Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

चायनीज मांजा विक्रेत्यांवर कारवाई करा

$
0
0

आम आदमी पार्टीची मागणी

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

चायनीज मांजामुळे शहरात जीवघेण्या अपघाताचे प्रसंग घडले आहेत. या मांजा विक्रीवर बंदी घातलेली असताना आजही मांजाची सर्रास विक्री होत आहे. बंदीची कडक अंमलबजावणी करुन विक्रेत्यांवर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन आम आदमी पार्टीच्या युवा आघाडीच्यावतीने महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर यांना देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे, 'मकर संक्रांती सणानिमित्त अनेक ठिकाणी पतंग उडवतात. पतंग उडवणे हा मनोरंजनात्मक खेळ असला, तरी अनेक ठिकाणी पतंगासाठी मांजाचा वापर केला जातो. मांजा दोऱ्यात अडकून शहरासह अन्य ठिकाणी जीवघेणे अपघात घडले आहेत. तसेच पशू, पक्षांनाही इजा पोहोचली आहे. चायनीज मांजा पशू, पक्षी आणि मानवी जीवनास घातक ठरत असल्यामुळे राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने मांजा उत्पादन, साठा, विक्री आणि खरेदीवर बंदी घातली आहे. तरीही या चायनीज मांजाची सर्रास विक्री होत आहे. त्यामुळे मांजा बंदीची कडक अंमलबजावणी करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. शिष्टमंडळात आम आदमी पार्टीचे युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष उत्तम पाटील, आदम शेख, अफियान मुजावर, महंमद काझी, शुभम माळी, आदित्य देशमुख आदींचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अतिक्रमण हटावचा धडाका कायम

$
0
0

फोटो आहे

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरात गेल्या दहा दिवसांपासून महापालिकेची अतिक्रमण कारवाई सुरू आहे. बुधवारी ताराराणी चौक, राजगौरव मंगल कार्यालय व सदर बजार परिसरात कारवाई करत अनधिकृत जाहिरात फलक व होर्डिंग्ज हटवले. त्यानंतर पथकाने चार दिवसांपूर्वी कारवाई केलेल्या महाद्वार व ताराबाई रोडवर पुन्हा कारवाई केली. कारवाईदरम्यान पथकांसोबत फेरीवाल्यांनी वाद घातला. पण रहदारीला अडथळा होणारे फेरीवाले व त्यांचे साहित्य पथकांनी ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेले साहित्य घेण्यासाठी काही विक्रेत्यांनी डंपरमध्ये चढून ते परत घेण्याचा प्रयत्न केला. पण पथकाने पोलिस बंदोबस्तात कारवाईचा धडाका कायम ठेवला.

छत्रपती ताराराणी मार्केट विभागीय कार्यालयाच्यावतीने बुधवारी अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवली. महाराजा हॉटेल, सदर बजार परिसरासह ताराराणी चौक ते राजगौरव मंगल कार्यालय मार्गावर कारवाई केली. कारवाईदरम्यान अतिक्रमण निर्मूलन पथकाने चार डिजिटल बोर्ड, ४० बॅनर्स व जाहिरात फलक काढून टाकले. तर आठ हातगाड्यांवर कारवाई करताना तीन जप्तही केल्या. राजेश मोटर्स येथील केएमटी बस स्टॉपशेजारी असलेली केबिन जेसीबीच्या मदतीने काढून टाकली. दुपारपर्यंत या परिसरात पथकाने कारवाई केली.

त्यानंतर सायंकाळी अचानक अतिक्रमण निर्मूलन पथक महाद्वारवर दाखल झाले. चार दिवसांपूर्वी महाद्वार व ताराबाई रोडवरील होर्डिंग्ज व जाहिरात फलकत हटवताना फेरीवाल्यांनाही हटवण्यात आले होते. पण चार दिवसांनंतर पुन्हा फेरीवाल्यांनी रहदारीला अडथळा होईल अशा पद्धतीने अतिक्रमण केले होते. पथकाने बिनखांबी गणेश मंदिरापासून कारवाईला सुरुवातच करताच फेरीवाल्यांकडून विरोध होऊ लागला. पण पोलिस बंदोबस्तात विरोध मोडीत काढून कारवाई केली. कॉट, लोखंडी स्टँड असे साहित्य डंपरमधून नेत असताना एका महिला विक्रेतीने डंपरवर चढून साहित्य मागे घेण्याचा प्रयत्न केला. फेरीवाल्यांचे साहित्य जप्त केले जात असताना फेरीवाला संघटनेचे नेतेही दाखल झाले. त्यांनी पोलिसांसह पथकांबरोबर वाद घालण्यास सुरुवात केली. पण कारवाईवर ठाम राहत पथकाने साहित्य ताब्यात घेतले. चार दिवसांपूर्वी कारवाई करताना अनेक दुकानांचे वाढीव साहित्य काढून टाकले होते. पण ते साहित्य पुन्हा बसवण्यात आल्यानंतर कारवाईत ते पुन्हा काढून टाकण्यात आले. महाद्वार रोडवरील विरोध मोडीत काढत पथकाने ताराबाई रोडवर कारवाईचा धडाका लावला. कारवाई केल्यानंतर मोकळे झालेले फूटपाथ पुन्हा व्यापून गेल्याने अतिक्रमण निर्मूलन पथकाने साहित्यच ताब्यात घेतले. यावेळी दुकानदार व फेरीवाल्यांनी प्रचंड विरोध करण्याचा प्रयत्न केला. पण पथक आणि पोलिस बंदोबस्तामुळे सर्व रस्ता पुन्हा एकदा मोकळा करण्यात आला.

बुधवारी झालेल्या कारवाईमध्ये उपशहर अभियंता हर्षजीत घाटगे, रमेश मस्कर, एस. के. माने, आर. के. जाधव, अतिक्रमण विभाग प्रमुख पंडित पोवार, कनिष्ठ अभियंता बाबूराव दबडे, महादेव फुलारी, मीरा नगिमे व शाहूपुरी पोलिस स्टेशनचे कर्मचारी सहभागी झाले .

................

चौकट

पथकाचेही असेही अभय

चार दिवसांच्या कारवाईनंतर बुधवारी पुन्हा अतिक्रमण निर्मूलन पथकाने महाद्वार व ताराबाई रोडवर कारवाई केली. कारवाईदरम्यान पथकाने दुकानांसमोरील वाढीव पत्र्याचे शेड, फेरीवाले व रस्त्यावर बसलेल्या भाजी व फळ विक्रेत्यांवर कारवाई केली. त्याचवेळी दोन्ही रस्त्यांवर असलेल्या खाद्यपदार्थांच्या गाड्यांना अभय दिले. 'खाद्यपदार्थांच्या गाड्या ताब्यात न घेता त्यांना गाडी काढण्याची सूचना केली जात होती,' असा आरोप कारवाई झालेले विक्रेते पथकांसमोर येवून करत होते.

.............................

चौकट

गेल्या आठ दिवसांपासून शहरात अतिक्रमण निर्मूलन मोहिमेतंर्गत जाहिरात फलक व होर्डिंग काढून टाकण्यात येत आहेत. पण कारवाईचे पथक पुढे जात असताना कारवाई झालेल्या ठिकाणी विशेषत: फेरीवाले पुन्हा ठाण मांडत होते. याबाबत महाराष्ट्र टाइम्सने 'अतिक्रमण जैसे थे' या मथळ्याखाली फोटोसह वृत्त प्रसिद्ध केले. या वृत्ताची प्रशासनस्तरावर चांगलीच चर्चा झाली. बुधवारी सदर परिसरात कारवाई केल्यानंतर वृत्ताची दखल घेत कारवाईनंतर पुन्हा अतिक्रमण केलेल्या महाद्वार व ताराबाई रोडवर कारवाई करण्यात आली.

.............................

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजप पदाधिकाऱ्यांना मुदतवाढीची लॉटरी

$
0
0

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्णय, इच्छुकांत नाराजी

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना मुदतवाढीची लॉटरी लागली आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत लाभ घेण्याची इच्छूक पदाधिकाऱ्यांची मनोकामना अपूर्ण राहणार असली तरी सध्याच्या कारभाऱ्यांचा भाव वाढणार आहे.

भाजपच्या राज्यभरातील सर्व पदाधिकाऱ्यांची तीन वर्षांची मुदत जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात संपणार आहे. यामुळे नवीन पदाधिकारी नियुक्तीसाठी गेल्या तीन चार महिन्यांपासून हालचाली सुरू होत्या. सभासद नोंदणी, वॉर्ड अध्यक्षामधून मंडल अध्यक्ष निवडण्यात येतो. त्यातून जिल्हाध्यक्षाची निवड होते. राज्यात सत्ता असल्याने या पक्षाचे पदाधिकारी होण्यासाठी इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे या सर्वांचे लक्ष नव्या निवडीकडे होते. पण लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकाच स्थगित करण्यात आल्या आहेत. राज्यातील आहे त्या सर्व पदाधिकाऱ्यांना वर्षभराची मुदतवाढ देण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. यामुळे विद्यमान कारभाऱ्यांना लॉटरी लागली आहे.

प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह राज्यातील सर्व जिल्हा व महानगर अध्यक्षांची मुदत या महिन्यात संपणार आहे. पण या सर्वांनाच मुदतवाढीचा लाभ होणार आहे. देशभरातील पदाधिकारी 'जैसे थे' ठेवण्याचा निर्णय पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी घेतला आहे. यामुळे नव्याने पदाधिकारी होण्यासाठी इच्छूक असणाऱ्यांना आता पुढील वर्षाची वाट पहावी लागणार आहे. निवडणुकीच्या काळात कारभाऱ्यांना अतिशय महत्व येते. सत्तेत असलेल्या पक्षात निवडणूक काळात आर्थिक उलाढाली मोठ्या प्रमाणात होतात. त्यामुळे सध्याच्या कारभाऱ्यांना त्याचा चांगला लाभ होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे वारे फिरल्याने निवडणुकीत यश मिळवण्यासाठी या पक्षाला झगडावे लागणार आहे. यामुळे अपयशाचे धनी होऊ नये यासाठी या पदाधिकाऱ्यांना पायाला भिंगरी बांधावी लागणार आहे.

पक्षात पद मिळणार नाही याची खात्री झाल्यानंतर किमान महामंडळ तरी मिळावे म्हणून राज्यातील अनेकजण सक्रीय झाले आहेत. मात्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या निवडी होण्याची शक्यता फारच कमी आहे. यामुळे अनेक इच्छूक नाराज झाले आहेत.

..............

चौकट

दोन हजार पदाधिकाऱ्यांना लाभ

कोल्हापूर जिल्ह्यात शहर व ग्रामीण असे वेगवेगळे दोन हजारांवर पदाधिकारी आहेत. त्यामध्ये संदीप देसाई व हिंदूराव शेळके हे दोन जिल्हाध्यक्ष, सोळा उपाध्यक्ष, आठ सरचिटणीस, सोळा चिटणीस यांच्यासह १८० कार्यकारिणी सदस्य आहेत. चौदा मंडल असून प्रत्येक मंडलमध्ये शंभर पदाधिकारी आहेत. जिल्हाध्यक्ष होण्यासाठी आर.डी. पाटील, अॅड. संपतराव पवार, अशोक देसाई, विजय जाधव यांच्यासह अनेकजण इच्छूक होते. विद्यमान अध्यक्ष संदीप देसाई यांना बदलण्यासाठी काही दिवसांपासून हालचाली सुरू आहेत. त्यासाठी काहीजण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे साकडे घालत होते. मात्र नव्या निर्णयामुळे या हालचालींना खो बसला आहे.

कोट

'जिल्हाध्यक्ष म्हणून तीन वर्षे काम करण्याची संधी मिळाली. या काळात पक्ष वाढवण्याबरोबरच संघटना मजबूत करण्याचे काम करता आले. पक्षात सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पदाधिकारी म्हणून संधी दिली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रोत्साहनामुळे चांगले काम करता आले, याचे समाधान आहे.

संदीप देसाई, महानगर जिल्हाध्यक्ष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भोई समाजाचा शनिवारीऔरंगाबादला मेळावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्यातील भोई समाजाच्या सर्व संघटना एकत्र आणून समाजाची संघटित ताकद उभी करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून औरंगाबाद येथे ५ जानेवारीला राज्यभरातील सर्व संघटनांची बैठक बोलाविण्यात आली आहे. समाजाचा अनुसूचित जातीत समावेश करावा, या मागणीसाठी लढा उभारण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात येणार आहे.

समाजाच्या राज्यभरात अनेक संघटना आहेत. १९७१ साली तत्कालीन खासदार जतीराम बर्वे व बबनराव परदेशी यांनी अखिल महाराष्ट्र भोई समाज सेवा संघाची स्थापना केली. त्यानंतर नेतृत्व न मिळाल्याने अनेक संघटना स्थापन करण्यात आल्या. त्यामुळे समाजाच्या मागण्यांसाठी लढा उभारण्यात अडथळे येत असल्याच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकत्र येण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यामध्ये प्रा. एकनाथ काटकर यांनी पुढाकार घेतला आहे.

५ जानेवारीला औरंगाबाद येथे सर्व संघटनांची एकत्रित बैठक घेण्यात येणार आहे. यामध्ये राष्ट्रीय क्रांती दल, राज्य क्रांती दल, भारत भोई समाज संघटना, अखिल भारतीय भोई संघटनांचा समावेश आहे. दहा लाखांवर भोई समाजाच्या उपस्थितीत नागपूर येथे अधिवेशन घेण्याचा संकल्प यावेळी करण्यात येणार आहे. बैठकीस प्रकाश लोणारे, गजानन, सातोते, पंकज सुरजुसे, वासुदेव सुरजूसे, भाऊसाहेब बावणे, अभिषेक घटमाळ यांच्यासह अनेक नेते उपस्थित राहणार आहे.

००००

कोट

भोई समाज देशभरात विखुरला आहे. काही राज्यात या समाजाचा समावेश ओबीसीत, तर काही ठिकाणी अनुसूचित जातीमध्ये केला आहे. महाराष्ट्रात या समाजाचा समावेश अनुसूचित जातीमध्ये करण्यासाठी लढा उभारण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व संघटना एकत्र आणण्यात येणार आहेत.

प्रा. एकनाथ काटकर, जनरल सेक्रेटरी, भोई सेवा संघ

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नवयान महाजलसा’ला परवानगी नाकारली

$
0
0

कोल्हापूर

विद्रोही शाहीर शितल साठे, सचिन माळी व सहकलाकारांच्या 'नवयान महाजलसा' या गुरुवारी (ता.३) होणाऱ्या कार्यक्रमाला पोलिस प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो हे कारण पुढे करत प्रशासनाने कार्यक्रमास मनाई केली आहे. भारिप बहुजन महासंघ समर्थक फ्रंटतर्फे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त 'नवयान महाजलसा'चे आयोजन केले होते. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह येथे दुपारी दोन वाजता कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मात्र पोलिसांनी कार्यक्रमाला परवानगी नाकारली. पोलिस प्रशासनाच्या पत्रानंतर नाट्यगृहाच्या व्यवस्थापनने संयोजकांना कार्यक्रमाचे आरक्षण रद्द केल्याचे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परिवर्तन यात्रेद्वारे सरकारच्या कामकाजाचा पर्दाफाश

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

'भारतीय जनता पक्षाचे सरकार हे भ्रष्ट आहे. राज्यकर्त्यांनी सामान्य नागरिकांना खोटी आश्वासने दिली. गेल्या चार वर्षांच्या कालावधीत नागरिकांची फसवणूक झाली. सरकारच्या विरोधात काँग्रेसतर्फे परिवर्तन यात्रा सुरू केली आहे. परिवर्तन यात्रेद्वारे भाजप सरकारच्या भ्रष्ट कारभाराचा पर्दाफाश केला जाईल,' असा इशारा आमदार सतेज पाटील यांनी दिला.

कोल्हापूर शहर व जिल्हा युवक काँग्रेसतर्फे कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात परिवर्तन यात्रा सुरू केली आहे. मंगळवारी सायंकाळी लक्षतीर्थ वसाहत येथून परिवर्तन यात्रेला प्रारंभ झाला. याप्रसंगी आमदार पाटील यांनी 'कहो दिलसे, काँग्रेस फिरसे'असा नारा दिला. परिवर्तन यात्रा १४ जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. अभियानात परिवर्तनाचा चारचाकी रथ सहभागी आहे. परिवर्तन यात्रा कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून निघणार आहे. बुधवारी फुलेवाडी रिंगरोड, आपटेनगर प्रभागात परिवर्तन यात्रा निघाली.

दरम्यान अभियाच्या शुभारंभप्रसंगी उपमहापौर भूपाल शेटे, माजी महापौर स्वाती यवलुजे, माजी उपमहापौर अर्जुन माने, नगरसेवक शारंगधर देशमुख, प्रवीण केसरकर, तौफिक मुल्लाणी यांनी मार्गदर्शन केले. अभियानाचे नेतृत्व युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक थोरात यांनी केले. युवक काँग्रेसचे संतोष कांबळे, वैभव तहसीलदार, शुभम चौगले, सचिन रावळ, अनिल कांबळे, मकरंद कवठेकर आदी सहभागी झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गरुडभरारी फाऊंडेशनचे पुरस्कार वितरण

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

'गतिमान स्पर्धात्मक जगात पत्रकारिता जोपासणे हीच मोठी तारेवरची कसरत आहे. सामाजिक सत्य परखडपणे मांडणे कठीण बनले आहे. माध्यमांमध्ये पक्षाचे हित घुसडले आणि हेच लोकशाहीच्या विघटनाचे कारण बनले आहे,'असे मत ज्येष्ठ पत्रकार डॉ. सुभाष देसाई यांनी व्यक्त केले.

गरुडभरारी एज्युकेशनल अँड सोशल फाऊंडेशनतर्फे आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शिक्षक संघटनेचे नेते दादासाहेब लाड होते. याप्रसंगी साहित्यिक चंद्रकुमार नलगे, शिक्षण उपसंचालक कार्यालयातील शिक्षण निरीक्षक डी. एस. पोवार, श्री किसान शिक्षण प्रसार मंडळ कोतोली संस्थापक डी. जी. पाटील, पशुधन विकास अधिकारी डॉ. अनिता कदम, डॉ. रमेश पोरवाल, उद्योजक बाबासाहेब कदम, मुख्याध्यापक बाबासाहेब पाटील (अमेणी विद्यालय), सहायक शिक्षक इकबाल मुजावर (सुळकूड हायस्कूल), सहायक शिक्षिका सुनीता हंकारे (शेलाजी संघवी विद्यालय) यांना विविध पुरस्कारांनी गौरविले.

आयुष फाऊंडेशनचे अमोल गायकवाड यांना जीवनगौरव पुरस्कार तर दिनकर रामचंद्र चव्हाण व दीपा दिनकर चव्हाण यांना आदर्श कुटुंब पुरस्कारांनी सन्मानित केले. निपाणी तालुक्यातील बारवाड येथील ५५ लोकांचे कुटुंब प्रमुख शशिकांत महादेव अर्जुनवाडे व चंद्रकांत भाऊसो अर्जुनवाडे यांना आदर्श एकत्र कुटुंब पुरस्कार देऊन गौरविले. फाऊंडेशनचे अध्यक्ष अनिल चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन संजय डवर यांनी केले. रवींद्र मोरे यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन्ही राज्यांमध्ये रंगली जुगलबंदी

$
0
0

खासदार साहेब मी अजूनही फिट

आमदार शिवेंद्रराजेंची उदयनराजेंना कोपखळी

सातारा

'खासदार साहेब माझा सारखा खांदा का दाबता, मी अजूनही फिट आहे. हवे तर प्रात्यक्षिक करून दाखवतो,' असे सांगत जावली-साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी खासदार उदयनराजेंना कोपरखळी मारली. या वेळी आमदार शिवेंद्रराजे आणि खासदार उदयनराजे यांनी एकमेकांना जोरदार कोपरखळ्या मारून एक प्रकारे राजकीय इशारेच दिले. कुडाळ (ता. जावली) येथे हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार प्रसंगी आमदार व खासदार समोरासमोर आले होते.

या वेळी या दोघांची ही नजरा नजर झाली. उदयनराजे शिवेंद्रराजे यांच्या समोर जात त्यांच्या खांद्यावर हात ठेवून खांदा दाबू लागले. त्या वेळी शिवेंद्रराजे यांनी 'खासदार साहेब माझा सारखा खांदा का दाबता', अशी विचारणी केली. त्या वर उदयनराजे डोळा मारत मिश्किलपणे म्हणाले, 'बघतोय खांदा किती मजबूत आहे.'

उदयनराजे यांच्या या मिश्किली उत्तराला प्रत्युत्तर देताना शिवेंद्रराजे यांनी आपला खांदा मजबूत असल्याचे सांगितले. हवे तर प्रात्यक्षिक दाखवतो, असे सांगत दोघांची चांगलीच जुगलबंदी रंगली. या जुगलबंदीची मजा जावळीतल्या कार्यकर्त्यांनी घेतली. सुरूची राडा प्रकरण, आनेवाडी टोल नाका प्रकरण, त्याचबरोबर साताऱ्यातील राजकीय कलगीतुरा अशा अनेक राजकीय घडामोडीनंतर दोन्हीही राजे एकमेकांसमोर आले होते. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण होते.

..............

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सहा ग्रामपंचायतसदस्यांचे राजीनामे

$
0
0

सहा ग्रामपंचायत

सदस्यांचे राजीनामे

कराड :

सवादे (ता. कराड) येथील उपसरपंचावरील अविश्वास ठरावाच्या अपिलावर कायद्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांकडून पंधरा दिवसांत निर्णय होणे अपेक्षित होते. मात्र, निर्णयास जाणीवपूर्वक विलंब करीत सत्ताधारी पक्षाकडून प्रशासनाचा गैरवापर करून लोकशाहीचा गळा घोटला जात आहे, असा आरोप येथील कॉंग्रेसच्या काका-बाबा गटाच्या सदस्यांनी केला आहे. प्रशासनाच्या बेकायदा कामकाजाच्या निषेधार्त नववर्षाचे स्वागत करीत मंगळवारी, एक जानेवारी रोजी सवादे ग्रामपंचायतीच्या सहा सदस्यांनी आपल्या पदांचे राजीनामे ग्रामसेवकांकडे सुपूर्द करून प्रशासनाचा निषेध नोंदवला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंतप्रधानांच्या दौऱ्याची सोलापुरात तयारी

$
0
0

पंतप्रधानांच्या दौऱ्याची

सोलापुरात तयारी

सोलापूर :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोलापूर दौऱ्याच्या नियोजनासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठक झाली. या वेळी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी पंतप्रधानांच्या दौऱ्यात सुरक्षा, वाहतूक, कार्यक्रमासाठी मैदानाची निवड आणि अन्य नियोजनात्मक बाबींसंदर्भात चर्चा केली.

दौऱ्यामध्ये कोणतीही कसर राहू नये, सर्व गोष्टींची पूर्तता वेळेत आणि काटेकोरपणे व्हावी यासाठी संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सूचना दिल्या. कार्यक्रमाच्या स्थळाची निवड करण्यासाठी विजापूर रोड येथील शिवाजी अध्यापक महाविद्यालय मैदान, सिद्धेश्वर कारखान्याजवळील मैदान, जुळे सोलापूर येथील अंबर हॉटेल समोरील मैदान, विष्णू मिल मैदानाची पाहणी करण्यात आली. दरम्यान, स्मार्ट सिटी योजनेतून इबीडी परिसरात दुहेरी पाइप-लाइन, रंगभवन, हुतात्मा गार्डन व होम मैदानचे नूतनीकरण, ड्रेनेज कामांचा शुभारंभ, ४५० फुटी उजनी दुहेरी पाइप लाइन, चार हुतात्माचे पोस्ट तिकीट, सुलतानपूरचे राहुल नगर नामांतर, रे नगरमधील घरांची पायाभरणी, सोलापूर-उस्मानाबाद- येडशी महामार्ग या कामाचे उद्घाटन, भूमीपूजन, पायाभरणी मोदींच्या हस्ते करण्याचे नियोजन सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थंडीने वृद्धाचा मृत्यू?

$
0
0

थंडीने वृद्धाचा मृत्यू?

सातारा

कडाक्याच्या थंडीने जावली तालुक्यातील विवर येथील एका वृद्धाला आपला जीव गमवावा लागल्याची घटना घडली. शामराव लक्ष्मण गोळे (वय ६५) असे या वृद्धाचे नाव आहे. मात्र, गोळे यांचा मृत्यू थंडीने झाल्याच्या वृत्ताला वैद्यकीय दुजोरा मिळालेला नाही.

राज्यात कडाक्याच्या थंडीने कहर केला आहे. नाशिक, निफाड, महाबळेश्वर येथे हिमकण पडले आहेत. गेल्या आठ दिवसांपासून जावली, महाबळेश्वर परिसरात थंडीचा कडाका वाढल्याने वातावरणात कमालीचा गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे विवर येथील गोळे यांचा मृत्यू कडाक्याच्या थंडीनेच झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. महाबळेश्वर पाठोपाठ जावली तालुक्यात कडाक्याच्या थंडीची लाट पसरली आहे. उंच डोंगरी भागात दवबिंदू गोटू लागले आहे. डोंगरी भागात कडाक्याच्या थंडीने गेल्या ३० वर्षांचे रेकॉर्ड ब्रेक केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तुरूंगाधिकारी सचिन पाटील निलंबित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कारागृहाच्या सुरक्षा व्यवस्थेत हलगर्जीपणा करण्याबरोबरच कैद्यांना मोबाइल उपलब्ध करुन देण्यात मदत केल्याबद्दल कळंबा कारागृहाचे तुरुंगाधिकारी सचिन पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. वाईतील सीरियल किलर आणि कळंबा कारागृहातील कैदी डॉ. संतोष पोळ (रा. धोम. ता. वाई) याला मोबाइल पुरविल्याच्या संशयावरुन प्रशासनाने ही कारवाई केली आहे. कैद्यांना मदत केल्याबरोबरच कामात कुचराई केल्याचा ठपका ठेवत कारवाई केलेल्यांची कारागृहांतील कर्मचाऱ्यांची संख्या आता १६ झाली आहे. पाटील यांच्यावरील कारवाईआधी कारागृहातील हवालदार, सुभेदारांसह एकूण १४ कर्मचारी निलंबित करण्यात आले आहे.

सचिन पाटील प्रतिनियुक्तीवर कळंबा कारागृहात आले होते. त्यांच्याकडे सर्कल इनचार्जपदाचा कार्यभार होता. त्यांच्यावर झालेल्या कारवाईने कारागृह कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी या प्रकरणी सुरक्षारक्षक राकेश शिवाजी पवार (वय ३०, रा. माळेगाव, ता. बारामती, जि. पुणे) यालाही तडकाफडकी निलंबित करण्यात आले होते.

वाईतील सीरियल किलर आणि त्यावेळी न्यायालयीन कोठडीतील कैदी डॉ. पोळने कारागृहात खोटे पिस्तूल तयार करून २७ नोव्हेंबरला व्हॉट्स अॅपवरुन क्लिप व्हायरल केली होती. त्यामुळे कळंबा कारागृह प्रशासन हडबडून गेले होते. पोळकडे केलेल्या चौकशीत हे पिस्तूल खोटे असल्याचेही स्पष्ट झाले होते. कारागृह प्रशासनाने या प्रकराची गंभीर दखल घेतली होती. पश्चिम विभागाच्या उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांनी संशयित दहा ते पंधरा जणांची चौकशी करुन या संबंधीचा अहवाल तयार केला होता. तो अप्पर कारागृह महासंचालक राजवर्धन यांच्याकडे सादर केला होता. साठे यांनी केलेल्या चौकशीत कारागृहातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. पोळच्या बरॅककडे जाणाऱ्या पंधरा कर्मचाऱ्यांची चौकशी केली होती. सुरक्षारक्षक पवारने पोळला छुप्या मार्गाने मदत केल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले होते. या प्रकारानंतर संतोष पोळची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे.

.. .. .. ..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वैद्यकीय परिषदपाच जानेवारीपासून

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

'असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडियातर्फे 'कॅपिकॉन - २०१९' नावाने दोन दिवसांच्या वैद्यकीय परिषदेचे आयोजन केले आहे. पाच जानेवारी रोजी सयाजी हॉटेल येथे परिषदेला सुरूवात होईल,' अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष तन्मय व्होरा यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले, 'वैद्यकीय क्षेत्रातील नवतंत्रज्ञान सर्व डॉक्टरांपर्यंत पोहचण्यासाठी परिषदेत चर्चा होणार आहे. दरम्यान, पाच जानेवारीला दुपारी तीन ते चार दरम्यान उच्च वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रश्नोत्तराचे सत्र होईल. सायंकाळी चार ते आठपर्यंत साथीचे आजार, एचआयव्ही, सर्पदंशानंतरचे उपचार अशा विविध विषयावर डॉ. हिंमतराव बावसकर, डॉ. अमित द्रविड, डॉ. प्रवीण पाटील, डॉ. गोपिनाथ शेनॉय मार्गदर्शन करणार आहेत. ६ ला सकाळी साडेअकरा वाजता डॉ. प्रकाश बाबा आमटे मार्गदर्शन करतील. त्यांचा डॉ. एस. के. कुलकर्णी यांचा सत्कार होणार आहे. त्यानंतरच्या चर्चासत्रात डॉ. कन्नन सुब्रमण्यम, डॉ. साजीव बाबू, डॉ. अंजली भट्ट, डॉ. मदन बहादूर, डॉ. शर्विल गाढवे, डॉ. अर्जुन आडनाईक, डॉ. चंद्रशेखर पाटील मार्गदर्शन करणार आहेत. परिषदेत जिल्ह्यासह पश्‍चिम महाराष्ट्रातून ३०० पेक्षा अधिक डॉक्टर उपस्थित राहतील. यावेळी उपाध्यक्ष डॉ. अमृत सुलताने, मानद सचिव डॉ. प्रकाश शारबिद्रे, सचिव डॉ. राहुल दिवाण, कोषाध्यक्ष डॉ. अमोल खोत, डॉ. साईप्रसाद उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ जखमीचा अखेरउपचारादरम्यान मृत्यू

$
0
0

फोटो-

मयत किशोर कांबळे व संशयित मयूर सुतार

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

किरकोळ वादातून मित्राने डोक्यात फरशी घातल्याने जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. किशोर शिवाजी कांबळे (वय ३२, रा. अक्कोळे हॉस्पिटलजवळ, जयसिंगपूर) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी मयूर राजेंद्र सुतार (वय ३२, रा. ५२ झोपडपट्टी रणवीर चौक, जयसिंगपूर) यास अटक केली आहे.

याबाबत माहिती अशी : किशोर व मयूर मित्र असून त्यांचा मित्र सागर सुतार याचा मृत्यू झाला होता. ३१ डिसेंबरला रात्री त्याच्या अंत्यविधीला जाण्यासाठी शाहूनगरमधील शिवतेज चौक परिसरात ते गेले होते. थंडीमुळे तेथे शेकोटी पेटविली होती. शेकोटीजवळ किशोरला संशयित मयूरचा धक्का लागल्याने दोघांत भांडण झाले होते. भांडण मिटवल्यानंतर काही वेळानंतर मयूरने रस्त्याकडेच्या गटारीवरील फरशी उचलून किशोरच्या डोक्यात घातली. त्यात तो गंभीर जखमी झाला होता. त्यास सांगलीतील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र, बुधवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. किशोरचा भाऊ वालमेश कांबळे याने दिलेल्या फिर्यादीवरून जयसिंगपूर पोलिसांनी मयूरविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास ताब्यात घेतले. मृत किशोर ड्रायव्हर म्हणून काम करीत होता. त्याच्या पश्‍चात पत्नी, आई, दोन मुले असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

म्हैस, गायींची चोरी

$
0
0

कागल : बोरवडे (ता. कागल) येथून एक दुभती म्हैस व दोन गायी अज्ञाताने चोरून नेल्या. सुभाष गोपाल मगदूम यांच्या मालकीची ही जनावरे असून, या चोरीमुळे त्यांचे सुमारे पावणेदोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. मगदूम शुक्रवारी सकाळी गोठ्यावर गेले असता त्यांना जनावरे चोरीस गेल्याचे लक्षात आले. मुरगूड पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आठवड्यात कामाचा अहवाल द्या

$
0
0

महापालिका लोगो

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरातील रखडलेली विकासकामे, पाणीपुरवठा विभागातील नियोजनशून्य कारभारासह नगरसेवकांनी प्रभागातील विविध समस्यांचा पाढा महापौरांच्या आढावा बैठकीत वाचला. जलअभियंता, शहर अभियंता यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. त्यामुळे बैठकीला जणू महासभेचे स्वरुपच प्राप्त झाले. उपस्थित सर्वच नगरसेवक आक्रमक झाल्यानंतर दर पंधरा दिवसाला बैठक घेण्याचे जाहीर करत आज झालेल्या बैठकीचा अहवाल आठ दिवसांत सादर करण्याचे आदेश महापौर सरिता मोरे यांनी प्रशासनाला दिले.

शहरातील विविध प्रश्नांच्या संदर्भात महापौर सरिता मोरे यांच्या कार्यकाळातील पहिलीच बैठक बुधवारी स्थायी समितीच्या सभागृहात पार पडली. नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी बैठकीला उपस्थिती लावली होती. 'वारंवार पाणीपुरवठा विभागाला माहिती देवूनही दुरुस्ती केली जात नसल्याने अपुरा पाणी पुरवठा होत आहे. पाण्याचे नियोजन का केले जात नाही?, पाणी बिल नियमित घेत असताना पाणी का सोडत नाही?' असा प्रश्न उपस्थित करत महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सुरेखा शहा यांनी पाणीपुरवठा विभागावर हल्लाबोल करत कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. शोभा कवाळे यांनीही अपुऱ्या पाणीपुरवठ्याबाबत प्रश्न उपस्थित केला. जलअभियंता सुरेश कुलकर्णी यांनी या भागात तीन इंची पाईपलाईन टाकण्याची आवश्यकता आहे, प्रभाग उंचावर असल्याने अपुरा पाणीपुरवठा होत असल्याचे स्पष्टीकरण दिले. पण त्यांच्या उत्तरावर नगरसेवकांचे समाधान झाले नाही.

'पाणीप्रश्नाबाबत १५ दिवसांनी आढावा बैठक घेणार आहे. पाण्याच्या प्रश्नाबाबत कोणाची गय करणार नसल्याचा इशारा देत बैठकीचा अहवाल आठ दिवसांत द्या, असे आदेश महापौर मोरे यांनी प्रशासनाला दिले.

'विकासकामांचा आढावा घेण्यासाठी आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी प्रभागांची पहाणी केली. मात्र अधिकाऱ्यांकडून कामाचा पाठपुरावा केला जात नाही,' असा आरोप अश्विनी बारामते यांनी केला.

नगरसेविका वनिता देठे आणि रीना कांबळे यांनी फुलेवाडी रिंगरोड रस्त्याचा प्रश्न उपस्थित करत रस्त्याची दहा कोटींची निविदा कोणाला दिली? रस्त्यावरुन अवजड वाहतूक सुरू आहे. अपघाताचे प्रमाण वाढलेले असताना निविदा काढूनही रस्ता का केला जात नाही, असा प्रश्न उपस्थित केला. शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी रस्त्याच्या कामासाठी निविदा काढली असून ३१ जानेवारीला निविदा खुली होणार असल्याचे स्पष्टीकरण देत, रस्त्यावर मुरुम पसरला असल्याचे सांगितले. त्यावर देठे यांनी रस्ता कधी होणार हे प्रथम स्पष्ट करण्याची मागणी केली.

नगरसेवक तौफिक मुल्लानी आणि नगरसेविका रुपारणी निकम यांनी शाळा परिसरात गतिरोधक बसवण्याची मागणी केली. राजसिंह शेळके म्हणाले, 'सदस्यांनी सुचविलेली कामे आठ ते दहा महिने होत नाहीत. तसेच काही फायली गायब झाल्या आहेत.'

बैठकीस परिवहन सभापती राहुल चव्हाण, नगरसेविका माधुरी लाड, अॅड. सुरमंजिरी लाटकर, उमा इंगळे, छाया पोवार नगरसेवक किरण शिराळे, सचिन पाटील, ईश्वर परमार, शेखर कुसाळे यांच्यासह पदाधिकारी नगरसेवक उपस्थित होते.

............

चौकट

ठेकेदारांना नोटीस

उपमहापौर भूपाल शेटे म्हणाले,'सदस्यांनी प्रभागातील कामासाठी नियोजन करुन दिलेले बजेट १५ दिवसांत खर्ची होऊन निविदा काढण्यासाठी प्रशासन कोणती यंत्रणा राबविणार आहे, तसेच वर्कऑर्डर झालेली कामे अद्याप का सुरु केलेली नाहीत. आचारसंहिता कधीही लागू शकते, त्यापूर्वी वर्कऑर्डर झालेली व वर्कऑर्डर द्यावयाची कामे तातडीने सुरु करण्याबाबत संबंधित ठेकेदारास नोटीस काढा.' बैठकीला नगररचना, आरोग्य, मुख्य आरोग्य निरिक्षक, विधी या विभागाचा एकही अधिकारी अथवा कर्मचारी उपस्थित नसल्याचे निदर्शनास आणून देत उपमहापौर शेटे यांनी त्यांना नोटीस काढावी अशी सूचना अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर यांना केली. पाटणकर यांनी वर्कऑर्डर झालेल्या कामाबाबत ठेकेदारांना नोटीस काढू, असे स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनपा शाळांना ‘देवस्थान’ची दहा लाखांची मदत

$
0
0

आंतरशालेय स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी महेश जाधव यांची घोषणा

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीतर्फे आयोजित ६९ व्या आंतरशालेय क्रिडा स्पर्धेचे उद्घाटन बुधवारी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्या हस्ते झाले. उद्घाटनानंतर महापालिकेच्या शाळांसाठी दहा लाख रुपयांची मदत देवस्थान समितीमार्फत देण्याची घोषणा अध्यक्ष जाधव यांनी केली.

छत्रपती शिवाजी स्टेडीयम, गांधी मैदान, पद्मा पथक हॉकी मैदान अशा तीन ठिकाणी स्पर्धा होणार आहेत. स्पर्धेच्या उद्घाटनानंतर बोलताना अध्यक्ष जाधव म्हणाले, 'क्रिडा स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांचा उत्साह प्रेरणादायी असून महापालिकेच्या शाळांचा दर्जा वाढत असल्याचा अधोरेखित करणार आहे. बौद्धिक विकासासोबत विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकास महत्त्वाचा असून त्यासाठी क्रिडा स्पर्धा नियमित होण्याची आवश्यकता आहे. स्पर्धेच्या माध्यमातून शालेय वयातच विद्यार्थ्यांच्या अंगभूत कौशल्यांना वाव मिळणार आहे. यातून जिल्हा, राज्य, देश व आतंरराष्ट्रीयस्तरावरील विद्यार्थी घडतील. शाळांचा दर्जा सुधारत असताना त्याला मदत करण्यासाठी देवास्थान समितीकडून दहा लाख देणार आहे.'

शिक्षण समिती सभापती अशोक जाधव म्हणाले, 'महापालिका शाळांची गुणवत्ता वाढत असून विद्यार्थी विकासासाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम शिक्षण समितीमार्फत राबविण्यात येत आहेत.'

उद्‌घाटन समारंभास सचिन पाटील, अजित ठाणेकर व विजयसिंह खाडे-पाटील, नगरसेविका माधुरी लाड, स्वाती यवलुजे, रुपाराणी निकम, क्रीडा निरीक्षक सचिन पांडव आदी उपस्थित होते. प्रशासनाधिकारी शंकर यादव यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

छोट्या कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र बेकायदेशीर

$
0
0

अंगणवाडी कर्मचारी महासंघाचे पत्र

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'छोट्या कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र घेण्याची सरकारची भूमिका पूर्णपणे बेकायदेशीर असून ते ताबडतोब थांबवावे,' अशी मागणी करणारे पत्र राज्य पूर्व प्राथमिक अंगणवाडी कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अतुल दिघे व सचिव सुवर्णा तळेकर यांनी रायगड भवन येथे आयुक्त कार्यालयाला दिले.

सरकारची भूमिका ही अंगणवाडींची संख्या कमी करुन पैसै वाचवण्याचा असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. दरम्यान आठ व नऊ जानेवारी रोजी कामगार संघटना संयुक्त कृती समितीने जाहीर केलेल्या संपात अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. शिवाय नऊ जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. कर्मचाऱ्यांनी सकाळी ११ वाजता महावीर उद्यान येथे जमावे, असे आवाहन त्यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अखेर चंदगडला नगरपंचायतीचा दर्जा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, चंदगड

चंदगड ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा द्यावा, या मागणीसाठी गेले दीड वर्षे ग्रामस्थांनी एकजुटीच्या जोरावर व सर्वपक्षीय नेतेमंडळींनी वेगवेगळ्या मार्गाने शर्तीचे प्रयत्न केले होते. चंदगड ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा मिळाल्याने चंदगडवासीयांच्या लढ्याला यश आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी मंत्रालयात चंदगडला नगरपंचायतीचा दर्जा दिल्याची अधिकृत घोषणा करून याबाबतच्या अध्यादेशावर स्वाक्षरी करून नगरपंचायत विभागाकडे पाठविला. या निर्णयाचे चंदगडवासीयांनी फटाके फोडून व गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा केला.

२०१४ मध्ये सरकारने अध्यादेश काढून तालुका व मोठी लोकसंख्या असलेल्या ठिकाणी नगरपंचायतीचा दर्जा देण्याचा अध्यादेश काढला होता. मात्र, चंदगडला तांत्रिक कारण पुढे करून चंदगड ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा देण्यास सरकारने दोन वर्षे झुलवत ठेवले होते. सरकारच्या या धोरणाविरोधात चंदगड वासियांनी असहकार पुकारला. याची पहिली पायरी म्हणून चंदगड सरपंचांसह १७ सदस्यांनी पदांचे राजीनामे दिले होते. त्यानंतर तब्बल चारवेळा सरकारने जाहीर केलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवर बहिष्कार घातला. नगरपंचायत कृती समिती, सर्वपक्षीय कार्यकर्ते व नेते यासाठी मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांची भेट घेतली. नगरपंचायत कृती समितीच्या नेतृत्वाखाली साखळी उपोषण केले होते. घर टू घर जावून लोकांच्यामध्ये जनजागृती केली. बहिष्काराचे अस्त्र नेहमी कायम ठेवल्याने सरकारने लोकांच्या भावना विचारात घेऊन सकारात्मक निर्णय घेतला. आमदार संध्यादेवी कुपेकर, आमदार सतेज पाटील, आमदार हसन मुश्रीफ यांनी चंदगडला नगरपंचायतीचा दर्जा देण्याबाबत विधान परिषदेतही आवाज उठविला. चंदगडला नगरपंचायत लवकरात लवकर मिळावी यासाठी भाजपचे आमदार सुरेश हाळवणकर यांनी विशेष प्रयत्न केले. नगरपंचायतीचा दर्जा मिळावा, यासाठी ग्रामस्थ व नेतेमंडळींनी केलेल्या प्रयत्नांचे आज नगरपंचायत मंजूर झाल्याने प्रयत्नाचे फळ मिळाले.

दरम्यान बुधवारी मंत्रालयात भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य गोपाळराव पाटील, शिवाजीराव पाटील, नामदेव पाटील, सुनील काणेकर, चंद्रकांत दाणी, विजय कडूकर, सचिन नेसरीकर, मिलिंद सडेकर, उमेश शेलार उपस्थित होते.

००००

कोट...

चंदगड ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा मिळाला. हा तमाम चंदगडवासीय नागरिक व सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या एकजुटीचा विजय आहे. याकामी चंदगड, आजरा, गडहिंग्लज यासह अन्य सर्वपक्षीय नेत्यांनी मदत केली. त्यांचे सर्वांचे व सरकारचेही आम्ही ऋण व्यक्त करतो.

शिवानंद हुंबरवाडी, अध्यक्ष, चंदगड नगरपंचायत कृती समिती

००००००

फोटो...

चंदगड नगरपंचायत झाल्यानंतर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची प्रतीक्षा

$
0
0

मंदिर फाइल फोटो

मटा अजेंडा

Maruti.Patil

@timesgroup.com

tweet: @MarutipatilMT

कोल्हापूर :

बहुचर्चित अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्यातील ८७ कोटी ११ हजार निधीतील कामाचा आराखडा सप्टेंबर महिन्यात राज्य सरकारच्या नगरविकास विभागाला सादर केला. त्यानंतर झालेल्या मंत्रिमंडळ बैठक किंवा हिवाळी अधिवेशामध्ये आराखड्याला मंजुरी मिळेल अशी अपेक्षी होती. पण चार महिन्यानंतरही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आराखड्याला मंजुरी मिळालेली नसल्याने तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची शहरवासियांना प्रतीक्षा लागली आहे. लोकसभा निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर झाली, तर विकास आराखडा अचारसंहितेत अडकण्याची भितीही या निमित्ताने व्यक्त केली जात आहे.

साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनाला दरवर्षी लाखो भाविक गर्दी करतात. मात्र मंदिर परिसरात भाविकांना पायाभूत सुविधा मिळत नसल्याने भाविकांसह स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी आहे. भाविकांत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने पायाभूत सुविधांचा बोजवारा उडाला आहे. मंदिरासभोवतालचे रस्ते, पार्किंग, भक्तनिवास, स्वच्छतागृह अशा अनेक सुविधांत वााढ होण्याची गरज आहे. भाविकांना सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी अनेक वर्षांपासून तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची मागणी होत होती, तसेच यासाठी आंदोलनेही झाली. तत्कालीन आघाडी सरकारने तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची घोषणा करत दहा कोटी रुपयांची अर्थसंकल्पात तरतूद केली. पण प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली नाही. आघाडी सरकारने सुरू केलेला कित्ताच सध्याचे भाजप सरकारही गिरवत असल्यासारखी स्थिती झाली आहे.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी तरतूद करत महापालिकेला आराखडा सादर करण्याच्या सूचना केल्या. २५५ कोटींपैकी पहिल्या टप्प्यातील प्रस्तावाला राज्याच्या मुख्य सचिवांनी जून २०१७ मध्ये मंजुरी दिली. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर पुन्हा आराखडा सादर करण्यात आला. त्यांनी आराखड्याबाबत काही सूचना केल्या. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केलेला पहिल्या टप्प्यातील ८७ कोटी ११ हजारांचा सुधारित आराखडा महापालिकेने सप्टेंबर महिन्यात सादर केला. पण आराखड्याची फाईल अद्यापही हललेली नाही.

पहिल्या टप्प्यातील कामांना सुरुवात करण्याबाबत पालकमंत्री पाटील यांनी अनेकवेळा जाहीर कार्यक्रमात कुदळ मारण्याची डेडलाईन दिली. पण त्यांच्या घोषणेनंतरही अद्याप कुदळ पडलेली नाही. परिणामी विकास आराखडा पूर्णत्वास जाण्याची जिल्हावासियांची प्रतीक्षा कायम राहिली. मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी प्रथम दर्शन मंडप, स्वच्छतागृह, मंदिरासभोवतालचे रस्ते आणि पार्किंगची सुविधा देण्यात येणार होती. पण अद्याप आराखडाच मंजूर नसल्याने भाविकांना उन्हाचे चटके सहन करत करवीर निवासिनीच्या चरणी लीन व्हावे लागत आहे.

शहरातंर्गत अरुंद रस्ते अन् पार्किंगची सुविधा नसल्याने वारंवार वाहतुकीची कोंडी होत असते. वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी तीन ठिकाणी बहुमजली पार्किंगचा आराखड्यात समावेश केला. पण पहिल्या टप्प्यातील कामाला सुरुवात न झाल्याने ख्रिसमस सुटीनिमित्त आलेल्या भाविकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. महापालिकेवर काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असल्याने भाजप सरकारकडून निधी मिळत नसल्याची टीका होत असताना किमान तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला मंजुरी देवून टीकाकारांची चोख उत्तरे द्यावीत, अशीही अपेक्षा शहरवासियांकडून व्यक्त होत आहे.

...............................................

चौकट

कुदळ मारण्याचे आश्वास हवेतच

तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात अनेकवेळा बदल केल्यानंतर पहिल्या टप्प्यातील कामे होण्यासाठी आराखडा नगरविकास विभागाकडे पाठवण्यात आला. आराखडा पाठवण्यापूर्वी व पाठवल्यानंतर अनेकदा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कुदळ मारण्याचे आश्वासन दिले. मंत्रीमंडळात पालकमंत्री पाटील यांचे वजन पाहता त्यांनी दिलेल्या आश्वासनामुळे कोणत्याही क्षणी कामाला सुरुवात होईल अशी शक्यता होती. पण चार महिन्यानंतरही प्रत्यक्ष कामाला सुरुवात होत नसल्याने पालकमंत्री पाटील यांचे आश्वासन हवेत विरल्यासारखी स्थिती झाली आहे.

...........................

चौकट

आराखड्यातील प्रस्तावित प्रमुख कामे

३ कोटी ८२ लाख

दर्शन मंडप इमारत

१४ कोटी २५ लाख

बिंदू चौक व सरस्वती चित्रपटगृह पार्किंग

४५ लाख

स्वच्छतागृह

६ लाख

दिशादर्शक फलक

११ लाख

पिण्याच्या पाण्याची व्यवस्था

२ कोटी ६५ लाख

विद्युत व टेलिफोन लाइन स्थलांतर

१ कोटी ९५ लाख

व्हिनस कॉर्नर येथे भक्त निवास व पार्किंग

८७ कोटी ११ हजार

एकूण आराखडा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live


Latest Images