Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

काँग्रेसचे पाच आमदार निवडून आणू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

'एकमेकांची जिरवण्याच्या नादात सर्वांचीच जिरल्यामुळे पक्ष अडचणीत आला. पण आता पक्षाला पुन्हा भक्कम करण्यासाठी सर्वजण झालं गेलं विसरुन एकत्र आलो आहोत. वरिष्ठ पातळीवर आघाडीसंदर्भात काहीही निर्णय होवो. पण, पी. एन. पाटील, सतेज पाटील, राजूबाबा आवळे, गणपतराव पाटील व मी स्वत: अशा पाच जागा काँग्रेसच्याच असणार आहेत' असा विश्‍वास माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांनी व्यक्त केला. आमच्या आघाडीसोबत राजू शेट्टी येणार असतील त्यांनाही विजयी करु अशी ग्वाही दिली. इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने काँग्रेस भवनात आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी खासदार कल्लाप्पा आवाडे होते.

बैठकीत माजी खासदार जयवंतराव आवळे यांनी, 'कोल्हापूर जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. परंतु अंतर्गत गटबाजीमुळे पक्षाची वाताहात झाली. गटबाजीची ही कीड मूळापासून नष्ट करण्याची गरज आहे. त्यासाठी अंतर्गत वितुष्ट संपवून आम्ही सर्वजण एकजुट झालो आहोत. निवडणुकीत इचलकरंजीचे दोन आमदार झाले पाहिजेत. प्रकाश आवाडे यांनी राजूबाबा आवळे यांना आमदार करण्याचा शब्द दिला आहे. आमची ताकद कमी असली तरी प्रामाणिकपणे मदत करून आवाडेंना आमदार करू. आता गटबाजीचे राजकारण संपले आहे. प्रकाश आवाडे यांना जिल्हाध्यक्ष करण्यासाठी मी आणि आमदार सतेज पाटील प्रयत्नशील असून ते निश्‍चितपणे अध्यक्ष होतील' असे सांगितले.

याचाच धागा पकडून आवाडे यांनी 'आगामी निवडणुकीत हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून राजूबाबा आवळे यांना १३ गावांतील निर्णायक मतावर निश्‍चितपणे आमदार करू' असे सांगितले. 'इथे राजूबाबा अनेक आहेत. पण, आपल्याला राजू जयवंतराव आवळे यांना आमदार करायचे आहे,' असे आवाडे यांनी म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

'भाजप सरकारने केवळ घोषणाबाजी करत सर्वसामान्यांची फसवणूक केली आहे. निवडणूका डोळ्यासमोर ठेवून अच्छे दिनाचे स्वप्न दाखविणार्‍या भाजपाला जनता जागा दाखवून देईल. सुज्ञ जनता राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेसला निश्‍चितपणे बळ देईल. त्यासाठी कार्यकर्त्यांनीही जोमाने कामाला लागावे' असे आवाहन अखिल भारतीय काँग्रेसच्या सचिव तथा पश्‍चिम महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रभारी सोनल पटेल यांनी केले. यावेळी हरिष रोगे, यशवंत हाप्पे, अलका राठोड, प्रदेश काँग्रेस सचिव प्रकाशराव सातपुते, राजीव साहू, चैतन्य रेड्डील, नासिर झकेरीया, विलास गाताडे, अशोकराव सौंदत्तीकर, राहुल आवाडे, राजू आवळे, संजय केंगार, अमरजित जाधव, राजू बोंद्रे, बिलकिस मुजावर, ध्रुवती दळवाई, लक्ष्मी पोवार, तेजश्री भोसले, रुपाली कोकणे, बाळासाहेब कलागते, पै. अमृत भोसले, अनिस म्हालदार, बाबासाहेब चौगुले, सूरज बेडगे, पवन शिंदे, किशोरी आवाडे, अंजली बावणे, रत्नप्रभा भागवत, हमिदा गोरवाडे, जुगनू पिरजादा, लक्ष्मी सपाटे आदी उपस्थित होते.

काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश मोरे यांनी स्वागत केले. राहुल खंजिरे यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सह्याद्री शिलेदार प्रतिष्ठानतर्फे ‘किल्ले बनवा’स्पर्धा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सह्याद्री शिलेदार सेवा प्रतिष्ठानतर्फे शालेय मुलांसाठी १२ ते १४ नोव्हेंबर या कालावधीत 'किल्ले बनवा स्पर्धा' आयोजित केली आहे. लक्ष्मीपुरी येथील सुसरबाग मैदान येथे स्पर्धा होणार असल्याची माहिती संयोजक अभिजित सूर्यवंशी, देवेंद्र भोसले यांनी दिली.

कोल्हापुरात पहिल्यांदाच 'किल्ले बनवा' स्पर्धा होत आहे. यामध्ये दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सहभागी होता येईल. दहा मुले सामूहिकपणे स्पर्धेसाठी नोंदणी करु शकतात. एका संघात दहा मुले आणि त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी दोन व्यक्ती असणार आहेत. स्पर्धेतील पहिल्या क्रमांकाच्या विजेत्यांना ५५५५, व्दितीय क्रमांकासाठी ३३३३ आणि तृतीय क्रमांकासाठी २२२२ रुपयांचे बक्षीस आहे. शिवाय उत्तेजनार्थ बक्षीसे आहेत.

सूर्यवंशी म्हणाले, 'शालेय विद्यार्थ्यांमध्ये गडकिल्ल्याविषयी आकर्षण वाढावे हा उद्देश आहे. स्पर्धेसाठी १५१ रुपये प्रवेश शुल्क आहे. दरम्यान स्पर्धेत सहभागी होऊ ईच्छिणाऱ्यासाठी किल्ले बांधणी कार्यशाळा आयोजित केली आहे. कार्यशाळेला दुर्ग अभ्यासक भगवान चिले, गणेश खोडके, राम यादव, अमित आडसुळे हे किल्ल्याची माहिती, कोणते साहित्य वापरावे यासंबंधी मार्गदर्शन करणार आहेत. प्रतिष्ठानतर्फे किल्ल्यासाठी दगड माती पुरविले जाईल. अन्य साहित्य स्पर्धकांनी सोबत आणावयाचे आहे. किल्ला दहा बाय दहा फूट जागेत बनवायचा आहे. किल्ले बनविताना नैसर्गिक रंगाचा वापर करावा. प्लास्टिकचा अवलंब करता येणार नाही. १४ तारखेला बक्षीस समारंभ आहे. स्पर्धेत सहभाग नोंदविणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पावनगड येथे एक दिवस सहलीचे नियोजन आहे.'

पत्रकार परिषदेला शुभम माळी, अमित अतिग्रे, गणी आजरेकर आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गुणनियंत्रक कार्यालयाचे स्थलांतर नको’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, चंदगड

गडहिंग्लज उपविभागातील सुरु असलेले व पूर्ण नसलेले आंबेओहोळ, उचंगी व सर्फनाला मध्यम प्रकल्प अद्याप पूर्ण करण्याच्यादृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे गुणनियंत्रण उपविभाग गडहिंग्लज मुख्यालय चंदगड हे कार्यालय हे तिन्ही प्रकल्प पुर्ण होईपर्यंत अन्यत्र हलवू नये अशी मागणी आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी अधिक्षक अभियंता गुणनियंत्रक मंडळाकडे केली आहे.

चंदगड मतदारसंघातील गुणनियंत्रण उपविभाग गडहिंग्लज मुख्यालय चंदगड हे कार्यालय कार्यरत आहे. उपविभाग नजीकच्या काळात अन्यत्र स्थलांतरीत होणार असल्याचे समजते. परंतु या उपविभागामुळे या परिसरातील सर्व पाटबंधारे प्रकल्प पूर्ण होण्यास मदत झालेली आहे. त्यामुळे या प्रकल्पांच्या पूर्ततेसाठी हा उपविभाग या ठिकाणीच असणे आवश्यक आहे अशी मागणी आमदार कुपेकर यांनी अधिक्षक अभियंत्यांकडे केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'नकोशी' झाली 'देवयानी'

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गारगोटी

नको असतानाही मुलगीच झाली तर तिचे नाव 'नकुशी' ठेवण्याची मानसिकता. हे नाव त्या मुलीला आयुष्यभर सतावत राहणारी बाब असते. अशाच एका 'नकुशी'चा नामकरण समारंभ भुदरगड तालुक्यातील भुमकरवाडीच्या प्राथमिक शाळेत झाला. आता तिला 'देवयानी' हे नाव मिळालंय. नामकरण सोहळ्यानंतर तिच्या चेहऱ्यावर प्रचंड आनंद जाणवत होता.

अनेक कुटुंबे वंशाचा दिवा म्हणून मुलांकडे पाहतात मुलगी जन्माला आली की नाक मुरडतात. असेच उदाहरण समोर आल्यावर लेक वाचवा अभियानांतर्गत भुमकरवाडीच्या प्राथमिक शाळेत नामकरण करण्यात आले.

भुमकरवाडी येथील उत्तम नाटले यांची ती मुलगी. ती पहिलीच्या वर्गात शिकते. घरी अठराविश्व दारिद्र्य. कष्टाशिवाय पर्याय नसलेल्या नाटले यांना विद्या, वैशाली, दिव्या या तीन मुली. चौथ्यांदा मुलगीच झाली म्हणून तिचे नाव 'नकुशी' ठेवण्यात आले. समाजात मुलींविषयी असणारा दुजाभाव, तिरस्कार लक्षात घेऊन गुणवत्ता विकास कार्यक्रमांतर्गत नकोशीचा नामकरण सोहळा झाला. तिला 'देवयानी' नाव देण्यात आले.

विस्तार अधिकारी दीपक मेंगाणे, मुख्याध्यापक तानाजी देसाई, शिक्षक विजय रामाणे यांनी 'नकुशी' नावाचा अर्थ लक्षात घेत तिचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला. यासाठी प्रांताधिकारी संपत खिलारी यांचे मोलाचे योगदान मिळाले. नामकरण प्रसंगी केंद्रप्रमुख संजय कुकडे, उपसरपंच शरद झगडे, शाळा समिती अध्यक्ष बाजीराव नाटले, पांडुरंग चव्हाण, उत्तम कुंभार, साताप्पा नाटले व ग्रामस्थ उपस्थित होते.

फोटो :

भूमकरवाडी येथे विद्यार्थिनीचे नामकरण करताना दीपक मेंगाणे, संजय कुकडे, तानाजी देसाई व इतर.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रा.अजय मस्के यांना पीएच.डी.

$
0
0

हातकणंगले : वाठार तर्फ वडगाव (ता. हातकणंगले) येथील प्रा. अजय कृष्णा मस्के यांना शिवाजी विद्यापीठाची वाणिज्य विद्या शाखेची पीएच. डी. प्रदान करण्यात आली. त्यांनी 'इव्हॅल्यूशन ऑफ स्टुडंट्स ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट प्रोग्राम फॉर प्लेसमेंट्स वुईथ रेफरन्स टू टेक्निकल इन्स्टिट्यूट्स अंडर शिवाजी युनिव्हर्सिटी जुरीडीक्शन' या विषयावर प्रबंध विद्यापीठास सादर केला. प्रा. मस्के हे अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनमध्ये ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर म्हणून काम पाहत आहेत. त्यांना डॉ. एस. डी. गोरल व प्रा. डॉ. डी. एन. मुदगल यांचे मार्गदर्शन मिळाले. बाळासाहेब मााने शिक्षण मंडळाचे अध्यक्ष विजयसिंह माने, कार्याध्यक्ष विकासराव माने यांनी त्यांचे अभिनंदन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पुनावाला स्कूलमुळे शैक्षणिक क्षेत्रात प्रगती’

$
0
0

म. टा. वृतसेवा, हातकणंगले

'सध्याच्या आधुनिक शिक्षण प्रणालीत विज्ञान व तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देऊन ग्रामीण टच असलेल्या वडगाव नगरीत सायरस पूनावाला स्कूलने विशेष ओळख निर्माण केली आहे' असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी केले. पेठवडगाव (ता. हातकणंगले) येथील डॉ. सायरस पुनावाला इंटरनॅशनल स्कूलमध्ये पी. ए. इनामदार कम्प्युटर सेंटर व 'लिंग्वाफोन' लॅबच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पी. ए. इनामदार होते. संस्थेचे अध्यक्ष गुलाबराव पोळ, उपाध्यक्षा विजयादेवी यादव, सचिव विद्याताई पोळ, मुख्याधिकारी अतुल पाटील, तहसीलदार सुधाकर भोसले प्रमुख उपस्थित होते.

जिल्हाधिकारी सुभेदार म्हणाले, 'सध्याच्या कम्प्युटरच्या युगात विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ज्ञानदान केले तर विद्यार्थी अधिक समरस होऊन शिक्षण घेतात. या स्कूलमध्ये तंत्रज्ञानाच्या अभ्यासक्रमाविषयी विविध संकल्पना राबविल्या जातात. अशाच एका संकल्पनेला वाव देणेसाठी पी. ए. इनामदार अॅकडमीच्या मदतीने आकर्षक 'लिंग्वाफोन' आधुनिक लॅब उदयास आणून दिली आहे. लॅबचा विद्यार्थ्यानी योग्य तो शैक्षणिक वापर करून घ्यावा.'

कार्यक्रमाचे अध्यक्ष पी. ए. इनामदार म्हणाले, 'कम्प्युटर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थी आपले उज्ज्वल भविष्य घडवू शकतात. विद्यार्थ्यांनी कम्प्युटर ज्ञान अवगत करावे. '

पुण्याच्या पी. ए. इनामदार अॅकॅडमीने एक आकर्षक आधुनिक लॅब बनवून दिली आहे. लॅबची मांडणी विद्यार्थ्यांनी स्वत: केली आहे. कम्प्युटर जोडणी करताना अत्याधुनिक प्रोजेक्टर, विविध हार्ड डिस्क चे प्रकार, एलइडी मॉनिटर, यूएसबी फ्लॅश ड्राइव अशा अनेक पार्ट्सची विद्यार्थ्यांनी स्वत: जोडणी करून लिंग्वाफोन आधुनिक लॅब उदयास आणली. स्कूलचे संचालक डॉ. सरदार जाधव यांनी प्रास्ताविक केले. उपप्राचार्य मारुती कांबळे यांनी आभार मानले.

फोटो ओळ

पेठवडगाव (ता. हातकणंगले) येथील डॉ. सायरस पुनावाला इंटरनॅशनल स्कूलमध्ये पी. ए. इनामदार कम्प्युटर सेंटर व 'लिंग्वाफोन' लॅबच्या उद्घाटन करताना जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार. शेजारी संस्थेचे अध्यक्ष गुलाबराव पोळ, विद्याताई पोळ, विजयादेवी यादव, मुख्याधिकारी अतुल पाटील, तहसीलदार सुधाकर भोसले आदी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्ता दुरुस्तीसाठी उद्योजक येणार रस्त्यावर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कागल

कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील लक्ष्मी टेकडी ते हुपरी हा मुख्य रस्ता प्रचंड दुरावस्थेत आहे. वेळोवेळी मागणी करूनही रस्ता होत नसल्याने एक नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजल्यापासून मॅकचे पदाधिकारी आणि उद्योजक कामगारांसह रास्ता रोको आंदोलन करणार आहेत. 'मॅक'च्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

'मॅक'चे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे, मनोहर शर्मा, संजय जोशी, विठ्ठल पाटील, कुमार पाटील, भावेश पटेल, सुरेश क्षीरसागर आदींनी उद्योजकांची भूमिका मांडली. ते म्हणाले, 'औद्योगिक वसाहतीचा हा मुख्य रस्ता सुमारे १५ वर्षांपूर्वी करण्यात आला आहे. तो अत्यंत धोकादायक झाला असून अनेक कामगारांचा अपघाताने मृत्यू ओढवला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, उद्योगमंत्री सुभाष देसाई, स्थानिक आमदारांसह नेत्यांकडे, सह प्रादेशिक अधिकाऱ्यांकडे वारंवार निवेदने देण्यात आली आहेत. बैठका झाल्या. मात्र, केवळ आश्वासनावरच उद्योजकांची बोळवण करण्यात आली. अधिकारी तर खोटी माहिती देऊन तोंडाला पाने पुसण्याचे काम करत आहेत. मे २०१७ रोजी या रस्त्याच्या कामाची निविदा निघाली होती. मात्र जीएसटीमुळे हे काम परवडत नसल्याने कोणीही ठेकेदार आला नाही. सव्वा वर्षांपासून फेरनिविदा काढण्याचे काम सुरूच आहे. या रस्त्याने कित्येक कामगारांना अपघातामुळे जीवास मुकावे लागले आहे. त्यांचे कुटुंबीय उघड्यावर पडले आहेत. लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांकडून वेळकाढूपणा केला जात आहेत. त्यामुळे कामगार, उद्योजकांत तीव्र नाराजी पसरली आहे. उद्योजक आपल्या कामगारांसह रास्ता रोको आंदोलनात भाग घेणार आहेत. जनजागृतीसाठी रस्त्यावर डिजिटल फलकही लावण्यात येणार आहेत. निविदा निघाल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही अशी वज्रमुठ उद्योजकांनी बांधली आहे.'

'मॅक'चे सेक्रेटरी शंतनु गायकवाड यांनी स्वागत केले. संजय पेंडसे यांनी आभार मानले.

'पंचतारांकित' म्हणण्याची लाज

'कागल-हातकणंगले औद्योगिक वसाहतीत प्राथमिक सुविधांचा वानवा आहे. मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्‍ते, वीज आदींसह अनेक समस्या येथे आहेत. या औद्योगिक वसाहतीला पंचतारांकित म्हणण्याची लाज वाटते' असे उपस्थित अनेक उद्योजकांनी सांगितले.

फोटो :

मॅकच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे, मनोहर शर्मा, संजय जोशी, विठ्ठल पाटील आदी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जयसिंगपुरात उद्या स्वाभिमानीची १७ वी ऊस परिषद

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

'गेल्यावर्षी पालकमंत्र्यांनी उसाला एफआरपी अधिक दोनशे असा दर निश्‍चित केला. मात्र, अनेक कारखान्यांनी एफआरपीची रक्कम दिलेली नाही. उसतोड झाल्यानंतर १४ दिवसांत कारखान्यांनी एफआरपी देणे बंधनकारक असतानाही अद्याप शेतकर्‍यांचे पैसे कारखान्यांकडे थकित आहेत. सरकारने कारखान्यांवर कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना घामाचे दाम मिळवून देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना सक्षम आहे' असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ. प्रकाश पोपळे व सावकर मादनाईक यांनी सांगितले. यंदाचा उस दर ठरविण्यासाठी शनिवार (दि. २७) दुपारी दोन वाजता जयसिंगपूर येथे नगरपालिकेसमोरील विक्रमसिंह मैदानावर १७ वी ऊस परिषद होत आहे. या परिषदेची तयारी पूर्ण झाली आहे, असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

'शेतकऱ्यांच्या पाठबळामुळेच स्वाभिमानीच्या आंदोलनाला यश येते' असे स्पष्ट करून सावकर मादनाईक म्हणाले, 'स्वाभिमानीकडून उस परिषदेत उसाच्या उत्पादन खर्चावर आधारीत दर मागितला जातो. यंदाच्या उस परिषदेकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. या परिषदेच्या पार्श्‍वभूमीवर खासदार राजू शेट्टी यांच्यासह कार्यकर्त्यांनी दौरा करून संपूर्ण राज्य पिंजून काढले आहे. यंदाच्या ऊस परिषदेस राज्यभरातून व कर्नाटक सीमाभागातून मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित राहतील. परिषदेत खासदार राजू शेट्टी, राज्य वस्त्रोद्योग मंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर, शेतकरी नेते व्ही. एम. सिंग शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतील. परिषदेसाठी येणाऱ्यां शेतकऱ्यांच्या वाहनांची पार्किंगची व्यवस्था झेले चित्रमंदिर, दसरा चौक, प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात करण्यात आली आहे.'

'उसाचा रिकव्हरी बेस साडेनऊ टक्क्यांवरून १० टक्के करण्यात आल्याने शेतकऱ्यांचे प्रतिटन १४८ रुपये नुकसान झाले आहे. यंदा उस क्षेत्र कमी आहे. हुमणी कीड व लोकरी माव्याचा प्रादुर्भाव, विजेचे भारनियम यामुळे उस उत्पादनात घट झाली आहे. यामुळे उसाला अधिकाधिक दर मिळविण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा प्रयत्न राहिल. उस परिषदेत आंदोलनाची दिशा निश्‍चित करण्यात येईल' असेही मादनाईक यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेस डॉ. महावीर अक्कोळे, स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष देवेंद्र भुयार, विठ्ठल मोरे, विजय भोसले, मिलींद साखरपे, आदिनाथ हेमगिरे, सुभाष शेट्टी, सागर संभूशेटे, सागर चिपरगे उपस्थित होते.

ती राजकीय परिषद

'वारणा कोडोली येथे बुधवारी झालेली रयत शेतकरी परिषद ही राजकीय परिषद होती' अशी टीका करून जिल्हाध्यक्ष भगवान काटे म्हणाले, 'उसाचा उत्पादन खर्च वाढला आहे. यंदा उसही कमी आहे. शेतकऱ्यांना उसदर एफआरपीप्रमाणे १४ दिवसांच्या आत मिळाला पाहिजे, यासाठी आम्ही आग्रही आहोत. कारखानदारांनी टाळाटाळ केल्यास एकरकमी विनाकपात वसूल करू. चालू कारखाने बंद पाडायची ताकद स्वाभिमानी संघटनेत आहे.'

त्यांना उस दर ठरविण्याचा अधिकार काय?

'आजवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने साखर कारखानदारांकडे ऊस दराची मागणी केली. सरकारने केवळ मध्यस्थी केली. खासदार राजू शेट्टी यांना शह देण्यासाठी वारणाकोडोली येथे कृषीराज्य मंत्री सदाभाऊ खोत यांनी शेतकरी परिषद घेतली. त्यांना उसाचा दर ठरविण्याचा अधिकार काय?' असा सवाल विठ्ठल मोरे यांनी केला. 'सरकारने केवळ मध्यस्थीचे काम करावे. आम्ही ऊस दर घ्यायला समर्थ आहोत' असेही ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शेतकऱ्यांनी ठोकले वीज उपकेंद्राला टाळे

$
0
0

म. टा. वृतसेवा, हातकणंगले

माणगाव (ता. हातकणंगले) येथे महावितरण कंपनीच्या वीज उपकेंद्राच्यावतीने शेतीसाठी वीजपुरवठा करताना दुजाभाव, भारनियमन व अनागोंदी कारभाराने संतप्त शेतकऱ्यांनी वीज उपकेंद्रावर मोर्चा काढून कार्यालयाला टाळे ठोकले. यावेळी शेतकऱ्यांनी महावितरण कंपनीविरोधात घोषणाबाजी करुन परिसर दणाणून सोडला.

माणगाव वीजकेंद्रातून माणगाव, माणगाववाडी, साजणी, तिळवणी, रुई आदी गावांना घरगुती, शेती व औद्योगिक वीजपुरवठा करण्यात येतो. सततच्या वीजेच्या लंपडावामुळे माणगाव परिसरातील ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या प्रमाणात त्रस्त आहेत. उपकेंद्रातील कर्मचाऱ्यांच्या मनमानी, अरेरावी व उद्धट वर्तनाने सर्वसामान्य नागरिक, शेतकरी त्रस्त झाले आहेत. शेतीला रात्री आठ व दिवसा आठ तास याप्रमाणे भारनियमन ठरले असताना उपकेंद्रातून वेगवेगळी कारणे दाखवून दररोज दोन ते तीन तास वीज कपात केली जाते. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी व ग्रामस्थांनी वीज उपकेंद्रावर मोर्चा काढून रोष व्यक्त केला.

शेतकऱ्यांनी शेतीसाठी किमान दहा तास वीजपुरवठा व्हावा अशी मागणी केली. उपकेंद्रातील सहाय्यक अभियंता विकास भारद्वाज, वरिष्ठ यंत्रचालक भरत वैगुडे, लायनमन राजेंद्र शिसव व चार वीज कर्मचाऱ्यांना बाहेर काढून टाळे ठोकले. जोपर्यंत भारनियमन कपात बंद होत नाही, उद्धट वीज कर्मचाऱ्यांची बदली होत नाही, तोपर्यंत टाळे खोलणार नसल्याची आक्रमक भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. मोर्चाचे नेतृत्व शेतकरी संघटनेचे अरुण मगदूम, माजी सरपंच अनिल पाटील, उपसरपंच राजू मगदूम, भाऊसाहेब मगदूम, आय. वाय. मुल्ला, कृष्णा गुरव, किशोर मायगोंडा, महावीर पाटील, अंकुश चव्हाण, दादासाहेब पाटील, भाऊसाहेब हेरवाडे, नेमिनाथ मगदूम, महावीर सांगले आदींसह शेतकरी उपस्थित होते.

दरम्यान इचलकरंजी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता सुनील अकिवाटे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन शेतकऱ्यांच्या तक्रारी ऐकून वीजेची झालेली अतिरिक्त कपात टप्याटप्याने करण्याचे आश्वासन आंदोलकांना दिले. हातकणंगले पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सिताराम डुबल यांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता.

फोटो

माणगाव (ता. हातकणंगले) येथे भारनियमन व वीज केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या उद्धट वर्तनाने त्रस्त शेतकऱ्यांनी वीज केंद्राच्या कार्यालय व गेटला टाळे ठोकताना अरुण मगदूम, राजू मगदूम, आय. वाय. मुल्ला, कृष्णा गुरव, किशोर मायगोंडा, महावीर पाटील, अंकुश चव्हाण आदी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कराडांच्या पोस्टरला जोडेमारो आंदोलन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

पुण्यातील 'एमआयटी'मधील जगविख्यात घुमटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना स्थान देण्यात न आल्याने संतप्त झालेल्या संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी पुणे रोडवरील 'एमआयटी' शिक्षण संकुलासमोर आंदोलन करून 'एमआयटी'चे संस्थापक अध्यक्ष विश्वनाथ कराड यांच्या पोस्टरला जोडे मारले. 'महाराष्ट्रात शाळेच्या नावावर पैसा कमवून गलेलठ्ठ झालेल्या कराड यांना छत्रपतीच्या राज्यात राहण्याचा अधिकार नाही, त्यांची महाराष्ट्रातून हकालपट्टी करण्यात यावी,' अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष भाऊ रोडगे यांनी केली.

'जगविख्यात घुमटात एकूण ५४ पुतळे आहेत. हे पाहायला जगभरातून लोक येतील. परंतु, छत्रपती शिवरायांच्या जन्मभूमीत त्यांनाच स्थान नाही. ज्या शिवाजी महाराजांनी मूठभर मावळ्यांच्या स्वकर्तृत्वावर हिंदवी स्वराज्य निर्माण करून रयतेचे, शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे राज्य निर्माण केले. आरमार दलाची निर्मिती केली, जगाला हेवा वाटावा असे शेकडो गड - किल्ले निर्माण केले. हजारो इतिहास संशोधक निर्माण केले, ते छत्रपती शिवाजी महाराज 'तत्वज्ञ' नाहीत. हे कराड यांचे वक्तव्य संतापजनक आहे,' असे रोडगे म्हणाले. या वेळी कराड यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वच्छता मोहीम

$
0
0

कोल्हापूर: रुईकर कॉलनी परिसरातील डॉ. श्रीधर सावंत विद्यामंदिर व जयभारत हायस्कूलतर्फे टेंबलाई मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. ३५ विद्यार्थ्यांनी मंदिर परिसर स्वच्छ केला. स्वच्छतेविषयक घोषणा देत प्रभात फेरी काढली. याप्रसंगी मुख्याध्यापक एस. एम. पाटील, आर. डी. पाटील, आर. व्ही. पाटील, बी. एल. पाटील, किरण खटावकर, एस. एस. शेळके, एस. आर. मगदूम आदींनी मोहिमेत सहभाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठा आरक्षण मागणीसाठी शनिवारी परिषद

$
0
0

मराठा आणि महिला आरक्षण मागणीसाठी शनिवारी परिषद

कोल्हापूर : मराठा संघटनेच्यावतीने मराठा आणि महिलांसाठी आरक्षण मागणीसाठी पुन्हा लढा देण्यासंदर्भात चर्चा विनिमय करण्यासाठी शनिवारी (ता. २७) परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संघटनेचे बाळ घाटगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मराठा समाज आरक्षण प्रश्नांवर मोर्चे, उपोषण, निदर्शने या लोकशाही मार्गाने गेली ४० वर्षे आंदोलन करत आहेत. समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणात व नोकरीत आरक्षणाची गरज आहे. समाजाने आजअखेर शांततेत महामोर्चे काढले. ठोक मोर्चे काढले तरी आरक्षणाबाबत राज्य सरकारकडून चालढकल केली जात आहे. आरक्षण मागणीसाठी पुन्हा लढा उभारण्याबाबत परिषदेत निर्णय घेतले जाणार आहेत.

महिला आरक्षण मागणीवरही परिषदेत चर्चा करण्यात येणार आहे. समाजात आजही पुरुषप्रधान संस्कृतीचा प्रभाव आहे. ग्रामीण भागात मुलींची शिक्षणात पिछेहाट होत आहे. महिलांना शिक्षण, नोकरीत आरक्षण मिळत असले तरी राजकीयदृष्ट्या महिलांची पिछेहाट होत आहे. विधवांना हलाखीचे जीवन जगावे लागत आहे. त्यांना नोकरी, व्यवसाय उपलब्ध करून देण्याची गरज आहे. विधवांच्या मुलांना शिक्षणांसाठी मदत होण्याची गरज आहे. लहान वयात विधवा झालेल्या मुलींचे पुनर्विवाह करण्यास सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी मराठा संघटनेच्यावतीने महिलांची संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. शनिवारी होणाऱ्या परिषदेत मराठा आरक्षण, महिला आरक्षण प्रश्नांवर चर्चा होणार आहे. या परिषदेला लोकप्रतिनिधीसह, खासदार, आमदार, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, सरपंच, विद्यार्थी, विदार्थीनींनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. पत्रकार परिषदेला मराठा आरक्षण संघर्ष समितीचे राजू सावंत, छावा संघटनेचे सुरेश सूर्यवंशी, राजमाता जिजाऊ ब्रिगेडच्या सुनिता पाटील, मराठा सेवा संघटनेचे चंद्रकांत पाटील उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शरद बनसोडे बेवडा खासदारः प्रणिती शिंदे

$
0
0

सूर्यकांत आसबे, सोलापूर

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकाजवळ येऊ लागल्या आहेत तशी राजकीय मंडळी एकमेकांवर खालच्या थरावर येऊन भाषा वापरत आहेत. सोलापुरातील मौलाली चौकात रस्ते कामाच्या उदघाटन कार्यक्रमात आमदार प्रणिती शिंदे यांची जीभ घसरली. दोन देशमुखांची भांडणे सोलापूरकर पाहत आहेत, असे सांगत प्रणिती शिंदे यांनी खासदार शरद बनसोडे यांच्यावर 'बेवडा खासदार' अशा शब्दात टीका केली. प्रणिती शिंदे यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

काँग्रेसच्या काळातील रस्ते आणि ड्रेनेजची कामं सुशीलकुमार शिंदे यांनी मंजूर केली. त्या कामांचं उदघाटन भाजपचे मंत्री करत आहेत. दोन देशमुख मंत्र्यांच्या भांडणामुळे सोलापूरचा विकास खुंटला. दोन मंत्री आणि एक बेवडा खासदार, असा उल्लेख प्रणिती शिंदे यांनी आपल्या भाषणात करून खालच्या थराला जाऊन टीका केल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.


... अन्यथा मुंबईत काय घडले उघड करेनः बनसोडे

मी नेहमी महिलांचा आदर करतो. पण त्याचा गैरफायदा घेऊन आमदार प्रणिती शिंदे यांनी माझं चारित्र्य हनन करू नये. त्यांच्यावर घरातून योग्य संस्कार झाले नसावेत असं त्यांच्यावर या बेताल आणि बालीश वक्तव्यावरून वाटतं, असं प्रत्युत्तर खासदार शरद बनसोडे यांनी दिलं आहे.

आमदार प्रणिती यांचे वडील माजी केंद्रीयमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी त्यांच्या आजपर्यंतच्या राजकीय कारकिर्दीत कधीच कोणावर वैयक्तीक टीका केली नाही. पण मुलगी मात्र बालीश आणि बेताल वक्तव्य करून स्वतःचीच संस्कार न झालेली बुद्धी पाजळत आहे. मी बेवडा आहे, हे पहायला त्या माझ्या घरी आल्या होत्या का? ते आधी त्यांनी सांगावं. मी जबाबदार लोकप्रतिनिधी आहे. त्याही जबाबदार लोकप्रतिनिधी आहेत. पण त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव दिसत नाही. निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन बलिशपणाचे वक्तव्य त्यांनी करू नये. अन्यथा मुंबईत काय काय घडतं ते सोलापुरात उघड करायला वेळ लागणार नाही. निवडणूक लढवायची असेल तर आपली कामं सांगून समोरासमोर या जनता ठरवेल कोणाला निवडून द्यायचे ते, असं आव्हान शरद बनसोडे यांनी प्रणिती शिंदे यांना दिलं.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहाय्यक अभियंत्यासह एजंट अटकेत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, चंदगड

शिनोळी (ता. चंदगड) येथील शितला एन्टरप्रायजेस य मशिनरी कारखान्यातील विद्युतसंच मांडणीचे सन २०१८-१९ च्या वार्षिक निरिक्षण अहवालात आढळलेल्या चुका न दाखविण्यासाठी आणि अनुकूल निरिक्षण अहवाल देण्यासाठी लाच मागणाऱ्या विद्युत निरीक्षण विभागाच्या सहाय्यक अभियंत्यासह एजंटाला लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तडजोडीअंती दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना एजंट अभिजित वसंतराव मोरे (वय ४०, रा. शिनोळी, ता. चंदगड) याला पकडले. त्याच्यासह सहाय्यक अभियंता श्रेणी -२, विद्युत निरिक्षण उपविभाग कोल्हापूरचे महेश गंगाराम चव्हाण (वय ३०, रा. विश्रामबाग, सांगली) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी भाऊराव आण्णाप्पा गडकरी यांनी तक्रार दिली होती.

तक्रारदार भाऊराव गडकरी यांचे शिनोळी (ता. चंदगड) येथे शितला एंटरप्रायजेस या नावाने मशिनरी शॉप आहे. या शॉपमधील विद्युत संच मांडणीचे सन वार्षिक निरिक्षण करायचे होते. याबाबत विद्युत निरिक्षण विभागाच्या सहाय्यक अभियंता महेश चव्हाण यांनी भाऊराव गडकरी यांना नोटीस दिली होती. २५ ऑक्टोबर २०१८ रोजी एजंट अभिजित मोरे हे गडकरी यांच्या कारखान्यामध्ये फाइल घेऊन जाण्यासाठी आले होते. त्यावेळी मोरे यांनी सहाय्यक अभियंता महेश चव्हाण हे विद्युत संचमांडणीचे वार्षिक निरिक्षणासाठी येणार असून सन २०१८-१९ मधील विद्युत संचमांडणीच्या वार्षिक निरिक्षण अहवालात आढळलेल्या चुका न दाखविण्यासाठी व अनुकूल असा निरिक्षण अहवाल देण्यासाठी ३००० रुपये लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदार गडकरी यांनी लाचलुचपत विभागाकडे सहाय्यक अभियंता चव्हाण व एजंट मोरे यांच्याविरोधात तक्रार दिली. गडकरी यांच्या तक्रारीवरुन शुक्रवारी शिनोळी (ता. चंदगड) येथील शितला एंटरप्रायजेस येथे सापळा रचून साक्षीदारांच्या समक्ष सहाय्यक अभियंता चव्हाण यांनी मागणी केल्याप्रमाणे एजंट अभिजित मोरे याने लाच स्वीकारली. त्याला रंगेहाथ पकडण्यात आले. गडकरी यांच्या तक्रारीवरुन साक्षीदारांसमक्ष मागणीची पडताळणी केली असता पडताळणीत सहाय्यक अभियंता चव्हाण याने अनुकूल निरिक्षण अहवाल देण्यासाठी तडजोडीअंती २००० रुपये लाचेची मागणी करून ती लाच एजंट अभिजित मोरे याच्याकडे देण्यास सांगितल्याचे पडताळणीमध्ये निष्पन्न झाले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधिक्षक गिरीश गोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक प्रविण पाटील, सहाय्यक फौजदार शामसुंदर बुचडे, पोलिस नाईक संदीप पावलेकर, पोलिस कॉन्स्टेबल कृष्णात पाटील, रुपेश माने, विष्णु गुरव यांनी कारवाई केली. या दोघांविरोधात चंदगड पोलिसात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेठवडगावात बळवंतराव यादव यांना अभिवादन

$
0
0

म. टा. वृतसेवा, हातकणंगले

पेठवडगाव (ता. हातकणंगले) येथील बळवंतराव यादव (आबाजी) यांच्या बेचाळीसाव्या पुण्यतिथी निमित्त बळवंतराव यादव विद्यालयात अभिवादन करण्यात आले.

माजी पोलिस आयुक्त व विजयसिंह यादव शैक्षणिक समूहाचे अध्यक्ष गुलाबराव पोळ यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन झाले. माजी पोलिस निरीक्षक वसंतराव बागल, खंडेराव मिरजकर, अभिजित पोळ, डी. बी. जाधव, अदिलशहा फकीर, पंचायत समिती सदस्य एल. के. अवघडे, कार्यवाह अभिजित गायकवाड, प्राचार्य प्रदीप पाटील, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. ईशा आमणे या विद्यार्थिनीने बळवंतराव यादव यांच्या कार्याची माहिती दिली. स्वास्तिक माळी यांनी स्वागत केले. नगरपालिका चौकातील स्वर्गीय बळवंतराव यादव यांच्या पुतळ्यास माजी उपनगराध्यक्ष सुनील हुक्केरी यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. माजी नगराध्यक्षा विद्याताई पोळ, माजी पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ, दिलीपसिंह यादव, नगरसेवक जवाहर सलगर, नगरसेविका अनिता चव्हाण, संगिता मिरजकर, राजन शेटे यांच्यासह शहरातील विविध संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

फोटो ओळी

पेठवडगाव (ता. हातकणंगले) येथील नगरपालिका चौकात बळवंतराव यादव यांच्या पुण्यतिथीनिमित अभिवादन करताना सुनील हुक्केरी. शेजारी विद्याताई पोळ, माजी पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ, अभिजित गायकवाड, दिलीपसिंह यादव, राजन शेटे, अनिता चव्हाण, संगिता मिरजकर, खंडेराव मिरजकर, अभिजित पोळ, अदिलशहा फकीर आदी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


२२ कारखान्यांनी दिली एफआरपी

$
0
0

Satish.ghatage@timesgroup.com

Tweet:satishgMT

कोल्हापूर : जिल्ह्यातील २२ सहकारी व खासगी कारखान्यांनी ऊस उत्पादकांना एफआरपीप्रमाणे ५९२६ कोटी ६३ लाख रुपयांची बिले दिली आहेत. गेल्यावर्षी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत 'एफआरपी अधिक दोनशे' असा दराचा तोडगा काढण्यात आला. मात्र जादाची रक्कम देण्यात कारखान्यांकडून टाळाटाळ झाली आहे. शिरोळ तालुक्यातील दत्त सहकारी साखर कारखान्याने उसाची एफआरपी २९२५ रुपये अधिक १०० रुपये असा ३०२५ रुपये प्रतिटन सर्वाधिक दर दिला. अन्य कारखान्यांकडून दीपावली सणानिमित्त अधिक १०० रुपये बिलाची घोषणा होऊ लागली आहे.

राज्यात १८८ साखर कारखान्यांनी गळीत हंगामात ९५५ लाख टन उसाचे गाळप केले. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील ३७ कारखान्यांकडून गेल्या हंगामात २१४ लाख मेट्रिक टनाचे गाळप केले. जिल्ह्यातील साखरेचा उतारा सरासरी बारा टक्के असल्याने एफआरपीची रक्कम २९१५ ते ३५१४ रुपये प्रतिटन होती. ऊस तोडणी, ओढणी, वाहतूक वगळून उत्पादकांना २२९२ रुपयांपासून २९५१ रुपये नेट एफआरपी देणे बंधनकारक होते. जिल्ह्यात हंगाम सुरू होण्यापूर्वी पालकमंत्री पाटील यांच्या उपस्थितीत एफआरपी अधिक १०० रुपये पहिली उचल देण्याचा तोडगा काढण्यात आला. दुसऱ्या टप्प्यात १०० रुपये प्रतिटन बिल काढण्यास मान्यता देण्याचे ठरल्याने हंगाम सुरू झाला. १५ डिसेंबरपर्यंत कारखान्यांनी एफआरपी अधिक १०० रुपये अशी बिले दिली. मात्र नंतर आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर कोसळल्याने एफआरपीप्रमाणे दर मिळणे दुरापास्त झाले.

साखर कारखान्याला ऊस पाठवल्यानंतर १५ दिवसांत एफआरपीप्रमाणे बिल उत्पादकाच्या खात्यावर जमा करण्याचा नियम आणि कायदा आहे. पण साखरेचे दर कोसळल्याने १५ दिवसांत बिले जमा झाली नाहीत. जिल्ह्यातील बहुतांश कारखान्यांनी एफआरपीप्रमाणे दर दिला. मात्र काही कारखान्यांनी टाळटाळ केल्याने साखर आयुक्तांनी कारखान्यांना नोटिसा पाठवल्या. जे कारखाने एफआरपी देणार नाहीत, त्यांना गाळप परवाना मिळणार नाही असा आदेश हायकोर्टाने दिल्यानंतर जिल्ह्यातील कारखान्यांनी एफआरपीप्रमाणे बिले दिली. जिल्ह्यातील २२ कारखान्यांनी एफआरपी देण्यात बाजी मारली तरी पश्चिम महाराष्ट्रातील १२ कारखान्यांनी अद्याप एफआरपी दिलेली नाही. यात सोलापूर जिल्ह्यातील आठ, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील प्रत्येकी दोन कारखान्यांचा समावेश आहे.

कारखाने एफआरपीप्रमाणे बिले देण्यात यशस्वी झाले तर पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत काढण्यात आलेल्या तोडग्यानुसार जादा २०० रुपये देण्याबाबत चालढकल केली जात आहे. काही कारखान्यांनी जादा १०० रुपये प्रतिटन बिले काढली आहेत. ऊस हंगामात अडथळा येऊ नये म्हणून अन्य काही कारखान्यांनी दीपावलीच्या पार्श्वभूमीवर जादा १०० रुपयांचे बिल काढण्याचे नियोजन केले आहे. आता 'एफआरपी अधिक दोनशे रुपये' देण्यासाठी शेतकरी संघटना आग्रही आहेत. रयत क्रांती संघटनेने आगामी हंगामात 'एफआरपी अधिक २००' रुपयांची मागणी केली असली स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस परिषदेत खासदार राजू शेट्टी किती दर मागणार याकडे कारखाने व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

जिल्ह्यातील २२ साखर कारखान्यांनी एफआरपीप्रमाणे ऊस उत्पादकांच्या खात्यावर बिले जमा केली आहेत. काही कारखान्यांकडून वाढीव १०० रुपये बिले काढली जात आहेत. एफआरपीप्रमाणे बिले दिल्याने सर्व कारखान्यांना गाळप परवाना देण्यात आला आहे.

- सचिन रावळ, प्रादेशिक साखर संचालक

कारखान्यांनी दिलेली एफआरपी अशी

कोल्हापूर जिल्हा : वारणा (२७००), पंचगंगा (२७६४), कुंभी कासारी (२९००), दूधगंगा बिद्री (२८७०), भोगावती (२७१२), दत्त शिरोळ (३०२५), गडहिंग्लज (२५६५), शाहू कागल (२८३२), जवाहर हुपरी (२८५०), राजाराम बावडा (२७१२), आजरा (२५००), गायकवाड बांबवडे (२६३५), मंडलिक कागल (२७१०), शरद नरंदे (२८००), डी.वाय.पाटील (२७११), इंदिरा गांधी, तांबाळे (२५००), दालमिया (२७९८), गुरुदत्त शुगर्स (२९५४), इको केन नलवडे शुगर्स (२८००), हेमरस चंदगड (२६२०), महाडिक शुगर्स (२५००), संताजी घोरपडे (२७०२).

सांगली जिल्हा : वसंतदादा सांगली (२५००), रा.बा. पाटील साखराळे (२८९३), विश्वासराव नाईक (२८००), किसन अहिर (३०३२), महाकाली कवठेमहांकाळ (२३००), रा.बा.पाटील वाटेगाव (२८७३), सोनहिरा वांगी (२८०५), क्रांती अंग्रणी कुंडल (२७७६), सर्वोदय (२९२६), मोहनराव शिंदे आरग (२५००), दालमिया (२५००), उदगिरी शुगर खानापूर (२५६५), सदगुरु राजेवाडी (२३००).

०००

(मूळ कॉपी)

Satish.ghatage@timesgroup.com

Tweet:satishgMT

कोल्हापूर : जिल्ह्यातील २२ सहकारी व खासगी कारखान्यांनी ऊस उत्पादकांना एफआरपीप्रमाणे ५९२६ कोटी ६३ लाख रुपये बिले दिली आहेत. गतवर्षी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत एफआरपी अधिक दोनशे असा तोडगा काढण्यात आला होता पण अधिक रक्कम देण्यात कारखान्याकडून टाळाटाळ होऊ लागली आहे. शिरोळ तालुक्यातील दत्त सहकारी साखर कारखान्याने एफआरपी २९२५ रुपये अधिक १०० रुपये असा ३०२५ रुपये प्रतिटन उसाला सर्वाधिक दर दिला. अन्य कारखान्याकडून दीपावली सणानिमित्त अधिक १०० रुपये बिलाची घोषणा होऊ लागली आहे.

राज्यात १८८ साखर कारखाने असून ९५५ लाख टन उसाचे गाळप झाले. कोल्हापूर, सांगली, जिल्ह्यातील ३७ कारखान्यांकडून गत हंगामात २१४ लाख मेट्रिक टनाचे गाळप झाले. जिल्ह्यातील साखरेचा उतारा सरासरी बारा टक्के असल्याने एफआरपीची रक्कम २९१५ रुपये ते ३५१४ रुपये इतकी होती. उस तोडणी, ओढणी, वाहतूक वगळून उत्पादकांना २२९२ रुपयांपासून २९५१ रुपये नेट एफआरपी देणे बंधनकारक होते. जिल्ह्यात हंगाम सुरु होण्यापूर्वी पालकमंत्री पाटील यांच्या उपस्थितीत एफआरपी अधिक १०० रुपये पहिली उचल देण्याचा तोडगा काढण्यात आला . दुसऱ्या टप्प्यात १०० रुपये प्रतिटन बिल काढण्यास मान्यता दिल्यानंतर हंगाम सुरु झाला. १५ डिसेंबरपर्यंत कारखान्यांनी एफआरपी अधिक १०० रुपये अशी बिले दिली. पण आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर कोसळल्याने एफआरपीप्रमाणे दर मिळणार का अशी भिती सतावत होती.

कारखान्याला ऊस घातल्यावर १५ दिवसात एफआरपीप्रमाणे बिल उत्पादकाच्या खात्यावर जमा होण्याचा नियम व कायदा आहे. पण साखरेचे दर कोसळल्याने १५ दिवसात बिल जमा करण्याचा कायदा गुंडाळावा लागला. जिल्ह्यातील बहुतांशी कारखान्यांनी एफआरपीप्रमाणे दर दिला. पण काही कारखान्यांकडून टाळटाळ होऊ लागल्याने साखर आयुक्तांना नोटीसा पाठवाव्या लागल्या. जे कारखाने एफआरपी देणार नाहीत त्यांना गाळप परवाना मिळणार नाही, असा आदेश हायकोर्टाने दिल्यानंतर जिल्ह्यातील कारखान्यांनी एफआरपीप्रमाणे बिले दिली. जिल्ह्यातील २२ कारखान्यांनी एफआरपी देण्यात बाजी मारली असली तरी पश्चिम महाराष्ट्रातील १२ कारखान्यांनी अद्याप एफआरपी दिलेली नाही. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील आठ, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील प्रत्येकी दोन कारखान्यांचा समावेश आहे.

एफआरपीप्रमाणे बिले देण्यात कारखाने यशस्वी झाली असली तर पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत काढण्यात आलेल्या तोडग्यानुसार जादा २०० रुपये देण्याबाबत चालढकल केली जात आहे. काही कारखान्यांकडून जादा १०० रुपयांनी बिले काढली जात आहेत. तर ऊस हंगामात अडथळा येऊ नये म्हणून अन्य कारखान्याने दीपावलीच्या पार्श्वभूमीवर जादा १०० रुपयांचे बिल काढण्याची शक्यता आहे. एफआरपी अधिक दोनशे रुपये देण्यासाठी शेतकरी संघटना आग्रही आहेत. आगामी हंगामात एफआरपी अधिक २०० रुपयांची मागणी केली असली खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस परिषदेत किती भाव मागणार याकडे कारखाने व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

०००००

जिल्ह्यातील २२ साखर कारखान्यांनी एफआरपीप्रमाणे ऊस उत्पादकांच्या खात्यावर बिले जमा केली आहेत. काही कारखान्यांकडून वाढीव १०० रुपये बिले काढली जात आहेत. एफआरपीप्रमाणे बिले दिल्याने सर्व कारखान्यांना गाळप परवाना देण्यात आला आहे.

सचिन रावळ, प्रादेशिक साखर संचालक

००००

कारखान्यांनी दिलेली एफआरपी अशी

कोल्हापूर जिल्हा : वारणा (२७००), पंचगंगा (२७६४), कुंभी कासारी (२९००), दूधगंगा बिद्री (२८७०), भोगावती (२७१२), दत्त शिरोळ (३०२५), गडहिंग्लज (२५६५), शाहू कागल (२८३२), जवाहर हुपरी (२८५०), राजाराम बावडा (२७१२), आजरा (२५००), गायकवाड बांबवडे (२६३५), मंडलिक कागल (२७१०), शरद नरंदे (२८००), डी.वाय.पाटील (२७११), इंदिरा गांधी, तांबाळे (२५००), दालमिया (२७९८), गुरुदत्त शुगर्स (२९५४), इको केन नलवडे शुगर्स (२८००), हेमरस चंदगड (२६२०), महाडिक शुगर्स (२५००), संताजी घोरपडे (२७०२).

सांगली जिल्हा : वसंतदादा सांगली (२५००), रा.बा. पाटील साखराळे (२८९३), विश्वासराव नाईक (२८००), किसन अहिर (३०३२), महाकाली कवठेमहांकाळ (२३००), रा.बा.पाटील वाटेगाव (२८७३), सोनहिरा वांगी (२८०५), क्रांती अंग्रणी कुंडल (२७७६), सर्वोदय (२९२६), मोहनराव शिंदे आरग (२५००), दालमिया (२५००), उदगिरी शुगर खानापूर (२५६५), सदगुरु राजेवाडी (२३००)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शिरोळच्या राजकारणात यापुढे सहभागी होणार नाही’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

शिरोळ नगरपरिषद निवडणुकीतील पराभव भाजपाचे नेते व गोकुळ दूध संघाचे संचालक अनिल यादव यांच्या जिव्हारी लागला आहे. 'निवडणुकीत झालेल्या पराभवास मीच जबाबदार आहे. येथुन पुढे शिरोळच्या राजकारणात माझा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष सहभाग असणार नाही,' असे त्यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे स्पष्ट केले आहे. यादव यांच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

शिरोळ ग्रामपंचायतीमध्ये अनिल यादव गटाचे वर्चस्व होते. ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपरिषदेत झाल्यानंतर पहिलीच निवडणूक भाजपने पक्षाच्या चिन्हावर लढविण्याचा निर्णय घेतला होता. तर भाजपाला शह देण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजर्षी शाहू आघाडीची मोट बांधली होती. या निवडणुकीत अनिल यादव यांचे पुतणे पृथ्वीराज यादव हे भाजपाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार होते. मात्र त्यांचा केवळ ३३ मतांनी पराभव झाला. शाहू आघाडीचे अमरसिंह पाटील विजयी झाले. नगरसेवकपदाच्या १७ पैकी नऊ जागा शाहू आघाडीला, सात जागा भाजपाला तर एक जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला होता. मात्र, निवडणुकीतील पराभव अनिल यादव यांच्या जिव्हारी लागला आहे. 'निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पृथ्वीराजसिंह यादव व अन्य उमेदवार पराभूत झाले. प्रमुख म्हणून त्याची संपूर्ण जबाबदारी माझी आहे. झालेल्या पराभवाला मी राबविलेली सदोष प्रचार यंत्रणा जबाबदार आहे. निवडून आलेले नगरसेवक व पराभूत उमेदवारांनी स्वत:ला आपल्या कामात गुंतवून घ्यावे,' असे यादव यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. गेली तीस वर्षे शिरोळ गावच्या राजकीय घडामोडीमध्ये माझा सहभाग नेहमीच असायचा. मात्र येथून पुढे मी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष शिरोळच्या राजकारणात सहभागी असणार नाही' असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिवाळीत सौर आकाश कंदील उजळणार

$
0
0

दीपावलीत सौर आकाश कंदिल उजळणार

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जुना बुधवार पेठेतील डांगे गल्ली तरुण मंडळाने यंदा सौर उर्जा हा देखावा गणेशोत्सवात सादर केला होता. कार्यकर्त्यांच्या कल्पनेतून तयार केलेला सौर आकाश कंदील देखाव्यात मांडण्यात आले. या कंदिलाबद्दल नागरिकांकडून विचारणा झाल्यावर दीपावलीसाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी १०० हून अधिक कंदील बनवले आहेत. कंदिलाला छत्रपती शाहू महाराजांचे नाव देण्यात आले आहे.

प्रबोधनात्मक देखाव्याची परंपरा असलेल्या डांगे गल्ली तरुण मंडळाचा यंदा देखाव्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. देखाव्यात सौर उर्जेवरील उपकरणे मांडण्यात आली. या उपकरणात मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आकाश कंदील बनवला. हा कंदील देखावा पाहण्यासाठी नागरिकांना आवडला. उत्सवकाळात आणि त्यानंतर नागरिकांकडून आकाश कंदिलाची मागणी होऊ लागल्यावर कार्यकर्त्यांनी कंदिलाचे उत्पादन तयार करण्याचा निर्णय घेतला. गेले महिनाभर कार्यकर्त्यांनी १०० दिवे तयार केले असून दीपावलीत विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे.

सौर कंदिलाचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर हा कंदील 'मेक इन कोल्हापूर' म्हणून ओळखला जावा म्हणून 'छत्रपती शाहू सौर आकाश कंदील' असे नाव देण्यात आले. कार्यकर्त्यांनी रंगकाम, रंगीत खडे, लेस, गोंड्याचा वापर करून आकर्षक सजावट केल्याने कंदिलाला मागणी वाढली आहे. वायर, बल्ब, पीन, होल्डर या साहित्यांचा वापर केलेला नसून सौर उर्जेवर चालणारी बॅटरीचा वापर करण्यात आला आहे. कंदिलावर टोपण असून त्यात बॅटरी बसविली आहे. टोपण एक तास उन्हात ठेवल्यावर आठ तास बॅटरी बॅकअप मिळतो. कंदिलासाठी लागणारा उत्पादन खर्च जादा असून सध्या सहाशे रुपये किंमत ठेवण्यात आली आहे. सध्या कंदिलाला खर्च जादा येत असला तरी भविष्यात उत्पादन संख्या वाढली तर ग्राहकांना कमी किंमतीत उपलब्ध करुन दिला जात आहे. विजय बंगडे, मानसिंग चित्रुक, ऋतुराज चेणे, दीपक देसाई यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते कंदील तयार करण्यात आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेपत्ता निरीक्षकाचे गूढ वाढले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातील निरीक्षक सुनील विलास पाटील (वय ३८, रा. बाचणी, ता. करवीर) यांच्या बेपत्ता होण्याचे गुढ वाढले. त्यामुळे प्रशासन हादरले आहे. २२ ऑक्टोबरला सकाळी सहा वाजता त्यांनी कार्यालयात येऊन हालचाल वहीत पुण्याला जात असल्याची नोंद केल्याचे आढळून आले आहे. मात्र जिल्हा परिषदेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये या कालावधीत कोणीही कार्यालयात आल्याचे दिसलेले नाही. त्यामुळे ती सही नेमकी कोणाची? त्याचा शोध प्रशासन घेत आहे.

दलित वस्ती बृहत आराखड्याच्या कामाची जबाबदारी निरीक्षक सुनील पाटील यांच्यावर होती. ते सध्या शिवाजी पेठेत रहात होते. दलित वस्ती आराखड्याच्या कामासाठी ते २२ ऑक्टोबर रोजी घराबाहेर पडले. पुण्यातील काम संपवून मुंबईला मंत्रालयात गेले. तेथून ते विक्रोळीत पोहचले. तेथे त्यांचा मोबाईल बंद झाला असे त्यांच्या पत्नी वसुंधरा यांनी गुरुवारी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. पाटील यांचे नातेवाईक आणि मित्रमंडळींनी विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांची भेट घेऊन या प्रकरणाचा तपास गतीने करण्याची विनंती केली. त्यानंतर पोलिसांनी विविध ठिकाणी शोध घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र अद्याप त्यास यश आलेले नाही.

शुक्रवारी मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी पोलिस प्रशासनास पत्र लिहून तपासाबाबत सहकार्य करण्याची विनंती केली आहे. दरम्यान, सुनील यांनी सकाळी सहा वाजता एवढ्या लवकर कार्यालय उघडून हालचाल नोंद वहीत कशी नोंद केली? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या प्रश्नाचे उत्तर समाजकल्याण अधिकाऱ्यांकडेही नाही. जिल्हा परिषदेच्या आयटी विभागाच्या कर्माचाऱ्यांनी सोमवारचे सकाळी साडेपाच ते ९ यावेळेत कार्यालय परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहिले. त्यात सकाळी कार्यालयात सुनील हे आल्याचे दिसले नाही. यामुळे संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. सुनी यांनी खरोखरच सकाळी सहा वाजता येऊन सही केली असेल तर त्यावेळी कार्यालय कुणी उघडले?, जर उघडले असेल तर खातेप्रमुख किंवा सामान्य प्रशासन विभागाची परवानगी घेतली होती का?, असे अनेक प्रश्नही समोर येत आहेत.

मुख्यालय सोडताना आदेश

जिल्हा परिषदेत कार्यालय परिसरात किंवा शहरात प्रशासकीय कामकाजासाठी जाताना हालचाल नोंदवहीत नोंद करणे बंधनकारक असते. कार्यालयीन कामासाठी मुख्यालय म्हणजे शहर सोडताना खातेप्रमुखांचा लेखी आदेश घ्यावा लागतो. सुनील पाटील यांनी असा आदेश घेतला नसल्याचे पुढे आले आहे. केवळ हालचाल वहीत नोंद केल्याने त्याचा सोयीचा अर्थ काढण्याला वाव मिळत आहे. समाजकल्याण विभागाच्या एका पदाधिकाऱ्याने त्यांना परस्पर बृहत आराखड्याच्या कामासाठी पुण्याला जाण्यास सांगितले, अशीही चर्चा सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ए, बी वॉर्डचा पाणीपुरवठा आज बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिंगणापूर पंपिंग स्टेशन येथे ट्रान्सफॉर्मरमध्ये झालेल्या बिघाडामुळे शुक्रवारपासून शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यास सुरुवात झाली. नवीन वेळापत्रकांप्रमाणे शनिवारी ए व बी वॉर्डमधील पाणी बंद राहणार असून या भागात ट्रँकरद्वारे पाणी देण्यात येणार आहे. शुक्रवारी ज्या भागात अपुरा पाणीपुरवठा झाला तेथे १६ टँकर फेऱ्यांतून पाणी देण्यात आले. दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत ए, बी, व ई वॉर्डातील काही भागात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

सोमवारी (ता. २२) शिंगणापूर येथील पंपिंग स्टेशनमधील ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाल्यापासून शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. ट्रान्सफॉर्मर दुरुस्ती होईपर्यंत प्रशासनाने शहरात एक दिवसाआड पाणी देण्याचे नियोजन केले आहे. ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीबरोबर गळती काढण्याचे काम सुरू असल्याने नव्या नियजोनुसार पाणी देण्यास सुरुवात झाली. त्यानुसार शुक्रवारी मध्यरात्रीपासून राजेंद्रनगर, कावळा नाका, राजारामपुरीतील काही भागात पाणी सोडण्यात आले. हा पाणीपुरवठा शनिवारी रात्रीपर्यंत सुरू राहणार असल्याने ए, बी वॉर्डचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर कसबा बावडा पंपिंग स्टेशनमधून नेहमीप्रमाणे पाणीपुरवठा सुरु राहणार आहे. ज्या भागात पाणीपुरवठा बंद आहे, तेथे टँकरद्वारे पाणी देण्याचे नियोजन पाणीपुरवठा विभागाने केले आहे. नियोजनानुसार शुक्रवारी दिवसभर कळंबा व बावडा फिल्टर हाऊस येथून १६ टँकर फेऱ्यांद्वारे विविध भागात पाणीपुरवठा करण्यात आला.

दरम्यान, शहरात पाणीपुरवठ्याची समस्या निर्माण झाल्यानंतर प्रशासनाने एक दिवसाआड पाणी देण्याचे नियोजन केले. पण त्याला शिवाजीपेठेसह उपनगरांतील नगरसेवकांनी विरोध केला. मात्र ज्या भागात पाण्याची समस्या आहे, तेथील नगरसेवकांनी प्रस्तावाचे समर्थन केले. शुक्रवारपासून दुरुस्तीच्या कारणास्तव शहराच्या ए, बी व ई वार्डच्या काही भागात एक दिवसाआड पाणी सोडण्यास सुरुवात झाली. त्याचा कालावधीही जादा असल्याने अनेक नगरसेवकांनी याला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे एक दिवसाआड पाणीपुरवठ्यावरुन नगरसेवकांमध्ये मतभिन्नता दिसून येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images