Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

‘वक्फ जमिनींच्या शोधासाठी पाठपुरावा’

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'राज्यात वक्फ बोर्डाने दान दिलेल्या अनेक मोक्याच्या जमिनींवर अतिक्रमण झाले आहे. काही ठिकाणी त्या हडप केल्या आहेत. भाड्याने दिल्या आहेत. त्यांच्या शोधासाठी कडक भूमिका घेण्याची विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करणार आहे' अशी माहिती अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

अध्यक्ष शेख म्हणाले, 'सर्व शहरात वक्फ बोर्डाच्या मालमत्ता आहेत. त्या कुठे आहेत?, किती आहे? याचा शोध घेण्याची गरज आहे. मात्र बोर्डाकडे केवळ सहाच कर्मचारी आहेत. त्यामुळे कामकाजाला मर्यादा येत आहेत. मनुष्यबळ वाढवून सर्व मालमत्तांचा शोध घेण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. लवकरच बोर्डाच्या सीईओंची भेट घेणार आहे. मदरशांमध्ये आधुनिक शिक्षण देण्यासाठी सरकारी निधीचा अधिकाधिक वापर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. अल्पसंख्याक आयोगाच्या कक्षेत येणाऱ्या मुस्लिम, जैन, ख्रिश्चन समाजाच्या विकासासाठी जे करावे लागेल, त्यासाठी सरकारकडे शिफारस केली जाईल. राज्यातील सर्व जिल्ह्यांत फिरून एका महिन्यात राज्य सरकारला अहवाल देण्याचे नियोजन आहे.'

दरम्यान, कोल्हापूर शहरात लिंगायत समाजाला दफनभूमीसाठी जमीन अपुरी पडत आहे, अशी तक्रार समाजाच्या शिष्टमंडळाने केली. हा प्रश्न सोडवण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला जाईल. ख्रिश्चन समाजातील व्यक्ती मृत झाल्यास लाकडी पेटीची गरज असते. त्यासाठी सरकारकडून मदतीसाठी प्रयत्न करणार आहे,' असेही शेख यांनी सांगितले.

यावेळी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे उपस्थित होते.

सोयीस्करपणे बगल

केंद्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षांनी अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीला पाठिंबा दिला. या पार्श्वभूमीवर राज्य आयोगाची भूमिका काय आहे?, या पत्रकारांच्या प्रश्नाला अध्यक्ष शेख यांनी थेट उत्तर देण्याचे टाळले. 'पहिल्यांदा जनतेच्या पोटाचे प्रश्न सोडवू,' असे सांगत त्यांनी प्रश्नाला सोयीस्कर बगल दिली. राज्यातील औरंगाबादसह इतर काही शहरांची नावे बदलण्याच्या मागणीच्या प्रश्नावरही त्यांनी भाष्य केले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


निषेध मोर्चा

0
0

कोल्हापूर: हातकणंगले तालुक्यातील सावर्डे येथील मातंग समाजावर ६ नोव्हेंबरला सामूहिक हल्ला करण्यात आला. भाजप सरकार सत्तेवर आल्यापासून अशाप्रकारचे हल्ले विविध ठिकाणी वाढले आहेत, या विरोधात डेमोक्रेटीक पार्टी ऑफ इंडियातर्फे मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चासमोर बोलताना प्रा. सुकुमार कांबळे यांनी सरकारवर जोरदार टीका केली.

मागासवर्गीयांवरील असे अत्याचार थांबविण्याच्या मागणीसाठी शिवाजी चौक, सीपीआर रोड, दसरा चौकमार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. तेथे मोर्चेकऱ्यांनी जोरदार निदर्शने केली. सरकार विरोधात घोषणाबाजी केली. सतीश भंडारे, सुभाष साठे, प्रविण आकुर्डे, महमद शेख, राजू सुहासे, अजित टोमके, अमोल आवळे, संतोष महापुरे आदी उपस्थित होते.

०००००००००

कोल्हापूर: हातकणंगले तालुक्यातील सावर्डे येथील मातंग समाजावर ६ नोव्हेंबरला सामुहिक हल्ला करण्यात आला. भाजप सरकार सत्तेवर आल्यापासून अशाप्रकारचे हल्ले विविध ठिकाणी वाढले आहेत, या विरोधात डेमोक्रेटीक पार्टी ऑफ इंडियातर्फे मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चासमोर बोलताना प्रा. सुकुमार कांबळे यांनी सरकारवर जोरदार टिका केली.

सावर्डेतील गुंड तलवारी घेऊन मातंग समाजातील दगडू कांबळे यांना मारहाण केली. दहशत माजवून समाजाला वेठीस धरण्याचा प्रयत्न केला. शिरोळ तालुक्यातील कवठेसार येथील पोलिस पाटीलाने १५ वर्षाच्या मातंग समाजाच्या मुलीवर अत्याचार केले. भादोलीतील मागासवर्गीय महिलेवर अतिप्रसंग करून खून करण्यात आला. मिणचे गावातील गुंडांनी समाजातील तिघांवर खुनी हल्ला केला. पारगावमध्येही असाचा प्रकार घडला. या विरोधात व दोषींवर कारवाई करावी, या मागणीसाठी 'डेमोक्रेटीक'तर्फे बिंदू चौकातून मोर्चा निघाला. शिवाजी चौक, सीपीआर रोड, दसरा चौकमार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. तेथे मोर्चेकऱ्यांनी जोरदार निदर्शने केली. सरकार विरोधात घोषणाबाजी केली. सतीश भंडारे, सुभाष साठे, प्रविण आकुर्डे, महमद शेख, राजू सुहासे, अजित टोमके, अमोल आवळे, संतोष महापुरे आदी उपस्थित होते.

--------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साडेपंधरा हजार कोटींचा व्यवसाय

0
0

लोगो :

सहकाराची घोडदौड भाग १

००००००

एंट्रो...

'विना सहकार नहीं उद्धार' तत्त्वानुसार सहकाराचे काम चालते. सहकार चळवळ महाराष्ट्रात चांगली रुजली. कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासात सहकाराचा मोठा वाटा आहे. राजर्षी शाहू महाराजांनी पतपेढ्यांच्या माध्यमातून सहकाराचे रोपटे लावले. आज त्याचे वटवृक्षात रूपांतर झाले. १९९० आणि २००० च्या दशकात काही ठिकाणी अपप्रवृत्ती घुसल्याने सहकार चळवळ संपण्याचा धोका होता; पण काही प्रामाणिक सहकारी संस्थांनी निष्ठा, सचोटीने काम करत सहकार टिकवला. आज जिल्ह्यात सहकारी बँका, नागरी बँका, पतसंस्था, दूध, यंत्रमाग, साखर कारखान्यांच्या माध्यमातून कोट्यवधीची उलाढाल होऊन अनेकांना रोजगार मिळला आहे. १४ ते २० नोव्हेंबरअखेर अखिल भारतीय राष्ट्रीय सहकार सप्ताह होत आहे. त्यानिमित्त जिल्ह्यातील सहकाराचा आजपासून आढावा...!

००००००

satish.ghatage@timesgroup.com

Tweet:satishgMT

कोल्हापूर : जिल्ह्याच्या सहकारविश्वात नागरी बँकांची घोडदौड सुरू आहे. अनेक बँकांनी जिल्ह्याचा परिघ ओलांडून परराज्यात बँकांच्या शाखा उघडून मल्टिस्टेटचा दर्जा प्राप्त केला आहे, तर तीन बँकांनी साडेसातशे कोटींचा टप्पा ओलांडून शेड्युल्ड बँकेचा दर्जा मिळवण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडे प्रस्ताव पाठवले आहेत. जिल्ह्यातील ४७ नागरी बँकांनी २०१७-१८ या आर्थिक वर्षात १५ हजार ५२९ कोटी रुपयांचा व्यवसाय केला. सहकार विभाग आणि रिझर्व्ह बँकेकडून येणाऱ्या बंधनांचा मुकाबला करताना न डगमगता बँका ग्राहक, सभासदांचा विश्वास संपादन करून जिल्ह्याच्या विकासात मोलाचे योगदान देत आहेत.

राजर्षी शाहू महाराजांनी सावकारांच्या तावडीतून रयतेची सुटका व्हावी यासाठी सहकाराची प्रेरणा घेत पतपेढ्या स्थापन केल्या. १९१३ मध्ये अर्बन को-ऑप. सोसायटीची स्थापना केली. सोसायटीचे रूपांतर बँकेत झाले. शतकोत्तर वर्षात बँकेने मोठा पल्ला गाठला असून शेड्युल्ड बँकेकडे झेप घेतली आहे. आज जिल्ह्यात ४७ नागरी बँका पूर्णक्षमतेने सुरू आहेत. एकीकडे खासगी व राष्ट्रीय बँका सर्वसामान्यांना कर्जपुरवठा करण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे अडीअडचणीला सावकारांच्या दारात जाण्याऐवजी सर्वसामान्य लोक नागरी बँकांकडे धाव घेतात. अध्यक्ष, संचालक मंडळांच्या माध्यमातून कर्ज मिळाल्यानंतर कर्जाची फेडही प्रामाणिकपणे करत असल्याने बँकांचा कारभार व्यवस्थित सुरू आहे. छोटे व मध्यम व्यापाऱ्यांना नागरी बँकांचा मोठा आधार वाटतो. रोजच्या व्यवहारात विवाह, घरबांधणी, व्यवसाय, वाहन खरेदी यासाठी सहकारी बँकांकडून २५ हजार रुपयांपासून एक लाख रुपयांचे कर्ज मिळते. मोठ्या व्यवसायांना आठ ते नऊ कोटी रुपयांचे कर्ज दिले जाते.

सहकारात काही अपप्रवृत्ती शिरल्याने १९९० ते २०१० या काळात शहरातील मराठा, महावीर, बलभीम, जनता, रवी, शाहू या बँका अडचणीत आल्याने त्या अन्य बँकांत विलीन झाल्या. अर्बन, वीरशैव, इचलकरंजी जनता, वारणा, महालक्ष्मी, कमर्शिअल, आजरा जनता, महिला, कुंभी, सत्यशोधक, पंचगंगा, आजरा अर्बन, गडहिंग्जल अर्बन, यूथ, गणेश कुरुंदवाड या प्रमुख बँकांसह जिल्ह्यातील ४७ बँकांनी आपला आलेख उंचावत ठेवला आहे. त्यांच्याकडे ९५३० कोटींच्या ठेवी असून, सहा हजार कोटींचे कर्जवाटप झाले आहे. साडेपंधरा हजार कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. कल्लाप्पाण्णा आवाडे बँक शेड्युल्ड असून, चार बँका मल्टिस्टेट आहेत. बहुतांश बँकांनी आधुनिकीकरण स्वीकारले असून एटीएम, मोबाइल बँकिंगसह सर्व सुविधा ग्राहकांना दिल्या जात आहेत. कर्जवसुलीचे प्रमाण चांगले असल्याने सरासरी एनपीएचे प्रमाण पाच टक्के आहे. सरकारी बँकांचा ढोबळ एनपीए दहा टक्क्यापेक्षा जास्त आहे. तरीही राज्याचे सहकार खाते आणि रिझर्व्ह बँकेकडून नागरी बँकांवर बंधने आणली जात आहेत. दर दोन वर्षांनी रिझर्व्ह बँकेकडून तपासणी केली जाते. नागरी बँका अन्य बँकांत विलिनीकरण कराव्यात यासाठी रिझर्व्ह बँकेकडून दबाव वाढवला जात आहे. सभासदांमुळे लोकशाहीमार्गाने निवडून आलेले संचालक मंडळ काम करत असताना संचालक मंडळाबरोबर व्यवस्थापक मंडळ नियुक्तीसाठी रिझर्व्ह बँकेने कंबर कसली आहे. व्यवस्थापक मंडळ स्थापन झाल्याने संचालकांच्या अधिकारावर गदा येणार आहे. तसेच व्यवस्थापक मंडळाने घेतलेल्या निर्णयाला संचालक मंडळाला जबाबदार धरले जाणार आहे. आगामी पाच वर्षांत डिजिटल बँकिंगचे युग येणार असल्याने नागरी बँकांकडून अद्ययावत यंत्रणा आणि सक्षम मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी पावले उचालावी लागणार आहेत.

००००

दृष्टिक्षेपात जिल्ह्यातील बँका

एकूण बँका ४७

शेड्युल्ड बँक १

मल्टिस्टेट बँका ४

शाखा संख्या ४६७

कर्मचारी संख्या ३७७३

ठेवी ९५३०.७६ कोटी

कर्जे ५९९८.८९ कोटी

गुंतवणूक ३७११.६६ कोटी

व्यवसाय १५५२९.६५ कोटी

नफा ४६७ कोटी

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

म्हाकवेत मालकाकडून शेतमजुराचा खून

0
0

म. टा. वृत्तसेवा, कागल

शेतमालकाने मजुराचा खून केल्याची घटना म्हाकवे (ता. कागल) येथे घडली. शेतमालक व शेतमजूर दोघेही म्हाकवे येथील आहेत. मजुराचा मृतदेह नानीबाई चिखली (ता. कागल) येथील शेतात आढळून आला. महादेव सदाशिव देवडकर असे खून झालेल्या मजुराचे नाव आहे. संशयित आरोपीचे नाव विजय महादेव डाफळे आहे. याबाबतची फिर्याद मृताचा भाऊ सागर देवडकर यांनी मुरगूड पोलिसांत दिली, त्यानुसार विजय डाफळेला पोलिसांनी ताब्यात घेतले.

खुनाचे नेमके कारण पैशाच्या देवघेवीतून, शेतात कामाला न येण्याच्या कारणावरून की अन्य काही आहे हे लवकरच तपासात पुढे येईल, अशी माहिती करवीरचे डीवायएसपी सूरज गुरव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

देवडकर यांचा मृतदेह नानीबाई चिखली हद्दीतील कुर्ली रोडवरील महादेव बाबू चौगले यांच्या उसाच्या शेतात मंगळवारी सकाळी पावणे बाराच्या सुमारस आढळला. महादेव गावातीलच विजय डाफळे याच्या शेतात गेल्या तीन वर्षांपासून कामाला होता. महादेवला दारूचे व्यसन होते. त्यासाठी तो शेतमालक डाफळेकडून वेळोवेळी पैसे घेत असे. मात्र, कामावर येत नसल्याने डाफळे व महादेव यांच्यात वादावादी होत होती. काल, सोमवारी बोलावूनही महादेव कामावर आला नसल्याच्या रागातून संशयित आरोपी डाफळेने महादेवचा गळा आवळून डाव्या डोळ्यावर, छातीवर हत्याराने वार करून खून केल्याची फिर्याद महादेवचा भाऊ सागरने पोलिसांत दिली.

घटनास्थळी डीवायएसपी गुरव यांनी भेट देऊन तपासाची चक्रे फिरवून संशयित आरोपी डाफळेला अवघ्या काही तासांत ताब्यात घेऊन त्याच्यावर मुरगूड पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीज निर्मिती प्रकल्प ताब्यात घेणार?

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कसबा बावडा येथे कचऱ्यापासून वीज निर्मिती करणाऱ्या प्रकल्पाची कामे मुदतीत पूर्ण न केल्याबद्दल कंपनी व कंपनीच्या संचालकांना प्राथमिक निलंबनाची नोटीस दोन दिवसांत महापालिका प्रशासन पाठवणार आहे. मंगळवारी (ता. २०) प्रशासनाने कंपनी व उपकंपन्यांची बैठक बोलवली आहे. बैठकीत प्रकल्प सुरू करण्यास दिरंगाई होणार असल्याचे स्पष्ट झाल्यास, कायदेशीर बाबी तपासून प्रकल्प महापालिका ताब्यात घेण्याची शक्यता आहे.

कसबा बावडा येथे अनेक वर्षापासून साचलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करुन वीजनिर्मिती करण्यासाठी २०१३मध्ये महापालिकेने सुनील हायटेक व रोकेम कंपनीबरोबर करार केला. शास्त्रीय पद्धतीने कचऱ्यावर प्रक्रिया केल्यानंतर कंपनीला महापालिका प्रतिटन ३०८ रुपये देणार होती. दररोज २०० टन कचऱ्यांतून २५० किलोवॅट वीजनिर्मिती करण्याचे उद्दीष्ट होते. यासाठी दोन्ही कंपन्यांनी कोल्हापूर ग्रीन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी स्थापन केली.

कंपनीने पाच वर्षांपासून प्रकल्प सुरू करण्यात प्रचंड दिरंगाई केली. अपुरे कर्मचारी अन् आर्थिक कारणाने प्रकल्प रखडत गेला. अद्याप प्रकल्पातील कामे बाकी असली, तरी वीज निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या सर्व तांत्रिक बाबी कंपनीने पूर्ण केल्या आहेत. याबाबतचा अहवाल त्रयस्थ समितीने नुकताच दिला. अपुऱ्या कामांबाबत मूळ कंपनी प्रशासनाला दाद देत नसल्याने कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रकल्पाला दिरंगाई केल्याबद्दल प्राथमिक निलंबनाची कारवाई करण्याबाबत कंपनी व कंपनीच्या संचालकांना त्यांच्या संकेतस्थळ व निवासी पत्त्यावर नोटीस पाठवणार आहे. नोटिशीवर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांची स्वाक्षरी झाली असून दोन दिवसांत नोटीस पाठवली जाणार असल्याचे महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितले.

याबाबत कंपनी व उपकंपन्यांची मंगळवारी महापालिकेत बैठक होईल. प्रकल्प सुरू करण्याबाबत कंपनीचे दिरंगाईचे धोरण आढळल्यास प्रकल्प ताब्यात घेण्याची तयारी महापालिकेने केली आहे. प्रकल्प ताब्यात घेऊन अन्य कंपनीला चालवण्यास देणार आहे. यासाठी महापालिकेच्या विधी विभागाकडून मार्गदर्शन घेण्यात येणार असल्याचेही वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

वीज निर्मितीचा फज्जा?

कचऱ्यापासून वीज निर्मिती करताना मोठ्याप्रमाणात आरडीएफ हा ज्वलनशील पदार्थ तयार होतो. याचा वापर मोठमोठ्या कारखान्याच्या बॉयलरसाठी होऊ शकतो. मात्र, कंपनीला आरडीएफ खरेदीदार अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे कंपनीची मोठी अडचण झालेली असताना, या प्रकल्पाशेजारी बायोगॅसपासून वीज निर्मिती करण्याची शक्यता आहे. बायोगॅसपासून होणारी वीज केवळ प्रकल्पासाठी वापरता येणार आहे. परिणामी दररोज २५० किलोवॅट वीजनिर्मितीचा फज्जा उडण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मधुमेही रुग्णांची ‘लाईफ’ वाढली

0
0

तरुण आणि महिलांना मधुमेहाचा सर्वाधिक धोका, २५ ते ३५ वयोगटाचा समावेश

मधुमेह दिन ... विशेष

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मधुमेही रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असली तरी अत्याधुनिक उपचारपद्धतीमुळे मृत्यूचे प्रमाण घटले आहे. मधुमेहासंबंधी झालेल्या संशोधनामुळे रुग्णांचे आयुर्मान वाढविणे शक्य झाले आहे. मात्र तरुण आणि महिलांना मधुमेहाचा सर्वाधिक धोका निर्माण झाला असून यामध्ये २५ ते ३५ वयोगटातील तरुण आणि महिलांचा सर्वाधिक समावेश आहे. कुटुंबाच्या उत्पन्नाच्या एक तृतीअंश उत्पन्न मधुमेहाच्या उपचारांवरील औषधांवर खर्च होत असल्याचे दिसून आले असून टाईप टू च्या रूग्णांचे प्रमाण वाढले आहे.

भारताला मधुमेहाची जागतिक राजधानी म्हटले जाते आहे. भारतीय वंशाच्या लोकांना सर्वाधिक मधुमेह ग्रासत आहे. साधरणत: २०३० पर्यंत भारतातील मधुमेहींची संख्या आठ कोटीपर्यंत पोहचण्याचा धोका जागतिक आरोग्य संघटनेने नुकताच व्यक्त केला. बदलत्या जीवनशैलीचा अंगीकार, अनुवंशिकता, लठ्ठपणा अति ताणतणाव अशासारखी कारणे मधुमेहाला खतपाणी घालत आहेत. जवळपास साडेसहा कोटींपर्यंत मधुमेही रुग्ण देशात आहेत. तर इंडस हेल्थ प्लस संस्थेने २०१७ साली केलेल्या सर्वेक्षणात मधुमेहींचे प्रमाण १४ टक्के आढळले आहे. वीसपेक्षा कमी वय असलेल्या रुग्णांमध्ये स्त्रियांची संख्या अधिक आहे. वीसपेक्षा कमी वय असलेल्या महिलांना मधुमेहाचा सर्वाधिक धोका आहे. मात्र धोका वाढला असला तरी तुलनेने मधुमेहामुळे मृत्यू होण्याच्या प्रमाणात घट झाली आहे.

आधुनिक उपचारपद्धतीमुले 'लाईफ' वाढली

पूर्वी मधुमेह झाला म्हणजे सर्व संपले अशी भावना रुग्णांत होत असे. मात्र अलिकडे या क्षेत्रात झालेल्या प्रगत संशोधनामुळे मधुमेहींना सर्वसामान्य आयुष्य जगणे शक्य झाले आहे. मधुमेहावरील नवनवीन औषधे बाजारपेठेत उपलब्ध होत आहेत. सातत्यपूर्ण संशोधनामुळे प्रभावी इन्सुलिन आणि गोळ्या उपलब्ध झाल्याने धोक्याची तीव्रता कमी करण्यास मदत झाली आहे. सद्यस्थितीत इन्सुलिनचे नऊ प्रकार व गोळ्यांचे बारा ते तेरा प्रकार बाजारपेठेत मिळतात. इन्सुलिनमध्ये ह्युमन इन्सुलिन हा औषध प्रकार असून यामध्ये तत्काळ आणि जास्त काळ परिणाम करणारे प्रकार असतात. तसेच वेगवेगळे तयार कॉम्बिनेशन्स देखील मिळतात. ह्युमोलॉग्स, ग्लीप्टीन्स, एसजीएलटीटू इनहिबीटस अशी औषधे उपलब्ध आहेत. आधुनिक औषधांमुळे वजन कमी, साखर कमी होऊन हृदयावर तसेच किडनीवर होणारा परिणाम कमी झाला आहे. तसेच काही इन्सुलिनचा प्रभाव चोवीस तासांपर्यंत राहत असल्याने पूर्वीसारखे वारंवार औषध घेण्याचे कष्ट कमी झाले आहेत.

................

कोट

'नवीन उपचारपद्धतींमुळे मधुमेही रुग्णांचे आयुर्मान वाढले आहे. पूर्वी मधुमेहाचा परिणाम झाल्याने हृदयविकाराने मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या अधिक होती. त्याचे प्रमाण घटले आहे. नव्या औषधांचा तिहेरी वापर होत आहे. त्यामुळे वजन, साखर नियंत्रित राहते, हृदय सुरक्षित राहते आणि किडनीचे विकार उद्भवत नाहीत. नवीन उपचारपद्धती काहीशी महाग असली तरी त्याचा दीर्घकाळ फायदा होतो.

डॉ. राजेश देशमाने, मधुमेह विकार तज्ज्ञ

..............

महाराष्ट्रात १४ टक्क्यांहून अधिक व्यक्ती मधुमेहग्रस्त

आधुनिक औषधांमुळे मधुमेहींचे आयुर्मान ७० वर्षांपर्यंत वाढण्यास होणार मदत

८० टक्के मधुमेहग्रस्तांत लठ्ठपणा

७० टक्के रुग्णांच्या डोळ्यांवर परिणाम

देशात साधारणा १२ टक्के व्यक्ती मधुमेहीग्रस्त

मधुमेहींपैकी ६० ते ८५ टक्के रुग्णांना डायबिटीक रेटिनोपॅथी (डोळ्यांवर परिणाम) धोका

मधुमेहीग्रस्तांमध्ये मोतिबिंदूची शक्यता अधिक

............

कोटा की ...

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ई-मशिन्सअभावी केएमटीला ब्रेक

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सर्व्हर डाउनमुळे ई-मशिन्सची कमतरता आणि पार्किंग ठेक्यांच्या वसुलीसाठी केलेली केएमटीच्या वाहकांची नेमणूक यातून केएमटीला मोठा फटका बसला आहे. या दोन्ही कारणांमुळे सोमवारी केएमटीला ७०० किलोमीटरच्या फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. त्यामुळे आधीच तोट्याच्या गर्तेत अडकलेली केएमटी अधिकच नुकसानीत गेली. प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे केएमटीच्या मार्गाला ब्रेक लागला.

महापालिकेच्या परिवहन उपक्रमातंर्गत दररोज ९८ बसमधून प्रवासी वाहतूक केली जाते. प्रवाशांना यापूर्वी छपाई तिकिटाद्वारे प्रवासी शुल्क आकारले जात होते. नंतर ई-मशिन्सद्वारे तिकिट देण्यास सुरुवात झाली. सकाळी व दुपारी अशा दोन सत्रांत बसवर वाहकांची नियुक्ती केली जाते. वाहकांना कामावर रुजू होताना ई-मशिन्स सर्व्हरद्वारे डाऊनलोड करुन घ्यावी लागतात. पण, गेल्या काही दिवसांपासून सर्व्हर डाऊन असल्याने मशिन्स डाऊनलोड होण्यास बराच विलंब लागत आहे. त्यामुळे वर्कशॉपमधून बस उशीरा किंवा अनेकदा बाहेरच न पडण्याच्या घटना वारंवार घडू लागल्या आहेत. संबंधीत कंपनीला मशिन्स डाउनलोड करण्यासाठी देण्यात येणारी रक्कम वेळेवर मिळत नसल्याने अशी स्थिती जाणिवपूर्वक निर्माण केली जात असल्याची चर्चा आहे.

सोमवारी ई-मशिन्स वेळेवर डाऊनलोड न झाल्याने तब्बल ७०० किलोमीटरच्या फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. त्यामुळे केएमटीला प्रतिकिमी ४१ रुपयांप्रमाणे २८ हजार रुपयांचा फटका बसला. प्रवाशांचीही मोठी ससेहोलपट झाली. केएमटीचा दैनंदिन सुमारे अडीच लाखांचा तोटा असताना वाढीव तोट्यामुळे प्रशासनाची डोकेदुख वाढली आहे.

ई-मशिन्समुळे अडचणी वाढल्या असताना शहरातील विविध पार्किंगच्या ठिकाणांवर वाहकांची नेमणूक केली जाते. दररोज ३५ ते ४० वाहकांची पार्किंग शुल्क आकारण्यासाठी नेमणूक केली जाते. त्याचाही परिणाम बस वाहतुकीवर होत आहे. अवैध प्रवासी वाहतुकीचे आव्हान समोर असताना यातून मार्ग काढण्याऐवजी असलेल्या मनुष्यबळाचा योग्य वापर करण्यात प्रशासनाला अपयश येत असल्याचे स्पष्ट होत आहे. प्रशासनाच्या या नियोजनशून्य कारभारांमुळे केएमटी अधिकच तोट्याच्या गर्तेत अडकू लागली आहे.

वाहकांअभावी बस

वर्कशॉपमध्येच

केएमटीच्यावतीने बिंदू चौक, अयोध्या पार्क, सीपीआर हॉस्पिटल, प्रादेशिक परिवहन कार्यालय, कपिलतीर्थ मार्केट, रंकाळा पदपथ उद्यान, गोकुळ हॉटेल या पार्किंगच्या ठिकाणी वसुली केली जाते. यासाठी रोज १८ ते २० वाहकांची नियुक्ती केली जाते. सर्वच पार्किंग स्थळावरुन वाहकांना दैनंदिन देण्यात येणाऱ्या वेतनाएवढी वसुली होत असल्याने सर्वच पार्किंगस्थळे उत्पन्नाच्या दृष्टीने निरपयोगी ठरत आहेत. बसस्टँड, शिवाजी चौक व अन्य गर्दीच्या ठिकाणी तिकिट देण्यासाठी सात ते आठ वाहकांची नेमणूक केली जाते. परिणामी ३५ ते ४० केएमटी बस केवळ वाहकांअभावी वर्कशॉपमधून बाहेर पडत नसल्याची वस्तूस्थिती समोर आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाकीघोल परिसरातील विकासकामांचे उदघाटन

0
0

फोटो...

म. टा. वृत्तसेवा, राधानगरी

'राधानगरी विधानसभा मतदारसंघातून २०१४ मध्ये विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाताना मतदारसंघातील रस्त्यांची दयनीय अवस्था या एकमेव मुद्द्यावरच आपण निवडणूक लढलो. गेल्या चार वर्षांत विधानसभेत गेल्यानंतर ग्रामीण भागातील रस्त्यांना निधी मिळण्याबाबत वारंवार मागणी केली. त्यामुळे वाकीघोल परिसरातील रस्त्यांसाठी साडेसात कोटी रुपये मंजूर झाले,' असे प्रतिपादन आमदार आबिटकर यांनी केले. वाकीघोल (ता. राधानगरी) परिसरातील साडेसात कोटी रुपयांच्या विकासकामांच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते.

आमदार आबिटकर म्हणाले, 'वाकीघोल परिसर राधानगरी तालुक्यातील दुर्गम व डोंगराळ भाग आहे. येथे स्वातंत्र्यानंतरसुद्धा अनेक रस्त्यासाठी निधी उपलब्ध झाला नसल्याने हा भाग रस्ते विकासापासून वंचित होता. यासाठी वारंवार पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्त्यांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. गेली २५ वर्षे प्रलंबित असणाऱ्या वाकीघोल परिसरासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणारा सावर्दे (कामतेवाडी) प्रकल्पाचे कामाची फाइल लोकप्रतिनिधीच्या उदासिनतेमुळे धूळखात पडली होती. २०१४ मध्ये आमदार झाल्यानंतर या प्रकल्पाला ऊर्जितावस्था आणण्यासाठी फाइल राज्यशासनाच्या वनविभागाची मान्यता घेऊन ती सेंट्रल वाइल्ड लाइफ बोर्ड, दिल्ली यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आली असून, वाइल्ड लाइफ बोर्डाच्या बैठकीमध्ये या प्रकल्पाला काही अटींची पूर्तता करण्याच्या अधीन राहून मंजुरी देण्यात आली असून, त्या अटींची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न सुरू आहोत.'

यावेळी माजी उपसभापती अरुणराव जाधव, दत्तात्रय उगले, नंदकुमार ढेंगे, बाबा नांदेकर, सुभाष चौगले, डी. के. परीट, विजय बलुगडे, सरपंच धनाजी खोत, सावर्दे सरपंच विद्या गुरव, अरविंद नाईक, वाकीघोल विकास समितीचे अध्यक्ष डॉम्निक डिसोझा, आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तरुणाचा संशयास्पद मृत्यू

0
0

म. टा. वृत्तसेवा, हातकणंगले

येथील कोल्हापूर-सांगली महामार्गावरील स्वामी समर्थ मंदिराशेजारी सोमवारी रात्री नऊच्या सुमारास डोक्याला इजा होऊन तरुण गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला. त्याला सांगलीच्या सिव्हिल व्हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला. राकेश विलास जुवे (वय १८, रा. हातकणंगले) असे त्याचे नाव असून, करण भाट (वय १९) गंभीर जखमी असून, त्याच्यावर कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, मृत राकेश जुवेचा अपघात नसून घातपात झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी हातकणंगले पोलिस ठाण्यासमोर चार तास ठिय्या मारून खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यावेळी संतप्त जमावाचा रुद्रावतार पाहून अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी तत्काळ अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केल्याने नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार नेला.

याबाबत पोलिस व घटनास्थळांवरून मिळालेली माहिती अशी : हातकणंगलेतील राकेश जुवे कुटुंबीयांसह तहसीलदार कार्यालयानजीक राहत होता. सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास तो मित्र करण भाट याच्याबरोबर मोटारसायकलवरून गेला होता. रात्री नऊच्या सुमारास राकेशचा अपघात झाला असून, हातकणंगले ग्रामीण रुग्णालयात तत्काळ येण्याचा निरोप कुटुंबीयांना मिळाला. तेव्हा तेथे गेल्यांतर राकेशच्या डोक्यास गंभीर दुखापत होऊन नाका-तोंडातून रक्त येऊन बेशुद्ध असल्याचे दिसून आले, तर मित्र करण जखमी झालेला दिसून आला. नातेवाइकांनी राकेशची अवस्था गंभीर बनल्याने त्याला सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी तो मृत झाल्याचे घोषित करून शवविच्छेदन करून मृतदेह ताब्यात दिला.

दरम्यान, मंगळवारी सकाळी राकेशच्या नातेवाइकांनी महामार्गावरील घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता स्वामी समर्थ मंदिराच्या दक्षिणेस राकेश व करण जखमी अवस्थेत पडलेले ठिकाण व त्याची मोटारसायकल विरुद्ध दिशेला लॉक केलेल्या अवस्थेत आढळली, पण मोटारसायकलला साधे खरचटले नसल्याचे आढळून आले. त्यामुळे राकेश व करण यांना अपघात न होता ते जखमी कशामुळे झाले, याबाबत संशय बळावल्याने सकाळी अकरा वाजता राकेशचा घातपात झाल्याचा आरोप नातेवाइकांनी करून हातकणंगले पोलिसांना खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असता पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल करण्याची भूमिका घेतल्याने संतप्त नातेवाइकांनी राकेशचा मृतदेह हातकणंगले पोलिस ठाण्यासमोर आणून ठेवला. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक निलाभ यांनी अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून घेतला.

००००

जुवे कुटुंबीयांचा आधार गेला

मृत राकेश रुकडी येथे महाविद्यालयीन शिक्षण घेत होता. त्याचे वडील विलास अर्धांगवायूने ग्रस्त असून, आई अंध आहे. भाऊ नागेश नऊ वर्षांचा तसेच बहिणी राखी व पूजा या इंगवले हायस्कूलमध्ये शिक्षण घेत आहेत. कुटुंबीयांचा आधार गेल्याने त्यांनी राकेशचा मृतदेह पाहून फोडलेल्या हंबरडा पाहून उपस्थितांना अश्रू आवरता आले नाही.

.........

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राधानगरी परिसरात शनिवारी टेंट कॅम्प

0
0

म. टा. वृत्तसेवा, राधानगरी

राधानगरी तालुक्यातील पर्यटन विकासासाठी प्रयत्नशील असणाऱ्या बायसन नेचर क्लबमार्फत पर्यटकाना निसर्गाची ओळख करून देण्याबरोबरच विविध वनसंपत्ती, प्राणी यांचे निरीक्षण करण्यासाठी या कॅम्पचे आयोजन केले आहे. कॅम्पला शनिवारी (ता.१७) सकाळी आठ वाजता सुरुवात होणार आहे. कॅम्पमध्ये फक्त फॅमिली ग्रुप सहभागी होऊ शकतात. कॅम्पमध्ये सहभागी होणाऱ्या पर्यटकांनी शनिवारी सकाळी आठपर्यंत राधानगरी येथे जमावे. रविवारी (ता.१८) सकाळी कॅम्पची सांगता होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापौर निवडीत नेत्यांच्या सावध हालचाली

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापौर शोभा बोंद्रे यांचा कार्यकाळ २४ नोव्हेंबर रोजी संपुष्टात येणार आहे. नेत्यांनी आदेश दिल्यास राजीनामा देण्याची आपली तयारी आहे असे त्यांनी स्पष्ट केले असले तरी, महापौर निवडीवेळी नगरसेवकांची करावी लागत असलेली बडदास्त, या राजकारणातील धोके यामुळे आघाडीच्या नेत्यांनी सावध हालचाली सुरू केल्या आहेत. इच्छुकांची संख्या, आर्थिक खर्च अन् भाजप-ताराराणीचे तगडे आव्हान त्यामुळे नेते पेचात सापडले आहेत. परिणामी, सोमवारी (ता. १९) होणाऱ्या महासभेत महापौर राजीनामा देणार का? हाच कळीचा मुद्दा ठरणार आहे.

महापालिकेत तीन वर्षांपूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आली. सध्याच्या सभागृहाला १५ नोव्हेंबर रोजी तीन वर्षे पूर्ण होत आहेत. गेल्या निवडणुकीपासून पक्षीय राजकारणाला सुरुवात झाली तरी महापौरपदाचे तुकडे पाडण्याची परंपरा या सभागृहानेही कायम राखली. अन्य समित्यांचे सभापतिपदही विभागून घेण्याच्या फॉर्म्यूल्यामुळे प्रत्येक निवडीवेळी इच्छुकांची संख्या वाढताना दिसते. वाढत्या इच्छुकांमुळे स्थायी समितीमध्ये सत्तारुढ आघाडीला फटका बसला अन् सत्तास्थापनेपासून चमत्काराच्या प्रतीक्षेत असलेल्या भाजप-ताराराणीने आघाडीने चमत्कार घडवून दाखवला. आता महापौरनिवडीतही त्याची पुनरावृत्ती करण्याची तयारी या आघाडीची आहे.

२५ मे रोजी झालेल्या महापौर निवडीत सत्तारुढ आघाडीला पद आपल्याकडे कायम राखताना बरीच कसरत करावी लागली. आघाडीचे नगरसेवक विरोधात जातील या भीतीपोटी सर्वांना सहलीवर पाठविण्यात आले. नगरसेवकांसोबत त्यांचे कुटुंबीय सोबत असल्याने सहलीचा खर्च ५० ते ६० लाखांच्या घरात गेल्याची चर्चा होती. तरीही आघाडीतील सात सदस्य विरोधी आघाडीच्या संपर्कात असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे सत्तारुढ गटाने विरोधी आघाडीतील सदस्यांना आपल्या आघाडीत घेण्याचा राजकीय डाव खेळला. यात ते यशस्वी होणार अशी शक्यता असल्याने फोडाफोडीच्या राजकारणाला ब्रेक लागला. पण, पद मिळवणाऱ्यांना याची चांगलीच किंमत मोजावी लागली. अशी किंमत पुन्हा मोजण्याची तयारी नेत्यांची नसल्याने सर्वांनी साधव पवित्रा घेतला आहे.

पुढील एक वर्षासाठी महापौरपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे असेल. पदासाठी अॅड. सूरमंजिरी लाटकर, सरिता मोरे, माधवी गवंडी यांची नावे चर्चेत आहेत. गेल्या तीन वर्षात या तिन्ही नगरसेविकांना कोणतेही पद मिळालेले नसल्याने त्यांची दावेदारी प्रमुख मानली जाते. त्यामुळे पुन्हा महापौरपदाचे तुकडे होणार हे निश्चित मानले जाते. पण स्थायी समितीच्या निवडीत ज्याप्रमाणे सदस्य फोडोफोडी झाली, त्याची पुनरावृत्ती घडण्याची शक्यता असल्याने नेत्यांनी सावध भूमिका घेतली आहे.

'स्थायी'ची धास्ती

गेल्यावेळच्या महापौर निवडीमध्ये सत्तारुढ गटातील सात नगरसेवक विरोधी आघाडीमध्ये सहभागी झाल्याची चर्चा होती. त्यासाठी 'लाखों'चा डाव खेळल्याची उघड चर्चा होती. नंतर हा प्रयत्न फसला. पण, स्थायी समितीमध्ये भाजप-ताराराणीने सत्तारुढ आघाडीला सुरुंग लावला. सत्तारुढ गटाचा गाफिलपणाचा फायदा घेत राष्ट्रवादीच्या दोन नगरसेवकांना फोडून 'स्थायी'तील सत्ता ताब्यात घेतली. गेल्या तीन वर्षात दोन्ही आघाड्यांतील नगरसेवकांमध्ये नाराजी असली, तरी सत्तारुढ गटात ती अधिक ठळक दिसून येते. त्याचा फायदा पुन्हा विरोधी आघाडी घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थायी समितीच्या निवडीची धास्ती घेऊन महापौर निवडीचे राजकारण सध्या खेळले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वायत्त संस्थांवर सरकारची हुकूमशाही

0
0

म टा प्रतिनिधी, कोल्हापूर

पंतप्रधान मोदी यांच्या हुकूमशाही वृत्तीमुळे रिझर्व्ह बँक, सीबीआय आणि न्यायव्यवस्था अशा संस्थांची स्वायत्तता धोक्यात आली आहे. १९ नोव्हेंबरला होणाऱ्या आरबीआयच्या बैठकीत उर्जित पटेल यांना राजीनामा द्यावा लागेल किंवा मोदी सरकारसमोर शरणागती पत्करावी लागेल, असे भाकित चव्हाण यांनी केले. ते कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी बोलताना चव्हाण म्हणाले, पंतप्रधान मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय एकाधिकारशाहीने घेतला. सर्व मंत्र्यांना बंद घोलीत ठेवले. रिझर्व्ह बँकेची तातडीची बैठत बोलवून नोटाबंदीला मान्यता देण्यास भाग पाडले. गेल्या दोन वर्षात काळा पैसा, भ्रष्टाचार, आतंकवाद या कोणत्याच मुद्यावर यश आले नाही. मागणी करूनही रिझर्व्ह बँकेच्या बैठकीचा अहवाल सरकारने दिला नाही. हा अहवाल नुकताच लिक झाला आहे. हा अहवाल कोणी लिक केला याचा सरकारने शोध घ्यावा. सरकार आणि आरबीआयमधील संघर्ष शिगेला पोहोचला असून, १९ नोव्हेंबरला होणाऱ्या आरबीआयच्या बैठकीत एकतर उर्जित पटेल यांना राजीनामा द्यावा लागेल किंवा मोदी सरकारसमोर शरणागती पत्करावी लागेल.

रिझर्व्ह बँकेच्या गंगाजळीतील साडेतीन लाख कोटी रुपयांची मागणी सरकारने केली आहे. देशाच्या इतिहासात पहिल्यांदा असा प्रकार घडला असून, या पैशातून सरकारने राष्ट्रीयीकृत बँकांची कर्जे भागवण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोपही चव्हाण यांनी केला. राफेल विमान खरेदीवरून पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदींवर निशाना साधला. ६७० कोटी रुपयंची किंमत ठरली असताना त्याच विमानांना प्रत्येकी १६७० कोटी रुपये का दिले? त्याचबरोबर १२६ विमानांची खरेदी करण्याचा निर्णय बदलून केवळ ३६ विमानांच्या खरेदीचा निर्णय मोदींना का घेतला? याचे उत्तर मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले. राफेल खरेदीबाबत सीबीआयकडे गुन्हा दाखल होण्याच्या धास्तीनेच मोदींनी सीबीआयच्या संचालकांना हटवले. गुजरातमधील हरेन पंड्या यांच्या मृत्यूप्रकरणी खटल्याची सुनावणी घेणारे न्यायाधीश लोया यांच्यावर अमित शहा यांच्या बाजूने निकाल देण्यासाठी प्रचंड दबाव होता. याची माहिती त्यांनी एक निवृत्त न्यायाधीश आणि एका वकील मित्रास सांगितली होती. लोया यांच्यासह निवृत्त न्यायाधीश आणि वकिलांचाही संशयास्पद मृत्यू झाल्याने याची नव्याने चौकशी करण्याची मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

सरकार अपयशी ठरल्याने राम मंदिरचा मुद्दा पुढे आला. शहरांची नावे बदलणे, धार्मिक मुद्दे समोर आणणे हा धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुंबईच्या प्रेमी युगुलाची सज्जनगडावर आत्महत्या

0
0

सातारा

मुंबई येथून सज्जनगडावर फिरण्यासाठी आलेल्या एका प्रेमी युगुलाने दुपारच्या वेळी गडावरून खोल दरीत उडी मारून आत्महत्या केली. पूनम मोरे आणि तिचा प्रियकर निलेश अंकुश मोरे अशी त्यांची नावं आहेत.

पुनम अभय मोरे ( वय २६ ) ही पाटण तालुक्यातील बोडकेवाडीचे आहे. ती पतीसोबत मुंबईत राहात होती. तर निलेश अंकुश मोरे हा त्यांच्या भावकितील आहे. तो सुद्धा मुंबईत राहातो. या दोघांचे प्रेम संबध होते, अशी प्राथमिक माहिती आहे.

दोघांचे मृतदेह दरीतूनवर काढण्याचं काम महाबळेश्वर येथील सह्याद्री ट्रेकर्सच्या मदतीने सुरू आहे. एक मृतदेह वर काढण्यात आला आहे. पोलीस आणि नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आजोबाचा नातीवर बलात्कार; गर्भवती नातीकडून बाळाची हत्या

0
0

सातारा :

आजोबाने बलात्कार केल्याने अल्पवयीन नात गर्भवती राहिली आणि तिने एका बाळाला जन्म दिला. पण त्या बाळाबद्दल लोकांना कळले तर लोक काय म्हणतील या भितीपोटी तिने त्या नवजात बाळाची ब्लेडने गळा कापून हत्या केली. फलटण तालुक्यातील बागेवाडी बरड येथे ही खळबळजनक घटना घडली आहे. फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात अजोबा विरोधात बलात्कार व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर अल्पवयीन मुलीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत फलटण ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शामराव बाजीराव जाधव रा.बागेवाडी बरड, ता. फलटण याने खुरंगे मळ्यात जानेवारी 2018 ते मार्च 2018 या कालावधीत अल्पवयीन नातीवर बलात्कार केला. याबाबत कोणासही सांगितले तर तुला जीवे मारून टाकीन अशी धमकी दिली. धमकीच्या भीतीने तिने घडल्या प्रकाराची वाच्यता केली नाही. त्यानंतर आजोबाने तिला चार वेळा खुरंगे मळ्यात गवत आणण्याच्या निमित्ताने नेऊन बलात्कार केला.

ही अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली व तिने ११ नोव्हेंबर २०१८ रोजी एका मुलाला जन्म दिला. हे मूल तिला नको होते. लोकांना कळले तर तिची व आजोबाची बदमानी होईल म्हणून तिने बाळाच्या गळ्यावर ब्लेडने वार करून खून केला. बाळाचा मृतदेह ऊसाचे शेतात पुरला. या प्रकरणी सूर्यदास निगडे रा.बागेवाडी बरड यांनी अल्पवयीन मुलीविरोधात तक्रार दाखल केली. आजोबा शामराव बाजीराव जाधवविरोधात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे तर अल्पवयीन मुलीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापुरात ६ डिसेंबरपासून सैन्य भरती

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांसाठी ६ ते १६ डिसेंबरअखेर ११ दिवस सैन्य भरती मेळावा होणार आहे. येथील शिवाजी विद्यापीठाच्या मैदानावर होणाऱ्या भरतीसाठी सरकारी, निमसरकारी यंत्रणेतर्फे आवश्यक ती मदत करू, असे आश्वासन निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत दिले.

निवासी उपजिल्हाधिकारी शिंदे म्हणाले, 'कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या सहा जिल्ह्यांसह गोवा राज्यातील पणजी आणि मडगावसाठी ही सैन्य भरती होईल. सैन्य प्रशासनातर्फे आयोजित भरतीसाठी आतापर्यंत ३८ हजार तरुणांनी ऑनलाइन नोंदणी केली. नोंदणीची मुदत २० नोव्हेंबरपर्यंत आहे. भरती प्रक्रिया सुरळीत, शांततेत पार पाडण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी. मेळाव्याच्या ठिकाणी बॅरेकेट्स, पोलिस बंदोबस्त, वाहतूक व्यवस्था, आरोग्य, स्वच्छता, वीज पुरवठा, पिण्याचे पाणी, शौचालये या सुविधा द्याव्यात. भरतीला येणाऱ्या अधिकाऱ्यांची निवास व्यवस्था संबंधीत विभागाने करावी. बसस्थानकातून आवश्यकतेनुसार शिवाजी विद्यापीठापर्यंत जादा एसटी, केएमटी बस सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात.'

जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सुभाष सासणे म्हणाले, 'उमेदवारांना राहण्यासह प्राथमिक सोयी उपलब्ध करुन देणे, फुड पॅकेटस्‌, बिस्किटे, शामियाना उभारणीसाठी दानशूर व्यक्ती तसेच सेवाभावी संस्थांनी मदत करावी. यासंबंधी ज्यांना मदत करावयाची आहे, त्यांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, महासैनिक दरबार, कसबा बावडा रोड, सर्कीट हाऊसजवळ दूरध्वनी २६६५८१६ तसेच मोबाइल ९९७०८५६४३८ या क्रमांकावर संपर्क साधावा.

यावेळी सैन्य भरती अधिकारी कर्नल अनुराग सक्सेना, डॉ. मेजर गौरव, शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास नांदिवडेकर, तहसीलदार गुरू बिराजदार, पोलिस निरीक्षक औदुंबर पाटील, महानगरपालिका आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील आदींसह अधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मुश्रीफ, समरजितसिंह शनिवारी एकाच व्यासपीठावर

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कागल तालुक्यातील राजकारण नेहमीच आरोप- प्रत्यारोप आणि कुरघोडीच्या प्रकारांनी चर्चेत असते. विधानसभा निवडणुकीला अजून अवधी असतानाही आतापासूनच एकमेकांना शह-काटशह देण्याची एकही संधी न दवडणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार हसन मुश्रीफ, भाजप नेते, म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे आणि माजी आमदार संजय घाटगे हे राजकीय विरोधक शनिवारी (ता. १७) एकाच व्यासपीठावर येणार आहेत.

अखिल भारतीय ग्राहक पंचायत, मध्य महाराष्ट्र प्रांत कोल्हापूर कागलतर्फे कार्यकर्ता प्रबोधन शिबिर व प्रांतिक अधिवेशन १७ व १८ नोव्हेंबर रोजी आयोजित केले आहे. कागल येथील सांगाव रोडवरील अलका शेती फार्म येथे शिबिर होणार आहे. शिबिराचे उद्घाटक म्हणून पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार मुश्रीफ, समरजितसिंह घाटगे आणि संजय घाटगे, खासदार धनंजय महाडिक यांना संयोजकांनी आमंत्रित केले आहे. कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेतही त्यांचा उल्लेख आहे. सध्या लोकसभेच्या तिकीटावरून मुश्रीफ आणि खासदार महाडिक यांच्यामध्ये संघर्ष आहे. मुश्रीफांनी यापूर्वी महाडिकांच्या उमेदवारीला विरोध केला होता. तर महाडिक यांनी पक्ष कोणताही असेल, पण खासदार मीच असणार अशी वल्गना केली आहे. ग्राहक पंचायतीच्या कार्यकर्ता प्रबोधन शिबिराच्या निमित्ताने हे सगळे राजकीय विरोधक एकाच व्यासपीठावर येणार आहेत.

शिबिराचा समारोप रविवारी (ता. १८) होणार असून त्याप्रसंगी हमिदवाडा साखर कारखान्याचे चेअरमन प्रा. संजय मंडलिक उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाकडे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरक्षण द्या ; अन्यथा पायउतार व्हा

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सकल मराठा क्रांती मोर्चानंतर मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगलाच ऐरणीवर आला आहे. मोर्चे, आंदोलने होऊनही सरकार आश्वासनांवर समाजाला झुलवत ठेवत आहे. सरकारच्या या फसव्या आश्वासनांविरोधात सकल मराठा समाजाने विधानभवनावर धडक देण्याचा निर्धार केला आहे. 'आरक्षण द्या; अन्यथा पायउतार व्हा' असा निर्वाणीचा इशाराही दिला आहे. यासाठी राज्यव्यापी मोर्चाचे आयोजने केले असून कोल्हापूर हेच आंदोलनाचा प्रमुख केंद्र राहणार आहे असे पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आले.

इतिहास संशोधक इंद्रजित सावंत म्हणाले, 'कोल्हापुरातील ठिय्या आंदोलन मागे घेतल्यानंतर सरकारने एकही कुणबी प्रकरण निकालात काढलेले नाही. सरकार जोपर्यंत आध्यादेश काढत नाही, तोपर्यंत आमच्या त्यांच्यावर विश्वास नाही. सरकार आरक्षण दिल्यासारखे दाखवते, प्रत्यक्षात काहीही कार्यवाही करत नाही. त्यामुळे आता राज्यव्यापी आंदोलनाची दिशा ठरवली आहे. मोर्चामध्ये पूर्वीप्रमाणे फसगत केल्यास एकाही मंत्र्याला राज्यात राहू देणार नाही. समाजाला नक्षलवादी ठरवा अथवा गुन्हे दाखल करा. जोपर्यंत आरक्षणाची मागणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत मुंबईतून हलणार नाही.'

दिलीप देसाई म्हणाले, 'मंत्री गट उपसमितीने २२ मागण्यांचे लेखी आश्वासन दिल्यानंतर ४२ दिवसांचे ठिय्या आंदोलन मागे घेतले. पण, अद्याप आश्वासनांची पूर्तता झालेली नाही. परिणामी सरकार समाजाची कुचेष्टा करत आहे का? असा प्रश्न उपस्थित होतो. आयोगाचा अहवाल येण्यापूर्वीच फुटत असेल तर, पारदर्शकता आणि विश्वासार्हतेचे काय? आम्ही आश्वासनांमुळे गाडी मोर्चा रद्द केला. पण सरकार फसवत असल्याने रस्त्यावरील आंदोलनांशिवाय पर्याय नाही. 'सारथी'ला पाच कोटी, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला २०० कोटी दिल्याचे सांगितले जाते. महामंडळाची पदे देऊन, त्यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा दिला. पण त्याचा लाभ युवकांना झाला नसल्याने समाजात असंतोष निर्माण झाला आहे. या युवकांना सोबत घेऊनच सरकारचे डोके ठिकाणावर आणले जाईल.'

पत्रकार परिषदेला पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष अॅड. गुलाबराव घोरपडे, स्वप्नील पार्टे, प्रकाश पाटील, शरद साळुंखे, इंद्रजित माने, दिलीप सावंत आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सफाई कामगारांना अॅपरन

0
0

कोल्हापूर

आझाद तरुण मंडळ व हुजूर गल्ली तरुण मंडळाच्यावतीने महापालिकेच्या सफाई कामगारांना अॅपरनचे वाटप करण्यात आले. नगरसेवक ईश्वर परमार, उद्योजक जयेश ओसवाल यांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला. याप्रसंगी कर्मचाऱ्यांना मिठाईचे बॉक्स वितरित करण्यात आले. यावेळी दिलीप इंगवले, सचिन घोटणे, विराज ओतारी, प्रशांत कोरगांवकर, विजय करजगार, शुभम इंगवले, ओंकार इंगवले आदी उपस्थित होते.

......

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ना पक्षाची साथ, ना सत्तास्थाने

0
0

फोटो : निवेदिता माने, धैर्यशील माने

Gurubal.Mali@timesgroup.com

gurubalMaliMT

कोल्हापूर : पस्तीस वर्षे घरात खासदारकी असतानाही सत्तास्थाने निर्माण करण्यात आलेले अपयश, विविध पक्षांमध्ये विखुरले गेलेले कार्यकर्ते आणि ज्यांच्या जिवावर राजकारण करायचे त्याच हक्काच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सतत वाऱ्यावर सोडण्याची घेतलेली भूमिका, यामुळे एकेकाळचा बलाढ्य माने गट सध्या कोंडीत सापडला आहे. ज्यांच्याशी संघर्ष केला, त्यांच्याच प्रचाराची जबाबदारी पक्ष देणार असल्याने हा गट पक्ष सोडणार हे निश्चित आहे. लोकसभेची लढाई निश्चित असली तरी कोणता झेंडा हाती घ्यायचा या संभ्रमात सध्या धैर्यशील माने आहेत.

एकेकाळी कोल्हापूर जिल्ह्यात खासदार बाळासाहेब माने गटाची मोठी ताकद होती. तत्कालीन इचलकरंजी लोकसभा मतदारसंघात गावागावात नव्हे तर गल्लीगल्लीत या गटाचे कार्यकर्ते होते. त्यामुळे बाळासाहेब माने पाचवेळा, तर निवेदिता माने दोनवेळा खासदार झाल्या. आवाडे आणि कुंभार गटाला टक्कर देत हे यश मिळवले. राजकारणासाठी सहकारी, शैक्षणिक व औद्योगिक संस्था लागतात, याकडे दुर्लक्ष केल्याने राजकीय पद गेल्यानंतर या गटाची अवस्था बिकट झाली. सध्या तर या गटाकडे कोणतेच सत्तास्थान नाही, त्यामुळे कार्यकर्ते सांभाळणे अवघड झाल्याने गटाचे अस्तित्व टिकविण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे.

निवेदिता माने यांना उमेदवारी नाकारून हातकणंगले मतदारसंघ गेल्यावेळी काँग्रेसला देण्यात आला. आता तो स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्याचे जवळजवळ निश्चित झाले आहे. यामुळे ज्यांच्याशी अनेक वर्षे संघर्ष केला, त्या आवाडे गटानंतर आता खासदार राजू शेट्टी यांचा प्रचार करण्याची वेळ माने गटावर येण्याची शक्यता आहे. राजकीय सोयीसाठी राष्ट्रवादीने माने गटाला वाऱ्यावर सोडण्याची भूमिका घेतल्याने या गटाची कोंडी झाली आहे. यामुळे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धैर्यशील माने यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला आहे. निवेदिता मानेंऐवजी आपण मैदानात उतरू असे त्यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. राष्ट्रवादीची उमेदवारी मिळणार नसल्याने सध्या कोणता झेंडा हाती घेऊ, अशी त्यांची मानसिकता झाली आहे. शेट्टी दोन्ही काँग्रेस व स्वाभिमानी आघाडीचे उमेदवार असतील. शिवसेना व भाजपची युती नक्की आहे. यामुळे युतीची उमेदवारी मिळवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. पण शेट्टींना टक्कर देण्याची या गटाची ताकद नाही. त्यामुळे भाजप अथवा शिवसेना मानेंना प्राधान्य देण्याची शक्यता नाही. प्रबळ कुणी मिळालाच नाही तर पर्याय म्हणून विचार होऊ शकतो. हा विचार व्हावा म्हणूनच गटाचे अस्तित्व दाखवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. नुकताच झालेला माने गटाचा मेळावा हा त्याचाच एक भाग. धनुष्यबाण उचलण्याची घोषणा केली असली तरी शेवटच्या क्षणापर्यंत त्यांचा पक्ष ठरण्याची चिन्हे दिसत नाहीत.

००००

ना ताकद, ना उपद्रवमूल्य

राष्ट्रवादी अथवा शिवसेना, भाजपने दखल घ्यावी अशी सध्या तरी माने गटाची ताकद नाही. गटाचे कार्यकर्ते विविध पक्षांत विखुरल्याने दबाबगट नाही. शिक्षणसंस्था वगळता साखर कारखाना, सूतगिरणी, बँक अशी कोणतीच सत्तास्थाने नाहीत. त्यामुळे कार्यकर्ते बांधून ठेवण्याची सोय नाही. खासदारकी आणि जिल्हा परिषद सदस्यत्व गेल्यानंतर कोणतेच राजकीय पद या घराण्याकडे नाही, त्यामुळे राजकीय वजन कमी झाले आहे. अशोकराव जांभळे, प्रविता सालपे, जयरामबापू पाटील हे नेते वगळता त्यांच्याकडे मोठे नेते नाहीत. अशोक स्वामी, मदन कारंडे, अरुण इंगवले अशा अनेकांनी विविध पक्षांचा झेंडा हाती घेतल्याने गटाचा प्रभाव कमी झाला आहे.

००००

पुण्याई, सहानुभूती अन् मराठा स्पिरीट

बाळासाहेब मानेंची पुण्याई, पक्षाकडून सतत डावलले जात असल्याच्या भावनेने तयार झालेली सहानुभूती, मराठा स्पिरीट हे या गटाच्या जमेच्या बाजू आहेत. धैर्यशील मानेंची धडाडी, प्रभावी वक्तृत्वशैली यामुळे छाप पाडण्यात ते यशस्वी होतात. गावागावांत अजूनही या गटाला मानणारी माणसे आहेत. निवेदिता माने यांच्याकडे पद नसले तरी त्यांचा संपर्क कमी झाला नाही. जातीय समीकरण मजबूत असणाऱ्या या मतदारसंघात 'बहुजन समाज' हा शिक्का या गटावर आहे. जो त्यांना उपयोगी पडणार आहे. युतीची उमेदवारी मिळाल्यास आर्थिक ताकद तर मिळेलच, शिवाय प्रचारयंत्रणाही. शेट्टी प्रस्थापितांसोबत गेल्यास त्यांच्याविरोधात तयार होणाऱ्या वातावरणाचा लाभ या गटाला होईल.

००००

कोट

काही चूक नसताना राष्ट्रवादी काँग्रेस आमच्यावर सतत अन्याय करत आहे. ज्यांच्याशी आम्ही संघर्ष केला, त्यांचा प्रचार करण्याची जबाबदारी आम्ही कदापि स्वीकारणार नाही. लोकसभेच्या मैदानात उतरणार हे निश्चित आहे, फक्त कोणता झेंडा घेणार, हे मात्र शेवटच्या क्षणी ठरेल.

धैर्यशील माने

००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीर्थक्षेत्र विकास आराखडा लालफितीत

0
0

लोगो : महापालिका @3 लेखाजोखा

Maruti.Patil@timesgroup.com

tweet: @MarutipatilMT

कोल्हापूर : बहुचर्चित अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्यातील कामाचा आराखडा सप्टेंबर महिन्यात महापालिकेने राज्य सरकारकडे नगरविकास विभागात सादर केला. दोन महिन्यानंतरही मुख्यमंत्री कार्यालयाकडून आराखड्याला मंजुरी मिळालेली नाही. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अनेकदा योजनेला प्रारंभ करण्याचे जाहीर आश्वास दिले. दोन महिन्यानंतरही त्यांचे आश्वासन हवेतच विरले आहे.

साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या करवीरनिवासिनी अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविक दरवर्षी येतात. मात्र, मंदिर परिसरात भाविकांना पायाभूत सुविधी मिळत नसल्याने भाविकांसह स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी आहे. भाविकांची दिवसेंदिवस वाढ होत असल्याने पायाभूत सुविधांचा बोजवारा उडाला आहे. मंदिराभोवती चांगले रस्ते, पार्किंग, भक्तनिवास, स्वच्छता गृहे अशा सुविधांचा अभाव आहे. भाविकांना सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी अनेक वर्षापासून तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची मागणी होत होती. यासाठी आंदोलनेही झाली. तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारने तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची घोषणा करून अर्थसंकल्पात दहा कोटी रुपयांची तरतूद केली. प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली नाही.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी तरतूद केली. महापालिकेला आराखडा सादर करण्याच्या सूचना केल्या. २५५ कोटी रुपयांच्या आराखड्यापैकी पहिल्या टप्प्यातील प्रस्तावाला मुख्य सचिवांनी जून २०१७ मध्ये मंजुरी दिली. नंतर मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर पुन्हा आराखडा सादर झाला. त्यांनी आराखड्याबाबत काही सूचना केल्या. विकासकामांमध्ये जीएसटीचा समावेश केला गेला. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केलेला पहिल्या टप्प्यातील ८७ कोटी ११ हजारांचा सुधारित आराखडा महापालिकेने दोन महिन्यांपूर्वी सादर केला. पण, मुख्यमंत्री कार्यालयाकडून अद्याप अध्यादेश किंवा मंजुरी मिळालेली नाही.

पहिल्या टप्प्यातील कामांना सुरुवात करण्याबाबत पालकमंत्री पाटील यांनी अनेकवेळा जाहीर कार्यक्रमात कुदळ मारण्याची डेडलाइन जाहीर केली. पण अद्याप काहीच घडलेले नाही. परिणामी विकास आराखडा पूर्णत्वास जाण्याची जिल्हावासियांची प्रतीक्षा संपलेली नाही. मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी प्रथम दर्शन मंडप, स्वच्छतागृहे, मंदिर सोभावतालचे रस्ते आणि पार्किंगची सुविधा देण्यात येणार होती. पण, अद्याप आराखडाच मंजूर नसल्याने भाविकांना उन्हाचे चटके सहन करत अंबाबाईचे दर्शन घ्यावे लागत आहे.

शहरांतर्गत अरुंद रस्ते अन् पार्किंगची सुविधा नसल्याने वारंवार वाहतुकीची कोंडी होते. वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी बिंदू चौक, सरस्वती चित्रपटगृह व व्हिनस कॉर्नर येथे बहुमजली पार्किंगची सोय आराखड्यात आहे. या सर्व सुविधा कागदावर राहिल्याने वाहतूक कोंडीची समस्या कायम राहिली. त्यामुळे मंदिर परिसर आणि वाहतुकीची समस्या निकालात काढण्यासाठी आराखड्यातील कामांना लवकर सुरुवात होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

अंतिम मंजुरीसह अध्यादेश हवा

आघाडी सरकारच्या कालावधीत जिल्हा नियोजन मंडळाने २५० कोटींचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार केला. पण मोठ्या रक्कमेचा प्रकल्प असल्याने याला मूर्त रुप मिळाले नाही. परिणामी विद्यमान सरकारने २५५ कोटींचा आराखडा तयार करताना त्याचे तीन टप्पे केले. आराखड्याचे केशवराव भोसले नाट्यगृहात सादरीकरण झाले. नंतर तांत्रिक समिती व मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या शिखर समितीने मंजुरी देऊन आराखडा बांधकाम विभागास तपासणी करण्यासाठी देण्याची सूचना महापालिकेला केली. बांधकाम विभागाकडून पहिल्या टप्प्यातील आराखडा सादर झाला असून तो राज्य सरकारलाही सादर झाला आहे. राज्य सरकारने अंतिम मंजुरी देऊन अध्यादेश काढल्यानंतरच निधी उपलब्ध होऊन, प्रत्यक्ष काम सुरू होईल.

सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्यातील कामाचा आराखडा सप्टेंबरमध्ये पाठवला आहे. सरकारकडून त्यास लवकरच मंजुरी मिळेल. मंजुरीनंतर पहिल्या टप्प्यातील कामांना सुरुवात होईल.

- नेत्रदीप सरनोबत, शहर अभियंता

आराखड्यातील प्रस्तावीत प्रमुख कामे

३ कोटी ८२ लाख

दर्शन मंडप इमारत

१४ कोटी २५ लाख

बिंदू चौक व सरस्वती चित्रपटगृह पार्किंग

४५ लाख

स्वच्छतागृहे

६ लाख

दिशादर्शक फलक

११ लाख

पिण्याच्या पाण्याची व्यवस्था

२ कोटी ६५ लाख

विद्युत व टेलिफोन लाइन स्थलांतर

१ कोटी ९५ लाख

व्हिनस कॉर्नर येथे भक्त निवास व पार्किंग

८७ कोटी ११ हजार

एकूण आराखडा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live


Latest Images