Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

महाद्वारवर पुन्हा विक्रेत्यांचा ठिय्या

$
0
0

सायंकाळनंतर रोड पॅक, अतिक्रमण विभाग हतबल

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दिवाळी सणामध्ये महाद्वार व ताराबाई रोड खुला करण्यासाठी रविवारी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केली. कारवाईनंतर महालक्ष्मी धर्मशाळेपासून विक्रेत्यांना बसण्यास जागा दिली. मात्र सोमवारी सायंकाळनंतर दोन्ही रोडवर विक्रेत्यांनी पुन्हा ठिय्या मारला. त्यामुळे महाद्वार ते पापाची तिकटी रोड वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झाला.

दिवाळीमध्ये महाद्वार व ताराबाई रोड खुला करण्यावरुन गेल्या चार दिवसांपासून व्यापारी व विक्रेत्यांमध्ये संघर्ष सुरू आहे. महापालिकेने यामध्ये हस्तक्षेप करुन संघर्ष संपुष्टात आणला. रविवारी सकाळी अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवून विक्रेत्यांना हटवले. सर्व विक्रेत्यांना ताराबाई रोडवरील महालक्ष्मी धर्मशाळेपासून रंकाळाकडे जाणाऱ्या मार्गावर व बाबूजमाल येथील पार्किंगमध्ये बसण्यास पर्यायी जागा दिली. त्यानुसार विक्रीला सुरुवातही झाली. सोमवारी दुपारपर्यंत महाद्वार विक्रेतामुक्त होता. पण त्यानंतर काही फेरीवाल्यांचे नेते व विक्रेत्यांमध्ये मध्यभागी बसण्यासाठी चर्चा होऊ लागली. विक्रीचा महत्त्वाचा दिवस असल्याने सायंकाळी विक्रेत्यांनी रस्त्याच्या मध्यभागी ठाण मांडले.

रस्त्यावर विक्रेत्यांनी अतिक्रमण करु नये, यासाठी अतिक्रमण निर्मूलन पथक बिनखांबी गणेश मंदिर येथे तैनात होते. पण पापाची तिकटी येथून एक-एक विक्रेता रस्त्यावर येवू लागला. महाद्वार गर्दीने ओसंडून वाहत असताना अचानक विक्रेत्यांनी घेतलेल्या या पवित्र्यामुळे क्षणात महाद्वार व ताराबाई रोड विक्रेत्यांनी व्यापून गेला. विक्रेते बिनखांबी गणेश मंदिरांपर्यंत आल्यानंतर पथकाला याबाबतची माहिती मिळाली. त्यामुळे गर्दीत विक्रेत्यांना हटवणे अतिक्रमण विभागाला शक्य झाले नाही. मंगळवारपासून महापालिकेला तीन दिवस सुटी असल्याने पुढील तीनही दिवस विक्रेत्यांचा ठिय्या रोडवरच राहणार आहे. मंगळवारी जर व्यापाऱ्यांनी वेगळी भूमिका घेतली तर ऐन दिवाळीच्या मुख्य दिवशी संघर्षाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तोडगा निघेपर्यंत ओलम शुगर्स बंद

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, चंदगड

राजगोळी खुर्द (ता. चंदगड) येथील हेमरस -ओलम साखर कारखान्याने ऊस दराचा तोडगा निघेपर्यंत तोडणी बंद केली आहे. तुटलेल्या उसाचे गाळप पूर्ण झाल्यानंतर कारखानाही बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कारखान्याचे बिझनेस हेड भरत कुंडल यांनी प्रसिद्धी पत्रकातून ही माहिती दिली.

शेतकरी संघटनांनी केलेली ऊस दराची मागणी एफआरपीची रक्कम देण्यात येणाऱ्या अडचणी विचारात घेऊन कोल्हापूर जिल्ह्यातील कारखानदारांनी एक नोव्हेबरपासून कारखाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने हेमरसने तुटलेला ऊस गाळप झाल्यानंतर दराचा तोडगा निघेपर्यंत कारखाना बंद करण्याचा निर्णय घेऊन कारखानदारांनी पुकारलेल्या बंदमध्ये सहभाग घेतला आहे. हेमरस कारखान्याने हंगामातील २०० रुपयांचा हप्ता देण्याचे जाहीर करून २९ ऑक्टोबरपासून हंगाम सुरू केला होता. त्यामुळे ऊस तोडणी सुरू होती. पण कोल्हापुरात झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील कारखाने बंद ठेवण्याचा निर्णय झाल्याने हेमरस व्यवस्थापनाने रविवारपासून तोडणी बंद करुन तुटलेल्या उसाचे गाळप केल्यानंतर कारखाना बंद करण्याचा निर्णय घेतला. १० नोव्हेंबरला पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याबरोबर होणाऱ्या बैठकीत तोडगा निघाल्यानंतर कारखाना सुरू करण्यात येणार असल्याचे कुंडल यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दीपोत्सव ... कोल्हापुरच्या प्रतिभेचा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी,कोल्हापूर

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील नेमबाजी स्पर्धेत अचूक निशाणा साधत पदक पटकाविणाऱ्या, संशोधन क्षेत्रात जागतिक स्तरावर मुद्रा उमटवणाऱ्या, सौंदर्य आणि बुध्दीमत्तेचा सुंदरसा मिलाफ घडवित सौंदर्यवती स्पर्धा जिंकणाऱ्या कोल्हापुरातील तरुण पिढीचे टॅलेंट दिवाळी सणाच्या निमित्ताने 'महाराष्ट्र टाइम्स'च्या व्यासपीठावर अवतरले. विविध क्षेत्रात कर्तबगारी सिध्द केलेल्या तरुणाईच्या प्रतिभाने यंदाचा दीपोत्सवाचा सोहळा आणखी उजळला. शुटिंग, स्वीमिंग, मॉडेलिंग, आणि संशोधन क्षेत्राकडे आश्वासक नजरेने पाहणाऱ्या तरुणाईच्या दुर्दम्य इच्छाशक्तीचे दर्शन या निमित्ताने घडले.

विविध क्षेत्रात कोल्हापूरचा नावलौकिक सर्वदूर पोहचविणाऱ्या या तरुणाईने सोमवारच्या सायंकाळी दिवाळीच्या एकमेकांना शुभेच्छा दिल्या. नेमबाज अनुष्का पाटील, नेमबाज जान्हवी पाटील, नेमबाज शाहू माने, युवा संशोधक अभिनंदन पाटील, अनिशा राजमाने, दीपक सावंत, महाराष्ट्र टाइम्स श्रावणक्वीन स्पर्धेतील कोल्हापूर फेरीतील विजेत्या रत्नेशा पोतदार, शर्वरी जोग, मिसेस महाराष्ट्र गृहलक्ष्मी सौंदर्यस्पर्धेच्या विजेत्या स्वप्नाली जगोजे, मिसेस महाराष्ट्र उपविजेत्या प्रिती क्षीरसागर-सोरटे, बायथलॉन व ट्रॉयथलॉन या अनोख्या क्रीडा प्रकारातील विजेत्या अहिल्या चव्हाण यांनी अनुभव शेअर करत निखळ गप्पाही मारल्या.

...........

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा मार्गाचा दर्जा

$
0
0

कोल्हापूर

शिरोळ तालुक्यातील चिपरी, जैनापूर, कोथळी, हरीपूर या १० किलोमीटरच्या रस्त्याला सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्हा मार्गाचा दर्जा दिला. यासंबंधीचा सरकारी आदेश सोमवारी निघाला. हा रस्ता जिल्हा परिषदेकडे होता. परिणामी दुरूस्ती, बांधणीसाठी निधी कमी पडत होता. या रस्त्यावर वाहतूकही वाढली आहे. यामुळे जिल्हा रस्त्याचा दर्जा मिळावा, असा प्रस्ताव जि. प. प्रशासनाने सरकारकडे दिला होता. त्याला मंजुरी मिळाली.

-------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खड्डे भरण्याचे काम मार्चअखेर पूर्ण करणार

$
0
0

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आश्वासन

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'सार्वजनिक बांधकाम विभागाकडील सर्व रस्त्यांवरील खड्डे भरण्याचे काम मार्चअखेर पूर्ण केले जाईल, रस्ते चकाचक केले जातील', असे आश्वासन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी दिले.

चेतना अपंगमती विकास संस्थेत शैक्षणिक साहित्य संच वाटप कार्यक्रमात ते बोलत होते.

पालकमंत्री म्हणाले, 'चार वर्षात रस्ते विकासावर अधिक भर दिला. दर्जेदार रस्त्यांची बांधणी केली. पावसाळ्यात पडलेले खड्डे मार्च अखेरपर्यंत भरले जातील. सरकारी निधी आणि लोकसहभागाव्दारे गावे स्वयंपूर्ण करण्यावर भर दिला असून गावांतील रस्ते, घाट, पिण्याचे आणि शेतीसाठीचे पाणी, शिक्षण अशा पायाभूत सुविधा पुरवण्याला प्राधान्य दिले. याशिवाय प्राथमिक शिक्षण गुणवत्तापूर्ण, दर्जेदार मिळण्यासाठी शैक्षणिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. जिल्हा परिषदेच्या १९०० शाळा डिजिटल झाल्या असून संरक्षण भिंत, क्रिडांगण, इमारत दुरूस्तीचा व्यापक कार्यक्रम हाती घेतला आहे.'

जि. प. शिक्षण सभापती अंबरिष घाटगे म्हणाले, 'जिल्ह्यातील ९२ शाळा खोल्या बांधण्यात आल्या असून शाळा दुरूस्तीचा ८ कोटींचा निधी मिळाला आहे.' यावेळी संवेदना सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष राहुल चिकोडे यांनी शैक्षणिक साधन संच उपक्रमाची माहिती दिली. चेतना अपंगमती विकास संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष पवन खेबुडकर यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. मुख्याध्यापक विजयकुमार केंद्रे यांनीही मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी ३०० शाळांना शैक्षणिक संच साहित्य देण्यात आले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसुळ, पणनचे विशेष लेखापरीक्षक बाळासाहेब यादव यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांनी आभार मानले.

--------------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमचा निधी, आम्हाला द्या

$
0
0

प्रहार क्रांती अपंग संघटनेची आयुक्तांकडे मागणी

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दिव्यांगांना विविध सुविधा प्राप्त करुन देण्यासाठी दरवर्षी अपंग कल्याण निधीची तरतूद केली जाते. राज्य सरकारकडून मिळणारा निधी दिव्यांगांसाठीच खर्च करावा, अशी मागणी प्रहार क्रांती अपंग संघटनेच्यावतीने सोमवारी आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्याकडे केली. अपंगांसाठी कृती आराखडा तयार केला असून त्यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन आयुक्तांनी केले. पण याबाबत समाधान न झाल्याने संघटनेने सायंकाळी महापालिका चौकात प्रशासनाचा निषेध केला.

राज्य सरकारकडून महापालिकेला मिळालेल्या अपंग कल्याण निधीमधील अनुक्रमे ५० लाखांचा निधी लिफ्ट व ७० लाखांचा निधी केएमटीकडे वर्ग केल्याची माहिती संघटनेला मिळाली. याबाबत त्यांनी आयुक्तांना पत्रव्यवहार करुन निधी अपंगावर खर्च करण्याची मागणी केली. तसेच निधी खर्च न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर आयुक्तांनी संघटनेला सोमवारी (ता. ५) चर्चेसाठी बोलवले. 'दिव्यांगासाठी असलेल्या निधीतून शिवाजी मार्केटमध्ये लिफ्ट बसवण्यात येणार आहे. लिफ्टचा दिव्यांगांना फायदा होईल का? केएमटीमधून आम्ही प्रवासच करत नसताना आमच्या हक्काचा निधी कशासाठी दिला? आमचा निधी आम्हास द्या, तो इतरत्र खर्च करु नका, अशी मागणी त्यांनी केली.

शिष्टमंडळात देवदत्त माने, कल्पना वावरे, जानकी मोकाशी, उज्ज्वला चव्हाण, संजयसिंह जाधव, संदीप दळवी, प्रशांत म्हेतर, विकास चौगुले, विनायक सुतार आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बांधकाम कामगारांसाठीमेडिक्लेम योजना सुरू करा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

भाजप सरकारने २०१५ मध्ये बंद केलेली बांधकाम कामगारांची मेडिक्लेम योजना पुन्हा सुरू करावी, या मागणीसह अन्य मागण्यांचे निवेदन लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेच्यावतीने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना दिले. कामगारांच्या मागण्यांबाबत लवकरच बैठक घेऊन प्रश्न सोडवू, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले.

संघटनेच्यावतीने कामगारांच्या मागण्यांसाठी सातत्याने आंदोलने सुरू आहेत. पण सरकारी यंत्रणेने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने संघटनेने पालकमंत्री पाटील यांच्या ताराराणी चौकातील सरकारी विश्रामगृहातील कार्यालयावर सोमवारी मोर्चाचा इशारा दिला होता. त्यादृष्टीने जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने ताराराणी विश्रामगृहाच्या परिसरात जमले. पालकमंत्री पाटील यांचे दिवसभर कार्यक्रम असल्याने त्यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना हॉटेल पॅव्हेलियन येथे सुरू असलेल्या कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सच्या कार्यक्रमस्थळी भेटण्याची विनंती केली. कार्यक्रम संपल्यावर जिल्हा कार्याध्यक्ष चंद्रकांत यादव, अध्यक्ष भरमा कांबळे, सचिव शिवाजी मगदूम यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पालकमंत्र्यांची भेट घेऊन निवेदन दिले.

निवेदनात म्हटले आहे की, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात बांधकाम कामगारांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन केले. मेडिक्लेमसह २४ योजना सुरू केल्या. पण भाजप महायुती सरकारने २० ऑगस्ट २०१५मध्ये मेडिक्लेम योजना बंद केली. ही योजना तातडीने सुरू करावी. कामगारांना घरबांधणीसाठी १० लाख रुपये अनुदान द्यावे, १० हजार रुपये दिवाळी भेट द्यावी, ६० वर्षांवरील कामगारांना पाच हजार रुपये पेन्शन देण्याची मागणी केली. पालकमंत्र्यांनी संघटनेच्या शिष्टमंडळाशी अर्धा तास चर्चा केली. मागण्यांबाबत लवकरच बैठक घेतली जाईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर शिष्टमंडळाने विश्रामगृहावर येऊन ठिय्या मांडलेल्या कामगारांना मंत्री पाटील यांच्याशी झालेल्या चर्चेची माहिती दिली. मागण्यांबाबत सहानभुतीपूर्वक विचार न झाल्यास तीव्र आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला. यावेळी भगवानराव घोरपडे, संदीप सुतार, विक्रम खतकर, आनंदा कराडे, दत्ता गायकवाड, कुमार कागले आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तयार फराळाला वाढली मागणी

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

यंदाच्या दिवाळीमध्ये तयार फराळ व्यवसायात मोठी उलाढाल सुरू आहे. बुंदी लाडूला सर्वाधिक मागणी असून कुरकुरीत, खुशखुशीत चकली व बाकरवडीलाही ग्राहकांची पसंती मिळत आहे.

घरोघरी फराळ तयार करण्याची तयारी सुरू असली तरी नोकरदार वर्ग, विद्यार्थी वर्गाचा तयार फराळ खरेदीकडे कल वाढला आहे. फराळ तयार करण्यासाठी मोठी प्रक्रिया असल्याने वेळ देणे नोकरदार महिलांना अशक्य असते. तसेच ज्यांच्या घरी लहान मुले असतात त्या कुटुंबाकडूनही तयार फराळ खरेदी केला जातो असे दुकानदारांनी सांगितले. तसेच काही ग्राहक फक्त बुंदी लाडू, बाकर वडी, चिवडा हे विशिष्ट पदार्थच खरेदी करतात. बुंदी लाडू तयार करण्यासाठी बुंदी पाडणे, पाक जमणे, लाडू वळणे या प्रक्रिया किचकट व वेळखाऊ असल्याने तयार बुंदी लाडूला मागणी आहे. काही ग्राहक फक्त तयार बुंदी खरेदी करून घरी लाडू बनवतात. रवा, बुंदी आणि बेसन लाडूचे दर तेल, तूप ड्रायफूटसचा वापर करण्यावर ठरतात.

शहर व उपनगरात तयार फराळ विक्रीचे १०० हून अधिक दुकाने आहेत. पराज्यातील राजस्थानी, गुजराती मिठाई दुकानदारांकडून तयार फराळाबरोबर मिठाई तयार करण्याकडे कल आहे. शहरात तयार फराळ विक्रीची सुरुवात जोतिबा रोडवरील राधेश्याम मंगल कार्यालयाजवळील वसंतराव जोशी यांनी १९७२ मध्ये सुरू केली. आज या उपक्रमाला व्यवसायाचे रुप आले आहे. महाद्वारातील दगडू बाळा भोसले यांचा बुंदी लाडू प्रसिद्ध आहे. शाहूपुरीतील 'वहिनी' येथील बाकरवडी ऑल सिझन फेव्हरेट आहे. बिंदू चौक दुर्गा रोडवरील माधुरी बेकरी, महाद्वार रोडवरील दीपक, भाऊसिंगजी रोडवरील विजय भुवन, जसवंत या दुकातील तयार फराळांना मोठी मागणी आहे. राधेश्याम कॅटरर्सची पुडाची वडी खरेदीसाठी ग्राहक संभाजीगरात धाव घेत आहेत. सर्व मिठाई दुकानदारांनी तयार फराळ विक्री सुरु केली आहे.

तयार फराळ खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. ग्राहकांना ताजे, रुचकर पदार्थ देण्याचा प्रयत्न केला जात आहे. बुंदी लाडूला सर्वाधिक मागणी असून दोन ते तीन दिवसांपूर्वी तयार केलेले पदार्थ दिले जातात.

चंद्रकांत वडगावकर, व्यावसायिक

तयार फराळ देण्याची संकल्पना आमचे आजोबा वसंतराव जोशी यांनी सुरू केली. आजही त्यांनी सुरू केलेली परंपरा कायम आहे. तयार फराळ खरेदी करणारा ग्राहक चोखंदळ आहे. फराळातील विशिष्ट पदार्थाची चव चाखण्यासाठी ग्राहकांची पैसे खरेदी करण्याची तयारी आहे.

गौरव जोशी, व्यावसायिक

फराळाचे दर (प्रतिकिलो)

करंजी: ४०० रु.

बुंदी लाडू: २०० ते ४०० रु.

रवा लाडू: २०० ते ४०० रु.

बेसन: २४० ते ४०० रु.

चिवडा: २४० ते २८० रु.

बाकरवडी: २८० रु.

पुडाची बाकरवडी: ३४० रु.

चकली: २८० रु.

शंकरपाळी : २४० रु.

अनारसे: ४०० रु.

शेव : २०० रु.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दोन जुगार क्लबवर इचलकरंजीत छापा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

गावभाग व शिवाजीनगर पोलिसांनी रविवारी मध्यरात्री दोन ठिकाणी जुगार क्लबवर छापा टाकून १८ जणांना अटक केली. कारवाईत रोख रकमेसह वाहने, मोबाइल असा ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

गावभाग पोलिसांनी वर्धमान चौकातील एका यंत्रमाग कारखान्याच्या शेडमधील क्लबवर टाकलेल्या छाप्यात सातजणांना अटक करण्यात आली. रोख ७ हजार रुपये, ४ मोबाइल, २ मोटरसायकली असा ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.शिवाजीनगर पोलिसांनी चंदूर (ता. हातकणंगले) गावचावडीजवळ सुरू असलेल्या जनावरांच्या गोठ्यातील क्लबवर छापा टाकून १० जणांना अटक केली. कारवाईत रोख ९ हजार रुपये, ५ मोबाइल असा ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जागेच्या वादातून दोन गटात मारामारी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

जागेच्या वादातून जंगमवाडी (ता. हातकणंगले) येथे दोन गटात झालेल्या मारामारीत सातजण जखमी झाले. त्यातील शिवाजी सदाशिव साळुंखे, दादासाहेब शिवाजी साळुंखे हे दोघे गंभीर जखमी असून सुमित्रा शिवाजी साळुंखे, सोनाबाई सुभाष साळुंखे, शेखर बापू खोत, चिदानंद व सदानंद अशी जखमींची नावे आहेत. शिवाजीनगर पोलिसात या प्रकरणी परस्परविरोधी फिर्यादी दाखल आहेत.

पोलिसांनी सांगितले की, जंगमवाडीत शेखर खोत व शिवाजी साळुंखे यांच्यातील जागेचा वाद न्यायप्रविष्ट आहे. या प्लॉटमध्ये साळुंखे यांनी शौचालय बांधले आहे. शौचालयावरील पत्रे काढून साळुंखे स्लॅब टाकत असल्याचे समजताच त्याला खोत यांनी विरोध केला. त्यातून मारामारी झाली. त्यामध्ये शेखर यांचा मुलगा चिदानंद याने कोयत्याने तर सदानंद याने तलवारीने डोक्यात, हातावर वार केल्याने दादासाहेब साळुंखे तसेच कोयत्याने हाताच्या तळव्यावर वार झाल्याने शिवाजी साळुंखे गंभीर जखमी झाले. वाद सोडविण्यासाठी आलेल्या सुमित्रा खोत व सोनाबाई खोत यांनाही मारहाण करण्यात आल्याची फिर्याद अमोल शिवाजी साळुंखे याने दिली.

शेखर खोत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शिवाजी साळुंखे, त्यांची मुले दादासाहेब, अमोल यांनी शेखर खोत व त्यांची मुले चिदानंद, सदानंद यांना लोखंडी गजाने डोक्यात मारहाण केली. ठार मारण्याची धमकी दिली. यात तिघे जखमी झाले. गंभीर जखमींवर कोल्हापुरात उपचार सुरू आहेत. रात्री उशीरापर्यंत कोणालाही अटक करण्यात आली नव्हती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खोलखंडोबा परिसरात पार्किंग स्लॉट

$
0
0

वाहतूक कोंडीला बसणार आळा : आणखी स्लॉट वाढवण्याची मागणी

फोटो आहे

Maruti.Patil

@timesgroup.com

tweet: @MarutipatilMT

कोल्हापूर :

शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महापालिकेने खोलखंडोबा प्रभागातील पद्माराजे शाळेच्या ग्राऊंडमध्ये (शनिवार पेठ) पार्किंग स्लॉट विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून गाडी अड्ड्यात इस्टेट विभाग पार्किंग स्लॉट विकसित करणार आहे. खोल खंडोबा येथील नव्या पार्किंग स्लॉटमुळे गंगावेश, पापाची तिकटी व रंकाळावेश येथील वाहतूक कोंडीची समस्या काहीअंशी निकालात निघेल.

अंबाबाई मंदिर, रंकाळा, न्यू पॅलेस, टॉऊन हॉल बाग आदी प्रेक्षणीय स्थळे आणि शहराला लाभलेल्या ऐतिहासिक वारशामुळे शहरात वर्षभर पर्यटकांचा राबता असतो. सुटी आणि सणासुदीच्या काळात पर्यटकांची गर्दी जास्त होते. त्यामुळे स्थानिक अन् पर्यटकांच्या वाहनांमुळे अनेकवेळा महत्त्वाच्या मार्गावर वाहतूक कोंडी होते. शहरातील अरुंद रस्ते, पार्किंगसाठी उपलब्ध कमी जागा आदी कारणांमुळे दिवसेंदिवस या समस्येत वाढच होत आहे. प्रादेशिक विकास आराखड्यांमध्ये अनेक पार्किंगच्या जागा प्रस्तावित केल्या आहेत. मात्र आराखड्यावर मोठ्या प्रमाणात हरकती घेतल्या असल्याने याची अंमलबजावणी होण्यास बराच कालवधी लागणार आहे. परिणामी इस्टेट विभागाने पद्माराजे शाळा व गाडी अड्डा येथे पार्किंग स्लॉट विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे.

रंकाळा, रंकाळा स्टँड, गंगावेश व पापाची तिकटी येथे रस्त्याच्या दुतर्फा वाहने लावलेली असतात. शहरात येणाऱ्या वाहनांना जागा नसल्याने रस्त्याच्या बाजूला लावलेल्या वाहनांमुळे वाहतुकीवर ताण येतो. किमान या परिसरातील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी बंद पडलेल्या पद्माराजे शाळेच्या मैदानाचा वापर करण्यात येणार आहे. सुमारे शंभर वाहने पार्किंग करता येथील एवढ्या जागेचा ठेका देण्यात येणार आहे. याबरोबरच तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून गाडी अड्डा येथील पार्किंग विकसित करण्यात येणार आहे. दोन्ही जागा नव्याने विकसित होणार असल्याने किमान या परिसरातील वाहतूक समस्येवर मार्ग निघण्याची शक्यता असून महापालिकेच्या उत्पन्नातही भर पडणार आहे.

..........................

चौकट

राजारामपुरीत पार्किंगची गरज

गेल्या काही वर्षांत राजारामपुरीमध्ये कपडे, ज्वेलरी मार्केटबरोबरच अद्ययावत हॉस्पिटलची संख्या वेगाने वाढत आहे. परिणामी राजारामपुरीत रहदारी वाढत असून वाहतूक कोंडी होत असते. यावर उपाय म्हणून अनेक रस्ते एकेरी वाहतुकीसाठी खुले केले आहेत. मात्र येथे मोठा पार्किंग स्लॉट नसल्याने वाहनधारक रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहने लावतात. त्यामुळे एकेरी वाहतुकीचा फारसा फायदा वाहनधारकांना झालेला नसून वाहतूक कोंडी दूर झालेली नाही. सणासुदीच्या दिवसात तर यामध्ये अधिक वाढ होते. परिणामी या भागात पार्किंग स्लॉट तयार करावेत, अशी मागणी पुढे येवू लागली आहे.

..................

चौकट

सध्याचे पार्किंग स्लॉट

केएमटी विभाग : रंकाळा पदपथ, खराडे डी.एड कॉलेज, कपिलतीर्थ मार्केट, भाऊसिंगजी रोड, प्रादेशिक परिवहन कार्यालय, अयोध्या पार्क, बिंदू चौक.

इस्टेट विभाग : मध्यवर्ती बसस्थानक, विद्यापीठ हायस्कूल परिसर, बाबूजमाल

................................

कोट

'महापालिकेच्या इस्टेट विभागाच्यावतीने गाडी अड्डा व पद्माराजे शाळा (खोलखंडोबा) पार्किंग स्लॉट विकसित करण्यात येणार आहेत. तसेच प्रादेशिक विकास योजनेतील आराखड्यानुसार पार्किंगच्या जागा निश्चित केल्या जाणार आहेत.

प्रमोद बराले, इस्टेट विभाग प्रमुख

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारखानदारांसोबत दरमहा संवाद साधणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'व्यापार, व्यवसाय, कारखानदारीवर रोजगार निर्मिती आणि विकास अवलंबून आहे. इंडस्ट्रीच्या विकासासाठी सरकार प्रयत्नशील आहे. कोल्हापुरातील व्यावसायिक, कारखानदारांच्या अडचणी सोडविण्यासाठी दर महिन्याला संबंधित खात्यांचे अधिकारी व व्यापारी, व्यावसायिकांची संयुक्त बैठक घेतली जाईल. नियमित संवाद साधून इंडस्ट्रीच्या विकासाला चालना देऊ' अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. 'महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज् अँड अॅग्रिकल्चर'तर्फे १५ ते १८ डिसेंबर या कालावधीत 'वेस्टर्न महाराष्ट्र कन्व्हर्जन्स' या औद्योगिक प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. हे चार दिवसीय प्रदर्शन शाहूपुरी जिमखाना येथे होणार आहे. हॉटेल पॅव्हेलियन प्रदर्शनाच्या माहिती पत्रिकेचे प्रकाशन मंत्री पाटील यांच्या हस्ते सोमवारी झाले.

पालकमंत्री पाटील म्हणाले, 'मेक इन महाराष्ट्रच्या धर्तीवर मेक इन वेस्टर्न महाराष्ट्र या उद्योग क्षेत्राशी निगडीत प्रदर्शनामुळे स्थानिक, देशभरातील व्यवसायाचे आदान-प्रदान होईल. शेतीक्षेत्राचाही विकास झाला पाहिजे. सोबत इंडस्ट्रीही वाढल्या तरच रोजगार निर्मितीसोबत अर्थार्जन वाढीस लागते. सरकारचे औद्योगिक प्रदर्शनाला सहकार्य राहील.'

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष ललित गांधी म्हणाले, 'औद्योगिक प्रदर्शनाच्या उद्घाटनला केंद्रीय उद्योग मंत्री सुरेश प्रभू उपस्थित राहणार आहेत. तसेच उद्योग क्षेत्राशी निगडीत असलेल्या प्रदर्शनामध्ये राज्य आणि देशासह विदेशातील नामांकित कंपन्यांचा समावेश असणार आहे. कोल्हापुरातील गूळ क्लस्टरला मान्यता मिळाली आहे. पालकमंत्री पाटील यांनी सरकार दरबारी वजन वापरुन गुळ क्लस्टर सुरु करावे. कोल्हापुरातील फाऊंड्री उद्योगाचा देशभर गवगवा आहे. संरक्षण दलासाठी आवश्यक शस्त्रास्त्रे बनविण्यासाठी आवश्यक उत्पादने बनविण्याची क्षमता येथील इंडस्ट्रीजमध्ये आहे. कोल्हापुरात 'डिफेन्स क्लस्टर'ची निर्मिती केल्यास येथील फाऊंड्री उद्योगाला आणखी चालना मिळेल.सरकारने यासाठी पाठपुरावा करावा.'

कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय शेटे, 'स्मॅक'चे अध्यक्ष राजू पाटील, गोशिमाचे अध्यक्ष लक्ष्मीदास पटेल, कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे, जयेश ओसवाल, उद्यम सोसायटीच्या संगीता नलवडे व्यासपीठावर होते. कार्यक्रमाला प्रताप पुराणिक, शिवाजीराव पोवार, धनंजय दुग्गे, प्रदीप कापडिया, प्रकाश केसरकर, महावीर गाठ, नितीन धूत, प्रकाश शहा, स्वप्नील शहा आदी उपस्थित होते.

विमानसेवेचे घोडे अडलयं...

'कोल्हापुरातील विमानसेवा सुरळीत होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यातील तीन खासदार त्यासाठी पाठपुरावा करत आहेत. तरीही नियमित विमानसेवेचा प्रश्न मार्गी लागत नाही' असे सांगून पालकमंत्री पाटील म्हणाले, 'विमानसेवेचे घोडे नेमके कुठे अडलंय? हे पाहण्यासाठी मी दिल्लीला जाणार आहे. यात मी स्वत: लक्ष घालणार आहे.'

अधिकाऱ्यांची नकारात्मक मानसिकता

'अधिकाऱ्यांनी प्रत्येक काम सकारात्मक भूमिकेतून केले पाहिजे. त्यासंदर्भात केंद्र सरकार आयएएस अधिकाऱ्यांना रितसर प्रशिक्षण देते. मात्र काहीजणांची नकारात्मक मानसिकता पाहिली की कोणतेही काम होऊ नये याचे प्रशिक्षण त्यांना दिले जाते का? असा प्रश्न पडतो' अशी टीका पालकमंत्री पाटील यांनी केली. ते म्हणाले, 'त्यामुळे अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम तपासण्याची मला उत्सुकता आहे. त्यासाठी मी लवकरच मसुरीला जाणार आहे. नियमांचा बागुलबुवा करत निधी खर्च न करण्याची अधिकाऱ्यांची भूमिका योग्य नाही. सरकारचा पैसा एफडी रुपात ठेवता येईल का? हेच अधिकारी पाहतात. सरकारचा निधी लोकोपयोगी कामांसाठी खर्च झाला पाहिजे. वास्तविक लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक करणे म्हणजे सरकारचे हित आहे हे त्यांनी जाणावे. '

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंढरपूरजवळ दोन बसना अपघात, १९ प्रवासी जखमी

$
0
0

पंढरपूर:

दिवाळीसाठी पुण्याहून बार्शी आणि लातूरकडे निघालेल्या दोन बसना आज पहाटे वेगवेगळ्या ठिकाणी अपघात झाला. यात १९ प्रवासी जखमी झाले आहेत. हे दोन्ही अपघात चालकाला झोप अनावर झाल्यानं झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.

पुणे येथून बार्शीकडे निघालेल्या एसटी बसला टेंभुर्णी कुर्डुवाडी रस्त्यावर अपघात झाला. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. यात १२ प्रवासी जखमी झाले. त्यातील सात प्रवासी गंभीर जखमी असून, त्यांच्यावर टेंभुर्णी आणि सोलापूर येथील रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. तर पुणे येथून लातूरकडे निघालेली खासगी बस इचगावजवळ उलटली. यात सात प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात हलवले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रा. मंडलिक यांनी घेतली कोरेंची भेट

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, वारणानगर

शिवसेनेचे नेते प्रा. संजय मंडलिक यांनी सोमवारी जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक, नेते डॉ. विनय कोरे यांच्याशी बंद खोलीत चर्चा केली. आगामी लोकसभा निवडणुकीत मंडलिक आणि खासदार धनंजय महाडिक अशी थेट लढत होईल हे गृहीत धरून चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जात आहे. आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी भेट घडवून आणण्याचे आश्वासन कोरे यांनी महाडिक यांना दिल्याची चर्चा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्याधिकारी, अधिकारी म्हणजे कारभार नव्हे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कागल

'निपाणी वेस येथे छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारावयाचा आहे. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारताना आवश्यक ठरलेल्या कागदपत्रांची फाइल मागितली होती. ती देण्यास प्रशासन जाणीवपुर्वक टाळाटाळ करीत आहे. अन्य कामांतही प्रशासनाचे सहकार्य मिळत नाही. मुख्याधिकारी आणि अधिकारी म्हणजे नगरपालिका कारभार नव्हे', अशी टीका सत्तारुढ गटाचे पक्षप्रतोद नितीन दिंडे यांनी दिला. पालिकेच्या सर्वसाधारण सभेत त्यांनी प्रशासनाच्या कारभाराचे वाभाडे काढले. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा माणिक माळी होत्या. 'पदाधिकारी, सदस्यांच्या मतांचा विचार झाला पाहिजे. तसे न झाल्यास कोणताही मुलाहिजा न ठेवता, प्रसंगी अधिकार्‍यांच्या कार्यालयाला टाळे ठोकू' असा इशारा त्यांनी दिला.

कागल पालिकेच्या शाहू नगर वाचनालयात झालेल्या सर्वसाधारण सभेसमोर नियोजित २२ विषय होते. प्रशासन अधिकारी तथा मुख्याधिकारी टीना गवळी, उपनगराध्यक्ष प्रविण काळबर उपस्थित होते. अभिजित गोरे यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले.

दिवाळी आणि गहिनीनाथ उरुसाच्या पार्श्वभूमीवर सभेत वाद टाळण्याचे आवाहन विरोधी पक्षनेते विशाल पाटील यांनी केले. '२०१०मध्ये हद्दवाढ झाल्याने शेती-शिवारात बांधलेल्या झोपड्या किंवा तात्पुरता निवारा, घरे असलेल्यांपैकी ज्यांना नगरपालिकेच्या सुविधा मिळत नाहीत अशा मिळकतधारकांचा कर कायमस्वरुपी रद्द करावा यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न चालू आहेत' असे उपनगराध्यक्ष प्रविण काळबर यांनी सांगितले. २०१०ला झालेल्या हद्दवाढीनंतर काही नागरिकांनी पालिकेचा कर भरलेला नाही. त्यावर व्याज आकारणी केली आहे. ही व्याज आकारणी रद्द केली असल्याने मिळकतधारकांनी उर्वरित रक्कम भरावी असे यावेळी ठरले.

'अखिलेश पार्क येथील नगरपरिषद मालकीच्या दोन खुल्या जागांपैकी एका जागेत शासकीय अनुदान प्राप्त झाल्यानंतर ब्राह्मण समाजाचा हॉल बांधण्याचा आहे. दुसरी खुली जागा मराठा भवनसाठी राखीव ठेवण्याचे ठरले आहे. पंतप्रधान आवास योजनेत शासनाने जनतेची दिशाभूल केली आहे' असे प्रविण काळबर यांनी सांगितले. यावर विरोधी पक्ष नेते विशाल पाटील म्हणाले, 'शासनाच्या नावाने ओरड करू नका. योजना समजून घ्या आणि मगच त्यावर बोला.'

यावेळी मोहद्दीन जमादार यांच्या मिळकतीतून सांडपाण्याची निर्गत करणे, तज्ज्ञ आर्किटेक्ट्सचे पॅनेल तयार करणे यांसह अन्य विषयांना सभागृहाने मंजुरी दिली. चंद्रकांत गवळी, विवेक लोटे, सुरेश पाटील, विजया निंबाळकर, सतीश घाडगे, प्रविण कदम, मंगल गुरव आदींनी चर्चेत सहभाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उदगाव येथे जुगार अड्ड्यावर छापा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा,जयसिंगपूर

उदगाव (ता. शिरोळ) येथे अकिवाटे औद्योगिक वसाहतीलगत कला, क्रीडा, सांस्कृतिक मंडळाच्या नावाखाली चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर जयसिंगपूर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत शिरोळ पंचायत समितीच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यासह नऊ जणांना अटक केली. रोख रक्कमेसह तीन लाख २९ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

महेश रामनिवास मिणीयार (वय ३६, रा. पाचवी गल्ली जयसिंगपूर), अनिल सिध्दराम ओमासे (४३, रा. बेघर वसाहत उदगाव), सचिन आण्णासाहेब मगदूम (३१, रा. पाटील गल्ली, उदगाव), विनोद पांडूरंग सातपुते (वय ३२, रा. गुरुवार पेठ मिरज), संतोष शिवाजी नाळे (२६, रा. मच्छीमार्केट जयसिंगपूर), अशोक महादेव पाटील (३८, रा. नववी गल्ली, जयसिंगपूर), अक्षय उर्फ आकाश यशवंत धामणे (२१, रा. पंचमुखी हनुमान मंदिरजवळ, शाहूनगर), राजू किसन भोसले (४६, बायपास रोड, विभुते शाळेजवळ जयसिंगपूर), मुकेश उध्दव चव्हाण (३५, रा. सहावी गल्ली, राजीव गांधीनगर जयसिंगपूर) अशी त्यांची नावे आहेत. यातील अनिल ओमासे हा शिरोळ पंचायत समितीचा शिक्षण विस्तार अधिकारी आहे.

पोलिसांनी सांगितले की, महेश मिणियार हा साई मंडळाचा अध्यक्ष आहे. तो अकिवाटे औद्योगिक वसाहतीनजीक निकम मळ्यात हे केंद्र चालवितो. येथे पैसे लावून जुगार खेळला जात असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक नामदेव शिंदे यांना मिळाली. पोलिसांनी सायंकाळी साडेचार वाजता केंद्रावर छापा टाकला. कारवाईत नऊ जणांना अटक करण्यात आली. याचबरोबरच ७८ हजार ६५० रुपये, ११ मोबाईल संच, पाच मोटारसायकल, एलईडी स्क्रिनसह खुर्च्या, टेबल, तिजोरी, पत्त्याची पाने असा ३ लाख २९ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. उपनिरीक्षक सुरेश नलवडे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीरशैव माळी समाज मेळावा

$
0
0

कोल्हापूर

अखिल भारतीय वीरशैव माळी समाजोन्नती परिषद, शिवप्रसाद विकास परिषद सांगली आणि शिवप्रसाद नागरी सहकारी पतसंस्थेमार्फत रविवारी (ता.११) वीरशैव माळी समाजाचा वधू्-वर मेळावा आयोजित केला आहे. वीरशैव माळी मंगल कार्यालय, लक्ष्मी मंदिराजवळ कुपवाड रोड सांगली येथे सकाळी ११ वाजता हा मेळावा होणार आहे. सांगली, सातारा,कोल्हापूर, सोलापूर,पुणे, मुंबई, विजापूर, बेळगाव येथील नागरिक यामध्ये सहभागी होणार आहेत. समाजाने या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन माळी समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष विजयराव धुळूबुळू, कार्याध्यक्ष अण्णासाहेब माळी यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वच्छतागृहांच्या टापटीपवर प्रशासनाचा वॉच

$
0
0

शाळा-मुख्याध्यापकांना स्पष्ट सूचना,वर्षभरात शाळा दुरुस्तीवर आठ कोटी खर्च

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने शाळेतील स्वच्छतागृहांची निगा, नियमित स्वच्छता याबाबी जिल्हा परिषदने गांभीर्याने घेतल्या आहेत. शाळा व मुख्याध्यापकांना स्वच्छतागृहांच्या टापटीपणाविषयी स्पष्ट सूचना केल्या आहेत. प्रत्येक शाळेत मुला, मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची उपलब्धता करण्यावर भर असल्याची माहिती शिक्षण समिती सभापती अंबरिश घाटगे यांनी दिली. गेल्या वर्षभरात आठ कोटी रुपये खर्च करुन २४० शाळांची दुरुस्ती झाल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हा परिषदेच्या मालकीच्या जिल्ह्यात जवळपास दोन हजार शाळा आहेत. प्रत्येक शाळेत स्वच्छतागृहे आहेत, मात्र अनेक ठिकाणी त्यांची देखभाल, दुरुस्ती होत नाही. स्वच्छतागृहातील अस्वच्छतेमुळे मुलांच्या आरोग्यविषयक समस्या निर्माण होत असल्याच्या तक्रारी आहेत. याबाबत सभापती घाटगे म्हणाले, ' मुख्याध्यापकांना मुलांच्या आरोग्याचा विचार करुन स्वच्छतागृहासंबंधी स्पष्ट आदेश दिले आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी स्वच्छतागृहांच्या देखभालीकडे विशेष लक्ष देण्याची सूचना शाळांना केली आहे. 'माझी शाळा, समृध्द शाळा'अभियान अंतर्गत शाळेची गुणवत्ता आणि भौतिक सुविधांवर भर आहे. ज्या शाळा डिजीटल बनलेल्या नाहीत अशा शाळा वर्षभरात डिजीटलयुक्त केल्या जातील. प्रत्येक शाळेत प्रयोगशाळा, प्रत्येक वर्गात एलईडी प्रोजेक्टचे नियोजन आहे. लोकसहभागातून शाळांचा विकास हे सूत्र ठरविले आहे. राधानगरी तालुक्यातील कासारवाडा येथील विनायक राऊत यांनी जिल्हा परिषद शाळांना ५१ लाख रुपयांची मदत केली आहे. सावर्डे बुद्रुक येथील श्रीकांत जिरगे यांनी वीस लाख रुपयांचे साहित्य दिले आहे.'

.................

'तो' शिक्षक शाळेच्या

आवारात दिसणार नाही

'बोळावी येथील शाळेत विद्यार्थिनीशी गैरवर्तन करणाऱ्या शिक्षक सुनील कांबळेवर कारवाई झालीच पाहिजे. त्याच्या विरोधात यापूर्वी तक्रारी झाल्या आहेत. विद्यार्थिनीसोबत गैरवर्तनाचा प्रकार खपवून घेणार नाही. कारवाईसाठी प्रसंगी लोकचळवळ उभारु. संबंधित शिक्षक शाळेच्या आवारात पुन्हा दिसणार नाही अशा पध्दतीने प्रशासकीय कारवाई करायला भाग पाडू', असेही सभापती घाटगे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन जुगार अड्डयांवर छापा

$
0
0

इचलकरंजी : वेगवेगळ्या ३ जुगार अड्ड्यांवर धाडी टाकून १४ जणांना ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत १४ मोबाईल, २ मोटरसायकली आणि सुमारे ३५ हजारांची रोकड जप्त करण्यात आली. सहाय्यक पोलिस अधिक्षक निलाभ रोहन यांच्या पथकाने सोमवारी रात्री पुन्हा ३ ठिकाणी जुगार अड्ड्यांवर धाडी टाकल्या. यामध्ये शहापूर पोलिस ठाणे हद्दीतील गणेशनगर गल्ली नंबर ९ येथे छापा टाकून चौघांना अटक केली. त्यांच्याकडून १८ हजाराची रोकड, २ मोटरसायकली, रोकड असा सुमारे ५० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. कोरोची येथील कुंभार गल्लीत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून ८ जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत ८ मोबाइल, ११ हजारांची रोकड जप्त केली. गावभाग पोलिस ठाणे हद्दीतील फुले पुतळ्याजवळील आवळे गल्लीत रस्त्यावरच सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून दोघांना ताब्यात घेण्यात आले. यावेळी ८ जणांनी पलायन केले मात्र, त्यांची नावे निष्पन्न झाल्याने १० जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. या कारवाईत ३ मोबाईल, ५ हजांराची रोकड जप्त करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘प्रतिभा’ दिवाळी अंकाचे प्रकाशन

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

'वाचनासारखा विषय घेऊन नामवंतांना लिहिते करून 'प्रतिभा दिवाळी अंकाने नव्या पिढीला दिशा देण्याचे काम केले आहे,' असे प्रतिपादन लेखिका सोनाली नवांगुळ यांनी केले. सांगली जिल्ह्यातून प्रकाशित होणाऱ्या प्रतिभा दिवाळी अंकाच्या प्रकाशनावेळी त्या बोलत होत्या.

प्राचार्य डॉ. दीपा देशपांडे यांच्यासह सतीश चौगुले, एकनाथ पाटील, श्यामसुंदर मिरजकर, राजा माळगी यांनी या अंकाचे संपादन केले आहे. सोनाली नवांगुळ म्हणाल्या, 'प्रतिभा दिवाळी अंकाचे मुखपृष्ठ दर्जेदार आहे. अंकात लक्ष्मीकांत देशमुख, राजन खान, नामवंत लेखकांनी वाचन या विषयावर केलेले लेखन मार्गदर्शक ठरेल असे आहे. याशिवाय कथा, कविता आणि अन्य विषयावरील लेखनही दर्जेदार आहे.' यावेळी अरुण नाईक, चित्रकार अन्वर हुसेन, राहील परवेज आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images