Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

शाळेसाठी कोट्यवधीचा हातभार

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

जिल्हा परिषद शाळांचा दर्जा वाढावा, मुलांची गुणवत्ता उंचवावी यासाठी जिल्हाभर 'माझी शाळा, समृद्ध शाळा'अभियानाने वेग घेतला आहे. या अभियान अंतर्गत प्रत्येक शाळेचे स्वयंमूल्यांकन सुरू आहे. भौतिक व गुणवत्ता वाढीसोबतच माजी विद्यार्थ्यांच्या सहभागातून शाळेचा विकास साधण्यावर भर आहे. गेल्यावर्षी शाळा समृध्दीसाठी दीड कोटी रुपये लोकवर्गणी जमली. शैक्षणिक उठावतंर्गत तब्बल १६ कोटी रुपयांची कामे झाली आहेत. यंदा लोकसहभाग वाढवून २० कोटी रुपयांपर्यंतचा निधी शैक्षणिक उठावसाठी जमविण्याचा पदाधिकारी व प्रशासनाचा संकल्प आहे.

गावपातळीवरील या प्रयत्नांना जिल्हा परिषद प्रशासनाने हातभार लावला आहे. शिक्षणतज्ज्ञ डॉ. जे. पी. नाईक जन्मशताब्दी वर्षानिमित्त 'माझी शाळा...समृद्ध शाळा'अभियानाची अंमलबजावणी सुरू आहे. या अभियानातील विजेत्या शाळांना तालुका आणि जिल्हास्तरावर रोख रक्कम देऊन गौरविले जाणार आहे. तत्पूर्वी सहभागी शाळांनी ३०० गुणांचे स्वयंमूल्यांकन करावयाचे आहे. यामध्ये भौतिक व गुणवत्ता विषयासाठी १६० गुण आहेत. अभियान कालावधीत राबविलेल्या उपक्रमांसाठी १४० गुण आहेत. डिसेंबर अखेर हे अभियान चालणार आहे. शाळा विकासात लोकांना सहभाग करुन घेणे हा प्रमुख उद्देश आहे.

अभियानाला चालना देण्यासाठी पदाधिकारी आणि प्रशासकीय पातळीवरुन प्रयत्न सुरू आहेत. अध्यक्षा शौमिका महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात तालुकानिहाय बारा कार्यशाळा घेतल्या. मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, शिक्षण समिती सभापती अंबरिश घाटगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ, प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांनी कार्यशाळेला मार्गदर्शन केले.

०००

'स्पर्धेच्या माध्यमातून शाळा विकास हे अभियानाचे सूत्र आहे. माझी शाळा समृद्ध शाळा अभियानमध्ये प्रत्येक शाळेचा सहभाग आहे. १९ निकषावर आधारित स्वयंमूल्यांकन आहे. प्रत्येक शाळेने त्या पद्धतीने काम केल्यास शाळेची गुणवत्ता, भौतिक सुविधा निर्माण होणार आहेत. हे अभियान शाळा विकासासाठी नव संजीवनी ठरेल.'

रविकांत आडसूळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी

शाळा समृद्धीसाठी गेल्यावर्षी जमलेला निधी

तालुका जमलेला निधी

आजरा ९,५२,५००

भुदरगड १३,०१,०००

चंदगड ३,६७,५१०

गडहिंग्लज ३१,९१,९२७

गगनबावडा ३,८०,३३०

हातकणंगले ७,२८,४६०

कागल २३,८५,६००

करवीर ११,७७,८७०

पन्हाळा १८,०५,०००

राधानगरी ६,२७,४६२

शाहूवाडी १६,७३,५००

शिरोळ ४,३८,१००

वित्त आयोगातील निधी शाळेसाठी बंधनकारक

चौदाव्या वित्त आयोगातील निधी थेट ग्रामपंचायतींना उपलब्ध होतो. या निधीतील २५ टक्के रक्कम ही शिक्षण, आरोग्य आणि उपजिविका या घटकावर खर्ची करणे बंधनकारक आहे. जिल्हा परिषदेतीच्या प्राथमिक शाळा या ग्रामीण भागातील मुलांच्या आधारवड आहेत. चौदाव्या वित्त आयोगातील अधिकाधिक निधी शाळा विकासासाठी खर्च करावा, असे आवाहन कार्यशाळेतून करण्यात आले.

जिल्हा परिषद शाळेची गुणवत्ता वाढावी, मुलांना भौतिक सुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्नशील आहे. गेल्या वर्षी शैक्षणिक उठावांतर्गत १६ कोटी रुपयांची कामे झाली.'माझी शाळा समृद्ध शाळा'ही अभिनव संकल्पना आहे. त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ठिकठिकाणी कार्यशाळा घेतल्या. शिक्षकांना, लोकांना महत्त्व पटवून दिले. शाळा विकासात प्रशासकीय धोरणासोबतच लोकसहभाग अंत्यत महत्त्वाचा आहे. शाळा तिथं प्रयोगशाळा, वाचनालय, भौतिक सुविधा हा उद्देश आहे. यंदा लोकसहभागाच्या प्रयत्नातून वीस कोटी रुपयांपर्यंतची शाळा विकासाची कामे करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

अंबरिश घाटगे, सभापती शिक्षण समिती जिल्हा परिषद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सलग सुट्यांमुळे सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी आनंदीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांना मंगळवारपासून दिवाळीची सुट्टी सुरू झाली. शनिवार, रविवार जोडून आल्याने सहा दिवस सुट्टी मिळणार आहे. परिणामी त्यांच्या दिवाळीच्या आनंदात भर पडली. शाळांनाही सुट्टी असल्याने अनेक कर्मचाऱ्यांनी कुटुंबासह पर्यटनाला जाणे पसंत केले. सर्वच सरकारी कार्यालयात शुकशुकाट जाणवत आहे.

मोठ्या उत्साहात दिवाळीला प्रारंभ झाला. घराघरात आनंदी वातावरण राहिले. यंदा दिवाळीला जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारची स्थानिक तर बुधवार, गुरूवार, शुक्रवारी सरकारने सुट्टी जाहीर केली. जोडून दुसरा शनिवार, रविवार आहे. सोमवारी रजा टाकलेल्यांना तब्बल एक आठवडा आणि रजा न टाकलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना सहा दिवस सुट्टी मिळाली. ५ नोव्हेंबरपासून दोन आठवडे शाळांना सुट्ट्या पडल्या आहेत.

राष्ट्रीयकृत बँकांना उद्या, बुधवारी, गुरूवारी सुट्टी असणार आहे. बँक अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही सुट्टी मिळणार आहे. त्यांचाही दिवाळीचा आनंद व्दिगुणीत झाला. सलग सुट्टीमुळे महानगरपालिका, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, पंचायत समिती, तहसील कार्यालयात शुकशुकाट जाणवत आहे. दीर्घ सुट्टीनंतर १२ नोव्हेंबरला पुन्हा कार्यालयीन कामकाजाला सुरूवात होणार आहे. कामाचा अतिरिक्त ताण राहणार आहे. यामुळे प्रशासन गतीमान होण्यास दोन आठवडे लागणार आहेत.

------------

चौकट

विकासकामांनाही ब्रेक

सरकारच्या विविध योजनांतून सुरू असलेल्या विकासकामांनाही दिवाळीनिमित्त ब्रेक लागला आहे. कामगार दिवाळीसाठी गावी गेल्याने ठेकेदारांनी काम बंद ठेवणे पसंत केले. परराज्यातील कामगारांनीही सुट्टी घेतल्याने शहरातील इमारत बांधकामांवरही परिणाम झाला आहे.

---------

पर्यटनस्थळे फुल्ल

शाळा, कॉलेज, महाविद्यालय तसेच सरकारी कार्यालयांना सुट्टीमुळे शहर आणि परिसरातील धार्मिक, निसर्ग पर्यटनस्थळांवर मोठी गर्दी झाल्याचे दिसत आहे. परजिल्हा, राज्यातूनही पर्यटक मोठ्या संख्येने येत आहेत. एक आठवडा असेच चित्र राहण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांच्या मध्यस्थीने दिव्यांगांचे आंदोलन स्थगित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'अपंग कल्याण निधी दिव्यांगांवरच खर्च करा' या प्रमुख मागणीसाठी मंगळवारी आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्या निवासस्थानी प्रहार क्रांती अपंग संघटनेतर्फे होणारे 'भीक मांगो' आंदोलन पोलिसांच्या मध्यस्तीनंतर स्थगित करण्यात आले. यासंदर्भात महापालिकेतील सर्व विभागप्रमुखांची पाच दिवसांनंतर बैठक घेण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले. शाहूपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे यांनी यात मध्यस्ती केली.

दिव्यांगांसाठी दरवर्षी राज्य सरकारकडून पाच टक्के निधी स्थानिक स्वराज्य संस्थांना दिला जातो. यावर्षी महापालिकेला मिळालेल्या निधीपैकी एक कोटी २० लाख निधी अन्यत्र वर्ग केला आहे. 'आमचा निधी, आम्हाला द्या' अशी मागणी करत संघटनेने सोमवारी आयुक्तांबरोबर चर्चा केली. पण चर्चेतून समाधान न झाल्याने त्यांनी महापालिका चौकात येऊन प्रशासनाविरोधात घोषणा देत दिवाळीदिवशी आयुक्तांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन जाहीर केले होते. त्यानुसार मंगळवारी सकाळी संघटनेचे कार्यकर्ते कटोरा घेऊन निवासस्थानाबाहेर दाखल झाले. त्याचवेळी शाहूपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक मोरे यांनी आंदोलक व डॉ. चौधरी यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चा केली. त्यानंतर डॉ. चौधरी यांनी आंदोलनकांना पाच दिवसांनंतर सर्व विभागप्रमुखाबरोबर बैठक घेण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे संघटनेने आंदोलन स्थगीत केल्याची घोषणा केली. यावेळी देवदत्त माने, कल्पना वावरे, जानकी मोकाशी, उज्ज्वला चव्हाण, संजयसिंह जाधव, संदीप दळवी, प्रशांत म्हेतर, विकास चौगुले, विनायक सुतार आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

छोट्या शहरांचा औद्योगिक आराखडा

$
0
0

Appasaheb.mali@timesgroup.com

Tweet:Appasaheb_MT

कोल्हापूर : छोट्या शहरांत औद्योगिक विकासाला चालना मिळावी, स्थानिक शेतीमाल उत्पादनांवर प्रक्रिया करणाऱ्या कृषी प्रक्रिया उद्योगाची सुरुवात व्हावी आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीपासून ते तरुणांसाठी रोजगार निर्मिती असा व्यापक दृष्टिकोन ठेऊन महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजने 'मास्टर प्लॅन' तयार केला आहे. राज्यातील सहा महसूली विभागनिहाय औद्योगिक विकासाचा प्रादेशिक आराखडा तयार होणार आहे.

राज्यातील वेगवेगळया प्रातांतील शेती उत्पादने, उद्योगवाढीची क्षमता, कच्या मालाची उपलब्धता, आवश्यक पायाभूत सुविधा, सध्या जाणवणाऱ्या कमतरता असा सर्वंकष डाटा यानिमित्ताने संकलित होणार आहे. 'चेंबर'तर्फे प्रादेशिक विभागावर आधारित हा उद्योग आराखडा राज्य सरकारकडे सादर करण्यात येणार आहे. हा आराखडा तयार करण्यामागे राज्यातील अन्य शहरांतील औद्योगिकीकरणाला गती मिळावी ही चेंबर ऑफ कॉमर्सची भूमिका आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांच्या मार्गदर्शनानुसार हे काम सुरू आहे. छोट्या शहरांतील औद्योगिकीकरणासाठी प्रशासकीय पातळीवरून पाठबळ मिळण्यासाठी पाठपुरावा आणि संस्थेकडून आवश्यक सहकार्य करण्याचे धोरण चेंबरने आखले आहे.

सध्या मुंबई, रायगड परिसर, पुणे, पिंपरी चिंचवड, ठाणे, औरंगाबाद, नाशिक अशा मोजक्या शहरात औद्योगिक विकासाचा पट्टा तयार झाला आहे. दिल्ली - मुंबई कॉरिडॉरमुळे औरंगाबाद शहराची गेल्या काही वर्षात झपाट्याने औद्योगिक प्रगती झाली. पुण्यामध्ये अॅटोमोबाइल क्षेत्र विस्तारले. पश्चिम महाराष्ट्रात कृषी उत्पादन मोठे होते. मात्र बहुतांश कृषी उत्पादनावर प्रक्रिया, त्यापासून अन्नपदार्थाच्या निर्मितीचे प्रकल्प नाहीत. कृषी प्रक्रिया उद्योगांच्या अभावामुळे फक्त थेट उत्पादन विक्रीपुरतेच बाजारपेठेत स्थान आहे. हे चित्र बदलण्यासाठी 'चेंबर'ने पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष ललित गांधी म्हणाले, 'उसापासून साखरेव्यतिरिक्त अन्य अन्नपदार्थ, भाजीपालावर प्रक्रिया करून पदार्थांची निर्मिती असे औद्योगिक धोरण राबविल्यास स्थानिक उत्पादनांना मोठी बाजारपेठ, उद्योग आणि रोजगार निर्मिती शक्य होणार आहे. राज्यातील सहा महसूली विभागातील संबंधित जिल्हे, उत्पादनांचा विचार करुन औद्योगिक आराखडा बनविण्यात येत आहे. डिसेंबर महिनाअखेर कोल्हापूरसंबंधी आराखड्याला अंतिम स्वरुप दिले जाईल. '

२३ देशांशी सामज्यंस करार

पाश्चात्य तंत्रज्ञान आणि स्थानिक उत्पादने, कौशल्यांचा मेळ घालत औद्योगिक विकास असे सूत्र निश्चित केले आहे. त्यासाठी परदेशातील नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग इंडस्ट्रीज क्षेत्राला होण्यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने २३ देशाशी सामंज्यस करार केला आहे. छोट्या शहरातील औद्योगिककरणाला चालना देण्यासाठी जागतिक कंपन्यांनी अर्थसहाय करण्याची तयारी दर्शविली आहे.

महाराष्ट्र चेंबरची वाटचाल पुस्तकरुपात

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज् सध्या शतकमहोत्सवी वर्षाककडे वाटचाल करत आहे. शेठ वालचंद हिराचंद यांच्या पुढाकारातून १९२७मध्ये व्यापार, व्यावसायिकांच्या या शिखर संस्थेची स्थापना झाली. पुढे शेठ वालचंद हिराचंद, आबासाहेब गरवारे, शंतनुराव किर्लोस्कर यांनी अन्य इंडस्ट्रीधारकांना सोबतीला घेऊन महाराष्ट्राची औद्योगिक उभारणीसाठी मोठे योगदान दिले. संस्थेच्या स्थापनेपासूनचा आतापर्यंतचा वाटचालीवर पुस्तक तयार केले जात आहे. लेखनासाठी आवश्यक मटेरिअल, जुने संदर्भ, कागदपत्रे संकलित करुन लिखाण सुरू असल्याचे उपाध्यक्ष गांधी यांनी सांगितले. त्यासाठी चेंबर'चे नाशिक येथील माजी मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद साळवेकर (नाशिक) यांचे सहकार्य घेतले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रुकडीत पंधरा दिवसांत सोळाशे टन ऊस जाळला

$
0
0

म. टा. वृतसेवा, हातकणंगले

हातकणंगले तालुक्यातील रुकडी येथे गेल्या पंधरा दिवसांपासून अज्ञातांनी जाणीवपूर्वक उसाच्या फडाला आग लावण्याचे प्रकार केल्याने आतापर्यंत सुमारे वीस एकरांतील सोळाशे टन ऊस भस्मसात झाला. शेतकऱ्यांचे सुमारे ५० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सततच्या आगीच्या घटनांनी शेतकरी हवालदिल झाले आहेत.

रुकडी परिसरात गेल्या काही दिवसांपासून उभ्या असलेल्या उसाच्या फडाला अज्ञात व्यक्तींकडून आग लावण्याचे प्रकार घडत आहेत. काही शेतकऱ्यांच्या ऊसाला आग लावण्याच्या प्रकाराने चर्चेला उधाण आले आहे. गेल्या पंधरा दिवसांत परिसरातील वीस एकरांतील सोळाशे टन ऊस आगीत भस्मसात झाला. यामध्ये अंदाजे ५० लाख रुपयांचे नुकसान झाले. सध्या शेतकरी संघटनांनी ऊस दरासाठी तोडी बंद केल्यामुळे साखर कारखाने बंद पडले आहेत. यामुळे जळालेला ऊस शेतात पडून राहिल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागत आहे. सोमवारी रात्री पंचगंगा नदीकाठच्या चिंचवाड रोडवरील अशोक पाटील, शितल पाटील, अशोक मोहीते, अमोल किणींगे, संदीप पाटील यांचा आठ एकरातील ऊस जळून खाक झाला. ही माहीती समजताच शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी धाडसाने काही ऊस बाजूला केल्याने मोठे नुकसान टळले. यापूर्वी आदीनाथ किणींगे, वसंत मगदूम, चंद्रकांत खोत, कुमार खोत, किरण चौगुले यांच्या शेतातील ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. या नुकसानीची भरपाई कोण देणार? अशी विचारणा होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एस. टी. गँगला मोक्का

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

कोल्हापूर शहरातील एस. टी. गँगवर जयसिंगपूर पोलिसांनी 'मोक्का' कायद्याअंतर्गत कारवाई केली. राजारामपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत सक्रिय असणार्‍या या टोळीचा शुभम अजित हळदकर हा प्रमुख आहे. हळदकर याच्यासह टोळीतील नऊ जणांवर कारवाई केल्याची माहिती जयसिंगपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णात पिंगळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शुभम अजित हळदकर (वय ३०), आसू बादशहा शेख, विशाल अविनाश माने उर्फ गोट्या लातूर (तिघेही रा. राजारामपुरी), राकेश किरण कारंडे (रा. शांतीनगर), सागर उर्फ सनी राजेंद्र सावंत, शुभम सुधाकर देवकर (दोघेही रा. शास्त्रीनगर), ओंकार कार्वेकर उर्फ पेले, विराज भोसले उर्फ जब्या (कोल्हापूर) यांच्यासह एका अल्पवयीन मुलावर 'मोक्का'अंतर्गत कारवाई करण्यात आली. यापैकी आसू शेख याच्यावर दुसर्‍यांदा 'मोक्कां'तर्गत कारवाई करण्यात आली आहे. मोक्काची ही कोल्हापूर जिल्ह्यातील १६ वी तर गडहिंग्लज विभागातील १२वी कारवाई आहे. पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे पाटील यांनी गेल्या अडीच वर्षात केलेली ही मोक्काची १०६ वी कारवाई आहे.

कोल्हापूर शहरात राजारामपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एस. टी. गँग सक्रिय आहे. या टोळीचा प्रमुख शुभम हळदकर याच्याविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, मारामारी, विनयभंग, दरोडा, शासकिय कामात अडथळा, जबरी चोरी, खंडणी यासारखे ११ गुन्हे तर एस. टी. गँगवर एकूण २६ गुन्हे दाखल आहेत. पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या आदेशानंतर या टोळीवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. मात्र, यानंतरही टोळीकडून विविध गुन्हे सुरुच होते.

दरम्यान, १३ ऑगस्ट रोजी एस. टी. गँगचा गुंड साईराज जाधव याच्या साथीदारांनी जयसिंगपूर व धरणगुत्ती (ता. शिरोळ) येथे आशिष शिवाजी पाटील (वय २५, रा. रत्नमाला अपार्टमेंट, अंबाई डिफेन्स कॉलनी, कोल्हापूर) यास पाठलाग करून डांबून घालून बेदम मारहाण केली होती. आशिषने आपली मैत्रीण श्रृती गबाले हिला एसटी गँगविरुद्ध राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यास सांगितल्याच्या समजातून मारहाणीची ही घटना घडली होती. यानंतर ४ सप्टेंबर रोजी आशिष पाटील याच्या फिर्यादीवरून जयसिंगपूर पोलिसांनी एस. टी. गँग विरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास करीत असताना एस. टी. गँग विरुद्ध कोल्हापूर जिल्ह्यातील राजारामपुरी, शाहूपुरी, गांधीनगर, जयसिंगपूर येथे विविध गुन्हे दाखल असल्याचे तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक शहाजी निकम, उपनिरीक्षक किरण दिडवाघ, सुरेश नलवडे यांनी केलेल्या तपासात स्पष्ट झाले. टोळीचा प्रमुख शुभम हळदकर हा अन्य साथीदारांच्या मदतीने गुन्हे करीत असल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर अधिक्षक श्रीनिवास घाडगे, उपअधिक्षक कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली जयसिंगपूर पोलिसांनी टोळीविरूध्द मोक्काअंतर्गत कारवाईचा प्रस्ताव तयार करून तो मंजुरीसाठी महानिरीक्षक नांगरे-पाटील यांच्याकडे पाठविला होता. यानंतर ही कारवाई करण्यात आली. तपासकामात हवालदार विजय भांगरे, साजिद कुरणे, आसिफ मुल्लाणी, आकाश पाटील यांनी मदत केल्याचे उपअधिक्षक पिंगळे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हमीदवाड्यात रविवारी हरिपाठ सादरीकरण स्पर्धा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कागल

राज्यातील पहिलीच राज्यस्तरीय हरिपाठ सादरीकरण स्पर्धा रविवारी (ता. ११ नोव्हेंबर) होणार आहे. परिवर्तन सामाजिक विकास संस्था व पुण्याच्या आम्ही वारकरी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्पर्धेसाठी एकूण ५० हजार रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. या आगळ्या स्पर्धेबाबत सांप्रदायिक क्षेत्रात उत्सुकता आहे.

ज्ञानेश्वर माउलींनी रचलेल्या हरिपाठाला वारकरी परंपरेमध्ये महत्व आहे. हरिपाठाचे महत्व तरुण पिढीपर्यंत पोहचवण्यासाठी हमीदवाडा येथील प्रतिएकादशी प्रवचन मालिकेच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त स्पर्धेचे आयोजन केल्याची माहिती माऊलींचे वंशपरंपरागत चोपदार व आम्ही वारकरीचे अध्यक्ष रामभाऊ रंधवे व परिवर्तनचे प्रवर्तक सचिन पवार,अध्यक्ष शिवराज भोसले-पाटील यांनी दिली. स्पर्धेसाठी अनुक्रमे १५००१, १३००१, ११००१, ९००१, ३५०१ची दोन व अन्य व्यक्तिगत वादक, गायक अशी बक्षिसे आहेत. स्पर्धेत सहभागी संघात किमान २० ते ३० सदस्य बंधनकारक असून सदस्यांचे वय ३० वर्षापर्यंत असावे. एका संघास हरिपाठातील कोणतेही ९ अभंग दिले जातील. वेळ २५ मिनिटे असेल. सांप्रदायिक वाद्ये व चाली तसेच पाउल खेळणे आवश्यक आहे. स्पर्धेत महाराष्ट्र, गोवा व कर्नाटकातील कोणत्याही फड परंपरेतील संघ सहभाग घेऊ शकतात. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी हभप तुकाराम पवार धारवाडकर, डॉ. एस. डी. पन्हाळकर, मधुकर भोसले, अनिल हासबे, मारुती कदम यांचेशी संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रामीण भागात ‘जी प्लस फोर’ बांधकाम परवाने द्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कुडित्रे

'जिल्हा परिषदेच्या अधिनियम १९६२नुसार ग्रामीण भागात जी प्लस टू बांधकाम परवाने मिळतात. अलीकडे बहुतांशी ठिकाणी जागेअभावी तीन-चार मजली इमारतींची बांधकामे झाली आहेत. मात्र अशा लोकांना परवाने मिळण्यात अडचणी येत आहेत. यासंदर्भात अनेक तक्रारी येत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेने 'जी प्लस टू'चा नियम बदलून 'जी प्लस फोर' असा बदल करावा अशा मागणीचा ठराव करवीर पंचायत समितीच्या मासिक सभेत करण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती राजेंद्र सूर्यवंशी होते. उपसभापती सागर पाटील, गटविकास अधिकारी सचिन घाटगे उपस्थित होते.

करवीर तालुक्यातील अनेक शाळांमध्ये अद्याप शिक्षकांची कमतरता आहे. प्रथम सत्र संपत आले तरीही शाळांना शिक्षक मिळत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे रिक्त शिक्षकांची पदे तात्काळ भरा अशी मागणी करत शिक्षक नाही दिले तर शाळेला कुलपे लावू असा पवित्रा काही सदस्यांनी घेतला. सभापती सूर्यवंशी व गटविकास अधिकारी सचिन घाटगे यांनी दिवाळी सुट्टी पूर्ण होईपर्यंत यासाठी पाठपुरावा करू. वाड्या-वस्त्यांवरील शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता भासणार नाही यासाठी प्रयत्न करू' असे सांगितले.

हसुर दुमाला प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांची गरज आहे. रुग्णांची गैरसोय होत असून या केंद्रात पुरेशा प्रमाणात कर्मचारी देण्याची मागणी सविता पाटील यांनी केली. इस्पूर्ली केंद्रातही चांगल्या सुविधा देण्याबरोबरच कर्मचारी व डॉक्टर वेळेत हजर राहतात का? याकडे लक्ष देण्याची मागणी केली. पिरवाडीच्या हद्दीत रस्त्याकडेला मोठ्या प्रमाणात कचरा आणून टाकला जातो. त्यामुळे कचरा टाकणाऱ्यांवर कारवाईची मागणी आश्विनी धोत्रे यांनी केली. गांधीनगर परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असल्याकडे सरीता कटेजा यांनी लक्ष वेधले. केर्ले-निगवे येथील पाणंद रस्त्याच्या दुरुस्तीकडे लक्ष देण्याची सूचना चंद्रकांत पाटील यांनी केली. गांधीनगर, चिंचवाड, मुडशिंगी, वसगडेसारख्या परिसरात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर बांधकामे झाली आहेत. गावांतील ओढ्यांवरही काही ठिकाणी बांधकामे झाली आहेत. त्यांना कोणाचे अभय मिळत आहे?, यावर काय कारवाई करणार? असा सवाल प्रदीप झांबरे, सुनील पवार यांनी केला. सभापती सूर्यवंशी यांनी सदस्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी अधिकाऱ्यांना त्वरीत कार्यवाही करावी असे सांगितले.

किती वेळा खड्डे बुजवता ?

कोल्हापूर-राधानगरी रोडवरील खड्डे बुजविण्याची गती वाढवा, दर्जेदार कामाकडे लक्ष द्या अशी सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे केली. करवीरच्या पश्चिम भागातील रस्त्यांची अवस्था बघता किती वेळा खड्डे बुजवता? असा सवाल अर्चना खाडे यांनी उपस्थित केला. यावेळी अधिकाऱ्यांनी पहिल्यांदा मुरुमाने व नंतर कार्पेट दुरुस्ती होईल असे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महाद्वार गजबजलेलाच

$
0
0

रात्रभर अतिक्रमण विभागाचे पथक रस्त्यावर

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गेल्या चार दिवसांपासून महाद्वार रोडच्या मध्यभागी बसण्यावरुन व्यापारी व विक्रेते यांच्यामध्ये संघर्ष सुरू होता. सोमवारपासून दोन्ही घटकांनी समजस्यांची भूमिका घेतल्याने महाद्वार गजबजून गेला. दिवाळीच्या पूर्वसंध्येला विक्रेत्यांचा चांगला व्यवसाय झाल्याने त्यांच्यामध्ये समाधानाचे वातावरण होते. मात्र व्यापारी व विक्रेत्यांमध्ये संघर्ष निर्माण होऊ नये, यासाठी अतिक्रमण विभागाचे पथक रात्रभर तैनात होते.

महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने रविवारी रस्ता अडवणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करत त्यांचे साहित्य जप्त केले. त्यानंतर झालेल्या चर्चेनुसार त्यांना ताराबाई रोडवरील महालक्ष्मी धर्मशाळेपासून रंकाळ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर बसण्याची परवानगी दिली. पण सोमवारी सायंकाळी विक्रेत्यांनी रस्त्याच्या मध्यभागी ठिय्या मारला. त्यामुळे संघर्षाची चिन्हे दिसू लागली. मात्र अतिक्रमण विभागाने विक्रेत्यांना रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याची सूचना केली. विक्रेत्यांनीही त्याला प्रतिसाद देत रस्त्याच्या बाजूला बसत विक्री सुरू केली. त्यामुळे सोमवारी रात्रीपासून मंगळवारी दहापर्यंत महाद्वार रोड गजबजून गेला होता.

दुपारी रोडवरील गर्दी तुरळक झाली, सायंकाळनंतर गर्दी वाढत गेली. लक्ष्मीपूजन आणि दीपावली पाडव्याच्या खरेदीसाठी ग्राहकांनी रोडवर पुन्हा गर्दी केली. महाद्वारवरील गर्दी रात्रीपर्यंत कायम होती. रांगोळी, पणत्या, बेंड बत्तासे याबरोबर फुले विक्रेत्यांनीही गर्दी केली होती. महाद्वार, ताराबाई रोडवर विक्री सुरळीत असल्याने व्यापारी व विक्रेत्यांमधील संघर्ष संपुष्टात आल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे दोन्ही घटकांमध्ये समाधानाचे वातावरण पहायला मिळाले. पण दोन्ही घटकांमध्ये संघर्ष निर्माण होऊ नये, यासाठी महापालिकेचे अतिक्रमण विभागाचे पथक सोमवारी रात्रभर तैनात होते. विक्रेत्यांनी रस्ता रहदारीसाठी खुला ठेवल्यानंतर पुन्हा रस्त्यावर येणार नसल्याची खात्री झाल्यानंतर पथकातील कर्मचाऱ्यांना मंगळवारी सकाळी दहा वाजता सुटी मिळाली.

.......................

चौकट

अनर्थ टळला

सोमवारी दिवसभर महाद्वार रोड गर्दीने फुलून गेला होता. रस्त्यांच्या मध्यभागी विक्रेत्यांना बसण्यास मज्जाव केल्याने गर्दीतून वाहतूक सुरू होती. गर्दीमध्ये सायंकाळी महाद्वार चौकात एका बँकेच्या निवृत्त कर्मचाऱ्याला ह्रदयविकाराचा त्रास जाणवू लागला. ते जमिनीवर कोसळत असताना त्यांना सावरण्यात आले. त्यांना तातडीने रिक्षातून हॉस्पीटलमध्ये दाखल करुन त्वरीत उपचार केले. रस्ता वाहतुकीसाठी खुला ठेवण्यात आल्याने त्यांच्यावर वेळेवर उपचार होऊ शकले. रस्ता बंद असता, तर अनर्थ घडला असता, अशा प्रतिक्रिया उमटत होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगराध्यक्षांनी घेतली पालकमंत्र्यांची भेट

$
0
0

म. टा. वृतसेवा, हातकणंगले

कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदेच्या नगराध्यक्षांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची कोल्हापुरात भेट घेऊन नगरपरिषदेच्या अडचणी, शहरातील समस्या व जिल्हा नियोजन तसेच सरकारकडून मिळणाऱ्या निधीबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी पालकमंत्री पाटील यांनी सर्व नगरपरिषदांना यंदा मागील वर्षापेक्षा अधिक निधी देण्याचे आश्वासन दिले.

यावेळी पेठवडगावचे नगराध्यक्ष मोहनलाल माळी, हुपरीच्या नगराध्यक्षा जयश्री गाट, मलकापूरचे नगराध्यक्ष केसरकर, मुरगूडचे नगराध्यक्ष राजेखान जमादार, जयसिंगपूरच्या नगराध्यक्षा निता माने, इचलकरंजी नगराध्यक्षा अलका स्वामी, गडहिंग्लजच्या नगराध्यक्षा स्वाती कोरी, पन्हाळ्याच्या नगराध्यक्षा धाडेल, आजऱ्याच्या नगराध्यक्षा जोस्त्ना चराटी आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निधनवृत्त...दिनकर काळे

$
0
0

दिनकर काळे

कोल्हापूर : उचगाव येथील दिनकर प्रकाश काळे (वय ८३) यांचे सोमवारी रात्री निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. फुले अर्पण विधी बुधवारी (ता. ७) सकाळी नऊ वाजता कदमवाडी येथील ख्रिस्ती दफन भूमीत होणार आहे. पत्रकार डॅनियल काळे यांचे ते वडील होत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेशनवरून दिवाळीची साखर गायब

$
0
0

\B

\Bपॉस मशीनचे सर्व्हर डाऊन, \Bपुरवठा प्रशासन बघ्याच्या भूमिकेत \B

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सरकारच्या अन्न, नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण विभागातर्फे प्राधान्य गटातील पात्र कुटुंबांस दिवाळीनिमित्त १ किलो साखर देण्याचा निर्णय घेतला. मात्र दोन दिवसांपासून सर्व्हर डाऊन असल्याने साखरेसह शिधापत्रिकेवरील सर्वच धान्य मिळाले नाही. यामुळे सर्वसामान्य, गरीबांना ऐन दिवाळीत सरकार, प्रशासनाविरोधात 'शिमगा' करावा लागत आहे. धान्य दुकानांसमोर मोठमोठ्या रांगा लागत आहेत. त्यांना दिवसभर थांबूनही रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. पुरवठा प्रशासन मात्र बघ्याच्या भूमिकेत आहे.

प्रत्येक अंत्योदय शिधापत्रिकाधारकास रास्त भाव दुकानातून दरमहा २ रुपये किलोने २० किलो गहू, ३ रुपयाने १५ किलो तांदूळ, १३ रूपये किलोने एक किलो साखर मिळते. प्राधान्य गटातील शिधापत्रिकेस माणसी २ रूपयाने ५ किलो गहू, ३ रुपयाने २ किलो तांदूळ मिळते. दिवाळीसाठी या महिन्यात प्रती किलो २० रुपयांप्रमाणे साखरही देण्याचा नव्याने निर्णय घेण्यात आला. याप्रमाणे इतर धान्यासोबत साखरही दुकानात पोहच आहे. मात्र पॉस मशीनचे सर्व्हर डाऊन आहे. यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात केवळ ५ ते १० टक्के धान्याचे वाटप झाले. उर्वरित पात्र सर्व शिधापत्रिकाधारकांना धान्यापासून वंचित राहावे लागले. ऐन दिवाळीतच धान्य न मिळाल्याने गरीब, सर्वसामान्यांच्या भाकरीचा प्रश्न निर्माण झाला आहे.

दोन दिवसांपासून धान्यासाठी महिला, पुरूष दुकानात जात आहेत. मात्र पॉस मशीन सुरू नसल्याने त्यांना रेशन दिले जात नाही. दुकानासमोर ताटकळत थांबावे लागत आहे. दुकानदारही यामुळे हतबल झाले आहेत. जिल्हाधिकारी, तहसील कार्यालय सलग सुट्ट्यांमुळे बंद आहे. यामुळे रेशन मिळत नाही, सर्व्हर डाऊनच्या तक्रारी कुणाकडे करावे, असा प्रश्न सतावत आहे. सरकार विरोधात असंतोष निर्माण झाला आहे. शिधापत्रिकाधारकांना रेशन दुकानासमोर दिवाळी साजरी करावी लागत आहे.

----------

हेल्पलाइन कुचकामी

पॉस मशीनव्दारे धान्य वितरणात तांत्रिक अडचणी आल्यास रेशन दुकानदारांनी १८००८३३३९०० या हेल्पलाइनला संपर्क साधावा, असे प्रशासनाने आवाहन केले आहे. मात्र हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर सरकारच्या एनआयसी वेबसाइटला तांत्रिक अडचण आहे. आम्हीही काहीही करू शकत नाही. फक्त पॉस मशीनमध्ये बिघाड झाल्यास मदत करू, असे उत्तर मिळत आहे. त्यामुळे हेल्पलाइन कुचकामी ठरली आहे.

-----------

अजब सल्ला

तांत्रिक अडचण असल्यास दहा शिधापत्रिकाधारकांचे गट करावेत. त्यांना गटागटाने बोलवावे. एकाचवेळी वितरण करू नये, असा अजब सल्ला प्रशासनाने दिला आहे. प्रत्यक्षात असे गट तयार करणे, वितरण करणे अशक्य असल्याचे दुकानदारांचे मत आहे. सर्व्हरही बंद असल्याने धान्य वितरण कसे करावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

------

कोट

'सरकारचा गलथान कारभार आणि तांत्रिक तज्ज्ञांच्या दुर्लक्षामुळे दोन दिवसांपासून सर्व्हर डाऊन आहे. पॉस मशीन बंद असल्याने रेशनवरील धान्य वितरणाला ब्रेक लागला. सर्वसामान्य, गरीबांना रेशनच्या धान्यापासून वंचित राहावे लागले. त्यांना दिवाळी करता आली नाही. सरकार केवळ बोलघेवडं असल्याने धान्य वितरण व्यवस्था कोलमडली.

चंद्रकांत यादव, अध्यक्ष, रेशन बचाव समिती

-------

हमालीचा प्रश्न

सरकारच्या आदेशानुसार धान्य पोहच करण्याची जबाबदारी वाहतूक ठेकेदारांची आहे. असे असताना प्रत्येक दुकानदारांकडून बेकायदेशीरपणे ५० किलोचे पोत ट्रकमधून उतरण्यासाठी ३ रूपये हमाली घेतली जात आहे. त्यास रेशन दुकानदार संघटनेचा तीव्र विरोध आहे. परिणामी दुकानदार आणि हमालांत संघर्ष निर्माण होत आहे.

-------------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमने सामने....रघुनाथ पाटील,

$
0
0

लोगो : आमने सामने

ऊस दराचा तिढा निर्माण झाल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व साखर कारखाने बंद आहेत. कारखानदारांनी दर जाहीर करावा, अशी मागणी करत शेतकरी संघटना आणि शिवसेनेने आंदोलने सुरू केले आहे. त्यामुळे ऊस तोडी बंद पडल्या आहेत. कारखानदारांनी एफआरपी देण्यासाठी सरकारने मदत करावी, अशी मागणी केली आहे. सरकारची मदत जाहीर झाल्यावरच कारखाने सुरू करण्याचा प्रवित्रा कारखानदारांनी घेतला आहे. कारखानदार-शेतकऱ्यांच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आंदोलनाचा इशारा देणारे शेतकरी संघटनेचे रघुनाथदादा पाटील आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सहकारी साखर कारखानदारांचे निमंत्रक, माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी आपली भूमिकी 'आमने-सामने' मांडली.

एफआरपीसाठीचे कारखानदारांचे रडगाणे चुकीचे

शेतकरी संघटनेचे संस्थापक, दिवंगत नेते शरद जोशी यांनी शेतीचे अर्थकारण मांडताना, जो कच्चा माल तयार करतो तो कंगाल होतो आणि पक्का माल तयार करणारा गडगंज होतो, अशी वस्तुस्थिती मांडली होती. राज्यात कापूस पिकवणारा शेतकरी कंगाल झाला. पण कापड तयार करणारे गडगंज झाले आहेत. आता ऊस पिकवणारा शेतकरी पिचला आहे तर साखर कारखानदार गडगंज झाले आहेत. सहकारातील नेतृत्व राजकारणात गेले. सहकाराबरोबर खासगी कारखाने काढून ते कारखानदार होत आहेत. कारखानदारांनी भ्रष्टाचारातून प्रचंड कमाई केली असताना आता एफआरपी देता येत नाही म्हणून रडगाणे सुरू आहे. गेल्यावर्षी ऊस दरावर तोडगा काढण्यासाठी पालकमंत्री पाटील यांनी घेतलेल्या बैठकीत 'एफआरपी अधिक दोनशे रुपये' देण्याचा निर्णय घेतला होता. साखर कारखान्यांनी एफआरपी दिली. पण जादाचे दोनशे रुपये दिलेले नाही. त्याचा जाब विचारण्यासाठी आम्ही मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. पूर्वीचा दोनशे रुपयांचा फरक दिलेला नाही आणि या हंगामातील ऊस दर जाहीर केला जात नाही. एफआरपी आणि ७०:३० फॉर्म्युल्यानुसार दर देणे कायद्याने बंधन घातले आहे. हा कायदा राज्यभर राबवला जात आहे. महाराष्ट्रातील कारखानदारांनी ३१०० रुपये दर दिला आहे तर गुजरातमधील खासगी कारखान्यांनी ४५०० रुपये अंतिम दर दिला आहे. दोन्ही राज्यांत शेतकरी ऊसाची लागवड करतो. तिथेही रिकव्हरीनुसारच दर दिला जातो. पण दोन्ही राज्यांतील दरात मोठा फरक आहे. राज्य सरकारने गुजरात व महाराष्ट्रातील कारखान्यांचा अभ्यास करून ऊस दराचे धोरण ठरवले पाहिजे. आम्ही पहिली उचल ३५०० रुपये व अंतिम दर ४५०० रुपये द्यावी, अशी मागणी केली आहे. भार्गव समितीच्या शिफारशीनुसार साखरेच्या उपपदार्थ झालेल्या फायद्यातील ५० टक्के रकमेतून दुसरा व तिसरा हप्ता द्यावा. सरकारने दोन कारखान्यांत ४० किलोमीटरची घातलेली अट रद्द करावी. अट काढल्यास कारखान्यांत स्पर्धा होऊन शेतकऱ्यांना चांगला दर मिळेल. अनेक कारखाने तोडणी व वाहतूक खर्च एक हजार ते अकराशे रुपये दाखवत आहेत. त्याऐवजी प्रत्यक्ष किती किलोमीटर ऊस वाहतूक झाली, त्याप्रमाणे दराची आकारणी झाली पाहिजे. उसाची रिकव्हरी काढून तोड झाली पाहिजे. ८.५ बेस धरून उसाला दर दिल्यास शेतकऱ्यांना चांगला दर मिळू शकेल.

- रघुनाथ पाटील, शेतकरी संघटना

००००००

दराअभावी साखर उद्योग अडचणीत

गेल्यावर्षी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेचा दर प्रतिक्विंटल ३५०० रुपये दर होता. जवाहर साखर कारखान्याच्या गळीत हंगामात खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत मी 'एफआरपी अधिक रक्कम' देण्याची भूमिका मांडली होती. त्यानंतर पालकमंत्री पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत प्रतिटन 'एफआरपी अधिक दोनशे रुपये' दराला मान्यता दिली. सुरुवातीला सर्व कारखान्यांनी एफआरपीनुसार दर दिला. पण साखरेचे दर गडगडल्याने हा उद्योग हादरुन गेला. त्याचा फटका यावर्षीच्या हंगामावर होत आहे. यंदा या उद्योगासाठी कठीण काळ आहे. एफआरपीप्रमाणे दर देणे कारखान्यांना जमणार नाही ही वस्तूस्थिती आहे. त्यासाठी आम्ही जिल्ह्यातील २२ कारखानदार एकत्र आलो आहोत. बँकांकडून मिळणारी कर्ज, कर्जाचे हप्ते आणि यातून मिळणारी रक्कमेतून कारखान्यांना एफआरपी देणे अशक्य आहे. त्यासाठी आम्ही सरकारकडे मदतीची मागणी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एफआरपी अधिक दोनशे रुपये दर देण्याची मागणी झाली आहे. खासदार राजू शेट्टी यांनी ९.५ टक्के बेस धरुन एफआरपी अधिक दोनशेची मागणी केली आहे. सध्या साखरेचे दर ३००० ते ३१०० रुपये आहे. आणि संघटनांनी ३१०० ते ३२०० रुपये दर मागितला आहे. यंदा आगामी वर्षात साखरेच्या दरात वाढ होण्याची शक्यता नाही. त्यामुळे एफआरपी आणि अधिक दराच्या मागणीने कारखाने भरडले जात आहेत. या वस्तूस्थितीकडे सर्वजण डोळेझाक करीत आहेत. गेली अनेक वर्षे ऊस दरावरून आंदोलने सुरू होतात. कोल्हापूर जिल्ह्यात त्याची मोठी तीव्रता असते. अन्य जिल्ह्यांत कारखाने सुरू असतात. पण कोल्हापुरात कारखाने सुरू नसतात. यंदाही तीच परिस्थिती आहे. अन्य जिल्ह्यातील कारखाने एफआरपीही देत नाहीत. पण कोल्हापुरातील कारखाने एफआरपीपेक्षा जादा रक्कम देतात. आजही कोल्हापूरच्या सीमेवर कर्नाटकातील कारखाने सुरू आहेत. ते फक्त १८०० ते २००० रुपये दर देत आहेत. पण आंदोलनाची तीव्रता मात्र कोल्हापूर जिल्ह्यात आहे. आंदोलनातील कार्यकर्ते, शेतकरी हे कारखानदारांशी संबधित आहेत. त्यांच्याशी आम्ही संघर्ष टाळण्याचा प्रयत्न करतो. पण यंदा ऊस दराचे प्रकरण कारखानदारांच्या गळाशी प्रकरण आल्याने सरकारच्या मदतीशिवाय कारखाने सुरू होऊ शकत नाही ही वस्तूस्थिती आहेत. सरकारची मदत जाहीर होईपर्यंत कारखाने बंद ठेवण्याची कारखानदारांची तयारी आहे. आमचे क्रशिंग कमी होणार आहे. ऊस तोडणी कामगारांचे हाल होणार आहेत. पण कारखानदारांनी नुकसान सोसण्याची तयारी यंदा ठेवली आहे.

- प्रकाश आवाडे, निमंत्रक कोल्हापूर जिल्हा साखर कारखानदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावर्डेत मारामारी

$
0
0

सावर्डेत दोन गटात

मारामारी, चार जखमी

हातकणंगले : सावर्डे (ता. हातकणंगले) येथे घोडागाडी शर्यत सोडण्याच्या कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी होऊन तुफान दगडफेक झाली. यामध्ये चौघेजण गंभीर जखमी झाले. याप्रकरणी घोडागाडी स्पर्धेच्या आयोजकांवर पेठवडगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. गावात तणाव असून सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले. गावात राज्य राखीव दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. घटनास्थळी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी भेटी देऊन शांततेचे आवाहन केले आहे.

सावर्डेत दरवर्षी दिवाळीत शर्यतींचे आयोजन केले जाते. आज स्पर्धेवेळी आयोजकांसोबत एका तरुणाचा वाद झाला. त्यातून मारमारी झाली. दोन्ही गटांनी मोठ्या प्रमाणात दगडफेक केली. दगडफेकीत दोन्ही गटांतील चौघे जखमी झाले. जखमींना उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी घोडागाडी शर्यतीच्या आयोजकांवर वडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला. सुनील संताजी चव्हाण, अनिल दिनकर पाटील, राया उर्फ मारुती चव्हाण, भास्कर चव्हाण, दिलीप चिमाजी पाटील, राहुल पाटील (सर्व रा. सावर्डे, ता. हातकणंगले) यांसह पाचजणांवर बेकायदेशीरपणे शर्यतीचे आयोजन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत तक्रार दाखल झाली नव्हती. घटनेचे गांभीर्य ओळखून पेठवडगावचे निरीक्षक प्रदीप काळे यांनी राज्य राखीव दलाच्या तीन तुकड्यांना पाचारण केले. गावात ऐन दिवाळीदिवशी तणावपूर्ण शांतता होती. गावातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले. घटनास्थळी अप्पर पोलिस अधीक्षक श्रीनिवास घाटगे, जयसिंगपूर विभागाचे डीवायएसपी कृष्णात पिंगळे यांनी भेट देऊन दोन्ही गटाना शांततेचे आवाहन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिवाळी पाडव्यासाठी बाजारपेठ सज्ज

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

आनंद, उत्साह आणि चैतन्याचा सण असलेल्या दीपावली सण जल्लोषात साजरा सुरू असताना दीपावली पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर होणाऱ्या खरेदीसाठी बाजारपेठ सज्ज झाली आहे. वाहन, सोने, इलेक्ट्रॉनिक वस्तूसह बांधकाम व्यवसायात मोठी उलाढाल होण्याचे संकेत मिळत आहेत.

दसऱ्याला वाहन खरेदीला चांगला प्रतिसाद लाभला होता. ग्राहकाकडून नवीन कार, नवीन बाइक बुकिंग झाल्या असून पाडव्यादिवशी शोरूममधून बाइक खरेदी करण्यासाठी ग्राहक उत्सुक आहे. बाईकमध्ये नवीन मॉडेल खरेदीकडे तरुणाईचा कल आहे. शिरोली, गोकुळ शिरगाव येथील कारच्या शोरुममध्ये वाहनांची मॉडेल मांडण्यात आली आहेत. तर गोडाऊनमध्ये नवीन मोटारींच्या रांगा लागल्या आहेत. जुनी कार देऊन नवीन कार विकत घ्या, अशा ऑफरही काही एजन्सीजनी दिल्या आहेत. बँकाकडून लोनची सुविधाही उपलब्ध करून दिली जात आहे.

इलेक्ट्रॉनिक्स वस्तूच्या बाजारपेठेत खरेदीला ग्राहकांकडून सर्वाधिक पसंती मिळत आहे. शिवाजी स्टेडियम टेंबे रोड, लक्ष्मीपुरी, दसरा चौक जूना पूल या परिसरातील दुकानात एलईडी टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशिन या वस्तू मांडण्यात आल्या आहेत. जुना टीव्ही, फ्रीज, वॉशिंग माशिन दिल्यास एक ते दोन हजार रुपयांची सूट दिली जात आहे. अॅटोमॅटिक वॉशिंग मशिन, डबल डोअर फ्रीजकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. व्यापाऱ्यांनी पाच ते २० टक्केपर्यंत कॅशबॅक ऑफरही दिल्या आहेत. तसेच शून्य टक्के दराने डाऊन पेमेंटची सुविधा वित्तीय संस्था आणि बँकांकडून दिली जात आहे. मोबाइलमधील नवीन व्हर्जन बाजारात आले असून तरुणाईकडून चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा व्यावसायिक व्यक्त करत आहेत.

धनत्रयोदशीपासून गुजरीत सोने खरेदी सुरू झाली आहे. पाडव्याच्या महुर्तावर किमान एक ग्रॅम सोने खरेदीची परंपरा अनेक कुटुंबात असल्याने सराफ कट्टा सज्ज झाला आहे. सोने, चांदी, हिरे दागिन्यांच्या मोठ्या शोरुममध्ये खरेदी करण्याकडे कल वाढला आहे. सराफ बाजारात लाखो रुपयांची उलाढाल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेली दोन वर्षे नोटबंदी, जीएसटीमुळे बांधकाम व्यवसायात मंदी होती. पण आता फ्लॅट खरेदीसाठी ग्राहकांकडून विचारणा होऊ लागली आहे. जीएसटी अंमलबजावणीपूर्वी पूर्णत्वास आलेल्या प्रकल्पातील तयार फ्लॅट खरेदीसाठी ग्राहकांची सर्वात जास्त पसंती आहे. अशा प्रकल्पात जीएसटी लागू होत नसल्याने अंदाजे दोन ते सव्वा दोन लाख रुपयांची बचत होत असल्याने ग्राहकांकडून फ्लॅट खरेदीसाठी विचारणा होत असल्याचे बांधकाम व्यवसयात समाधानाचे वातावरण आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सोमवारपासून क्षयरोग रुग्णशोध मोहीम

$
0
0

सोमवारपासून क्षयरोग रुग्णशोध मोहीम

कोल्हापूर: क्षयमुक्त भारत अभियानातंर्गत राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम राबवला जात आहे. कार्यक्रमातंर्गत महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने १२ ते २४ नोव्होंबरपर्यंत क्षयरोग रुग्णशोध मोहीम राबवण्यात येणार आहे. मोहिमेमध्ये कुटुंबातील प्रत्येक सदस्यांची तपासणी करून, संशयित रुग्णावर मोफत उपचार करण्यात येणार आहेत.

राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत क्षयरोग नियंत्रण सोसायटी व महापालिका मार्च २००१ पासून क्षयरोग रुग्णशोध मोहीम राबवते. मोहिमेनंतर महापालिकेच्या सर्व हॉस्पिटल, वॉर्ड दवाखाने, नागरी आरोग्य केंद्र येथे मोफत क्षयरोगाबाबत निदान व औषधोपचार केले जातात. जागतिक आरोग्य संघटनेने २०३० पर्यंत क्षयरोगाचे समूळ उच्चाटन करण्याचे जाहीर केले असले, तरी देशाने २०२५ पर्यंत क्षयरोग मुक्त देश करण्याचे उद्दिष्ट ठेवून त्या अनुषंगाने नियोजन सुरू केले आहे. याचाच भाग म्हणून १२ ते २४ नोव्होंबरअखेर मोहीम राबवण्यात येणार आहे. मोहिमेत महापालिका आरोग्य विभाग, क्षयरोग नियंत्रण सोसायटी, नागरी आरोग्य केंद्रामधील एएनएम, जीएनएम व आशा कर्मचारी प्रत्यक्ष गृहभेट देणार आहेत. तपासणीमध्ये संशयित रुग्णावर मोफत उपचार करण्यात येणार आहेत. मोहिमेत सहभागी होणाऱ्या ६२ लोकांना प्रशिक्षण देण्यात आले, अशी माहिती महापालिकेचे शहर क्षयरोग अधिकारी डॉ. अरुण परितेकर यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आगामी खासदार मंडलिक गटाचाच

$
0
0

फोटो...

म. टा. वृत्तसेवा, कागल

'कागल तालुक्यासह जिल्ह्यातील मंडलिकप्रेमी कार्यकर्ते आपल्या हक्काचा प्रतिनिधी लोकसभेत पाठविण्यासाठी इच्छुक असून ते जोमाने कामालाही लागले आहेत. त्यामुळे आगामी खासदार मंडलिक गटाचा आणि त्यांच्या विचारांचाच होईल यात तिळमात्र शंका नाही. दिवगंत खासदार सदाशिवराव मंडलिक कागल तालुका आपले कुटुंब मानून हयातभर कार्यरत राहिले,' असे प्रतिपादन प्रा. संजय मंडलिक यांनी केले.

सदाशिवराव मंडलिक कारखान्याच्या वतीने कार्यस्थळावर अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालकांसह सभासद शेतकरी, ऊसतोड मजूर व अधिकारी व कर्मचारी यांना एकत्रितपणे दिवाळीनिमित्त स्नेह फराळाचे आयोजन केले होते. यावेळी मंडलिक यांच्या हस्ते लक्ष्मीपूजन करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.

प्रा. मंडलिक म्हणाले, 'शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यात जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे मोलाचे योगदान आहे. मात्र, सद्य:स्थितीत कारखानदारीच अडचणीत आहे. ऊसदरप्रश्नी शेतकरी संघटना आपल्या निर्णयावर ठाम आहे, तर सरकार तोडग्यासाठी पुढाकार घेताना दिसत नाही. परिणामी ऊसतोड मजूर व कारखान्यांचे कर्मचारी बसून आहेत. शिरोळमधून येऊन कोणी ऊसतोडी रोखत असेल तर याचा सभासदांनी गांभीर्याने विचार करावा.'

यावेळी उपाध्यक्ष बंडोपंत चौगुले-म्हाकवेकर, वीरेंद्र मंडलिक, वैशाली मंडलिक, नगराध्यक्ष राजेखान जमादार, उपसभापती विजय भोसले, विश्वासराव कुराडे, आनंदा मोरे, धनाजी बाचणकर, शिवाजीराव इंगळे, नंदकुमार घोरपडे, समरजित मंडलिक, राजश्री चौगुले, आदी उपस्थित होते. जीवन साळोखे यांनी प्रास्ताविक केले. कार्यकारी संचालक एन. वाय. पाटील यांनी आभार मानले.

०००

१४ ला गारगोटीत पुरस्कार वितरण

दिवंगत सदाशिवराव मंडलिक सामान्य व्यक्ती नसून ती अखंडित विचारधाराच आहे. त्यामुळे त्यांच्या विचारांची जपणूक करण्यासाठी त्यांच्या नावे विविध क्षेत्रांतील ख्यातनाम विभूतींचा स्मृती पुरस्कार देऊन सन्मान केला जातो. यंदाचा पुरस्कार वितरण सोहळा गारगोटी (ता. भुदरगड) येथे १४ नोव्हेंबरला होणार आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे, असे आवाहनही प्रा. मंडलिक यांनी केले.

०००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निधन : पार्वती पाटील

$
0
0

फोटो...

पार्वती पाटील

कोल्हापूर : गोळीबार मैदान, कसबा बावडा येथील श्रीमती पार्वती महादेव पाटील (वय ९७) यांचे निधन झाले. सामाजिक कार्यकर्ते रघुनाथ पाटील यांच्या त्या आई होत. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, मुली, नातवंडे असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपघातात तरुण ठार

$
0
0

चंदगड : दुचाकीवरील ताबा सुटल्याने हजगोळी (ता. चंदगड) येथील वळणावर तरुणाची दुचाकीसह भिंतीला जोराची धडक बसली. त्यात तो गंभीर जखमी झाला. शैलेश विठ्ठल भडसकर (रा. तुडये, ता. चंदगड) असे त्याचे नाव आहे. जखमी शैलेशला तातडीने उपचारासाठी बेळगाव येथील केएलई रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, तेथे त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. गजानन पाटील यांनी याबाबतची वर्दी चंदगड पोलिसांत दिली. बुधवारी दुपारी बारा वाजता हा अपघात झाला. घटनेची नोंद चंदगड पोलिसांत झाली आहे.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शंकर पाटील यांचा जनसुराज्यमध्ये प्रवेश

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, वारणानगर

कोडोली (ता. पन्हाळा) येथील ग्रामपंचायत सदस्य शंकर पाटील यांनी समर्थकांसह जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश केला. कोडोली येथे आयोजित केलेल्या विशेष समारंभात पक्षाचे अध्यक्ष विनय कोरे यांच्याहस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पाटील यांनी केलेल्या प्रवेशामुळे जनसुराज्य शक्ती पक्षातील स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दुणावला आहे. शंकर पाटील जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष भारत पाटील यांचे विश्वासू सहकारी आहेत. कोडोली ग्रामपंचायत निवडणुकीत माजी आमदार यशवंत एकनाथ पाटील यांच्या गटाशी भारत पाटील यांच्या गटाच्या युतीमधून ते कोडोली ग्रामपंचायतीवर निवडून आलेले होते. त्यामुळे शंकर पाटील यांनी जनसुराज्य पक्षात केलेला प्रवेशाचा भारत पाटील यांच्यासह पाटील गटाला धक्का मानला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images