Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

विठ्ठल-बिरदेव यात्रेची उत्साहात सांगता

0
0

म. टा. वृतसेवा, हातकणंगले

महाराष्ट्रासह अनेक राज्यांत प्रसिद्ध असलेल्या पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथील श्री विठ्ठल-बिरदेव यात्रेत भाकणूक करणारे फरांडेबाबा यांना पट्टणकोडोलीवासीयांनी भक्तिमय वातावरणात निरोप दिला. गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या विठ्ठल-बिरदेव यात्रेची सांगता फरांडेबाबांच्या निरोपाने झाली.

श्री विठ्ठल-बिरदेव यात्रा महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, कर्नाटक, गोवा या राज्यांत मोठ्याप्रमाणात प्रसिद्ध असल्याने तेथील भाविक यात्रेसाठी येथे दाखल झालेले होते. परंपरागत रितीरिवाज आणि मुहूर्तानुसार विविध धार्मिक विधी मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडले होते. फरांडेबाबा (नाना देव) यांनी निरोपापूर्वी विठ्ठल-बिरदेवाचे दर्शन घेतले, तर भानस मंदिरात जाऊन देवीची ओटी भरणी करून त्यांच्या मानाच्या दगडी गादीचे दर्शन घेऊन ते बाहेर पडले. यावेळी महिला, आबालवृद्ध व भाविकांनी मोठी गर्दी केली होती. महिलांनी फरांडेबाबांच्या पायावर पाणी घालून त्यांचे दर्शन घेतले, तर पुरुष मंडळींनी त्यांचे चरणस्पर्श करुन दर्शन घेतले.

फरांडेबाबांना निरोप देण्यासाठी हजारो भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. फरांडेबाबांच्या हेडाम खेळण्याचा जागीच नागरिकांनी गर्दी करून त्यांचे दर्शन घेतले व मोठ्या भक्तिमय वातावरणात त्यांना निरोप दिला. फरांडेबाबांच्या परतीबरोबरच त्यांच्यासोबत आलेले भाविक भक्तही परतले.

दरम्यान, यात्रेतील घोंगडी बाजार अजून पंधरा दिवस सुरू राहणार असल्याने नागरिकांना घोंगडी खरेदीचा आनंद घेता येणार आहे. यात्रेसाठी समस्त पुजारी धनगर समाज, ग्रामपंचायत, आरोग्य विभाग, एसटी महामंडळ, महसूल विभाग व पोलिस यंत्रणा आधी सर्व विभागांनी काटेकोरपणे आणि नेटके नियोजन केल्यामुळेच यात्रा सुस्थितीत पार पडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कुसूम आरेकर यांचे निधन

0
0

फोटो..

कुसुम आरेकर

इचलकरंजी : येथील गावभागातील चावरे गल्लीतील श्रीमती कुसुम काशीनाथ आरेकर (वय ८८) यांचे निधन झाले. 'काकू' या नावाने त्या परिचित होत्या. त्यांच्या पश्चात मुले, सुना, नातवंडे, परतवंडे असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपघातातील जखमीचे निधन

0
0

हातकणंगले : पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झालेले राजाराम शिवाजी कोळी (वय ५७, रा. माणगाव) यांचे उपचारादरम्यान निधन झाले. अपघात मंगळवारी पहाटे सहाच्या सुमारास पिराई बिअर शॉपीसमोर घडला होता. माणगाव येथील राजाराम कोळी अभिषेक सूतगिरणीमध्ये नोकरीस होते. ते मंगळवारी पहाटे कामावर जात असताना अज्ञात वाहनाची धडक बसल्याने त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली होती. त्यांना कोल्हापुरात सीपीआर रुग्णालयात केले होते. तथापि, अधिक उपचारसाठी खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आहेत. घटनेची नोंद हुपरी पोलिस ठाण्यात झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गंठण हिसडा मारून लंपास

0
0

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

मोपेडवरून जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील साडेचार तोळ्यांचे सोन्याचे गंठण चोरट्यांनी हिसडा मारून लंपास केले. येथील नांदणी नाक्याजवळ जैन बस्ती रोडवर ही घटना घडली. याबाबत संगीता सुरेश दरभे (वय ४८, रा. दीप पब्लिक स्कूलजवळ, संभाजीपूर) यांनी जयसिंगपूर पोलिसांत फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की , सायंकाळी साडेसातच्या सुमारास दरभे नांदणी नाक्यावरून संभाजीपूर येथे नातेवाइकांसोबत मोपेडवरून जात होत्या. यावेळी पाठीमागून मोटारसायकलवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी दरभे यांच्या गळ्यातील गंठण हिसडा मारून लंपास केले. दरभे यांनी आरडाओरड केली, मात्र चोरटे पसार झाले.

०००००

जुगार अड्ड्यावर छापा,

सातजणांना अटक

जयसिंगपूर : उदगाव (ता. शिरोळ) येथे जुगार अड्ड्यावर छापा टाकून जयसिंगपूर पोलिसांनी सातजणांना अटक केली. या कारवाईत ११ हजार ८५० रुपये, चार मोबाइल संच, एक मोटारसायकल व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. सायंकाळी सव्वासातच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. गुंडा बाळू जमादार, दिगंबर दत्तात्रय सरनाईक, दीपक दत्ता पुजारी, शंकर यल्लाप्पा भंडारी, इमाम गुलाब जमादार, रफीक आप्पालाल मुजावर व अमोल बाबासो सासने (सर्व रा. उदगाव) अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युवक काँग्रेसतर्फे इचलकरंजीत फराळवाटप

0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

ऊसदराच्या आंदोलनामुळे लांबणीवर पडलेल्या साखर कारखान्यांच्या हंगामामुळे जुना चंदूर रोड परिसरात तोडणीसाठी आलेल्या ऊसतोड मजुरांची दिवाळी गोड व्हावी म्हणून इचलकरंजी विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीने फराळ व कपडेवाटप करण्यात आले. काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुरेश सावंत, राम तणगे, मारुती रोटे यांच्या हस्ते फराळाचे साहित्य व महिलांना साडी व पुरुषाना टॉवेल-टोपी देण्यात आली. यावेळी इचलकरंजी विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष पै. अमृत भोसले, नगरसेवक राजू बोंद्रे, भारत बोगार्डे, प्रमोद पवार समीर शिरगावे, अनिस म्हालदार, राहुल शिंदे, नितीन पडियार, स्वप्नील कुळवमोडे, वृषभ हेरलगे, स्वप्नील चौगुले, राजू निपाणे, निखिल जमाले, प्रदीप रोटे, मुकेश भोसले, सुशांत खोत, आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बोगस नळ कनेक्शनधारकांवर कारवाई

0
0

म. टा. वृतसेवा, हातकणंगले

पेठवडगाव शहरातील हजारो बोगस नळ कनेक्शनची जोडणी केलेले कर्मचारी व बोगस नळ कनेक्शन घेतलेल्या नागरिकांवर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय वडगाव पालिकेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. पालिका कर्मचाऱ्यांना अकरा हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा नगराध्यक्ष मोहनलाल माळी यांनी मांडलेला ठराव सभेत सत्ताधारी युवक क्रांती महाआघाडीच्या नगरसेवकांनी एकमताने मंजूर केला. सभेत बारा विषयांना मंजूरी देण्यात आली. उपनगराध्यक्ष अजय थोरात, मुख्याधिकारी अतुल पाटील उपस्थित होते.

नगरसेवक कालिदास धनवडे यांनी शहरात बोगस पाणीनळ कनेक्शन दिली गेली असून त्यामुळे पालिकेचे नुकसान झाले आहे. बोगस कनेक्शन देणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. नगरसेवक संदीप पाटील यांनी बोगस नळकनेक्शनची विचारणा करणाऱ्या नागरिकांना धमकी दिली जात असल्याचे सांगितले. नगरसेवक गाताडे, शरद पाटील यांनी सबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. उपनगराध्यक्ष अजय थोरात यांनी शहरात हजारो कनेक्शन बोगस असावीत. याचा सर्व्हे सुरू आहे. बोगस कनेक्शनवर कारवाई करू असे सांगितले. नगराध्यक्ष मोहनलाल माळी व मुख्याधिकारी अतुल पाटील यांनी तक्रारी आल्यावर संबंधित जोडणी देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर, कनेक्शन देणाऱ्या संबंधित नागरिकांवर कायदेशीर कारवाई करू असे सांगितले.

सभेत गुंठेवारी नियमितीकरणास मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्याधिकारी पाटील यांनी सोयीनुसार गुंठेवारी सुरू करण्यापेक्षा शहरातील अडवणूक केलेले बांधकाम परवानेही मंजूर करावेत अशी मागणी नगरसेवक संतोष गाताडे, गुरुप्रसाद यादव यांनी केली. नगरसेवक संदीप पाटील यांनी किणी टोल नाक्यावर परिसरातील गावांना अंतरानुसार टोल फ्री सुविधा वडगाव व परिसरातील गावांना मिळण्यासाठी पालिका सभेत ठरावाची मागणी केली. याबाबत रस्ते विकास महामंडळाशी पत्रव्यवहार करू असे नगराध्यक्ष माळी यांनी सांगितले.

नगरसेवक संदीप पाटील यांनी रोजंदारी कर्मचाऱ्यांचे पगार दरमहा व्हावेत, शहरातील सिद्धार्थनगर, यादव हॉस्पिटल परिसरात असलेली स्वच्छतागृहे खराब झाली आहेत. ती नव्याने बांधण्याची मागणी केली. पद्मा रोडवरही स्वच्छतागृहांची संख्या वाढविण्याची मागणी पाटील यांनी केली. शहरात सुरू असलेली विकासकामे दर्जेदार होत आहेत का? याकडे बांधकाम विभागाने लक्ष द्यावे अशी मागणी नगरसेवक यादव यांनी केली. नगरसेवक संतोष चव्हाण यांनी पाण्याच्या पाइपलाइनचे काम संथगतीने सुरू असून ही कामे दर्जेदार व गतीने व्हावीत याबाबत मुख्याधिकारी अतुल पाटील यांना सूचना केली.

यावेळी घरकुल आवास योजनेतून नागरिकांची कामे गतिमान करण्याचा निर्णय नगराध्यक्ष माळी यांनी केला. कर्मचाऱ्यांना दिवाळीसाठी अकरा हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला. शिवाजी नगरातील नवीन पार्कला शिवाजी पार्क असे नामकरण करण्याच्या मागणी अर्जाला एकमुखाने मान्यता देण्यात आली. हनुमान मंदिर पाठीमागील ओढा दुरुस्तीची चर्चा करून निर्णय घेण्यात आला. सभेस युवक क्रांती महाआघाडीच्या नेत्या व नगरसेविका प्रविता सालपे, सुनीता पोळ, शबनम मोमीन, मैमुन कवठेकर, अलका गुरव, नम्रता ताईगडे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हा तर दातृत्वाचा अपमान

0
0

'माणुसकीची भिंत' उपक्रमाच्या आयोजकांचा आरोप

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

माणुसकीच्या भावनेने लोकांनी लोकांसाठीच दिलेल्या कपड्यांचा सतत जुनी कपडे दिली असा उल्लेख म्हणजे कोल्हापूरकरांच्या दातृत्वाचा अपमान आहे. खासदार धनंजय महाडिक यांनी एका चांगल्या सामाजिक उपक्रमात राजकारण करू नये', असा इशारा 'माणुसकीची भिंत' या उपक्रमाच्या संयोजकांनी पत्रकार बैठकीत केला.

या उपक्रमाचे संयोजक व मुस्लिम बोर्डिंग चेअरमन गणी आजरेकर म्हणाले, 'गेली तीन वर्षे हा उपक्रम सुरू आहे. त्याला कोल्हापूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पण गेले काही दिवस लोकांना जुनी कपडे दिली असा वारंवार उल्लेख खासदार महाडिक करत आहेत. आम्ही तीन लाख कपडे वाटले, पण तीन लाख लोकांना कपडे वाटले, असा ते चुकीचा उल्लेख करत आहेत. यंदा दोन हजार ३६५ लोकांनी दिलेले दीड लाखांहून अधिक कपडे वाटप केले. तर उर्वरित कपडे विविध साखर कारखाना परिसरातील शेतकरी व ऊसतोड मजूरांना दिले. शिवाय अनेक लोकांनी नवीन कपडे सुद्धा आणून दिले आहेत, लवकरच याचेही वाटप करणार आहे.'

सचिन पाटील म्हणाले, 'हा उपक्रम एक लोकचळवळ बनला आहे. कपडे जुने की नवे यापेक्षा देण्याची भावना महत्वाची आहे. त्यामुळे मी नवे कपडे दिले आणि त्यांनी जुने दिले असा भेदभाव खासदार महाडिक यांनी करू नये. एकीकडे 'माणुसकीची भिंत' चे अनुकरण करून आपण 'आपुलकीची भिंत' सुरू केली असे म्हणायचे आणि दुसरीकडे जुनी कपडे देतात असे कुचेष्टेने म्हणायचे, हे कितपत योग्य आहे?'

यावेळी प्रा. महादेव नरके, प्रसाद पाटील,अमरसिंह पाटील,इम्तियाज मोमीन, प्रवीण पाटील, मयूर पाटील आदी कोअर कमिटी सदस्य उपस्थित होते .

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेस घेणार ‘लोकसभे’चा आढावा

0
0

कोल्हापूरच्या जागेवर हक्क सांगितल्याने बैठकीला महत्व

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लोकसभेच्या पश्चिम महाराष्ट्रातील जागा लढवण्यासाठी काँग्रेसची चाचपणी सुरू झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून १५ नोव्हेंबर रोजी मुंबईत आढावा बैठक घेण्यात येणार आहे. कोल्हापूरच्या जागेवर पक्षाने हक्क सांगितल्याच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला विशेष महत्व आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, सांगली, हातकणंगले या चार जागा काँग्रेसने लढवल्या. उर्वरित कोल्हापूर, सातारा, माढा, बारामती या जागा लढवून त्या राष्ट्रवादीने जिंकल्या. यातील कोल्हापूरच्या जागेवर काँग्रेसने हक्क सांगितला आहे. मागील वेळी हातकणंगलेची जागा या पक्षाला राष्ट्रवादीने दिली होती. त्यावर आता पुन्हा राष्ट्रवादीने दावा केला असला तरी हा मतदारसंघ स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्याच्या हालचाली सुरू आहेत. दोन्ही काँग्रेसची आघाडी होणार असून त्यामध्ये ही संघटना सहभागी होणार आहे. यामुळे राज्यातील एक जागा खासदार राजू शेट्टी यांना देण्याचे ठरले आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पुढील आठवड्यात काँग्रेसची मुंबईत बैठक होणार आहे. त्यामध्ये १५ नोव्हेंबरला पश्चिम महाराष्ट्रातील सर्व मतदारसंघांचा आढावा घेण्यात येणार आहे. सांगलीतून माजी केंद्रिय मंत्री प्रतिक पाटील, सोलापूरमधून माजी गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांची उमेदवारी जवळजवळ निश्चित आहे. पुणे मतदारसंघाबाबत वाद असल्याने या जागेबाबत उत्सुकता वाढली आहे.

............

असा घेतला जाईल आढावा...

१५ नोव्हेंबर २०१८

मराठवाडा विभाग - सकाळी १०.३० ते दुपारी १.३० वा.

पश्चिम महाराष्ट्र - दुपारी २.०० ते सायंकाळी ५.३० वा.

...

१६ नोव्हेंबर २०१८

विदर्भ विभाग - सकाळी १०.३० ते दुपारी १.३० वा.

उत्तर महाराष्ट्र विभाग - दुपारी २.०० ते सायंकाळी ५.०० वा.

.....

१७ नोव्हेंबर २०१८

कोकण विभाग - सकाळी १०.३० ते दुपारी १.०० वा.

...........

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बच्चेकंपनी रमली किल्ल्यांच्या दुनियेत

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

नव्या कपड्यांची नवलाई, फटाक्यांची आतषबाजी आणि फराळांचा आस्वाद लुटताना बच्चेकंपनी आता किल्ल्यांच्या दुनियेत रमली आहे. शाळकरी मुलांनी एकत्र येऊन विविध किल्ल्यांच्या प्रतिकृती बनविल्या आहेत. किल्ल्यांच्या माध्यमातून निर्मितीच्या निमित्ताने मुलांच्या कल्पनाशक्तीला बहर आला आहे.

बाजारपेठेत लहान मोठ्या आकारात किल्ल्यांच्या प्रतिकृती उपलब्ध आहेत. त्या १०० रुपयांपासून उपलब्ध आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांच्या लहान आकारातील शिल्पकृती, सरदार, मावळे, शस्त्रास्त्रे, तोफेच्या प्रतिकृतीने किल्ल्यांचे रुप खुलले आहे. शनिवारी परीक्षा संपल्या आणि शाळांना सुट्ट्या जाहीर झाल्या. गेल्या तीन-चार दिवसांत मुलांची लगबग पाहावयास मिळत आहे. कॉलन्या, अपार्टमेंटमधील मुले एकवटली. विटा, माती, दगडांची जमवाजमव केली. अनेक ठिकाणी दहा बाय दहा फूट आकारातील तर अनेक ठिकाणी त्यापेक्षा जास्त आकरातील किल्ले मुलांनी तयार केले आहेत.

किल्ल्यांची सजावट करण्यासाठी बाजारपेठेतील वेगवेगळ्या कलाकृती आणल्या. शिवाय पाठ्यपुस्तकातील माहिती, चित्रांचा संदर्भ घेतल्याचे मुले सांगतात. पन्हाळगड, रायगड, राजगड, सिंहगड, विशाळगडाच्या प्रतिकृती शहरभर अवतरल्या आहेत. कोल्हापुरात विविध संस्था, संघटनेतर्फे दिवाळी सणाच्या कालावधीत किल्ले स्पर्धा होतात. त्यामध्ये मुलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला आहे. शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, बुधवार पेठ, शुक्रवार पेठ, उत्तरेश्वर, राजारामपुरी, शाहूपुरी, लक्ष्मीपुरी, कसबा बावडा आदी ठिकाणी लगबग पाहावयास मिळत आहे. मुलांनी गडकिल्ल्यांचा ऐतिहासिक बाज जपताना आपआपल्या कल्पनाशक्तीप्रमाणे त्याला आधुनिकतेचे रुप दिले. प्रवेशव्दार, राजमहाल, तोफांची वेगळया पध्दतीने बांधणी केली.

सरनाईक कॉलनीत पन्हाळगड

शिवाजी पेठेतील सरनाईक कॉलनी, राज अपार्टमेंटमधील स्वराज ग्रुपने पन्हाळगडाची प्रतिकृती साकारली आहे. सज्जा कोठी, तीन दरवाजा, सोमेश्वर तलाव, अंबारखाना तयार केला आहे. याविषयी सांगताना विद्यार्थी प्रथमेश गुळवणी, आदित्य जाधव म्हणाले, 'किल्ल्याची हुबेहूब प्रतिकृती तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. नकाशा समोर ठेवून शिवकाळातील किल्ल्यांना मूर्त रुप देण्यासाठी सगळी मुले प्रयत्नशील राहिली. किल्ले बांधणीसाठी अपार्टमेंटमधील सगळी मुले एकवटली.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आजपासून किरणोत्सव प्रारंभ

0
0

फोटो

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

यंदाच्या वर्षातील दुसऱ्या पर्वातील किरणोत्सव सोहळ्यास गुरूवारी (ता. ८) प्रारंभ होणार आहे. मंगळवारी किरणोत्सव मार्गातील सात इमारतींवरील अडथळ्यांचा भाग महापालिकेच्यावतीने काढण्यात आला होता. बुधवारी महाद्वार चौकातील एका कपड्याच्या दुकानावरील पत्रा, प्रमोद देशिंगे यांच्या इमारतीवरील भिंत काढण्यात आली. मात्र किरणोत्सव मार्ग पूर्ण अडथळामुक्त होण्यासाठी किरणोत्सव समितीतील तज्ज्ञ अभ्यासकांनी सुचवलेल्या डीपी नकाशा देण्याबाबत महापालिका प्रशासन अद्याप उदासीन आहे.

अंबाबाई मंदिरात वर्षातून दोन वेळा किरणोत्सव सोहळा होतो. जानेवारी महिन्यातील ३१ व फेब्रुवारी महिन्यातील १ व २ या दिवशी तर ९ ते ११ नोव्हेंबर या कालावधीत हा सोहळा नैसर्गिकरित्या साजरा होतो. यामध्ये सूर्यास्ताची किरणे थेट देवीच्या गाभाऱ्यात येतात. पहिल्या दिवशी देवीच्या चरणांवर, दुसऱ्या दिवशी पोटावर तर तिसऱ्या दिवशी देवीच्या मुखावर पडतात. हा सोहळा पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. गेल्या काही वर्षात महाद्वारपासून रंकाळा टॉवर या किरणोत्सव मार्गातील इमारतींवर वाढीव बांधकाम झाल्यामुळे किरणोत्सव होण्यामध्ये अडथळा निर्माण होत आहे. या अडथळ्यांची पाहणी करण्यासाठी देवस्थान समितीने किरणोत्सव अभ्यास समिती नेमली आहे. या समितीमध्ये तज्ज्ञांचा समावेश आहे. गेल्या वर्षभरात समितीने अडथळ्यांची पाहणी करून त्याचा अहवाल महापालिका व देवस्थान समितीला दिला आहे.

दरम्यान, तीन दिवसांऐवजी पाच दिवस किरणोत्सव होऊ शकतो असा निष्कर्ष अभ्यासकांनी मांडला आहे. यानुसार ८ नोव्हेंबर ते १२ नोव्हेंबर या कालावधीत किरणोत्सवाची पाहणी करण्यात येणार आहे.

.........

भरीव बांधकामे पाडली

किरणोत्सव मार्गात मिणचेकर, जोशी, देशिंगे यांच्या घरावरील भरीव बांधकाम महापालिकेने बुधवारी पाडले. मिणचेकर यांचे किरणोत्सव मार्गात घर आहे. या घरावरील टेरेसवर जाणाऱ्या जिन्यावर येणाऱ्या टोपीचा पक्के बांधकाम असलेला भाग किरणोत्सव मार्गात अडथळा होत होता. याबाबत समितीने अहवालात नोंद केली होती. यानुसार महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी बुधवारी ही कारवाई केली. यावेळी मिणचेकर कुटुंबीय उपस्थित होते. तसेच देशिंगे यांच्या इमारतीचा भागही किरणोत्सव मार्गात अडथळा ठरत होता. जोशी यांच्या घरावरील वाढीव पक्के बांधकामही अडथळा हटाओ मोहिमेंतर्गत हटवण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रविवारीपर्यंत अल्टिमेटम

0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली

'ऊसदराच्या प्रश्नावर कारखानदार दाद देत नाहीत आणि सरकार जबाबदारी पार पाडत नाही. शेतकऱ्यांचा संयम सुटत चालला आहे. त्यामुळे ११ नोव्हेंबरला ऊसपट्ट्यात एक दिवस कडकडीत गाव बंद आणि चक्काजाम करून सरकारला इशारा देऊ. संयम संपण्यापूर्वी योग्य निर्णय न घेतल्यास २०१३ सारखाच उद्रेक होईल. त्याची जबाबदारी सरकारची राहील,' असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिला.

ते म्हणाले, 'शेतकऱ्यांसाठी तिजोरी खाली करण्याची घोषणा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे घोडे कुठे अडले आहे, हेच समजत नाही. मुख्यमंत्र्यांनी एका ऊस परिषदेत एफआरपी अधिक दोनशे रुपये तर द्याच, त्यापेक्षा अधिक काय देता येत असेल प्रयत्न करू, असे सांगितले होते. आम्हीही त्यांच्याच मागणीचे समर्थन करीत आहोत. मुख्यमंत्री बोलतात म्हणजे ते सरकारचे धोरण असते, असे असताना महसूलमंत्री चंद्रकांत पाटील मात्र एफआरपी द्या आणि गाळपाला सुरुवात करा. अडवणूक होत असेल तर बंदोबस्त घेण्याच्या सूचना कारखानदारांना करीत आहेत. एकाच सरकारमधील जबाबदार मंत्र्यांचे असे वेगळे सूर असतील तर त्यांनी मुख्यमंत्र्यांना उसातले काही कळत नाही किंवा ते त्यांचे वैयक्तिक मत आहे, असे जाहीर करायला पाहिजे. एफआरपी अधिक दोनशे रुपये ही गेल्या वर्षीची तडजोड आहे. ती दिलीच पाहिजे, त्यापेक्षा किती जास्त देणार, हा संघटनेचा सवाल आहे. काही कारखान्यांनी अद्याप मागील वर्षाची एफआरपीही दिलेली नाही, काहींनी अधिकच्या दोनशेपैकी शंभर दिले, असे असताना संबंधित कारखान्यांनी बेमालूमपणे जबरदस्तीने ऊसतोड घालून गाळप सुरू केले आहे.'

कोर्टात धाव घेण्याचा इशारा

ऊसदर नियमन अधिनियमनानुसार गाळपानंतर १४ दिवसांच्या आत एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणे बंधनकारक आहे. हा नियम धाब्यावर बसवून गाळप करणाऱ्यांना पोलिस संरक्षण देणे म्हणजे बेकायदा कृत्याची पाठराखणच आहे. या प्रश्नावर आम्ही कोर्टात गेलो आहोत. या घडीला काही कारखाने दबाब आणून गाळप करीत आहेत. त्यांनीही १४ दिवसांच्या आत एफआरपीची रक्कम वर्ग केली नसेल तर त्यांच्यावरही कारवाई करावी, यासाठी कोर्टात धाव घेणार आहोत, असा इशाराही शेट्टींनी दिला.

चंद्रकांत पाटलांची मध्यस्थी नको

मागील हंगामातील शेतकऱ्यांची थकबाकी ठेवणाऱ्या कारखान्यांमध्ये भाजपवाल्यांचेच कारखाने अधिक आहेत. त्या वेळी एफआरपी अधिक दोनशे रुपयांची मध्यस्थी करून श्रेयाचे धनी होणारे मंत्री चंद्रकांत पाटील आता कुठे आहेत?, असा सवाल करुन शेट्टी म्हणाले, 'थकबाकी मिळवून देण्याची जबाबदारी त्यांची होती. पण, ती त्यांनी पूर्ण केली नाही. त्यामुळे आता सरकारला चर्चा करायची असल्यास चंद्रकांत पाटील यांची मध्यस्थी नको आहे. त्यांच्याशी चर्चा करायची नाही. मुख्यमंत्र्यांनी दुसरा माणूस नियुक्त करावा.

सदाभाऊ किरकोळ

रक्तपात दिसल्याशिवाय या सरकारचा आत्मा थंड होत नाही. सरकारमध्येही अशीच मंडळी आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील कारखाने बंद आहेत. सांगली जिल्ह्याकडे जरा लक्ष देण्याची गरज आहे. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत किरकोळ आहेत, ते आमचे प्रतिस्पर्धी नाहीत, असा टोलाही शेट्टी यांनी लगावला.

-दिल्ली दरबारी जायची हिम्मत नाही...४

.. .. ..

.. .. ..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जवाहर’ने जपली सामजिक बांधिलकी

0
0

म. टा. वृतसेवा, हातकणंगले

गळीत हंगाम सुरू झाला की, ऊसतोडणीच्या निमित्ताने घरदार, गावे सोडून आलेल्या मजुरांच्या कुटुंबीयांना दिवाळीसारख्या सणाच्या आनंदापासून मुकावे लागते. त्यातच शेतकरी संघटनेच्या ऊसदरासाठी सुरू असलेल्या आंदोलनाने मजुरांचे हाल होत आहे. ही गंभीर परिस्थिती ओळखून हुपरी (ता. हातकणंगले) येथील जवाहर शेतकरी साखर कारखान्यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जोपासत कारखाना कार्यक्षेत्रातील तब्बल २०० गावांतील ३५०० ऊसतोड मजुरांच्या कुटुंबीयांना फराळाचे वाटप करण्यात आले.

इचलकरंजीतील पाटील मळ्यात कारखान्याचे माजी अध्यक्ष उत्तम आवाडे यांच्या व हुपरी येथे कारखाना कार्यस्थळावर मुख्य शेती अधिकारी किरण कांबळे, नगरसेवक सूरज बेडगे, अमेय जाधव, नगरसेविका शीतल कांबळे यांच्या हस्ते ऊसतोडणी मजुरांना फराळ वाटप केले तसेच प्रत्येक सर्कलमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला.

जवाहर कारखानाचा प्रत्येक ऊसतोड मजूर, वाहतूक कामगार म्हणजे कुटुंबातील सदस्य असल्याचे मानले जाते. दरवर्षी ऊसतोडणीच्या निमित्ताने येणाऱ्या मजुरांना कुटुंबासमेवत दिवाळी साजरा करण्याचा आनंद घेता येत नाही. हे ओळखून त्यांची दिवाळी गोड करण्यासाठी जवाहरच्या वतीने दरवर्षी फराळ वाटप केले जाते, परंतु यावर्षी ऊसदरासाठी शेतकरी संघटनेची आंदोलने सुरू असल्याने ऊसदराचा तिढा सुटल्याशिवाय कारखाने सुरू न करण्याचा निर्णय कारखानदारांनी घेतला आहे. त्यामुळे ऊसतोडणी मजुरांच्या कुटुंबीयांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

'जवाहरने'च्या या उपक्रमाबद्दल ऊसतोड मजुरांनी कारखान्याचे ऋण व्यक्त केले. कारखाना कार्यक्षेत्रातील जवळपास २०० गावांतील ३५०० कुटुंबीयांना हे साहित्य देण्यात आले. कारखाना प्रशासनाने माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, अध्यक्ष प्रकाश आवाडे, जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा महत्त्वपूर्ण उपक्रम राबविला.

०००

फोटो ओळी

हुपरी (ता. हातकणंगले) येथील जवाहर साखर कारखाना कार्यस्थळांवर ऊसतोड मजुरांना फराळवाटप करताना मुख्य शेती अधिकारी किरण कांबळे, नगरसेवक सूरज बेडगे, अमेय जाधव, शीतल कांबळे, आदी.

०००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सडोली खालसात महिला योग शिबिर उत्साहात

0
0

फोटो...

म. टा. वृत्तसेवा, कुडित्रे

सिद्धगिरी मठ कणेरी आणि सडोली खालसा (ता. करवीर) येथील संत गोरा कुंभार तरुण मंडळ यांच्या वतीने सलग पाचव्या वर्षी महिलांना दैनंदिन कामकाजापासून आपल्या आरोग्याकडे लक्ष देता यावे यासाठी योगासन शिबिराचे आयोजन केले होते. केंद्र शाळा सडोली खालसाच्या पटांगणावर झालेल्या शिबिरात सुमारे २५० ते ३०० महिलांनी सहभाग घेतला. शिबिराचे संपूर्ण संयोजन अध्यापक एकनाथ कुंभार यांनी केले.

शिबिरात प्राणायाम, योगासने, आहार व स्वास्थ्य या विषयावर कणेरी मठाचे योगसाधक दत्तात्रय पाटील यांनी मार्गदर्शन केले. शिबिराच्या ११ दिवसांच्या काळात रोज पूरक आहार म्हणून गावातील दानशूर लोकांच्या कडून फळांचे वाटप झाले. योगासनासोबतच कणेरी मठाचे प. पू. मुप्पीन स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली पाद्यपूजन सोहळा, श्रमदान व आरोग्य शिबिरचे आयोजन करण्यात आले. एकूण ३७० जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

शिबिरात उपस्थित महिलांमधून 'तंबाखूमुक्त कुटुंबाचा' लकी ड्रॉ काढण्यात आला. त्यातील पहिल्या तीन कुटुंबांना सावित्री ज्वेलर्सचे सचिन कुंभार (हसूर दुमाला) यांच्यामार्फत अनुक्रमे चांदीचा मेखला, पैंजण व जोडवी अशी बक्षिसे देण्यात आली.

शिबिराच्या यशस्वितेसाठी डॉ. बी. एच. पाटील, अरुण आवळे, राजश्री निचिते, शैलजा कुरणे, लता पाटील, सुजाता चव्हाण, अमृता पाटील, धनश्री पोतदार, सरिता साळोखे, सविता कुंभार, धनाजी कुंभार आदींचे सहकार्य लाभले. सुरेश कुंभार यांनी सूत्रसंचालन केले. रतन कुंभार यांनी आभार मानले.

००००

फोटो :

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इचलकरंजीत लक्ष्मीपूजन उत्साहात

0
0

फोटो...

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघालेल्या वस्त्रनगरी इचलकरंजीत धन-संपन्नतेची देवता असलेल्या लक्ष्मीचे विधिवत पूजन करण्यात आले. व्यापारी बंधूंसह घरोघरी लक्ष्मी-पूजनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. लक्ष्मीचा धनवर्षाव सदैव राहावा, अशी मनोभावे प्रार्थनाही करण्यात आली. सुप्रीम कोर्टाचा आदेश धाब्यावर बसवत फटाक्यांची यावेळी प्रचंड आतषबाजी करण्यात आली.

दरम्यान, गुरुवारी (ता.९) पाडव्याच्या मुहूर्तावर होणारी खरेदी लक्षात घेऊन व्यापारी पेठा पुन्हा एकदा ग्राहकांच्या सेवेसाठी सज्ज झाल्या आहेत. दिवाळीतील सर्वांत मोठा धार्मिक विधी म्हणून लक्ष्मी पूजनाकडे पाहिले जाते. त्याची तयारी दोन दिवसांपासूनच सुरू होती. पूजेसाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी बाजारात मोठी गर्दी झाली होती. केळीचे खांब, ऊस, पाने-फुले, श्रीफळ, प्रसादाचे साहित्य याची मोठ्या प्रमाणात खरेदी झाली. सायंकाळी मावळत्या सूर्याला साक्षी ठेवत पारंपरिक पद्धतीने लक्ष्मीपूजन करण्यात आले. लक्ष्मी देवतेचा वास कायम राहावा, तिचा आशीर्वाद लाभावा यासाठी लक्ष्मीपूजन केले गेले. लक्ष्मीपूजनानंतर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. अनेक कुटुंबांनी पर्यावरणाचे भान ठेवत मोठ्या आवाजाचे फटाके वाजविण्याचे टाळले. मात्र, कोर्टाच्या आदेशानंतर खुलेआम मिळणाऱ्या सुतळी बॉम्बसह कानठळ्या बसणारे फटाकेही फोडण्यात आले. झेंडूच्या फुलांची आवक कमी झाल्याने व्यापाऱ्यांनी याचा फायदा उठवला. सकाळी ५० ते ६० रुपये दराने विकला जाणारा झेंडूचा दर दुपारनंतर ८० ते ९० रुपयांवर येऊन पोहोचला. ऊस, केळीचे खुंट यांनाही चांगला भाव मिळाला.

दरम्यान, उद्या पाडवा आहे. पाडव्याच्या साडेतीन मुहूर्तावर खरेदी करण्याकडे ग्राहकांचा अधिक कल असतो. गृहोपयोगी वस्तू, इलेक्ट्रॉनिक साहित्य, सदनिका, वाहन, दागिने अशा प्रकारच्या खरेदीला महत्त्व दिले जाते. ग्राहकांनी आपल्याकडूनच खरेदी करावी यासाठी विक्रेत्यांनी सवलतीही जाहीर केल्या आहेत. गर्दी आपल्याकडे खेचण्यासाठी दुकानात आकर्षक सजावट करून ग्राहकांच्या प्रतीक्षेत बाजारपेठ सज्ज झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिवाळी गिफ्ट देण्याची धांदल

0
0

ड्रायफ्रूट्स, परफ्युम्स, वॉलेटला पसंती

म.टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दिवाळीचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी गिफ्ट म्हणून ग्रिटिंग, ड्रायफ्रूट्स, परफ्युम्स, वॉलेट, घड्याळ, डायरी, पेनड्राइव्ह देण्याची धांदल सुरू आहे. मित्रमंडळी, जवळच्या नातेवाईकांना थेट भेटून किंवा कुरिअरने, पोष्टाने गिफ्ट पाठवून दिले जात आहे. त्याशिवाय विविध संस्थांनी आपल्या कर्मचाऱ्यांनाही गिफ्टचे वाटप केले .

वर्षातला महत्वाचा सण दिवाळी असल्याने सर्वांच्या घरी आनंदी, उत्साही वातावरण असते. एकमेकांना आनंदाची देवाण-घेवाण केली जाते. यानिमित्ताने नाते घट्ट करण्यासाठी विविध वस्तू, ड्रायफ्रूट्स, मिठाई दिली जाते. चीनी भांडी, कपबशी, जार, थर्मास, कि चेन, पितळी वॉटर बॉटल, महागडी घड्याळ, हस्तनिर्मित वस्तू, वॉलेट, क्रॉकरी, बॅग्ज भेट म्हणून दिली जात आहे. आकर्षक पद्धतीने पॅकिंग करून देण्याकडे सध्याचा कल आहे. किमान १०० ते ७०० रुपये असा विविध वस्तूंचा दर आहे. भेटवस्तूंसोबत शुभेच्छा संदेश असलेले ग्रीटिंगही दिले जात आहे.

बदाम, पिस्ता, मनुके, अंजीर, काजू अशा ड्रायफ्रूट्सह पॅकिंग बॉक्सला मोठी मागणी आहे. आकार आणि वजनानुसार कमीत कमी २०० ते ७ हजारांपर्यंत दर आहेत. लहान मुले असलेल्या घरांत चॉकलेटस बॉक्स घेतला जात आहे. शाहूपुरी, राजारामपुरी, लक्ष्मीपुरी, महाद्वार रोड, गांधीनगर येथील मिठाई शॉपीमध्ये खरेदी केली जाते. गेल्या काही वर्षांत अशा प्रकारच्या गिफ्ट्स देण्याचा ट्रेंड आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी गिफ्ट विक्रीच्या दुकानासमोर वेगवेगळ्या ऑफर्सचे फलक लागले आहेत. लकी ड्रॉ आणि विशिष्ट रकमेवर खरेदी केल्यास गिफ्ट दिली जात आहे.

..........

ई- शुभेच्छाच्या युगातही

ई मेल, व्हॉट्सअॅप, एसएमएस अशा माध्यमांतून शुभेच्छा देणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र अनेकजण पारंपरिक पध्दतीने गिफ्ट देऊन, फोनवरून शुभेच्छा देत आहेत. कार्पोरेट कंपन्याही ग्राहकांना खूश करण्यासाठी आणि नवे ग्राहक निर्माण करण्यासाठी महागड्या भेटवस्तू देत आहेत. त्यात कार अॅक्सेसेरिज, मोबाइल, इलेक्ट्रॉनिक वस्तू दिली जात आहे.

...........

कोट

'दिवाळीत मित्रमैत्रिणी, जवळच्या नातेवाईकांना भेटवस्तू देण्यासाठी बाजारपेठेत गर्दी आहे. प्रत्येकाच्या पसंतीनुसार गिफ्ट खरेदी केली जात आहे. दैनंदिन वापरात येणाऱ्या वस्तू देण्याकडे कल जास्त आहे. क्रॉकरी वस्तूंना मागणी चांगली आहे.

- अतुल पाटणे, व्यापारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बिलात २५ कोटींची थकबाकी

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे प्रत्येक बिलात सुमारे २५ कोटींची थकबाकी राहते. दोन टप्प्यांतील (चार महिने) बिले थकीत गेल्यानंतर पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय स्थायी समितीमध्ये घेतला; पण असे थकबाकीदार शोधण्यासाठी सॉप्टवेअरमध्ये बदल करावा लागणार आहे. यासाठी किमान दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याने पाणीपुरवठा विभागाकडील थकबाकी सॉप्टवेअरमधील बदल होईपर्यंत कायम राहणार आहे.

शिंगणापूर आणि बालिंगा पंपिंग स्टेशनमधून दैनंदिन १४० एमएलडी पाण्याचा उपसा करून शहराची तहान भागवली जाते. सुमारे एक लाख दहा हजार ग्राहक असून, त्यांच्याकडून दर दोन महिन्याला पाणीपट्टी वसूल केली जाते. उपसा केलेल्या पाण्यापैकी १२० एमएलडी पाण्याचे सुमारे ३१ कोटी रुपये बिलिंग होते. त्यापैकी केवळ सहा कोटी रुपयांची वसुली होत असून प्रत्येक बिलात २५ कोटींची थकबाकी राहते. प्रत्येक बिलात शिल्लक राहत असलेल्या थकबाकीतून बिल अदा करण्यातील शहरवासीयांची अनियमितता दिसून येते.

घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वापरातील बिलांची अशी स्थिती असताना सरकारी कार्यालये, ग्रामपंचायत व बड्या थकबाकीदारांकडे पाणीपुरवठा विभागाची २५ कोटी ७६ लाखांची थकबाकी आहे. यामध्ये सरकारी कार्यालये व १२ ग्रामपंचायतींकडे निम्म्यापेक्षा जास्त थकबाकी आहे. थकीत रक्कम वसुलीसाठी प्रशासनाने जाहिरात प्रसिद्ध केली. पण २५ कोटी थकबाकीपैकी आतापर्यंत केवळ १६ लाखांची थकबाकी जमा झाली आहे. परिणामी प्रशासनाने मालमत्तेवर बोजा चढविण्याचा निर्णय घेतला. वर्षानुवर्षांची थकबाकी असल्याने दोन टप्प्यातील बिले थकीत गेल्यानंतर पुरवठा बंद करण्याचा ठराव स्थायी समितीमध्ये केला. मात्र, दोन बिले थकीत शोधण्याची कोणतीच यंत्रणा पाणीपुरवठा विभागाकडे नसल्याने यासाठी स्वतंत्र सॉप्टवेअर तयार करावे लागणार आहे. महापालिकेच्या सॉप्टवेअर विभागाला असे तंत्र विकसित करण्यास आणि त्यांची अंमलबजावणी करण्यास किमान दोन ते तीन महिन्यांचा अवधी लागणार आहे. त्यामुळे किमान नवे सॉप्टवेअर विकसित होईपर्यंत पाणीपुरवठा विभागातील थकबाकी कायम राहणार आहेत.

अपुऱ्या कर्मचाऱ्यांची समस्या

महापालिकेच्या अनेक विभागांत मोठ्याप्रमाणात रिक्त पदे आहेत. त्यामध्ये पाणीपुरवठा विभागाचाही समावेश आहे. एका अधिकाऱ्याकडे तीन ते चार टेबलचा कार्यभार असताना विभागाकडे पुरेसे मीटर रीडर नाहीत. परिणामी अनेक मजूर पदावरील कर्मचाऱ्यांकडे मीटर रीडरचा पदभार दिला आहेत. तसेच अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे अनेकांना पदोन्नती मिळालेली नाही. त्याचाही परिणाम थकबाकीमध्ये वाढ होण्यास कारणीभूत ठरत आहे.

०००

चौकट....

१,१०,१११

एकूण ग्राहक संख्या

९७,१३८

घरगुती वापर

१,६७०

व्यवसायिक वापर

१,३६५

औद्योगिक

सुमारे सहा कोटी

प्रत्येक बिलापोटी वसूल रक्कम

००००

चौकट....

दृष्टिक्षेपात पाणीपुरवठा

५.६० लाख

शहराची एकूण लोकसंख्या

१२० एमएलडी

दैनंदिन लागणारे पाणी

१४० एमएलडी

दैनंदिन उपसा

५० एमएलडी

पाणी गळती

००००००

प्रत्येक बिलाची थकबाकी २४ ते २५ कोटींपर्यंत असते. वाढती थकबाकी प्रशासनाची डोकेदुखी बनत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी दोन बिले थकीत गेल्यानंतर पाणीपुरवठा बंद करण्याचा स्थायीमध्ये ठराव झाला; पण अशी थकीत बिले शोधण्यासाठी सॉप्टवेअरमध्ये बदल करावा लागणार आहे.

प्रशांत पंडत, अधीक्षक

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मध्यवर्तीचा ‘लोकनृत्य’ चषक आजरा महाविद्यालयाकडे

0
0

म. टा. वृत्तसेवा, आजरा

शिवाजी विद्यापीठाच्या ३८ व्या मध्यवर्ती युवा महोत्सवातील लोकनृत्य या प्रतिष्ठेच्या आणि जबरदस्त चुरशीने झालेल्या कला स्पर्धा प्रकारामध्ये आजरा महाविद्यालयाच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला आणि सलग दुसऱ्या वर्षी सरदार माने चषक राखला. याशिवाय पाश्चिमात्य समूह गीत, नकला, मातीकाम स्पर्धेमध्येही आजरा महाविद्यालयास पारितोषिके प्राप्त झाली.

सांगलीत विलिंग्डन महाविद्यालयात ३१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबरदरम्यान विद्यापीठाचा हा मध्यवर्ती युवा महोत्सव पार पडला. यावेळी आजरा महाविद्यालयाने त्रिपुरा राज्यातील 'होजागिरी' हे लोकनृत्य सादर केले. नऊ लोकनृत्यांमध्ये आजरा महाविद्यालयाच्या या नृत्यास यशस्वीतेची पोच या चषकाने मिळाली. सह्याद्री वाहिनीवर होणाऱ्या लोकनृत्य स्पर्धेसाठी या नृत्याची निवड झाली असल्याचे तेथील अधिकारी सोनवणे यांनी निकालावेळी जाहीर केले. सांगलीचे पालकमंत्री सुभाष देशमुख, खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, 'विद्यार्थी कल्याण'चे डॉ. आर. बी. गुरव, प्राचार्य डॉ. ताम्हणकर आदींच्या हस्ते विद्यापीठाचा लोकनृत्य चषक प्रदान करण्यात आला.

याशिवाय नकलामध्ये पहिला, वेस्टर्न ग्रुप सॉंग मध्ये दुसरा आणि मातीकाम कला प्रकारात तिसरा क्रमांक पटकावून या महाविद्यालयाने आणखी यश मिळविले. लोकनृत्यामध्ये मीनाक्षी दोडमणी, धनश्री सुतार, शुभांगी दोरुगडे, प्रियांका वाजंत्री, प्रियांका गुरव, वर्षा कांबळे, विद्या मोरबाळे, उषा पाटील, पास्किन फर्नांडिस, अलिना फर्नांडिस यांचा सहभाग होता. तर नकला मयुरी वझरेकरने सादर केल्या. वेस्टर्न सॉंग मयुरी वझरेकर, अलिना फर्नांडिस, पास्किन फर्नांडिस, प्रियांका निठुरकर, ऋतुजा शिंदे आणि कोमल कळेकर यांनी व मातीकाम दिनेश सुतारने सादर केले. डॉ. आनंद बल्लाळ, अमित घरत (मुंबई), अनिकेत पोवार यांचे मार्गदर्शन तर जनता एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक चराटी, प्राचार्य डॉ. एम. एल. होनगेकर यांचे प्रोत्साहन लाभले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निधनवृत्त...

0
0

कांचनमाला शेळके

कोल्हापूर : शिवाजी पेठ, वेताळमाळ तालीम परिसरातील कांचनमाला पांडुरग शेळके (वय ६८) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, दोन सुना, नातंवडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता.८) सकाळी नऊ वाजता पंचगंगा स्मशानभूमी येथे आहे.

०००

विनायक शिंदे

कोल्हापूर : लक्षतीर्थ वसाहत येथील विनायक दत्तात्रय शिंदे (वय ६३) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, जावई, पाच भाऊ, बहीण असा परिवार आहे.

०००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरोग्य विभागाचे सौंदर्य खुलले

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषदेत विविध कामानिमित्त दररोज हजारो लोकांची ये-जा सुरू असते. काहींना योजनांची माहिती हवी असते तर कोण कामाच्या पूर्ततेसाठी हेलपाटा मारत असतो. राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांची अंमलबजावणी जबाबदारी जिल्हा परिषदेवर असते. आरोग्य विभागाने विविध योजनांचे सचित्र दर्शन घडविले आहे. या फलकामुळे कार्यालय परिसराला वेगळा लूक प्राप्त झाला आहे.

विविध योजनांचे सचित्र फलक, योजनेची वैशिष्ट्ये, निकष यासंबंधीची माहिती मांडली आहे. आरोग्य योजनेचा प्रसार करण्याच्या उद्देशाने केलेल्या सचित्र मांडणीमुळे कार्यालय परिसराचे सौंदर्य खुलले आहे. उच्च रक्तदाबाचे नियंत्रण व प्रतिबंधात्मक उपाय, फिरती रुग्ण्वाहिका सेवा, किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम, जननी सुरक्षा योजना, मातृवंदना, शेतकरी प्रशिक्षण योजनांची माहिती ठळक स्वरुपात दिली आहे. पशुसंवर्धन विभागाच्या वेगवेगळ्या योजना आहेत. पशुसंवर्धनातून ग्रामसमृध्दी योजना, शेळी मेंढी जंतनाशक पुरवठा यासंबंधीच्या माहितीचा समावेश आहे. विविध योजनांचे सचित्र फलक नागरिकांचे आकर्षण ठरले आहेत.

......................

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माजी विद्यार्थ्याकडून शाळेला लाखाची देणगी

0
0

म. टा. वृत्तसेवा, राधानगरी

कौलव (ता. राधानगरी) येथील सामाजिक कार्यकर्ते शाळेचे माजी विद्यार्थी चंद्रकांत पाटील यांनी कौलव येथील प्राथमिक शाळेला एक लाख रुपयांची मदत प्रदान केली. या रकमेतून शाळेसाठी बगीचा, वाचनालय आणि ई लर्निंग सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत.

कौलव गावातील सामाजिक कार्यकर्ते व साई उदयोग समूहाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राधानगरी, भुदरगड, आजरा विधानसभा मतदारसंघात अनेक गावच्या युवकांना मदतीचा हात दिला आहे. क्रीडा स्पर्धांसह सामाजिक उपक्रम राबविले आहेत. कौलव येथील प्राथमिक शाळेला एक लाख अकरा रुपये मदतीचा धनादेश शाळेचे व्यवस्थापन समिती अध्यक्ष धनाजी पाटील, दीपक चरापले, भगवान पाटील, जेष्ठ शिक्षक ऱ्हाटोळ यांच्याकडे सुपूर्द केला. यातून प्राथमिक शाळेत ई लर्निंग सुविधा, शाळेसमोर बगीचा आणि वाचनालय सुसज्ज करण्यात येणार आहे. शाळेच्या शतक महोत्सवानिमित्य केलेली ही मदत मोलाची ठरली आहे.

माजी विद्यार्थी म्हणून असून मला शाळेविषयी अभिमान वाटतो. त्यामुळे ही आर्थिक मदत केली आहे. वाचनालय, क्रीडा साहित्य, बगीचा आणि ई लर्निंग सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आणखी मदत देणार आहे.

- चंद्रकांत पाटील,, सामाजिक कार्यकर्ते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images