Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

डी.वाय.पाटील यांच्या राष्ट्रवादीमधील प्रवेशाची कारणे

0
0

सक्षम उमेदवार

राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिकांना पक्षातील काहींचा विरोध आहे. गेल्या चार वर्षांत महाडिकांची भाजपच्या नेत्यांशी जवळीक आहे. ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा अनेकवेळा झाली. नजीकच्या काळात महाडिक भाजपमध्ये सहभागी झाल्यास ऐनवेळी उमेदवारीची धावपळ नको म्हणून राष्ट्रवादीकडून डी. वाय. पाटील हे सक्षम पर्याय ठरू शकतात. दोन्ही काँग्रेसकडून त्यांना पाठिंबा मिळू शकतो. शिवाय राज्यातील एका मोठा नेता पक्षात आल्यामुळे राष्ट्रवादीने कार्यकर्त्यांत वेगळा संदेश दिला.

सतेज पाटील यांना राष्ट्रवादीसोबत घेण्यासाठी

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी कोल्हापूर दौऱ्यात विद्यमान खासदार धनंजय महाडिक यांच्या उमेदवारीचे संकेत दिले. महाडिक, मुश्रीफ यांच्यासह प्रमुख नेत्यांची बैठकही झाली. पवार यांनी दोनदा महाडिकांच्या निवासस्थानी भेट दिली. त्यांची संसदीय उपनेतेपदी निवड केली. त्यांच्या उमेदवारीला आमदार सतेज पाटील यांचा विरोध होऊ नये म्हणून डी. वाय. पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश केला असावा. त्यामुळे सतेज पाटील यांचा महाडिक विरोध मावळू शकतो असा कयास आहे.

पवार यांचे धक्कातंत्र

राजकारणात धक्कातंत्र देण्यात शरद पवार हे माहीर समजले जातात. डी. वाय. यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशमागे तेच सूत्र आहे. एकीकडे महाडिकांवर दबाव आणि दुसरीकडे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याला पक्षात घेऊन काँग्रेसलाही सूचक इशारा असावा. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीची कमांड आपल्याच हाती राहावी यासाठी ही खेळी असावी. शिवसेनेचे नेते, प्रा. संजय मंडलिक यांना राष्ट्रवादीतून उमेदवारीसाठी पक्षातील काहीजण प्रयत्नशील आहेत. पवार यांचा दुसराच विचार सुरू असल्याचे राजकीय घडामोडीतून दिसते. नुकत्याच झालेल्या दौऱ्यात त्यांनी श्रीमंत शाहू महाराजांकडे स्नेहभोजन घेतले. आता अचानक डी. वाय. पाटील यांच्या पक्षप्रवेशामुळे नवे आडाखे बांधले जात आहेत.

०००

(मूळ कॉपी)

सक्षम उमेदवार म्हणून

राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिकांना पक्षातील काही मंडळीचा विरोध आहे.शिवाय गेल्या चार वर्षात महाडिकांची भाजप नेत्यांशी जवळीक होती. ते भाजपात प्रवेश करण्याच्या वावड्या उठविल्या. नजीकच्या काळात महाडिक भाजपमध्ये सहभागी झाल्यास ऐनवेळी प्रवेशासाठी उमेदवारीची धावपळ नको म्हणून राष्ट्रवादीकडून डी.वाय.पाटील हे सक्षम उमेदवार म्हणून पर्याय ठरु शकतात.दोन्ही काँग्रेसकडून त्यांना पाठिंबा मिळू शकतो. शिवाय राज्यातील एका मोठा नेता पक्षात आल्यामुळे कार्यकर्त्यामध्ये वेगळा संदेश दिला.

...................

सतेज पाटलांना राष्ट्रवादीसोबत घेण्यासाठी

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी कोल्हापूर दौऱ्यात विद्यमान खासदार धनंजय महाडिक यांच्या उमेदवारीचे संकेत दिले आहेत. महाडिक, मुश्रीफसह प्रमुख नेत्यांची बैठक घेतली. दोन वेळेला महाडिकांच्या निवासस्थानी भेट दिली. संसदीय उपनेतेपदी निवड केली. त्यांच्या उमेदवारीला आमदार सतेज पाटील यांचा विरोध होऊ नये म्हणून डॉ.डी.वाय.पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश.डी.वाय. पक्षात आल्याने सतेज पाटलांचा विरोध मावळू शकतो असा कयास आहे.

..............

पवारांचे धक्कातंत्र

राजकारणात धक्कातंत्र देण्यात शरद पवार हे माहिर समजले जातात. डी.वाय.यांचा राष्ट्रवादीतील प्रवेशमागे तेच सूत्र. एकीकडे महाडिकांवर दबाव आणि दुसरीकडे काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याला पक्षात घेऊन काँग्रेसलाही सूचक इशारा. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीची कमांड आपल्याच हाती राहावी यासाठी राजकीय खेळी. प्रा.संजय मंडलिकाच्या उमेदवारीसाठी पक्षातील काही मंडळी प्रयत्नशील आहेत. पवार यांच्या मनात मात्र दुसराच विचार सुरू असल्याचे राजकीय घडामोडीतून दिसत आहेत. दौऱ्यात श्रीमंत शाहू महाराज यांच्याकडे स्नेहभोजन घेतले. तर अचानकपणेडी.वाय.पाटील यांच्या पक्ष प्रवेशामुळे नवीन आडाखे बांधायला सुरुवात झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


संघटनांमुळे कामगारांचे अस्तित्व

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'संघटित किंवा असंघटित कामगारांना मिळालेल्या सुविधा सहजासहजी मिळालेल्या नाहीत. त्यासाठी कामगारांना रक्त सांडावे लागले. कामगारांना लढ्यातून मिळालेला न्याय व हक्क सध्याचे राजकर्ते काढून घेत असून, त्यासाठी कामगारांची एकजूट आवश्यक आहे. संघटना कामगारांची ताकद असून ताकद टिकवण्याची गरज आहे. संघटनांमुळेच कामगारांचे अस्तित्व टिकून आहे,' असे प्रतिपादन डॉ. आनंद मेणसे यांनी केले.

आप्पासाहेब मारुतीराव ढेरे यांच्या चौथ्या स्मृतिदिनानिमित्त कोल्हापूर डिस्ट्रिक्ट बँक एम्प्लॉईज युनियनच्या वतीने आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. जिल्हा परिषदेच्या कर्मचारी सोसायटीच्या हॉलमध्ये झालेल्या व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी दिलीप पवार होते.

'सहकार चळवळीतील कामगार संघटनांपुढील आव्हाने' या विषयावर बोलताना डॉ. मेणसे म्हणाले, 'स्वातंत्र्यापूर्वी कामगारांचे तास व आठवड्याची सुट्टी निश्चित नव्हती. त्यामुळे वडील आणि मुलांची भेट होणे मुश्कील बनले होते. कामगारांना छोट्या सुविधा देण्यासाठी प्रथम नारायण लोखंडे यांनी संघटना बांधणी केली. तत्कालीन भांडवलदारांना ब्रिटिश सत्तेचे पाठबळ असल्याने सुट्टीला धार्मिकतेची जोड देऊन कामगारांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न झाला. परिणामी कामगारांना संघटित करण्यासाठी त्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांची जोड दिली. मात्र, फूट पाडण्याचे धोरण जुनेच असले, तरी ते नव्याने समोर येत आहे. त्याला सध्याचे राजकर्ते कारणीभूत असून, त्याचे लोण सहकार क्षेत्रातही पसरले आहे. सहकाराला आर्थिक शिस्त लावण्याचे काम कामगारांचे असून, त्यासाठी त्यांनी आपल्यातील एकजूट कायम ठेवली पाहिजे.'

यावेळी प्रा. विलास रणसुभे, बी. आर. पाटील-सिरसेकर, आनंदराव परुळेकर, आय. बी. मुनशी, अशोक यादव, एस. बी. पाटील, हिराचंद आरबाळे यांच्यासह जिल्हा बँकेचे कर्मचारी उपस्थित होते. युनियनचे अध्यक्ष भगवान पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सी. ए. रावण यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रीय महामार्गाचे काम चार पटीने वाढलेमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा

0
0

राष्ट्रीय महामार्गाचे काम चार पटीने वाढले

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा

म. टा. वृत्तसेवा, सातारा

'केंद्र सरकारच्या मदतीने राज्यात जल सिंचनाची व रस्ते विकासाची कोट्यवधी रुपयांची कामे सुरू आहेत. राज्याच्या विकासाचा वेग वाढला आहे. २०१९पर्यंत राज्याच्या सिंचन क्षमतेत भरीव वाढ होईल,' असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी साताऱ्यात आयोजित कार्यक्रमात व्यक्त केला. जलयुक्त शिवार, उरमोडी, जिहे-कटापूर योजनांच्या माध्यमातून संपूर्ण सातारा जिल्हा दुष्काळमुक्त करण्याचा निर्धार तसेच जिल्ह्यातील मेडीकल कॉलेजच्या जमिनीचा प्रश्न मार्गी लागला असून, एक महिन्याच्या आत पद निर्मितीचे काम पूर्ण करणार असल्याची घोषणा ही त्यांनी केली.

सैनिक स्कूलच्या मैदानावर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवरील खंबाटकी घाट परिसरातील नवीन सहा मार्गिका बोगद्यासह हेळवाक-कराड सेक्शन व सातारा-म्हसवड सेक्शनच्या दुपदरीकरणाच्या कामांची कोनशिला अनावरण आणि धोम बलकवडी प्रकल्पाच्या मुख्य कालव्याचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी होते.

या वेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, सहकारमंत्री सुभाष देशमुख, साताऱ्याचे पालकमंत्री विजय शिवतारे, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खा. उदयनराजे भोसले आदी उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रस्ते महामार्ग व सिंचनासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'प्रधानमंत्री सिंचन योजना आणि बळीराजा योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार मोठ्या प्रमाणात निधी राज्यासाठी देत आहे. त्यामुळे राज्यात सिंचनाची अनेक कामे सुरू आहेत. जलसंपदा विभागात वेगाने कामे होण्याबरोबरच पारदर्शक कामांवर भर दिला आहे. या विभागात ६३ टक्के बिलो टेंडर पद्धतीने कामे सुरू आहेत. या निमित्ताने नवी पारदर्शक कार्य संस्कृती राज्यात निर्माण झाली आहे. कृष्णा-भीमा खोऱ्यात दोन प्रकल्पांच्या माध्यमातून पुढील सहा महिन्यांत ५० हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचनाचा लाभ देण्यावर भर आहे. येत्या काळात पश्चिम महाराष्ट्राचे चित्र बदलणार आहे. राज्यातील वीजेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी एक लाख सौर पंपाचे वितरण केले जाणार आहे. सध्या आठ हजार पिण्याच्या पाण्याच्या योजनांचे काम पूर्ण झाले असून, नवीन दहा हजार योजनांचे काम सुरू आहे. जलयुक्त शिवार, जिहे-कटापूर, उरमोडी प्रकल्पाच्या माध्यमातून संपूर्ण सातारा जिल्हा दुष्काळ मुक्त करणार आहे.'

पाच लाख कोटींची कामे राज्यात सुरू : गडकरी

केंद्राच्या माध्यमातून राज्यात रस्ते विकासाचे मोठे काम हाती घेण्यात आले आहे. राज्यात भारतीय राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून ५ लाख कोटी रुपयांपेक्षाही अधिक कामे सुरू आहेत. रस्ते विकासाबरोबरच प्रधानमंत्री सिंचन योजना व बळीराजा सिंचन योजनेच्या माध्यमातून राज्यात जलसंधारणाची मोठी कामे सुरू आहेत. राज्यातील अर्धवट स्थितीत राहिलेल्या सिंचन प्रकल्पांची कामे पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार आवश्यक तो सर्व निधी देण्यास तयार आहे. राज्यात रस्ते विकासाबरोबरच जलसंधारणाच्या कामांना गती देण्यासाठी १७० ब्रीज कम बंधाऱ्यांचे काम सुरू आहे. या माध्यमातून राज्याची सिंचन क्षमता ५० टक्यांपर्यंत जाईल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार उदयनराजे भोसले यांनी मनोगत व्यक्त केले.

..............

खंबाटकी बोगदा भूसंपादनात शेतकऱ्यांना न्याय देऊ : गडकरी

सातारा :

'खंबाटकी बोगद्याच्या भूसंपादनाच्या प्रक्रियेत शेतकऱ्यांना योग्य दर द्यावा, अशा सूचना मी नक्की देईन. प्रकल्प राष्ट्राच्या हिताचा असल्याने प्रकल्पग्रस्तांच्या योगदानाची निश्चितपणे नोंद घेऊन शेतकऱ्यांना न्याय देऊ,' अशी ग्वाही केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवरील खंबाटकी बोगद्याच्या कामासाठी वाई तालुक्यातील वेळे व खंडाळा तालुक्यातील वाण्याचीवाडी, पारगाव व खंडाळा या चार गावांमधील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, शेतकऱ्यांना अपेक्षित असलेली नुकसान भरपाई दिली जात नसल्याबाबत चारही गावांतील शेतकऱ्यांच्या वतीने आमदार मकरंद पाटील यांनी नितीन गडकरी यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले. त्यावेळी गडकरी बोलत होते.

.........

राष्ट्रवादीने रस्त्यात फेकले कांदे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्त्यानी रविवारी दुपारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सातारा दौऱ्यात चक्क रस्त्यावर कांदे फेकून प्रसार माध्यमांचे लक्ष वेधून घेतले. या युवा कार्यकर्त्यांसह इतर सामाजिक प्रश्नावर आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी अटक केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष तेजस शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पन्नास युवक कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत रस्त्यावर कांदे फेकले. कांद्याला दर मिळावा यासाठी हे आंदोलन करण्यात आले आहे, अशी माहिती दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रंगरेषांची चित्र दुनिया

0
0

फोटो अर्जुन टाकळकर...

कोल्हापूर टाइम्स टीम

मोहित करणारी निसर्गाची नानाविध रुपे, कॅनव्हासवर अवतरलेली ग्रामीण संस्कृती, समुद्रकिनारा, हुबेहुब साकारलेली व्यक्तीचित्रे आणि रंग आणि रेषांच्या माध्यमातून साकारलेल्या चित्रांच्या दुनियेत रमलेला कलाप्रेमी असे चित्र दसरा चौक परिसरातील कला महोत्सवमध्ये आकाराला आले आहे. नामवंत चित्रकार आणि शिल्पकारांच्या कलाकृतीची प्रात्यक्षिके हे दुसऱ्या दिवशीच्या महोत्सवाचे आकर्षण ठरले. महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त महोत्सवातील चित्रकार एकत्र येऊन गांधीजींचे चित्र तयार करणार आहेत. त्याला रविवारी सुरुवात झाली.

कोल्हापूर आर्ट फाऊंडेशनतर्फे आयोजित कला महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी बालचित्रकारांनी महोत्सवात रंग भरला. कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील तब्बल ११०० विद्यार्थ्यांनी या स्पर्धेंत सहभाग घेतला. प्रत्यक्ष स्पर्धेला सुरुवात होण्याअगोदर विद्यार्थ्यांना संपूर्ण कलामहोत्सव दाखविण्यात आला. महोत्सवात सहभागी चित्रकारांच्या स्टॉलमध्ये बसून विद्यार्थ्यांनी चित्रे काढण्याची संधी मिळाल्याने त्यांचा हुरुप वाढला होता. 'महोत्सवातील आवडता प्रसंग, आवडता चित्र' या विषयावर ही स्पर्धा रंगली. पहिली ते चौथी, पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी अशा तीन गटात स्पर्धा झाली. विद्यार्थ्यांनी महोत्सवातील मनाला भावणारा प्रसंग,व्यक्तीचित्रे, निसर्गचित्रे रेखाटली. दुपारी साडेबारा वाजेपर्यंत ही स्पर्धा रंगली.

कला महोत्सवाच्या माध्यमातून कोल्हापुरातील सीनिअर आणि तरुण कलाकारांच्या चित्रकृती, शिल्पकृती आणि काष्ठशिल्पे प्रेक्षकांना पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. प्रत्येक कलाकृतीची वेगळी खासियत आहे. गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, हनुमान, कलावतीदेवी, श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांची व्यक्तीचित्रे पाहताना कलाकृतीवरुन नजर हटत नाही. चित्रकार विलास बकरे, एस. म्हस्के, सुरेश पोतदार, सुनील पंडित, अतुल डाके, युवराज पाटील, सिकंदर मुल्ला, राजू इंगळे, नेहा जाधव, स्वप्नील पाटील, डॉ. किरण सूर्यवंशी यांच्यासह अन्य चित्रकारांच्या कलाकृती आर्कषण ठरत आहेत. सीनिअर आणि तरुण चित्रकारांच्या या यादीमध्ये सात वर्षीय आयुष स्वप्नील गायकवाड या शाळकरी विद्यार्थ्याचा स्टॉल महोत्सवाचे वेगळेपण दर्शविणारे आहे.

प्रात्यक्षिके ठरली आकर्षण

चित्र आणि शिल्पकृतीची निर्मिती कशी होते, रंगसंगती, कुंचल्याचा वापर याविषयी सगळ्यांनाच उत्सुकता असते. महोत्सवात नामवंत चित्रकार आणि शिल्पकारांच्या कलाकृतीचे प्रात्यक्षिक झाले. महोत्सवातील मुख्य व्यासपीठासमोरील मोकळ्या जागेत प्रत्यक्ष कलाकृती आकाराला येताना पाहण्याचा आनंद उपस्थितांना मिळाला. चित्रकार एस. निंबाळकर, नागेश हंकारे, सागर बोंद्रे, राहुल रेपे, राजेंद्र हंकारे यांनी प्रात्यक्षिके दाखविली. शिल्पकार प्रशांत धुरी यांनी व्यक्तीशिल्प तयार केले.

चित्रकारांनी खरेदी केल्या चित्रकारांच्या पेटिंग्ज

कलाकारांच्या कलाकृतीविषयी प्रेक्षकांना नेहमीच कुतुहल असते. महोत्सवातील चित्रे, शिल्पकृती, फोटोग्राफी प्रेक्षकांना आकर्षित करत आहेत. आवडलेल्या कलाकृती खरेदी करुन त्यावर पसंतीची मोहोर उमटवली. महोत्सवात सहभागी चित्रकारांनी इतर चित्रकारांच्या स्टॉल भेटी देऊन आवडलेल्या पेटिंग्जही खरेदी करण्याचे अनोखे दृश्य रविवारी पाहावयास मिळाले. चित्रकार संजीव संकपाळ, शिल्पकार सतीश घारगे यांनी चित्रकार विजय टिपुगडे, बबन माने, एस. निंबाळकर यांची चित्रे खरेदी केली.

जुने कोल्हापूर आणि जैवविविधतेच्या फोटोग्राफीला पसंती

प्रदर्शनात चित्रांच्या सोबतीला फोटोग्राफीचे दोन स्टॉल प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहेत. ज्येष्ठ चित्रकार कै. एस. बी. टाकळकर यांनी कॅमेराबद्ध केलेल्या फोटोग्राफीतून कोल्हापूरच्या ५० वर्षांपूर्वीच्या वैभवाचे दर्शन घडत आहे. कोल्हापुरातील विविध वास्तू, धार्मिक स्थळे पाहताना जुने कोल्हापूर डोळ्यासमोर उभे राहते. पर्यावरण अभ्यासक रमण कुलकर्णी यांच्या संग्रहातील कोल्हापूरच्या जैवविविधतेवरील छायाचित्रांचे स्टॉल पर्यावरणप्रेमीसाठी आकर्षण ठरले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हे आमदार नव्हे बडे भांडवलदार

0
0

म. टा. वृत्तसेवा, कागल

शेतकरी, सभासद, कर्मचाऱ्यांसह सर्वच घटकांचे हित डोळ्यासमोर ठेवून शाहू ग्रुपची वाटचाल सुरू आहे. तरीही काही मंडळी चिखलफेक करतात. कारखान्याला मिळालेल्या दोन पुरस्कारांनी त्यांना चपराक बसली आहे. आमच्या कारभारावर आरोप करणारे हे आमदार नसून खासगी कारखानदारी काढणारे कागलमधील बडे भांडवलदारच आहेत,' अशी टीका 'म्हाडा'चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी केली.

म्हाकवे (ता. कागल) येथे विकासकामांचे उद्घाटन, शाहू कारखान्याच्या सभासदांमार्फत आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शाहूचे संचालक पी. डी. चौगुले होते. आमदार मुश्रीफ यांचा नामोल्लेख टाळत घाटगेंनी जोरदार टीका केली.

घाटगे म्हणाले, 'राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशनच्या माध्यमातून जलयुक्त शिवाय, शालेय साहित्य वाटप, गरीब रुग्णांवर उपचार, सुशिक्षित बेरोजगार युवकांना नोकरीसाठी प्रशिक्षण मेळाव्याचे आयोजन, महिला सबलीकरण आदी उपक्रम राबवून त्यांचे विचार अमलात आणत आहे. सर्वांच्या इच्छेनुसार त्यांचा पुतळा उभारण्याचाही निर्णय घेतला आहे. दोन जानेवारीला त्याचे भूमिपूजन करणार आहे.'

महावीर पाटील यांनी प्रास्ताविक केले. चौगुले वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामाचा प्रारंभ करण्यात आला. ज्येष्ठ सभासदांच्या हस्ते समरजितसिंह घाटगेंचा सत्कार करण्यात आला. राजे बँकेला मिळालेल्या पुरस्काराबद्दल बँकेचे अध्यक्ष एम. पी. पाटील, कार्यकारी संचालक विनायक चव्हाण यांच्यासह संचालक मंडळाचा सत्कार झाला. एअर पोर्समध्ये भरती झालेल्या सौरभ पाटील, विनायक पाटील यांचाही सत्कार करण्यात आला.

'शाहू'चे संचालक डी. एस. पाटील, कारखान्याचे सुपरिटेंड बाळासाहेब तिवारी, अशोक पाटील यांची भाषणे झाली. उपाध्यक्ष बाळ घोरपडे, कागलचे नगरसेवक विशाल पाटील, बाजार समितीच्या संचालिका आशालता पाटील, सुनील मगदूम, ए. डी. पाटील आदी उपस्थित होते. रावसाहेब पाटील यांनी आभार मानले.

००००

कुणाला पुरस्कार, तर कुणाला घागरी...

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या हस्ते कारखान्याला पुरस्कारांचे वितरण झाले. अत्यंत पारदर्शी आणि निष्पक्षपाती निवड प्रक्रिया होते. किमान यावरून विरोधकांनी शाहू ग्रुपच्या कारभाराची दखल घ्यावी. विक्रमसिंह घाटगे यांनी घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार कारभार सुरू आहे. तरीही काहीजण टीका करत आमच्यावर आरोप करतात. कितीही टीका झाली तरी आपले काम प्रामाणिकपणे करत राहायचे ही राजेंची शिकवण आहे. ज्याच्या त्याच्या नियतीप्रमाणे कर्माची फळे मिळतात. त्यामुळेच कोणाला घागरी मिळतात, तर कोणाला पुरस्कार', असे समरजितसिंह घाटगे यांनी म्हणताच उपस्थितांत हशा पिकला.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टोमॅटोच्या दरात १० रुपयांनी वाढ

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गेले सहा महिने स्वस्त असलेल्या टोमॅटोच्या दरात प्रतिकिलो दहा रुपयांची वाढ झाली. टोमॅटोच्या प्रतवारीनुसार प्रतिकिलो ३० ते ४० रुपये दराने विक्री झाली. दोडकाही प्रतिकिलो १० ते २० रुपयांनी महागला. कोबीगड्डाही पाच रुपयाने महागला. स्वस्ताईमुळे ग्राहकांकडून पालेभाज्यांना अधिक मागणी होती.

पंधरा दिवसांपूर्वी टोमॅटोची विक्री प्रतिकिलो दहा रुपये दराने सुरू होती. पण ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर गोव्यात टोमॅटो आणि कोबीला सॅलडसाठी मागणी वाढली. त्यामुळे बाजार समितीतील सौद्यात टोमॅटो आणि कोबीचे दर वाढले. टोमॅटोचा आज बाजारात प्रतिकिलो ३० ते ४० रुपये दर होता. गेल्या आठवड्यात लहान कोबीगड्डा पाच तर मोठा कोबी गड्डा दहा रुपयांना होता. आज अनुक्रमे दहा आणि पंधरा रुपये दराने त्याची विक्री सुरू होती.

वांगी, वरणा, कारले, घेवडा, मटार यांचा दर प्रतिकिलो ४० रुपये होता. मोठ्या आकाराची वांगी प्रतिकिलो ३० रुपये दराने विकली गेली. भेंडीचा दर ४० तर गवारीचा दर ७० ते ८० रुपये प्रतिकिलो होता. दोडक्याच्या दरात प्रतिकिलो दहा ते वीस रुपयांनी वाढ झाली. प्रतिकिलो ६० ते ८० रुपयाने याची विक्री झाली. मेथी, पोकळा, चाकवत, कांदा पात, शेपू, करडई, पालक या पालेभाज्यांचा दर प्रतिपेंढी दहा रुपये होता. बाजारात हरभऱ्याचे आगमन झाले असून प्रतिपेंढी पाच ते दहा रुपये दराने विक्री सुरू आहे.

फळभाज्यांचे दर (प्रतिकिलो रुपयांत)

वांगी ३० ते ४०

टोमॅटो ३० ते ४०

भेंडी ५० ते ६०

ढबू ३० ते ४०

गवार ८०

दोडका ६०

कारली ४०

वरणा ३० ते ४०

ओली मिरची ३० ते ४०

फ्लॉवर १० ते २५ रुपये नग

कोबी १० ते १५ रुपये नग

बटाटा २५ ते ३०

लसूण ३०

कांदा १० ते २०

पालेभाजी दर (पेंढी रुपयांत)

मेथी १०

कांदा पात १०

कोथिंबीर १०

पोकळा १०

पालक १०

शेपू १०

फळांचे दर (प्रतिकिलो रुपयांत)

सफरंचद ६० ते १८०

डाळिंब ४० ते ६०

संत्री ३० ते ८०

मोसंबी ३० ते ८०

बोरं २० ते ४०

केळी २० ते ६० (डझन)

जवारी केळी ३० ते ७० (डझन)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चंद्रभागेच्या महाआरतीसाठी जय्यत तयारी

0
0

म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे करणार असलेल्या चंद्रभागेच्या महाआरतीकडे सर्वांचे जगाचे लक्ष लागले आहे. उद्धव ठाकरे कुटुंबीयांसह सोमवारी सायंकाळी चंद्रभागेच्या पैलतीरावर असलेल्या इस्कॉन घाटावरून चंद्रभागेच्या महाआरती करणार आहेत. त्यासाठी शिवसेनेने जोरदार तयारी केली असून, या मठापर्यंत येणाऱ्या मार्गावर दुतर्फा शिवसेनेचे शेकडो झेंडे आणि बॅनर लावण्यात आले आहेत. मठापर्यंत येण्याचा रस्ता नव्याने तयार करून घेतला असून, इस्कॉन घाटावर चारी बाजूला भगवे पडदे बांधण्यात आले आहेत. ज्या ठिकाणी उभे राहून आरती करायची आहे, तेथे लोखंडी बॉरिकेड लावले आहेत.

दरम्यान, ही सर्व व्यवस्था अतिशय चकाचक झाली असली तरी चंद्रभागेच्या महाआरतीचा सोहळा होणार आहे, त्या चंद्रभागा पात्राच्या सफाईकडे प्रशासनाने साफ दुर्लक्ष केले आहे. महाआरती होणार आहे तिथे मोठ्या प्रमाणात मोकळ्या बाटल्या, निर्माल्य, जुने कपडे आणि घाण तरंगत आहे. कार्यक्रमाच्या तयारीसाठी सेनेचे पदाधिकारी आठ दिवसांपासून शहरात तळ ठोकून आहेत, त्यांच्याही नजरेत अजून ही गोष्ट न आल्याने ही मंडळी वरवरच्या चकाचक वातावरणावर भाळून गेली आहे.

उद्धव घाटाचे भाग्य फळफळले

केवळ नावामुळे पंढरपूरच्या उद्धव घाटाचे भाग्य फळफळले आहे. चंद्रभागेवरील पुरातन उद्धव घाटाला पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी थेट एक कोटी रुपयाचा निधी जाहीर केला आहे. चंद्रभागा आरतीसाठी उद्धव ठाकरे इस्कॉन घाटावर येणार असल्याने कदम यांनी इस्कॉन घाटाची पाहणी केली. समोरच्या घाटाचे नाव उद्धव घाट आहे, असे त्यांच्या निदर्शनास आणताच कदम यांनी आपल्या विभागातून घाट सुशोभीकरणासाठी तातडीने एक कोटींचा निधी जाहीर करीत जिल्हाधिकाऱ्यांना या घाटाचेही सुशोभीकरण करण्याचे आदेश दिले. वर्षांनुवर्षे हा उद्धव घाट चंद्रभागेच्या तीरावरून असून, घाटाची अतिशय दुरवस्था झाली आहे. श्रीकृष्णाचा सखा असलेल्या उद्धवाचे येथे छोटे मंदिर असल्याने या घाटाला उद्धव घाट नाव पडले आहे. या घाटाच्या परिसरातून दुर्दैवाने शहरातील ड्रेनेजचे पाणी थेट चंद्रभागेत नेहमीच मिसळते. आता या घाटाचे सुशोभीकरण करण्याचे आदेश रामदास कदम यांनी दिल्याने सर्वात जास्त दुर्लक्षित असलेल्या या घाटाचे नशीब केवळ नावामुळे फळफळणार आहे.

सेना नेत्यांमध्ये विसंवाद

उद्धव ठाकरे यांच्या महासभेची तयारी अंतिम टप्प्यात आलेली असताना शिवसेना नेत्यांतील विसंवाद समोर आला आहे. आपल्या विधानावर ठाम राहणाऱ्या खासदार संजय राऊत यांच्यावर आपले वक्तव्य मागे घ्यायची नामुष्की आली आहे. या प्रकारावरून सभेची संपूर्ण जबाबदारी आणि निर्णय फक्त रामदास कदम यांच्याकडे असल्याचे समोर आले आहे. शनिवारी संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना सभेमध्ये मोठे राजकीय प्रवेश असल्याचे वक्तव्य करून खळबळ उडवून दिली होती. मात्र, रविवारी रामदास कदम यांनी असे कोणतेही राजकीय प्रवेश होणार नसून, ही महासभा केवळ राममंदिर आणि राज्यातील दुष्काळी प्रश्नावर असल्याचे सांगत राऊत यांचे विधान त्यांच्यासमोरच खोडून काढले. शेवटी सरवासारव करताना राऊत म्हणाले, 'शिवसेना पक्षप्रवेशाची मोठी यादी मातोश्रीवर गेली असून, त्यासाठी वेगळा कार्यक्रम घेण्यात येणार आहे.'

चंद्रभागेचे पात्र घाणच राहिले आहे. प्रशासनाने काम नीट केले नसल्याने सोमवारी सकाळी आठ ते दहा मी स्वतः येऊन चंद्रभागेच्या सफाई करणार आहे.

रामदास कदम, पर्यावरण मंत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Shivsena-BJP Yuti: अर्ध्या जागांचं वाटप मीडियानं केलंय; शिवसेनेचा खुलासा

0
0

पंढरपूर:

भाजपशी युती करण्यासाठी शिवसेना समान जागांची मागणी करणार असल्याचं वृत्त शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज फेटाळून लावलं. 'शिवसेना-भाजपमध्ये अर्ध्या-अर्ध्या जागांचं वाटप मीडियानं केलेलं आहे. शिवसेनेच्या कोणत्याही नेत्याने किंवा मुखपत्रातून आम्ही तसं काहीही जाहीर केलेलं नाही,' असं राऊत यांनी स्पष्ट केलं.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज पंढरपूर दौऱ्यावर जाणार आहेत. तिथं चंद्रभागेच्या तिरी उद्धव महाआरती करणार असून शिवसेनेची जाहीर सभाही होणार आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीनं यावेळी महत्त्वपूर्ण घोषणा होणार असल्याची चर्चा आहे. विशेषत: शिवसेना-भाजपची युती होणार की नाही, याबाबत भूमिका स्पष्ट केली जाण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर जागावाटपाचे फॉर्म्युलेही समोर आले आहेत.

संजय राऊत यांनी मात्र हे सगळे फॉर्म्युले फेटाळून लावले. 'महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा ही आमची इच्छा आहे. शिवसेनेचं राज्य आणायचं आहे. यात चुकीचं काय आहे,' असा प्रश्न राऊत यांनी वृत्तवाहिन्यांशी बोलताना केला. युती होणार की नाही याबाबत बोलणं त्यांनी टाळलं. उद्धव ठाकरे हे याबाबत निर्णय घेतील, असं त्यांनी सांगितलं. त्यांच्या या भूमिकेमुळं शिवसेनेच्या आजच्या सभेची उत्सुकता वाढली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मुलांच्या विकासाची जबाबदारी पालकांची

0
0

फोटो आहे

कोल्हापूर टाइम्स टीम

'माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात आपली मुले प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आणि अष्टपैलू असावीत यासाठी पालकांनी प्रयत्न केले पाहिजेत. मुलांना शाळेत घातल्यानंतर त्यांची जबादारी संपत नसून चांगल्या संस्काराबरोबर त्याच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी पालकांची असते,' असे मत सोशल वेल्फेअरच्या अध्यक्षा प्रतिमा पाटील यांनी व्यक्त केले.

महापालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या विविध स्पर्धांमधील विजेत्यांचा व महापालिका शाळातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरव समारंभात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी महापौर सरिता मोरे होत्या. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात शुक्रवारी गौरव समारंभ पार पडला.

पाटील म्हणाल्या, 'एकविसाव्या शतकात आपले पाल्य सर्वबाबतीत सक्षम असावे, अशी अपेक्षा पालकांची असते. स्पर्धेच्या युगात पाल्यांची जडणघडण करताना योग्य संस्काराकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊन ज्ञानात भर घातली पाहिजे. सद्य:स्थितीत मुलांवर सोशल मीडियाचा पगडा वाढत असताना पालकांकडून योग्य संस्कार होण्याची गरज आहे. आजच्या काळात वृद्धाश्रमात वृद्धांची संख्या वाढत आहे, त्याला योग्य संस्कारांचा अभाव कारणीभूत आहे. योग्य संस्कारासाठी स्वत:च्या व्यवहारातून पालकांनी मार्गदर्शन होईल याकडे लक्ष दिले पाहिजे.'

महापौर मोरे म्हणाल्या, 'महापालिकेतर्फे महिला दिनानिमित्त राबवलेल्या उपक्रमात महिलांनी कौतुकास्पद कामगिरी केली आहे. तसेच महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी यापुढेही अशीच कामगिरी करावी.'

उपमहापौर भूपाल शेटे म्हणाले, 'सध्या महिलांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. ज्ञाना शिवाय कोणत्याच गोष्टीला महत्त्व नाही. त्यामुळे शिक्षकांनीही विद्यार्थी ज्ञानाधिष्ठित बनतील असे प्रयत्न करावेत.'

यावेळी महिला आणि बालकल्याण समिती सभापती सुरेखा शहा, शिक्षण समिती सभापती अशोक जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. समारंभात पाटील यांच्या हस्ते 'अ' श्रेणीतील मुलींना मिळणाऱ्या अनुदानाच्या धनादेश, तसेच विविध स्पर्धामधील विजेत्यांचा, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव बक्षीस देऊन केला.

यावेळी परिवहन सभापती राहुल माने, अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, उपायुक्त मंगेश शिंदे, माजी महापौर हसीना फरास, नगरसेविका छाया पोवार, माधुरी लाड, अॅड. सूरमंजिरी लाटकर, शमा मुल्ला, अश्विनी बारामते यांच्यासह विद्यार्थी, पालक व महिला उपस्थित होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इचलकरंजीत झालेल्या कामांची पुन्हा निविदा

0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

गुंठेवारी विकास नियमावली अंतर्गत केवळ ३.४४ लाख रुपये प्रशमन शुल्क जमा असताना आमराई मळा येथील गट नं. २७/१ या ठिकाणी तब्बल २४ लाख रुपयांची कामे कशी झाली? या ठिकाणी खडी, मुरुमाचे रस्ते तयार असतानाही त्या कामाचा पुन्हा टेंडरमध्ये समावेश करण्यामागचा हेतू काय? असा सवाल करत या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी काँग्रेसचे नगरसेवक शशांक बावचकर यांनी मुख्याधिकारी दीपक पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. कामे तातडीने रद्द करुन त्यांना धनादेश देऊ नयेत असेही निवेदनात म्हटले आहे.

गुंठेवारीसंदर्भात महाराष्ट्र शासनाने गुंठेवारी विकासाचे नियमितीकरण व श्रेणी वाढ करणे, गुंठेवारी विकासाचे नियंत्रण करणे बाबत १३ ऑगष्ट २००१ रोजी राजपत्र प्रसिद्ध केले आहे. त्या प्रमाणे नियोजन प्राधिकरणाकडून प्राप्त झालेल्या भरपाईच्या रक्कमेच्या प्रमाणानुसार रेखांकनाच्या जागेच्या विकासाची कामे हाती घेणेत येतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. नगरपरिषदेने २६ नोव्हेंबर २०१८ रोजी स्थायी समिती ठराव नं. १६८ अनुसार

३४ कामांचे अंदाजपत्रक मंजूर केले. या कामांच्या संचिकांची माहिती घेता त्यामधील गट नं. २७/१ आमराई मळा येथील गुंठेवारी विकास अंतर्गत एकूण ९ कामे रस्ते, खडी मुरमाची करणे अशी नोंद केली असल्याचे निदर्शनास आले. या गटनंबरची गुंठेवारी विकास नियमावली अंतर्गत ३ लाख ४४ हजार रुपये नगरपरिषदेने भरुन घेतल्याचे समजते. तथापि मंजूर अंदाजपत्रकामध्ये विकास गटमधील रस्ते, खडी मुरुम करणे याचे एकुण अंदाजपत्रक २४ लाखांचे आहे. या गट नंबरमधील गुंठेवारी विकास नियमावली अंतर्गत केवळ ३ लाख ४४ हजार इतके प्रशमन शुल्क जमा असताना या ठिकाणी ३४ लाख रुपयांची कामे का घेण्यात आली आहेत? अशी विचारणा नगरसेवक बावचकर यांनी निवेदनातून केली.

दरम्यान, आमराई मळा येथील उपरोक्त गट नंबरच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट दिली असता त्या ठिकाणी खडी मुरुमाचे रस्ते तयार असलेचे दिसून आले. विशेष म्हणजे त्या ठिकाणी कोणतीही लोकवस्ती नाही. त्यामुळे नगरपालिकेने प्रचंड प्रमाणात रक्कम खर्च करणे चुकीचे आहे. प्रत्यक्षात तेथे खडी मुरुमाचे रस्ते असतांना या टेंडरमध्ये ही कामे का घातली गेली? यामागचे गौडबंगाल काय याचा खुलासा होणे गरजेचे आहे. अंदाजपत्रक तयार करताना नगरपरिषदेच्या अभियंत्यांनी प्रत्यक्ष जाग्यावर जाऊन पाहणी करणे आवश्यक असते. परंतु कोणाच्या तरी सांगण्यावरुन कार्यालयात बसूनच अंदाजपत्रक तयार केले आहे का? असा सवालही बावचकर यांनी केला आहे.

दरम्यान, प्रलंबित कामे करुन विकासकामे मार्गी लावण्यापेक्षा झालेल्या कामांचे टेंडर काढून नगरपरिषदेची आर्थिक लूट करण्याचा हा प्रकार असल्याची चर्चा नगरपालिका वर्तुळात ऐकावयास मिळत आहे.

- प्रशमन शुल्क ३.४४ लाख आणि नवी निविदा २४ लाखांची

- झालेल्या कामाचे टेंडर काढून नगरपालिकेची लूट

- कामे रद्द करण्याची नगरसेवक बावचकर यांची मागणी

फोटो

आमराई मळा येथील गट नं. २७/१ या ठिकाणी खडी, मुरुमाची कामे पूर्ण झाल्याचे दिसून येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हुपरी शहर स्मार्ट सिटी आराखड्यास मंजूरी देऊ

0
0

म. टा. वृत्तसेवा, हातकणंगले

'हुपरी शहराच्या विकासासाठी गेल्या वर्षात १२ कोटी २७ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. स्मार्ट सिटीसाठी कराव्या लागणाऱ्या विविध योजनांचा सर्वंकष आराखडा तयार करा. त्यास तत्काळ मंजूरी देऊ,' असे आश्वासन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. हुपरी (ता. हातकणंगले) येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गंत नगरपरिषदेच्या जलकुंभ व काळम्मावाडी वसाहत कंपाऊंड पायाखोदाई प्रारंभप्रसंगी आयोजित कार्यक्रमात मंत्री पाटील बोलत होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले, 'हुपरी शहरातील विविध विकास कामांसाठी सरकारने भरघोस निधी दिला आहे. शहरात सध्या स्ट्रीटलाइट पूर्णपणे बदलेले असून शहरातील अन्य सर्व प्रश्नही निश्चितपणे सोडविले जातील. काळम्मावाडी वसाहतीतील धरणग्रस्तांचे सर्व प्रश्न मार्गी लावण्यासही प्राधान्य दिले जाईल. धरणग्रस्तांचे हुपरीच्या नव्या पाणीपुरवठा योजनेसाठी मिळालेले सहकार्य महत्वाचे आहे. काळम्मावाडी वसाहतीमध्ये आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देऊ.'

याप्रसंगी माजी मंत्री प्रकाश आवाडे, नगरसेविका रेवती पाटील यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमास माजी खासदार कलाप्पाण्णा आवाडे, नगराध्यक्षा जयश्री गाट, मुरलीधर जाधव, जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे, आण्णासाहेब शेंडूरे, स्मिताताई शेंडूरे, उपनगराध्यक्ष जयकुमार माळगे, प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार सुधाकर भोसले, पक्षप्रतोद भरत लठ्ठे, सूरज बेडगे, दौलत पाटील, मुख्याधिकारी तानाजी नरळे, जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता एन. बी. भोई उपस्थित होते. अण्णासाहेब इंग्रोळे यांनी स्वागत केले. नगराध्यक्षा जयश्री गाट यांनी प्रास्ताविक केले. पाणीपुरवठा सभापती माया रावण यांनी आभार मानले.

फोटो

हुपरी (ता. हातकणंगले) येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणांतर्गंत नगरपरिषदेच्या जलकुंभ व काळम्मावाडी वसाहत कंपाऊंडचा पाया खुदाई प्रारंभ करताना माजी खासदार कल्लाप्पा आवाडे. शेजारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, प्रकाश आवाडे, जयश्री गाट, महावीर गाट, स्मिताताई शेंडूरे आदी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राधानगरी पोलिस ठाण्याला आयएसओ मानांकन

0
0

म. टा. वृत्तसेवा, राधानगरी

सुसज्ज आणि अद्ययावत नोंदीमुळे पोलिस विभागाच्या प्रशासकीय कामाला आता गती मिळणार आहे. या अद्ययावत सुधारणांची दखल घेऊन राधानगरी पोलिस ठाण्याला आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे. त्यामुळे यापुढे पोलिस कर्मचाऱ्यांची जबाबदारी वाढणार आहे. आगामी काळात पोलिस यंत्रणा स्मार्ट होईल. आम्ही सर्वसामान्य लोकांना चांगली सेवा देण्यासाठी प्रयत्न करू' असे प्रतिपादन जिल्हा पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी केले. राधानगरी पोलिस प्रशासनाला आयएसओ मानांकन प्रमाणपत्र वितरणप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती दिलीप कांबळे होते.

पोलिस अधीक्षक देशमुख म्हणाले, 'काळ बदलला आहे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पोलीस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे तात्काळ काम करून त्यांच्या प्रश्नांची त्वरित सोडवणूक केली पाहिजे. जोपर्यंत पोलीस स्टेशन लोकांसाठी होत नाही तोपर्यंत लोकांचा विश्वास बसत नाही. न्यायासाठी येणाऱ्या सर्व लोकांच्या कामाची वेळेत दखल घेऊन त्यांची विश्वासार्हता जपा.'

शाहुवाडी उपविभागीय कार्यक्षेत्रातील राधानगरी पोलिस ठाणे हे आयएसओ मानांकन मिळणारे पहिले ठरले आहे लोकसहभाग, पोलिस कर्मचारी, पोलिस पाटील आदी विविध राजकीय पदाधिकारी आणि दानशूर व्यक्तींच्या आर्थिक मदतीतून पोलिस ठाण्याचा अंतर लूक बदलला आहे. यावेळी पोलिस निरीक्षक अशोक इंदलकर, पोलिस पाटील संघटनेच्यावतीने संजय कांबळे, बिंदिया राजरत्न, ऐश्वर्या पालकर यांनी मनोगत व्यक्त केले. पोलिस प्रमुख देशमुख यांनी प्रशासनाला मार्गदर्शन केले. प्रा. चंद्रशेखर कांबळे सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एकरकमी एफआरपी देणे अशक्य

0
0

कारखानदारांची भूमिका

साखर उद्योग अडचणीत

टनाला ५०० रुपये अनुदान द्यावे

हमीभाव ३४०० रुपये करा

.. .. ..

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत घसलेले साखरेचे दर आणि राज्य बँकेकडून होणारा पतपुरवठा याचे आर्थिक गणित जुळत नाही. त्यामुळे एकरकमी एफआरपी देणे अशक्य असल्याची भूमिका साखर कारखानदारांनी सोमवारी स्पष्ट केली.

एकरकमी एफआरपी देण्यात ५०० रुपयांची तूट येते. ती सरकारने अनुदान म्हणून द्यावी, ही रक्कम थेट उत्पादकांच्या खात्यावर जमा करावी, अशी मागणी कारखानदारांनी केली. अन्यथा केंद्राने साखरेचा हमीभाव २९०० रुपयावरुन ३४०० रुपये करावा. तसेच सध्याच्या अडचणी लक्षात घेऊन कारखान्यांवर कारवाई करण्यात येऊ नये, अशी विनंतीही सरकारला करणार असल्याचे कारखानदारांनी सांगितले.

एफआरपीप्रश्नी खासदार राजू शेट्टी यांची कारखानदारांच्या शिष्टमंडळाने रविवारी भेट घेतली होती. पण, शेट्टी यांनी एकरकमी एफआरपीवर ठाम असल्याचे सांगितले. या पार्श्वभूमीवर कारखानदारांची सर्किट हाउस येथे बैठक झाली. बैठकीनंतर त्यांनी भूमिका स्पष्ट केली. माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी त्यासंबंधी माहिती दिली.

ते म्हणाले, 'जिल्ह्याचा सरासरी साखर उतारा १२.५० टक्के आहे. साखर मालतारणावर बँकेकडून प्रतिक्विंटल २३५० रुपये कर्जरुपात दिले जातात. चालू हंगामाची एफआरपी टनाला ३४६२ रुपये आहे. तोडणी, वाहतूक खर्चाचे ६०० वजा जाता शेतकऱ्याला सरासरी २८६२ रुपये एफआरपी द्यावी लागणार आहे. बँकेकडून मिळालेल्या सरासरी २३५० कर्जातून २५० रुपये प्रक्रिया खर्च, ५०० रुपये पूर्वहंगामी कर्ज अशी ७५० रुपये प्रतिक्विंटल वजा केली असता ऊसदरासाठी कारखानदारांकडे क्विंटलला १६०० ते १८०० रुपयेच उपलब्ध होतात. बँकेकडून मिळालेली रक्कम आणि उपपदार्थासह साखर उत्पन्न लक्षात घेता कारखानदारांना एफआरपी देण्यात ५००ची तूट येते. साखर उद्योगाने यापूर्वी केंद्र व राज्य सरकारला कर रुपाने मोठी रक्कम दिली आहे. साखर उद्योगाीच सद्यस्थिती लक्षात घेऊन येणारी पाचशेची तूट सरकारने अनुदान म्हणून द्यावी. तसेच निर्यातीसाठी क्विंटलला १००० ते ११०० रुपये तूट येते. ही तूट भरुन काढण्यासाठी सरकारने कारखानदारांना मदत करावी.'

साखरेचा दर ३४०० केल्यास एकरकमी एफआरपीसाठी सरकारी अनुदानाची गरजच भासणार नाही, असेही कारखानदारांनी यावेळी स्पष्ट केले.

आमदार हसन मुश्रीफ, चंद्रदीप नरके, पी.एन. पाटील, राजेंद्र पाटील यड्रावकर, माधवराव घाटगे, पी.जी मेढे यांच्यासह कारखान्यांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

.. .. ..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बुधवारी मैत्रीण महोत्सव

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

महिलांमधील सुप्त कलागुणांना वाव मिळावा तसेच त्यांच्यातील व्यक्तिमत्त्वाला आकार यावा या हेतूने गेल्या नऊ वर्षांपासून मैत्रीण महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी बुधवारी (ता.२६) महोत्सवाला प्रारंभ होणार आहे. सायंकाळी चार ते दहा या वेळेत कार्यक्रम होणार आहेत, अशी माहिती नगरसेवक किरण नकाते यांनी दिली.

ते म्हणाले, 'दोन दिवस चालणारा हा महोत्सव संभाजीनगर येथील एनसीसी ऑफिस शेजारी असलेल्या न्यू इंग्लिश स्कूल मैदानावर होत आहे. महोत्सवाचे उद्घाटन खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते व आमदार अमल महाडिक, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, पुणे म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, महानगरपालिका आयुक्त अभिजित चौधरी यांच्या उपस्थितीत होणार आहे. महोत्सवाच्या माध्यमातून महिलांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न होत आहे. महोत्सवातील विविध कार्यक्रमात लहान मुलांसाठी खेळणी तसेच धुंद रंग व लावणी नृत्याचा कार्यक्रम होणार आहे. महोत्सवात अभिनेत्री तेजा देवकर, ऐश्वर्या साळवी, लावणीसम्राज्ञी माधुरी आचरेकर, निवेदक प्रणोती कदम, भारती राघव, अभिनेत्री कियारा सहभागी होणार आहेत. तसेच महिलांच्या आर्थिक विकासासाठी त्यांना ५५ मोफत खाद्यपदार्थांचे स्टॉल उपलब्ध करून देण्यात येत आहेत. लहान मुले महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या या महोत्सवात कोल्हापूरकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. याप्रसंगी माजी नगरसेविका माधुरी नकाते, अमर नकाते, अॅड. समृद्धी माने, धनश्री दळवी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चित्रांची मोहिनी, सुरांची बरसात

0
0

फोटो अमित गद्रे....

कोल्हापूर टाइम्स टीम

जलरंग, तैलरंगातील विविध विषयांवर आधारित चित्रे, काष्ठशिल्प आणि शिल्पकृतींची नजाकत आणि सोबतीला सुरावटींचा दरवळ असा माहोल सोमवारी कला महोत्सवामध्ये निर्माण झाला. कोल्हापूर आर्ट फाऊंडेशनतर्फे आयोजित कला महोत्सवाच्या तिसऱ्या दिवसाची सुरुवात उपशास्त्रीय संगीताच्या मैफलीने झाली. प्रेक्षकांना एकाचवेळी सुंदरशा कलाकृती पाहण्याचा आणि उपशास्त्रीय संगीत ऐकण्याची पर्वणी लाभली.

दसरा चौक येथील मैदानावर आयोजित कला महोत्सवात चित्र,शिल्प आणि काष्ठशिल्पांच्या प्रदर्शनाबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल आहे. महोत्सवात एका बाजूला नामवंत चित्रकारांची प्रात्यक्षिके आणि दुसऱ्या बाजूला गीत, संगीताचे सादरीकरण असा मिलाफ घडला आहे. चित्रकार शिवाजी म्हस्के, आर. एस. कुलदीप, सुनील पंडित, विजय टिपुगडे, समृद्धा पुरेकर, आदिती कांबळे, नेहा जाधव यांनी चित्रकलेची प्रात्यक्षिके दाखविली. चित्र प्रात्यक्षिके दरम्यान चित्रकलेचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती.

चित्रकार कुलदीप यांनी शाहीर राजू राऊत यांचे तर चित्रकार समृद्धी पुरेकर यांच्या कुंचल्यातून पोलिस कर्मचाऱ्यांचे व्यक्तीचित्र कॅनव्हासवर अवतरले. चित्रकारांची व्यक्तीचित्र निर्मितीची ही कला पाहताना प्रेक्षकही सुखावला. शिल्पकार किशोर पुरेकर व अतुल डाके यांनी शिल्पकलेची प्रात्यक्षिके दाखवली.

\Bदुपारी एकपर्यंत आठ चित्रांची विक्री

\Bकला महोत्सव पाहण्यासाठी सकाळपासूनच गर्दी झाली. विशेष म्हणजे सकाळच्या दोन सत्रात महोत्वात ८२ हजार रुपयांच्या आठ चित्रांची विक्री झाली. यामध्ये चित्रकार अरुण सुतार, अनिल हिरे, जगन्नाथ भोसले, अमेय घाडगे यांच्या चित्रांची विक्री झाली.

'नादब्रह्म ग्रुप व रसिक रंजन' जिंकली प्रेक्षकांची मने

'नादब्रह्म ग्रुप'कलाकारांच्या उपशास्त्रीय संगीताची मैफलीने प्रेक्षकांची मने जिंकली. गायक नागेश पाटील, सिद्धराज पाटील, उषा पोतदार यांनी भावगीत, भक्तीगीत सादर करत केले. 'छुन्नक छुन्नक टाळ वाजविते पाटामधलं पाणी', कौशल्याचा राम' या भक्तीगीतांवर प्रेक्षकांना डोलायला लावले. जवळपास दोन तास ही मैफल रंगली. त्यांना संगीत साथ अमोल राबाडे, प्रसाद पवार, अभिजित पाटील, नरेंद्र पाटील, प्रदीप जिरगे यांनी केली. सायंकाळच्या सत्रात 'रसिक रंजन'मराठी वाद्यवृंदच्या गायक कलाकारांनी गीत, संगीतमय कार्यक्रमाव्दारे संगीत क्षेत्रातील कोल्हापूरच्या कलावंतांना अभिवादन केले. महेश सोनुले व सहकलाकारांनी हा कार्यक्रम सादर केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पहारेकरीही चोऱ्या करायला लागलेत

0
0

पंढरपूरमधील सभेत उद्धव ठाकरेंची टीका

म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर

'पीकविम्याचे कंत्राट खासगी कंपनीला दिले. राफेलमध्ये घोटाळा झाला. किती पापे करणार? कडुलिंबालाही कीड लागली आहे, हे पहिल्यांदाच घडते आहे. हल्ली पहारेकरीही चोऱ्या करायला लागलेत,' अशी जोरदार टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव न घेता केली. पंढरपुरात चंद्रभागेच्या तीरावर आयोजित सभेत उद्धव ठाकरे यांनी हा घणाघात केला.

शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे, उद्धव यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, खासदार संजय राऊत, खासदार अरविंद सावंत, राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्यासह राज्यातील शिवसेनेचे आमदार, खासदार उपस्थित होते. या महामेळाव्यासाठी महाराष्ट्रासह अन्य राज्यातूनही शिवसैनिक मोठ्या संख्येने आले होते. संयोजक आणि आमदार प्रा. तानाजी सावंत यांनी या महामेळाव्याचे आयोजन केले होते.

ठाकरे म्हणाले, 'युती होणार का, या फालतू चर्चेत मी जात नाही. तुमच्या क्लीन चिटशी माझे घेणे देणे नाही, माझ्या शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करा, ज्यांनी माझ्या जनतेचे वाकडे केले, त्याला अद्दल घडव, हेच विठ्ठलाच्या चरणी माझे साकडे आहे. आज पंढरपुरात आलो आहे. उद्या वाराणसीतही जाईन. कुंभकर्णाला जागे करण्यासाठी संपूर्ण देश फिरेन. कुंभकर्ण झोपलेला असला तरी हिंदू झोपलेला नाही. त्यामुळे कुंभकर्णा आता जागा हो, नाही तर पेटलेला हिंदू तुला जागे केल्याशिवाय राहणार नाही. कुंभकर्णाला जागे करण्यासाठीच अयोध्येला गेलो होतो.'

'जुमला केला तर ठोकून काढू'

'मिझोराम आणि तेलंगणात प्रादेशिक पक्षांनी राष्ट्रीय पक्षांना धूळ चारली. त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. आम्ही जगज्जेते आहोत, असा समज असणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या पाच राज्यांतील निकालांनी ठिकऱ्या उडवल्या आहेत. तुम्ही अच्छे दिनचे आश्वासन दिले, ते पूर्ण केले नाही. त्या बद्दल तुम्हाला एकवेळ माफ करू. इतर मुद्द्यावरही तुम्हाला माफ करू, पण आमच्या देवाच्या नावाने जर जुमला केला तर तुम्हाला ठोकून काढल्याशिवाय राहणार नाही. जे लोक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संपवायला निघाले होते, त्यांच्यासमोर भाजपने गुडघे टेकले आहेत. भाजप आज या लोकांच्या मांडीला मांडी लावून बसला आहे,' अशी बोचरी टीका उद्धव यांनी केली.

'राम मंदिराबाबत नितीशकुमार आणि रामविलास पासवान यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी, असे आव्हान ही त्यांनी दिले. मोदींनी राम मंदिराबाबत संसदेत चर्चा घडवून आणावी. माझे तुम्हाला आव्हान आहे. मग कळेल एनडीएतील कोणते घटक पक्ष तुमच्या बाजूने उभे राहतात,' असा चिमटाही त्यांनी मोदींना काढला.

............

'जागा वाटप गेले खड्ड्यात'

'लोकसभा-विधानसभा निवडणुकीचे जागा वाटप गेले खड्ड्यात. आधी राज्यातील शेतकऱ्यांना सुखी करा. मराठवाडा, विदर्भात दुष्काळाची परिस्थिती गंभीर आहे. महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय. मोदींनी दुष्काळी भागाचा दौरा करावा. राफेल घोटाळ्यात क्लीन चिट घेतली तरी चालेल; परंतु माझ्या शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करा. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणाऱ्या योजना कुठे आहेत? मराठवाड्यात पाण्यासाठी जीव जायची वेळ आली आहे. किती शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले,' असा सवाल करून 'कर्जमुक्त झालेला शेतकरी दाखवा,' असे आव्हान त्यांनी दिले. शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून आवाज उठवणे गुन्हा असेल, तर तो गुन्हा करणारच. न्याय मागणे आणि सरकारला धारेवर धरणे गुन्हा असेल तर हा गुन्हा करणारच. हिंमत असेल तर मला शिक्षा करून दाखवा. तुमची मस्ती इथे नाही चालणार. हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे, शिवरायांचा महाराष्ट्र तुमची मस्ती खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

.........

उद्धव उवाच...

सरकार पुन्हा आणीबाणी आणते आहे, जनतेच्या खासगी आयुष्यात हस्तक्षेप करते आहे.

राम मंदिर बांधणार म्हणजे बांधणारच, राम मंदिराचा मुद्दा सोडणार नाही.

केंद्रीय पथकाने दुष्काळ पाहणीचा केवळ देखावा केला, आठ हजार कोटींची मदत गेली कुठे?

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणाऱ्या योजना गेल्या कुठे?, मोदींनी जगभर फिरण्यापेक्षा दुष्काळ पाहावा.

विदर्भ, मराठवाड्यात दुष्काळाची समस्या गंभीर, जानेवारीपासून दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करणार.

महाराष्ट्रातील दुष्काळ हटण्यासाठी पांडुरंगाला साकडे घालण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी खुर्ची सोडावी.

गोवंश हत्याबंदी सरकारने केली, पण चारा-पाण्याअभावी गोधन अडचणीत आले आहे, गोधन वाचविण्यासाठी शिवसेना जनावरांना चारा देईल.

............

सरकारला तीन सवाल

कांदा प्रश्न किती दिवसांत सोडविणार?

पिक विम्याचे पैसे कधी देणार?

कर्जमाफ केलेला शेतकरी कधी दाखवणार?

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चंद्रभागेची महाआरती...

0
0

वेदमंत्राच्या घोषात, दोन्ही तीरावर सुरू असलेल्या प्रचंड अतिषबाजीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कुटुंबीयांसह चंद्रभागा नदीची आरती केली. इस्कॉन मंदिरानजीकच्या चंद्रभागेच्या पात्रात आरतीसाठी भगव्या कपड्यांनी व विविध फुलांनी आकर्षक सजावट करण्यात आली होती.

सुनील दिवान

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खड्यातील पाण्यात बुडून दोन बालकांचा मृत्यू

0
0

खड्यातील पाण्यात बुडून दोन बालकांचा मृत्यू

सोलापूर

सात वर्षांची दोन बालके झाडावरून खड्यात पडलेले बोर काढण्याच्या प्रयत्न करीत असताना खड्यातील पाण्यात बुडाली. ही घटना सोमवारी उत्तर सोलापूर तालुक्यातील डोणगांवात येथे घडली.

शेतातील बोरचे पाणी एका खड्यात टाकले होते. समर्थ विपुल गायकवाड (वय ७), नंदिनी अशोक मस्के (वय ७, दोघे रा. डोणगांव, ता. उत्तर सोलापूर) हे दोघेजण त्यांच्या घराजवळील शिवप्पा आमले यांच्या शेतात खेळत होती. खड्ड्यात पडलेले बोर काढण्याच्या प्रयत्नात दोघेही खड्ड्यात बुडाली. दोघांच्या आई-वडिलांनी त्यांचा संपूर्ण परिसरात शोध घेतला. परंतु ते मिळून आले नाहीत. शेवटी त्यांनी खड्यात पाहिले असता खड्यातील पाण्यात दोघे बालक बेशुद्धावस्थेत सापडली. सोलापूरच्या सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले केले असता उपचारापूर्वीच त्या दोन्ही बालकांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेची नोंद सलगरवस्ती पोलिस ठाण्यात झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोकसभेच्या विजयासाठी आमदारांना तंबी

0
0

लोकसभेच्या विजयासाठी आमदारांना तंबी

मुख्यमंत्र्यांनी सुनावले खडे बोल

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाचे उमेदवार निवडून येण्यासाठी स्थानिक आमदारांनी जोमाने काम करावे; पक्षाचा उमेदवार पराभूत झाल्यास त्यांना विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट दिले जाणार नाही, अशी तंबी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पक्षाच्या आमदारांना दिली आहे.

भाजपच्या आमदार आणि खासदारांची अलीकडेच झालेल्या बैठकीत याबाबत मुख्यमंत्र्यांनी खडे बोल सुनावल्याचे कळते. विधानसभा निवडणुकीत तिकीट देताना लोकसभा निवडणुकीतील मतदारसंघातील मिळालेली मते हा तिकीट देताना निकष लावला जाईल, असे संकेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत.

'पक्षाच्या आमदारांच्या विधानसभा मतदारसंघात काय परिस्थिती आहे याची माहिती आमच्याकडे आहे. काही आमदारांचे काम चांगले आहे. विकासकामे झाली आहेत; परंतु काही आमदारांनी विकासकामे जलद गतीने करणे गरजेचे आहे,' अशा भाषेत मुख्यमंत्र्यांनी आमदारांना ऐकवल्याची माहिती सूत्रांनी दिली. 'सरकारने घेतलेले निर्णय लोकांपर्यंत पोहचवले पाहिजेत. गृह खाते आपल्याकडे असल्याने आमदारांच्या मतदारसंघाची परिस्थिती माहिती आहे,' असेही त्यांनी स्पष्ट केल्याचे कळते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पहारेकरीही चोऱ्या करायला लागलेत

0
0

पंढरपूरमधील सभेत उद्धव ठाकरेंची टीका

म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर

'पीकविम्याचे कंत्राट खासगी कंपनीला दिले. राफेलमध्ये घोटाळा झाला. किती पापे करणार? कडुलिंबालाही कीड लागली आहे, हे पहिल्यांदाच घडते आहे. हल्ली पहारेकरीही चोऱ्या करायला लागलेत,' अशी जोरदार टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव न घेता केली. पंढरपुरात चंद्रभागेच्या तीरावर आयोजित सभेत उद्धव ठाकरे यांनी हा घणाघात केला.

शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे, उद्धव यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, खासदार संजय राऊत, खासदार अरविंद सावंत, राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्यासह राज्यातील शिवसेनेचे आमदार, खासदार उपस्थित होते. या महामेळाव्यासाठी महाराष्ट्रासह अन्य राज्यातूनही शिवसैनिक मोठ्या संख्येने आले होते. संयोजक आणि आमदार प्रा. तानाजी सावंत यांनी या महामेळाव्याचे आयोजन केले होते.

ठाकरे म्हणाले, 'युती होणार का, या फालतू चर्चेत मी जात नाही. तुमच्या क्लीन चिटशी माझे घेणे देणे नाही, माझ्या शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करा, ज्यांनी माझ्या जनतेचे वाकडे केले, त्याला अद्दल घडव, हेच विठ्ठलाच्या चरणी माझे साकडे आहे. आज पंढरपुरात आलो आहे. उद्या वाराणसीतही जाईन. कुंभकर्णाला जागे करण्यासाठी संपूर्ण देश फिरेन. कुंभकर्ण झोपलेला असला तरी हिंदू झोपलेला नाही. त्यामुळे कुंभकर्णा आता जागा हो, नाही तर पेटलेला हिंदू तुला जागे केल्याशिवाय राहणार नाही. कुंभकर्णाला जागे करण्यासाठीच अयोध्येला गेलो होतो.'

'जुमला केला तर ठोकून काढू'

'मिझोराम आणि तेलंगणात प्रादेशिक पक्षांनी राष्ट्रीय पक्षांना धूळ चारली. त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. आम्ही जगज्जेते आहोत, असा समज असणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या पाच राज्यांतील निकालांनी ठिकऱ्या उडवल्या आहेत. तुम्ही अच्छे दिनचे आश्वासन दिले, ते पूर्ण केले नाही. त्या बद्दल तुम्हाला एकवेळ माफ करू. इतर मुद्द्यावरही तुम्हाला माफ करू, पण आमच्या देवाच्या नावाने जर जुमला केला तर तुम्हाला ठोकून काढल्याशिवाय राहणार नाही. जे लोक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संपवायला निघाले होते, त्यांच्यासमोर भाजपने गुडघे टेकले आहेत. भाजप आज या लोकांच्या मांडीला मांडी लावून बसला आहे,' अशी बोचरी टीका उद्धव यांनी केली.

'राम मंदिराबाबत नितीशकुमार आणि रामविलास पासवान यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी, असे आव्हान ही त्यांनी दिले. मोदींनी राम मंदिराबाबत संसदेत चर्चा घडवून आणावी. माझे तुम्हाला आव्हान आहे. मग कळेल एनडीएतील कोणते घटक पक्ष तुमच्या बाजूने उभे राहतात,' असा चिमटाही त्यांनी मोदींना काढला.

............

'जागा वाटप गेले खड्ड्यात'

'लोकसभा-विधानसभा निवडणुकीचे जागा वाटप गेले खड्ड्यात. आधी राज्यातील शेतकऱ्यांना सुखी करा. मराठवाडा, विदर्भात दुष्काळाची परिस्थिती गंभीर आहे. महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय. मोदींनी दुष्काळी भागाचा दौरा करावा. राफेल घोटाळ्यात क्लीन चिट घेतली तरी चालेल; परंतु माझ्या शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करा. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणाऱ्या योजना कुठे आहेत? मराठवाड्यात पाण्यासाठी जीव जायची वेळ आली आहे. किती शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले,' असा सवाल करून 'कर्जमुक्त झालेला शेतकरी दाखवा,' असे आव्हान त्यांनी दिले. शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून आवाज उठवणे गुन्हा असेल, तर तो गुन्हा करणारच. न्याय मागणे आणि सरकारला धारेवर धरणे गुन्हा असेल तर हा गुन्हा करणारच. हिंमत असेल तर मला शिक्षा करून दाखवा. तुमची मस्ती इथे नाही चालणार. हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे, शिवरायांचा महाराष्ट्र तुमची मस्ती खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

.........

उद्धव उवाच...

सरकार पुन्हा आणीबाणी आणते आहे, जनतेच्या खासगी आयुष्यात हस्तक्षेप करते आहे.

राम मंदिर बांधणार म्हणजे बांधणारच, राम मंदिराचा मुद्दा सोडणार नाही.

केंद्रीय पथकाने दुष्काळ पाहणीचा केवळ देखावा केला, आठ हजार कोटींची मदत गेली कुठे?

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणाऱ्या योजना गेल्या कुठे?, मोदींनी जगभर फिरण्यापेक्षा दुष्काळ पाहावा.

विदर्भ, मराठवाड्यात दुष्काळाची समस्या गंभीर, जानेवारीपासून दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करणार.

महाराष्ट्रातील दुष्काळ हटण्यासाठी पांडुरंगाला साकडे घालण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी खुर्ची सोडावी.

गोवंश हत्याबंदी सरकारने केली, पण चारा-पाण्याअभावी गोधन अडचणीत आले आहे, गोधन वाचविण्यासाठी शिवसेना जनावरांना चारा देईल.

............

सरकारला तीन सवाल

कांदा प्रश्न किती दिवसांत सोडविणार?

पिक विम्याचे पैसे कधी देणार?

कर्जमाफ केलेला शेतकरी कधी दाखवणार?

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images