Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

वडार समाजाचा सोमवारी सोलापुरात महामेळावा

$
0
0

वडार समाजाचा सोमवारी

सोलापुरात महामेळावा

मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे उपस्थित राहणार

सोलापूर :

वडार समाजाचा कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि तेलंगण राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही अनुसूचित जाती आणि जमातीमध्ये समावेश करून 'एक देश-एक प्रवर्ग' हा न्याय देत एससी, एसटी प्रवर्गाचेच आरक्षण द्यावे, समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ द्यावे, या मुख्य मागण्यांसह समाजाचे प्रश्न सरकार दरबारी मांडण्यासाठी 'मी वडार महाराष्ट्राचा' या संघटनेच्या वतीने सोमवारी, १७ डिसेंबर रोजी सोलापूरच्या इंदिरा गांधी स्टेडियममध्ये वडार समाजाचा राज्यस्तरीय महामेळावा आयोजित केला असल्याची माहिती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विजय चौगुले यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. वडार समाजाच्या या महामेळाव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरणमंत्री रामदास कदम, सहकार मंत्री सुभाष देशमुख व सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


संविधान दिन

$
0
0

भाकपतर्फे विविध उपक्रम

कोल्हापूर: भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे विविध उपक्रमानी संविधान बचाव दिन साजरा करण्यात आला. भाकपच्या बिंदू चौकातील ऑफिसवर शालेय विद्यार्थ्यासाठी आपले संविधान या विषयावर निबंध स्पर्धा झाल्या. कार्यक्रमाच्या सुरवातीस कॉ. शांता रानडे याना श्रद्धंजली अर्पण्यात आली. त्यानंतर क्रांतिसिंह नाना पाटील व डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमाना पुष्पहार अर्पण केल्यानंतर संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामुदायिक वाचन करण्यात आले. संविधान बचाव प्रतिज्ञा घेण्यात आली. प्रमुख पाहुणे उपप्राचार्य टी. आर. गुरव यानी आपल्या भाषणात संविधानाची वैशिष्ट्ये गोष्टीतून स्पष्ट केली. प्रास्ताविक संयोजक कॉ. अनिल चव्हाण यानी, सूत्रसंचलन कॉ. सतीश कांबळे यांनी, तर आभार प्रदर्शन कॉ. रघुनाथ कांबळे यानी केले. कार्यक्रमासाठी कॉ. उमा पानसरे, कॉ. सुमन पाटील, कॉ नामदेव गावडे, कॉ. प्रशांत आंबी, कॉ. हरिश कांबळे, कॉ. बी. एल .बरगे, आशा बरगे, गिरिश फोंडे, आरती रेडेकर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेणुका यात्रेदरम्यानच्याअडचणी त्वरित सोडवा

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

कर्नाटकातील सौंदत्ती यात्रेदरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातून जाणाऱ्या भक्तांच्या गैरसोय होते. अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. यामुळे अडचणी, समस्या सोडविण्यासाठी बेळगाव जिल्हा प्रशासनाशी पाठपुरावा करावा. यासंबंधी प्रशासन आणि भक्त संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक घ्यावी, अशा मागणीचे निवेदन हिंदूत्ववादी संघटनांतर्फे निवासी नायब तहसीलदार अपर्णा मोरे यांना मंगळवारी देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे, सौंदत्ती यात्रेसाठी बुकिंग केलेल्या बसचा खोळंबा आकार एसटी महामंडळाने कायमस्वरूपी रद्द करावा, यात्रेदिवशी रेणुका मंदिराचे सर्व दरवाजे उघडे ठेवावेत, तेथे पिण्याच्या पाण्याची सोय करावी, यात्राकाळातील अडचणीसंदर्भात संपर्क साधण्यासाठी प्रशासनाचे मोबाइल क्रमांक द्यावेत, वाहनतळाची व्यवस्था करावी, जोगणकुंडची सफाई करावी, धार्मिक विधीच्या ठिकाणी अंघोळीसाठी शॉवर व कपडे बदलण्यासाठी विशेष रूमचे सोय करावी, वैद्यकीय पथक तैणात करावे. या मागण्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत. निवेदन देताना किशोर घाटगे, बंडा साळोखे, महेश उरसाल, मनोहर सोरप, सुनील पाटील, मधुकर नाझरे, रेखा दुधाणे, बाबा पार्टे, सरोज फडके आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेण्णा लेक परिसरात हिमकण

$
0
0

वेण्णा लेक परिसरात हिमकण

म. टा. वृत्तसेवा, सातारा

महाबळेश्वरमध्ये थंडीचा जोर वाढला आहे. बुधवारी पहाटे वेण्णा लेक परिसरात कडक थंडी पडली होती. गारठा वाढल्यामुळे परिसरात हिमकण जमा झाल्याचे पहावयास मिळाले. नौकाविहारासाठी बोटीमध्ये चढ उतार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या जेटीवर ठिकठिकाणी हिमकण साचल्याचे दिसत होते. परिसरात रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या गाड्यांच्या टपांवर तसेच झोपड्यांच्या छप्परांवर ही हिमकण पहावयास मिळाले. लिंगमाळा परिसरातील स्मृतीवन परिसर व तेथील रान फुलांवर दवबिंदू गोठून तयार झालेल्या हिमकणांमुळे सर्वत्र पांढरा शुभ्र नजारा दिसत होता.

दरम्यान, थंडीच्या हंगामात यंदा हिमकण दिसण्याची ही पहिलीच वेळ असल्याने त्या बद्दल विशेष कुतूहल होते. स्थानिकांसह फिरवायला आलेल्या पर्यटकांनी हिमकणांचा आनंद लुटला. हवामान खात्याच्या नोंदीनुसार महाळेश्वरात बुधवारी किमान तापमान १३.५ अंश सेल्सिअस होते. दरम्यान, वेण्णा तलाव आणि लिंगमाळा परिसराचे तापमान बुधवारी पहाटे ३-४ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते, अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे.

गेले दोन दिवस पर्यटनस्थळी गार वाऱ्यासह कडाक्याची थंडी होती. मंगळवारी रात्री गार वारे कमी झाले. मात्र, थंडीचा जोर वाढला होता. स्थानिकांसह पर्यटकांनीही ठिकठिकाणी शेकोट्या पेटविल्या होत्या. महाबळेश्वरात आलेले पर्यटक वुलन टोप्या, शाली, जर्किन्स, स्वेटर घालून फिरताना दिसत होते. वाढलेल्या थंडीमुळे वेण्णा तलाव परिसर चांगलाच गारठला होता. काही ठिकाणी दवबिंदू गोठून हिमकण तयार झाल्याचे फारच सुंदर दृश्य पहावयास मिळत होते. वेण्णा तलावावर नौकाविहारासाठी बोटीमध्ये चढ-उतार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या जेटीवर ठिकठिकाणी हिमकण साचल्याचे दिसत होते. परिसरात रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या गाड्यांच्या टपांवर तसेच झोपड्यांच्या छप्परांवर हिमकण पहावयास मिळाले.

.........

फोटो ओळी

वेण्णा तलावावर नौकाविहारासाठी बोटीमध्ये चढ-उतार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या जेटीवर ठिकठिकाणी हिमकण साचल्याचे दिसत होते.

...

गाडीचा टप दवबिंदू गोठून तयार झालेल्या हिमकणांमुळे पांढरे शुभ्र झाले होते.

..

स्मृतिवन हिमकणांमुळे असे पांढरे शुभ्र झाले होते.

.........

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शरद पवार यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

$
0
0

फोटो...

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा ७८ वा वाढदिवस विविध उपक्रमांद्वारे साजरा झाला. शहर व जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे 'स्वाभिमान सप्ताह' साजरा होणार आहे. पक्षाच्या जिल्हा कार्यालयात जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्या हस्ते वाढदिवसाचा केक कापून स्वाभिमान सप्ताहाला प्रारंभ झाला. शहर राष्ट्रवादीतर्फे अंध शाळेतील विद्यार्थ्यांना भोजनवाटप करण्यात आले.

जिल्हाध्यक्ष पाटील म्हणाले, 'कष्टकरी, सामान्य जनतेची नस माहीत असणारा नेता म्हणून त्यांची देशभर ओळख आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचे भाग्य आपणास लाभले. त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून समाजातील गरीब घटकांच्या अडचणी दूर करू. जिल्हाभर कार्यक्रम आयोजित करून वाढदिवस साजरा करूया.'

याप्रसंगी बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, अण्णासाहेब क्वाणे, मधुकर जांभळे, रोहित पाटील, संगीता खाडे यांनी मनोगत व्यक्त केले. पक्षाचे जिल्हा सरचिटणीस अनिल साळोखे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाला आप्पासाहेब धनवडे, संभाजी पाटील, जयकुमार शिंदे, कल्पेश चौगले, संजय घोडके, सुनील साळोखे, आदी उपस्थित होते. शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मिरजकर तिकटी येथील अंधशाळेत विद्यार्थ्यांना महापौर सरिता मोरे यांच्या हस्ते भोजन वाटपाचा कार्यक्रम झाला. पक्षाचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, स्थायी समितीचे माजी सभापती आदिल फरास, नंदकुमार मोरे, सुनील देसाई, महिला आघाडीच्या जहिदा मुजावर, किसन कल्याणकर, रिजाय कागदी, जहाँगीर अत्तार, आदी उपस्थित होते.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सैन्यभरतीत उमेदवारांचीवैद्यकीय चाचणी सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

भारतीय सैन्य दलातर्फे येथील शिवाजी विद्यापीठाच्या मैदानावर सोमवारपासून शारीरिक चाचणी फेरीत पात्र ठरलेल्या उमेदवारांची वैद्यकीय चाचणी घेतली जात आहे. १५ डिसेंबरपर्यंत ही प्रक्रिया चालणार आहे. खेड्यापाड्यांतून भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना मोफत जेवण देण्यासाठी दानशूर व्यक्त, संस्था पुढे येत आहेत.

पश्चिम महाराष्ट्र आणि गोव्यातील दोन जिल्ह्यांसाठी ६ नोव्हेंबरपासून सैन्यभरती प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी ५७ हजार ८५६ तरुणांनी ऑनलाइन अर्ज भरले होते. प्रत्यक्षात भरतीला ५५ हजार तरुणांनी हजेरी लावल्याचे सांगण्यात येते. वजन, उंची, धावण्याच्या चाचणीत पात्र झालेल्यांची वैद्यकीय सैन्यातील डॉक्टरांच्या पथकाकडून तपासणी केली जात आहे. त्यासाठी विविध जिल्ह्यांतून तरुण येत आहेत. वैद्यकीय तपासणीसाठी बोलावलेल्या दिवसाआधीच ते दाखल होत आहेत. त्यांना मूलभूत सुविधांची सोय सायबरजवळील राजाराम कॉलेज मैदानावर उपलब्ध करून दिली आहे. महापालिकेतर्फे पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. भरतीच्या ठिकाणी व्हाइट आर्मीने मोफत जेवणाची सुविधा उपलब्ध केली आहे.

००००

क्रिडाईतर्फे चपाती, भाजी

भरतीसाठी आलेल्या तरुणांची होणारी गैरसोय, पैसे नसल्याने त्यांच्यावर उपाशीपोटी राहण्याची येत असलेली वेळ यासंबंधी महाराष्ट्र टाइम्समध्ये बुधवारी सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाले. त्याची दखल क्रिडाईने सायंकाळी १५०० उमेदवारांना मोफत चपाती-भाजीचे वाटप केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, क्रिडाईचे अध्यक्ष महेश यादव, उपाध्यक्ष विद्यानंद बेडेकर, सचिव के. पी. खोत, खजिनदार सचिन ओसवाल, सहसचिव रविकिशोर माने यांच्यासह संचालक उपस्थित होते. सामाजिक बांधिलकी मानून मदत केल्याचे यादव यांनी सांगितले. हिंदू एकतातर्फे एक हजार उमेदवारांना अल्पोपहार वाटप केले. यावेळी लालासाहेब गायकवाड, गजानन तोडकर, हिंदुराव शेळके, सुरेश काकडे, अजित गायकवाड, अजित चव्हाण, प्रकाश आयरेकर, बाळासाहेब मुधोळकर उपस्थित होते.

०००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यातील दुष्काळावर लोकसभेत चर्चा करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्यातील दुष्काळ, तिहेरी तलाक आणि राफेल डीलवर चर्चा घडवून आणण्याची मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी केली. संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर झालेल्या लोकसभा बिझनेस अॅडव्हायझरी कमिटीच्या बैठकीत त्यांनी ही मागणी केली. लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.

सरकारच्यावतीने आठ महत्त्वाची विधेयके प्रस्तावित आहेत. या प्रत्येक विधेयकावर लोकसभेत चर्चेसाठी नेमका किती कालावधी द्यायचा, यावर समिती सदस्यांनी मते व्यक्त केली. प्रामुख्याने डीएनए तंत्रज्ञान, मानवाधिकार संरक्षण, वैयक्तिक कायदा, धरण सुरक्षा या विधेयकांवर तसेच पुरवणी मागण्यांवर चर्चा करण्यासाठी कालावधी निश्‍चित केला. यावेळी समिती सदस्यांनी नोटाबंदी, शेतकऱ्यांसमोरील समस्या या विषयांवरही चर्चा घडवून आणण्याची मागणी केली.

खासदार महाडिक यांनी तीन महत्त्वाच्या मुद्द्यांवर लोकसभेत चर्चा होणे अपेक्षित असल्याचे सांगितले. महाराष्ट्रात सध्या दुष्काळसदृश परिस्थिती असून, सर्वसामान्य घटक त्यात होरपळत आहे. त्यामुळे हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा असून, लोकसभेत चर्चेसाठी त्याला वेळ मिळणे गरजेचे आहे. तसेच तिहेरी तलाक या विषयावर सविस्तर चर्चा घडवून आणून त्याची अंमलबजावणी, सद्य:स्थिती, त्रुटी जाणून घेऊन त्यात बदल करणे आवश्यक आहे, असे खासदार महाडिक यांनी नमूद केले.

बैठकीला भाजपच्यावतीने मंत्री अर्जुनराम मेघवाल, काँग्रेसच्या वतीने खासदार दीपेंद्रसिंग हुडा यांच्याव्यतिरिक्त खासदार आनंदराव आडसूळ, सुदीप बंडोपाध्याय, संजय धोत्रे, प्रल्हाद जोशी, तथागत सत्पती, अनुरागसिंग ठाकूर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन वर्षात पाच महापौर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गेल्या १८ वर्षांपासून महापौरपदाची खांडोळी करण्याचा राजकीय पक्षांकडून व नेत्यांकडून सुरू असलेला उद्योग या सभागृहातही कायम राहिला आहे. परिणामी काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या सत्तेतील गेल्या तीन वर्षांतील पाचव्या महापौर म्हणून सरिता मोरे नुकत्याच विराजमान झाल्या. स्पष्ट बहुमत असताना एकाही व्यक्तीला महापौरपदाचा अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आलेला नाही, ही शहराच्या विकासाच्या दृष्टीने शोकांतिका म्हणावी लागेल. पक्षीय राजकारणामुळे पदाचे तुकडे पाडण्याला अटकाव होईल ही शक्यता फोल ठरली आहे.

शहराचे प्रथम नागरिक म्हणून महापौरपदाला नेहमीच सन्मान मिळाला आहे. राज्यघटनेतील तरतूद आणि राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार महापौरपदावरील व्यक्तीने कार्यकाळ पूर्ण करणे अपेक्षीत असते. मात्र घटनेची पायमल्ली आणि मार्गदर्शक सूचनांचा अनादर कोल्हापुरात कायमच केला गेला आहे. अनेकांना मिळालेला सहा महिन्यांचा कालावधी सत्कार, उद्घाटने यातच जात असल्याचा परिणाम शहराच्या विकासावर होत आहे.

कोल्हापूर महापालिकेच्या सुरुवातीच्या काळात महापौरपदाचा कार्यकाळ एक वर्षाचा होता. राजकीय परिपक्वता आणि ईर्ष्येचा अभावामुळे अनेकांनी या पदाचा कार्यकाल पूर्ण करत त्याला चांगला न्यायही दिला. पण नंतर गल्लीबोळात तयार झालेले आण्णा, दादा, भाऊ, तात्या यांच्या वर्चस्ववादातून प्रभागांमध्ये उदंड राजकीय कार्यकर्ते निर्माण झाले. प्रथम नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर त्यांना नगरीचे सर्वोच्च पद भूषवण्याची अभिलाषा निर्माण झाली. राजकीय नेत्यांच्या वळचणीला जात अनेकांनी पक्ष खुंटीला बांधून ठेवला. त्यामुळे ठराविक व्यक्तींच्या हातात महापालिकेची सत्ता गेली. पदाच्या लालसेने अनेकजण अशा व्यक्तींच्या आश्रयाला गेले. सर्वांना पद देण्याची खेळी करत महापौरपदाचे तुकडे करण्यास सुरुवात झाली.

२००० नंतर महापालिकेची एकहाती सत्ता माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्याकडे होती. त्यांनी याला सुरुवात केली. राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार महापौरपदाचा कार्यकाल एक वर्षाचा असताना वर्षात दोघांना पदे देण्यात आली. त्याची सुरुवात २००१मध्ये झाली. शिरीष कणेरकर यांनी सहा महिन्यांचा कालावधी पूर्ण केला. नंतर दीपक जाधव यांनी अवघ्या चार महिन्यांसाठी महापौरपद भूषवले. नंतर दिलीप मगदूम व बाजीराव चव्हाण हे अनुक्रमे तीन व दोन महिन्यांसाठी महापौरपदावर विराजमान झाले. सातत्याने महापौर बदलामुळे जोरदार टीका झाली. मात्र त्याकडे गांभिर्याने पाहिले गेले नाही.

सत्ता कायम राखण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी शहर विकासाचा मुद्यांना बाजुला सारले. महापौरपदाच्या दोन ते सहा महिन्यांच्या अल्प कालावधीतील बुहतांश वेळ सत्कार समारंभांत जातो. त्याचबरोबर जुन्या कामांचे उद्घाटन समारंभ करण्यात अनेकांनी धन्यता मानली. त्यामुळे अल्प काळात शहराचा विकास होईल असे प्रकल्पच मार्गी लागले नाहीत. परिणामी शहरातील पार्किंग, कचरा, नदी प्रदूषण पाण्याच्या प्रश्न जैसे-थै राहिले.

२०१०मध्ये महापालिकेत पक्षीय राजकारणाला महत्त्व आले. माजी आमदार महाडिक आणि आमदार सतेज पाटील यांच्यातील सत्ता संघर्षात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने बाजी मारली. आघाडीच्या फॉर्म्यूल्यानुसार काँग्रेसने पहिल्या वर्षात वंदना बुचडे तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कादंबरी कवाळे यांनी एक वर्षाचा कालावधी पूर्ण केला. त्याचवेळी महापौरपदाचा कार्यकाळ अडीच वर्षाचा करण्याचा धोरणात्मक निर्णय राज्य सरकारने घेतला. वाढवलेल्या कालावधीमुळे पदाची अभिलाषा बाळगलेल्या अनेकांचा हिरेमोड झाला. पण राजकीय नेते त्यांच्या मदतीला धावून आले. सत्ता अबाधित ठेवताना महाडिक यांचाच कित्ता काँग्रेसचे आमदार सतेज पाटील आणि राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांनी कायम ठेवला. पक्षीय राजकारणाने महापौरपदाचे तुकडे पडणार नाहीत अशी अपेक्षा असलेल्या शहरवासियांचा पुरता भ्रमनिरास झाला. २०१५मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीला स्पष्ट बहूमत मिळूनही पुन्हा महापौरपदाची खिरापत वाटली जात आहे. पक्षीय बलाबल असतानाही पदाची विभागणी केली जात असल्याने अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा, राजर्षी शाहू समाधीस्थळ, शाहू मिल येथील स्मारक, थेट पाइपलाइन योजना यांच्याकडे दुर्लक्ष झाले आहे. काही योजनांची कामे संथगतीने सुरू आहेत. अल्पकाळाच्या पदामुळे एकाही महापौरांना योजना कार्यन्वित करण्यासाठी पाठपुरावा करता आलेला नाही. सरकार विविध प्रकल्पांच्या निधीची घोषणा करते. मात्र प्रशासन आणि लोकप्रतिनिधीही पाठपुरावा करण्यात कमी पडत असल्याने शहर विकासाला खीळ बसली आहे.

घोडेबाजाराची चर्चा खुलेआम

शहराचे सर्वोच्च पद देताना पदाचे तुकडे केले जात असल्याचे वास्तव सर्वमान्य आहे. इच्छुकांची संख्या जास्त असल्याने नेहमीच नाराजांची संख्याही जास्त असते. अशा नाराजांना आपल्या गोटात घे‌ऊन सत्ता परिवर्तन करण्यासाठी विरोधक नेहमीच प्रयत्नशील असतात. तर सत्ता कायम ठेवताना काठावरील नगरसेवकांना अनेक प्रलोभने दिली जातात. त्यामध्ये विशेषत: रोख रकमेची चर्चा होते. प्रत्यक्षात नगरसेवकांच्या हातात किती रक्कम मिळते, हा संशोधनाचा विषय असला, तरी त्यामुळे त्यांची बदनामी मोठी होते. त्याकडेही नगरसेवक दुर्लक्ष करतात हे मोठे दुर्दैव आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आठ दिवसांत कारवाई न झाल्यास आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'सभागृहात नगरसेवकांवर प्रवेश देण्यावरून आमदार हसन मुश्रीफ व सतेज पाटील यांच्यासोबत हुज्जत घालताना 'करवीर'चे उपाधीक्षक सूरज गुरव यांनी महिला नगरसेविकांना धक्काबुक्की केली. सभागृहात सत्तारुढ गटाच्या नगरसेवकांना जाणिवपूर्वक वेळ होईल यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील व पोलिसांनी षङयंत्र रचले होते' असा आरोप नूतन महापौर सरिता मोरे यांनी केला. गुरव यांची कार्यपद्धती कायदा व सुव्यवस्था बिघडेल अशीच असल्याने आठ दिवसांत जिल्हा पोलिसप्रमुखांनी त्यांच्यावर कारवाई न केल्यास त्यांच्या कार्यालबाहेर ठिय्या आंदोलन करू,' असा इशाराही महापौरांनी दिला. महिला सदस्यांना झालेल्या धक्काबुक्कीचा निषेध केला.

उपमहापौर भूपाल शेटे म्हणाले, 'आघाडीच्या नगरसेवकांना आयकार्ड तपासणीच्या नावाखाली सभागृहात पोहोचू द्यायचे नाही अशी सुपारी उपाधीक्षक गुरव यांनी घेतली होती. आघाडीचे नगरसेवक वेळेत पोहोचले नसते तर महापौर निवडीत वेगळेच चित्र दिसले असते. त्यांचा प्रयत्नही तसा होता. त्यामुळे गुरव यांचे निलंबन करून चौकशी करावी या मागणीसाठी ठिय्या आंदोलन करण्यात येईल. महासभेत त्यांच्या निषेधाचा ठराव करण्यात येणार आहे.'

सभागृह नेते दिलीप पोवार म्हणाले, 'नगरसेवक गुन्हेगार किंवा चोर नसताना त्यांची ओळखपत्रे तपासण्याची काय आवश्यकता होती? ती महापालिका प्रशासनाची जबाबदारी असताना पोलिस ओळखपत्रे तपासत होते. पोलिस आणि पालकमंत्री पाटील यांच्या संगनमतातूनच या सर्व घटना घडल्या.'

नगरसेवक लोकशाही पद्धतीने सभागृहात प्रवेश करत असताना उपाधीक्षक गुरव यांनी केलेल्या प्रकारचा निषेध करताना काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख म्हणाले, 'महापौर पदाच्या निवडीवरुन झालेल्या आरोप-प्रत्यारोपांमध्ये आमदार मुश्रीफ यांनी कायदा व सुव्यवस्था बिघडेल अशी भीती व्यक्त करत पालकमंत्री पाटील नागरिकांना समस्या घेऊन निवासस्थानाऐवजी शासकीय विश्रामगृह किंवा इतर ठिकाणी बोलवतात अशी टीका केली होती. त्यामुळे संतप्त पालकमंत्री पाटील यांनी गुरव यांना वादग्रस्त प्रकाराची ऑफर दिली होती. त्यानुसारच गुरव यांनी घरी जातो, गडचिरोलीला जातो अशी वक्तव्ये करत आमदार मुश्रीफ यांच्यासोबत हुज्जत घालत सदस्यांना सभागृहात वेळेत पोहोचू द्यायचा नाही असा त्यांचा प्रयत्न होता. गुरव यांनी त्यांच्या कार्यालयात स्त्रिया व ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान राखत असल्याचा फलक लावला असला तरी त्यांचे वर्तन त्याउलट आहे.'

शहर विकासाच्या फायली हलवा

'महापौर निवडीपूर्वी काँग्रेस आघाडीच्या तीन नगरसेवकांना पालकमंत्री पाटील यांनी अपात्र ठरवले. निवडीशी माझा संबंध नाही असे म्हणणाऱ्या पालकमंत्री पाटील यांनी एका दिवसात फायली हलवल्या. ही तत्परता शहर विकासासाठी दाखवली असती तर बरे झाले असते' असे टीकास्र काँग्रेसचे गटनेते सारंगधर देशमुख यांनी सोडले. ते म्हणाले, 'पालकमंत्री शहराच्या विकासावर बोलण्यापेक्षा जिल्ह्याच्या विकासाची खोटी आकडेवारी देतात. शहर विकासावर खुल्या चर्चेचे आम्ही त्यांना आव्हान देतो. उपाधिक्षक गुरव यांच्यामार्फत आमदार मुश्रीफ व पाटील यांना सोशल मीडियाद्वारे बदनामी केली केला. निवडीची तारीख जाहीर झाल्यानंतर, सदस्यांना अपात्र ठरवून कोर्टात जाता येऊ नये यासाठी महापालिका प्रशासनासह पालकमंत्री पाटील यांनी प्रयत्न केले' असाही आरोपही देशमुख यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलगीच झाल्याच्या रागातून विष पाजले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा शाहूवाडी

विष पाजून पोटच्या दोन महिन्याच्या मुलीला ठार केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. याप्रकरणी शाहूवाडी पोलिसांनी दाम्पत्याला अटक केली. दुसरीही मुलगीच झाल्याच्या नैराश्यातून त्यांनी हे कृत्य केल्याचे उघड झाले. जयश्री प्रकाश पाडावे (वय २१) आणि प्रकाश बंडू पाडावे (२८, रा. सावर्डी, ता. शाहूवाडी) असे या दाम्पत्याचे नाव आहे. सिद्धी (वय २ महिने) असे मृत मुलीचे नाव आहे. शाहूवाडी-मलकापूर न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी दाम्पत्याला शनिवार (ता.१५) पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सावर्डीतील प्रकाश आणि जयश्री प्रकाश पाडावे या दाम्पत्याला प्रांजल ही २ वर्षाची पहिली मुलगी आहे. त्यानंतरही त्यांना मुलगीच झाली. दोन महिन्याची सिद्धी ही एकसारखी रडत असल्याने ते ४ ऑक्टोबर २०१८ ला करंजफेणच्या खासगी दवाखान्यात घेऊन गेले. मुलीची प्रकृती पाहून डॉक्टरांनी तिला सीपीआरमध्ये दाखल करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार तिला सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. परंतु, तत्पूर्वीच मुलीचा मृत्यू झाला होता. यावेळी संशय आल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी विच्छेदनाशिवाय मृतदेह ताब्यात देणार नसल्याचे स्पष्ट केले. मात्र प्रकाश पाडावेने विच्छे्दनास तत्काळ विरोध दर्शविला. त्यामुळे संशय आणखी बळावला. मृतदेहाच्या उत्तरीय तपासणीत मुलीचा अनैसर्गिक मृत्यू झाल्याचे अहवालात नमूद करून पुढील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्हिसेरा राखून ठेवण्यात आला. व्हिसेरा पृथ्थकरण अहवालात थिमेटसारखा विषारी पदार्थ आढळल्याचा अहवाल न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडून पोलिसांना मिळाला. चौकशीवेळी पाडावे दाम्पत्याने गुन्हा कबूल केला. दुसरीही मुलगीच झाल्याच्या रागातून हे कृत्य केल्याचे त्यांनी कबूल केले. पोलिस उपनिरीक्षक एम. व्ही. जठार यांनी पोलिसांत फिर्याद दिली असून, पाडावे दाम्पत्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. पोलिस निरीक्षक मनोहर रानमाळे तपास करीत आहेत.

.. .. ..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गवई गटातर्फे निषेध

$
0
0

कोल्हापूर : केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांना अंबरनाथ येथे झालेल्या धक्काबुक्कीचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया,(गवई गट) जिल्हा शाखेतर्फे निषेध करण्यात आला. धक्काबुक्की करणाऱ्या प्रवीण गोसावीवर कारवाई करावी, अशी मागणी कार्यकर्त्यांच्या बैठकीत करण्यात आली. बैठकीला पक्षाचे पदाधिकारी पी. एस. कांबळे, भाऊसाहेब काळे, सज्जन कांबळे, अजित हेर्लेकर, विश्वास कांबळे, भगवान कांबळे, बाजीराव गायकवाड, विलास कांबळे आदींच्या उपस्थितीत बैठक झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रविवारी वधू-वर मेळावा

$
0
0

कोल्हापूर: चर्मकार शुभमंगल वधू वर केंद्रातर्फे पुणे येथे समाजाचा वधू वर व पालक मेळावा रविवारी (ता. १६) आयोजित केला आहे. विणकर सभागृह निमल पार्क शेजारी, चव्हाणनगर कमानी शेजारी पद्मावती येथे सकाळी ११ ते दुपारी चार या वेळेत मेळावा होणार आहे. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी अनिल यशवंत नाईक दत्त कॉलनी जवाहरनगर येथे संपर्क साधावा असे संयोजकांनी आवाहन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२३३ बालके जगताहेत एचआयव्हीमुक्त

$
0
0

Sachin.patil1@timesgruoup.com

Tweet-sachinpMT

कोल्हापूर : पालकांकडून अपत्याकडे होणारा एचआयव्हीचा प्रसार टाळण्यासाठी राबवण्यात आलेल्या एमडीआर पीपीटीसीटी उपचारपद्धतीमुळे गेल्या चार वर्षात एचआयव्हीसह जगणाऱ्या मातांच्या २३३ बालकांना एचआयव्ही मुक्त करण्यात यश आले आहे. प्रभावी उपचार, प्रचारामुळे हे बालकांना एचआयव्ही- एड्स होण्यापासून रोखता येणे आरोग्य विभागाला यश आले आहे.

राज्यात एचआयव्ही रुग्णांमध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा पाचवा क्रमांक लागतो. मात्र गेल्या तीन वर्षात एचआयव्ही-एड्समुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. तपासणीत व्यक्ती पॉझिटिव्ह आल्यास तत्काळ उपचाराची प्रक्रिया सुरू केली जाते. त्यामुळे एचआयव्हीसह जगणाऱ्या व्यक्तीचे आयुष्य वाढण्यास मदत झाली आहे. सन २००२ पासून पालकांकडून बालकाला होणारा एचआयव्ही संसर्ग टाळण्यासाठी पीपीटीसीटी हा प्रतिबंध कार्यक्रम हाती घेण्यात आला. यामध्ये पॉझिटिव्ह गरोदर स्त्रीला प्रसूतीवेळी नेविरॅपिन या औषधाची मात्रा दिली जाते. त्यानंतर ते औषध बाळाला देखील दिले जाते. त्यामुळे ९० टक्‍क्‍यांपर्यंत बाळांचा रिपोर्ट एचआयव्ही निगेटिव्ह येत होता.

फेब्रुवारी २०१४ पासून एमडीआर पीपीटीसीटी हा नवीन एचआयव्ही संसर्ग प्रतिबंध कार्यक्रम हाती घेण्यात आला. यामध्ये गरोदर स्त्रीला एचआयव्ही आढळल्यास तिला ताबडतोब एचआयव्ही विषाणू विरोधी औषधे दिली जातात. त्यामुळे बाळाला होणारा संसर्ग लक्षणीयरित्या घटण्यास मदत होते. राज्यात हा उपक्रम लागू झाल्यापासून मातांमध्ये जनजागृती झाली आहे. तसेच पालकांचे समुपदेशन देखील करण्यात येते. शासकीय रुग्णालयातील स्त्रीरोग व प्रसुती विभागात या मोहिमेची अंमलबजावणी झाल्याने बालकाला मातेकडून होणारा एचआयव्ही संसर्ग रोखण्यात यश मिळत आले आहे. या योजना राबविण्यापूर्वी कोणत्याही उपाय व उपचारांशिवाय होत असलेल्या प्रसूतीमुळे बालकाला संसर्ग होण्याचे प्रमाण अधिक होते. आता प्रभावी उपचार पद्धतीमुळे त्यामध्ये घट झाली आहे. आता सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये मातेपासून जन्माला येणाऱ्या बाळाला एचआयव्हीचा संसर्ग होऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून प्राधान्याने औषधोपचार केले जातात. अलीकडे मातांकडून देखील स्वतःहून पॉझिटिव्ह असल्याचे सांगण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच त्या माता औषधोपचाराला प्राधान्य देत आहेत. यामुळे होणाऱ्या बालकाला एचआयव्ही संसर्ग होण्यापासून वाचवण्यासाठी उपयोजना करणे अधिक सोपे झाले आहे. गेल्या तीन वर्षांत समुपदेशन, मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली जनजागृती यामुळे एचआयव्हीसह जगणाऱ्या मातांच्या बालकांना एचआयव्ही मुक्त करणे सोपे झाले आहे.

एचआयव्ही/एड्स निर्मूलनासाठी शासनस्तरावर मोठ्या प्रमाणात प्रयत्न होत आहेत. त्यामुळे मागील काही वर्षाच्या तुलनेत नवीन एचआयव्ही संसर्गितांचे प्रमाण कमी झाले आहे. २०३० पर्यंत एचआयव्ही संसर्गितांचे प्रमाण शून्यावर आणण्याचा संकल्प करण्यात आला आहे. यासाठी शासनाबरोबर समाजातील प्रत्येक घटकाचा सहभाग महत्त्वाचा आहे. तसेच खासगी रुग्णालयातील सहकार्य केल्यास एकही एचआयव्ही पॉझिटीव्ह बाळ जन्माला येणार नाही.

दीपा शिपूरकर, जिल्हा कार्यक्रम अधिकारी

एचआयव्हीमुक्त मुले

सन तपासणी झालेली मुले पॉझिटिव्ह बालके

२०१४-१५ ७४ ६

२०१५-१६ ६१ १

२०१६-१७ ५२ ०

२०१७-१८ ५३ ०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनपा शाळांसाठी सेंट्रल किचन

$
0
0

महापालिकेचा लोगो वापरावा...

कोल्हापूर टाइम्स टीम

येत्या शैक्षणिक वर्षापासून महिला बचत गटाऐवजी 'अक्षयपात्र फाऊंडेशन'तर्फे महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार देण्याचे प्रस्तावित आहे. फाऊंडेशनचे पदाधिकारी व महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये प्राथमिक चर्चा झाली आहे. पालिका प्रशासन सर्वांना विश्वासात घेऊन 'सेंट्रल किचन'ची संकल्पना राबविण्याच्या विचारात आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती व बचत गटांशी स्वतंत्रपणे चर्चा करणार आहे. महापालिकेच्या शाळेसाठी मंगळवार पेठेतील महाराणी ताराराणी विद्यालय येथे सेंट्रल किचन सुरू करण्याचा प्रस्ताव प्रशासनाच्या विचाराधीन आहे.

सेंट्रल किचन अंतर्गत एकाच संस्थेकडे शालेय पोषण आहार निर्मितीचे काम सोपविले जाणार आहे. यामुळे बचत गटांच्या माध्यमातून शालेय पोषण आहार तयार करणाऱ्या महिलांच्या रोजगाराविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होणार आहे. महापालिकेच्या ५९ शाळांमध्ये १० हजार विद्यार्थी शिकतात. शहरातील ४० महिला बचत गटामार्फत शालेय पोषण आहार अंतर्गत माध्यान्ह भोजन दिले जाते. बचत गटांना मध्यान्ह भोजन तयार करण्यासाठी ठेका दिला जातो. पहिली ते चौथीपर्यंत एका विद्यार्थ्यांसाठी चार रुपये तेरा पैसे तर पाचवी ते आठवीपर्यंतच्या प्रत्ये विद्यार्थ्यांसाठी सहा रुपये १८ पैसे या हिशेबानुसार बचत गटांना रक्कम वितरीत केली होती. शहराभागातील बचतगटांना तांदूळही पुरविले जाते. दरम्यान राज्य सरकारच्या आदेशानुसार महापालिकेच्या प्रशासकीय पातळीवरून सेंट्रल किचन सुरू करण्यासाठी हालचाली वेगावल्या आहेत.

'अक्षयपात्र...'तर्फे ठाणे आणि नाशिक जिल्ह्यात 'सेंट्रल किचन'चालविले जाते. फाऊंडेशनने महापालिका शाळेसाठी सेंट्रल किचन चालविण्याची तयारी दाखवली आहे. फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी कोल्हापुरात येऊन किचनसाठी आवश्यक जागेची पाहणी केली आहे. प्रशासनासोबत चर्चा केली आहे. किचनसाठी आवश्यक साधनसामग्री, साहित्य व इतर आवश्यक बाबी फाऊंडेशन करणार आहे. शिवाय 'सेंट्रल किचन'मध्ये महिला बचत गटातील काही महिलांना काम करण्याची संधी उपलब्ध केली जाणार आहे. पुढील आठवड्यात महिला बचत गटाच्या सदस्यासोबत स्वतंत्रपणे चर्चा होणार आहे.

आजच्या बैठकीत होणार निर्णय, आयुक्त साधणार संवाद

'सेंट्रल किचन'संदर्भात महापालिकेचे आयुक्त अभिजित चौधरी व प्राथमिक शिक्षण समितीचे पदाधिकारी व सदस्यांत गुरुवारी (ता.१३ ) चर्चा होणार आहे. तसेच आयुक्तांची महापालिका शाळेतील मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षांसोबत दुपारी दोन वाजता यशवंतराव चव्हण महाविद्यालय केएमसी येथे बैठक होणार आहे. या बैठकीला फाऊंडेशनचे पदाधिकारी सेंट्रल किचनची माहिती, आहार, बनविण्याची पद्धत याविषयी माहिती देणार आहेत. समिती सदस्य व मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षासोबतच्या बैठका या स्वतंत्र होणार आहेत.

शिक्षण समितीने मागवली बचतगटांची माहिती

महापालिकेच्या ५९ शाळेसाठी 'सेंट्रल किचन'स्थापण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. सध्या ४० बचत गटामार्फत या शाळांना माध्यान्ह भोजनाचा पुरवठा होता. एका बचतगटात आठ ते दहा महिला आहेत. शिवाय प्रत्येक शाळेत एक मदतनीस आहे. 'सेंट्रल किचन'मुळे बचत गटातील महिलांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. सेंट्रल किचनला सुरुवात झाल्यानंतर मदतनीसचे काम कायम आहे. मदतनीसाला कामावरुन कमी केले जाणार नाही. शिक्षण समितीने ५९ शाळांना पत्रे पाठवून महिला बचत गटाचे नाव, सहभागी सदस्य संख्या, प्रत्यक्ष काम करणाऱ्या महिला व मदतनीसांची माहिती संकलित केली जात आहे. शिवाय फाऊंडेशनने सेंट्रल किचनमध्ये काही महिलांना रोजगार उपलब्ध करुन देण्याची तयारी असल्याचे प्राथमिक बैठकीत स्पष्ट केल्याचे वृत्त आहे.

मुख्यमंत्री कार्यालयातील अतिरिक्त सचिवाकडून सेंट्रल किचनसंदर्भात पत्र आले आहे. आयुक्त हे प्राथमिक शिक्षण समिती सदस्य, मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती आणि महिला बचत गटांशी चर्चा करणार आहेत. सर्व घटकांशी चर्चा करुन सेंट्रल किचनबाबतचा निर्णय घेण्याचा प्रशासनाचा मानस आहे.

एस. के. यादव, प्रशासनाधिकारी शिक्षण समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिवाळी संपली आणि डाळ आली

$
0
0

निम्माच कोटा आल्याने वितरण करताना अडचणी

Bhimgonda.Desai@timesgroup.com

Tweet : @bhimgondaMT

कोल्हापूर : दिवाळी झाल्यानंतर तब्बल एक महिन्यांनी सरकारकडून चणा, उडीद डाळी सवलतीच्या दरात शिधापत्रिकाधारकांना वितरित करण्यासाठी उपलब्ध झाल्या आहेत. याचा निम्माच कोटा आल्याने स्वस्त धान्य दुकानदारांना सर्व पात्र लाभार्थींना डाळ देता येत नसल्याचे चित्र आहे. यामुळे डाळ न मिळालेले दुकानदारास जाब विचारत आहेत. परिणामी सातत्याने वादाचे प्रसंग निर्माण होत आहेत.

पुरवठा विभागाकडून अंत्योदय, प्राधान्य गटातील शिधापत्रिकाधारकांना स्वस्त धान्य दुकानातून गहू, तांदूळ मिळते. याशिवाय अन्न व नागरी पुरवठा विभागाने १७ ऑक्टोबर, २०१८ मध्ये दिवाळीपासून चणा, उडीद डाळ देण्याचा निर्णय घेतला. या आदेशानुसार प्रत्येक शिधापत्रिकाधारकास ३५ रुपयांस एक किलो चणा आणि उडीद असे दोन किलो डाळ नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे दिवाळीत मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र ती न आल्याने निराशा झाली.

महिन्यानंतर सरकारकडून वितरणाचा ठेका मिळालेल्या कंपनीकडून डाळींचे वितरण होत आहे. मात्र डाळीसाठी जितके पात्र शिधापत्रिकाधारक आहेत, तितक्या सर्व कुटुंबांना देण्यासाठीचा कोटा मिळालेला नाही. दोन्ही डाळींचा कोटा निम्माच मिळाल्याने कोणत्या दुकानदारास किती द्यायची, वाटपाचे कसे नियोजन करायचे त्याची डोकदुखी पुरवठा प्रशासनाची झाली आहे. प्रशासनाने आलेल्या कोट्यांतून जिल्ह्यातील सर्व दुकानदारांना समान वितरण करण्याचा प्रयत्न केला. दुकानदार जेवढी डाळ मिळाली, तितकी वाटून इतर लाभार्थीस नकार देत आहेत. त्यांना सरकारकडून कमी डाळ आल्याची नेमकी माहिती नसल्याने दुकानदारांवर आक्षेप घेत आहेत. जाणीवपूर्वक काहीजणांना डाळी देता, आम्हाला का देत नाही, अशी विचारणा करीत आहेत. परिणामी दुकानदारांना निरूत्तर व्हावे लागत आहे. अशा तक्रारी आल्यानंतर त्वरित जिल्हा पुरवठा प्रशासनाने सरकारकडे डाळींची अधिकची मागणी केली आहे. मागणी लालफितीत अडली आहे.

शिधापत्रिकाधारकांना दर महिन्याला उडीद, चणा डाळ देणार असल्याचे सरकारने ऑक्टोबरमध्ये जाहीर केले. दिवाळीपासून वितरणाला प्रारंभ होईल, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात महिन्यानंतर डाळी आल्या आहेत. तिही मागणी इतकी आलेली नाही. हा सरकारचा गलथानपणा आहे. त्याचा फटका सामान्य, गरिबांना होत आहे.

चंद्रकांत यादव, अध्यक्ष, रेशन बचाव समिती

नोव्हेंबर महिन्यात चणा, उडीद डाळी उपलब्ध झाल्या. त्या जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना वितरण करण्यात आल्या आहेत. पात्र सर्व शिधापत्रिकाधारकांना देण्यासाठी आणखी डाळींचा कोटा येणे गरजेचे आहे. त्याची मागणी सरकारकडे केली आहे. वाढीव कोटा उपलब्ध झाल्यानंतर वितरित केले जाईल.

अमित माळी, प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी

५५४०८७

एकूण शिधापत्रिकाधारक

५२२६७

अंत्योदय

५०००१६

प्राधान्य गट

३८४ मेट्रीक टन

चणा, उडीद डाळ उपलब्ध

११०४ मे. ट.

आवश्यक डाळ

१५७२

धान्य दुकानांची संख्या

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सा.रे.पाटील यांची जयंती

$
0
0

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा साने गुरुजी कथामाला समितीतर्फे सहकारमहर्षी व माजी आमदार सा. रे. पाटील यांची ९७ वी जयंती साजरी करण्यात आली. हसन देसाई यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाला अॅड. आर. एम. जाधव, मोहन देशमुख, शशिकांत पाटील, आर. जी. कुलकर्णी उपस्थित होते. केव्हीझ प्लाझा येथील कार्यालयात कार्यक्रम झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विकासआराखडा नियोजनबद्ध हवा

$
0
0

फोटो आहे...

म. टा. वृत्तसेवा, कसबा बावडा

' गावांचा नियोजनबद्ध विकास आराखडा तयार केला पाहिजे. धर्मादाय संस्था,सेवाभावी संस्था व लोकसहभागातून गावाचा विकास करावा. ग्रामीण भागात सुविधा अपुऱ्या असतील तर त्याचा ताण शहरावर पडतो. त्यासाठी गावांचा विकास झाला पाहिजे. वाढती लोकसंख्या विचारात घेऊन पुढील ३० वर्षाचा आराखडा तयार करून काम करा,' असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी केले.

ते करवीर तालुक्यातील वडणगे येथे उभारलेल्या पाणी शुद्धीकरण केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. नांदी कम्युनिटी वॉटरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दिव्या याचमनी अध्यक्षस्थानी होत्या. वडणगे ग्रामपंचायत व नांदी फाउंडेशन, हैदराबाद यांच्यातर्फे २० लाख रुपये खर्चून शुद्धीकरण केंद्र उभारले आहे.

मित्तल म्हणाले,'आरोग्यासाठी स्वच्छ पाण्याची गरज आहे. अनेक आजारांचे मुख्य कारण पाणी आहे. त्यामुळे ठिकठिकाणी पाणी शुद्धीकरण प्रकल्प गरजेचा आहे. नागरिकांनी स्वच्छ पाण्याला प्राधान्य द्यायला हवे. त्यादृष्टीने वडणगे येथील हा पाणी शुद्धीकरण प्रकल्प तालुक्यासाठी मॉडेल ठरावा.'

उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत अडसूळ म्हणाले, 'गटतट बाजूला ठेवून विकासासाठी सर्वांनी एकत्र व एकदिलाने काम करावे.' प्रकल्पाधिकारी सातपुते म्हणाले, 'जिल्ह्यातील हा चौथा व करवीर तालुक्यातील पहिला प्रकल्प आहे. यातून केवळ ३५ पैशांत एक लिटर, सात रुपयांत वीस लिटर शुद्ध पाणी मिळणार आहे.यावेळी बी.एच पाटील, राजेंद्र सूर्यवंशी, प्राचार्य महादेव नरके, सचिन चौगले यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी सर्जेराव नावले, संभाजी केसरकर यांचा सत्कार करण्यात आला. रांगोळी स्पर्धेतील विजेत्या कादंबरी पंडीत,पूनम बराले, संध्या पाटील यांना बक्षिसे देण्यात आली.'

याप्रसंगी जि. प. सदस्या कोमल मिसाळ, पंचायत समिती सदस्य इंद्रजित पाटील, मार्केट कमिटीचे माजी प्रशासकीय सदस्य बाजीराव पाटील, ग्रामसेवक पी. एस. बागुल आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन आर.बी. देवणे यांनी केले. आभार उपसरपंच दीपक व्हरगे यांनी मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाचनाने जीवन समृद्ध

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

'आजच्या सोशल मीडियाच्या युगात माणूस पुस्तक वाचनापासून दुरावत चाललेला आहे. भावना आणि विचारांची मनात जागृती करुन सामाजिक बांधिलकी जपायची असेल तर वाचनाशिवाय पर्याय नाही. वाचनाने जीवन समृद्ध बनते.'असे प्रतिपादन विवेकानंद कॉलेजच्या ग्रंथपाल डॉ. नीता पाटील यांनी केले.

विवेकानंद कॉलेजच्या वाङमय मंडळ व ग्रंथालयातर्फे आयोजित व्याख्यानात त्या बालत होत्या. प्राचार्य एस. वाय. होनगेकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्राचार्य होनगेकर यांनी 'विज्ञानवादी साहित्यातून झालेले सामाजिक बदल व साहित्यातून घडलेला माणूस यासंबंधी विचार मांडले. वाङमय मंडळ प्रमुख डॉ. दीपक तुपे यांनी प्रास्ताविक केले. नंदिनी काकडे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. विकास मस्के यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सत्ता भाजपची, आनंदोत्सव काँग्रेसचा

$
0
0

जिल्हा परिषदेत रंगले राजकीयनाट्य, सत्ताधारी घटकही सामील

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषदेत भारतीय जनता पक्ष, शिवसेना, ताराराणी आघाडी आवाडे गट यांची संयुक्त सत्ता आहे. सत्ताधारी भाजप आघाडी आणि विरोधी काँग्रेस, राष्ट्रवादीमध्ये कायम कुरघोडीचे राजकारण सुरू असते. तीन राज्यातील काँग्रेसच्या विजयानंतर जिल्हा परिषदेत काँग्रेस आघाडीच्या नगरसेवकांनी पेढे वाटप करत आनंदोत्सव साजरा केला. याप्रसंगी त्यांनी भाजप आघाडीतील सदस्यांना पेढा भरवत त्यामध्ये सहभागी करुन घेतले. मंगळवारी घडलेल्या या प्रकाराची जिल्हा परिषदेत चांगलीच चर्चा रंगली आहे.

मंगळवारी तीन राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकालाचे कल स्पष्ट झाले. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीचे सदस्य भगवान पाटील, विजय बोरगे व सत्ताधारी गटातील महिला व बालकल्याण समिती सभापती वंदना मगदूम यांचे दीर राजू मगदूम यांनी पेढे वाटप करत काँग्रेसच्या विजयाबद्दल आनंद व्यक्त केला. शिवसेनेचे सदस्य प्रविण यादव याप्रसंगी उपस्थित होते. मगदूम हे आवाडे समर्थक म्हणून ओळखले जातात.

जिल्हा परिषदेतील प्रवेशव्दारासमोर हे सगळे एकत्र जमले होते. त्याचदरम्यान भाजप आघाडीचे गटनेते अरुण इंगवले, विजय भोजे त्या ठिकाणी दाखल झाले. कॉँग्रेसच्या सदस्यांनी त्यांनाही पेढा भरवला. यावेळी सत्ताधारी व विरोधी सदस्यामध्ये शाब्दिक कोट्या झाल्या. राजकीय घडामोडीवरुन टीका टिप्पणीमुळे सगळे हास्यात रमले. काँग्रेस सदस्यांनी 'परिवर्तन सुरू झाले आहे, त्याला आता कुणी थोपवू शकणार नाही'अशा शब्दांत सत्ताधाऱ्यांचा चिमटा काढण्याचाही प्रयत्न केला. पेढे वाटपात आवाडे गट, शिवसेना सदस्य सहभागी झाल्याने राजकीय चर्चा रंगली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृषीपंप जोडणी

$
0
0

कोल्हापूर : राज्य सरकारच्या 'उच्चदाब वितरण प्रणाली'या योजनेव्दारे वीजजोडणीला सुरुवात झाली आहे. पहिल्या जोडणीचा मान कंदलगाव येथील शेतकरी पांडूरंग भाऊ रणदिवे यांना मिळाला. त्यांच्या कूपनलिकेतील तीन अश्वशक्तीच्या पंपासाठी महावितरणने २५ केव्हीए क्षमतेचे स्वतंत्र रोहित्र उभारुन जोडणी पूर्ण केली. अशा अनेक जोडण्या पूर्णत्वास जात असून शेतकऱ्यांन स्वतंत्र रोहित्र मिळत असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images