Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

अधिकाऱ्यांच्या संपामुळे बँकांचे व्यवहार ठप्प

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फेडरेशनच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयीकृत बँकेतील अधिकारी विविध मागण्यासाठी शुक्रवारी एक दिवस संपावर केल्याने बँकेचे कामकाज बंद ठेवल्याने सुमारे ३५० कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प झाले. जिल्ह्यातील १५० हून अधिक बँकेतील ७५० अधिकारी संपात सहभागी झाले होते. संप आणि सलग दोन दिवस बँकांना सुट्टी असल्याने ग्राहकांना एटीएमवर अवलंबून रहावे लागत आहे.

अधिकारी संपावर गेल्याने बँकांच उगडल्या नाहीत. संघटनेच्यावतीने लक्ष्मीपुरीतील बँक ऑफ इंडिया शाखेच्या कार्यालयासमोर केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आल्या. बँक विलिनीकरणाच्या विरोधात घोषणा दिल्या. तसेच पाच दिवसांचा आठवडा करावा, अशी मागणी करण्यात आली. सरकारने ४०० दिवसांपासून वेतन करार प्रलंबित ठेवला आहे. केंद्र सरकारने बँक विलिनीकरणाची मोहीम सुरू केली असून त्याचा पहिला प्रयोग म्हणून बँक ऑफ बडोदा, विजया बँक, देना बँकेचे विलिनीकरण केले आहे. आजच्या संपामुळे दैनंदिन बँक व्यवहार ठप्प झाले. ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी एटीएम सेवा सुरू ठेवली. तसेच आठ टक्के पगारवाढ अत्यल्प असल्याबद्दल टीका करण्यात आली.

संघटनेने केंद्र सरकारकडे विविध मागण्या केल्या आहेत. त्यामध्ये अकराव्या द्विपक्षीय वेतन करारामध्ये सरकारी बँकामधील श्रेणी एक ते श्रेणी सात या मधील सर्व अधिकाऱ्यांचा समावेश करावा. सुधारित वेतन करार हा सरकारला सादर केलेल्या चार्टर ऑफ डिमांड नुसार व्हावा. आरबीआय व इतर केंद्र सरकारी कार्यालयांप्रमाणे बँकांमध्ये देखील पाच दिवसीय आठवडा कामकाज पद्धती अवलंबावी. बँक कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या कुटुंब पेन्शन योजनेत सुधारणा कराव्यात. नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी योजना लागू करण्यात यावी. केंद्र सरकारने राबविलेली बँक विलीनीकरण योजना त्वरित थांबवण्यात यावी. बँकांमध्ये राबविण्यात येणाऱ्या म्युचुअल फंड आणि लाइफ इन्शुरन्स वितरणवर प्रतिबंध आणावा व मुख्य बँक व्यवसायास प्राधान्य देण्यात यावे, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. पण या मागण्याकडे केंद्र सरकारने दुर्लक्ष केले आहे. आंदोलनाचे नेतृत्व संघटनेचे विभागीय सचिव परेश हटकर, अनंत बिलगी, दिलीप कांबळे, धनंजय जाधव, प्रदीप हत्ती, सुनिल शिंदे, शीतलराव यमगेकर, प्रकाश कुलकर्णी, चातक देशपांडे यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नेचर फ्रेंडस् जगवली एक हजार झाडे

$
0
0

लोगो : ग्रीन कोल्हापूर

कोल्हापूर टाइम्स टीम

वृक्षारोपण मोहिमेत रस्त्याकडेने रोपे लावली. मात्र, दोन ते तीन महिन्यांनी काही रोपे वाळून गेली होती. हे दश्य पाहून मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या नागरिकांनी रोपे वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. महिला व लहान मुलांनी खारीचा वाटा उचलला. त्यातून आर. के. नगर परिसरात नेचर फ्रेंडस हा ग्रुप तयार झाला. गेल्या तीन वर्षात या ग्रुपने एक हजार झाडे वाचवून त्याचे संगोपन करुन पर्यावरण चळवळीला हातभार लावला आहे.

आर. के. नगर ते खडीचा गणपती या रस्त्याच्या डाव्या बाजूला वृक्षारोपण केलेल्या ठिकाणी काही रोपे मरून गेली होती तर काहीठिकाणी रोप तग धरून होती. मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या नागरिकांना ही गोष्ट खटकली. त्यांनी रोपांना पाणी घालण्यास सुरुवात केली. मेलेल्या रोपांच्या ठिकाणी नवीन रोपे लावली. त्यानंतर सदस्यांनी वर्गणी काढून पाण्यासाठी टँकर भाड्याने आणण्यास सुरुवात केली. पण ज्यावेळी टँकर यायचा तेव्हा सर्व कार्यकर्ते नोकरी व्यवसायानिमित्त बाहेर असत. पाणी साठवण्यासाठी नवीन टाक्या खरेदी केल्या. त्यानंतर डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत दर १५ दिवसाला तर उन्हाळ्यात दर आठवड्याला पाणी घालण्यात येते. मशागत करून खतही टाकले जाते. काही ठिकाणी सायफन पद्धतीने पाणी घालण्यात येते. बंगल्यासमोर असलेल्या झाडांना पाणी घालणे व देखभालीसाठी मालकांना प्रवृत्त करण्यात आले. सुट्टीच्या दिवशी नेचर क्लबमधील महिला सदस्य व लहान मुलेही श्रमदान करतात. म्हशी व शेळ्यापासून लहान रोपांचा बचाव करण्यासाठी कुंपन लावले आहे. काही ठिकाणी गवत पेटवल्याने ठिबक सिंचनच्या पाइप जळाल्या. पण त्यावर मात करून सदस्यांनी झाडे जगवण्याचे व्रत कायम ठेवले आहे.

गेल्या तीन वर्षात एक हजार झाडे जगवली असून झाडे पाच ते पंधरा फूट इतकी वाढली आहेत. आंबा, चिंच, मोहगणी तामण, बर्ड चेरी या झाडावर पक्षांची वर्दळ वाढली आहे. विजय शिंदे, अमोल गायकवाड, प्रमोद हुदले, जयवंत शिंदे, चार्टड अकाऊंट गिरीष सामंत, माजी सरंपच अमर मोरे, संग्राम पोहाळकर यांच्याकडून झाडाकडून नियमित देखभाल होत असते. त्यामुळे मोरेवाडी नाका ते खडीचा गणपती, कंदलगाव हा परिसर हिरवागार होऊ लागला आहे.

झाड लावण्यापेक्षा झाड जगवणे सर्वात अवघड आहे. ग्रुपचे सदस्य, महिला, विद्यार्थी परिसरात नागरिकांच्या एकत्रित इच्छाशक्तीतून एक हजार वृक्षांचे संगोपन करण्यास यशस्वी झालो आहे.

रणवीर चव्हाण, सदस्य नेचर फ्रेंडस् क्लब

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गव्याच्या हल्ल्यात एकजण जखमी

$
0
0

चंदगड : कोवाड-बेळगाव मार्गावरील होसूर (ता. चंदगड) येथील घाटात गव्याची मोटारसायकलला धडक बसून झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार जखमी झाला. संदीप लोकळू तारीहाळकर (वय ३२, रा. कागणी) असे जखमीचे नाव आहे. शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘दौलत’चा ताबा जिल्हा बँकेकडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

चार कोटी रुपये भरण्यास न्यूट्रियन्स कंपनी असमर्थ ठरल्याने हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत सहकारी साखर कारखान्याचा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ताबा घेतला. कारखान्याचा ताबा घेण्यावरून जिल्हा बँक आणि न्युट्रियन्स कंपनी यांच्यात कोर्टात लढाई सुरू आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, तीन वर्षांपूर्वी दौलत कारखाना जिल्हा बँकेने गोकाक येथील न्यूट्रियन्स कंपनीला ४५ वर्षे भाडे कराराने चालविण्यास दिला होता. पण कंपनीने कराराप्रमाणे आठ कोटी ६० लाख रुपयांचा पहिला हप्ता थकविल्याने बँकेने करार रद्द केला. त्यानंतर कारखान्याचा ताबा मिळवण्यासाठी कंपनीला नोटीस पाठवली होती. या कारवाईविरोधात कंपनीने जिल्हा कोर्टात धाव घेतली होती, पण कंपनीची मागणी कोर्टाने फेटाळली होती. कोर्टाच्या निर्णयानुसार बँकेने पुन्हा कारखाना ताब्यात घेण्याची कारवाई सुरू केल्यावर पुन्हा दुसऱ्यावेळी कंपनीने जिल्हा कोर्टात धाव घेतली.

कोर्टात सोमवारी (ता.१७) आणि बुधवारी (ता.१९) सुनावणी झाली. न्यूट्रियन्स कंपनीने शुक्रवारी (ता.२०) चार कोटी रुपये भरू, असे लेखी निवेदन कोर्टात केले होते. तसेच उर्वरित सहा कोटी ९२ लाख रुपयांची रक्कम पाच जानेवारीला भरण्याची तयारी दाखवली होती. आज कोर्टात कंपनीला चार कोटी रुपये भरण्याबाबत न्यायाधीशांनी विचारले असता कंपनीने रक्कम भरण्यास असमर्थता दर्शवली. कंपनीने रक्कम जमा केली नसल्याने आणि कंपनीला दिलेल्या नोटिशीला एक महिना पूर्ण झाल्याने बँकेने पंचनामा करून दुपारी दोनच्या सुमारास कारखान्याचा ताबा घेतला. कारखान्याच्या वतीने अॅड. लुईस शहा यांनी काम पाहिले. दरम्यान, या खटल्याची पुढील सुनावणी सोमवारी (ता.२४) होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सारस्वत वसतिगृहातर्फे शिष्यवृत्ती वाटप

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

'कोणतेही कार्य किंवा ध्येय गाठताना भक्कम पाठिंब्याची गरज असते. सारस्वत विद्यार्थी वसतिगृहाने असाच पाठिंबा आणि शिष्यवृत्ती देऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक करिअर घडवले आहे,' असे प्रतिपादन डॉ. विजय करंडे यांनी केले.

येथील श्री सरस्वतीबाई गौड सारस्वत ब्राह्मण विद्यार्थी वसतिगृहातर्फे शिष्यवृत्ती वितरणप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमात एकूण १६६ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, ३५ विद्यार्थ्यांना परतफेडीची शिष्यवृत्ती तसेच २० विद्यार्थ्यांना प्राविण्य पारितोषिके प्रदान करण्यात आली. मोहन देशपांडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

वसतिगृहाचे विश्वस्त किशोर सातोसकर यांनी शिष्यवृत्ती योजनेविषयी माहिती दिली. देशपांडे यांच्या हस्ते राष्ट्रीय गौरव सन्मान पुरस्कारप्राप्त श्वेता परुळेकरचा सत्कार झाला. वसतिगृहाच्या माजी अध्यक्षा डॉ. यशस्विनी जनवाडकर यांच्या हस्ते तीन विद्यार्थ्यांना प्राविण्य पारितोषिके देण्यात आली. सचिव सुधीर कुलकर्णी यांनी स्वागत केले. डॉ. विनोद घोटगे यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. सूत्रसंचालन ऋत्विज जनवाडकर यांनी सूत्रसंचालन केले. संस्थेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ लाटकर यांनी आभार मानले. याप्रसंगी डॉ. गजानन आसगेकर, सचिन जनवाडकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वार्षिक महोत्सव

$
0
0

कोल्हापूर: पाचगाव येथील मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये वार्षिक महोत्सव उत्साहात पार पडला. या महोत्सवांतर्गत विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकास कार्यक्रमासह क्रीडा स्पर्धा झाल्या. संतोष सस्ते व सागर पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले. संस्थेचे उपाध्यक्ष प्रकाश नाईक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी रमेश गवळी, प्रीती गवळी, वैशाली नाईक, बापू डवरी, विनायक गाडगीळ, शिवाजी दळवी, राज पाटील आदी उपस्थित होते. मुख्याध्यापक साईनाथ तुरटवाड यांनी स्वागत केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आजपासून अधिवेशन

$
0
0

कोल्हापूर: कनिष्ठ अभियंता संघटनेचे ६२ वे दोन दिवसीय राज्यस्तरीय अधिवेशनाला शनिवारपासून (ता. २२) होणार आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घटन होणार आहे. तर जलसंपदामंत्री गिरीष महाजन अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. कसबा बावडा येथील श्रीराम सांस्कृतिक भवन येथे शनिवारी सकाळी ११ वाजता उद्घाटन होईल. याप्रसंगी 'अधिवेशन स्मरणिका'प्रकाशित करण्यात येणार आहे, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष इंजिनीअर शंकर राऊळ, कार्याध्यक्ष उन्मेश मुडबिद्रीकर यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सोशल मीडियाच्या आहारी जाऊ नका’

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

'शिक्षण, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रात यशस्वी होऊन मुलींनी आईवडिलांचा नावलौकिक करावा. मुलींनी शिक्षणावर पूर्ण लक्ष केंद्रित करुन जास्तीत जास्त गुणवत्ता प्राप्त करावी. सोशल मीडियाच्या आहारी जाऊ नये,' आवाहन डॉ. रुपा कुलकर्णी यांनी केले.

भागिरथी महिला संस्थेतर्फे कणेरीवाडी येथील काडसिद्धेश्वर हायस्कूलमध्ये 'कळी उमलताना' या प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा महाडिक म्हणाल्या, 'भागीरथी महिला संस्थेच्यावतीने जिल्ह्यातील महिला आणि युवतींच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबविले जातात.' यावेळी मुख्याध्यापक अर्जुन होनगेकर, पी. जी. पाटील, मेघा पाटील, अर्जुन इंगळे यांची भाषणे झाली. कार्यक्रमाला वाय. एस. पाटील, व्ही. ए. पाटील, एम. एस. पोवार, चंद्रकला सिद्धनेर्ले, रुपाली ढोबळे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रस्ता दुरुस्तीसाठी उद्या रास्ता रोको आंदोलन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, हातकणंगले

हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव ते हेर्ले हा रस्ता मोठ्या प्रमाणात खराब झाला असून रस्त्यात मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या रस्त्याचे त्वरीत डांबरीकरण करण्यात यावे या मागणीसाठी शनिवारी (ता. २२) बंडखोर सेना पक्षाच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करणार आहे. बंडखोर सेनेचे अध्यक्ष शिवाजीराव आवळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबतचे निवेदन दिले आहे.

पेठवडगाव शहर ही मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. या ठिकाणी मुख्य रस्त्यावरून नेहमी वर्दळ असते. हेर्ले, मौजे वडगाव, तासगाव व पेठवडगावमधील नागरिकांना या खराब व खड्डे पडलेल्या रस्त्यामुळे त्रास होत आहे. पावसाळ्यात या रस्त्याची खूप दयनीय अवस्था झाली आहे. संबंधित बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे, असे आवळे यांनी सांगितले. बंडखोर सेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख विजय लोखंडे, हातकणंगले तालुकाध्यक्ष सुरेश आवळे, सरचिटणीस नितिन कोळी, शहराध्यक्ष राहुल सोनटक्के, शहर उपाध्यक्ष विजय तडाखे, अभी माने यावेळी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सातारा: २५० फूट खोल दरीत जीप कोसळली, ४ ठार,९ जखमी

$
0
0

सातारा:

सातारा जिल्ह्यात माण तालुक्यात भोजलिंग देवस्थानाच्या डोंगरावरील जीप २५० फूट खोल दरीत कोसळून चार जण ठार तर ९ जण जखमी झाले आहेत.

माण तालुक्यातील भोजलिंग देवस्थान येथे आज पौर्णिमा असल्याने मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येत असतात. सांगलीतील आटपाडी तालुक्यातील विटलापूरहून भाविक मोठ्या प्रमाणात भोजलिंगच्या डोंगरावर दर्शनासाठी आले होते. दर्शन घेऊन परत असताना या भाविकांची जीपचे चाक रस्त्यावरून घसरले आणि जीप दरीत कोसळली. काही भाविक जीपच्या बाहेर फेकले जाऊन थोडक्यात बचावले. स्थानिकांनी लगेच दरीत जाऊन भाविकांना बाहेर काढले आणि नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून १२ जणांवर उपचार सुरू आहेत अशी माहिती मिळते आहे.

भोजलिंग देवस्थानाच्या घाटाला कोणतेच संरक्षक कठडे नसल्यामुळेही घटना घडली असल्याची चर्चा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्वारी सहा रुपयांनी महागली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कमी झालेला परतीचा पाऊस, वाया गेलेल्या पेरण्यांमुळे यंदा ज्वारीचे उत्पन्न घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्वारीला मागणी वाढली असून आवक कमी झाल्याने दर वाढले आहेत. गेले महिनाभर प्रतिकिलो ५० रुपयांवर स्थिर असलेल्या ज्वारीच्या दरात सहा रुपयांनी वाढ झाली आहे. प्रतिकिलो ५६ बार्शी ज्वारीची विक्री केली जात आहे. सूर्यफूल, मूगडाळ, मटकी, शाबूदाणा दरातही वाढ झाली आहे.

गेल्या महिन्यांत ज्वारी, गहू या धान्यासह सर्वच कडधान्याचे दर कडाडले होते. या आठवड्यात ज्वारीच्या दरात सहा रुपयांनी वाढ झाली आहे. साखरेचा दर प्रतिकिलो ३६ रुपयांवर स्थिर असला तरी बारीक आकाराची साखरेची ३४ रुपयांनी विक्री होत आहे. मैदा व आट्याच्या दरात प्रतिकिलो अनुक्रमे दोन व एक रुपयाने घट झाली आहे. गुळाचा दर ४५ ते ५० रुपयांवर स्थिर आहे. मार्गशीर्ष महिन्यात सणांची रेलचेल असल्याने शाबूदाणा दरात प्रतिकिलो चार रुपयांनी वाढ झाली आहे. मूगडाळ आणि मटकी दरात प्रतिकिलो चार रुपयांनी वाढ झाली आहे. पॅकिंगमधील सुर्यफूल दरात प्रतिकिलो दोन ते चार रुपयांनी वाढ झाली आहे.

किराणा दर (प्रतिकलो, रुपयांत)

पोहे : ४४ ते ४८

साखर : ३४ ते ३६

शेंगदाणा : ९० ते १००

मैदा :३०

आटा : ३२

रवा : ३२

गूळ : ४५ ते ५०

शाबूदाणा : ६०

वरी : ७० ते ७२

...........

डाळीचे दर (प्रतिकिलो रुपयांत)

तूरडाळ : ७६ ते ८०

मूगडाळ: ८४ ते ८८

उडीद डाळ: ८० ते ८४

हरभरा डाळ : ७०

मसूर डाळ : ६० ते ६४

मसूर: ७० ते १२०

चवळी : ७२ ते ८०

हिरवा वाटाणा : ९० ते १००

काळा वाटाणा: ६० ते ६४

पांढरा वाटाणा : ५६ ते ६४

मटकी: ८० ते १००

छोले : ८० ते १००

..........

ज्वारी दर (प्रतिकिलो, रुपयांत)

बार्शी शाळू : ४० ते ५६

गहू : २८ ते ३४

हायब्रीड ज्वारी :२८ ते ३०

बाजरी : २८

नाचणी : ३६ ते ४०

.........

तेलाचे दर (प्रतिकलो, रुपयांत)

शेंगतेल : १२५

सरकी तेल: ९०

खोबरेल : १८० ते २२०

सूर्यफूल: ९५ ते १०५

................

मसाले दर (प्रतिकलो, रुपयांत)

तीळ : १८०

जिरे : ३००

खसखस : ७००

खोबरे : १८० ते २२०

वेलदोडे : २०००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुरुंदकरच्या घरी सापडलेल्या वस्तूंची डीएनए

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे-गोरे हत्या प्रकरण खटल्याच्या कामकाजासाठी विशेष सरकारी वकिलांची अद्याप प्रतीक्षा आहे. गोरे कुटुंबियांनी राज्य सरकारकडे दोन वकिलांची नावे सुचविली. मात्र त्यापैकी एकही नाव निश्चित झालेले नाही. दरम्यान या प्रकरणातील संशयित अभय कुरुंदकर याच्या घरी सापडलेल्या ३८ वस्तूंची डीएनए चाचणी करण्याची प्रक्रिया खासगी प्रयोगशाळेतून सुरू झाली आहे. पंधरा दिवसात हा अहवाल मिळेल.

राज्य सरकारकडे बिद्रे यांचे पती राजू गोरे यांनी नोव्हेंबर महिन्यात या खटल्याच्या सुनावणीसाठी विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करावी, अशी मागणी केली आहे. त्यासाठी दोन नावे सुचविली आहेत. मात्र सरकारकडून नाव निश्चित झालेले नाही. सध्या या खटल्याचे कामकाज अॅड. संतोष पवार चालवित आहेत. या प्रकरणी बिद्रे कुटुंबियांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. हायकोर्टाने हत्यांकाडाची सुनावणी एका वर्षात पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र तपास जलदगतीने केला जात नाही. या हत्येतील आरोपींना सरकारकडून अप्रत्यक्षरित्या मदत केली जात आहे. सरकारी वकील म्हणून अॅड. प्रदीप घरात यांची नेमणूक करावी. तत्कालीन तपास अधिकारी संगीता अल्फान्सो यांची नेमणूक करावी. तपास जलदगतीने होण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी केली आहे.

दरम्यान, या प्रश्नी विधानसभेत जाब विचारणार असल्याची ग्वाही माजी उपमुख्यमंत्री पवार यांनी दिली आहे. दरम्यान बिद्रे यांच्या हत्येनंतर मृतदेहाचे तुकडे करुन एका फ्रिजमध्ये ठेवले होते. या फ्रिजमध्ये केस सापडले आहेत. त्यासह कुरुंदकरच्या फ्लॅटमधील ३८ वस्तूची डीएनए चाचणी एका खासगी प्रयोगशाळेतून करण्यास कोर्टाने परवानगी दिली आहे. संशयित आरोपींचा अर्ज कोर्टाने फेटाळल्याने या वस्तूंची पुन्हा डीएनए चाचणी केली जाणार आहे. संशयितांनी कारागृह बदलाच्या मागणीला गोरे यांनी विरोध केला असून त्यावर अंतिम निर्णय २ जानेवारीला होणार आहे. संशयित कुरुंदकराचे वकीलपत्र कोल्हापुरातील एक वकिलाने घेतले आहे. तो अलिबाग कोर्टाकडे रवाना झाला असून संशयिताला जामिन मिळण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

३१ डिसेंबरनंतर रस्त्यावरची लढाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'एफआरपीचे तुकडे पाडण्याची भाषा कारखानदार करत असून त्यांना राज्य सरकारची फूस आहे. कारखानदार व शेतकऱ्यांत भांडणे लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. कारखानदारांनी जर शेतकऱ्यांच्या खात्यावर एफआरपीचे तुकडे पाडून रक्कम जमा केली तर रस्त्यावरील लढाई सुरू होईल,' असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी राज्य सरकार व कारखानदारांना दिला. एकरकमी एफआरपीवर स्वाभिमानी शेतकरी संघटना ठाम असून रविवारपासून त्याबाबत साखर कारखानदारांना निवेदन देण्यात येणार आहे. ३१ डिसेंबरपर्यंत एफआरपी जमा न झाल्यास एक जानेवारीला प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढला जाईल, अशी घोषणा शेट्टी यांनी केली.

शासकीय विश्रामगृहावर एफआरपीप्रश्नी शनिवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी बैठक झाली. कारखानदार एफआरपीचे ८०:२० असे तुकडे पाडत असल्याच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांच्या भावना जाणून घेतल्यावर खासदार शेट्टी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

राज्य सरकार एफआरपीप्रश्नी दुटप्पी भूमिका घेत असल्याचा आरोप करून शेट्टी म्हणाले, 'एकीकडे सरकार चौदा दिवसांत एफआरपी न देणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करण्याची घोषणा करत आहेत, तर दुसरीकडे एफआरपीचे तुकडे पाडण्यासाठी कारखानदारांना मुख्यमंत्री व पालकमंत्री फूस लावत आहेत. कारवाईची घोषणा करणाऱ्या सरकारने गतवर्षी सात ते आठ महिने उशिरा एफआरपी देण्यास कारणीभूत ठरलेल्या सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यावर प्रथम कारवाई करावी. तसेच अनेक कारखानदार भाजपच्या गोटात असल्याने सर्व कारखान्यांवर कारवाई केल्यास शेतकरी संघटना सरकारच्या पाठीशी राहील. सरकारला जर कारखान्यांना मदत करायची असेल तर गतवर्षी शॉर्ट मॉर्जिनमुळे अडचणीत आलेल्या कर्जांचे राज्य सरकारने पुनर्गठण करावे. बँकांनी कारखानदारांना कर्ज वाढवून द्यावे.'

यावेळी राज्य उपाध्यक्ष सयाजी मोरे, जिल्हाध्यक्ष भगवान काटे, सावकार मादनाईक, प्रा. जालंदर पाटील, अण्णासाहेब चौगुले, राजेंद्र गड्ड्यान्नावर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी भूमिका मांडली.

०००००

ते पालक कशाला झालेत?

शासकीय विश्रामगृहावर स्वाभिमानीची बैठक सुरू असताना दुसऱ्या खोलीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील कार्यकर्त्यांची भेट घेत होते. एफआरपीप्रश्नी पालकमंत्र्यांना भेटणार का? असा खासदार शेट्टींना पत्रकारांनी प्रश्न केला असता, त्यांना एफआरपीचा प्रश्न माहीत नाही का? असा सवाल करत ते पालक कशाला झालेत, अशी टीका केली.

०००००

केंद्राकडे साखरप्रश्नी पाठपुरावा

एकीकडे शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी मिळावी यासाठी लढा देत असताना दुसरीकडे साखरेचा प्रतिक्विंटल दर ३४०० रुपये करावा, अशी मागणी केंद्र सरकारकडे केल्याचे शेट्टी यांनी सांगितले. एफआरपी कमी असणारे कारखानदार कमी दरात साखर विक्री करत आहेत, अशी तक्रार कारखानदारांनी केल्यावर अन्न व नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांची भेट घेऊन तक्रार केली. त्यांनी कमी दराने साखर विक्री करणाऱ्या कारखान्याचा कोटा रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. यंदा महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेशात दुष्काळ पडल्याने २९० लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन होणार आहे. देशाला २५० लाख मेट्रिक टन साखरेची गरज आहे. तसेच २० टक्के साखर निर्यात झाल्यास शिल्लक साखरेचा प्रश्न सोडविण्यास मदत होऊ शकते. साखरेचा दर व डॉलरचे अवमूल्यन होऊन साखर निर्यात केल्यास कारखान्यांना प्रतिटन १५० रुपयांचा तोटा होणार आहे. हे नुकसान भरून काढण्यासाठी सरकारने १५० रुपये अनुदान दिल्यास प्रश्न सुटू शकतो, याकडे शेट्टींनी लक्ष वेधले.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रॅज्युईटीत कपात, निवृत्तीवेतन थकले

$
0
0

Appasaheb.mali@timesgroup.com

Tweet : Appasaheb_MT

कोल्हापूर : पदनाम बदल करून वेतनश्रेणीवाढीच्या प्रकरणांची चौकशीचा आदेश काढला. दुसरीकडे वेतनश्रेणीच्या यापूर्वी निघालेल्या आदेशाविषयी संभ्रमावस्था असल्याचे निदर्शनास आल्यामुळे शिक्षण सहसंचालक कार्यालयाने गेल्या दोन वर्षापासून २८ कर्मचाऱ्यांचे पेन्शन थकविले. तर ४८ कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युईटीच्या रकमेत ४० टक्के कपात केली आहे. प्रॉव्हिडंड फंडाची रक्कम वगळता सेवानिवृत्तीचे अन्य लाभ न मिळाल्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. सरकारने पदनाम रद्द करुन वेतनश्रेणी वसूल करण्याचा आदेश दिल्यामुळे कर्मचाऱ्यांची अवस्था 'तेलही गेले, तूपही गेले, हाती धुपाटणे आले' अशी झाली आहे.

२०११ मध्ये विद्यापीठातील काही कारभारी कर्मचाऱ्यांनी चुकीच्या पध्दतीने पदनाम व वेतनश्रेणीची प्रक्रिया केली. हा प्रकार रोखावा अशी मागणी काही कर्मचाऱ्यांनी विद्यापीठातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली होती. मात्र अन्य विद्यापीठांत अशीच प्रक्रिया सुरू असल्याचे सांगत शिवाजी विद्यापीठातही पदनाम बदल व वेतन निश्चितीचे प्रकार घडले. दरम्यान शिक्षण सहसंचालक कार्यालयाने २४ फेब्रुवारी २०११ रोजीच्या सरकारी आदेशाचा आधार घेत कारवाई केली आहे. जानेवारी २०१७ पासून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे निवृत्तीवेतन थकविले आहे. सेवानिवृत्तीचे लाभ मिळावेत म्हणून निवृत्त कर्मचाऱ्यांची शिक्षण सहसंचालक कार्यालय, विद्यापीठ आणि मंत्रालयापर्यंत हेलपाटे मारत आहेत. मात्र, सरकारने नव्याने आदेश काढून पदनाम रद्द करण्याचे, सेवानिवृत्तीच्या वेतन प्रस्तावाचे नव्याने निश्चिती करण्याचे आदेश दिल्यामुळे निवृत्तांच्या समस्यांत आणखी भर पडली. प्रत्येक सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचे किमान दहा लाख रुपये अडकले. काहीजणांनी तीस तर तर कुणी ३३ वर्षे नोकरी करून निवृत्त झाले आहेत. निवृत्तीनंतर मोठी रक्कम हाती उपलब्ध होणार, मुलाबाळांच्या नोकरीसह अन्य कामासाठी नियोजन केले होते. मात्र सेवानिवृत्तीचे लाभ न मिळाल्याने काही जणावर उधार-उसनावारी करण्याची वेळ ओढावली आहे.

तेरा हजारांची वसुली, वरिष्ठांचा कानाडोळा

पदनाम बदल करुन वेतनश्रेणी लागू व्हावी यासाठी विद्यापीठ ते मंत्रालयापर्यंत साखळी निर्माण झाली होती. विद्यापीठातील कर्मचाऱ्यांतील काही कारभाऱ्यांनी २०११मध्ये वेतनश्रेणीसाठी प्रत्येकाकडून १३००० रुपयांची वसुली केली होती. पदनाम व वेतनश्रेणीसाठी तेरा हजार रुपयांची वसुली जमा करण्याचा कारभारी कर्मचाऱ्यांचा निर्णय काही कर्मचाऱ्यांना रुचला नाही. सरकारी आदेशात संदिग्धत: असताना पदनाम व वेतनश्रेणी लागू करण्यासाठी घाई करण्यात अर्थ नाही अशी त्या कर्मचाऱ्यांची भूमिका होती. मात्र कारभाऱ्यांनी इतर विद्यापीठातील दाखले देत प्रत्येकी तेरा हजार रुपयांचा फॉर्म्युला राबविला. रक्कम गोळा करण्याच्या प्रकाराविरोधात काही कर्मचाऱ्यांनी प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. मात्र विद्यापीठातील तत्कालिन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सोयीची भूमिका घेत तक्रारीकडे दुर्लक्ष केले. त्या कालावधीतील शिक्षण सहसंचालक कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कर्मचारी ते मंत्रालयापर्यंतच्या घडामोडीत मध्यस्थाची भूमिका बजावली होती चर्चा आहे.

भिशीची रक्कम, उधार उसनवारी

कनिष्ठ व वरिष्ठ लिपिक, सहायक अधिक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या पदनामात बदल होवून नवी वेतनश्रेणी लागू होईल या अपेक्षेने बहुसंख्य कर्मचाऱ्यांनी १३००० रुपयांचा भरणा केला. विद्यापीठात कर्मचारी एकत्र येऊन भिशी चालवितात. पदनामातील संधी गमावू नये यासाठी काही कर्मचाऱ्यांनी शक्कल लढविली. भिशीसाठी जमलेली सगळी रक्कम प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या नावानिशी कारभाऱ्यांकडे सोपविली होती अशा चर्चा आता रंगू लागल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लिंगायत वसतिगृहात पाण्याच्या टाकीत पाल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दसरा चौकातील लिंगायत वसतिगृहातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीत मृत पाल आढळल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर वसतिगृह प्रशासनाने स्वच्छता मोहीम राबवली.

वसतिगृहात सुविधा मिळाव्यात अशी मागणीचे निवेदन एका विद्यार्थी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. पण प्रशासनाने दुर्लक्ष केले होते. आज पिण्याच्या पाण्याला वास येत होता. तसेच काही विद्यार्थ्यांना पोट विकाराचा त्रास होऊ लागल्यावर पिण्याच्या पाण्याची टाकी विद्यार्थ्यांनी तपासली. यावेळी पाण्यात कुजलेल्या अवस्थेतील पाल सापडली. विद्यार्थ्यांनी व्यवस्थापक पाटील यांच्याकडे तक्रार केली. तसेच संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत शाहू छत्रपतींना निवेदन देण्याचा निर्णय विद्यार्थ्यांनी घेतला. या घटनेने जागे झालेल्या वसतिगृहाच्या संचालक मंडळ व प्रशासनाने स्वच्छता मोहीम राबवली. वसतिगृहाचे सचिव राजू वाली यांनी विद्यार्थ्यांच्या तक्रारीची दखल घेतली असून आज वसतिगृह परिसर स्वच्छ केल्याचे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जीप दरीत कोसळून तीन जण ठार

$
0
0

सातारा : भोजलिंगाच्या डोंगरावरून भाविकांची जीप खोल दरीत कोसळून तीन भाविकांचा मृत्यू झाला, तर बारा जण ठार झाले आहेत. ही घटना माण तालुक्यातील वरकुटे-मलवडी येथील भोजलिंगाच्या डोंगरावर घडली. चालकाचा ताबा सुटल्याने ही जीप खोल दरीत कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

शनिवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. सिंधू धोंडिबा गळवे, मनिषा आटपाडीकर, कंठेमाला कलास आटपाडीकर (विटलापूर, ता. आटपाडी. जि. सांगली) अशी मृतांची नावे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वस्त्रोद्योगातील सर्वांनाच वीज सवलतीचा दिलासा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

सरकारने यंत्रमागासह वस्त्रोद्योगातील अन्य घटकांनाही वीज दराची सवलत देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. नव्या वस्त्रोद्योग धोरणातील तरतुदींप्रमाणे वस्त्रोद्योगातील सर्वच घटकांना पहिल्यांदाच वीज दरातील सवलतीचा लाभ मिळणार आहे. २१ डिसेंबर २०१८ पासून पुढील पाच वर्षांसाठी ही सवलत लागू केली गेली आहे. तसेच वस्त्रोद्योगातील प्रकल्पांना चालना देण्यासाठी वस्त्रोद्योग धोरणात सुधारणा केल्याची माहिती आमदार सुरेश हाळवणकर यांनी दिली. नव्या वस्त्रोद्योग धोरणाच्या वेबसाइटचा प्रारंभ २६ डिसेंबरला वस्त्रोद्योगमंत्र्यांच्या हस्ते होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

आमदार हाळवणकर म्हणाले, 'नवीन वस्त्रोद्योग धोरण फेब्रुवारी २०१८ पासून लागू झाले आहे. त्यापूर्वीचे धोरण २०१७ मध्ये संपले होते. या दरम्यानच्या काळात धोरण अस्तित्वात नसताना स्थापन झालेल्या प्रकल्पांना दोन्हीपैकी एका धोरणाचा लाभ मिळणे आवश्यक असल्याने १ ऑगस्ट २०१७ ते १४ फेब्रुवारी २०१८ या कालावधीत ज्या प्रकल्पांना दीर्घ मुदतीचे कर्ज मंजूर झाले असेल तसेच ज्या स्वअर्थसहाय्यित प्रकल्पांनी यंत्रसामग्री खरेदीचे आदेश दिले असतील अशा प्रकल्पांना जुन्या किंवा नव्या धोरणात योजनांचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच या नव्या वस्त्रोद्योग धोरणात व्याज अनुदानाऐवजी भांडवली अनुदान योजनेअंतर्गत बँकेकडून अर्थसाह्य घेतलेल्या प्रकल्पांना प्रस्तावित केले होते. मात्र, काही मोठ्या प्रकल्पांना १०० टक्के कर्ज मिळत नाही. हे उद्योजक स्वभांडवलाचा वापर करतात व बँकेकडून मिळालेल्या कर्जावरच सवलत अनुदान मिळते असे उद्योजक या फायद्यापासून वंचित राहण्याची शक्यता असल्याने स्वनिधीतून वापरलेल्या रकमेवरसुद्धा भांडवली अनुदान देण्यात येईल. भांडवल ऐवजी यंत्रसामुग्रीची किमतीवर अनुदान मिळेल.'

अलीकडेच पॉवर फॅक्टर पेनल्टीमुळे वीजबिल वाढून आले असून याबाबत मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री यांना भेटून महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोगासमोर स्वतंत्ररीत्या याचिका दाखल केली होती. याबाबत २० डिसेंबरला महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगासमोर सुनावणी झाली. यावेळी महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाचे सदस्य आय. एम. बोहरी व मुकेश खुल्लर यांच्या न्यायपीठासमोर स्वतः युक्तिवाद केला. त्याबाबत महावितरणने आपले म्हणणे मांडण्यासाठी २६ डिसेंबरपर्यंत वेळ मागितला आहे. पॉवर फॅक्टर पेनल्टीबाबत डिसेंबरअखेर निश्चितच वीज ग्राहकांना मोठा दिलासा मिळेल असा विश्वासही हाळवणकर यांनी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जीप दरीत कोसळून तीन जण ठार

$
0
0

वृत्तसंस्था, सातारा

भोजलिंगाच्या डोंगरावरून भाविकांची जीप खोल दरीत कोसळून तीन भाविकांचा मृत्यू झाला, तर बारा जण ठार झाले आहेत. ही घटना माण तालुक्यातील वरकुटे-मलवडी येथील भोजलिंगाच्या डोंगरावर घडली. चालकाचा ताबा सुटल्याने ही जीप खोल दरीत कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

शनिवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. सिंधू धोंडिबा गळवे, मनिषा आटपाडीकर, कंठेमाला कलास आटपाडीकर (विटलापूर, ता. आटपाडी. जि. सांगली) अशी मृतांची नावे आहेत.

माण तालुक्यातील वरकुटे-मलवडी येथील डोंगरावर भोजलिंगचे देवस्थान आहे. शनिवारी पोर्णिमा असल्याने या ठिकाणी भाविकांची गर्दी होती. आटपाडी तालुक्यातील विटलापूरहून जीपने (एमएच १० सी ३४४१) तेरा भाविक भोजलिंग डोंगरावर दर्शनासाठी आले होते. दर्शन घेतल्यानंतर हे सर्वजण जीपने माघारी आपल्या गावी निघाले होते. डोंगरावरील घाट उतरत असताना अचानक जीपचे चाक घसरले. घाटामध्ये संरक्षक कठडे नसल्यामुळे जीप थेट तीनशे फूट दरीत कोसळली. या जीपचे हूड उघडे असल्यामुळे इतर प्रवासी जीपमधून बाहेर फेकले गेले. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. या अपघाताची माहिती मिळताच वरकुटे-मलवडी आणि परिसरातील नागरिकांनी तसेच डोंगरावर जाणाऱ्या नागरिकांनी दरीत उतरून जखमींना बाहेर काढले. मिळेल त्या वाहनाने सर्व जखमींना तत्काळ म्हसवड येथील रुग्णालयात नेण्यात आले. तीन महिलांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जीप दरीत कोसळून तीन जण ठार

$
0
0

वृत्तसंस्था, सातारा

भोजलिंगाच्या डोंगरावरून भाविकांची जीप खोल दरीत कोसळून तीन भाविकांचा मृत्यू झाला, तर बारा जण ठार झाले आहेत. ही घटना माण तालुक्यातील वरकुटे-मलवडी येथील भोजलिंगाच्या डोंगरावर घडली. चालकाचा ताबा सुटल्याने ही जीप खोल दरीत कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

शनिवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. सिंधू धोंडिबा गळवे, मनिषा आटपाडकर, कंठेमाला कलास आटपाडकर (विटलापूर, ता. आटपाडी. जि. सांगली) अशी मृतांची नावे आहेत.

माण तालुक्यातील वरकुटे-मलवडी येथील डोंगरावर भोजलिंगचे देवस्थान आहे. शनिवारी पोर्णिमा असल्याने या ठिकाणी भाविकांची गर्दी होती. आटपाडी तालुक्यातील विटलापूरहून जीपने (एमएच १० सी ३४४१) तेरा भाविक भोजलिंग डोंगरावर दर्शनासाठी आले होते. दर्शन घेतल्यानंतर हे सर्वजण जीपने माघारी आपल्या गावी निघाले होते. डोंगरावरील घाट उतरत असताना अचानक जीपचे चाक घसरले. घाटामध्ये संरक्षक कठडे नसल्यामुळे जीप थेट तीनशे फूट दरीत कोसळली. या जीपचे हूड उघडे असल्यामुळे इतर प्रवासी जीपमधून बाहेर फेकले गेले. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. या अपघाताची माहिती मिळताच वरकुटे-मलवडी आणि परिसरातील नागरिकांनी तसेच डोंगरावर जाणाऱ्या नागरिकांनी दरीत उतरून जखमींना बाहेर काढले. मिळेल त्या वाहनाने सर्व जखमींना तत्काळ म्हसवड येथील रुग्णालयात नेण्यात आले. तीन महिलांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

.......

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाखरीजवळ अपघात;दोन महिला जागीच ठार

$
0
0

वाखरीजवळ अपघात;

दोन महिला जागीच ठार

सोलापूर :

पंढरपूरनजीकच्या वाखरी येथे भीषण अपघात झाला. या अपघातात दोन महिला जागीच ठार झाल्या आहेत. मीराबाई संजय भोसले, माधुरी अशोक भोसले, अशी मृत महिलांची नावे आहेत.

वाखरी (ता. पंढरपूर) येथील शाहीर मळ्याजवळ शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता दुचाकीला चुकवण्याच्या प्रयत्नात गाडी झाडावर आदळून भीषण अपघात झाला. भोसले यांच्या कुटुंबात विवाह सोहळा असल्याने साहित्य खरेदीसाठी मीराबाई संजय भोसले आणि माधुरी अशोक भोसले या दोघी कारमधून पंढरपूर येथे निघाल्या होत्या. शाहीर मळा येथे कारच्या आडवी दुचाकी आली. दुचाकीस चुकवण्याच्या प्रयत्नात कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडावर जाऊन आदळली. या अपघातात कारमधील दोन्ही महिला उडून रस्त्यावर पडल्याने जागीच ठार झाल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images