Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

आवक वाढल्याने भाज्या स्वस्त

$
0
0

टोमॅटो, कोबी, फ्लॉवरची बाजारात मोठी आवक

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मंडईत मोठ्या प्रमाणात भाज्यांची आवक झाल्याने दर गडगडले आहेत. भाजी स्वस्त झाल्याने ग्राहकांकडून चांगली खरेदी होत आहे. कच्च्या कैऱ्यांचे आगमन झाले असून १० ते २० रुपयाला एक कैरी अशी विक्री होत आहे.

कांदा, टोमॅटो, कोबी, फ्लॉवरची बाजारात मोठी आवक झाली आहे. कांद्याचा दर प्रतिकलो दहा ते वीस रुपये इतका होता. टोमॅटोचा दर प्रतिकिलो आठ ते दहा इतका होता. काही विक्रेत्यांनी टोमॅटोची दहा रुपयाला दीड किलो अशी विक्री केली. भेंडीचा दर ५० रुपये किलो असून दोडका, कारली, वरणा यांचा दर प्रतिकिलो ४० रुपयांवर स्थिर आहे.

वांग्यांची मोठी आवक झाल्याने दर कमी झाले आहेत. प्रतिकिलो तीस ते चाळीस रुपये दराने ग्राहकांकडून खरेदी होत आहे. मटारचा दर प्रतिकिलो ५० ते ६० रुपये आहे. मेथी, पोकळा, चाकवत, कांदा पात, शेपू, करडई, पालक या पालेभाज्यांची चांगली आवक झाली आहे. दहा रुपयाला पेंडी अशी पालेभाज्यांची विक्री झाली. काही ठिकाणी मेथीची १५ रुपयाला दोन पेंड्या अशी विक्री झाली.

.....................

फळभाज्यांचे दर (प्रतिकिलो रुपये)

वांगी ४० ते ५०

टोमॅटो ८ ते १०

भेंडी ५०

ढबू ३० ते ४०

गवार ६० ते ८०

दोडका ४०

कारली ४०

वरणा ४० ते ५०

ओली मिरची ३० ते ४०

बटाटा २५ ते ३०

लसूण ३०

कांदा १० ते २०

फ्लॉवर १० ते २५ रुपये नग

कोबी ५ ते १० रुपये नग

...............

पालेभाजी दर (पेंढी रुपयांत)

मेथी ८ ते १०

कांदा पात १०

कोथिंबीर ५ ते १०

पोकळा १०

पालक १०

शेपू १०

.............

फळांचे दर (प्रतिकिलो रुपये)

सफरंचद ६० ते १८०

डाळिंब ४० ते ६०

संत्री ३० ते ८०

मोसंबी ३० ते ८०

बोर २० ते ४०

केळी २० ते ६० (डझन)

जवारी केळी ३० ते ७० (डझन)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बाजार समिती सभापती निवड आज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समिती सभापती निवड सोमवारी (ता. ३) दुपारी तीन वाजता राधानगरी प्रातांधिकारी मनीषा कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. सतेज पाटील गटाचे दशरथ माने आणि जनसुराज्यशक्ती पक्षाचे माजी आमदार विनय कोरे गटाचे बाबासाहेब लाड यांच्या नावाची सभापतीपदासाठी चर्चा सुरु आहे. सभापती कृष्णात पाटील यांच्या राजीनामानंतर नवीन सभापती निवड होत आहे.

सभापतींचे नाव निश्चित करण्यासाठी सोमवारी जिल्हा बँकेत अकरा वाजता नेते मंडळीची बैठक होणार आहे. या बैठकीला आमदार हसन मुश्रीफ, सतेज पाटील, माजी आमदार विनय कोरे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष ए.वाय. पाटील उपस्थित राहणार आहे. बैठकीत सभापतीपदासाठी नाव निश्चित होणार आहे.

बाजार समितीवर राष्ट्रवादी, जनसुराज्य, शेकाप, आमदार सतेज पाटील, चंद्रदीप नरके या गटांची सत्ता आहे. दरवर्षी एका गटाला रोटेशन पद्धतीने सभापती व उपसभापती देण्याचा निर्णय नेत्यांनी घेतला आहे. २०१५ मध्ये बाजार समितीवर सत्ता स्थापन झाल्यावर पहिल्या वर्षी जनसुराज्यचे पांडुरंग खुडे तर दुसऱ्या वर्षी राष्ट्रवादीचे सर्जेराव पाटील यांना सभापतीपदाची संधी मिळाली होती. तिसऱ्या वर्षी राष्ट्रवादीकडून संधी मिळालेले कृष्णात पाटील मुश्रीफ गटाचे आहेत. सलग दोन वर्षे राष्ट्रवादीला सभापतीपदाची संधी मिळाल्याने यंदा जनसुराज्यला संधी मिळणार की सतेज पाटील गटाला याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मल्हार सेना करणार ढोलवादन आंदोलन

$
0
0

१० डिसेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिवसभर आंदोलन

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

धनगर समाजाचा अनुसुचित जमातीत समावेश करुन आरक्षण द्यावे, या मागणीसाठी मल्हार सेनेच्यावतीने सोमवारी (ता. १०) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिवसभर ढोलवादन आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी मुस्लिम बोर्डिंग येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अध्यक्षस्थानी सेनेचे अध्यक्ष बबनराव रानगे होते.

बैठकीत बोलताना रानगे म्हणाले, 'धनगर समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश असतानाही राजकारण्यांनी आजअखेर समाजाची घोर फसवणूक केली आहे. आरक्षण मागणीसाठी साडेचार वर्षापूर्वी धनगर समजाने काँग्रेसची सत्ता उलथवून भाजपाला साथ दिली. परंतु भाजपकडूनही दिशाभूल केली जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश केला आहे. या आरक्षणाची अंमलबजावणी करावी हीच आमची मागणी आहे. गेली साडेचार वर्षे भाजप सरकारने भूलथापाच मारल्या असल्याने धनगर समाज आता स्वस्थ बसणार नाही. राज्य सरकारच्या विरोधातील आंदोलनाची ठिणगी कोल्हापूरातूनच पेटवली जाणार आहे.'

मल्हार सेनेचे जिल्हाप्रमुख बयाजी शेळके म्हणाले, 'धनगड आणि धनगर हे एकच असल्यामुळे इतर प्रवर्गात समावेश केलेला नाही. हे सरकारला बडगा उगारुनच सांगण्याची वेळ आली आहे. कोणताही गट-तट न मानता समाज एक होवून सरकार विरोधात लढाईसाठी सज्ज झाला आहे.'

याप्रसंगी सिध्दार्थ बन्ने, राघू हजारे, शहाजी सिद्, छगन नांगरे, मार्तंड दुधाळ यांचीही भाषणे झाली. बाबूराव बोडके यांनी स्वागत केले. युवक संघटना जिल्हा अध्यक्ष प्रल्हाद देबाजे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. विजय गोरड यांनी आभार मानले. यावेळी लिंबाजी हजारे, डॉ.कमलाकर जानगर, चंद्रकांत वाळकुंजे, शामराव माने, सोमाजी वाघमोडे, स्वाभिमानीचे बाळासाहेब रानगे, कोयाप्पा बोडेकर, शामराव बंडगर, विठ्ठल गावडे, प्रकाश येडगे, सर्जेराव पुजारी आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

असोसिएशन ऑफ आर्किटेक्टस... ओळ

$
0
0

फोटो ओळी...

असोसिएशन ऑफ आर्किटेक्टस अँड इंजिनीअर्सतर्फे रविवारी जयंती नाला परिक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसह नगरसेवकांनी सहभाग घेतला. असोसिएशनचे अध्यक्ष अजय कोराणे, भाजपचे गटनेते विजय सुर्यवंशी, नगरसेवक अजित ठाणेकर यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘समर्थ रामदासांकडूनराष्ट्रभक्तीची शिकवण’

$
0
0

तेंडुलकर स्मृती व्याख्यानमाला...

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'समाजाच्या जडणघडणीत संतांचे मोठे योगदान आहे. समर्थ रामदासांनी संपूर्ण समाजाच्या कल्याणासाठी आयुष्य समर्पित केले. समाज संघटन करताना त्यांनी राष्ट्रभक्तीची शिकवण दिली,'असे प्रतिपादन डॉ. कल्याणी नामजोशी (पुणे) यांनी केले.

येथील ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम आणि श्री महालक्ष्मी को-ऑप. बँकेतर्फे आयोजित तात्यासाहेब तेंडुलकर स्मृती व्याख्यानमालेत त्या बोलत होत्या. 'समर्थ रामदास' हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. प्रायव्हेट हायस्कूल येथे व्याख्यानमाला सुरू आहे.

नामजोशी म्हणाल्या, 'भारतीय संस्कृतीचा आत्मा हा धर्म आणि कुटुंब व्यवस्थेत आहे. येथील नागरिकांची धर्माविषयीची आंतरिक पकड मजबूत आहे. संस्कृतीवर अनेक आक्रमणे झाली, पण सत्त्व कधी बदलले नाही. समाज संघटन, हिंदू धर्माच्या कार्यासाठी जीवन वाहिले. त्यासाठी त्यांनी समर्थ रामदासांनी देशभर भ्रमंती केली. त्यांनी विविध प्रांतांत मिळून ११२१ मठांची स्थापना केली. धर्मरक्षणासाठी करावे लागणार कार्य म्हणजेच राजकारण हे सूत्र मांडले. दासबोधातून उत्तम जीवन आचरणाची शिकवण दिली. मात्र, ते प्रवृत्तीवादी संत नव्हते. त्यांच्या शब्दांत विलक्षण आत्मविश्वास आढळतो. त्यांच्या 'मनाचे श्लोक'मधून नवीन ऊर्जा लाभते. विशेष म्हणजे राष्ट्रभक्ती संतत्वाला जोडली. '

वृषाली कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. दीपक भागवत यांनी सूत्रसंचालन केले. अनुराधा गोसावी यांनी आभार मानले. कार्यक्रमास जयवंतराव तेंडुलकर, डॉ. उदय कुलकर्णी, अॅड. रवी शिराळकर, डॉ. दीपक आंबर्डेकर, अॅड. दिलीप मुंडरगी, अॅड. विवेक शुक्ल, रामचंद्र टोपकर, श्रीकांत लिमये, आदी प्रमुख उपस्थित होते.

००००

आजचे व्याख्यान

वक्ते : निवृत्त विंग कमांडर शशिकांत ओक (पुणे)

विषय : सिंहगड संग्राम : लष्करी अधिकाऱ्याच्या नजरेतून

स्थळ : प्रायव्हेट हायस्कूल, सभागृह

वेळ : सायंळी ६ वाजता.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंतप्रधान आवासमधील चार प्रकल्पांना मान्यता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सर्वांसाठी घर संकल्पनेवर आधारित केंद्रीय मंत्रालयाने सुरू केलेल्या पंतप्रधान आवास घरकुल योजनेंतर्गत कोल्हापूर शहरातील चार गृहप्रकल्पांना केंद्रीय गृह निर्माण विभागाने मंजुरी दिली आहे. प्रकल्प मंजुरीमुळे शहरात दोन हजार घरे तयार करण्यात येणार असून, फेब्रुवारीपासून प्रत्यक्ष गृह प्रकल्पाला सुरुवात होणार आहे.

अल्प उत्पन्न गटातील लाभार्थ्यांना हक्काचे घर मिळण्यासाठी केंद्र सरकारने २०२२ पर्यंत पंतप्रधान आवास घरकुल योजना पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. केंद्रीय गृह निर्माण विभागाने राज्यातील ३५ प्रस्तावांना मंजुरी दिली असून, त्यामध्ये चार प्रस्ताव कोल्हापूर शहरातील आहेत. महापालिका एक व खासगी गृहप्रकल्पासाठी तीन प्रस्तावांचा यामध्ये समावेश असून, महापालिकेकडून तपोवन येथे, तर खासगी विकसकांकडून महावीर कॉलेज, कसबा बावडा व जाधववाडी येथे गृहप्रकल्प उभारण्यात येणार आहेत. लाभार्थ्यांना केंद्र व राज्य सरकारचे अडीच लाखांचे अनुदान मिळणार असून, प्रत्यक्ष गृह बांधणीला फेब्रुवारी २०१९ मध्ये सुरुवात होणार आहे.

आवास योजनेत अधिकाधिक बांधकाम व्यावसायिकांनी सहभागी व्हावे, यासाठी जीएसटी, स्टँप ड्युटी व आयकर, आदी सवलती दिल्या आहेत. त्यानुसार क्रिडाई महाराष्ट्र राज्यात साडेपाच लाख घरे बांधणार असून, कोल्हापूर क्रिडाईने दोन हजार घरे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. गृह प्रकल्पामध्ये ३०० व ६०० स्क्वेअर फुटांची घरे लाभार्थ्यांना मिळणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी

$
0
0

अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी

पंढरपूर :

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून सोशल मीडियावर आत्महत्येची धमकी दिलेला पोलिस कर्मचारी राहुल जगताप शनिवारी अत्यावस्थ अवस्थेत सापडला होता. त्याच्यावर पंढरपुरातील लाइफ लाइन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून, अद्याप तो बेशुद्ध अवस्थेत आहे. प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने कुटुंबीय तणावाखाली आहेत. दरम्यान, राहुलल याला त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यावर कडक कारवाई करण्याची मागणी जगताप कुटुंबाने केली आहे.

चार दिवसापूर्वी पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यातील कर्मचारी राहुल जगताप याने सोशल मीडियावर आत्महत्येचा संदेश टाकल्यानंतर पोलिस आणि त्याचे कुटुंबीय त्याचा शोध घेत होते. शनिवारी सायंकाळी भाळवणी या गावात राहुल अत्यवस्थ अवस्थेत ग्रामस्थांना सापडल्यावर त्याला तातडीने पंढरपूर येथील लाइफ लाइन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलविण्यात आले होते. याची माहिती मिळताच पोलिस अधिकारी, कर्मचारी आणि कुटुंबियांनी हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. उपचारादरम्यान त्याच्या पोटातील विषारी औषध बाहेर काढले असले तरी अजूनही तो बेशुद्ध अवस्थेत असल्याने कुटुंबीय तणावाखाली आहेत. अतिदक्षता विभागात राहुलवर उपचार सुरू आहेत. आपल्या मुलाला आत्महत्या करण्यापर्यंत त्रास देणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यावर ३०६ कलमानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी राहुलच्या आई-वडिलांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अंनिस’तर्फे सभासद नोंदणीचे महाअभियान

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

अंधश्रद्धा निर्मूलन व वैज्ञानिक दृष्टिकोन समाजात रुजविताना या कार्याची व्याप्ती वाढविण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे (अंनिस) एक ते ३० डिसेंबर या कालावधीत सभासद नोंदणीचे महाअभियान होणार असल्याची माहिती समितीचे राज्य सरचिटणीस संजय बनसोडे यांनी पत्रकार बैठकीत दिली. तसेच ऑगस्ट २०१९ मध्ये अंनिसचे आंतरराष्ट्रीय परिषद होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

'अंनिस'च्या त्रिदशकपूर्ती निमित्त वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. दरम्यान समितीचे राज्याध्यक्ष डॉ. एन. डी. पाटील यांच्या हस्ते वार्षिक सभासद नोंदणी अभियानाला प्रारंभ झाला. महाअभियान विषयी माहिती सांगताना बनसोडे म्हणाले, 'डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या वैचारिक नेतृत्वामुळे समाजात प्रबोधनाच्या, अनुभवाच्या व प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून समाज विवेकी बनविण्यासाठी १९८९ पासून चळवळ सुरू झाली. राज्यातील ३५० पेक्षा जास्त शाखामधून 'अंनिस'चे काम सुरू आहे.'

सर्व प्रकारच्या अंधश्रद्धांमुळे होणाऱ्या शोषणाला विरोध, वैज्ञानिक दृष्टिकोनाची रुजवात, धर्माची विधायक चिकित्सा अशा विविध टप्प्यावर काम केले जाते. चळवळीचे कार्य हे राज्य, जिल्हा व शाखा पातळीवरुन चालते. दरवर्षी एक जानेवारी ते ३१ डिसेंबर हा शाखांचा कालावधी असतो. जुन्या व नव्या इच्छुक कार्यकर्त्यांनी एक ते ३० डिसेंबर या महिनाभराच्या कालावधीत सभासद अर्ज करून सभासद नोंदवावा.' 'लोकाभिमुख असणारी समितीची चळवळ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविणे, भूमिका लोकांना नीट समजावून सांगणे ही काळाची गरज आहे. यासाठी तरुण कार्यकर्ते झोकून देऊन काम करतील याचा मला विश्वास वाटतो.' असा विश्वास अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्याध्यक्ष डॉ. एन. डी. पाटील यांनी व्यक्त केला. त्यांच्या हस्ते सभासद नोंदणीला सुरुवात झाली. याप्रसंगी समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते. पत्रकार परिषदेला कृष्णात कोरे, रमेश वडणगेकर, प्रा. एकनाथ पाटील, सीमा पाटील, स्वाती कोरे, सीमा कांबळे, दिलीप कांबळे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बसवतत्त्वांच्या प्रचारासाठी गाव तेथे अनुभव मंटप

$
0
0

फोटो...

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बसवतत्त्वांच्या प्रभावी प्रचारासाठी गाव तेथे अनुभव मंटप आणि घर तेथे महात्मा बसवेश्वरांचे विचार ही संकल्पना मूर्त रूपात आणण्याचा निर्धार कार्यकर्ता प्रबोधन शिबिरात करण्यात आला.

अनुभव मंटप महासंघ, कोल्हापूर जिल्ह्यातर्फे दसरा चौकातील चित्रदुर्ग मठ येथे रविवारी दिवसभर जिल्ह्यातील लिंगायत कार्यकर्त्यांचे विभागीय शिबिर व चर्चासत्र आयोजित केले होते. यामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांतील कार्यकर्त्यांचा समावेश होता. बसव समितीचे (बेंगळुरू) अध्यक्ष अरविंद जत्ती अध्यक्षस्थानी होते.

जत्ती म्हणाले, 'महात्मा बसवेश्वरांच्या विचारांचा प्रभाव संबंध देशभर आहे. विविध पातळ्यांवर त्यांच्या विचारकार्याचा अभ्यास होत आहे. सिंगापूर, अमेरिकेतही बसव विचारांचा अभ्यास सुरू आहे. 'माणुसकीचा खजिना' म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. समाजाच्या उन्नतीसाठी बसव वचन प्रेरणादायी ठरणारी आहेत. समाजातील नागरिकांनी गट-तट विसरून 'अनुभव मंटप'मध्ये एकवटले तर प्रगतीचा नवा मार्ग गवसेल.'

लातूरचे प्रा. भीमराव पाटील म्हणाले, 'लिंगायत धर्माचे मूळ तत्त्वज्ञान वचनात आहे. लोकांनी लोकांसाठी लोकभाषेत लिहिलेले साहित्य म्हणजे वचने होत. त्यामध्ये लोकशाही विचारप्रणाली आढळते. बसवतत्त्वांच्या चळवळीचे अनुभव मंटप हे प्रमुख केंद्र आहे. त्याद्वारे गाव तेथे वचन साहित्याची ग्रंथालये, चर्चासत्रे झाली पाहिजेत. मंटपाच्या माध्यमातून महात्मा बसवेश्वरांच्या विचारांची चळवळ महाराष्ट्रभर उभी राहू शकते.'

याप्रसंगी प्रा. राजाभाऊ माळगी, चन्नवीर मठ, धानाप्पा पट्टणशेट्टी, बसवराज कणजे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला ज्ञानेश्वर जंगम, सूर्यकांत डोईजड, महादेव हिंगमिरे, महादेव माळी, प्रा. डॉ. मांतेश हिरेमठ, किरण गवळी, आदी उपस्थित होते. बसव केंद्र व कोल्हापूर लिंगायत समाज संस्थेतर्फे राजशेखर तंबाखे, सरला पाटील, बाबूराव तारळी, विलास आंबोळे, चंद्रशेखर बटकडली, बी. एम. पाटील, आदींनी शिबिराचे संयोजन केले.

००००

जिल्ह्यात १०० गावांत अनुभव मंटप

कोल्हापूर जिल्ह्यात १०० गावांत अनुभव मंटपची सुरुवात केली जाईल. त्या ठिकाणी वचन साहित्यावर चर्चा, प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे नियोजन आहे. वर्षातून एकदा या १०० गावांतील कार्यकर्त्यांचे एकत्रित शिबिर होईल. शिवाय वचन साहित्यावर स्पर्धा, अनुभव मंटपवर वक्तृत्व स्पर्धा होतील, अशी माहिती संयोजक राजशेखर तंबाखे यांनी दिली.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादीच्या सावध हालचाली

$
0
0

महापौरपदाचा उमेदवार ठरवताना लागणार कसोटी, आज पक्षाची बैठक

महापालिका लोगो

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

स्थायी समितीमधील पुनरावृत्ती टाळण्याबरोबर महापौरपदासाठी पक्षातील इच्छुकांची संख्या जास्त असल्याने उमेदवार ठरवताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांची कसोटी लागणार आहे. नाव निश्चित करताना नाराजीचा फटका बसू नये, यासाठी खबरदारी घेताना इतर पदांचे आश्वासनही पक्षनेतृत्वाला द्यावे लागणार आहे. नगरसेवकांची मते आजमावण्यासाठी सोमवारी (ता. ३) ताराबाई पार्क येथील डॉ. विश्वेश्वरय्या हॉलमध्ये सकाळी ११ वाजता बैठक होणार असून बैठकीमध्ये एखाद्या नावाला विरोध होऊ नये, यासाठी पक्षनेतृत्व खबरदारी घेत असल्याचे समजते.

महापालिकेत २०१५ मध्ये कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नसले, तरी काँग्रेस, राष्ट्रवादीने एकत्र येऊन सत्ता स्थापना केली. सत्ता स्थापनेत दोन अपक्षांसह शिवसेनेच्या चार नगरसेवकांचा पाठिंबा आघाडीला मिळाला. त्यामुळे महापौर, उपमहापौरपदासह इतर समित्यांचे सभापतीपद विभागून देण्याचा निर्णय घेतला. सत्तास्थापनेपासून विरोधी भाजप-ताराराणी आघाडीने सत्ता मिळवण्यासाठी अयशस्वी प्रयत्न केले. पण दोन वर्षात आघाडीतील नेतृत्वाबाबतच्या नाराजीमुळे राष्ट्रवादीला स्थायी समिती सभापतीपदावर पाणी सोडावे लागले. ऐनवेळी स्थायीतील दोन सदस्यांनी बंड केल्याने भाजप-ताराराणीला सभापतीपद मिळाले.

बहुमत असताना स्थायीतील सत्ता गमवावी लागल्याचा पक्षनेतृत्वामध्ये सल असताना ठरलेल्या फॉर्म्युलानुसार महापौर निवड होत असून हे पद राष्ट्रवादी काँग्रेसकडे असणार आहे. स्थायीप्रमाणे महापौर निवडीमध्ये दगाफटका होऊ नये, यासाठी राष्ट्रवादी खबरदारी घेत आहे. महापौरपदासाठी अॅड. सुरमंजिरी लाटकर, सरिता मोरे, अनुराधा खेडकर, माधवी गवंडी, मेघा पाटील अशी भलीमोठी इच्छुकांची यादी असल्याने पक्षनेतृत्वाची कसोटी लागली आहे. आघाडीतील कारभारावरुन एकमेकांवर नाराज असलेले निवडीच्या निमित्ताने उघड विरोध करण्याची शक्यता आहे. महापौरपद सहा-सहा महिने विभागून दिले जाणार असले, तरी पहिल्या सहा महिन्यासाठी कोण यावरुन राष्ट्रवादीमध्ये चांगलीच खेचाखेची सुरू झाली आहे. राष्ट्रवादीअंतर्गत अशा वेगवान घडामोडी सुरू असताना काँग्रेस कोणत्या नावाला समर्थन देणार यावरही महापौरपदाचा उमेदवार निश्चित होईल.

दरम्यान, उपमहापौरपदासाठी केवळ श्रावण फडतारे व शिक्षण समिती सभापती अशोक जाधव यांची नावे चर्चेत होती. पण रविवारी अचानकपणे संजय मोहिते यांचे नाव चर्चेत आले. स्थायी समितीसाठी मोहिते यांचे नाव आघाडीवर असताना त्यांना उपमहापौरपद देण्याच्या हालचाली काँग्रेसच्या गोटात सुरू आहेत.

.........................

चौकट

स्थायीसाठीही हालचाली वेगावल्या

स्थायी समितीमधील काँग्रेसचे डॉ. संदीप नेजदार व राहुल माने तर राष्ट्रवादीचे अजिंक्य चव्हाण, अफजल पिरजादे व मेघा पाटील यांचा एक वर्षाचा कार्यकाल जानेवारी महिन्यात संपुष्टात येणार आहे. पुढील वर्ष स्थायी सभापतीपद काँग्रेसकडे राहणार असल्याने इच्छुकांची संख्या अधिक आहे. यामध्ये संजय मोहिते, शारंगधर देशमुख व भूपाल शेटे यांची नावे आघाडीवर आहेत. संजय मोहिते यांना उपमहापौरपद देवून चर्चेतील एक नाव कमी करण्याच्या हालचाली काँग्रेसमध्ये सुरू आहेत.

...............

मोरे दांपत्य कोरेंच्या भेटीला

महापौरपदासाठी सर्वात जास्त चर्चा अॅड. लाटकर व मोरे यांची सुरू आहे. दोन्ही इच्छुक सहकारी नगरसेवकांबरोबर इतर नेत्यांचीही भेट घेत आहेत. पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या दौऱ्यात माजी नगरसेवक राजू लाटकर व नंदुकमार मोरे दिवसभर सहभागी होते. मोरे-लाटकर यांनी शुक्रवारी एकमेंकाच्या घरी भेट दिल्यानंतर रविवारी मोरे दांपत्याने जनसुराज्य पक्षाचे नेते विनय कोरे यांची भेट घेतली. बाजार समिती सभापती निवडीदरम्यान कोरे, मुश्रीफ एकत्र येणार असल्याने ही भेट घेतली असल्याची चर्चा सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केंद्रीय पथक करणार दुष्काळी भागाची पाहणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्यातील विविध भागांत दुष्काळाची तीव्रता वाढत असताना केंद्रीय पथक पाच ते सात डिसेंबर या कालावधीत दुष्काळी भागाची पाहणी करणार आहे. पथकाकडून सांगली जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांची पाहणी सहा डिसेंबर रोजी होणार आहे. पथकाच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा गतिमान झाली आहे. केंद्रीय पथकाच्या अहवालावर दुष्काळी भागाला मिळणारे पॅकेज अवलंबून असल्याने या दौऱ्याला महत्त्व आहे.

या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्तांनी पुणे विभागातील पाचही जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसमवेत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे रविवारी चर्चा केली. केंद्रीय पथकाच्या दौऱ्यात सोलापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील दुष्काळी भागाची पाहणी होणार असल्याचे वृत्त आहे. यंदा सरासरीपेक्षा पाऊस कमी झाला आहे. शिवाय परतीच्या पावसाने पाठ फिरवल्याने ग्रामीण भागातील स्थिती दयनीय बनली आहे. विहिरी व तलाव आटत आहेत. पिकांची वाढ खुंटली आहे, चाऱ्याचा प्रश्न उद्भवत आहे. सांगली जिल्ह्यातील जत, कवठेमहांकाळ, खानापूर, विटा, आटपाडी आणि तासगाव तालुक्यांत गंभीर दुष्काळाची स्थिती असल्याचा सरकारचाच अहवाल आहे. पथकाकडून सहा डिसेंबरला या तालुक्यांत पाहणीची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यातील माण, दहीवडी, कोरेगाव, फलटणमध्ये दुष्काळी स्थिती आहे, तर सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, माढा, माळशिरस, मंगळवेढा, पंढरपूर, सांगोला, अक्कलकोट, मोहोळ, दक्षिण सोलापूर तालुक्यात दुष्काळी स्थिती आहे.

००००

दौऱ्याच्या कालावधीत रजा नाहीत

सांगली प्रशासनाकडून टंचाईग्रस्त भागाची माहिती संकलित केली जात आहे. जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने जत, आटपाडी, खानापूर, कडेगाव, तासगाव, पलूस, शिराळा, वाळवा, मिरज, कवठेमहांकाळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व पाणीपुरवठा विभागाला विशेष सूचना केल्या आहेत. पथकाच्या दौऱ्याच्या कालावधीत संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना रजा देऊ नयेत. तसेच मुख्यालयात राहण्याच्या सूचना केल्या आहेत.

०००

दौऱ्यापासून कोल्हापूर लांबच

कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील काही गावांत पाणीटंचाई आहे. मात्र, दुष्काळसदृश स्थिती नसल्याचा कृषी खात्याचा अहवाल आहे. यामुळे केंद्रीय पथकाच्या दौऱ्यापासून कोल्हापूर लांबच असे चित्र आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एक गुंठा जमिनीसाठी सातारा राजघराण्याची पोलिसात धाव

$
0
0

पंढरपूर:

सातारा येथील छत्रपतींच्या गादीकडे राज्यातील हजारो एकरांच्या जमिनीची मालकी आहे आणि आजवर या घराण्याने अनेक जमिनी गोरगरिबांना कसायला व वापरायला दिल्यानेच त्यांचे राजेपण जनतेच्या हृदयात टिकून आहे. मात्र सध्या सांगोला तालुक्यातील महूद गावाच्या एका जमिनीच्या तुकड्यासाठी थेट साताऱ्याच्या राजमाता कल्पनाराजे भोसले यांनी प्रशासनाकडे लेखी तक्रार दिल्याने राजा विरुद्ध प्रजा असा वाद समोर आला आहे.

महूद येथील एका जमिनीवर राजघराण्याचे जुने इस्टेट मॅनेजर उत्तम खांडेकर यांनी एक तीन मजली इमारत उभी करून तेथे व्यवसाय थाटला आहे. काही दिवसांपूर्वी खांडेकर आणि राजघराण्यात वाद झाल्याने त्यांच्याविरोधात सध्या न्यायालयात खटले सुरु आहेत. खांडेकर यांनी ही दीड गुंठा जमीन महूद येथील राजेंद्र देशमुख यांच्याकडून १० वर्षांपूर्वी विकत घेऊन तेथे ही तीन मजली इमारत उभी केल्याचे जागामालक राजेंद्र देशमुख यांचे म्हणणे आहे. मात्र ही आपल्या राजघराण्याच्या मालकीची जमीन असून यावरील इमारतीचे अतिक्रमण तातडीने पाडण्याची तक्रार राजमाता कल्पनाराजे भोसले यांनी जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी राजेंद्र भारूड यांना दिली आहे. अजून जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी सुरु केलेली नसली तरी ज्या जागेवर राजघराणे दावा करीत आहे ती जागा आपल्या मालकीची असल्याची असल्याचे जागामालक सांगत असल्याने आता या प्रकरणाला राजा विरुद्ध प्रजा असे वळण लागले आहे . दरम्यान या सर्व प्रकरणावर अजून छत्रपती उदयन महाराज किंवा राजमाता कल्पनाराजे यांनी कोणतीच अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र राजमातेचे कर्मचारी विचारणा करण्यासाठी गेले असता पिस्तुलाचा धाक दाखविला जात असल्याचीही तक्रार राजमाता यांनी केल्याने प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जागा आमच्याकडे, मग तुमचं काय?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'हातकणंगले लोकसभा मतदारसंघ भाजपकडे आहे, तुम्ही तर शिवसेनेत गेलात, मग आता कसे लढणार?' या पालकमंत्री पाटील यांच्या गुगुलीवर नुकतेच शिवसेनेत प्रवेश केलेल्या धैर्यशील माने यांची चांगलीच गोची झाली. मात्र, त्यांनीही तेवढ्याच तत्परतेने 'गेली २० ही जागा शिवसेनेच्या ताब्यात आहे. भाजपकडे नाही,त्यामुळे युती झाली नाही झाली तरी तेथूनच लढणार' असे सांगत त्यांनी मतदारसंघाचा इतिहासच मांडला.. 'ठीक आहे बघू...'म्हणत जाता जाता 'युती झाली नाही तर तुम्हीच लढा' अशा शुभेच्छा पालकमंत्री पाटील यांनी दिल्या.

शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर माने यांनी लोकसभेची तयारी सुरू केली आहे. सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना हातकणंगले लोकसभा मतदार संघात प्रचाराला लागण्याचे संकेत दिले आहेत. पक्ष प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर माने तर त्याचवेळी पालकमंत्री पाटील हे मराठा आरक्षणाबाबत भूमिका मांडण्यासाठी महाराष्ट्र टाइम्सच्या कोल्हापूर कार्यालयास भेट देण्यासाठी आले. माने यांना पाहताच 'काय तयारी झाली का?' असा प्रश्न करत 'अहो, तुम्ही सेनेत गेलाय पण जागा भाजप लढणार असल्याने तुम्ही कसे लढणार?' अशी गुगली टाकली. पालकमंत्र्यांच्या या गुगलीने माने क्षणभर दचकलेच. गेली २० वर्षे ही जागा सेना लढवत आहे, त्यामुळे यावेळी युती झाली तर त्यावर सेनेचाच हक्क आहे. युती झाली तरी मीच आणि नाही झाली तरी मीच उमेदवार असा शब्द पक्षप्रमुख ठाकरे यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले.

यावर 'हा मतदारसंघ आमच्याकडे असल्याने गेले सहा महिने आम्ही मंत्री सदाभाऊ खोत यांना पळवतोय.. कार्यक्रमांचा धडाका लावलाय, निधीही भरपूर खर्च करत आहोत, त्यामुळे काहीही झाले तरी हा मतदारसंघ आमच्याकडेच राहील. तेथे आमची ताकद वाढली आहे. पुर्वी उमेदवार मिळत नव्हते म्हणून आम्ही ती जागा सेनेला सोडली, पण आत्ता तेथे लढणार आहोत.' असे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले. 'हा मतदारसंघ तुम्हाला दिला तर कोल्हापूर आम्हाला द्यावा लागेल, मग तर आमचा प्रश्नच मिटेल,' असे सांगत उमेदवाराचे नावही त्यांनी जाहीर केले. भाजपकडे कोल्हापुरात प्रबळ उमेदवार असल्याने ही जागा पदरात पडण्यासाठी त्यांची फिल्डिंग सुरू असल्याचेही मंत्री पाटील यांच्या बोलण्यातून पुढे आले.

आता गृहीत धरू नका

'शिवसेना पूर्वी जागा वाटपात भाजपला गृहीत धरत होती. पण आता ताकद वाढली आहे. त्यामुळे यापुढे गृहीत धरून राजकारण करता येणार नाही,' असा इशाराच मंत्री पाटील यांनी दिला. पाच राज्याच्या विधानसभा निकालावरच युती होणार की नाही हे ठरेल, असेही ते स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पहिली उचल अधांतरीच

$
0
0

शिल्लक साखर,पडलेला भाव यावरून कारखानदारांकडून चिंता व्यक्त

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जागतिक बाजारपेठेत कमी झालेले साखरेचे भाव, बाजारपेठेत साखरेला नसलेला उठाव, साखर निर्यातीला बँकाचा नकार आणि गतवर्षी निर्यातीचे न मिळालेले अनुदान यामुळे जिल्ह्यातील साखर कारखानदारांची चिंता वाढली आहे. साखर उद्योगाच्या सद्यस्थितीबद्दल सोमवारी जिल्ह्यातील कारखानदारांनी एकत्र बैठक घेऊन सविस्तर चर्चा केली. कारखानदारांनी अडचणींवर चर्चा केली असताना ऊस उत्पादकांना पहिली उचल कधी देणार याबाबत कोणतेही भाष्य न केल्याने उसाची बिले कधी मिळणार, असा प्रश्न ऊस उत्पादकांकडून विचारला जात आहे.

शहरातील एका हॉटेलमध्ये जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्याचे अध्यक्ष, कार्यकारी संचालक उपस्थित होते. बैठकीस आमदार हसन मुश्रीफ, चंद्रदीप नरके, माजी आमदार प्रकाश आवाडे, विनय कोरे, पी.एन. पाटील, दत्त शिरोळचे गणपतराव पाटील, शरद कारखान्याचे राजेंद्र पाटील यड्रावकर, गुरुदत्तचे भगवानराव घाटगे, दूधगंगाचे कार्यकारी संचालक जोशी, राजारामचे पी.जी.मेढे यांची प्रमुख उपस्थिती होती.

बैठकीत साखर उद्योगासमोर आलेल्या अडचणींवर चर्चा करण्यात आली. साखरेचा दर २९०० रुपयांच्या खाली आला आहे. बाजारात साखरेला उठाव होत नसल्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली. अनेक कारखान्यांकडे गतवर्षीची ३० ते ५० टक्के साखर अद्याप शिल्लक आहे. गेल्या महिन्यात फक्त ४० ते ५० टक्के साखर खपली आहे. जागतिक बाजारपेठेत साखरेचा दर प्रतिटन ३८५ डॉलरवरुन ३४० डॉलरपर्यंत खाली आला आहे. तसेच डॉलरचा भाव ७४ रुपयांवरुन ७० रुपयांवर आल्याने निर्यात होणाऱ्या साखरेला कमी भाव मिळण्याची शक्यता व्यक्त केली. भाव कमी झाल्याने साखरेच्या निर्यातीवर परिणाम झालेला आहे. कर्ज परतफेड न केल्याने साखर निर्यात करण्यास बँका परवानगी देत नाहीत. गतवर्षी निर्यात केलेल्या साखरेचे अनुदान कारखान्यांना अजूनही मिळालेले नाही. साखरेचा बफरस्टॉक करुन सहा महिने उलटले तरी त्याचे अनुदान कारखान्यांना मिळालेले नाही.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साखरेला प्रतिक्विंटल ३१०० रुपये दर मिळण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करण्याचे आश्वासन दिले होते. पण त्याचाही निर्णय झालेला नाही. उत्तर प्रदेशच्या धर्तीवर कोणतेही अनुदान केंद्र सरकारकडून अद्यापही जाहीर केलेले नाही. त्यामुळे दैनंदिन कामकाजामध्ये साखर कारखान्यांना अनेक आर्थिक अडचणी येत असल्याबद्दलच्या अडचणी बैठकीत मांडण्यात आल्या.

............

चौकट

पहिली उचलीबाबत चर्चाच नाही

एकीकडे कारखानदारांनी अडचणींचा पाढा वाचला असला तरी ऊस उत्पादकांना पहिली उचल कधी देणार हे स्पष्ट केलेले नाही. १२ नोव्हेंबरला जिल्ह्यातील सर्व कारखाने सुरु झाले आहेत. गाळप झालेल्या उसाचे एफआरपीनुसार बिल देण्याचे कारखान्याने कायदेशीर बंधन आले. पण कारखानदारांनी अजूनही उत्पादकांना बिल दिलेले नाही. बैठकीत ऊस उत्पादकांना पहिली उचल देण्याबाबत कोणतीच चर्चा झाली नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

के. डी. पाटील यांचा सत्कार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कसबा बावडा

मागासवर्ग आयोगाचे विधी सल्लागार व निवृत्त प्रमुख जिल्हा न्यायाधीश के. डी. पाटील यांच्या निवासस्थानी पालकमंत्री चंद्रकांत पाटील व आमदार सतेज पाटील यांनी सदिच्छा भेट देवून त्यांचा सपत्नीक सत्कार केला. आयोगाचे विधी सल्लागार म्हणून पाटील यांनी महत्वाची जबाबदारी पार पाडली असून मराठा समाजाला आरक्षण देताना ते कायद्याच्या चौकटीत कसे बसवता येईल याचा अभ्यास करण्याची जबाबदारी पाटील यांच्यावर होती.

पालकमंत्र्यांनी मागासवर्ग आयोगात मराठा आरक्षणाविषयी पाटील यांनी दिलेल्या योगदानाबद्दल आभार मानले. यावेळी त्यांनी के. डी. पाटील यांचा फेटा बांधून शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. आमदार सतेज पाटील यांनीही विधी सल्लागार पाटील यांचा सत्कार केला. यावेळी के. डी. पाटील यांच्या पत्नी सरोजिनी, अॅड. जीवन पाटील, उद्योगपती शिवाजी मोहिते तसेच भारतवीर मित्र मंडळ व स्थानिक भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

...............

फोटो ओळ : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मागासवर्ग आयोगाचे विधी सल्लागार के. डी. पाटील यांचा सत्कार केला. यावेळी उपस्थित सरोजिनी पाटील, अॅड. जीवन पाटील, शिवाजी मोहिते आदी.

..........

फोटो : राहुल मगदूम

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत कोरे यांची चर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

येथील शासकीय विश्रामगृहात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी सोमवारी दुपारी माजी मंत्री विनय कोरे यांनी बंद खोलीत चर्चा केली. सुमारे अर्धा तास दोघांत गुप्तगू झाले. मंत्री पाटील हे कोरे यांना भाजपमध्ये आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यांना अद्याप यश आलेले नाही. मात्र कोरे यांना ते रसद पुरवत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत हातकणंगले लोकसभा निवडणुकीसाठी कोरे यांची मदत महत्वाची आहे. त्या पार्श्वभूमीवर दोघांत झालेल्या चर्चेमुळे राजकीय क्षेत्रात चर्चेला उधाण आले आहे. बंद खोलीत भेट झाल्याने नेमक्या कोणत्या विषयावर चर्चा झाली, त्याचा नेमका तपशील समजू शकला नाही.

----------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सत्ताधाऱ्यांच्या बैठकीत गोंधळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषदेतील सत्तारुढ आघाडी अंतर्गत सुरू असलेली धुसफूस सोमवारी चव्हाट्यावर आली. सध्याचे सभागृह अस्तित्वात आल्यापासून पहिल्यांदाच सत्तारुढ सदस्यांची अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित केली होती. बैठकीला अध्यक्षा शौमिका महाडिक व सीईओ अमन मित्तल यांना बैठकीला येण्यास दोन तास विलंब झाल्याने सदस्यांचा संयम सुटला. त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या कामकाजाचा पंचनामा करत आढावा बैठकीवर बहिष्कार टाकत सगळे समिती सभागृहातून बाहेर पडले. 'सदस्यांच्या पाठबळावर पदाधिकाऱ्यांच्या खुर्च्या टिकून आहेत, त्यांचा आदर करा' अशा संतप्त भावना काहींनी व्यक्त केल्या.

अपुरा विकास निधी, मंजूर निधी खर्च करण्यास होत असलेला विलंब यावरुन जिल्हा परिषद सदस्यात प्रचंड नाराजी आहे. शिवाय सव्वा वर्षानंतर पदाधिकारी बदल करण्याचे ठरले असताना नवीन पदाधिकारी निवड झाली नाही. या साऱ्या कारणावरुन सत्तारुढ आघाडीत धुसफूस सुरू आहे. दुसरीकडे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता केव्हाही लागण्याची शक्यता आहे. यामुळे निधी अखर्चित राहण्याची भिती सदस्यांना लागू आहे. प्रशासकीय पातळीवरुन पदाधिकारी पाठपुरावा करत नसल्याचा अनेकांनी आक्षेप नोंदविला होता. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी सत्तारुढ गटाचे सदस्य, पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांची संयुक्त बैठकीचे आयोजन केले होते.

बैठकीची नियोजित वेळ सकाळी ११ ची होती. बैठक सुरू होवून दोन तास उलटले तरी अध्यक्ष, सीईओ व पाच विभागाचे प्रमुख बैठकीला पोहचले नाहीत. शिवाय समाजकल्याण, पशुसंवर्धन, आरोग्य, पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी नव्हते. सदस्यांनी चौकशी केल्यावर अध्यक्षा इचलकरंजी येथील कार्यक्रमात तर सीईओ प्रवासात असल्याचे सांगितले. सदस्य दुपारी दीड वाजेपर्यंत सभागृहात थांबून राहिले. 'अध्यक्ष व सीईओ बैठकीला नसतील तर धोरणात्मक व अंमलबजावणीचे निर्णय कोण घेणार? मोठ्या प्रमाणात निधी पडून आहे, त्याच्या नुकसानीला जबाबदार कोण ? पाणी पुरवठ्याच्या योजना का रखडल्या असा प्रश्न सदस्य प्रा. शिवाजी मोरे, राहुल आवाडे,पद्माराणी पाटील, शंकर पाटील, प्रवीण यादव, प्रा. अनिता चौगुले आदींनी उपस्थित केला. उपाध्यक्ष सर्जेराव पाटील यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. शिक्षण समिती सभापती अंबरिश घाटगे, गटनेते अरुण इंगवले, पक्षप्रतोद विजय भोजेसह सुमारे २७ सदस्य बैठकीला हजर होते. सायंकाळी अध्यक्षांनी काही सदस्य व पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केल्याचे समजते.

०००००

सभागृह अस्तित्वात आल्यानंतर पहिल्यांदाच संयुक्त बैठक बोलावली होती. त्यामुळे सदस्य मोठ्या अपेक्षा ठेऊन बैठकीला उपस्थित राहिले होते. पदाधिकारी व प्रमुख अधिकारी बैठकीची वेळ पाळणार नसतील तर सदस्यांना कशाला बोलावले. सदस्यांचा सन्मान राखायला पाहिजे. विकास कामांना गती लाभावी हा सदस्यांचा आग्रह आहे.

राहुल आवाडे, सदस्य

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सत्ताधाऱ्यांच्या बैठकीत गोंधळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषदेतील सत्तारुढ आघाडी अंतर्गत सुरू असलेली धुसफूस सोमवारी चव्हाट्यावर आली. सध्याचे सभागृह अस्तित्वात आल्यापासून पहिल्यांदाच सत्तारुढ सदस्यांची अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित केली होती. बैठकीला अध्यक्षा शौमिका महाडिक व सीईओ अमन मित्तल यांना बैठकीला येण्यास दोन तास विलंब झाल्याने सदस्यांचा संयम सुटला. त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या कामकाजाचा पंचनामा करत आढावा बैठकीवर बहिष्कार टाकत सगळे समिती सभागृहातून बाहेर पडले. 'सदस्यांच्या पाठबळावर पदाधिकाऱ्यांच्या खुर्च्या टिकून आहेत, त्यांचा आदर करा' अशा संतप्त भावना काहींनी व्यक्त केल्या.

अपुरा विकास निधी, मंजूर निधी खर्च करण्यास होत असलेला विलंब यावरुन जिल्हा परिषद सदस्यात प्रचंड नाराजी आहे. शिवाय सव्वा वर्षानंतर पदाधिकारी बदल करण्याचे ठरले असताना नवीन पदाधिकारी निवड झाली नाही. या साऱ्या कारणावरुन सत्तारुढ आघाडीत धुसफूस सुरू आहे. दुसरीकडे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता केव्हाही लागण्याची शक्यता आहे. यामुळे निधी अखर्चित राहण्याची भिती सदस्यांना लागू आहे. प्रशासकीय पातळीवरुन पदाधिकारी पाठपुरावा करत नसल्याचा अनेकांनी आक्षेप नोंदविला होता. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी सत्तारुढ गटाचे सदस्य, पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांची संयुक्त बैठकीचे आयोजन केले होते.

बैठकीची नियोजित वेळ सकाळी ११ ची होती. बैठक सुरू होवून दोन तास उलटले तरी अध्यक्ष, सीईओ व पाच विभागाचे प्रमुख बैठकीला पोहचले नाहीत. शिवाय समाजकल्याण, पशुसंवर्धन, आरोग्य, पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी नव्हते. सदस्यांनी चौकशी केल्यावर अध्यक्षा इचलकरंजी येथील कार्यक्रमात तर सीईओ प्रवासात असल्याचे सांगितले. सदस्य दुपारी दीड वाजेपर्यंत सभागृहात थांबून राहिले. 'अध्यक्ष व सीईओ बैठकीला नसतील तर धोरणात्मक व अंमलबजावणीचे निर्णय कोण घेणार? मोठ्या प्रमाणात निधी पडून आहे, त्याच्या नुकसानीला जबाबदार कोण ? पाणी पुरवठ्याच्या योजना का रखडल्या असा प्रश्न सदस्य प्रा. शिवाजी मोरे, राहुल आवाडे,पद्माराणी पाटील, शंकर पाटील, प्रवीण यादव, प्रा. अनिता चौगुले आदींनी उपस्थित केला. उपाध्यक्ष सर्जेराव पाटील यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. शिक्षण समिती सभापती अंबरिश घाटगे, गटनेते अरुण इंगवले, पक्षप्रतोद विजय भोजेसह सुमारे २७ सदस्य बैठकीला हजर होते. सायंकाळी अध्यक्षांनी काही सदस्य व पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केल्याचे समजते.

०००००

सभागृह अस्तित्वात आल्यानंतर पहिल्यांदाच संयुक्त बैठक बोलावली होती. त्यामुळे सदस्य मोठ्या अपेक्षा ठेऊन बैठकीला उपस्थित राहिले होते. पदाधिकारी व प्रमुख अधिकारी बैठकीची वेळ पाळणार नसतील तर सदस्यांना कशाला बोलावले. सदस्यांचा सन्मान राखायला पाहिजे. विकास कामांना गती लाभावी हा सदस्यांचा आग्रह आहे.

राहुल आवाडे, सदस्य

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बांधकामासंदर्भात ई पोर्टल सुरू करणार’

$
0
0

'दालन २०१९' च्या माहिती पुस्तिकाचे प्रकाशन

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर शहराच्या विकासाला चालना देण्यासाठी महापालिका विविध पातळीवर प्रयत्नशील आहे. भाडेतत्वावरील विशेषत: व्यापारी मिळकतींचा घरफाळा (प्रॉपर्टी टॅक्स) कमी करण्यासंदर्भात सर्वसाधारण सभेसमोर प्रस्ताव आणू. तसेच बांधकाम पूर्णत्वासाठी आवश्यक ना हरकत दाखला व घरफाळा नोंदणीच्या ऑनलाइन कार्यवाहीसाठी 'ई पोर्टल'सुरू करत असल्याची ग्वाही आयुक्त अभिजित चौधरी यांनी दिली.

क्रिडाई कोल्हापूरतर्फे फेब्रुवारी महिन्यात बांधकामविषयक 'दालन २०१९' प्रदर्शन आयोजित केले आहे. 'दालन...'च्या माहिती पुस्तिकाचे प्रकाशन व स्टॉल बुकिंगचा शुभारंभ सोमवारी झाला. जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्या हस्ते व आयुक्त चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत रेसिडेन्सी क्लब येथे हा कार्यक्रम झाला.

भाडेतत्वावरील व्यापारी मिळकतींचा घरफाळा जास्त असल्यामुळे कोल्हापुरात मोठ्या कंपन्यांची कार्यालये, कंपन्यांचे शोरुम्स सुरू होण्यात अडचणी उदभवत आहेत. त्याचा फटका शहराचा विकास, रोजगार निर्मितीवर होत आहे. महापालिकेने या मिळकतींचा घरफाळा कमी करावा यासाठी क्रिडाईचा पाठपुरावा सुरू आहे. महापालिकेने हा घरफाळा कमी करावा, अशी मागणी क्रिडाईचे अध्यक्ष महेश यादव यांनी केली.

त्या मागणीचा संदर्भ घेत आयुक्तांनी भाडेतत्वावरील मिळकतीचा घरफाळा कमी करण्यासंदर्भात प्रशासन सकारात्मक असल्याचे नमूद केले. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ३५ पैकी ४ प्रकल्पांना मंजुरी मिळाली आहे. महापालिकाही सरकारी व स्वत:च्या जागेवर खासगी विकसकामार्फत घरकुल बांधणीचा प्रस्ताव तयार करत आहे. लवकरच त्याची निविदा काढण्यात येणार असून बांधकाम व्यावसायिकांनी सहकार्य करावे. तसेच क्रिडाईने शहरातील चौक सुशोभिकरणाचा प्रस्ताव दिल्यास त्याला एका दिवसात मंजुरी देऊ, असे आयुक्तांनी नमूद केले.

जिल्हाधिकारी सुभेदार म्हणाले, 'खासगी विकसक, प्रशासन व उद्योगपतींनी हातात हात घालून काम केल्यास शहराचा विकास झपाट्याने होईल. प्रशासन विकासात्मक दृष्टीकोन ठेवून कार्य करत आहे. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत इचलकरंजीत ७५० घरकुलांच्या प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे.' 'दालन'चे चेअरमन सचिन ओसवाल यांनी बांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी महापालिकेने पायाभूत सुविधांची पूर्तता करावी अशी मागणी केली. समन्वयक संजय चव्हाण यांनी आभार मानले. याप्रसंगी क्रिडाईचे उपाध्यक्ष विद्यानंद बेडेकर, सचिव के. पी. खोत, विक्रांत जाधव, पारस ओसवाल, कृष्णा पाटील, शंकर गावडे, श्रेयांस मगदूम, प्रमोद साळोखे आदी उपस्थित होते.

................

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंगळवेढा सबजेलमधून आरोपीचे पलायन

$
0
0

मंगळवेढा सबजेलमधून आरोपीचे पलायन

सोलापूर :

न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपीने कंपाउंडच्या भिंतीवरून उडी मारून मंगळवेढा सबजेलमधून पलायन केल्याची घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. दादासाहेब दिगंबर लेंडवे (वय ४८ राहणार, लेंडवे चिंचोळे, तालुका मंगळवेढा ) असे पलायन केलेल्या आरोपीचे नाव आहे. सकाळच्या सुमारास शौचालयासाठी त्याला बाहेर काढले असताना आरोपीने सब्जेलच्या कंपाउंडच्या भिंतीवरून पलायन केले. चादरी फाडून एकमेकांना गाठी मारून भिंत ओलांडून पलायन केले. लेंडवे याच्या विरोधात मंगळवेढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images