Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

रक्तदान शिबिर उद्या

$
0
0

कोल्हापूर : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिवसेना शहर शाखा व राजारामपुरी गोज ग्रीनच्यावतीने रविवारी (ता. २५) थॅलेसेमियाग्रस्तांसाठी रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. राजारामपुरी दुसरी गल्ली येथे सकाळी ८.४५ वाजता शिबिराला सुरुवात होईल. गेल्या काही वर्षापासून थॅलेसेमिया रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशा रुग्णांमध्ये लाल पेशींची निर्मिती होत नसल्याने रुग्ण दगावण्याची शक्यता असते. त्यामुळे आशा रुग्णांना रक्ताचा पुरवठा सुलभ होण्यासाठी रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. शिबिरात रक्तदात्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन शहरप्रमुख दुर्गेश लिंग्रस यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उद्यान दिंडीतून पर्यावरणाचा जागर

$
0
0

गार्डन्स क्लबच्या पुष्प प्रदर्शनास सुरुवात

फोट आहे

कोल्हापूर टाइम्स टीम

पर्यावरण संवर्धन व उद्यानविषयक अनेक उपक्रम कल्पकतेने राबवत असलेल्या गार्डन्स क्लबच्या पुष्प प्रदर्शनाला शुक्रवारी उद्यान दिंडीने सुरुवात झाली. पर्यावरणपूरक आणि आरोग्य लाभदायी रोप घेऊन सहभागी झालेल्या प्रर्यावरणप्रेमींनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. महावीर गार्डन येथे महपौर शोभा बोंद्रे यांच्या हस्ते व शांतादेवी डी. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पालखी पूजनाने दिंडीचे उद्घाटन झाले.

गेल्या ४८ वर्षांपासून शहरात गार्डन्स क्लबच्यावतीने पुष्प प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. शुक्रवार ते रविवारपर्यंत ताराबाई पार्क येथील ताराबाई गार्डन्समध्ये प्रदर्शन सुरू राहणार आहे. शुक्रवारी सकाळी महावीर गार्डन येथून उद्यान दिंडीला सुरुवात झाली. दिंडीत एनएसएसची मुले रोपे घेऊन सहभागी झाली होती. शहरातील जैवविविधता उद्यानामुळे टिकणार असल्याचा संदेश देत सुमारे १७५ पर्यावरणप्रेमी दिंडीत सहभागी होत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

दिंडी जिल्हाधिकारी कार्यालय, अदित्य कॉर्नर, डी. मार्ट मार्गे ताराबाई गार्डनमध्ये दाखल झाली. त्यानंतर नगरसेवक रत्नेश शिरोळकर यांच्या हस्ते नर्सरीज स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी नगरसेवक विजय सूर्यवंशी, सत्यजित कदम, सीमा कदम आदी उपस्थित होते. स्टॉलमध्ये गार्डन मटेरियल, खते, अत्याधुनिक औजारे व कृषी उत्पादने मिळणार आहेत. पुष्प प्रदर्शनामध्ये सायंकाळी लँडस्केपिंग स्पर्धा झाली. स्पर्धेत न्यू आर्किटेक्ट कॉलेज व कलानिकेतनच्या सुमारे ४५ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षा बागा तयार केल्या. तसेच पुष्प प्रदर्शनामध्ये पुणे येथील अपूर्व नर्सरी व इन-आऊट मार्जिन नर्सरी सहभागी होणार आहेत.

उद्यान दिंडीमध्ये गार्डन्स क्लबच्या अध्यक्षा कल्पना सावंत, उपाध्यक्ष शशिकांत कदम, सेक्रेटरी पल्लवी कुलकर्णी, खजानीस राज अथणे, गोकुळेचे ज्येष्ठ संचालक अरुण नरके, डॉ. धनश्री पाटील, डॉ. अंजली साळवी, रुपेश हिरेमठ, सुमेधा मानवी, शिवाजी विद्यापीठ बॉटनी विभागाचे विभागप्रमुख डॉ. डी. के. गायकवाड, गोखले कॉलेजचे प्रा. संजय मेनशे आदी सहभागी झाले होते. शनिवारी (ता. २४) सकाळी ११ वाजता जिल्हा परिषदेचे सीईओ अमन मित्तल यांच्या हस्ते पुष्प प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आईसाहेब महाराज, माउली पुतळ्यांचे सुशोभिकरण पूर्ण

$
0
0

फोटो आहेत...

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर शहरात अनेक मान्यवरांचे पुतळे मुख्य चौकामध्ये उभारण्यात आले असून, पुतळ्यांचे आणि चौकांचे सुशोभिकरण महापालिका व केएसबीपी यांच्याकडून सुरू आहे. लक्ष्मीपुरी येथील आईसाहेब महाराज पुतळा व राजारामपुरीतील माउलीच्या पुतळ्याचे सुशोभिकरण पूर्ण झाले आहे. रविवारी (ता. २५) सुशोभिकरण कामाचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार आहे. शहराच्या सौंदर्यीकरणामध्ये भर घालणारी ही दोन्ही ठिकाणे सुशोभित झाल्याने पर्यटकांचे आकर्षण ठरतील.

शहर सौंदर्यीकरणांतर्गत शहरातील ३० चौक व ट्राफिक आयलँडच्या सुशोभिकरणास वर्षभरापूर्वी सुरुवात झाली. शहराचे मुख्य प्रवेशद्वार असलेल्या ताराराणी चौक व मिरजकर तिकटी येथील हुतात्मा स्तंभाचे सुशोभिकरण झाल्यानंतर केएसबीपीकडून लक्ष्मीपुरी येथील आईसाहेब महाराज पुतळा व माउलीच्या पुतळ्याचे सुशोभिकरण करण्यास सुरुवात केली. दोन्ही पुतळ्यांचे काम पूर्णत्वाकडे गेले असून सुशोभिकरण कामाच्या उद्घाटनासाठी सज्ज ठेवले आहे.

संपूर्ण इटालियन मार्बल्समधील आईसाहेब महाराज यांच्या पुतळ्यासभोवती विविध प्रकारची शोभिवंत झाडे ठेवण्यात आली असून छोटा लॉनही तयार केला आहे. यापूर्वीच्या कारंज्याऐवजी पुतळ्याच्या दोन्ही बाजूंना छोटे धबधबे केले आहेत. यासाठी दोन स्वतंत्र टँक व विद्युत मोटर बसविली आहे. पुतळ्याभोवती रात्रभर विद्युत रोषणाई सुरू राहणार आहे.

राजारामपुरी येथील माउली चौकाचे सुशोभिकरण पूर्ण झाले आहे. गेल्या काही वर्षांत माउलीच्या पुतळ्याचे विद्रुपीकरण झाले होते. सद्य:स्थितीत पुतळ्याला रंगरंगोटी केली असून, सभोवती लोखंडी ग्रील तयार करून आत लॉनही तयार केले आहे. पुतळ्यासमोर प्रथमच कारंज्या कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्यामुळे पुतळ्याला आकर्षक रूप प्राप्त झाले असून, दोन्ही पुतळे शहराच्या सौंदर्यात भर टाकणारे ठरणार आहेत.

००००

केएसबीपीमार्फत ताराराणी चौक व मिरजकर तिकटी येथील हुतात्मा स्तंभाचे सुशोभिकरण पूर्ण केले आहे. आईसाहेब महाराज पुतळा व माउली पुतळ्याचे सुशोभिकरण पूर्ण झाले असून, त्याची देखभालही करण्यात येणार आहे. शहरातील हे महत्त्वाचे पुतळे व चौक पर्यटकांचे आकर्षण ठरणार आहेत.

सुजय पित्रे, केएसबीपी

०००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवतरले दीपांगण

$
0
0

पहाटे हजारो पणत्यांनी उजळला पंचगंगा घाट

कोल्हापूर टाइम्स टीम

नदीच्या नीरव शांततेत मावळतीकडे झुकणाऱ्या पौर्णिमेच्या चंद्राची साथ... हवेत सुखद गारवा आणि एकेका पणतीने उजळून निघालेल्या पंचगंगा घाटावर दीपांगण अवतरले. 'ज्योत से, ज्योत जलाते रहो' म्हणत हजारो पणत्या प्रज्वलित झाल्या आणि शुक्रवारी पहाटे पंचगंगा घाट, नदी परिसर उजळून दिघाला. या दीपोत्सवाला रंगावली आणि सांस्कृतिक कार्यक्रमाने साज चढवला. हा नयनरम्य सोहळा 'याची देही याची डोळा' पाहण्यासाठी गर्दी केलेल्या नागरिकांनी शुक्रवारी भल्या पहाटे थंडीतही पंचगंगेवर दीपोत्सवाचा आनंद लुटला.

दीपावलीची प्रारंभ वसुबारसला तर सांगता त्रिपुरारी पौर्णिमेला होते. गेली ३५ वर्षे पंचगंगेवर दीपोत्सव साजरा केला जातो. यंदा शिवमुद्रा प्रतिष्ठान आणि संदीप देसाई सोशल फाउंडेशनच्यावतीने दीपोत्सवाचे आयोजन केले होते. गुरुवारी सायंकाळी 'गाथा महाराष्ट्राची जाणीव लोकसंस्कृतीची' हा गीतगायन, नृत्याचा कार्यक्रम झाला. गुरुवारी मध्यरात्रीपासून कार्यकर्ते, कलाकार जमू लागले. रांगोळी काढण्यासाठी युवक, युवतीचे बोटे फिरू लागली तर कलाकारांनी रांगोळीजवळ आकर्षक सेट उभारले. कार्यकर्त्यांनी ओळीने पणत्या ठेवल्या. तीन वाजण्याच्या सुमारास पंचगंगेची विधीवत ओटी भरून पूजा करण्यात आली. भाविकांनी स्नान करत 'हर हर महादेवा'चा गजर केला.

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव, भाजप महानगर अध्यक्ष संदीप देसाई यांच्या उपस्थितीत दीपोत्सवास सुरुवात झाली. त्यानंतर ध्वनिक्षेपकावरून कार्यकर्त्यांना पणत्या प्रज्वलित करण्याच्या सूचना देण्यात आल्या. पणत्या प्रज्वलित करू लागल्यावर घाट उजळून गेला. घाटावर आडव्या रेषा तर मंदिराच्या शिखरावर चौकोनी, आयताकृती प्रकाश रेषांनी आकार धरला. अवघ्या दहा ते पंधरा मिनिटात समाधी मंदिरे विद्युत रोषणाईने झळाळून निघाली. पहाटे चार ते पाच या वेळेत पंचगंगा नदी परिसर नागरिकांनी फुलून गेला. काही भाविकांनी द्रोणातून पाण्यात दिवे सोडले. आकाशात फटाक्यांची आतषबाजी सुरू झाल्यानंतर पंचगंगेच्या प्रवाहात घाट प्रतिबिंबित झाला. ब्रह्मपुरी पिकनीक पाँईटवरुन हिरव्या रंगाची लेसर किरणे सोडण्यात आली. शिवाजी पुलावरील पणत्यांच्या आकारांची आकर्षक विद्युत रोषणाई लक्ष वेधून घेत होती.

दीपोत्सवाचा हा क्षण टिपण्यासाठी मोबाइलचे कॅमेऱ्यांचे फ्लॅश लकाकले. पाच वाजण्याच्या सुमारास अंतरंग प्रस्तुत महेश हिरेमठ यांच्या 'स्वरउत्सव' कार्यक्रमास सुरुवात झाली. भक्ती आणि भावगीताना रसिकांनी दाद दिली. यावेळी चितारलेल्या आकर्षक रांगोळ्यांचेही नागरिकांनी कौतुक केले. यावेळी दीपक जांभळे यांच्याकडून मोफत मसाले दूधाचे वाटप करण्यात आले. घाटांच्या पायऱ्यावर गप्पांचे फडही जमले. साडेपाचच्या सुमारास आलेल्य वाऱ्याच्या झुळूकेबरोबर पणत्या विरत होत्या, पण पूर्वेला पहाटेची किरणे डोकावत होती.

रंगावलीचा कलाविष्कार

रांगोळ्यांना सेटची जोड देत कलाकार, मंडळांनी सामाजिक संदेश दिले. सिद्धार्थनगरातील श्री प्रेमी तरुण मंडळाने महाराष्ट्र पोलिस वर्दीतील माणूस ऑन ड्यूटी २४ तास ही रांगोळीने लक्ष वेधून घेतली. छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजीराजे, शिवाजी, संभाजीराजे भेट या रांगोळ्यांना चांगली दाद मिळाली. सत्यनारायण तालीमने शिवलिंगाचा, महालक्ष्मी प्रतिष्ठानने शिवरायांना भवानी तलवार भेट, संयुक्त प्रतिष्ठानची स्वामी समर्थ मंदिरासमोर तुळशी वृदांवनासह सुंदर रांगोळी रेखाटली होती. रणांगण ग्रुपने फुलांची रांगोळी मांडली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने 'अखंड भारत' तर समस्त हिंदुत्ववादी संघटनेने प्रभू रामचंद्रांची रांगोळी रेखाटत 'चलो अयोध्या'चा नारा दिला होता.

सेना, भाजपमध्ये पहाटे कोल्ड वॉर

दीपोत्सवानिमित्त भाजप व शिवसेनेने स्वागत कमानी उभारल्या होत्या. भाजपचे महानगर अध्यक्ष संदीप देसाई यांच्या फाऊंडेशनने दीपोत्सवात पुढाकार घेतला होता. सांस्कृतिक कार्यक्रमासाठी भव्य स्टेज उभारले होते. त्यांच्या शेजारीच शिवसेनेने दक्षिणेकडे तोंड करून स्टेज उभारले होते. तसेच भव्य स्क्रीनवर आमदार क्षीरसागर यांच्या दहा वर्षातील कामाचा लेखाजोखा दाखवला होता. क्षीरसागर यांच्या ५० वाढदिवसाचे औचित्य साधत सेनेने शक्तीप्रदर्शन केले. सांस्कृतिक कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी सेनेने साऊंड सिस्टीम थांबवून सहकार्य केले. पण दीपोत्सवानिमित्ताने दोन्ही पक्षाच्या कोल्ड वॉरची चर्चा सुरु होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पक्षिमित्र’चे साहित्य संमेलन होऊ नये

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कराड

'कराडला दुसऱ्यांदा पक्षिमित्र संमेलन झाले, ही चांगलीच गोष्ट आहे. निवडणुका, राजकीय हस्तक्षेप, वादावादी यामुळे पक्षिमित्र संमेलनाचे साहित्य संमेलन होऊ नये,' अशी अपेक्षा येथे भरलेल्या बत्तिसाव्या राज्यस्तरीय पक्षिमित्र संमेलनाचे अध्यक्ष किशोर रिठे यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केली.

महाराष्ट्र पक्षिमित्र, राज्य सरकारचा वन विभाग, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, कराड जिमखाना यांच्या वतीने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. मुंबईतील बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे सहायक संचालक डॉ. गिरीश जठार, पक्षिमित्र संघटनेचे अध्यक्ष डॉ. जयंत वडतकर, माजी संमेलनाध्यक्ष दत्ताजी उगावकर, निसर्ग पर्यटन केंद्राचे व्यवस्थापकीय संचालक सुनील लिमये, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कोल्हापूर क्षेत्र संचालक व्ही. सी. बेन, कोल्हापूरचे (प्रादेशिक) मुख्य वन संरक्षक अरविंद पाटील, कराड जिमखान्याचे सचिव व संमेलनाचे महासचिव सुधीर एकांडे, नाना खामकर, जयेश शहा आदी व्यासपीठावर होते. राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले.

संमेलनाध्यक्ष किशोर रिठे म्हणाले, 'कराड शहरात अखिल भारतीय व राज्यस्तरीय पक्षीमित्र संमेलन दुसऱ्यांदा होणे ही गौरवास्पद बाब आहे. अशा संमेलनांच्या माध्यमातून नव्या पिढीमध्ये जागृती करण्यासाठी संमेलनामध्ये नवनवीन उपक्रम राबविणे गरजेचे आहे. त्यासाठी आर्थिक व शासकीय सहकार्याची आवश्यकता आहे. मात्र, त्यामध्ये निवडणुका, राजकीय हस्तक्षेप, वादविवाद निर्माण होऊन भविष्यात महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलनाचे साहित्य संमेलन होऊ नये.'

'पक्षी संवर्धन ही काळाची गरज आहे. ती एक चळवळ अन्‌ संस्कृती म्हणून पुढे आली पाहिजे. पक्षी हा मानवी जीवनाचा घटक असून, त्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्नांची गरज आहे. पक्षी संर्वधनाची चळवळ आहे. त्यासाठी सरकारसह लोकांकडून संवर्धनासाठी तळमळ दाखविली जात नाही, याचेही दु:ख वाटते. वाढत्या प्रदूषणामुळे अनेक पक्षांच्या जाती नामशेष होत आहेत.'

पक्षी अध्ययन केंद्राचा प्रस्ताव

कराड हे पश्चिम महाराष्ट्रातील मध्यवर्ती ठिकाण असल्याने येथे पक्षी अध्ययन केंद्र व्हावे, असा ठराव संमेलनात मांडावा. हे केंद्र उभारणीसाठी शासकीय पातळीवर लागेल ती मदत करू, अशी ग्वाही उ्दघाटनावेळी सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगगावकर यांनी येथे दिली. संमेलनाध्यक्ष रिठे यांनीही ही कल्पना उचलून धरली. 'कराडला पक्षी अध्ययन केंद्र उभारण्यासाठी ठराव मांडण्याची सूचना स्वागतार्ह आहे. त्यासाठी राज्यकर्त्यांनी पुढाकार घेणे चांगली गोष्ट आहे,' अशा शब्दांत रिठे यांनी या कल्पनेला पाठिंबा दिला.

वर्धा ते कराड सायकल रॅली

या संमेलनाच्या निमित्ताने वर्ध्याच्या बहार नेचर फाउंडेशनचे प्रा. किशोर वानखेडे व पक्षिमित्र संघटनेचे विदर्भाचे समन्वयक दिलीप वीरखडे यांच्या नेतृत्वाखाली सायकल रॅली काढण्यात आली होती. ही रॅली शुक्रवारी सकाळी कराडमध्ये पोहोचली. कोल्हापूर नाक्यावर कराड नगर पालिकेचे मुख्याधिकारी यशवंत डांगे, अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी संचालक दिलीप गुरव, सुधीर एकांडे यांनी त्यांचे रॅलीचे स्वागत केले. पक्ष्यांचा अधिवास वाचवा, प्रदूषणमुक्तीसाठी प्रयत्न करा, असा संदेश या रॅलीद्वारे देण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अत्याधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'वैद्यकीय क्षेत्रात झपाट्याने बदल होत आहेत. नवीन तंत्रज्ञानाची भर पडत आहे. डॉक्टरांनी बदललेले तंत्रज्ञान आत्मसात करणे काळाजी गरज आहे,' असा सूर शुक्रवारी कदमवाडीतील डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये आयोजित 'विविध आजारांवरील चिकित्सा व निदान' कार्यशाळेत व्यक्त झाला. सोसायटी ऑफ क्रिटिकल केअर मेडिसीनच्या येथील शाखेतर्फे 'महाक्रिटीकॉन २०१८'चे आयोजन केले होते. त्याअंतर्गत ही कार्यशाळा झाली. 'महाक्रिटीकॉन २०१८'चे उदघाटन कर्नल आर. के. शर्मा यांच्या हस्ते झाले. दोन दिवस ही परिषद सुरू राहणार आहे.

कार्यशाळेत डॉ. कपिल जीरपे यांनी कृत्रिम श्वास उपचारासंबंधी माहिती दिली. ते म्हणाले, 'रुग्णांची प्रकृती गंभीर झाल्यानंतर अनेकवेळा कृत्रिम श्वास द्यावा लागतो. आयसीयूतील उपचारपद्धती अद्ययावत होत आहे. ती आत्मसात केल्यास रुग्णांना फायदा होईल.'

डॉ. अमित पाटील म्हणाले, 'डॉक्टारांनी नेहमी अपडेट राहिले पाहिजे. उपचारांतील नवे ज्ञान आत्मसात करण्याची मानसिकता तयार करावी. झपाट्याने होणारे बदल स्वीकारावेत.'

डॉ. आशिष नलवडे म्हणाले, 'विविध कारणांनी हृद्याचे आजार वाढत आहेत. त्यावरील उपचार आणि औषधांवर वैद्यकीय क्षेत्रात संशोधन होत आहे. त्याचाही वापर प्रत्यक्ष उपचारावेळी करता येऊ शकतो.'

डॉ. गौरी साईप्रसाद यांनी गर्भावस्थेतील, बाळंतपणातील गंभीर आजार आणि त्यावरील अत्यावश्यक सेवांची माहिती दिली. डॉ. प्रविण घुले यांनी मार्गदर्शन केले. यावेळी 'महाक्रिटीकॉन'चे मानद चेअरमन डॉ. प्रल्हाद केळवकर, सचिव डॉ. अभिजित कोराणे, कोषाध्यक्ष डॉ. प्रताप वरुटे, डॉ. शैलेंद्र माने, डॉ. राजेश पाटील, डॉ. तन्मय व्होरा, डॉ. अजय केणी यांच्यासह राज्यातील विविध जिल्ह्यांतील ३०० डॉक्टर उपस्थित होते. दरम्यान, सायंकाळी दसरा चौकातील शाहू स्मारक भवनात 'अतिदक्षता विभागातील समज, गैरसमज' या विषयावर चर्चासत्र झाले.

हॉटेल सयाजीत आज उद्घाटन

'महाक्रिटीकॉन २०१८' ही पुढील दोन दिवसांची परिषद हॉटेल सयाजीमध्ये होणार आहे. शनिवारी दुपारी १२ वाजता डॉ. डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन होईल. रविवारी कार्यशाळेची सांगता होईल. कार्यशाळेत महाराष्ट्रातील ५०० डॉक्टर उपस्थित राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निधन...

$
0
0

जयश्री निकम

हातकणंगले : नवे चावरे (ता. हातकणंगले) येथील जयश्री तुकाराम निकम (वय ४६) यांचे निधन झाले. निवृत्त मुख्याध्यापक तुकाराम महादेव निकम यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शनिवारी (ता.२४) आहे.

०००

निशा शिंदे

हातकणंगले : जुने चावरे (ता. हातकणंगले) येथील निशा पवनकुमार शिंदे (वय ४०) निधन झाले. चावरे माध्यमिक विद्यालयाचे कर्मचारी पवनकुमार शिंदे यांच्या त्या पत्नी त्या होत. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शनिवारी (ता.२४) आहे.

००००

हरी कानकेकर

राधानगरी : राशिवडे (ता. राधानगरी) येथील हरी कृष्णाजी कानकेकर (वय ८८) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता.२५) सकाळी दहा वाजता आहे.

०००

सुनील महाले

कसबा बावडा : येथील सुनील रामचंद्र महाले (वय ५०) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता.२५) आहे.

०००

लक्ष्मीबाई देसाई

गारगोटी : सोनाळी (ता. भुदरगड) येथील लक्ष्मीबाई देसाई (वय ८१) यांचे निधन झाले. स्वातंत्र्यसैनिक कै. यशवंतराव देसाई यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे.

०००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रादेशिक पक्षांची आघाडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्याराज्यांत भाजपविरोधी प्रादेशिक पक्षांची आघाडी करण्यात येणार आहे. त्यानुसार महाराष्ट्रात दोन्ही काँग्रेसची आघाडी होणार आहे. चाळीस जागांचा तिढा सुटला आहे,' असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी शुक्रवारी पत्रकार बैठकीत स्पष्ट केले. कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही जागा राष्ट्रवादीकडेच असल्याचे स्पष्ट करताना हातकणंगलेची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडण्याबाबतचे संकेत त्यांनी दिले. दरम्यान, विकासाचा कोणताच मुद्दा नसल्याने भाजप पुन्हा धर्माचा, राम मंदिराचा आधार घेत आहे. मराठा आरक्षणावरून मुख्यमंत्र्यांनी घातलेला घोळ म्हणजे समाजात दुही निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोपही त्यांनी केला.

कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या पवारांनी दोन दिवस विविध माध्यमातून राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकार बैठकीत त्यांनी अनेक मुद्दे स्पष्ट केले. लोकसभा निवडणुकीत देशात भाजपविरोधी आघाडी होणार का, या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, 'संपूर्ण देशात एकच आघाडी होणार नाही. पण, राज्याराज्यांत भाजपविरोधी प्रादेशिक आघाड्या होतील. त्यादृष्टीने चर्चा सुरू आहेत. महाराष्ट्रात दोन्ही काँग्रेस एकत्र येतील, कर्नाटकात जनता दल, आंध्र प्रदेशात चंद्राबाबू नायडू आणि तमिळनाडूत डीएमके, पश्चिम बंगालमध्ये ममता, उत्तर प्रदेशात मायावती यांच्या नेतृत्वाखाली आघाड्या होतील. निवडणुकीनंतर सर्वमान्य नेता निवडला जाईल. यापूर्वी डॉ. मनमोहनसिंग पंतप्रधान झाले तेव्हा हा प्रयोग झाला होता. भाजप विरोधकांचे मतविभाजन टाळण्यासाठी पुन्हा तसा प्रयत्न करण्यात येईल. देशभरातील अनेक पक्षाकडून त्याला संमती आहे. याचाच भाग म्हणून येत्या दहा डिसेंबरला दिल्लीत या सर्व पक्षांच्या नेत्यांची बैठक घेण्यात येणार आहे.'

राज्यात दोन्ही काँग्रेसची आघाडी होणार असल्याचे स्पष्ट करताना ते म्हणाले की, दोन्ही पक्षाच्या नेत्यांच्या बैठकीत चाळीस जागांवर एकमत झाले आहे. उर्वरित आठ जागावरही तोडगा निघेल. आघाडीत शेकाप, माकप, भाकप, शेतकरी संघटना यांना घेण्यासाठी चर्चा सुरू आहे. यासाठी जे पक्ष पुढे येतील त्यांना काही जागा दिल्या जातील. जागावाटप सूत्रानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही जागा राष्ट्रवादीकडेच असतील. पण, त्यातील हातकणंगलेची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडण्याबाबत सहानभुतीपूर्वक विचार करण्याची चर्चा झाली आहे. याला काही लोकांचा विरोध असल्याचे समजते. कोल्हापूरच्या उमेदवारीबाबतही तक्रारी झाल्या. एक जागेसाठी एक उमेदवार कुठेच नसतो. त्यामुळे कोणताही निर्णय एकमताने होत नसतो. प्रत्येकाचे मत असू शकते. विरोध केल्याने त्यांच्या भावना तरी समजल्या. यातून मार्ग काढला जाईल. आमच्यात मतभेद नाहीत. फार तणाव आहे, असेही नाही. किरकोळ वाद असला तरी कुणीही टोकाची भूमिका घेणार नाही. उमेदवारी दिल्यानंतर विजयासाठी दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनी एकमेकांना मदत करायची आहे, असे स्पष्ट करताना माने गटाच्या विरोधाची नोंद घेतल्याचे त्यांनी सांगितले.

.. .. ..

पवार म्हणाले...

प्रचाराला मुद्दा नसल्याने भाजपला हिंदुत्वाची आठवण

जम्मू काश्मीरबाबत राज्यपालांचा निर्णय घातक

मतदानासाठी 'इव्हीएम'चा वापर नकोच

मराठा आरक्षणावरुन दोन समाजात संघर्ष वाढवण्याचा डाव

सीबीआयबाबत चंद्राबाबू नायडू, ममता बॅनर्जींनी घेतलेला निर्णय योग्य

भाजपकडून सीबीआय, न्यायसंस्थांवर दबावाचे राजकारण

.. .. .. .. ..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दूधासाठी परराज्यातून प्लास्टिक पॉलिफिल्म उपलब्ध करू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्यातील प्लास्टिक पिशव्या उत्पादकांनी १५ डिसेंबरपासून बेमुदत उद्योग बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने दुधांच्या पिशव्यासाठी लागणाऱ्या पॉलिथिन फिल्मची टंचाई जाणवण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र टंचाई जाणवल्यास परराज्यातून पॉलिथिन फिल्म उपलब्ध करण्याचा निर्णय जिल्हा दूध उत्पादक संघाने (गोकुळ) घेतला आहे. किमान तीन आठवडे पुरेल इतका साठा जिल्ह्यातील दूध संघांकडे असून राज्य सरकार हस्तक्षेप करून हा प्रश्न सोडवावा अशी मागणी गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी केली.

प्लास्टिक बंदी कायद्यांतर्गत पॉलिथिन फिल्मच्या उत्पादकांचे उद्योग सील करण्याची कारवाई प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून सुरू आहे. सरकारच्या कारवाईविरोधात उत्पादकांनी १५डिसेंबरपासून बेमुदत उद्योग बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा फटका दूध उद्योगाला बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यात गोकुळ, वारणा, शाहू, स्वाभिमानी, प्रतिभा यांच्यासह खासगी व सहकारी दूध संघांकडून दूध व दुग्धजन्य पदार्थांची विक्री प्लास्टिक पिशव्यांतून केली जाते. त्यासाठी फूड ग्रेडसाठी वापरण्यात येणारी पॉलिथिन फिल्मचा वापर केला जातो. ही फिल्म मुंबई, नाशिक, गुजरात, दमण येथून मागविण्यात येते. दूध संघांकडे किमान १५ दिवस ते तीन आठवडे पुरेल इतका फिल्मचा साठा आहे. यासंदर्भात जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील म्हणाले, 'सरकारकडे याबाबत पाठपुरावा केला जाईल. महाराष्ट्रात जर पॉलिथिन फिल्म उपलब्ध झाली नाही तर अन्य राज्यांतून फिल्म उपलब्ध केली जाईल. कोणत्याही परिस्थितीत दूधाचा पुरवठा बंद केला जाणार नाही.'

पुनर्चक्रण प्रक्रिया राबवणार

'प्लास्टिक बंदीतून दूध पिशव्या वगळल्या असल्या तरी दूध पिशव्यांचे पुनर्चक्रण करण्याचे बंधन कायद्याने घालण्यात आले आहे. प्रत्येक पिशवीमागे ग्राहकांकडून ५० पैसे जादा आकारण्याची सूचना केली आहे. पण, कोणत्याही दूध संघांनी ही यंत्रणा राबवली नाही. या कायद्याची अंमलबजावणी करण्याचे संकेत सरकारने दिले असून पुनर्चक्रमण यंत्रणा सुरू करण्यासाठी गोकुळकडून पावले उचलली जात आहेत. यासंदर्भात अध्यक्ष पाटील म्हणाले, 'पुनर्चक्रण करण्यासाठी प्रतिपिशवी ग्राहकांकडून ५० पैसे आकारले जातील. प्लास्टिक पिशव्या गोळा करण्यासाठी टेंडर काढण्यात येईल. ग्राहकांनी पिशवी पुनर्चक्रणासाठी दिली तर त्यांना पन्नास पैसे परत देण्यात येईल.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनास्था सोडल्यास प्रकल्प मार्गी

$
0
0

लोगो : रखडलेले सिंचन प्रकल्प : ४

Bhimgonda.Desai@timesgroup.com

Tweet : @bhimgondaMT

कोल्हापूर : आजरा तालुक्यातील सर्फनाला प्रकल्प १८ वर्षांपासून रखडला आहे. परिणामी मूळ किमतीच्या तब्बल सातपट किंमत वाढली. रखडलेल्या पाचही प्रकल्पांची अवस्था अशीच आहे. सरकारी यंत्रणेची लालफीत, दिरंगाई कायम राहिल्यास प्रकल्पाची किंमत वाढत जाऊन काम रखडलेलेच राहील. यामुळे सर्व बाधित शेतकऱ्यांचे समाधानकारक पुनर्वसन करण्यासाठीच्या आजवरच्या अनास्थेवर पाणी सोडले तरच रखडलेल्या प्रकल्पांची कामे मार्गी लागतील.

सर्फनाला मध्यम प्रकल्प मंजुरीनंतर तब्बल आठ वर्षांनंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. आठ वर्षांत कोल्हापूर पद्धतीचे पाच बंधारे आणि इतर ६५ टक्के काम पूर्ण झाले. प्रकल्पग्रस्तांनी पुनर्वसन आज होईल, उद्या होईल, या आशेपोटी विरोध केला नाही. शेवटी सरकार, प्रशासन बेदखल करीत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर काम बंद पाडले. नऊ वर्षांहून अधिक काळ झाला पुन्हा काम सुरू झालेले नाही. पुन्हा काम सुरू करायचे असल्यास भूसंपादन, पुनर्वसनासाठी २५ कोटी ४० लाख, उर्वरित धरणांच्या कामासाठी ४५ कोटी, घळभरणी माती कामासाठी ५० कोटी १७ लाख निधींचा प्रस्ताव पाटबंधारे विभागाने सरकारकडे पाठवला आहे. तो मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. गायरान क्षेत्रातील प्रकल्पग्रस्तांना वाटप करण्यासाठी जमीन मागणीचा प्रस्ताव महसूल प्रशासनाकडे धूळखात पडून आहे. (समाप्त)

००००

सर्फनाना

सन २०००

प्रकल्पाला मंजुरी

२२१ कोटी ३८ लाख

प्रकल्पाची आजची किंमत

१०० कोटी ८१ लाख

प्रकल्पाचा आजवरचा खर्च

१८.९८ द.ल.घ.मी.

पाणी साठवण क्षमता

२२९

प्रकल्पग्रस्त

२१७

देय जमीन प्रकल्पग्रस्त

७५ टक्के

काम

आजरा तालुका

प्रकल्पाचा लाभ

००००

जिल्हा पुनर्वसनचा गलथानपणा

येथील मध्यवर्ती सरकारी इमारतीमध्ये जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्यांचे कार्यालय आहे. प्रकल्पग्रस्तांशी संबंधित असलेल्या या कार्यालयातील कारभार प्रचंड गलथान, दिरंगाईचा आहे. वारंवार हेलपाटे मारले तरी नेमकेपणाने माहिती दिली जात नाही. वरिष्ठांकडे बोट दाखवून टाळाटाळ केली जाते. असा कारभारही प्रकल्प रखडण्याला कारणीभूत असल्याचा आरोप बाधित शेतकऱ्यांचा आहे.

०००

कोट...

प्रकल्पग्रस्तांना बेदखल केल्यानेच धरणांची कामे वर्षानुवर्षे रखडली. सरकारी यंत्रणा बाधित शेतकऱ्यांना गृहित धरून, फसवी आश्वासने देत काम रेटून नेण्याचा प्रयत्न करते. फसल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित शेतकरी आक्रमक होऊन काम बंद पाडतो. असाच प्रकार सर्फनालासह जिल्ह्यातील सर्व रखडलेल्या प्रकल्पांचा आहे. जोपर्यंत सर्व प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन पूर्ण होणार नाही, तोपर्यंत धरणाचे काम होऊ देणार नाही. प्रशासनही पुनर्वसनासाठी सहा महिन्यापासून जोरदार प्रयत्न करीत आहे. विभागीय आयुक्तांकडे पुनर्वसनासंबंधी काही उपायही सुचवले आहेत.

डॉ. भारत पाटणकर, राज्य नेते, धरणग्रस्त

००००

प्रकल्प सुरू होण्यापूर्वीच जमीन संपादन आणि पुनर्वसन करण्यासाठी निधीची तरतूद केलेली असते. मात्र जिल्हा पुनर्वसन, महसूल, पाटबंधारे प्रशासन पुनर्वसन करताना पसंत नसलेल्या डोंगराळ जमिनी प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या गळ्यात घालण्यासाठी धडपडते. पुनर्वसित वसाहतीमध्ये मूलभूत सुविधांची कामे निकृष्ट दर्जाची केली जातात. सरकारी निधीचा अधिकारी चांगला विनियोग करीत नाहीत. अशा कारभारामुळे कामे निर्धारित वेळेत पूर्ण होऊ शकली नाहीत. अनेक वर्षांपासून कामे रखडली. ती मार्गी लावण्यासाठी सातत्याने शिवसेनेतर्फें पाठपुरावा करीत आहे.

विजय देवणे, जिल्हा प्रमुख

००००

मटा भूमिका

प्रकल्पग्रस्तांना विश्वासात घ्या

जिल्ह्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर कोरडवाहू शेती बागायती होणार आहे. त्या परिसरातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणार आहे. म्हणून सरकारने ७० टक्यांपेक्षा अधिक काम झालेल्या जिल्ह्यातील चार प्रकल्पाचे काम त्वरित पूर्ण करण्यासाठी ठोस निर्णय घ्यावा. प्रकल्पग्रस्तांना विश्वासात घेऊन पुनर्वसन करावे. बाधित शेतकऱ्यांची नाळ माती, शेतीशी असल्याने त्यांच्या मागणीनुसार जमिनीला जमीन द्यावी. त्यासाठी जिल्ह्यातील खासदार, आमदारांनी राजकीय ताकद वापरावी. सरकारवर दबाव आणून निधी, पुनर्वसनसाठीच्या जमिनीचे प्रस्ताव मार्गी लावावेत.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोनवडेतील जवानाचे दिल्लीत निधन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गारगोटी

कोनवडे (ता. भुदरगड) येथील भारतीय सैन्य दलातील नायब सुभेदार संताजी जगन्नाथ भोसले (वय ३५) यांचे दिल्ली येथील आर्मी हॉस्पिटलमध्ये उपचारांदरम्यान निधन झाले. शनिवारी (ता. २४) कोनवडे येथे त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ते लिव्हरच्या विकाराने आजारी होते.

संताजी यांचे वडील जगन्नाथ भोसले हे सैन्यदलात सेवा बजावून निवृत्त झाले आहेत. वडिलांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव असल्याने संताजी हेसुद्धा लष्करात भरती झाले. त्यांचे प्राथमिक शिक्षण कोनवडेत, माध्यमिक शिक्षण निळपण येथे तर बिद्री येथे विज्ञान शाखेतून बारावीपर्यंतचे शिक्षण झाले. सप्टेंबर २००१मध्ये कोल्हापूरमध्ये भरती होऊन त्यांनी लष्कराच्या पुणे येथील बॉम्बे इंजिनीअरिंग विभागात ट्रेनिंग पूर्ण केले. आपल्या कष्टाच्या जोरावर नायब सुभेदारपद मिळविले. गेल्या १८ वर्षात त्यांनी राजौरी (जम्मू), जालंधर, पुणे, इस्सार, सूरतगढ येथे सेवा बजावली तर सध्या ते उधमपूर (जम्मू) येथे ते सेवा बजावत होते. गेल्या दीड महिन्यापासून लिव्हरशी संबंधीत आजाराने ते त्रस्त होते. त्यांच्यावर दिल्लीत आर्मी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. गुरुवारी त्यांच्यावर गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊन सायंकाळी ७.३० वाजता त्यांची प्राणजोत मालवली. त्यांच्यामागे आई, वडील, भाऊ, भावजय, पत्नी मनीषा, मुली संचिता आणि आसावरी असा परिवार आहे. मनमिळावू स्वभावाच्या संताजी यांच्या अकाली जाण्याने परिसरात शोककळा पसरली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वसगडेत साकारली डिजिटल अंगणवाडी

$
0
0

कोल्हापूर टाइम्ससाठी....

फोटो आहेत..

कोल्हापूर टाइम्स टीम

मुलांना एकसारखा गणवेश, रंगीत गणवेशावर टाय आणि पायात शूज, डिजिटल क्लासरुम, मुलांना प्रत्येक विषयाचा 'होमवर्क' आणि त्यावर पालकांचा शेरा, करवीर तालुक्यातील वसगडे येथील अंगणवाड्यांमधील शैक्षणिक चित्र. इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्याही पुढे अंगणवाड्यामध्ये शैक्षणिक आणि भौतिक सुविधा निर्माण केल्या आहेत. गावातील सातही अंगणवाड्यांचा लूक बदलला आहे.

वसगडेतील अंगणवाडी क्रमांक ६७ वैशिष्ट्यपूर्ण ठरली आहे. गावात सात अंगणवाड्या आहेत. ग्रामपंचायतीच्या सहकार्यातून सातही अंगणवाड्यातील मुलांना आकर्षक आणि एकसारखा गणवेश आहे. टप्प्याटप्प्याने सातही अंगणवाड्या डिजिटलयुक्त बनविल्या जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात ६७ क्रमांकाच्या अंगणवाडीचा पूर्णत लूक बदलला. याकामी ग्रामपंचायत आणि लोकांचे सहकार्य लाभल्याचे पर्यवेक्षिका सुरेखा कदम यांनी सांगितले. एकात्मिक बाल विकास प्रकल्प अंतर्गत अंगणवाड्या चालविल्या जातात. 'आकार' शिक्षणक्रमातंर्गत अंगणवाडयांचे कामकाज केले जाते.

\Bहसत-खेळत शिक्षण

\Bअंगणवाडीतील मुलांचा वयोगट ओळखून हसत-खेळत शिक्षण ही संकल्पना राबविली. तीन ते चार, चार ते पाच आणि पाच ते सहा वर्षे वयोगट अशा तीन गटात मुलांची विभागणी केली आहे. मुलांच्या आवडीनिवडी, कल ओळखून रोज दोन ते अडीच तास औपचारिक शिक्षण दिले जाते. मुलांना अक्षर ओळख, गाणी शिकवली जातात. मुलांचा बौद्धिक विकास व्हावा, या पद्धतीने रचना केली आहे. वेळापत्रक तयार केले आहे. मुलांच्या आकलन क्षमतेनुसार परीक्षा घेतली जाते.

डायरी बुक ते कलाकृतीचा बॉक्स

अंगणवाडीच्या प्रत्येक शैक्षणिक उपक्रमांमध्ये पालकांना सामावून घेतले जाते. मुलांना रोज 'होमवर्क'दिला जातो. डायरी बुक, पालकांचा अभिप्राय, अंगणवाडीतील वेळापत्रक, खेळातून शिक्षण यासारख्या वेगळया संकल्पनेचा समावेश आहे. मुलांच्या कल्पनाशक्तीला प्रोत्साहित करण्यासाठी रंग ओळखा, वस्तूंची निर्मिती अशा वेगळया संकल्पना सुरू केल्या आहेत. अंगणवाडीत प्रत्येक मुलासाठी कलाकृतीचा बॉक्स आहे. त्यामध्ये मुलांनी तयार केलेल्या विविध वस्तू साठविल्या जातात. पालकसभेवेळी प्रदर्शन मांडले जाते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर भीषण अपघात; चार ठार

$
0
0

कोल्हापूरः

कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर रेडिडोह येथे तवेरा गाडीचा टायर फुटून रस्त्याच्या कडेला असलेल्या पाण्याच्या डोहात कोसळली. या अपघातात ४ जण जागीच ठार तर, ७ जण जखमी झाले आहेत. तर, गाडीतील दोन वर्षांच्या मुलीचा शोध सुरू आहे.

पहाटे दोन वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. डोहात कोसळलेली गाडी बाहेर काढण्यात आली आहे. या गाडीतील दोन वर्षांच्या मुलीचा शोध सुरू आहे. गणपतीपुळेहून परतत असताना अपघात झाला आहे. मृतांमध्ये १ महिला व ३ मुलींचा समावेश आहे. मृत व जखमी सर्व मिरज येथील रहिवाशी आहेत.
66780114

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Sangola Bandh: टेंभूच्या पाण्यासाठी सांगोल्यात कडकडीत बंद

$
0
0

पंढरपूर

टेंभूच्या पाण्यातून माण नदीतील बंधारे भरून देण्याच्या मागणीसाठी गेले आठ दिवस जनावरांसह सुरू असलेल्या १४ गावांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज सांगोला शहर व तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. दीपक पवार आणि दत्त टापरे हे दोन तरुण सांगोला तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले असून दोघांचीही प्रकृती खालावली आहे. राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या अध्यक्षतेखाली काल पुण्यात झालेल्या बैठकीत कोणताही तोडगा न निघाल्याने परिस्थिती चिघळत चालली आहे.

गेल्या आठ दिवसापासून या १४ गावातील शेतकरी आपल्या जनावरांसह सांगोला तहसील कार्यालयासमोर तळ ठोकून बसल्याने प्रशासनावरील दबाव वाढत चालला आहे. जलसंपदा विभागाकडून मात्र योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. टेंभू योजनेतील पाण्याने बलवडीपासून मेथवडेपर्यंतचे बंधारे कमीतकमी २५% भरून देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. यासाठी राज्यमंत्री शिवतारे यांच्यासोबत तब्बल दोन तास बैठक झाली. मात्र, त्यात तोडगा न निघाल्याने आता सोमवारी मुख्यमंत्री याबाबत हस्तक्षेप करतील, अशी अपेक्षा आहे.

सांगोल्यात सध्या भीषण पाणीटंचाई असल्याने पशुधन व शेतातील पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. पाणी आल्याशिवाय उपोषण मागे घेण्यास आंदोलकांनी नकार दिला आहे. सांगोल्याचे आमदार गणपतराव देशमुख सोमवारी या प्रश्नावर थेट मुख्यमंत्र्याना साकडे घालणार असून सांगोल्यातील इतर नेतेही मुंबईच्या दिशेला रवाना झाले आहेत. या प्रश्नावर जनतेचा रेटा वाढवण्यासाठी आज सांगोला शहर व तालुक्यात सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इचलकरंजीत आज मोटरसायकल रॅली

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

सोमवार (ता.२६) पुकारण्यात आलेल्या इचलकरंजी बंदच्या जागृतीसाठी रविवारी (ता.२५) सकाळी शहरातून मोटारसायकल फेरी काढण्यात येणार आहे. बंदमध्ये सर्व वाहतूकदार संघटना सहभागी झाल्या असल्याने शाळा, महाविद्यालयांनीही सोमवारी बंद ठेवून विद्यार्थ्यांची गैरसोय टाळावी, असे आवाहन यंत्रमागधारक संघटना समन्वय समितीचे निमंत्रक प्रताप होगाडे यांनी पत्रकार परिषदेत केले.

यंत्रमाग व्यवसाय चार वर्षांपासून संक्रमणावस्थेतून मार्गक्रमण करत आहे. त्यामुळे शासनाकडे विविध मागण्यांसाठी पाठपुरावा करुनही काहीच पदरात पडलेले नाही. त्यामुळे वीजदर आणि व्याजात सवलत मिळावी, यासह विविध मागण्यांबाबत सरकारने केलेल्या आश्‍वासनाची अंमलबजावणी करावी यासह विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी यंत्रमागधारक समन्वय समितीने राज्यभर लाक्षणिक बंदचे आवाहन केले आहे. त्यानुसार सोमवारी इचलकरंजी बंदची हाक दिली आहे. बंदच्या जागृतीसाठी रविवारी सकाळी इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनपासून मोटारसायकल रॅली काढण्यात येणार आहे, तर सोमवारी शाहू पुतळ्यापासून मुख्य मार्गावरून प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. यावेळी नगरसेवक सागर चाळके, पुंडलिक जाधव, विश्‍वनाथ मेटे, सतीश कोष्टी, दीपक राशिनकर, विनय महाजन, आदी उपस्थित होते.

००००००

पोलिसास धक्काबुक्की, तिघांवर गुन्हा

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तिघांना थांबवून परवान्याबाबत विचारणा केल्याने त्यांनी वाहतूक पोलिसाला शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. त्यामुळे सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी तिघांविरोधात गावभाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. इचलकरंजीतील वाहतुक नियंत्रण शाखेकडे कार्यरत असलेले रवींद्र माळी झेंडा चौक परिसरात सेवा बजावत होते. त्यावेळी एका मोटारसायकलवरून तिघे येत असल्याचे निदर्शनास येताच त्यांना इशारा करून थांबवले. दुचाकीस्वार गुरुनाथ हिंदुराव चव्हाण (वय २८) याच्याकडे माळी यांनी परवान्याबाबत विचारणा केली असता दुचाकीवरील सागर सुरेश मडके (वय २१) व जयवंत आनंदा पाटील (वय २७, तिघे रा. शहापूर) यांनी माळी यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की करून पळून जाण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी माळी यांनी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी तिघांविरोधात गावभाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बिल्डरचा खून पैशाच्या देवघेवीतून

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इस्लामपूर

येथील बांधकाम व्यावसायिक साकेत उर्फ चिकू किरण कांबळेचा (वय ३२ रा. गुरुप्रसाद कॉलनी, राजारामनगर) आर्थिक देवाणघेवाणीतून निर्घृण खून झाल्याचे स्पष्ट झाले. शनिवारी, १७ नोव्हेंबरपासून ते बेपत्ता होते. त्यांचा खून करून मृतदेहाचे तुकडे करून मृतदेह वारणा नदीत टाकल्याची कबुली संशयिताने दिली आहे. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.

संतोष ज्ञानू पवार (रा. शाहूनगर, इस्लामपूर, मूळगाव-पाटण, जि. सातारा) व अनिकेत गणेश पानिरे (रा. कार्वे, ता. वाळवा) अशी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत. या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, आज दिवसभर चिकुर्डे व कणेगाव येथील वारणा नदी पात्रात पोलिसांनी मृतदेहाचा शोध घेतला मात्र रात्री उशिरापर्यंत मृतदेह सापडला नाही.

साकेत शनिवारी, १७ नोव्हेंबरला रात्री बेपत्ता झाला होता. रविवारी त्याची पत्नी स्नेहलने इस्लामपूर पोलिसात साकेत बेपत्ता असल्याची फिर्याद दिली होती. साकेत येथील शिवपार्वती अपार्टमेंटमध्ये कमिशनवर फ्लॅट विक्रीचे काम करत होता. येथे संशयित संतोष पवार इलेक्ट्रिशीयन म्हणून काम पाहतो. पवारचे 'शिवपार्वती'च्याच बांधकाम व्यवसायिकाकडून कामाचे १४ लाख रुपये येणे होते. या रकमेला साकेत मध्यस्थ होता. दिवाळीच्या आदल्या दिवशी, ५ नोव्हेंबरला साकेत आणि संतोषमध्ये पैशावरून वाद झाला होता. त्यावेळी एकमेकाला बघून घेण्याची भाषा वापरली होती. तपास सुरू असताना पवार गेल्या आठ दिवसांपासून रोज साकेतच्या नातेवाईकांसोबत पोलिस ठाण्यात दिवसभर असायचा. त्याचाही तपास पोलिसांनी केला होता. त्याच्या सांगण्यात तफावत आढळल्याने पोलिसांनी खोलात जाऊन त्याची तपासणी केली.

.. .. ..

.. .. .. .. ..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुष्पप्रदर्शनाचे शानदार उद्घाटन

$
0
0

फोटो आहे

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गार्डन्स क्लबच्या वतीने ताराबाई पार्क येथील ताराबाई गार्डनमध्ये सुरू झालेल्या ४८ व्या पुष्पप्रदर्शनाचे उद्घाटन व उद्यान स्पर्धेचे बक्षीस वितरण डी. वाय. पाटील उद्योग समूहाच्या शांतादेवी डी. पाटील यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. फ्लोरल या संकल्पनेवर आधारित यावर्षीच्या उद्यान स्पर्धेत खासगी, संस्था व कारखान्यांच्या अशा ८० बागांनी विक्रमी सहभाग नोंदवला.

गार्डन्स क्लबच्या फ्लॉवर शोला शुक्रवारपासून सुरुवात झाली. उद्यान दिंडी व गार्डन मटेरियल स्टॉलच्या उद्घाटनानंतर उद्यान स्पर्धेच्या मांडणीला सुरुवात झाली. यावर्षीच्या फ्लॉवर शोमध्ये प्रथमच लँडस्केपिंग डिझायनिंग स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यानंतर झालेल्या पुष्परचनेत पूर्णत: नैसर्गिक साधनांचा वापर करण्यात आला. कांचन, वाळा, आपटा, बकूळ, निर्गुडी, शतावरी, कांचन यासारख्या औषधी वनस्पती व त्यांचे उपयोग दर्शविणारे फलकही प्रदर्शनात ठेवले होते. यावेळी नीता शिंदे यांनी फ्लोरल ड्रिंकचे तर मोना पिंगळे यांनी इकेबाना पुष्परचनेचे प्रात्यक्षिक दाखविले. सायंकाळी बोटॅनिकल पॅशन शो पार पडला.

उद्घाटन समारंभास गार्डन्स क्लबच्या अध्यक्षा कल्पना सावंत, उपाध्यक्ष शशिकांत कदम, सचिव पल्लवी कुलकर्णी, खजानिस राज अथणे, सुजाता लोहिया, माजी अध्यक्षा डॉ. धनश्री पाटील, डॉ. अंजली साळवी, रूपेश हिरेमठ, सुमेधा मानवी, उपस्थित होते.

०००

प्रदर्शनाची आज सांगता

प्रदर्शनात सकाळी नऊ वाजता खुली चित्रकला स्पर्धा होणार आहे. त्यानंतर दळवीज आर्ट इन्स्टिट्यूटचे प्राचार्य अजेय दळवी यांच्या हस्ते चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण होईल. सायंकाळी सहा वाजता फ्लॉवर शो स्पर्धेचे बक्षीस वितरण गोकुळचे संचालक अरुण नरके यांच्या हस्ते व जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक यांच्या प्रमुख उपस्थित होऊन प्रदर्शनाची सांगता होणार आहे.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सांगोल्यात कडकडीत बंद

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर

टेंभू योजनेतील पाण्यातून माण नदीतील बंधारे भरून देण्याच्या मागणीसाठी गेले आठ दिवस जनावरांसह सुरू असलेल्या १४ गावांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी शनिवारी सांगोला शहर व तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. आठ दिवसांपासून दीपक पवार आणि दत्त टापरे हे दोन तरुण सांगोला तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसले असून दोघांचीही प्रकृती खालावली आहे.

पुण्यात शुक्रवारी या विषयावर राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कोणताही तोडगा न निघाल्याने परिस्थिती चिघळत आहे. गेल्या आठ दिवसापासून या १४ गावातील शेतकरी आपल्या जनावरांसह सांगोला तहसील कार्यालयासमोर तळ ठोकून बसल्याने प्रशासनावरील ताण वाढत चालला असताना जलसंपदा विभागाकडून मात्र योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने शेतकरी संतप्त बनले आहेत .

टेंभू योजनेतील पाण्याने बलवडीपासून मेथवडेपर्यंतचे बंधारे कमीतकमी २५ टक्के भरून देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. सांगोल्यात सध्या भीषण पाणीटंचाई असल्याने पशुधन व शेतातील पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची निकराची धडपड सुरू आहे. सांगोल्याचे आमदार गणपतराव देशमुख सोमवारी या प्रश्नावर मुख्यमंत्र्याना साकडे घालणार असून, सांगोल्यातील इतर नेतेही मुंबईच्या दिशेला रवाना झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्या तोलामोलाचा मोर्चा निघणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारचा मराठा आरक्षण कायदा आणण्याचा विचार दिसत नाही. गेली चार वर्षे चालढकल करणाऱ्या सरकारला देता की जाता, असा जाब विचारण्यासाठी आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराजांच्या नगरीतूत सोमवारी मुंबईला तोलामोलाचा मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चात मराठा समाजातील नागरिकांनी स्वत:ची चारचाकी वाहने घेऊन सहभागी व्हावे,' असे आवाहन सकल मराठा समाजाचे समन्वयक वसंतराव मुळीक यांनी केले. हिवाळी अधिवेशनात टिकाऊ आरक्षणाची घोषणा न झाल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना पायउतार व्हावे लागेल, असा इशाराही देण्यात आला.

सकल मराठा समाजाच्या वतीने सोमवारी (ता. २६) मुंबईला गाडी मोर्चा काढण्यात येणार आहे. सकाळी नऊ वाजता दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चा निघणार आहे. मुंबईतील गाडी मोर्चात राज्यभरातील मराठा समाजाचे कार्यकर्ते सहभागी होणार असून, त्याच्या नियोजनासाठी शनिवारी राजर्षी शाहू स्मारक भवन येथे बैठक घेण्यात आली.

गाडी मोर्चावरून प्रशासनाच्या वतीने सभ्रंम निर्माण केला जात असल्याचा आरोप करत वसंतराव मुळीक म्हणाले, 'राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालाची विधानसभा व विधानपरिषदेत साधकबाधक चर्चा होण्याची गरज आहे. अहवाल सभागृहात मांडण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एक डिसेंबरला जल्लोषास सज्ज राहा असे सांगत आहेत. अहवाल मांडण्यापूर्वी सरकारने मंत्रिगटाची उपसमिती नेमली आहे. सरकार आरक्षण देण्यासाठी चालढकल करत असल्याने दबाव आणण्यासाठी राज्यभरातून गाडी मोर्चा काढण्यात येणार आहे.'

इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी १०० दिवसांत मराठा समाजाला आरक्षण देतो, असे सांगून सत्तेवर आलेले सरकार लबाड असल्याचा आरोप केला. ते म्हणाले, 'गेली साडेचार वर्षे सरकारने आरक्षणाबाबत चालढकल केली आहे. राज्यभरात शांततेत मोर्चे काढूनही मराठा समाजाची एकही मागणी सरकारने मान्य केलेली नाही. मराठा समाजातील नेत्यांना पुढे करून सरकारने फसवले आहे. न्यायालयाने आदेश दिल्यामुळे राज्य मागासवर्ग आयोगाला १५ नोव्हेंबरपर्यंत अहवाल देण्यास भाग पडले. आरक्षण प्रश्नावर दोन दिवस विशेष अधिवेशन बोलावण्यात येईल, असे मान्य केले. पण दहा दिवसांच्या अधिवेशनात सरकारकडून आरक्षणाच्या प्रश्नावर कोणतीही भूमिका स्पष्ट होत नसल्याने गाडी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे.'

मोर्चा अयशस्वी ठरावा यासाठी सरकार षङयंत्र रचत असल्याचा आरोप करून दिलीप देसाई म्हणाले, 'मराठा समाजाने अफवांवर विश्वास न ठेवता मुंबईतील ठिय्या आंदोलनाच्या तयारीत सहभागी व्हावे.' भैय्या माने म्हणाले, 'राज्य सरकारने आरक्षण कसे व कधी देणार हे स्पष्ट केले नसल्याने चळवळ म्हणून गाडी मोर्चा काढत आहे. या मोर्चातून सरकारवर दबाव आणला जाईल.' मराठा समाजाचा अंत पाहू नये, असे मत सचिन तोडकर यांनी व्यक्त केले.

यावेळी हर्षल सुर्वे, शाहीर दिलीप सावंत, शंकरराव शेळके, प्रताप नाईक, संजय जाधव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हेरिटेज वॉकसाठी एक कोटी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

छत्रपती घराण्यातील चिमासाहेबांच्या प्रेरणेतून १८५७ च्या बंडाची ठिणगी पडलेला ऐतिहासिक जुना राजवाडा, भवानी मंडप परिसर, पोलिसांच्या गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या बिंदू नारायण कुलकर्णी यांच्या हौतात्म्यामुळे नामकरण झालेला बिंदू चौकासह २० पुरातन वास्तूंची ओळख कोल्हापूरवासीयांना हेरिटेज वॉकमधून मिळाली. या उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी खासदार संभाजीराजे यांनी हेरिटेज वॉक या उपक्रमासाठी खासदार निधीतून एक कोटी रुपये देण्याची घोषणा केली.

जागतिक वारसा सप्ताह दिनानिमित्त छत्रपती संभाजीराजे फाउंडेशन, कोल्हापूर हॉटेल मालक संघ, असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट अँड इंजिनिअर्स या संस्थांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते. शनिवारी सकाळी दसरा चौकात श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी महापौर शोभा बोंद्रे, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, निवासी उप जिल्हाधिकारी संजय शिंदे, संयोगिताराजे, मधुरिमाराजे, प्रतिमा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

शाहू महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करुन मान्यवरांसह उपक्रमात सहभागी झालेले सर्व नागरिक चालत चिमासाहेब चौकात आले. आर्किटेक्ट अमरजा निंबाळकर, राम यादव, मंदिर अभ्यासक उमाकांत राणिंगा, प्रसन्न मालेकर, कोल्हापूर वास्तुसंग्रहालयाचे अमृत पाटील, डॉ. अमर आडके यांनी पुरातन वास्तूंची माहिती दिली. आर्किटेक्ट अमरजा निंबाळकर यांनी वास्तूंची शैली, बांधणी यांची माहिती देताना त्यांची जपणूक होण्याची गरज व्यक्त केली. सुमारे तीन तास चाललेल्या या उपक्रमात नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. परिवहन समिती सभापती राहुल चव्हाण, असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट अँड इंजिनीअर्सचे अध्यक्ष अजय कोराणे, गौरी चोरगे, वंदना कुसाळकर, माजी महापौर सई खराडे, हसिना फरास, फाउंडेशनचे कार्याध्यक्ष हेमंत साळोखे, हॉटेल मालक संघाचे अध्यक्ष उज्ज्वल नागेशकर, सचिव सिद्धार्थ लाटकर, प्रसाद कामत, दयानंद शेट्टी, अरुण चोपदार, आदी सहभागी झाले होते.

००००००

कोल्हापूर शहरात २५०, तर जिल्ह्यात ३५०० पुरातन वास्तू आहेत. तसेच शिवकालीन ११ किल्ले आहेत. या सर्वांची माहिती हेरिटेज कमिटीच्या वतीने एकत्रित केली जात आहे. हेरिटेज वॉक या उपक्रमातून नागरिकांना पुरातन वास्तूबद्दल अभिमान जागृत होण्यास मदत होईल.

अमरजा निंबाळकर, अर्किटेक्ट

०००००

कोल्हापूर शहराला प्राचीन धार्मिक, ऐतिहासिक, सामाजिक वारसा आहे. शहरातील पुरातन वास्तू परिसरात स्वच्छता ठेवण्यासाठी महापालिकेसह नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे. भवानी मंडप परिसर प्लास्टिकमुक्त करून स्वच्छतेसाठी पाऊल उचलले आहे.

संयोगिताराजे

०००००

कोल्हापुरातील पुरातन वास्तू जगाच्या नकाशावर येण्यासाठी खासदार संभाजीराजेंचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्या प्रयत्नाला हेरिटेज वॉकच्या माध्यमातून बळ देण्याचा आमचा प्रयत्न आहे. तसेच या उपक्रमाच्या माध्यमातून भावी पिढीला कोल्हापूरचा समृद्ध वारसा, संस्कृतीची नव्याने ओळख निर्माण करून देण्यास मदत होईल.

उज्ज्वल नागेशकर, अध्यक्ष कोल्हापूर हॉटेल मालक संघ

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images