Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

अनुराधा काजळेंनी सर केले किलीमांजारो

$
0
0

अनुराधा काजळेंनी सर केले किलीमांजारो

सोलापूर :

जिल्हा परिषदेच्या शिक्षिका अनुराधा काजळे यांनी दक्षिण आफ्रिकेतील किलिमांजारो शिखर सर केले आहे. या शिखरावर जाणाऱ्या त्या सोलापुरातील पहिल्या महिला व जिल्हा परिषदेच्या पहिल्या महिला शिक्षिका ठरल्या आहेत.

आफ्रिकेतील टांझानिया देशातील हे शिखर असून, त्याची उंची समुद्र सपाटीपासून १९३४१ फूट आहे. एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांनी १५ ऑगस्ट २०१४ रोजी हे शिखर सर केले होते. गेल्या सहा वर्षांत सोलापूरमधील जवळपास २५० प्रोफेशनल गिर्यारोहक व ट्रेकर्स आनंद बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झाले आहेत. गेल्या ३ वर्षांत १२ जणांनी आनंद बनसोडेच्या मार्गदर्शनाखाली माउंट किलीमांजारो हे आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर सर केले आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सराव करून अनुराधा काजळे यांनी ही मोहीम यशस्वी केली. ३० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता किलीमांजारो शिखराच्या गिलमन्स पॉइंट या ठिकाणी त्यांनी तिरंगा फडकवला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘भाजपने आश्वासनेपाळली नाहीत’

$
0
0

'भाजपने आश्वासने

पाळली नाहीत'

सोलापूर :

'सत्तेवर येण्यासाठी दिलेली सर्व आश्वासने खोटी ठरल्याने भाजपला त्याचे चटके सोसावे लागतील,' असा इशारा माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिला.

शिंदे म्हणाले, 'चार राज्यांच्या निवडणूक निकालानंतर देशातील भाजपविरोधी आघाडीच्या प्रक्रियेला वेग येईल. देशाचे वातावरण बदल आहे. ज्या पद्धतीने भाजपने देशाला आश्वासित केले, ती सर्व आश्वासने खोटी ठरली आहेत. त्यामुळे त्यांच्यावर लोकांचा विश्वास राहिला नाही. त्यामुळे चटके भाजपला सातत्याने सोसावे लागतील. विधानसभेत यंदा आमच्या जागा निश्चित वाढणार आहेत, असेही शिंदे म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विजय दिवस मराठा लाईट इन्फट्रीला समर्पित

$
0
0

विजय दिवस मराठा लाईट इन्फट्रीला समर्पित

निवृत्त कर्नल संभाजीराव पाटील यांची माहिती

म. टा. वृत्तसेवा, कराड

कराडमध्ये यंदाही दिमाखात विजय दिवस समारोह साजरा केला जाणार आहे. मराठा लाईट इंन्फट्रीला यंदा २५० वर्षे होत असल्याने यंदाचा विजय दिवस मराठा लाईट इंन्फट्रीला समर्पित करण्यात आला आहे. दर वर्षीप्रमाणे यंदाही सैन्य दलाच्या कसरतींसह मोटरसायकलच्या डेअर डेव्हील्सचे खास आकर्षण असणार आहे, अशी माहिती विजय दिवसाचे संस्थापक अध्यक्ष निवृत्त कर्नल संभाजीराव पाटील यांनी दिली.

विजय दिवस समारोह यंदा १४-१६ डिसेंबर दरम्यान विविध कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या तयारी संदर्भातील बैठक प्रांताधिकारी हिंम्मत खराडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्या दरम्यान ते बोलत होते. या वेळी तहसीलदार राजेश चव्हाण, मुख्याधिकारी यशवंत डांगे, सहाय्यक पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्यासह विजय दिवस समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

निवृत्त कर्नल पाटील म्हणाले, 'यंदाच्या विजय दिवस समारोहात नेहमीप्रमाणेच शोभा यात्रा, कराड स्वच्छता दौड, माजी सैनिकांचा मेळावा, यशवंत जीवन गौरव पुरस्कार वितरण यासह १६ डिसेंबरला छत्रपती शिवाजी स्टेडीयमवर मुख्य सैन्यदलाच्या कसरतींचा कार्यक्रम होणार आहे. यंदा सैन्य दलातील जवानांचे डेअर डेव्हील्सचे पथक मुख्य आकर्षण असणार आहे. त्याचबरोबर सैन्यदलाचे श्वान पथक, एसआरपीएफचे पीटीची प्रात्यक्षिक, गुरखा रेजिमेंटचा कुकरी डान्स, बॉम्बे इंजिनीयरींग ग्रुपचे जीम्नॅशीयमचे प्रात्यक्षिक, पुणे येथील पॉवर मोटर ग्रुप, मराठा लाईट इंन्फंट्रीचे लेझीम व मल्लखांबाचे पथक आणि स्थानिक विद्यार्थ्यांचे समूह नृत्य सादर केले जाणार आहे.

४०० महिलांची मोटरसायकल रॅली

यंदाच्या विजय दिवस समारोहाच्या पार्श्वभूमीवर नारी शक्तीला प्रोत्साहन देण्यासाठी १६ डिसेंबरला विजय दिवसाच्या मुख्य दिवशी ४०० महिलांची मोटरसायकल रॅली काढण्यात येणार आहे. रॅलीतील महिला तिरंगी कपडे परिधान करणार आहेत. रॅलीचे नियोजन मिनल ढापरे व सहकारी करीत आहेत.

.........

रेल्वे प्रकल्प बाधित करणार आंदोलन

कराड :

पुणे-मिरज-लोंढा रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरण व विद्युतीकरणासाठी भूसंपादन व मोजणी प्रक्रिया सुरू आहे. मात्र, बाधित शेतकऱ्यांनी रेल्वे विभागाने या पूर्वी संपादित केलेल्या जमिनींच्या जुन्या भूसंपादनाच्या नोंदी दाखवण्याची मागणी केली असता त्या नोंदी न दाखवता रेल्वे प्रशासनाने बेकायदा व बळजबरीने भूसंपादन व जमिनीची संयुक्त मोजणी सुरू केली आहे. रेल्वेने हुकूमशाही पद्धतीने मोजणी चालू ठेवल्यास येत्या सोमवारी, १० रोजी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रेल्वे प्रकल्प बाधित शेतकऱ्यांसह आंदोलन करणार आहेत, अशी माहिती स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे यांनी दिली आहे.

......

रयत अथणीकडून

दोनशे रुपयांचा हप्ता जमा

कराड :

म्हासोली (शेवाळेवाडी, ता. कराड) येथील रयत अथणी सहकारी साखर कारखान्याने गतवर्षी कारखान्यास ऊस दिलेल्या शेतकऱ्यांची उर्वरित थकीत ऊसाची बिले दिली नाहीत तर कारखान्याचे ऊस वाहतूक रोखण्याचा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला होता. प्रशासनाकडून याची गंभीर दखल घेत कारखान्यास तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर दोनशे रुपये जमा करण्याचे आदेश देण्यात आले. त्याची अंमलबजावणी झाली असून, रयत अथणी कारखान्याकडून शेतकऱ्यांच्या खात्यावर थकीत प्रतीटन दोनशे रुपये जमा करण्यात आले आहेत.

..........

रस्त्यांसाठी २८ कोटी

कराड :

कराड तालुक्यातील पंधरा रस्त्यांना प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नती देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता राज्य सरकारने यापैकी दहा मार्गांवरील रस्त्यांच्या नुतनीकरणासाठी तब्बल २८ कोटी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या मध्ये कराड दक्षिणमधील आठ मार्गांचा समावेश असून, त्यासाठी २३ कोटी ९५ लाख रुपये तर कराड उत्तरमधील दोन रस्त्यांसाठी ४ कोटी ३० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे, अशी माहिती श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी दिली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या रस्त्यांना तातडीने भरघोस निधी मंजूर केल्याने, कराड तालुक्यातील रस्त्यांचे जाळे मजबूत होण्यास मदत होणार आहे.

.........

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘दिवसा वीज’पासून शेतकरी अंधारातच

$
0
0

Appasaheb.mali@timesgroup.com
Tweet:Appasaheb_MT

कोल्हापूर :

शेतकऱ्यांना कृषी पंपांसाठी दिवसा वीजपुरवठा मिळावा या उद्देशाने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आखली. मात्र, प्रकल्पासाठी गावपातळीवर सरकारी जमीन मिळण्यात उद्भवणाऱ्या अडचणी, योजनेविषयी शेतकऱ्यांमधील साशंकता, पडिक जमिनीचा अभाव आणि 'पीपीपी' तत्त्वावर होणाऱ्या प्रकल्पासाठी गुंतवणूकदारांचे 'वेट अँड वॉच'ची भूमिका, यामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांत प्रकल्पाला अद्यापही थंडा प्रतिसाद आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ११ आणि सांगली जिल्ह्यात २१ गावांचे प्रस्ताव दाखल आहेत.

दोन्ही जिल्ह्यांत मिळून नऊ गावांत सौरऊर्जा प्रकल्पासाठी जागा मिळाल्या आहेत. मात्र अजून निविदा प्रक्रियेला सुरुवात व्हायची आहे. योजनेंतर्गत निविदा प्रक्रिया राबवून पीपीपी तत्त्वावर प्रकल्प उभारणी होणार आहे. संबंधित कंपनीने तीस वर्षांनंतर संबंधित प्रकल्प महानिर्मितीकडे हस्तांतरण करावयाचा आहे. राज्य सरकारने शेती आणि शेतकरी केंद्रस्थानी ठेवून कृषी पंपांना दिवसा आठ तास वीजपुरवठा करण्यासाठी १४ जून २०१७ पासून 'मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना'सुरू केली. सौरऊर्जेपासून निर्माण झालेली वीज संबंधित गावातील कृषी पंपासाठी करावयाची आहे.

योजनेद्वारे कृषी पंपांना दिवसा वीजपुरवठा नियोजित आहे. शेतकऱ्यांना कमी दरात व सोयीनुसार वीजपुरवठा, मुबलक वीजपुरवठ्यामुळे जास्तीत जास्त जमीन ओलिताखाली येईल असा सरकारचा दावा आहे. सांगली जिल्ह्यात २१ गावांनी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेसाठी प्रस्ताव दाखल केले असले तरी केवळ सात गावांत सौर प्रकल्पासाठी जागा मिळाली आहे. तीन गावांतील जागा प्रस्तावित आहेत. उर्वरित ११ गावांत जागा मिळण्यात अडचणी उद्भवत असल्याचे चित्र आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील महावितरणच्या सात उपकेंद्रांतील रिकाम्या जागेत ५.५ मेगावॅट सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्प प्रस्तावित आहेत. तीन ठिकाणी वेगाने काम सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

०००००

मिरज-जतमध्ये सात ठिकाणी प्रकल्प प्रस्तावित

सांगली जिल्ह्यातील २१ गावांनी सौर कृषी योजनेसाठी प्रस्ताव दाखल केले आहेत. यामध्ये जत तालुक्यातील गावांची संख्या मोठी आहे. यामध्ये जत तालुक्यातील सोन्याळ, उटगी, बोरगी खुर्द, उमदी आणि दरीकोणूर या गावांत सौर कृषी वाहिनी योजनेसाठी जागा उपलब्ध झाली आहे. मिरज तालुक्यातील आरग व सलगर येथे जागा मिळाल्या आहेत. आणखी तीन गावांत जागा मिळणार असून प्रकल्प प्रस्तावित आहेत. यामध्ये तासगाव तालुक्यातील बोरगाव, नागेवाडी आणि जतमधील वाळेखिंडी गावाचा समावेश आहे. सांगली जिल्ह्यात २७ मेगावॅट वीज निर्मिती प्रस्तावित आहे.

.................

कोल्हापुरात प्रस्ताव ११, पाच ठिकाणी प्रकल्प प्रस्तावित

सौर कृषी वाहिनी योजनेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील ११ गावांनी तयारी दर्शविली आहे. मात्र, आजअखेर शिरोळ तालुक्यातील टाकळी व टाकळीवाडी येथील जागा उपलब्ध झाल्या आहेत. या दोन्ही ठिकाणी अनुक्रमे सात व चार मेगावॅट वीजनिर्मितीचे प्रकल्प प्रस्तावित आहेत. याशिवाय हातकणंगले तालुक्यातील तिळवणी व कुंभोज येथे अनुक्रमे दोन व चार मेगावॅट, तर गडहिंग्लज तालुक्यातील भडगावात चार मेगावॅट मिळून २१ मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प प्रस्तावित आहेत. जागा मिळण्याची प्रक्रिया सुरू आहे.

...........

कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांत पडिक जमीनींची उपलब्धता कमी आहे. यामुळे या भागात सौर कृषी वाहिनी योजनेच्या यशस्वितेची शाश्वती कमी आहे. महानिर्मितीने एकाच ठिकाणी जास्त संख्येने सौर प्रकल्प उभारल्यास देखभाल, दुरुस्तीचा खर्च कमी होऊ शकतो. जिथे पाण्याची उपलब्धता कमी, पडिक जमीन जास्त त्या ठिकाणी ही संकल्पना शक्य आहे. सरकारने विदर्भ, मराठवाड्यात या स्वरूपाचा मोठा प्रकल्प उभारून अन्य भागातील शेतकऱ्यांना कमी दरात वीजपुरवठा करावा ही इरिगेशन फेडरेशनची भूमिका आहे.

विक्रांत पाटील, जिल्हाध्यक्ष कोल्हापूर जिल्हा इरिगेशन फेडरेशन

...............

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भिडे गुरुजी आणि चंद्रकांत पाटलांमध्ये गुफ्तगू

$
0
0

कोल्हापूर:

शिव प्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी आज सकाळी राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. कोरेगाव-भीमा हिंसाप्रकरणामुळे वादात सापडेल्या भिडे गुरुजींनी अचानक पाटील यांची भेट घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

भिडे गुरुजी आज पहाटे सव्वा सहा वाजता कोल्हापूरला आले. त्यानंतर त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. या दोघांमध्ये अर्धा तास चर्चा झाली. या भेटीचं नेमकं कारणं समजू शकलं नाही. शिवाय या दोघांनीही या चर्चेचा तपशील देण्यास नकार दिला. पाटील यांनीही मीडियाशी संवाद साधण्यास नकार दिला. त्यामुळे या भेटीमागचं गुढ वाढलं आहे. दरम्यान, कोरेगाव-भीमा प्रकरण आणि शेतातील आंबे खाल्ल्याने मुल होतं असं केलंलं वक्तव्य यामुळे भिडे गुरुजी आधीच वादग्रस्त ठरले आहेत. यापार्श्वभूमीवर पाटील-भिडे यांच्या भेटीमुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. दरम्यान, भिडे गुरुजींचा लक्षतीर्थ वसाहत येथे रविवारी कार्यक्रम होणार आहे. त्यासाठी ते कोल्हापूरात आले असल्याचे सूत्रांनी सांगितलं.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यटनाला आलेल्या पतीने केली पत्नीचा गळा कापून हत्या

$
0
0

सातारा:

महाबळेश्वरमध्ये फिरायला आलेल्या पती-पत्नीमध्ये वाद झाल्याने संतप्त झालेल्या पतीने पत्नीची गळा कापून हत्या केली. त्यानंतर त्यानेही आत्महत्या केल्याने खळबळ उडाली असून पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. हा सगळा प्रकार त्यांच्या ११ वर्षाच्या मुलासमोरच घडल्याने या मुलाला मोठा धक्का बसला आहे.

अनिल सुभाष शिंदे आणि सीमा शिंदे असं या जोडप्याचं नाव आहे. ते पुण्यातल्या धानोरीमधील विश्रांतवाडीमध्ये राहणारे आहेत. ते त्यांचा मुलगा आदित्यसह महाबळेश्वरला फिरायला आले होते. एका हॉटेलमध्ये हे कुटुंब उतरले होते. यावेळी अनिल शिंदे आणि त्यांची पत्नी सीमा शिंदे यांच्यात वाद झाला. हा वाद शिगेला पोहोचल्याने संतप्त झालेल्या अनिलने पत्नीवर चाकूने सपासप वार करून तिची गळा कापून हत्या केली. त्यानंतर त्यानेही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. अनिलला दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. हा सगळा प्रकार आदित्यने पाहिल्याने त्याला धक्का बसला आहे. बाबाने आईवर आधी वार चाकूने वार केले आणि नंतर स्वत: आत्महत्या केली, असं तो सांगतो.

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सीमा शिंदे यांचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. तसेच घटनास्थळावरून चाकू ताब्यात घेतला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून आदित्यचीही चौकशी करण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चांदोली अभयारण्यग्रस्तांशीवनप्रशासनाची सकारात्मक चर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

चांदोली अभयारण्यग्रस्तांच्या प्रलंबित मागण्या सोडविण्यासंबंधी वन प्रशासनासोबत गुरुवारी झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. रमणमळा परिसरातील वन कार्यालयात बैठक झाली. मुख्य वनसंरक्षक डॉ. व्ही. क्लेमेंट बेन, श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

बैठकीत डॉ. पाटणकर यांनी अभयारण्यग्रस्तांच्या मागण्या मांडल्या. बाधित शेतकऱ्यांना पुनर्वसनासाठी पन्हाळा तालुक्यातील जाखले, हातकणंगले, शिरोळ येथील सरकारी जमीन तातडीने देण्यासंबंधी प्रक्रिया करणे, वन विभागाची शेतकऱ्यांना देण्यात येणारी जमीन लागवडीयोग्य करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवून पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी कराड वन विभागाच्या अधिकारी डॉ. विनिता व्यास, अतिरिक्त जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, उपवन संरक्षक हणमंत धुमाळ, श्रमिक मुक्ती दलाचे मारुती पाटील, डी. के. बोडके, प्रकाश बेलवलकर, आनंदा आमकर, आदी उपस्थित होते.

०००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मशानात पार पडला आंतरजातीय विवाह

$
0
0

म. टा. वत्तसेवा, बेळगाव

अंत्यसंस्काराला स्मशानात लोक जमले होते, मृतदेह चितेवर ठेवून त्याला अग्नी दिला, तर दुसरीकडे विवाहाची मंगलाष्टके सुरू होती. कोणत्या चित्रपटातील अथवा कोणत्या वाहिनीवरील मालिकेतील हा प्रसंग नव्हे तर बेळगावच्या सदाशिवनगर येथील स्मशानभूमीत एका ठिकाणी अंत्यसंस्कार सुरू होता, तर दुसरीकडे विवाह सोहळा होत होता. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून अंधश्रद्धा निर्मूलनाच्या उपक्रमांतर्गत स्मशानात आंतरजातीय विवाह पार पडला.

मानव बंधुत्व संघटनेच्या माध्यमातून अंधश्रद्धा दूर करण्यासाठी म्हणून आमदार सतीश जारकिहोळी यांच्या आणि मानव बंधुत्व संघटना यांच्या पुढाकाराने चक्क स्मशानात आंतरजातीय विवाह पार पडला. विवाहाला स्वामीजींनीही उपस्थिती दर्शवली होती. सोपान बाळकृष्ण जांबोटी (रा. तीर्थकुंडये) या दलित युवकाचा हिरेबागेवाडी येथील रेखा चंद्रप्पा गुरवण्णवर या लिंगायत तरुणीशी आंतरजातीय विवाह स्मशानात पार पडला.

आमदार जारकिहोळी यांनी नवदाम्पत्याला पन्नास हजार रुपये रोख आहेर देऊन त्यांचे अभिनंदन केले. आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना सरकारने तीन लाख रुपये मदत द्यावी, अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे आमदार जारकिहोळी यांनी सांगितले.

उपस्थित मंडळींनी अक्षता टाकून वधू-वरांना शुभेच्छा दिल्या. यापूर्वीही आमदार जारकिहोळी यांनी डॉ. आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त स्मशानात वास्तव्य करून उपाहार आणि भोजनही केले होते. आज झालेला स्मशानभूमीतील आंतरजातीय विवाह मात्र चर्चेचा विषय ठरला आहे. माणसाचा अखेरचा प्रवास जेथे संपतो, तेथेच नवजीवनाचा प्रारंभ करण्याचे धाडस दाखवणाऱ्या वधू-वरांचेही कौतुक करावे तेवढे थोडेच.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महाबळेश्वरात पतीकडून पत्नीचा खून

$
0
0

मृत दाम्पत्य पुण्यातील

म. टा. वृत्तसेवा, सातारा

पर्यटनासाठी पुण्याहून आलेल्या पतीने ११ वर्षांच्या मुलासमोरच पत्नीचा खून करून आत्महत्या केली. हे कुटुंब पुण्यातील धानोरी येथील रहिवासी आहे.

अनिल सुभाष शिंदे (वय ३४), त्याची पत्नी सीमा (वय ३०) अशी मृतांची नावे आहेत. अनिल शिंदे पुण्यातील धानोरीतील वडार सोसायटी ऑफिसजवळ राहतो. पत्नी आणि मुलाला घेऊन तो महाबळेश्वरला फिरण्यासाठी आला होता. येथील सुभाष चौकातील एका लॉजमध्ये त्यांनी खोली घेतली होती. बुधवारी दिवसभर फिरल्यानंतर हे कुटुंब रात्री खोलीवर परतले. मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास महिलेच्या किंचाळण्याचा आवाज ऐकून व्यवस्थापक व मालक यांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली. आदित्यने खोलीचा दरवाजा उघडताच आतील दृश्य पाहून सर्वांच्याच काळजाचा थरकाप उडाला. शिंदे पती-पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. मालकाने आदित्यला तेथून दूर नेले आणि पोलिस व रुग्णवाहिकेला फोन केला. मात्र, येथील ग्रामीण रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच अनि आणि सीमा यांचा मृत्यू झाला होता.

आई-बाबांमध्ये मध्यरात्री कडाक्याचे भांडण झाले. संतापाच्या भरात अनिलने सीमाचा गळा चिरला. तेव्हा मी जागा झालो आणि आईला मारू नका, अशी विनंती बाबांना केली. मात्र, ते ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. त्यांनी आईवर वार केले आणि नंतर स्वत:वरही वार करून घेतले, अशी माहिती आदित्यने पोलिसांना दिली.

अनिलने सीमाच्या अंगावर किमान २५ वार केल्याचे पोलिसांनी सांगितले. आदित्यने आपला मामा अनिल पवार यांचा नंबर पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी त्यांच्याशी संपर्क साधला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोकुळ 'मल्टिस्टेट' 'सायलेंट'वर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ (गोकुळ) मल्टिस्टेट करण्याच्या ठरावाला गोकुळ बचाव कृती समितीने सर्वसाधारण सभेत विरोध केला. सभेनंतर मल्टिस्टेटच्या निर्णयाला हायकोर्टात आव्हान देण्याची आणि हा विषय विधानसभेच्या दोन्ही सभागृहांत उपस्थित करण्याची घोषणा विरोधकांकडून झाली; पण तब्बल दोन महिने उलटूनही विरोधकांकडून कोणतीच पावले न उचलल्याने लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा विषय 'सायलेंट मोड'वर ठेवल्याची चर्चा सुरू आहे.

गोकुळ ताब्यात घेण्यासाठी गेली वीस वर्षे विरोधकांकडून प्रयत्न होत आहे. गेल्यावेळच्या निवडणुकीत माजी आमदार महादेवराव महाडिक यांना विरोध करत आमदार सतेज पाटील यांनी निवडणुकीत मोठे आव्हान निर्माण केले. पण त्यांच्या गटाकडून निवडून आलेले संचालक थेट सत्ताधाऱ्यांच्या गोटात गेले. भविष्यात गोकुळच्या निवडणुकीत धोका उत्पन्न होऊ नये यासाठी सत्ताधारी माजी आमदार महादेवराव महाडिक, पी. एन. पाटील यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाने गोकुळ संघ मल्टिस्टेट करण्याचा निर्णय घेतला. परजिल्हा व राज्यातील दूध संस्थांना सभासद करून मल्टिस्टेटच्या माध्यमातून संघ कायमस्वरूपी आपल्या ताब्यात राहावा यासाठी ठराव केल्याचा आरोप विरोधकांनी केला.

मल्टिस्टेटला आमदार सतेज पाटील, हसन मुश्रीफ, चंद्रदीप नरके, माजी आमदार संपतराव पवार-पाटील यांच्या नेतृत्वाखालील गोकुळ बचाव कृती समितीच्या वतीने जिल्ह्यात मल्टिस्टेटविरोधात रण पेटवले. हा ठराव मंजूर करण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी कंबर कसली. दूध संस्थांचे ठराव आपल्या बाजूने करण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी साम, दाम, दंड, भेद नीतीचा अवलंब केला. सभेची वेळ, तारीख, स्थळ बदलणे, गुप्त मतदान घेण्यासाठी विरोधकांनी कोर्टात धाव घेतली.

३० सप्टेंबर रोजी ताराबाई पार्क येथील गोकुळच्या मुख्य कार्यालयात सर्वसाधारण सभा झाली. पोलिसांच्या बंदोबस्तामुळे परिसराला छावणीचे रूप आले होते. सत्ताधारी संचालक मंडळाने रात्रीच ठरावदारांना सभास्थळी आणले होते, तर दुसरीकडे सभेच्या दिवशी विरोधकांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले. प्रत्यक्ष सभा सुरू झाल्यावर सत्ताधारी व विरोधक सभेत आमने-सामने आले. चपलांचा पाऊस पडला. गोंधळातच अवघ्या तीन मिनिटांत मल्टिस्टेटचा ठराव मंजूर झाला. सत्ताधाऱ्यांनी हा ठराव कायदेशीर, तर विरोधकांनी बेकायदेशीर ठरवला. त्यानंतर मल्टिस्टेटच्या निर्णयाविरोधात कोर्टात जाण्याचा इशारा विरोधकांनी दिला.

सभेपूर्वी व सभेनंतर काही दिवस विरोधकांचा जो आवेश होता, तो कमी झाल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या दोन महिन्यांत मल्टिस्टेटविरोधात हायकोर्टात जाण्याच्या विरोधकांच्या हालचाली मंदावल्या आहेत. हिवाळी अधिवेशनाचा कमी कालावधी झाल्याने मल्टिस्टेटचा प्रश्न उपस्थित करण्यासाठी आमदार पाटील व नरके यांना संधी मिळाली नाही. त्यातच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजू लागले आहेत. या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडी करून एकत्रित निवडणूक लढविणार आहे. गोकुळमध्ये सत्ताधारी व विरोधकांत दोन्ही पक्षांचे नेते आहेत. दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ पक्षनेतृत्वाने मल्टिस्टेट प्रश्नावर सबुरीचे धोरण घ्यायला सांगितले आहे. त्यामुळे मल्टिस्टेटचा प्रश्न सायलेंट मोडवर ठेवल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

०००००००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘दौलतच्या जमीन विक्रीला प्रतिसाद नको’

$
0
0

चंदगड : शेतकऱ्यांची ऊसबिले, कामगांराची देणी देण्यासाठी प्रशासनाने चंदगड तालुक्यातील दौलत सहकारी साखर कारखान्याच्या जमीन विक्रीसाठीचा जाहीर लिलाव शुक्रवारी (ता.७) होणार आहे. चंदगडच्या शेतकऱ्यांची अस्मिता असेलल्या दौलतच्या जमीन घेण्यासाठी कोणीही हजर राहू नये, असे आवाहन दौलत बचाव कृती समितीचे अध्यक्ष अॅड. संतोष मळवीकर यांनी केले आहे.

दौलत कारखान्याची जमीन ही शेतकरी सभासदांची हक्काची जमीण असून तीच विकूण त्याच शेतकऱ्यांची देणी देणे चुकीचे आहे. साखर आयुक्तांच्या आदेशाने चंदगड तहसीलदारांनी दौलतची जमीन विक्री करून शेतकऱ्यांची देणी देण्याची नोटीस काढली आहे. त्याच आदेशाद्वारे शुक्रवारी दौलतच्या जमिनीचा लिलाव होणार आहे. याअगोदर सभासद शेतकरी, कामगार यांनी जमीनविक्रीला विरोध केला आहे. तोंडी व लेखी सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. पण प्रशासन कायद्याप्रमाणे कारवाई करत असल्याने दौलतच्या जमीन विक्रीला कोणीच प्रतिसाद देऊ नये. यावेळी प्रदीप पवार, राजेंद्र पाऊसकर यांच्यासह सदस्य उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरक्षण काढून घेतल्यास मराठा समाजाचा उद्रेक

$
0
0

सकल मराठा समाजाचा इशारा

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आरक्षणप्रश्नी मराठा समाजाने ५८ मूक मोर्चे, ४२ व्यक्तींचे बलिदान आणि १६ हजारांवर झालेले खटले दाखल होऊन लोकशाही मार्गाने लढा दिला आहे. राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाला मागास ठरवले आहे. कष्टाने मराठा समाजाने कायदेशीर आरक्षण मिळवले आहे. तरीही काहीजण कोर्टात जाऊन आरक्षण काढून घेण्याचा प्रयत्न करत असतील तर मराठा समाजाचा उद्रेक होईल', असा इशारा सकल मराठा समाजाचे समन्वयक नगरसेवक प्रा. जयंत पाटील आणि दिलीप पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला.

दिलीप पाटील म्हणाले, 'मुंबई हायकोर्टात अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याविरोधात याचिका दाखल केली आहे. कोर्टाने याबाबत १० डिसेंबरला दोन्ही पक्षांची सुनावणी ठेवली आहे. राज्य सरकार मराठा आरक्षणाप्रश्नी सक्षमपणे आपली बाजू मांडणार आहे. अॅड. सदावर्ते यांची याचिका पूर्णपणे चुकीच्या तथ्यावर आधारित आहे. मराठाद्वेषाने पछाडलेल्या लोकांनी अॅड. सदावर्ते यांचा चेहरा पुढे केला आहे. राज्य सरकार ७२ हजार पदांसाठी मेगा भरती करणार आहे. तसेच पुढील दोन महिन्यात वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया सुरु होणार आहे. त्याचा लाभ मराठा समाजातील लोकांना होऊ नये यासाठी याचिका दाखल करण्यात आली आहे. कोर्टात होणाऱ्या विरोधाला तोंड देण्यासाठी मराठा वकील, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते प्रयत्न करत आहेत.'

प्रा. जयंत पाटील म्हणाले, 'मराठा आरक्षण कोर्टात टिकावे यासाठी राज्य सरकारने सतर्क रहावे. तसेच आरक्षणाची बाजू मांडण्यासाठी कोर्टात सक्षमपणे उभे राहिले पाहिजे. आरक्षण टिकले पाहिजे यासाठी राजकीय नेते व मराठा समाजाने सजग राहिले पाहिजे. भविष्यात एखाद्यावेळी राज्य सरकारचा दृष्टीकोन बदलला तर कोर्टात मराठा समाजाचे म्हणणे मांडण्यासाठी सकल मराठा समाजाकडून कायदेशीर लढा दिला जाईल.' पत्रकार परिषदेला राजीव लिंग्रस, सचिन तोडकर, स्वप्निल पार्टे, उमेश पोवार, विजय जाधव आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निधनवृत्त...

$
0
0

विशाल जाधव

कोल्हापूर : राजारामपुरी येथील विशाल आनंदराव जाधव (वय ३८) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, बहीण असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठा जातीच्या दाखल्यासाठीसरकारी आदेशाची प्रतिक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मराठा समाजाला महसूल प्रशासनातर्फे जातीचे दाखले देण्याची प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही. यामुळे तालुका तहसील कार्यालयात आणि गावपातळीवरील तलाठी, सर्कलकडे दाखल्यांसाठी चौकशीसाठी रीघ लागत आहे. दरम्यान, 'सामाजिक न्याय विभागातर्फे दाखला देण्यासंबंधी मार्गदर्शक सूचनांचा सरकारी आदेश आलेला नाही. हा आदेश आल्यानंतर तालुका पातळीवरील प्रशासनास सूचना दिल्या जातील', असे जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी 'महाराष्ट्र टाइम्स'शी बोलताना सांगितले.

सरकारने आठवड्यापूर्वी मराठा आरक्षणाची घोषणा केली. यामुळे शिक्षण आणि नोकरीत १६ टक्के आरक्षण मराठा समाजाला मिळणार आहे. नव्या आरक्षणानुसार विविध विभागांतील रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात विविध विभागनिहाय रिक्त जागा, बिंदू नामावली निश्चित केली जात आहे. दुसऱ्या बाजूला नोकरीसाठी प्रयत्न करणारे आणि शिक्षण घेणारे विद्यार्थी मराठा जातीचा दाखल काढण्यासाठी धडपडत आहेत. महसूल प्रशासनाशी संपर्क साधून विचारणा करीत आहेत. मात्र दाखल्यासंबंधी प्रक्रियेची नेमकी माहिती मिळत नसल्याचे चित्र आहे. तालुका पातळीवर तहसीलदार, प्रांताधिकारी हे सरकारकडून अद्याप आदेश आलेले नाहीत, असे सांगत आहेत. यामुळे दाखल्यांसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.

----------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फसवणुकीच्या धक्क्याने नावलीतील एकाचा मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, वारणानगर

नावली (ता. पन्हाळा) येथील सुभाष पांडुरंग पाटील (वय ४९) यांचा स्वत:च्या बोलेरो गाडी विक्रीच्या व्यवहारात फसवणूक झाल्याचा धक्का सहन न झाल्याने बुधवारी कोल्हापुरात उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी कोडोली पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत माहिती अशी : मृत सुभाष पोवार यांनी त्यांची बोलेरो गाडी अनिल कांबळे (रा.डोणोली) यांना दोन लाख ७० हजार ५०० रुपयांना विकली होती. या व्यवहारापोटी अॅडव्हान्सपोटी रक्कम दिल्यावर कांबळे याने उर्वरित रकमेचा चेक देऊन गाडी रितसर नावावर करण्यासाठी तसेच बँकेचे कर्ज प्रकरण करण्यासाठी पोवार यांच्या टी. टी. फॉर्मवर सह्या घेऊन कांबळे याने स्वत:च्या नावे खरेदी केलेली गाडी पुन्हा दुसऱ्याला विकली तसेच या व्यवहारासाठी दिलेला चेक रोख पैसे आणून देतो म्हणून नेला आणि पैसेही दिले नाहीत. पैसे मागायला गेल्यावर दमदाटी करीत गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. या धक्क्याने पोवार यांना छातीत दुखू लागल्याने १ डिसेंबरला कोल्हापुरात उपचारास दाखल केले होते. मात्र, बुधवारी त्यांचा मृत्यू झाला. पोवार यांचा मुलगा नीलेश पोवार याने याप्रकरणी कोडोली पोलिसांत फसवणूकप्रकरणी उत्तम चितांमणी कांबळे, अनिल कांबळे (दोघेही रा. डोणोली) व नामदेव काटकर (रा. मलकापूर पैकी निलेवाडी ता. शाहूवाडी) या तिघांविरोधात फिर्यादी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘गुरुदत्त’च्या जनसुनावणीस शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त पाठिंबा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

टाकळीवाडी (ता. शिरोळ) येथील श्री गुरूदत्त साखर कारखान्याच्या आसवनी प्रकल्पाच्या पर्यावरणविषयी जनसुनावणीस कारखाना परिसरातील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला. या इथेनॉल प्रकल्पातून होणाऱ्या प्रदूषणाबाबत ग्रामस्थांत गैरसमजूत होती. या प्रकल्पातून कोणतेही प्रदूषण होणार नाही, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष माधवराव घाटगे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

गुरुदत्त शुगर्स साखर कारखाना कार्यस्थळावर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने पर्यावरणविषयी जनसुनावणी घेण्यात आली. यावेळी निवासी जिल्हाधिकारी संजय शिंदे, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी लोहाळकर, उपप्रादेशिक अधिकारी प्रशांत गायकवाड, विभागीय अधिकारी मोरे, कुरुंदवाडचे पोलिस निरीक्षक चंद्रकांत निरावडे प्रमुख उपस्थित होते.

यावेळी प्रकल्पासंदर्भात शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्‍नांना कारखान्याचे अध्यक्ष घाटगे यांनी उत्तरे दिली. पेट्रोल व डिझेलच्या किमती कमी करण्यासाठी केंद्र सरकारने साखर कारखान्यांमध्ये इथेनॉलनिर्मितीस चालना दिली आहे. यामुळे इथेनॉलनिर्मिती प्रकल्पाची देशात मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे. इथेनॉल प्रकल्पातून होणाऱ्या प्रदूषणाबाबत ग्रामस्थांत गैरसमज होता. अत्याधुनिक तंत्रज्ञान असणारी मशिनरी येथे बसविण्यात येणार आहे. प्रकल्पातून एक थेंबही पाणी व स्पेंटवॉश बाहेर पडणार नाही. त्यामुळे शेतजमिनीस कोणताही धोका नसल्याचे घाटगे यांनी स्पष्ट केले. आसवनी प्रकल्पातील टाकाऊ स्पेंटवॉशचा इंधन म्हणून वापर केला जाणार असून त्याद्वारे वीजनिर्मिती केली जाणार आहे. गुरुदत्त कारखाना शेतकरी, कामगार व परिसराच्या विकासाचा केंद्रबिंदू असून या प्रकल्पास शेतकऱ्यांनी पाठिंबा दिल्याबद्दल घाटगे यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मेकर ग्रुप’ प्रकरणी आज गुन्हे

$
0
0

संचालकांवर फौजदारीसह हायकोर्टात याचिका

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'मेकर ग्रुप इंडिया कंपनीने कोल्हापूर परिसरातील ४५ हजार गुंतवणूकरदारांना पन्नास कोटींचा गंडा घातला आहे, या कंपनीच्या चेअरमनसह सतरा संचालकांवर शुक्रवारी फौजदारी करण्यात येणार आहे', अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते नाथाजीराव पोवार व संजय सुतार यांनी पत्रकार बैठकीत दिली. दरम्यान, या संचालकांची मालमत्ता जप्त करण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल केल्याचेही त्यांनी सांगितले.

पोवार यांनी सांगितले की, 'आठ वर्षांपूर्वी रमेश वळसे पाटील यांच्यासह सतरा संचालकांनी पुण्यात मेकर ग्रुपची स्थापना केली. ही कंपनी अनेक राज्यात कार्यरत होती. कंपनीकडे शेती,भूखंड, पवन चक्क्यावरील वीज प्रकल्प, जैविक उत्पादने असल्याचे सांगून गुंतवणूकदारांना भूलथापा मारल्या. सिनेव्यवसाय, गाय प्रकल्प, पोल्ट्री फार्म, कोकणात आंब्याची बाग असल्याच्या थापा मारतानाच लवकरच शिक्षणसंस्था काढणार असल्याचेही सांगण्यात आले. कंपनीकडे कोट्यवधींचा निधी आहे, तुम्ही देखील भागीदार व्हा, रक्कम गुंतवा, पाच वर्षात दामदुप्पट रक्कम मिळवा असे सांगून शंभर कोटींपेक्षा अधिक रक्कम जमा केली. त्यातील काही रक्कम परत केली, मात्र नंतर उर्वरित सर्व रक्कम घेऊन संचालक गायब झाले आहेत.'

या संचालकांनी पन्नास कोटींचा गंडा घातल्याचा आरोप करून पोवार म्हणाले, 'कंपनीने सर्व व्यवहार रोखीने केले. पण नंतर जे चेक दिले, ते न वटता परत येत आहेत. गुंतवलेली रक्कम परत मिळावी यासाठी आता ठेवीदार एजंटांकडे तगादा लावत आहेत. संचालक गायब झाल्याने एजंटही अडचणीत आले आहेत. राज्यात पंधरा हजारांवर तर कोल्हापूर परिसरात दोन हजारांवर एजंट आहेत. यामुळे आता ठेवीदार व एजंट यांची कृती समिती स्थापन करण्यात आली आहे. दोघांनी मिळून संचालकांकडून वसुलीचे प्रयत्न सुरू करण्यात येणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सर्व सतरा संचालकांवर फौजदारी करण्यात येणार आहे. यासाठी शुक्रवारी सकाळी एजंट व ठेवीदारांचा टाऊन हॉल बागेत मेळावा बोलवण्यात आला आहे. तेथून शाहूपुरी पोलिस ठाण्यात जाऊन गुन्हा नोंदवला जाईल. याशिवाय या सर्व संचालकांची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश द्यावेत यासाठी हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे.'

..............

चौकट

दोन संचालक कोल्हापुरातील

या कंपनीचे जे संचालक आहेत, त्यांचे राजकीय नेत्यांशी जवळचे संबंध आहेत. त्यामुळे कारवाईत हस्तक्षेप होण्याची शक्यता आहे. म्हणून पोलिसांनी कोणताही दबाव न घेता त्यांना तातडीने अटक करावी यासाठी शुक्रवारी पोलिस अधीक्षक व विशेष पोलिस महानिरीक्षकांना एक शिष्टमंडळ भेटणार आहे. कंपनी पुण्यातील असली तरी त्याची शाखा कोल्हापुरात होती, दोन संचालकही या जिल्ह्यातील आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरोपीची पोलिसांशी झटापट, गोळीबार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पोलिसांबरोबर झालेल्या झटापटीतून झालेल्या गोळीबारात सराईत गुंड आणि गंभीर गुन्ह्यातील फरारी आरोपी विजय उर्फ काळबा रामभाऊ गायकवाड (वय ४२, रा. टेंबलाई फाटक, कोल्हापूर) याच्या तोंडात गोळी लागून तो गंभीर जखमी झाला. गुरुवारी सायंकाळी चारच्या सुमारास महाडिक माळ येथे ही घटना घडली. गायकवाड आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांत ही झटापट झाली. यावेळी पिस्तुलातून दोन गोळ्या झाडल्या गेल्या. झटापटीत दोन पोलिसही जखमी झाले आहेत. सुमारे अर्धा तास सुरू असलेल्या या प्रकाराने महाडिक माळ परिसरात थरार उडाला होता.

दरम्यान, गायकवाडवर सीपीआरमध्ये शस्त्रक्रिया सुरु असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सांगितले. तर पोलिसांनी त्याचा एन्काउंटर करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप गायकवाडच्या नातेवाईकांनी केला. त्यामुळे सीपीआरमध्ये वातावरण तणावपूर्ण बनले होते. फॉरेन्सिक लॅबकडून आलेल्या अहवालानंतर गोळी कुणाकडून झाडली गेली, ते समजेल, पोलिसांच्यावतीने सांगण्यात आले.

विजय उर्फ काळबा गायकवाड याच्यावर खंडणी तसेच लहान मुलांच्या अपहरणाचे चार गंभीर गुन्हे गांधीनगर पोलिसांत दाखल आहेत. या प्रकरणात तो फरारी आहे. त्याच्यावर आणखी १२ गुन्हे आहेत. महाडिक माळ परिसरातील तारा ऑईल मिलजवळ त्याची सासुरवाडी आहे. गुरुवारी तो सासऱ्याच्या वर्षश्राद्धासाठी पत्नी आणि मुलासह येणार असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचला होता. पोलिस साडेतीन वाजता घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी दारात दहा ते पंधरा महिला बसल्या होत्या. काळबा घरात झोपला असल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांच्या तीन तुकड्यांनी लागलीच कोम्बिंग ऑपरेशन सुरु केले. तीन घरात घुसून त्याचा शोध सुरु केला. त्याची चाहूल लागताच काळबा एका घरातून पळून जाण्याचा प्रयत्न करु लागला. मात्र पोलिसांनी त्याला ओढत बाहेर आणले. त्याच्या हातात दोन पिस्तूल होत्या. त्या काढून घेण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरु केले. मात्र त्याने 'तुला खल्लास करणार, उडविणार,' अशी धमकी पोलिसांना दिली. पोलिसांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. दोघा पोलिसांनी त्याला मागून पकडले. मात्र त्यांच्या तावडीतूनही तो सुटला. अन्य पोलिसांसोबत त्याची झटापट सुरु झाली. त्याने पोलिसांवर पिस्तूल रोखले. त्याचवेळी एका कॉन्स्टेबलने मागच्या बाजूने त्याच्या अंगावर उडी घेतली. या झटापटीत त्याच्याजवळील पिस्तुलातून गोळी उडाली आणि त्याच्याच तोंडात घुसून बाहेर पडली. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. घटनास्थळी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी भेट दिली.

.. .. .. ..

घटनाक्रम

सायंकाळी ३ : ३० वाजता : काळबा सासरवाडीत आल्याची माहिती

४ .०० : पोलिस महाडिक माळ येथे पोहोचले

४ वा. ५: काळबा सासरवाडीच्या दारात आला

४ वा ६ : त्याने पोलिसांवर पिस्तूल रोखले

४ वा ८ : पोलिस आणि काळबा याच्यात झटापटी

४ वा. १० : पोलिसांकडून रोखण्याचा प्रयत्न

४ वा. ११ : झटापटीत काळबा जखमी

४ वा. ४५ : सीपीआरमध्ये दाखल, उपचार सुरु

५ : १० : नातेवाईकांची गर्दी, मोठा बंदोबस्त

५ : २० : जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांची भेट

.. .. .. .. ..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘प्रधानमंत्री आवास’साठी अतिक्रमणे नियमित !

$
0
0

लोगो : मटा विशेष

Appasaheb.mali@timesgroup.com

Tweet:Appasaheb_MT

कोल्हापूर : मोठा गाजावाजा करत सुरू झालेल्या प्रधानमंत्री आवास योजनेची महापालिका व नगरपालिका क्षेत्रात धीम्या गतीने अंमलबजावणी सुरू आहे. जिल्ह्यातील दहा नगरपालिका क्षेत्रातील चार प्रकल्पांतर्गत ८५७, तर महापालिका हद्दीत १५०० हून अधिक घरकुलांना मंजुरी मिळाली आहे. दरम्यान 'सर्वांसाठी घर २०२२' या धोरणाला चालना देण्यासाठी सरकारी जमिनीवरील निवासी वापरातील १५०० चौरस फुटांपर्यंतच्या भूखंडावरील अतिक्रमण नियमित करण्याबाबतचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय, महापालिका आणि नगरपरिषदांना आदेश प्राप्त झाले आहेत.

विभागीय आयुक्त कार्यालयाने महापालिकेकडे सरकारी जागेवरील अतिक्रमण, झोपडपट्ट्यांची माहिती मागविली आहे. महापालिकेच्या विभागामार्फत माहिती संकलित केली जात आहे. केंद्र व राज्य सरकारने '२०२२ पर्यंत सर्वांना घर' ही महत्त्वाकांक्षी मोहीम हाती घेतली आहे. केंद्राने, राज्यातील ३८२ शहरांत योजना राबविण्यास मान्यता दिली आहे. शहरी भागात लाभार्थ्यांची निवड स्वत:च्या मालकीची जागा व वार्षिक उत्पन्न या निकषाच्या आधारे होते. दुसरीकडे ज्यांच्याकडे स्वत:ची जागा नाही, अथवा पात्र लाभार्थी महसूल विभागाच्या अखत्यारितील सरकारी जमिनीवर अतिक्रमण केले असल्यास त्यांना या योजनेंतर्गत सरकारी जमीन उपलब्ध करून दिली जाणार आहे. शिवाय अतिक्रमणे नियमित झाल्यानंतर सर्वांसाठी घर योजनेंतर्गत घर बांधणीसाठी लाभार्थ्यांना अडीच लाखांचे अनुदान मिळेल. २०२२ पर्यंत महापालिका परिसरात २५१७८ घर बांधणी प्रस्तावित आहे.

नगरपालिका क्षेत्रात २१,७६६ घरकुलांचे उद्दिष्ट

जिल्ह्यातील नगरपालिका क्षेत्रात २०२२ पर्यंत २१ हजार ७६६ घरकुलांचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत इचलकरंजी, गडहिंग्लज, कागल आणि कुरुंदवाड नगरपालिका हद्दीतील चार प्रकल्प मिळून ८५७ घरकुलांना मंजुरी मिळाली. यामध्ये इचलकरंजीत सर्वाधिक ७१३, गडहिंग्लजमध्ये ४१, कागलमध्ये ४६ तर कुरुंदवाडमध्ये ५७ घरकुलांचा समावेश आहे. इचलकरंजीत दोन प्रकल्प आहेत. त्यापैकी ५२ घरांचे बांधकाम सुरू आहे. नगरपालिकांचे आणखी आठ प्रकल्प मान्यतेसाठी केंद्रीय स्तरावरील कमिटी व संनियत्रंण समितीच्या मान्यतेच्या प्रतीक्षेत आहेत. यामध्ये जयसिंगपूरमधील दोन, मुरगूड, वडगाव, गडहिंग्लज, पन्हाळा, कुरुंदवाड आणि हुपरी येथील एका प्रकल्पाचा समावेश आहे. आठ गृहप्रकल्पांत मिळून ८५७ घरे प्रस्तावित आहेत.

००००

'नियमित'साठी सरकारी अधिकाऱ्यांची समिती

महापालिका व 'अ' वर्ग नगरपरिषदांच्या हद्दीतील सरकारी जमिनीवरील अतिक्रमणे नियमितीकरणासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापण्याचे नगरविवकास विभागाचे आदेश आहेत. यामध्ये जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख, महापालिका आयुक्त अथवा त्यांनी सुचविलेला अधिकार, नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांचा समावेश असेल. 'ब' व 'क' वर्ग नगरपरिषदा व नगरपंचायत हद्दीतील सरकारी जमिनीवरील अतिक्रमणे नियमित करण्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उपअधीक्षक भूमी अभिलेख व नगरपरिषद नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांचा समावेश असेल.

००००

नगरपालिकानिहाय प्रस्तावित घरकुल योजनेवर दृष्टिक्षेप

नगरपालिका उद्दिष्ट प्राप्त अर्ज

इचलकरंजी १३,२००० १२,६४९

जयसिंगपूर १७३४ २१६७

मलकापूर २०७ ५५

मुरगूड ४१२ ५३६

वडगाव १२६९ १२७५

गडहिंग्लज ९७४ ४०८

कागल १५९६ ८५६

पन्हाळा ४१२ १७४

कुरुंदवाड ८४२ ६१५

हुपरी ११२० १७६

०००

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत प्रत्येकाला घर मिळावे म्हणून सरकारने योजनेत लवचिकता आणली आहे. अर्ज करताना नागरिक परिपूर्ण सादर करत नाहीत. सोबत आवश्यक कागदपत्रे जोडत नसल्यामुळे प्रस्तावात त्रुटी उद्भवतात. परिपूर्ण अर्ज सादर केल्यास नागरिकांना जास्तीत जास्त फायदा होईल.

नितीन देसाई, जिल्हा प्रशासन अधिकारी

००००

सरकारचे आदेश काय आहेत....

सरकारी जागेवर निवासासाठी अतिक्रमणे केलेल्या भूखंडांचे नियमितीकरण

एक जानेवारी २०११ पूर्वीची ही बांधकामे असावीत.

१५०० चौरस फुटांच्या आतील भूखंडावरील बांधकामेच नियमित होणार

भोगवटदार वर्ग २ अंतर्गत ही बांधकामे नियमित

५०० चौरस फुटांपेक्षा अधिक जमीन असल्यास शुल्क भरावे लागणार

ना विकास क्षेत्र जागा, डोंगर उताराची जमीन, सीआरझेडच्या जमिनीवर अतिक्रमण असल्यास ते नियमित होणार नाही.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जि.प.ची आजची सभा गाजणार

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्या कामकाजाची चौकशी, औषध घोटाळा चौकशी अहवाल, सदस्यांना निधी वाटपातील असमानता यावरुन शुक्रवारी (ता.७) जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा गाजण्याची चिन्हे आहेत. काही दिवसांपूर्वी अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी आयोजित केलेल्या बैठकीतून सत्ताधारी सदस्यांनी काढता पाय घेतल्याच्या पार्श्वभूमीवर सभेत त्याचे पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत.

गेल्या सर्वसाधारण सभेत औषध घोटाळा आणि शिक्षणाधिकाऱ्यांच्या कामकाजावरुन गदारोळ झाला होता. आज होणाऱ्या सभेमध्ये औषध घोटाळा चौकशीचा अहवाल सभागृहासमार मांडण्याची शक्यता आहे. या घोटाळयातील काही अधिकाऱ्यांनी अन्यत्र बदली झाली. चौकशी अहवालावरुन कारवाई होण्याअगोदर संबंधित अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यामुळे हा विषय सभागृहात उपस्थित होणार आहे. पन्हाळा येथील विश्रामगृह भाडेतत्वावर चालवायला देण्याचा विषय व धोकादायक व नादुरुस्त शाळा दुरुस्तीचे प्रस्ताव प्रलंबित आहेत. समाजकल्याण, पशुसंवर्धन, कृषि विभागातील वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यत पोहचल्या नाहीत. सदस्याकडून हा विषय सभेत मांडण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images