Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

पाणी बिलांतून जनतेची लूट

$
0
0
फरक न काढता सांडपाणी अधिभार जमा करायचा असे ठरले होते. मात्र सहा महिन्यांच्या फरकाची बिले वाटप करुन प्रशासनाने दरोडेखोरांप्रमाणे जनतेची लूट चालवली असल्याचा आरोप करत स्थायी सदस्यांनी शुक्रवारी प्रशासनाला घरचा आहेर दिला. संपूर्ण शहरातून आंदोलनांचा भडका उडण्यापूर्वी तातडीची उपाययोजना राबवली नाही तर बिले वाटू देणार नाही, असा इशाराही दिला आहे.

प्रत्येक कॉलेजवर ‘संशोधन कक्ष’

$
0
0
प्राध्यापकांतील संशोधनवृत्तीला चालना मिळावी, विद्यार्थ्याना संशोधनाच्या अनुषंगाने पूरक माहिती, दर्जेदार संशोधन व्हावे हा उद्देश मूर्त स्वरूपात आणण्यासाठी आता प्रत्येक कॉलेजवर ‘संशोधन कक्ष’ची स्थापना केली जाणार आहे.

ई-मीटरमध्ये पुन्हा हेराफेरी

$
0
0
प्रवाशांची आर्थिक लुबाडणूक थांबविण्यासाठी कोल्हापूर आणि इचलकरंजी शहरांत तीन आसनी ऑटो रिक्षांत इलेक्ट्रॉनिक मीटर बसले. मात्र, रिक्षाचालकांनी प्रवाशांना लुबाडण्याचा नवा फंडा शोधला आहे. मीटरमध्ये हेराफेरी, प्रवासी रिक्षात बसण्यापूर्वीच मीटर डाउन (वेटिंग) करून आर्थिक लूटमार सुरू केली आहे. डे-नाइट सुरू असलेल्या या व्यवसायात काहींनी सील फोडून मीटर फास्ट करण्याचा फंडा शोधला आहे.

खंडपीठासाठी नवे सकारात्मक पाऊल

$
0
0
मुंबई हायकोर्टाचे खंडपीठ व सर्किट बेंच कोल्हापुरात व्हावे, यासाठी हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा यांनी एस. जी. वजिफदार, पी. व्ही. हरदास, रणजित मोरे या न्यायमूर्तींची त्रिसदस्यीय समिती पुन्हा नियुक्त केली आहे. समितीने कोल्हापूर खंडपीठ कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांना १६ डिसेंबर रोजी सायंकाळी सव्वापाच वाजता म्हणणे मांडण्यासाठी आमंत्रित केले आहे.

गॅदरिंग... तारुण्याचा उत्साह

$
0
0
पंधरा-वीस वर्षांपूर्वीचा काळ असा होता की, गॅदरिंग म्हणजे कॉलेज युवकांचा जीव की प्राण! दिवाळीनंतर त्यांना गॅदरिंगचे वेध लागायचे. गॅदरिंगमधून युवकांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळत असल्याने तसेच अनेकांचे करिअर याच टप्प्यावर घडत असल्याने अनेक जण गॅदरिंगमध्ये सहभागी होत असत. सध्याच्या बॉलिवूड, हॉलिवूडमधील नट-नट्यांच्या जीवनाला खरी कलाटणी मिळाली ती कॉलेजच्या गॅदरिंगमधून.

जयसिंगपुरातील खून : दोघे ताब्यात

$
0
0
जयसिंगपूर बसस्थानकासमोरील जयसिंग महाराज उद्यानात २७ वर्षीय तरूणाचा गळा दाबून तसेच डोक्यावर वार करून खून केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. मृताची ओळख अद्याप पटलेली नाही. शनिवारी याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले.

वडाप जीप उलटून महिला जागीच ठार

$
0
0
धामोड-म्हासुर्ली मार्गावर खासगी वडाप वाहतूक करणारी कमांडर जीप रस्त्यावरच उलटून झालेल्या अपघातात महिला जागीच ठार झाली. ही दुर्घटना शनिवारी दुपारी खामकरवाडी (ता.राधानगरी) येथे घडली. मनीषा भागोजी घुरके (वय ३५,रा.म्हासुर्लीपैकी रातांबीचा धनगरवाडा) असे त्या मृत महिलेचे नाव असून यामध्ये अन्य चौदा प्रवासीही जखमी झाले आहेत.

विषबाधेमुळे दाम्पत्याचा मृत्यू

$
0
0
अन्नातून विषबाधा झाल्याने भुदरगड तालुक्यातील शिवडाव गावठाणातील बाबजी धाकू पाटील (वय ७५), सुगणा बाबाजी पाटील (वय ७०) या पती दाम्पत्याचा मृत्यू झाला.

टोलप्रश्नी वक्तव्याचा विपर्यास

$
0
0
शहरातील टोल संदर्भातील प्रश्नाबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना औपचारिक चर्चेदरम्यान आपण उत्तर दिले. शहरातील टोल प्रश्नाशी माझा अथवा माझ्या विभागाचा काहीच संबंध नाही. मात्र, आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला आहे.

‘महाटीईटी’साठी २४ केंद्रे

$
0
0
राज्य शिक्षक पात्रता परीक्षा (महाटीईटी) परीक्षा रविवारी (ता.१५) होत आहे. या परीक्षेचे दोन पेपर असून सकाळी साडेदहा वाजता पहिला पेपर होणार आहे. दुपारी अडीच वाजता दुसरा पेपर होईल. पहिल्या पेपरसाठी ३९ केंद्रे असून १२ हजार ७६० उमेदवार परीक्षार्थी आहेत.

टोलला आमचा विरोधच

$
0
0
मुंबईत गिरणी कामगारांना घरे, अंगणवाडी सेविकांना वेतन आणि श्रमिक कामगारांना पेन्शन देण्याबाबत राज्य सरकारकडे आग्रही राहणार असल्याचे आश्वासन गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी शनिवारी राज्य श्रमिक महासंघाच्या मोर्चासमोर बोलताना दिले.

रात्रीचे भाडे : दीडपटवरून दुप्पट

$
0
0
पाच ते दहा मिनिटांचे वेटिंग आणि ई-मीटरच्या घड्याळात हेराफेरी करुन प्रवाशांकडून जादा भाडे आकारणी काही रिक्षाचालकांनी सुरु केली आहे. रात्रीच्या बारा ते पाच या वेळेतील प्रवाशांकडून होणारी दीडपट आकारणी दुप्पट होऊ लागली आहे.

कांदा, लसूण घसरला

$
0
0
गेल्या महिन्यापासून आवक वाढूनही कांद्याचा दर ५० ते ६० रुपपयांपर्यंत कायम होता. मात्र गेल्या दोन दिवसांपासून कांद्याच्या दरामध्ये चांगलीच घसरण झाली असून दर १५ ते २० रुपयांपर्यंत खाली आला आहे. कांदादरात घट झाल्याने सर्वसामान्य ग्राहकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. लसणाच्या दरातही ३० रुपयांनी घट झाली.

राष्ट्रवादी इच्छुकांत ‘स्थायी’साठी रस्सीखेच

$
0
0
स्थायी समिती सदस्य होण्यासाठी राष्ट्रवादीच्यावतीने अदिल फरास व प्रकाश गवंडी यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. जनसुराज्य आघाडीला एक सदस्यत्व देण्यात येणार आहे. वसंत कोगेकर, निशीकांत मेथे व इंद्रजीत बोंद्रे या तिघांपैकी एकाला संधी मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी रोहिणी काटे यांचे नाव पुढे आले असून जवळजवळ नि‌श्चित झाले आहे.

थेट विक्रीचा फायदा सर्वांनाच

$
0
0
कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीने सुरु केलेल्या ग्राहक ते शेतकरी या थेट गूळ विक्री केंद्रातून तीन दिवसांत ४७ हजारांची उलाढाल झाली आहे. शेतकऱ्यांना सेस स्वरुपात कोणताही कर आकारला जात नसल्याने शेतकऱ्यांना थेट नफा मिळू लागला आहे.

पथनाट्यातून प्रदूषणाचा जागर

$
0
0
एचआयव्ही/एड्स निर्मूलनासाठी मोहीम असो, ‘लेक लाडकी अभियान’ असो किंवा फार फार तर स्त्री-पुरूष समानता या विषयांवर आतापर्यंत अनेक पथनाट्य सादर झाले.

विजय दिन : सैन्यदलाचे शस्त्रास्त्र प्रदर्शन

$
0
0
बंकर आणि दुर्गम भागातही शत्रूंच्या लक्ष्याचा वेध घेणारी मिसाइल्स, रशियन बनावटीचे ९५० किलो वजनाचे अँटी एअर क्राफ्ट मशीन, एका मिनिटात गोळ्यांच्या दोनशे फैरी झाडणारे मशीन, तीन ते चार किलोमीटर अंतरावरील शत्रूचा थरकाप उडविणारी ग्रेनाइड मिसाइल्स... भारतीय सैन्यदलाच्या सामर्थ्याचे दर्शन घडविणारी ही शस्त्रास्त्रे.

यमगे अपघातातील जखमींची प्रकृती गंभीर

$
0
0
मुरगूड -निपाणी राज्यमार्गावर यमगे गावाजवळ समोरासमोर झालेल्या दोन ट्रकच्या भीषण अपघातात ट्रकचालकासह अन्य चार जणांची प्रकृती गंभीर आहे. तानाजी दिनकर पावले ट्रकचालक (वय ३८ रा.कलनाकवाडी ता.भुदरगड), देवानंद तुकाराम पाटील (वय २५ रा.यमगे ता.कागल),आकाराम गुंडू पाटील (वय ६५), महिपती साताप्पा पाटील (वय ४०) व दत्तात्रय मारुती पाटील (वय ५० सर्व रा. उंदरवाडी ता. कागल) अशी जखमीची नावे आहेत.

इचलकरंजीत ६७ टक्के मतदान

$
0
0
संपूर्ण शहरासह जिल्ह्यातील राजकीय क्षेत्राचे लक्ष वेधून घेतलेल्या इचलकरंजी नगरपरिषद प्रभाग क्रमांक तीन कच्या पोटनिवडणुकीत चुरशीने ६७.५४ टक्के मतदान झाले. आज (सोमवारी) मतमोजणी होणार असून राष्ट्रीय काँग्रेसचे विलास गाताडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विठ्ठल चोपडे यांच्यापैकी मतदारांनी कोणाला कौल दिला हे समजणार आहे.

लाळखुरकतीचा विळखा कायम

$
0
0
कागल तालुक्यातील कुरणी येथील जनावारांना झालेली लाळखुरकत रोगाची साथ ९० टक्केच आटोक्यात आल्याचा तसेच तालुक्यातही कुठे या रोगाची साथच नसल्याचा दावा तालुक्याच्या पशुधन विभागाने केला आहे. मात्र मुरगूडसह अन्य ठिकाणच्या बाजारातून खरेदी केलेल्या अथवा विकण्यासाठी नेलेल्या जनावरांमुळे तालुक्यासह जिल्ह्यात सर्वच ठिकाणी लाळेची साथ मोठ्या प्रमाणावर पसरली आहे.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images