Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

परिवहन कर्मचा-यांची बदली करा

$
0
0
प्रादेशिक परिवहन विभागाच्या कागल येथील तपासणी नाक्यावरील कर्मचाऱ्यांची बदली करावी या मागणीचे निवेदन जिल्हा ब्लॅक पँथरने सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सतीश जाधव यांच्याकडे केली.

आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रम रद्द

$
0
0
जिल्हा परिषदेच्यावतीने २०१३ चे जिल्हा आदर्श पुरस्कार जाहीर झालेल्या शिक्षकांना या पुरस्कारांचे वितरण शनिवारी (दि. १४) करण्यात येणार होते. मात्र, निमंत्रण पत्रिकेतील नावांच्या वादावरून नेत्यांशी चर्चा करून हा कार्यक्रमच रद्द करण्यात आला आहे.

सौंदत्ती यात्रेसाठी १४७ बस

$
0
0
श्री रेणुका देवीच्या यात्रेसाठी सौंदत्ती येथे शनिवारपासून भाविक रवाना होणार आहे. यात्रेचा मुख्य सोहळा १६ डिसेंबर रोजी होत आहे. कोल्हापुरातून १४७ एसटी देवीच्या यात्रेसाठी रवाना होणार आहे. खासगी वाहनांनी प्रवासालाही भाविकांनी नोंदणी केली आहे. खासगी ७० वाहने यात्रेसाठी धावणार आहेत.

यात्रेकरू सुविधा : लोकप्रतिनिधी सरसावले

$
0
0
आगामी विधानसभा निवडणुकीत मतदारांची मने जिंकण्यासाठी कोल्हापूर उत्तर मतदारसंघात निवडणूक लढविणाऱ्या इच्छुकांनी सौंदत्ती यात्रेच्या भाविकांना खूश करण्याचे ठरवले आहे. यात्रेसाठी सुविधा देण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे.

मृत्यूशी झुंजणा-या कोयनाला दातृत्वाची गरज

$
0
0
नशीब कधी कधी माणसाला अशा टप्प्यावर आणून सोडते की, सारं जगणं अवघड होऊन जाते. असाच विचित्र अनुभव येथील बोंद्रेनगरमधील १७ वर्षांची कोयना घेतेय. आज ती मृत्यूशी झुंज देते आहे. आई-वडिल मोलमजुरी करणारे, घरची परिस्थिती बेताची, अचानक तिच्या आयुष्यात काळोख दाटून येतो आणि तिच्या दोन्ही किडन्या स्टोनमुळे निकामी झाल्याचे भयाण वास्तव समोर येते.

थंडी करा एंजॉय

$
0
0
आठवडाभरापासून वाढलेली थंडी जशी वातावरणातील उत्साह वाढवते तसेच आजारांना निमंत्रण देणाऱ्या व्हायरसच्या अॅटॅकलाही पोषक ठरत आहे. त्यामुळे सर्रास दवाखान्यांमध्ये सर्दी, ताप, खोकल्याच्या पेशंटची संख्या वाढल्याचे चित्र असून आठवडाभर या आजारात काढण्यापेक्षा प्रतिबंधात्मक उपाय केल्यास सुदृढ राहून थंडीच्या वातावरणाचा आस्वाद घेता येणे सहज शक्य आहे.

पोलिस ठाणी नववर्षात पेपरलेस

$
0
0
केंद्रीय गृह खात्याच्या सीसीटीएनस (क्राईम अॅन्ड क्रिमिनल ट्रॅकिंग अॅन्ड नेटवर्क सिस्टीम) प्रकल्पातांतर्गत कोल्हापूर जिल्ह्याची पायलट प्रोजेक्टपदी निवड झाल्यानंतर अवघ्या तीन महिन्यात जिल्ह्यातील २२५३ पोलिस कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण सुरू झाल्याने दोन जानेवारीपासून पोलिस ठाणी पेपरलेस होणार आहेत.

अंडी दर वाढले; ऑम्लेट, बुर्जी स्थिर

$
0
0
सर्वच जीवनावश्यक वस्तूंच्या दरात वाढ झाल्याने सर्वसामान्य ग्राहक महागाईच्या झळा सोसत आहे. सर्वसामान्यांना गडबडीच्या वेळी ब्रेकफास्ट म्हणून उपयोगात येणाऱ्या अंड्यांच्या दरातही गेल्या दोन आठवड्यात मोठी वाढ झाली आहे. साडेतीन रुपयाला मिळणारे अंडे आता पाच ते सहा तर देशी अंड्याचा दर १० रुपयांवर पोहचला आहे.

तज्ज्ञ डॉक्टरांची वानवा अन् औषधांचा तुटवडा

$
0
0
येथील स्व. सौ. वेणूताई चव्हाण सरकारी उपजिल्हा हॉस्पिटलमधील महिला व बाल रुग्ण विभागाव्यतिरिक्त अन्य विभागात तज्ज्ञ डॉक्टरांची वानवा आहे. हॉस्पिटलमध्ये औषधांचा तुटवडा आणि कर्मचाऱ्यांच्या मनमानीमुळे रुग्णांची फरफट होत आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पुढाकाराने कोट्यवधी रुपयांची अद्यावत यंत्रणा उपजिल्हा हॉस्पिटलमध्ये कार्यान्वित केली जात आहे.

‘रासप’ने राजेवाडी कालवा फोडला

$
0
0
राष्ट्रीय समाज पक्षाच्या (रासप) काही कार्यकर्त्यांनी रात्री ब्रिटीश कालीन ‘राजेवाडी’ तलावाचा कालवा फोडून माण नदीत पाणी सोडण्याचा प्रकार केला आहे. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्याला पाणी नेणारा ‘राजेवाडी’ तलावाचा कालवा ‘जेसीबी’च्या मदतीने अर्धा-पाऊण तासात फोडला.

माद्याळमध्ये विजेच्या टॉवरचे काम बंद पाडले

$
0
0
माद्याळ (ता. कागल) येथे सर सेनापती संताजी घोरपडे या खासगी कारखान्याकडून येणाऱ्या वीज मंडळाच्या टॉवर लाइनचे काम शेतकऱ्यांनी बंद पाडले. विना परवाना व शेतकऱ्यांना कोणतीही नुकसान भरपाई न देता या साखर कारखान्याकडून मुमेवाडीकडे जाणाऱ्या विजेच्या टॉवरचे काम सुरु होते.

शामराव मानवी यांचे निधन

$
0
0
ज्येष्ठ रणजीपटू आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते शामराव गोविंदराव मानवी (वय ७६) यांचे गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास निधन झाले. गेले काही दिवस ते आजारी होते.

गडहिंग्लजमध्ये महिलाराज

$
0
0
गडहिंग्लज नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे सुंदराबाई बिलावर यांची निवड झाली. त्यांनी जनता दलाचे उमेदवार दादू पाटील यांचा १० विरुद्ध ७ मतांनी पराभव केला.

लोकसभेसाठी सच्चा शिवसैनिकच उमेदवार

$
0
0
‘लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर व हातकणंगले मतदारसंघासाठी ऐनवेळी येणारा नव्हे सच्चा शिवसैनिकच उमेदवारीसाठी निश्चित केला जाईल. घुसून तिकिट फाडणाऱ्यांची पध्दत उध्दव ठाकरेंनी मोडून काढली आहे,’ असे सांगत कोल्हापूरचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी शिवसेनेच्या उमेदवारीबाबतचे धोरण शुक्रवारी स्पष्ट केले.

महापौर राजीनाम्याबाबत चित्र अस्पष्टच

$
0
0
महापालिकेच्या सोमवारी होणाऱ्या (ता.१६) सर्वसाधारण सभेसाठी आगामी महापौरपदासाठीच्या इच्छुकांनी देव पाण्यात ठेवले आहेत. महिनाभरापासून महापौरांचा राजीनामा पुढे ढकलला जात असताना अजूनही राजीनाम्याबाबतचे चित्र स्पष्ट होत नसल्याने राष्ट्रवादीच्या इच्छुकांकडून नेत्यांकडेही पाठपुरावा सुरु आहे.

नेसरीजवळील अपघातात २२ जखमी

$
0
0
नेसरी-चंदगड मार्गावर तळेवाडीनजीक टेंम्पो उलथून पडल्याने २२ जण जखमी झाले. त्यांच्यावर गडहिंग्लजसह नेसरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरु आहेत. चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात घडला. सर्व जखमी निट्टूर व कोवाड (ता.चंदगड) येथील आहेत.

१.५ लाखांचा गुटखा जप्त

$
0
0
अन्न व औषध प्रशासन आणि तळबीड पोलिसांनी धडक कारवाई करून १ लाख ६० हजार ३८० रुपये किमतीचा बेकायदा गुटखा जप्त केला. या प्रकरणी गोरख पांडुरंग वीर (रा. इचलकरंजी ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) यास ताब्यात घेतले आहे.

ऊसतोड मजुरांच्या आरोग्यासाठी पथदर्शी प्रयोग

$
0
0
उघड्यावर संसार थाटणाऱ्या ऊसतोड मजुरांना काबाडकष्ट करून जगायचे एवढेच ठाऊक. त्यांच्या कुटुंबातील महिला आणि मुलांची स्थितीही यापेक्षा वेगळी नाही. या महिला गरोदरपणातही ऊसतोडीचे काम करत असतात. पालात बाळंतपण होते आणि मुलंही उसाच्या फडात झोळीत झोका घेत मोठी होतात. आरोग्याकडे त्यांचे पूर्ण दुर्लक्ष होते.

पोटनिवडणुकीत ‘नोटा’

$
0
0
इचलकरंजी नगरपरिषदेच्या प्रभाग तीन ‘क’च्या पोटनिवडणुकीच्या शिगेला पोहचलेल्या प्रचाराला आज पूर्णविराम मिळाला. मात्र उघड प्रचार संपला असला तरी छुप्या प्रचाराला आजपासून प्रारंभ झाला. उर्वरीत दिवसात मोठ्या प्रमाणात उलाढाली होण्याची चिन्हे आहेत.

LBT मुळे गॅस सिलिंडर महाग

$
0
0
गॅसचे अनुदान थेट बँक खात्यावर जमा करणाऱ्या डीबीटी (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर) योजनेतील घरगुती गॅस सिलिंडरला ४५ रूपये जादा मोजावे लागत आहे. गॅसच्या मूळ किंमतीवर एलबीटी आकारला जात असल्याने शहरवासियांना ४५ रूपये जादा गॅसला मोजावे लागत आहेत.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images