखानदारांना अडचणी येत असल्याने कारखानदारांनी ऊसबिलाचा पहिला हप्ता प्रतिटन २३०० रुपयांप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला आहे. ३० नोव्हेंबरपर्यंत गाळप झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाली आहे. नोव्हेंबरपर्यंत कोल्हापूर विभागातील ३६ कारखान्यांनी २२३ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून, ६३२ कोटी एफआरपी थकीत होती. २३०० रुपये पहिल्या हप्ताप्रमाणे अंदाजे ५०० कोटींहून अधिक रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची प्रक्रिया सुरू आहे.

००००

३१ डिसेंबरअखेर कारखानानिहाय थकीत एफआरपी

जवाहर : ११४ कोटी ७३ लाख

राजारामबपू पाटील, साखराळे : ९२ कोटी २१ लाख

एसएसके सोनहिरा : ८४ कोटी ४० लाख

क्रांती कुंडल : ७८ कोटी ६० लाख

दत्त-शिरोळ : ८३ कोटी १५ लाग

वारणा : ७६ कोटी २३ लाख

दालमिया : ७७ कोटी ३६ लाख

संताजी घोरपडे : ७१ कोटी १८ लाख

हेमरस : ७० कोटी २१ लाख

हुतात्मा किसन अहिर : ६२ कोटी ५६ लाख

००००

कोल्हापूर विभागातील कारखाने : ३६

कोल्हापूर जिल्ह्यातील कारखाने : २२

सांगली जिल्ह्यातील कारखाने : १४

कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण ऊसक्षेत्र : १,४२,२८० हेक्टर

जिल्ह्याचा सरासरी उतारा : १२.५१

आतापर्यंत झालेले गाळप :

सर्वाधिक एफआरपी असलेले कारखाने

गुरुदत्त : ३०८९

कुंभी : ३०५७

दत्त डालमिया : ३०४२

दूधगंगा-वेदगंगा : ३००३

००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युतीची काळजी करू नका, कामाला लागा

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

'युती होवो अथवा न होवो, त्याची काळजी करू नका, उमेदवार कोण आहे, हे न पाहता पक्षाच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी घरदार विसरून प्रचारात झोकून द्या,' असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दानवे यांनी कोल्हापूर लोकसभा मतदार संघांचा आढावा घेतला. ते म्हणाले, 'साडेचार वर्षांत भाजपने भरपूर काम केले आहे. हे काम मतदारापर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. चार वर्षात झालेल्या महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकांत पक्षाला चांगले यश मिळाले. आता लोकसभा निवडणुकीत पुन्हा दणदणीत यश मिळावे, म्हणून कार्यकर्त्यांनी घरदार विसरून कामाला लागावे. युती होईल, न होईल त्याची काळजी करू नका. ज्याला उमेदवारी मिळेल त्याला निवडून आणून फिर एक बार, मोदी सरकार आणण्यासाठी सक्रीय व्हा' असे आवाहन त्यांनी केले.

या बैठकीस पालकमंत्री चंद्रकांत पाटील, म्हाडाचे अध्यक्ष समरजित घाटगे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, विजय पुराणिक,आमदार सुरेश हाळवणकर, मकरंद देशपांडे, रवी अनासपुरे, बाबा देसाई, संदीप देसाई यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फसवणूकप्रकरणी आणखी दोघे अटकेत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

भाड्याने घेतलेली चारचाकी बनावट कागदपत्रांच्या आधारे परस्पर विक्री करून फसवणूक केल्याप्रकरणी आणखी दोघांना गावभाग पोलिसांनी अटक केली. सुदाम ढगे आणि जयसिंह सावंत अशी त्यांची नावे आहेत. याप्रकरणी ओंकार पाटील याला यापूर्वीच अटक केली असून, या गुन्ह्यात अटक केलेल्यांची संख्या तीन झाली आहे.

कोल्हापुरात राहणारा ओंकार पाटील महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. त्याने ठाणे येथून भाड्याने आणलेल्या चारचाकी गाडीची बनावट कागदपत्रे तयार केली होती. ती गाडी त्याने इचलकरंजीतील सचिन तळेकरला विकली होती. मात्र, त्या गाडीला ट्रॅकर असल्याने मूळ मालक तळेकर यांच्यापर्यंत पोहोचला. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तळेकर यांनी गावभाग पोलिस ठाण्यात ओंकार पाटीलविरोधात तक्रार दिली होती. पोलिसांनी १३ जानेवारीला कसबा बावडा येथून ओंकार पाटीलला अटक करून न्यायालयात हजर केले असता १६ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा तपास करताना सायबर कॅफेमध्ये गाडीच्या कागदपत्रात फेरफार करणे आणि बनावट शिक्के तयार केल्याप्रकरणी पोलिसांनी ढगे आणि सावंत या दोघांना अटक केली आहे. या दोघांनाही न्यायालयाने १६ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गरम डांबर पडून जखमी

$
0
0

कोल्हापूर

गारगोटी वेंगरुळ मार्गावर गरम डांबर अंगावरुन पडून दोन मुले गंभीर जखमी झाली. वरद सुरेश आबिटकर (वय १२) व अदित्य भिकाजी सुतार (१४ रा. दोघे, गारगोटी) अशी त्यांची नावे आहेत. मंगळवारी रात्री साडेआठ वाजता ही घटना घडली. गेले चार दिवस हिरा टॉकीजजवळ रस्त्याचे काम सुरु होते. डांबरीकरणासाठी ठेकेदाराने रस्त्याच्या कडेला डांबर गरम करण्यासाठी बॉयलर ठेवला होता. पेटत्या बॉयलरमध्ये दोन बॅरेल पालथी करुन ठेवली होती. बॉयलरजवळ परिसरातील चार मुले उभी होती. बॉयलर गरम करण्यासाठी ठेकेदाराने लाकडाचा ट्रॅक्टर आणला होता. त्या ट्रॅक्टर ट्रॉलीची मागून बॉयलरला धडक बसल्याने त्यातील पालथी केलेली बॅरेल बाहेर मुलांच्या अंगावर पडली. बॅरेलमधील गरम डांबर पडल्याने वरद, अदित्य मोठ्याने ओरडू लागल्यावर परिसरातील नागरिक घटनास्थळी धावले. त्यांनी दोघांना बाहेर काढून रुग्णवाहिकेने सीपीआर रुग्णालयात उपचारास दाखल केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आयपीपीबी’मध्ये कोल्हापूर डाकघर राज्यात अव्वल

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

इंडिया पोस्ट पेमेंटस बँकिग (आयपीपीबी) प्रणालीत कोल्हापूर डाकघर विभाग राज्यामध्ये अव्वल स्थानावर आहे. गेल्या चार महिन्यात 'आयपीपीबी'ने जिल्ह्यात २०,७५१ खाती सुरू करून महाराष्ट्र आणि गोवा विभागात प्रथम क्रमांक मिळवला आहे. पोस्टाची बँकिग सुविधा लोकापर्यंत पोहचविण्यात कोल्हापूर पोस्ट विभाग देशात सातव्या क्रमांकावर असल्याची माहिती प्रवर डाकघर अधीक्षक ईश्वर पाटील यांनी दिली.

पाटील म्हणाले, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपूर्ण देशभरात एक सप्टेंबर २०१८ रोजी आयपीपीबी बँकिग सुविधेला प्रारंभ झाला. कोल्हापूर जिल्ह्यातील ५६३ पोस्ट ऑफिस कार्यालयात बँकिग सुविधेचे नियोजन आहे. यापैकी ४६४ पोस्ट ऑफिसमार्फत बँक शाखा सुरू आहेत. पोस्टाच्या बँकिग सुविधेमार्फत ४९ लाख ८१ हजार रुपयांच्या ठेवी जमा आहेत. यापैकी ७५ टक्के खाती या ग्रामीण भागातील आहेत. सध्या ग्रामीण नागरिक, ज्येष्ठ नागरिक, शेतमजूर, असंघटित कामगार, विद्यार्थीसह विविध योजनांच्या लाभार्थ्यांना आयपीपीबीची बँकिग सोय उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी कर्मचाऱ्यावर तालुकानिहाय जबाबदारी सोपवली आहे.

आतापर्यंत गडहिंग्लज उपविभागांतर्गत ५१५६, गारगोटी ५३८९, कागल ११७६, उत्तर विभाग ६०६७, दक्षिण विभाग १४५९ आणि इचलकरंजी येथे १५०५ खाती सुरू झाल्या आहेत. चार टक्के व्याजदर आहे. किमान शिल्लक रकमेची गरज नाही. पोस्टाची बँक पूर्णपणे डिजिटल आहे. खाते उघडण्यापासून ते पैसे काढून देण्यापर्यंत कुठेही कागदपत्रे किंवा फॉर्म्स भरण्याची आवश्यकता नाही. फक्त आधार कार्ड क्रमांक व मोबाइल क्रमांकाच्या सहाय्याने लाभार्थ्यांचे खाते उघडता येते. बँकेमध्ये 'झिरो बँलेन्स'वर खाते सुरू करता येते. या सुविधेमुळे बचत खाते, चालू खाते, पैसे हस्तांतरण, थेट लाभ हस्तांतरण, बिल भरण्याची सोय आहे. यासह एंटरप्रायझेस आणि व्यापारी पेमेंटची सुविधा उपलब्ध केली आहे. सोपे व सुरक्षितपणे कॅशलेस व्यवहार करता येते. या उपक्रमामुळे आयपीपीबी कर्ज संस्था, गुंतवणूक आणि विमा उत्पादने व इतर आर्थिक संस्थेबरोबर भागीदारी असे उपक्रम राबविण्यात येत आहेत. बँकेचा आयएफएससी कोड संपूर्ण देशभरासाठी एकच आहे. पत्रकार परिषदेला बँकेच्या कोल्हापूर विभागाचे मॅनेजर अमोल कांबळे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘महिला बालकल्याण’कडे लक्ष

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

कोल्हापूर महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीचा एक वर्षाचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. समितीतील सभापती, उपसभापतिपदासह सर्वच सदस्य निवृत्त होत असल्याने नव्या सदस्यांची निवड शुक्रवारी (ता. १८) महापालिकेच्या महासभेत होणार आहे. स्थायी समितीतील आठ सदस्यांसह महिला बालकल्याण समितीमधील नऊ सदस्य निवृत्त होत असल्याने दोन्ही समितीमध्ये जाण्यासाठी सत्तारुढ व विरोधी आघाडीतील नगरसेवकांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे.

महिला व बालकल्याण सभापतिपदासह इतर सदस्यांची निवड एक वर्षांपूर्वी झाली होती. सभापती काँग्रेसच्या सुरेखा शहा विराजमान झाल्या. सभापती शहा यांच्यासह सर्वच सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. आघाडीच्या सत्तेच्या फॉर्म्युलानुसार सभापतिपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाणार आहे. त्यामुळे सभापतिपदासह समितीमध्ये समावेश करण्यासाठी इच्छुक नगरसेविकांनी मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे. सर्वच सदस्यांची निवड महासभेत होणार आहे. महिला बालकल्याण समितीबरोबर स्थायी समितीवर आठ सदस्यांची निवड होणार आहे. स्थायी समितीवर जाण्यासाठी अनेकजण इच्छुक असले, तरी ज्यांना 'स्थायी'मध्ये संधी मिळणार नाही, त्यांची महिला बालकल्याण समितीवर वर्णी लागण्याची शक्यता आहे.

महिला बालकल्याणमधील नऊ सदस्यांपैकी काँग्रेसचे तीन तर राष्ट्रवादी, भाजप व ताराराणी आघाडीचे प्रत्येकी दोन सदस्य आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीचे पाच सदस्य असल्याने बहुमत असल्याने सभापतिपद मिळवण्यासाठी त्यांना फारसी जमवाजमवी करावी लागणार नसल्याचे संख्याबळावरुन स्पष्ट होते.

मुदतवाढीसाठी चव्हाण प्रयत्नशील

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर महापालिकेच्या सत्तेत शिवसेनेचाही समावेश आहे. सत्ता वाटपामध्ये परिवहन समिती सभापतिपद शिवसेनेला देण्यात आले आहे. त्यानुसार गेल्या वर्षांत या पदावर राहुल चव्हाण यांची वर्णी लागली. चव्हाण यांची मुदत संपली असल्याने त्यांच्याठिकाणी इतर नगरसेवकांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. मात्र मुदत वाढ मिळण्यासाठी चव्हाण जोरदार प्रयत्न करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्हिडिओ पार्लरवर छापा

$
0
0

कोल्हापूर: तारबाई रोडवरील व्हिडिओ गेम पार्लरवर जुनाराजवाडा पोलिसांनी छापा टाकला. अवैधरित्या चालवल्या जात असलेल्या टाकलेल्या छाप्यात २५ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सुमारे आठ लाखाचा मुद्देमाल जप्त केला. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अत्यंत गजबजलेल्या ताराबाई रोडवर अवैधरित्या व्हिडिओ गेम पार्लर चालवला जात होता. याबाबतची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी सोमवारी सायंकाळी पार्लरवर छापा टाकल्या. कारवाई दरम्यान पोलिसांनी २५ जणांना ताब्यात घेतले. तसेच पार्लरमधील सुमारे आठ लाखाचा मुद्देमाल जप्त केला. रात्री उशिरापर्यंत जुना राजावाडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चौगुले यांच्यावर कारवाई करावी

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

कोल्हापूर विभागाचे प्रभारी शिक्षण उपसंचालक सुभाष चौगुले यांच्या मनमानी कारभारामुळे शिक्षक, कर्मचारी, संघटना प्रतिनिधींना अयोग्य वागणूक मिळत आहे. चौगुले यांच्या या वर्तणुकीविरोधात कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी पत्रकाद्वारे केली आहे.

पत्रकात म्हटले आहे की, चौगुले यांना कामानिमित्त भेटण्यासाठी येणाऱ्य शिक्षकांना विनाकारण तिष्ठत बसवून ठेवले जाते. अभ्यागतांना न भेटणे, संघटनेच्या प्रतिनिधींशी उद्धटपणे बोलणे, मला भेटण्याची काही गरज नाही अशा शब्दात बोलणे, प्रश्नांबाबत निवेदन न स्वीकारणे अशा पद्धतीची वागणून चौगुले यांच्याकडून मिळत आहे. चौगुले यांच्या या वागणुकीमुळे परवानगी, मान्यता घेण्याची कामे प्रलंबित आहेत. चौगुले यांच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी पदाच्या कार्यकाळातही याप्रकारच्या वागणुकीमुळे काही शाळांमधील शिक्षकांचे सहा महिन्याचे वेतन मिळण्यास विलंब झाला होता. आजतागायत हे वेतन मिळालेले नाही. याबाबत शिक्षणमंत्री, शिक्षण आयुक्त यांच्याकडे तक्रार देण्यात आली असून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साताऱ्यात तरुणाचा खून

$
0
0

साताऱ्यात तरुणाचा खून

सातारा :

सातारा कोडोलो येथील सम्राट हॉटेल व्यवसायिकाचा मुलगा सम्राट विजय निकम (वय २५) याच्यावर अज्ञातानी

धारदार कोयत्याने वार व आणि हॉकी स्टिकच्या सहाय्याने गंभीर मारहाण करून निघृण खून केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना मंगळवारी पावणेचार वाजता दत्तनगर येथील कॅनॉल परिसरात घडल्याचे वृत्त आहे. हा प्राणघातक हल्ला जुन्या भांडणाच्या कारणातून झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

शवविच्छेदनासाठी मृतदेह जिल्हा सरकारी रुग्णालयात आणला असता मृताच्या नातेवाईकांसह सम्राट याच्या मित्र परिवाराने मोठ्या जमावाने ठिय्या दिल्याने जिल्हा रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नातेवाईकांच्या भावना तीव्र बनल्याने परिस्थिती नियंत्रणात ठेवताना सातारा शहर पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. सम्राट विजय निकम हा सायंकाळी पावणेचार वाजता दुचाकीत महामार्गावर पेट्रोल भरून पुन्हा कोडोलीच्या दिशेने जात होता. या वेळी पाठीमागून त्याचा पाठलाग करीत आलेल्या दोघांपैकी एकाने त्याच्या डोळ्यात हॉकीच्या स्टीकचा जोरदार फटका दिला. त्या नंतर धारदार शस्त्राने डोक्यात वार केला. या प्राणघातक हल्ल्यात सम्राट गाडीवरून जागीच रस्त्यावर कोसळला. सम्राटला तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र, मार वर्मी बसल्याने रक्तस्त्रावामुळे त्याचा मृत्यू झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पी. डी. पार्टे यांचे निधन

$
0
0

पी. डी. पार्टे यांचे निधन

सातारा

महाबळेश्‍वरचे माजी नगराध्यक्ष, पी. डी. पार्टे उद्योग समूहाचे शिल्पकार व ज्येष्ठ हॉटेल व्यावसायिक पी. डी. पार्टे (शेठ) यांचे सोमवारी रात्री मुंबई येथे निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाची बातमी महाबळेश्‍वर येथे कळताच शहरावर शोककळा पसरली. त्यांच्या पश्‍चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, सून, जावई, नातवंडे, परतवंडे असा मोठा परिवार आहे. विद्यमान नगरसेविका व माजी नगराध्यक्षा विमलताई पार्टे यांचे ते पती होत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

करवीर मतदारसंघातील चार रस्त्यांसाठी साडेतीन कोटी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कुडित्रे

मुख्यमंत्री ग्रामसडक योजना संशोधन व विकास कार्यक्रमांतर्गत करवीर विधानसभा मतदारसंघातील चार रस्त्यांच्या दर्जोन्नतीसाठी तीन कोटी ५३ लाख ७८ हजार रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार चंद्रदीप नरके यांनी दिली.

आमदार नरके म्हणाले, मतदारसंघातील चार रस्त्यांची दुरवस्था झाली होती. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांची मागणी लक्षात घेऊन या रस्त्यांच्या दर्जोन्नतीचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजना सन २०१७-१८ या वित्तीय वर्षात संशोधन व विकासअंतर्गत सुचविले होते. त्यानुसार जिल्ह्यातील रस्त्यांची दर्जोन्नती करण्यासाठी मतदारसंघातील चार रस्त्यांच्या कामासाठी निधी मंजूर झाला आहे. वडणगे ते गोसावी वसाहत रस्त्यासाठी एक कोटी २९ लाख, सडोली दुमाला ते भाटणवाडी रस्त्यासाठी ७१ लाख ९३ हजार, आतकीरवाडी रस्ता ८७ लाख ४२ हजार आणि काटेभोगाव रस्त्यासाठी ६५ लाख ३५ हजार अशा एकूण ५.४३० किलोमीटरच्या रस्त्यांसाठी ३ कोटी ५३ लाख ७८ हजार रुपये मंजूर आहेत. पाच वर्षे नियमित देखभाल व दुरुस्तीसाठी २४ लाख ६६ हजार रुपये मंजूर आहेत. कामांची लवकरच तांत्रिक मान्यता घेऊन निविदा प्रक्रिया पूर्ण करून कामांना सुरुवात होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून राजारामपुरीत सर्व्हे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिका अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून गेल्या काही दिवसांपासून अतिक्रमण निर्मूलन मोहीम सुरू आहे. मोहिमेंतर्गत मंगळवारी पथकाने राजारामपुरी येथे सायंकाळी सर्व्हे केला. अनधिकृत जाहिरात फलक, होर्डिंग्ज व वाढीव पत्र्याचे शेडस् काढून घेण्याचे आदेश पथकाने दिले. त्यासाठी एक दिवसाची मुदत दिली असून मुदतीत अतिक्रमण स्वत:हून न काढल्यास कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला.

वर्षअखेरीस शहरात अतिक्रमण निर्मूलन पथकाने धडक कारवाई हाती घेतली. अनधिकृत व विनापरवाना जाहिरात फलक, होर्डिंग्ज, स्टँडी जप्त करण्याबरोबरच वाहतुकीला अडथळा व विनापरवाना केबिन्स आणि फेरीवाल्यांवर कारवाई केली आहे. चारही विभागीय कार्यालयातंर्गत प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कारवाई केली असून अतिक्रमण काढलेल्या ठिकाणी पथक पाहणी करुन पुन्हा अतिक्रमण होणार नाही, याची दक्षता घेत आहे. त्यामुळे अतिक्रमण विभागाचा एकप्रकारचा धसका अतिक्रमणधारकांनी घेतला आहे.

अतिक्रमणविरोधात कारवाई अधिक तीव्र करण्यासाठी मंगळवारी पथकाने संपूर्ण राजारामपुरीचा सर्व्हे केला. सर्व्हेदरम्यान पथकाला अनधिकृत जाहिरात फलक व होर्डिंग्ज आढळून आले. तसेच अनेक दुकानांच्या बाहेर वाढीव पत्रे व कायमस्वरुपी नामफलक लावल्याचे निदर्शनास आले आहे. अशा सर्व अतिक्रमणधारकांना अधिकाऱ्यांनी एक दिवसाची मुदत दिली आहे. बुधवारी सर्व अतिक्रमणे स्वत:हून न काढल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा देत त्यासाठी दोन कर्मचाऱ्यांनी खास नियुक्ती केली.

दरम्यान, बुधवारी महाद्वार व ताराबाई रोडवर अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवण्यात येणार आहे. गेल्या पंधरा दिवसांतील या ठिकाणची ही तिसरी कारवाई असणार आहे. दोनवेळच्या कारवाईत महापालिकेने फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला होता. पण अद्याप एकाही अनधिकृत अतिक्रमणधारकावर कारवाई केलेली नाही. परिणामी पंधरा दिवसाच्या कालावधीत तिसऱ्यांदा पथकाला कारवाई करावी लागत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live


Latest Images