Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

बुद्धमय भारतासाठी माणसे जोडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'बुद्धांच्या विचारांजवळ येण्यास मोठा समाज तयार आहे. त्यांना विविध अंगाने तपासत न बसता सामावून घेण्याची वेळ आली आहे. त्यासाठी देशभरात बुद्धांच्या विचारांचा प्रचार, प्रसार करणाऱ्या विविध संघटनांनी आपसातील मतभेद, अहंकार दूर सारून एकत्र येत माणसे जोडण्याची गरज आहे. तसे झाल्यास खऱ्या अर्थाने देश बुद्धमय होईल,' असे मत ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांनी रविवारी व्यक्त केले. पहिल्या धम्मविचार साहित्य व संस्कृती संमेलनात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. दसरा चौकातील शाहू स्मारक भवनात पिंपळाच्या रोपाला मान्यवरांच्या हस्ते पाणी घालून संमेलनाचे उदघाटन झाले.

डॉ. साळुंखे म्हणाले, 'अखंड ४५ वर्षे कार्यरत राहून बुद्धांनी करूणा आणि मानवतेचा सर्वोच्च संदेश दिला. वंचित, दु:खी वर्गाला आशेचा किरण दिला. आजही जगात बुद्धांचा विचार सर्वश्रेष्ठ मानला जातो. जगभरातील मोठा वर्ग त्यांच्या विचारांच्या प्रभावाखाली आहे. हा वर्ग बुद्धांच्या कार्याजवळ येण्यासाठी धडपडत आहे. त्यांच्यासाठी मार्ग मोकळा असणे महत्वाचे आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बुद्धांच्या स्वप्नातील जग निर्माण करण्यासाठी संशोधक, विचारवंतांनी वारंवार एकत्र बसून कृती कार्यक्रमाची आखणी केली पाहिजे.'

भदंत गौतमरत्न थेरो म्हणाले, 'अमेरिकेने जातीय विषमता कमी करून विकासाला प्राधान्य दिले. भारतात मात्र अद्याप जातीपातीच्या भिंती घट्ट आहेत. म्हणून देश सर्वांगिण विकासात मागे राहत आहे. वैज्ञानिक आधारावर कोणतीही गोष्ट तपासण्याची शिकवण बुद्धांनी आपल्या विचारांतून दिली. मानव कल्याणाची संकल्पना मांडली. म्हणून विदेशातील अनेक देश बुद्धांचे विचार कृतीत आणत आहेत.'

दिशा पिंकी शेख म्हणाल्या, 'देशात बुद्धांना विशिष्ट वर्गात आणि चाकोरीत बंदिस्त केले गेले. परिणामी विदेशात त्यांचे विचार गतीने पसरले. समाजात स्त्री, पुरुषाशिवाय माझ्यासारखा तृतीयपंथियांचा एक वर्ग आहे. तो अद्यापही उपेक्षित, वंचित आहे. या घटकाला बुद्धांच्या विचारांप्रमाणे न्याय, करूणा मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी बुद्ध विहारांमध्ये स्वतंत्र विभाग असावा.'

रत्नश्री म्हणाल्या, 'जगभर धम्म विचारांचा प्रसार करताना आशादायक बदल दिसतो. स्त्री-पुरुष समानतेसाठी त्यांचे विचार कृती आणा.'

अॅड. इंद्रजित कांबळे, मोहन मिणचेकर, अमित मेधावी यांची भाषणे झाली. सागर कांबळे, प्रविण बनसाडे यांनी सूत्रसंचालन केले. सुशिलकुमार कोल्हटकर यांनी प्रास्ताविक केले. अनिल म्हमाने यांचा विशेष सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ समाजसेवक व्यंकाप्पा भोसले, डॉ. दयानंद ठाणेकर, तात्या कांबळे आदी उपस्थित होते. दरम्यान, शेवटच्या सत्रात डॉ. शिवाजी पाटील, प्रा. टी. एल. पाटील, सतिश भारतवासी यांनी कविता सादर केल्या. भदंत आर. आनंद यांनी बुद्धांच्या कार्याची माहिती दिली. गायक कबीर नाईकनवरे, शाहीर रणजीत कांबळे यांचा कार्यक्रम झाला.

पुस्तक प्रकाशन

कार्यक्रमात प्रा. करुणा मिणचेकर संपादीत 'संविधान मूल्यांकरिता कला, साहित्य, संस्कृती' आणि प्रा. डॉ. चंद्रकांत कदम लिखित 'बाईपासून बाईपर्यंत' या कविता संग्रहाचे प्रकाशन झाले. युगप्रवर्तक महागायक स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीसे देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पोलिस स्मृती स्तंभाला अभिवादन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पोलिस स्मृतीदिनानिमित्त देशभरात कर्तव्य बजावत असताना वीरमरण आलेल्या पोलिसांना पोलिस क्रीडा संकुलात अभिवादन करण्यात आले. एक सप्टेंबर २०१७ ते ३१ ऑगस्ट २०१८ या कालावधीत ४१९ पोलिस अधिकारी व जवानांनी कर्तव्य बजावत असताना प्राणाची आहुती दिली आहे.

दरवर्षी २१ ऑक्टोबर रोजी पोलिस स्मृतीदिन साजरा केला केला जातो. रविवारी सकाळी आठ वाजता पोलिस क्रीडा संकुलातील स्मृती स्तंभास कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, महानगरपालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख यांनी पुष्पचक्र वाहिले. यावेळी बंदुकीच्या फैरी हवेत झाडण्यात आल्या. गुन्हे अन्वेषण विभागाचे दिनेश बारी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे, गृह पोलिस उपअधीक्षक सतीश माने, शाहूवाडी विभागाचे पोलिस उपअधीक्षक आर.आर. पाटील, करवीरचे पोलिस उपअधीक्षक सूरज गुरव यांच्यासह अधिकारी, पोलिस कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मी आणि संजय घाटगे कधी एकत्र येऊ हे सांगता येत नाही

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कागल

'मी आणि माजी आमदार संजय घाटगे... आम्ही दोघेही चांगले मित्र आहोत. यापुढे कुठल्या वळणावर एकत्र येणार आहोत हे आज सांगता येत नाही', असा गौप्यस्फोट आमदार हसन मुश्रीफ यांनी केला. कागल तालुक्यातील मळगे खुर्द विद्यामंदिरच्या शताब्दी महोत्सव कार्यक्रमात एकेकाळचे हे मित्र आणि राजकारणातील स्पर्धक एकाच व्यासपीठावर होते. त्याआधी माजी आमदार घाटगे यांनी भाषणात 'हसन मुश्रीफ हे माझे जवळचे मित्र आहेत' असे स्पष्ट केले. होते. राजकारणातील या दोन्ही स्पर्धक नेत्यांनी 'तुझ्या गळा- माझ्या गळा' वक्तव्य केल्याने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या.

माजी आमदार संजय घाटगे म्हणाले, 'महाराष्ट्राचे माजी जलसंपदामंत्री, कागल तालुक्याचे सन्माननीय आमदार हसन मुश्रीफ आणि मी कॉलेजमधले मित्र आहोत हे खरं आहे. आता ते माझे मित्र नाहीत हेही खरं आहे. हसन मुश्रीफ हे माझे जवळचे मित्र आहेत. कॉलेजमध्ये एकाच क्रिकेट संघामधून आम्ही खेळलो आहोत.'

हाच धागा पकडत आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, 'कागल तालुक्याचे सन्माननीय माजी आमदार संजय घाटगे आणि मी पाच-सहा वर्षे एकत्र शिकलो आहोत. जवळजवळ दहा वर्षे एकाच गटात आम्ही काम केले आहे. त्यानंतरची वीस वर्षे दोघांच्याही वाटा वेगळ्या झाल्या. आमच्या दोघांचेही वय आता ६४ ते ६५ आहे. पुढे कुठल्या वळणावर आम्ही एकत्र येणार आहोत हे आजतरी सांगता येणार नाही.'

मुश्रीफ यांच्या या वक्तव्यानंतर तालुक्यात उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे.

फोटोओळ

आमदार हसन मुश्रीफ व माजी आमदार संजय घाटगे हे मळगे खुर्द येथील विद्यामंदिरच्या शताब्दी महोत्सव कार्यक्रमानिमित्त एकत्र आले होते.

(छायाचित्र : जे. के. फोटो, सुरुपली)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पक्ष कोणताही असो लोकसभा लढणारच

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कुडित्रे

'मी केलेल्या विकासकामांचा पोटशुळ उटल्यानेच विरोधक माझ्या उमेदवारीला विरोध करत आहेत. जिल्ह्यात केलेल्या कामामुळे जनता माझ्या पाठीशी आहे. माझ्या उमेदवारीचा निर्णय पक्षश्रेष्ठी शरद पवार घेतील. मात्र, त्यामध्ये काही अडचणी येत असतील तर जनतेच्या दरबारात जाऊ. मग पक्ष कोणताही असूदे, लोकसभा निवडणूक लढविणारच' असा आक्रमक पवित्रा घेऊन खासदार धनंजय महाडिक यांनी रणशिंग फुंकले. करवीर तालुक्यातील हणमंतवाडी येथील बिरदेव मंदिर विकासकामाच्या प्रारंभप्रसंगी ते बोलत होते.

खासदार महाडिक म्हणाले, 'जिल्ह्यातील अनेक प्रलंबित प्रश्न उपस्थित करून संसदेत सर्वाधिक प्रश्न विचारले म्हणूनच संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे. अनेक कामे मार्गी लावली आहेत. जे लोक नगरपालिकेला निवडून आले नाहीत, ते आम्हाला विरोध करत आहेत. पण विरोधकांच्या असल्या बोलण्याने आम्ही डळमळणार नाहीच. राष्ट्रवादीतून उमेदवारीबाबत काही अडचणी आल्या तर मग पक्ष कोणताही असो, निवडणूक लढवणार.'

सरपंच लता गावडे यांच्या हस्ते कामाचे उद्घाटन करण्यात आले. माजी सरपंच प्रियंका शिणगारे, सुरेश रांगोळकर, संजय शिपुगडे यांची भाषणे झाली. कार्यक्रमास उपसरपंच बजरंग शिणगारे, सरदार पिंजरे, खानू पुजारी, भगवान शिनगारे, रवी शिनगारे, सचिन शिणगारे, आनंदा गावडे, विक्रम शिणगारे, तानाजी शिणगारे, बायाक्का तिबिले, अस्मिता पिंजरे, विक्रम शिणगारे, तानाजी शिणगारे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

फोटो : करवीर तालुक्यातील हणमंतवाडी येथील बिरदेव मंदिर विकासकाम प्रारंभप्रसंगी खासदार धनंजय महाडिक, लता गावडे, सुरेश रांगोळकर व मान्यवर.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जयसिंगपुरात तरुणाचा विहिरीत मृतदेह आढळला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

येथील सहाव्‍या गल्‍लीतील दीपचंद इंगळे यांच्‍या गट क्रमांक १३मधील शेतातील विहिरीत तरुणाचा मृतदेह तरंगताना आढळला. श्रीनाथ जितेंद्र शेटे (वय २३, रा. तेरावी गल्‍ली, स्‍वप्‍न अपार्टमेंट जयसिंगपूर) असे त्‍याचे नाव आहे. या घटनेची नोंद जयसिंगपूर पोलिसात झाली आहे.

श्रीनाथ हा गेल्या आठ वर्षापासून जयसिंगपूर येथे नातेवाईकाकडे रहात होता. फिट्सचा त्रास असल्याने त्याच्यावर औषधोपचार सुरू होते. शनिवारी दुपारी केस कापून येतो असे सांगून तो बाहेर पडला. मात्र रात्री उशिरापर्यंत परतला नाही. यामुळे नातेवाईकांनी त्याचा शोध घेतला. रविवारी सकाळी पावणेनऊ वाजण्याच्‍या सुमारास इंगळे यांच्‍या विहीरीत त्याचा मृतदेह तरंगताना आढळला. सुभाष अंधारे यांनी घटनेची वर्दी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्‍थळी धाव घेवून मृतदेह बाहेर काढला. प्राथमिक आरोग्‍य केंद्रात उत्‍तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्‍या ताब्‍यात देण्यात आला. सहाय्यक फौजदार बजरंग माने तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरातील दूध वितरण आज बंद

$
0
0

फोटो

........

कमिशनवाढीसाठी गोकुळच्या वितरकांचा निर्णय

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अन्य दूध संघांप्रमाणे कमिशनमध्ये वाढ करावी, या मागणीसाठी कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघाच्या (गोकुळ) शहरातील दूध वितरकांनी सोमवारी (ता. २२) दूध वितरण बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. बालागोपाल तालीम येथील यूथ बँक परिसरात रविवारी निदर्शने करत बंदचा निर्णय घेण्यात आला. शनिवारपर्यंत (ता. २७) गोकुळने कमिशनमध्ये वाढ न केल्यास बेमुदत संप करण्याच्या इशाराही वितरकांनी दिला.

गोकुळतर्फे शहरात दैनंदिन सुमारे दीड लाख लिटर दुधाचे वितरण केले जाते. यासाठी गोकुळचे २३१ मुख्य वितरक आहेत. ग्राहकांची गरज आणि दूध वेळेत पोहोच करण्यासाठी काही उपवितरकही निर्माण झाले आहेत. गोकुळच्यावतीने वितरकांना प्रतिलिटर एक रुपये ९० पैसे प्रमाणे कमिशन दिले जाते. मात्र अन्य दूध संघ दोन ते अडीच रुपये कमिशन देत असल्याने गेल्या दोन महिन्यांपासून वितरक कमिशनमध्ये वाढ करण्याची मागणी करत आहेत. गोकुळ प्रशासनाकडे त्यांनी पत्रव्यवहारही केला आहे. पण गोकुळने अद्याप कमिशनमध्ये वाढ अथवा वितरकांबरोबर चर्चा केलेली नाही.

गोकुळ प्रशासन मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याने वितरकांनी रविवारी बालगोपाल तालीम येथील यूथ बँक परिसरात निदर्शने करत प्रशासनाचा निषेध केला. सोमवारच्या दूध वितरणासाठी एक दिवस अगोदर वितरकांना रक्कम जमा करावी लागते. यासाठी गोकुळने यूथ बँक व शाहूपुरी तिसरी गल्ली येथील पार्श्वनाथ बँक येथे सुटीदिवशी व्यवस्था केली आहे. पण रविवारी आगाऊ भरणा न करण्याचा निर्णय घेत सोमवारी शहरातील दूध वितरण बंद करण्याचा एकमुखी निर्णय वितरकांनी घेतला. तसेच २७ ऑक्टोबरपर्यंत कमिशन वाढीबाबत निर्णय न घेतल्यास बेमुदत दूध वितरण बंद ठेवण्याचा इशारा दिला. दरम्यान, वितरकांनी दूध वितरण न करण्याचा निर्णय घेतला असल्याने, गोकुळने शहरात दूध वितरणासाठी पर्यायी व्यवस्था तयार ठेवली आहे.

...............

फोटो ओळी

कमिशनवाढीसाठी गोकुळच्या वितरकांनी रविवारी निदर्शने केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘काँग्रेस सेवा दलाच्या कार्यकर्त्यांनी सक्रिय व्हावे’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'काँग्रेस सेवा दलातील कार्यकर्त्यांनी पक्षाची ध्येय, धोरणे तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी सक्रिय व्हावे,' असे आवाहन राष्ट्रीय काँग्रेस सेवादलाचे सचिव व महाराष्ट्राचे प्रभारी शंकर गौडा यांनी रविवारी केले. जिल्हा काँग्रेस कमिटीत झालेल्या काँग्रेस सेवा दलाच्या नूतन पदाधिकारी बैठकीत ते बोलत होते. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

गौडा म्हणाले, 'पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी सेवा दलाच्या सर्व शाखांत नवऊर्जा आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. शाखांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी पक्षात चांगले काम करावे. नव्या पदाधिकाऱ्यांनी समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहचवावे.'

जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील म्हणाले, 'गेल्या अनेक वर्षापासून जिल्ह्यात सेवादल शाखेच्या पदाधिकाऱ्यांची निवड झाली नव्हती. यामुळे सेवादलाच्या कामाला मरगळ आली होती. ती आता दूर होईल.'

यावेळी अॅड. सुरेश कुराडे, तौफिक मुल्लाणी, संजय पाटील यांची भाषणे झाली. यावेळी नूतन सेवादल जिल्हाध्यक्ष रंगराव देवणे, शहराध्यक्ष संजय पवार- वाईक, सेवादलाचे सांगली जिल्हाध्यक्ष अजित डोले, करवीर पंचायत समितीचे माजी सदस्य जयसिंग काशीद, प्रविण चौगले यांचा सत्कार झाला. शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, महानगरपालिका महिला बालकल्याण समिती सभापती सुरेखा शहा, संध्या घोटणे, दिपा पाटील, वडणगे सरपंच सचिन चौगले, एस. के. माळी, बाबूराव कांबळे यांच्यासह सेवादलाचे कार्यकर्ते उपस्थित होते. संजय पवार-वाईकर यांनी आभार मानले.

संवाद शिबिरास माजी मुख्यमंत्री

काँग्रेसतर्फे २३ व २४ ऑक्टोबर 'संवाद' कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे़ फुलेवाडीतील अमृत मल्टिपर्पज हॉलमध्ये शिबिर होईल. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती राहील, असे पाटील यांनी सांगितले.

साखरेला ३६०० रुपये दर जाहीर करावा

'वारणानगरात २४ ऑक्टोबरला होणाऱ्या ऊस परिषदेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार आहेत. त्यांनी परिषदेत कारखान्यांच्या साखर विक्रीचा दर ३५०० ते ३६०० रुपये दर जाहीर करावा,' अशी मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांनी केली. 'इतका दर साखरेला मिळाला तर ऊस उत्पादकांना चांगला दर देता येईल,' असेही त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टेंबलाईवाडी घरफोडीत तीन लाखाचे दागिने लंपास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

टेंबलाईवाडी येथील प्रगती हाऊसिंग सोसायटी परिसरातील बंगला फोडून चोरट्यांनी तीन लाख रुपये किंमतीचे ११ तोळे दागिने लंपास केले. रविवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास चोरीची घटना उघडकीस आली. शबाना उमर मुलानी (वय ४६, रा. रा. भोसलेवाडी) यांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात चोरीची फिर्याद दिली .

फिर्यादी शबाना मुलानी यांचे वडील महम्मदअली बाबालाल गारदी यांचा प्रगती हौसिंग सोसायटी येथे बंगला आहे. गेले दोन दिवस बंगला बंद होता. रविवारी सकाळी शेजाऱ्यांनी बंगल्याचा दरवाजा उघडा असल्याचे शबाना यांना मोबाइलवरून सांगितले. त्यानंतर त्या घटनास्थळी आल्या. चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून बंगल्यात प्रवेश केला असल्याचे निदर्शनास आले. चोरट्यांनी बेडरुममधील लोखंडी तिजोरी आणि पत्र्याच्या कपाटातील ड्रॉवर उचकटून सोन्याचे दागिने चोरले. अर्धा तोळा वजनाच्या सहा अंगठ्या, दीड तोळ्याची एक, एक तोळ्याच्या तीन आणि अर्धा तोळ्याच्या तीन सोन्याच्या चेन, सोन्याचे झुबे, टॉप्स, सोन्याचे तुकडे असे अकरा तोळे दागिने लंपास केल्याची नोंद पोलिसांकडे झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


घरफोडीच्या प्रयत्नात असणाऱ्या कराडच्या दोघांना अटक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कागल

घरफोडीच्या प्रयत्नात असणाऱ्या हत्यारांसह आलेल्या कराडच्या दोघांना कागल पोलिसांनी अटक केली. ओम्नी गाडीसह घरफोडीचे साहित्य जप्त केले आहे. अभिनंदन रतन झेंडे (वय ३१, रा. शनिवार पेठ, कराड) व कुंदन जालंदर कराडकर (वय २४, रा. मंगळवार पेठ, कराड) ही अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. कॉन्स्टेबल पोपट गावीत यांनी जीवाची पर्वा न करता लक्ष्मी टेकडी येथे पाठलाग करून आरोपींना पकडले.

कागल पोलिसांनी सांगितले की, कागल शहरात शनिवारी संशयित दोघे रात्री ओम्नी गाडीमधुन (एमएच १० सी ६४७७) रिव्हाल्व्हरसारखे दिसणारे बनावटीचे लायटर, स्क्रूडायव्हर, वस्तारा, मोबाइल आदी साहित्यांसह फिरत होते. रिंग रोडवरील एचडीएफसी बँकेच्या समोर असलेल्या मोटरसायकलमधील पेट्रोल काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तुळजा ट्रेडर्स या दुकानाचे शटर उचकटण्याचा ते प्रयत्न करीत असताना बँकेच्या वॉचमनने आरडाओरडा केल्यावर त्यांनी पळ काढला. यावेळी मोटार तेथेच राहिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन मोटार ताब्यात घेतली. संशयितांचा शोध सुरू केला. पोलिस कर्मचारी पोपट गावीत, अरुण कोळी, अरुण कांबळे हे गस्त घालत होते. चोरटे लक्ष्मी टेकडीकडे चालत जात असताना पोलिस कर्मचारी गावीत यांनी पाठीमागून झडप घालून त्यांना पकडले. कुंदन कराडकर हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर खून, मारामारी, दरोडा असे सात मोठे गुन्हे त्याच्यावर आहेत. सल्या-चेप्यावर तसेच सातारच्या दीपक जाधव यांच्यावरदेखील त्याने गोळीबार केला आहे. पोलिस निरीक्षक दिलीप जाधव यांनी कुंदनला पकडणार्‍या पोलिस कर्मचारी पोपट गावीत यांचा पाचशे रुपयांचे इनाम देऊन सन्मान केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नियमांना फाटा, मनमानी कारभार

$
0
0

जिल्हा परिषदेचा लोगो वापरावा...

..................

'माध्यमिक'च्या मनमानी कारभाराचा अनेकांना फटका, नियुक्तीपासून वेतनश्रेणीपासून वंचित

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षण क्षेत्रातील कामकाज नियमाप्रमाणे चालविण्याची, गुणवत्तावाढीला प्रोत्साहित करण्याची जबाबदारी माध्यमिक शिक्षण विभागाची आहे. मात्र शिक्षकांच्या नियुक्त्या, वरिष्ठ वेतनश्रेणी, कुटुंब निवृत्ती वेतनाचे प्रस्ताव अशा प्रत्येक टप्प्यावर 'इंटरेस्टला प्राधान्य, नियमांना फाटा' अशा पध्दतीने कामकाज केले गेले. गेल्या काही वर्षांत माध्यमिक विभाग म्हटले की दफ्तर दिरंगाई, नियमबाह्य कामकाज अशी ओळख निर्माण झाली.

अतिरिक्त शिक्षक समायोजन प्रक्रियेत शिक्षण आयुक्तांचा आदेश डावलण्याचा व खोटा अहवाल सादर करण्याचा मुजोरपणा अधिकाऱ्यांनी केला. कधी शिक्षणसंस्था चालकांशी संगनमत करुन तर कधी खोटा अहवाल सादर करुन पात्र शिक्षकांना डावलण्याचा अर्थपूर्ण व्यवहार केला. तत्कालिन शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्या कामकाजाची चौकशी करण्यासाठी पाच सदस्यीय समितीची स्थापना झाल्यानंतर 'माध्यमिक'च्या कारभाराचा भांडाफोड करणारी प्रकरणे चव्हाट्यावर आली.

माध्यमिक शिक्षक संघ कोल्हापूर विभागाचे विभागीय निमंत्रक बी.डी.पाटील यांच्या नेतृत्वाखाली संबंधित शिक्षकांनी चौकशी समितीच्या सदस्यांकडे लेखी स्वरुपात तक्रारी दिल्या. अकरापैकी दोन शिक्षक सेवानिवृत्त झाले, पण त्यांना न्याय मिळाला नाही. श्रीमती तिलोत्तमा विठ्ठलराव सोनवणे, दगडू मारुती थडके, पांडूरंग रामा पाटील, शिवाजी दत्तात्रय कांबळे, सुरेश सटुप्पा काजिर्णेकर, सुरेश शिवाजी बेलेकर, सूरज उत्तम कांबळे, पी. के. चौगुले, बनाबाई गणपती कांबळे, संजय पांडूरंग व्हनागडे आणि बजरंग शंकर पाटील यांनी आपल्यावरील अन्यायाचा पाढा वाचला आहे.

सेवानिवृत्त सहायक शिक्षक बजरंग शंकर पाटील यांनी माध्यमिक विभागाच्या चौकशीची मागणी केली आहे. श्रीमती बनाबाई गणपती कांबळे यांचा कुटुंब निवृत्ती वेतनाचा प्रस्ताव सादर करण्याबाबत अनेकदा आदेश झाले. श्रीमती बनाबाई यांचे पती गणपती केरबा कांबळे हे चतुर्थश्रेणी कर्मचारी होते. गणपती कांबळे यांच्या मृत्यूनंतर श्रीमती बनाबाई यांनी कुटुंब निवृत्ती वेतन मिळण्याची मागणी केली होती. पण शिक्षणाधिकारी लोहार यांनी हेतूपुरस्सर या प्रकरणी लक्ष घातले नाही. पी.के.चौगुले या शिक्षकाला बारा वर्षानंतर लागू होणारी वरिष्ठ वेतनश्रेणी दिली नाही. सुरेश काजिर्णेकर यांनीही माध्यमिकच्या मनमानी कारभारावर प्रकाशझोत टाकला आहे.

.............

पद रिक्त नसल्याचा खोटा अहवाल

श्री काडसिध्देश्वर हायस्कूल येथील शिक्षिका श्रीमती तिलोत्तमा सोनवणे या माध्यमिक शिक्षण विभागाच्या बेजबाबदार कारभाराच्या बळी ठरल्या आहेत. त्या शिक्षकी पेक्षातून सेवानिवृत्त झाल्या, पण निवृत्तीवेतनापासून वंचित आहेत. विद्यार्थी संख्या घटल्यामुळे अतिरिक्त ठरलेल्या या शिक्षिकेला न्याय मिळाला नाही. जिल्ह्यातील अतिरिक्त शिक्षकांची यादी तयार करण्याची कार्यवाही सुरू असताना सोनवणे यांनी अतिरिक्त शिक्षक यादीत समावेश करावा म्हणून ढीगभर पत्रे दिली. पण त्याची दखल लोहारांनी घेतली नाही. संबंधित शाळेत रिक्त पदे असताना लोहारांनी शाळेत शिक्षक पदे रिक्त नसल्याचा खोटा अहवाल वरिष्ठांना दिला. आणि त्याचवेळी नवीन नेमणुकींना शिक्षणाधिकाऱ्यांनी मंजुरी दिल्याचे सोनवणेंनी तक्रारीत म्हटले आहे.

..............

कोट

'माध्यमिक शिक्षण विभागाचा कामकाज नेहमीच वादग्रस्त ठरला आहे. सहा, सहा महिने फायली प्रलंबित राहतात. माहिती अधिकार कायद्याअंतर्गत माहिती उपलब्ध होत नाही. या विभागात आस्थेवाईकपणे कुणालाच वागणूक मिळत नाही. शिक्षण आयुक्तांचे शिक्षक समायोजन संदर्भातील आदेश शिक्षणाधिकारी लोहार यांनी मानले नाहीत. या प्रकरणावरुन विभागातील अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार स्पष्ट होतो.

बी.डी.पाटील, विभागीय निमंत्रक, माध्यमिक शिक्षक संघ

............

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जीवनोन्नती अभियानबद्दल जिल्हा परिषदेचा गौरव

$
0
0

मुख्यमंत्र्याच्या हस्ते सीईओ मित्तल यांचा सत्कार

म.टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंमलबजावणीमध्ये कोल्हापूर जिल्हा राज्यामध्ये प्रथम आला. यानिमित्त जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नागपूर येथे हा कार्यकम झाला. सरकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करत लोकांना लाभ मिळवून देण्यात जिल्हा परिषद यशस्वी ठरल्याचे कौतुकोद्गारही मान्यवरांनी याप्रसंगी काढले.

केंद्र सरकारने, ग्रामीण भागातील दारिद्र्याचे उच्चाटन करण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानची सुरुवात केली आहे. राज्य सरकारच्या ग्राम विकास विभागामार्फत या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी केली जाते. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विविध योजना लोकांपर्यंत पोहचविल्या. जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक, तत्कालिन मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमनार, तत्कालिन ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक हरिष जगताप यांच्यासह पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी योजनेच्या यशस्वीतेवर भर दिला. अमन मित्तल यांनीही मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून या योजनेला चालना दिली.

अभियानामध्ये जिल्हा परिषदेने १०० टक्के काम केले आहे. जिल्ह्यात ८४० स्वयंसहायता बचत गट स्थापण्याचे उद्दिष्ट असताना १२४४ समूहांची स्थापना झाली. जिल्ह्यातील बचत गटांना एक कोटी ४१ लाख रुपयांचा निधी वितरीत केला. स्वयंसहाय्यता समूहांना बँकांमार्फत ६२ कोटी १७ लाख रुपयांचे अर्थसहाय्य उपलब्ध करुन दिले. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेंतर्गत १३७९६ इतके तर प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजनेचे १३५२९ इतके उद्दिष्ट पूर्ण केले आहे. या कामाची दखल घेऊन राज्य पातळीवर जिल्हा परिषदेच्या कार्याचा गौरव झाला. मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल, ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई यांनी पुरस्कार स्वीकारला.

....................

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

९० वर्षाचे आजोबा हाकतात नांगर

$
0
0

सूर्यकांत आसबे, सोलापूर

आयुष्यात एखादे संकट पचवू न शकल्याने अनेकजण आयुष्याची दोर कापून आपली जीवनयात्रा संपवतात. मात्र, गेल्या ७० वर्षापासून प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आपला नांगर आणि बैलजोडीची दोर हाती पकडून उभी हयात स्वाभिमानाने जगणाऱ्या ९० वर्षाच्या तरुणाची ही प्रेरणादायी कहाणी.... ही कहाणी ऐकल्यावर निश्चितच सर्वजण अवाक झाल्याशिवाय राहणार नाही. यादवराव तगारे असे त्या ९० वर्षीय तरुण शेतकऱ्याचं नाव आहे.

उत्तर सोलापूर तालुक्यातील रानमसले या गावातील हे आजोबा आहेत. 'आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे, मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे', गझलकार आप्पा ठाकूर यांच्या गझलमधील ओळी या बळीराजाला लागू पडतात. खांद्यावर नांगर घेऊन फिरणारे ९० वर्षीय यादवराव यांचा दिनक्रम म्हणजे पहाटे चार वाजता उठणे, थंड पाण्याने अंघोळ करणे, मिळेल तो भाकर तुकडा खाणे आणि दिवस उगवला की निघाले शेताची नांगरणी, कुळवणी, पेरणी करायला. मागील सत्तर वर्षापासून तगारे आजोबा लोकांचं शेत नांगरायला घेतात. दोन बैलजोड्या सोबतीला घेऊन नव्वद वर्षीय तगारे आजोबा दिवस -रात्र अशा दोन शिफ्टमध्ये आपले काम करतात. स्वाभिमानी वृत्ती आणि कणखर निग्रह याच्या बळावर ते आपल्या रोजीरोटीचा प्रश्न स्वतः मिटवतात. कोणापुढेही त्यांना हात पसरावा लागत नाही.

तगारे आजोबांनी आजपर्यंत सात ते आठ बैलजोड्या सांभाळल्या. वयोमानाने त्या बैलांचं निधन झालं. मात्र, तगारे आजही आपल्या पाखऱ्या आणि सर्जा या नव्या बैलजोडीसोबत जोमाने काम करतायत. आजोबा केवळ नांगर एके नांगर हाकत नाहीत. तर सामाजिक आणि राजकीय स्थित्यंतरावरही परखडपणे भाष्य करतात. त्यांच्या तावडीतून पंतप्रधान, मंत्री, खासदार, आमदार एवढचं काय, गावचा सरपंचही सुटत नाही. आजोबांचा उत्साह, कामाचा वेग हा आजच्या तरुणालाही लाजवेल असाच आहे. डोक्याला फेटा, अंगावर बंडी आणि धोतर खोचलं की आजोबांचं काम सुरू होतं. आजोबा कधीही आजारी पडल्याचं कोणालाच आठवत नाहीत. पंचक्रोशीत असा माणूस सापडणं विरळाच आहे, असं ग्रामस्थ दयानंद कुंभार आणि बालाजी गरड यांनी सांगितलं.

कष्टकरी कसा असतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे यादवराव तगारे आजोबा आहेत. आजही ते नांगर या रानातून त्या रानात सहजपणे नेतात. दुष्काळ असो वा सुकाळ तगारे आजोबा आपले बैल कायम तंदुरुस्त ठेवतात. एकवेळ स्वतःच्या पोटाला खाणार नाहीत. पण बैल मात्र हत्तीसारखे टुमदार ठेवतात. जगण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती आणि ठासून भरलेला स्वाभिमान हेच तगारे आजोबांचं बलस्थान आहे. आयुष्याच्या संध्याकाळीही ते सकारात्मकतेने आपलं जीवन व्यथीत करत आहेत. त्यामुळे अपयशाने खचून गेलेल्या व्यक्तींसाठी तगारे आजोबा म्हणजे बूस्टर डोसच ठरतील यात तिळमात्र शंखा नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रयतच्या ऊस परिषदेची तयारी अंतिम टप्प्यात

$
0
0

फोटो ओळ...

म. टा. वृत्तसेवा वारणानगर

कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी कोडोली (ता. पन्हाळा) येथील हाउसिंग सोसायटीच्या मैदानावर बुधवारी (ता.२४) आयोजित केलेल्या रयत क्रांती संघटनेच्या दुसऱ्या ऊस परिषदेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. परिषदेला उपस्थित राहणारे प्रमुख पाहुणे मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे.

कोडोली हाउसिंग सोसायटीच्या मैदानावर व मैदानाच्या बाजूने असणाऱ्या घरे बंगले यांचा सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी आढावा घेतला. सभेचे व्यासपीठ तेथील सुरक्षा, महनीय व्यक्ती, जनता यांची बैठक व्यवस्था सभास्थळी प्रवेश, मैदानाच्या रिकाम्या बाजू बंदिस्त करणे, सुरक्षा यंत्रणेला सभा सुरळीत पार पाडण्यासाठी करावे लागणारे उपाय याबाबत दिवसभर शाहूवाडी विभागाचे पोलिस उपअधीक्षक आर. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोडोली पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक संजीव झाडे, पोलिस दलातील इतर विभागाचे अधिकारी व कर्मचारी काम करीत आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी कोडोलीच्या मुख्य रस्त्यावर स्वागत कमान उभारली आहे. प्रमुख मार्गावर झेंडे, फलक, डिजिटल लावले आहेत. कोडोली परिसरात तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी, पन्हाळा, हातकंणगले, सांगली जिल्ह्यांतील शिराळा,वाळवा, मिरज या तालुक्यांतील वारणा नदीच्या दोन्ही तीरांवर वारणा खोऱ्यातील गावागावांतील नागरिकांनी उपस्थित राहावे यासाठी संपर्क सभा, डिजिटल फलक, भित्तीपत्रके लावून संयोजकांनी प्रयत्न केले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस ऊस परिषदेच्या माध्यमातून प्रथमच ऊसदर चळवळीच्या व्यासपीठावर येत असल्याने शेतकऱ्यांत ऊसदराबाबत उत्सुकता लागून राहिली आहे.

रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत, प्रदेशाध्यक्ष शिवनाथ जाधव, युवक नेते सागर खोत यांसह संघटनेचे इतर सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते परिषद यशस्वी होण्यासाठी गेले काही दिवस झटत आहेत.

०००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वितरकांच्या संपामुळे १९ हजार लिटरचा फटका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) शहरातील वितरकांनी कमिशन वाढीसह अन्य मागण्यासाठी एक दिवसाच्या संप केला. संपामुळे संघाला १९ हजार लिटरचा फटका बसला असून अंदाजे दहा लाख रुपयांचे नुकसान झाले. गोकुळने पर्यायी व्यवस्था उभारुन ८१ हजार लिटर दूधाचे वाटप केले. दरम्यान, मंगळवारपासून वितरकांकडून दुधाचे पूर्ववत वितरण केले जाणार आहे.

कोल्हापूर शहरात गोकुळचे २३१ वितरक आहेत. संघाकडून वितरकांना प्रतिलिटर एक रुपये ९० पैसे कमिशन दिले जाते. मुख्य वितरकांनी ग्राहकांना वेळेत दूध पुरवठा व्हावा यासाठी उपवितरक नेमले आहेत. त्यामुळे कमिशनची वाटणी होते. वारणा, अमूल या दूध संस्थांकडून अडीच ते पावणे तीन रुपये कमिशन दिले जाते. या तुलनेत गोकुळचे कमिशन कमी असल्याने दोन महिन्यांपूर्वी वितरकांनी कमिशन वाढवून मिळावे अशी मागणी केली होती. त्यानुसार प्रशासनाने सर्वसाधारण सभेनंतर कमिशन वाढवण्याबाबत निर्णय घेतले जाईल, असे आश्वासन दिले होते. पण, सर्वसाधारण सभेत मल्टिस्टेट प्रश्नांवरुन झालेल्या गदारोळामुळे त्याकडे दुर्लक्ष झाल्याने त्यांनी एक दिवस संपाचा निर्णय घेतला.

आंदोलनाचा भाग म्हणून ८५ टक्के वितरकांनी दूध विक्रीसाठीची रक्कम बँकेत जमा न केल्याने प्रशासनाला जाग आली. पर्यायी व्यवस्था म्हणून सोमवारी सकाळी सहा वाजता शहरातील वीस ठिकाणी दूध पिशव्यांचे वाटप करण्यासाठी वाहने उभी केली. शहरातील दूध विक्री करणारे दुकानदार, हॉटेल चालक, उप वितरकांनी रोख रक्कम देऊन दूध खरेदी केली. दोन तासात ८१ हजार लिटर दुधाची विक्री झाली. रोज एक लाख लिटर दुधाची विक्री होती. संपामुळे १९ लाख लिटरचा फटका बसला. अंदाजे दहा लाख रुपयांचे नुकसान झाले. दरम्यान एक दिवसाच्या संपानंतर मंगळवारपासून वितरकांकडून दुधाचे नियमित वितरण होणार आहे. संघाने २७ ऑक्टोबरपर्यंत निर्णय न घेतल्यास बेमुदत संपाचा इशारा वितरकांनी घेतला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालकमंत्र्यांच्या घरासमोर दिवाळीत शिमगा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'बांधकाम कामगारांसाठी पूर्वीपासून कार्यरत असलेल्या मात्र आता बंद केलेल्या वैद्यकीय विमा योजनेचा अध्यादेश ५ नोव्हेंबरपर्यंत न काढल्यास ऐन दिवाळीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या घरासमोर शिमगा आंदोलन करू', असा इशारा लाल बावटा बांधकाम व्यवसाय कामगार संघटनेने सोमवारी दिला. कामगार आयुक्त कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चानंतर झालेल्या सभेत राज्याध्यक्ष डॉ. डी. एल. कराड बोलत होते.

सोमवारी सकाळी दसरा चौक येथून वैद्यकीय विमा योजनेसह विविध मागण्यांसाठी मोर्चाला सुरुवात झाली. आईसाहेब महाराज पुतळा, फोर्ड कॉर्नर, व्हिनस कॉर्नर, शाहूपुरीमार्गे मोर्चा कामगार आयुक्त कार्यालयावर आला. केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांविरोधात घोषणाबाजी करत लक्षवेधी फलक घेऊन मोर्चात कामगार सहभागी झाले होते. मोर्चाचे रुपांतर सभेत झाल्यानंतर जिल्हा सेक्रेटरी शिवाजी मगदूम यांनी मागण्यांचे निवेदन वाचून दाखवले.

राज्याध्यक्ष डॉ. कराड म्हणाले, 'कोल्हापुरातील कामगारांनी मागण्यांसाठी केलेल्या आंदोलनाने मंत्र्यांच्या मनात धडकी भरली. पण कामगार मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना लोकशाहीचे मर्मच कळलेले नाही. ते कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहेत. कामगारांच्या घामातून महामंडळाकडे नऊ हजार कोटी रुपये जमा झाले. या रक्कमेतून कामगारांना लाभ देण्याऐवजी त्यांच्यासाठी असलेल्या लाभाच्या योजना भाजप सरकार बंद करत आहे. बंद केलेली वैद्यकीय विमा योजना पंधरा दिवसांत सुरू करण्याचे आश्वासन दिले गेले. पण चार वर्षांनंतरही योजना सुरू केलेली नाही. खोटी आश्वासने देऊन आणि घोषणाबाजी करून सरकार सर्वसामान्यांची फसवणूक करत आहे. कामगारांना लाभ देण्यासाठी सरकारकडे पैसे नसतील, तर दिवाळखोरी जाहीर करा.'

ते पुढे म्हणाले, 'सरकारला कामगारांबद्दल आस्था नसल्याने कामगार कार्यालयात कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जात नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी, कामगार, व्यापारी अशा सर्व घटकांचे वाटोळे केले आहे. अशा पंतप्रधानांना कामगार घरी बसवल्याशिवाय राहणार नाहीत. कामगारांच्या मागण्यांसाठी जानेवारी महिन्यात दोन दिवस देशव्यापी आंदोलन केले जाईल.'

यावेळी विविध संघटनांनी बांधकाम कामगारांना पाठिंबा दिला. त्यानंतर शिष्टमंडळाच्यावतीने सहायक कामगार आयुक्त अनिल गुरव यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. मोर्चात जिल्हाध्यक्ष भरमा कांबळे, प्रकाश कुंभार, भगवानराव घोरपडे, संदीप सुतार, शिवाजी मोरे, आनंदा कराडे, विजय कांबळे, दत्ता गायकवाड, मोहन गिरी, कुमार कागले, रमेश निर्मळे, परसू कांबळे, नवनाथ चौगुले यांच्यासह हजारो बांधकाम कामगार सहभागी झाले .

.........

प्रमुख मागण्या

- वैद्यकीय विमा त्वरीत सुरू करा

- घरांसाठी दहा लाखांचे अनुदान द्या

- ६० वर्षावरील कामगारांना पेन्शन द्या

- महामंडळासाठी स्वतंत्र कर्मचारी नेमा

- दिवाळीला दहा हजार रुपये बोनस द्या

.................

(मूळ कॉपी)

पालकमंत्र्यांच्या घरासमोर दिवाळीत शिमगा

लाल बावटा कामगार संघटनेचा इशारा : कामगार आयुक्तांना मागण्यांचे निवेदन

फोटो आहे

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बांधकाम कामगारांसाठी बंद केलेल्या वैद्यकीय विमा योजनेचा पाच नोव्हेंबरपर्यंत अध्यादेश न काढल्यास ऐन दिवाळीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या घरासमोर शिमगा आंदोलन करण्याचा इशारा लाल बावटा बांधकाम व्यवसाय कामगार संघटनेच्यावतीने सोमवारी दिला. कामगार आयुक्त कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चानंतर झालेल्या सभेत राज्याध्यक्ष डॉ. डी. एल. कराड बोलत होते.

तत्पूर्वी विविध मागण्यांसाठी दसरा चौक येथून मोर्चाला सुरुवात झाली. दसरा चौक, आईसाहेब महाराज पुतळा, फोर्ड कॉर्नर, व्हिनस कॉर्नर, शाहूपुरी मार्गे मोर्चा कामगार आयुक्त कार्यालयावर दाखल झाला. केंद्र व राज्य सरकारच्या धोरणाविरोधात घोषणाबाजी आणि लक्षवेधी फलक घवून कामगार मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चाचे रुपांतर सभेत झाल्यानंतर जिल्हा सेक्रेटरी शिवाजी मगदूम यांनी मागण्यांचे निवेदन वाचून दाखवले.

यावेळी बोलताना राज्याध्यक्ष डॉ. कराड म्हणाले, 'कोल्हापूरातील कामगारांनी मागण्यांसाठी केलेल्या आंदोलनातून मंत्र्यामध्ये धडकी भरवली. पण कामगार मंत्री संभाजीराव पाटील व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना लोकशाहीचे मर्मच कळले नसल्याने ते कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहेत. कामगारांच्या घामातून महामंडळाकडे नऊ हजार कोटी जमा झाले. या रकमेतून कामगारांना लाभ देण्याऐवजी त्यांच्यासाठी असलेल्या लाभाच्या योजना भाजप सरकार बंद करत आहे. बंद केलेली वैद्यकीय विमा योजना पंधरा दिवसात सुरू करण्याचे आश्वासन दिले, पण चार वर्षानंतरही योजना सुरू केलेली नाही. खोटी आश्वासने आणि घोषणाबाजी करुन सरकार सर्वसामान्यांची फसवणूक करत आहे. कामगारांना लाभ देण्यासाठी सरकारकडे पैसे नसतील, तर दिवाळखोरी जाहीर करा असे, आवाहनही डॉ. कराड यांनी केले.'

'सरकारला कामगारांबद्दल आस्था नसल्याने कामगार कार्यालयात कर्मचाऱ्यांची नियुक्ती कली जात नाही. शेतकरी, कामगार, व्यापारी अशा सर्व घटकांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाटोळे केले आहे. अशा पंतप्रधानांना कामगार घरी बसवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा देत कामगारांच्या मागण्यांसाठी जानेवारी महिन्यात दोन दिवस संपूर्ण देश ठप्प ठेवणार असल्याचे डॉ. कराड यांनी सांगितले.' यावेळी विविध संघटनांनी बांधकाम कामगारांना पाठिंबा दिला. त्यानंतर मागण्यांचे निवेदन शिष्टमंडळाच्यावतीने सहायक कामगार आयुक्त अनिल गुरव यांना दिले.

मोर्चात जिल्हाध्यक्ष भरमा कांबळे, प्रकाश कुंभार, भगवानराव घोरपडे, संदीप सुतार, शिवाजी मोरे, आनंदा कराडे, विजय कांबळे, दत्ता गायकवाड, मोहन गिरी, कुमार कागले, रमेश निर्मळे, परसू कांबळे, नवनाथ चौगुले यांच्यासह हजारो बांधकाम कामगार सहभागी झाले होते.

.......................................

चौकट

कामगारांच्या प्रमुख मागण्या

वैद्यकी विमा त्वरीत सुरु करा

६० वर्षावरील कामगारांना पेन्शन द्या

महामंडळासाठी स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नेमणूक करा

दहा हजार दिवाळी बोनस द्या

घरांसाठी दहा लाखांचे अनुदान द्या

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


श्रेयवादामुळे कार्यक्रमच रद्द

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना पहिला हप्ता देण्यासाठी महापालिकेने मंगळवारी (ता. २३) धनादेश वितरण कार्यक्रमाचे आयोजन केले. मात्र निमंत्रण पत्रिकेत पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार अमल महाडिक यांचे नाव नसल्याने आणि त्यांना निमंत्रित केले नसल्याने काही नगरसेवकांनी आक्षेप घेतला. नगरसेवकांच्या आक्षेपानंतर प्रशासनाने धनादेश वितरणाचा कार्यक्रमच स्थगित केला. सत्तारुढ नेत्यांची नावे नसताना केवळ विरोधी आघाडीच्या श्रेयवादामुळे कार्यक्रमाला दिलेल्या स्थगितीची चर्चा महापालिकेच्या चौकात सायंकाळी रंगली.

पंतप्रधान आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील वैयक्तिक स्वरुपाच्या घर बांधणीसाठी केंद्र व राज्य सरकारची मंजुरी मिळाली आहे. २५२ लाभार्थ्यांना घर बांधणीसाठी केंद्र सरकारचे एक कोटी व राज्य सरकारचे दीड कोटी असे एकूण अडीच कोटी अनुदान मिळणार आहे. २५२ पैकी ६० लाभार्थ्यांना महापालिकेने बांधकाम परवाना दिला आहे. त्यासाठी राज्य सरकारचा प्रति लाभार्थी ४० हजारांचा पहिला हप्ता महापालिकेकडे आला आहे. ऑक्टोबर २०१७ रोजी ६० लाभार्थ्यांपैकी ३७ लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर पहिल्या हप्त्यातील रक्कम जमा करण्यात आली आहे.

उर्वरीत २३ लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचा धनादेश देण्यासाठी महापौर शोभा बोंद्रे यांच्या उपस्थितीत मंगळवारी (ता. २३) सकाळी ११.३० वाजता कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे नियोजन प्रशासनाने केल्याने निमंत्रण पत्रिकेवर महापालिकेतील सर्व गटनेत्यांसह विरोधी पक्षनेत्यांचा नावाचा समावेश केला आहे. मात्र सर्व गटनेत्यांना सोमवारी सायंकाळी सहा वाजता निमंत्रणपत्रिका मिळाली. पत्रिका वेळेत न मिळाल्याने अनेक नगरसेवकांनी प्रशासनाकडे नाराजी व्यक्त केली. सरकारची महत्वकांक्षी योजना असताना पालकमंत्री आणि विद्यमान सरकारमधील आमदार अमल महाडिक यांचा निमंत्रणपत्रिकेत समावेश का केला नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

परिणामी, प्रशासनाने धनादेश वितरणाचा कार्यक्रमच स्थगित करण्याचा निर्णय घेतला. कार्यक्रम स्थगित न करता सरकारी शिष्टाचाराप्रमाणे पालकमंत्री, आमदार, खासदारांना कार्यक्रमाला निमंत्रीत करण्याची मागणी काही नगरसेवकांनी प्रशासनाकडे केली. नगरसेवकांच्या या भूमिकेमुळे महापालिकेतील श्रेयवादाचे राजकारण पुन्हा एकदा चर्चेला आले आहे. मात्र, श्रेयवादात लाभार्थ्यांना अनुदानाची रक्कम मिळण्यासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.

कोट

मंगळवारी कार्यक्रम असताना निमंत्रणपत्रिका सोमवारी सायंकाळी सहा वाजता देण्यात आली. सरकारची योजना असताना पालकमंत्री किंवा आमदारांना निमंत्रीत केलेले नाही. प्रशासनाची ही पद्धत चुकीची आहे. सरकारी शिष्टाचारानुसार पालकमंत्री, खासदार, आमदारांना कार्यक्रमाला निमंत्रण देणे गरजेचे आहे.

- विलास वास्कर, विरोधी पक्षनेते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भारत हमारा एक है, टुकडे ना करो

$
0
0

शिवाजी विद्यापीठात 'जश्न ए कव्वाली'ची अनुभूती

फोटो आहेत...

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'पंजाब से आसाम तक, कश्मीरसे मद्रास तक, यह सारा घर हमारा है, इस घर के टुकडे ना करो, भारत हमारा एक है, भारत के टुकडे ना करो',अशी राष्ट्रीय एकात्मतेची साद घालणाऱ्या, तरुणाईत देशभक्तीचे स्फुल्लिंग चेतविणाऱ्या कव्वालीने शिवाजी विद्यापीठातील माहोल भारावला. दिवसभरात विविध राज्यांतील पाच विद्यापीठांच्या विद्यार्थी कलाकारांनी एकापेक्षा एक परफॉर्मन्स केल्यामुळे कॅम्पसमध्ये 'जश्न ए कव्वाली'ची अनुभूती आली.

भारतीय विद्यापीठ महासंघ आणि शिवाजी विद्यापीठातर्फे दोन दिवसीय तिसऱ्या राष्ट्रीय आंतरविद्यापीठ कव्वाली स्पर्धेला सोमवारी दिमाखात सुरुवात झाली. स्पर्धेच्या माध्यमातून कव्वाली संघांनी ज्या त्या प्रांतातील वेशभूषा सादर करत आणि राष्ट्रीय एकतेची साद घालत कव्वाली संघांनी सामाजिक सौहार्दाचे दर्शन घडविले. तसेच राष्ट्रीय एकात्मता आणि देशभरातील विविध प्रांतातील परंपरेचा संगमही घडला.

दरम्यान, उद्घाटन सोहळ्याची औपचारिकता झाल्यावर मध्य प्रदेशमधील सागर येथील डॉ. हरिसिंग गौर केंद्रीय विद्यापीठाच्या कव्वाली संघाने नुसरत फतेह अली खान यांची गाजलेली 'अच्छे सूरत को सवरने की जरुरत क्या है, सादगी में भी तो कयामत की अदा होती है'ही कव्वाली पहाडी रागात सादर करत उपस्थितांची मने जिंकली. यानंतर राग तोडीमध्ये 'महफिल हमारी एक है, महफिल के टुकडे ना करो'अशी साद घालत कव्वालीतून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला. राजस्थान येथील बनस्थळी विद्यापीठाच्या संघाने 'चाह ये है की कोई नेक काम हो जाए, मेरी हर साँस देश के नाम हो जाए'ही कव्वाली सादर केली. सायंकाळी शिवाजी विद्यापीठाचा संघ सादरीकरणासाठी मंचावर येताच विद्यार्थ्यांचा उत्साह शिगेला पोहचला. यजमान संघाने बहारदार सादरीकरण करत एकतेचा आणि समतेचा संदेश दिला. शास्त्रीय सुरावटींची नजाकत, तबल्याच्या ठेक्याला टाळ्यांची साथ यामुळे स्पर्धेला अनोखा साज चढला.

विद्यापीठातील वि.स.खांडेकर भाषा भवन सभागृहात भारतीय विद्यापीठ महासंघाचे सहसचिव डॉ. डेव्हीड सॅम्पसन यांच्या हस्ते आणि शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन समारंभ झाला. प्र-कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के, एआययूचे निरीक्षक डॉ. विश्वरामन निर्मल यांची उपस्थिती होती. सईद खान (नवी दिल्ली), रियाज खान (मुंबई) आणि भारती वैशंपायन (कोल्हापूर) परीक्षक आहेत. डॉ. स्वरुपा पाटील यांनी स्वागत केले. कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी प्रास्ताविक केले. विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर.व्ही.गुरव यांनी आभार मानले.

...........

कोट

'संगीत कलाप्रकारात संपूर्ण देशाला एका सुत्रात गुंफण्याची क्षमता आहे. गीत, संगीत माणसाला चिरतरुण ठेवते. कव्वाली ही तर पवित्र हृदयाने ईश्वराला घातलेली साद आहे. मात्र हा कलाप्रकार अस्तंगत होऊ लागल्याचे चित्र आहे. अशा स्थितीत कव्वालीला संजीवनी देण्यासाठी आंतर विद्यापीठ कव्वाली स्पर्धा अतिशय उपयुक्त ठरणारी आहे.

डॉ. डेव्हीड सॅम्पसन, सहसचिव, भारतीय विद्यापीठ महासंघ

....................

'रांगडा पोवाडा आणि लावणीची परंपरा लाभलेल्या कोल्हापुरात कव्वाली स्पर्धेचे आयोजन ही एकाअर्थी सांस्कृतिक बदलाची वाटचाल आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याचा आदर्श समोर ठेवून ही स्पर्धा घेतली आहे. गेल्यावर्षी शिवाजी विद्यापीठाच्या कव्वाली संघाने राष्ट्रीय स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. त्या विद्यार्थ्यांच्या यशामुळे विद्यापीठात राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा भरविण्यासाठी पुढाकार घेतला. माणसातील स्वत्वाचा शोध घेऊन माणुसकीला प्रेरित करणारी 'ऐ माटी के पुतले तुझे कितना गुमान है' ही कव्वाली खूपच आवडली.

डॉ. देवानंद शिंदे, कुलगुरू शिवाजी विद्यापीठ

............

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केडीसीसीच्या १०० कर्मचाऱ्यांना कायम करण्याचे हायकोर्टाचे आदेश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १०० रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाच्या न्यायाधीश साधना जाधव यांनी दिला. एक नोव्हेंबर २०१८पासून कामगारांना कायम करण्याची प्रक्रिया राबवण्याचे आदेशही त्यांनी निकालपत्रात दिले आहेत. अॅड. अभय नेवगी यांनी ही माहिती दिली.

जिल्हा बँकेतील ११० कर्मचाऱ्यांना कायम करावे यासाठी २००९ मध्ये ज्येष्ठ कामगार नेते, दिवंगत कॉ. गोविंद पानसरे यांनी कामगार न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने कामगारांना कायम करण्याचे आदेश दिले होते. कामगार न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात जिल्हा बँकेने हायकोर्टात धाव घेतली. तेथेही या प्रकरणाचा पाठपुरावा पानसरे हे करीत होते. त्यांच्या हत्येनंतर कॉम्रेड दिलीप पवार यांनी कोर्टात या खटल्याचा पाठपुरावा केला. अॅड. अभय नेवगी यांनी कामगारांच्यावतीने मोफत खटला चालवला.

सोमवारी मुंबई हायकोर्टाच्या न्यायाधीश जाधव यांनी सर्व कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा आदेश दिला. या संदर्भात अॅड. नेवगी यांनी माहिती दिली. ते म्हणाले, '२००९पासून या खटल्याची सुनावणी कामगार न्यायालय व मुंबई हायकोर्टात सुरू आहे. आज हायकोर्टाने सर्व कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा आदेश दिला. सध्या ११० कर्मचाऱ्यापैकी नऊ ते दहा कर्मचारी निवृत्त झाले आहेत. त्यामुळे १०० कर्मचाऱ्यांना कोर्टाच्या निर्णयाचा फायदा होईल. एक नोव्हेंबर २०१८पासून रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांना कायम कर्मचारी म्हणून मान्यता देण्याचे आदेश दिले आहेत. या कर्मचाऱ्यांना कायदा व नियमाप्रमाणे पूर्ण वेतन मिळणार आहे. मात्र या कर्मचाऱ्यांना मागील काळातील कसलाही फरक मिळणार नाही.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकरी संघाची ३० ऑक्टोबरला अध्यक्षनिवड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शेतकरी सहकारी संघाच्या अध्यक्ष निवडीसाठी ३० ऑक्टोबरला दुपारी साडेबारा वाजता संघाच्या भवानी मंडपातील मुख्य कार्यालयात सभा होणार आहे. शहर निबंधक प्रदीप बरगे यांची यासाठी प्राधिकृत अधिकारी म्हणून निवड झाली आहे. अध्यक्षपदासाठी बाबासाहेब पाटील-भुयेकर, अमरसिंह माने, जी. डी. पाटील, राजू पाटील हे इच्छुक आहेत.

भू-विकास बँकेच्या थकबाकीपोटी युवराज पाटील यांचे संचालक आणि अध्यक्षपद रद्द झाल्यानंतर रिक्त अध्यक्षपदासाठी निवड प्रक्रिया राबवली जाणार आहे. निवड प्रक्रियेत अपात्र संचालकांना सहभागी होता येणार नाही. सोमवारी संघाच्या व्यवस्थापकांनी निवडणूक अधिकारी बरगे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर ३० ऑक्टोबरला निवडीचा निर्णय झाला. माजी अध्यक्ष पाटील अपात्र ठरल्यानंतर गेले दीड महिने प्रभारी अध्यक्षपद विद्यमान उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांच्याकडे आहे. सत्ताधारी आघाडीकडे बहुमत असून उपाध्यक्ष पाटील यांच्यासह अमरसिंह माने, जी. डी. पाटील, राजू पाटील अध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत. सत्ताधाऱ्यांच्या कारभाराविरोधात संचालक व माजी महापौर शिवाजीराव कदम, शोभना शिंदे, विजयादेवी राणे, मानसिंगराव जाधव हे नाराज आहेत. नाराज संचालकांकडूनही अध्यक्षपदासाठी चाचपणी सुरु आहे. इच्छुक सत्ताधारी संचालकांशी विरोधी गटाकडून संपर्क साधला जात आहे. आमदार हसन मुश्रीफ, माजी आमदार पी. एन. पाटील आणि विनय कोरे यांच्या सहमतीने अध्यक्ष निश्चित होईल. लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघावर आपल्या गटाची सत्ता असावी यासाठी नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत.

००

(मूळ कॉपी)

शेतकरी संघ अध्यक्षपद निवड ३० ऑक्टोबरला

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शेतकरी सहकारी संघ अध्यक्षपद निवडीसाठी ३० ऑक्टोबरला दुपारी साडेबारा वाजता संघाच्या भवानी मंडपातील मुख्य कार्यालयात सभा होणार आहे. शहर निबंधक प्रदीप बरगे यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून निवड झाली आहे. अध्यक्षपदासाठी बाबासाहेब पाटील भुयेकर, अमरसिंह माने, जी. डी. पाटील, राजू पाटील हे इच्छुक आहेत.

भूविकास बँकेच्या थकबाकीपोटी युवराज पाटील यांचे संचालक आणि अध्यक्षपद रद्द झाल्यानंतर रिक्त झालेल्या अध्यक्षपदासाठी निवड प्रक्रिया राबवली जाणार आहे. निवड प्रक्रियेत अपात्र संचालकांना निवड प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही. सोमवारी संघाच्या व्यवस्थापकांनी निवडणूक अधिकारी बरगे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर ३० ऑक्टोबर ही तारीख निश्चित केली.

माजी अध्यक्ष पाटील यांचे संचालकपद अपात्र ठरल्यानंतर गेले दीड महिने प्रभारी अध्यक्ष म्हणून विद्यमान उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील भुयेकर पहात आहेत. विद्यमान सत्ताधारी आघाडीकडे बहूमत असून उपाध्यक्ष भुयेकर पाटील यांच्यासह अमरसिंह माने, जी. डी. पाटील, राजू पाटील अध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत. सध्याच्या सत्ताधारी संचालकांच्या कारभाराविरोधात संचालक माजी महापौर शिवाजीराव कदम, शोभना शिंदे, विजयादेवी राणे, मानसिंगराव जाधव हे नाराज आहेत. या नाराज संचालकांकडून अध्यक्षपदासाठी चाचपणी सुरु आहे. अध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या सत्ताधारी संचालकांशी विरोधी गटाकडून संपर्क साधला जात आहे. सध्या आमदार हसन मुश्रीफ, माजी आमदार पी.एन. पाटील आणि विनय कोरे यांच्या सहमतीने अध्यक्षपदासाठी सत्ताधाऱ्यांकडून नाव निश्चित केले जाणार आहे. लोकसभा व विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी संघावर आपल्या गटाची सत्ता असावी यासाठी नेते मंडळीकडून प्रयत्न केले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थकबाकीपोटी तीन टॉवर सील

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत असलेल्या घरफाळ्याची थकबाकी मोठ्या प्रमाणात आहे. वारंवार सूचना देऊनही थकबाकी भरली जात नसल्याने, अशा थकबाकीदारांना सोमवारी महापालिकेने चांगलाच झटका दिला. शहरातील तीन टॉवर, एक दुकान सील केले. थकबाकीपोटी इंडस कंपनीकडून तब्बल ३९ लाख रुपये वसूल केले.

महापालिकेच्या घरफाळा थकबाकीदारांची दिवसेंदिवस संख्या वाढत आहे. थकबाकीदारांना वारंवार नोटिसा बजावल्या जात आहेत. काही ठिकाणी जप्तीची कारवाईही केली जात आहे. नोटीस देऊनही घरफाळा भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या मिळकतदारांवर कारवाईचे आदेश आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी दिले. त्यानुसार उपाआयुक्त मंगेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली चारही विभागीय कार्यालयांनी वसुली मोहीम राबवली. गांधी मैदान विभागीय कार्यालयाने तीन लाख आठ हजार थकबाकीपोटी साकोली कॉर्नर येथील वायोम टॉवर सील केला. राजारामपुरी पाचवी गल्लीत सव्वादहा लाखांच्या वसुलीपोटी रिलायन्स मोबाइल टॉवर, तीन लाख ४२ हजारांच्या थकबाकीसाठी कसबा बावडा येथील टॉवर आणि दोन लाख १२ हजारांच्या थकबाकीप्रकरणी गोल्ड म्युझियम दुकान पथकाने सील केले. इंडस कंपनीकडून विविध कंपन्यांच्या टॉवरची ३९ लाखाची थकीत रक्कम वसूल केली. कारवाईत करनिर्धारक व संग्राहक दिवाकर कारंडे यांच्यासह कर्मचारी सहभागी होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images