Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

हद्दवाढीचा निर्णय त्वरीत घ्या

$
0
0
‘शहर हद्दवाढीच्या दृष्टीने मागवलेली सर्वंकष माहिती ३१ जानेवारीपर्यंत सरकारला द्यावी. त्यानंतर सहा महिन्यांत सरकारने हद्दवाढीबाबत निर्णय घ्यावा,’ असे निर्देश बुधवारी हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा व न्यायमूर्ती संकलेचा यांनी दिले.

यशश्री पाचलगला उत्तम विद्यार्थी पुरस्कार

$
0
0
चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांच्या स्मरणार्थ भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्रातर्फे दरवर्षी उत्तम विद्यार्थी पुरस्कार देण्यात येतो. यंदाचा पुरस्कार प्रायव्हेट हायस्कूलमध्ये दहावीत शिकणारी विद्यार्थीनी यशश्री वासुदेव पाचलग हिला जाहीर झाला.

सहकारी संस्थांच्या पदाधिकारी निवडीबाबत संभ्रम

$
0
0
सहकारी प्राधिकरण अस्तित्वात येण्यापूर्वी अध्यक्ष-उपाध्यक्षपदांच्या झालेल्या निवडी रद्द करण्याचे आदेश निवडणूक उपनिबंधकांनी दिले असले तरी या आदेशाची कार्यवाही करण्याचा अधिकार जिल्हा उपनिबंधकांना नाही.

ऑनलाइन मूल्यांकन सुरू

$
0
0
विनाअनुदानित माध्यमिक शाळांचे ऑनलाइन मूल्यांकनाची सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील २० टक्के अनुदानास पात्र घोषित केलेल्या ५८ माध्यमिक शाळा आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळा वगळून अन्य सर्व विनाअनुदानित माध्यमिक शाळांचे ऑनलाइन प्रणालीव्दारे संकेतस्थळावर मूल्यांकनाची प्रक्रिया सुरु झाली आहे.

जगण्याच्या हक्कासाठी १४ डिसेंबरला मोर्चा

$
0
0
कामगारांना रेशन, पेन्शन, सर्वांना समान शिक्षण, घरे, मोफत औषधोपचार यासह इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघाच्यावतीने सर्किट हाऊसवर जगण्याच्या हक्काचा मोर्चा काढण्यात येणार आहे.

नव्या मिळकती शोधणार

$
0
0
शहर तसेच उपनगरांमधील अनेक इमारतींचा कित्येक वर्षे घरफाळा वसूल होत नाही. त्यांची माहितीच महापालिकेकडे नसल्याने त्यांना नोटीसही लागू करता येत नसल्याने आता अशा इमारती शोधण्यासाठी महापालिकेने खासगी यंत्रणा नियुक्त केली आहे.

​हद्दवाढ हवीच

$
0
0
नगरपालिकेची महापालिका झाल्यापासून महानगराच्या उद्देशाप्रमाणे केवळ करांचाच बोजा वाढत आहे. हा बोजा कमी करण्याबरोबर शहराचा विस्तार नियोजनबद्ध विकास साधण्यासाठी आवश्यक असलेल्या हद्दवाढीचा निर्णय घेण्यासाठी मात्र प्रामुख्याने राजकीय नेत्यांची इच्छाच प्रामुख्याने आड येत आहे.

..तर आमचा रस्ता वेगळाः शेट्टी

$
0
0
काँग्रेसची साथ सोडून केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये (एनडीए)मध्ये दाखल झाले, तर आपला रस्ता वेगळा असेल,’ अशी भूमिका खासदार राजू शेट्टी यांनी घेतली आहे

‘एफडीए’ची चार डेअरींवर कारवाई

$
0
0
जिल्ह्यातील दूध भेसळखोरांविरोधात अन्न व औषध विभागाने (एफडीए) धडक मोहिम हाती घेतली आहे. जिल्ह्यातील चार दूध डेअरींवर कारवाई करून त्यांच्याविरोधात कोर्टात सात खटले दाखल करण्यात आले आहेत.

अधिकारी, पदाधिकाऱ्यांची मुलांना प्रेरणा

$
0
0
जिल्हा परिषदेच्या शाळा आरटीआयचे निकष पूर्ण करत असतील तरी देखील त्यांच्यामध्ये सुधारणेला आणखी वाव असल्याची अपेक्षा विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

उसाच्या ट्रकने तरुणाला चिरडले

$
0
0
ऊस वाहतूकीच्या ट्रकखाली चिरडल्याने येथील तरूण जागीच ठार झाला. सांगली-कोल्हापूर महामार्गावर येथील पंचरत्न हॉटेलसमोर दुपारी अडीचच्या सुमारास हा अपघात झाला.

मोटारसायकलच्या धडकेत पादचारी ठार

$
0
0
मुरगूड निपाणी मार्गावरील खडकेवाडा(ता.कागल)येथे भरधाव मोटरसायकलने जोराची धडक दिल्याने पादचारी ठार झाला. तर मोटरसायकलस्वार गंभीर जखमी झाला.

कागलमधील २२ शाळांना नोटीस

$
0
0
येथील तहसीलदार कार्यालयात लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी आयोजित प्रशिक्षणाला अनुपस्थित राहिल्याबद्दल कागल तालुक्यातील २२ शाळांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

‘डॉ. आंबेडकरांची प्रेरणा घ्या’

$
0
0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण व पुस्तकांवर अफाट प्रेम करून विद्या मिळविली. बाबासाहेबांच्या चांगल्या विचारांचे व आचरणाचे अनुकरण करणे गरजेचे आहे.

प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीवर डल्ला

$
0
0
आजरा तालुक्यातील चित्री प्रकल्पासाठी संपादित करण्यात आलेली सावरवाडी (ता. आजरा) येथील सुमारे १५ एकर ज‌मीन महसूल विभागाच्या संगनमताने लाटण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

गडहिंग्लज उपनगराध्यक्षांची आज निवड होणार

$
0
0
गटनेते रामदास कुराडे यांच्या उपनगराध्यक्ष पदाच्या राजीनाम्यानंतर नवीन उपनगराध्यक्ष कोण? या चर्चेला वेग आला आहे. आज (ता. १३) होणाऱ्या या निवडीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

जंगलतोड जैवविविधतेच्या मुळावर

$
0
0
डोंगर-दऱ्यानी नटलेल्या भुदरगड तालुक्यात सध्या मोठ्या प्रमाणात जंगल तोड सुरू आहे. कोळसा तयार करण्यासाठी व जळाऊ लाकूड तयार करण्यासाठी दुर्मिळ वनौषधी तसेच फळझाडांची बेसुमार कत्तल केली जात आहे.

पवनचक्की प्रकल्प हाणून पाडू

$
0
0
भुदरगड तालुक्याला लाभलेले नैसर्गिक सौंदर्य व वनसंपदेचा विविध कारणांनी मोठ्या प्रमाणात ऱ्हास होत आहे. या ऱ्हासाला प्रस्ताविक पवनचक्की प्रकल्प कारणीभूत असून हा प्रकल्प हाणून पाडू.

गृहोपयोगी वस्तूंच्या अामिषाने ८० लाखांचा गंडा

$
0
0
उगार खुर्द (ता.चिकोडी) येथे निम्म्या किंमतीत गृहपयोगी वस्तू देण्याच्या बहाण्याने एका दुकानदाराने ८० लाख रुपयांना गंडा घातला.यामुळे परिसरात खळबळ उडाली असून एस.भालचंद्र हा दुकानदार दुकानाला कुलूप लावून पसार झाला आहे.

केडीसीसीला लाभले अनुभवी सीईओ

$
0
0
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेच्या (केडीसीसी) मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची सुनील कदम यांनी नुकतीच सूत्रे हाती घेतली. कदम यांना सीआरएआर (भांडवल पर्याप्तता) सात टक्के करण्याचे आव्हान आहे.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images