Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

'सीएम'च्या पूजेला विरोध; २ महिन्यानंतर जामीन

$
0
0

पंढरपूर

अडीच महिन्यापूर्वी मुख्यमंत्र्यांना आषाढी पूजेपासून रोखण्याचा इशारा देणारा सकल मराठा मोर्चाच्या रामभाऊ गायकवाडला अखेर ८१ दिवसानंतर मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला असून जामीन मंजूर केला आहे.

दोन महिन्यांपासून जेलमध्ये असणाऱ्या रामभाऊला समाजाने वाऱ्यावर सोडल्याची पोस्ट व्हायरल झाली होती. विशेष म्हणजे रामभाऊच्या कुटुंबानेही समाजाचे आभार मानले होते. मराठा आरक्षण दिल्याशिवाय मुख्यमंत्र्यांना पंढरपूरमध्ये पाऊल न ठेवू देण्याचा इशारा मराठा मोर्चाने दिला होता. यावेळी आंदोलनात पुढे असणाऱ्या रामभाऊ गायकवाडला १० ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली होती. मात्र आता जवळपास ८० दिवस त्याला जामीन न मिळू शकल्याने त्याला जेलमध्येच राहावे लागले आहे. रामभाऊ गायकवाड हा गुरसाळे येथील शेतकरी कुटुंबातला तरुण आहे. तो आई व पत्नी आणि दोन लहान मुलींसह शेतातच राहतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


डेंग्यूमुळे चार दिवसात सख्ख्या भावांचा मृत्यू

$
0
0

पंढरपूर

पंढरपूर तालुक्यातील आढीव गावात चार दिवसांच्या अंतरावर दोन सख्या भावांचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण असून आरोग्य विभागाने विशेष मोहीम राबविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

आढीव येथे सध्या तापाच्या आजाराने अनेक गावकरी आजारी आहेत. ते पंढरपुरात येऊन उपचार घेत आहेत. अशातच चार दिवसांपूर्वी शिवाजी मारुती धाकतोडे या ३७ वर्षांच्या ग्रामस्थाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्यांचा मृत्यू डेंग्युने झाल्याचे समोर आले होते. आता आज त्यांचाच मोठा भाऊ शहाजी धाकतोडे (वय ३९ ) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. गावातील अस्वच्छता वाढल्याने डेंग्यूचा फैलाव झाला आहे. प्रशासन आणि आरोग्य विभागाने परिसरात तातडीने उपाययोजना सुरू करण्याची मागणी होतेय.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकरी संघाच्या अध्यक्षपदीजनसुराज्यचे अमरसिंह माने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शेतकरी सहकारी संघाच्या अध्यक्षपदी जनसुराज्य शक्ती पक्षाचे कार्यकर्ते असलेले संचालक अमरसिंह माने यांची बिनविरोध निवड झाली. शहर निबंधक प्रदीप बरगे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड करण्यात आली. भू-विकास बँकेच्या थकबाकीपोटी युवराज पाटील यांचे संचालकपद आणि अध्यक्षपद रद्द झाल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी निवड प्रक्रिया राबविण्यात आली.

भवानी मंडपातील मुख्य कार्यालयात झालेल्या बैठकीत संचालक जी. डी. पाटील यांनी माने यांचे नाव सुचविले. यशवंतराव पाटील यांनी त्यास अनुमोदन दिले. सर्व संचालकांनी त्यास पाठिंबा दिल्यावर सभाध्यक्ष बरगे यांनी निवड बिनविरोध झाल्याचे घोषित केले. निवडीनंतर उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील, जी. डी. पाटील, शशिकांत पाटील यांची भाषणे झाली. बैठकीला अपात्र तीन संचालक वगळता उर्वरित संचालक उपस्थित होते. निवडीनंतर माजी अध्यक्ष युवराज पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष कृष्णात पाटील यांच्यासह संचालक मंडळाने माने यांचे अभिनंदन केले.

अध्यक्षपदासाठी अमरसिंह माने, जी. डी. पाटील, यशवंतराव पाटील यांची नावे आघाडीवर होती. मात्र, आमदार हसन मुश्रीफ यांनी माने यांच्या निवडीला पसंती दिली. अध्यक्ष माने हे भादोले (ता. हातकणंगले) येथील असून, ते जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष माजी आमदार विनय कोरे गटाचे समर्थक आहेत. ते प्रथमच संघाचे संचालक म्हणून निवडून आले आहेत. तिसऱ्याच वर्षी त्यांना अध्यक्षपदाची संधी मिळाली. ते बांधकाम व्यावसायिक असून, भादोलेतील गणेश विकास संस्थेचेही अध्यक्ष आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निधन - मालिनी मोरे

$
0
0

मालिनी मोरे

कोल्हापूर : गडमुडशिंगी (ता. करवीर) येथील मालिनी सीताराम मोरे (वय ७१) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केएमटी कर्मचाऱ्यांना एक महिन्याचे वेतन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

केएमटी कर्मचाऱ्यांचे तीन महिन्याचे वेतन थकीत आहे. दिवाळीपूर्वी थकीत वेतन अन् अॅडव्हान्स देण्याच्या मागणीसाठी म्युनिसिपल ट्रान्सफोर्ट वर्कर्स युनियनच्या दोन्ही कार्यकारिणी सदस्यांनी आयुक्त डॉ. अभिजित चौधरी व प्रभारी अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक संजय सरनाईक यांच्याशी चर्चा केली. सरनाईक यांनी सप्टेंबर महिन्याचे वेतन पाच नोव्हेंबरपर्यंत देण्याचे मान्य केले. दरम्यान, चर्चेसाठी मंगळवारी दोन्ही कार्यकारिणी आमने-सामने आल्याने सायंकाळी महापालिकेत वातावरण तणावपूर्ण बनले.

ऐन दिवाळीच्या तोंडावर कर्मचाऱ्यांचे वेतन प्रलंबित असताना युनियनमध्ये अध्यक्षपदावरून वाद सुरू आहे. कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत कार्यकारिणीचे अध्यक्ष निशिकांत सरनाईक आणि नव्या कार्यकारिणीचे अध्यक्ष प्रमोद पाटील यांनी एकत्रच आयुक्तांची भेट घेतली. आयुक्तांनी 'अधिकृत युनियन कोणती?' असा मुद्दा उपस्थित केला. तसेच व्यवस्थापक सरनाईक यांच्याशी चर्चा करण्याची सूचना केली.

पदमुक्त केलेले अध्यक्ष निशिकांत सरनाईक यांनी व्यवस्थापकांना थकीत वेतन, अॅडव्हान्सबरोबर अन्य मागण्या मांडण्याचा प्रयत्न केला. पण त्याला स्पष्ट नकार देत व्यवस्थापकांनी केवळ वेतनावर चर्चा करत एक महिन्याचे वेतन देण्याचे मान्य केले. त्यानंतर अध्यक्ष सरनाईक समर्थकांसह निघून गेले. त्यानंतर पुन्हा नव्या कार्यकारिणीचे अध्यक्ष प्रमोद पाटील यांनी व्यवस्थापकांना दोन महिन्यांचे वेतन, कायम व रोजंदारी कर्मचाऱ्यांना अनुक्रमे दोन व चार हजार रुपये अॅडव्हान्स देण्याची मागणी केली. पण व्यवस्थापकांनी केएमटीची आर्थिक स्थिती नसल्याने केवळ एक महिन्याचे वेतन देण्याचे मान्य केले. अॅडव्हान्सनंतर वेतनातून २०० ऐवजी ५०० रुपांची कपात करण्याची मागणी करत अॅडव्हान्सची मागणी पाटील यांनी लावून धरली. या मागणीबाबत व्यवस्थापकांनी आयुक्तांशी चर्चा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर कर्मचाऱ्यांनी थेट परिवहन सभापतींचे कार्यालय गाटले. यावेळी केएमटी कर्मचाऱ्यांनी चांगलीच गर्दी केली होती.

बुधवारी (ता. ३१) स्थायी समिती सभापती व परिवहन समिती सभापतींयांच्याबरोबर दुपारी १२.३० वाजता चर्चा करण्याचा निर्णय झाल्यानंतर कर्मचारी निघून गेले. मात्र कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावरुन दोन्ही कार्यकारिणी आमने-सामने आल्याने युनियनमधील वाद पुन्हा उफाळून येण्याची शक्यता आहे.

तणावाचे वातावरण

केएमटी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी चार दिवसांपूर्वी युनियनच्या सदस्यांना निमंत्रीत केले होते. पण त्यानंतर युनियनमधील वाद चव्हाट्यावर आल्यामुळे आयुक्तांनी त्यांनी प्रथम वाद मिटवण्यास सांगितले. त्यावेळी अध्यक्ष निशिकांत सरनाईक यांनी पुणे येथील कामगार आयुक्त कार्यालयाने नव्या कार्यकारिणीला मान्यता दिल्यास त्यांचीशी चर्चा करण्याची विनंती केली. त्यामुळे डॉ. चौधरींनी त्यांना व्यवस्थापकांशी चर्चा करण्याची सूचना केली. त्यानंतर दोन्ही संघटनांनी व्यवस्थापक सरनाईक यांच्याशी चर्चा केली. यावेळी वातावरण तणावपूर्ण बनले होते.

किमान वेतन द्या

महापालिका प्रशासनाकडे ठोक मानधनावर ११ चालक आहेत. त्यांना दरमहा ११ हजार वेतन दिले जाते. सरकारच्या नियमानुसार त्यांना किमान वेतन मिळणे अपेक्षित आहे. त्यामुळे या चालकांनाही प्रशासनाने किमान वेतनाप्रमाणे १४ हजार दरमहा वेतन द्यावे अशी मागणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आप्पाचीवाडी यात्रा उत्साहात

$
0
0

फोटो...

म. टा. वृत्तसेवा, निपाणी

तुतारीचा हुकांर... बासरीचा सूर... ढोल-कैताळाचा टिपेला पोहोचलेला निनाद, झेंडे, छत्र्या, देवाचे मुखवटे, अब्दागिरी, अशा सर्व लवाजम्यासह श्री क्षेत्र आप्पाचीवाडी (ता. चिकोडी) येथील श्री हालसिद्धनाथ यात्रेत विलोभनीय पालखी सोहळा पार पडला. हा पालखी सबिना याची देही याची डोळा पाहण्यासाठी महाराष्ट्रासह कर्नाटकातील हजारो भाविक दाखल झाले होते. हालसिद्धनाथांच्या नावानं चांगभलंच्या अखंड नामघोषात तल्लीन होऊन भाविकांनी नाथांच्या दर्शनासाठी गर्दी केली होती.

ढोलांचा आवाज, कैताळांचा निनाद तसेच बासरीच्या सुरांनी परिसर दुमदुमला होता. नाथांच्या भक्तांनी मंदिरात दिलेल्या उसाची कर वाघापूर व रायबाग येथील मानकऱ्यांकडून तोडली. कर तोडल्यानंतर वालंगाचा सोहळा झाला. नाथांच्या सबिन्यामध्ये मानाचे अश्व, बकरी, पुजारी, मानकरी, भाकणूक सांगणारे भगवान डोणे यांच्यासह भाविकांनी खडकावरील मंदिराची प्रदक्षिणा पूर्ण करून पालखी सबिना वाड्यातील मंदिराकडे गेला. वाड्यातील मंदिरात हालसिद्धनाथांच्या मूर्तीची व गादीची प्रतिष्ठापना करण्यात आली. तेथून कुर्लीची पालखी लवाजम्यासह चालत कुर्लीकडे रवाना झाली. कुर्लीतील हालसिद्धनाथ मंदिरात वालंग करण्यात आला. भाकणूक कथन करणारे भगवान डोणे यांचा येथून परतीचा मार्ग सुरू झाला. ते कुर्ली येथून नानीबाई चिखली, खडकेवाडा, यमगे, मुरगूडमार्गे वाघापूरला रवाना झाले. यावेळी एसटी महामंडळाने बसची सोय केली होती.

आसमंत पिवळा धमक

मंदिरासभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी पालखी बाहेर पडताच भाविकांनी पालखीवर लोकर, खारीक, खोबरे तसेच मोठ्या प्रमाणावर भंडाऱ्याची उधळण केली. यामुळे नाथांची मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या खडक मंदिर परिसरातील आसमंत पिवळा धमक झाला होता.

नेटके संयोजन

यात्राकाळात भाविकांना प्राथमिक उपचाराची सौंदलगा आरोग्य केंद्राच्या वतीने सोय करण्यात आली होती, तसेच निपाणी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. तर, कागल, निपाणी, चिकोडी, संकेश्वर, रायबाग, मुरगूड येथून जादा बसगाड्या सोडण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर, स्थानिक यात्रा कमिटीने गाड्यांच्या वाहनतळासह फेरीवाल्यांची नियोजनबद्ध व्यवस्था केल्याने भाविकांना यात्रेत सुरळीतपणे आत-बाहेर जाता आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वप्नातल्या घरासाठी रेडी पझेशनवर भर

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

नोटबंदी, जीएसटी आणि रेरा कायद्याची अंमलबजावणीनंतर आलेल्या मंदीनंतर बांधकाम उद्योग ग्राहकांच्या प्रतिसादामुळे घर विक्रीसाठी पुन्हा सज्ज झाला आहे. जीएसटी कायद्याची अंमलबजावणी होण्यापूर्वी तयार झालेल्या प्रकल्पांना जीएसटी लागू नसल्याने दीड ते दोन लाख रुपयांची बचत होत असल्याने तयार फ्लॅट खरेदी करण्याकडे ग्राहकांचा ओढा वाढला आहे. दसऱ्यात ग्राहकांकडून मिळालेल्या प्रतिसादानंतर दिवाळीत फ्लॅट, बंगले, दुकान गाळे विक्रीला चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दीपावलीत नवीन वस्तू घेण्याबरोबर गुंतवणूक करण्यावर ग्राहकांचा भर असतो. गेल्या काही वर्षांपासून जमीन, बंगले, फ्लॅटमध्ये गुंतवणूक करण्याऱ्यांची संख्या वाढली आहे. तसेच स्वत:चे घर असावे, असणाऱ्या ग्राहकांची संख्या मोठी आहे. नोटबंदी व जीएसटी लागू होण्यापूर्वी शहरात अनेक प्रकल्प तयार झाले आहेत. ताराबाई पार्क, नागाळा पार्क, फुलेवाडी, साने गुरुजी वसाहत, कदमवाडी, भोसलेवाडी, मुक्त सैनिक वसाहत, कळंबा रिंगरोड, राजेंद्रनगर, बळवंतनगर परिसरातील तयार झालेल्या प्रोजेक्टमधील फ्लॅट खरेदीसाठी व्यावसायिकांना विचारणा होऊ लागली आहे. अशा प्रकल्पातील फ्लॅट खरेदी करताना जीएसटी लागू होत नसल्याने ग्राहकाचे दीड ते दोन लाख रुपयांची बचत होत असल्याने तयार फ्लॅट खरेदीकडे कल वाढला आहे. तसेच नवीन प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक वाढू लागली आहे. रो बंगल्याबाबत विचारणा होत असून दिवाळीत विक्री होण्याचा अंदाज बांधला जात आहे. बाजारपेठ व मुख्य रस्त्यालगत असलेल्या प्रकल्पातील दुकान गाळ्यांबाबतही विचारणा होऊ लागली आहे. सध्या तयार व कार्यान्वित असलेल्या प्रकल्पामध्ये एक हजार फ्लॅटस् विक्रीसाठी सज्ज आहेत.

'प्रत्येकाला घर' ही केंद्र सरकारची संकल्पना असून त्यासाठी प्रथम घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना अडीच लाख रुपयांची सूट मिळते. बँकांना घरबांधणीसाठी कर्ज देण्यासाठी लक्ष्य ठेवले असल्याने चांगले ग्राहक शोधण्यासाठी बँकामध्ये स्पर्धा लागली आहे. गृहकर्ज सुलभ झाली असली ग्राहकांकडून घर खरेदीसाठी चांगला प्रतिसाद लाभत आहे. रेरा कायद्यानंतर नवीन प्रकल्प कार्यान्वित होण्यास विलंब लागत आहे. जे प्रकल्प कार्यान्वित झालेले आहेत त्यामध्येही ग्राहक गुंतवणूक करत आहेत. प्रकल्प सुरू होण्यापूर्वी १० टक्के रक्कम भरण्याची अट आहे. तसेच बांधकामाच्या टप्प्याप्रमाणे १० ते २० टक्के रक्कम भरण्याचा नियम रेरा कायद्यानुसार केला आहे. त्याला ग्राहक चांगला प्रतिसाद देत आहेत.

एकाच छताखाली असलेल्या टाऊनशिपमध्ये बंगले, फ्लॅट खरेदीसाठी ग्राहकांचा कल वाढला आहे. जीम, स्विमिंग टँक, मैदान, व्यासपीठ, टेबल टेनिस, चेस या सुविधा बांधकाम व्यावसायिकांनी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्यांना या सुविधांचा फायदा मिळत असल्याने ग्राहक टाऊनशिपमधील प्रकल्पांना रुची दाखवत आहेत.

'सेकंड होम' या संकल्पनेला पर जिल्हा, पर राज्यातील ग्राहकांकडून विचारणा होऊ लागले आहे. मुळचे कोल्हापूरचे पण मुंबई, पुण्यासह मेट्रो पॉलिटिन सिटीमध्ये व्यवसाय व नोकरीनिमित्त स्थायिक झालेल्यांची चांगल्या लोकेशनवरील रो बंगले व फ्लॅट खरेदीसाठी बांधकाम व्यावसायिकांना विचारणा होऊ लागली आहे. पन्हाळा, मलकापूर, शाहूवाडी या परिसरात नव्याने प्रकल्प सुरु होत आहेत. इचलकरंजी, जयसिंगपूर, पेठवडगाव, गडहिंग्लज, कागल शहराजवळील परिसरात सुरू असलेल्या प्रकल्पात गुंतवणूक होऊ लागली आहे. एकंदरीतच दीपावलीत बांधकाम उद्योगात मोठी आर्थिक उलाढाल होणार आहे.

जीएसटी लागू होण्यापूर्वी शहर व शहर परिसरात अनेक प्रकल्प तयार झाले आहेत. या प्रकल्पातील फ्लॅट खरेदीवर जीएसटी लागू नसल्याने ग्राहकांचा तयार फ्लॅटचा ताबा घेण्यासाठी ग्राहक उत्सुक आहे. दिवाळीत तयार फ्लॅटबाबत विचारणा होऊ लागली आहे. नवरात्र व दसरा उत्सवातही फ्लॅटची चांगली खरेदी झाली. दीपावलीत ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास बांधकाम व्यावसायिक बाळगून आहेत.

प्रकाश मेडशिंगे, साई डेव्हलपर्स अॅन्ड बिल्डर्स

एकाच छताखाली जीम, गार्डन, स्विमिंग टँक, मैदान, व्यासपीठ अशा सुविधा असलेल्या प्रकल्पाबाबत ग्राहकांची रुची वाढली आहे. अशा प्रकल्पांना ग्राहक भेटी देऊ लागले आहेत. सर्व कुटुंबातील सदस्यांना सुविधा मिळत असल्याने ग्राहक अशा प्रकल्पामध्ये फ्लॅट, बंगले खरेदीसाठी प्रतिसाद देत आहेत. दीपावलीच्या शुभ मुहुर्तावर ग्राहकांकडून बुकिंग, रेडी पझेशनसाठी विचारणा करु लागले आहेत.

विवेकानंद पाटील, अनंत इस्टेट डेव्हलपर्स

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साखर कारखाने आजपासून बंद..

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शेतकरी संघटनांनी केलेल्या मागणीप्रमाणे उसाला दर देता येणे शक्य नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व साखर कारखाने उद्यापासून (ता. ३१) बंद करण्याचा निर्णय कारखानदारांनी घेतला आहे. मंगळवारी बावीस कारखान्यांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यामध्ये खासगी आणि सहकारी क्षेत्रांतील कारखानदारांचे प्रतिनिधी उपस्थित होते. उत्पादकांनी मागितलेला दराची पूर्तता करण्यासाठी सरकारच्या मदतीशिवाय पर्याय नाही, असे मतही कारखानदारांनी व्यक्त केले. कारखानदारांनी घेतलेल्या या निर्णयामुळे राज्य सरकारला ऊस दराबाबत तोडगा काढण्यासाठी हस्तक्षेप करावा लागणार आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी एफआरपी अधिक दोनशे रुपये मिळून पहिली उचल ३१२७ रुपये देण्याची मागणी केली आहे. त्यासाठी पूर्ववत ९.५ टक्के बेस धरण्याची मागणी केली आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या शेतकरी, कष्टकरी परिषदेत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी १० टक्के बेस धरुन पहिली उचल २९५० रुपये देण्याची मागणी केली आहे. त्यावेळी दर देण्यासाठी साखरेच्या दरात वाढ करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. शेतकरी संघटनेचे रघुनाथदादा पाटील यांनी पहिली उचल ३५०० रुपये देण्याची मागणी केली आहे. दराची घोषणा न करता कारखाने सुरु केल्यास ऊस तोड बंद करण्याचा इशारा शेतकरी संघटनांनी दिला आहे. शिवाय सध्या ऊसतोडीही बंद पाडल्या जात आहेत.

राजाराम सहकारी साखर कारखाना व संताजीराव घोरपडे कारखान्यांचा गळीत हंगाम सुरु केला आहे. काही कारखाने हंगाम चाचणी घेत आहेत. पुढील आठवड्यात सर्व कारखाने पूर्ण क्षमतेने सुरु करण्याची तयारी केली आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी जिल्ह्यातील १८ सहकारी व खासगी चार अशा २२ कारखान्यांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. बैठकीत दराबाबत चर्चा झाली. त्यात साखर मूल्यांकन, बँकेकडून मिळणारी रक्कम, तोडणी वाहतूक खर्च, कर्जाचे हप्ते, उत्पादन खर्च, वजा होणारे टॅगिंग, चालू हंगामात उपलब्ध होणारी रक्कम यातील तफावत यावर चर्चा झाली. हा सगळा खर्च लक्षात घेता सरकारच्या मदतीशिवाय शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करता येत नाहीत, यावर मतैक्य झाले. त्यामुळे कारखाने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. जे कारखाने सुरु आहेत त्यांनी तोडी सुरु असलेल्या उसाचे गाळप करुन कारखाने बंद करण्याची तयारी दर्शवली.

बैठकीला आमदार हसन मुश्रीफ, दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील, 'गुरूदत्त साखर'चे माधवराव घाटगे, मंडलिक कारखान्याचे कार्यकारी संचालक एन. वाय. पाटील, कुंभीचे उपाध्यक्ष प्रकाश चिटणीस, जवाहर कारखान्याचे कार्यकारी संचालक एम. जी. जोशी, राजाराम कारखान्याचे पी.जी. मेढे यांच्यासह साखर कारखान्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

.. .. ..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘जेम पोर्टलमुळे पारदर्शकता’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सरकारने विकसित केलेल्या गर्व्हमेंट ई मार्केट प्लेस (जेम) पोर्टलमुळे शासकीय खरेदी पद्धतीत सुधारणा होणार आहे. खरेदी प्रक्रियेत अधिक पारदर्शकता येईल, असा विश्वास जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी मंगळवारी व्यक्त केला. जिल्हा उद्योग केंद्रातर्फे शासकीय विश्रामगृहातील सभागृहात आयोजित जेम पोर्टलच्या जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. जिल्हाधिकारी सुभेदार म्हणाले, 'सरकारी कार्यालयात फर्निचर, पडदे यासह विविध आवश्यक वस्तू खरेदी करावे लागते. यापुढे त्या जेम पोर्टलव्दारेच खरेदी करणे बंधनकारक केले आहे. पोर्टलद्वारे खरेदीची प्रक्रिया सोपी, सुटसुटीत केली आहे.' उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सतिश शेळके यांनी मार्गदर्शन केले. उद्योग निरीक्षक सतिश काटाळे यांनी प्रास्ताविक केले. उद्योग संचालनालयाचे समन्वयक अधिकारी प्रकाश घुग्गे, प्रशिक्षक निखिल पाटील आदी उपस्थित होते. मंजुषा चव्हाण यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुन्हे मागे घ्या, अन्यथा आंदोलन

$
0
0

हातकणंगले : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शांततेत आणि सनदशीर मार्गांनी आंदोलन केलेल्या हातकणंगले येथील ३० हून अधिक आंदोलकांवर पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल केले आहेत. ५ नोव्हेंबरपूर्वी मागणीची पूर्तता करावी, अन्यथा ६ नोव्हेंबरपासून पोलिस ठाण्याच्या दारात बेमुदत साखळी उपोषण, मोर्चा, रास्ता रोको अशा विविध मार्गांनी आंदोलन करू, असा इशारा सकल मराठा समाज हातकणंगले तालुका समन्वय समितीच्या वतीने दिला आहे. समितीच्या शिष्टमंडळाने याबाबतचे निवेदन मंगळवारी हातकणंगले पोलिसांना दिले. शिष्टमंडळात अध्यक्ष प्रा. रवींद्र पाटील, उपाध्यक्ष दीपक कुन्नुरे, सचिव भाऊसाहेब फास्के, शिवाजी पाटील, पंडित निंबाळकर, आदींचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जाखलेत जलयुक्तशिवारमुळे पाणी

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

पन्हाळा तालुक्यातीत जाखले गावात जलयुक्त शिवार अभियानातून साडेचार कोटींची कामे झाली. त्यातील ५४ लाखांची कामे लोकसहभागातून करण्यात आली. यामुळे पावसाचे पाणी जमिनीत चांगल्या पद्धतीने मुरले. परिणामी भूगर्भातील पाणी पातळी वाढल्याची, माहिती उपविभागीय कृषी अधिकारी डॉ. नंदकुमार कदम यांनी सोमवारी सांगितले.

तहसीलदार गणेश शिंदे, तालुका कृषी अधिकारी बंडा कुंभार, कनिष्ठ भूवैज्ञानिक एस. एस. गोधळी, सरपंच सागर माने यांनी गावातील कामांची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. सरपंच माने म्हणाले, 'गावकऱ्यांनी एकीने जलयुक्त शिवार अभियान राबवले. लोकसहभागातून तलावाचे पुनर्जिवन केले. ओढ्यांवर सिमेंटचे साखळी बंधारे बांधण्यात आले. डोंगर उतारावरील ओघळ जोडणी उपचार, सीसीटी, वनतळी खोदण्यात आले.'

उपविभागीय जलसंधारण अधिकारी धनाजी पाटील म्हणाले, 'गावातील तलावातील गाळ २०१६ मध्ये काढण्यात आला. यामुळे पाणी पातळी ३५ मीटरनी वाढली. यंदा तलावात ६० टक्के पाणीसाठा झाला. परिसरातील विहिरींच्या पाणीपातळीत वाढली. ओढे वाहत आहेत. सिंचनाचे क्षेत्र वाढले आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारी कर्मचाऱ्यांचीसहा दिवस दिवाळी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दिवाळीसाठी पुढील आठवड्यात सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांना तब्बल सहा दिवस सुट्टी मिळणार आहे. दुसरा शनिवार जोडून आल्याने आणि जिल्हाधिकाऱ्यांनी एक स्थानिक सुट्टी जाहीर केल्याने गेल्यावर्षीपेक्षा जादा सुट्टी मिळेल. पुढील आठवड्यात केवळ एकच दिवस, सोमवारी (ता. ५ नोव्हेंबर) प्रशासकीय कामकाज सुरू राहणार आहे. परिणामी कर्मचाऱ्यांना कुटुबींयासमवेत सण साजरा करता येणार आहे.

दिवाळी सण सहा दिवसांवर आला आहे. त्याची धांदल सर्वत्र सुरू आहे. सरकारी कर्मचाऱ्यांनाही सणाच्या सुट्टीचे वेध लागले आहेत. यंदा दिवाळीत सणांदिवळी जोडून दुसरा शनिवार आणि रविवार आला आहे. त्यामुळे सुट्टीचे दिवस वाढले आहेत. मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक तर बुधवार, गुरूवार, शुक्रवारी सरकारने सुट्टी जाहीर केली. त्यामुळे सलग सहा दिवस दिवाळी साजरी करता येणार आहे. बाहेरगावचे अनेक अधिकारी, कर्मचारी सोमवारी रजा टाकण्याच्या मानसिकतेत आहे. त्यांना रजा मिळाली तर आठवडाभर सुट्टी उपभोगता येणार आहे. ५ नोव्हेंबरपासून दोन आठवडे शाळांना सुट्टी पडणार आहे. राष्ट्रीयिकृत बँका ७ आणि ८ नोव्हेंबर या दोनच दिवशी बंद राहणार आहेत.

दिवाळीचा मूड

जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, तहसील कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी आतापासून दिवाळीच्या मूडमध्ये आहेत. विविध कामांनिमित्त येणाऱ्यांची संख्याही घटल्याचे दिसत आहे. महत्वाच्या प्रशासकीय कामकाजासाठी लोक गेल्यानंतर अधिकारी दिवाळीनंतर भेटा असे सांगत आहेत. प्रशासनही आतापासून दिवाळीच्या तयारीत असल्याचे दिसत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेकायदेशीर बारवर छापा ; ५३ मद्यपींना अटक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

येथील चांदणी चौकातील पोलिस उपअधीक्षक कार्यालयापासून हाकेच्या अंतरावरील बेकायदेशीर पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या बारवर सहायक पोलिस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्या पथकाने छापा टाकून ५३ मद्यपींना अटक केली. एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असलेल्या संजय पाटील याचा हा अड्डा असल्याचे समजते. स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांच्या पाठबळावर हा बार सुरू असल्याचे या छाप्यानंतर उघडकीस आले.

डॉ. रोहन यांनी अवैध व्यवसायाविरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. त्याचाच भाग म्हणून आठ दिवसांत पाच जुगार अड्ड्यांवर कारवाई करून अनेकांना अटक केली. अवैध व्यवसाय कायमस्वरुपी बंद करण्याच्या उद्देशाने सोमवारी नवीन हेल्पलाईन त्यांनी सुरू केली आहे. या हेल्पलाइनवर पोलिस उपअधीक्षक कार्यालयापासून जवळच बेकायदेशीररीत्या बार सुरू असल्याची तक्रार दाखल झाली होती. त्याची शहानिशा करून सहायक पोलिस अधीक्षक डॉ. रोहन यांनी रात्री नऊ वाजता पोलिस पथकासह छापा टाकला. या ठिकाणी मोठ्या संख्येने मद्यपी बसले होते. पोलिसांनी या कारवाईत ५३ जणांना ताब्यात घेतले. मोठ्या संख्येने मद्यपींना ताब्यात घेतल्याने रात्री उशिरापर्यंत नागरिकांनीही गर्दी केली होती. उशिरापर्यंत गावभाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे सुरू होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतिक्रमण विभागाने सहा केबिन्स हटवल्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गणेशोत्सवांदरम्यान थंडावलेल्या महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी मोहिमेला मंगळवारपासून पुन्हा सुरुवात झाली. राजारामपुरी विभागीय कार्यालयाने कारवाई करताना सावित्रीबाई फुले रुग्णालय ते उद्यमनगर रस्त्यावरील सहा केबिन्स हटवल्या. दरम्यान कारवाईवेळी किरकोळ वादाचे प्रसंग उद्भवले. पण, विरोध झुगारून देत अतिक्रमण विरोधी पथकाने मोहीम राबवली.

शहरात ठिकठिकाणी रस्त्यावर होणाऱ्या अतिक्रमणाला नगरसेवकांचे अभय मिळते हे वास्तव आहे. तरीही अतिक्रमणविरोधी पथक अधुनमधून कारवाई करत असते. मात्र, गांधीनगर परिसरात हद्दीवरुन वाद निर्माण झाल्यानंतर अतिक्रमणविरोधी मोहीम थंडावली होती. गणेशोत्सवाच्या काळात तरुण मंडळांच्या मंडपांवर कारवाई करत विभागाने आपले अस्तित्व दाखवले. पण ती कारवाई जुजबी स्वरुपाची होती. त्यामुळे अतिक्रमण करणाऱ्या केबिनची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाढती केबिनची संख्या लक्षात घेवून राजारामपुरी विभागीय कार्यालयाने दिवसभर हुतात्मा पार्क, सावित्रीबाई रुग्णालय ते उद्यमनगर या मार्गावर मोहीम राबवली. मोहिमेत वाहतुकीला अढथळा ठरणाऱ्या सहा केबिन्स हटवल्या. शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्या मार्गदर्शनाखाली उपशहर अभियंता आर. के. जाधव, कनिष्ठ अभियंता मिलिंद जाधव, पदमल पाटील, अतिक्रमण विभागाचे प्रमुख पंडित पवार यांनी मोहीम राबवली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जानेवारीत सानेगुरुजी कथामाला अधिवेशन

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

अखिल भारतीय सानेगुरुजी कथामाला जिल्हा समितीतर्फे येत्या जानेवारी महिन्यात तीन दिवसीय तीन दिवसीय अधिवेशन आयोजित केले आहे. या कार्यालयासाठी डॉ. प्रवीण हेंद्रे यांनी केव्हीज प्लाझा येथील पहिला मजल्यावरील जागा मोफत दिली आहे. त्यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन व पल्लवी कोरगांवकर यांच्या हस्ते कार्यालयाच्या नामफलकाचे अनावरण झाले.

कोल्हापुरात १८ ते २० जानेवारी कालावधीत ५२ वी कथामाला अधिवेशन होत आहे. समाजवादी कार्यकर्ते बाबूराव मुळीक यांच्या ९१ व्या जयंतीनिमित्त अधिवेशनाचे आयोजन केले आहे. अधिवेशनाच्या तयारीसाठी आयोजित बैठकीत विविध वक्त्यांनी सहकार्याची ग्वाही दिली. पल्लवी कोरगांवकर यांनी कोरगांवकर ट्रस्ट व आंतरभारती शिक्षण संस्थेतर्फे अधिवेशनाला सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही दिली. डॉ. हेंद्रे यांनी अधिवेशनासाठी मदतीचे आश्वासन दिले. संजय कुमठेकर यांनी साहित्य भेट दिले.

जिल्हा समितीचे अध्यक्ष हसन देसाई यांनी प्रास्ताविक केले. आर. जी. कुलकर्णी यांनी आभार मानले. याप्रसंगी मिरासाहेब मगदूम, गणपतराव हितारे, अशोक चौगले, शशिकांत पाटील, जगन्नाथ कांदळकर, अॅड. आर. एम. जाधव, बापूसाहेब कांबळे, एकनाथ जाधव, बाबा मगदूम, एम. एस. पाटोळे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जिल्हाधिकाऱ्यांनी दिलीभ्रष्टाचार निमूर्लनाची शपथ

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

भ्रष्टाचाराबाबत तीन नोव्हेंबरअखेरच्या दक्षता जनजागृती सप्ताहाचा शुभारंभ सोमवारी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्या हस्ते झाला. यावेळी उपस्थितीत महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्यांनी भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ दिली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात कार्यक्रम झाला.

ते म्हणाले, 'प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सचोटी, पारदर्शकपणे कामकाज करावे. सर्व क्षेत्रात भ्रष्टाचार निर्मूलन करण्यासाठी मदत करावी. दरम्यान, राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सप्ताहानिमित्त दिलेला संदेश वाचून दाखवला. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, उपजिल्हाधिकारी (महसूल) अरविंद लाटकर, पोलिस उपअधीक्षक गिरीश गोडे, पोलिस निरीक्षक मारुती पाटील, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) स्नेहल भोसले, तहसीलदार सविता लष्करे, स्नेहल मुळे-भांमरे, नायब तहसीलदार प्रकाश दगडे यांच्यासह कर्मचारी उपस्थित

होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मैदान हातकणंगले मतदारसंघच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'माझे मैदान हातकणंगले मतदारसंघच असून लोकसभा निवडणूक याच मतदारसंघातून लढवणार आहे' याचा पुनरुच्चार कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला. तर 'जयसिंगपूरला झालेली ऊस परिषद ऊस दरासाठी नसून सदाभाऊंचा द्वेष करणारी परिषद होती. ज्यांची ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत निवडून येण्याची पात्रता नाही, त्यांनी परिषदेत माझ्या फोटोवर चाबकाचे फटके मारत माढ्यातून लढण्याचे आव्हान दिले' अशा शब्दात त्यांनी नाव न घेता रविकांत तपुकर यांची खिल्ली उडवली.

मंत्री खोत म्हणाले, 'जयसिंगपूरच्या परिषदेत ऊस दरापेक्षा अधिक वेळ सदाभाऊचा द्वेष करण्यात खर्ची पडला. माझ्या पोस्टरवर चाबकाचे फटके मारत अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली गेली. ज्यांची ग्रामपंचायतीला निवडून येण्याची पात्रता नाही, अशांनी माढ्यातून लढण्याचे मला आव्हान दिले. आव्हाने देणारे हे नारळावर लढणारे पैलवान आहेत. त्यांच्यासाठी माझ्याकडे असे नारळावर लढणारे अनेक पैलवान आहेत.'

मंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, 'एकीकडे संघटनेचे ताकदवान नेते मंत्र्यांच्या गाड्या अडवणार, कपडे फाडणार अशी वक्तव्ये करणाऱ्या नेत्याच्या जीविताला केव्हापासून धोका निर्माण झाला? मला अन्य मतदारसंघातून लढण्याचे आव्हान दिले जात आहे. पण मी कसलेला पैलवान असल्याने गेल्यावर्षी माढ्यातून लोकसभा निवडणूक लढवली. हा पैलवान कोणत्याही मैदानात लढण्यास तयार आहे. यावर्षी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातूनच निवडणूक लढवणार आहे,' असा पुनरुच्चार त्यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संसदेत पाठवले, मग रस्त्यावरील लढाई कशाला?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

केंद्रीय कृषीमूल्य आयोगाने उत्पादन, मागणी आणि पुरवठ्याच्या सूत्रानुसार उसाच्या एफआरपीचा बेस निश्चित केला. पण, एफआरपीचा बेस चुकला असल्याचे धादांत खोटे सांगून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे. जनतेने संसदेत कायदे करण्यासाठी पाठवले असताना, पुन्हा रस्त्यावरील लढाई कशाला लढता?, अशी टोलेबाजी कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली. खासदार राजू शेट्टी यांचे नाव न घेता 'कायदे करुन लोकांना संरक्षण देता येत नसेल, तर लोकांच्यात रहा' असा उपरोधिक सल्लाही खोत यांनी दिला. मंगळवारी जिल्हा दौऱ्यावर आलेल्या खोत यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

मंत्री खोत म्हणाले, 'कृषीमूल्य आयोगाने दहा टक्के उताऱ्यानुसार नव्हे, तर नऊ टक्के उताऱ्यानुसार एफआरपी निश्चित केली आहे. मात्र , एफआरपीचा बेस चुकल्याचा दिशाभूल करणारा आरोप काही विद्वान मंडळी करत आहेत. यापूर्वी सरकारबरोबर चर्चा करण्यासाठी आंदोलन करावे लागत होते. पण सध्याचे सरकारने पहिल्यापासून चर्चेची कवाडे खुली ठेवत आहे. सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सकारात्मक असल्याने मुख्यमंत्र्यांनी प्रथमच शेतकऱ्यांच्या परिषदेला उपस्थिती लावली. पण, यापूर्वी मी सांगिल्याप्रमाणे यावर्षी ऊस दराचे आंदोलन होईल. त्याची सुरुवातही झाली आहे' अशी टीका खोत यांनी केली.

'शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी शिकवलेल्या अर्थशास्त्रानुसार गेल्यावर्षी आम्ही उसदराची मागणी केली. ती मान्यही झाली' असे सांगून मंत्री खोत म्हणाले, 'यावर्षीच्या हंगामासाठी याच सुत्रानुसार आम्ही दराची मागणी केली. पण हंगाम सुरू झाला असताना एफआरपी बेस बदलण्याची मागणी करत संसदेला घेराव घालण्याचा इशारा दिला जातो. ही त्यांची वृत्ती म्हणजे तहान लागल्यावर विहीर खोदण्याचा प्रकार असून म्हणूनच ते कारखानदारांच्या यात्रेत सहभागी झाले आहेत. आता हे दोघे मिळून बैठका घेतील, आंदोलने करतील. १५ दिवस तमाशा करून सरकारकडे मागणी करतील. त्यानंतर तोडगा निघेल अन् मग श्रेयाचे ढोल-ताशे वाजवले जातील.'

सरकारचे निर्णय भारी

'गेल्या चार वर्षात सरकारने कारखानदारांना पॅकेज दिले. इथेनॉलच्या दरात वाढ केली. साखरेचा हमीभाव प्रतिकिलो २९ रुपये निश्चित केला. उसाखालील शंभर टक्के क्षेत्रावर ठिबक संच बसवण्यासाठी ४५ टक्के अनुदान आणि ५५ टक्के कर्ज केवळ दोन टक्के व्याजाने देण्यात येणार आहे. सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे गेल्या तीन वर्षात आंदोलन करावे लागलेले नाही' असे मंत्री खोत यांनी सांगितले.

मतदारसंघात सीएम चषक स्पर्धा

'दिवाळीनंतर विशेषत: ग्रामीण भागातील खेळांना चालना देण्यासाठी कबड्डी, खो-खो आदी क्रीडा प्रकारांच्या स्पर्धा सीएम चषक नावाने घेण्यात येणार आहे. तसेच सामाजिक बांधिलकी म्हणून आरोग्य शिबिर घेतले जात आहे. आरोग्य शिबिराचा एक मोठा कार्यक्रम रयत शेतकरी संघटनेच्यावतीने घेण्यात येणार आहे' असे खोत यांनी स्पष्ट केले.

०००

(मूळ कॉपी)

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

केंद्रीय कृषीमुल्य आयोगाने उत्पादन, मागणी आणि पुरवठ्याच्या सुत्रानूसार ऊसाच्या एफआरपीचा बेस निश्चित केला. पण एफआरपीचा बेस चुकला असल्याचे धांदात खोटे बोलून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे. जनतेने संसदेत कायदे करण्यासाठी पाठवले असताना, पुन्हा रस्त्यावरील लढाई कशाला लढता, अशा टोला कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी खासदार राजू शेट्टी यांचे नाव न घेतला लगावला. कायदे करुन लोकांना संरक्षण देता येत नसेल, तर लोकांच्यात रहा असा उपरोधिक सल्लाही त्यांनी दिला.

मंत्री खोत मंगळवारी जिल्हा दौऱ्यावर आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, 'कृषीमुल्य आयोगाने दहा टक्के उताऱ्यानुसार नव्हे, तर नऊ टक्के उताऱ्यानुसार एफआरपी निश्चित केली आहे. मात्र एफआरपीचा बेस चुकल्याचा दिशाभूल करणारा आरोप काही विद्वान मंडळी करत आहेत. केंद्र व राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे ऊसदरासाठी तीन वर्षात उत्पादकांना संघर्ष किंवा लाठ्या-काठ्यांचा मार खावा लागला नाही. यापूर्वी सरकारबरोबर चर्चा करण्यासाठी आंदोलन करावे, लागत होते. पण सद्याचे सरकारने पहिल्यापासून चर्चेची कवाडे खुली ठेवत आहे. सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सकारात्मक असल्याने मुख्यमंत्र्यांनी प्रथमच शेतकऱ्यांच्या परिषदेला उपस्थिती लावली. पण यापूर्वी आपण सांगिल्याप्रमाणे यावर्षी ऊसदराचे आंदोलन होणार असून त्याला सुरुवातही झाली असल्याचा टोला पुन्हा एकदा खासदार शेट्टी यांना खोत यांनी लगावला.'

'शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी शिकवलेल्या अर्थशास्त्रानुसार गेल्यावर्षी आपण ऊसदराची मागणी करुन ती मान्यही झाली. यावर्षीच्या हंगामासाठी आपण याच सुत्रानुसार दराची मागणी केली. पण हंगाम सुरू झाला असताना, एफआरपीची बदलण्याची मागणी करत संसदेला घेराव घालण्याचा इशारा दिला जातो. त्यांची वृत्ती म्हणजे तहान लागल्यावर विहीर खोदाई करण्याचा प्रकार असून म्हणूनच ते कारखानदारांच्या यात्रेत सहभागी झाले आहेत. आता हे दोघे मिळून बैठक घेतील, आंदोलन करतील, १५ दिवस तमाशा करुन सरकारकडे मागणी करतील. त्यानंतर तोडगा निघेल अन् मग श्रेयाचे ढोल-ताशे वाजवले जातील, असा टोला खोत यांनी लगावला.'

'गेल्या चार वर्षात सरकारने कारखानदारांना पॅकेज दिले. इथेनॉलच्या दरात वाढ केली. प्रतिकिलो २९ रुपये साखरेचा हमीभाव निश्चित केला. ऊसाखालील शंभर टक्के क्षेत्रावर ठिबक संच बसवण्यासाठी ४५ टक्के अनुदान आणि ५५ टक्के कर्ज केवळ दोन टक्के व्याजाने देण्यात येणार आहे. सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे तीन वर्षात आंदोलन करावे लागले नसल्याचा पुनरुच्चार मंत्री खोत यांनी केला.'

..................

चौकट

मतदारसंघात सीएम चषक स्पर्धा

दिवाळीनंतर विशेषत: ग्रामीण भागातील खेळाना चालणा देण्यासाठी कबड्डी, खो-खो आदी क्रीडा प्रकारच्या स्पर्धा सीएम चषक नावाने घेण्यात येणार आहे. तसेच सामाजिक बांधिलकी म्हणून आरोग्य शिबिर घेतले जात आहे. आरोग्य शिबिराचा एक मोठा कार्यक्रम रयत शेतकरी संघटनेच्यावतीने घेण्यात येणार असल्याचे खोत यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा न्यायाधीश लव्हेकर यांचा निवृत्तीनिमित्त सत्कार

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

जिल्हा न्यायाधीश एम. ए. लव्हेकर यांना जिल्हा बार असोसिएशनच्या कार्यक्रमात सेवानिवृत्तीनिमित्त निरोप देण्यात आला. ते ३१ ऑक्टोबर रोजी ते सेवानिवृत्त होत आहेत. बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड प्रशांत चिटणीस अध्यक्षस्थानी होते.

अॅड चिटणीस यांनी शाल,श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी बोलताना अध्यक्ष चिटणीस म्हणाले, 'लव्हेकर यांनी न्यायदानाचे कर्तव्यबद्धीने आणि निपक्षपती काम केले. ते अजातशत्रू होते. ज्येष्ठ विधीज्ञ के. ए. कापसे यांनी लव्हेकर यांनी सेवानिवृत्तीनंतर ज्युनिअर वकिलांसाठी कार्यशाळा घ्याव्यात, अशी सूचना केली. यावेळी अॅड. पी. आर. पाटील, अॅड डी. बी. भोसले, मुख्य सरकारी वकील विवेक शुल्क यांनी मनोगत व्यक्त केले. उपाध्यक्ष आनंदराव जाधव यांनी प्रास्ताविक केले तर सचिव सुशांत गुडाळकर यांनी सूत्रसंचालन केले. अॅड तेहजीज नदाफ यांनी आभार मानले. यावेळी लोक ऑडिटर अॅड धैर्यशील पवार, मनिषा पाटील, दीपाली पोवार, स्वाती तानवडे, अभिषेक देवरे, जयदीप कदम, युवराज शेळके, बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष विवेक घाटगे, प्रकाश मोरे, अभिजित कापसे, सचिन पाटील, अजित मोहिते, रणजित गावडे, सिटी क्रिमिनल बारचे अध्यक्ष डी. डी. देसाई, डी. डी. घाटगे, पीटर बारदेसकर आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अधिनियमानुसारच म्युनिसिपल ट्रान्सपोर्टची सभा

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

म्युनिसिपल ट्रान्सपोर्ट वर्कर्स युनियनची सभा घेण्यासाठी २० दिवसांपूर्वी अध्यक्षांना नोटीस दिली होती. मात्र अध्यक्षांनी सभा न बोलवल्याने श्रमिक संघ अधिनियम १९२६ नुसार विशेष सभा बोलवून नवीन कार्यकारिणी जाहीर केली. कार्यकारिणी २०२० पर्यंत कार्यरत राहणार असल्याचे प्रसिद्धी पत्रक नव्या कार्यकारिणीने दिले आहे. पत्रकात म्हटेल आहे, 'अध्यक्षांनी युनियनची ३२ वर्षे सत्ता भोगली, मात्र कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. त्यांच्या हुकूमशाही व स्वार्थीपणाला कंटाळूणच सभासदांनी स्वत: सभा घेण्याचा निर्णय घेतला. अध्यक्षांना सभा घेवून पदच्युत करण्याचा निर्णय बहुमताने घेतला, असताना जॉइन सेक्रेटरी यांनी बेकायदेशीरपणे पत्रक काढून संघटनेच्या घटनेचा भंग केला आहे. त्यांच्यावरही लवकरच कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे सभासदांनी अशा स्वार्थी व ढोंगीपणाला बळी पडू नये, असे पत्रकात नमूद केले आहे.' पत्रकावर अध्यक्ष, खजानीस व जॉईन सेक्रेटरी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images