Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

‘शेतकऱ्यांना बिनव्याजी खते, बियाणे पुरविणार’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कुडित्रे

'गगनबावडा तालुक्यातील कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ झाली पाहिजे यासाठी कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना क्रेडिटवर बियाणे, रासायनिक खते, ऊस रोपे, कीड व रोग नियंत्रण औषधे, ठिबक सिंचनासाठी अनुदान व पाचट अनुदान पुरविणार आहे. सभासदासांठी राबविण्यात येणाऱ्या नवनवीन उपक्रमाचा लाभ शेतकऱ्यांनी घ्‍यावा,' असे प्रतिपादन कारखान्‍याचे संस्‍थापक चेअरमन संजय पाटील यांनी केले.

गगनबावडा तालुक्यातील असळज येथील डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखान्‍याच्‍या १६व्‍या बॉयलर अग्‍नी प्रदीपन प्रारंभप्रसंगी ते बोलत होते.

कारखान्‍याचे संस्‍थापक चेअरमन पाटील यांनी चालू गळीत हंगामात कारखान्‍याने साडेचार लाख टन गाळपाचे उद्दिष्‍ट पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांनी आपला पिकविलेला संपूर्ण ऊस गळीतास पाठवून सहकार्य करावे असे आवाहनही केले. कारखान्‍याचे संचालक बजरंग पाटील, चंद्रकांत खानविलकर, मानसिंग पाटील, दत्तात्रय पाटणकर, खंडेराव घाटगे, जयसिंग ठाणेकर, रवींद्र पाटील, शामराव हंकारे, बाजीराव शेळके, उदय देसाई, कार्यकारी संचालक जयदीप पाटील, बँक स्‍थायी अधिकारी एस. एम. यादव, खातेप्रमुख व कर्मचारी मोठ्या संख्‍येने उपस्थित होते. कार्यकारी संचालक जयदीप पाटील यांनी स्‍वागत केले. सेक्रेटरी नंदू पाटील यांनी आभार मानले.

फोटो : असळज येथील पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखान्‍याच्या बॉयलर अग्‍नी प्रदीपनप्रसंगी संस्‍थापक चेअरमन संजय पाटील. सोबत कारखान्‍याचे कार्यकारी संचालक जयदीप पाटील यांच्यासह संचालक.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘शाहू’चा १०० रुपये हप्ता जमा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कागल

कागलच्या श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याने २०१७-१८ या सालात गाळप झालेल्या उसाला शंभर रुपयांचा हप्ता देण्याचे जाहीर केले. कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यापोटी ३१ ऑक्टोबर रोजी संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पाच कोटी ७२ लाख ३५ हजार रुपये जमा केले जातील असेही त्यांनी सांगितले.

कारखान्याचे अध्यक्ष घाटगे म्हणाले, 'शाहू साखर कारखान्याने गेल्या हंगामात सात लाख ९० हजार ८९६ मेट्रिक टन इतके गाळप केले होते. या हंगामातील १५ डिसेंबरअखेर गळीतास आलेल्या उसास ठरल्याप्रमाणे ३०३२ रुपयांप्रमाणे दर दिला आहे. यावेळी साखरेचा दर ३७०० रुपये होता. मात्र नंतर साखरेचा दर घसरत जाऊन तो २३०० रुपयांपर्यंत आला. साखरेच्या दरातील घसरणीमुळे १५ डिसेंबरनंतर आलेल्या उसाला पहिल्यांदा २५०० रुपये आणि नंतर ३२३ रुपये असे २८३२ रुपयांप्रमाणे पैसे यापूर्वीच अदा केले आहे. उर्वरित दोनशे रुपयांपैकी आज जाहीर करत असलेल्या अॅडव्हान्स प्रतिटन शंभर रुपयांप्रमाणे दिला जात आहे. ही रक्कम ५ कोटी ७२ लाख ३५ हजार रुपये होते. कारखाना नेहमीच आपली गुणवत्ता टिकवून ठेवत निघेल तो दर आणि या एफआरपीत सातत्य ठेवत जादा दर देण्याची परंपरा टिकवून आहे. शेतकऱ्यांनी पिकविलेल्या उसाला चांगला दर मिळालाच पाहिजे ही नेहमीच शाहूची भूमिका राहिली आहे. कारखाना व्यवस्थापनाने २०१८-१९ हंगामासाठी निश्चित केलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी ऊस गाळपास पाठवावा.'

पत्रकार परिषदेस कारखान्याचे व्हाइस चेअरमन अमरसिंह घोरपडे, कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण, संचालक बॉबी माने, युवराज पाटील, सचिन मगदूम आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नितीन लायकर याला सशर्त जामीन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

स्वत:च्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या नितीन दिलीप लायकर याला जिल्हा व सत्र न्यायालयाने शुक्रवारी सर्शत जामीन मंजूर केला. अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून लायकरला अटक केली होती. तो सध्या न्यायालयीन कोठडीत होता. जामिनासाठी त्याने येथील न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जावर सुनावणी होऊन न्यायालयाने ३० हजार रुपयांच्या व्यक्तिगत जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. जोपर्यंत दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले जात नाही, तोपर्यंत लायकर यास इचलकरंजी शहरात येण्यास मनाई करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोहारांविरोधात तब्बल ३५१ तक्रारी

$
0
0

सर्वाधिक तक्रारी टपालाने दाखल, लवकरच सुनावणीला होणार

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

येथील माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्या विरोधात टपालाने तब्बल ३०० आणि प्रत्यक्ष येऊन ५२ जणांनी अशा एकूण ३५२ लेखी तक्रारी आल्या आहेत. त्यांनी जितके दिवस काम केले आहे, त्या प्रत्येक दिवशी एक तक्रार असे हे प्रमाण आहे. प्रत्येक तक्रारीची लवकरच सुनावणी सुरू होईल, असे चौकशी समितीचे अध्यक्ष अंबरिश घाटगे यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. दरम्यान, लोहारांची कार्यमुक्ती कायम होईपर्यंत कायदेशीर लढा सुरूच राहील, असेही त्यांनी सांगितले.

महिन्यापूर्वीच्या जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत लोहार यांच्यावर गंभीर आरोप झाले. त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवून प्रशासकीय कामकाजाची चौकशी करण्याचा निर्णय झाला. सक्तीच्या रजेवर जात नसल्याने त्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी अमल मित्तल यांनी एकतर्फी कार्यमुक्त केले. मात्र लोहारांनी कार्यमुक्तीला मॅटमध्ये जाऊन स्थगिती मिळवली. ते गुरूवारपासून कार्यालयात येत आहेत. तक्रारींचा ओघही कायम आहे. परिणामी या प्रकरणात प्रशासन तोंडघशी पडले. सभागृहातील निर्णयालाच आव्हान देत कामावर हजर झाल्याने तक्रारदार सदस्यांनी प्रतिष्ठा पणाला लावली. ते पुन्हा आक्रमक बनले आहेत.

शिक्षण सभापती कक्षात सायंकाळी चार वाजता सदस्य राजवर्धन निंबाळकर, प्रसाद खोबरे, राजेश पाटील, विनय पाटील यांची बैठक झाली. त्यांनी लोहार प्रकरणात पुढील भूमिका कोणती घ्यायची यासंबंधी सविस्तर चर्चा केली. चर्चेत सर्वच सदस्यांनी लोहार यांच्या हकालपट्टीसाठी विशेष सभा बोलवावी, अशी मते मांडली. या संबंधी सीईओंची भेट घेण्याचे ठरवले. शिक्षण सभापती घाटगे यांच्या नेतृत्वाखाली सीइओ मित्तल यांची सदस्यांनी भेट घेतली. भेटीवेळी कार्यमुक्तीला स्थगिती कशी मिळाली, यासंबंधी सविस्तर माहिती घेतली. विशेष सभेसंबंधीही चर्चा केली. शेवटी कार्यमुक्तीच्या स्थगितीचा आदेश अंतरिम आहे, अंतिम नाही. २७ नोव्हेंबर रोजीच्या मॅटमधील सुनावणीत ठोस बाजू मांडू, असे मित्तल यांनी सांगितले. त्यासाठी नामवंत कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

....................

कायदेशीरपणे कार्यमुक्तीसाठी लढा

जि. प. सभागृह, मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच सरकारला आव्हान देत लोहार यांनी मॅटमध्ये धाव घेत कार्यमुक्तीला स्थगिती मिळवली. यामुळे तक्रारदार सदस्य निंबाळकर यांच्यासह चौकशी समितीमधील सदस्य आक्रमक झाले आहेत. यामुळे विशेष सभा घेऊन लोहारांच्या हकलपट्टीचा ठराव करण्यासंबंधी विचारविनिमय केला. पण सीईओंच्या भेटीनंतर विशेष सभा बोलावून हकालपट्टी करण्याइतके लोहार मोठे नाहीत. यामुळे मॅटमध्ये आणि प्रसंगी हायकोर्टात धाव घेत कायदेशीरपणे कार्यमुक्ती कायम राहण्यासाठी लढा देण्यावर चौकशी समिती सदस्यांचे एकमत झाले.

...................

अन पडदा ओढला ...

दुपारी एकच्या सुमारास लोहार 'माध्यमिक'मध्ये आले. तत्पूर्वीच कक्षासमोर तक्रारदार आणि अभ्यागतांची गर्दी झाली होती. ते कक्षात जाऊन खुर्चीवर बसले आणि त्वरित कक्षाच्या दरवाजातील काचेवरील पडदा शिपायाने ओढला. इतकी खबरदारी का घेतली जात आहे, अशी चर्चा उपस्थितांत सुरू होती.

---------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एकरकमी FRPसाठी ‘स्वाभिमानी’ आक्रमक

$
0
0

अजय जाधव, जयसिंगपूर

कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेच्या शेतकरी परिषदेनंतर आज जयसिंगपूर येथे खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेची उस परिषद होत आहे. कोडोलीच्या परिषदेत उसाला एफआरपी अधिक दोनशे रुपयांची मागणी करण्यात आली. एफआरपी देण्यासाठी कारखान्यांना अडचण आली तर राज्य सरकार स्वतःच्या तिजोरीतून मदत करेल, अशी ग्वाहीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली. यामुळे आता गेल्या गळीत हंगामातील उसाची थकित बिले, यंदाच्या हंगामातील विनाकपात, एकरकमी एफआरपीसह गेल्यावर्षीच्या तुलनेत अधिक उसदर मिळविण्यासाठी संघटनेने रणनिती आखली आहे. यामुळे पुन्हा ऊसदरासाठी सरकारविरोधातील संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत.

गेल्या सोळा वर्षापासून शेतकऱ्यांच्या घामाला दाम मिळवून देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून जयसिंगपूर येथे ऊस परिषद घेतली जाते. उस दर मिळविण्यासाठी संघटनेने रस्त्यावर उतरून आंदोलने केली आहेत. पहिल्या ऊस परिषदेवेळी टनाला साडेचारशे रुपये देणे शक्य नाही असे म्हणणार्‍या साखर कारखानदारांना आतापर्यंत प्रतिटन ३००० रुपयांहून अधिक ऊसदर देण्यास संघटनेने भाग पाडले आहे.

गेल्यावर्षीच्या ऊस परिषदेत खासदार राजू शेट्टी यांनी विनाकपात ३४०० रुपये पहिली उचल द्या, अन्यथा धुराडी पेटू देणार नाही असा इशारा दिला होता. मात्र, यानंतर एफआरपी अधिक दोनशे रुपयांचा तोडगा काढण्यात आला. कारखाने सुरू झाल्यानंतर पहिल्या महिन्यात कारखान्यांनी एफआरपीची रक्कम दिली. यानंतर साखरेचे दर गडगडल्याने एफआरपीचे तुकडे झाले.

काही कारखान्यांनी हंगाम सुरू करताना दिलेला शब्द पाळला. ठरल्यानुसार एफआरपी अधिक दोनशे रुपये दिले. मात्र राज्यातील अनेक कारखान्यांकडे शेतकऱ्यांची एफआरपीची रक्कम आजही थकित आहे. उसाचे निर्धारीत मूल्य (एफआरपी) ही केंद्र सरकारच्या ऊस नियंत्रण अध्यादेश १९६६ नुसार ऊस तोडणीनंतर १४ दिवसांच्या आत शेतकऱ्यांना देणे बंधनकारक आहे. असे असताना शेतकऱ्यांचा हाच अधिकार धोक्यात आला आहे. एफआरपीचे तुकडे सुरूच आहेत. एफआरपी न देणाऱ्या कारखानदारांवर गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात टाकावे अशी मागणी स्वाभिमानीने तीन वर्षांपूर्वी केली होती. मात्र अशा कारखान्यावर सरकारने कोणतीही कठोर कारवाई केली नाही. यामुळे 'स्वाभिमानी' आक्रमक झाली आहे.

खासदार राजू शेट्टी यांना शह देण्यासाठी नुकतीच कोडोली येथे शेतकरी परिषद झाली. या परिषदेत कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी एफआरपी अधिक २०० रुपये पहिली उचल देण्याची मागणी केली. एफआरपी देण्यासाठी सरकार मदत करणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. साखर खरेदीचा किमान दर २९०० रुपये ऐवजी ३१०० रुपये करावा अशी शिफारस आपण केंद्राकडे करू अशी ग्वाहीही त्यांनी दिली. यामुळे आता विनाकपात एकरकमी एफआरपीबरोबरच जास्तीत जास्त ऊस दर मिळविण्यासाठी स्वाभिमानीचा प्रयत्न राहणार आहे. देशातील एकूण साखरेपैकी २४ टक्के साखर खाण्यासाठी तर ७६ टक्के साखर व्यावसायिक कारणासाठी वापरली जाते. यामुळे सरकारने साखरेच्या दराचे नियंत्रण करणे बंद करावे, गॅस सबसिडीच्या धर्तीवर थेट सबसिडी खात्यावर वर्ग करावी. देशातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून त्यांना कर्जमुक्त करावे. शेतीसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प मंजूर करावा यासह संघटनेच्या अन्य मागण्या तशाच राहिल्या.

आजवर स्वाभिमानी संघटनेने रस्त्यावरची लढाई करीत प्रसंगी कारखाने बंद पाडून तसेच साखरेचे ट्रक रोखून शेतकऱ्यांना अधिकाधिक ऊस दर मिळवून दिला आहे. आता शनिवारच्या ऊस परिषदेत गतहंगामातील थकित बिलाचा हिशोब मागितला जाईल. गेली अनेक वर्षे साखर कारखाने व शेतकरी यांच्यातील उसदराच्या प्रश्‍नात सरकारने केवळ मध्यस्थाची भूमिका केली होती. आता समांतर उसपरिषद घेऊन परस्पर उसदराचा प्रश्‍न मार्गी लावण्याचे सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. यामुळे संघटनेचा सरकारवर रोष आहे. कायद्यावर बोट ठेवून विनाकपात एकरकमी एफआरपी मागण्याबरोबरच ऊसदराच्या प्रश्‍नावरून सरकारला खिंडीत पकडण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना सज्ज झाली आहे.

शेतकरी, कारखानदारांचे लक्ष

रयत क्रांती संघटनेच्या शेतकरी परिषदेनंतर आता जयसिंगपुरात आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेची १७वी उस परिषद होत आहे. नगरपालिकेसमोरील विक्रमसिंह पटांगणावर दुपारी २ वाजता ही परिषद होणार आहे. या परिषदेच्या पार्श्‍वभूमीवर खासदार शेट्टी यांच्यासह संघटनेतील दुसऱ्या फळीतील नेत्यांनी महाराष्ट्र व कर्नाटक राज्याचा सीमाभाग पिंजून काढला आहे. यामुळे आता या परिषदेत यंदाचा ऊस दर किती ठरणार तसेच आंदोलनाची दिशा कोणती असणार याकडे शेतकरी व कारखानदारांचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमदार मिणचेकर यांच्या वाढदिनी विविध कार्यक्रम

$
0
0

म. टा. वृतसेवा, हातकणंगले

हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांच्या वाढदिवसानिमित्त हुपरी (ता. हातकणंगले) येथे शनिवारी (ता. २७ ऑक्टोबर) सायंकाळी सहा वाजता मराठी तडका हा बहारदार संगीत रजनीचा कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम हुतात्मा स्मारकच्या भव्य पटांगणात होणार असल्याची माहिती सुजित मिणचेकर फाउंडेशनचे अध्यक्ष संजय चौगुले यांनी दिली. दरम्यान, २८ ऑक्टोबर रोजी पेठवडगाव येथील नगरपालिका चौकात शिवशाहीर आझाद नायकवडी यांचा 'शिवचरित्र' शाहिरी व शिवसेना उपनेते प्रा. नितीन बानुगडे यांचे 'राजा छत्रपती शिवचरित्र' या विषयावर व्याख्यान होणार आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील, बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, कृषी, पणन व पाणीपुरवठा राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार राजू शेट्टी, संभाजीराजे छत्रपती, धनंजय महाडिक, आमदार सुरेशराव हाळवणकर आदींसह जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत. मराठी तडका कार्यक्रमात 'चला हवा येऊ द्या' फेम भाऊ कदम, कुशल बद्रीके, प्रसिद्ध गायिका मिरा जोशी, सुप्रसिद्ध निवेदिका डॉ. भाग्यश्री, गायक विश्वजित बोरवणकर, नृत्यांगना मधुरा कुंभार सहभागी होणार आहेत. सिनेरसिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चंदूरचा लाचखोर तलाठी चौगुले निलंबीत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

लाच स्वीकारल्याप्रकरणी पोलिस कोठडीत असलेला चंदूरचा तलाठी निलेश सदाशिव चौगुले याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी याबाबतचे आदेश दिले. त्याच्याजागी रुईचे तलाठी गणेश आवळे यांच्याकडे अतिरीक्त पदभार देण्यात आला आहे.

५० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत खात्याकडे तक्रार झाली होती. याप्रकरणी २० ऑक्टोबर रोजी सापळा रचून तलाठीचा पंटर पिंटू उर्फ विजय कांबळे याला मूळ रकमेतील पहिला २५ हजार रुपयांचा हप्ता स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले होते. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती. याप्रकरणी तलाठी निलेश चौगुले यालाही २२ ऑक्टोबर रोजी अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यास पोलिस कोठडी देण्यात आली होती. महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) १९७९मधील नियम ४ (१)(क) मधील अधिकारास अधीन राहून प्रांताधिकारी शिंगटे यांनी निलेश चौगुले याला निलंबित केले असल्याचे आदेश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बदलीला अंतरिम स्थगिती,कार्यमुक्तीला नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्या बाजूने 'मॅट'मध्ये बदलीसंबंधी युक्तिवाद करण्यात आला. यात सरकारला बाजू मांडण्याची संधी मिळाली नाही. परिणामी मी केलेल्या कारवाईला स्थगिती मिळाली. ती अंतरिम आहे. अंतिम नाही. पुढील २७ नोव्हेंबरच्या सुनावणीत ठोस बाजू मांडू,' असे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल म्हणाले, 'मॅटने दिलेला आदेश पाळणे बंधनकारक आहे, म्हणून त्यांचा हजर अहवाल स्वीकारला. जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत त्यांच्या विरोधात झालेल्या तक्रारी, त्यानंतर आक्रमक झालेले सदस्य पाहता परिस्थिती गंभीर झाल्याने त्यांना कार्यमुक्त केले आहे. नियमानुसार त्यांच्या बदलीचा अधिकार मला नाही. त्यामुळे मी त्यांची बदली केलेली नाही. मला अधिकार असल्यानेच त्यांना कार्यमुक्त केले आहे. याविरोधात ते मॅटमध्ये गेले. त्यांनी तेथे स्थगिती मिळवली. स्थगितीचा आदेश मी वाचला आहे. त्यामध्ये सीईओंना बदलीचे अधिकार नाहीत, मात्र त्यांनी बदली केली आहे, अशा आशयाचा युक्तिवाद केला गेला आहे. ही पहिलीच सुनावणी असल्याने सरकारतर्फे बाजू मांडण्यास संधी मिळाली नाही. त्यांच्या वकिलांनी मांडलेला युक्तिवाद ग्राह्य मानून त्यांना तात्पुरती स्थगिती मिळाली. कार्यमुक्तीला स्थगिती मिळालेली नाही.

सदस्य त्रास देतात...

'मॅट'मधील सुनावणीत लोहार यांच्यावतीने सदस्य अरुण इंगवले, राजवर्धन निंबाळकर हे सदस्य त्रास देत असा मुद्दा मांडला गेला आहे. हे समजताच सदस्य निंबाळकर यांनी आपल्याविषयी घेतलेल्या आक्षेपाची लेखी माहिती आणि पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे. प्रसंगी याविरोधातही आवाज उठवणार असल्याचे निंबाळकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सडोली खालसात बँक फोडण्याचा प्रयत्न

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कुडित्रे

करवीर तालुक्यातील सडोली खालसा येथील केडीसीसी बँकेत चोरी करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आला. दरम्यान, बीड ते सावरवाडी फाटा यादरम्यान येथील सागर बाळू बाबर व सदाशिव शिवाजी पोवार यांच्या वेल्डिंग, ट्रॅक्टर गॅरेजमध्ये गुरुवारी मध्यरात्री चोरट्यांनी दरवाजाची कडी उचकटून ऑक्सिजन गॅस टाकी व रेग्यूलेटर चोरून नेला. चोरीच्या दोन्ही प्रकारांनी परिसरात खळबळ उडाली आहे.

सडोली खालसा येथील कोल्हापूर जिल्हा बँकेच्या शाखेत चोरी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी बँक उघडल्यावर कर्मचाऱ्यांच्या लक्षात आली. चोरट्यांनी गॅसकटरच्या सहाय्याने बँकेचा दरवाजा उचकटून सर्व कुलपे तोडली. त्यानंतर कॅश केबिनमधील तिजोरी व सोने तारण लॉकर गॅस कटरच्या साहाय्याने फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र टाकीतील गॅस संपल्याने चोरट्यांना तिजोरीतील रक्कम नेता आली नाही. प्रयत्न सफल होत नसल्याचे ओळखून चोरांनी तेथून पोबारा केला. बँकेच्या शेजारील पेट्रोल पंपावरील सीसीटीव्हीत चोर कैद झाले आहेत.

दरम्यान, बीडशेड फाट्यावरील सागर बाळू बाबर यांच्या वेल्डिंग व ट्रॅक्टर गॅरेजमधील तसेच सावरवाडी फाटा येथील सदाशिव शिवाजी पोवार यांच्या कल्लेश्वर ट्रॅक्टर गॅरेजमधील ऑक्सिजन गॅस टाकी व रेग्युलेटरची चोरी झाल्याचे निदर्शनास आले. या घटनेची माहिती सावरवाडीचे पोलिस पाटील गजानन खोत व कसबा बीडचे पोलिस पाटील पंढरीनाथ ताशिलदार यांनी करवीर पोलिस ठाण्यास कळविली.

करवीरचे पोलिस निरीक्षक सुनील पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. श्वानपथकाच्या साहाय्याने चोरांचा माग घेण्याचा प्रयत्न केला असता श्वान बॅंकेच्या परिसरातच घुटमळले. सडोली खालसा येथील बँकेत चोरी करण्यासाठी वापरण्यात आलेल्या ऑक्सिजन गॅस टाक्या बीडशेड परिसरातील गॅरेजमधूनच चोरल्या आहेत का याचा तपास करवीरचे पोलिस निरीक्षक पाटील करत आहेत.

फोटो : सडोली खालसा येथील केडीसीसी बँक शाखा फोडण्याचा केलेला अयशस्वी प्रयत्न केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आज नियोजन मंडळ बैठक

$
0
0

नियोजन मंडळाची आज बैठक

कोल्हापूर : जिल्हा नियोजन मंडळाची बैठक शनिवारी (ता. २७ ऑक्टोबर) दुपारी साडेबारा वाजता होणार आहे. या बैठकीस पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह जिल्ह्यातील खासदार, आमदार व सदस्य उपस्थित राहणार आहेत. पालकमंत्री पाटील यांच्या उपस्थितीत सायंकाळी हुपरी येथे आमदार डॉ. सुजित मिणचेकर फाउंडेशन आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. तर रविवारी आजरा तालुक्यातील उत्तूर येथे महाआरोग्य शिबिर होणार आहे. त्यास पालकमंत्री उपस्थित राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उल्लेखनीय कामाबद्दल ज्येष्ठांचा सत्कार

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

येथील करवीर सिटीझन्स फोरमतर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या डॉ. मोहन धर्माधिकारी, सर्जेराव लाड, बापूसाहेब भोसले, डॉ. भारती वैशंपायन, श्रीकांत हिरवे, नारायण बुधले यांचा शाल, श्रीफळ, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. शाहूपुरीत कार्यक्रम झाला. यावेळी फोरमचे अध्यक्ष बाबूभाई शहा, कार्याध्यक्ष अरूण देशपांडे, सचिव विजय नलावडे, खजिनदार प्रताप दड्डीकर, किरीट मेहता, राजकुमार पाटील, बी. एस. पटेल आदी मान्यवर उपस्थित होते. विजय नलावडे यांनी प्रास्ताविक केले. आर. वाय. पाटील पाहुण्यांची ओळख करून दिली. शिवाजी नरके यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नव्या सेवांवर डाक विभागाचा भर’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पार्सल, बँकिंग, एटीएम, पासपोर्ट अशा नवनव्या सेवा देण्यावर डाक विभागाचा भर आहे. विभाग अधिक सक्षम केला जात आहे, अशी माहिती भारतीय डाकचे गोवा क्षेत्राचे पोस्टमास्तर जनरल डॉ. एन. विनोदकुमार यांनी गुरुवारी दिली.

रेल्वे स्टेशन पोस्ट ऑफिसच्या नवीन इमारत उद्घाटनप्रसंगीत ते बोलत होते. डॉ. विनोदकुमार म्हणाले, संपूर्ण संगणकीकरणाद्वारे ऑनलाइन कामकाज केले जात आहे. प्रशासन गतिमान केले. सर्वसामान्य जनतेपर्यंत सेवा प्रभावीपणे पोहविल्या. सर्व कार्यालय सुविधायुक्त आहेत. विभागाच्या महसूल उत्पन्नातही वाढ झाली. त्यात कोल्हापूर आघाडीवर आहे. प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्यावर अधिकारी, कर्मचाऱ्यांनी लक्ष केंद्रित करावे. प्रवर अधीक्षक ईश्वर पाटील यांनी स्वागत केले. अधीक्षक अशोक खोराटे, अंजनादेवी कोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उखळू येथे घरगुती वीज उपकरणे जळून नुकसान

$
0
0

म. टा. वृत्तसेवा शाहूवाडी

उखळू (ता. शाहूवाडी) येथे अचानक वाढलेल्या उच्चदाबाच्या वीजेमुळे अनेक घरातील घरगुती विद्युत उपकरणे जळून सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. गावातील प्रकाश विठ्ठल पाटील, तानाजी नामदेव पाटील, संजय संतू वडाम, आदिक आनंदा तेली, रमेश मारुती पाटील, शिवाजी नामदेव पाटील, सचिन लक्ष्मण पाटील, बबन चंद्रू पाटील आदींसह परिसरातील २५ ते ३० घरातील ट्यूब, बल्ब, टीव्ही, मिक्सर आदी विद्युत उपकरणे वीजेच्या उच्च दाबाने जळाली आहेत. गावाला विद्युत पुरवठा करणाऱ्या विजेच्या तारा या झाडाझुडपातून आलेल्या असून वारंवार तांत्रिक बिघाड उद्भवूनही वीज वितरण कंपनीकडून योग्य देखभाल-दुरुस्ती केली नसल्यामुळेच उपकरणे जळण्याचा प्रसंग घडल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिला आयोगाचा महिलांना आधार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कुडित्रे

'ज्या महिलांचे आर्थिक, लैंगिक, सामाजिक, शारीरिक, मानसिक शोषण होते अशा महिलांचे सक्षमीकरण व सबलीकरण करण्यासाठी महिला आयोग काम करते. महिला आयोग म्हणजे महिलांना तारक आणि पुरुषांना मारक हा समज चुकीचा आहे. कायद्याची अंमलबजाणी नीट होईलच असे नाही. महिलांना स्वतःच्या कुटुंबाचाही आधार मिळत नाही, अशा वेळेस महिलांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्यासाठी महिला आयोगच सक्षम पर्याय आहे' असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सचिव डॉ. मंजुषा मोळवणे यांनी केले. कुडित्रे (ता. करवीर) येथील कुंभी कारखान्याच्या शेतकरी भवनमध्ये राज्य महिला आयोगाच्या मार्गदर्शनाखाली राजर्षी शाहू ज्येष्ठ नागरिक सेवा संघ, कुंभी कासारी शिक्षण प्रसारक मंडळ, सांगरुळ शिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महिला सबलीकरण व सक्षमीकरण कार्यशाळेत त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी गोकुळचे ज्येष्ठ संचालक अरुण नरके होते. आमदार चंद्रदीप नरके, कुंभी बँकेचे अध्यक्ष अजित नरके, प्रा. साधना झाडबुके प्रमुख उपस्थित होते.

डॉ. मंजुषा मोळवणे म्हणाल्या, 'कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यातील मुला-मुलींच्या प्रमाणात मोठी तफावत असल्यामुळे मुली अथवा महिलांवर होणाऱ्या अत्याचारात वाढ होत आहे. यासाठी स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी कडक पावले उचलण्याची गरज आहे. आता प्रत्येक तालुक्यात महिला आयोगाने समुपदेशन केंद्र स्थापन केले आहेत. त्यांच्या हेल्पलाइनचा महिलांनी वापर करावा.'

आमदार चंद्रदीप नरके म्हणाले, 'ग्रामीण भागातील महिलांना आरोग्याचा समस्यांनी ग्रासले आहे. पण महिला खुल्या मनाने आपल्या भावना कुटुंबात अथवा नातेवाईकांना सांगत नाहीत. कॅन्सरसारखा रोगाचे प्रमाण महिलांत वाढत आहे. यासाठी तालुक्यातील ग्रामीण भागात महिलांसाठी स्वतंत्र ग्रामीण रुग्णालयाची आवश्यकता आहे.'

ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे अध्यक्ष डॉ. मानसिंगराव जगताप म्हणाले, 'ज्येष्ठ नागरिक असणाऱ्या महिलांना योग्य मानधनाची गरज असताना फक्त ६०० रुपये पेन्शन देत सरकारकडून महिलांची थट्टा सुरू आहे.'

प्रा. साधना झाडबुके, आनंद शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. मेळाव्यास श्रीकांत आडिवरे, पी. टी. पाटील, कुंभी कासारी शिक्षण मंडळ, सांगरुळ शिक्षण संस्थेच्या ,शिक्षिका, शिक्षक विद्यार्थिनी व महिला उपस्थित होत्या.

फोटो

महिला सबलीकरण व सक्षमीकरण कार्यशाळेत मार्गदर्शन करताना डॉ. मंजुषा कोळवणे. यावेळी अजित नरके, डॉ. मानसिंगराव जगताप, आमदार चंद्रदीप नरके, साधना झाडबुके, अरुण नरके आदी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इचलकरंजीत जुगार क्लबवर छापा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

येथील विक्रमनगर परिसरातील मंडळाच्या नावाखाली सुरू असलेल्या तीनपानी जुगार क्लबवर पोलिस उपअधिक्षक निलाभ रोहन यांच्या पथकाने शुक्रवारी छापा टाकला. कारवाईत ७ जणांना अटक करण्यात आली असून ६२ हजाराच्या रोकडसह, ६ मोबाइल, ३ मोटारसायकली असा १ लाख ६१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, क्लबचालक अजय भोरे, महेश जमदाडे व अन्य एकजण असे तिघे फरारी आहेत. आठवडाभरात शहरातील ही तिसरी कारवाई आहे.

अमर निवृत्ती मगदूम (वय ४३ रा. वेताळपेठ), अस्लम मौला मुल्ला (वय ४७), उमर मदारसाब शेख,(वय ४४), श्रीवर्धन महावीर अकोळे (वय २० तिघे रा. जयसिंगपूर), अमर नारायण शिंदे (वय ३७ रा. टाकवडे वेस), सचिन शिवाजी मोरबाळे (वय ३४ रा. कृष्णानगर) व अमर सुमंत बुगड (वय २९ रा. सांगली रोड) अशी अटक केलेल्यांची नांवे आहेत.

विक्रमनगर परिसरातील बालाजी चौक येथील पेट्रोल पंपालगत जयभारत कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या नावाखाली तीनपानी जुगार क्लब सुरु असल्याची माहिती पोलिस उपअधिक्षक निलाभ रोहन यांच्या पथकाला मिळाली. दुपारी पथकाने गावभाग पोलिसांच्या सहकार्याने त्याठिकाणी धाड टाकून जुगार खेळणाऱ्या सातजणांना अटक केली. यामध्ये ६२ हजार रुपये रोख, ३ मोटारसायकल, ६ मोबाइल व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कर्ज परताव्याबरोबरचउद्योग प्रशिक्षण देणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'मुद्रा योजनेंतर्गत कर्ज घेतलेल्या मराठा समाजातील तरुणांचे व्याज आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे तरुण उद्योजकांवर व्याजाचा बोजा राहणार नाही व दुसरीकडे 'मुद्रा' च्या कर्जप्रकरणाचा एनपीएही वाढणार नाही. कर्ज परताव्याबरोबरच उद्योगांचे प्रशिक्षण देण्याचेही नियोजन आहे, ' असे महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील महामंडळाच्या आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना पाटील म्हणाले, 'राज्यातील ३० हजार लोकांनी वेबसाइट पाहिली आहे. २१ हजारांनी प्रमाणपत्र घेतले आहे. त्यातील ८४० लोकांची प्रकरणे मंजूर झाली आहेत. जिल्ह्यात प्रमाणपत्रधारक लोकांची संख्या १६६० आहे. त्यातील ६८ प्रकरणांना मंजुरी दिली आहे. ४ कोटी ४४ लाख रुपये कर्जाचे वितरण झाले आहे. तर १९२ प्रकरणे बँकेत प्रलंबित आहेत. पात्र नागरिकांची संख्या मोठी आहे, पण त्यांना कर्जमंजुरी मिळत नाही, असे चित्र दिसते. यासाठी राष्ट्रीयीकृत बँकांची मानसिकता कारणीभूत दिसून येते. अनेक बँकांमध्ये अमराठी अधिकारी आहेत. त्यातील अनेकांना योजना समजत नाहीत. भाषेचा प्रश्न असल्याने ग्रामीण जनता व त्यांच्यात वाद निर्माण होत आहेत. त्यामुळे कर्जप्रकरणे मंजूर होत नाहीत. अशा अडचणींबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. त्यावर मार्ग सुचवले आहेत. त्यामुळे भविष्यात जास्त प्रकरणांना मंजुरी मिळाल्याचे दिसून येईल. मुद्रा योजनेसाठी इतर सवलती आहेत. पण व्याज भरावे लागते. तर महामंडळाच्या प्रकरणात व्याज परतावा दिला जातो. त्यामुळे ज्या मराठा समाजातील तरुणांनी मुद्रामधून कर्ज घेतले आहे. त्यांनी महामंडळाकडे पात्रता प्रमाणपत्र (एलओआय) सादर केले तर त्यांना मुद्रामधील व्याजाचा परतावा मिळेल. त्यासाठी अशा तरुणांनी बँकांमध्ये योग्य ती प्रक्रिया पूर्ण करावी.'

ते पुढे म्हणाले, 'राष्ट्रीयीकृत बँकांबरोबर जिल्हा बँक, नागरी बँक यांचाही समावेश या योजनेत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या बँकांनी साडेबारा टक्के व्याज दर करावा यासाठी सहकारमंत्र्यांमार्फत पाठपुरावा केला जात आहे. कर्ज परताव्याबरोबरच उद्योगांचे प्रशिक्षण देण्याचे नियोजन केले जात आहे. त्यासाठी नावनोंदणी आवश्यक आहे. नोंदणीनंतर कोणत्या माध्यमातून प्रशिक्षण द्यायचे हे ठरवले जाईल.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उत्तूरला रविवारी महाआरोग्य शिबिर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कागल

उत्तूरमध्ये रविवारी (ता. २८ ऑक्टोबर) उत्तूर विद्यालयात भव्य महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन म्हाडा पुणेचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी कागल येथे पत्रकार परिषदेत केले.

घाटगे म्हणाले, 'कोल्हापूर, मुंबई, बेळगाव, पुण्यासह २७ रुग्णालये यामध्ये सहभागी होणार आहेत. कॅन्सर, लहान मुलांचे आजार, हृदयरोग अशा आजारांची तपासणी व उपचार होणार आहेत. महिलांमध्ये कॅन्सरचे आजार वाढत आहेत. याचे योग्य निदान झाल्यास तो बरा होतो. आज बहुतांशी ग्रामीण महिला शेतीच्या कामात गुरफटलेल्या असतात. कामाच्या व्यापात प्रकृतीची हेळसांड होते. त्यामुळे महिलांसह लहान मुलाच्या सर्व आजारांबाबत मोफत उपचार व उपाय केले जाणार आहेत. पुरुषांबरोबरीने महिलांनीही निसंकोच आपली तपासणी करून घ्यावी. या शिबिरासाठी आतापर्यंत हजाराहून अधिक लोकांनी नोंदणी केली आहे. शिबिरस्थळीही नोंदणी होऊन तपासणी केली जाईल. यासाठी मतदारसंघाची मर्यादा नाही. या शिबिराचा जास्तीजास्त नागरिकांनी लाभ घ्यावा' असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्ज परताव्याबरोबरचउद्योग प्रशिक्षण देणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'मुद्रा योजनेंतर्गत कर्ज घेतलेल्या मराठा समाजातील तरुणांचे व्याज आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे तरुण उद्योजकांवर व्याजाचा बोजा राहणार नाही व दुसरीकडे 'मुद्रा' च्या कर्जप्रकरणाचा एनपीएही वाढणार नाही. कर्ज परताव्याबरोबरच उद्योगांचे प्रशिक्षण देण्याचेही नियोजन आहे, ' असे महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील महामंडळाच्या आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना पाटील म्हणाले, 'राज्यातील ३० हजार लोकांनी वेबसाइट पाहिली आहे. २१ हजारांनी प्रमाणपत्र घेतले आहे. त्यातील ८४० लोकांची प्रकरणे मंजूर झाली आहेत. जिल्ह्यात प्रमाणपत्रधारक लोकांची संख्या १६६० आहे. त्यातील ६८ प्रकरणांना मंजुरी दिली आहे. ४ कोटी ४४ लाख रुपये कर्जाचे वितरण झाले आहे. तर १९२ प्रकरणे बँकेत प्रलंबित आहेत. पात्र नागरिकांची संख्या मोठी आहे, पण त्यांना कर्जमंजुरी मिळत नाही, असे चित्र दिसते. यासाठी राष्ट्रीयीकृत बँकांची मानसिकता कारणीभूत दिसून येते. अनेक बँकांमध्ये अमराठी अधिकारी आहेत. त्यातील अनेकांना योजना समजत नाहीत. भाषेचा प्रश्न असल्याने ग्रामीण जनता व त्यांच्यात वाद निर्माण होत आहेत. त्यामुळे कर्जप्रकरणे मंजूर होत नाहीत. अशा अडचणींबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. त्यावर मार्ग सुचवले आहेत. त्यामुळे भविष्यात जास्त प्रकरणांना मंजुरी मिळाल्याचे दिसून येईल. मुद्रा योजनेसाठी इतर सवलती आहेत. पण व्याज भरावे लागते. तर महामंडळाच्या प्रकरणात व्याज परतावा दिला जातो. त्यामुळे ज्या मराठा समाजातील तरुणांनी मुद्रामधून कर्ज घेतले आहे. त्यांनी महामंडळाकडे पात्रता प्रमाणपत्र (एलओआय) सादर केले तर त्यांना मुद्रामधील व्याजाचा परतावा मिळेल. त्यासाठी अशा तरुणांनी बँकांमध्ये योग्य ती प्रक्रिया पूर्ण करावी.'

ते पुढे म्हणाले, 'राष्ट्रीयीकृत बँकांबरोबर जिल्हा बँक, नागरी बँक यांचाही समावेश या योजनेत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या बँकांनी साडेबारा टक्के व्याज दर करावा यासाठी सहकारमंत्र्यांमार्फत पाठपुरावा केला जात आहे. कर्ज परताव्याबरोबरच उद्योगांचे प्रशिक्षण देण्याचे नियोजन केले जात आहे. त्यासाठी नावनोंदणी आवश्यक आहे. नोंदणीनंतर कोणत्या माध्यमातून प्रशिक्षण द्यायचे हे ठरवले जाईल.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोदी फकीर, संसारी माणसांचं दु:ख कळत नाही: पवार

$
0
0

कोल्हापूर:

'पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फकीर आहेत. त्यांना संसारी माणसांचं दु:ख कळत नाही. म्हणूनच ते करतात एक आणि वागतात वेगळं,' असा चिमटा काढतानाच केंद्र सरकारने केलेली नोटाबंदी पूर्णपणे फसल्याचा पुनरुच्चारही राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केला.

कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी शिवसेना-भाजपवर जोरदार टीका केली. देशात जाती आणि धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मनुवादी प्रवृत्तींनी पुन्हा डोकंवर काढलं आहे, असं सांगतानाच देशात मागच्या दाराने आणीबाणी आणण्याचा डाव सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.

अरबी समुद्रात बोटीला झालेल्या अपघातावरूनही त्यांनी भाजपला धारेवर धरले. अरबी समुद्रात चमकोगिरी करायला गेल्यानेच एकाचा मृत्यू झाल्यांच ते म्हणाले. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची जास्त होत होती. त्यामुळेच महाराजांच्या पुतळ्याची उंची कमी करण्यात आल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.

आंबेडकरांना सोबत घेणार

शिवसेना-भाजपचा पराभव करण्यासाठी मोट बांधण्याचा प्रयत्न सुरू आहे. भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांना सोबत घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं पवार म्हणाले. मात्र सध्या लोकसभा उमेदवारीबद्दल कोणतीही चर्चा नको, असंही त्यांनी सांगितलं. तसंच आगामी निवडणुकांसाठी 'एक बूथ आणि २५ यूथ' अशी व्यूहरचना करण्याच्या सूचनाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या. तर शिवसेना सत्तेत आहे की विरोधात हेच त्यांना कळत नाही. शिवसेना बावचळून गेल्याची बोचरी टीकाही त्यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

९३ वर्षाच्या तरुणाचे २० तासापासून आंदोलन

$
0
0

पंढरपूर

इच्छाशक्तीला वय नसते म्हणतात ते उगीच नाही. नाहीतर ९३ वर्षाचा तरुण २० -२० तास आंदोलनात सहभागी झाला नसता . होय, या तरुणाचा उत्साह याही वयात अजूनही तरुणाईला लाजवणारा आहे. गेली ५५ वर्षे सांगोल्याचे आमदार म्हणून काम करणारे ९३ वर्षाचे गणपतराव देशमुख काल दुपारीपासून तिसंगी तलावात पाणी सोडण्याच्या मागणीसाठी आंदोलनात सहभागी झाले.

नीरा कालव्याचे पाणी अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे तिसंगी तलावात न आल्याने येथील शेतकऱ्यांनी दोन दिवसांपासून टॉवरवर चढून आंदोलन सुरू केले होते. पंढरपूर तालुक्यातील या परिसरातील गावे सांगोला विधानसभा मतदारसंघाला जोडल्यामुळे काल दुपारी गणपतराव येथे भेट द्यायला आले. परिस्थितीचे गांभीर्य पाहून या आंदोलनात ते सहभागी झाले. आंदोलनाला नुसता पाठिंबा देणं वेगळं. पण गणपतरावांनी काल दुपारपासून या कालव्यावर जो ठिय्या मंडला तो आज सकाळी देखील कायम होता. शेतकऱ्यांसोबत काल रात्री याच कालव्यावर जेवण करून रात्रही याच उघड्या कालव्यावर काढली. कालव्यात सकाळी कमी क्षमतेने पाणी येऊ लागल्याचे पाहून पुन्हा पूर्ण क्षमतेने पाणी मागणीसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन सुरूच ठेवले.

आमदार खासदारांचा लवाजमा आणि त्यांचा थाट पाहता गणपतरावांचा साधेपणा त्यांची नाळ मातीशी आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांशी किती घट्ट जोडली गेली आहे हे दाखवून देते. शेतकऱ्यांसोबत सकाळी चहा घेत तेथेच आपली औषधं घेऊन पुन्हा ताज्यादमाने आंदोलनाला बसलेल्या गणपतराव देशमुखांचा आदर्श आजच्या तरुणाईला दिशादर्शक ठरेल. या वयात आपल्याला कमी ऐकायला येऊ लागल्याने फोनवर बोलताना गैरसमज नको म्हणून दुसऱ्याला फोन देतो, असं सांगायला लाजत नसलेल्या गणपतरावांची बुद्धी मात्र अजूनही तितकीच तल्लख आहे. पाण्याच्या लढ्यातील कायदे काय आहेत आणि आता काय आंदोलन करायचे ही त्यांची व्यूहरचना तयार असते. कालव्याला लायनिंग करायला अकलूज, फलटण, बारामतीकरांच्या विरोधावर देखील ते कोणतीही मुलाहिजा न ठेवता रोखठोक भाषेत टीका करतात. शेलक्या आणि मार्मिक शब्दात टीका करण्याचे गणपतराव देशमुखांचे कसब सध्याच्या सत्ताधारी बोलघेवड्या नेत्यांना धडा देऊन जाणारे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images