Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

मृत अनुराधाच्या पतीचा मृतदेह आढळला

0
0

मृत अनुराधाच्या पतीचा मृतदेह आढळला

लोगो : मंगळवेढा ऑनर किलिंग प्रकरण

म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर / सोलापूर

राज्यभर गाजलेल्या मंगळवेढा तालुक्यातील सलगर (बु) येथील अनुराधा बिराजदार ऑनर किलिंग प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. अनुराधाचा मृत्यू झाला होता, त्याच ठिकाणी श्रीशैल बिरादार याचाही मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली असून, घटनास्थळी गावातील नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. आपल्या जीवाला धोका असल्याची शंका उपस्थित करणाऱ्या श्रीशैलने आत्महत्या केली की, त्याची हत्या झाली, या बाबत उलट-सुलट चर्चा सुरू आहे.

सलगर ( ता. मंगळवेढा ) येथील अनुराधा बिराजदार ही कर्नाटकात वैद्यकीय शिक्षण घेत होती. तिने आपल्या वडिलांच्या शेतात सालगडी म्हणून काम करणाऱ्या श्रीशैल बिरादार याच्याशी विजापूर येथे नोंदणी विवाह पद्धतीने प्रेमविवाह केला होता. सालगड्याच्या मुलाबरोबर लग्न केल्याचा राग मनात धरून अनुराधाला सलगर येथे ४ ऑक्टोबर रोजी रात्री आपल्या शेतात आणून वडील विठ्ठल बिराजदार व सावत्र आई श्रीदेवी या दोघांनी विष पाजून ठार मारले होते. या प्रकरणी पोलिसांनी वडील विठ्ठल व आई श्रीदेवी बिराजदार यांना अटक केली आहे. अनुराधा बिराजदार हिच्या खुनात सहभागी असणाऱ्या सर्व मारेकऱ्यांना अटक करून कठोर शिक्षा व्हावी, अन्यथा मी आत्महत्या करणार असल्याचा इशारा श्रीशैल बिराजदार यांनी काही दिवसांपूर्वीच लेखी निवेदनाद्वारे दिला होता. या पार्श्वभूमीवर रविवारी सकाळी जिथे अनुराधा बिराजदार हिच्यावर अंत्यसंस्कार झाले, त्याच ठिकाणी तिचा पती श्रीशैल याचा मृतदेह आढळून आला आहे.

दरम्यान, श्रीशैल बिरादार यांनी आत्महत्या केली की, त्याची हत्या करण्यात आली या बाबतचा उलगडा अद्याप झालेला नाही. मात्र, घटनास्थळी मंगळवेढा पोलिस आले असून, पुढील तपास सुरू आहे. श्रीशैलच्या शवविच्छेदनाचा अहवालानंतरच मृत्यूचे कारण समजणार आहे. त्याच्या शरीरावर कोणत्याही प्रकारच्या जखमा आढळून आलेल्या नाहीत. या संपूर्ण प्रकाराबाबत पोलिस काहीच बोलण्यास तयार नाहीत.

....

धमक्या दिल्या जात असल्याची तक्रार

अनुराधाचा पती श्रीशैल याने आपल्या कुटुंबाला धमक्या मिळत असून, माझ्या जीवाला धोका असल्याची तक्रार पोलिसात दिली होती. दरम्यानच्या काळात श्रीशैल न्यायालयीन कामासाठी पोलिस बंदोबस्त घेऊन मंगळवेढ्यात येऊन गेला होता. मात्र, रविवारी पहाटे अचानक श्रीशैलचा मृतदेह सलगरमधील अनुराधाच्या घराजवळच आढळून आला. कर्नाटकात राहणार श्रीशैल बिराजदार सलगरमध्ये कसा आला?, हा प्रश्न अनुत्तरित आहे. श्रीशैल नेमका अनुराधाच्या घरापाशी कसा गेला, अनुराधाचा ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार झाले त्याच ठिकाणी त्याचा मृतदेह कसा सापडला?, असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. दरम्यान, श्रीशैल याची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असून, यात आपल्या पत्नीला कोणी मारले याचा खुलासा त्याने केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अनधिकृत फलकांवर कराडमध्ये होणार कारवाई

0
0

अनधिकृत फलकांवर कराडमध्ये होणार कारवाई

म. टा. वृत्तसेवा, कराड

कराड शहरातील विविध चौक व रस्त्यांवर लावण्यात आलेल्या फलकांमुळे शहराच्या सौंदर्यात बाधा निर्माण होऊन शहराचे विद्रुपीकरण झाले होते. त्या अनुषंगाने पालिकेच्या सर्वसाधारण सभेत शहरातील विनापरवाना व मुदत संपलेल्या फलकांवर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार मुख्याधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने शनिवारी सायंकाळी सुमारे २५ फलकांवर कारवाई केली आहे.

स्वच्छ भारत २०१८अंतर्गत कराड नगरपालिकेने देशपातळीवर नावलौकिक मिळवला असून, त्या धर्तीवर आता पालिकेचे स्वच्छ भारत २-१९ स्पर्धेची तयारी सुरू केली आहे. मात्र, या वेळी शहरातील विविध रस्त्यांवरती अनेक ठिकाणी व्यवसायिकांकडून विनापरवाना फलक लावण्यात येत आहेत. शिवाय या फलकांची मुदत संपल्यानंतरही ते काढले जात नाहीत. शहरात वाढदिवस व अन्य कारणांनी फलक लावण्याची जणू काही स्पर्धाच लागल्याने शहरातील रस्ते, फलकांनी झाकले जात आहेत. शहरातील रस्त्यांवरील झाडे व विजेच्या खांबावरही अशा प्रकारचे फलक लावण्यात आले आहेत. या बाबत नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत या संदर्भात चर्चा होऊन शहरातील सर्व अनधिकृत फलक काढण्या बाबत ठराव घेण्यात आला. या बाबतची मागणीही येथील शहरवासियांकडून करण्यात आली होती.

..........

तीन तलवारी जप्त

म. टा. वृत्तसेवा, कराड

विद्यानगर येथील सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर कारमधून तीन तलवारी घेऊन जाणाऱ्या दोन युवकांना तलवारीसह पोलिसांनी ताब्यात घेतले. शनिवारी, ८ रोजी रात्री पोलिसांनी ही कारवाई केली असून, घटनेची नोंद शहर पोलिसात झाली आहे. या मध्ये नितीन बाबासाहेब बारगजे (२७, रा. वाघजाईनगर, आंबेगाव खुर्द, पुणे) व सोमनाथ अशोक देवकुळे (२८, रा. कुंडल ता. पलुस, जि. सांगली) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

शहर पोलिसांना शनिवारी रात्री येथील विद्यानगर परीसरात काही युवक तलवार घेऊन येणार असल्याची खबर मिळाली होती, त्या नुसार पोलिसांनी विद्यानगर परिसरात सापळा रचला असता त्यांना एक कार संशयास्पदरीत्या फिरत असल्याचे आढळून आले. संबंधित कारमधील दोन युवकांकडे पोलिसांनी विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत कारची झडती घेतली, त्या वेळी कारमध्ये पोलिसांना तीन धारदार तलवारी आढळून आल्या. त्यानुसार कारमधील नितीन बारगजे व सोमनाथ देवकुळे या दोघांना ताब्यात घेतले. या दोघांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.

......

बनावट खत विक्रीतून फसवणूक

कराड :

कराड तालुक्यात गाळ व माती मिश्रित बोगस खत शेतकऱ्यांच्या माथी मारून त्यांची फसवणूक करणारे रॅकेट उघडकीस आले आहे. त्याचबरोबर पिकांच्या व उत्पन्न वाढीसाठी वापरले जाणारे टॉनिकही बनावट असल्याचे समोर आले आहे. या धडीतील बनावट खत जप्त करण्यात आले असून, या संपूर्ण रॅकेटचा शोध लाऊन त्यांनी वितरित केलेल्या व इतरत्र असलेल्या अन्य साठ्याचा शोध लावण्याचे आव्हान कृषी विभागासमोर आहे.

कराड तालुक्यातील काले व कळंत्रेवाडी येथे शनिवारी सायंकाळी उशीरा कृषी विभागाच्या पथकाने छापा टाकून ही कारवाई केली. या छाप्यात बनावट खतांची ५७० पोती जप्त करण्यात आली. माती, गाळ व मळीमिश्रित असणारे हे खत प्रमाणित नसल्याचे समोर आले आहे. या खताची तपासणी करण्यासाठी कोल्हापूर येथील कृषी विभागाच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे. जप्त केलेल्या खताची किंमत सुमारे २ लाख ३७ हजार इतकी आहे. बनावट खतांची आणखी पोती कळंत्रेवाडी येथील गोडावूनमध्ये आहेत. त्या पोत्यांची संख्या किती हे अद्याप स्पष्ट झाले नसून, संबंधित एजंट गोडावूनला कुलूप लावून पसार झाले आहेत. त्यामुळे त्यांची नावे आणि बनावट खत विक्री प्रकरणात त्यांच्यासोबत आणखी कोण कोण सहभागी आहेत, हे अद्याप समोर आलेले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मृत अनुराधाच्या पतीचा मृतदेह आढळला

0
0

सोलापूर : राज्यभर गाजलेल्या मंगळवेढा तालुक्यातील सलगर (बु) येथील अनुराधा बिराजदार ऑनर किलिंग प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. अनुराधाचा मृत्यू झाला होता, त्याच ठिकाणी श्रीशैल बिरादार याचाही मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली असून, घटनास्थळी गावातील नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. आपल्या जीवाला धोका असल्याची शंका उपस्थित करणाऱ्या श्रीशैलने आत्महत्या केली की, त्याची हत्या झाली, या बाबत उलट-सुलट चर्चा सुरू आहे. सलगर (ता. मंगळवेढा) येथील अनुराधा बिराजदार ही कर्नाटकात वैद्यकीय शिक्षण घेत होती. तिने आपल्या वडिलांच्या शेतात सालगडी म्हणून काम करणाऱ्या श्रीशैल बिरादार याच्याशी विजापूर येथे नोंदणी विवाह पद्धतीने प्रेमविवाह केला होता. सालगड्याच्या मुलाबरोबर लग्न केल्याचा राग मनात धरून अनुराधाला सलगर येथे ४ ऑक्टोबर रोजी रात्री आपल्या शेतात आणून वडील विठ्ठल बिराजदार व सावत्र आई श्रीदेवी या दोघांनी विष पाजून ठार मारले होते. या प्रकरणी पोलिसांनी वडील विठ्ठल व आई श्रीदेवी बिराजदार यांना अटक केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मृत अनुराधाच्या पतीचा मृतदेह आढळला

0
0

मृत अनुराधाच्या पतीचा मृतदेह आढळला

लोगो : मंगळवेढा ऑनर किलिंग प्रकरण

म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर / सोलापूर

राज्यभर गाजलेल्या मंगळवेढा तालुक्यातील सलगर (बु) येथील अनुराधा बिराजदार ऑनर किलिंग प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. अनुराधाचा मृत्यू झाला होता, त्याच ठिकाणी श्रीशैल बिरादार याचाही मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली असून, घटनास्थळी गावातील नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. आपल्या जीवाला धोका असल्याची शंका उपस्थित करणाऱ्या श्रीशैलने आत्महत्या केली की, त्याची हत्या झाली, या बाबत उलट-सुलट चर्चा सुरू आहे.

सलगर ( ता. मंगळवेढा ) येथील अनुराधा बिराजदार ही कर्नाटकात वैद्यकीय शिक्षण घेत होती. तिने आपल्या वडिलांच्या शेतात सालगडी म्हणून काम करणाऱ्या श्रीशैल बिरादार याच्याशी विजापूर येथे नोंदणी विवाह पद्धतीने प्रेमविवाह केला होता. सालगड्याच्या मुलाबरोबर लग्न केल्याचा राग मनात धरून अनुराधाला सलगर येथे ४ ऑक्टोबर रोजी रात्री आपल्या शेतात आणून वडील विठ्ठल बिराजदार व सावत्र आई श्रीदेवी या दोघांनी विष पाजून ठार मारले होते. या प्रकरणी पोलिसांनी वडील विठ्ठल व आई श्रीदेवी बिराजदार यांना अटक केली आहे. अनुराधा बिराजदार हिच्या खुनात सहभागी असणाऱ्या सर्व मारेकऱ्यांना अटक करून कठोर शिक्षा व्हावी, अन्यथा मी आत्महत्या करणार असल्याचा इशारा श्रीशैल बिराजदार यांनी काही दिवसांपूर्वीच लेखी निवेदनाद्वारे दिला होता. या पार्श्वभूमीवर रविवारी सकाळी जिथे अनुराधा बिराजदार हिच्यावर अंत्यसंस्कार झाले, त्याच ठिकाणी तिचा पती श्रीशैल याचा मृतदेह आढळून आला आहे.

दरम्यान, श्रीशैल बिरादार यांनी आत्महत्या केली की, त्याची हत्या करण्यात आली या बाबतचा उलगडा अद्याप झालेला नाही. मात्र, घटनास्थळी मंगळवेढा पोलिस आले असून, पुढील तपास सुरू आहे. श्रीशैलच्या शवविच्छेदनाचा अहवालानंतरच मृत्यूचे कारण समजणार आहे. त्याच्या शरीरावर कोणत्याही प्रकारच्या जखमा आढळून आलेल्या नाहीत. या संपूर्ण प्रकाराबाबत पोलिस काहीच बोलण्यास तयार नाहीत.

....

धमक्या दिल्या जात असल्याची तक्रार

अनुराधाचा पती श्रीशैल याने आपल्या कुटुंबाला धमक्या मिळत असून, माझ्या जीवाला धोका असल्याची तक्रार पोलिसात दिली होती. दरम्यानच्या काळात श्रीशैल न्यायालयीन कामासाठी पोलिस बंदोबस्त घेऊन मंगळवेढ्यात येऊन गेला होता. मात्र, रविवारी पहाटे अचानक श्रीशैलचा मृतदेह सलगरमधील अनुराधाच्या घराजवळच आढळून आला. कर्नाटकात राहणार श्रीशैल बिराजदार सलगरमध्ये कसा आला?, हा प्रश्न अनुत्तरित आहे. श्रीशैल नेमका अनुराधाच्या घरापाशी कसा गेला, अनुराधाचा ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार झाले त्याच ठिकाणी त्याचा मृतदेह कसा सापडला?, असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. दरम्यान, श्रीशैल याची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असून, यात आपल्या पत्नीला कोणी मारले याचा खुलासा त्याने केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उंब्रज पोलिस ठाण्यासमोर दारूविक्रीचा इशारा

0
0

उंब्रज पोलिस ठाण्यासमोर दारूविक्रीचा इशारा

म. टा. वृत्तसेवा, कराड

गेल्या काही दिवसांपासून शहापूर (ता. कराड) गावासह उंब्रज विभागात बेकायदा दारू विक्री सुरू आहे. या संदर्भात मुख्यमंत्री, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक, जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्यासह उंब्रज, मसूर विभागीय पोलिसांना वेळोवेळी निवेदनाद्वारे दारू बंदीची मागणी करण्यात आली होती. मात्र, संबंधितांवर सरकारी वरदहस्त असल्याने येथील दारूविक्री जोमात सुरू आहे. त्याच्या निषेधार्थ शहापूर येथील महिलांसह ग्रामस्थांनी थेट उंब्रज पोलिस ठाण्यासमोरच दारू विक्री करण्याचा निर्णय घेतला असून, हे दारू विक्रीचे आंदोलन आज, सोमवारी सकाळी अकरा वाजता करण्यात येणार आहे.

उंब्रज परिसरात पाच बेकायदा दारू व्यवसाय राजरोसपणे सुरू आहेत. सामाजिक स्वास्थ्यावर परिणाम करणाऱ्या दारूविक्रीमुळे विद्यार्थी, महिला व ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दारू बंदीसाठी स्थानिक पोलिसांकडे ग्रामस्थांचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. मात्र, पोलिसांकडून त्याची कोणत्याही प्रकारे दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे अखेर या बेकायदा दारू व्यवसायाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी महिलांनी पोलिस ठाण्यासमोर दारू विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापौर निवडीसाठी कडेकोट बंदोबस्त

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापौर निवडीत कमालीची चुरस निर्माण झाली आहे. सोमवारी (ता. १० डिसेंबर) होत असलेल्या निवडीवेळी महानगरपालिकेच्या परिसरात दीडशे पोलिस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. ओळखपत्र तपासूनच नगरसेवक, कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या इमारतीत प्रवेश दिला जाणार आहे. पोलिसांनी खबरदारी म्हणून महापालिकेसमोरील रस्त्यावरील वाहतूकही बंद करण्याचे नियोजन केले आहे.

महापौरपदासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि भाजप-ताराराणी आघाडीत काट्याची टक्कर सुरू आहे. दाखल्यांप्रकरणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी नगरसेवकांवर कारवाई झाल्यास कायदा व सुव्यवस्था बिघडेल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार हसन मुश्रीफ यांनी दिला आहे. दोन्ही आघाड्यांतील घोडेबाजार जोरात सुरू असून नगरसेवक फोडण्याची राजकारण सुरू आहे. यातून निवडीवेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बंदोबस्त ठेवला जाणार आहे. सोमवारी सकाळपासूनच महापालिकेसमोरील रस्त्यांवरील वाहतूक बंद केली जाईल. अतिरिक्त पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली करवीरचे पोलिस उपाधीक्षक सूरज गुरव, शाहूवाडी पोलिस उपाधीक्षक आर. आर. पाटील यांच्या नेतृत्वाखाली चार पोलिस निरीक्षक, १७ सहाय्यक निरीक्षक, उप निरीक्षक बंदोबस्ताला असतील. याशिवाय आरएसपीच्या तीन तुकड्या, दोन स्ट्रायकिंग फोर्ससह १५० पोलिस महापालिका परिसरात तैनात असतील.

असा आहे बंदोबस्त

अतिरिक्त अधीक्षक

डीवायएसपी

निरीक्षक

१७

सपोनि

१५०

पोलिस कर्मचारी

३ तुकड्या

आरएसपी

२ तुकड्या

स्टायकिंग फोर्स

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाढत्या आवकेमुळे भाज्यांची स्वस्ताई

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने भाज्या स्वस्त झाल्या आहेत. रविवारी बहुतांश फळभाज्यांचा सरासरी दर ४० रुपये किलो असून पालेभाज्यांचा दर प्रतिपेंढी १० रुपये झाला आहे. फक्त हरभरा पालेभाजीचा प्रतिकिलो दर ८० रुपयांवर टिकून राहिला.

दरवर्षी थंडीच्या कालावधीत, डिसेंबरपासून भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात वाढते. आवक वाढल्याने वांगी, दोडका, घेवडा, भेंडी, कारली यांचा दर प्रतिकिलो ४० रुपये इतका झाला होता. मटारचा दरही कमालीचा घसरला असून ४० ते ५० रुपये किलो अशी विक्री सुरू होती. वरण्याचा दर घसरला असून प्रतिकिलो ३० ते ४० रुपये दराने विक्री झाली. टोमॅटोचा दर प्रतिकिलो १० रुपयांवर स्थिर आहे. कोबी पाच ते दहा रुपयांना एक नग तर फ्लॉवरचा प्रतिगड्डा दर १० ते २० रुपये होता. मेथी, पोकळा, चाकवत, कांदा पात, शेपू, करडई, पालक या पालेभाज्यांची चांगली आवक झाली. पालेभाज्यांची दहा रुपयांना पेंढी अशी विक्री झाली. हरभरा पालेभाजीचा दर प्रतिकिलो ८० रुपये आहे. काही विक्रेत्यांनी दहा रुपयाला ढीग अशीही हरभरा भाजीची विक्री केली.

फळांचीही आवक वाढली आहे. सफरचंद, मोसंबी, संत्री, चिकू, अंजीर, बोरं ही फळे बाजारात आली असून प्रतिकिलो ४० ते ८० रुपयांनी विक्री होत आहे. संत्र्यांनाही ग्राहकांतून मागणी कायम राहिली.

फळभाज्यांचे दर (प्रतिकिलो रुपये)

वांगी ४० ते ५०

टोमॅटो १०

भेंडी ४०

ढबू ३० ते ४०

गवार ६० ते ८०

दोडका ४०

कारली ४०

वरणा ३० ते ४०

ओली मिरची ३० ते ४०

बटाटा २५ ते ३०

लसूण ३०

कांदा १० ते २०

फ्लॉवर १० ते २५ रुपये नग

कोबी ५ ते १० रुपये नग

पालेभाजी दर (पेंढी रुपयांत)

मेथी ८ ते १०

कांदा पात १०

कोथिंबीर ५ ते १०

पोकळा १०

पालक १०

शेपू १०

फळांचे दर (प्रतिकिलो रुपये)

सफरंचद ६० ते १८०

डाळिंब ४० ते ६०

संत्री ३० ते ८०

मोसंबी ३० ते ८०

बोरं २० ते ४०

केळी २० ते ६० (डझन)

जवारी केळी ३० ते ७० (डझन)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवैध धंद्यांविरोधात ‘निर्भय कोल्हापूर’ चळवळ उभारणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहर आणि जिल्ह्यात गुन्हेगारी टोळ्यांतील हाणामारी, अवैध धंदे, मटका, महिला छेडछाड, खंडणी उकळणे, रस्त्यावरच वेश्या व्यवसाय खुलेआम सुरू आहे. पोलिस यंत्रणेतील भ्रष्ट साखळीमुळे असे धंदे वाढत आहेत. याविरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे 'निर्भय कोल्हापूर' चळवळ उभारy[ जात आहे. चळवळी अंतर्गंत न्याय देण्यासाठी अवैध धंद्याचा त्रास होणाऱ्यांनी बिंदू चौकातील कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयात तक्रारी कराव्यात, असे आवाहन पक्षाचे जिल्हा सहसचिव गिरीश फोंडे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केले.

ते म्हणाले, 'पोलिस प्रशासनातील काहीजणांचे अवैध धंदेवाल्यांशी लागेबांधे आहेत. यामुळे पोलिसांकडून योग्य न्याय मिळत नाही. शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या ५० मीटर अंतरावरच वेश्या व्यवसाय चालतो. तावडे हॉटेल ते शिरोलीपर्यंत वेश्या रस्त्याकडेलाच थांबलेल्या असतात. यामुळे सामान्य कुटुंबातील महिला, नागरिकांना याचा त्रास होतो. खुलेआम वेश्या व्यवसायास पोलिसाचे पाठबळ असल्याचा संशय येत आहे. चोऱ्या, महिलांच्या छेडछाड प्रकरणे पोलिस ठाण्याबाहेरच तडजोड करणाऱ्या दलालांची संख्या वाढली आहे. अवैध व परवानाधारक दारूचे दुकाने गुन्हेगारांचे केंद्रे बनली आहेत. हुपरी पोलिस ठाण्याच्या आवारात २२ नोव्हेंबरला २०१८ रोजी न्याय मिळत नसल्याचे प्रविण शिंगे या तरूणाने आत्महत्येचा प्रयत्न केला. म्हणून पोलिसांच्या निष्क्रिय कामकाजाविरोधात चळवळ उभारणार आहे. या माध्यमातून पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांची संपत्तीचा लेखाजोखा जाहीर करण्यासाठीची मागणीही लावून धरणार आहे.'

---------------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महापौर, उपमहापौरपदाचा आज फैसला

0
0

दोन सिंगल फोटो

महापालिका लोगो

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पाच नगरसेवकांवर कोणत्याही क्षणी अपात्र होण्याची असलेली टांगती तलवार, शिवसेनेने घेतली तटस्थ भूमिका आणि फोडाफोडीच्या राजकारणाने घेतलेला वेग यामुळे महापौर, उपमहापौर निवडीच्या सत्तासंघर्षाने नाट्यमय वळण घेतले आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील व आमदार हसन मुश्रीफ यांच्यामध्ये झडलेल्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरींमुळे या निवडीत कमालीची ईर्ष्या निर्माण झाली आहे. आरोप प्रत्यारोपांमुळे सभागृह आणि सभागृहाबाहेर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याच्या शक्यतेने जिल्हा पोलिस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. सोमवारी (ता. १०) सकाळी ११ वाजता होणाऱ्या महापौर, उपमहापौर निवडीचा सत्तासंघर्ष टोकाला गेला असून महापौरपदी काँग्रेस आघाडीच्या सरिता मोरे की भाजप-ताराराणी आघाडीच्या जयश्री जाधव विराजमान होणार याचा फैसला होणार आहे.

महापौर, उपमहापौर निवडीमध्ये कमालीची ईर्ष्या आणि टोकाचा राजकीय संघर्ष दिसून येत आहे. आघाडीच्या पाच नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार असून त्याचा फायदा घेण्यासाठी भाजप-ताराराणीने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. अजिंक्य चव्हाण व अफजल पिरजादे पक्षांतरबंदी कायद्यामुळे दोन दिवसांपूर्वी अपात्र ठरल्याने शिवसेनेला सोबत घेऊन सत्तेचा सोपान पूर्ण करण्याचा प्रयत्न विरोधी आघाडीतून सुरू असतानाच सत्ताधारी गटातील नगरसेवकांना आघाडीत खेचण्यासाठी अर्थपूर्ण घडामोडी सुरू केल्या आहेत.

विरोधी आघाडीकडून सत्ता हस्तगत करण्यासाठी प्रयत्न सुरू असताना सत्ताधारी गटानेही आघाडीतील नाराजी दूर करत विरोधी गटातील नगरसेवक फोडण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. दोन्ही गटांतून अर्थपूर्ण व्यवहारावर भर दिला जात असल्याने नगरसेवकांचा भाव चांगलाच वधारला आहे. परिणामी शहरविकासाचा मुद्दा महापौर, उपमहापौर निवडीत गौण ठरला आहे. एका नगरसेवकासाठी दोन्हीकडून प्रत्येकी ६० लाखांची बोली लावली असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे. आपल्या आघाडीतील नगरसेवक विरोधी गटाच्या गळाला लागू नयेत, यासाठी नगरसेवकांना नजरकैदेत ठेवले असून त्यांच्यावर 'वॉच' ठेवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यन्वित ठेवली आहे. त्यामुळेच अनेक काठावरील नगरसेवकांचे फोन 'नॉट रिचेबल' मोडवर गेले आहेत. महापालिकेच्या सत्तेचा सोपान पार करण्यासाठी शिवसेनेची भूमिका किंगमेकरची ठरणार असल्याने त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न अखेरपर्यंत सुरू राहणार आहेत. यासाठी दोन्हींकडून वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

जात वैधता प्रमाणपत्र मुदतीत सादर न केलेल्या डॉ. संदीप नेजदार, दीपा मगदूम, वृषाली कदम, सचिन पाटील व संतोष गायकवाड यांचे पद अपात्र ठरण्याची शक्यता आहे. नगरविकास विभागाकडून निवडीच्या अखेरच्या क्षणापर्यंत अपात्रतेचा आदेश निघण्याची शक्यता असल्याने महापौर, उपमहापौर निवडणूक नाट्यमय वळणावर पोहोचली आहे. ऐनवेळी आदेश प्राप्त झाल्यास पीठासन अधिकारी अमन मित्तल यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील व राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या आरोप-प्रत्यारोपांमुळे निवडणुकीत टोकाची ईर्ष्या निर्माण झाली आहे. विरोधी आघाडीचे सदस्य महाबळेश्वर तर सत्ताधारी गटाचे सदस्य आंब्यात असून निवडीपूर्वी एक तास अगोदर त्यांचे कोल्हापुरात आगमन होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

.....................................

पॉइंटर

अश्विनी रामाणे मतदानापासून वंचित?

महापालिकेला येणार पोलिस छावणीचे स्वरुप

दोन्ही आघाडीतील नगरसेवक नजरकैदेत

उपमहापौरपदासाठी भूपाल शेटे, कमलाकर भोपळेंमध्ये लढत

हात उंचावून होणार मतदान

.............................................

चौकट

पक्षीय बलाबल

काँग्रेस : २९ (दोन अपक्ष)

राष्ट्रवादी काँग्रेस : १५

एकूण : ४४

पैकी दोन अपात्र, पाच अपात्रतेची शक्यता

उर्वरित : ३७

...........................

भाजप : १४ (एक अपक्ष)

ताराराणी आघाडी : १९

एकूण : ३३

पैकी : एक अपात्रतेची शक्यता

उर्वरित : ३२

...........................

शिवसेना : ४

एकूण : ८१

..........................

कोट

'महापालिकेत सत्ताधारी आघाडीचे बहुमत असल्याने महापौर आघाडीचाच होणार हे निश्चित आहे . शिवसेना सत्तेत पहिल्यापासून सहभागी असून आज होणाऱ्या निवडीमध्ये ते नेहमीप्रमाणे आमच्यासोबत राहणार आहेत. निवडीवर अपात्र नगरसेवकांचा कोणताही परिणाम होणार नाही.

आर. के. पोवार, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

.................

कोट

'केंद्र, राज्यात भाजपची सत्ता आहे. त्याचप्रमाणे महापालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी लोकशाही मार्गाने शेवटपर्यंत प्रयत्न सुरू राहतील. महापालिकेत सत्ता मिळल्यास केंद्र व राज्यातील सत्तेमुळे शहराचा विकास वेगाने होईल. शहरविकासासाठीच महापौरपदाची निवडणूक लढवली जात आहे.

विजय सूर्यवंशी, गटनेते, भाजप

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हिंदुस्थान जगात सर्वश्रेष्ठ

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'हिंदुस्थानात वन, निसर्ग, खनिज संपत्ती मोठी आहे. बुध्दीमान लोकही आहेत. म्हणूनच जगात हिंदुस्थान सर्वश्रेष्ठ आहे', असे मत शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी रविवारी व्यक्त केले.

येथील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे लक्षतीर्थ वसाहतीमधील आण्णासाहेब शिंदे शाळेजवळ झालेल्या व्याख्यानात ते बोलत होते. 'श्री शिवछत्रपतींचे ३२ मण सुवर्णसिंहासन प्रतिष्ठापना' व 'धारातीर्थ यात्रा' हा व्याख्यानाचा विषय होता.

भिडे म्हणाले, 'हिंदुस्थानात निसर्गसंपत्ती असतानाही पाण्याचे चांगले नियोजन करता आलेले नाही. हिंदूंमध्ये एकी नसल्याने परकीयांनी देशावर आक्रमण केले. अनेक वर्षे राज्य केले. यामुळे आपल्या लोकांना पारतंत्र्यांचे जीवन जगावे लागले. यापुढील काळात तरी प्रत्येकाने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे चरित्र, कार्याचा अभ्यास केला पाहिजे. राष्ट्रपुरूषांची उथळ जयंती साजरी करण्यापेक्षा त्यांचे विचार आत्मसात करणे काळाची गरज आहे. शिवविचार आचरणात आणले पाहिजे. घराघरांतील मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र वाचण्यास द्यावे, असे केल्यास महाराष्ट्र आणखी ताकदवान होईल.' यावेळी आशिष लोखंडे, प्रथमेश मोरे, दिलीप सपाटे, आदिनाथ गवळी, अवधूत चौगले, अभिजीत शिंदे आदी उपस्थित होते. दरम्यान, व्याख्यानादरम्यान कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी प्रचंड पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सत्यशोधकांचा वारसा’

0
0

कोल्हापूर : 'समाजाच्या जडणघडणीत सत्यशोधक समाजाचे योगदान अग्रकमाचे आहे. सत्यशोधकांच्या विचार कार्याचा वारसा पुढील पिढीने जपायला पाहिजे' असे प्रतिपादन प्रा. डॉ. विलास पोवार यांनी केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बिंदू चौकातील पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाच्या ६८व्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित समारंभात ते बोलत होते. प्रारंभी, महात्मा फुले व डॉ. आंबेडकर यांच्या पुतळयाना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. राजवैभव शोभा रामचंद्र यांनी प्रास्ताविक केले. सीमा पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमाला छाया पोवार, किरण गवळी, युवराज कदम, आरती रेडेकर, संघसेन जगतकर, रमेश वडणगेकर, कपिल मुळे, प्रशांत आंबी, अॅड. बाळासाहेब पोवार, शिवाजी माळी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काजू खरेदीदारांकडून आठ लाखांची फसवणूक

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गुजरात राज्यातील काजू खरेदीदारांनी येथील स्थानिक काजू प्रोसेसिंग युनीट चालकांची आठ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अमितकुमार उर्फ दीपक भरत पटेल (रा. गांधीनगर, गुजरात), सुमीत राजेश असनानी (रा. कोरल डी, प्लॉट नं. २०३, दुसरा मजला, पार्श्वनाथ अटलांटिस पार्क, बालाजी अरोरा मॉल, सुघड गांधीनगर, गुजरात) या दोन संशयितांविरोधात करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी सुजित दिलीप पाटील (वय ३२, रा. अमृतसिद्धी हॉलजवळ, कळंबा रोड) यांनी फिर्याद दिली.

फिर्यादी सुजीत पाटील यांचे काजू प्रोससिंग युनीट आहे. संशयित अमित पटेल, सुमीत असनानी यांनी पाटील यांच्याकडून चांगल्या प्रतिचा चार लाख ८६० रुपये किंमतीचा ५०० किलो काजू खरेदी केला. पण संशयितांनी पैसे दिले नाहीत. तसेच करवीर तालुक्यातील कांडगाव येथील अस्मिता योगेश ओटवकर यांच्याकडूनही दोघा संशयितांनी आठ लाख ९० लाख रुपयांचे काजू खरेदी केले होते. त्यापैकी त्यांना चार लाख ९० हजार रुपये दिले. मात्र उर्वरीत चार लाख रुपये दिलेले नाहीत. त्यामुळे ओटवकर यांनीही करवीर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी स्थानिक व्यापाऱ्यांची आठ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी पटेल व असनानी या संशयितांविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जयप्रभा स्टुडिओ महापालिकेने ताब्यात घ्यावा

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

'कोल्हापूर वासियांची व चित्रपट कलावंताची अस्मिता असलेला जयप्रभा स्टुडिओ महापालिकेने ताब्यात घ्यावा. त्यामोबदल्यात महापालिकेने लता मंगेशकर यांना पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी,' अशी मागणी महिला व बालकल्याण समिती सभापती सुरेखा शहा यांनी प्रशासनानकडे पत्रकाद्वारे केली आहे.

पत्रात म्हटले आहे, 'जयप्रभा स्टुडिओचे नाव बदलून चित्रपटतपस्वी भालजी पेंढारकर स्टडिओ नाव देवून त्यांचे स्मारक बनवण्याचा ठराव फेब्रुवारी २०१६ मध्ये झालेल्या महासभेत झाला होता. मात्र ठरावाची अंमलबजावणी प्रशासनाने केलेली नाही. प्रशासनाला ठरावाची अंमलबजा‌वणी करण्यासाठी तत्कालीन महापौरांना आदेश देण्याची विनंती केली होती. त्यानुसार महापौरांनी प्रशासनाला आदेशही दिले, पण त्यावर अद्याप कार्यवाही झालेली नाही. नोव्हेंबर २०१८ मध्ये झालेल्या सभेत जयप्रभा स्टुडिओची जागा चित्रपट व्यवसायाशिवाय अन्य कोणत्याही कारणासाठी वापर करू नये, तसेच बांधकामाला परवानगी न देता जागा आरक्षित करण्याचा ठराव केला. स्टुडिओची जागा तीन एकर असून पर्यायी जागा म्हणून मंगेशकर यांना द्यावी. स्टुडिओची जागा बंधिस्त करुन चित्रीकरणासाठी भाड्याने उपलब्ध करून द्यावी. त्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नातही भर पडेल, असेही पत्रकात नमूद केले आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थीनीचा वर्गात बेंचवर डोके आपटून खून

0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली

सांगलीतील शांतिनिकेतनमधील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातील विद्यार्थीनीचा वर्ग खोलीतच गळा दाबून, बेंचवर डोके आपटून खून करण्यात आल्याची घटना रविवारी घडली. इतर विद्यार्थ्यांनी त्या वर्ग खोलीत प्रवेश करण्यासाठी दरवाजा उघडताच एसवायबीएच्या वर्गात शिकणार्‍या वैशाली तानाजी नलावडे (वय २१) हिचा मृतदेह पडलेला दिसला. वैशालीचे लग्न झाले असून तिचे सासरचे नाव वैशाली रामदास मुळीक असे आहे. तिला दीड वर्षाचा मुलगाही असल्याची माहिती समोर आली आहे. संशयीत खूनी सीसीटिव्हीमध्ये कैद झाला असून त्याचे नावही निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

सांगलीतील शांतिनिकेतन लोकविद्यापीठात यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे केंद्र आहे. त्या केंद्रातील एसवायबीए वर्गात वैशाली नलावडे हिने माहेरच्या नावावर सप्टेंबर 2018 मध्ये प्रवेश घेतला आहे. प्रत्येक रविवारी या विद्यापीठाचे वर्ग भरतात. रविवारी सकाळी वैशालीला तिच्या पतीने शांतिनिकेतनमध्ये सोडले. त्यानंतर तो चिंचणीकडे आपल्या कामासाठी निघून गेला. ती आणि संशयीत दोघांनी एकत्र वर्ग खोल्या असलेल्या ठिकाणी प्रवेश केल्याचे सीसीटिव्हीवरुन दिसत आहे. तृतीय वर्ष बीए असा फलक असलेल्या वर्गात येणार्‍या अन्य विद्यार्थींनी आकरा वाजण्याच्या सुमारास त्या ठिकाणी आल्या. त्यावेळी त्या खोलीचा दरवाजा आतून बंद होता. दरवाजा ठोठावल्यानंतर आतूनच ‘ आमचे काम आहे, दहा मिनिटे थांबा ‘ असा आवाज आला. त्यामुळे संबधित मुली शेजारच्या वर्गात जावून बसल्या. काही वेळाने त्या विद्यार्थींनीनी वर्गात जाण्यासाठी दरवाजा मागे ढकलताच वैशाली नलावडे ही अस्ताव्यस्त आवस्थेत पडलेली असून तिचे तोंड रक्ताने माखलेले दिसले. त्यानंतर त्या परिसरात एकच खळबळ उडाली. त्या वर्गात वैशालीची पर्स, त्यामध्ये पॅनकार्ड, फोटो, एनर्जीफुडचे रिकामे डबे, किरकोळ रोकड, पेन असे साहित्य आढळले आहे.

मिरज तालुक्यातील मालेवाडी येथील राहणारी वैशाली नलावडे हिचा विवाह कसबे डिग्रज मधील रामदास मुळीक याच्याशी झाला होता. तिला दीड वर्षाचा मुलगा असून तिने मुक्त विद्यापीठात बीएला नुकताच प्रवेश घेतला होता. रविवारी तिचा खून झाल्याची घटना समोर आली. संशयीत व्यक्ती त्याच केंद्रात प्राध्यपक म्हणून कार्यरत असल्याची माहिती समोर येत आहे. संशयीताचे गावही कसबे डिग्रजच असून त्याने कोणत्या कारणावरुन वैशाली हिचा खून केला असावा, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नव्हते. पत्नीच्या खूनाची माहिती मिळाल्यानंतर रामदास मुळीक हा शांतिनिकेतन मध्ये धावत आला. त्यानंतर त्याने त्या ठिकाणी हंबरडा फोडला. त्याला अधिक त्रास होऊ लागल्याने पोलिसांनी त्याला गावी पाठविले.

वैशाली नलावडे हिचा मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेल्यानंतर सायंकाळच्या सुमारास शवविच्छेदनाची प्रक्रिया पार पडली. त्यावेळी वैशालीच्या माहेरकडचे नातेवाईक उपस्थित होते. पती मात्र त्या ठिकाणी आला नव्हता. डॉक्टरांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार संशयीताने वैशाली हिच्या तोंडावर ओढणी आवळून उर्वरित ओढणीनेच तिचा गळा करकचून आवळला. त्याच स्थितीत तिला जमीनीवर आपटले. या झटापटीत तिच्या डोक्याला पाठीमागे जखम झाली असल्याचेही समोर आले आहे. या घटनेची नोंद संजयनगर पोलिसांत झाली आहे. घटनास्थळी अप्पर पोलिस अधिक्षक शशिकांत बोराटे, पोलिस उपाधिक्षक अशोक वीरकर, पोलिस निरिक्षक अनिल तनपुरे, सहाय्यक पोलिस निरिक्षक काकासाहेब पाटील, उपनिरिक्षक दादासाहेब बुधावले, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलिस निरिक्षक अमित पाटील यांच्यासह मोठा पोलिस फौजफाटा उपस्थित झाला होता. शांतिनिकेतन परिसराला खासगी रखवालदारांचा गराडा असतानाही दिवसाढवळ्या विद्यार्थीनीच्या खूनाची घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. मुक्त विद्यापीठाचे विद्यार्थी म्हणून अनेकजण रविवारी त्या परिसरात येत असतात. दिवसभर त्या ठिकाणचे वर्ग मुक्तविद्यापीठाच्या स्वाधीन असतात. आकरा वाजता वर्ग सुरु होतात, याची माहिती असल्यानेच संशयीतांने दहा ते साडेदहा वाजण्याच्या सुमारास वैशालीचा खून करुन पोबारा केला असल्याची माहिती पुढे आली आहे. पाठीला सॅक लावून वैशालीबरोबर वर्गात आलेला संशयीत परतत असताना अगदी शांतपणे निघून गेल्याचेही समोर आले आहे.

खूनांच्या घटनांत सातत्य

सांगली आणि जिह्याच्या काही भागात सतत खूनाच्या घटना समोर येत आहेत. गुरुवारी दिवसाढवळ्या विश्रामबागमधील अपार्टमेंटमध्ये व्यापार्‍याच्या खूनाची घटना घडली होती. त्यानंतर रविवारी शांतिनिकेतन मध्येही दिवसाढवळ्याच विद्यार्थीनीचा खून करण्यात आल्याची घटना घडली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाभार्थ्यांनी पडताळणी न केल्यास धान्य होणार बंद

0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

शहरातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या शिधापत्रिकाधारक कुटुंबांनी सरकारमान्य रास्तभाव धान्य दुकानांमध्ये ई-पॉस मशिनद्वारे आपली पडताळणी करून घ्यावी, असे आवाहन पुरवठा निरिक्षण अधिकारी महादेव शिंदे यांनी केले आहे. ही पडताळणी प्रक्रिया पूर्ण न करणार्‍या कुटुंबांना धान्य दिले जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत एई पीडीएस प्रणालीमध्ये राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या शिधापत्रिकाधारक कुटुंबाचे ई-पॉस मशिनव्दारे लाभार्थी पडताळणी करण्याची मोहीम राबविण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्यानुसार हे आवाहन करण्यात आले आहे. सध्या राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या शिधापत्रिकाधारक कुटुंबातील कोणाही एका सदस्याची आधार पडताळणी झाल्यास त्या कुटुंबासाठीचे देय अन्नधान्य दिले जाते. परंतु भविष्यात शिधापत्रिकाधारक कुटुंबातील ज्या सदस्याचे आधारसिडींग झालेले आहे, लाभार्थी पडताळणी झाली आहे, अशा सदस्यांपुरतेच अन्नधान्य त्या कुटुंबाला दिले जाणार आहे. आधारसिडींग नसणार्‍या व लाभार्थी पडताळणी न झालेल्या सदस्यांचे अन्नधान्य बंद केले जाणार आहे.

शहरात सध्या राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या ३१ हजार ५४६ इतक्या शिधापत्रिका आहेत. त्यामध्ये १ लाख २१ हजार ९५९ सदस्य आहेत. त्यापैकी १ लाख ७ हजार ८४८ सदस्यांचे आधारसिडींग झालेले आहे. आधार सिडींग असलेल्या सर्व सदस्यांनी रास्तभाव धान्य दुकानाचे ई-पॉस मशिनव्दारे लाभार्थी पडताळणी करुन घेणे आवश्यक आहे. सदस्यांचे आधारसिडींग करण्याची सुविधा ई-पॉस मशिनमध्येच उपलब्ध असून इ केवायसी आधारसिडींग झाल्यानंतर तत्काळ पडताळणीही करता येते असे पुरवठा निरिक्षण अधिकारी महादेव शिंदे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वाहतूक आराखड्याचा फज्जा

0
0

प्रविण कांबळे, पेठवडगाव

पेठवडगाव (ता. हातकणंगले) शहरात प्रवेश करण्यासाठी लागणारे बाळासाहेब ठाकरे चौक, बिरदेव चौक, विजयसिंह यादव चौक, लाटवडे रोड, नगरपालिका चौक, वाठार नाका आदी सर्वच चौकांत नगरपरिषदेच्या भोंगळ कारभाराने, पोलिसांच्या दुर्लक्षाने वाहनधारक बेफामपणे मुख्य रस्त्यावर वाहने चालवत असल्याने जिल्हा पोलिस अधीक्षकांनी मंजूर केलेल्या वाहतूक आराखड्याचा चांगलाच फज्जा उडाला आहे.

वडगाव शहरासाठी नगरपरिषद व पोलिस प्रशासनाने तयार केलेल्या वाहतूक आराखड्याला तत्कालीन पोलिस अधिक्षक संजय मोहीते यांनी १८ जून २०१८ रोजी मंजूरी दिली. शहरवासीयांच्या सुरक्षिततेसाठी वाहतूक आराखड्याची तत्काळ अंमलबजावणी करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने मुख्य रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी क्रेनची व्यवस्था करून वाहतूक नियंत्रणासाठी नगरपरिषदेचे दोन वॉर्डन व पोलिस ठाण्याचे दोन कर्मचारी नेमण्यात आले. पद्मा रोडवर दक्षिणोत्तर सम-विषम तारखेला पार्किंग, नागरिकांच्या माहितीसाठी शहरातील एकेरी मार्गांचे डिजिटल फलक लावण्यात आले. त्यामुळे वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यास मदत झाली. मात्र नंतर काही महिन्यांनी वाहतूक आराखड्याचा फज्जा उडून वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली. मुख्य रस्त्यावर वाढती व बेफाम वाहनांनी छोट्या मोठ्या अपघाताच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली.

बाळासाहेब ठाकरे (हजारे घर) चौक

कोल्हापूरकडून शहरात दाखल होताना लागणारा प्रमुख चौक म्हणजे बाळासाहेब ठाकरे चौक. येथे अंबप, कोल्हापूरसह एस. टी. स्टँड आणि शहरातील चार रस्ते एकत्र येतात. येथे वाहनधारकांना अंदाज येत नसल्याने सर्रास अपघात घडतात. त्यामुळे हा चौक मोठ्या प्रमाणात धोकादायक बनला आहे.

बिरदेव चौक

बिरदेव चौक हा मध्यवर्ती असून येथे वडाप रिक्षा तसेच दुकानांच्या दारांत अस्ताव्यस्त लावलेली वाहने, शहरातून येणाऱ्या-जाणाऱ्या मोठ्या वाहनांनी वाहतुकीचा चांगलाच बोजवारा उडाला आहे.

नगरपालिका चौक

शहरातील मुख्य ठिकाण असलेल्या नगरपालिका चौकात चोहोबाजूंनी येणाऱ्या वाहनांची संख्या जास्त असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होते. सोमवारी आठवडी बाजारादिवशी मोठ्या प्रमाणात रहदारी असल्याने चक्काजामसारखी स्थिती निर्माण होते. या परिसरात नगरपरिषद कार्यालय असूनही प्रशासनाने योग्य उपाययोजना केलेल्या नाहीत.

वाठार नाका

शहराबाहेर वाठारकडच्या रस्त्यावरील या वळणावर शहरातून, वाठारकडून येणाऱ्या-जाणाऱ्या अवजड वाहनांची संख्या जास्त असते. त्यामुळे या वळणावर नेहमीच वाहतूक ठप्प झालेली दिसून येते. हा चौक अनेक अपघातांना निमंत्रण देणारा ठरत आहे. या चौकात होत असलेल्या वाढत्या अपघाताच्या संख्येने शहरवासीयांची सुरक्षितता धोक्यात असून नगरपरिषद व पोलिस प्रशासनाने या गंभीर घटनेकडे लक्ष देणे गरजेचे बनले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक

पुणे-बंगळुरू महामार्गावरुन वाठारमधून व सांगली जिल्ह्यातील अनेक वाहने या चौकातून शहरात दाखल होत असतात. अवजड वाहनांची संख्या जास्त असल्याने या चौकात मोठ्या प्रमाणात गर्दी नेहमीच होत असते.

काय होता वाहतूक आराखडा ?

वाहतूक आराखड्यानुसार डॉ. आंबेडकर पुतळा ते वाठार नाका (आंबा रोड) या रोडवर पश्चिमेकडून पूर्वेस तसेच हातकणंगले नाका, बिरदेव चौक,बाळासाहेब ठाकरे चौक ते कोल्हापूर नाका या रोडवर पूर्वेकडून पश्चिमेस आणि दुचाकी व तीन चाकी वाहने वगळून इतर वाहने हातकणंगले नाक्यावरून कोल्हापूर-वाठारकडे जाण्यासाठी एस.टी स्टॅण्ड पाठीमागून बिरदेव चौक, कोल्हापूर नाकामार्गे कोल्हापूर तर शिवाजी पुतळा मार्गे वाठार, आष्टा-तासगावला जाणारी वाहने बसस्थानकांच्या पाठीमागून बिरदेव चौक, पालिका चौक, डॉ आंबेडकर पुतळा मार्गे रस्ता एकेरी वाहतूक व प्रवेश बंद मार्ग करण्यात आले होते. पद्मा रोड व बाजारपेठ पार्किंग करण्यासह जड वाहनांस नो-पार्किंग करण्यात आले आहे. बाजारपेठ भागात आबांचा पुतळा ते चावडीपर्यंत सम तारखेस मुख्य रोडचे दक्षिण बाजूस,विषम तारखेस रोडचे उत्तर बाजूस वाहन पार्किंग असे नियोजन करण्यात आले होते.

जनावरांच्या बाजारादिवशी कोलमडते यंत्रणा

शहरात सोमवारी भरणारा आठवडी बाजार व जनावरांचा बाजार हा चार ते पाच जिल्ह्यांत प्रसिद्ध आहे. बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी होते. वाहतुकीचे नियंत्रण करताना पोलिसांची दमछाक होत असते. त्यामुळे बाजारादिवशी नगरपरिषद, पोलिसांसह वडगाव बाजार समितीने वाहतूक व्यवस्था राबवण्यासाठी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे.

शहरात वाहतूकीचे नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. वाहनधारकांना शिस्त लावण्यासाठी पुन्हा क्रेनची व्यवस्था करावी. रस्त्यावर बेफिकीरपणे लावलेल्या वाहनांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई सुरु केल्यास वाहतुकीतील बेशिस्तीला आळा बसेल.

- आनंदा म्हेत्रस, माजी उपनगराध्यक्ष

शहराच्या वाहतूकीला शिस्त लावण्यासाठी नगरपरिषद व पोलिस प्रशासनाने वाहतूक आराखडा तयार केला. नगरपरिषदेचे चार कर्मचारी यासाठी कार्यरत आहेत. वाहतुकीचे नियंत्रण करण्यासाठी पोलिसांनी आणखी कर्मचारी वाढवणे गरजे आहे. शहरवासीयांनी स्वयंशिस्त लावून वाहतुकीचे नियम पाळल्यास अडचणी कमी होतील.

- अतुल पाटील, मुख्याधिकारी वडगाव नगरपरिषद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हलकर्णीत आज पेन्शनरांची बैठक

0
0

चंदगड : हलकर्णी (ता. चंदगड) येथे मुंबई गिरणी कामगार व इपीएस ९५च्या सर्व पेन्शनरांची मंगळवारी (ता. ११ डिसेंबर) दुपारी बारा वाजता दौलत कारखाना गणपती मंदिर येथे बैठक होणार आहे. वाढीव पेन्शनबद्दल झालेल्या वृत्ताची माहिती व गिरणी कामगारांनी मुंबईत ज्या कंपनीमध्ये काम केले आहे, त्या जागेवरच घराचा आराखडा मिळण्याच्या अंतिम निर्णयाबद्धल माहिती घेण्यासाठी उपस्थित राहावे. २०१४ पासून रिटायर्ड झालेल्या पेन्शनधारकांनी वाढीव पेन्शनबद्दल फॉर्म भरावेत यांसह अन्य विषयांवर बैठकीमध्ये चर्चा होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्योजक रोखणार महामार्ग

0
0

म. टा. वृत्तसेवा, हातकणंगले

'हातकणंगलेतील लक्ष्मी औद्योगिक वसाहतीमधील उद्योजकांच्यावतीने वीज दरवाढीच्या निषेधार्थ शुक्रवारी (ता. १४ डिसेंबर) सरकारविरोधात रस्ता रोको आंदोलन करणार आहे. पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग रोखण्यासाठी उद्योजकांसह सर्व कर्मचारी रस्त्यावर येणार आहेत. तत्पूर्वी सध्या काळ्या फिती लावून कामकाज चालू केले आहे,' अशी माहिती 'सिल्मा'चे अध्यक्ष उद्योजक शितल केटकाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

दरम्यान, आज उद्योजकांनी काळे झेडे घेऊन वीज दरवाढीचा निषेध नोंदविला. उद्योजक संजय पाटील, सुधीर गोलगंडे, मिलिंद पाटील, सुहास देशपांडे, गणेश भांबे, स्लिमाचे सचिव अजय मनवाडे यांच्यासह अन्य उद्योजक उपस्थित होते. किमान तीन वर्ष वीज आकारणी स्थिर असावी, क्रॉस सबसिडी रद्द व्हावी, १८ टक्के वीज दरवाढ तत्काळ बंद करावी, वीज दर आकारणी करताना उद्योगधंदात मतभेद करू नये यांसह अन्य मागण्या करण्यात आल्या.

केटकाळे म्हणाले, 'राज्य सरकार स्टार्ट अप इंडिया, मेक इन इंडियासारखे उपक्रम राबवून उद्योजकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक करत आहे. उद्योगधंदे वाढवून रोजगार निर्मितीसाठी प्रोत्साहन देण्याऐवजी वीज दरवाढ केल्यामुळे सर्व उद्योगधंदे अडचणीत आले आहेत. प्रत्येक राज्यात वीजेचे दर वेगवेगळे आहेत. उद्योगधंद्यात वेगवेगळ्या दराने वीजेची आकारणी केली जाते. फक्त महाराष्ट्रात उद्योजक प्रामाणिकपणे काम करतात. त्यांना सरकार वाढीव वीजेची दर आकारणी करत आहे. त्यामुळे चांगले व व्यवस्थित असलेले उद्योगधंदे मोडून पडण्याची भीती निर्माण झाली आहे. लक्ष्मी औद्योगिक वसाहतीमध्ये कोट्यवधी रुपये गुंतवून उद्योजकांनी उद्योग उभे केले. वीज वितरण कंपनीने अचानक सुमारे १८ ते २० टक्के दरवाढ केली आहे. ती उद्योगांना न परवडणारी असून भविष्यात याचे दु:ष्परिणाम भोगायला मिळतील. सध्याचे सरकार फक्त पोकळ घोषणाबाजी करून फसवणूक करीत आहे. यामुळे आम्हाला रस्तावर उतरुन आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टस्करचा मोर्चाकोदे खोऱ्याकडे

0
0

म. टा. वृत्तसेवा, गगनबावडा

गेले चार दिवस असळज-पळसंबे परिसरात धुमाकूळ घातलेल्या हत्तीने सोमवारी आपला मोर्चा कोदे खोऱ्याकडे वळविला. आंबेवाडी येथे त्याने काही शेतकऱ्यांच्या ऊसाचे नुकसान केले.

काल रविवारी रात्री आठच्या सुमारास टस्कर पळसंबे जंगलातून बाहेर पडला. शेतवडीत न उतरता तो रात्री डोंगरातून पलिकडील कोदे खोऱ्यात उतरला. तेथे त्याने काही शेतकऱ्यांच्या भाताच्या गंजी उद्ध्वस्त केल्या. त्यानंतर भीमराव बापू म्हेतर, आकाराम काशीराम डाकवे, आनंदा शामराव पाटील ( कोदेपैकी आंबेवाडी ) यांच्या उसाचे नुकसान केले. सायंकाळच्या वेळेत तो पुन्हा जंगलात गेला. आता तो पुन्हा जांभळी खोऱ्यातील कोलीक - गोठणे परिसरात उतरण्याची शक्यता आहे. परिसरातील नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन वनरक्षक विश्वास पाटील यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावर्डे दुमालातील सराफी दुकान फोडले

0
0

म. टा. वृत्तसेवा, कुडित्रे

करवीर तालुक्यातील सावर्डे दुमाला येथील भावेश्वरी ज्वेलर्स या दुकानात अज्ञात चोरट्यांनी रविवारी रात्री पावणेदोनच्या सुमारास चोरीचा प्रयत्न केला. सोमवारी सकाळी ६ वाजता ही घटना उघडकीस आली. चोरट्यांनी सुमारे १५ हजार रुपयांचा माल लंपास केला. या घटनेची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली आहे.

सावर्डे दुमाला येथे मुख्य रस्त्यावर भावेश्वरी ज्वेलर्स आहे. सोमवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास दुकानाची कुलूपे तोडून टाकल्याचे गाळा मालक व कामगारांच्या निदर्शनास आले. त्यांनी दुकान मालक अजित पाटील यांना याबाबत कल्पना दिली. त्यानंतर अजित पाटील व पोलिस पाटील पंकज गुरव यांनी करवीर पोलिसात वर्दी दिली. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केला. रविवारी रात्री पावणेदोनच्या सुमारास चोरट्यांनी सायरन असेल या अंदाजाने दुकानाबाहेरील टीव्ही व टेलिफोनच्या वायर तोडल्या. कुलूप तोडून आत प्रवेश केला. दुकानात येताच चोरट्यांनी एक सीसीटीव्ही बंद केला. दुसरा सीसीटीव्ही त्यांच्या लक्षात न आल्याने ते सीसीटीव्हीत कैद झाले. दुकानातील मुख्य लॉकर फोडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण, अपयश आल्याने बाहेरच्या ड्रॉव्हरमधील चांदींच्या सुमारे ३५ अंगठ्या, पैंजण, मुगवट आदी सुमारे १५ हजारांचा माल लंपास केला.

युवकांची टोळी....

सीसीटीव्ही फुटेजमध्ये दुकानात चोरी करायला घुसलेले चार व शटरबाहेर असलेले दोन चोरटे हे १८ ते ३० वयोगटातील असल्याचे स्पष्टपणे दिसते.

फोटो

सावर्डे दुमाला येथील भावेश्वरी ज्वेलर्समध्ये चोरी करताना दिसणारे चोरटे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images