Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

स्टुडिओसाठी न्यायालयीन लढाई

$
0
0

चित्रपट महामंडळाकडून दिन काळा दिवस

फोटो आहे

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शालिनी स्टुडिओ कोल्हापूरची अस्मिता असून स्टुडिओ बिल्डरच्या घशात जाऊ देणार नाही. महापालिका व सरकारने त्वरित लक्ष न दिल्यास न्यायालयीन आणि रस्त्यावरील लढाई लढण्याचा निर्धार शनिवारी करण्यात आला. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे चित्रपट व्यवसाय दिन काळा दिन म्हणून साजरा करत काळ्या फिती लावून प्रशासन व सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिला. खरी कॉर्नर येथील कॅमेरा मानस्तंभासमोर महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले.

राजेभोसले म्हणाले, 'शालिनी स्टुडिओबाबत महापालिका पदाधिकारी,अधिकाऱ्यांनी जाणीपूर्वक दुर्लक्ष केले. नगरविकास राज्यमंत्री रणजितसिंह पाटील यांनी अत्यंत चुकीचा निर्णय दिला असून या निर्णयाला कोर्टात आव्हान देण्यात येणार आहे. ऐतिहासिक वारसास्थळ असलेला स्टुडिओ वाचवण्यासाठी रविवारी (ता. २) पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेणार असून सोमवारी (ता. ३) आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांना घेराव घालणार आहे. कोल्हापूर वासियांनी या आंदोलनात सहभागी व्हावे.' असे आवाहन त्यांनी केले.

'राज्यमंत्री पाटील यांनी विकसकाचे अपील मंजूर केले असले, तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रद्द करण्याचा अधिकार आहे. पालकमंत्री पाटील यांच्या माध्यमातून त्यांच्याशी चर्चा करू. चर्चेतून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास कायदेशीर मार्गाचा अवलंब केला जाईल,' असेही राजेभोसले यांनी सांगितले.

यावेळी चित्रपट व्यावसायिकांनी राज्यमंत्री पाटील, महापालिका प्रशासन, सरकार व बिल्डरविरोधात निषेधाच्या घोषणा दिल्या. यावेळी ज्येष्ठ चित्रपट अभिनेते भालचंद्र कुलकर्णी, महिला व बालकल्याण समिती सभापती सुरेखा शहा, रणजित जाधव, मिलिंद अष्टेकर, सतीश बिडकर, सतीश रणदिवे, दिग्दर्शक यशवंत भालकर, चंद्रकांत जोशी, अर्जुन नलवडे, विजयमाला पेंटर, शुभांगी साळोखे, श्रीकांत डिग्रजकर, सुरेंद्र पन्हाळकर, अरुण चोपदार आदी उपस्थित होते.

घरकुल योजना राबवा

'जयप्रभा स्टुडिओचे ज्याप्रमाणे अस्तित्व संपुष्टात आणले, त्याप्रमाणे शालिनी स्टुडिओची अस्तित्व संपुष्टात येऊ नये, यासाठी लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर यांनी केले. पण त्याचवेळी त्यांनी स्टुडिओच्या जागेवर महामंडळाच्या सदस्यांसाठी घरकूल योजना राबवावी, अशी मागणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


खोळंबा आकारात ९० टक्के सवलत

$
0
0

आमदार राजेश क्षीरसागर यांची माहिती

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'सौंदती यात्रेसाठी कोल्हापूर शहरातून १६५ एसटी गाड्या प्रासंगिक कराराद्वारे बुकिंग केल्या जातात. भाविकांच्या सोयीसाठी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करुन यंदा खोळंबा आकारात ९० टक्के सवलत मिळाली आहे. प्रतितास दहा रुपये इतका खोळंबा आकारणीस मंजुरी मिळाली आहे, ' अशी माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार बैठकीत दिली.

आमदार म्हणाले, 'सौंदती येथील रेणुका देवीची यात्रेला सर्वसामान्य घरांतील भक्त मोठ्या संख्येने जातात. त्यांना कमी झालेला खोळंबा आकार दिलासा देणारा आहे. यात्रेसाठी खोळंबा आकार व एसटी भाड्याचा प्रश्न कायमस्वरुपी निकालात निघावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. २०१५ मध्ये सौंदती यात्रेसाठी ३८० किमीसाठी प्रतिकिलोमीटर ४२ इतका एसटी दर तर ताशी ९८ रुपये प्रमाणे ७२ तासांचा खोळंबा आकार होता. मंत्री रावते यांनी खास बाब म्हणून सवलत दिल्याने खोळंबा आकारासह एसटी भाडे कमी झाले. यंदा, प्रत्येक गाडीमागे ९३७६ इतकी बचत होणार आहे. सततच्या प्रयत्नामुळे गेल्या तीन वर्षात भाविकांची ३३ लाख रुपयांची बचत झाली.

विभागीय वाहतूक नियंत्रक रोहन पलंगे यांनी यात्रेसाठी नियोजन केले आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी अधिकाऱ्यांवर जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत. २० प्रवाशांसाठी एका अधिकाऱ्याची नेमणूक केल्याचे सांगितले. पत्रकार परिषदेला रेणुका भक्त संघटनेचे अध्यक्ष मोहन साळोखे, माजी नगरसेवक रविकिरण इंगवले, उदय पाटील, जयवंत हारुगले, पद्माकर कापसे, किशोर घाटगे, धनाजी दळवी, रणजित जाधव, विजय सावंत, माजी उपमहापौर उदय पोवार आदी उपस्थित होते.

क्षीरसागरांनी लगावला विरोधकांना टोला

काही मंडळी यात्रा आली की खोळंबा आकार वाढल्याचे आणि नंतर तो आकार कमी केल्याचे भासवायचे. जेणेकरुन 'मीच या यात्रेचा मसीहा' असे चित्र निर्माण करायचे. पण लोकप्रतिनिधीच्या नात्याने मागील तीन वर्षांमध्ये या गोष्टीत मी लक्ष घातले. परिवहनमंत्र्यांशी चर्चा केली. खोळंबा आकार कमी करण्यासाठी यशस्वी पाठपुरावा केला. खरे तर, सौंदती यात्रा, खोळंबा आकारावरुन राजकारण आणि भाविकांच्या भावनेशी खेळण्याचा प्रयत्न कुणी करु नये.' असा टोला आमदार क्षीरसागर यांनी विरोधकांना लगावला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मारहाणीत तिघे जखमी

$
0
0

इचलकरंजी : भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या शशिकांत श्रीकांत घारूंगे, शेलम शक्ती गागडे व तनीशा शशिकांत घारूंगे या तिघांना लोखंडी रॉड व काठीने मारून जखमी केले. याप्रकरणी येथील चौघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत शशिकांत घारूंगे (वय ४६, रा. सहकारनगर) यांनी फिर्याद दिली आहे. शशिकांत घारुंगे हे शेलम गाडगे व राधा कांबळे यांची भांडणे सोडविण्यासाठी गेले असता बच्चन कांबळे, तौफिक (पूर्ण नाव माहीत नाही), खंडू नेटके, बाळू पाथरे यांनी शशिकांत घारूंगे, शेलम गागडे व तनीशा घारूंगे यांना लोखंडी रॉड व काठीच्या सहाय्याने मारहाण करून जखमी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. लवटे, यादव यांना ‘ऋग्वेद’ पुरस्कार जाहीर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, आजरा

यावर्षीचा प्रतिष्ठेचा 'ऋग्वेद' पुरस्कार ज्येष्ठ शिक्षक, लेखक विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. सुनीलकुमार लवटे (कोल्हापूर) यांना जाहीर झाला आहे, तर 'ऋग्वेद' परिवाराच्या संस्थापक संचालिका सई अपसंगी यांच्या स्मरणार्थ या वर्षीपासून सुरू केलेला शिक्षक-सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार 'चिल्लर पार्टी'च्या माध्यमातून गरीब आणि झोपडपट्टीतील मुलांसाठी कार्यरत असलेले मिलिंद यादव यांना जाहीर केल्याची माहिती आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.

आजरा येथील चैतन्य सृजन आणि सेवा संस्थेच्या माध्यमातून हे पुरस्कार दरवर्षी देण्यात येतात. शिक्षण क्षेत्रात सर्जनशील आणि पायाभूत कार्यासाठी 'ऋग्वेद' पुरस्कार दिला जातो. डॉ. लवटे यांनी संपूर्ण आयुष्यच औपचारिक व अनौपचारिक शिक्षणासाठी वाहिले आहे, त्याचा सन्मान या पुरस्कारातून होणार आहे. १६ डिसेंबरला होणाऱ्या समारंभात डॉ. शिवशंकर उपासे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या समारंभात हे पुरस्कार प्रदान केले जातील.

तसेच तालुक्यातील शिक्षक ल. धों. पाटील यांच्या समरणार्थ विजयकुमार पाटील यांनी ठेवलेला दुर्गम शाळांतील मुलांसाठी कार्यरत शिक्षक पुरस्कार उत्तम कोकितकर यांना, व जिल्हास्तर महिला शिक्षिकेसाठीच तेरेजा फर्नांडिस पुरस्कार सविता पाटील (कागल) यांना जाहीर झाला. याशिवाय जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून शिक्षण विभागाने निवड केलेल्या प्राथमिक, माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षकांनाही यावेळी सन्मानित करण्यात येणार आहे.

०००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘विमानतळाच्या ६४ एकर जागेसाठी पाठपुरावा करू’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'कोल्हापूरातील विमानतळाला थ्रीसी व्हीएफआर परवाना मिळाला असला तरी तेवढ्यावर समाधान मानून चालणार नाही. देश, परदेशातील शहरे कोल्हापूरशी जोडण्यासाठी धावपट्टीचे विस्तारीकरण आवश्यक असून त्यासाठी लागणाऱ्या ६४ एकर अतिरिक्त जमिनीसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार आहे,' असे खासदार संभाजीराजे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

ते म्हणाले, 'विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी ६४ एकर अतिरिक्त जागेची मागणी केली आहे. जागेचा प्रस्ताव महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने जिल्हा प्रशासनाकडे मागितली आहे. त्यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे. तसेच वन विभागाची हस्तांतरित केलेली जमीन वापरण्यासाठी पाठपुरावा करू. मुंबई, हैद्राबाद, तिरुपती या विमान सेवेवर समाधान न मानता कोल्हापूर सिंगापूर, दिल्ली, कोलकोता अशी विमानसेवा सुरू होण्यासाठी मोठी धावपट्टी आवश्यक आहे. अतिरिक्त जागा उपलब्ध झाल्यास धावपट्टीचे विस्तारीकरण होऊन एअरबस ए ३२० सारखी मोठी विमाने उतरणे शक्य होईल. विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी २७४ कोटी रुपयांचा आराखडा करण्यात आला आहे. विमानतळाला छत्रपती राजाराम महाराजांचे नाव देण्यात येणार असून त्यासाठी दिल्लीत प्रयत्न केले जात आहेत. विमान प्राधिकरणाने विमानतळाच्या इमारतीचे डिझाईन तयार केले आहे. पण डिझाईन आधुनिक पद्धतीचे असल्याने त्या इमारतीला कोल्हापुरी टच असावा, असे डिझाईन तयार करण्यात आले आहे. हे डिझाईन प्राधिकरणाला सादर करण्यात येणार आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्राथमिक शिक्षकांची निदर्शने

$
0
0

कोल्हापूर: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित मागण्याकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ शिक्षकांनी करवीर तहसीलदार कार्यालयासमोर निदर्शने केली. याप्रसंगी २६ मागण्यांचे निवदेन सादर केले. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, कोल्हापूर शहर व करवीर शाखेच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. एक नोव्हेंबर २००५ पासून नियुक्त शिक्षक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना व भविष्य निर्वाह निधी योजना लागू करावी, कमी पटसंख्या अभावी शाळा बंद करू नयेत. पात्र शिक्षकांना विनाअट वरिष्ठ वेतन श्रेणी मिळावी, महापालिका व नगरपालिका शाळेतील शिक्षकांच्या पगारासाठी सरकारने शंभर टक्के अनुदान द्यावे, यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन झाले. अखिल भारतीय प्रारंभिक शिक्षक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रभाकर आरडे, राज्य प्रमुख सुधाकर सावंत, उपाध्यक्ष उमेश देसाई, महिला आघाडीच्या राज्याध्यक्ष वर्षा केनवडे, शिक्षक नेते कृष्णात कारंडे आदींच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. याप्रसंगी सरकारच्या विरोधी घोषणा देत निदर्शने केली. शिक्षक समितीच्या विजयाच्या घोषणांनी परिसर दणाणला. आंदोलनात सुरेश कोळी, सतीश बरगे, हरिदास वर्णे, चंद्रकांत पाटील, श्रीकांत गुर्जर, दीपाली भोईटे, संदीप मगदूम, हिंदुराव परीट, संजय पाटील आदींचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पवारांनी जमवला गप्पांचा फड

$
0
0

महाडिकांच्या घरी कोल्हापुरी मटण, आहार, उसापासून राजकारणापर्यत चर्चा

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'मी मटण खातोय ते फक्त कोल्हापूर आणि साताऱ्यातच. तुमचं दीक्षित गुरुजींचं फॅड आता आलंय. अनेक वर्षे दोन जेवणाच्या मध्ये मी काहीच खात नाही. कोल्हापूरची माणसं मटणाचे मोठे शौकीन. उपवास असेल तर रात्री बारानंतर मटण खातात...'असे किस्से सांगता सांगता राष्ट्रीय नेते शरद पवारांनी आवडत्या उसाच्या प्रश्नाला हात घातला आणि गप्पांचा फड ऊस, राजकारण, शेती, लोकसभा निवडणूक अशा विषयांवर रंगला. तासभराहून अधिक काळ रंगलेल्या अनौपचारिक गप्पांमध्ये व्यासंगी, मिश्कील आणि हजरजबाबी व्यक्तिमत्वाचे दर्शन घडले.

आंबोलीत रविवारी होणाऱ्या एका कार्यक्रमाच्या निमित्ताने पवार शनिवारी कोल्हापुरात आले. दुपारी खासदार धनंजय महाडिक यांच्या घरी स्नेहभोजनात तांबडा-पांढरा रस्सा असा फक्कड बेत होता. कोल्हापुरात पोहोचल्यानंतर पवारांनी थेट रुईकर कॉलनीतील खासदार महाडिकांचे निवासस्थान गाठले. रश्श्याबरोबरच मटण लोणच्याचाही त्यांनी आस्वाद घेतला. लोकसभा निवडणूक आणि कोल्हापुरातील राजकीय संभ्रमाच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला मात्र, पवार यांनी त्यावरचे भाष्य टाळत अन्य गोष्टींवर गप्पांचा फड रंगवला. यावेळी पवार यांनी खासदार महाडिक यांचा संसदीय उपनेतेपद मिळाल्याबद्दल सत्कार केला. या निवडीबद्दल खासदार महाडिक यांनी पवार यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत पुष्पगुच्छ व शाल देऊन स्वागत केले. कोल्हापूर लोकसभेचा प्रश्न सुटल्याने ताण हलका झालेले पवार निवांत मूडमध्ये होते.

गप्पांची मैफल सुरू झाली ती मटणाच्या विषयानेच. 'कोल्हापुरी मटण भारी असते. मी मटण खातो ते फक्त कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातच. देशात अथवा परेदशातदेखील कुठेही खात नाही,' हे सांगताना पवारांना कोल्हापुरी मटण किती आवडते याचा पुरावाच दिला. 'कोल्हापुरी माणसं मटणाचे मोठे शौकीन. उपवास असेल तर रात्री बारानंतर काहीजण मटण खातात,' हे सांगताना त्यांना हसू आवरले नाही. आपल्या तब्येतीचे रहस्य उलगडताना त्यांनी गेले अनेक वर्षे आपण दोन जेवणाच्या मध्ये काहीही खात नसल्याचे सांगितले. पायावर शस्त्रक्रिया झाल्याने पायऱ्या चढताना त्रास होतो, पण चालण्याचा व्यायाम कायम असल्याचे ते म्हणाले. बोलता बोलता त्यांनी त्यांच्या आवडीच्या विषयाला हात घातला. उसावर ते बोलू लागले. राज्यात व केंद्रात असलेल्या सत्ताधाऱ्यांना शेती प्रश्नातील काही कळत नाही, यामुळे प्रश्न वाढत आहेत असा टोलाही त्यांनी मारला. ऊस शेती परवडत असली तरी शेतकऱ्यांनी त्याला पर्याय म्हणून फळबागा करायला हरकत नाही, असा सल्लादेखील त्यांनी दिला. पवारांनी साखर कारखान्यांचा विषय काढताच खासदार महाडिक व आमदार हसन मुश्रीफांनी कारखानदारांसमोरील पाढा वाचताना आकडेवारीच सादर केली. बीट वापरून साखर निर्मिती करण्याचा प्रयोग परदेशात यशस्वी झाला आहे, तो येथे करायला हवा, याचा अभ्यासही सुरू असल्याचे पवारांनी सांगितले.

देशात भाजप विरोधात आघाडी स्थापन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे गप्पांच्या ओघात हा विषय येताच त्यांचा चेहरा आणखी खुलला. कारण शेतकऱ्यांच्या प्रश्नावर दिल्लीत सारे विरोधक एकवटले. हे चांगले चिन्ह होते. या आघाडीच्या स्थापनेत त्यांच्या पुढाकार आहे. त्यामुळे ते खूष दिसले. बोलता बोलता त्यांनी अनेक विषयाला स्पर्श केला. या गप्पात महाडिक, मुश्रीफ यांच्यासह व्ही. बी. पाटील, ए. वाय. पाटील, आर. के. पोवार, अनिल साळाखे हेदेखील सहभागी झाले आणि चर्चा रंगतच गेली. यावेळी अरुंधती महाडिक, पृथ्वीराज महाडिक, कृष्णराज महाडिक,समीर शेठ उपस्थित होते.

चौकट नको म्हणून आलो...

गप्पांचा फड रंगला असतानाच तेथे आमदार मुश्रीफ आले. आल्याआल्या त्यांनी षटकार मारला. पत्रकारांकडे पाहत, 'उद्या चौकट नको म्हणून आलो' असे म्हणताच सारेच हास्यात बुडाले. लोकसभा उमेदवारीच्या घडामोडीत दोन्ही नेत्यांमधील वादाच्या पार्श्वभूमीवर महाडिकांच्या घरात पवार असताना मुश्रीफ नव्हते, अशी काही बातमी येऊ नये, म्हणून आपण आल्याची कबुली त्यांनी दिली. तेव्हा महाडिकांनी जेवणाचा आग्रह धरल्यानंतर दीक्षित गुरुजींचे नाव पुढे करत त्यांनी नारळ पाण्यावर समाधान मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फेब्रुवारीत क्रिडाईचे ‘दालन’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बांधकाम व्यावसायिकांची शिखर संस्था असलेल्या क्रिडाईच्या बांधकाम विषयक प्रदर्शन 'दालन'चे ८ ते ११ फेब्रुवारी २०१९ रोजी न्यू शाहूपुरी येथील शाहूपुरी जिमखाना ग्राऊंडवर होणार आहे. तत्पुर्वी दालन माहिती पत्रकाचे प्रकाशन व स्टॉल बुकिंगचा प्रारंभ जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्या हस्ते व आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्या प्रमुख उपस्थित सोमवारी (ता. ३) सायंकाळी सात वाजता रेसिडन्सी क्लब येथे होणार आहे, अशी माहिती क्रिडाईचे अध्यक्ष महेश यादव यांनी पत्रकार बैठकीत दिली.

अध्यक्ष यादव म्हणाले, 'क्रिडाईने बांधकाम व्यावसायिकांचे हित जोपासताना शहराच्या विकासात भरीव योगदान दिले आहे. या योगदानातूनच १९९२ पासून बांधकाम विषयक दालन प्रदर्शनाला सुरुवात झाली. आतापर्यंत आयोजित केलेली सर्व प्रदर्शने यशस्वी झाली असून कोल्हापूर व परिसरातील ग्राहकांना एकाच छताखाली वेगवेगळ्या बांधकाम व इमारत साहित्य विषयक नवनवीन प्रकल्प याही वर्षी पाहण्याची संधी मिळणार आहे. ग्राहकांच्या गरजा व वेळेचे दालन वैशिष्ट्यपूर्ण असेल असेही त्यांनी सांगितले.'

दालनचे चेअरमन सचिन ओसवाल म्हणाले, 'दर तीन वर्षांनी आयोजित केलेले जाणाऱ्या प्रदर्शनाचे १० वे दालन नव्या वर्षात खुले होणार आहे. दालन हा भव्य अशा वस्तू व बांधकाम उपक्रम असून क्रिडाई सभासदांच्या विविध समितींच्या माध्यमातून प्रदर्शन भरवले जाते. यावर्षीचे दालन 'बिग्गर, ब्लोडर, बेटर' या संकल्पनेवर आधारित असून 'यंदा संधी सर्वांसाठी घर योजना' असे उद्देश असणार आहे. सभासदांचे स्टॉल बुक झाले असून वित्त व साहित्य पुरवठा यांच्यासाठी ७० स्टॉल उपलब्ध असून ३० स्टॉल बुक झाले आहेत.'

समन्वयक संजय चव्हाण म्हणाले, '८ फेब्रुवारी रोजी दालनचा प्रारंभ झाल्यानंतर नऊ रोजी सिव्हिल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी टेक्निकल सेमिनार व १० रोजी डॉ. अमोल कोल्हे यांचे व्याख्यान होणार आहे. ११ फेब्रुवारी रोजी दालनचा सांगता समारंभ होणार आहे. ' दालनमध्ये बुकिंग होणाऱ्या प्लॅटधारकांना लकी ड्रॉद्वारे बक्षिस देण्यात येणार असल्याचे विक्रांत जाधव यांनी सांगितले.

पत्रकार बैठकीस क्रिडाईचे उपाध्यक्ष विद्यानंद बेडेकर, सचिव के. पी. खोत, श्रीधर कुलकर्णी, प्रमोद साळुंखे, महेश पोवार, अतुल पोवार, गणेश सावंत यांच्यासह दालनच्या विविध समित्यांचे पदाधिकारी व सभासद होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उद्या काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीची बैठक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर महापालिकेच्या महापौरांनी राजीनामा दिल्यानंतर नूतन महापौर निवडीसाठी हालचाली गतिमान झाल्या आहेत. त्याचाच भाग म्हणून सत्तारुढ काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची बैठक आमदार हसन मुश्रीफ व सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थित होणार आहे. ताराबाई पार्क येथील सर डॉ. विश्वेश्वरय्या हॉल येथे सोमवारी (ता. ३) सकाळी ११ वाजता बैठक होणार आहे.

महापौर शोभा बोंद्रे व उपमहापौर महेश सावंत यांनी राजीनामा दिल्याने नव्या महापौर व उपमहापौरांची निवड सोमवारी (ता. १०) होणार आहे. महापौर राष्ट्रवादी तर उपमहापौरपद काँग्रेस पक्षाकडे राहणार आहे. महापौरपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुकांची संख्या जास्त असली, तरी उपमहापौरपदासाठी काँग्रेसकडे फारसे इच्छुक नगरसेवक नाहीत. मात्र पुढील दोन वर्षे महापालिकेतील सत्ता आघाडीकडे अबाधित ठेवण्यासाठी नेते प्रयत्नशील झाले आहेत.

स्थायी समिती सभापती निवडणुकीवेळी झालेल्या फोडाफोडीच्या राजकारणामुळे नेत्यांनी खबरदारी घेतली असून त्याचाच भाग म्हणून सोमवारी सर्व नगरसेवकांशी संवाद साधणार आहेत. यावेळी नगरसेवकांची मते जाणून घेण्याचीही शक्यता आहे. बुधवारी (ता. ५) महापौर व उपमहापौर पदासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत आहे. तत्पुर्वी दोन्ही पदासाठी नावे निश्चित करून नगरसेवकांना सहलीवर पाठवण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. आघाडीच्या नगरसेवकांची बैठक घेण्यात येणार असली, तरी भाजप-ताराराणी आघाडीने अद्याप हालचाली गतिमान केलेल्या नाहीत. आघाडीकडून महापौरपदाचे नाव जाहीर झाल्यानंतरच विरोधी आघाडीच्या मोर्चेबांधणीला सुरुवात होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाटणच्या तहसीलदारांचे अधिकार काढले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कराड

पाटणच्या तहसीलदारांकडून गौण-खनिज, कुळ कायदा व देवस्थान, वतन जमिनीच्या परवानगीचे अधिकार काढून घेण्याचा आणि पाटण तहसीलदार कार्यालयातील दोन नायब तहसीलदारांची तडकाफडकी बदली करण्याचा निर्णय साताऱ्यांच्या जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी घेतला आहे. दरम्यान, तहसीलदार व प्रांताधिकारी, तहसीलदार व नायब तहसीलदार आणि अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये असलेल्या संघर्षामुळे तहसील कार्यालयातील कामकाजाचा बोजवारा उडाला आहे. या बाबत त्यांनी एकमेकांविरोधात तक्रारीही केल्या होत्या, या सर्व प्रकरानंतर जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी कारवाईच बडगा उगारत तहसीलदारांसह दोन नायब तहसीलदारांच्या बदल्या केल्या आहेत.

पाटण तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांत गेल्या दीड दोन वर्षांपासून मतभेद होते. त्यामुळे त्याचा नाहक त्रास ग्रामस्थ, नागरिकांना सहन करावा लागत होता. तलाठी व मंडलाधिकाऱ्यांकडून ऑनलाइन सात-बारामधील चुका दुरुस्त करताना लोकांची चांगलीच दमछाक होत होती. तहसीलदार व प्रांताधिकाऱ्यांमध्ये नसलेला समन्वय, तहसीलदार व नायब तहसीलदार यांच्यातील चव्हाट्यावर आलेले मतभेद, त्यातून दीर्घ मुदतीच्या रजेवर गेलेल्या नायब तहसीलदारांसह कर्मचाऱ्यांचेही वारंवार रजेवर जाण्याचे प्रमाण वाढले आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये संवाद कमी झाल्याने कर्मचाऱ्यांनी राजीनामा देण्याचेही काही प्रकार घडले होते. त्यातच कुळ कायदा, वतन व देवस्थान जमिनी या दोन परवानगी व गौण खनिज प्रकरणांबाबत तालुक्यात संभ्रमाचे वातावरण होते. सिंघल यांनी पाटणच्या तहसीलदारांचे गौण-खनिज, कुळ कायदा व देवस्थान, वतन जमिनीच्या परवानगीचे अधिकार काढून प्रांताधिकाऱ्यांकडे दिले आहेत. नायब तहसीलदार राजेश जाधव यांची सातारा मुख्यालयात तर विजय माने यांची कराड प्रांताधिकारी कार्यालयात तडकाफडकी बदली केली आहे.

.............

बिबट्याच्या हल्ल्यात वाढ

कराड :

मोळेवाडी (ता. कराड) येथील एका वस्तीवर बिबट्याने हल्ला करून एका रेडकाचा फडशा पाडला. कुसुर (ता. कराड) येथेही शिवारात जनावरे चारायला गेलेल्या गुरख्यासमोरच बिबट्याने हल्ला करून एक वासरू ठार केले. शुक्रवार व शनिवारी या दोन दिवसांत बिबट्याच्या हल्ल्याची ही दुसरी घटना असल्याने कराड तालुक्यात घबराट निर्माण झाली आहे.

..........

सूर्यकांत दळवींची निवड

कराड :

कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी यांची पुणे येथील महाराष्ट्र साखर कारखाना मॅनेजिंग डायरेक्टरर्स असोसिएशन या संस्थेच्या नवीन कार्यकारिणीमध्ये सातारा विभागातून सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीबद्दल दळवी यांचे अभिनंदन होत आहे.

साखर संकुलामध्ये महाराष्ट राज्य साखर कारखाना मॅनेजिंग डायरेक्टरर्स असोसिएशनची वार्षिक सभा मावळते अध्यक्ष सुरेश तावरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. या वेळी नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली असून, असोसिएशनच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र राज्याचे साखर आयुक्त आहेत. उपाध्यक्षपदी पांडुरंग सहकारी कारखान्याचे यशवंत कुलकर्णी, कार्याध्यक्षपदी विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र रणवरे, सचिवपदी अजिंक्यताराचे कार्यकारी संचालक संजीव देसाई, खजिनदारपदी अगस्ती कारखान्याचे भास्कर घुले यांच्या निवडी करण्यात आल्या आहेत. कृष्णा कारखान्याचे कार्यकारी संचालक म्हणून सूर्यकांत दळवी यांनी दीड वर्षापूर्वी पदभार स्वीकारला आहे. या पूर्वी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखाना उस्मानाबादचे कार्यकारी संचालक, लोकमंगल अॅग्रो इंडस्टीज सोलापूरचे युनीट हेड म्हणून काम पाहिले आहे.

वक्तृत्व, निबंध, चित्रकला स्पर्धा

कराड :

मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठानचे संस्थापक स्व. दादासाहेब मोकाशी यांची ६९वी जयंती येत्या गुरू. 06 रोजी सकाळी 10 वा. प"तिष्ठानच्या शैक्षणिक संकुलामध्ये साजरी होणार आहे.या जयंतीच्या निमित्ताने भव्य वक्तृत्व,निबंध आणि चित्रकला स्पर्धांचे आयोजन केले असून या स्पर्धेमध्ये कराड शहर व परीसरातील व़िद्यालयांतील इ. 8 वी ते 10 पर्यंतच्या मुले व मुलींनी सहभाग घ्यावा.ही स्पर्धा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कलागुणांना वाव देण्यासाठी आयोजित केली असून या स्पर्धेमधील विजेत्यास रोख रक्कम व प"माणपत्र तसेच सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प"माणपत्र देण्यात येणार असल्याची माहीती प्रतिष्ठानचे प्रशासकीय प्रमुख विलासराव चौधरी यांनी येथे दिली आहे.

स्पर्धा व स्पर्धेचेविषय खालीलप"माणेः

वक्तृत्व स्पर्धा

संस्काराने माणूस घडतो,नोकरीत गुंतलेली माझी आई,का वाढतात वृद्धाश्रम, सावधान निसर्ग बदलोतय,आजचा युवक आणि व्यसनाधीनता,

निबंध स्पर्धा

महाराष्ट्र संताची भूमी ,पाणीटंचाई एक ज्वलंतसमस्या ,जंगल वाचवू प"ाणी वाचवू ,आईची थोरवी ,बापरे! केवढी हीमहगाई

चित्रकला स्पर्धा

स्मरणचित्र-कृषीप"दर्शन, ग"ामीणभागातील जत्रा, आपले सण व आपले उत्सव, स्वच्छ भारत अभियान तर संकल्पचित्र-फुलदाणीसाठी डिजाईन, आकाश कंदील,टेबलक्लॅाथसाठी डिजाईन

वरील स्पर्धेच्या आयोजनासाठी मोकाशी कृषी विकास प"तिष्ठानचे सेक"ेटरी अभिजीत मोकाशी व उपाध्यक्ष विश्वजीत मोकाशी यांनी प"ोत्साहन दिले,संचालक विलास चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सर्व घटक महाविद्यालयांतील प"ाचार्य,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या सहभागाने स्वर्गीय दादासाहेबांची 69 वी जयंती साजरी होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कडाक्याच्या थंडीने विठुरायालाही भरली हुडहुडी

$
0
0

पंढरपूर, सुनील दिवाण

राज्यभर थंडीचा कडाका वाढत चालला असताना साक्षात विठुरायालाही या थंडीमुळे हुडहुडी भरली असून यापासून उब देण्यासाठी देवाला उबदार रजई, शाल आणि डोक्याला रेशमी मुंडासे बांधण्यास सुरुवात करण्यात आली आहे. गेल्या चार दिवसांपासून थंडीचा कडाका वाढत चालल्याने प्रक्षाळपुजेनंतर देवाला हे उबदार कपडे देण्यास सुरुवात होते . रात्री शेजारतीनंतर विठुराया जेव्हा निद्रेसाठी जातो तेव्हा त्याच्या अंगावरील पोशाख काढून देवाचे अंग पुसून घेतल्यावर देवाच्या डोक्यावरील मुकुट काढून तेथे १५० हात लांबीचे हे खास उबदार मुंडासे देवाच्या मस्तकावर वैशिष्ठ्यपूर्ण पद्धतीने बांधण्यात येते. यानंतर देवाच्या कानाला थंडी वाजू नये म्हणून सुती उपरण्याची कानपट्टी देवाच्या कानाला बांधण्यात येते .

यानंतर देवाच्या उघड्या अंगावर पांढराशुभ्र उबदार शेला डोक्यापासून पायापर्यंत टाकण्यात येतो. यावर पारंपरिक असलेली देवाची उबदार शाल अंगावर टाकून त्यावर खास काश्मिरी रजई घालण्यात येते . या कपड्यांमुळे देवाला नखशिखांत उबदारपणा जाणवेल याची खबरदारी घेतली जाते . यानंतर देवाला तुळशीहार घालून आरती करुन देवाला निद्रेसाठी सज्ज केले जाते . पहाटे काकड्याच्यावेळी देवाच्या अंगावरील हि काश्मिरी रजई काढून बाकीचे उबदार कपडे तसेच ठेवण्यात येतात . साधारणपणे प्रक्षाळपुजेच्या दुसऱ्या दिवसापासून देवाची हुडहुडी घालविण्यासाठी हा खास पद्धतीचा पोशाख देवाला घालण्यात येत असून साधारण होळीपर्यंत हे उबदार कपडे देवाला घालण्यात येतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गूळ दरात घसरण,उत्पादक हवालदिल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गूळ खरेदी दरात पाचशे ते सातशे रुपयांची घसरण झाल्याने गूळ उत्पादक हवालदिल झाले आहेत. दरात वाढ न झाल्यास गुऱ्हाळघरे बेमुदत बंद करण्याची हालचाली सुरू झाल्या आहेत.

सध्या साखर आणि गूळ हंगाम सुरू आहे. गेल्या महिनाभरात स्पेशल गुळाला ४२०० ते ४३०० रुपये दर होता. हा दर सध्या ३४०० ते ३५०० रुपयांवर आला आहे. तसेच दोन ते तीन नंबरच्या गुळाचा दर ३५०० रुपयांवरून तीन हजार ते ३२०० रुपयांपर्यंत घसरला आहे. गुळाला मागणी कमी असल्याने दर घसल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे, तर काही व्यापारी कमी दरात गूळ खरेदी करून साठवणूक करत असल्याची चर्चा गूळ उत्पादकांत आहे.

सध्या साखर कारखाने उसाला जो दर देतात, तोच दर गुऱ्हाळमालक ऊस उत्पादकांना देतात. गुऱ्हाळघरात एका आदणासाठी सव्वा दोन टन ऊस लागतो. गुऱ्हाळमालकाला उत्पादकांना सहा ते साडेसहा हजार रुपये द्यावे लागतात. गूळ काढण्यासाठी प्रतिआदणासाठी उत्पादन खर्च अंदाजे २३०० रुपये येतो. एका आदणातून २०० ते २१० किलो गूळ रव्यांचे उत्पादन होते. सध्याचा सरासरी गुळाचा प्रतिटन दर ३००० रुपये धरला तर सहा हजार रुपये गुऱ्हाळमालकाला मिळतात. शेतकऱ्याला द्यावी लागणारी उसाची रक्कम आणि गूळ उत्पादन खर्च मिळून सव्वासात ते साडेसात हजार रुपये येतो. गुळाचा दर पडल्याने ऊसदर आणि उत्पादन खर्च यांचा ताळमेळ बसत नसल्याने १५०० ते २००० हजार रुपये तोटा होत आहे. त्यामुळे गुऱ्हाळमालकांनी आदणांची संख्या कमी केली आहे. गुळाचे दर असेच राहिल्यास गुऱ्हाळघरे बंद करण्याचा विचार मालक करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रत्येक तालुक्यात दहा ‘मॉडेल स्कूल’

$
0
0

Appasaheb.mali@timesgroup.com
Tweet:Appasaheb_MT

कोल्हापूर :

सकाळी एकदा शाळा भरली की, सुटेपर्यंत अध्यापनाचा पॅटर्न ठरलेला. एकानंतर दुसऱ्या विषयातील पाठांची शिकवणी आणि आठवड्यातून एखाद्या दिवशी सायंकाळच्या सत्रात खेळाचा तास. या पारंपरिक चौकटीला छेद देत गगनबावडा तालुक्यात 'ज्ञानयज्ञ' नावाने नवशिक्षणाची संकल्पना रुजू होत आहे. अध्यापन, बौद्धिक खेळ, तरंग वाचनालय, मुक्त वर्ग, प्रयोगशाळा आणि कम्प्युटर लॅबमध्ये एक तास या पद्धतीने रोजची दैनंदिनी तयार केली आहे. प्रत्येक तालुक्यात या पद्धतीने दहा शाळा 'मॉडेल स्कूल' म्हणून विकसित करण्याचे जिल्हा परिषदेच्या प्रशासनाच्या विचाराधीन आहे.

'एकच मिशन, समृद्ध शिक्षण' या संकल्पनेवर आधारित गगनबावडा तालुक्यातील कोदे खुर्द विद्यामंदिरला नवे रूप दिले जात आहे. जिल्हा परिषद सदस्य भगवान पाटील यांनी याकामी पुढाकार घेतला आहे. शाळा आवारातील जागेची आणि वर्गखोल्यांची वैशिष्ट्यपूर्णरीत्या रचना केली जात आहे. डिसेंबर महिन्यामध्ये या शाळेचा लोकार्पण सोहळा होणार आहे. पाटील यांनी लोकसहभागातून हा वेगळा प्रयोग केला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी या शाळेला भेट देऊन वेगळ्या संकल्पनेची माहिती घेतली.

मुलांचा बौद्धिक विकास, आनंददायी शिक्षण हा प्रमुख उद्देश आहे. ज्ञान आणि मनोरंजनाचा मिलाफ असणार आहे. कोदे खुर्द विद्यामंदिरचे 'मॉडेल स्कूल' म्हणून दिवसभराचे वेळापत्रक बनवले आहे. पहिले दोन तास शिकवणी, त्यानंतर मुक्त वर्गात विद्यार्थ्यांना प्रवेश, ज्ञानरचनावादावर आधारित अध्यापन, स्वयंम अध्ययनाचा समावेश राहील. मुलांच्या बौद्धिकतेला वाव देण्यासाठी बुद्धिबळ खेळ, त्यानंतर मुलांसाठी तयार केलेले झाडाखालील तरंग वाचनालय, तसेच विद्यार्थ्यांनी एक तास प्रयोगशाळेत घालवायचा आहे. कम्प्युटर लॅब, चित्रकला व इतर कलागुणांना प्रोत्साहित करण्यासाठी मुक्त व्यासपीठ ही संकल्पना असेल. विद्यार्थ्यांना श्रमाचे मूल्य, सेंद्रीय शेती पद्धतीची ओळख होईल. या पद्धतीने रचना केली आहे. प्रत्येक विद्यार्थ्याचा कल ओळखून त्याच्यातील सुप्त गुणांना प्रोत्साहित करण्यासाठी शिक्षकांवर जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. शाळा परिसर हिरवागार बनावा यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती, फुलझाडांची जोपासना यावर भर आहे.

००००००

गगनबावडा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या मालकीच्या ७३ शाळा आहेत. यामध्ये ३२४७ विद्यार्थी शिकत आहेत. 'ज्ञानयज्ञ' शिक्षण उपक्रमांतर्गत पहिल्या टप्प्यात सर्व शाळांतील विद्यार्थी व शिक्षकांसाठी एकच ड्रेसकोड, समान परिपाठ, ओळखपत्र बनविले आहे. शैक्षणिक उठावला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. पहिल्या टप्प्यात कोदे खुर्द शाळेची अभिनव पद्धतीने उभारणी सुरू आहे.

भगवान पाटील, सदस्य, जिल्हा परिषद

००००००

जिल्हा परिषदेच्या शाळांची गुणवत्ता, विद्यार्थी पटसंख्या वाढीसाठी प्रयत्न सुरू आहेत. भौतिक सुविधांची उपलब्धता केली जात आहे. विद्यार्थ्यांना आकर्षित करणे व शाळांचा लौकिक वाढविणे हा उद्देश आहे. प्रत्येक तालुक्यातील दहा शाळा 'मॉडेल स्कूल' बनविण्याचा विचार आहे. पदाधिकारी, सदस्य, प्रशासन, शिक्षक या सर्वच घटकांना सोबत घेऊन ही अभिनव संकल्पना साकारू.

अमन मित्तल, सीईओ, जिल्हा परिषद

००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दूषित पाणी कुणाचे?

$
0
0

Bhimgonda.Desai@timesgroup.com

Tweet : @bhimgondaMT

कोल्हापूर: येथील प्रादेशिक प्रदूषण नियंत्रण मंडळाकडील अहवालानुसार जिल्ह्यातील सर्व २३ साखर कारखान्यांत सांडपाणी प्रक्रिया आणि हवा प्रदूषण नियंत्रण प्रकल्प कार्यान्वित आहेत. त्यावर २४ तास ऑनलाइन वॉच असतो, असा यंत्रणेचा दावा आहे. यामुळे नदीचे प्रदूषण होते कसे, पाणी प्रदूषित झाल्याने मासे मृत कसे होत आहेत, याचे मोठे कोडे नदीकाठच्या गावांसह शहराला पडले आहे. नुकतेच कासारी, भोगावती, पंचगंगा नदीतील मासे मृत झाल्यामुळे हा प्रश्न अधिकच गहिरा होत आहे.

गळीत हंगाम सुरू झाल्यानंतर जिल्ह्यातील नद्यांतील पाण्याचा रंग बदलत असतो. साखर कारखान्यांनी दावा केल्यानुसार साखर कारखान्यांतील मळीमिश्रीत पाण्यावर प्रक्रिया केल्यानंतर ते बाहेर सोडले जाते. या दाव्यामुळे नद्यांत येणारे पाणी नेमके कुठले? असा प्रश्न पडत आहे. साखर कारखान्यांच्या या दाव्याला प्रदूषण नियंत्रण महामंडळही दुजोरा देत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना प्रश्न पडला आहे.

गेल्या दोन दशकांपासून पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर झाला आहे. पर्यावरणासंबंधी अभ्यास करणाऱ्या 'नीरी' संस्थेने चार वर्षांपूर्वी केलेल्या सर्व्हेत पंचगंगा खोऱ्यातील साखर कारखाने, इतर प्रक्रिया उद्योगातील आणि नदीकाठावरील गावांतील सांडपाण्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे कमी अधिक प्रमाणत जलस्त्रोत दूषित होतात, असे नमूद केले आहे. मात्र प्रत्यक्षात प्रदूषणकारी घटकांविरोधात सबळ पुरावे मिळत नाहीत. जबाबदारी निश्चित होत नाही. त्यामुळे ठोस कारवाई करणे अडचणीचे होते. प्रत्येक वर्षी ऊस हंगाम सुरू झाल्यानंतर साखर कारखाना पट्ट्यातील नदीतील मासे मृत होतात. यावर्षीही दोन दिवसांपूर्वी मृत मासे पाण्यावर तरंगताना निदर्शनास आले. कागल तालुक्यातील सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे पाणी चिकोत्रा नदीत मिसळत असल्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आमदार हसन मुश्रीफ यांना धक्काबुक्की केली होती. त्यानंतर प्रदूषण नियंत्रण महामंडळाने कारखाना बंद करण्याची नोटीस काढली. त्यावेळी मुश्रीफ यांनी माझ्याच एका कारखान्यावर कारवाई का? असा सवाल करत कारवाई हाणून पाडली. त्यानंतर सर्वच नद्यांतील पाणी प्रदूषित होत असतानाही प्रदूषण नियंत्रण महामंडळ केवळ बघ्याची भूमिका घेत आाहे. सर्वच साखर कारखान्यांत सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रकल्प कार्यान्वित असताना पाणी दुषित कसे झाले, हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे.

नदी खोऱ्यातील साखर कारखाने

भोगावती नदी :भोगावती

कुंभी नदी : कुंभी कासारी, डी. वाय. पाटील ( गगनबावडा)

पंचगंगा नदी : छत्रपती राजाराम, रत्नाप्पाण्णा कुंभार (रेणुका शुगर्स), दत्त (शिरोळ), जवाहर (हुपरी)

चिकोत्रा: सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना

आठ कारखान्यांवर संशय

जिल्ह्यातील आठ कारखाने नदी परिसरात आहेत. भोगावती, कुंभी, कासारी नदी खोऱ्यात चार तर 'पंचगंगा' भागात चार कारखाने आहेत. यातील तीन नद्या पंचगंगेत मिसळतात. तीनपैकी एकाही नदीचे पाणी दुषित झाले तरी 'पंचगंगे'तील मासे व जलचर प्राणी मृत होतात. मळीमिश्रीत, पेंटवॉशसारखे रसायन पाण्यावर तरंगताना दिसते. त्यानंतर आठपैकी एका कारखान्यांतून सांडपाणी नदीत मिसळले असावे, अशी चर्चा होते. पर्यावरण तज्ज्ञ, प्रदूषण नियंत्रण मंडळाची यंत्रणाही याला दुजोरा देते. प्रत्यक्षात दोषी कारखान्यांवर ठोस कारवाई होत नाही.

'जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांत सांडपाणी प्रक्रिया आणि हवा प्रदूषण नियंत्रण प्रकल्प कार्यान्वित आहेत. हे प्रकल्प केंद्रीय, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वेबसाईटला कनेक्ट असल्याने ऑनलाइन वॉच ठेवला जातो. ज्याक्षणी यंत्रणा बंद होईल, त्याक्षणी संदेशाची नोंद वेबसाइटवर होते. संबंधित कारखान्यास नोटीस काढली जाते. याशिवाय हंगाम सुरू होण्याआधी २३ कारखान्यांच्या व्यवस्थापकांची बैठक घेऊन प्रदूषणकारी घटक बाहेर येणार नाहीत, त्याची खबरदारी घेण्याच्या सूचनाही दिल्या होत्या.

प्रशांत गायकवाड, उपप्रादेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हस्तक्षेपामुळे बँकिंगपुढे आव्हाने

$
0
0

फोटो

कोल्हापूर टाइम्स टीम

'भारतीय बँकिगमध्ये सातत्याने बदल होत आहेत. त्याचवेळी रुपयांची घसरण, तेलाच्या वाढत्या किंमतीमुळे बँकिग क्षेत्राला नवीन प्रश्न भेडसावत आहेत. केंद्र सरकारचा रिझर्व्ह बँकेतील वाढत्या हस्तक्षेपामुळे वेगळ्या समस्या निर्माण होत आहेत. सरकारने हा हस्तक्षेप थांबवून बँकेला अधिक मुक्त व स्वायत्तपणे काम करण्याची मोकळीक द्यावी.' असे मत बँक ऑफ महाराष्ट्राचे सेवानिवृत्त वरिष्ठ व्यवस्थापक डॉ. प्रकाश मिसाळ यांनी व्यक्त केले.

कनिष्ठ महाविद्यालयीन अर्थशास्त्र विचार मंच (कोल्हापूर व कोकण विभाग) आणि काउन्सिल ऑफ एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय १९ व्या वार्षिक अधिवेशनाला कॉमर्स कॉलेज सभागृहात शनिवारी प्रारंभ झाला. उद्योजक अमोल कोरगांवकर अध्यक्षस्थानी होते. काउन्सिल ऑफ एज्युकेशनचे उपाध्यक्ष प्रसाद कामत, संचालक अॅड. व्ही. एन. पाटील, कॉमर्स कॉलेजचे प्राचार्य व्ही. ए. पाटील, अर्थशास्त्र विचार मंचचे संस्थापक प्राचार्य डॉ. एन. के. पाटील हे प्रमुख अतिथी होते. याप्रसंगी 'अर्थवेध'स्मरणिकेचे प्रकाशन झाले.

डॉ. मिसाळ म्हणाले, 'सद्यस्थितीत रिझर्व्ह बँकेला अधिक स्वायत्त आणि जागृत राहणे आवश्यक बनले आहे. कारण रिझर्व्ह बँकेच्या राखीव फंडातील पैशाच्या मागणीवरून मध्यंतरी सरकार आणि बँकेत संघर्ष निर्माण झाल्याचे चित्र देशाने पाहिले. देशात पहिल्यांदाच सरकारला आरबीआयच्या राखीव फंडातील पैशाची मागणी करावी लागली. मात्र या पैशाचा विनियोग, कशासाठी पैसे खर्च करणार याचा हिशेब बँकेने मागितला. त्याशिवाय पैसे देणार नाही, असा पवित्रा घेतल्यावर सरकारने आपले श्रेष्ठत्व सिद्ध केल्यामुळे बँकेला रक्कम द्यावी लागली. यासह अन्य घटनांवरून रिझर्व्ह बँकेला पूर्ण स्वायत्त आहे का असा प्रश्न उपस्थित होतो.'

'बँकिग क्षेत्रातील बदलते प्रवाह' या विषयावर प्रा. सुषमा पाटील (कोल्हापूर) , प्रा. सतीश जंगम (फलटण) यांनी विचार मांडले. प्रा. सुरेखा देशपांडे (वेंगुर्ला), प्रा. अंबिका चौगुले (पेठवडगाव), मल्हार कुलकर्णी (कोल्हापूर) यांनी 'कार्ल मार्क्सचे आर्थिक विचार' याविषयी शोधनिबंध सादर केले. शिक्षण उपसंचालक कार्यालयातील सहायक शिक्षण संचालक सुभाष चौगुले यांनी मार्गदर्शन केले. मंचचे अध्यक्ष प्रा. शरद शेटे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. उषा काळे यांनी स्वागत केले. प्रा. आर. ए. पोर्लेकर यांनी आभार मानले. याप्रसंगी मंचचे माजी अध्यक्ष व्ही. व्ही. बचोटे, माजी सचिव आर. एम. पाटील, सचिव अनिल निर्मळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

शिवकालीन नाण्यांचे प्रदर्शन

राजापूर येथील प्रा. एम. बी. तोडकर यांनी संकलित केलेल्या जुन्या नाणी व नोटांचे प्रदर्शन हे अधिवेशनाचे आकर्षण आहे. प्रदर्शनात १५०० हून अधिक नाणी तसेच देश विदेशातील नोटांचा समावेश आहे. शिवकालीन नाण्यांचा संग्रह आहे. तांबे, पितळ, अॅल्युमिनियम अशा वेगवेगळया धातूपासून तयार केलेल्या नाण्या येथे पाहावयास मिळतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सैन्य भरतीसाठी ४५ हजार जणांची नोंदणी

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

शिवाजी विद्यापीठाच्या मैदानात ६ ते १८ डिसेंबर अखेर होणाऱ्या सैन्यभरती मेळाव्यासाठी तब्बल ४५ हजार तरुणांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. यापैकी चार ते पाच हजार युवकांना रोज निमंत्रित करण्यात येणार आहे. त्यांना मूलभूत, सेवा सुविधा पुरवण्यासाठी आतापासून सैन्य, जिल्हा प्रशासन जोरदार तयारी करीत आहे.

तीन वर्षात पहिल्यांदाच सैन्यातील मोठी भरत होणार आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या सहा जिल्ह्यांसह गोवा राज्यातील पणजी आणि मडगावसाठी ही भरती होईल. सोल्जर जनरल ड्युटी, टेक्निकल, क्लार्क, ट्रेडमन, स्टोअर किपर टेक्निकल, आर. टी. जेसीओ, हवालदार, सोल्जर टेक्निकल एव्हिएशन, एम्नुनेशन या पदांचे सुमारे १५०० जागा आहेत. यासाठी विक्रमी अर्ज दाखल झाले आहेत.

एकाच दिवशी सर्व उमेदवार येऊ नये, यासाठी मोबाइलवर मॅसेज पाठवले आहेत. ज्या दिवशी भरतीची तारीख मॅसेजद्वारे कळवण्यात आली आहे, त्याच दिवशी उमेदवारांनी यावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. यापूर्वीच्या भरती दरम्यान गर्दीच्या अनुभवानुसार वाहतुकीच्या नियोजनासाठी पोलिस प्रशासन कामाला लागले आहे. भरतीवेळी शारीरिक चाचणीवेळी मार्गदर्शनासाठी प्रशासनाने इंटरनेटवरील युट्यूबवर व्हिडिओ अपलोड केला आहे. देशातील विविध राज्यांतील २० वर्षांत झालेल्या सैन्य भरती प्रक्रियेची माहिती युट्यूबवरील https://youtu.be/fxMe7oz5CA8 या लिंकवर आहे. युवकांनी हा व्हिडिओ पाहावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

जीवन मुक्तीतर्फे जेवण

भरतीसाठी येणारे बहुतांशी मुले गरीब, सर्वसामान्य कटुंबांतील असतात. पहाटे वेळेत भरतीच्या ठिकाणी पोहचण्यासाठी रात्री, अपरात्री गावाहून कोल्हापुरात येतात. बसस्थानक आणि फुटपाथवर ते झोपतात. जेवणासाठी पैसे नसल्याने चिरमुरे, भजी, केळी खाऊन दिवस काढतात. त्यांच्यासाठी मोफत जेवणाची सुविधा येथील जीवन मुक्ती सेवा संस्थेतर्फे (व्हाइट आर्मी) करण्यात येणार आहे, अशी माहिती अध्यक्ष अशोक रोकडे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. यासाठी ज्या दानशूरांना मदत करावयाची, त्यांनी व्हाइट आर्मीशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाजार समिती सभापती निवडणूक आज

$
0
0

कोल्हापूर: शेती उत्पन्न बाजार समिती सभापती निवड सोमवारी (३) राधानगरी प्रातांधिकारी मनीषा कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. सतेज पाटील गटाचे दशरथ माने, विलास साठे, जनसुराज्यकडून बाबासाहेब लाड यांच्या नावाची अध्यक्षपदासाठी चर्चा सुरू आहे. सोमवारी (२६) सभापती कृष्णात पाटील यांनी आज सोमवारी जिल्हा निबंधक अरुण काकडे यांच्याकडे राजीनामा सादर केल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून नवीन सभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. बाजार समितीवर राष्ट्रवादी, जनसुराज्य, शेकाप, आमदार सतेज पाटील, चंद्रदीप नरके या गटाची सत्ता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुळाला हमीभाव द्या

$
0
0

बाजार समितीतील बैठकीत उत्पादकांची मागणी

कोल्हापूर टाइम्स टीम

गूळ दरात मोठी घसरण सुरू असल्याने उत्पादकांना मोठा तोटा होत आहे. त्यामुळे राज्य सरकारने गुळाला हमीभाव जाहीर करुन गूळ खरेदी करावा, अशी मागणी गूळ उत्पादकांनी कोल्हापूर शेती उत्पादन बाजार समितीने आयोजित केलेल्या बैठकीत केली. अध्यक्षस्थानी माजी अध्यक्ष कृष्णात पाटील होते.

गेल्या आठवड्यात गुळाचे दर प्रतिक्विंटल एक हजार ते बाराशे रुपयांनी घसरले आहेत याकडे लक्ष वेधत दरवाढ न झाल्यास गुऱ्हाळघरे बंद ठेवावी लागतील, असा इशारा बैठकीत उत्पादकांनी दिला. निगवे दुमाला येथील उत्पादक दादासाहेब पाटील म्हणाले, 'नैसर्गिक आपत्तीमुळे ऊस उत्पादन घटले आहे. त्यामुळे उतारा कमी पडत असल्याने उत्पादनही कमी होत आहे. तयार झालेला गूळ विक्रीसाठी आणल्यावर कमी दर मिळत असल्याने त्याचा फटका शेतकरी व उत्पादकांना होत आहे. प्रकाश पाटील यांनी दर कमी मिळत असल्याने हा व्यवसाय बंद ठेवण्याची वेळ आली आहे, अशी खंत व्यक्त केली. गूळ व्यापारी शिवगोंडा सदलगे म्हणाले, 'गूळ दर कमी झाला तर व्यापारांचाही तोटा होत आहे. कर्नाटकातील शेतकरी थेट आमच्या ग्राहकांना गूळ पुरवठा करत आहेत. गुळाच्या दरावर सर्वांनी एकत्र येऊन तोडगा काढण्याची गरज आहे. यावेळी गूळ उत्पादकांकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे, असा आरोपही करण्यात आला.

गूळ व्यवसायाला सरकारने मदत करावी, या मागणीसाठी सहकार मंत्री सुभाष देशमुख आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली जाईल, असे आश्वासन माजी सभापती कृष्णात पाटील यांनी दिले. व्यापारी प्रतिनिधी नंदकुमार वळंजू, उत्तम पाटील, तानाजी आंग्रे, शिवाजी पाटील यांनीही भाषणे केली. प्रास्ताविक सचिव मोहन सालपे यांनी केले. यावेळी उपसभापती अमित कांबळे, सर्जेराव पाटील-गवशीकर, दशरथ माने, नेताजी पाटील, बाबूराव खोत, अॅड. किरण पाटील, शेखर बेंडगे, शशिकांत आडनाईक, सरदार पाटील उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेंगुर्ल्याला अभ्यास दौरा

$
0
0

कोल्हापूर: वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत राबविलेल्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची जिल्हा परिषदेतील स्थायी समिती व जलव्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी पाहणी केली. जिप अध्यक्षा शौमिका महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली दोन्ही समितच्या सदस्यांचा एक दिवसीय अभ्यास दौरा झाला. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शिनी मोरे व अन्य अधिकाऱ्यांचा दौऱ्यात समावेश होता. मोठ्या लोकवस्तीच्या गावांमध्ये घनकचरा व्यवस्थापन राबविण्याचा प्रस्ताव प्रशासनाच्या विचाराधीन आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सांडपाण्यावरील प्रक्रियेसाठी ‘अॅक्शन प्लॅन’

$
0
0

फोटो ...

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'जागे व्हा पंचगंगेसाठी'अभियान अंतर्गत रविवारी सकाळी हुतात्मा गार्डन ते रेणुका मंदिरापर्यंतच्या जयंती नाला काठावर परिक्रमा करण्यात आली. पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी नाल्यात मिसळण्यापूर्वीच सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचा प्रस्ताव पुढे आला. असोसिएशन ऑफ आर्किटेक्टस अँड इंजिनीअर्सतर्फे औद्योगिक आणि घरगुती सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी 'अॅक्शन प्लॅन' बनविणे व महापालिकेतर्फे त्याची अंमलबजावणी या अनुषंगाने चर्चा झाली.

परिक्रमा सुरू असतानाच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापालिकेतील भारतीय जनता पक्षाचे गटनेते व नगरसेवक विजय सुर्यवंशी यांना फोनवरुन पर्यावरणपूरक प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करुन देऊ, अशी ग्वाही दिली. आर्किटेक्ट असोसिएशनतर्फे 'जागतिक प्रदूषण प्रतिबंधक दिन'साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून परिक्रमाचे आयोजन केले होते. हुतात्मा गार्डनच्या प्रवेशव्दारापासून परिक्रमेला सुरूवात झाली. प्रारंभी असोसिएशनचे अध्यक्ष अजय कोराणे, गटनेते सुर्यवंशी, नगरसेवक अजित ठाणेकर, माजी अध्यक्ष राजेंद्र सुर्यवंशी, विजय कोराणे, संदीप घाटगे, प्रा. वंदना पुसाळकर यांची भाषणे झाली. असोसिएशनमार्फत नदी प्रदूषणासंदर्भात नागरिकांत जनजागृती घडावी म्हणून 'जागे व्हा पंचगंगेसाठी'हे अभियान सुरू केले आहे. या अभियानची व्याप्ती वाढविण्यासाठी परिक्रमा आयोजन अतिशय उपयुक्त माध्यम असल्याचे यावेळी साऱ्यांनीच नमूद केले.

असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी जयंती नाल्यात मिसळणारे सांडपाणी रोखले तर प्रदूषणाची तीव्रता कमी होईल. यासाठी औद्योगिक क्षेत्र व घरगुती सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी ठिकठिकाणी प्रकल्प उभारण्याची गरज असल्याचे नमूद केले. भाजपचे गटनेते सुर्यवंशी यांनी असोसिएशने यासंदर्भात 'अॅक्शन प्लॅन' बनविल्यास त्याच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न करु असे सांगितले. महापालिकेच्या पर्यावरण विभागातील अधिकारी आर. के. पाटील यांनी नदीत मिसळणारे सांडपाणी रोखण्यासाठी महापालिका करत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. परिक्रमेमध्ये प्रसाद मुजुमदार, अतुल दिघे, जीवन बोडके, सुधीर हंजे, श्रीकांत भोसले, महेश ढवळे, मंदार आंबेकर, अनिल घाटगे,उमेश कुंभार, प्रशांत काटे आदी सहभागी झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images