Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

दिवाळी मार्केटचे‘महाद्वार’

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

लहान मुलांच्या फॅशनेबल कपड्यांनी सजलेली शोरुम्स, नामवंत कपन्यांच्या ब्रँन्डेड कपड्यांच्या असंख्य व्हरायटीज, मुला मुलींच्या फॅशनेबल कपड्यांची चलती आणि दीपावलीच्या सजावटीच्या साहित्यांनी महाद्वार रोडचे मार्केट फुलले आहे. लहानमोठ्या आकारातील आकाशकंदिलाच्या झगमगाट संपूर्ण बाजारपेठेत व्यापून राहिली असून पणत्या, रंगीबेरंगी रांगोळी, तोरण, फुलांच्या माळांनी बाजारपेठेची शोभा वाढली आहे.

किराणा साहित्यापासून फॅशनेबल कपड्यांपर्यत आणि सजावटीच्या साहित्यापासून सोने चांदीपर्यंत सगळ्या वस्तूंची दालने महाद्वार रोडवर आहेत. रोडच्या दोन्ही बाजूला मोठी दुकाने, रस्त्यावर फेरीवाल्यांचे स्टॉल यामुळे खरेदीसाठी ग्राहकांची पहिली पसंत याठिकाणी असे जणू समीकरण बनले आहे. महाद्वार रोडच्या दोन्ही बाजूची दुकाने, शोरुस्म सजली आहेत. विद्युत रोषणाईने शोरुम्सचे सौंदर्य आणखी खुलले आहे. सणानिमित्त लहानमुलांचे फॅशनेबल कपडे, ब्रँन्डेड कपड्यांच्या शोरुम्समध्ये स्वतंत्र दालने सुरू केली आहेत.

काही दुकानदारांनी गर्दी कॅश करण्यासाठी खरेदीवर सवलत योजना घोषित केली आहे. तयार कपड्यांच्या दुकानात ऑफर्स पाहावयास मिळतात. लहान मुलांच्या ब्रँडेड कपड्यांना मोठी मागणी आहे. लहान मुलांच्या तयार कपड्यांत दरवर्षी नवनवीन फॅशन्सची भर पडते. लहान मुलांचे ट्रॅकसूटबद्दल क्रेझ असल्याचे चित्र आहे. फॅशनेबल कपड्यांची बाजारपेठ साऱ्यांचेच आकर्षण ठरत आहे. जॅकेट, फॅन्सी ड्रेस, टी शर्ट व जीन्समधील वैविध्यता तरुणाईला खुणावत आहे. गुजरी कॉर्नर परिसरातील सौंदर्यप्रसाधनांच्या दुकानातील दरवळ वाढली आहे. विविध प्रकारच्या परफ्यूम्स खरेदीसाठी ग्राहकांची वर्दळ आहे.

स्वस्त खरेदीचा बाजार

महाद्वार रोड, ताराबाई रोड आणि जोतिबा रोड येथील रस्त्यावरील बाजारही तेजीत आहे. दीपावली सणाचे औचित्य साधून फेरीवाल्यांनी कपड्यांचे स्टॉल उभारले आहेत. लहान मुलांच्या कपड्यांपासून, कुर्ता, लेगीन्स, टॉप, जीन्स अशी तयार कपडे त्यांच्याकडे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. रस्त्यावरील बाजारात लहान मुलांचे शर्ट १०० रुपये तर जीन्स १५० ते २०० रुपयांना मिळत आहेत. बिनखांबी गणेश मंदिरपासून पापाची तिकटीपर्यंत रस्त्यावरचा बाजार फुलला आहे. कमी किंमतीत विविध प्रकारच्या वस्तू मिळत असल्याने सामान्य नागरिक महाद्वार रोडवरील खरेदीला प्राधान्य देत आहेत.

१७ नमुन्यात पणत्या

दिवाळी सणात घरोघरी पणत्यांचा उत्सव असतो. पणत्यांची विक्री मोठ्या संख्येने होते. बाजारपेठेत लहानमोठ्या आकारातील आणि सुमारे १७ नमुन्यात पणत्या तयार केल्या आहेत. थाळी पणती, नियमित पणती, उभ्या पणत्यांना मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. लक्ष्मीपूजनासाठी मोठ्या आकारातील पणत्या तयार केल्या आहेत. स्थानिक उत्पादनासोबतच परराज्यातून पणत्यांची आवक झाली आहे. पणत्या चिनीमाती, बेळगावी मातीपासून बनविल्या आहेत. पणत्यांच्या आकारमानावरून त्यांची किंमत आकारली जाते. प्रतिडझन ५० रुपयांपासून सुरुवात आहे. बिनखांबी गणेश मंदिर चौक, महाद्वार रोडवर ठिकठिकाणी पणत्या विक्रीस उपलब्ध आहेत. धातूच्या पणत्यांनाही मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

रांगोळी, सजावटीच्या साहित्यांची रेलचेल

दसरा, दीपावली सणाच्या कालावधीत सजावटीच्या साहित्यांची मोठ्या प्रमाणात विक्री होती. महाव्दार रोडवर रंगीबेरंगी तोरणे, कृत्रिम फुलांचे हार, लाइट माळाच्या पाहावयास मिळतात. दुकानदारासोबतच लहानसहान विक्रेते, फेरीवाल्याकडे सजावटीच्या साहित्यांची धडाक्यात विक्री सुरू आहे. आकाशकंदिलाची विक्री मोठ्या प्रमाणात आहे. लहान आकरातील आकाशकंदिलाचा भाव प्रतिडझन १०० रुपये इतका आहे. मोठ्या आकारातील आकाशकंदिलाच्या किंमती १०० रुपयांपासून पुढे आहेत. महाव्दार चौकात रंगीत रांगोळी महिला वर्गाचे लक्ष वेधत आहे. २५० ग्रॅम, अर्धा किलो, एक किलोच्या वजनाच्या रांगोळीच्या पिशव्या विक्रीसाठी तयार केल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आयुक्तांच्या निवासस्थानासमोर दिवाळीत आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी दिव्यांगासाठी राखीव असलेला अपंग कल्याण निधी अन्यत्र वळवला आहे. यानिषेधार्थ सोमवारी (ता. ५) आयुक्तांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्यात येणार आहे. प्रहार अपंग क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवदत्त माने यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

देवदत्त माने म्हणाले, 'केंद्र व राज्य सरकारकडून महापालिकेला दरवर्षी अपंग कल्याण निधी मिळतो. यावर्षी मिळालेला निधी आयुक्तांनी अन्यत्र वळवला आहे. दिव्यांगाचा हक्काचा निधी दिव्यांग व्यक्तींसाठीच मिळाला पाहिजे. सरकारच्या निर्णयाप्रमाणे अपंग कल्याण निधी इतरत्र वळवणे गुन्हा असल्याने प्रसंगी आयुक्तांवर गुन्हा दाखल करू. मनमानीपणे वळवलेला निधी अपंगासाठी न दिल्यास आयुक्तांना दिवाळी साजरी करु देणार नाही.'

पत्रकार परिषदेस कार्याध्यक्ष विकास चौगुले, विष्णुपंत पाटील, अक्षय म्हेतर, संदीप दळवी, प्रशांत म्हेतर, संजयसिंह जाधव, विवेक पाटील आदी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मटार, वांग्याचे दर भडकले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आवक कमी आणि वाढती मागणी यामुळे मटार महागली असून भाजी मंडईत त्याचा दर प्रतिकिलो १२० रुपये झाला आहे. मेथी पेंढीचा दर २० रुपये तर कोथंबिरी पेंढीचा दर २० ते ३० रुपये असा कायम राहिला आहे. वांग्याच्या दरात दहा रुपयांनी वाढ झाली असून प्रतिकिलो ८० रुपये दराने विक्री सुरू आहे.

बाजारात पालेभाज्यांना मोठी मागणी असली तरी दरही चढेच राहिले आहेत. मेथी पेंढीचा दर २० रुपये तर शेपू व कांदा पातीचा दर १५ रुपयांवर स्थिर आहे. पालक, पोकळ्याच्या पेंढीचा दर १० रुपये कायम आहे. वांग्यांना मागणी असून दरात प्रतिकिलो १० रुपयांची वाढ झाली आहे. पावटा प्रतिकिलो ६० रुपये असून भेंडी, दोडका, कारली यांचा दर प्रतिकिलो ४० रुपयांपर्यंत आहे. टॉमटोचा दर प्रतिकिलो १० रुपये तर गवार ८० रुपये असा आहे. कांद्याची आवक घटल्याने गेले दोन आठवडे दरवाढ झाली आहे. लहान कांदा प्रतिकिलो २० रुपये, मध्यम कांदा २५ तर मोठा कांदा ३० रुपये किलोने विक्री सुरू आहे. कोबी प्रतिगड्डा १० तर फ्लॉवर गड्डा १५ ते ३० रुपये गड्डा विक्री होत आहे.

फळभाज्यांचे दर (प्रतिकिलो, रुपयांत)

वांगी ८०

टोमॅटो १०

भेंडी ४०

ढबू मिरची ४०

गवार ८०

दोडका ४०

कारली २०

वरणा ५०

ओली मिरची ४०

बटाटा २५ ते ३०

लसूण ३०

कांदा २० ते ३०

फ्लॉवर १५ ते ३० रुपये प्रति नग

कोबी १० रुपये प्रति नग

पालेभाजी दर (पेंढी, रुपयांत)

मेथी २०

कांदा पात १५

मेथी १०

कोंथबीर २० ते ३०

पोकळा १०

पालक १०

फळांचे दर (प्रतिकिलो, रुपयांत)

सफरंचद ६० ते २००

डाळिंब ४० ते ८०

सिताफळ ४० ते ८०

केळी २० ते ६० (डझन)

जवारी केळी २० ते ७० (डझन)

हनुमान १२०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साखर मूल्यांकन ३१०० रुपये

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्य सहकारी बँकेने साखरेचे प्रतिक्विंटलला ३१०० रुपये मूल्यांकन केले आहे. राज्य बँकेकडून प्रतिपोत्यामागे ८५ टक्के, तर जिल्हा बँकेकडून ९० टक्के कर्ज दिले जात आहे. ३१०० रुपये मूल्यांकनानुसार या हंगामातही जिल्ह्यातील साखर कारखान्यांना कर्ज दिले जाणार असल्याची माहिती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने यांनी दिली.

राज्य बँकेकडून बाजारातील साखरेच्या दरावरून मूल्यांकन केले जाते. सप्टेंबर महिन्यात ३१०० रुपये प्रतिक्विंटल मूल्यांकन केले आहे. दराच्या चढउतारानुसार दोन ते तीन महिन्यांनी साखरेचे मूल्यांकन जाहीर केले जाते. कारखानदार हंगामासाठी पूर्वहंगामीही कर्ज घेतात. कारखाना सुरू झाल्यावर मूल्यांकनानुसार तयार साखरेच्या प्रत्येक पोत्यावर कर्ज दिले जाते. साखरेचे मूल्यांकन ३१०० रुपये असल्याने प्रतिपोत्यावर २९९० रुपये कर्ज मिळणार आहे. पण प्रत्यक्षात कारखान्यांच्या हातात पूर्ण रक्कम मिळत नाही. प्रत्येक पोत्यामागे साखरेवरील जीएसटी कारखान्यांना भरावा लागतो. तसेच बँकेकडून उचललेल्या पूर्वहंगामी कर्जाचा ५०० रुपये हप्ता बँक कापून घेते. तसेच जुनी कर्जे, मध्यम कर्जांचे हप्तेही वसूल केले जातात. त्यामुळे प्रत्येक पोत्यामागे १९०० ते २००० रुपये कर्जातून मिळतात.

गतवर्षी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेचे दर कोसळल्याने कारखाने व बँकांना शॉर्ट मार्जिन सोसावे लागले. जिल्ह्यातील २२ कारखान्यांचे जिल्हा बँकेत अंदाजे १८० कोटी रुपये कर्ज थकीत आहे. त्याच्या वसुलीसाठी बँकेकडून तगादा सुरू आहे. त्यामुळे सरकारने साखर खरेदी दरात वाढ करावी, अशी मागणी होत आहे. साखरेचा दर ३४०० ते ३५०० रुपये झाल्यास ऊस उत्पादकांना जादा दर देणे शक्य असल्याचा दावा कारखान्यांकडून केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

म्युनिसिपल ट्रान्सपोर्ट वर्कर्स युनियनची सभा बेकायदेशीर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

म्युनिसिपल ट्रान्सपोर्ट वर्कर्स युनियनच्या कार्यकारिणीची निवड २०२२पर्यंत झाली आहे. युनियनच्या घटनेनुसार कार्यकारिणी कार्यरत असताना बेकायदेशीर सभा बोलावून नव्या कार्यकारिणीची निवड जाहीर केली आहे. अध्यक्षांच्या परवानगीशिवाय पदाधिकाऱ्यांची नियुक्ती व सभा घेतली असल्याने या नियुक्त्या बेकायदेशीर असल्याचे प्रसिद्धी पत्रक युनियनचे जॉइन सेक्रेटरी आनंद आडके यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

पत्रकात म्हटले आहे, युनियनच्या पदाधिकाऱ्यांची निवड २०१७ मध्ये विशेष सर्वसाधारण सभा घेऊन केली. अध्यक्ष निशिकांत सरनाईक यांच्यासह अन्य कार्यकारिणीची मुदत २०२२ पर्यंत असून घटनेतील तरतुदीनुसार युनियनचे कामकाज सुरू आहे. तथापि संघटनेतील जनरल सेक्रेटरी व अन्य पदाधिकारी स्वार्थ आणि सत्तेच्या हव्यासापोटी संघटनेच्या हिताला बाधा आणत आहेत. विद्यमान अध्यक्षांविरोधात अफवा पसरवून कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण करत आहेत. अध्यक्षांच्या परवानगीशिवाय सभा बोलवता येत नसताना, सभा बोलवली गेली. जाहीर केलेली कार्यकारिणी बेकायदेशीर आहे. संघटनेची मुदत पाच वर्षे असल्याने उपद्व्यापी मंडळीबरोबर संबंध न ठेवण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्यासोबत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसंबंधी मंगळवारी (ता. ३०) चर्चेसाठी वेळ निश्चित केली आहे. त्याप्रमाणे चर्चेला जाण्यासाठी संघटनेच्या सभासदांनी शाहू क्लॉथ मार्केटमधील केएमटीच्या मुख्य कार्यालयाजवळ सायंकाळी चार वाजता उपस्थित राहण्याचे आवाहनही प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भिशी फुटल्याने खरेदीला वेग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहर परिसरासह जिल्ह्यातील भिशीतून उलाढाल सुरू झाली आहे. दिवाळीच्या सणानिमित्त विविध वस्तू, कपडे, खाद्यपदार्थांच्या खरेदीसाठी पैसे उपलब्ध झाल्याने महिनाअखेर असूनही बाजारपेठेत लगबग वाढली आहे.

दसरा-दिवाळी हा वर्षातील सर्वात महत्वाचा सण समजला जातो. दोन्ही सणांदरम्यान मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. त्यासाठी खासगी कंपन्या, सहकारी संस्थांकडून बोनस दिला जातो. गावागावांतील दूध डेअरी, पतसंस्थांतील बोनसही आधार ठरतो. मात्र कष्टकरी, रोजंदारी, छोट्या दुकानांत काम करणाऱ्यांकडून वार्षिक भिशी चालवली जाते. शहरासह परिसरात आठवडा, मासिक, सहा महिने आणि वार्षिक भिशी चालवल्या जातात. आठवड्यात विशिष्ट दिवशी ठराविक रक्कम जमा केली जाते. सभासदांना गरज असल्यास नाममात्र व्याज आकारून पैसे दिले जातात. साठलेल्या पैशांची भिशी दिवाळीच्या तोंडावर उघडली जाते. यातून सहभागी कुटुंबांमध्ये कमी-अधिक प्रमाणात पैसे उपलब्ध होत आहेत. या पैशांचा मध्यमवर्गीय, गरिब, गरजूंना सर्वाधिक आधार मिळाला आहे. काही ठिकाणी भिशी फुटण्यास विलंब असल्यास अॅडव्हान्स घेतला जात आहे. या पैशांतून फराळ, कपडे, दैनंदिन वस्तू खरेदी करण्याकडे अनेकांचा कल आहे. मोठे व्यवसायिक, नोकरदार बचत केलेल्या पैशांतून सोने, दुचाकी, चारचाकी वाहन, इलेक्ट्रॉनिक वस्तू घेत आहेत. मुहूर्तावर घेऊन जाण्यासाठी आतापासून बुकिंग सुरू आहे. परिणामी शहरातील प्रमुख बाजारपेठेत खरेदीसाठी वर्दळ वाढली आहे.

ऑफर्सचे फलक

सरकारी, निमसरकारी, खासगी कंपन्यांनी अद्याप बोनस वाटप सुरू केलेले नाही. मात्र बोनस किती मिळणार याचा अंदाज घेत अॅडव्हान्स घेऊन खरेदी केली जात आहे. त्यामुळे बाजारात उलाढाल वाढली आहे. या पार्श्वभूमीवर ग्राहकांना आपल्याकडे खेचण्यासाठी सर्वच दुकानदारांनी लक्षवेधक सजावट केली आहे. लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, शिवाजी चौक, राजारामपुरी, गांधीनगर आदी ठिकाणी दुकानांसमोर विविध ऑफर्सचे फलक झळकले आहेत.

बचत गटांचेही वाटप

महिला बचत गटही दिवाळीच्या खरेदीसाठी काही रक्कम बाजूला काढून ठेवतात. ती रक्कम सभासदांना वाटली जात आहे. शहर परिसरातील, उपनगरातील महिला बचत गटातील सभासदांच्या हाती पैसे उपलब्ध होत आहे. त्यामुळे तालुका स्तरांवरील बाजारपेठेतही खरेदीची धांदल सुरू आहे.

०००

(मूळ कॉपी)

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहर, परिसर, जिल्ह्यातील लहान, मोठ्या भिशी फुटत आहेत. यामुळे विविध वस्तू, कपडे, खाद्य पदार्थ खरेदीसाठी पैसे उपलब्ध झाले आहेत. बाजारपेठेत लगबग वाढली आहे.

दसरा, दिवाळी वर्षातील सर्वात महत्वाचा सण समजला जातो. दोन्ही सणात खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यासाठी खासगी कंपन्या, सहकारी संस्था बोनस देतात. गावा, गावातील दूध डेअरी, पतसंस्थांतील बोनसही आधार असतो. मात्र कष्टकरी, रोजंदारी, लहान दुकानात काम करणारे भिशीत पैसे भरतात. म्हणून शहरात गल्लो गल्ली आठवडा, मासिक, सहा महिने, ११ महिन्यांच्या मुदतीची भिशी आहेत.

आठवड्याला विशिष्ट पैसे किंवा शक्य तितकी रक्कम जमा करण्याची मुबा असते. सभासदांना गरज असल्यास नाममात्र व्याज आकारून पैसे दिले जातात. अशा प्रकारे साठलेल्या पैशांची भिशी दिवाळीच्या तोंडावर फोडली जात आहे. सर्व घटकातील कुटुंबांमध्ये कमी, अधिक प्रमाणात पैसे जात आहेत. या पैशाचा आधार सर्वाधिक मध्यमवर्गीय, गरिबांना होत आहे. भिशी फुटण्यास विलंब असल्यास अॅडव्हान्स घेतला जात आहे. या पैशातून फराळ, कपडे, दैनंदिन वस्तू खरेदी करण्याकडे कल आहे. मोठे व्यवसायिक, नोकरदार बचत केलेल्या पैशांतून सोने, दुचाकी, चारचाकी वाहन, इलेक्ट्रॉनिक वस्तू घेत आहेत. मुहुर्तावर घेऊन जाण्यासाठी आतापासून बुकिंग सुरू आहे. परिणामी शहरातील प्रमुख बाजारात खरेदीसाठी वर्दळ वाढली आहे.

सरकारी, निमसरकारी, खासगी कंपनीने अजूनही बोनस वाटप सुरू केलेले नाही. तरीही बोनस किती मिळणार त्याचा अंदाज घेत अॅडव्हान्स घेऊन खरेदी केली जात आहे. बाजारात चलन आहे. यापार्श्वभूमीवर ग्राहकांना खेचण्यासाठी सर्वच दुकानदारांनी लक्षवेधी सजावट केली आहे. लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, शिवाजी चौक, राजारामपुरी, गांधीनगर परिसरातील दुकानांसमोर विविध ऑफर्सचे फलक लागले आहेत.

बचत गटातीलही पैसे

महिला बचत गटही दिवाळीच्या खरेदीसाठी काही रक्कम बाजूला काढून ठेवतात. ती रक्कम सभासदांना वाटली जात आहे. शहर परिसरातील उपनगरातील महिला बचत गटातील सभासदांच्या हातात पैसे उपलब्ध होत आहे. यामुळे तालुका बाजारपेठेतही खरेदीची धांदल आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चांगभलंचा गजर आणि भंडाऱ्याची उधळण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, हातकणंगले

'बिरदेवाच्या नावानं चांगभल'च्या गजरात मानाच्या छत्र्या फिरवत, धनगरी ढोल व कैताळांच्या गगनभेदी निनादात भंडाऱ्याच्या व खारीक-खोबऱ्यांची उधळण करीत लाखो भाविकांच्या उपस्थितीत पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथील श्री विठ्ठल-बिरदेव यात्रेस रविवारी पारंपरिक पद्धतीने भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. फरांडेबाबांची भाकणूक ऐकण्यासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती.

महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश, गोवा, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश तसेच देशाच्या अनेक राज्यांतून विविध प्रांतांतील लाखो भाविकांनी हजेरी लावून श्री विठ्ठल बिरदेवाचे दर्शन घेतले. रविवारी सकाळी गावचावडीत धार्मिक प्रथेप्रमाणे मानाच्या दुधारी तलवारींचे पूजन झाले. तलवारींसह गावकामगार पाटील रणजित पाटील, गावडे, कुलकर्णी, आवटे, जोशी, चौगुले, आदींसह मानकरी धनगर समाजाचे पंच मंडळी फरांडेबाबांना भेटण्यासाठी निघाले. गादीवर विराजमान असलेल्या खेलोबा राजाभाऊ वाघमोडे (फरांडेबाबा) यांना आलिंगन देऊन मंदिरात येण्याचे निमंत्रण दिले. मंदिरात येण्याचे निमंत्रण स्वीकारून फरांडेबाबा दगडी गादीवरून उठले. तेथून फरांडेबाबांनी हेडाम नृत्यास (पोटावर तलवारीचे वार करीत) सुरुवात केली. यावेळी लाखो भाविकांनी विठ्ठल बिरदेवाच्या अखंड जयघोषात फरांडेबाबांच्या अंगावर भंडारा, खोबरे, बाळ लोकर, पैशांची उधळण केली. भंडाऱ्याच्या उधळणीने संपूर्ण परिसर पिवळाधमक झाला होता. सोमवारी (ता.२९) भरयात्रा, श्रींची तिसरी, चौथी पालखी, नैवेद्य दाखविणे, मंगळवारी (ता.३०) पाचवी पालखी व फूट यात्रा असून, दोन दिवस यात्रा चालणार आहे. भाविकांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाने जादा बसेसची सोय केली आहे. वाहतूक व्यवस्थेसाठी पोलिस प्रशासनाने एकेरी वाहतूक मार्गाचा अवलंबला असून, यात्रेकरूंच्या सुरक्षितेसाठी पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. विविध व्यावसायिक, पाळणेवाले यांच्यासह घोंगडी-कांबळ्यांची दुकाने, ढोल, ढोलाच्या कड्या यांचा मोठा बाजार भरला होता. यात्रेच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात उलाढाल होत आहे.

००००

चौकट..

हुपरी पोलिसांची अनोख्या कल्पनेचा उपयोग...!

यात्रेसाठी लाखो भाविक येतात. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी हुपरी पोलिस ठाण्याचे नामदेव शिंदे यांनी सोशल मीडियातून यात्राकाळात साध्या वेशातील पोलिस व सीसीटीव्ही कॅमेरे असल्याची अॅडिओ क्लिप प्रसारित केल्याने याची अनेकांनी धास्ती घेतल्याने या अनोख्या कल्पनेचा मोठ्या प्रमाणात उपयोग झाला.

००००

★भंडाऱ्याऐवजी हळदीचा वापर

यात्रेत दरवर्षी भंडाऱ्याची प्रचंड उधळण होते; परंतु भंडाऱ्यात मातीच्या खरीचा वापर असल्याने डोळ्यात जाऊन जळजळ होत असल्याने यावर्षीपासून हळदीचा वापर करण्याचे आवाहन केले होते. देवस्थान समितीच्या या निर्णयाचे भाविकांनी स्वागत करून समाधान व्यक्त केले.

००००

यात्रेत आपत्ती व्यवस्थापन पथक

पट्टणकोडोली यात्रेत पोलिस व प्रशासनाच्या मदतीला यावर्षी प्रथमच जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन टीमचे सहकार्य घेतले. यात आपत्ती व्यवस्थापन पथकाचे प्रमुख संकपाळ व त्यांचे ७० सदस्यांचे पथक लाठ्या, हेल्मेटसह यात्रेत तैनात केले होते. संपूर्ण यात्रेचे ड्रोनद्वारे शूटिंग, वॉकीटॉकीच्या १२ सेटद्वारे संपर्क सुरू होते. अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे व प्रांताधिकारी समीर शिंगटे यांच्या सहकार्याने हे अद्ययावत पथक उपलब्ध झाले होते. यात्रास्थळी अप्पर पोलिस अधीक्षक श्रीनिवास घाटगे, डीवायएसपी नीलाम, तहसीलदार सुधाकर भोसले, सहायक पोलिस निरीक्षक नामदेव शिंदे, मंडल अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, आदींसह तालुक्यातील सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

०००००

भरांडेबाबांची भाकणूक...

राजकारणात गोंधळ होईल

★रोहिणीचा पाऊस मृगाचा पेरा

★तांबडं धान्य व रसभांडे कडक होईल

★माझी सेवा करेल त्याला कांबळ्याखाली धरेन

★सात दिवसांत पाऊस पडेल.

००००००

१)श्री. विठ्ठल -बिरदेव यात्रे मध्ये फरांडेबाबा ऐतिहासिक हेडाम नृत्य खेळताना.

२) यात्रेमध्ये भाविक मानाच्या छत्र्या फिरवताना.

३)भाकणूक व हेडाम नृत्याच्या कार्यक्रमासाठी यात्रेमध्ये जमलेले लाखो भाविक.

४) पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथील श्री विठ्ठल-बिरदेव यात्रेत जिल्हा प्रशासनाने प्रथमच आपत्कालीन व्यवस्थापनाचा वापर केला. यावेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक श्रीनिवास घाडगे, तहसीलदार सुधाकर भोसले, आदींसह सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

००००

सर्व छाया -साक्षी कुंभोजकर,हुपरी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

५८ हजार वृद्ध मतदार ‘संशयित’

$
0
0

Bhimgonda.Desai@timesgroup.com

Tweet : @bhimgondaMT

कोल्हापूर : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीत ८० पेक्षा अधिक वय असलेले ५८ हजार २४६ मतदार 'संशयित' असल्याचे निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे. सर्व मृत वृद्ध नागरिकांची नावे कमी न झाल्याने प्रत्यक्षातील मतदारांपेक्षा दुप्पटीहून अधिक वृद्ध मतदार यादीत असल्याचे यंत्रणेचे म्हणणे आहे. निकषांपेक्षा अधिक संख्येने असलेल्या या वयोगटातील मतदारांची छाननी सुरू करण्यात आली आहे.

इतक्या मोठ्या संख्येने ज्येष्ठ मतदार यादीत असल्याने सरासरी आयुर्मान वाढले असावे किंवा मृतांची नावे कमी झाली नसावीत अशा दोनच शक्यता आहेत. आता निवडणूक आयोगाने यावर संशय घेतल्याने बीएलओंमार्फत यादीतील सर्व मतदारांची खात्री केली जात आहे. मात्र, प्रत्येक घरात जाऊन प्रत्येक वृद्धापर्यंत पोहचण्याइतकी यंत्रणा प्रशासनाकडे नसल्याने ते आव्हानात्मक बनले आहे. यादीनुसार सर्वाधिक वृद्ध मतदार चंदगड आणि सर्वात कमी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात आहेत.

जिल्ह्याची एकूण लोकसंख्या ३९ लाख २३ हजार आहे. यापैकी १ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीनुसार २९ लाख ६५ हजार ३१४ मतदार आहेत. यात ८० वर्षावरील मतदार १ लाख १० हजार २६८ आहेत. ही संख्या २०१९ च्या अंदाजित जनगणनेनुसार प्रत्यक्षातील वृद्ध मतदारांपेक्षा दुप्पटीपेक्षा अधिक आहेत. वस्तूत: मृत सदस्याचे नाव कमी करण्यास संबंधितांचे कुटुंबीय स्वत:हून प्रशासनाकडे जात नाहीत. यादीत ती वृद्ध व्यक्ती जिवंत दिसते. वाढलेल्या आयुर्मानापेक्षा हीच शक्यता अधिक असल्याने वृद्ध मतदार संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. यादीत नाव असेल आणि प्रत्यक्षात ते जिवंत नसतील तर त्यांच्या नावे दुसरी व्यक्ती मतदान करू शकते. त्यावेळी मतदान प्रक्रिया वादग्रस्त बनते. हे टाळण्यासाठी निवडणूक यंत्रणेने मतदार यादी शुद्धीकरण, अद्यावतीकरणांतर्गत नवीन नाव नोंदवणे, नावात, पत्त्यात दुरुस्ती करण्याच्या मोहिमेत मृत किंवा स्थलातंरीत मतदारांची नावे कमी करण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. गावपातळीवरील ग्रामसेवक, तलाठी, कोतवालांच्या मदतीने हे काम केले जात आहे. मात्र ३१ ऑक्टोबरअखेरच्या मोहिमेत शहर-तालुक्याचे ठिकाण, मोठ्या गावांत संशयित सर्व मतदारांर्यंत जाऊन वस्तूस्थिती तपासण्यासाठी यंत्रणा कमी पडत आहे. यादीत जिवंत असलेल्या सर्व मतदारांची नावे कमी करणे हे आव्हानात्मक बनले आहे.

विभागीय आयुक्तांचाही आक्षेप

सध्याच्या मतदारयादीत १ लाख १० हजार २६८ मतदारांचे वय ८० किंवा त्यापेक्षा अधिक आहे. प्रत्यक्षात ५२ हजार ०२२ जणच ८० वर्षावरील असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. तुलनात्मकदृष्या यादीत ५८ हजार २४६ मतदार यादीत अधिक आहेत. महिन्यापूर्वी निवडणूक कामाचा आढावा घेण्यासाठी आलेले विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी यावर आक्षेप घेतला. 'इतके वृद्ध मतदार जिवंत आहेत का?, नसतील तर त्यांची नावे कमी करा,' असे आदेश त्यांनी दिले आहेत.

विधानसभा मतदारसंघनिहाय

प्रारूप यादीतील ८० वर्षावरील मतदार (कंसात जनगणनेनुसार संख्या)

कोल्हापूर दक्षिण ९००० (५८७६)

कोल्हापूर उत्तर ९७८९ (४८१९)

करवीर १०६७७ (५२२८)

चंदगड ४८३७ (४८३७)

राधानगरी १२०१७ (५०९४)

कागल १२१७३ (५२१३)

शाहूवाडी ११२९९ (४६८७)

हातकणंगले ११८१३ (५३६१)

इचलकरंजी ७०३३ (५७०५)

शिरोळ १३३८४ (५२०२).

०००

(मूळ कॉपी)

निवडणूक यंत्रणेकडून छाननी सुरू

Bhimgonda.Desai@timesgroup.com

Tweet : @bhimgondaMT

कोल्हापूर : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी प्रसिध्द करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीत ८० वर्षावरील ५८ हजार २४६ वृध्द मतदार संख्या 'संशयित' असल्याचे समोर आले. सर्व मयत वृध्दांची नावे कमी न झाल्याने प्रत्यक्षातील मतदारांपेक्षा दुप्पटीहून अधिक वृध्द मतदार यादीत आहेत. त्या संख्येवर निवडणूक प्रशासनाने संशय घेतला आहे. म्हणून बीएलओंतर्फे यादीतील सर्व वृध्द मतदारांची खात्री केली जात आहे. मात्र घरांपर्यंत जाऊन प्रत्येक वृध्दांपर्यंत पोहचण्याइतकी यंत्रणा प्रशासनाकडे नसल्याने ते आव्हानात्मक बनले आहे.

जिल्ह्याची एकूण लोकसंख्या ३९ लाख २३ हजार आहे. पैकी २९ लाख ६५ हजार ३१४ मतदार असल्याचे १ सप्टेंबर रोजी प्रसिध्दी झालेल्या प्रारूप मतदार यादीवरून स्पष्ट झाले. त्यात ८० वर्षावरील १ लाख १० हजार २६८ मतदार आहेत. ही संख्या २०१९ च्या अंदाजीत जनगणनेनुसार प्रत्यक्षातील वृध्द मतदारांपेक्षा दुप्पटीपेक्षा अधिक आहेत. यामुळे सरासरी आयुर्मान वाढले असावे किंवा मयतांची नावे कमी झाली नसावीत, अशा दोनच शक्यता आहेत. मयत सदस्याचे नाव कमी करण्यास संबंधीत कुटुंबीय स्वत:हून प्रशासनाकडे जात नाहीत. यादीत तो किंवा ती वध्दा जिवंत दिसते. आयुर्मानापेक्षा हीच शक्यता अधिक असल्याने वृध्द मतदार संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

यादीतच नाव असेल आणि प्रत्यक्षात ते जिवंत नसतील तर त्यांच्या नावे दुसरी व्यक्ती मतदान करू शकते. त्यावेळी मतदान प्रक्रिया वादग्रस्त बनते. हे टाळण्यासाठी निवडणूक यंत्रणा मतदार यादी शुध्दीकरण, अद्यावतीकरणातर्गंत नवीन नाव नोंदवणे, नावात, पत्त्यात दुरूस्ती करण्याच्या मोहिमेत मयत किंवा स्थलातंरीत मतदारांची नावे कमी करण्यावर लक्ष केंद्रीत केले. गावपातळीवरील ग्रामसेवक, तलाठी, कोतवालाच्या मदतीने हे काम केले जात आहे. मात्र ३१ ऑक्टोबर अखेरच्या मोहिमेत शहर, तालुक्याचे ठिकाण, मोठ्या गावात संशयित सर्व मतदारांर्यंत जाऊन वस्तूस्थिती तपासण्यासाठी यंत्रणा कमी पडत आहे. फक्त यादीत जिवंत असलेल्या सर्व मतदारांची नावे कमी करणे आव्हानात्मक बनले आहे.

---------------

चौकट

आयुक्तांचाही आक्षेप

सध्याच्या मतदार यादीत १ लाख १० हजार २६८ मतदार ८० वर्षावरील आहेत. प्रत्यक्षात ५२ हजार ०२२ जण ८० वर्षावरील आहेत. तुलनात्मकदृष्या ५८ हजार २४६ मतदार यादीत अधिक आहेत. त्यावर महिन्यापूर्वी निवडणूक कामाचा आढावा घेण्यासाठी आलेले विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी आक्षेप घेतला. इतके वृध्द मतदार जिवंत आहेत का, नसतील तर नावे कमी करा, असेही त्यांनी सूचना दिली होती.

----------

सर्वाधिक चंदगडमध्ये

प्रारूप यादीतील ८० वर्षावरील मतदार व कंसात जनगणनेनुसार प्रत्यक्षातील मतदार विधानसभा मतदारसंघनिहाय असे : कोल्हापूर दक्षिण ९००० (५८७६), कोल्हापूर उत्तर ९७८९ (४८१९), करवीर १०६७७ (५२२८), चंदगड ४८३७ (४८३७), राधानगरी १२०१७ (५०९४), कागल १२१७३ (५२१३), शाहूवाडी ११२९९ (४६८७), हातकणंगले ११८१३ (५३६१), इचलकरंजी ७०३३ (५७०५), शिरोळ १३३८४ (५२०२). प्रत्यक्षातीलपेक्षा यादीत सर्वाधिक वृध्द मतदार चंदगड आणि सर्वात कमी इचलकरंजी विधानसभा मतदार संघात आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अधिक रकमेवर 'घोडे' अडणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस परिषदेत खासदार राजू शेट्टी यांनी पहिल्या उचलीची एकरकमी ३२१७ रुपयांची मागणी केली आहे. शेट्टी यांनी एफआरपी अधिक २०० रुपयांची मागणी केली असताना साखर कारखानदारांनी कायद्याप्रमाणे एफआरपी देण्याची तयारी दर्शविली आहे. गतवर्षीचा एफआरपी अधिक २०० रुपयांचा अनुभव पाहता यंदा कारखानदारांकडून अधिक रकमेवर घोडे अडण्याची शक्यता आहे.

स्वाभिमानीच्या ऊस परिषदेनंतर दरवर्षी ऊसदर जाहीर होतो. यंदा कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शेतकरी व कष्टकऱ्यांची परिषद घेतली. मुख्यमंत्र्यांनी एफआरपी अधिक २०० रुपयांच्या दराला संमती दिली. यंदाच्या हंगामासाठी कृषिमूल्य आयोगाने १० टक्के रिकव्हरी बेस धरून २७५० रुपये मागणी केली आहे. पश्चिम महाराष्ट्र व कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी १२.५० टक्के उतारा धरला तर ऊसदर प्रतिटन ३४५० रुपये होतो. त्यातून वाहतूक खर्च ६०० रुपये वजा केला असता निव्वळ एफआरपी २८५० रुपये होते. एफआरपी अधिक २०० रुपये जादा दिल्यास एकरकमी दर ३०५० रुपये होतो. शेट्टींनी एफआरपीचा बेस १० टक्क्यांवरून साडेनऊ टक्के पूर्ववत करावा, अशी मागणी केली आहे. १० टक्के बेस धरल्याने प्रतिटन १८६ रुपये ५० पैसे तोटा होत आहे. त्यांनी एफआरपी बेस बदलाविरोधात कोर्टातही याचिका दाखल केली आहे. तसेच दिल्लीत ३० नोव्हेंबरला संसदेला घेराओ घालण्याची घोषणा केली आहे.

केंद्र सरकारने एफआरपीचा कायदा केला असून, त्याला बांधील असल्याचे कारखानदारांचे म्हणणे आहे. १० टक्के बेस धरून सरासरी १२.५० टक्क्यांप्रमाणे २८५० रुपये एफआरपी देण्याची कारखानदारांनी तयारी दर्शविली आहे. स्वाभिमानीने पहिली उचल ३२१७ रुपये न दिल्यास कारखान्याचे धुराडे पेटू न देण्याची इशारा दिला आहे. जिल्ह्यात राजाराम, संताजी घोरपडे या कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. अन्य कारखाने पुढील आठवड्यात पूर्णक्षमतेने गाळप सुरू करण्याची शक्यता आहे. कारखान्यांकडून साखरेचे दर जाहीर न केल्याने स्वाभिमानी, शिवसेनेकडून ऊसतोडी रोखल्या जात आहेत. गेल्यावर्षी तोडगा काढण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बैठक घेतली होती. त्यामध्ये एफआरपी अधिक २०० रुपये असा दर निश्चित केला होता. सुरुवातीला कारखान्यांनी एफआरपी अधिक १०० रुपये असा दर दिला, पण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेचे दर कोसळल्याने एफआरपी देणेही अवघड झाले. तरी जिल्ह्यातील २२ कारखान्यांनी एफआरपीप्रमाणे शेतकऱ्यांना बिले दिली. काही कारखान्यांनी अधिक १०० रुपयांचे बिल दिले आहे. ठरल्याप्रमाणे एफआरपी अधिक २०० रुपये बिल न देणाऱ्या कारखान्यांना सोडणार नाही, असा इशारा शेट्टी यांनी दिला आहे. त्यामुळे यंदा साखर कारखानदार व संघटनेमध्ये तडजोड कोण करणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

००००

३५०० हमीभाव मिळाला तरच ३२१७ उचल

एफआरपीनुसार कायद्याने दर देण्यास साखर कारखानदार बांधील आहेत. साखरेचे दर वाढल्यास कायद्याप्रमाणे ७०:३० फॉर्म्युल्यावर दर द्यावा लागणार आहे. सध्या पहिल्या उचलीची ३२१७ रुपये मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे, तर दुसरीकडे बाजारपेठेत साखरेचा दर प्रतिक्विंटल ३१०० रुपये आहे. कच्च्या मालाला दर जास्त आणि त्यापासून तयार केलेल्या पक्क्या मालाला दर कमी असे व्यस्त प्रमाण आहे. त्यामुळे साखरेचा ३४०० ते ३५०० रुपये हमीभाव मिळाला तरच पहिली उचल ३२१७ रुपये देणे परवडणार असल्याचे मत साखर कारखानदारांकडून केले जात आहे. ऊस उत्पादकांना जादा दर मिळावा आणि कारखानेही व्यवस्थित सुरू राहावेत यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे हस्तक्षेप करून साखरेचा दर ३५०० रुपये करण्यासाठी दबाव आणावा. साखरेचा दर २९०० कायम राहिल्यास अधिक दरावरून घोडे अडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा बँकेत १९ दिवसांत १०१ कोटीच्या ठेवी

$
0
0

कोल्हापूर : ठेवीदारांनी दाखवलेल्या विश्वासमुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जाहीर केलेल्या श्री. महालक्ष्मी पुनर्गुंतवणूक ठेव योजनेत १९ दिवसांत तब्बल १०१ कोटी रुपयांच्या ठेवी जमा झाल्या आहेत. महालक्ष्मी योजनेसह वसंत वर्षा, इंद्रधनुष्य योजनेत तब्बल ६०२ कोटींच्या ठेवी जमा झाल्याची माहिती , बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ ए. बी. माने यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

पत्रकात असे म्हटले आहे, बँकेच्या ८० व्या वर्धापन दिनानिमित्त दोन ऑक्टोबर २०१८ रोजी महालक्ष्मी पुनर्गुंतवणूक ठेव योजना जाहीर केली आहे. ३६ महिन्यांच्या मुदतीनंतर १०.५२ टक्के व्याजासह परतावा देणारी ही योजना आहे. ३१ डिसेंबर, २०१८ पर्यंत या योजनेची मुदत असून ३०० कोटी रुपयांच्या ठेवी गोळा करण्याचे बँकेने लक्ष्य ठेवले आहे. सध्या जमा झालेल्या १०१ कोटींमध्ये व्यक्तिगत ठेवी ४० टक्‍क्‍यांहून अधिक असून संस्थांनी ६० टक्के ठेवी ठेवल्या आहेत. या योजनेत ठेव तारण कर्ज सुविधाही उपलब्ध आहे.

दर तीन महिन्यांनी व्याज परतावा मिळणाऱ्या वसंत-वर्षा ठेव योजनेलाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. १३ महिने मुदतीच्या नऊ टक्के व्याजाच्या या योजनेत बहुतांशी संस्थांनी ठेवी ठेवल्या असून या योजनेत उच्चांकी ४७५ कोटींच्या ठेवी जमा झाल्या आहेत. इंद्रधनुष्य ठेव योजनेलाही ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ९१५ दिवसांसाठी ९.१५ टक्के व्याज असलेल्या या योजनेत आतापर्यंत २६ कोटी रुपये जमा झाले आहेत. तिन्ही योजनांमध्ये ६०२ कोटी रुपयांच्या ठेवी जमा झाल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कायदे न करणाऱ्यांना निवडणुकीत पाडा’

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

'कोणताही राजकीय पक्ष, नेता न्याय देऊ शकत नाही. पण कायदा न्याय देऊ शकतो. चांगले कायदे करणाऱ्यांना निवडून द्या. कायदे न करणाऱ्यांना निवडणुकीत पाडा,' असे आवाहन अॅड आर. बी. शरमाळे यांनी केले. कॉ. शंकर पुजारी यांच्या 'बांधकाम कामगारांच्या समस्या व कल्याणकारी योजना' या पुस्तक प्रकाशनाच्या प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अनिल म्हमाने होते. राजर्षी शाहू स्मारक भवनात कॉ. पुजारी यांच्या पुस्तकाचे प्रकाशन अॅड. शरमाळे यांच्या हस्ते झाले. अॅड. शरमाळे म्हणाले, 'देशात अनेक चांगले कायदे झाले. पण त्याची अंमलबजावणी योग्य प्रकारे झाली नाही. कामगारांना सुरक्षा व दाम मिळाला मिळाला पाहिजे. पण १९६० नंतर सर्वच पक्षांनी अनेक भांडवलधार्जिणे कायदे राज्यकर्त्यांनी केले. त्याचा फटका कामगारांच्या सुरक्षेला व पगाराला होऊ लागला आहे. कंत्राटीकरणाने कामगारांच्या हक्कांची पायमल्ली होऊ लागली आहे. कामगारांना कायद्याची ओळख व्हावी, यासाठी पुजारी यांनी बांधकाम कामगारांसाठी सरकारने केलेले कायदे, आदेश, अंमलबजावणी, त्रुटी याचे एकत्रित संकलित केलेले पुस्तक दिशादर्शक ठरणार आहे.'

कॉ. अतुल दिघे म्हणाले, 'बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे मोठी रक्कम असली तरी ती कामगारांवर खर्च करण्याची राज्य सरकारची मानसिकता दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात बांधकाम कामगारांना धनादेश वाटून पाठ थोपटून घेतली. त्यानंतर भाजप महायुती सरकारच्या काळात बांधकाम कामगार म्हणून नोंद करण्यासाठी कामगार कार्यालयासमोर रांगा लागल्या. पण सरकारने कामगारांना कोणतीही मदत दिलेली नाही. आपल्या हक्काच्या कल्याणकारी योजना न राबवणाऱ्या भाजपाला बांधकाम कामगारांनी मतदान करु नये.'

पुस्तकाचे लेखक कॉ. शंकर पुजारी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी कवी पाटलोबा पाटील, कॉ. आनंदा गुरव, शामराव कुलकर्णी, रघुनाथ देशिंगे, विजय बचाटे उपस्थित होते. सुमन पुजारी यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रोसिडिंगमध्ये मल्टिस्टेटचा ठराव 'बहुमता'ने

$
0
0

Satish.ghatage@timesgroup.com

Tweet:satishgMT

कोल्हापूर : अवघ्या तीन मिनिटांत कोणतीही चर्चा न होता 'मल्टिस्टेट'च्या प्रश्नावर गुंडाळण्यात आलेल्या जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त (प्रोसिडिंग) तयार झाले आहे. प्रोसिडिंगमध्ये १३ विषयांसह मल्टिस्टेटचा ठराव बहुमताने मंजूर झाला असल्याचा उल्लेख आहे. तीन हजार संस्थांनी 'मल्टिस्टेट'च्या ठरावाला पाठिंबा दिला असल्याचीही नोंद केली आहे. प्रोसिडिंगसोबत पाठिंब्याचे ठरावही जोडण्यात आले आहेत. त्यावर अध्यक्ष विश्वास पाटील यांची स्वाक्षरी झाली आहे. प्रोसिडिंगला संचालक मंडळाच्या बैठकीत रितसर मान्यता देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

जिल्हा दूध संघ म्हणून मान्यता असलेला गोकुळ संघ मल्टिस्टेट (बहुराज्यीय संस्थाचा कायदा) करण्याचा ठराव सर्वसाधारण सभेत मांडण्याची घोषणा झाल्यानंतर त्याला आमदार सतेज पाटील, हसन मुश्रीफ, चंद्रदीप नरके यांच्यासह गोकुळ बचाव कृती समितीने विरोध केला. सत्ताधारी गटाकडून माजी आमदार महादेवराव महाडिक, पी. एन. पाटील यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाने ठराव मंजूर करण्याचा चंग बांधला. मल्टिस्टेटच्या प्रश्नावर जिल्ह्याचे राजकारण चांगलेच ढवळून निघाले. त्यामुळे सर्वसाधारण सभेत काय निर्णय होतो, याकडे लक्ष होते. ताराबाई पार्क येथील गोकुळच्या मुख्यालयात ३० सप्टेंबरला सर्वसाधारण सभा झाली. यावेळी सत्ताधारी आणि विरोधी गटात प्रचंड संघर्ष झाला. दोन्ही गटांकडून परस्परांवर चप्पलफेक, धक्काबुक्कीचे प्रकार घडले. त्यामुळे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी गडबडीने १३ विषय मांडून मल्टिस्टेटचा ठराव मांडला. अवघ्या तीन मिनिटांत सर्व ठराव मंजूर करत सभा गुंडाळण्यात आली. सत्ताधारी गटाने मल्टिस्टेटचा ठराव मंजूर झाल्याची तर विरोधकांनी ठराव नामंजूर झाल्याची घोषणा केली.

गेल्यावर्षीही विरोधी गटाच्या आक्रमक भूमिकेमुळे सभा गुंडाळल्याची तक्रार झाली असतानाही इतिवृत्ताप्रमाणे सभा झाल्याचा अहवाल 'गोकुळ'ने दिला होता. तसा प्रकार पुन्हा होऊ नये म्हणून आमदार पाटील यांच्या नेतृत्वाखाली समितीने यावेळी प्रोसिडिंगमध्ये वस्तूस्थिती दडवली जाणार असल्याचा आरोप केला. सभेचा परिपूर्ण आणि खरा अहवाल सादर करावा अशी मागणी 'पदुम्'चे सहाय्यक निबंधक डॉ. गजेंद्र देशमुख यांच्याकडे केली आहे.

मात्र बचाव समितीच्या मागणीला केराची टोपली दाखवत गोकुळ प्रशासनाने प्रोसिडिंग पूर्ण केले आहे. सहकार कायद्यानुसार प्रोसिडिंग हा महत्वाचा पुरावा मानला जातो. सभेच्या प्रोसिडिंगमध्ये गोंधळाचा उल्लेख न करता मल्टिस्टेटचा ठराव बहुमताने मंजूर झाल्याची नोंद केली आहे. तीन हजार सभासदांच्या पाठिंब्याचा उल्लेख यात आहे. या संस्थांच्या पाठिंब्याचे ठरावही इतिवृत्तासोबत जोडले आहेत. संस्थांच्या पाठिंब्यांची नोंद प्रोसेडिंगमध्ये करताना संचालक मंडळाने सभेपूर्वी व सभेनंतर ठराव गोळा करण्यावर भर दिला होता. मल्टिस्टेटला असलेल्या संस्थांच्या पाठिंब्याची पत्रेही प्रोसिडिंगसोबत जोडली आहेत. एकीकडे सत्ताधाऱ्यांनी तीन हजार संस्थांनी पाठिंबा दिल्याचा पुरावा जोडला असताना दुसरीकडे विरोधकांकडे १८३६ संस्थांनी मल्टिस्टेटला विरोध केल्याचे ठराव आहेत. त्यामुळे सभेचा विषय न्यायप्रविष्ट होण्याची शक्यता आहे.

सहकार कायद्यात ठराव मंजुरीसाठी मतदान घेण्याचा नियम असतानाही 'गोकुळ'ची सभा अवघ्या तीन मिनिटांत गुंडाळण्यात आली. आम्ही संस्थेच्या प्रोसिडिंगची वाट बघत आहोत. ही सभा बेकायदेशीर ठरवावी यासाठी बचाव समितीने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. आमचा लढा दूध उत्पादकांच्या हिताचा असून ही लढाई रस्त्यावर आणि न्यायालयीन पातळीवरही लढण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. त्यानुसार कार्यवाही करू.

- सतेज पाटील, आमदार

३६५९

गोकुळचे एकूण सभासद

३०००

मल्टिस्टेटला पाठिंब्याचे ठराव

१८३६

विरोधी ठरावा कृती समितीचा दावा

०००

(मूळ कॉपी)

तीन हजार संस्थांचे ठराव जोडले,

Satish.ghatage@timesgroup.com

Tweet:satishgMT

कोल्हापूर : अवघ्या तीन मिनिटांत कोणतीही चर्चा न होता 'मल्टिस्टेट'च्या प्रश्नांवर गुंडाळण्यात आलेल्या जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त (प्रोसिडिंग) तयार झाले आहे. प्रोसिडिंगमध्ये १३ विषयासह मल्टिस्टेटचा ठराव बहुमताने मंजूर झाला आहे असे उल्लेख केला आहे. तसेच तीन हजार संस्थांचा मल्टिस्टेटला पाठिंबा असल्याची नोंद केली आहे. प्रोसिडिंगसोबत पाठिंब्याचे ठरावही जोडण्यात आले असून त्यावर अध्यक्ष विश्वास पाटील यांनी स्वाक्षरी झाली आहे. प्रोसिडिंगला संचालक मंडळानेही संचालक मंडळाच्या बैठकीत रितसर मान्यता दिली आहे.

जिल्हा दूध संघ म्हणून मान्यता असलेला गोकुळ मल्टिस्टेट (बहुराज्यीय संस्थाचा कायदा) करण्याचा ठराव सर्वसाधारण सभेत मांडण्यात घोषणा झाल्यानंतर आमदार सतेज पाटील, हसन मुश्रीफ, चंद्रदीप नरके यांच्यासह गोकुळ बचाव समितीने या ठरावाला विरोध करण्याचा निर्णय घेतला. सत्ताधाऱ्यांकडून माजी आमदार महादेवराव महाडिक, पी.एन. पाटील यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळाने ठराव मंजूर करण्याचा चंग बांधला. मल्टिस्टेट प्रश्नांवर जिल्हयाचे राजकारण चांगलेच ढवळून निघाल्याने सर्वसाधारण सभेत ठरावाचे काय होणार याकडे लक्ष होते.

ताराबाई पार्क येथील गोकुळच्या मुख्यालयात गेल्या महिन्यात ३० सप्टेंबरला सर्वसाधारण सभा झाली. यावेळी सत्ताधारी व विरोधी गटात मल्टिस्टेटवरुन सभेत प्रचंड गोंधळ झाला. दोन्ही गटाकडून चप्पलांचा वर्षाव झाला. घाईगडबडीत अध्यक्ष विश्वास पाटील यांनी १३ विषय मांडून मल्टिस्टेटचा ठराव मांडला. अवघ्या तीन मिनिटात सर्व ठराव मंजूर करत सभा गुंडाळण्यात आली. सत्ताधाऱ्यांकडून ठराव मंजूर झाल्याची घोषणा केली तर विरोधकांनी ठराव नामंजूर झाल्याचा दावा केला.

गतवर्षी सभा गुंडाळल्याबाबत तक्रार केली असतानाही इतिवृत्ताप्रमाणे सभा झाल्याचा अहवाल गोकुळने दिला होता. हा पुन्हा असा प्रकार होऊ नये म्हणून आमदार पाटील यांच्या नेतृत्वाखाली समितीने यावेळी प्रोसिडिंगमध्ये सत्यस्थिती दडवली जाणार असल्याचे लक्षात घेऊन सभेचा परिपूर्ण आणि खरा अहवाल सादर करावा अशी मागणी पदुमचे सहाय्यक निबंधक डॉ. गजेंद्र देशमुख यांच्याकडे केली आहे. पण बचाव समितीच्या मागणीला केराची टोपली दाखवत गोकुळ प्रशासनाने प्रोसिडिंग पूर्ण केले आहे.

सहकार कायद्यानुसार प्रोसिडिंग हा महत्वाचा पुरावा मानला जातो. सभेच्या प्रोसिडिंगमध्ये गोंधळाचा उल्लेख न करता मल्टिस्टेटचा ठराव बहुमताने मंजूर झाल्याची नोंद केली आहे. तीन हजार सभासदांनी मल्टिस्टेटला पाठिंबा दिल्याचा उल्लेख केला आहे. तसेच तीन हजार दूध संस्थांचे पाठिंब्याचे ठराव ही इतिवृत्तासोबत जोडले आहेत. संस्थांचा पाठिंब्यांची नोंद प्रोसेडिंगमध्ये करताना संचालक मंडळाने सभेपूर्वी व सभेनंतर ठराव गोळा करण्यावर भर दिला होता. मल्टिस्टेटला असलेल्या संस्थांच्या पाठींब्याची पत्रेही प्रोसिडिंगसोबत जोडली आहेत. एकीकडे सत्ताधाऱ्यांनी तीन हजार संस्थांनी पाठिंबा दिल्याचा पुरावा जोडला असताना दुसरीकडे विरोधकांकडे १८३६ संस्थांनी मल्टिस्टेट विरोधाचे ठराव आहेत. त्यामुळे सभेचा विषय न्याय प्रविष्ठ होण्याची शक्यता आहे.

०००००

गोकुळचे एकूण सभासद ३६५९

मल्टिस्टेटला पाठिंबा असणारे ठराव ३०००

विरोध असणारे ठराव १८३६

००००००

सहकार कायद्यात मतदानाचा नियम असतानाही गोकुळची सभा अवघ्या तीन मिनिटात गुंडाळण्यात आली. आम्ही प्रोसिडिंगची वाट बघत आहोत. सभा बेकायदेशीर ठरवावी यासाठी बचाव समितीच्यावतीने हाय कोर्टात याचिका दाखल केली आहे. आमचा लढा दूध उत्पादकांच्या हिताचा असून ही लढाई रस्त्यांवर व न्यायालयीन पातळीवरही लढली जाईल.

आमदार सतेज पाटील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युवा महोत्सवात झळकले ग्रामीण टँलेंट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठच्या ३८ व्या जिल्हास्तरीय युवा महोत्सवात ग्रामीण भागातील कॉलेजांनी बाजी मारली. महावीर कॉलेजमध्ये झालेल्या या महोत्सवात शनिवारी मध्यरात्रीपर्यंत महोत्सवाची धूम सुरू होती. महोत्सवात ५५ कॉलेजांतील ११०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

सर्वाधिक आकर्षण असलेल्या 'लोकनृत्य'मध्ये आजरा महाविद्यालयाने प्रथम क्रमांक पटकाविला. लोकसंगीत वाद्यवृंद व लघुनाटिका कलाप्रकारात विवेकानंद कॉलेज, 'वादविवाद'मध्ये न्यू कॉलेज, 'सुगमगायन'मध्ये राजाराम कॉलेज, 'पथनाट्य'मध्ये घाळी कॉलेज, गडहिंग्लज, 'नकला'मध्ये यशवंतराव चव्हाण कॉलेज वारणानगर तर 'लोककलां'मध्ये इचलकरंजीच्या दत्ताजीराव कदम कॉलेजने प्रथम क्रमांक पटकाविला. एकांकिका स्पर्धेत यड्रावच्या शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी,'मूकनाट्य'मध्ये पेठवडगावचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय पहिल्या क्रमांकावर राहिले.

'लोकनृत्य' स्पर्धेत सरुडच्या शिवशाहू महाविद्यालयाने व्दितीय तर विवेकानंद कॉलेजने तृतीय क्रमांक मिळवला.

मराठी वक्तृत्व स्पर्धेत अनुक्रमे डी. आर. माने कॉलेज कागल, दूधसाखर महाविद्यालय बिद्री आणि राजाराम कॉलेज विजेते ठरले. हिंदी वक्तृत्व स्पर्धेत जयसिंगपूर कॉलेज, गोखले कॉलेज कोल्हापूर, राजर्षी शाहू कॉलेज रुकडी विजेते ठरले. इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेत अनुक्रमे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय पेठवडगाव, दूधसागर महाविद्यालय बिद्री, शिवाजी विद्यापीठ अधिविभागाने बाजी मारली. वादविवाद कलाप्रकारात न्यू कॉलेज, विवेकानंद कॉलेज आणि दूधसाखर महाविद्यालय विजेते ठरले. तर लोककला प्रकारात अनुक्रमे दत्ताजीराव कदम आर्टस सायन्स अँड कॉमर्स कॉलेज इचलकरंजी, सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय मुरगूड आणि शरद इन्स्टिट्यूट यड्रावने यश मिळवले. लोकसंगीत वाद्यवृंदमध्ये विवेकानंद कॉलेज, आजरा महाविद्यालय, देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स विजेते ठरले.

अन्य निकाल

समूहगीत : अधिविभाग शिवाजी विद्यापीठ, विवेकानंद कॉलेज कोल्हापूर, डीआरके कॉलेज ऑफ कॉमर्स, कोल्हापूर.

नकला : यशवंतराव चव्हाण महाविद्यालय वारणानगर, आजरा महाविद्यालय, विवेकानंद कॉलेज कोल्हापूर.

एकांकिका : शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यड्राव, विवेकानंद कॉलेज कोल्हापूर, दत्ताजीराव कदम कॉलेज इचलकरंजी.

लघुनाटिका : विवेकानंद कॉलेज कोल्हापूर, भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालय कोल्हापूर, न्यू कॉलेज कोल्हापूर. पथनाट्य : डॉ. घाळी कॉलेज गडहिंग्लज, भोगावती महाविद्यालय कुरुकली, डीआरके कॉलेज ऑफ कॉमर्स.

मूकनाट्य : डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय पेठवडगाव, विजयसिंह यादव कॉलेज पेठवडगाव, अक्काताई पाटील कन्या महाविद्यालय इचलकरंजी.

सुगमगायन स्पर्धा : राजाराम कॉलेज कोल्हापूर, विवेकानंद कॉलेज कोल्हापूर, आजरा महाविद्यालय.

सांगलीत मध्यवर्ती युवा महोत्सव

सांगलीतील विलिंग्डन महाविद्यालयात ३१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत मध्यवर्ती युवा महोत्सव होणार आहे. स्पर्धेत तिन्ही जिल्हास्तरीय युवा महोत्सवांतील १४ कलाप्रकारातील तीन विजेत्या कॉलेजांचा सहभाग असेल. अन्य १८ कलाप्रकारांत थेट नोंदणीमुळे एकूण ३२ कलाप्रकार यात असतील अशी माहिती विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर. व्ही. गुरव यांनी दिली.

०००

(मूळ कॉपी)

......

युवा महोत्सवात झळकले ग्रामीण टँलेंट

'लोकनृत्य'मध्ये आजरा महाविद्यालय प्रथम, 'लोकसंगीत'मध्ये विवेकानंद अव्वल

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठ आणि महावीर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ३८ व्या जिल्हास्तरीय युवा महोत्सवात यंदा ग्रामीण भागातील कॉलेजनी बाजी मारली. युवा महोत्सवातील सर्वाधिक आकर्षण कलाप्रकार समजल्या जाणाऱ्या 'लोकनृत्य'मध्ये आजरा महाविद्यालयाने प्रथम क्रमांक पटकाविला.

लोकसंगीत वाद्यवृंद व लघुनाटिका कलाप्रकारात येथील विवेकानंद कॉलेज, वादविवाद स्पर्धेत न्यू कॉलेज, सुगमगायन स्पर्धेत राजाराम कॉलेज, 'पथनाट्य'मध्ये घाळी कॉलेज गडहिंग्लज,'नकला'मध्ये यशवंतराव चव्हाण कॉलेज वारणानगर तर 'लोककला'प्रकारात मध्ये दत्ताजीराव कदम आर्टस सायन्स अँड कॉमर्स कॉलेजने (इचलकरंजी) अव्वल क्रमांक पटकाविला. 'एकांकिका'मध्ये शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज ऑफ इंजिनिअरींग (यड्राव),'मूकनाट्य'मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय (पेठवडगाव) प्रथम क्रमांकावर राहिले.

'लोकनृत्य'स्पर्धेत श्री शिवशाहू महाविद्यालय सरुडने व्दितीय तर विवेकानंद कॉलेजने तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला. शनिवारी मध्यरात्रीपर्यंत युवा महोत्सवाची धामधूम सुरु होती. जिल्हास्तरीय युवा महोत्सवामध्ये ५५ कॉलेजमधील ११०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

मराठी वक्तृत्व स्पर्धेत पहिले तीन क्रमांकाचे विजेते अनुक्रमे डी आर माने कॉलेज कागल, दूधसाखर महाविद्यालय बिद्री, राजाराम कॉलेज ठरले. हिंदी वक्तृत्व स्पर्धेत जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर, गोपाळकृष्ण गोखले कॉलेज कोल्हापूर, राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालय रुकडी हे विजेते आहेत. इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेतील पहिल्या तीन क्रमांकामध्ये अनुक्रमे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय पेठवडगाव, दूधसागर महाविद्यालय बिद्री, शिवाजी विद्यापीठ अधिविभाग हे विजेते आहेत. वादविवाद कलाप्रकारात न्यू कॉलेज, विवेकानंद कॉलेज आणि दूधसाखर महाविद्यालय बिद्री विजेते आहेत.

..........

लोककलेत इचलकरंजी, 'लोकसंगीत'मध्ये विवेकानंद

लोककला कलाप्रकारात पहिले तीन क्रमांकांच्या विजेत्यात अनुक्रमे दत्ताजीराव कदम आर्टस सायन्स अँड कॉमर्स कॉलेज इचलकरंजी, सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय मुरगूड आणि शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ऑफ इंजिनिअरींग यड्राव यांचा समावेश आहे. लोकसंगीत वाद्यवृंदमध्ये विवेकानंद कॉलेज प्रथम, आजरा महाविद्यालयाने व्दितीय तर देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्सने तिसरा क्रमांक पटकाविला. समूहगीत स्पर्धेत प्रथम - अधिविभाग शिवाजी विद्यापीठ, व्दितीय - विवेकानंद कॉलेज कोल्हापूर व तृतीय - देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स कोल्हापूर. नकला : प्रथम - यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय वारणानगर. व्दितीय- आजरा महाविद्यालय आजरा, तृतीय - विवेकानंद कॉलेज कोल्हापूर. एकांकिका : प्रथम - शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज ऑफ इंजिनिअरींग यड्राव. व्दितीय - विवेकानंद कॉलेज कोल्हापूर आणि तृतीय - दत्ताजीराव कदम आर्टस, सायन्स अँड कॉमर्स कॉलेज इचलकरंजी.

..................

स्पर्धेचा अन्य निकाल (पहिले तीन क्रमांकाचे विजेते)

लघुनाटिका : विवेकानंद कॉलेज कोल्हापूर, भारती विद्यापीठाचे अभियांत्रिकी महाविद्यालय कोल्हापूर, न्यू कॉलेज कोल्हापूर. पथनाट्य : डॉ. घाळी कॉलेज गडहिंग्लज, भोगावती महाविद्यालय कुरुकली, देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स. मूकनाट्य : डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय पेठवडगाव, श्री विजयसिंह यादव कला व विज्ञान महाविद्यालय पेठवडगाव,

श्रीमती अक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालय इचलकरंजी. सुगमगायन स्पर्धा : राजाराम महाविद्यालय कोल्हापूर, विवेकानंद कॉलेज कोल्हापूर, आजरा महाविद्यालय आजरा

.....

सांगलीत मध्यवर्ती युवा महोत्सव, ३२ कला प्रकारांचा समावेश

सांगली येथील विलिंग्डन महाविद्यालय येथे ३१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत मध्यवर्ती युवा महोत्सव होणार आहे. या स्पर्धेत सातारा, कोल्हापूर आणि सांगली जिल्हास्तरीय युवा महोत्सव स्पर्धेतील १४ कलाप्रकारातील प्र प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक प्राप्त कॉलेजचा सहभाग असणार आहे. शिवाय अन्य १८ कलाप्रकारात थेट नोंदणीमुळे मध्यवर्ती युवा महोत्सवात ३२ कलाप्रकार असतील अशी माहिती विद्यार्थी विकास विभागचे संचालक डॉ. आर.व्ही.गुरव यांनी दिली.

..........

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खरेदीचा हाउसफुल्ल रविवार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आठ दिवसांवर आलेल्या दिवाळी सणामुळे आज खरेदीचा रविवार केला. दुपारपासून शहरातील बाजारपेठांत खरेदीसाठी प्रचंड गर्दी झाली. सणाची लगबग लक्षात घेऊन कपड्यांच्या शोरुम्सबी गर्दीने हाउसफुल्ल झाल्या. बच्चे कंपनीसह कपडे खरेदीसाठी कुटुंबीयांनी महाद्वार रोडसह बाजारपेठेत गर्दी केली. महाद्वार रोड, राजारामपुरी, न्यू शाहूपुरीसह विविध ठिकाणच्या मॉल्समध्ये कपडे खरेदीसाठी गर्दी होती. फराळाच्या साहित्याचीही मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली. रात्री उशीरा तर या गर्दीने उच्चांक गाठला.

दरम्यान, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, सोने-चांदीचे दागिने, चारचाकी व मोटारसायकल अशा वस्तूंवर आकर्षक सवलती जाहीर झाल्या आहेत. घरांची साफसफाई, रंगरंगोटीसह विविध वस्तुंच्या खरेदीचे प्लॅनिंग सुरू आहे. कपडे, वाहन, प्लॉट, फ्लॅट, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीचा मुहूर्त साधण्याची धांदल सुरू आहे. ग्राहकांची पसंती लक्षात घेऊन विविध शो-रुम सज्ज झाल्या आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपन्यांनी आणि दुकानदारांनी ऑफर्सचा धडाका लावला आहे. विविध वस्तूंचे बुकिंग आणि विशेषत: कपडे खरेदीसाठी ग्राहकांची रविवारी झुंबड उडाली.

धनत्रयोदशी किंवा लक्ष्मीपूजनला घरोघरी नवीन वस्तू घेण्याची प्रथा असल्यामुळे अनेकांनी बुकिंग सुरू केले आहे. त्यामुळे रविवारी मोटारसायकल, चारचाकी वाहनांच्या आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या शोरुममध्ये ग्राहकांची गर्दी झाली होती. कपडे, फर्निचर, टीव्ही, फ्रिजसारख्या वस्तू, आकाशकंदील, फटाके, भेटकार्ड, फराळाचे साहित्य खरेदीसाठी दुकानात गर्दी दिसत होती. युवकांचा कल स्मार्टफोन व टॅबलेटकडे असल्याने मोबाईल शोमरुमध्ये मित्रांसह जाऊन खरेदी सुरू झाली आहे. गृहिणींनी मुलांच्या कपडे खरेदीचा धडाका लावला आहे. त्याला रविवारच्या सुटीची जोड मिळाली. दुपारी दोनपर्यंत मुख्य बाजारपेठेत अनेकांची सहकुटुंब खरेदी सुरू होती. दुपारी उन्हाचा तडाखा वाढल्यानंतर त्यांची पावले कोल्ड्रिंक हाऊसकडे वळली. त्यानंतर सायंकाळी पाच वाजेपर्यंत बाजारपेठेतील वर्दळ काहीशी कमी होती. मात्र सायंकाळी पुन्हा बाजारपेठ गर्दीने फुलली. राजारामपुरी, महाद्वार रोड, लक्ष्मीपुरीतील कापड पेठेत रात्री उशीरापर्यंत गर्दीचा उच्चांक होता. मॉलमध्येही रांगा लागल्या होत्या.

महाद्वार रोड हाउसफुल्ल

महाद्वार रोडवर रांगोळी, पणत्या, आकाशकंदील व भेटकार्डची दुकाने सजली आहेत. कापड खरेदीबरोबर या वस्तुंची खरेदी करण्यासाठी रात्री गर्दीने उच्चांक गाठला. बिनखांबी गणेश मंदिरापासून पापाची तिकटी व ताराबाई रोडवर ग्राहकांची प्रचंड गर्दी होती. महाद्वार रोडला खरेदीसाठी येणारे ग्राहक अन्य ठिकाणी वाहने पार्किंग करत असल्याने, बिनखांबी गणेश मंदिर ते मिरजकर तिकटी, निवृत्ती चौक ते बिनखांबी गणेश मंदिर, खरी कॉर्नर, चप्पल लाइन, शिवाजी चौक, भाउसिंहजी रोडवर वारंवार वाहतूक कोंडी होत होती. वाहनधारकांना गर्दीतूनच वाट काढावी लागत होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ई’ वॉर्डात पाण्यासाठी धावाधाव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहर पाणीपुरवठा विभागाच्यावतीने जलवाहिनी दुरुस्तीचे काम सुरू असल्याने रविवारी दिवसभर ई वॉर्डात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला. कळंबा व कसबा बावडा फिल्टर हाऊसमधील सात टँकरच्या ३२ फेऱ्यांद्वारे नागरिकांना पाणी देण्यात आले. त्यामुळे ई वॉर्डात नागरिक टँकरभोवती गर्दी करीत असल्याचे दिसत होते. दुरुस्तीचे काम आणखी पाच दिवस सुरू राहणार असल्याने सोमवारी ए आणि बी वॉर्डातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

शिंगणापूर पंपिंग स्टेशनमधील ट्रान्सफॉर्मरमध्ये झालेल्या बिघाडामुळे मंगळवारपासून शहराच्या ए, बी, आणि ई वॉर्डच्या काही भागात एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. रविवारी ई वॉर्डमध्ये पाणीपुरव‌ठा बंद असल्याने नागरिकांना पाण्यासाठी धावपळ करावी लागली. पाणीच न आलेल्या ठिकाणी टँकरने पाणी देण्यात आले. कळंबा फिल्टर हाऊस येथील तीन टँकरच्या २२ तर कसबा बावडा येथील चार टँकरच्या दहा फेऱ्यांनी ई वॉर्डातील नागरिकांची तहान भागवली. सोमवारी नियोजनाप्रमाणे ए व बी वॉर्डात पाणीपुरवठा बंद राहणार असून या भागात टँकरद्वारे पाणी देण्याचे नियोजन सुरू आहे. ट्रान्सफॉर्मरमधील दुरुस्ती काढण्यास आणखी पाच दिवसांचा कालावधी लागणार असल्याने दिवसाआड पाणीपुरवठ्याचा कालावधी वाढणार आहे.

दरम्यान, ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर नागरिकांना पाण्यासाठी धावपळ करावी लागत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. मात्र दिवसाआड पुरवठ्यामुळे पाणी सोडण्याचा कालावधी आणि दाबही वाढवला असल्याने सर्वांना मुबलक पाणी मिळत असल्याचा दावा शहर पाणीपुरवठा विभागाने केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मी उदयनराजेंचा प्रतिस्पर्धी नाही!: नरेंद्र पाटील

$
0
0

पंढरपूर:

'उदयनराजे भोसले हे राजे आहेत. मी त्यांचा प्रतिस्पर्धी नाही. मी सातारा लोकसभेची जागा लढवण्याचा प्रश्नच येत नाही,' असा खुलासा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केला आहे. सातारा लोकसभेसाठी भाजपकडून उदयनराजे भोसले यांच्या विरोधात तगड्या उमेदवाराचा शोध सुरू आहे. तसा उमेदवार म्हणून नरेंद्र पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू झाली होती. या चर्चेला पाटील यांनी काल पंढरपूरमध्ये बोलताना पूर्णविराम दिला. 'मी उदयनराजेंचा आदर करतो. मी एक साधा माथाडी कार्यकर्ता असून महामंडळाचे काम मला अधिक चांगल्या प्रकारे करायचं आहे. सातारची निवडणूक लढवण्याचा विषयच माझ्यापुढं नाही,' असं ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंगळवेढा तालुक्यात माजी सरपंचाच्या मुलाचे अपहरण

$
0
0

पंढरपूर

मंगळवेढा तालुक्यातील माचणूर येथील प्रतीक मधुकर शिवशरण या ९ वर्षाच्या मुलाचे अपहरण झाल्याच्या तक्रारीने परिसरात खळबळ माजली आहे. गुन्हा दाखल करुन घेण्यास पोलिसांनी उशीर केल्याने प्रतीकला शोधण्यात अडचणी वाढल्या असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.

प्रतीकचे वडील मधुकर दगडू शिवशरण हे माजी सरपंच आहेत. प्रतीक हा इयत्ता तिसरी वर्गात जिल्हा परिषद शाळेत शिकत आहे. शनिवारी २७ ऑक्टोबर रोजी शाळेत आल्यानंतर तो दुपारी ३.३० वाजता खाजगी शिकवणीला गेला. दुपारी ४.३० वाजण्याच्या सुमारास प्रतीक घरी परतला. जेवण करून तो खेळण्यासाठी मित्रांसोबत घराबाहेर पडला. खेळून झाल्यानंतर तो माचनुर चौकातील धाब्यावर जाऊन येतो असे सांगून ढाब्याकडे एकटा गेला. मात्र, तो रात्री उशिरापर्यंत घरी आला नाही. रात्री सर्वत्र शोधाशोध केली मात्र तो न सापडल्याने वडीलांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी प्रतीकला नातेवाईकांकडे शोधण्या सांगितले. सर्वत्र शोधाशोध घेऊन रविवारी सायंकाळी पाच वाजता अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी प्रतीकचे अपहरण केल्याचा गुन्हा दाखल केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उसाबाबत सरकारकडून फसवे वायदे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गडहिंग्लज

'राज्यातील सत्ताधारी सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे काहीही देणेघेणे नाही आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातील आताचे मुख्यमंत्री फडणवीस हे सर्वात फसवे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे ऊसाची एफआरपी व इतर उपाययोजनांच्या मुख्यमंत्री व त्यांच्या चेल्यांच्या घोषणा या फसव्या आहेत. त्यामुळेच ऊसबाबत सध्याच्या सरकारकडून फसवे वायदे केले जातात,' अशी टीका शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी केला. ते गडहिंग्जल येथे शिवसेनेच्यावतीने आयोजित ऊस परिषदेत बोलत होते.

शिवसेनेचे चंदगड विधानसभा संघटक संग्रामसिंह कुपेकर, सहसंपर्क प्रमुख प्रा. सुनील शिंत्रे, उपजिल्हा प्रमुख प्रभाकर खांडेकर, आजरा तालुका प्रमुख राजेंद्र सावंत, गडहिंग्लज तालुका प्रमुख दिलीप माने, रियाजभाई शमनजी, अनिरुद्ध रेडेकर, श्रद्धा शिंत्रे यांची उपस्थित होते. सूर्या सांस्कृतिक भवनमध्ये आयोजित शेतकरी मेळावा व ऊस परिषदेस गडहिंग्लज, आजरा, चंदगड यांसह कागल आणि राधानगरी मधील शेतकऱ्यांची उपस्थिती लक्षणीय होती.

जिल्हाप्रमुख विजय देवणे म्हणाले, 'आधी २०१७-२०१८चे थकीत ३०० कोटी द्यावे, मग पुढील घोषणा सरकारने कराव्यात. हे नाही केले तर कोल्हापूरची जनता मुख्यमंत्री, मंत्री चंद्रकांत पाटील आणि मंत्री सदाभाऊ खोत यांना त्यांची जागा दाखवून देईल. सदाभाऊ खोत यांनी एवढे हवेत जाऊ नये की भाजप तुमचा लाल दिवे कधी काढून घेईल हे तुम्हाला कळणारच नाही. शिवसेना हीच फक्त शेतकऱ्यांना न्याय देऊ शकते.

राधानगरी तालुकाप्रमुख संभाजी भोसले म्हणाले, 'आतापर्यंत जिथे जिथे शेतकऱ्यांवर अन्याय झाला, तिथे आम्ही आंदोलने केली. यापुढे ही जर कारखानदारांकडून शेतकऱ्यांची फसवणूक होत असेल तर त्या कारखान्याला सुद्धा कुलूप ठोकू.'

प्रा. सुनील शिंत्रे म्हणाले, 'मी आजरा कारखाना मध्ये संचालक असलो तरी प्रथम शिवसैनिक आहे आणि जिथे जिथे शेतकर्‍यांवर अन्याय होईल तिथे मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने आजच्या स्थितीतून मार्ग काढला पाहिजे आणि शेतकऱ्यांना योग्य तो भाव मिळवून दिला पाहिजे.'

अ‍ॅड. संतोष मळवीकर, नेसरी कृषी महाविद्यालयाचे संस्थापक आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रियाज शमनजी, चंदगड विधानसभा संघटक संग्रामसिंह कुपेकर, उपजिल्हाप्रमुख प्रभाकर खांडेकर आदींची भाषणे झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थकीत बिले न दिल्यास सेंटर कार्यालये पेटवू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गारगोटी

तांबाळे (ता. भुदरगड) येथील अथणी शुगर्स कारखान्याने थकीत ऊस बिले तात्काळ न दिल्यास सेंटर कार्यालये पेटवून देण्याचा व कारखाना चालू न देण्याचा इशारा शिवसेनेने गारगोटी-कोल्हापूर मार्गावर रास्ता रोको आंदोलनावेळी दिला. अथणी शुगर्सचे डायरेक्टर आंदोलस्थळी उपस्थित न राहिल्याने आंदोलकांनी टायर पेटवून प्रशासनाचा निषेध नोंदविला. रास्ता रोको आंदोलनामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.

तांबाळे येथील अथणी शुगर्स कारखान्याने शेतकऱ्यांची थकीत ऊस बिले त्वरीत द्यावीत, शेतकऱ्यांना प्रती टन एक किलो साखर द्यावी, कामगारांची पगारवाढ करावी, चालू गळीत हंगामासाठी ३६०० रुपये उचल जाहीर करावी यांसह विविध मागण्यांसाठी शिवसेनेने आंदोलन केले. आंदोलकांनी अथणी शुगर्सविरोधात घोषणाबाजी करून संताप व्यक्त केला. अथणी शुगर्सचे डायरेक्टरआंदोलनस्थळी न आल्याने आक्रमक आंदोलकांनी टायर पेटविले. पोलिसांनी हस्तक्षेप करून आंदोलकांना तहसील कार्यालयात चर्चेसाठी नेले.

यावेळी जिल्हाप्रमुख विजय देवणे म्हणाले, 'अथणी शुगर्सने शेतकऱ्यांची ऊस बिले वेळेत न दिल्याने शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. कारखान्याप्रमाणे बिद्रीप्रमाणे बिले देण्याचे आश्वासन दिले होते. शेतकऱ्यांना बिद्री कारखान्याप्रमाणे तत्काळ बिले द्यावीत. थकीत बिले त्वरीत द्यावीत, पहिली उचल ३६०० द्यावी, अन्यथा सेंटर कार्यालये पेटवून देऊ.

उपजिल्हा प्रमुख प्रकाश पाटील यांचे भाषण झाले. आंदोलनात तालुकाप्रमुख अविनाश शिंदे, महिला संघटक मेरी डिसोजा, तानाजी देसाई, अशोक पाटील, बजरंग पांडुरंग देसाई, अशोक दाभोळे, वसंत कांबळे, रमेश माने, रफीक मुल्ला, सयाजी ढेंगे, दिग्विजय पाटील, मानसींग देसाई, सुनील बिरंबोळे आदींसह शिवसैनिक सहभागी झाले होते.

तहसिल कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनावेळी शेती अधिकारी गणेश पाटील यांनी प्रशासनाची बाजू मांडली. त्यांच्या उत्तराने समाधान न झाल्यामुळे विजय देवणे यांनी संचालक योगेश पाटील यांच्याशी संपर्क साधला. त्यांनीही कोणतेच आश्वासन न दिल्याने आंदोलक आक्रमक झाले. शनिवारपर्यंत थकीत बिले न दिल्यास सेंटर कार्यालये पेटवू असा इशारा त्यांनी दिला. दरम्यान, तोडग्यासाठी जिल्हाप्रमुख विजय देवणेंसह आंदोलकांनी तहसील कार्यालयात प्रवेश केला. तहसिलदारांनी चर्चा करण्यास नकार दिल्यामुळे तहसीलदार व विजय देवणेंसह आंदोलकांत जोरदार बाचाबाची झाली. तहसीलदारांनी आंदोलकांना तत्काळ ताब्यात घेण्याचा आदेश पोलिस निरिक्षक विपीन हसबनीस यांना दिला. त्यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले. तहसीलदारांच्या निषेधार्थ आंदोलकांनी ठिय्या आंदोलन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमदारांच्या प्रतिक्रिया.....२

$
0
0

केवळ घोषणाबाजीचे सरकार

अंबाबाई तीर्थक्षेत्र विकासासाठी ८४ कोटी रुपये मंजूर झाले असताना हे काम अजूनही सुरु झाले नाही. मुंबई हायकोर्टाच्या कोल्हापूर खंडपीठ इमारतीसाठी ११०० कोटी रुपयांची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. पण, अंदाजपत्रकात तरतूद केलेली नाही. शहराची हद्दवाढ झाली असती तर शहर सदृढ झाले असते,पण ही मागणी डावलण्यात आली. जिल्ह्यात रस्त्यांची चाळण झालेली आहे. अंबाबाई मंदिरात पुजारी कायदा मंजूर झाला पण त्याची अंमलबजावणी झालेली नाही. देवस्थानच्या ३० हजार जमिनींचा घोटाळा झाल्यावर एसआयटी नेमण्यात आली, पण त्याचा अहवाल प्राप्त झालेला नाही. पश्चिम महराष्ट्रातील उद्योजकांना जास्त वीजदर तर विदर्भात उद्योजकांना स्वस्त वीज असा दुजाभावही केला जात आहे.

आमदार राजेश क्षीरसागर, शिवसेना

..............

सर्वच पातळीवर अपयशी सरकार

मराठा, धनगर समाजाला आरक्षण देण्यात सरकार असमर्थ ठरले आहे. लिंगायत धर्माला अल्पसंख्याक धर्माचा दर्जा दिलेला नाही. कर्जमाफीत हजारो शेतकऱ्यांना डावलले आहे. जलयुक्त शिवार योजनेत भ्रष्टाचार झाला आहे. देशात सर्वात जास्त महाग पेट्रोल, डिझेल महाराष्ट्रात मिळते. उद्योगाचे धोरण नसल्याने कामगारांची अवस्था बिकट झाली आहे. विदर्भाला स्वस्त तर पश्चिम महाराष्ट्राला महाग वीज दिली जाते. कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे. गरीबाला रॉकेल, धान्य मिळत नाही, पण मद्य ऑनलाइॅन देण्याचे धोरण आखले जात आहे. अंबाबाई तीर्थक्षेत्र आराखडा रखडला आहे. राज्याच्या वाट्याचे १२ टीएमसी पाणी अडवलेले नाही. संपूर्ण राज्यात कोल्हापूर जिल्ह्यात सर्वात जास्त रस्ते खराब आहेत.

आमदार हसन मुश्रीफ, राष्ट्रवादी

.....................

जलयुक्त शिवारचे उत्कृष्ट काम

कोणत्याही सरकारला पाच वर्षे सत्ता मिळाली तरी काम करण्यासाठी अपुरा वेळ असतो. तरीही भाजप महायुती सरकारने प्रामाणिकपणे प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न केले आहेत. अनेक चांगले निर्णय घेतले असून त्याची अंमलबजावणी केली आहे. जलसंधारणमध्ये पाणी अडवा,पाणी जिरवा हे उद्दिष्ट ठेऊन जलयुक्त शिवारसारखी चांगली कामे केली. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांना मोफत पास देण्याच्या योजनांची चांगली अंमलबजावणी केली. पाटबंधारे विभागाचे काम संथ आहे. मोठे व मध्यम प्रकल्प रखडले. मागील सरकारच्या काळात सिंचनामध्ये घोटाळे झाल्याने त्याची चौकशी सुरु असल्याने रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता मिळण्यास विलंब झाला. सध्या प्रशासकीय मान्यता मिळालेल्या प्रकल्पाचे निर्णय त्वरीत घेण्याची गरज आहे. साखर उद्योगाला मदत करण्यासाठी सरकारने हात पुढे केला पाहिजे. भाजप महायुतीने राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी करुन दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.

आमदार चंद्रदीप नरके, शिवसेना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images