Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

वीज दरवाढीविरोधात शिरोळमध्ये रास्ता रोको

$
0
0
वीज दरवाढ रद्द करावी तसेच उद्योजक व घरगुती ग्राहकांना वीज पुरवठा सुरळीत करावा या मागणीसाठी शिरोळ येथील कुलकर्णी पॉवर टूल्सजवळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात येथील ल.क.अकिवाटे औद्योगीक वसाहत व शाहू औद्योगीक वसाहतीमधील उद्योजक सहभागी झाले होते.

इचलकरंजीत उद्योजकांचा’चक्का जाम’

$
0
0
राज्यातील सर्वच वीज ग्राहकांवर लादलेली अन्यायी वीज दरवाढ रद्द करावी या मागणीसाठी इचलकरंजी शहरात येणाऱ्या चारही प्रमुख रस्त्यांवर मंगळवारी चक्का जाम आंदोलन करण्यात आले.

कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १९ पासून

$
0
0
‘अनुभवा सिनेमाचे जग आणि जगातील सिनेमा’ असे ब्रीद वाक्य असलेल्या कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला १९ डिसेंबरपासून सुरूवात होत आहे. २६ डिसेंबरपर्यंत सुरू राहणाऱ्या या महोत्सवात विविध भाषांतील ३६​ चित्रपटांसह १० लघुपट व माहितीपट पाहण्याची पर्वणी मिळणार असल्याची माहिती दिलीप बापट व चंद्रकांत जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

‘एसटी’ गँगवर ‘मोक्का’चा चाप

$
0
0
खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, दरोडा, मारामारी, दुखापत करणे, चोरी, सरकारी नोकरांवर हल्ला, पिस्तूल बाळगणे, अंमली पदार्थ बाळगणे अशा गुन्ह्यांची नोंद असलेल्या स्वप्निल तहसीलदार याच्या ‘एसटी’ गँगवर पोलिसांनी मोक्का लावत त्यांच्या संघटित गुन्हेगारीला चाप लावला आहे.

पाणी बिलांमधून अवास्तव आकारणी

$
0
0
सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी महापालिकेने आकारलेल्या सांडपाणी अधिभारामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. नियमित बिलाच्या तीन-तीन पटीने वाढून नवीन बिले आलेली असल्याने हा संताप वेगवेगळ्या आंदोलनांमधून व्यक्त करण्यात येत आहे.

दर्जाहीन मालिकांना प्रेक्षकांसह कलाकार जबाबदार

$
0
0
‘भूमिकेबाबत कोणताही अभ्यास न करता केवळ प्रेक्षकांना आवडते म्हणून रोल स्वीकारणाऱ्या कलाकारांसह, ​अभिरूची बाजूला ठेवत जे दाखवतात ते पाहणाऱ्या प्रेक्षकांमुळेच सध्याच्या टीव्ही मालिकांचा दर्जा घसरत आहे,’ असे परखड मत अभिनेते सचिन खेडेकर यांनी व्यक्त केले.

औद्योगिक परिसर, पण रस्त्यांचे दारिद्रय

$
0
0
टिंबर व्यवसाय, प्लायवूड विक्री आणि लाकडाच्या वखारी यामुळे टिंबर मार्केटची ओळख ही इंडस्ट्रीयल एरिया म्हणून. रोज येथे लाखोंची उलाढाल. व्यापार व्यवसायाच्या निमित्ताने येथे वाहतूकही दिवसभर सुरू असते. मात्र या परिसरात पायाभूत सुविधातंर्गत रस्त्यांचा पत्ताच नाही.

चंदगडमध्ये दिव्याखाली अंधार

$
0
0
कलिवडे पैकी धनगरवाडा (ता.चंदगड) येथील मराठी विद्यामंदिरातील शिक्षकांची गैरहजेरी ही नित्याचीच बाब झाली आहे. आमदार संध्यादेवी कुपेकर यांचे शिष्ठमंडळ मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी या भागात गेले असता दुपारी बाराच्या सुमारास शिक्षकांच्या ‌शिक्षक जागेवर नसल्याने काही विद्यार्थीच शिक्षकाच्या भूमिकेत होते.

‘लेक वाचवा’पासून कोल्हापूर शहर दूरच

$
0
0
‘लेक वाचवा’ म्हणून जिल्ह्यासाठी विविध योजनांचे फतवे काढणारे जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण व पुढारलेपण दाखवणाऱ्या कोल्हापूर शहराला गेल्या नऊ वर्षांपासून जिल्ह्याच्या स्त्री-पुरुष प्रमाणाच्या सरासरीपर्यंतही पोहचता आलेले नाही. सध्या जिल्ह्यातील एक हजार पुरुषांमागे ९५७ स्त्रिया अशी सरासरी असताना शहरात मात्र ९ वर्षात केवळ एकदाच ९०५ पर्यंतचा पल्ला गाठता आला आहे.

शाळा वाचवा, शिक्षण वाचवा

$
0
0
राज्य सरकारच्या अन्यायी शैक्षणिक धोरणांचा निषेध करण्यासाठी मंगळवारी (ता. १०) जिल्ह्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, ज्युनिअर कॉलेजच्या शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. जिल्ह्यातील ७०० शाळांतील सुमारे पाच हजार शिक्षक मोर्चात सहभागी झाले.

विनापरवाना बांधकामांवर हातोडा

$
0
0
एफएसआयपेक्षा जास्त व विनापरवाना केलेल्या बांधकामांवर महापा​लिकेने मंगळवारी हातोडा चालवण्यास सुरुवात केली. बऱ्याच दिवसानंतर मंजुरीपेक्षा जादा बांधकाम केलेल्या बांधकामांवर महापालिकेने कारवाई करण्यास सुरुवात केली असून त्यानुसार मंगळवारी नागाळा पार्क, कसबा बावडा तसेच सेंट झेविअर्स हायस्कूलजवळ कारवाई करण्यात आली.

अपघात रोखण्यासाठी कृती आराखडा

$
0
0
महावितरणच्या कर्मचाऱ्यांना वीज दुरूस्तीच्या दरम्यान अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. काहीवेळा जीवही गमवावा लागतो. त्यामुळे वीज दुरूस्तीदरम्यान अपघात होऊ नये यासाठी महावितरणने एक कृती आराखडा तयार केला आहे.

‘व्हिजन’चा अभाव, निधीचा तुटवडा

$
0
0
अधिविभाग असो की शैक्षणिक संस्था, त्याला नावारूपाला आणण्यासाठी चौकटीबाहेर जाऊन काम करण्याची वृत्ती असावी लागते. नवनवीन कल्पना, सोबतीला विद्यार्थी केंद्रित उपक्रम आणि महत्वाचे म्हणजे कार्यालयीन वेळेत न अडकता अधिकाधिक वेळ संस्थेसाठी​ खर्ची घालण्याची तयारी या गोष्टींचा मिलाफ घडला तरच नवीन काही घडू शकते.

नि‌यमित टेक ऑफ होणार

$
0
0
कोल्हापूरच्या विमानतळ विकासाचा जमीन संपादनाचा पहिला टप्पा पूर्ण झाला. त्यामुळे एअरपोर्ट अथॉरिटीने नाइट लँडिंग फॅसिलिटीची सुविधा देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. ही सुविधा झाल्यास मुंबई आणि पुण्यात विशिष्ट काळासाठी पार्किंगला जागा न मिळालेली विमाने कोल्हापूरच्या विमानतळावर उतरू शकणार आहेत.

कुत्र्याच्या हल्ल्यात १७ जखमी

$
0
0
करवीर तालुक्यातील शिये येथे पिसाळलेल्या कुत्र्याने केलेल्या हल्ल्यात दोन ते दहा वयोगटातील १३ मुलांसह १७ जण जखमी झाले. त्यात समावेश असून, दोन वर्षांची मुलगी गंभीर जखमी झाली आहे.

खुनी हल्ल्यातील संशयिताला अटक

$
0
0
अनैतिक संबध तोडून टाकण्याची समज देऊनही दुर्लक्ष करत असल्याच्या कारणावरून सूरज प्रकाश शिंदे (वय २१, रा. चव्हाण गल्ली, गडमुडशिंगी) याचा डोक्यात दगड घालून खून करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

‘लाल दिवा’ होणार दुर्मिळ

$
0
0
घटनात्मक पदाशिवाय कुणाच्याही मोटारीवर लाल दिवा वापरणे नियमबाह्य असल्याचे सूतोवाच करत सुप्रीम कोर्टाने मिरविण्यासाठी लाल दिवा आणि सायरन वाजविणाऱ्यांवर निर्बंधाचे आदेश दिले. त्यामुळे कोल्हापुरातील दोन मंत्री आणि जिल्हा परिषद अध्यक्षांच्या मोटारीवर असणाऱ्या लाल दिव्यावर संक्रांत येणार आहे.

रंगकर्मींशी ‘कनेक्टिव्हिटी’

$
0
0
संगीत व नाट्यशास्त्र विभाग सक्षम असावा, नाट्यविषयक उपक्रमांना चालना मिळावी ही विद्यापीठ प्रशासनाची भूमिका आहे. नाट्य विभागाला चालना देण्यासाठी नाट्यशास्त्र विभागप्रमुख एन. व्ही. चिटणीस यांना सूचना केल्या जाणार आहेत.

‘डर्टी पिक्चर’ बदलणार

$
0
0
शहरात ठिकठिकाणी स्वच्छतागृहांअभावी होणारी महिलांची कुचंबणा रोखण्यासाठी महापालिकेने घेतलेल्या निर्णयानुसार आगामी दहा दिवसांत शहरात स्वच्छतागृहे उभारली जाणार आहेत.

फुलेवाडीत साडेसहा फूट अजगर

$
0
0
हरिओमनगरमध्ये बुधवारी सायंकाळी साडेसहा फूट लांबीचा अजगर आढळला. रहिवाशांनी याची माहिती वनविभागाला दिल्यानंतर पावणेचार किलो वजनाचा हा अजगर पकडला.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images