Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

कारखान्यांची शासनावर मदार

$
0
0

युवराज पाटील, कुडित्रे

केंद्र सरकारने शिल्लक साखरेचा उठाव व्हावा तसेच देशांतर्गत साखर दर वाढायला मदत व्हावी, यासाठी कारखान्यांना साखर कोटा ठरवून अनुदानही दिले. मात्र निर्यात कोट्यानुसार साखर निर्यात केली तर कारखान्यांना मिळणारा दर आणि साखरेवर बँकेकडून घेतलेली उचल यात मोठी तफावत येत आहे. सुमारे ८५० रुपयांचा हा फरक आहे. शिवाय बँकेकडून साखरेवर उचल केलेली रक्कम पूर्ण भरल्याशिवाय साखर विक्रीला परवानगी मिळत नाही. त्यामुळे निर्यातीत निर्माण होणाऱ्या या अडचणी सोडविण्यासाठी सरकारनेच तातडीने निर्णय घेण्याची वेळ आली आहे.

एफआरपी अधिक २०० रुपये अशा फॉर्म्युल्यानुसार यंदाचा हंगाम सुरू झाला. मात्र साखरेचे घसरते दर आणि शिल्लक साठा यामुळे ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार दर देण्याचे आव्हान आहे. त्यातच निर्यात कोट्याप्रमाणे साखर निर्यात केली तर होणारा तोटा कसा भरून काढावा, असा प्रश्न भेडसावू आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही साखरेचे दर कोसळल्यामुळे निर्यात कोट्यानुसार साखर विकली तर कारखान्यांना क्विंटलला २००० ते २१०० रुपये भाव मिळतो. भारतात सध्या २९०० रुपये दर मिळत आहे.

हंगामाच्या प्रारंभी सरासरी ३१०० रुपये दर गृहित धरून कारखान्यांनी बँकांकडून पोत्याला २६३५ रुपये कर्ज घेतले आहे. मात्र सध्याचा निर्यात साखरेला मिळणारा दर २१०० रुपये आणि बँकेकडील उचल २६३५ रुपये आहे. त्यामुळे मोठा फरक पडत आहे. ही फरकाची रक्कम भरल्याशिवाय बँक साखर विक्रीस परवानगी देत नाही. हा गुंता सोडविण्यासाठी शासनानेच पुढाकार घेण्याची वेळ आली आहे. ब्राझिलने इथेनॉल निर्मितीला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे भविष्यात साखर निर्यातीसाठी आंतरराष्ट्रीय बाजारातील परिस्थिती अनुकूल होऊ शकते.

शिल्लक साखरेचा प्रश्न निकाली काढण्यासाठी केंद्र सरकारने एकूण गाळपाच्या १६. ७० टक्के साखर निर्यात कोटा ठरवून दिला आहे. हा कोटा पूर्ण केल्यास कारखान्यांना गाळपावर टनाला १३८.८० रुपये अनुदान जाहीर केले. त्यामुळे निर्यातीला चालना मिळेल, असे वाटत असतानाच निर्यात साखरेचा दर २१०० रुपयांपर्यंत आला आहे. तर बँकेकडील उचल २६३५ रुपये आहे. तरीही अनुदान गृहित धरून निर्यात करायची म्हटले तरी बँक ताब्यातील साखरेवरील कब्जा सोडायला तयार नाही. त्यामुळे गेल्यावर्षीची शिल्लक आणि चालू हंगामातील साखर ठेवायची कुठे, हा मोठा प्रश्न आहे.

.. .. .. .. ..

अनुदानात वाढ करावी

सरासरी ३१०० रुपये दर गृहीत धरून बँकाकडून कारखान्यांनी प्रति पोते सुमारे २६३५ रुपये कर्ज घेतले आहे. सध्या निर्यात साखरेला मिळणारा दर २००० ते २१०० रुपये आहे. बँक २६३५ रुपये भरल्याशिवाय साखरेवरील कब्जा सोडत नाही. त्यामुळे सरकारने बँकांना वरची रक्कम रोख द्यावी किंवा अनुदानात भरीव वाढ करावी, असे मत जिल्हा बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले. सद्यस्थितीत साखर निर्यात होणे गरजेचे आहे. यासाठी बँकेने साखरेवर पोत्यामागे दिलेली उचल आणि निर्यात साखरेचा दर यातील तफावतीची रक्कम शासनाने रोख स्वरूपात बँकांना देणे गरजेचे आहे. कारखाने आर्थिक अडचणीत आहेत. त्यामुळे कारखान्यांना कर्ज नव्हे तर अनुदान स्वरूपात मदत देण्याची भूमिकाही शासनाने घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.

.. .. ..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जागतिक बाजारपेठ काबीज करा

$
0
0

फोटो....

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

'वाढत्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी दर्जेदार कापडाची निर्मिती आणि योग्य दर असणे गरजेचे आहे. काळानुरूप नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून त्याद्वारे आपला दर्जा सिद्ध करण्याची जबाबदारी उद्योजकांवर आली आहे. त्यासाठी आंतरराष्ट्रीय वस्त्र प्रदर्शनाच्या माध्यमातून जागतिक बाजारपेठ काबीज करण्यासाठी सज्ज राहा,' असे आवाहन महसूल व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

वाणिज्य मंत्रालय व वस्त्रोद्योग मंत्रालय भारत सरकार यांच्या मदतीने आणि पॉवरलूम डेव्हलपमेंट अँड एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिल (पिडीक्सिल) यांच्या वतीने आयोजित 'रिव्हर्स बायर सेलर मीट' अर्थात 'आयआयटी एक्स्पो इचलकरंजी २०१८' या वस्त्र प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी पाटील अध्यक्षस्थानावरून बोलत होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. येथील स्टेशन रोडवरील पंचरत्न सांस्कृतिक भवनमध्ये ६ ते ८ डिसेंबरअखेर प्रदर्शन भरविण्यात आले आहे.

मंत्री पाटील म्हणाले, 'सूतगिरण्या हा वस्त्रोद्योगातील महत्त्वाचा घटक कापूस असून त्यासाठीच मराठवाडा, विदर्भात नव्या सूतगिरण्यांना मंजुरी दिली आहे. अमरावती येथे ३५० एकर जागेत टेक्स्टाइल पार्क साकारण्यात येत असून एकाच ठिकाणी दर्जेदार कापड निर्मितीसाठी सर्व प्रक्रिया होणार आहे. कोळशाची कमतरता भासू लागल्याने विजेच्या दरात वाढ होत आहे. त्यामुळे काही अडचणी निर्माण होत आहे. परंतु नव्या वस्त्रोद्योग धोरणातील शिफारशींच्या अंमलबजावणीबाबत सरकार अनुकूल असून, लवकरच निर्णय घेतला जाईल. यंत्रमागासाठी वीज दरात आणि कर्जावरील व्याजात सवलतीच्या अंमलबजावणीतील अडचणींचा आढावा घेऊन मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून ते मार्गी लावू.'

पिडीक्सिलचे चेअरमन सुनील पाटील यांनी स्वागत केले. प्रास्ताविकात माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे म्हणाले, 'मंदीच्या गर्तेतून वाटचाल करीत असलेल्या वस्त्रोद्योगासाठी या प्रदर्शनातून नवे विचार आणि नव्या संधी देण्याचा प्रयत्न आहे. तरुणांनी या प्रदर्शनाच्या माध्यमातून पुढाकार घेऊन वस्त्रनगरीला जगाच्या नकाशावर न्यावे.'

याप्रसंगी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, पिडीक्सिलचे माजी चेअरमन पुरुषोत्तम वांगा, ए. बी. जोशी, टी. एल. बालाकुमार, नगराध्यक्षा अलका स्वामी, प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार सुधाकर भोसले, पी. एम. पाटील, प्राचार्य डॉ. पी. व्ही. कडोले, पिडीक्सिलचे संचालक विश्‍वनाथ अग्रवाल, गजानन होगाडे, चंद्रकांत पाटील, जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे, प्रकाश सातपुते आदींसह शहर व परिसरातील वस्त्रोद्योजक, व्यापारी, कारखानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. भाग्यश्री शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. पिडीक्सिलचे संचालक विश्‍वनाथ अग्रवाल यांनी आभार मानले.

०००

६५ विदेशी उद्योजकांचा सहभाग

प्रदर्शनात देशभरातील १०० कापड उत्पादकांनी स्टॉल लावले आहेत. यामध्ये केनिया, श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ, फ्रान्स, मॉरिशस, ब्रह्मदेश, थायलंड, मलेशिया, रशिया, व्हिएतनाम, इजिप्त, मालदीव यांसह विविध देशांतील ६५ परदेशी कापड खरेदीदार सहभागी झाले आहेत.

०००००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गारगोटी

वाघापूर (ता. भुदरगड) येथे ऊस लावणीसाठी गेलेल्या शेतकऱ्याचा विजेचा धक्का बसून मृत्यू झाला. संभाजी आरडे (वय ४५) असे त्यांचे नाव आहे. ते पेपर एजंट म्हणूनही काम करत होते.

याबाबत माहिती अशी : संभाजी आरडे ऊस लावण करण्यासाठी अमित यशवंत पाटील यांच्या शेतात गेले होते. ऊस वातरून झाल्यानंतर मोटारपंप सुरू करण्यासाठी वेदगंगा नदीवरील पाटील यांच्या मोटारीकडे ते गेले. मोटार सुरू केल्यानंतर शॉर्ट सर्किट होऊन विजेचा जोराचा झटका बसल्याने ते बेशुद्ध पडले. बराच वेळ झाला तरी ते परत न आल्याने त्यांच्या पत्नी नदीकडे गेल्या असता ही घटना त्यांच्या निदर्शनास आली. आरडे यांना त्यांचे बंधू तानाजी यांनी गारगोटी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, दोन भाऊ असा मोठा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फसवणूकप्रकरणी सूत दलालावर गुन्हा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

सूत व्यापाऱ्यांची ३७ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सूत दलाल नितीन महेंद्रकुमार व्यास (रा. सांगली रोड) याच्याविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद मुकेश मुकनलाल तापडिया (बोहरा मार्केटशेजारी) यांनी दिली आहे. मुकेश तापडिया यांची यार्न एन फॅब्रिक्स नावाची फर्म आहे. तसेच मुंबई येथील मे. एव्हरप्लो पेट्रोफिल्स या यार्न ट्रेडर्सचा एजंट असून, कारखानदार व ट्रेडर्स यांना कंपनीकडून दीड टक्का कमिशनवर सूत घेऊन देण्याचे काम करतात. सूत दलाल व्यास याने ओळखीतूनच महालक्ष्मी टेक्स्टाइल फर्म स्वत:च्या मालकीची असताना ती दुसऱ्याची असल्याचे सांगितले. त्याद्वारे व्यासने २ जून ते १ ऑगस्ट २०१८ या कालावधीत ३० एस विस्कोस नंबरचे ३६ लाख ८१ हजार ८९७ रुपयांचे सूत खरेदी केले. मात्र, त्याचे पैसे देण्यास तो टाळाटाळ करु लागल्याने तापडिया यांनी त्याच्याविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे.

०००

वस्त्र प्रदर्शनाच्या

निमित्ताने आज फॅशन शो

म.टा. वृत्तसेवा , इचलकरंजी

पॉवरलूम डेव्हलेपमेंट अँड एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिलच्या वतीने इचलकरंजी येथे आयोजित आंतरराष्ट्रीय वस्त्र प्रदर्शनाच्या निमित्ताने शुक्रवारी (ता.७) सायंकाळी साडेपाच वाजता इचलकरंजीतील कारखानदारांनी उत्पादित केलेल्या वस्त्रांचा फॅशन शो आयोजित केला आहे. यावेळी जगभरात सध्या प्रचलित असलेली वस्त्रप्रवणे पाहावयास मिळणार आहेत. तसेच पिडीक्सिलचा कट्टा हा नावीन्यपूर्ण टॉक शो आयोजित केला आहे. यामध्ये वस्त्रोद्योगाशी संबंधित सर्वच घटक, गारमेंट आणि निर्यात करणाऱ्या तज्ज्ञांशी चर्चा होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुस्लिम आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाकडे पाठपुरावा करणार

$
0
0

मुस्लिम बोर्डिंगला भेटप्रसंगी पालकमंत्र्यांची ग्वाही

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'मुस्लिम, लिंगायतसह अनेक समाजांना आरक्षण देण्याची सरकारची भूमिका आहे. मराठा समाजानंतर मुस्लिमांना न्यायालयात टिकणारे आरक्षण देण्यासाठी मागासवर्गीय आयोगाकडे सरकार पाठपुरावा करेल,' अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

पालकमंत्री पाटील यांनी सायंकाळी मुस्लीम बोर्डींगला भेट दिली. समाजाच्या वतीने त्यांच्याकडे अनेक मागण्या करण्यात आल्या. त्यामध्ये आरक्षणाची प्रमुख मागणी होती. समाजाच्या अडचणी सोडवण्याबरोबरच संस्थांना सुविधा देण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

मंत्री पाटील म्हणाले, 'मुस्लीम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण मिळणे कठीण आहे. धार्मिक आधारावर दिलेले आरक्षण न्यायालयात टिकत नसल्यानेच अनेक ठिकाणी आरक्षणाचा निर्णय घेतलेला नाही. मुस्लीम समाज मागासलेला आहे, आरक्षणासाठी या समाजाच्या भावना तीव्र आहेत. त्यामुळे या समाजाची मागणी पूर्ण करण्यासाठी सरकार निश्चितपणे प्रयत्न करेल. या समाजात मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण कमी आहे. ते वाढवण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. एक हजार मुलींच्या शिक्षणाचा खर्च करण्याचा आपला मानस आहे. त्यासाठी प्राथमिक तयारी सुरू केली आहे. या समाजातील पाचशे महिलांना सकस आहार दिला आहे.'

मुस्लीम बोर्डींगचे चेअरमन गणी आजरेकर म्हणाले,' या समाजाची प्रगती होण्यासाठी सरकारची मदत आवश्यक आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यामध्ये पुढाकार घ्यावा.' माजी नगरसेवक आदिल फरास म्हणाले, 'मुस्लीम समाज मागासलेला आहे. समाजात प्रचंड गरिबी आहे. बेरोजगार युवकांची संख्या मोठी आहे. आरक्षण नसल्याने नोकरी मिळत नाही. त्यामुळे वडिलोपार्जित व्यवसाय करावे लागत आहेत. या समाजाच्या उन्नतीसाठी आरक्षण आवश्यक आहे.'

यावेळी बोर्डींगचे कादर मलबारी, नगरसेवक तौफिक मुलाणी, बबलू मकानदार, जहांगीर अत्तार, हाजी अस्लम, इक्बाल देसाई, मौलाना इरफान, बाबा पार्टे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रा. गुरव यांच्या 'लागीर'चा गौरव

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गारगोटी

येथील मौनी विद्यापीठाच्या उदाजीराव अध्यापक महाविद्यालयातील प्रा. सुधीर गुरव यांनी तयार केलेल्या 'लागीर' या शैक्षणिक लघुपटास राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व शिक्षक परिषदेच्या वतीने (एनलीईआरटी) आयोजित २३व्या ऑल इंडिया चिल्ड्रन्स एज्युकेशन ऑडिओ-व्हिडीओ फेस्टिव्हल अँड आयसीटी मेळामध्ये सर्वोत्कृष्ट शैक्षणिक लघुपट म्हणून गौरविण्यात आले. त्यांना चाळीस हजार रुपये आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

२७ ते २९ नोव्हेंबर दरम्यान नवी दिल्लीत शैक्षणिक प्रदर्शन झाले. प्रदर्शनात देशातील १६ लघुपटांचे नामांकन झाले होते. यात महाराष्ट्रातून केवळ तीन लघुपटांना नामांकन होते. प्रा. गुरव यांच्या 'लागीर' या शैक्षणिक लघुपटाबरोबरच 'आम्ही फुले बोलतोय' (अजय पाटील), 'वर्ड मोबाइल अॅप' (अमोल हंकारे) व रेणू (संतोष केंद्रे) आदींचा समावेश होता. या लघुपटांचे दिल्लीत ज्युरींसमोर स्क्रिनिंग होऊन त्यातून 'लागीर'ची निवड झाली. पशुहत्येसारख्या प्रथेविरुद्ध बालमनाचे प्रबोधन करणारा हा लघुपट आहे. अत्यंत तुटपुंजी साधनसामग्री व अत्याधुनिक साधनांचा अभाव असतानाही केवळ सकस कथेच्या बळावर नवोदित कलाकारांना घेऊन गुरव यांनी तयार केलेल्या या लघुपटाने आता यानिमित्ताने थेट राष्ट्रीय पातळीवर आपली मोहोर उमटवली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गांधीनगरात रस्त्यांची दुरवस्था

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

कापडाची मोठी बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या गांधीनगरमध्ये रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्ते पूर्णत: उखडले आहेत. नागरिकांसह वाहनधारक त्रस्त बनले आहेत. जिल्हा परिषद प्रशासनाने गांधीनगरमधील अंतर्गत रस्त्यांची तत्काळ दुरुस्ती करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांना दिला.

गांधीनगर मेनरोडवरुन सिंधी सेंट्रल पंचायतीकडे जाणाऱ्या रस्त्याची बिकट अवस्था आहे. रस्ते खराब झाल्यामुळे किरकोळ अपघात होत आहेत. प्रशासनानचे मात्र त्याकडे दुर्लक्ष होत आहे. कापडाची मोठी बाजारपेठ असल्यामुळे दिवसभर वाहनांची वर्दळ असते. सरकारी वसाहत रुग्णालय ते वळीवडे कॉर्नरचा रस्ता मंजूर होऊन देखील काम रखडले आहे. सिंधू मार्केटमधील रस्ता खराब झाला आहे. परिसरात लोकवस्ती वाढत आहे. ग्रामपंचायत प्रशासनाचे पायाभूत सुविधेकडे लक्ष नाही. प्रशासनाने, गांधीनगरमधील रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी केली. शिष्टमंडळात

शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, माजी जिल्हाप्रमुख रवी चौगले,अवधूत साळोखे, विनोद खोत, दिनेश परमार, पोपट दांगट, अरुण अब्दागिरी, संतोष चौगुले, संजय दांगट आदींचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोकसभा मतदारयादी लांबणीवर

$
0
0

Bhimgonda.Desai@timesgroup.com

Tweet : @bhimgondaMT

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी अद्यावतीकरण मोहिमेत राज्यातून ३६ लाख, ६६ हजार, ४९५ नव्याने मतदारांनी ऑनलाइन आणि ऑफलाइन अर्ज निवडणूक प्रशासनाकडे दाखल केले. मोठ्या संख्येने अर्ज आल्याने अंतिम यादी प्रसिद्धी लांबणीवर पडणार आहे. यासंबंधीची माहिती जिल्हा निवडणूक प्रशासनास राज्याचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी लेखी पत्राद्वारे कळवले आहे. अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतरच सर्व राजकीय पक्षाचे नेते, कार्यकर्ते मतदारांपर्यंत पोहचण्याची व्यहरचना करतात. यासाठी त्यांना आता एक आठवडा अधिक प्रतीक्षा करावी लागणार आहे.

निवडणूक प्रशासनाने सप्टेंबर, ऑक्टोबर या दोन महिन्यात नविन नावांचा सामावेश करणे, नाव, पत्यात दुरुस्ती, बदल करणे, स्थलांतरित झाल्यास नाव कमी करून नव्या ठिकाणी दाखल करण्यासाठी अर्ज दाखल करून घेण्यासाठी मोहीम राबवली. यासाठी गावपातळीवर व्यापक प्रचार, प्रसिद्धी केली. १८ ते १९ वयोगटातील पात्र तरुण, तरुणींची नावे यादीत सामावेश होण्यासाठी कॉलेजमध्ये जाऊन अर्ज भरून घेण्यात आले. परिणामी जिल्ह्यात तब्बल १ लाख, ३२ हजार, ९५० नव्याने अर्ज दाखल झाले.

राज्यात ३६ लाख, ६६ हजार, ४९५ अर्ज आले. अपेक्षेपेक्षा अधिक अर्ज आले आणि त्या तुलनेत निवडणूक प्रशासनाकडे मनुष्यबळ कमी असल्याने यादीत नावाचा सामावेश करण्यास विलंब होत आहे. पूर्वीची चार जानेवारीची यादी प्रसिद्धीची डेटलाइन पाळणे अवघड झाले होते. प्रशासनाची दमछाक होत होती. म्हणून मुदत वाढ मिळावी, अशी राज्यभरातून मागणी झाली. त्याची दखल घेत आयोगाने सात दिवसाची मुदतवाढ दिली. नव्या आदेशानुसार दावे, हरकती निकाली काढणे, डाटाबेसचे अद्यावतीकरण करणे, यादी प्रसिद्धी करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे.

४ जानेवारीला यादी प्रसिद्धी

यादीत सामावेश करण्यासाठी आलेलेल्या अर्जाच्या प्रक्रियेचा सुधारित कालावधी :

१४ डिसेंबर : दावे व हरकती निकालात काढणे

१० जानेवारी : पुरवणी यादी छपाई करणे, डाटा अद्यावतीकरण करणे

११ जानेवारी २०१९ : अंतिम मतदार यादी प्रसिद्धी

सर्वाधिक ठाण्यात

नव्याने दाखल अर्जात राज्यात ठाणे पहिल्या तर मुंबई दुसऱ्या आणि पुणे तिसऱ्या क्रमांकावर आहे. सर्वात कमी सिंधुदुर्गमधून अर्ज आले आहेत. आयोगाच्या वेबसाइटवर पात्र अर्जदारांची नावे भरणे, त्यांचे ओळखपत्र घरच्या पत्यावर पाठवले जात आहे. यासाठी विलंब लागत आहे.

२९ लाख

जिल्ह्याचे आताचे एकूण मतदार

१३,२,९५०

नव्याने अर्ज आलेले

१९,६७३

यादीत सामावेश झालेले मतदार

३६,६६,४९५

राज्यात नव्याने आलेले अर्ज

६२,८,९१६

यादीत सामावेश झालेले मतदार

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातून मोठ्या संख्येने अर्ज आले आहेत. अर्जाची छाननी करून यादीत नावांचा सामावेश करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र अर्ज अधिक असल्याने आयोगाने अंतिम मतदार यादी प्रसिद्धीस नुकतीच मुदतवाढ दिली.

स्नेहल भोसले, उपजिल्हाधिकारी, निवडणूक विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


डॉ. आंबेडकर स्मारकप्रश्नीभीमसेनेचे आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

हातकणंगले तालुक्यातील माणगाव आणि पन्हाळा येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राष्ट्रीय स्मारकाचे काम त्वरित सुरू करावे, या मागणीसाठी भीमसेनेतर्फे गुरुवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत साखळी ठिय्या आंदोलन सुरू केले. मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, डॉ. आंबेडकर यांच्या माणगावातील स्मारकाचा १७८ कोटींचा आराखडा तयार आहे. मात्र, संपूर्ण आराखडा मंजूर न करता काही कामांसाठी दोन कोटी रुपये मंजूर करून सरकार दिशाभूल करीत आहे. छत्रपती राजाराम महाराज यांनी पन्हाळा येथे डॉ. आंबेडकर यांना राहण्यासाठी जागा दिली. त्या जाग्यावर डॉ. आंबेडकर यांचे घर बांधण्याचे स्वप्न अपुरे राहिले. म्हणून पन्हाळ्यावरही त्यांचे राष्ट्रीय स्मारक बांधावे. आंदोलनात वैभव कांबळे, अमर शिंदे, जयदास कांबळे, अक्षय कांबळे, संदीप कांबळे, अमित आढाव, रणधीर कांबळे, राहूल कांबळे आदी सहभागी झाले होते.

--------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोतवालांचे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महसूल विभागात काम करणाऱ्या कोतवालांना चतुर्थ श्रेणी देण्यात यावी, या मागणीसाठी गुरुवारपासून जिल्हा कोतवाल संघटनेतर्फे येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले. यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे काम बंद करून ठिय्या आंदोलन केले जात आहे. आंदोलनात संघटनेचे संदीप टिपुगडे, श्रीकांत कोळी, अतुल जगताप, सुनील पाटील, पांडुरंग बरकाळे, संतोष पाटील, बाजीराव कांबळे यांच्यासह जिल्ह्यातील कोतवाल सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सांस्कृतिक दहशतवाद मोडून काढा

$
0
0

अवी पानसरे व्याख्यानमाला

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'आहार, पोशाख, कलाकृतीवरून देशातील साहित्यिक, कलाकारांना लक्ष्य केले जात आहे. देशात अदृश्य भीतीचे सावट पसरले आहे. या भीतीला छेद देताना साहित्यिक, कलाकारांनी निर्भयतेने सामोरे जात सांस्कृतिक दहशतवाद मोडून काढावा,' असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक दत्ता नाईक यांनी केले. श्रमिक प्रतिष्ठान आयोजित कॉम्रेड अविनाश पानसरे व्याखानमालेत ते बोलत होते. 'सांस्कृतिक दहशतवाद' हा व्याख्यानाचा विषय होता. डॉ. राजन गवस अध्यक्षस्थानी होते.

भारतावर प्राचीन काळापासून शक, हूण, मुस्लिम, ख्रिश्चन, पोर्तुगीजांची आक्रमणे होऊन भारतातील संस्कृती कायम टिकून आहे, असे सांगून नाईक म्हणाले, 'भारतावर आक्रमणे करणारे भारतीय संस्कृतीत विलीन झाले. त्यांचे अनेक पदार्थ, वस्तू, शब्द, जीवन पद्धती संगीत, कला भारतीयांनी आत्मसात केल्या. पण मुस्लिम, ख्रिश्चन धर्मीय भारतीय संस्कृतीवर घाला घालत आहेत, अशी आवई उठवून सांस्कृतिक दहशतवाद जोपासला जात आहे. २०१४ मध्ये भाजप सरकार सत्तेवर आल्यावर त्याला जोर चढला आहे. यामुळे साहित्यिक, कलाकार, तत्वज्ञ भयभीत झाले आहेत.'

ते पुढे म्हणाले, 'सांस्कृतिक दहशतवादाने बौद्धिकतेवर हल्ला केला आहे. आत्मभान हरवून टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. सृजनशीलता नष्ट केली जात आहे. पण काही साहित्यिक, कलाकार निर्भयतेने लढा देत आहेत. साहित्यिक, कलाकारांनी सांस्कृतिक दहशतवादाची भीती न बाळगता आपले मत, कलाकृती धीटपणे मांडली पाहिजे. ज्यावेळी साहित्यिक, कलाकार अशा दहशतवादाला सामोरे जातात तेव्हा हुकूमशाही भयभीत होते, असा जगाचा इतिहास आहे. विज्ञान व विवेकवादावर श्रद्धा ठेवून साहित्यिक व कलाकृती आपली सृजनशीलता निर्भयतेने प्रकट करावी.'

डॉ. राजन गवस म्हणाले, 'सांस्कृतिक दहशतवाद हा ऑक्टोपस आहे. तो अनेक मार्गांनी समाजमन तयार करत आहे. चुकीच्या गोष्टी सांगून मेंदू बधीर केला जात आहे. बहुजन समाजातील तरुणांना सांस्कृतिक दहशतवादासाठी प्रवृत्त केले जात आहे. हे सर्व टाळण्यासाठी प्रत्येक कुटुंबप्रमुखाने आपली मुले या दहशतवादाला बळी पडू नयेत यासाठी सजग राहताना पहारेकऱ्याची भूमिका निभावली पाहिजे. लेखकांनी भित्रेपण सोडून समाजात जे चुकीचे चालले आहे, त्यावर निर्भयतेने लिखाण करावे. सांस्कृतिक दहशतवादाविरोधातील लढा सोशल मीडियासह सर्व ठिकाणी दिला पाहिजे. आय. बी. मुन्शी यांनी सूत्रसंचालन केले. शरद कुंभार यांनी आभार मानले.

०००

आजचे व्याख्यान

विषय : सोशल मीडियाचा गैरवापर

वक्ते : अनंत बागाईतकर (दिल्ली)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पानसरे हत्या: दोन्ही आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ

$
0
0

कोल्हापूर :

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणात मोटारसायकल आणि हत्यार हस्तांतरित केल्याच्या संशयावरून कोल्हापूर एसआयटीने संशयित वासुदेव भगवान सूर्यवंशी (वय २९ रा. साखळी, ता. यावल. जि. जळगाव) आणि भारत उर्फ भरत जयवंत कुरणे (वय ३७, रा. धर्मवीर संभाजी गल्ली, महाद्वार रोड, बेळगाव) या दोघांची पोलीस कोठडी आठ दिवसांनी वाढविली.

त्यांची सात दिवसांची मुदत संपल्याने शुक्रवारी १५ वे सहदिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) एस. एस. राऊळ यांच्या कोर्टासमोर हजर करण्यात आले. पानसरे हत्या प्रकरणासाठी वापरलेले मोटारसायकलचा शोध, बेळगाव येथे झालेल्या गोपनीय बैठकीत अन्य साथीदारांची नावे, बॉम्बस्फोट प्रशिक्षण, कटाची बैठक, हत्येत वापरलेले पिस्तूल कोठे लपविले की नष्ट केले या सर्वाचा तपास होण्यासाठी आठ दिवसांची पोलीस कोठडीची मागणी सरकारी वकील शिवाजीराव राणे यांनी केली. पानसरे हत्येशी या दोघांचा काहीही संबध नाही असा दावा करत त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी संशयितांचे वकील समीर पटवर्धन यांनी केली. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून कोर्टाने त्यांना १५ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खूनप्रकरणी गुन्हा दाखल

$
0
0

खूनप्रकरणी गुन्हा दाखल

कराड :

शिवाजी स्टेडियम नजीकच्या झोपडपट्टीतील अल्पवयीन मुलीवर हल्ला केल्याच्या संशयावरून अजय गवळी याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, अजय गवळी याला रवींद्र सोनावले (रा. पाटण) याने अॅसिड पाजून त्याचा खून केल्याची फिर्याद अजयची बहिण निलम अनिल बाबर यांनी दिली आहे. त्या वरून सोनवणे याच्या विरोधात गुरूवारी रात्री उशीरा कराड शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला असून, पोलिस अधिक तपास करीत आहेत.

मृत अजय गवळी.

......

'अनुवाद जीवनाचा अविभाज्य भाग'

कराड :

'मराठी भाषेबद्दल अस्मिता मनामध्ये असली तरी कन्नड भाषेतील दर्जेदार व चांगले साहित्य मराठी वाचकांना मिळावे, या भावनेतून मी अनुवादाकडे वळली. अनुवाद ही कला आहे. ती आयुष्यभर जोपासण्याचा मी प्रयत्न केला असून. अनुवाद हा माझ्या जीवनाचा अविभाज्य भागच बनला आहे, ' असे प्रतिपादन अनुवादिका डॉ. उमा कुलकर्णी यांनी काढले.

कै. बाबुराव गोखले स्मारक समितीच्या वतीने शुक्रवारी येथील कराड अर्बन बँकेच्या सभागृहात समाजभूषण बाबुराव गोखले स्मृतिदिनानिमित्त आयोजित 'संवादु अनुवादु : एक संवाद' या विषयावर डॉ. उमा कुलकर्णी बोलत होत्या. या वेळी स्मारक समितीचे अध्यक्ष सुभाषराव जोशी, कराड अर्बन बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम, उपाध्यक्ष समीर जोशी, बँकेचे संचालक वि. पु. गोखले, मुख्य कार्यकारी अधिकारी सीए दिलीप गुरव, स्मारक समितीचे कार्याध्यक्ष विठ्ठलराव शिखरे, कार्यवाह वि. के. जोशी व माधव माने आदी उपस्थित होते.

डॉ. कुलकर्णी म्हणाल्या, 'मराठी भाषेबद्दल माझ्या मनामध्ये अस्मिता असली तरी पती विरूपाक्ष यांची भाषा कन्नड होती. लग्नानंतर पुण्यात रहायला गेले, त्या वेळी घरात कन्नड आणि बाहेर मराठी असा आमच्यात अलिखीत करारच झाला होता. मी मला आवडलेल्या मराठी पुस्तकांबद्दल व माझे पती विरूपाक्ष यांना आवडलेल्या कन्नड पुस्तकांबद्दलची माहिती सांगायचे यातूनच मी सन १९८० सालापासून अनुवादाकडे वळाले. त्याच वेळी कन्नडमधील ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक शिवराम कारंथ यांच्या पुस्तकाचे 'तनमनाच्या भोवऱ्यात' या नावाने अनुवादित पुस्तक आले. महात्मा बसवेश्वरांच्या जीवनावरील गिरीश कर्नाडांच्या 'तलेदंड' या नाटकाचा अनुवाद केला. प्रसिद्ध लेखिका सुधा मुर्ती, बहिरप्पा यांच्या कन्नडमधील कादंबऱ्या मी अनुवादित केल्या. ई टीव्हीसाठी आणि आकाशवाणीसाठीही मला काम करण्याची संधी मिळाली. यातूनच माझा अनुवादकाचा प्रवास वाढत गेला.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाभापासून वंचित

$
0
0

कोल्हापूर : आदिवासी कोळी जमातीमधील महादेव, ढोर, मल्हार कोळी, माना, गोवारी, मन्नेवार, ठाकूर समाज अनुसूचित जमाती सरकारी लाभांपासून वंचित आहेत, अशी माहिती अखिल भारतीय कोळी समाजाचे जिल्हा अध्यक्ष प्रा. बसवंत पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकातून दिली. पत्रकात म्हटले आहे, सर्वच राजकीय पक्षाचे नेते आदिवासींचा निवडणुकीपुरता वापर करून घेतात. निवडून आल्यानंतर समाजासाठी काहीही करीत नाहीत. त्यांना अधिकार दिले जात नाहीत. यामुळे विस्तारीत क्षेत्रातील आदीवासींना वाली कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे.

-----------------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीर माता, पत्नी आठवणींनी गहिवरल्या

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

देशाच्या सीमेवरील इंचइंच भूमीचे रक्षण करताना प्राणाची बाजी लावलेल्या जिल्ह्यातील जवानांच्या वीरमाता, पत्नी गहिवरल्या. शहीद मुलगा, पतीच्या आठवणींनी त्यांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या तरी देशाभिमान चेहऱ्यावर जाणवला. निमित्त होते, सशस्त्र सेना ध्वज दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे. कार्यक्रमात खासदार संभाजीराजे छत्रपती, संयोगिताराजे छत्रपती यांनी ७२ वीर माता, वीर पत्नींचा सन्मान शुक्रवारी केला. टेंबलाई हिल येथील १०९ टेरिटोरियल आर्मी मराठा लाइट इन्फंट्री बटालियन येथे कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

यावेळी खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले, 'शालेय मुलांमध्ये देशाभिमान निर्माण व्हावा आणि सैन्यांविषयी समाजात जागृती होण्यासाठी आमच्या फाउंडेशनतर्फे हा उपक्रम राबविला. सैन्य, देशसेवा या विषयावर घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांत ७२ शाळांतील अडीच हजारांहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले. यातील विजेत्यांना पुण्यातील एनडीए संस्थेत घेऊन जाणार आहे. छत्रपती घराण्याचा आणि मराठा लाइट इन्फंट्री यांचे जवळचे संबंध आहेत.'

टीए बटालियनचे कर्नल आर. एस. लेहल यांच्या पत्नी परमजित म्हणाल्या, 'शालेय वयातच विद्यार्थ्यांनी करिअरची निवड करावी. सैन्य दलात चांगल्या संधी आहेत. देशाची सेवाही करता येते आणि मान, सन्मानही मिळतो. काही कारणांनी सैन्यात येणे अशक्य झाल्यास ज्या क्षेत्रातील करिअरची निवड कराल तिथे प्रामाणिकपणे, निष्ठेने काम केल्यास तीसुद्धा देशाची सेवाच ठरू शकते.'

कर्नल दिलीपसिंग मंडलिक म्हणाले, 'भारत सरकार ७ डिसेंबर सशस्त्र सेना ध्वजदिन म्हणून साजरा करते. प्रत्येक वर्षी या दिवशी शहीद जवानांचे कुटुंबीय, नातेवाइकांना आधार दिला जातो.' शर्वरी जोग यांनी देशभक्तीपर गीत गायिले. कार्यक्रमास सुभेदार मेजर एन. डी. पाटील, प्रवीणसिंह घाटगे, युवराज शहाजीराजे छत्रपती, निवेदिता घाटगे, प्रतिमा सतेज पाटील यांच्यासह विविध शाळांतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मशिन गन, रॉकेट लाँचर्स, मिसाईल लाँचर्स...

$
0
0

फोटो...

कोल्हापूर टाइम्स टीम

मध्यम मशिन गन्स, रॉकेट लाँचर्स, ऑटोमेटिक ग्रेनेड लाँचर्स, जर्मन निर्मित अँटी टँक ग्राईडेड मिसाईल लाँचर्स अशी सैन्यातील अनेक अत्याधुनिक युद्ध शस्त्रे पाहण्यासाठी शालेय विद्यार्थी, शिक्षक, पालक, माजी सैनिकांनी शुक्रवारी गर्दी केली होती. टेंबलाई हिल येथील १०९ टेरिटोरियल आर्मी मराठा लाईट इन्फंट्री बटालियन येथे सशस्त्र सेना ध्वज दिनानिमित्त संभाजीराजे फाउंडेशनतर्फे एक दिवसाचे प्रदर्शन आयोजन केले होते.

बेळगाव, पुणे येथील सैन्य दलातून आणलेली शस्त्रे प्रदर्शनात ठेवण्यात आली होती. १९ स्टॉलवर ३० प्रकारची शस्त्रे होती. शत्रूचा बिमोड करण्यासाठी प्रत्येक शस्त्र कशा पद्धतीने हाताळले जाते, कोणकोणत्या युद्धात वापरले होते याची सविस्तर माहिती जवान विद्यार्थ्यांना देत होते. अतिशय कुतूहलाने शिक्षक, पालक, विद्यार्थी शस्त्रांची माहिती जाणून घेताना दिसले.

प्रदर्शनात ठेवण्यात आलेले मेडियम मशिन गनचे वजन २४ किलो होते. गॅसवर चालणाऱ्या या गनमधून १८०० मीटरवरील शत्रूवर एका मिनिटाला १०० ते २०० गोळ्या झाडता येतात. १८ किलोमीटरच्या अंतरावरील शत्रूंच्या हालचाली तर ८ किलोमीटरवरील हेलिकॉप्टर शोधणारे बॅटेल फिल्ड सव्हाइन्सर रॅडर लक्षवेधी ठरले. स्वीडननिर्मित रॉकेट लाँचर, कार्बाइन मशिन गन, ९ मि.मी. पिस्टॉल, ५.५६ मि.मी. एनसॅस रायफल, मल्टिशूट ग्रेनाइड लाँचर, ७.६२ मि.मी. एके ४७ रायफल, ५१ मि.मी. मॉरटर, लाइट मशिन गन, अंडर बॅरेल ग्रेनेड लाँचर, ७.६२ मि.मी. स्नॅपर रायफल, अॅटोमेटिक ग्रेनाईड सिस्टम अशी शस्त्रे पहिल्यांदाच विद्यार्थ्यांना पाहायला मिळाली.

०००

एक शस्त्र दोन जवान

प्रदर्शनातील एका स्टॉलवर एक आणि दोन शस्त्रे ठेवण्यात आली होती. एका शस्त्रासोबत दोन जवान तैनात होते. एक जवान माहिती देत होता. दुसरा शस्त्राच्या सुरक्षिततेची काळजी घेत होता. मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेत त्यांनी माहिती देऊन विद्यार्थ्यांची मने जिंकली.

०००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नदी स्वच्छतेचा ‘पायलट प्रोजेक्ट’

$
0
0

फोटो अमित गद्रे...

कोल्हापूर टाइम्स टीम

जयंती आणि गोमती या शहरातून वाहणाऱ्या नद्या. मात्र, गेल्या काही वर्षांत त्यांच्या काठावर झालेली अतिक्रमणे, औद्योगिक व घरगुती सांडपाणी मिसळल्याने या दोन्ही नद्यांची अवस्था गटारगंगा झाली. शिवाय ठिकठिकाणच्या अतिक्रमणांमुळे नद्यांना नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. मात्र, या नद्यांना त्यांचे मूळ स्वरूप प्राप्त करून देण्याचा अभिनव प्रकल्प कोल्हापुरातील आर्किटेक्ट आणि इंजिनीअर्सनी हाती घेतला आहे. ज्या ठिकाणाहून जयंती आणि गोमतीमध्ये सांडपाणी मिसळते, त्याच ठिकाणी सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प राबविण्याचा हा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे. त्याचा सविस्तर प्रकल्प आराखडा (डीपीआर) बनविला जाणार आहे.

या प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास जयंती व गोमती नद्यांमध्ये सांडपाणीच मिसळणार नाही अशी त्यांची धारणा आहे. असोसिएशन ऑफ आर्किटेक्टस् अँड इंजिनीअर्सने या प्रकल्पासाठी काम सुरू केले आहे. त्यांना असोसिएशन ऑफ टेक्नोक्रॅट्सचे सहकार्य लाभत आहे. या प्रकल्पाचा डीपीआर तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे. २०१५-१६ मध्ये असोसिएशन ऑफ आर्किटेक्टस अँड इंजिनीअर्सचे तत्कालीन अध्यक्ष राजू सावंत यांच्या अध्यक्षपदाच्या कालावधीत 'जागे व्हा पंचगंगेसाठी...'अभियान सुरू झाले होते. या कालावधीत जयंती नदीच्या उगमापासून पंचगंगा नदीत मिसळण्याच्या प्रवाहापर्यंतचे सर्वेक्षण झाले. सर्वेक्षणानंतर काही काळ काम थंडावले. असोसिएशनचे अध्यक्ष अजय कोराणे व पदाधिकाऱ्यांनी पुन्हा 'जागे व्हा पंचगंगेसाठी...'हाक दिली आहे.

रविवारी असोसिएशनची बैठक, सादरीकरण

संस्थेने पहिल्या टप्प्यात हुतात्मा गार्डने ते रेणुका मंदिरापर्यंतच्या जयंती नाल्याच्या दोन्ही बाजूकडील काठावर स्वच्छतेचा प्रकल्प राबविण्याचे ठरविले आहे. या काठावरून थेट जयंतीमध्ये मिसळणारे सांडपाणी रोखण्यासाठी उपाययोजनांची आखणी करण्यात येणार आहे. नदी अथवा नाल्यात मिसळणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याऐवजी ज्या ठिकाणाहून सांडपाणी नाला व नदीत मिसळते, त्याच ठिकाणी उपाययोजना करावयाची. जेणेकरून प्रदूषणविरहीत पाणी नदी व नाल्यामध्ये मिसळेल. परिणामी प्रदूषणाची तीव्रता कमी होईल, अशा पद्धतीचा आराखडा बनविण्यात येणार आहे. रविवारी (ता.९) आर्किटेक्टस अँड इंजिनीअर्स असोसिएशनची बैठक होत आहे. यामध्ये आराखडा संदर्भात चर्चा, सादरीकरण होणार आहे.

००००००

जयंती नदी स्वच्छतेसाठी डीपीआर बनविणार

जयंती नदीची लांबी १४.७ कि.मी.

कात्यायनी येथे जयंती नदीचा उगम

उगमापासून सात कि.मी.चा प्रवाह फार प्रदूषित नाही

यामध्ये कात्यायनी ते कळंबा जेलपर्यंतच्या प्रवाहाचा समावेश

हुतात्मा पार्क ते रेणुका मंदिरपर्यंत पायलट प्रोजेक्ट राबविणार

०००००

जयंती नाल्याची मूळ ओळख नदी अशी आहे. नदी पूर्ण स्वच्छ करणे जिकिरीचे काम आहे, पण नदीतील पाणी प्रदूषणाची तीव्रता मात्र नक्कीच कमी करता येईल. यासाठी 'अॅक्शन प्लॅन' बनविण्याचे काम सुरू आहे. जयंती नदीत जेथून सांडपाणी मिळते, अशा ठिकाणांचा सर्व्हे केला आहे. रविवारच्या बैठकीत आराखड्याला अंतिम स्वरूप दिले जाईल. पहिल्यांदा पायलट प्रोजेक्टची अंमलबजावणी होईल. नंतर प्रकल्पाची व्याप्ती वाढवली जाईल.

अजय कोराणे, अध्यक्ष, असोसिएशन ऑफ आर्किटेक्टस अँड इंजिनीअर्स

००००

जयंती व गोमती नद्यांसह शहरातून वाहणारे नाले प्रदूषित बनले आहेत. प्रदूषणामुळे पाण्यातील जलचर कमी झाले आहेत. पर्यावरणीयदृष्ट्या हे जलचक्र कायम राहणे महत्त्वाचे आहे. पर्यावरणाची साखळी सुरक्षित राहिल्यास प्रदूषण आपोआप कमी होते. नदी व नाल्यात मिसळणाऱ्या सांडपाण्यावर अगोदरच प्रक्रिया झाली तर प्रदूषणाची तीव्रता कमी होईल. त्या अनुषंगाने सध्या काम सुरू आहे.

वंदना पुशाळकर, आर्किटेक्ट, प्रकल्प समन्वयक

००००

कोल्हापुरात १९७० च्या आसपास ड्रेनेजलाइन अस्तित्वात आली. त्यापूर्वी जयंती नदीतील पाणी स्वच्छ होते. गेल्या काही वर्षांत नदीत मोठ्या प्रमाणात सांडपाणी मिसळल्यामुळे नदीला नाल्याचे स्वरूप लाभले. जयंती नदीत मिसळणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया झाल्यास प्रदूषणाची तीव्रता कमी होईल या विचाराने आर्किटेक्ट, इंजिनीअर्स एकत्र आले आहेत. त्यांना सरकारी अधिकाऱ्यांची साथ मिळत आहे. नजीकच्या काळात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.

राजेंद्र सावंत, अध्यक्ष, असोसिएशन ऑफ टेक्नोक्रॅट्स

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टाकमारे यांची निवड

$
0
0

कोल्हापूर

महाराष्ट्र राज्य भ्रष्टाचार विरोधी जनशक्तीच्या, कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्षपदी श्रेणिक टाकमारे, शहर कार्याध्यक्षपदी युवराज शिंदे तर करवीर तालुका कार्याध्यक्षपदी राजकुमार तुप्पद यांची निवड झाली. संघटनेचे राज्य अध्यक्ष नितीन जगताप यांच्या सूचनेनुसार संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत खाडे, जिल्हा प्रमुख सुशिल भादिंगरे यांनी निवडी जाहीर केल्या. बिंदू चौक येथे नुकतीच संघटनेची कार्यशाळा झाला. यावेळी शिवाजी शिंगे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला उदय सुतार, वैशाली जाधव, साहेबराव गायकवाड, संजीवनी पाडगांवकर, सुमन ढेरे, मंगल खुडे, गीता जरग आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वच्छता, आरोग्यवरून प्रशासन धारेवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातील अखर्चित निधी, ग्रामस्वच्छता योजनेचा उडलेला बोजवारा, आरोग्य आणि शिक्षण विभागातील भोंगळ कामकाजावरून जिल्हा परिषद सदस्यांनी प्रशासनाचे पुरते वाभाडे काढले. विविध प्रश्नी सदस्यांनी थेट अधिकाऱ्यांवर आरोपांच्या फैरी डागल्याने सभागृहाला उत्तरे देता देता प्रशासनाची दमछाक झाली. प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे ग्रामस्वच्छता आणि पुरवठा योजनेचा तब्बल साडेसात कोटी रुपयांचा निधी खर्ची पडला नाही, अशा शब्दांत जिल्हा परिषद सदस्यांनी प्रशासनाच्या ढिम्म कामकाजाचा बुरखा फाडला. तसेच कुठे नेऊन ठेवलाय माझा कोल्हापूर, असा सवाल करत प्रशासनाची भंबेरी उडवली.

जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून पंचगंगा नदी स्वच्छतेच्या उपाययोजना राबविण्यावरून पदाधिकारी व सदस्यांत खटके उडाले. अध्यक्षा महाडिक व सदस्य राहुल आवाडे यांच्यात खडाजंगी उडाली. अध्यक्षा महाडिक म्हणाल्या, 'हायकोर्टाने जिल्हा परिषदेला पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. स्वनिधीतून घनकचरा प्रकल्प, नमामि पंचगंगेसाठी जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतील रक्कम वापरणार असून, २५ लाख रुपयांची तरतूद केली आहे.'

सदस्य राहुल आवाडे, सतीश पाटील, राजवर्धन निंबाळकर, मनोज फराकटे यांनी 'नदी स्वच्छतेच्या उपाययोजनेला आमचा विरोध नाही. मात्र, त्यासाठी स्वनिधीतील रकमेचा विनियोग होऊ नये, परिणामी अन्य योजनेवर परिणाम होईल,' अशी भूमिका मांडली. निंबाळकर यांनी साडेसात कोटी रुपयांचा निधी परत गेल्यावरून प्रशासनाला कात्रीत पकडले. त्यावर सीईओ अमन मित्तल यांनी प्राप्त निधी शौचालय बांधणीसाठी खर्च करण्याचे आदेश होते, निधी परत गेला नाही असा खुलासा केला. सदस्य प्रसाद खोबरे, पांडुरंग भादिंगरे, सुनीता रेडेकर, प्रा. अनिता चौगुले, आदींनी अन्य विषयावरील चर्चेत सहभाग घेतला.

पन्हाळा येथील जिल्हा परिषदेच्या मालकीचे सभागृह भाडेतत्त्वावर देण्याच्या करारावरून जनसुराज्य शक्ती विरुद्ध राष्ट्रवादी व शाहूवाडी तालुक्यातील शिवसेनेच्या सदस्यांत वादविवाद चांगलाच रंगला. राष्ट्रवादीचे सदस्य सतीश पाटील, शिवसेनेचे सदस्य हंबीरराव पाटील यांनी ठेकेदाराने जि.प.सोबतच्या करारानुसार नूतनीकरण केले आहे. ठेका काढून घेतल्यास जिल्हा परिषद अडचणीत येईल. याप्रश्नी राजकीय हेतूने निर्णय घेऊ नये, असे सांगितले. त्याला सभापती सर्जेराव पाटील पेरीडकर, विशांत महापुरे, शिवाजी मोरे यांनी प्रत्युत्तर देताना जि.प.च्या मालकीची विश्रामगृहे भाडेतत्त्वावर चालवायला देऊ नयेत ही सदस्यांची भावना आहे. ठेकेदारांनी जि.प.प्रशासनाची परवानगी न घेता नूतनीकरण का केले, असे विचारत भाडेतत्त्वाला विरोध केला. सीईओ मित्तल यांनी विश्रामगृहासंबंधी चौकशी करण्यासाठी समिती नेमली आहे. अहवाल आला की, सर्वांशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे सांगितले.

०००

नऊ कोटी अखर्चित, सुधारित अंदाजपत्रकांत वाढीव तरतूद

अर्थ समिती सभापती अंबरीश घाटगे यांनी सादर केलेल्या जिल्हा परिषदेच्या २०१८-१९ च्या सुधारित अंदाजपत्रकाला मंजुरी दिली. त्यामध्ये ९,२२,४०,२८९ रुपयांची वाढीव तरतूद केली आहे. अखर्चित रकमेचे सुधारित अंदाजपत्रकात तरतूद केल्याने २०१८-१९ चे सुधारित अंदाजपत्रक ४६,९८,९५,२८९ रुपयांचे झाले. दरम्यान, नव्या तरतुदीमध्ये सर्वसमावेशक व नावीन्यपूर्ण योजनेसाठी एक कोटी २२ लाख रुपयांचा निधी राखीव ठेवला आहे. या निधीसह स्वत:च्या अखत्यारित आणखी एक कोटी रुपयांचा निधीचा विनियोगही आपण करणार असल्याचे अध्यक्षा महाडिक यांनी सभेत स्पष्ट केले.

०००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्ड स्टोअरेज ठरणार मैलाचा दगड

$
0
0

Satish.ghatage@timesgroup.com

Tweet:satishgMt

मटा इम्पॅक्ट ... लोगो

................

कोल्हापूर

मार्केट यार्ड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत होणारे कोल्ड स्टोअरेज मैलाचा दगड ठरणार आहे. या सुविधेमुळे शेतकऱ्यांना शेतीमालाचा दर वाढल्यानंतर विक्री करता येणार आहे. तसेच प्रोसेसिंग युनिटमुळे शेती मालावर प्रक्रियाही होणार असल्याने शेतीमालाला चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे.

बाजार समितीत शेती माल ठेवण्यासाठी कोल्ड स्टोअरेज उभारणीची मागणी अनेक वर्षे केली जात आहे. समितीच्या प्रत्येक निवडणुकीत कोल्ड स्टोअरेज हा प्रमुख मुद्दा असतो. माजी आमदार विनय कोरे यांच्या पुढाकाराने आणि आमदार हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांच्या प्रयत्नातून बीओटी तत्वावर कोल्ड स्टोअरेजची उभारणी होणार आहे. समितीच्या १५ हजार स्क्वेअर फूट जागेवर ३० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार असून शेतकऱ्यांचा ३० टक्के शेतमाल ठेवण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यासाठी बाजार समिती 'ना नफा, ना तोटा' या तत्वानुसार नाममात्र दर ठेवणार आहे. दर मिळाला नाही म्हणून कवडीमोलाने शेती माल न विकता स्टोअरेजमध्ये ठेऊन दर आल्यावर हा माल विकण्याची सोय स्टोअरेजमुळे होणार आहे.

वाई येथे दोन कोल्ड स्टोअरेज पूर्ण क्षमतेने चालवणाऱ्या अशोक शहा आणि त्यांचा मुलगा दर्शक शहा हे हातकणंगले येथील नरंदे (ता. हातकणंगले) येथे त्यांच्या स्वमालकीच्या जागेवर कोल्ड स्टोअरजची उभारणी करणार होते. नरंदे ऐवजी बाजार समितीत कोल्ड स्टोअरेज उभारल्यास जिल्ह्यातील गूळ उत्पादकासह शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल,अशी सूचना विनय कोरे यांनी केल्यावर त्यांनी स्टोअरेज उभारण्यास होकार दिला. तीन वर्षांत हा प्रकल्प उभारण्यात येणार असून त्याला बाजार समिती आणि पणन महामंडळाची परवानगी मिळाली आहे. महापालिकेच्या परवानगीसाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. त्यानंतर स्टोअरेजच्या उभारणीला सुरुवात होणार आहे.

गुळाला भाव नसल्याने उत्पादकांचे नुकसान होते. मार्च ते एप्रिल महिन्यात गुळाचा दर वाढतो. शेतकऱ्यांनी स्टोअरेजमध्ये गूळ ठेवून ज्यावेळी बाजारात दर वाढतो तेव्हा शेतकऱ्याला विकता येणे शक्य होणार आहे. स्टोअरेजमध्ये गूळ ठेवल्यानंतर शेतकऱ्यांला ७० टक्के रक्कम मिळावी यासाठी गूळ तारण ठेऊन बँक शेतकऱ्यांना पैसे देऊ शकेल. त्यासाठी काही बँकांशी बोलणी सुरु आहे. गूळ विक्रीनंतर शेतकरी बँकेचे कर्ज फेडू शकतात. बाजार समितीत गुळाबरोबर कांद्याची बाजारपेठ असल्याने शेतकऱ्यांना कांद्यासह टोमॅटो, फळे, भाजी पाला ठेवता येणार आहे. गूळ आणि फळे तीन ते सात डिग्री सेल्सियस तापमानावर ठेवावी लागतात. कोल्ड स्टोअरेजबरोबर अन्नधान्यावर प्रक्रिया करणारे प्रोसिसिंग युनिटही सुरु होणार आहे. फळे, भाजी स्वच्छ करणे, निवडणे, कापणे, रस करणे या प्रक्रिया करण्याची सोय केली जाणार आहे. ही प्रक्रिया करण्यासाठी ब्लास्ट फ्रिझर यंत्रणेचा वापर केला जाणार आहे. टोमॅटो, फळांचा रस काढून तो फ्रीज करुन योग्य दर आल्यावर शेतकऱ्यांना देशांतर्गत बाजारसह परदेशात विकता येणे शक्य होणार आहे. तसेच केळी, आंबा ही फळे गॅसव्दारे शास्त्रोक्त पद्धतीने पिकवली जाणार असल्याने रासायनिक प्रक्रिया टाळता येणार असल्याने ग्राहकांना आरोग्यदायी फळे मिळू शकतात.

..............

कोट

'बाजार समितीच्या सहकार्याने कोल्ड स्टोअरेज उभारणार आहे. ना नफा, ना तोटा या तत्वानुसार शेतकऱ्यांचा ३० टक्के माल स्टोअरेजमध्ये ठेवणार आहे. ३० टक्क्यांपेक्षा जास्त माल आला तरी शेतकऱ्याच्या मालाला पसंती असेल. या सुविधेमुळे शेतकऱ्यांना फायदा होईल.

अशोक शहा, एसपीडी कोल्ड स्टोअरेज एलएलपी.

.............

कोल्ड स्टोअरेज क्षमता ५००० मेट्रिक टन

जागा १७००० स्क्वेअर फूट

भांडवल ३० कोटी रुपये

शेतकऱ्यांच्या मालाला ३० टक्के जागा

गुळासह फळ, भाजा ठेवण्यास मदत

........................

मटा भूमिका

कोल्ड स्टोअरेजचा पाठपुरावा

महाराष्ट्र टाइम्स कोल्हापूर आवृत्तीच्या सहाव्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित केलेल्या 'मेक इन कोल्हापूर' अंतर्गत सहकारावर 'मटा कॉन्क्लेव'चे आयोजन केले होते. महसूल तथा कृषीमंत्री चंद्रकांत पाटील, दुग्ध व पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांच्या उपस्थितीत झालेल्या सहकार परिषदेत शेतीमालाला दर मिळावा यासाठी 'मटा'च्यावतीने कोल्ड स्टोअरेजची मागणी व्यासपीठावर केली होती. या मागणीनुसार शेती उत्पन्न बाजार समितीने बीओटी तत्वावर कोल्ड स्टोअरेज उभारणीचा प्रारंभ केला आहे. सुमारे ५० कोटी रुपये खर्चून बीओटी तत्वानुसार स्टोअरेजची उभारणी होणार आहे. या सुविधेमुळे शेतीमाल स्टोअरजमध्ये ठेऊन योग्य वेळी दर आल्यावर शेतकऱ्यांना विकता येणे शक्य होणार आहे. तसेच शेतीमालावर प्रक्रिया करणारी यंत्रणा उभारण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांना माल फेकून न देता प्रक्रिया करुन ते प्रॉडक्ट विकता येणे शक्य होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images