Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

मतदानापासून रोखण्याचा अधिकार कोर्टालाच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

' महापालिकेच्या सोमवारी (ता. १०) होणाऱ्या महापौर निवडीसाठी सर्व नगरसेवकांना उपस्थित राहण्याची नोटीस प्रशासनाने दिली आहे. या नोटिशीमुळे सर्व नगरसेवकांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला असून त्यांना कोर्टाशिवाय मतदानापासून कोणीही रोखू शकत नाही. भाजपने सत्तेचा गैरवापर करुन जातवैधता प्रमाणपत्र वेळेत सादर न केलेल्या पाच नगरसेवकांना अपात्र ठरवले, तरी ते सभेला उपस्थित राहणार आहेत', अशी माहिती राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकार बैठकीत दिली. मतदान प्रक्रियेपासून त्यांना रोखण्याचा प्रयत्न केल्यास निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेला पालकमंत्री चंद्रकांत पाटील जबाबदार राहतील,' असा इशाराही त्यांनी दिला.

महापौर निवडीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीचे बहुमत असताना नगरसेवकांना अपात्र ठरवण्याची राजकीय खेळी करत भाजप लोकशाहीची क्रूर थट्टा करत असल्याचा निषेध करत आमदार मुश्रीफ म्हणाले,'महापौर निवडीच्या पूर्वसंध्येला जातवैधता प्रमाणपत्र मुदतीत सादर न केलेल्या पाच नगरसेवकांना व पक्षाचा व्हीप डावललेल्या दोन नगरसेवकांना मतदानापासून वंचित ठेवण्याची फाईल बाहेर काढली आहे. अपात्रतेची टांगती तलवार असलेल्यांमध्ये नगरसेवकांमध्ये चार काँग्रेस-राष्ट्रवादीचे तर एका भाजपच्या नगरसेवकाचा समावेश आहे. प्रमाणपत्र सादर करण्यासाठी काढलेल्या अध्यादेशामध्ये शब्दच्छल करुन नगरसेवकांना मतदानापासून वंचित ठेवण्याची खेळी सुरू आहे. नगराध्यक्ष, पंचायत समिती सभापती किंवा सरपंचावर अविश्वास ठराव दाखल केला जातो. त्यासाठी सदस्यांना सभेची नोटीस पाठवली जाते. मात्र बदनामी नको म्हणून संबंधित व्यक्ती राजीनामा देते, तरीही सदस्यांना नोटीस दिल्यामुळे सभा घ्यावी लागते. त्याचप्रमाणे महापौर निवडीच्या सभेला उपस्थित राहण्याची नोटीस प्रशासनाने यापूर्वीच नगरसेवकांना पाठवली असल्यामुळे त्यांना मतदानापासून कोर्टाशिवाय कोणीही रोखू शकत नाही.'

गुरुवारी भाजप-ताराराणी आघाडीची बैठक घेऊन फोडाफोडीचे राजकारण न करता लोकशाही मार्गाने येणाऱ्यांचे स्वागत करा असा सल्ला देणाऱ्या पालकमंत्री पाटील यांना नोबेल पुरस्कार दावा असा टोला लागवताना मुश्रीफ म्हणाले, 'लोकशाहीमध्ये जय-पराजय मान्य असतात. पण अशा पद्धतीने सत्ता बळकवणे ही लोकशाहीची क्रूर थट्टाच आहे. या घटनेचे गंभीर परिणाम होतील. नगरसेवक फोडण्यासाठी प्रयत्न जरुर करावेत, पण त्यासाठी कायद्याच्या पायमल्ली करणे उचित नाही. नगरसेवकांना मतदानापासून कोणताही अध्यादेश रोखू शकत नाही. अधिकारी कायद्याची पायमल्ली करीत सत्ताधाऱ्यांच्या हातातील बाहुले बनले आहेत. सत्ता येते व जाते, पण अधिकाऱ्यांनी कायद्याची पायमल्ली केल्यास त्यांचाही योग्यवेळी समाचार घेतला जाईल.' पिठासन अधिकारी अमन मित्तल यांनी सरकारी आदेशाला घाबरायची गरज नसल्याचा दावाही त्यांनी केला.

पत्रकार बैठकीस काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, सुनील पाटील, गणी आजरेकर, डॉ. संदीप नेजदार, अर्जुन माने, दुर्वास कदम, अफजल पिरजादे, माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, आदिल फरास यांच्यासह आजी-माजी नगरसेवक उपस्थित होते.

..........

चौकट

उमेदवार निवडताना धर्मसंकट

'महापौरपदाचा उमेदवार निवडताना इच्छुकांची संख्या जास्त असल्याने धर्मसंकट निर्माण होते. शहराध्यक्ष राजू लाटकर सेवादलाचे कार्यकर्ते आणि निष्ठावंत कार्यकर्ते असल्याने त्यांची समजूत काढली. त्याचप्रमाणे माधवी गवंडी, अनुराधा खेडकर, मेगा पाटील इच्छुक होते. खेडकरांनाही शब्द दिला होता. त्यांची सर्वांनी समजूत काढली असून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी एकसंध आहे. मात्र पिरजादे व चव्हाण यांना धडा शिकवण्यासाठी त्यांचे पद अवैध ठरवण्यासाठी विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली होती, असेही मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.

...................

याचिका मागे

स्थायी समिती निवडीदरम्यान पक्षाचे नगरसेवक अफजल पिरजादे व अजिंक्य चव्हाण यांनी व्हीप डावलल्याबद्दल अपात्र करण्यासाठी आठ महिन्यापूर्वी विभागीय आयुक्तांकडे गटनेते सुनील पाटील यांनी याचिका दाखल केली होती. याचिकेवर सहा महिन्यात निर्णय होणे अपेक्षीत असताना अद्याप निर्णय झालेला नाही. मात्र महापौर निवडीदरम्यान दोघांना अपात्र ठरवण्यासाठी आयुक्त रजेवर असताना त्यांना हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. मात्र पाटील यांनी शुक्रवारी सकाळी याचिका मागे घेतली असल्याने, ते मतदानासाठी अपात्र ठरु शकत नसल्याचा दावा प्रा. पाटील यांनी केला.

...................................................

कोल्हापूरसाठी निर्णय घेता येणार नाही : प्रा. पाटील

'महाराष्ट्र म्युनिसिपल कौन्सिल, नगरपंचायत व इंडस्ट्रियल टाउनशिप अॅक्ट १९६५ कलम ९ 'अ' मध्ये बदल करुन जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी एक वर्षाची मुदत दिली. तसेच अध्यादेश काढल्यापासून १५ दिवसांचा अवधीही दिला. त्याबाबतची अधिसूचना काढण्यात आली. अधिवेशनामध्ये अधिसूचनेचे कायद्यात रुपातंर केले. अधिसूचना निघाल्यानंतर राज्यातील २०० ते ३०० स्थानिक स्वराज्य संस्थांनी राज्य सरकारकडे मार्गदर्शन मागवले. मात्र अधिसूचनेचे कायद्यात रुपांतर झाल्याने या पत्रास कोणताही अर्थ राहिला नाही. त्यामुळे निर्णय घ्यायचा असल्यास तो संपूर्ण राज्यासाठी घ्यावा लागेल, फक्त कोल्हापूर महापालिकेसाठी घेता येणार नाही', असे प्रा. जयंत पाटील यांनी सांगितले.'

प्रा. पाटील म्हणाले, 'जात वैधता प्रमाणपत्राबाबत विधानपरिषदेच्या सभागृहात उपस्थित झाल्यानंतर अध्यादेश निघाल्यापासून प्रमाणपत्र सादर करण्यासाठी १५ दिवसांची मुदत असल्याचे नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांनी स्पष्ट केले. विधानपरिषदेच्या इतिवृत्तामध्ये त्याबाबतची नोंद झाली आहे. गुरूवारी अचानक कोल्हापूरच्या पाच नगरसेवकांच्या अपात्रतेबाबत आयुक्तांनी पाठविलेल्या पत्राच्या आधारे तयार केलेली फाईल विधी व न्याय विभागाकडे पाठविण्यात आली. कायदा होण्यापूर्वी आयुक्तांनी या पाच नगरसेवकांबाबत निर्णय घेण्याबाबत पत्रव्यवहार केला होता. तसा राज्यभरातील सर्व नगरपालिका व महापालिकेच्या प्रशासन प्रमुखांनी पत्रव्यवहार केले होते. आता कायदा झाल्याने या पत्रास काही अर्थ नाही. त्यामुळे कोल्हापूर महापालिकेसाठी स्वतंत्र निर्णय घेता येणार नाही. गांधीनगरप्रकरणी नगरसचिव मनीषा म्हैसकर बचावल्या होत्या, मात्र, आता मुख्यमंत्र्याच्या अपरोक्ष नगरविकास विभागाने नगरसेवक अपात्रतेप्रश्नी कोणताही अध्यादेश काढल्यास म्हैसकर यांना न्यायालयात खेचले जाईल. नगरविकास विभागाने अध्यादेश काढल्यास सोमवारी सकाळी ११ वाजता कोर्टात याचिका दाखल केली जाईल, तशी प्रक्रियाही सुरू केली आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कॉ. पानसरे हत्येचा बेळगावात कट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येचा कट बेळगावात रचला. कोल्हापुरात त्यांच्यावर गोळ्या झाडल्यानंतर पिस्तूल नष्ट करण्यासाठी टेंबलाईवाडी टेकडीवर कटातील सहभागींची भेट झाली. तेथून पिस्तूल आणि हत्येवेळी वापरलेली दुचाकी नष्ट करण्याचे ठरले. यात या प्रकरणातील सहावा संशयित वासुदेव भगवान सूर्यवंशी (वय २९ रा. साखळी, ता. यावल. जि. जळगाव) आणि भारत उर्फ भरत जयवंत कुरणे (३७, रा. धर्मवीर संभाजी गल्ली, महाद्वार रोड, बेळगाव) यांचा महत्त्वाचा सहभाग होता. संशयितांचे बेळगाव ते जळगावपर्यंतचे कनेक्शन उघड होत आहे. तपास अंतिम टप्प्यात आहे,' अशी माहिती जिल्हा सरकारी वकील शिवाजीराव राणे यांनी शुक्रवारी युक्तिवादावेळी दिली. त्यामुळे पानसरे हत्येचा तपास महत्त्वाच्या टप्प्यावर आल्याचे मानले जात आहे.

राणे यांनी युक्तिवादात सांगितले की, पानसरे हत्या प्रकरणात वीरेंद्रसिंह तावडे क्रमांक दोनचा संशयित आहे. त्याने बेळगांव जिल्ह्यात बॉम्बस्फोटाचे प्रशिक्षण आयोजित केले होते. तावडेच्या सांगण्यावरुनच सूर्यवंशी बेळगांवात आला होता. कुरणे त्यापूर्वीच बैठकीला उपस्थित होता. त्याच्यासोबत आठ ते नऊ साथीदार होते. याच बैठकीत पानसरे हत्येचा कट शिजला. हत्येसाठी मोटारसायकल चोरुन आणण्याची जबाबदारी सूर्यवंशीवर सोपवली. त्याने ती बेळगावरुन चोरून आणली. कोल्हापुरात तावडे हॉटेल परिसरात गाडी लावल्याचे ठिकाणही त्याने दाखिवले आहे. हत्येसाठी पाच ते सहा मोटारसायकल वापरण्यात आल्या. पानसरेंवर गोळ्या झाडल्यानंतर काही मिनिटांतच मास्टंर माइंड वीरेंद्रसिंह तावडे, अमोल काळे, कुरणे आणि त्याचा साथीदार टेंबलाई टेकडीवर भेटले. तावडेने गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल नष्ट करण्यासाठी कुरणेकडे दिले. तो पिस्तूल घेऊन हायवेवरुन न जाता गडहिंग्लजमार्गे बेळगावला गेला. त्या वेळी गडहिंग्जलज परिसरातील एका पोलिस पाटलला या दोघांचा संशय आला. त्याने दोघांकडे विचारणा केली. मात्र तेथून हे दोघे स्थानिक परिसरातील ओळख सांगून निघून गेले. अमोल काळेने मे २०१५ मध्ये कुरणेला दूरध्वनी करुन बेळगाव जिल्ह्यातील एका रिसॉर्टवर भेटण्यासाठी बोलाविले होते. पानसरे याच्या हत्येविषयी अधिक चर्चा करू नये, असा दमही त्याला दिला. या रिसॉर्टवर फरार असलेले संशयित विनय पवार आणि सारंग अकोलकर उपस्थित असल्याचे तपासात निष्पन्न होत आहे.

एसआयटी जाणार बेळगाव, जळगावला

गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल बेळगावातून आणली आहे. सूर्यवंशी मेकॅनिक असल्याने चोरून आणलेल्या वाहनांचा गुन्ह्यात वापर केल्याची शक्यता आहे. तो मूळचा जळगावचा आहे. जळगाव आणि बेळगावचे काय कनेक्शन आहे. त्याने बेळगावातून कुणाकडून मोटारसायकल आणली, ती कुठे नष्ट केली, त्याचे स्पेअर पार्ट कुठे आहेत, याचा तपास करण्यासाठी कोल्हापूर एसआयटी बेळगाव आणि जळगावला जाणार आहे. तपासाचा अहवाल १४ डिसेंबरला हायकोर्टासमोर सादर केला जाणार आहे.

.. .. ..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ध्वजनिधीस मदत करा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांसाठीच्या कल्याणकारी योजनांवर ध्वजदिन निधीचा विनियोग केला जातो. त्यामुळे दानशूर व्यक्ती, संस्थांनी ध्वजनिधीस मदत करावी', असे आवाहन अतिरिक्त जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांनी शुक्रवारी केले.

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातर्फे येथील महासैनिक दरबार हॉलमध्ये आयोजित सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल अध्यक्षस्थानी होते.

काटकर म्हणाले, 'देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या सैनिकांच्या त्यागाची, कष्टाची जाणीव समाजातल्या प्रत्येक घटकाला असणे आवश्यक आहे. सैनिकांप्रती सदैव कृतज्ञता व्यक्त करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. माजी सैनिकांसाठी १ कोटी ६० लाख निधी संकलनाचे उद्दिष्ट आहे. उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत.'

याप्रसंगी शहीद सैनिकांच्या वीर पत्नी, वीर माता, पित्यांचा सन्मान करण्यात आला. माजी सैनिकांना आर्थिक मदतीचे वाटप करण्यात आले. यावेळी कर्नल मधुकर काशीद, कर्नल माधव वेस्वीकर यांची भाषणे झाली. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सुभाष सासने यांनी स्वागत केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, पोलिस उपअधीक्षक शशिराज पाटोळे यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी, आजी-माजी सैनिक उपस्थित होते. सहायक सैनिक कल्याण अधिकारी रविंद्र राजिगरे यांनी आभार मानले.

------------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चिकोत्रातील पाण्यासाठी से. कापशीत रास्ता रोको

$
0
0

फोटो...

म. टा. वृत्तसेवा, कागल

चिकोत्रा प्रकल्पाच्या प्रत्येक आवर्तनावेळी प्रकल्पग्रस्तांकडून अडवणूक होत आहे. यामुळे परिसरातील २२ गावच्या पाणीटंचाईला कारणीभूत ठरणाऱ्या त्या प्रकल्पग्रस्तांवर कारवाई व्हावी, या मागणीसाठी शुक्रवारी सकाळी येथे सर्वपक्षीय रास्ता रोको करण्यात आला. ऊस आणि अन्य वाहतूक खोळंबल्यावर पोलिसांनी हस्तक्षेप करून आंदोलकांना ताब्यात घेतले. मुरगूडमधील पाटबंधारे विभागाने लेखी आश्वासन दिल्यावरच आंदोलक शांत झाले.

प्रत्येक आवर्तनानंतर महिन्यातील पंधरा दिवस चिकोत्रा नदी कोरडी राहते. यामुळे २२ गावांत शेतीच्याच नव्हे पिण्याच्या पाण्याचाही ठणठणाट होतो. आवर्तनाच्या आठ दिवसांनंतरही पाणी सोडले नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त झाला. पुनर्वसनाच्या प्रश्नाबाबत प्रशासनाने विचार करावा. त्यासाठी २२ गावच्या नागरिकांना वेठीस का धरले जाते? असा प्रश्न करून परिसरातील नागरिकानी रास्ता रोको केला. सकाळी दहा वाजता येथील मुख्य संताजीनगर चौकातच त्यांनी बैठक मारली, रस्त्यात वाहने आडवी लावली. यावेळी पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. त्यानंतर विस्कळित होणारी वाहतूक पाहून सहायक पोलिस निरीक्षक विठ्ठल दराडे यांच्या पथकाने आंदोलकांना ताब्यात घेऊन मुरगूड येथे नेले. तेथे पाटबंधारेचे उत्तम कापसे यांनी यापुढे कोणीही पाणी अडविले तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे लेखी आश्वासन दिले. मगच आंदोलक शांत झाले.

दरम्यान, आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर निषेधार्थ कापशी बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. त्यांना सोडल्यावरच सर्व व्यवहार सुरळीत झाले. सुनील चौगले, प्रवीण नाईकवाडी, मुस्ताक देसाई, दत्तात्रय वालावलकर, महेश देशपांडे, प्रकाश घाटगे, उपसरपंच दयानंद घोरपडे, तुकाराम भारमल, आदींनी आंदोलनात पुढाकार घेतला.

०००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खणदाळ ग्रामस्थांचा 'शाळा बंद'चा इशारा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी गडहिंग्लज

खणदाळ (ता. गडहिंग्लज) येथील ग्रामस्थांनी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळा दुरुस्तीबाबत प्रशासनाने डोळेझाक केल्यास मुलांना शाळेला पाठविणार नसल्याचा निर्णय शुक्रवारच्या बैठकीत घेतला. याबाबत लवकरच ते प्रशासनाला निवेदन सादर करणार आहेत.

खाणदाळमध्ये पहिली ते सातवीपर्यंतची जिल्हा परिषद शाळा असून, सुमारे दोनशे विद्यार्थी शिक्षण घेतात. शाळा इमारतीच्या पाच खोल्या धोकादायक बनल्या आहेत. त्यांची दुरुस्ती व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांची आहे, पण सध्या एकाच खोलीच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर झाला आहे. शुक्रवारी शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांसह पालकांनी शाळेतच बैठक घेतली. इमारतीची अवस्था धोकादायक असल्याने संपूर्ण इमारतीच्या दुरुस्ती करावी, प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास मुलांना शाळेला न पाठविण्याचा निर्णय पालकांनी घेतला. बैठकीस शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रवींद्र यरकदावर, उपाध्यक्ष अर्चना घोडके यांच्यासह सदस्य, पालक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘डॉ. आंबेडकरांचे योगदान अमूल्य’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, हातकणंगले

'भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र भारताला अत्यंत द्रष्टेपणाने नवराष्ट्र निर्मितीसाठी राजकीय व सामाजिक चांगला कार्यक्रम दिला. त्याच्या अंमलबजावणीसाठी जिवाचे रान करून त्यांनी भारतीयांना दिलेले योगदान अमूल्य आहे,' असे प्रतिपादन नगराध्यक्षा जयश्री गाट यांनी केले.

हुपरी (ता. हातकणंगले) येथे स्मारक समिती व बौद्ध समाजाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात गाट बोलत होत्या. हुपरी नगरपरिषदेमार्फत महापरिनिर्वाण कार्यक्रम झाला

यावेळी हुपरी नगरपरिषदेच्या कार्यालयात डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच डॉ. आंबेडकर स्मृतिस्थळावरील पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्या आले. यावेळी आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांनी डॉ. आंबेडकर यांच्यामुळे सर्वसामान्यांना न्याय व स्वातंत्र्य मिळाल्याचे सांगितले. माजी आमदार राजीव आवळे, डीवायएसपी गणेश बिरादार, सहायक पोलिस निरीक्षक रिजवाना नदाफ, जेष्ठ नेते मंगलराव मालगे, किरण कांबळे, आदींसह मान्यवर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निधन : अजीज शेख

$
0
0

अजीज शेख

हातकणंगले : धाकडवाडी (ता. जत) येथील श्रीमती अजीज वजीर शेख (वय १०७) यांचे निधन झाले. हुपरी येथील मुस्लिम समाजाचे संचालक मुबारक शेख त्यांच्या त्या आई होत. त्यांच्या पश्चात चार मुलगे, चार मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरसेवकांना २५ लाखाची ऑफर

$
0
0

महापालिका लोगो

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महपौर निवडीला अद्याप दोन दिवसांचा अवधी शिल्लक असला तरी, सत्ता खेचण्यासाठी आणि अबाधित राखण्यासाठी नगरसेवकांचा बाजार मांडला गेला आहे. बहुमताची मॅजिक फिगर पकडण्यासाठी सावज हेरले जात असून अशा काठावरील सावजांना थेट २५ लाखांची ऑफर दिली जात असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे. निवडीची वेळ जवळ येईल, तशी लाखांची बोली कोट्यवधींच्या घरात जाण्याची चर्चा दबक्या आवाजात शहरात सुरू आहे.

कोल्हापूर महापालिका महापौर निवडीत होणारा घोडेबाजार शहराला नवीन राहिलेला नाही. महापालिकेची सत्ता आपल्याच ताब्यात ठेवण्यासाठी गेल्या वीस वर्षांपासून महापौरपदाची अक्षरश: खांडोळी केली जात आहे. शहराचे प्रथम नागरिक अशी बिरुदावली मिरवणाऱ्या व्यक्तींना त्यामुळे अवघ्या दोन ते तीन महिन्याचीही संधी मिळाली. वीस वर्षांची हीच लाजीरवाणी परंपरा आजही कायम आहे. सर्वांना पद देण्याच्या प्रयत्नात अनेकवेळा सत्तेचा झोका दोलायमान होत झुलत राहिला. सत्तेच्या बाजारीकरणात सत्ता आपल्याकडे कायम राहावी, यासाठी खुलेआम नगरसेवकांना ऑफर देण्यात आल्या. त्याची पुनरावृत्ती सध्या सुरू असलेल्या महपौर निवडीत दिसू लागली आहे.

२०१५ पासून महापालिकेच्या पक्षीय राजकारणाला सुरुवात झाली. काँग्रेस-राष्ट्रवादीने (४४) बहुमताचा आकडा पार केला. त्याला शिवसेनेच्या चार नगरसेवकांचा टेकू मिळाला. विरोधी भाजप-ताराराणीला (३३) बहुमतापर्यंत पोहोचता आले नसले, तरी पहिल्या महापौर निवडीपासून चमत्काराची आशा त्यांनी सोडलेली नाही. हा चमत्कार स्थायी समितीमध्ये चांगलाच दिसून आला. राष्ट्रवादीच्या दोन नगरसेवकांना फोडून स्थायीची सत्ता ताब्यात घेतली. सत्ता हस्तगत करताना कोट्यवधींची वाटणी झाल्याची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात सुरू होती. त्या चर्चेची पुनरावृत्ती सोमवारी होणाऱ्या महापौर निवडीच्या निमित्ताने पुन्हा होऊ लागली आहे. या चर्चेत दोन्ही आघाड्यांचा समावेश आहे.

सत्तारुढ व विरोधी आघाडीला बहुमतासाठी तीन ते चार नगरसेवकांची गरज असल्याने काठावरील सावजांना हेरण्यासाठी विविध माध्यमातून मोर्चेबांधणी सुरू आहे. दोन्ही आघाड्या एकमेकांचे नगरसेवक फोडण्यासाठी सरसावले असल्याने लाखांत चर्चा होऊ लागली आहे. लाखमोलांच्या ऑफरमुळे शहरात खुलेआम घोडेबाजाराची चर्चा रंगू लागली आहे. अखेरच्या टप्प्यात तर हा घोडेबाजार कोट्यवधीच्या घरात पोहोचल अशी अटकळ राजकीय जाणकार बांधू लागले आहेत.

............

चौकट

शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष

जातवैधता प्रमाणपत्र मुदतीत सादर न केल्याने काँग्रेसचे तीन, राष्ट्रवादीचे एक अशा चार नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. तसेच व्हीप डावलल्याबद्दल राष्ट्रवादीच्या दोन नगरसेवकांचेही पद जाण्याचा धोका आहे. त्यामुळे सत्तारुढ आघाडीची संख्या सहाने कमी होणार आहे. भाजपचा एक सदस्य कमी होणार असला तरी त्यांच्यावर फारसा परिणाम होणार नाही. त्यामुळेच शिवसेनेच्या चार नगरसेवकांच्या भूमिकेकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मनोमिलन झाले असल्याने चार नगरसेवकांना आपल्या गोटात ओढण्यासाठी भाजपकडून वरिष्ठस्तरावर प्रयत्न सुरू आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सोमवारी किसान सभेची शेतकरी दिंडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

रत्नागिरी-नागपूर व विजापूर-गुहागर महामार्गासाठी शेतकऱ्यांचा विरोध डावलून सुरू असलेले जमीन अधिग्रहण आणि देवस्थान इनाम वर्ग तीन जमीन शेतकऱ्यांच्या नावावर करण्यासाठी सोमवारी (ता. १०) सांगली ते कोल्हापूर किसान सभेच्या वतीने शेतकरी दिंडी काढण्यात येणार आहे. दिंडी मंगळवारी (ता.११) कोल्हापुरात दाखल होणार असून त्यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन होईल, अशी माहिती किसान सभेचे जिल्हाध्यक्ष डॉ. उदय नारकर यांनी पत्रकार बैठकीत दिली.

डॉ. नारकर म्हणाले, 'रत्नागिरी-नागपूर व विजापूर-गुहागर महामार्गासाठी जमीन अधिग्रहणाचे काम सुरू आहे. जमीन अधिग्रहणाची अधिसूचना जाहीर केल्यानंतर बहुतांश शेतकऱ्यांनी वैयक्तिक स्वरूपात निवेदने देऊन विरोध केला आहे. याबाबत सरकारने कोणत्याही प्रकारची सुनावणी न घेता, जमिनी अधिग्रहित केल्याचे जाहीर केले आहे. शेतकऱ्यांच्या निवेदनांना केराची टोपली दाखवत जमिनींचे मूल्यांकनही केले असून महामार्गाचा कोणताही आराखडा संबंधित गावातील ग्रामस्थांना दिलेला नाही. शेतकऱ्यांचे कमीतकमी नुकसान होण्यासाठी अधिकारीपातळीवर विविध चर्चा घडवून आणल्या. तसेच ३० ऑक्टोबरला पालकमंत्री पाटील यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आश्वासनाची अद्याप पूर्तता झालेली नाही.'

सांगली जिल्हाध्यक्ष उमेश देशमुख म्हणाले, 'देवस्थान इनाम वर्ग तीनची जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावावर होण्यासाठी अनेक वर्षापासून आंदोलन सुरू आहे. या प्रश्नांची सोडवणूक करण्याऐवजी कागदोपत्री बेदखल केले जात आहे. याच्या निषेधार्थ सोमवारी सांगली येथून शेतकरी दिंडी काढण्यात येणार आहे. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन दिंडीला सुरुवात होईल. अतिग्रे (ता. हातकणंगले) येथे मुक्काम केल्यानंतर मंगळवारी दिंडी कोल्हापुरात दाखल होणार आहे. त्यानंतर पालकमंत्री पाटील यांच्या कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहा हजार तरुणांची सैन्य भरतीला हजेरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

भारतीय सैन्य दलातर्फे येथील शिवाजी विद्यापीठाच्या मैदानावर आयोजित सैन्य भरती मेळाव्यास दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सहा हजार उमेदवारांनी हजेरी लावली. मेळाव्यासाठी आलेल्या उमेदवारांना अनेक संस्थांनी मोफत जेवण, नाष्टा दिला. पहाटे उंची, वजन, धावण्याच्या चाचणीत अपात्र ठरलेले उमेदवार सकाळी दहापूर्वीच गावी परतले.

सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, माळशिरस, सांगोला, मंगळवेढा, अक्कलकोट तर सांगली जिल्ह्यातील शिराळा येथून उमेदवार भरतीसाठी आले होते. गुरुवारी सायंकाळी चारनंतर ते येत होते. त्यांना सायबरजवळील राजाराम कॉलेजच्या मैदानात थांबण्याची सोय केली होती. रात्रभर त्यांनी मैदानातच झोप घेतली. त्यांच्यासाठी महापालिकेने पाण्याची सोय केली. येथील जैन श्वेतांबर ट्रस्टने मोफत जेवण, नाष्टा, वैद्यकीय उपचाराची सेवा दिली. रॉबीनहुड आर्मी, व्हाइट आर्मीने जेवणाची सोय केली. माजी सैनिकांच्या महिला बचत गटाचा जेवणाचा स्टॉल लावण्यात आला आहे. यामुळे उमेदवारांची जेवणाची चांगली सोय झाली. मध्यरात्रीनंतर २५० तरुणांचे एक पथक असे टप्प्याटप्प्याने मेळाव्याच्या स्थळी सोडले. तेथे थंब व कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. त्यानंतर पहाटे उंची, वजन, धावण्याची चाचणी घेण्यात आली. त्यात अपात्र ठरलेले उमेदवार सकाळी दहापूर्वीच गावी परतले.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उजळाईवाडी येथील पेट्रोल पंपावर दरोडा

$
0
0

६८ हजारांचा मुद्देमाल लंपास

म. टा. वृत्तसेवा, कसबा बावडा,

पुणे- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील गजबजलेल्या उजळाईवाडी येथील प्रवीण पेट्रोल पंपावर चार सराईत गुंडांनी गुरुवारी रात्री दरोडा टाकला. पंपावरील कर्मचाऱ्यांवर हल्ला चढवत ५२ हजार रोख रक्कम व सोने असा एकूण ६८ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. गोकुळ शिरगांव पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे तपास करून संशयितांवर गुन्हा दाखल केला. घटनास्थळी करवीरचे पोलिस उपाधीक्षक सूरज गुरव यांनी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गुरुवारी मध्यरात्री तीन मोटारसायकलवरुन आलेल्या किरण पाटील, विकी चव्हाण (रा.उजळाईवाडी), सनी देशपांडे (रा.राजारामपुरी) यांच्यासह जोकर नावाचा मुलगा यांनी उजळाईवाडी येथील नारायण माने यांच्या प्रवीण पेट्रोल पंपावर दोन हजार रुपयांचे पेट्रोल भरले. कर्मचाऱ्यांनी पैसे मागितल्यानंतर त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. पेट्रोल पंपाचे मालक माने यांच्या नितीन व सागर या मुलांनी पैसे मागितले. त्यावेळी चारही जणांनी त्यांच्यावर हल्ला केला. तर पंप अटेडंट कर्मचारी बाजीराव पाटील, सुदेश माळी किरकोळ जखमी केले. संशयितांनी पंपाच्या कार्यालयावर दगडफेक केली. या गोंधळाचा फायदा घेत ५२ हजार रोकड व सोने असाा एकूण मिळून ६८ हजारचा माल संशयितांनी लंपास केला. त्याचबरोबर या सराईत गुंडांनी पंपावरून निघून जाताना दर महिन्याला ५ हजार रुपये हप्ता द्यावा लागेल अन्यथा जीवास मुकाल अशी धमकी दिली. घटनेची नोंद शुक्रवारी गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात झाली आहे. अधिक तपास गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्याचे

सहाय्यक पोलिस निरीक्षक वाय. आर. खाडे व एच. पी. पाटील करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जयंती, गोमती नदी जलचरांना धोकादायक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

असोसिएशन ऑफ आर्किटेक्टस अँड इंजिनीअर्सतर्फे शुक्रवारी जयंती व गोमती नद्यांची पाहणी करण्यात आली. पाण्याच्या तपासणीमध्ये जलचरांना जिवंत राहण्यासाठी तेथे आवश्यक ऑक्सिजनचे प्रमाण नसल्याचे सामोरे आले.

सकाळी आठ ते दहा या वेळेत हुतात्मा पार्क ते रेणुका मंदिर परिसरातील जयंती नदीचा अभ्यास करण्यात आला. असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसह पुणे येथील पर्यावरणतज्ज्ञ विनोद बोधनकर, जयप्रकाश पराडकर, नीलेश इनामदार, ओमकार गानू यामध्ये सहभागी झाले होते. या ठिकाणच्या पाण्यामध्ये ऑक्सिजनच शिल्लक नसल्यामुळे जलचर जिवंत राहू शकत नाहीत. ओला व सुका कचरा, मैलायुक्त सांडपाणी थेट नदीत मिसळते. शहरातील सांडपाणी थेट नदीत मिसळत असल्यामुळे प्रदूषणाची तीव्रता वाढली आहे. प्रदूषण कमी करण्यासंदर्भात चर्चा झाली. माजी अध्यक्ष राजेंद्र सावंत, उपाध्यक्ष विजय चोपदार, सचिव राज डोंगळे, अनिल घाटगे, उमेश कुंभार, प्रशांत काटे, प्रमोद पोवार, विजय आर.पाटील यांनी चर्चेत सहभाग घेतला.

दरम्यान, असोसिएशनच्या कार्यालयात 'घनकचरा व्यवस्थापन' विषयावर चर्चा झाली. तज्ज्ञांनी कचऱ्यापासून इंधननिर्मितीसंदर्भात मार्गदर्शन केले. असोसिएशनचे अध्यक्ष अजय कोराणे यांनी नदी स्वच्छतेसाठी जनजागृती मोहीम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी निशांत पाटील, सचिन घाटगे, अतुल दिघे, विनायक दिवाण, सुभाष यादव, आदी उपस्थित होते.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कळंबा’चे १४ कर्मचारी निलंबित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सुरक्षा व्यवस्थेत हलगर्जीपणा, कैद्यांना मोबाइल उपलब्ध करुन देण्यास मदत करणाऱ्याबरोबरच कामात कचुराई केल्याचा ठपका ठेवत शुक्रवारी रात्री कळंबा कारागृहातील हवालदार, सुभेदारांसह एकूण १४ कर्मचारी निलंबित करण्यात आले.

अप्पर कारागृह महासंचालकांनी राजवर्धन यांनी दिलेल्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.

वाईतील सीरियल किलर आणि कळंबा कारागृहातील कैदी डॉ. संतोष पोळ (रा. धोम. ता. वाई) याला मोबाइल पुरविल्याच्या संशयावरुन प्रशासनाने ही कारवाई केली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी या प्रकरणी सुरक्षारक्षक राकेश शिवाजी पवार (वय ३०, रा. माळेगाव, ता. बारामती, जि. पुणे) याला तडकाफडकी निलंबित केले होते. या प्रकरणी निलंबितांची संख्या १५ झाली आहे. न्यायालयीन कोठडीतील कैदी डॉ. पोळने कारागृहात खोटे पिस्तूल तयार करून २७ नोव्हेंबरला व्हॉट्स अॅपवरुन क्लिप व्हायरल केली होती. त्यामुळे कळंबा कारागृह प्रशासन हडबडले होते. पोळकडे केलेल्या चौकशीत हे पिस्तूल खोटे असल्याचे स्पष्ट झाले होते. या प्रकरणी पश्चिम विभागाच्या उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांनी संशयित दहा ते पंधरा जणांची चौकशी करुन अहवाल तयार केला होता. तो अप्पर कारागृह महासंचालक राजवर्धन यांच्याकडे सादर केला होता. शुक्रवारी रात्री त्यांनी निलंबित कर्मचाऱ्यांची माहिती लखोट्यातून उपमहानिरीक्षक साठे यांच्याकडे पाठविली. शनिवारी सकाळी संबंधित कर्मचाऱ्यांना निलंबित केल्याचे आदेश दिले जाणार आहेत. या प्रकरणी कारागृह अधीक्षक शरद शेळके यांनी या कारवाईला दुजोरा दिला. सध्या पोळची रवानगी येरवडा येथील कारागृहात झाली आहे. साठे यांनी केलेल्या चौकशीत कारागृहातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. पोळच्या बरॅककडे जाणाऱ्या पंधरा कर्मचाऱ्यांची चौकशी केली होती. सुरक्षारक्षक पवारने पोळला छुप्या मार्गाने मदत केल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चारा वीट प्रकल्प पथदर्शक ठरेल

$
0
0

एनडीडीबीचे अध्यक्ष दिलीप रथ यांचा विश्वास

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'दुभत्या जनावरांना हिरव्या चाऱ्याबरोबरच आवश्यकतेनुसार वाळलेला चारा द्यावा लागतो. पण चाऱ्याची मोठ्या प्रमाणात नासाडी होत असते. तसेच काही शेतकऱ्यांकडे वाळलेला चारा उपलब्ध नसतो. वाळलेल्या चाऱ्याला पर्याय म्हणून एन.डी.डी.बी. (नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड) मार्फत जिल्हा दूध उत्पादक संघाने (गोकुळ) देशातील उभारलेला पहिला चारा वीट प्रकल्प पथदर्शक ठरेल', असे प्रतिपादन एनडीडीबीचे अध्यक्ष दिलीप रथ यांनी केले. गडमुडशिंगी (ता. करवीर) येथील महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यात या प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार महादेवराव महाडिक होते. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी.एन. पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यातून आणि एनडीडीबीच्या मार्गदर्शनातून शंभर टक्के अनुदानातून उभारण्यात आलेल्या चारा वीट प्रकल्पाच्या टीएमआर प्लँटचे उद्घाटन दिलीप रथ यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना रथ म्हणाले, 'सहकाराच्या माध्यमातून उभारलेल्या गोकुळचे नाव देशभरात आदराने घेतले जाते. ऑपरेशन फ्लड आणि डेअरी इन्फास्ट्रक्चर डेव्हलपमेंटने दिलेल्या ९२ कोटी रुपयांच्या अनुदानातून आजअखेर वासरु संगोपन, चार विकास प्रकल्प, पशुआहार,चिलिंग सेंटर या योजना राबवण्यात आल्या. जनावरांना सकस कोरडा चारा प्रकल्प उभारण्यासाठी देशभरात राजस्थानमधील हनुमान गड आणि गोकुळ संस्थेची निवड झाली आहे. एनडीडीबीच्या माध्यमातून दहा कोटी रुपयांचे अनुदानातून देशातील सहकार तत्वावरील पहिला चारा वीट प्रकल्प उभारला आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.

मुंबई येथे गोकुळच्यावतीने दहा लाख लिटर दूधावर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पाला एनडीबीबीच्या माध्यमातून मदत केली जाईल.'

गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. संचालक रविंद्र आपटे यांनी आभार मानले. यावेळी एनडीबीबी चे जनरल मॅनेजर डॉ. श्रीधर, डेप्युटी जनरल मॅनेजर ए.के. वर्मा, अनिल होतेकर, सहकार संस्था दुग्ध सहाय्यक निबंधक गजेंद्र देशमुख, ज्येष्ठ संचालक अरुण नरके, रणजितसिंह पाटील, रविंद्र आपटे, अरुण डोंगळे, विश्वास जाधव, पी.डी. धुंदरे, धैर्यशील देसाई, दीपक पाटील, राजेश पाटील, बाळासाहेब खाडे, सत्यजित पाटील, उदय पाटील, बाबा देसाई, विलास कांबळे, जयश्री पाटील चुयेकर, अनुराधा पाटील सरुडकर, कार्यकारी संचालक डी.व्ही. घाणेकर, जनरल मॅनेजर आर.सी. शहा, पशुखाद्य विभागाचे अधिकारी ए.जी. खोत, व्ही.डी. पाटील, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

................

मल्टिस्टेटचे पत्र लवकरच मिळणार

'गोकुळला लवकरच मल्टिस्टेटबाबतचे पत्र मिळेल', अशी घोषणा माजी आमदार महादेराव महाडिक यांनी कार्यक्रमात केली. गोकुळच्या म्हशीच्या दुधाची ख्याती असून कर्नाटक, सोलापूर, सीमाभागातील म्हशीच्या दुधाचा पुरवठा व्हावा या उद्देशाने गोकुळ मल्टिस्टेट करण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेत बहुमताने घेण्यात आल्याचेही महाडिक यांनी भाषणात सांगितले.

...........

दृष्टीक्षेपात चारा वीट प्रकल्प

अनुदान १० कोटी रुपये

क्षमता ५० मेट्रिक टन (प्रतिदिवस)

१५ किलो वीट किंमत १९५ रुपये

४० किलो वीट किंमत ६४० रुपये

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आज पतंग महोत्सव

$
0
0

कोल्हापूर

लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष बाबा महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी (ता.८) पतंग महोत्सवाचे आयोजन केले आहे. उद्योगपती संजय कदम, सागर कोराणे, अक्षय जरग यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. रंकाळा चौपाटी येथे दुपारी चार वाजता पतंग महोत्सव होणार आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महापौर भाजपचा होईल

$
0
0

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा आशावाद

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'जात वैधता प्रमाणपत्र मुदतीत सादर न केलेल्या महापालिकेच्या नगरसेवकांच्या अपात्रतेप्रश्नी विधी व न्याय विभागाबरोबर नगरविकास विभाग सल्लामसलत करत आहे. त्यामुळे अपात्रतेचा आदेश सोमवारी सकाळपर्यंत येण्याची शक्यता व्यक्त करत भाजपचा महापौर होईल', असा आशावाद पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार बैठकीत व्यक्त केला. सत्ता परिवर्तनासाठी स्वतंत्र टीम कार्यरत असून त्यामध्ये लक्ष घालत नसल्याचे सांगून सद्य:स्थितीत मराठा आरक्षण टिकवणे हा आपला प्रमुख अजेंडा असल्याचेही त्यांनी सांगितले.

पालकमंत्री पाटील म्हणाले, 'प्रत्येक जातीला स्थानिक स्वराज्य संस्थेत प्रतिनिधीत्व देण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी घटनादुरुस्ती केली. ज्या-त्या प्रवर्गातील लोकांना प्रतिनिधीत्वाची संधी मिळण्यासाठी प्राप्त स्थितीत प्रमाणपत्र देणे हीच लोकशाही आहे. मुदतीत प्रमाणपत्र देण्यासाठी सुप्रीम व हायकोर्टाने मर्यादा निश्चित केली आहे. मुदत संपणाऱ्या सदस्यांची राज्यात मोठी संख्या असताना मुदत वाढवण्याची विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अनेकांनी केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी एक वर्षाची मुदतवाढ दिली. एक वर्षाचीही मुदत संपलेल्या नगरसेवकांच्या पात्रतेबाबत प्रशासनाने अभिप्राय मागवला. त्याबाबत विधी व न्याय विभागाबरोबर नगरविकास विभाग सल्लामसलत करत आहे. अपात्रतेचा निर्णय संबंधित विभाग घेईल. पण या नगरसेवकांना पालकमंत्री अपात्र ठरवत असल्याचा आरोप केला जात आहे.' तर, 'देशात पूर्वी कोणतीही अप्रिय घटना घडल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जबाबदार धरले जात होते. त्याचप्रमाणे जिल्ह्यात जे वाईट होते त्याला पालकमंत्र्याला जबाबदार धरले जात असल्याचा टोलाही त्यांनी मुश्रीफ यांना लगावला.

'मुश्रीफ यांच्या कारखान्यामुळे परिसरातील पाण्याचे स्त्रोत बिघडले. त्यामुळे तेथील लोकांनी आंदोलन केल्यानंतर कारखाना बंद करण्याची कारवाई प्रदूषण मंडळाने केली. पण अधिकाऱ्यांवर दबाव आणून आंदोलन चिरडणाऱ्या मुश्रीफांनी लोकशाहीची बूज राखण्याचे आपल्याला शिकवू नये,' अशी टीकाही पालकमंत्री पाटील यांनी मुश्रीफ यांच्यावर केली.

....................

चौकट

मराठा आरक्षण टिकवण्याला प्राधान्य

आपल्या अजेंड्यावर मराठा आरक्षण हा महत्त्वाचा विषय आहे. आरक्षण टिकवणे हे महत्त्वाचे असून राणे समितीने तयार केलेल्या अहवालाचा फायदा राज्य मागासवर्ग आयोगाला झाला असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सत्तारुढ आघाडीत अस्वस्थता

$
0
0

पाच नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार, महापौर निवडीत कमालीची चुरस

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जात वैधता प्रमाणपत्र मुदतीत सादर न केलेल्या सत्ताधारी काँग्रेस आघाडीच्या चार नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार असल्याने सत्तारुढ गटात कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. नगरविकास विभागाने अपात्रतेची कारवाई केल्यास सत्तेचा लंबक विरोधी भाजप-ताराराणी आघाडीकडे झुकणार असल्याने महापौर निवडीने कमालीचे नाट्यमय वळण घेतले आहे. सत्ता खेचण्यासाठी दोन्ही बाजूंकडून नगरसेवकांना प्रलोभने दाखवली जात असल्याने शहकाटशहाच्या राजकारणाला ऊत आला आहे.

सत्तारुढ काँग्रेस आघाडीचे दोन नगरसेवक अपात्र ठरले असून आघाडीचे पाच तर भाजप-ताराराणी आघाडीच्या एका नगरसेवकावर अपात्रतेची टांगती तलवार असल्याने सोमवारी (ता.१०) होणारी महापौर निवड अत्यंत रंगतदार वळणावर पोहोचली आहे. त्यामुळेच शिवसेनेच्या चार नगरसेवकांना लाखमोलाचे महत्त्व आले आहे. जात वैधता प्रमाणपत्र मुदतीत सादर न केलेल्या नगरसेवकांना एक वर्षाची मुदत दिली. तसेच अध्यादेश निघाल्यानंतर १५ दिवसांत प्रमाणपत्र सादर करण्याची सूचना केली. त्यानुसार महापालिकेच्या १९ नगरसेवकांनी प्रमाणपत्र सादर केले. पण पूर्वी एक वर्षापेक्षा जास्त कालवाधी लागलेल्या काँग्रेसच्या दीपा मगदूम, डॉ. संदीप नेजदार, वृषाली कदम, राष्ट्रवादीचे सचिन पाटील व भाजपचे संतोष गायकवाड यांच्याबाबत नगरविकास विभागाकडे अभिप्राय मागवला. त्याचदरम्यान स्थायी समिती निवडीमध्ये पक्षविरोधी भूमिका घेतल्याने विभागीय आयुक्तांनी राष्ट्रवादीचे अजिंक्य चव्हाण व अफजल पिरजादेंचे नगरसेवकपद अपात्र ठरवले.

दोनने संख्याबळ कमी झाल्याने धक्का बसलेल्या काँग्रेस आघाडीच्या चार नगरसेवकांना अपात्र ठरवण्याच्या हालचाली गतिमान झाल्याने सत्तारुढ आघाडीत चांगलीच अस्वस्थता निर्माण झाली आहे. अपात्र नगरसेवकांचा आदेश अद्याप महापालिका प्रशासनाला शनिवारपर्यंत मिळालेला नसला, तरी खबरदारीचा उपाय म्हणून सर्वच नगरसेवकांना सहलीवर पाठवण्यात आले आहे. सोमवारी निवडीपूर्वी राज्य सरकारकडून आदेश देऊन कोर्टात दाद मागण्याची संधी मिळू न देण्याची हालचाली भाजपकडून सुरू आहे. सत्तारुढ गटाने ही शक्यता गृहीत धरुनच विरोधी आघाडीतील सदस्यांना खेचण्याचा प्रयत्न सुरू असल्याने विरोधी आघाडीतील नगरसेवकही सहलीवर गेले आहे. दोन्ही आघाडींतील कारभारी नगरसेवक मात्र एकमेकांच्या हालचालींवर बारीक नजर ठेवून राजकीय डाव खेळत आहेत. त्यामुळेच अंतिम टप्प्यात फोडाफोडीच्या राजकारणाला प्रचंड वेग आला असून महापौर निवड अत्यंत रंगतदार टप्प्यावर पोहोचली आहे.

.............................

चौकट

अश्विनी रामाणे मतदानापासून वंचित?

जातपडताळणी वेळेत पूर्ण न केल्याबद्दल माजी महापौर अश्विनी रामाणे यांचे नगरसेवकपद यापूर्वीच रद्द झाले आहे. कोर्टाने त्यांच्या प्रभागातील पोट निवडणुकीला स्थगिती दिली आहे. त्यामुळे रामाणे यांना प्रत्यक्ष मतदानात सहभागी होता येणार नाही. याबाबत महापालिका प्रशासनाने कायदेतज्ज्ञांचा अभिप्राय घेतला असून त्यांनी मतदानात सहभागी होता येत नसल्याचा अभिप्राय दिला आहे. तरीही त्यांनी मतदानात सहभाग घेतल्यास कायदेशीर अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे.

...................

अपात्रतेची नोटीस दारावर

पक्षातंर्गत बंदी कायद्यानुसार राष्ट्रवादीचे नगरसेवक अजिंक्य चव्हाण व अफजल पिरजादे यांचे पद पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी शुक्रवारी अपात्र ठरवले. अपात्रतेची नोटीस शनिवारी चव्हाण व पिरजादे यांच्या दारावर आणि महापालिकेच्या प्रवेशद्वारावर चिकटवण्यात आली आहे. त्याचे व्हिडीओ चित्रीकरणही झाले आहे. पण अपात्र ठरवण्यापूर्वीच त्यांच्यावर कारवाई करणारी याचिका गटनेते सुनील पाटील यांनी मागे घेतली आहे. त्यामुळे महापौर निवडीदरम्यान दोन नगरसेवकांबाबत कायदेशीर अडचण येणार आहे.

...................

कोट

'जात वैधता प्रमाणापत्राच्या मुदतवाढीच्या अधिसूचनेनंतर महापालिकेच्या पाच नगरसेवकांबाबत राज्य सरकारकडे अभिप्राय मागवला आहे. मात्र सरकारकडून अद्याप अभिप्राय मिळालेला नसून लेखी आदेशानंतरच अंमलबजावणी केली जाईल.

डॉ. अभिजित चौधरी,आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरसेवकांचा भाव वधारला; दर ६० लाखांपर्यंत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर महापालिकेच्या सत्तासंघर्षाने शुक्रवारी नाट्यमय वळण घेतले. सत्तारूढ काँग्रेस आघाडीच्या पाच नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. परिणामी सत्तारूढ आणि विरोधी आघाडीच्या संख्याबळात फारसा फरक पडणार नसल्याने काठावरील नगरसेवकांचा भाव चांगलाच वधारल्याचे स्पष्ट झाले. हा व्यवहार २५ लाखांवरून एकदम ६० लाखांपर्यंत गेल्याची चर्चा सुरू झाली. निवडीच्या अखेरपर्यंत अशीच स्थिती राहिल्यास तो कोटीपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, शुक्रवारी पक्षांतर बंदीमुळे अपात्र ठरलेल्या नगरसेवक अजिंक्य चव्हाण व अफजल पिरजादे यांच्या दारावर प्रशासनाने नोटिसा चिकटवल्या, तर अश्विनी रामाणे मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता असून, शिवसेनेचे चार नगरसेवक सोमवारी (ता. १०) भूमिका स्पष्ट करणार आहेत. त्यामुळे सोमवारी होणारी महापौर निवड अद्याप दोलायमान स्थितीतच आहे. पाच नगरसेवक अपात्र ठरविण्याचा आदेश केव्हाही येणार असल्याने महापालिका प्रशासनानेही आदेश बजावण्याची तयारी केली आहे.

महापालिकेत सध्या काँग्रेस-राष्ट्रवादीचे बहुमत असून, त्यांच्याकडे ४४ नगरसेवक आहेत, तर विरोधी भाजप-ताराराणी आघाडीकडे ३३ नगरसेवक आहेत. मात्र, जातवैधता प्रमाणपत्र मुदतीत सादर न केल्याने आणि पक्षांतरबंदी कायद्यामुळे सत्तारूढ आघाडीचे सात नगरसेवक अपात्र ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांचे संख्याबळ ३७ पर्यंत खाली येईल. तर भाजपचा एक नगरसेवक कमी होणार असल्याने त्यांचेही संख्याबळ ३२ पर्यंत आले आहे. महापालिकेत शिवसेनेने सत्ताधारी आघाडीला पाठिंबा दिला असला तरी त्यांचे संख्याबळ कमी झाल्याने त्यांच्या चार नगरसेवकांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरेल. वरिष्ठ पातळीवर भाजपची शिवसेनेबरोबर चर्चा सुरू असून, भाजपबरोबर शिवसेना येण्याची अटकळ बांधली जात आहे. त्यामुळे दोन्ही आघाड्यांमध्ये केवळ एका मताचा फरक राहत असल्याने फोडाफोडीच्या राजकारणाने वेग घेतला आहे.

परस्पर आघाडीतील काठावरील नगरसेवक हेरून त्यांना विविध प्रलोभने दाखविली जात आहेत. शुक्रवारी अशा नगरसेवकांना २५ लाख रुपये देण्याची तयारी असताना शनिवारी हाच दर ६० लाखांपर्यंत पोहोचला. मित्र, नातवाईक अशा खास व्यक्तींमार्फत 'लाख'मोलाची बोलणी सुरू आहेत. विरोधी आघाडीकडून हालचाली गतिमान झाल्यानंतर सत्तारूढ गटही सरसावला आहे. त्यामुळेच परस्पर आघाडीतील नगरसेवक फोडल्याचा दावा खुलेआम केला जात आहे. दोन्ही आघाड्यांनी आपले संख्याबळ अबाधित राखण्यासाठी नगरसेवकांना सहलीवर पाठवून नजरकैदेत ठेवले असले तरी नजरकैद भेदण्यासाठीही स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित झाली आहे.

०००

महापौर निवडीच्या निमित्ताने सुरू असलेला घोडेबाजार जनता उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. निवडीतील घोडेबाजार निषेधार्ह आहे. त्याला जनतेकडूनच योग्यवेळी धडा मिळाल्याशिवाय राहणार नाही.

आमदार राजेश क्षीरसागर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेना नगरसेवक महाबळेश्वरात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापौरपदाची किल्ली शिवसेनेच्या चार नगरसेवकांच्या हातात असल्याने त्यांच्या पाठिंब्यासाठी सध्या राजस्तरीय हालचाली सुरू झाल्या आहेत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील व शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यात याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. पण तत्पूर्वी या नगरसेवकांना तातडीने महाबळेश्वरात येण्याचा निरोप दिला आहे. तेथे उध्दव ठाकरेंचे स्वीय सहायक आणि पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर त्यांना पुढील आदेश देणार असल्याचे समजते.

शिवसेनेचे नगरसेवक ज्याच्याकडे असतील, त्याचा महापौर होण्याचा मार्ग सुकर होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये ही चार मते आमच्याकडे आहेत, असा दावा दोन्ही आघाड्यांकडून केला जात आहे. सेनेने याबाबत कोणताच निर्णय अधिकृतपणे जाहीर केला नाही. भाजपला त्रास देणे हा सेनेचा अजेंडा असल्याने ही मते कमळाच्या बाजूने झुकणार नाहीत, असा राष्ट्रवादीला विश्वास वाटत आहे. आमदार राजेश क्षीरसागर यांनी बुधवार पेठेतील महापौर व्हावा म्हणून शब्द दिल्याची चर्चा आहे. पण या चार मतांसाठी भाजपने राज्यस्तरीय फिल्डींग लावली आहे. त्यामध्ये यश आल्यास त्यांना मोठी मदत होणार आहे.

सध्या तरी सेनेची भूमिका तळ्यात मळ्यात आहे. सकाळी आमदार क्षीरसागर यांच्याबरोबर असणारे नगरसेवक दुपारी भाजपच्या एका स्थानिक नेत्याच्या राजेंद्रनगर येथील घरात होते. त्यानंतर दुपारी त्यांना तातडीने महाबळेश्वरात पोहचण्याचा आदेश दिला. तेथे नार्वेकर व संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर आहेत. त्यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. या चित्रात आता नार्वेकरच आल्याने हा विषय राज्यस्तरीय झाला आहे. सेनेच्या मतासाठी घोडेबाजार रंगत असल्याची चर्चा आहे. यामध्ये चार नगरसेवकाबरोबरच अन्य काहीजण सहभागी झाल्याने घोडेबाजाराचा आकडा वाढत आहे. यामुळे महाबळेश्वरात काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

..............

ताराराणीची दोन मते फुटणार ?

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कारवाईचा बडगा उगारून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची संख्या कमी केली जात असताना दुसरीकडे भाजप ताराराणी आघाडीलाही फुटीचा दणका बसण्याची शक्यता आहे. या आघाडीतील एक सदस्य उघडपणे विरोधकांच्या बाजूने फिरत असून मित्रासाठी एक मत म्हणून चक्रे फिरू लागली आहेत. यामुळे त्यांची समजूत काढण्यासाठी कारभारी मंडळी सक्रीय झाली आहेत.

पाच नगरसेवकांवरील कारवाईचे आदेश अजून तरी निघालेले नाहीत. त्यामुळे या घडीला महापौरपदाचा लंबक राष्ट्रवादीच्या बाजूने आहे. पण हा कारवाईचा आदेश सोमवारी सकाळी संबंधित नगरसेवकांना मिळण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास आघाडीचे संख्याबळ कमी होणार आहे. याला शह देण्यासाठी भाजप व ताराराणी आघाडीतील काही मते फोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये दोन नगरसेवक गळाला लागल्याची चर्चा आहे. त्यामध्ये एका माजी पदाधिकाऱ्याची पत्नी असल्याचे समजते. यासह आणखी एक मत फुटणार असल्याच्या चर्चेने या आघाडीचे कारभारी अस्वस्थ झाले आहेत. त्यांनी दुपारनंतर तातडीने संबंधितांना गाठून पुढील सूत्रे हलवण्यास सुरूवात केली आहे. महापौर पदासाठी सध्या एकेक मत महत्वाचे आहे. यामुळे प्रत्येक मतासाठी फिल्डींग लावण्याची वेळ आली आहे. विरोधी आघाडीतील सदस्य फोडण्यासाठी पंचवीस ते पन्नास लाखाची ऑफर निघाल्याने आमचे काय, असा सवाल आता आघाडीतील सदस्यांकडून सुरू झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाईक, गुप्ते, शिलेदार लोकमंगल पुरस्काराचे मानकरी

$
0
0

नाईक, गुप्ते, शिलेदार

लोकमंगल पुरस्काराचे मानकरी

......

गो. तु. पाटील यांना साहित्य सेवा पुरस्कार

.....

सोलापूर :

लोकमंगल सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने देण्यात येणारे राज्यस्तरीय लोकमंगल साहित्य पुरस्कार वाचनालयाचे अध्यक्ष दिनकर देशमुख यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत जाहीर केले. राजीव नाईक (मुंबई) यांना 'लागलेली नाटकं' (नाट्य विचार) या पुस्तकाबद्धल, ऋषीकेश गुप्ते (पुणे) यांना 'घनगर्द' कथासंग्रह तर प्रफुल्ल शिलेदार (नागपूर) यांना त्यांच्या 'पायी चालणार,' या कविता संग्रहाबद्धल लोकमंगल साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

२५ हजार रुपये रोख, स्मृतीचिन्ह, शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या शिवाय येवला नाशिक येथील गो. तू. पाटील यांना त्यांच्या 'अनुष्ठूब' या कवितेला वाहिलेल्या नियतकालिकेद्वारे केलेल्या वाङमय सेवेसाठी साहित्य सेवा पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. १५ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि शाल, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. २३ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता निर्मलकुमार फडकुले सभागृहात नाट्य व चित्रपट कलावंत मोहन जोशी यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. पत्रकार परिषदेला पुरस्कार निवड समितीचे सदस्य शिरीष देखणे, नितीन वैद्य, प्रा. डॉ. ऋचा कांबळे आणि समन्वयक शोभा बोल्ली आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images