Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

प्रतिमा उंचावण्यासाठी एसटीचे ‘मिशन’

$
0
0
‘एसटीचा प्रवास, सुखाचा प्रवास’ या ब्रीदवाक्यानुसार एसटीची प्रवासी वाहतूक सुरू आहे. सुरक्षित प्रवासाची हमी देणारे महामंडळ आता प्रवाशांचा विश्वास आणि एसटीची प्रतिमा अधिकाधिक उंचावण्यासाठी अधिक दक्ष झाले आहे.

‘माने यांचे कार्यक्रम होऊ देणार नाही’

$
0
0
‘उपरा’कार लक्ष्मण माने यांच्यावरील गुन्हे या ब्राह्मणी भांडवली व्यवस्थेतील प्रचलित न्याय व्यवस्थेमध्ये सिद्ध होण्याशी आमचा संबंध राहिलेला नाही. आजअखेरचे माने यांचे सामाजिक, राजकीय, संस्थात्मक आणि चळवळीच्या पातळीवरचे विचार-व्यवहार हे फुले-शाहू-आंबेडकरांच्या तत्वज्ञानाशी प्रतारणा करणारे आहेत.

वीज दरवाढीविरोधात आज चक्का जाम

$
0
0
वीज दराबाबत कोणताही निर्णय होत नसून उद्योगांचा खर्च मात्र वाढत असल्याने त्याला विरोध करण्यासाठी सर्व उद्योजकांनी उद्योग बंद ठेवून रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

महालक्ष्मीच्या तिजोरीत ११ कोटींची भर

$
0
0
व्यवस्थापन खर्चात केलेली बचत व जादा व्याज दर देणाऱ्या बँकात केलेली गुंतवणूक, भाविकांनी दिलेल्या देणगी यामुळे करवीर निवासिनी महालक्ष्मीच्या तिजोरीत तब्बल ११ कोटींची भर पडली आहे.

महापौरांचा प्रवास आता लक्झरियस

$
0
0
शहराच्या प्रथम नागरिक असलेल्या महापौरांसाठी आता खऱ्या अर्थाने लक्झरी कार घेता येणे शक्य होणार आहे. सरकारने केवळ सहा लाखांची मर्यादा घातल्याने केवळ नावालाच लक्झरी कार असलेल्या एंट्री लेव्हल कारच्या पुढे वाहन घेता येत नव्हते.

जादूटोणा विधेयकावर निवेदन

$
0
0
‘प्रत्येक पोल‌िस ठाण्यात नांदेड पॅटर्नप्रमाणेच दक्षता अधिकारी नेमले जातील. येत्या चार दिवसांत त्याबाबत अभ्यास करून कार्यवाही केली जाईल,’ असे आश्वासन जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या शिष्टमंडळाला सोमवारी दिले.

‘नाट्यशास्त्र’चा फ्लॉप शो

$
0
0
शिवाजी विद्यापीठातील संगीत व नाट्यशास्त्र विभागाची स्थापना होऊन २५ वर्षे उलटून गेली. विद्यापीठाच्या इतर अधिविभागांसारखा संगीत व नाट्यशास्त्र विभागही महत्त्वपूर्ण. या विभागाच्या कामकाजावरून विद्यापीठाची सांस्कृतिक ओळख ठरते. यामुळे या विभागाचा कामकाज, विद्यार्थीकेंद्र‌ित उपक्रम याकडे साऱ्यांचेच लक्ष.

थंडीचा कडाका कायम

$
0
0
थंडीच पडलेली नसल्याने आतापर्यंत खरेदी करून कपाटबंद असलेल्या जॅकेट, स्वेटर्स, स्कार्फ आणि लोकरीच्या टोप्या तरुणाईने बाहेर काढल्या आणि कॉलेज कॅम्पस म्हणजे थंडीमधील वेगवेगळे फॅशन ट्रेंड दाखवणारी ठिकाणेच बनली.

गटबाजी पडणार काँग्रेसला महागात

$
0
0
चार-पाच महिन्यांवर लोकसभा निवडणूक आली असताना जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघांवर काँग्रेस हक्क सांगत आहे. पण या पक्षाकडे लढायला सक्षम उमेदवार नसताना ऐनवेळी काहींनी आपले नाव पुढे करण्यास सुरुवात केली आहे.

टोल याचिकांवर १८ ला निर्णय

$
0
0
शहरातील रस्ते प्रकल्पाच्या टोलच्या विरोधात दाखल झालेल्या याचिकांवर १८ डिसेंबरला निर्णय होणार आहे. सोमवारच्या ऐन सुनावणीत ‘आयआरबी’ने ७०० पानांचे प्रतिज्ञापत्र सादर केल्याने आणखी कुणाला प्रतिज्ञापत्राद्वारे मत मांडायचे असल्यास त्यासाठी हायकोर्टाने मंगळवार (१० डिसेंबर) पर्यंतची मुदत दिली आहे.

पंचगंगा मैलीच...!

$
0
0
पंचगंगा नदी प्रदूषणाचा विषय ऐरणीवर आला असून, महापालिका, जिल्हा परिषद आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या पातळीवर काम सुरू असते. प्रदूषणाला विविध घटक जबाबदार असतात. कोल्हापूर शहरातील तसेच नदीकाठावरील १७४ गावांतून बाहेर पडणारे सांडपाणी, साखर कारखान्यांची मळी, औद्योगिक कारखान्यांतील रसायनयुक्त सांडपाणी, जनावरे, कपडे धुणे अशा विविध कारणांमुळे नदीच्या प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होत आहे.

संवाद अन् विसंवाद

$
0
0
एकमेकांशी बोलणं नि त्यात समज असणं, ह्याला संवाद म्हणायला हरकत नसावी. समजेचा जेव्हा दुष्काळ असतो तेव्हा विसंवाद घडतो. जोपर्यंत दोघांत संवाद सुरू असतो, तोपर्यंत दोघेही भक्त असतात, पण विसंवाद सुरू झाला की, विभक्त होतात. इतकं हे सरळ साधं आहे.

वीजदरवाढ मागे घेईपर्यंत आंदोलन

$
0
0
वीजदरवाढ कमी करावी या मागणीसाठी जिल्ह्यातील सर्व आद्योगिक संघटनांनी रास्तारोको केला. तावडे हॉटेल येथे करण्यात आलेल्या रास्तारोकोमुळे सुमारे अर्धा तास वाहतूक खोळंबली होती. उद्योजकांच्या या बंदमध्ये उद्योजकांसह सुमारे दोन हजार कामगारही सहभागी झाले होते.

क्षण मावळतीचे येता...!

$
0
0
विविध कारणांमुळे एकटे राहणाऱ्या यंग सीनिअर्सची संख्या शहरात वाढत आहे. ज्येष्ठ कवयित्री प्रा. मंदा कदम याही एकट्याच राहत असत. त्यांचे नुकतेच निधन झाले. कोल्हापूर शहरात एकट्या राहणाऱ्या यंग ‌सीनिअर्सना विविध अडचणींना तोंड द्यावे लागते.

‘संभाजीराजेंना सुरक्षा द्या’

$
0
0
संभाजीराजे छत्रपती यांना फेसबुकवर जीवे मारण्याची धमकी आलेली आहे. महाराष्ट्र सरकारने याची गंभीरपणे दखल घेऊन संभाजीराजेंना सुरक्षा व्यवस्था पुरवावी, अशी मागणी एका निवेदनाद्वारे मौजे सांगाव (ता.कागल) येथील छत्रपती शिवाजी आखाडा तालीम मंडळाकडून करण्यात आली आहे.

डॉन बनण्याची नागोरीची ‘मनीषा’

$
0
0
गावठी पिस्तुल विक्रीप्रकरणी अटक केलेल्या मनीष रामविलास नागोरी उर्फ मन्या याचे अनेक कारनामे पोलिस तपासात आता उघड होऊ लागले आहेत. किरकोळ गुन्ह्यात अटक केलेल्या नागोरीच्या कृत्यांची अख्खी मालिकाच समोर येत आहे.

भूखंड निश्चितीसाठी निविदेचा निर्णय

$
0
0
नगररचना क्रमांक एक व दोनमधील आरक्षित केलेल्या भूखंडांची चतु:सीमा निश्चित करण्यासाठी भूखंडांची मोजणी खाजगी मक्तेदारामार्फत करण्याकरिता निविदा मागविण्याचा निर्णय नगररचना विभागाचे सहसंचालक एम. यादव यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

सूर्याजी घोरपडेंसह ५ जण अटकेत

$
0
0
जातिवाचक शिविगाळ केल्याप्रकरणी माद्याळ (ता.कागल) चे सरपंच सूर्याजी घोरपडे यांच्यासह अन्य चार जणांना मंगळवारी मुरगूड अटक केली.

प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या मार्गी

$
0
0
श्रमिक मुक्ती दलाच्यावतीने सुरु असलेलल्या विविध मागण्यांसाठीच्या आंदोलनाच्या दुसऱ्याच दिवशी जिल्हा प्रशासनाने तत्काळ दखल घेत कृतीशील दिलासा दिला. जैनापूर (ता.शिरोळ) गोठणे येथील वसाहतींमध्ये ४७ जणांना प्लॉट वाटपाचे आदेश मंगळवारी अप्पर जिल्हाधिकारी आप्पासाहेब धुळाज यांनी दिले.

भुदरगड तहसीलदारांवर प्रभाग रचनेवरून दबाव

$
0
0
निळपण (ता. भुदरगड) येथील ग्रामपंचायत निवडणूक प्रभाग रचनेत पैसे घेतल्याचा आरोप करत प्रभाग रचनेवरून कामगार मंत्री हसन मुश्रीफ, गृहराज्यमंत्री सतेज पाटील आमदार के. पी. पाटील, धनंजय महाडिक यांच्याकरवी निळपण येथील शामराव पाटील यांनी दबाव टाकल्याची ‌तक्रार भुरदगडच्या तहसीलदार शिल्पा ओसवाल यांनी भुदरगड पोलिसांत दिली.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images