Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

मंदाकिनी कुलकर्णी यांचे निधन

0
0

मंदाकिनी कुलकर्णी यांचे निधन

सोलापूर :

मंदाकिनी सीताराम कुलकर्णी (वय ७५) यांचे निधन झाले. स्वामी दर्शन मासिकाच्या त्या संस्थापक संपादिका होत्या. सोमवारी सकाळी बाळे स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अक्कलकोट स्वामी दर्शन त्रैमासिकचे पत्रकार नंदकुमार कुलकर्णी, सतीश कुलकर्णी आणि अविनाश कुलकर्णी, अंजली संदीप कुलकर्णी यांच्या त्या मातोश्री होत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘तुकाराम मुंढेंनासाखर आयुक्त करा’

0
0

'तुकाराम मुंढेंना

साखर आयुक्त करा'

कराड :

'सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची गेल्या तेरा वर्षांत तब्बल बारा वेळा बदली करण्याची नामुष्की राज्य सरकारवर आली आहे. त्यांच्या सारख्या प्रामाणिक, कर्तव्यदक्ष व स्वच्छ प्रतिमेच्या अधिकाऱ्याची पुणे प्रादेशिकच्या साखर आयुक्तपदी पूर्णवेळ अधिकारी म्हणून नियुक्ती करा,' अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी केली आहे. जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांना निवेदन देऊन त्यांनी ही मागणी केली आहे.

..........

खून प्रकरणी एकास कोठडी

कराड : नवीन कवठे (ता. कराड) येथील युवक वैभव आनंदराव घार्गे याचा दोरीने गळा आवळून खून केल्याप्रकरणी उंब्रज पोलिसांनी एकाला अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता येत्या गुरुवारी, सहा डिसेंबरपर्यंत त्याला पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. पवन उर्फ प्रवीण शामराव साळुंखे (रा. नवीन कवठे) असे खूनप्रकरणी अटक करण्यात आलेल्याचे नावे आहे. राजू उर्फ भिकोबा मारुती मसुगडे हा अद्यापही फरार आहे.

..

मोकाशी यांच्या जयंतीनिमित्त स्पर्धा

कराड :

मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठानचे संस्थापक स्व. दादासाहेब मोकाशी यांची ६९वी जयंती गुरुवारी, सहा नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता प्रतिष्ठानच्या शैक्षणिक संकुलामध्ये साजरी होणार आहे. या जयंतीच्या निमित्ताने वक्तृत्व, निबंध आणि चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेमध्ये कराड शहर व परिसरातील विद्यालयांतील इयत्ता आठवी वी ते दहावी पर्यंतच्या मुले व मुलींना सहभाग घेता येईल. स्पर्धेमधील विजेत्यास रोख रक्कम व प्रमाणपत्र तसेच सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे प्रशासकीय प्रमुख विलासराव चौधरी यांनी येथे दिली आहे.

वक्तृत्व स्पर्धेचा विषय संस्काराने माणूस घडतो, नोकरीत गुंतलेली माझी आई, का वाढतात वृद्धाश्रम, सावधान निसर्ग बदलोतय, आजचा युवक आणि व्यसनाधीनता, असे आहेत. निबंध स्पर्धेचे विषय महाराष्ट्र संताची भूमी, पाणीटंचाई एक ज्वलंत समस्या, जंगल वाचवू पाणी वाचवू, आईची थोरवी, बापरे! केवढी ही महगाई, असे आहेत. चित्रकला स्पर्धेचे विषय स्मरणचित्र-कृषी प्रदर्शन, ग्रामीण भागातील जत्रा, आपले सण व आपले उत्सव, स्वच्छ भारत अभियान तर संकल्पचित्र-फुलदाणीसाठी डिजाईन, आकाश कंदील, टेबल क्लॅाथसाठी डिझाईन, असे विषय आहेत. अधिक माहितीसाठी मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठानशी संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवृत्त अभियंत्यांचे रंगले ‘गेट टुगेदर’

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

निवृत्त अभियंता मंडळाच्या वार्षिक स्नेहसंमेलन गाणी, नकला, नृत्याचे सादरीकरण अशा कार्यक्रमांनी रंगले. कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. वयाची साठी ओलांडलेल्या या अधिकाऱ्यांनी विविध कलाविष्कार सादर करत धमाल केली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतरत्न सर विश्वैश्वरय्या यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कुंडीतील तुळशीच्या रोपाला पाणी घालून स्नेहसंमेलनाचे उद्घाटन झाले. याप्रसंगी निवृत्त अभियंता मंडळाचे अध्यक्ष अण्णासाहेब माळी यांच्या हस्ते क्रीडाक्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल खेळाडू आर्य अभिजित मोरे, अर्जुन अभय माळी, अनिष अभय माळी यांना मानचिन्ह देऊन गौरवले.

सांगलीच्या नगरसेविका कल्पना कोळेकर, ऑलिपिंयाड गणित व विज्ञान विषयाच्या परीक्षेत आयुष्य अमरसिंह भोसले व दिव्यांगासाठी विशेष व्हीलचेअरचे डिझाइन केल्याबद्दल ऋषिकेश गायकवाड यांचा सत्कार झाला. शिवाय अमृत महोत्सव साजरा केलेले मंडळाचे सभासद शंकरराव अतिग्रे, श्रीधर नाईक यांचा सपत्नीक सत्कार झाला. यावेळी इतिहास अभ्यासक डॉ. अमर अडके यांचे 'सह्याद्रीच्या गिरिशिखरावरुन'या विषयावर व्याख्यान झाले. पुण्याच्या बंडा जोशी यांचा 'हास्यपंचमी'एकपात्री प्रयोग झाला.

दुपारच्या सत्रात कलाविष्काराचा कार्यक्रम रंगला. अजित घळसासी, अरविंद नार्वेकर, तनिष्क नायकवडे, पूजा मगदूम, लता व सुरेश अनगोळकर, पुष्पलता यादव, रेखा कदम, शोभा खाडिलकर आदींनी सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतला. मराठी व हिंदी सिनेमातील गाणी, नकला, एकपात्री प्रयोग सादर केले. नृत्य दिग्दर्शिका स्नेहा पवार, सुनीता मोरे, साधना पवार, नयना आंबेकर, सपना तिवारी, शुभांगी पाटील, अनुजा नाईक, प्रतिभा पाटील, जयसिंह यादव, उदय वाठारकर, राजन कदम, भरत दोडवाड यांनी विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम सादर केला. सुभाष पोफळे यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष चंद्रकांत पवार यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संभाजीराजे फाउंडेशन करणार ध्वजनिधी संकलन

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

छत्रपती संभाजीराजे फाऊंडेशनच्यावतीने सशस्त्र ध्वजदिन जागृतीसाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले असून देशासाठी बलिदान दिलेल्या जवानांच्या वीरपत्नीचा सत्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिली.

फाऊंडेशनच्यावतीने 'क्नो यूवर आर्मड् फोर्सेस, सॅल्युट सपोर्ट अॅन्ड स्टँड' हा उपक्रम आयोजित केला आहे. शुक्रवारी (ता. ७) टेंबलाई हिल येथील १०९ टी. ए. बटालियन येथे वीर जवानांच्या वीरपत्नींचा गौरव करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास श्रीमंत शाहू छत्रपती, खासदार संभाजीराजे छत्रपती टी ए बटालियनचे कर्नल आर. एस. लेहल, उपस्थित राहणार आहेत. तसेच सैनिकांच्या जीवनावर रेखाटलेल्या चित्रांचे आणि विविध शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन विद्यार्थ्यांसाठी आयोजित केले आहे.

इंग्रजांच्या विरोधात स्वातंत्रयुद्ध पुकारलेल्या चिमासाहेब महाराजांना अभिवादन करताना बुधवारी (५) रोजी भवानीमंडप, जुना राजवाडा येथे पथनाट्य स्पर्धेचे आयोजन केले आहे. फाऊंडेशनच्यावतीने महाविद्यालयीन विद्यार्थांच्या सैनिकांच्या जीवनावरील निबंधलेखन स्पर्धा, पथनाट्य स्पर्धा, घोष वाक्य लेखन, देशभक्तीपर गीत गायन या स्पर्धा आयोजित केल्या आहेत. स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांसाठी पुणे खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षक प्रबोधिनी (एनडीए) येथे सहलीचे आयोजन केले आहे. ४५० विद्यार्थ्यांना एनडीए सहलीचा लाभ होणार आहे.

देशात १९४९ पासून सात डिसेंबर हा दिवस सशस्त्र सेना ध्वज दिन म्हणून साजरा केला जातो. भारतीय सैनिक, नौसैनिक आणि हवार्इ दलातील सैनिकाच्या शौर्याचे स्मरण करतो आणि आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी जीवाची पर्वा न करता प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्या आपल्या सैनिकांना सलाम करतो. त्यासाठी ध्वजनिधी गोळा केला जातो. नागरिकांनी कृतज्ञतेच्या भावनेतून नागरिकांनी ध्वज दिनासाठी देणगी द्यावे, असे आवाहनही संभाजीराजेंनी केले. यावेळी रविराज निंबाळकर, उदय घोरपडे, माजी नगरसेवक विनायक फाळके, शाहीर शहाजी माळी, आझाद नायकवडी आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘इस्लाममध्ये सर्व धर्मियांचा सन्मान’

0
0

कोल्हापूर: 'हजरत मुहम्मद पैगंबर हे केवळ मुस्लिम सुमदायाचे प्रेषित नसून मानव जातीसाठी आदर्श जीवन पद्धती देणारे व विश्वशांतीसाठी जीवन अर्पित करणारे जगाचे नायक होते. त्यांनी सर्व धर्मियांना समान न्याय दिला. साहजिकच मुस्लिम समाज इतर धर्मियांचा आदर करणे आपले भाग्य समजतो.' असे प्रतिपादन मुस्लिम पंचायत राज्य महाराष्ट्र राज्य या सघटनेचे राज्याध्यक्ष हाजी फारुक एम. कुरेशी यांनी केले. ईद-ए-मिलाद (पैगंबर जयंती) निमित्त मुस्लिम पंचायत, राष्ट्रीय सेवा समिती, एम एज्युकेशन काउंन्सिलतर्फे तिरंगा महल येथे कार्यक्रम आयोजित केला होता. याप्रसंगी ते बोलत होते. उर्दू भाषा पदविका परिक्षेत प्राविण्य मिळवल्याबद्दल डॉ. क्षीतिजा बर्वे, अॅड. रिहाना बेगम सिधनाळे यांचा सत्कार करण्यात आला. अॅड. जी. एन. महात, हाजी खलिल पटेल यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला सिकंदर हजारी, एम. ए. कुलकर्णी, रहिमतुल्ला शेख, उमरशरीफ मेस्त्री, हुसेन नदाफ आदी उपस्थित होते. प्रास्ताविक अॅड. मुनाफ मणेर यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाटील यांचा सत्कार

0
0

कुडित्रे: पाडळी खुर्द (ता. करवीर) येथे आयोजित पश्चिम महाराष्ट्र शरीरसौष्ठव स्पर्धेत वारणा कोडोलीचा शुभम जाधव टायटलधारक , भिकाजी कांबळे बेस्ट पोझरचा मानकरी ठरला. खुल्या गटात गौतम शिर्केने प्रथम क्रमांक पटकावला. विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरवण्यात आले. स्पर्धेचे संयोजन स्पार्टन बॉइज, डॉ. के. एन. पाटील युवा मंच व के १ जीम फुलेवाडी यांनी केले होते. उद्योगपती व दिवंगत भगवानराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक, सामाजिक कार्यकर्ते डॉ. के. एन. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार पी. एन. पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, सभापती राजेंद्र सूर्यवंशी, वीरेंद्र मंडलिक, नगरसेवक राहुल माने, शारंगधर देशमुख, शामराव सूर्यवंशी, सुरेश सूर्यवंशी, कृष्णा धोत्रे, विजय पोवार, सरदार पाटील, सरदार सावंत, शिवछत्रपती पुरस्कार विजेते भारतश्री बिभिषण पाटील आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवाजी अर्धपुतळ्याचे सुशोभिकरण पूर्णत्त्वाकडे

0
0

फोटो आहे

कोल्हापूर टाइम्स टीम

ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी निवृत्ती आडूरकर यांच्या नावाने प्रसिद्ध असलेला निवृत्ती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्ध पुतळा परिसर सुशोभीकरण अंतिम टप्प्यात आले आहे. १५ दिवसांत उद्घाटन समारंभ होणार आहे. पुतळ्यासभोवती कोरीव दगडी बांधकाम, कारंजे आणि आकर्षक लाइट इफेक्ट दिला आहे. त्यामुळे संपूर्ण चौक आणि महाराजांचा अर्धाकृती पुतळा एलईडी व स्पॉट लाइटने उजाळून निघणार आहे.

शिवाजी पेठेचे प्रवेशद्वारावर असलेल्या निवृत्ती चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धपुतळा आहे. पुतळ्यासमोर असलेल्या जुन्या तोफेमुळे ऐतिहासिक लूक निर्माण झाला आहे. मात्र गेल्या काही वर्षात आयलँडची दुरवस्था झाली होती. पुतळ्याच्या मागे असलेल्या विद्युत खांबावर शुभेच्छा फलक लावण्यात येऊ लागल्याने पाठीमागून पुतळाच दिसत नव्हता. पुतळ्यामागील विद्युत खांब हटवण्याबरोबर आयलँड व संपूर्ण चौकाचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्यानुसार प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. सुशोभीकरणातंर्गत प्रत्यक्ष जागेवर दगडाचे कोरीव काम करून सभोवती बांधकाम करण्यात आले. पुतळ्यासमोर दोन व मागे एक असे तीन कारंजे बसवण्यात आले आहेत. जुन्या तोफेची डागडुजी करण्यात आली आहे. पुतळ्याशेजारी असणाऱ्या राजमुद्रेवर कारंजातील पाणी सोडण्यात येणार आहे. पुतळ्यावर असलेल्या छत्रीला सोन्याचा मुलामा देण्यात आला आहे. पुतळ्याजवळ उभारण्यात येणाऱ्या स्तंभाचे काम आठवड्यात पूर्ण करण्यात येणार आहे. काम पूर्ण झाल्यानंतर एलइडी व स्पॉट लाइटची रोषणाई पुतळा व चौकात केली जाणार आहे. सुशोभिकरण अंतिम टप्प्यात आल्याने उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे. तीन दिवसांच्या कार्यक्रमात हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर रायगड व सिंधुदुर्ग किल्ल्यांवरील विहिरीतून पाणी आणून जलाभिषेक करण्यात येणार आहे.

सुशोभिकरणासाठी एकूण ३५ लाखांचा आराखडा तयार करण्यात आला. आमदार राजेश क्षीरसागर यांच्या माध्यमातून मंत्री दिवाकर रावते यांच्याकडून २० लाख तर शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्या प्रयत्नातून महापालिकेच्या फंडातून दहा लाखांचा निधी उभा केला असल्याचे रविकिरण इंगवले यांनी सांगितले.

भव्य एलईडी बोर्ड

शिवाजी अर्धपुतळ्याच्या मागे वाढदिवस, नामकरण सोहळा, श्रद्धांजलीचे फलक लावले जात होते. त्यामुळे चौकाचे स्वरुपच बदलून जात होते. असे प्रकार बंद करण्यासाठी पुतळ्याच्या मागे बारा बाय बारा आकाराचा भव्य एलईडी बोर्ड बसवण्यात येणार असून बोर्डवर 'राजा शिवछत्रपती' नाव झळकणार आहे. पुतळ्याच्या कोणत्याही बाजूने हे नाव दिसणार असून त्यामुळे अनधिकृत फलकांनाही अटकाव बसणार आहे.

'गेल्या काही वर्षांत कोल्हापूरच्या पर्यटनात वाढ झाली आहे. त्याचबरोबर शिवाजी पेठेबाबत राज्य व राज्याबाहेरील लोकांना कुतूहल राहिले आहे. त्यासाठी महाराजांचा अर्ध पुतळा आणि निवृत्ती चौकाचे सुशोभिकरण करण्याचा निर्णय घेतला.

रविकिरण इंगवले, माजी उपमहापौर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गूळप्रश्नी मुंबईत बैठक घेण्याचे आश्वासन

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्यावतीने गूळ दरात सातत्याने होणाऱ्या घसरणीबद्दल पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदन देण्यात आले. गूळ उद्योगाला सरकारने मदत करावी, अशी मागणी करण्यात आली. गुळाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी मुंबईत पुढील आठवड्यात सहकार मंत्री सुभाष देशमुख, कृषी मूल्य आयेगाचे सदस्य पाशा पाटील यांच्यासमवेत बैठक घेतली जाईल, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले.

पालकमंत्र्यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे , 'जिल्ह्यात सुमारे १२०० गुऱ्हाळघरे होती. परंतु मजूरांच्या कमतरतेमुळे गुऱ्हाळघरे बंद पडली आहेत. सध्या २५० ते ३०० गुऱ्हाळघरे सुरु आहेत. त्यावर ५० ते ६० हजार लोकांची उपजिविका सुरु आहे. कोल्हापूर ही गुळाची मोठी बाजारपेठ असून ९० टक्के गूळ गुजरातला निर्यात होतो. सध्या गुळाचा दर कोसळल्याने सरकारने गूळ खरेदी करुन अन्य व्यावसायिकांना पुरवावा.' गुळाची आधारभूत किंमत निश्चित करावी तसेच गुळाच्या उपपदार्थांची निर्मिती करावी, आदी मागण्याही करण्यात आल्या. गुळाचे दर पडल्याने प्रति क्विंटल एक हजार ते बाराशे रुपये अनुदान द्यावे अशी मागणी गूळ उत्पादकांकडून होत आहे, याकडे पालकमंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले. शिष्टमंडळात माजी सभापती कृष्णात पाटील, उपसभापती अमित कांबळे, भगवान काटे, विलास साठे, दशरथ माने, सदानंद कोरगांवकर आदींचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उद्धव ठाकरेंची २४ रोजी पंढरपुरात सभा

0
0

उद्धव ठाकरेंची २४ रोजी पंढरपुरात सभा

सोलापूर :

आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीची तयारी म्हणून २४ डिसेंबर रोजी पंढरपूर येथे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेला सुमारे ५ लाख शिवसैनिक उपस्थित राहतील, अशी तयारी करण्यात येत आहे, अशी माहिती शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गणेश वानकर यांनी दिली.

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तयारीला लागले आहेत. राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात जाहीर सभा घेऊन सेनेला पोषक वातावरण निर्माण करण्याच्या अनुशंगाने ते जोमाने कामाला लागले आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राज्यात जास्तीत जास्त जागा जिंकून आणण्यासाठी त्यांचे दौरे सुरू झाले आहेत. दरम्यान, या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी मुंबईत मंगळवारी राज्यस्तरीय बैठक बोलावली होती. या बैठकीला महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांचे जिल्हाप्रमुख, पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी दौऱ्याच जाहीर केला आहे. त्यानुसार २४ डिसेंबर रोजी पंढरपुरात जाहीर सभा घेऊन निवडणुकीचे रणशिंग फुंकण्याचे त्यांनी जाहीर केले आहे. पंढरपुरात आल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सर्वप्रथम विठूरायाचे दर्शन घेतील, त्या नंतर शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत, असे जिल्हा प्रमुख गणेश वानकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुशीलकुमार शिंदेंचेसोलापुरात मॉर्निग वॉक

0
0

सुशीलकुमार शिंदेंचे

सोलापुरात मॉर्निग वॉक

सोलापूर :

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे गेल्या तीन दिवसांपासून सोलापुरात आहेत. शिंदे यांनी मंगळवारी सकाळी सोलापुरातील गुलाबी थंडीत हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर सवंगड्यांसमवेत मॉर्निंग वॉक केले. डोक्यावर निळ्या-काळ्या रंगाची टोपी, लाल रंगाचा फुल टी-शर्ट, फिक्कट पिवळ्या रंगाची व्यायामाची पॅन्ट आणि पायात बूट, असा पेहराव असलेले शिंदे आनंदी चेहऱ्याने मित्रांसोबत गप्पा मारत मैदानावर फेऱ्या मारताना सोलापूरकरांना दिसले. मॉर्निंग वॉक झाल्यानंतर शिंदे आणि सहकारी सर्वजण मिळून जुन्या मंजू हॉटेलमध्ये गेले, तेथे गप्पा रंगल्या. चहापान आणि अल्पोपहार घेताना सोलापुरातील आठवणींना त्यांनी उजाळा दिला. या वेळी कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, मात्र आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेंनी मॉर्निंग वॉक होता, अशीच चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

शिंदे म्हणाले, 'मी दर रोज चालण्याचा व्यायाम केल्यामुळे आरोग्य निरोगी राहते. बाहेरगावी असलो तरी व्यायाम करतोच. शिवाय आजही ताशी पाच किलोमीटर वेगाने चालतो, तासभर चालून मजा आली. आजही मी अर्धा तास ट्रेडमिलवर चालतो.'

सोलापुरात आल्यानंतर सुशीलकुमारांसमवेत सर्वच क्षेत्रातील मंडळींचा कायम मोठा गोतावळा असतो. २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत भाजपचे खासदार शरद बनसोडे यांच्याकडून शिंदे यांचा पराभव झाला. मागील चार ते साडेचार वर्षांत विद्यमान खासदार बनसोडे यांच्याकडून सोलापूरकरांची उपेक्षाच झाली. आता आगामी लोकसभा निवडणुकीला काही महिने बाकी असताना सुशीलकुमारांचे सोलापूर दौरे वाढले आहेत. शिवाय छोट्या-मोठ्या कार्यक्रमांना ते उपस्थित राहत आहेत. सुशीलकुमार शिंदे लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत, असे राजकीय जाणकारांचे निरीक्षण आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एटीएम कटरने फोडले

0
0

एटीएम कटरने फोडले

सातारा

सातारा शहराच्या उपनगरातील बारावकरनगर व अमरलक्ष्मी बसस्टॉप येथे मंगळवारी पहाटे दरोडेखोरांनी एटीएम सेंटर कटरने फोडून तब्बल १५ लाख रुपयांची रोकड लंपास केली. दोन्ही ठिकाणी या घटना घडल्याने परिसर हादरून गेला असून, नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. कोडोली व संभाजीनगर दोन्ही उपनगर आहेत. मंगळवारी पहाटे दरोडेखोर आले होते. या दरोडेखोरांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम सेंटर फोडले. या मधील एका एटीएम सेंटरमधून १५ लाख रुपये चोरट्यांच्या हाती लागले. आणखी रक्कम वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. पहाटे चोरी होत असल्याचे परिसरातील नागरिकांच्या लक्षात आले. मात्र, तोपर्यंत दरोडेखोर रक्कम लुटून पसार झाले.

.........

माण, खटावमध्ये तीव्र पाणीटंचाई

म. टा. वृत्तसेवा, सातारा

सातारा जिल्ह्यातील माण, खटाव, कोरेगाव व फलटण तालुक्यातील ३९ गावे व १९९ वाड्या वस्त्यांमधील ५०४८८ नागरिक व १२७६० जनावरांची तहान ३५ टँकरवर भागवावी लागत आहे. डिसेंबरमध्ये पाण्यासाठी अशी अवस्था असेल तर पुढील पाच महिन्यांत अतिशय भयावह परिस्थिती निर्माण होणार आहे.

जिल्ह्याच्या पूर्वेला पावसाने हुलकावणी दिली आहे. खरीप हंगाम वाया गेला आहे. रब्बी हंगामात ज्वारी व बाजरीची पेरणी झालीच नसल्याने उत्पन्नाची आशाच नाही. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे. सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासूनच माण, खटाव व कोरेगाव तालुक्यातील काही भागात पाण्याची भीषण टंचाई जाणवू लागली आहे.

माण तालुक्यातील पांगरी, बिजवडी, बिदाल, तोंडले, वडगांव, येळेवाडी, जाधववाडी, मोगराळे, पाचवड, राजवडी, पिंपरी, पळशी, भालवडी, खडकी, भाटकी, रांजणी, वरकुटे-म्हसवड, कारखेल, संभूखेड, बनगरवाडी, महाबळेश्‍वरवाडी, शेनवडी, विरळी, पानवण, परकंदी, टाकेवाडी, बोडके, कुकुडवाड, पुकळेवाडी, अशी ३० गावे व शेळकेवस्ती, कापूसवाडी, लांडेवाडी, आटपाडकरवस्ती, बागलवाडी, जमालवाडी, लांडगोबा, मोरदरा, मुलाणीवस्ती, खरातवस्ती, बिरोबानगर, बेरडकी, जाधववस्ती, वाघाडी, चाफेमळा, लोंखडेवस्ती, धुळाची मळवी, बिरोबा मंदिर परिसर, जाधव वस्ती, निंबाळकर वस्ती, रामोशी आळी, चव्हाण वस्ती, आमजाई, सिद्धनाथ मळा, डांगेवाडी, सत्रेवाडी, कदमवस्ती, इनामवस्ती, खरातवस्ती, काटकर बळीपवस्ती या १८९ वाड्यामधील ४५९८४ नागरिकांना व ६९०४ जनावरांना २७ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

खटाव तालुक्यातील गारवडी, मांजरवाडी, मोळ, मांडवे, पाचवड, गारूडी या सहा गावांना व आवळे पठार गावठाण, कठरेवस्ती, पाटील वस्ती अशा सात वाड्यांमधील ३२६२ नागरिकांना ५ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. कोरेगाव तालुक्यातील चिलेवाडीत एका टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. फलटण तालुक्यातील नाईकबोमवाडी, गोळेगाव (पुनर्वसित) या २ गावांना व ३ वाड्यांना २ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. खंडाळा, वाई, पाटण, जावली, महाबळेश्‍वर, सातारा व कराड तालुक्यात पुरेसा अवकाळी पाऊस झाल्याने टँकरद्वारे पाणीपुरवठा बंद करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत देण्यात आली.

परतीच्या पावसाने हुलकावणी दिली असल्याने माण, खटाव, कोरेगाव, फलटण, खंडाळा व अन्य तालुक्यात टँकर वाढण्याची शक्यता आहे. माणमध्ये ५, खटाव १, कोरेगाव १, अशा एकूण ७ विहिरींचे अधिग्रहण प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

...........

..........

म्हसवडमध्ये सिद्धनाथाचा ८ रोजी रथोत्सव

सातारा

म्हसवड येथील सिद्धनाथाचा रथोत्सव शनिवारी, ८ डिसेंबर रोजी होणार आहे. एकादशीच्या दिवशी रथोत्सवासाठी रथाचे पूजन करून रथाचे तोंड पूर्व दिशेस करण्यात आले. रथोत्सवासाठी येथील रथाचे पूजन करून रथाचे तोंड पूर्व दिशेला वळवण्यात येते. रथाचे पूजन श्रीमंत विजयसिंह राजेमाने, माजी नगराध्यक्ष श्रीमंत अजितराव राजेमाने, श्रीमंत बाळासाहेब राजेमाने, श्रीमंत पृथ्वीराज राजेमाने, नाथाचे सालकारी सिद्धेश्वर गुरव आदींच्या हस्ते रथाचे पूजन करण्यात आले. श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी यांचा हळदी समारंभ दिवाळी पाडव्यादिवशी व विवाह सोहळा तुळशीविवाह दिवशी पार पडला. या नंतर विवाहानंतरची वरात म्हणजेच रथोत्सव शनिवारी, ८ डिसेंबर रोजी होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माण, खटावमध्ये तीव्र पाणीटंचाई

0
0

माण, खटावमध्ये तीव्र पाणीटंचाई

म. टा. वृत्तसेवा, सातारा

सातारा जिल्ह्यातील माण, खटाव, कोरेगाव व फलटण तालुक्यातील ३९ गावे व १९९ वाड्या वस्त्यांमधील ५०४८८ नागरिक व १२७६० जनावरांची तहान ३५ टँकरवर भागवावी लागत आहे. डिसेंबरमध्ये पाण्यासाठी अशी अवस्था असेल तर पुढील पाच महिन्यांत अतिशय भयावह परिस्थिती निर्माण होणार आहे.

जिल्ह्याच्या पूर्वेला पावसाने हुलकावणी दिली आहे. खरीप हंगाम वाया गेला आहे. रब्बी हंगामात ज्वारी व बाजरीची पेरणी झालीच नसल्याने उत्पन्नाची आशाच नाही. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे. सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासूनच माण, खटाव व कोरेगाव तालुक्यातील काही भागात पाण्याची भीषण टंचाई जाणवू लागली आहे.

माण तालुक्यातील पांगरी, बिजवडी, बिदाल, तोंडले, वडगांव, येळेवाडी, जाधववाडी, मोगराळे, पाचवड, राजवडी, पिंपरी, पळशी, भालवडी, खडकी, भाटकी, रांजणी, वरकुटे-म्हसवड, कारखेल, संभूखेड, बनगरवाडी, महाबळेश्‍वरवाडी, शेनवडी, विरळी, पानवण, परकंदी, टाकेवाडी, बोडके, कुकुडवाड, पुकळेवाडी, अशी ३० गावे व शेळकेवस्ती, कापूसवाडी, लांडेवाडी, आटपाडकरवस्ती, बागलवाडी, जमालवाडी, लांडगोबा, मोरदरा, मुलाणीवस्ती, खरातवस्ती, बिरोबानगर, बेरडकी, जाधववस्ती, वाघाडी, चाफेमळा, लोंखडेवस्ती, धुळाची मळवी, बिरोबा मंदिर परिसर, जाधव वस्ती, निंबाळकर वस्ती, रामोशी आळी, चव्हाण वस्ती, आमजाई, सिद्धनाथ मळा, डांगेवाडी, सत्रेवाडी, कदमवस्ती, इनामवस्ती, खरातवस्ती, काटकर बळीपवस्ती या १८९ वाड्यामधील ४५९८४ नागरिकांना व ६९०४ जनावरांना २७ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

खटाव तालुक्यातील गारवडी, मांजरवाडी, मोळ, मांडवे, पाचवड, गारूडी या सहा गावांना व आवळे पठार गावठाण, कठरेवस्ती, पाटील वस्ती अशा सात वाड्यांमधील ३२६२ नागरिकांना ५ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. कोरेगाव तालुक्यातील चिलेवाडीत एका टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. फलटण तालुक्यातील नाईकबोमवाडी, गोळेगाव (पुनर्वसित) या २ गावांना व ३ वाड्यांना २ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. खंडाळा, वाई, पाटण, जावली, महाबळेश्‍वर, सातारा व कराड तालुक्यात पुरेसा अवकाळी पाऊस झाल्याने टँकरद्वारे पाणीपुरवठा बंद करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत देण्यात आली.

परतीच्या पावसाने हुलकावणी दिली असल्याने माण, खटाव, कोरेगाव, फलटण, खंडाळा व अन्य तालुक्यात टँकर वाढण्याची शक्यता आहे. माणमध्ये ५, खटाव १, कोरेगाव १, अशा एकूण ७ विहिरींचे अधिग्रहण प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिव्यांगाना प्रमाणपत्राचे वाटप

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

'जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील लाभार्थी दिव्यांगाना यूडीआयडी कार्ड व दिव्यांग प्रमाणपत्र उपलब्ध करुन देण्यासाठी लवकरच मेळाव्याचे आयोजन केले जाईल. कार्ड व प्रमाणपत्रामुळे दिव्यांगाना सरकारी सेवेचा लाभ मिळण्याचा मार्ग सुलभ बनेल.'असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी केले.

जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषदेतर्फे प्रातिनिधीक स्वरुपात दिव्यांगाना युडीआयडी कार्ड व प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. जि.प.तर्फे नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत दिव्यांग उन्नती अभियान राबविण्यात येत आहे. अभियानाच्या पहिल्या टप्प्यात ४५ हजार दिव्यांगाची नोंद झाली आहे. यापैकी २६ हजार दिव्यांगाकडे प्रमाणपत्र नसल्याचे सामोरे आले होते. अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात पाचगाव येथे शिबिर घेण्यात आले. ऑनलाइन फॉर्म भरून सीपीआरमध्ये तपासणी केली. त्यापैकी काही जणांना सोमवारी प्रमाणपत्राचे वितरण झाले. यावेळी उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, बांधकाम समिती सभापती सर्जेराव पाटील पेरीडकर, समाजकल्याण समिती सभापती विशांत महापुरे, महिला व बालकल्याण समिती सभापती वंदना मगदूम, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, गटनेते अरुण इंगवले, पक्षप्रतोद विजय भोजे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत अडसूळ उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्धव ठाकरेंची २४ रोजी पंढरपुरात सभा

0
0

उद्धव ठाकरेंची २४ रोजी पंढरपुरात सभा

सोलापूर : आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीची तयारी म्हणून २४ डिसेंबर रोजी पंढरपूर येथे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेला सुमारे ५ लाख शिवसैनिक उपस्थित राहतील, अशी तयारी करण्यात येत आहे, अशी माहिती शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गणेश वानकर यांनी दिली. राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात जाहीर सभा घेऊन सेनेला पोषक वातावरण निर्माण करण्याच्या अनुशंगाने ते जोमाने कामाला लागले आहेत. उद्धव ठाकरे यांनी मुंबईत मंगळवारी राज्यस्तरीय बैठक बोलावली होती. या बैठकीला महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांचे जिल्हाप्रमुख, पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी दौऱ्याच जाहीर केला आहे. त्यानुसार २४ डिसेंबर रोजी पंढरपुरात जाहीर सभा घेऊन निवडणुकीचे रणशिंग फुंकण्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुशीलकुमार शिंदेंचेसोलापुरात मॉर्निग वॉक

0
0

सुशीलकुमार शिंदेंचे

सोलापुरात मॉर्निग वॉक

सोलापूर :

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे गेल्या तीन दिवसांपासून सोलापुरात आहेत. शिंदे यांनी मंगळवारी सकाळी सोलापुरातील गुलाबी थंडीत हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर सवंगड्यांसमवेत मॉर्निंग वॉक केले. डोक्यावर निळ्या-काळ्या रंगाची टोपी, लाल रंगाचा फुल टी-शर्ट, फिक्कट पिवळ्या रंगाची व्यायामाची पॅन्ट आणि पायात बूट, असा पेहराव असलेले शिंदे आनंदी चेहऱ्याने मित्रांसोबत गप्पा मारत मैदानावर फेऱ्या मारताना सोलापूरकरांना दिसले. मॉर्निंग वॉक झाल्यानंतर शिंदे आणि सहकारी सर्वजण मिळून जुन्या मंजू हॉटेलमध्ये गेले, तेथे गप्पा रंगल्या. चहापान आणि अल्पोपहार घेताना सोलापुरातील आठवणींना त्यांनी उजाळा दिला. या वेळी कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, मात्र आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेंनी मॉर्निंग वॉक होता, अशीच चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

शिंदे म्हणाले, 'मी दर रोज चालण्याचा व्यायाम केल्यामुळे आरोग्य निरोगी राहते. बाहेरगावी असलो तरी व्यायाम करतोच. शिवाय आजही ताशी पाच किलोमीटर वेगाने चालतो, तासभर चालून मजा आली. आजही मी अर्धा तास ट्रेडमिलवर चालतो.'

सोलापुरात आल्यानंतर सुशीलकुमारांसमवेत सर्वच क्षेत्रातील मंडळींचा कायम मोठा गोतावळा असतो. २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत भाजपचे खासदार शरद बनसोडे यांच्याकडून शिंदे यांचा पराभव झाला. मागील चार ते साडेचार वर्षांत विद्यमान खासदार बनसोडे यांच्याकडून सोलापूरकरांची उपेक्षाच झाली. आता आगामी लोकसभा निवडणुकीला काही महिने बाकी असताना सुशीलकुमारांचे सोलापूर दौरे वाढले आहेत. शिवाय छोट्या-मोठ्या कार्यक्रमांना ते उपस्थित राहत आहेत. सुशीलकुमार शिंदे लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत, असे राजकीय जाणकारांचे निरीक्षण आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


घरफाळ्यातून पाणीबिल वसुलीचे आव्हान

0
0

महापालिका लोगो

Maruti.Patil

@timesgroup.com

tweet: @MarutipatilMT

कोल्हापूर

महापालिकेच्या शहर पाणीपुरवठा विभागाकडे घरगुती वापराचे पाणीबिल वसूल करण्यासाठी घरफाळ्यातून पाणीबिल वसूल करण्याचा प्रस्ताव विचारधीन होता. नवीन प्रॉपर्टी शोध मोहिमेमध्ये घर एकाच्या नावावर आणि पाणी कनेकश्न दुसऱ्याच्याच नावावर असल्याने थकीत पाणीबिल वसूल करण्याचे आव्हान प्रशासनासमोर निर्माण झाले आहे. थकबाकीदारांपैकी ५० टक्के थकबाकीदारांच्या नावावर घर नसल्याने वसुली मोहिमेला ब्रेक लागण्याची शक्यता आहे.

पाणीपुरवठा विभागाकडे विलंब आकारासह २५ कोटी ५२ लाखांची थकबाकी आहे. थकबाकीदारांमध्ये घरगुती वापरासह, व्यावसायिक व बड्या राजकीय व्यक्तींचा सामवेश आहे. एक हजारांपासून लाखांपर्यंत असलेली थकबाकीची रक्कम वसूल करण्यासाठी प्रशासनाने संबंधितांना नोटिसा बजाल्या, पण त्याला मिळकतधारकांनी फारसा प्रतिसाद दिला नाही. प्रत्येक बिलात थकीत रक्कम फुगत जात असल्याने थकबाकी वसूल करण्यासाठी घरफाळ्यामध्ये थकीत रकमेचा समावेश करण्याचा प्रस्ताव विराचधीन होता. तसेच थकबाकीदारांना २५ हजारांचा दंड करण्याचा प्रस्ताव महासभेत चर्चेला आला. महासभेत प्रस्तावावर चर्चा करताना व्यावसायिक पाणी वापराची कनेक्शन केवळ १,३६५ असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आले. शहरात हॉटेल्स, मंगल कार्यालये, कॉर्पोरेट कार्यालये, यात्री निवासांची संख्या मोठी असताना अपुऱ्या दाखवलेल्या संख्येमुळे नगरसेवकांनी अशा पाणी कनेक्शनचा नव्याने सर्व्हे करण्याची मागणी केली होती. त्याचबरोबर माजी महापौर शोभा बोंद्रे यांनी व्यावसायिक वापराच्या कनेक्शनचे नव्याने सर्व्हे करण्याचे आदेश दिले.

पाणीपुरवठा विभागाकडे असलेल्या अपुऱ्या मनुष्यबळामुळे घरफाळा विभागाकडून नवीन प्रॉपर्टी शोधण्यासाठी सुरू असलेल्या सर्व्हेची मदत घेण्याचा निर्णय झाला. एका खासगी कंपनीकडून सुरू असलेल्या सर्व्हेमध्ये ९५ प्रकारची माहिती संकलित केली जात असून त्यामध्ये पाणी कनेक्शनचाही समावेश आहे. या सर्व्हेचा आधार घेऊन थकबाकी वसूल करण्याचा प्रस्ताव विचारधीन असताना एकूण थकबाकीदारांपैकी ५० टक्के थकबाकीदारांच्या नावार घर नसल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. घर एकाच्या नावावर असताना पाणी कनेक्शन कुटुंबातील दुसऱ्याच व्यक्तींच्या नावावर असल्याचे सर्व्हेमध्ये स्पष्ट झाले आहे. त्यामुळे थकीत रकमेसाठी संबंधित ग्राहकाला नोटीस जरी पाठवली तरी, त्याचा फारसा फायदा होणार नाही. परिणामी पाणीपुरवठा विभागाच्या थकबाकी वसुलीला ब्रेक लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

...............

चौकट

नोटीसीला केराची टोपली

अनेक वर्षांपासून थकीत असलेली पाणीबिलाची थकबाकी वसूल करण्यासाठी पाणीपुरवठा विभागाने मिळकतधारकांना वारंवार नोटीस बजावली. पण मिळकतधारकांनी त्याला केराची टोपली दाखवत थकीत रक्कम भरली नाही. घरफाळ्यातून रक्कम वसूल करायचे म्हटले, तरी त्यांच्या नावावर घर नसल्याने त्यावर मर्यादा आल्या आहेत. अशा स्थितीत नव्याने सर्व्हे करायचा निर्णय घेतला तरी, पाणीपुरवठा विभागाकडे अपुरे कर्मचारी असल्याने थकीत रक्कम वसूल कशी करायची असा जटील प्रश्न प्रशासनासमोर निर्माण झाला आहे.

......................

चौकट

१,०१२

एकूण थकबाकीदार

१६,८७,४५,१६६

थकबाकी

८,६४,६२,८९८

विलंब आकार

२५,५२,०८,०६४

एकूण थकबाकी

..........................

चौकट

१,१०,१११

एकूण ग्राहक संख्या

९७,१३८

घरगुती वापर

१,६७०

व्यावसायिक वापर

१,३६५

औद्योगिक

सुमारे सहा कोटी

प्रत्येक बिलापोटी वसूल रक्कम

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिक्त पदांची मागवली माहिती

0
0

मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून संवर्गनिहाय आढावा

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयानंतर राज्य सरकारने आता विविध विभागातील रिक्त जागांची माहिती मागविली आहे. जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, कृषि विभागांचा समावेश आहे. २३ संवर्गातील रिक्त पदांची माहिती संकलित केली जात आहे.

राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाकडून स्थानिक स्वराज संस्थांना सध्या रिक्त असलेली पदे व डिसेंबर २०१९ पर्यंत रिक्त होणाऱ्या जागांचा तपशील सादर करण्याच्या सूचना आहेत. हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणाला सोळा टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले. 'सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग'असा विशेष प्रवर्ग तयार करुन सोळा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय झाला. सरकारने विविध विभागातील माहिती मागविल्याने प्रशासनाची धावपळ सुरू आहे. नऊ डिसेंबरपर्यंत संपूर्ण तपशील सादर करण्याच्या सक्त सूचना आहेत.

राज्य सरकारच्या सूचनेनंतर स्थानिक स्वराज्य संस्थेत संवर्गनिहाय माहिती जमविण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ यांनी जिल्हा परिषदेतील विविध विभागप्रमुखांची बैठक घेतली. वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, ग्रामसेवक, शिक्षण विस्तार अधिकारी, बांधकाम, आरोग्य, कृषी विभागातील रिक्त पदांची माहिती संकलित करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या. दोन दिवसात माहिती गोळा करुन नऊ डिसेंबरपर्यंत राज्य सरकारला सादर करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेत शिक्षण, पशुसंवर्धन, आरोग्यसह अन्य विभागातील मिळून एक हजारांहून अधिक पदे रिक्त आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जनसुराज्य शक्ती पक्षाची वाढती ताकद

0
0

\Bबाजार समिती, शेतकरी संघात महत्वाची पदे \B

Satish.ghatage.timesgroup.com

Tweet:satishgMT

कोल्हापूर

जनसुराज्य शक्ती पक्ष राज्यात भाजप महायुतीत सहकारी पक्ष आहे तर दुसरीकडे जिल्ह्यातील सहकाराच्या राजकारणात काँग्रेस, राष्ट्रवादीशी हातमिळवणी करत पक्षाची ताकद वाढवत आहे. महिनाभरात पक्षाने कोल्हापूर शेती उत्पन्न समिती सभापती आणि शेतकरी संघ अध्यक्ष निवडीत बाजी मारली आहे. दोन्ही महत्वाच्या संस्थांच्या सभापतीपदांवर 'जनसुराज्य'ची वर्णी लागल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाची शक्ती वाढण्याचे संकेत मिळत आहेत.

जनसुराज्य शक्ती पक्षाच्या स्थापनेनंतर पहिल्याच निवडणुकीत पक्षाचे तीन आमदार निवडून आल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीने संस्थापक विनय कोरे यांना मंत्रीपद दिले. जिल्ह्याच्या राजकारणात जनसुराज्य पक्षाने मोठी हवा केली. कोल्हापूर महानगरपालिका, जिल्हा परिषद, जिल्हा मध्यवर्ती बॅंक, बाजार समिती, शेतकरी संघ या महत्वाच्या संस्थांत शिरकाव करताना महापौर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष, केडीसीसी बँक उपाध्यक्ष, बाजार समिती सभापतीपद पक्षाने मिळवले. २००९ च्या निवडणुकीत पक्षाचे दोनच आमदार निवडून आले तर २०१४ च्या निवडणुकीत स्वत: विनय कोरे थोड्या मताने हरले. त्यामुळे जनसुराज्यची ताकद कमी झाल्याची चर्चा सुरु झाली.

विधानसभेतील पराभवानंतर पन्हाळा शाहूवाडी विधानसभा मतदारसंघात कोरेंनी पुन्हा बांधणी सुरु केली आहे. राज्यात भाजप महायुतीत जनसुराज्य पक्ष सहभागी झाला आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यातील सहकारातील राजकारणात मात्र काँग्रेस राष्ट्रवादीशी आघाडी केली आहे. शेतकरी संघ, केडीसीसी बँक, बाजार समितीत जनसुराज्यचे संख्याबळ पाहता काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीला जनसुराज्यला डावलता येत नाही. गेली तीन वर्षे शेतकरी संघावर एक खांबी राष्ट्रवादीची सत्ता असताना युवराज पाटील यांच्या राजीनाम्यानंतर जनसुराज्यचे अमरसिंह माने यांना अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीला संधी द्यावी लागली. बाजार समितीची निवडणूक काँग्रेस, राष्ट्रवादी, जनसुराज्य, शेकाप, शिवसेनेने एकत्रित लढवली. निवडणुकीत राष्ट्रवादी आणि जनसुराज्यचे प्रत्येकी पाच सदस्य निवडून आले. पक्षाच्या नेत्यांनी रोटेशन पद्धतीने पदे वाटण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या वर्षी जनसुराज्यच्या पांडुरंग खुडे यांना संधी मिळाली. त्यानंतर मात्र सलग दोन वर्षे राष्ट्रवादीच्या सर्जेराव पाटील आणि कृष्णात पाटील यांना संधी मिळाली. यावर्षी सभापतीपदासाठी सतेज पाटील यांनी आग्रह धरला होता. पण विधानसभा डोळ्यासमोर ठेऊन कोरे यांनी आग्रह धरल्याने बाबासाहेब लाड यांचे नाव निश्चित झाले. शेतकरी संघ आणि बाजार समितीवरील महत्वाच्या दोन पदांवर जनसुराज्यने बाजी मारल्याने काँग्रेस व राष्ट्रवादी बॅकफूटवर गेली आहे.

.........

महत्वाच्या ठिकाणी पदे

जिल्ह्याच्या राजकारणात महाडिक गटाला विरोध करताना मुश्रीफ, कोरे, पाटील हा गट गेली १५ वर्षे काम करत आहेत. तरीही जिल्हा परिषदेच्या राजकारणात कोरे यांनी भाजपला मदत केल्याने माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या स्नुषा शौमिका महाडिक जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष झाल्या. भाजपला मदत करताना जनसुराज्यने जिल्हा परिषदेतील सार्वजनिक बांधकाम सभापतीपदी सर्जेराव पेरिडकरांची वर्णी लावली . जिल्हा परिषद, बाजार समिती, शेतकरी संघ या महत्वाच्या ठिकाणी जनसुराज्यने पदे मिळवल्याने विधानसभा निवडणुकीत कोरे यांची बाजू बळकट होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हापूस अंब्याचे आगमन

0
0

आंब्याचा फोटो वापरणे

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या श्री शाहू मार्केट यार्ड येथे नवीन हापूस आंब्याची आवक झाली आहे. फळ भाजीपाला मार्केट यार्ड येथील यासीन बागवान व इकबाल बागवान यांच्या अडत दुकानात बुधवारी (ता.५) सकाळी दहा वाजता जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे व विशेष लेखा परीक्षक बी.बी.यादव यांच्या हस्ते नवीन आंब्याचा सौदा काढण्यात येणार आहे. या सौद्यास अडते, व्यापारी, शेतकऱ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन बाजार समितीचे सचिव मोहन सालपे यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आठ जिल्हा परिषदांना पत्रे

0
0

राज्य सरकारने औषधनिर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, लेखा विभागातील कनिष्ठ व वरिष्ठ सहायक, शिक्षण व सांख्यिकी विभागातील विस्तार अधिकारी, आरोग्य सेवक महिला व पुरुष, कनिष्ठ आरेखक, लघुलेखक, अंगणवाडी पर्यवेक्षिका, कनिष्ठ लेखाधिकारी, कृषी विभागातील विस्तार अधिकारी, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ व वरिष्ठ सहायक लिपिक, आरोग्य पर्यवेक्षक, पशुधन पर्यवेक्षक, आरेखक, कनिष्ठ अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, कनिष्ठ यांत्रिकी अशा २३ संवर्गातील पदांची माहिती मागवली आहे. कोल्हापूर, ठाणे, नाशिक, जळगाव, औरंगाबाद, अहमदनगर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्हा परिषदेतील पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता यासंबंधीच्या माहितीचा समावेश आहे. याशिवाय विविध पदांसाठी आवश्यक पात्रतेविषयी विचारणा केली आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेकडे सांख्यिकी व शिक्षण विभागातील विस्तार अधिकारी, पंचायत समितीमधील विस्तार अधिकारीसाठी आवश्यक पात्रतेसंबंधी माहिती उपलब्ध करुन देण्याविषयी सूचना आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images