Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

तर अधिकाऱ्यांना अभ्यंगस्नान घालू

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

जिल्ह्यातील धरणे पूर्ण क्षमतेने भरली असून नद्या दुथडी वाहत असताना, केवळ नियोजनाअभावी पाणीपुरवठ्याचा पुरता बोजवारा उडाला आहे. पाणीपुरवठा विभागाच्या गलथान कारभारांमुळे सणासुदीच्या दिवसात नागरिकांना पाण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे. दिवाळीपूर्वी पाण्याचा सुरळीत पुरवठा करा, अन्यथा महापालिका चौकात अधिकाऱ्यांना अभ्यंगस्नान घालू, असा इशारा हिंदुत्ववादी संघटनांनी अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर यांना बुधवारी निवेदनाद्वारे दिला. दरम्यान बी वॉर्ड अन्याय निवारण कृती समितीनेही प्रसिद्धी पत्रकाद्वांरे पाणीपुरवठा विभागावर ताशेरे ओढले आहेत.

निवेदनात म्हटले आहे, 'शिंगणापूर पंपिंग स्टेशनमधील ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाल्यापासून निम्म्या शहरात एक दिवसाआड पाणी देण्यास सुरुवात केली. त्यामुळे ए, बी व निम्म्या ई वॉर्डात टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असताना, जलवाहिनी फुटल्याने ई वॉर्डाचे पूर्णच पाणी बंद झाले. अपुऱ्या पाण्यामुळे विशेषत: महिला वर्गाला ऐन सणात धावाधाव करावी लागत आहे. विस्कळीत झालेल्या पाणीपुरवठ्याला सर्वस्वी पाणीपुरवठा विभाग जबाबदार आहे. नियोजन करून नागरिकांना दिवाळीपूर्वी पाणी न दिल्यास अधिकाऱ्यांना महापालिका चौकातच अभ्यंगस्नान घालू,' असा इशारा शिष्टमंडळाने दिला.

शिष्टमंडळामध्ये किशोर घाटगे, मधुकर नाझरे, शिवानंद स्वामी, महेश उरसाल, मनोहर सोरप, जयवंत निर्मळ, बबन हरणे, प्रमोद सावंत, अवधूत भारंबे, हर्षल पाटील, सुनील सावंत, अशोक रामचंदानी, दीपाली खाडे यांच्यासह शिवसेना, हिंदू महासभा, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, वंदे मातरम यूथ ऑगनायझेशन, हिंदू जनजागृती, महालक्ष्मी भक्त समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान बी वॉर्ड अन्याय निवारण कृती समितीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे पाणीपुरवठा विभागावर ताशेरे ओडले आहेत. पत्रकात म्हटले आहे, 'कोल्हापूर शहर पंचगंगा नदीच्या काठावर वसलेले असून शाहू महाराजांनी केलेल्या जलसंधारणांमुळे शहराला बारमाही पाणी मिळते. पण महापालिकेच्या गलथान कारभारामुळे पाणीपुरवठ्याचे तीन तेरा वाजले आहेत. ऐन सणात कृत्रीम पाणीटंचाई निर्माण करुन नागरिकांना जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे. अधिकाऱ्यांनी यामध्ये जर सुधारणा न केल्यास धडा शिकवण्याचा इशारा पत्रकाद्वारे दिला आहे. पत्रकावर किसन कल्याणकर, रामेश्वर पत्की आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दिवाळीसाठी १० हजार रुपये सानुग्रह देण्याची मागणी

$
0
0

शेकापची कामगार मंत्र्याकडे मागणी

कोल्हापूर टाइम्स टीम

बांधकाम व्यवसाय मंदीच्या छायेत असल्याने कामगार अर्थिक अडचणीत आले आहेत. नोंदणी झालेल्या कामगारांना दिवाळीसाठी दहा हजार रुपये सानुग्रह देण्यात यावे, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाने कामगारमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. माजी आमदार संपतराव पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने कामगार कार्यालयाला निवेदन दिले.

जिल्ह्यात एकच कामगार कार्यालय असल्याने कामगारांची संख्या पाहता गडहिंग्लज, गारगोटी येथे नवीन कार्यालय सुरू करावे, २०१५ पासून बंद असलेली बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्यावतीने वैद्यकीय विमा योजना सुरू करावी, अर्ज केलेल्या कामगारांना लॅपटॉप द्यावेत, बांधकाम कामगारांना घर बांधण्यासाठी पाच लाखाचे अनुदान द्यावे, नोंदणीकृत बांधकाम कामगारांना ६० वर्षानंतर निवृती वेतन लागू करावे, अशा मागण्या करण्यात आल्या. शिष्टमंडळात मधुकर हरेल, दिलीप जाधव, मोहन कांबळे, कृष्णा कांबळे, दिनकर कांबळे, मनीषा कांबळे यांचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावित्रीबाई फुले रुग्णालयाला ‘जीवनदायी’ समितीची भेट

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

महात्मा जोतिबा फुले जीवनदायी आरोग्य योजनेत समावेश होण्यासाठी आवश्यक निकषांची पाहणी करण्यासाठी राज्य सरकारच्या समितीने महापालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालयाला बुधवारी भेट दिली. सहा जणांची समिती आपला अहवाल राज्य सरकारला सादर करणार आहे. समितीचा अहवालानंतर फुले रुग्णालयाचा 'जीवनदायी'मध्ये समावेश होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

तत्कालीन राजीव गांधी आरोग्य योजना व त्यानंतर सुरू झालेल्या महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेत महापालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालयाचा समावेश झालेला नाही. परिणामी महापालिकेच्या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या गोरगरीब रुग्णांना योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागत होते. त्यामुळे संपूर्ण महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. आरोग्य योजनेसाठी लागणारे निकष रुग्णालयाच्यावतीने पूर्ण झालेले नसल्याने उपचार घेणाऱ्या अनेक गोरगरीब रुग्णांना पात्रता असूनही योजनेत समावेश होत नव्हता. सीपीआर रुग्णालय वगळता शहरातील एकाही सरकारी रुग्णालयांच्या योजनेत समावेश नसल्याने संपूर्ण ताण सीपीआर रुग्णालयाच्या आरोग्य यंत्रणेवर पडत होता. परिणामी आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी विशेष लक्ष देवून 'जीवनदायी'चे निकष पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. आयसीयू विभाग, मेडिकल व सर्जिकल वॉर्ड सुसज्ज ठेवण्यासाठी विशेष लक्ष देऊन निधीची तरतूद केली. आठवड्यापूर्वी त्यांनी भेट देऊन रुग्णालयाची पाहणी केली होती. समितीच्या भेटीपूर्वी त्यांनी केलेल्या पाहणीला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते.

आयुक्तांची पाहणीनंतर उर्वरित कामे पूर्ण झाल्यानंतर राज्य सरकारच्या सहा जणांच्या समितीने बुधवारी फुले रुग्णालयाला अचानक भेट दिली. समितीने आयसीयू विभाग, मेडिकल, सर्जिकल वॉर्ड व उपचार घेणाऱ्या रुग्णाची माहिती घेतली. तसेच नोंदणी रजिस्टरची पाहणी केली. समिती आपला अहवाल लवकरच राज्य सरकारला सादर करणार आहे. समितीच्या अहवालनंतरच सावित्रीबाई फुले रुग्णालयाचा 'जीवनदायी'मध्ये समावेश होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

राज्य सरकारच्या या महत्त्वाकांक्षी योजनेतून सुमारे ११०० आजारांवर मोफत उपचार केले जातात. सरकारी व खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना या योजनेचा लाभ मिळतो. पण महापालिकेच्या कोणत्याही रुग्णालयात उपचार घेणाऱ्या गोरगरीब लोकांना योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागत होते. पण समितीने भेट दिल्याने फुले रुग्णालयाचा 'जीवनदायी'मध्ये समावेश होण्याचा मार्ग सुकर होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिवाळीतही परदेशवारी

$
0
0

पर्यटनाला मिळतोय नवा आयाम

कोल्हापूर टाइम्स टीम

शाळांमधील परीक्षा संपत आल्या असून दिवाळीची सुट्टी सुरू होत असल्याने पर्यटन हंगामाला सुरुवात होत आहे. कोल्हापूरच्या पर्यटकाकडून परदेशातील थायलंड, मलेशिया, दुबई सिंगापूर तसेच देशांतर्गत पर्यटनात राजस्थान, केरळ, सिक्कीम, सिमला या ठिकाणास अधिक पसंती दिली जात आहे. त्यामुळे दिवाळीच्या काळातील या ठिकाणांच्या बहुतांश कंपन्यांच्या सहलीचे बुकिंग फुल्ल झाले आहे.

दिवाळी सुट्टीत हमखास पर्यटनासाठी जाण्याची नवी क्रेझ निर्माण झाली आहे. पूर्वी केवळ निसर्गरम्य ठिकाणी तसेच देवदर्शन असा ट्रेड होता. आता त्यात बदल झाले असून 'हटके डेस्टिनेशन' निवडण्यावर अधिक भर दिला जात आहे. 'सहा ते सात रात्री तसेच दहा ते बारा दिवसाची ट्रीप काढली जात आहे. प्रादेशिक पर्यटनात गोवा, केरळ, सिक्कीम, दार्जिलिंग, गंगटोकला अधिक प्राधान्य दिले जात आहे. तसेच यंदा काश्मिरकडे पर्यटकांचा कल कमी झाला असून सिमल्याला अधिक पसंदी दिली जात आहे. पर्यटनासाठी पाच जणांचे ग्रुप किंवा समुहाने जाण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. यंदा दिवाळीची सुट्टी मोठी असल्याने आधीच नियोजन करण्यावर भर दिला आहे. तसेच काहीना सुट्ट्या कमी असल्याने जवळपास असलेल्या ठिकाणांना प्राधान्य देण्यात येत आहे. यासाठी कोकण, कर्नाटक, दक्षिणेतील पर्यटनस्थळे निवडण्यात आली आहेत. हैद्राबादला जाण्याकडे पर्यटकांचा अधिक कल आहे. कोकण किनारपट्टीवरील तारकर्ली, वेंगुर्ला, देवबाग, अलिबाग, गुहागर, वेळणेश्वर, गणपतीपुळे अशा ठिकाणी पसंती दिली जात आहे. तसेच थंड हवेसाठी महाबळेश्वर, माथेरान, लोणावळा, आंबोली, भंडारदरा आदी ठिकाणी सहलीचे नियोजन करण्यात येत आहे. काहीजण वैयक्तिक ट्रीपलाद देखील प्राधान्य देत आहेत.

जंगल टुरिझमला चांगला प्रतिसाद

कोल्हापूर घनदाट जंगलाचा परिसर लाभला आहे. जंगलात अनुभवायला मिळणारी शांतता पर्यटकांना अधिक भावत आहे. त्यामुळे राधानगरी अभयारण्य त्याचबरोबर ताडोबा, नागझिरा, पेंच या ठिकाणांना मोठ्या संख्येने भेट देण्याचे नियोजन केले जात आहे. जिल्ह्यातील आंबा, विशाळगड परिसरात एका दिवसाच्या सहलीचे आयोजन करण्यात तरुणाई गुंग आहे.

यंदा पर्यटनासाठी लोकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. खासकरून दिवाळीच्या सुट्टीत पर्यटनाला अधिक चालना मिळते. डिलक्स टूरकडे अधिक कल असून पंचवीस हजारापासून बुकिंगचे दर आहेत. सोयी आणि दर्जानुसार दरात तफावत आढळते. तसेच मल्टिशेअरिंग करण्याकडे नागरिकांचा कल आहे.

रवी सरदार, डोमेस्टिक टूर ऑपरेटर्स असोसिएशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉक्टर कार्यमुक्त

$
0
0

कोल्हापूर: इचलकरंजी परिसरातील आरोग्य केंद्रामध्ये कुटुंब नियोजन कार्यक्रमांतर्गत लाभार्थ्यांकडून ५०० रुपयांची लाचेची मागणी करणाऱ्या मानसेवी डॉक्टरांना कामावरुन कमी करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत सदस्य अरुण इंगवले यांनी आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी लाभार्थ्यांकडे लाचेची मागणी करत असल्याची तक्रार केली होती. प्रशासनाने या प्रकाराची दखल घेत तातडीने कारवाई केली. मानसेवी अधिकाऱ्याला कामावरुन कमी केले. तसेच आरोग्य केंद्रातील महिला कर्मचाऱ्याला समज दिल्याचे वृत्त आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बळीराजा पुरस्कार पाटील,पोटले, शिंदे यांना जाहीर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

येथील बळीराजा महोत्सव समितीतर्फे बळीराजा सन्मान पुरस्कार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुमन पाटील, शिवराज मंच संघटनेचे संघटक अॅड. सुर्याजी पोटले, अंधश्रध्दा निमूर्लन चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते शिवाजी शिंदे यांना देण्यात येणार आहे. येथील गंगावेश चौकात ८ नोव्हेंबरला सायंकाळी साडेपाच वाजता पुरस्कार वितरण कार्यक्रम होईल, अशी माहिती समितीचे प्रा. टी. एस. पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

प्रा. पाटील म्हणाले, 'समाजातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना प्रत्येक वर्षी हा पुरस्कार दिला जातो. यावर्षी पुरस्कारासाठी निवडलेल्या सुमन पाटील या ५० वर्षांपासून कम्युनिस्ट पक्षात कार्यरत आहेत. सत्यशोधक विचारांचा प्रचार, प्रसार त्या करतात. १९६५ च्या चूल, कचेरी बंद आंदोलनात त्यांचा सहभाग होता. दारूबंदी आंदोलन, जटा निमूर्लन, अंधश्रध्दा निर्मूलन चळवळीत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. अॅड. पोटले हे सत्यशोधक विचारांचा प्रचार करण्यासाठी प्रयत्नशील असतात. त्यांनी संविधान साक्षरता मोहिम राबवली आहे. तर शिंदे हे निपाणीतील चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते असून देवदासी निमूर्लनासाठी त्यांनी विविध कार्यक्रमातून जागृती केली आहे. अशा तिघांचा सन्मान यावेळी करण्यात येणार आहे.' पत्रकार परिषदेस व्यंकाप्पा भोसले, रवी जाधव, संभाजी जगदाळे उपस्थित होते.

---------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बोळावीत शिक्षकाकडून चार मुलींचे लैंगिक शोषण

$
0
0

सिंगल फोटो...

म. टा. वृत्तसेवा, कागल

बोळावी (ता. कागल) येथे प्राथमिक शाळेत पाचवीच्या वर्गात शिकणाऱ्या चार मुलींचे वर्गशिक्षकाकडूनच लैंगिग शोषण झाल्याची खळबळजनक घटना गुरुवारी उघडकीस आली. या घटनेने संतप्त झालेल्या पालकांनी शुक्रवारी सकाळी शाळेच्या आवारात शिक्षकास बेदम चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. सुनील भाऊ कांबळे (वय ४२, रा. बिद्री, ता. कागल) असे या नराधम शिक्षकाचे नाव आहे.

याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी : बोळावी प्राथमिक शाळेत जून २०१८ मध्ये रूजू झालेल्या शिक्षक सुनील भाऊ कांबळे याने पाचवीच्या वर्गात शिकणाऱ्या चार मुलींचे लैगिक शोषण करून याबाबत कुठेही वाचता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. कांबळे हा गेल्या महिन्याभरापासून पीडित मुलींशी लगट करण्याचा प्रयत्न करीत होता. त्याचे कृत्य सहन न झाल्याने मुलींनी मुख्याध्यापक मोहन पाटील यांना याची कल्पना दिली. त्यावर मुख्याध्यापकांनीसुद्धा कांबळेला समज देऊन सोडून दिले. मुख्याध्यापकांकडूनही कांबळेवर कोणतीच कारवाई झाली नसल्याने पीडित मुलींनी घडला प्रकार पालकांना सांगितला. त्यामुळे बोळावी व बोळावीवाडी येथील पालकांनी शाळेत येऊन मुख्याध्यापक व शिक्षक कांबळेला जाब विचारला. त्यावर संबंधितांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन उलट त्यांनी पालकांनाच दरडावले. त्यामुळे संतप्त झालेल्या पालकांनी शिक्षक कांबळेची चांगलीच धुलाई करून त्याला वर्गातच कोंडून ठेवले व घटनेची माहिती मुरगूड पोलिसांना दिली.

दरम्यान, मुरगूड पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक किशोरकुमार खाडे सहकाऱ्यांसमवेत घटनास्थळी आल्यानंतर संतप्त पालकांनी त्यांच्यावरही प्रश्नांचा भडिमार करत शिक्षक कांबळेवर कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन लोकांना शांत केले व पीडित मुलींचा जबाबही घेऊन शिक्षक कांबळेला ताब्यात घेतले. घटनेची नोद मुरगूड पोलिसांत झाली आहे.

०००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात तंबाखू बंदीचा निर्धार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सिगारेट, तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करणे, जिल्हा तंबाखूमुक्तीसाठी प्रयत्न करण्याचा निर्धार शुक्रवारी झालेल्या जिल्हास्तरीय कार्यशाळेत करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित कार्यशाळेचे उद्घाटन अध्यक्षा शौमिका महाडिक यांच्या हस्ते झाले. जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षातर्फे कार्यशाळा आयोजित केली होती.

महाडिक म्हणाल्या, 'तंबाखूचे व्यसन लवकर सुटत नाही. मनावर ताबा ठेवून व्यसन बंद करावे लागते. त्यासाठी निश्चय करावा लागतो. जिल्हा परिषद शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात तंबाखू बंदी केली जात आहे. त्याला सकारात्मक बदल दिसत आहेत. अशाप्रकारे जिल्हा, राज्य तंबाखूमुक्त करण्यासाठी सर्व यंत्रणांनी मदत करावी.'

जिल्हा सल्लागार डॉ. सुरेश घोलप म्हणाले, 'तंबाखू सेवनाने आरोग्यावर विपरीत परिणाम होतात. त्यामुळे जिल्हा तंबाखूमुक्त करण्यासाठी व्यापक प्रयत्न केले जातील. कायद्यांतर्गत सार्वजनिक ठिकाणी तंबाखू, सिगारेट ओढताना निदर्शनास आलेल्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल.'

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बी.सी. केम्पीपाटील यांनी कायद्याची अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले. यावेळी महिला बालकल्याण सभापती वंदना मगदूम, बांधकाम सभापती सर्जेराव पाटील-पेरीडकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. यू. जी. कुंभार, जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ. फारुफ देसाई, समुपदेशक चारूशिला कणसे, सामाजिक कार्यकर्त्या क्रांती शिंदे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षला वेदक यांनी आभार मानले.

०००००

खातेप्रमुखांची दांडी

महसूल, पोलिस, उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य परिवहनसह सरकारच्या सर्व महत्वाच्या विभागाचे दंडात्मक कारवाईचे अधिकार असणारे अधिकारी, पान शॉप, हॉटेल ओनर असोसिएशन, स्वयंसेवी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना कार्यशाळेसाठी आमंत्रित केले. मात्र, जि.प.मधील एकही खातेप्रमुख उपस्थित राहिले नाहीत. इतर सरकारी विभागातील बहुतांश अधिकाऱ्यांनीही दांडी मारली. यावरून तंबाखू, सिगारेट व्यसनबंदीसंबंधी किती उदासीनता आहे, हे स्पष्ट होते.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


एसबीआयचे एमडी गुप्ता ९ ला कोल्हापूर दौऱ्यावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

भारतीय स्टेट बँकेचे मॅनेजिंग डायरेक्टर परवीणकुमार गुप्ता शुक्रवारी (ता.९) कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात सकाळी दहा वाजता महिला बचत गटाचा मेळावा होणार आहे.

बँकेचे रिजनल मॅनेजर प्रदीप देव यांनी पत्रकार परिषदेत गुप्ता यांच्या दौऱ्याची माहिती दिली. गेल्या दहा वर्षांत प्रथमच बँकेचे वरिष्ठ अधिकारी कोल्हापुरात येत आहेत. शुकवारी सकाळी नऊ वाजता राजारामपुरी येथील शाखेत गुप्ता यांच्या हस्ते ई-कॉर्नर प्रणालीचे उद्घाटन होणार आहे. या प्रणालीमुळे ग्राहकांना चांगल्या सुविधा मिळणार आहेत. सकाळी दहा वाजता बचत गटांचा मेळावा होणार असून, यावेळी १५० महिला बचत गटांना आर्थिक मदतीचे प्रमाणपत्र वितरित केले जाणार आहे. सायंकाळच्या सत्रात हॉटेल सयाजी येथे उद्योगपती, व्यावसायिकांशी गुप्ता चर्चा करणार आहेत. चर्चेत उद्योग, व्यवसायाच्या पतपुरवठ्याबाबत माहिती घेणार आहेत. कोल्हापूर विभागात कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांत ५८ शाखा आहेत. एकूण ५३०० कोटी रुपयांच्या ठेवी असून, ३२०० कोटी रुपयांचे वितरण केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाद्वार खुला राहणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दिवाळी सणामध्ये महाद्वार रोड वाहतुकीसाठी खुला ठेवण्यासाठी शुक्रवारी महापालिका अतिक्रमण विभाग, पदाधिकारी व फेरीवाल्यांनी पाहणी केली. रोडवरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी फेरीवाल्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने दिवाळी सणामध्ये महाद्वार रोड वाहतुकीसाठी खुला ठेवण्याचा निर्णय झाला. रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यासाठी अतिक्रमण विभागाने दोन स्वतंत्र पथके तयार केली आहेत.

दिवाळी सणाच्या अगोदर चार दिवस व दिवाळी दिवशी महाद्वार रोडवर फिरते फेरीवाले रस्त्याच्या मध्यभागी बसतात. फेरीवाल्यांचे ठाण रस्त्यावर असल्याने वाहतूक पोलिसांना नाईलाजास्तव या काळात बिनखांबी रस्ता ते पापाची तिकटी व ताराबाई रोड वाहतुकीसाठी बंद ठेवावा लागतो. रस्ता बंद असल्याने आणि परिसरात पार्किंगची सुविधा नसल्याने ग्राहक थेट अन्य व्यापार पेठेकडे जातात. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून ऐन दिवाळी सणामध्ये महाद्वार रोड, पापाची तिकटी, चप्पल लाईन, ताराबाई रोड येथील व्यापारावर अनिष्ट परिणाम झाला आहे. तसेच पूर्ण रस्ताच बंद असल्याने एखादी दुर्घटना घडल्यास आपत्कालीन व्यवस्था वेळेत पोहोचू शकणार नाही, अशी स्थिती निर्माण होते.

परिणामी महाद्वार रोडच्या मध्यावर बसण्यास येथील व्यापाऱ्यांनी विरोध केला होता. गेल्या चार दिवसांपासून व्यापाऱ्यांचे शिष्टमंडळ आयुक्त व पोलिस प्रशासनाबरोबर चर्चा करत होते. शुक्रवारी सकाळी आयुक्तांच्या सूचनेनुसार अतिक्रमण विभागाचे प्रमुख पंडित पोवार यांनी पाहणी केली. त्यांच्यासोबत नगरसेवक किरण नकाते, अजित ठाणेकर, व्यापारी व फेरीवाले उपस्थित होते. यावेळी पांढऱ्या पट्ट्याबाहेर आलेल्या फेरीवाल्यांना साहित्य काढण्याचा सूचना केल्या. फेरीवाल्यांनीही रस्त्याच्या मध्ये बसणार नसल्याचे सांगितल्याने दिवाळी सणादरम्यान महाद्वार खुला राहणार यावर शिक्कामोर्तब झाले. 'दिवाळी दरम्यान रस्त्यावर अतिक्रमण होऊ नये, यासाठी अतिक्रमण विभागाला आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी सूचना दिल्या आहेत. याबाबत पोलिस प्रशासनाबरोबर त्यांची चर्चा झाली असून प्रसंगी पोलिसांची मदत घेण्याची सूचना आयुक्तांनी केली असल्याचे नगरसेवक नकाते यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विमानतळ परिसरातील अडथळ्यांची पाहणी होणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

येथील महसूल विभाग, विमानतळ प्राधिकरण अधिकाऱ्यांच्या संयुक्त पथकाकडून लवकरच विमानतळ परिसरातील अडथळ्यांची पाहणी करून अडथळे दूर करण्याचा निर्णय शुक्रवारी झाला. जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार अमल महाडिक यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

विमानतळ आवारातील विजेचे खांब, मोठे होर्डिंग्ज, उंच झाडे, पाण्याच्या टाकींचा अडथळा येत असल्याबाबत चर्चा झाली. विमानतळालगतच्या तामगाव - उजळाईवाडी रस्त्याला दोन पर्यायी मार्ग आहेत. विमान लँडिंगवेळी हा रस्ता बंद करून पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात येणार आहे. संभाव्य अडथळ्यांच्या पठारावर सिग्नल बसविण्यावरही बैठकीत चर्चा झाली. 'त्या परिसरात १ लाख लिटर पाण्याची नविन टाकी बांधण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने आराखडा करावा', असे आमदार महाडिक यांनी सांगितले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, विमानतळ प्राधिकरणचे महंमद शाह, प्राधिकरणच्या इलेक्ट्रीकल विभागाच्या एस. टी. कांबळे, विमानतळ व्यवस्थापक पुजा मूल, प्रांताधिकारी सचिन इथापे, अभियंता तुषार बुरूड, समीर शेट उपस्थित होते.

---------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्ट्रक्चरल ऑडिटवर २७ लाखांचा चुराडा

$
0
0

दुकॉलमी फोटो

Bhimgonda.Desai@timesgroup.com

Tweet : @bhimgondaMT

कोल्हापूर : जिल्ह्यातील १९ पुलांच्या स्ट्रक्चरल ऑडिटवर २६ लाख ९४ हजारांचा चुराडा झाला आहे. त्रयस्थ यंत्रणेकडून ऑडिट होऊन दीड वर्षांहून अधिक काळ उलटला, तरीही आवश्यक त्या पुलांची दुरूस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे इतके पैसे खर्च का केले, असा सवाल उपस्थित होत आहे. केवळ डल्ला मारण्यासाठीच निधी वापरल्याचा आरोप करवीर तालुका शिवसेनेने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रशासनावर केला आहे. परिणामी स्ट्रक्चरल ऑडिटचेच ऑडिट करण्याचा मुद्दा समोर आला आहे.

रायगड जिल्ह्यातील सावित्री पूल ऑगस्ट २०१६ मध्ये कोसळला. त्या दुर्घटनेनंतर सरकारने राज्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेतला. यानुसार ब्रिटीशकालीन व १९७० ते ८० च्या दशकात बांधण्यात आलेल्या पुलांचे ऑडिट करण्यात आले. खासगी एजन्सीकडून हे काम करून घेण्यात आले. त्यामुळे त्यावरच आक्षेप घेतला जात आहे. पूल सुस्थितीत आहे किंवा नाही, नसेल तर डागडुजी करणे, आयुर्मान संपले असेल तर प्रस्ताव पाठवून सरकारकडून निधी मंजूर करून घेण्याचे नियमित काम सार्वजनिक बांधकाम विभागाचे आहे. त्यासाठी या विभागाचे जिल्हा, तालुका पातळीवरील अभियंता, उपभियंत्यांसह कर्मचारी आहेत. तरीही पुलाच्या ऑडिटचे काम खासगी त्रयस्थ एजन्सीकडून करून घेतले गेले. त्यावर जिल्ह्यात तब्बल २६ लाख ९४ हजारांचा निधी खर्च झाला आहे. इतक्या रक्कमेत एक नविन पूल बांधून पूर्ण झाला असता. यामुळे ऑडिटवरील खर्चाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. वाहतुकीस अयोग्य तसेच धोकादायक पूल दुर्घटनेआधीच शोधून काढणे हा स्ट्रक्चरल ऑडिटचा मुख्य उद्देश होता. मात्र ऑडिट अहवालातील धोकादायक पुलांच्या दुरूस्तीचे काम दीड वर्षानंतरही झालेले नाही. परिणामी ऑडिटवरील खर्च वाया गेला असून कमिशन मिळविण्यासाठीच त्रयस्थांकडून हे काम करून घेतल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.

................

'मटा' भूमिका

प्रमुख मार्गांवरील अनेक पूल ब्रिटीशकालीन आहेत. त्यांचे आयुर्मान संपल्याने वाहतुकीस धोकादायक बनले आहेत. मात्र बांधकाम प्रशासन दुरूस्तीकडे दुर्लक्ष करीत आहे. अनेक पुलांच्या भिंतींवर आणि बाजूच्या भरावावर झाडे, झुडपे वाढली आहेत. ओढा, नदीचे पात्र खोल होत असल्याने पाया भुसभुशीत झाला आहे. स्ट्रक्चरल ऑडिटमधील अहवालानुसार धोकादायक पुलांची त्वरित डागडुजी करण्याबरोबरच नव्याने पर्यायी पूल बांधणे आवश्यक आहे. त्याचा प्रस्ताव सरकारकडे पाठवून निधीसाठी पाठपुरावा करण्याचीही गरज आहे.

..............

५५ लाख पडून

वाहतुकीस अयोग्य असल्याचा अहवाल ऑडिटमध्ये आल्यानंतर गगनबावडा तालुक्यातील रूपणी, साळवण तर पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथील पुलांच्या दुरूस्तीसाठी ५५ लाख रूपयांचा निधी एप्रिल २०१८ मध्ये मंजूर झाला. मात्र अद्याप काम सुरू झालेले नाही. निधी सरकारच्या तिजोरीत पडून आहे. सर्वच पुलांची परिस्थिती अशीच आहे.

...............

कोट

'पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठीचे तज्ज्ञ विभागाकडे नाहीत. सरकारच्या निर्णयानुसारच त्रयस्थ यंत्रणेकडून ऑडिट करून घेतले आहे. गरजेनुसार पुलांच्या दुरूस्तीचे काम केले जात असून शिवसेनेने निवेदन देऊन उपस्थित केलेल्या आक्षेपांना लेखी उत्तर दिले आहे.

संभाजी माने, अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

.....................

कोट

'बांधकाम प्रशासनाकडे गुणनियंत्रण, रस्ते प्रकल्प विभाग आहे. तरीही पुलांच्या ऑडिटचे काम खासगी एजन्सीकडून करून घेतले गेले. त्यात लाखो रूपयांचा चुराडा झाला. कमिशनच्या माध्यमातून डल्ला मारण्यासाठीच त्रयस्थ एजन्सीची निवड केली गेली. वाहतुकीस अयोग्य, धोकादायक पुलांच्या दुरूस्तीचे कामही झालेले नाही.

- विराज पाटील, अध्यक्ष, करवीर तालुका,शिवसेना

........................

२९६

एकूण पुलांची संख्या

१९

स्ट्रक्चरल ऑडिट झालेले पूल

दुरूस्त केलेले पूल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इस्लामपूर जोड...

$
0
0

दरम्यान, सलग तिसऱ्या दिवशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाची तीव्रता वाढवत ठेवली. ऊसदर जाहीर न करणाऱ्या कारखानदारांविरुद्ध संताप व्यक्त करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी नवेखेड इस्लामपूर रोडवरती राजारामबापू साखर कारखानाकडे ऊस भरून निघालेल्या दोन बैलगाड्या अडवून संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत बैलगाडीतील ऊस रस्त्यावर विस्कटून बैलगाडी उलथवून टाकली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बनावट फेसबुक अकाउंट काढून बदनामी’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘माझ्या नावाचे बनावट फेसबुक अकाउंट काढून बदनामी सुरू केली आहे. सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख संशयित पोलिस निरीक्षक अभय कुरूंदकर आणि त्याच्या सहकाऱ्यांकडून माझ्या जीविताला धोका आहे. बनावट फेसबुक अकाउंटची चौकशी करावी’, अशी मागणी अश्विनी बिद्रे यांचे पती राजू गोरे यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्याकडे केली आहे.

जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या प्रकरणाचा तपास सुरू असताना जिल्ह्यातील १५ ते १६ कर्मचाऱ्यांनी कुरूंदकरला मदत केली आहे. तीन महिन्यांपूर्वी कुरुंदकरचा मुलगा आशिषने फेसबुकवर फ्रेन्ड रिक्वेस्ट पाठविली होती. ही रिक्वेस्ट मी नाकारली. दोन दिवसांपूर्वी माझ्या नावाचे बनावट फेसबुक अकाउंट काढले आहे. त्यावर आक्षेपार्ह मजकूर टाकला जात आहे. त्याचा तपासकामावर परिणाम होण्याची शक्यता आहे. कुरुंदकरच्या मुलाने नवी मुंबई पोलिस दलाकडील तत्कालीन तपास अधिकारी प्रकाश निलेवाड यांच्यासोबत मोबाइलवर झालेले संभाषण सोशल मीडियावर टाकण्याची धमकी दिली होती. गेली अडीच वर्षे बिद्रे हत्याप्रकरणाचा तपास संथ गतीने सुरू आहे.

दरम्यान, या प्रकरणी जिल्हा पोलिस अधीक्षक देशमुख यांनी मागणीची दखल घेऊन तपास सायबर क्राइमकडे दिला आहे. बनावट फेसबुक, त्याचा यूआरएल क्रमांक आणि अन्य माहिती फेसबुकच्या कॅलिफोर्नियातील कार्यालयाला पाठविली आहे. त्याबाबत कार्यवाही करू, असे आश्वासन दिल्याचे गोरे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विमानतळावर शांती; शिवसेनेचे अनोखे आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

विमानसेवेला मुहुर्त लागत नसल्याच्या निषेधार्थ शिवसेनेने शनिवारी विमानतळावर अनोखे आंदोलन केले. विमानतळाबाहेर होमहवन करून मांत्रिकाच्या साहाय्याने भूतपिशाच्च दूर करण्याचाही प्रयत्न केला. यावेळी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, 'राजाराम महाराजांच्या विचारातून कोल्हापुरात विमानतळ सुरू झाले. यातून उद्योगांना बळ मिळावे, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र नियमित विमानसेवा नसल्याने कोल्हापूरला फटका बसत आहे. त्यामुळे शिवसेनेच्या या अंद्धश्रद्धाळू आंदोलनाची उलट-सुटल चर्चा सुरू झाली आहे.

पुरोगामी विचारांची परंपरा सांगणाऱ्या कोल्हापुरात राजाराम महाराजांच्या नावाने असलेल्या विमानतळावर एक नोव्हेंबरचा बेंगळुरू आणि हैदराबाद विमानसेवेचा मुहुर्त हुकला. विमान उड्डान संचलनालयाने ऐनवेळी परवानगी नाकारल्याने विमान उड्डाण रद्द करावे लागले. याबाबत बैठकांसह विमान उड्डाण संचलनालयाच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा सुरू आहे. विमानसेवेला मुहुर्त लागत नसल्याने शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व अण्णासाहेब पाटील, आर्थिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार यांनी आज विमानतळाची शांती घालून आंदोलन केले..

नियमित विमानसेवा सुरू व्हावी, यासाठी एकाही नेत्याने प्रामाणिक प्रयत्न केले नाहीत. श्रेयवादाचे फलक लावण्याऐवजी विमानसेवा सुरू होण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. विमानसेवेसह थेट पाइपलाइन, शाहू जन्मस्थळ, शाहू गारमेंट, आदी कामांमध्ये यश येत नाही. विमानतळावरील जागा बाधित असल्यास त्या जागेवर होमहवन करून शांती करण्यात आली. तसेच भूतपिशाच्च असल्यास मांत्रिकाच्या साहाय्याने तो दूर करण्याचा प्रयत्न केला.
यावेळी जिल्हाध्यक्ष संजय पवार, विजय देवणे, शहरप्रमुख दुर्गेश लिंग्रस, करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांच्यासह रवी चौगुले, आदी आंदोलनासाठी उपस्थित होते.

विमानतळाबाहेर आंदोलन करणाऱ्या शिवसेनेने कोणत्याही अधिकाऱ्यांना निवेदन दिले नाही. विमानसेवेच्या मुद्यावरून श्रेयवाद रंगू नये. प्रत्यक्षात विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा निवेदनातून व्यक्त केली आहे. मात्र, होमहवन, मांत्रिक आणि भूतबाधा काढण्याच्या प्रकाराने हे प्रश्न सुटणार आहेत काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ज्वारी दरात आठ रुपयांनी वाढ

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

गेल्या दोन आठवड्यात बाजारपेठेत ज्वारीचा भाव चांगलाच कडाडला असून प्रतिकिलो तब्बल आठ रुपयांनी वाढ झाली आहे. बार्शी ज्वारीचा दर प्रतिकिलो ४४ रुपयांवरुन ४८ रुपयांपर्यंत पोचला आहे. मूगडाळ प्रतिकिलो चार रुपयांनी तर उडीद डाळीत प्रतिकिलो आठ रुपयांनी वाढ झाली आहे.

भाकरी, चपाती यांचा रोजच्या आहारात समावेश असतो. गरीब कुटुंबासह मध्यमवर्गीय भाकरीला पसंती देतात. कष्टकरी, श्रमिक मंडळीच्या आहारात रोज भाकरीचा समावेश असतो. पण ज्वारीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. एक नंबरचा बार्शी शाळूचा प्रतिकिलो दर ४४ रुपयांवरुन ४८ रुपयांवर पोचला आहे. दोन नंबरचा शाळू ४० वरून ४४ तर तीन नंबरचा शाळू ३६ वरून ४० रुपयांवर पोचला आहे. दुष्काळ व अवकाळी पावसामुळे ज्वारी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. परतीचा पाऊस पडला नसल्याने सांगली, सोलापूर, मराठवाड्यात पेरण्या न झाल्याने रब्बी हंगामात ज्वारीचे उत्पन्न कमालीचे घसरणार असल्याने ज्वारीच्या दरात वाढ झाल्याचे व्यापारी व दुकानदारांकडून सांगण्यात आले. कर्नाटक व आंध्र प्रदेशातील ज्वारी बाजारात आल्यावर दर कमी होण्याची शक्यता असली तरी स्थानिक ग्राहक बार्शी शाळूला पसंती देतात. त्यामुळे ज्वारीऐवजी गव्हाच्या चपातीकडे ग्राहकांना वळावे लागणार आहे.

दरम्यान दिवाळी सण दणक्यात साजरा करण्यासाठी फराळासाठी लागणाऱ्या रवा, आटा, पिठ्ठी, हरभरा डाळ, सुके खोबरे, उडीद डाळ आणि जाड्या तांदळांची मोठी खरेदी झाली. शेवटच्या टप्प्यात सुंगधी तेल उटणे, साबण या वस्तूंना दुकानात मोठी मागणी आहे. तसेच दिवाळीत सलग चार दिवस सणांची रेलचेल असल्याने ब्रॅन्डेड कंपन्यांच्या तांदळांना मोठी मागणी आहे. घनसाळ, आंबे मोहोर, बासमती तांदळाला ग्राहकांकडून पसंती मिळत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हिंदकेसरी श्रीपती खंचनाळेंवर पुण्यात उपचार

$
0
0

श्रीपती खंचनाळे

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पहिले हिंदकेसरी श्रीपती यल्लाप्पा खंचनाळे यांना पायावरील शस्त्रक्रियेसाठी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात हलवण्यात आले आहे. ८७ वर्षीय खंचनाळे यांच्या पायाला बुधवारी दुखापत झाली होती. त्यांच्यावर कोल्हापुरात उपचार सुरु होते. मात्र हाडाला गंभीर जखम झाल्याने त्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी त्यांना पुण्याला हलवण्यात आले आहे. खंचनाळे यांच्यावरील उपचारासाठी मोठा खर्च आहे. कुस्तीच्या क्षेत्रात दबदबा असलेले आणि कुस्तीचा चालता बोलता इतिहास असलेले खंचनाळे वृद्धत्वामुळे घरी असतात. काही दिवसांपूर्वी कॉटवरून पडल्याने त्यांच्या पायाला दुखापत झाली होती. त्यांचे कुस्तीतील योगदान पाहता सरकारने आर्थिक मदत करणे गरजेचे आहे, अशी भावना कुस्तीक्षेत्रातून व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विनयभंगप्रकरणी एकास शिक्षा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी जयसिंगपूर येथील प्रथमवर्ग न्यायालयाने यड्राव (ता. शिरोळ) येथील शीतल गोविंद गायकवाड यास दोन वर्षे कारावास व वीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ६ सप्टेंबर २०१४ रोजी विनयभंगाची ही घटना घडली होती. पीडित महिला आपल्या शेतामध्ये भांगलण करीत असताना शीतल गायकवाडने तिचा विनयभंग केला होता. यानंतर तिने शिरोळ पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली होती. पोलिसांनी तपास करून गायकवाडविरुद्ध जयसिंगपूर येथील फौजदारी न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील रश्मी नरवाडकर व सूर्यकांत मिरजे यांनी युक्तिवाद केला. यानंतर न्यायालयाने गायकवाडला शिक्षा सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आवाडे बँकेविरोधात पोलिसांत तक्रार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

भाऊबंदकीच्या न्यायप्रविष्ट मिळकतीवर संगनमताने सुमारे नऊ कोटी ४७ लाख रुपयांच्या कर्जाचा बोजा नोंदवून मिळकतीचा लिलाव करण्याचा प्रयत्न करणाऱ्या येथील कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या चौघा अधिकाऱ्यांसह तत्कालीन दुय्यम निबंधक व सदानंद विठ्ठल काळे व त्यांचे नातलग अशा १३ जणांविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. प्रथमवर्ग न्यायालयाने याप्रकरणी तपास करून माहिती देण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.

मुकेश श्रीपती काळे (वय ४६, रा. इंडस्ट्रियल इस्टेट) यांनी याबाबतची फौजदारी याचिका न्यायालयात दाखल केली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार काळे यांनी ही फिर्याद पोलिसात दिली आहे. यामध्ये बँकेसह राजेंद्र महादेव डांगरे (बँक व्यवस्थापक), राजेंद्र दत्तात्रय बचाटे (वसुली अधिकारी), संजय आनंद सातपुते (सहायक उपव्यवस्थापक), नंदकुमार विठ्ठल हावळ ( सहायक व्यवस्थापक) यांच्यासह सदानंद विठ्ठल काळे, सुधाकर विठ्ठल काळे, सुनीता सदानंद काळे, नीता सुधाकर काळे, शेखर सदानंद काळे, अभिषेक सुधाकर काळे तसेच निवृत्त दुय्यम निबंधक विठ्ठल बालाजी जाधव, प्रल्हाद निवृत्ती पाटील अशा १३ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

काळे यांची औद्योगिक वसाहतीत स्थावर मिळकत आहे. सध्या या मिळकतीच्या वाटणीचा दावा न्यायालयात प्रलंबित आहे. असे असताना बँकेने या मिळकतीवर कागदपत्रात अफरातफर करून बोजा नोंद केल्याचा आरोप काळे यांनी न्यायालयात केला आहे. सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरून न्यायप्रविष्ट मिळकतीचा लिलाव करण्याचा प्रयत्न बँकेने केला. त्यामुळे त्या विरोधात न्यायालयात फौजदारी याचिका दाखल केली. न्यायमूर्ती एस. ए. खलाने यांनी सीआरपीसी १५६ (३) प्रमाणे तपास करून अहवाल सादर करण्याचा आदेश शिवाजीनगर पोलिसांना दिला आहे. इचलकरंजी जनता सहकारी बँकेविरोधात पोलिसांना तपास करण्याचा आदेश दिल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान, याबाबत बँकेशी संपर्क साधला असता ही बाब न्यायप्रविष्ट असून, अधिक माहिती देण्यास नकार दिला.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोणत्याही क्षणी हातोडा

$
0
0

तावडे हॉटेल परिसरातील बांधकामप्रश्नी पालिकेच्या निर्णयाकडे लक्ष

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्य सरकारने महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ च्या कलम ५२ 'अ' बदल करून अनधिकृत बांधकामे व भूखंड नियमितीकरणाची सूचना महापालिकेला केली. पण कोर्टाने कलमच घटनाबाह्य ठरवल्याने शहरातील अनधिकृत बांधकामावर कोणत्याही क्षणी हातोडा पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरांसह तावडे हॉटेल परिसरात असलेल्या अनधिकृत मिळकतधारक चांगलेच धास्तावले आहेत.

शहरात सुमारे दहा हजार अनधिकृत बांधकाम असल्याचे महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात समोर आले होते. विनापरवाना बांधकाम, रस्त्यासाठी ओपन स्पेस, वाढवलेली गॅलरी, पार्किंगसाठी अपुरी जागा सोडल्याचे सर्वेक्षणामध्ये समारे आले होते. अशा मिळकधारकांना महापालिकेने नोटिसा बजावल्या. पण त्यानंतर राज्य सरकारने अशी अनधीकृत बांधकामे नियमित करण्याचा अधिकार स्थानिक पातळीवरील स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले. या निर्णयामुळे ३१ डिसेंबर,२०१५ पर्यंत झालेली बांधकामे व लेआऊट मंजूर झालेले भूखंड नियमित होणार होते. कलम ५३ 'क' नुसार नियमितीकरणाची प्रक्रिया राबवली जाणार होती. त्यासाठी मिळकतधारकांकडून प्रशासनाला अर्ज प्राप्त झाल्यानंतर निर्णयामधील तरतुदीनुसार विकास कर, दंड आकारणी, प्रीमियर व इतर लागू असणारे शुल्क आकारण्यात येणार होते.

राज्य सरकारच्या निर्णयानुसार महापालिकेने मिळकतधारकांना सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन केले होते. महापालिकेच्या आवाहनला मिळकतधारकांनी फारसा प्रतिसाद दिला नाही. शहरात सुमारे दहा हजार अनधिकृत मिळकती असताना नियमितीकरणासाठी सरकारच्या निर्णयानंतर सुमारे १३०० लोकांनी महापालिका प्रशासनाकडे अर्ज सादर केले आहेत. त्यामुळे महापालिकेने पुन्हा मिळकतधारकांना मुदतवाढ दिली. पण तत्पुर्वीच हाय कोर्टाने बांधकामे नियमित करण्यास मज्जाव केला असल्याने अनधिकृत मिळकतधारकांमध्ये चांगलीच धास्ती निर्माण झाली आहे. शहरासह तावडे हॉटेल परिसरात अनधिकृत बांधकामाची संख्या जास्त असल्याने येथील मिळकतधारक चांगलेच धास्तावले आहेत. मात्र कोर्टाच्या निर्णयाबाबत महापालिका अधिकाऱ्यांनी 'वेट अँड वॉच'ची भूमिका घेत बोलण्यास नकार दिला.

दोनवेळा मुदतवाढ

राज्य सरकारच्या निर्णयानंतर महापालिकेने अनधिकृत बांधकामे नियमितीकरणासाठी आवाहन केले. महापालिकेच्या आवाहनाला मिळकतधारकांनी फारसा प्रतिसाद दिली नाही. त्यामुळे नियमितीकरणासाठी दोनवेळा मुदतवाढ दिली. त्यामध्ये आणखी वाढ करत चार दिवसांपूर्वी ३१ डिसेंबरपर्यंत अंतिम मुदत देण्याचे जाहीर केले. पण त्यानंतर आलेल्या कोर्टाच्या निकालानंतर महापालिका कोणता निर्णय घेणार याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images