Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

खंडणीबद्दरांना बसणार लगाम

$
0
0

Gurubal.mali@timesgroup.com

gurubalmaliMT

कोल्हापूर : आरटीआय कार्यकर्ते, नगरसेवक आणि अधिकाऱ्यांच्या संगनमतातून होणाऱ्या लुटीला आता ब्रेक लागणार आहे. त्यासाठी जिल्हा पोलिसप्रमुख, जिल्हा प्रशासन आणि महापलिका अधिकारी यांची संयुक्त समिती नियुक्त करण्यात येणार आहे. आलेल्या माहिती व तक्रार अर्जांची शहानिशा ही समिती करणार आहे. यामुळे केवळ अर्जाच्या भांडवलावर व्यवसाय करणाऱ्या व्हाइट कॉलर खंडणीबहाद्दरांना लगाम बसणार आहे. पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या पुढाकाराने हा नवा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

माहितीचा अधिकार मिळाल्यानंतर त्याचा गैरफायदा घेणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. प्रत्येक सरकारी कार्यालयात अर्ज करून माहिती घेणाऱ्या टोळ्याच कार्यरत झाल्या. रोज अर्ज देऊन विविध माहिती घ्यायची आणि त्याचा वापर ब्लॅकमेलिंगसाठी करायचा हा अनेकांचा व्यवसायच बनला. महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, प्रांत, तहसीलदारांसह बहुतांश सर्वच सरकारी कार्यालयांत या टोळीचा वावर आहे. बिल्डर, सरकारी अधिकारी, खासगी जमीनमालक, व्यावसायिक, व्यापारी यांच्यासह अनेकांविरोधात टोळी मोहीमच राबवत आहे. यातून खंडणी वसुलीच होत असल्याने बिल्डर मेटाकुटीला आले आहेत.

महापालिकेत तर आरटीआय कार्यकर्ता, नगरसेवक आणि अधिकाऱ्यांची साखळीच आहे. अधिकारी व नगरसेवकच माहितीच्या अधिकाराखाली अर्ज दाखल करण्यास सांगतात. ज्याच्या विरोधात अर्ज आला असेल त्याच्याशी संपर्क साधून वसुली सुरू केली जाते. खासगी सावकारी करणारेसुद्धा या साखळीत आहेत. खासगी सावकारी व आरटीआय कार्यकर्त्यांच्या त्रासाने काही बांधकाम व्यावसायिकांनी आत्महत्या केली. या पार्श्वभूमीवर क्रिडाईच्या सदस्यांनी गुरुवारी पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख व महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांची भेट घेतली. त्रास, देणाऱ्या सावकारांबरोबरच कार्यकर्त्यांची यादीच त्यांनी सादर केली.

माहितीचा अर्ज आल्यानंतर काही ठिकाणी सरकारी कार्यालयांतील अधिकारी व कर्मचारीच ज्याच्याबद्दल माहिती मागवली आहे, त्याच्याशी संपर्क साधून वसुली सुरू करतात, अशा तक्रारी बांधकाम व्यावसायिकांनी केल्या. यावर मार्ग काढण्यासाठी तीन अधिकाऱ्यांची समिती नियुक्त करण्याचा निर्णय पोलिस अधीक्षकांनी घेतला. यामध्ये पोलिस खात्यासह जिल्हाधिकारी व महापालिकेचा अधिकारी असेल. अर्ज आल्यानंतर त्याची शहानिशा तातडीने करून तो निर्गत करण्यात येईल. प्रमुख अधिकाऱ्यांकडे अर्ज जाणार असल्याने ऊठसूट तक्रार करणाऱ्यांवरही मर्यादा बसणार आहे.

०००

संगमनत करून बांधकाम व्यावसायिकांना त्रास देणाऱ्यांची संख्या वाढत आहे, पण तीन प्रमुख अधिकाऱ्यांची समिती स्थापन झाल्यास अनावश्यक अथवा लूट करण्यासाठी येणाऱ्या अर्जावर नक्कीच मर्यादा येतील. यामुळे पोलिस अधीक्षकांनी यामध्ये पुढाकार घेत तातडीने समिती स्थापन करावी.

विद्यानंद बेडेकर, उपाध्यक्ष, क्रिडाई

०००

बारा नगरसेवकांचा त्रास

कोल्हापुरात बारा नगरसेवक आरटीआय कार्यकर्त्यांच्या मदतीने बांधकाम व्यावसायिकांना त्रास देत असल्याचे समजते. तू माहितीच्या अधिकाराखाली अर्ज कर, पुढचं मी बघतो म्हणून हे सेवक सक्रिय होतात. बिल्डरांना या सर्वांची नावेच पोलिसांना देण्यात आली आहेत. यामध्ये काही अधिकारीसुद्धा या नगरसेवकांना सामील आहेत. यापुढे समितीच्या समोर अर्ज जाणार असल्याने तक्रारी करणाऱ्यांची संख्या तातडीने कमी होण्याची शक्यता आहे.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


डॉ. रोहन यांच्या बदलीमागे राजकारण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

आपल्या मर्जीनुसारच कामकाज होण्यासाठी मर्जीतील अधिकारी हवा, या राजकीय हेतूनेच कर्तव्यदक्ष सहायक पोलिस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. यातून शहरात अराजकतेने उच्छाद मांडल्याचे सिद्ध होत असून, गुंडांना संरक्षण देण्याचे काम काही मंडळी करत आहेत. शहरातील अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी डॉ. रोहन यांच्यासारख्या अधिकाऱ्याची गरज असून, त्यांची बदली रद्द करावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रकात पाटील यांना निवेदन दिले असून, त्यांची प्रत्यक्ष भेटही घेणार असल्याची माहिती माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

आवाडे म्हणाले, 'आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका निरपेक्ष भावनेने होऊ नयेत यासाठी काही राजकीय मंडळींनी डॉ. रोहन यांची तडकाफडकी बदली केली आहे. गेल्या काही वर्षांत वस्त्रनगरीच्या औद्योगिकीकरणाबरोबरच गुंडगिरीही वाढत चालली आहे. ही गुन्हेगारी पोलिस प्रशासनाने वेळीच मोडून काढावी, अशी जनभावना होती. त्यातूनच अवघ्या महिन्याभराच्या कारकिर्दीत डॉ. रोहन यांनी शहरातील जुगार क्लब, मटका अड्ड्यांसह ओपन बार, ऑनलाइन लॉटरीसह अवैध व्यवसायांना लगाम घालून सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. असे असताना त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. पण ती कोणत्या कारणास्तव झाली, हा प्रश्न निर्माण झाला आहे. बदलीमागे नेमका कोणाचा हात आहे, याची उलटसुलट चर्चा सुरू आहे. बदलीमागे कोणाचे राजकारण दडले आहे? विविध गुन्ह्यांच्या कलमांखाली 'मोक्का'ची भीती दाखवून राजकीय खेळी खेळणाऱ्या प्रवृत्तीचे हे षडयंत्र आहे.'

ते पुढे म्हणाले, 'आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर डॉ. रोहन यांच्यासारख्या अधिकाऱ्याची गरज आहे. मोक्याच्या यादीतील ज्यांची नावे समाविष्ट होणे गरजेचे होते, ती मूळ नावे बाजूलाच पडली आहेत. पोलिस त्यांच्यापर्यंत का पोहोचू शकत नाहीत, यामागचे गौडबंगाल काय? हा प्रश्न अनुत्तरित आहे. निळ्या खोक्यांचा विषयही मध्यंतरीच्या काळात चांगलाच गाजला होता. त्यामुळे बदलीचा संबंध या निळ्या खोक्याशी निगडित आहे अशीही चर्चा आहे. निवडणुकांच्या तोंडावर मर्जीप्रमाणे वागणारा अधिकारी नाही, या कारणास्तवच डॉ. रोहन यांची बदली करण्याचा राजकीय अट्टहास काहींनी केला आहे. शहरातील गुन्हेगारीसह अवैध व्यवसायाचा बिमोड करण्यासाठी डॉ. रोहन यांची बदली रद्द करावी यासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत.'

पत्रकार परिषदेस प्रकाश मोरे, विलास गाताडे, राहुल आवाडे, संजय कांबळे, अमृत भोसले, राजु बोंद्रे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

०००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठा -ओबीसींत फूट पाडण्याचा डाव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'इंग्रजांनी ज्याप्रमाणे देशात फूट पाडा आणि राज्य करा या कुटनितीचा वापर करून देश ताब्यात घेतला, त्याप्रमाणे मराठा आणि ओबीसी यांच्यात भांडणे लावून सत्ता टिकवण्याचा भाजप सरकारचा प्रयत्न आहे,' असा आरोप आमदार राजेश क्षीरसागर यांनी केला. तर आमदार सतेज पाटील यांनी 'मागासवर्गीय आयोगाचा अहवाल विधानसभा आणि विधानपरिषदेच्या पटलावर ठेवावा,' अशी मागणी केली.

सकल मराठा समाजाच्यावतीने सोमवारी (ता. २६) मुंबईला गाडी मोर्चा नेण्यात येणार आहे. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर समाजाच्यावतीने राजर्षी शाहू महाराजांना वंदन करण्यासाठी दसरा चौकातील शाहू पुतळ्याभोवती चारचाकी वाहनांनी प्रदक्षिणा घालण्यात आली. शिवशाहीर दिलीप सावंत यांनी गाडी मोर्चावर पोवाडा सादर केला. यावेळच्या सभेत आमदार क्षीरसागर आणि पाटील यांनी सरकारवर टीका केली.

'आरक्षणप्रश्नी भाजप सरकार मराठा समाजाला फसवत आहे,' असा आरोप करुन आमदार क्षीरसागर म्हणाले, 'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाने एक डिसेंबरला जल्लोषास सज्ज रहावे असे सांगितले. तर दुसरीकडे राज्य मागासवर्गीय आयोगाने ५२ टक्क्यांवर आरक्षण देता येणार नसल्याचे सांगितल्याचे कळते. यातून सरकारचा खोटारडेपणा दिसून येतो. मराठा समाजाने राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्यापासून आंदोलनाला सुरुवात केली होती. आजही आरक्षणाच्या मागणीसाठी समाजाने पुन्हा आंदोलन सुरू केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो. आरक्षणाच्या मागणीसाठी समाजाने ताकदीने लढण्यासाठी सज्ज रहावे.'

आमदार सतेज पाटील म्हणाले, 'पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पंढरपुरात विठ्ठलाकडे मराठा समाजाला दिलेले आरक्षण कोर्टात टिकू दे असे साकडे घातले आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एक डिसेंबला जल्लोषास सज्ज रहा, असे आवाहन करीत आहेत. कॅबिनेट मंत्र्यांना अहवाल माहीत नाही. अहवाल पाच विरुद्ध चार मतांनी फेटाळला आहे, अशी चर्चा माध्यमांमध्ये सुरू आहे समाजाला १६ टक्के आरक्षण देणार की १३ टक्के?, केंद्र व राज्य पातळीवरील नोकरीत किती टक्के आरक्षण असेल? हे स्पष्ट झालेले नाही. आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारची संभ्रमावस्था असल्याने अहवाल पारदर्शक असल्याचे स्पष्ट होण्यासाठी सरकारने विधानसभा व विधान परिषदेत अहवाल ठेवावा.'

यावेळी सकल मराठा समाजाचे वसंतराव मुळीक, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, दिलीप देसाई, सचिन तोडकर, स्वप्निल पार्टे, किशोर घाटगे, जयेश कदम, कादर मलबारी, अवधूत पाटील, नगरसेवक तौफिक मुल्लाणी, माजी नगरसेवक अजित राऊत, रविकिरण इंगवले, उदय जगताप, सुभाष जाधव, दीपक थोरात, संजय पाटील, शशिकांत पाटील आदी उपस्थित होते.

बंदोबस्त चोऱ्या रोखण्यासाठी ठेवा

सकल मराठा समाजाच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर कडक पोलिस बंदोबस्तामुळे दसरा चौकाला पोलिस छावणीचे रुप आले होते. 'शांततेत सुरू असलेल्या आंदोलनाला मोठा बंदोबस्त ठेवण्यापेक्षा दररोज शहर व उपनगरांत मोठ्या प्रमाणात चोऱ्या होत आहेत. तिथे बंदोबस्त तैनात करावा,' अशी टीका आमदार सतेज पाटील यांनी केली. 'कोल्हापूर ही आंदोलनाची भूमी असून मराठा समाजाने शांततेत आंदोलन केली आहेत. पोलिसांनी दडपशाही करू नये,' असा इशाराही त्यांनी दिला. वसंतराव मुळीक यांनी पोलिसांच्या नोटिसांला भीक घालत नाही असे सांगून 'मराठा समाजाचा नाद करू नका' असा इशारा पालकमंत्र्यांना दिला. आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांचा दिलीप देसाई यांनी निषेध केला.

मंडप घालण्यास परवानगी नाकारली

दसरा चौकात शाहू पुतळ्याजवळ मंडपाला महानगरपालिकेने परवानगी दिली नसल्याने पोलिसांनी मंडप घालण्यास कार्यकर्त्यांना अटकाव केला. त्यामुळे काहीकाळ तणाव निर्माण झाला. आमदार क्षीरसागर यांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक वसंत बाबर यांच्याशी चर्चा केल्यानंतर पुतळ्याजवळ कार्यक्रम करण्यास परवानगी दिली. शाहीर दिलीप सावंत 'मुंबईत निघणार, मराठा गाडी मोर्चा, सरकार सांभाळा तुमच्या खुर्च्या' हा पोवाडा सादर केला. समाधान कांबळे, रत्नाकर कांबळे, भगवान आंबले, पोपट वाघे, संभाजी पाटील यांच्यासह ढोलकीवर सुरेश कांडगावकर आदींनी त्यांना साथ दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीमाप्रश्नी डिसेंबरमध्ये मुंबईत, दिल्लीत बैठक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बेळगाव सीमाप्रश्नाचा खटला सुप्रीम कोर्टात सुरू आहे. मात्र, गेले वर्षभर सुनावणी झाली नाही. हा विषय पुन्हा पटलावर येऊन सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीला चालना देण्यासाठी पाठबळ मिळावे म्हणून मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची भेट घेतली.

पवारांनी शिष्टमंडळाला सीमाप्रश्नी सहा व सात डिसेंबर रोजी मुंबईत बैठकीचे निमंत्रण दिले. तसेच सीमाप्रश्नाचा खटला लढविणाऱ्या अॅड. हरीश साळवी यांच्या उपस्थितीत ३० डिसेंबरला दिल्लीत बैठक घेण्याची ग्वाही दिली. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, माजी आमदार अरविंद पाटील, माजी महापौर मालोजी अष्टेकर, तज्ज्ञ समिती सदस्य राजाभाऊ पाटील, खजिनदार प्रकाश मरगळे, सुनील आनंदाचे, आदींच्या शिष्टमंडळाने पवारांची भेट घेतली.

सीमावासीय गेल्या अनेक दशकांपासून संघर्ष करत आहेत. सुप्रीम कोर्टात लढाई सुरू आहे. सीमावासीयांच्या संघर्षात शरद पवार यांची पहिल्यापासून साथ आहे. दरम्यान, सुप्रीम कोर्टात गेले वर्षभर ही सुनावणी पटलावर नाही. कर्नाटक सरकार त्याचा फायदा उपटत आहे. कोर्टाच्या पटलावर हा विषय पुन्हा यावा म्हणून प्रयत्न सुरू असल्याचे दळवी यांनी सांगितले.

०००

मुंडे, महाडिक महाअधिवेशनला जाणार

कर्नाटक सरकारतर्फे गेल्या काही वर्षांपासून बेळगावमध्ये अधिवेशन भरविले जाते. १० डिसेंबरला अधिवेशन होणार असून याच दिवशी मराठी भाषिकांतर्फे महाअधिवेशन भरविले जाते. सीमावासीयांना पाठबळ देण्यासाठी मराठी भाषिकांच्या महाअधिवेशनचे निमंत्रणही शिष्टमंडळाने दिले. याप्रसंगी पवार यांनी मुंबई व दिल्लीतील बैठका घेऊन चालना देण्याची ग्वाही दिली. तसेच मराठी भाषिकांच्या महाअधिवेशनचे निमंत्रण स्वीकारत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार धनंजय महाडिक उपस्थित राहतील असे स्पष्ट केले.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दीपसंध्येने उजळला राजाराम बंधारा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कसबा बावडा

त्रिपुरारी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला लक्ष लक्ष दीपांनी उजळलेला राजाराम बंधाऱ्यावरील पंचगंगा घाट, बंधाऱ्यावरील आकर्षक विद्युत रोषणाई, पंचगंगेच्या दुथडी भरलेल्या संथ पाण्यात ज्योतींचं प्रतिबिंब, सोबतीला मराठी, हिंदी गाण्यांची बरसातीने आज राजाराम बंधारा खुलून गेला. दीपसंध्या कार्यक्रमासाठी महिलांची मोठी गर्दी झाली. कार्यक्रमाला अभिनेत्री मयुरी देशमुख, आमदार सतेज पाटील व प्रतिमा पाटील यांनी नियोजन केले होते.

कार्यक्रमात अंबाबाई देवीच्या प्रतिमेचे आणि पंचगंगा नदीचे पूजन शांतदेवी पाटील यांच्या हस्ते झाले. ऋतुराज पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. भारतवीर मित्र मंडळाच्यावतीने घाटावर हजारो दीप लावण्यात आले होते. यावेळी महिलांसाठी स्पॉट गेमचे आयोजन करण्यात आले. विजेत्या महिलांना बक्षिसे देण्यात आली. बंधांऱ्यावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. महापालिकेच्यावतीने नदीमध्ये यांत्रिक बोट सुसज्ज ठेवण्यात आली होती. या कार्यक्रमाचे आयोजन दीपसंध्या समितीने केले होते. कार्यक्रमास कसबा बावड्यातील नगरसेवक, श्रीराम सोसायटीचे संचालक, नागरिकांची गर्दी होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वसतिगृहातील विद्यार्थ्यांचेशुल्क सरकार भरणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'येथील डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृहातील विद्यार्थ्यांना कोणत्याही स्वरूपाचे शुल्क भरण्याबाबत सांगण्यात आले नाही. या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना सरकार आठ हजार रुपये देणार आहे. बँकेतील त्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा होईल. विद्यार्थ्यांनी ते पैसे वसतिगृह चालविणाऱ्या एजन्सीला द्यायचे आहेत. त्यामुळे वसतिगृहात राहण्याची मोफतच सोय आहे,' अशी माहिती शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य प्रशांत पट्टलवार यांनी गुरुवारी प्रसिद्धीपत्रकातून दिली.

पत्रकात म्हटले आहे की, विचारे माळ येथे डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृहासंबंधी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने १० ऑगस्ट २०१८ रोजी सरकारने आदेश काढला. यानुसार उच्च माध्यमिक शिक्षणामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना दोन आणि एक हजार रुपये सरकारकडून दिले जाणार आहे. अभियांत्रिकी पदविका, पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज केल्यानंतर, ज्यांचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशांना प्रतिवर्षी २० हजार, तर ज्यांचे वार्षिक उत्पन्न आठ लाखांपर्यंत आहे, त्यांच्या खात्यावर सरकार आठ हजार जमा करणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना स्वत:कडील पैसे भरावे लागणार नाहीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोहारांच्या चौकशीची मागवली माहिती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्या कामकाजाची सध्या पाच सदस्यीय समितीकडून चौकशी सुरू आहे. चौकशी समितीने दोन टप्प्यात तक्रारदारांचे म्हणणे ऐकून घेतले आहे. या महिन्याच्या अखेरीस पुन्हा चौकशी समितीची बैठक होणार आहे. दरम्यान जिल्हा परिषद सदस्य राजवर्धन निंबाळकर यांनी चौकशीची प्रक्रिया सध्या कोणत्या स्थितीमध्ये आहे याचा तत्काळ अहवाल मिळावा असे पत्र चौकशी समिती सदस्य व उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ यांना दिले आहे. लोहारांच्या विरोधात जवळपास ३०० पत्रे प्रशासनाकडे प्राप्त झाली आहेत. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत त्यांच्या कामकाजाची चौकशी करण्याचा ठराव केला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जवानाच्या पत्नीची फरपट

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कराड

तीन जणांनी मिळून एका लष्करी जवानाच्या पत्नीवर सुमारे वर्षभर बलात्कार केल्याची तसेच, तिची साडेसात लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार शहर पोलिसांत दाखल झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एक प्राध्यापक, बांधकाम कंत्राटदारासह खासगी सावकार आणि ज्योतिषाला अटक केली असून, एक जण बेपत्ता आहे.

अटक केलेल्या निघांनाही आजपर्यंत (शुक्रवार) पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. हा तपास पोलिस उपअधीक्षक नवनाथ ढवळे यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे.

आकाश सावंत (रा. कराड), अनिल थोरात (रा. नडशी ता. कराड), प्रा. संपत अडसूळ (रा. विद्यानगर, ता. कराड) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत तर गणेश गोडसे (रा. विद्यानगर, ता. कराड) असे फरारी आरोपीचे नाव आहे.

पीडित महिलेने फिर्यादीत म्हटले आहे, की आकाश सावंत,अनिल थोरात व गणेश गोडसे यांनी ऑक्टोबर २०१६ ते सप्टेंबर २०१७ या काळात विद्यानगर परिसरातील एका फ्लॅटमध्ये व कराड, कोल्हापूर येथील लॉजवर नेऊन, तसेच माझ्या घरी बलात्कार केला. अडसूळ याने पीडित महिलेकडून साडेसात लाख रुपये घेऊन तिची फसवणूक केली. या प्रकरणात संतोष वेताळ (रा. सुर्ली) याने मध्यस्थी करून पैसे मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते.

'पीडितेचा पती लष्करी जवान आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित फरार आहे. त्याचा आम्ही शोध घेत आहोत,' अशी माहिती पोलिस उपअधीक्षक ढवळे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हेरिटेज वॉकचे उद्या आयोजन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जागतिक वारसा सप्ताह दिनानिमित्त कोल्हापूर शहरातील पुरातन वारसास्थळांकडे लक्ष वेधण्यासाठी शनिवारी (ता. २४) हेरिटेज वॉकचे आयोजन केले आहे. सकाळी साडेसात ते साडेनऊ या वेळेत शहरातील २० हून अधिक हेरिटेज वास्तूंची ओळख करून दिली जाणार आहे. छत्रपती संभाजीराजे फाउंडेशन, कोल्हापूर हॉटेल मालक संघ, असोसिएशन ऑफ अर्किटेक्ट अँड इंजिनिअर्स या संस्थांनी उपक्रमाचे आयोजन केले आहे.

असोसिएशन ऑफ अर्किटेक्ट इंजिनिअर्सचे अध्यक्ष अजय कोराणे, हॉटेल मालक संघाचे उपाध्यक्ष सचिन शानभाग यांनी पत्रकार परिषदेत या उपक्रमाची माहिती दिली. शहरातील प्राचीन व ऐतिहासिक वारसा असलेल्या पुरातन वारसा स्थळांचे जतन संवर्धन करुन त्यांची भविष्यकाळात संपन्नता टिकवणे, भावी पिढीसमोर सक्षमपणे मांडणे ही उपक्रमाची संकल्पना आहे. दसरा चौकात श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन शनिवारी सकाळी साडेसात वाजता दसरा चौकात होणार असून २० स्थळांना भेट देऊन पुन्हा दसरा चौकात वॉकचे विसर्जन होणार आहे. आर्किटेक्ट अमरजा निंबाळकर, मूर्ती अभ्यासक उमाकांत राणिंगा, प्रसन्न मालेकर, कोल्हापूर वास्तुसंग्रहालयाचे अमृत पाटील अभ्यासक वास्तूंची माहिती देणार आहेत. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी शहरातील नागरिकांसह, पर्यटकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले. पत्रकार परिषदेला छत्रपती संभाजीराजे फाउंडेशनचे कार्याध्यक्ष हेमंत साळोखे, हॉटेल मालक संघाचे सचिव सिद्धार्थ लाटकर, शंकरराव यमगेकर, उदय घोरपडे, प्रसन्न मोहिते उपस्थित होते.

००००००

हेरिटेज वॉकमधील वारसा स्थळे

दसरा चौक, चित्रदुर्ग मठ, चिमासाहेब महाराज चौक, छत्रपती शिवाजी महाराज मंदिर नर्सरी बाग, ब्रह्मपुरी, पंचगंगा नदी व घाट, महादेव मंदिर, टाऊन हॉल, छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय, महानगरपालिका, दूध कट्टा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, अंबाबाई मंदिर, भवानी मंडप आणि जुना राजवाडा, मोतीबाग तालीम, संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह, खासबाग, साठमारी, देवल क्लब, बिंदू चौक, छत्रपती शिवाजी महाराज टेक्निकल स्कूल, आईसाहेब महाराज चौक, ट्रेझरी ऑफिस.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेशनधारकांचा भव्य धडक मोर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'रोख अनुदान नको, धान्यपुरवठाच कायम ठेवा,' या प्रमुख मागणीसाठी गुरुवारी काढलेल्या मोर्चात रेशन कार्डधारक आणि रेशन दुकानदारांनी प्रचंड संख्येने सहभागी होत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. मिरजकर तिकटी येथून सुरू झालेल्या मोर्चादरम्यान ठिकठिकाणाहून रेशनधारक सहभागी झाले. त्यामुळे शहरातील वाहतूक अनेक ठिकाणी खोळंबली. ऑल इंडिया फेअर प्राइज शॉप डिलर्स फेडरेशन, रेशन बचाव समितीतर्फे या धडक मोर्चाचे आयोजन केले होते.

मोर्चाची सुरूवात मिरजकर तिकटीपासून झाली. मागण्यांचे फलक हाती घेऊन मोर्चेकरी सहभागी झाले होते. मोर्चात गावागावांतून आलेल्या महिला, पुरूष शिधापत्रिकाधारकांची संख्या मोठी होती. त्यामुळे सर्व रस्त्यांवर मोर्चेकरीच दिसत होते. प्रमुख मार्गावरून फिरून मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. मोर्चेकऱ्यांनी रस्त्यावरच ठिय्या मारला. तेथे ऑल इंडिया फेअर प्राईज शॉप डिलर्स फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी विश्वंभर बसू, राष्ट्रीय प्रदेशाध्यक्ष काकासाहेब देशमुख, खासदार धनंजय महाडिक, राजू शेट्टी, आमदार सतेज पाटील, नावीद मुश्रीफ यांची भाषणे झाली. रेशनिंगबाबत सरकारने स्वीकारलेल्या धोरणावर यावेळी जोरदार टीका करण्यात आली.

खासदार शेट्टी, आमदार पाटील, फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी चंद्रकांत यादव आदींच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना निवेदन दिले. त्यानंतर मोर्चाची सांगता झाली.

कुजबूज प्रचाराने धडा शिकवू

'सोशल मीडियातून प्रभावी प्रचार करून भाजप सत्तेवर आला. मात्र गेल्या चार वर्षांत सरकार सातत्याने गरीब, सामान्यांविरोधात निर्णय घेत आहे. रेशन बंद करून अनुदानाचा निर्णय घेऊन रेशनिंग व्यवस्था मोडीत काढत आहे. ही व्यवस्था पूर्ववत न ठेवल्यास रेशन दुकानांच्या माध्यमातून सरकारविरोधात व्यापक कुजबूज प्रचार मोहीम राबवू आणि सरकारला धडा शिकवू,' असा इशारा चंद्रकांत यादव यांनी दिला.

जिल्हाधिकारी दाखल

मोठ्या संख्येने निघालेल्या मोर्चाचे निवेदन जिल्हाधिकारी सुभेदार स्वीकारत नाहीत. ते निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना सांगतात. रेशनधारकांच्या ज्वलंत प्रश्नासंबंधीचे निवेदन स्वीकारण्यासाठी ते आले नाही तर ठिय्या मारू, असा इशारा आमदार पाटील यांनी भाषणात दिला. त्यानंतर तातडीने कार्यालयात दाखल होऊन सुभेदार यांनी निवेदन स्वीकारले.

-- -- --

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारला धडा शिकवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'शिधापत्रिकेवरील धान्य बंद करून रोख अनुदान देण्याच्या निर्णयाचा फटका शेतकरी, कष्टकरी, गरीब, सामान्यांना बसणार आहे. संपूर्ण रेशन व्यवस्थाच मोडीत काढण्याचा भाजपचा डाव आहे. अच्छे दिनाचे आमिष दाखवून सत्तेवर आलेल्यांनी प्रत्यक्षात बुरे दिन आणले. त्यांना धडा शिकवण्यासाठी, प्रसंगी नरडीवर पाय ठेवून मागण्या मान्य करून घेण्यासाठी व्यापक लढा उभारूया,' असे प्रतिपादन खासदार राजू शेट्टी यांनी गुरुवारी केले.

ऑल इंडिया फेअर प्राइज शॉप डीलर्स फेडरेशन, रेशन बचाव समितीतर्फे आयोजित मोर्चा मिरजकर तिकटी, बिंदू चौक, लक्ष्मीपुरी, व्हीनस कॉर्नरमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. तेथे मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. सभेत ते म्हणाले, 'रेशन व्यवस्थेमुळे शेतकऱ्यांच्या पिकास हमीभाव मिळण्यास मदत होते. मात्र, रेशन व्यवस्था मोडीत निघाल्यास शेतकऱ्यांना मोठा फटका बसेल. धान्यासाठी सामान्य, गरिबांना दलाल, व्यापाऱ्यांच्या दारात जावे लागेल. चार वर्षांपासून सरकारने याला तुरुंगात टाकतो, त्याला टाकतो, अशा धमक्या देत आहेत. आम्हाला त्याची सवय आहे, तुरुंगात टाका पण गरिबांना न्या द्या.'

खासदार धनंजय महाडिक म्हणाले, 'केंद्र, राज्यातील सरकार अनेक अन्यायकारी, जुलमी निर्णय घेत आहे. रेशनऐवजी रोख धान्याला विरोध करण्यासाठी सरकारला धडकी भरेल इतके लोक मोर्चात आहेत. रोख पैसे देऊ नये, अशी मागणी येत्या लोकसभा अधिवेशनात करणार आहे. ८ ते १० खासदारांचे शिष्टमंडळ घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊ.'

आमदार सतेज पाटील म्हणाले, 'भाजप सरकार गरीब, सामान्यांच्या चुलीत पाणी ओतत आहे. दिवाळीत डाळ देण्याचे आश्वासन दिले. प्रत्यक्षात ती मिळाली नाही. यामुळे सरकारचाच शिमगा करण्याची वेळ आली आहे. आंधळे आणि बहिरेपणाने भाजप निर्णय घेत असल्याने सामान्यांना त्रास होत आहे. ५० ते ६० वर्षांपासूनची रेशनव्यवस्था मोडीत काढून गरिबांच्या पोटाला चिमटा लावत आहे.'

यावेळी गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, भैया माने, रवींद्र मोरे, शौकत महालकरी यांच्यासह शिधापत्रिकाधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

०००

महत्त्वाच्या मागण्या

रॉकेल पुरवठा पूर्ववत करा

ऑनलाइन रेशन वितरण व्यवस्था सुरळीत करा

रेशन दुकानदारांकडून खंडणी मागितलेल्यांवर कडक कारवाई करा

०००

एकाच व्यासपीठावर, पण...

राजकारणात एकमेकांचे कट्टर शत्रू असलेले खासदार धनंजय महाडिक आणि आमदार सतेज पाटील एकाच व्यासपीठावर होते. मात्र, दोघांचीही तोंडे परस्परविरोधी राहिली. त्यांनी नजरानजरही केली नाही. मात्र, खासदार महाडिक यांनी भाषणाच्या सुरुवातीला आमदार पाटील यांचे नाव घेतले. याउलट आमदार पाटील यांनी कोणाचेही नाव न घेता सन्मानीय व्यासपीठ म्हणत थेट भाषणाला सुरुवात केली. त्याची मोर्चास्थळी चर्चा होती.

००००

पालकमंत्री फुसका बार

भाजप सरकारने बांधकाम कामगारांची वाट लावली. आता शिधापत्रिकाधारकांची वाट लावत आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील फुसका बार आहेत. त्यांनी चार वर्षांत काहीही केले नाही, असा आरोप बांधकाम कामगार नेते भरमा कांबळे यांनी केला

०००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पवारांच्या स्वागताला एकवटली ‘राष्ट्रवादी’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, शरद पवार यांच्या कोल्हापूर दौऱ्याच्या निमित्ताने शहर आणि जिल्हा राष्ट्रवादीतील पदाधिकारी एकवटल्याचे चित्र पहावयास मिळाले. गुरुवारी दुपारी एक वाजण्याच्या पवार यांचे ताराबाई पार्क परिसरातील सर्किट हाऊस येथे सपत्नीक आगमन होताच कार्यकर्त्यांनी उत्साही स्वागत केले. फटाक्यांची आतषबाजी, घोषणा देऊन स्वागत करण्यात आले. दरम्यान खासदारकीवरून पक्षात धुसफूस आणि कुरघोडीच्या राजकारणाची चर्चा वेगावली असताना शहरासह जिल्हा नेत्यांनी त्यांच्या स्वागताला हजेरी लावली.

कोल्हापुरातील एका नातेवाईकाच्या विवाह सोहळ्यानिमित्त पवार हे गुरुवारपासून तीन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. ते पत्नी प्रतिभा यांच्यासह दुपारी एक वाजता सर्किट हाऊसच्या दालनात आले. यावेळी त्यांना भेटण्यासाठी गर्दी होती. खासदार सुप्रिया सुळे, सदानंद सुळे यांचे सायंकाळी आगमन झाले. पवार यांचा दौरा कौटुंबीक असला तर आगामी लोकसभा निवडणुकीमुळे त्याला राजकीय झालरही लाभली आहे. कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरुन राष्ट्रवादीत मतभेद आहेत. खासदार धनंजय महाडिक यांच्या उमेदवारीला आमदार हसन मुश्रीफ यांनी विरोध केला आहे. तर हातकणंगले मतदारसंघात स्वाभिमानी खासदार राजू शेट्टी यांना दोन्ही काँग्रेसच्या पाठिंब्याची शक्यता आहे. शेट्टींना राष्ट्रवादीने पाठिंबा दिल्यास माजी खासदार श्रीमती निवेदिता माने यांचे पुत्र व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धैर्यशील यांनी बंडाचा इशारा दिला आहे.

दरम्यान, पवारांच्या दौऱ्यानिमित्त जिल्ह्यातील सगळे नेते तेथे आले होते. खासदार धनंजय महाडिक, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, माजी खासदार निवेदिता माने, शहराध्यक्ष आर. के. पोवार, उपमहापौर महेश सावंत, माजी आमदार के. पी. पाटील, राजेंद्र पाटील यांसह महापौर शोभा बोंद्रे यांनी पवार यांचे बुके देऊन स्वागत केले. कार्यकर्त्यांची गर्दी वाढल्याने पवार यांनी हॉलमध्ये येऊन कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. याप्रसंगी कागलच्या नगराध्यक्षा माणिक माळी, शिरोळचे नगराध्यक्ष अमरसिंह माने, भैय्या माने, युवक प्रदेश उपाध्यक्ष नाविद मुश्रीफ, इचलकरंजीचे पदाधिकारी मदन कारंडे, कागल तालुकाध्यक्ष शिवानंद माळी, जिल्हा सरचिटणीस अनिल साळोखे, राजेश लाटकर आदी उपस्थित होते. तत्पूर्वी बंद खोलीत पवार यांनी खासदार महाडिक, माजी खासदार माने यांच्यासोबत काही वेळ चर्चा केली.

पवार-महाडिक चर्चा

खासदार धनंजय महाडिक हे कराडपासून पवार यांच्यासोबत मोटारीतून आले आहेत अशी चर्चा सर्किट हाऊसवर सकाळपासून सुरू होती. मुंबईत राष्ट्रवादीच्या बैठकीत महाडिक यांच्या उमेदवारीला शहराध्यक्ष आर. के. पोवार, राजू लाटकर यांनी विरोध केला होता. दरम्यान पवार यांच्या आगमनापूर्वी अर्धा तास आधी खासदार महाडिक सर्किट हाऊस येथे दाखल झाले. यावेळी शहराध्यक्ष पोवार यांनी त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी महाडिक यांनी सकाळपासूनच कोल्हापुरातच आहे. कराडला गेलो नव्हतो असे सांगताच अफवांना पूर्णविराम मिळाला.

धावणारा कार्यकर्ता आणि पवारांचे लक्ष

दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पवारांनी बैठक आटोपून सर्किट हाऊसमधून बाहेर पडले. त्यांचा वाहनांचा ताफा निघाला असताना एक कार्यकर्ता वाहनासोबत धावत होता. ही बाब पवारांच्या नजरेत आली. दरम्यान सुरक्षा रक्षकांनी त्या कार्यकर्त्याला बाजूला होण्यास बजावले. पवारांनी सुरक्षा रक्षकाला सांगत चालकांना मोटार थांबविण्याची सूचना केली. मोटार थांबताच कार्यकर्त्याने बुके देण्यासाठी हात पुढे केला. फोटो काढायला मोबाइल सुरक्षा रक्षकाकडे दिला. पवार यांनी हसतच कार्यकर्त्याचा बुके स्वीकारला. हा क्षण सुरक्षा रक्षकाने मोबाइलमध्ये क्लिक केल्यावर त्या कार्यकर्त्याच्या आनंदाला पारावर उरला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरक्षणप्रश्नी मुख्यमंत्र्याकडून फसवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, नागरिकांच्या खात्यावर पंधरा लाख रुपये जमा, तरुणांना नोकऱ्या आणि महिलांची सुरक्षितता अशा सर्वच प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने राज्याची फसवणूक केली. मुख्यमंत्र्यांनी आरक्षणप्रश्नी मराठासह धनगर समाजाचा विश्वासघात केला. मराठा आरक्षणप्रश्नी फडणवीस वेगळे बोलतात, सरकारमधील मंत्री वेगवेगळ्या गोष्टी करत आहेत. यावरुन नागरिकांत संभ्रम निर्माण झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात वस्तूस्थिती आणि अहवालात खरे काय हे जाहीर करावे' असे आव्हान राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी दिले.

गुरुवारी सर्किट हाऊस येथे सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, 'मराठा आरक्षणप्रश्नी सरकार जनतेची फसवणूक सुरू आहे. सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेल्या एकाही घोषणेची पूर्तता केली नाही. गेल्या चार वर्षात रस्ते दुरुस्तीवर कोट्यवधी रुपये खर्ची पडल्याचे सरकार सांगत आहे. मग अजूनही रस्त्यात खड्डे का? असा सवाल करत त्यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्या खड्डेमुक्तीच्या घोषणेची खिल्ली उडवली. 'राज्य खरोखरच जर खड्डेमुक्त झाला असेल तर हा आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण आहे ' अशी कोपरखळी त्यांनी मारली.

सुळे म्हणाल्या, 'राज्यात ठिकठिकाणचे रस्ते अजूनही नादुरुस्त आहेत. रस्ते दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपये खड्ड्यासाठी खर्च पडत आहेत. कोट्यवधींचा निधी खर्च होऊनही खड्डे का भरले जात नाहीत? राज्यात दुष्काळाची भयानक स्थिती आहे. विविध भाग दुष्काळाने होरपळत आहे. पाणी, चारा टंचाई आहे. मात्र फडणवीस सरकार दुष्काळप्रश्नी संवेदनशील नाही. नागरिकांचा सरकारवर विश्वास राहिला नाही. सरकार वास्तवापासून खूप दूर आहे.'

धनगर आरक्षणाचे काय झाले

खासदार सुळे म्हणाल्या, 'मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी बारामती येथील सभेत राज्यात भाजपची सत्ता आल्यावर मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत धनगर समाजाला आरक्षण देऊ असे आश्वासन दिले होते. दर आठवड्याला मंत्रिमंडळाची बैठक होते. चार वर्षात मंत्रिमंडळाच्या २०८ बैठका झाल्या. मात्र धनगर समाजाला आरक्षण मिळाले नाही. मुख्यमंत्र्यांनी या समाजाचा विश्वासघात केला. '

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फायबर कारखान्यास आग, १६ लाखांचे नुकसान

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, हातकणंगले

माणगाव (ता. हातकणगंले) येथील कुरुंदवाडे माळावरील श्रीनिवास पाटील (रा. कबनूर) यांच्या मालकीच्या फायबर निर्मितीच्या कारखान्याला आग लागून यामध्ये अंदाजे पंधरा ते सोळा लाख रुपयांचे नुकसान झाले असून, नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. अचानक लागलेल्या आगीने मोठ्या प्रमाणात धुराच्या लोटामुळे आग विझविणे कठीण झाल्यामुळे अडथळा येत होता.

माणगाव येथील कुरुंदवाडे माळ येथे पाटील यांचा फायबर टफनिर्मितीचा कारखाना आहे. येथे फायबर निर्मितीसाठी कच्च्या मालाचा साठा मोठ्या प्रमाणात केला होता तसेच रासायनिक प्रक्रियेसाठी विविध रसायने ठेवली होती. कारखान्याच्या सभोवताली शेती असून, यामध्ये उसाचे पीक आहे तर नजीकच प्रकाश पाटील सांगलीकर याची उसाची शेती आहे. या शेतामधील तुटून गेलेल्या उसाचा पाला पेटविल्यामुळे त्याच्या धगीने श्रीनिवास पाटील यांच्या बांधाच्या कडेला ठेवलेल्या पॉवरलूम फायबर डकला आग लागली. भर उन्हात आग लागल्याने आगीने रौद्ररूप धारण केले होते. आगीची तीव्रता व धुराच्या प्रचंड ज्वाला हवेत पसरल्याने आग विझविण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण होत होते. आगीची बातमी गावात समजताच आग विझविण्यासाठी उपसरपंच राजू मगदूम, अशोक कांबळे, उमेश जोग, नाना जोग, आदींसह ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न केले. आग विझविण्यासाठी पंचगंगा साखर कारखाना व इचलकरंजी नगरपालिकेच्या अग्निशामक दलास पाचारण करून आग आटोक्यात आणली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. सुप्रिया दीक्षित निधन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कराड

ज्येष्ठ साहित्यिक प्रकाश संत उर्फ भालचंद्र दीक्षित यांच्या पत्नी डॉ. सुप्रिया दीक्षित यांचे गुरुवारी येथे निधन झाले. त्या ८२ वर्षांच्या होत्या. त्यांच्या मागे मुलगा डॉ. अनिरुद्ध, मुलगी डॉ. उमा, नातवंडे असा परिवार आहे.

प्रकाश संत यांच्या निधनानंतर डॉ. सुप्रिया दीक्षित यांनी त्यांच्या आठवणी अमलताश या पुस्तकात शब्दबद्ध केल्या. त्यातून संत यांच्या लेखनप्रवासातील अनेक पैलू वाचकांसमोर उलगडले. ज्येष्ठ कवयित्री इंदिरा संत यांच्या त्या स्नुषा होत. डॉ. दीक्षित व्यवसायाने डॉक्टर असल्या तरी साहित्यिक आवड त्यांनी जपली होती.

दीक्षित यांचा जन्म सात एप्रिल १९३६ रोजी बेळगाव येथे झाला. तेथेच माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी सन १९६२ मध्ये मुंबईतील ग्रँट मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस पदवी प्राप्त केली. त्यांचा विवाह कराड येथील प्रकाश दीक्षित यांच्याबरोबर झाल्यानंतर त्यांनी सन १९६२ पासून कराड येथे जनरल मेडिकल प्रॅक्टिस करण्यास प्रारंभ केला. त्यानंतर त्यांनी रत्नागिरी येथील शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणूनही काम पाहिले. त्यांनी कराड येथील को ऑपरेटिव्ह नर्सिंग होमच्या त्या व्यवस्थापकीय संचालक होत्या.

डॉ. सुप्रिया दीक्षित यांनी आपल्या वैद्यकीय सेवेबरोबरच लेखनही केले. यामध्ये अमलताश, कुवेशी ही पुस्तके लिहिली. माझं माहेर, नवी सुरुवात, पत्र, नवीन घरात आदी पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांच्या अमलताश या पुस्तकाला गोपीनाथ शिवराम पाटील स्मृती वाङ्मय पुरस्कार, लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार, सुधाबाई जोशी पुरस्कार आदी पुरस्कार मिळाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


डॉ. सुप्रिया दीक्षित निधन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कराड

ज्येष्ठ साहित्यिक प्रकाश संत उर्फ भालचंद्र दीक्षित यांच्या पत्नी डॉ. सुप्रिया दीक्षित यांचे गुरुवारी येथे निधन झाले. त्या ८२ वर्षांच्या होत्या. त्यांच्या मागे मुलगा डॉ. अनिरुद्ध, मुलगी डॉ. उमा, नातवंडे असा परिवार आहे.

प्रकाश संत यांच्या निधनानंतर डॉ. सुप्रिया दीक्षित यांनी त्यांच्या आठवणी अमलताश या पुस्तकात शब्दबद्ध केल्या. त्यातून संत यांच्या लेखनप्रवासातील अनेक पैलू वाचकांसमोर उलगडले. ज्येष्ठ कवयित्री इंदिरा संत यांच्या त्या स्नुषा होत. डॉ. दीक्षित व्यवसायाने डॉक्टर असल्या तरी साहित्यिक आवड त्यांनी जपली होती.

दीक्षित यांचा जन्म सात एप्रिल १९३६ रोजी बेळगाव येथे झाला. तेथेच माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी सन १९६२ मध्ये मुंबईतील ग्रँट मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस पदवी प्राप्त केली. त्यांचा विवाह कराड येथील प्रकाश दीक्षित यांच्याबरोबर झाल्यानंतर त्यांनी सन १९६२ पासून कराड येथे जनरल मेडिकल प्रॅक्टिस करण्यास प्रारंभ केला. त्यानंतर त्यांनी रत्नागिरी येथील शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणूनही काम पाहिले. त्यांनी कराड येथील को ऑपरेटिव्ह नर्सिंग होमच्या त्या व्यवस्थापकीय संचालक होत्या.

डॉ. सुप्रिया दीक्षित यांनी आपल्या वैद्यकीय सेवेबरोबरच लेखनही केले. यामध्ये अमलताश, कुवेशी ही पुस्तके लिहिली. माझं माहेर, नवी सुरुवात, पत्र, नवीन घरात आदी पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांच्या अमलताश या पुस्तकाला गोपीनाथ शिवराम पाटील स्मृती वाङ्मय पुरस्कार, लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार, सुधाबाई जोशी पुरस्कार आदी पुरस्कार मिळाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कानडी भक्ताकडून विठुरायाला २५ लाखांचा चंद्रहार

$
0
0

पंढरपूर:

'कानडा विठ्ठलु, कर्नाटकु' अशी ओळख असलेल्या पंढरपूरच्या विठुरायाचे लाखो भक्त कर्नाटकात असून अशाच एका एका कानडी भक्ताने आज विठुरायाला तब्बल पाऊण किलो वजनाचा सोन्याचा चंद्रहार अर्पण केला. या चंद्रहाराची किंमत २५ लाख रुपये इतकी आहे.

राघवेंद्र राव असं या विठ्ठलभक्ताचं नाव आहे. राव हे बेंगळुरू येथील हॉटेल व्यावसायिक आहेत. स्वप्नात विठुराया आल्यामुळं काही दिवसांपूर्वी ते पंढरपूरला दर्शनासाठी आले होते. त्यावेळी राव यांनी देवाला सोन्याचा चंद्रहार अर्पण करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार आज सहकुटुंब मंदिरात येऊन त्यांनी आपली इच्छा पूर्ण केली. पाऊण किलोच्या या चंद्रहारावर अतिशय बारीक कलाकुसर करण्यात आली आहे. जीएसटी आणि कारागिरांच्या खर्चासह राघवेंद्रराव यांना हा हार ३४ लाख रुपयांना पडला.

गोरगरिबांचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विठुरायाला भाविकांकडून लाखो रुपयांचे अलंकार भेट मिळण्याचं प्रमाण वाढलं आहे. मात्र, अलीकडच्या काळात देवाला मिळालेली ही सर्वात मोठी भेट आहे.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गाळेधारकांचा प्रश्न लवकरच निकालात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'महापालिकेच्या गाळेधारकांचे भाडे आकारण्याचा अधिकार महापालिका आयुक्तांना देण्यात येणार आहे. याबाबतचे विधेयक लवकरच विधीमंडळात येणार असल्याने गाळेधारकांचा प्रश्न लवकरच निकालात निघणार आहे' अशी माहिती आमदार सतेज पाटील यांनी दिली. नगरसेविका उमा बनछोडे यांच्या प्रभागात पेव्हर पद्धतीने करण्यात येत असलेल्या रस्ताच्या प्रारंभ प्रसंगी ते बोलत होते.

आमदार पाटील म्हणाले, 'महापालिका परिसरात व्यापाऱ्यांची संख्या अधिक असल्याने येथील समस्या निर्गत करण्यासाठी प्राधान्य दिले जाते. येथील रस्त्यांसाठी नगरसेविका बनछोडे यांनी सततच्या पाठपुराव्यामुळे २५ लाखांचा निधी दिला आहे. त्याचबरोबर माजी नगरसेवक श्रीकांत बनछोडे महापालिकेच्या गाळेधारकांच्या प्रश्नाबाबत पाठपुरावा करतात. यातूनच त्यांनी उपस्थित केलेल्या भाडेवाढीप्रश्नी मंत्री रणजित पाटील यांच्याकडे प्रयत्न करुन भाडेवाढीचा फेरविचार करण्याची मागणी केली. मंत्री पाटील यांनी रेडिरेकन दर कमी करण्याचे अधिकार आयुक्तांना देण्याचा निर्णय घेतला आहे. यावर महिन्यात शिक्कामोर्तब होणार असल्याने येथील व्यापाऱ्यांची मोठी अडचण दूर होणार आहे. सत्तारुढ सरकारने विदर्भ व उर्वरीत महाराष्ट्र असे राज्याचे दोन भाग केले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निधी वापटपामध्ये दुजाभाव करत असून चुकीच्या पद्धतीने जीएसटीची वसुली झाल्यावरुन नागपूर महापालिकेला ४०० कोटींचा परतावा दिला आहे. याच पद्धतीने महापौर शोभा बोंद्रे यांनी नागपूरप्रमाणे महापालिकेला निधी मिळण्याची मागणी सरकारकडे केली आहे. निधी न मिळाल्यास कोर्टाता जाणार आहे.'

यावेळी महापौर शोभा बोंद्रे, मारुतराव कातवरे, प्रदीप कापडिया, दिलीप पोवार, अशोक जाधव यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेची तयारी पूर्ण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये २९ नोव्हेंबरपासून गोवर-रुबेला लसीकरण मोहीम होणार आहे. या मोहिमेंतर्गत नऊ महिने ते १५ वर्षापर्यंतच्या वयोगटातील ८ लाख २३ हजार ८४८ मुलांना लसीकरण करण्यात येणार आहे. त्याची तयारी पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे व जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. फारुक ए. देसाई यांनी दिली.

डॉ. साळे म्हणाले, 'मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील ३४८० शाळांत ५ लाख ४५ हजार ६४९ बालकांना लसीकरणचे नियोजन आहे. सरकारी व खासगी शाळा, अंगणवाडी केंद्रे, आरोग्य केंद्रे या ठिकाणी पाच आठवड्यांच्या कालावधीत लसीकरण होईल. जिल्ह्यातील दुर्गम भाग व स्थलांतरित वस्त्यांसाठी विशेष पथकांची स्थापना केली आहे. मोहिमेत आरोग्य विभागातील ५ हजार कर्मचारी कार्यरत असणार आहेत. जिल्ह्यातील वैद्यकीय व्यावसायिक, रोटरी व लायन्स क्लबचे सहकार्य घेतले आहे.'

डॉ. देसाई म्हणाले, 'देशात दरवर्षी गोवर आजारामुळे जवळपास पन्नास हजार मुले मृत्यूमुखी पडतात. रुबेला आजारामुळे दरवर्षी ५० बालके अंपग व मतिमंद जन्माला येतात. केंद्र सरकारने २०२०पर्यंत गोवर आजाराचे निर्मूलन व रुबेलावर नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्य विषयक कार्यक्रम हाती घेतला आहे. जिल्ह्यात वर्षभरात गोवर आजारग्रस्त ३३ मुले आढळली आहेत. त्यामुळे वेळीच औषधोपचार, लसीकरण गरजेचे आहे.' यावेळी मोहिमेच्या समन्वयक डॉ. ज्योती लांडगे, बालरोगतज्ज्ञ डॉ. बाबासाहेब थोरात, डॉ. हर्षला वेदक आदी उपस्थित होते.

शहरात एक लाख ३२ हजार मुलांना लसीकरण

महापालिकेच्यावतीने गोवर रुबेला लसीकरण मोहिमेत शहरातील एक लाख ३२ हजार २९२ मुला-मुलींचे लसीकरण करण्यात येणार आहे, अशी माहिती महापौर शोभा बोंद्रे यांनी दिली. पालकांनी जागरुक राहून आपल्या मुलांचे लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील यांनी केले. पहिल्या टप्प्यात सर्व शाळांमधील ६० ते ६५ टक्के मुलांचे, दुसऱ्या टप्प्यात अंगणवाड्यांतील ३० ते ३५ टक्के मुले, शाळाबाह्य क्षेत्रातील ५ टक्के मुलांचे तिसऱ्या टप्प्यात लसीकरण करण्यात येईल. लसीकरणासाठी ४५ पथके तैनात केली आहेत. महापालिकेच्या दवाखान्यांमधील नर्सही मोहिमेत सहभागी असतील. वॉर्ड दवाखान्यांमध्येही लसीकरण करण्यात येईल. यावेळी डॉ.अमोलकुमार माने, डॉ.रुपाली यादव उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गव्यांचा मुक्काम रमण मळ्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जयंती नाला परिसरात गुरुवारी रात्री आढळलेल्या गव्यांचा मुक्काम कसबा बावडा येथील रमण मळ्यात असल्याचे स्पष्ट झाले आहे. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना गव्यांच्या पाऊलखुणा आढळल्या असून, त्यांना हुसकावून लावण्यासाठी मिरच्यांच्या धुरीची उपाययोजना सुरू केली आहे. दरम्यान, गव्यांनी रमण मळा परिसरात उसाचे नुकसान केल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

वडणगे परिसरातून रमण मळ्यात आलेले गवे गुरुवारी मध्यरात्री जयंती नाला परिसरात आल्याचे नागरिकांनी पाहिले. गवे थेट शहरात आल्याने वन विभागाच्या पथकाने त्यांना हुसकावून लावण्यासाठी तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. गुरुवारी रात्रीपासून शुक्रवारी पहाटेपर्यंत राजाराम बंधारा ते पंचगंगा स्मशानघाट परिसरात कर्मचाऱ्यांनी गस्त घातली. मात्र, सर्वत्र उसाची शेती असल्याने गव्यांना हुसकावून लावण्यात यश आले नाही. दरम्यान, चार ठिकाणी गव्यांनी उसाचे नुकसान केल्याचे आढळले. खुरांच्या निशाणावरून तीन ते चार गवे असावेत, असा संशय व्यक्त केला जात आहे. या परिसरात जनावरांचे गोठे आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांची रोज वर्दळ असते. गव्यांकडून शेतकऱ्यांसह गोठ्यातील जनावरांवर हल्ले होऊ नयेत, यासाठी वन विभागाकडून दक्षता घेतली जात आहे.

शहरात येणाऱ्या गव्यांना रोखण्यासाठी वन विभागाने शुक्रवारी राजाराम बंधारा ते शिवाजी पूल परिसरात चार ठिकाणी मिरच्यांची धुरी दिली. मिरचीच्या ठसक्याने गवे दूर जातात, त्यामुळे गवे नागरी वस्तीत शिरकाव करणार नाहीत, अशी माहिती करवीरचे वनपाल विजय पाटील यांनी दिली. दरम्यान, रमण मळा परिसरातील शेतकऱ्यांना दक्षता घेण्याच्या सूचना वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. गवा दिसताच त्याला मुद्दाम हुसकावून लावू नये. एकट्याने शेतात जाऊ नये. रात्रीच्या वेळी शेतात थांबू नये. कसबा बावडा ते वडणगे मार्गावर ये-जा करणाऱ्या नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन वन अधिकाऱ्यांनी केले आहे. वनरक्षक अमर वेटाळे, एम. एस. पवार, संदीप हजारे यांच्यासह वनसेवक गजानन मगदूम, बाबासो जगदाळे, भगवान चौगुले, आदी गव्यांना हुसकावण्याचे काम करीत आहेत.

खुरांच्या खुणा आढळल्या

जयंती नाला ते रमण मळा परिसरात गव्यांचा वावर आहे. शुक्रवारी संध्याकाळी जयंती नाला ते रमण मळा परिसरात पंचगंगा नदीकाठावरील चिखलात गव्यांच्या खुरांच्या खुणा आढळल्याचे वन कर्मचाऱ्यांनी सांगितले. विन्स हॉस्पिटलसमोर उसाच्या शेतात रात्रीच्या वेळी गवे येऊन थांबतात, अशी माहिती या परिसरातील शेतकऱ्यांनी दिली. गवे शहरात पोहोचू नयेत, यासाठी मिरचीच्या धुरीसह रात्रंदिवस गस्त घालण्याचेही काम वन विभागाकडून सुरू आहे.

.. .. ..

जयंती नाल्याजवळ गवे आल्याची माहिती मिळताच कर्मचाऱ्यांसह परिसराची पाहणी केली. खुरांच्या खुणा आढलल्या आहेत. याशिवाय गव्यांकडून तीन-चार ठिकाणी उसाचे नुकसानही झाले आहे. शहरात गवे येऊ नयेत, यासाठी दक्षता घेतली जात आहे. नागरिकांनी सहकार्य करावे.

विजय पाटील - वनपाल, करवीर

.. ..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images