Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

पाच वर्षांपूर्वी अत्याचार,अहवाल गेल्या महिन्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरातील एका हायस्कूलमध्ये पाच वर्षांपूर्वी एका विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली. त्याच्या चौकशीचा आदेश जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या प्रशासनाने सहा महिन्यांपूर्वी काढला. त्या प्रकरणात संबंधीत संशयिताला क्लीनचीट देणारा अहवाल गेल्या महिन्यात आला. यावरून माध्यमिक शिक्षण प्रशासनाचा कारभार किती गलथानपणाचा आणि दफ्तर दिरंगाईने भरलेला आहे हे समोर आले. या प्रकणाची वस्तूनिष्ठ, पारदर्शक, नि:पक्षपाती चौकशी झालेली नसल्याची तक्रार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) सतीश माळगे यांनी नव्यानेच स्थापन झालेल्या चौकशी समितीकडे केली आहे.

मार्च २०१३ मध्ये 'त्या' हायस्कूलमधील शिपायाने नववीत शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार केले होते. त्या मुलीचे आई, वडील गरीब असल्याने रितसर तक्रार झाली नाही. त्यानंतर संस्थाचालकांनी शिपायाला हायस्कूलच्या पन्हाळा तालुक्यातील शाखेत बदली करून या प्रकरणावर पडदा टाकला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने या प्रकरणाच्या चौकशीची मागणी माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे केली. मात्र चौकशी करण्यास टाळाटाळ होत राहिली. आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर पाच वर्षानंतर जून २०१८मध्ये प्रभारी उपशिक्षणाधिकारी ए. एम. आकुर्डेकर, व्ही. एस. ओतारी, बी. टी. टोणपे यांची त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली. समितीला आठ दिवसांत अहवाल देण्याचा आदेश तत्कालीन शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी दिला होता. मात्र, समितीने अहवालच दिला नाही. हे प्रकरण दाबून ठेवले.

दरम्यान, महिन्यापूर्वी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत तत्कालीन शिक्षणाधिकारी लोहार यांच्या कामकाजावर गंभीर आरोप झाले. त्यानंतर अहवाल देण्यास दिरंगाई केल्याने समितीमधील आकुर्डेकर, ओतारी, टोणपे यांना शिक्षणाधिकारी लोहार यांनी १४ सप्टेंबर २०१८ मध्ये कारणे दाखवा नोटीस काढली. नोटीस काढलेल्या दुसऱ्या दिवशी तिघांनीही चौकशी अहवाल दिला. त्यामध्ये जबाबदारी झटकत पोलिसांकडे बोट दाखवले. त्यामुळे या प्रकरणाबरोबरच चौकशी समितीचीदेखील चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

कोट

विद्यार्थिनी अत्याचार प्रकरणाची पारदर्शक चौकशी झालेली नाही. क्लीनचीट देणारा अहवाल देण्याचा आला. अहवाल देण्यासही प्रचंड विलंब झाला. 'माध्यमिक'मधील अधिकाऱ्यांनी दोषी व्यक्तींना वाचविल्याचे अहवालातून स्पष्ट झाले. त्यामुळे चौकशी समितीकडे तक्रार केली आहे.

- सतीश माळगे, तक्रारदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तर मुस्लिम समाज रस्त्यावर येईल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सर्व शिक्षण अभियानांतर्गंत अभ्यासक्रमातील पाठ्यपुस्तकात हजरत मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजूकर आणि काल्पनिक चित्र प्रकाशित केले आहे. परिणामी मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. हे पुस्तक त्वरित रद्द करावे. सरकारने जाहीर माफी मागावी. अन्यथा, मुस्लिम समाज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल, असा इशारा दी मोहामेडन एज्युकेशन सोसायटीने शुक्रवारी निवेदन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना दिला.

निवेदन देण्यासाठी मुस्लिम समाजातील प्रमुख नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने आले होते. तेथे बोलताना गणी आजरेकर म्हणाले, 'समाजातील कोणत्याही व्यक्तीशी चर्चा न करता, मोहम्मद पैगंबर यांचे काल्पनिक चित्र आणि आक्षेपार्ह मजकूर 'आदर्श गोष्टी' या पुस्तकात प्रकाशित केले आहे. यापूर्वी छत्रपती संभाजीराजे, संत तुकाराम यांच्या पत्नीविषयीही बदनामीकारक मजकूर या पाठ्यपुस्तकात छापण्यात आला आहे. अशा प्रकारे सरकार विविध समाजाच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न करीत आहे. पैगंबर यांच्यासंबंधीच्या मजकुरामुळे मुस्लिम धर्मियांच्या भावना तीव्र झाल्या आहेत. त्यामुळे ते पुस्तक तातडीने मागे घ्यावे.'

यावेळी माजी नगरसेवक आदील फरास, कादर मलबारी, मौलाना मन्सूर कासमी, इरफान कासमी, जाफर सय्यद, नियाज खान, डॉ. जुबेर बागवान, डॉ. आदील शेख, जमीर मुल्ला आदी उपस्थित होते.

समितीचेही निवेदन

'सरकारने प्रकाशित केलेल्या पाठ्यपुस्तकात मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर छापण्यात आला आहे. यामुळे समाजात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. काहीजण त्याचा राजकीय फायदा उठवण्याचा प्रयत्नही करीत आहेत. या पार्श्वभूमीवर कायदा, सुव्यवस्था बिघडू नये याची खबरदारी घ्यावी, अशी मागणी पुरूष हक्क संरक्षण समितीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. समितीचे अध्यक्ष आप्पासाहेब कोकितकर, मुश्ताक मुल्ला, राजू शेख आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अन्यथा तीव्र आंदोलन करू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश ३० ऑक्टोबरपर्यंत पदभार स्वीकारणार आहेत. पदभार स्वीकारल्यानंतर कोल्हापूरला स्वतंत्र खंडपीठ स्थापण्याबाबतचे शिफारसपत्र आणि शंभर कोटींचा निधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देतील, असे आश्वासन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी झालेल्या बैठकीत दिले आहे. पालकमंत्र्यांनी आश्वासन न पाळल्यास तीव्र आंदोलन करू. त्यानंतर निर्माण होणाऱ्या कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नाला सरकार जबाबदार राहील,' असा इशारा महापौर शोभा बोंद्रे यांनी दिला.

महापालिकेच्या स्थायी सभागृहात सर्वपक्षीय कृती समिती आणि खंडपीठ कृती समितीच्या बैठकीत महापौर बोंद्रे बोलत होत्या. यावेळी कोल्हापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. प्रशांत चिटणीस प्रमुख उपस्थित होते.

महापौर बोंद्रे म्हणाल्या, 'कोल्हापुरात खंडपीठ होण्यासाठी गेल्या ३० वर्षांपासून विविध पातळ्यांवर आंदोलन सुरू आहे. मात्र, सरकार केवळ पोकळ आश्वासने देत आहे. खंडपीठाचा प्रश्न प्रलंबित असल्याने सहा जिल्ह्यांतील पक्षकारांचे आर्थिक नुकसान होत आहे. आर्थिक नुकसानीची दखल घेऊन खंडपीठाचा प्रश्न त्वरित निकाली काढावा. खंडपीठासंदर्भात पालकमंत्र्यांनी आश्वासन दिले आहे. त्याची पूर्तता न झाल्यास तीव्र आंदोलन करू. आंदोलनानंतर निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेला सरकार जबाबदार राहील.'

निमंत्रक आर. के. पोवार म्हणाले, 'खंडपीठ प्रश्नासाठी पालकमंत्री पाटील यांच्यासोबत घाईगडबडीत बैठक झाली. परिणामी योग्य निर्णय झाला नाही. खंडपीठासाठी २४ एकर जमीन देण्याचे जाहीर केले आहे. तसेच न्यायाधीशांच्या निवासस्थानासाठी राजाराम तलावाशेजारील आठ एकर जागा देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. विभागीय आयुक्तांनी जागेचा प्रस्ताव भूसंपादन विभागाकडे पाठविला आहे. मुख्य न्यायाधीशांनी पदभार स्वीकारल्यानंतर दोन दिवसांत खंडपीठाबाबत शिफारसपत्र न दिल्यास प्रसंगी कोल्हापूर बंदचा करू. निवडणूक आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी सरकारकडून पत्र मिळावे.'

अॅड. प्रशांत चिटणीस म्हणाले, 'कृती समितीच्या वतीने आंदोलनाच्या माध्यमातून सातत्याने खंडपीठाची मागणी लावून धरली जात आहे. असोसिएशनचा कृती समितीवर विश्वास आहे. नरेश पाटील मुख्य न्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. पाटील महाराष्ट्रातील असल्याने नक्की न्याय मिळेल. मात्र, शिफारसपत्र देण्यास दिरंगाई झाल्यास सहा जिल्ह्यांत एकाचवेळी आंदोलन करण्यासाठी वकील व पक्षकारांशी संपर्क साधण्यासाठी वेळ द्यावी.'

बैठकीत किशोर घाटगे, प्रसाद जाधव, सतीशचंद्र कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी अॅड. प्रकाश मोरे, अॅड. महादेवराव आडगुळे, वसंतराव मुळीक, बाबा पार्टे, अशोक पवार, चंद्रकांत यादव, शिवाजीराव जाधव, बाबूराव कदम, रमेश मोरे, स्वप्निल पार्टे, वैशाली महाडिक, रूपाली पाटील, जहिदा मुजावर, दीपा पाटील यांच्यासह खंडपीठ कृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते. अॅड. विवेक घाटगे यांनी आभार मानले.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अखेर गायब फायलींचा मेळ लागला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

नगररचना विभागामार्फत (टीपी) देण्यात येणाऱ्या बांधकाम परवान्याच्या तब्बल २७० फायली गायब झाल्याचे बुधवारी विशेष पथकाने केलेल्या तपासणीमध्ये स्पष्ट झाले होते. या सर्व फायली कनिष्ठ अभियंता, विधी व आयुक्तांकडे पाठवल्याचे शुक्रवारी पथकाच्या निदर्शनास आले. त्यामुळे टीपी विभागातील गायब फायलींचा ताळमेळ लागला असून याबाबतचा अहवाल आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांना दोन दिवसांत सादर होणार आहे.

आयुक्त डॉ. चौधरी यांच्याकडे टीपी कार्यालयाच्या कार्यपद्धतीबाबत तक्रारींचा ओघ वाढल्यानंतर त्यांनी कामगार अधिकारी सुधाकर चल्लावाड व कनिष्ठ लिपिक विष्णू कराड यांना तपासणीचे आदेश दिले होते. दोन सदस्यीय पथकाने बुधवारी रात्री उशीरापर्यंत आवक-जावक नोंदणी रजिस्टरची तपासणी केली. तपासणीमध्ये कार्यालयात एकूण ४९७ फायलींची नोंद असल्याचे स्पष्ट झाले. मात्र, यापैकी २७० फायली तेथे नसल्याचे निदर्शनास आले. या सर्व फायली रात्री जमा करण्यात आल्याचा आरोप नगरसेवक भूपाल शेटे यांनी केला होता.

त्यानंतर शुक्रवारी पुन्हा फायलींची तपासणी करण्यात आली. तपासणीमध्ये २७० फायली कनिष्ठ अभियंता, विधी विभाग आणि आयुक्तांकडे पाठवल्याचे निदर्शनास आले, तर ६० फायलींची नोंद आवक-जावक रजिस्टरमध्ये असल्याचे पथकाचे प्रमुख चल्लावाड यांनी सांगितले. परिणामी टीपी कार्यालयातील गायब फायलींवर पडदा पडला. तपासणी पथक आपला अहवाल दोन दिवसांत आयुक्तांकडे सादर करणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अमृत योजनेला मुहूर्त कधी?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अमृत योजनेतील निधी मिळाला असताना अद्याप कामाला सुरुवात झालेली नाही. योजनेतील पाण्याच्या पाइपलाइनच्या कामाला मुहूर्त कधी मिळणार? असा प्रश्न स्थायी समितीच्या सभेत सदस्यांनी उपस्थित केला. यावेळी जुने कनेक्शन जोडताना त्याचा ग्राहकांवर बोजा टाकण्यात ये‌ऊ नये, अशी मागणीही करण्यात आला. याबाबत पाणी कनेक्शन शिफ्टिंगचा बोजार ग्राहकांवर पडणार नाही असे स्पष्ट करत प्रशासनाने येत्या दोन दिवसांत नव्या वेळापत्रकाप्रमाणे शहराला पाणीपुरवठा करण्यात येईल असे सांगितले.

अमृत योजनेतून निधी मिळूनही अद्याप कामाला सुरुवात झाली नसल्याबद्दल सभापती आशिष ढवळे आणि अफजल पिरजादे यांनी विचारणा केली. 'योजनेतील कामाला सुरुवात झाल्यानंतर उच्च दर्जाच्या पाइपलाइन वापराव्या. जुने कनेक्शन शिफ्ट करताना शुल्क आकारणी करणार का?' अशी विचारणा त्यांनी केली. याबाबत, योजनेच्या कामाबाबत आयुक्तांनी बुधवारी बैठक घेतली आहे. जेथे पाण्याचा अपुरा पाणीपुरवठा होत आहे, तेथे योजनेचे काम सुरू करण्याच्या सूचना ठेकेदारांना दिल्या आहेत. महिनाअखेर कंपनी टाक्यांचे डिझाइन सादर करणार आहे. कनेक्शन शिफ्ट करताना त्याचा बोजा ग्राहकांवर पडणार नाही' असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

'कचरा उठाव करणाऱ्या वाहनांवर खासगी ठेकेदारांमार्फत चालक पुरविण्यात येणार आहेत. अशा चालकांना कचरा डंपर चालवण्याचा अनुभव आहे का? अनुभव पाहून चालक नेमावेत. वाहने सुस्थितीत ठेवावी. त्यांची वारंवार दुरुस्ती होऊ नये' अशी सूचना प्रतीक्षा पाटील यांनी केली. याबाबत अवजड वाहन परवाना पाहून आणि वर्कशॉपमध्ये परीक्षा घेऊन वाहनचालकांची निवड केल्याचे प्रशासनाने सांगितले.

'उत्सवाच्या काळात धोकादायक इमारतींचा प्रश्न चर्चेला येतो. मात्र फक्त उत्सवांदरम्यान नोटिसा काढून थांबू नका' अशी सूचना पिरजादे यांनी केली.' तर 'धोकायदाय इमारती रिकाम्या करून देण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. त्याबाबत पोलिसांना पत्र दिले आहे. इमारती रिकाम्या केल्यानंतर महापालिका कारवाई करेल,' असे प्रशासनाने सांगितले.

राहुल माने म्हणाले, 'जेकेसी कंपनीने बालिंगा ते फुलेवाडी मेनरोडवर खोदाइ करून पाइपलाइन टाकली आहे. दहा दिवसानंतरही रस्ता दुरुस्त केला नसल्याने नागरिक व पर्यटकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यावर उपाय योजावेत.' यासंदर्भात 'कंपनीने सहा दिवसांपूर्वी काम पूर्ण केले आहे. त्वरीत रस्ता दुरुस्तीच्या सूचना दिल्या आहेत. नवीन वेळापत्रकांप्रमाणे दोन दिवसांत पाणी पुरवठा होईल' असे प्रशासनाने सांगितले.

बैठकीत टर्नटेबल लॅडर गाडी, इ-गव्हर्नन्स टेंडर, शिवाजी मार्केट येथील लिफ्ट आदी विषयांवर चर्चा झाली.

मांजा विक्रेत्यांवर कारवाई

पतंगासाठी वापरण्यात आलेल्या चिनी मांजामुळे शहरात अपघात होत आहेत. मांजामुऐ अपघात झाल्यास दुकानदारांवर फौजदारी गुन्हा दाखल करून मांजा विक्री करणारी दुकाने सील करा अशी मागणी संजय मोहिते यांनी केली.याबाबत शिवाजी मार्केट येथील दुकानांची तपासणी केली आहे. विक्रेत्यांना नोटिसा दिल्या आहेत. पुन्हा दुकानांची तपासणी करू असे प्रशासनाने सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिंदू चौक सबजेल येथे पाण्यासाठी रास्ता रोको

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अपुऱ्या आणि अनियमित पाणीपुरवठ्यामुळे वैतागलेल्या बिंदू चौक सबजेल परिसरातील नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले. परिणामी या मार्गावरील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली. सोमवारपासून नवीन वेळापत्रकाप्रमाणे पाणीपुरवठा केला जाणार आहे असे आश्वासन पाणीपुरवठा विभागाचे उपजल अभियंता व्यंकटेश सरवसे यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

बिंदू चौक परिसरात पाणीपुरवठ्याचा प्रश्न नेहमीच निर्माण होत आहे. परिणामी नागरिकांना नेहमीच पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. पाणी पुरवठ्याबाबत नागरिकांनी प्रभागाच्या नगरसेविका हसीना फरास व माजी नगरसेवक आदिल फरास यांच्यासह पाणीपुरवठा विभागाकडे तक्रारी केल्या. पण तक्रारींचे निरसन होत नसल्याने शुक्रवारी नागरिकांनी अचानक रास्ता रोको आंदोलन केले. घागरी, बादल्या घेऊन महिला रस्त्यावर येऊन उभ्या राहिली. अचानक झालेल्या आंदोलनामुळे सबजेल ते भवानी मंडप आणि भवानी मंडप ते शिवाजी चौकापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाल्याची माहिती मिळताच शहर वाहतूक पोलिसांनी अन्य मार्गाने वाहतूक वळवली.

आंदोलनाची माहिती माजी नगरसेवक फरास यांना मिळताच त्यांनी पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी सरवसे यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर सरवसे आंदोलनस्थळी तातडीने दाखल झाले. संतप्त आंदोलकांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. पाणीपुरवठा विभागाने वितरणाचे नवे नियोजन केले असून सोमवारपासून पाणीपुरवठा सुरळीत होणार असल्याचे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खरेदीचे सीमोलंघन

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

साडेतीन मुहुर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्याचा मुहूर्त साधून नागरिकांनी गुरुवारी खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी केली. इलेक्ट्रॉनिक वस्तू, सोन्या चांदीचे दागिने, दुचाकी व चारचाकी वाहने, मोबाइल, लॅपटॉप आदी वस्तूंची मोठी खरेदी झाल्याने बाजारपेठेत कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली. दसऱ्याच्या मुहूर्तावर अनेकांनी फ्लॅट, घरांचेही बुकिंग केले.

दसऱ्यादिवशी सोने खरेदी करण्याकडे महिलांचा कल असतो. गुजरीसह शहरातील नामवंत सराफी पेढ्यांच्या शोरुममध्ये सोने, चांदीच्या दागिन्यांच्या खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती. एक ग्रॅमपासून ते दहा ग्रॅम सोन्यापासून तयार केलेले डिझाईनचे दागिने खरेदीकडे महिलांचा कल होता. सायंकाळनंतर सराफी दुकानांच्या शोरूममध्ये गर्दी होती.

इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी टेंबे रोड, राजारामपुरी, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, महाद्वार रोड, मंगळवार पेठ, दसरा चौक शाहू रोड या परिसरातील शोरुममध्ये गुरुवारी गर्दी झाली होती. काही उत्पादनांवर एक्स्चेंज ऑफरही दिली होती. एलईडी, फ्रीज, वॉशिंग मशिन, ओव्हन, घरगुती आटा चक्की, व्हॅक्युम क्लिनर या वस्तू खरेदीवर पैशांत सूट दिल्याने त्यालाही मागणी होती. रोख खरेदीवर घसघशीत सूट देण्यात आली होती. काही ठिकाणी लकी ड्रॉही काढण्यात आले. बँका व फायनान्स कंपन्यांनी शून्य टक्के दराने अर्थपुरवठा केला. ग्राहकांना वस्तूंची डिलिव्हरी देण्यासाठी शोरुमसमोर छोट्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दुचाकी व चारचाकी वाहनांच्या शोरुममध्येही गर्दी झाली होती. आठवडाभर आधीच बुकिंग करून ठेवलेली वाहने दुपारनंतर ग्राहकांनी घरी नेली. यंदा चारचाकी वाहनांच्या खरेदीकडे ग्राहकांचा कल होता.

००

तरुणाईचा ओढा स्मार्टफोनकडे

शहरातील सर्वच मोबाइलच्या शोरुममध्ये खरेदीसाठी तरुणाईने गर्दी केली होती. सणांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक कंपन्यांनी नवीन व्हर्जंन लाँच केले होते. अडीच हजार रुपयापासून एक लाख ४४ हजार किंमतीचे मोबाइल हँडसेट बाजारात विकले जात होते. नवीन मोबाइलमधील सुविधा, तंत्रज्ञान याची चर्चा तरुणाइमध्ये सुरू होती.

घरांचे बुकिंग

दसऱ्याच्या मुहूर्तावर फ्लॅट व बंगले खरेदीसाठी बुकिंग झाल्याने बांधकाम व्यावसायिकांतून समाधान व्यक्त केले गेले. अनेक कुटुंबांनी खरेदी केलेल्या फ्लॅट व बंगल्यात गुरुवारी गृहप्रवेश केला. बुकिंगला चांगला प्रतिसाद मिळाल्याने बांधकाम व्यावसायिकांनी नव्यया गृहबांधणी प्रकल्पांचे नारळही फोडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंदाज घेत ऊस हंगामाला सुरुवात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्य सरकारच्या निर्णयानुसार ऊस हंगामाला शनिवारी (ता.२०) सुरुवात होत आहे. पाऊस, आंदोलन आणि ऊसतोडणी कामगारांची उपलब्धता यानुसार टप्प्याटप्याने जिल्ह्यातील साखर कारखाने सुरू करण्यात येणार आहेत. दरम्यान, कसबा बावड्यातील राजाराम साखर कारखाना आणि संताजी घोरपडे साखर कारखान्याने ऊस गाळपाला सुरुवात केली आहे. अन्य साखर कारखान्यांकडून बॉयलर प्रदीपन केले असून. त्यांच्याकडूनही गाळपाला सुरुवात करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

जिल्ह्यात एकूण २२ साखर कारखाने असून एक लाख ४९ हजार २८० हेक्टरवर उसाची लागवड करण्यात आली आहे. राज्य सरकारने २० ऑक्टोबरला ऊस हंगाम सुरू करण्याची घोषणा केली असून, जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांनी बॉयलर प्रदीपन केले आहेत. उसाला एफआरपीप्रमाणे दर देणे बंधनकारक असले तरी साखरेचे दर कोसळल्याने कारखानदार एफआरपीचे तुकडे करून शेतकऱ्यांना उसाला दर देणार की, एफआरपीपेक्षा जादा दर देणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांच्या ऊस परिषदेत पहिली उचल जाहीर केली जाते. पण यंदा कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत वारणा येथे २४ ऑक्टोबरला ऊस परिषद घेऊन शेट्टींना आव्हान दिले आहे. खासदार शेट्टी यांची ऊस परिषद २७ ऑक्टोबरला जयसिंगपुरात होणार आहे. स्वाभिमानीच्या परिषदेत ऊसदर जाहीर झाल्यानंतर तो दर साखर कारखाने मान्य करणार की, पुन्हा दरासाठी आंदोलन होणार हे परिषदेनंतर स्पष्ट होणार आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात ऊसतोडणी मजूर दाखल होण्याची शक्यता आहे.

काही कारखान्यांनी ऊसतोडणी मशिन खरेदी केली आहेत. पण ऊसतोडणीचा प्रश्न निर्माण होणार तर नाही ना, याची दक्षता घेतली आहे. ऊसतोडणी मजुरांची वाट न पाहता कारखान्यांनी तोडणीचे नियोजन केले आहे. पण सध्या सुरू असलेल्या पावसामुळे ऊसतोडणीत अडथळा येण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. पाऊस थांबल्यानंतर हंगाम सुरू करण्याचे नियोजन काही कारखान्यांनी सुरू केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मतदार नोंदणी नसल्यास पगार नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जे अधिकारी व कर्मचारी मतदार यादीत नावे समाविष्ठ करणार नाहीत, त्यांचे पगार जिल्हा कोषागार कार्यालयातून दिले जाणार नाहीत त्यामुळे सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपली नावे मतदार यादीत समाविष्ठ करावीत, असा आदेश जिल्हा निवडणूक शाखेचे उप जिल्हाधिकारी स्नेहल भोसले यांनी दिला आहे.

जिल्हयात छायाचित्र मतदार यादी पुन:रीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. ३१ ऑक्टोबर पर्यंत जिल्ह्यातील मतदार मदत केंद्रावर दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहेत. निवडणूक आयोगाने एक जानेवारी २०१९ या दिनांकावर आधारित मतदार यादीत नागरिकांना नाव नोंदवण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व सरकारी तसेच निमसरकारी कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट असणे अनिवार्य आहे. आपली नावे मतदार यादीत आहेत की नाहीत याची खातरजमा अधिकारी व कर्मचाऱ्यांनी करावीत. जर मतदार यादीत नाव नसेल त्यांनी नावे समाविष्ट करावीत. आयोगाच्या https ://www.nvsp.in या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने मतदार यादीत नाव समाविष्ट करावे, असे आवाहनही केले आहे. तहसील कार्यालयातील निवडणूक शाखा, मतदार केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडे फॉर्म भरुन नोंदणी करण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीळ, मटकी दरात वाढ

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

दसरा संपल्यानंतर बाजारपेठेला दिवाळीचे वेध लागले आहेत. किराणा दुकानात माल भरला असून दुकानदार ग्राहकांच्या प्रतिक्षेत आहेत. या आठवड्यात तिळाच्या दरात प्रतिकिलो २० रुपयांनी तर मटकीच्या दरात १० रुपयांनी वाढ झाली आहे.

नवरात्र उत्सवात रवा, आटा, खाद्य तेलाची मोठी विक्री झाली होती. दीपावलीच्या पार्श्वभूमीवर किराणा दुकानदारांनी रवा, आटा, हरभरा डाळ, साखरेसह फराळासाठी आवश्यक असणारे पदार्थ, मसाले असा माल भरुन ठेवला आहे. अनेक ठिकाणी भिशी फुटल्याने ग्राहकांकडून फराळासाठी लागणारे साहित्य खरेदी होण्याची शक्यता आहे. या आठवड्यात तिळाचे दर प्रतिकिलो २० रुपयांनी वाढले आहेत. १६० रुपयावरुन तिळाचा दर प्रतिकिलो १८० रुपयावर पोचला आहे. दीपावलीच्या चकली, चिवडा, बाकर वडी, करंजी, चिरोटे या पदार्थात तिळाचा वापर केला जातो. मटकीच्या दरातही प्रतिकिलो दहा रुपयांनी वाढ झाली आहे. पोह्याच्या दरात प्रतिकिलो दोन रुपयाने घट झाली आहे. धान्य, कडधान्य, उपवासाच्या पदार्थांचे दर स्थिर आहेत.

किराणा प्रतिकलो दर

पोहे ४८ रु.

साखर ३६ रु.

शेंगदाणा ९० ते १०० रु.

मैदा ३० रु.

आटा ३० ते ३५ रु.३२

रवा ३२ रु.

गूळ ५० रु.

साबूदाणा ६० रु.

००००

डाळीचे प्रतिकिलो दर

तूरडाळ ६४ ते ७२ रु.

मूगडाळ ८० रु.

उडीद डाळ ६० ते ६४ रु.

हरभरा डाळ ६० ते ६४ रु.

मसूर डाळ ६० रु.

मसूर ७० ते १२० रु.

चवळी ८० रु.

हिरवा वाटाणा ८० ते ९० रु.

काळा वाटाणा ६४ रु.

पांढरा वाटाणा ५६ रु.

मटकी ८० ते १०० रु.

छोले ८० ते १०० रु.

००००

बार्शी शाळू : ३२ ते ४० (किलो रु.)

गहू: २६ ते ३४ रु.

ज्वारी नं.: ४० रु.

ज्वारी नं.: २ ३८ रु.

बाजरी : २४ रु.

नाचणी : ३६ रु.

००००

तेलाचे दर (किलो रु.)

शेंगतेल : १३० रु. १२५

सरकी तेल : ९० ते ९२ रु.

खोबरेल २२० रु.२३०

सूर्यफूल ९५ ते १०३ रु.

०००

मसाले दर (किलोमध्ये रु.)

तीळ १५० रु. १८०

जिरे २८० रु.

खसखस ७०० ते ८०० रु.

खोबरे १८० ते २०० रु.

वेलदोडे १७०० ते २००० रु.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ईव्हीएम मशिन तपासणी सोमवारपासून

$
0
0

कोल्हापूर : लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात प्राप्त झालेल्या ईव्हीएम मशिन आणि व्हीव्ही पॅटस् ची तपासणी सोमवारपासून (ता. २२) सुरू होणार आहे. मशिन तपासणीवेळी मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे जिल्हाध्यक्ष अथवा त्यांच्या प्रतिनिधींनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक शाखेने एका पत्रकाद्वारे केले आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (बेल) कंपनीच्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक शाखेकडे ७३२१ बॅलेट युनिटस्, ४२७५ कंट्रोल युनिटस्, ४२६७ व्हीव्ही पॅटस् प्राप्त झाले आहे. ही सर्व मशिन केर्ली (ता. करवीर) येथील शासकीय गोदामात सुरक्षा कक्षामध्ये ठेवल्या आहेत. या मशिन्सची प्राथमिक तपासणी सोमवारी सकाळी नऊ वाजल्यापासून सुरू होणार आहे. तपासणीची प्रक्रिया तीन नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंगळवारी मेळावा

$
0
0

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील मास कम्युनिकेशन विभागाच्या आजी-माजी विद्यार्थ्यांचा मेळावा मंगळवारी (ता. २३) आयोजित केला आहे. विद्यापीठातील 'नॅक'चे समन्वयक डॉ. आर. के. कामत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. सकाळी ११ ते दुपारी तीन या वेळेत मानव्यशास्त्र सभागृहात मेळावा होणार आहे. विभागाच्या पाच विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार मिळाला आहे. त्यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात येणार आहे. कार्यक्रमास विभागाच्या माजी विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन विभागप्रमुख डॉ. निशा मुडे-पवार यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादीची २७ ला एल्गार परिषद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जादू ओसरली आहे. इंधन दरवाढीने नागरिक त्रस्त आहेत. 'अच्छे दिन'घोषणा फसवी ठरल्याचा आरोप करत सरकारविरोधात तीन हजार युवकांच्या उपस्थितीत एल्गार परिषद घेण्यात येणार आहे. हा मेळावा यशस्वी करण्याचा निर्धार राष्ट्रवादी पक्षाच्या बैठकीत करण्यात आला. या बैठकीत नियोजनापेक्षा आमदार हसन मुश्रीफ आणि जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी एकमेकांना उद्देशून मिश्किल टिप्पणींमुळे रंगत आली.

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत २७ तारखेला सकाळी ११ वाजता परिषदेला शाहू सांस्कृतिक मंदिर येथे सुरुवात होणार आहे. या परिषदेच्या तयारीसाठी ताराबाई पार्क येथील राष्ट्रवादी कार्यालयात तालुका पदाधिकारी व युवक पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली.

जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील म्हणाले, 'माजी उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थितीत तीन हजार युवकांची परिषद घेण्यात येणार आहे. प्रत्येक तालुक्यातून किमान २०० युवक कार्यकर्ते सहभागी व्हायला हवेत. ' त्याला प्रतिसाद देताना गडहिंग्लज तालुका अध्यक्ष बी. एन. पाटील यांनी 'आम्ही मोठ्या संख्येने येणार' असे सांगितले. त्यावर जिल्हाध्यक्ष पाटील यांनी,'जिल्ह्याचे नेते हसन मुश्रीफ यांनी राजकारणात नाविदला पुढे आणले आहे. बी. एन. तुम्ही येताना मुलालाही पुढे आणा.' असा चिमटा काढला. भाजप सरकारला लोक कंटाळले आहेत, येत्या विधानसभा निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी कसून तयारी करावी. पक्षाचे नेते अजित पवार यांना मुख्यमंत्री तर आमदार मुश्रीफ यांना मोठे मंत्रिपद मिळवून देऊ.'असेही पाटील म्हणाले.

हातकणंगले तालुक्यातील कार्यकर्त्यांनी 'माजी खासदार श्रीमती निवेदिता माने यांचे स्वाभिमानी कार्यकर्ते' असे फलक हाती घेऊन परिषदेला यावे, अशी मिश्किल टिप्पण्णीही त्यांनी केली. तसेच इचलकरंजी व कोल्हापुरातून ४०० कार्यकर्ते मोटारसायकल रॅली काढून परिषदेत सहभागी व्हावेत, अशी सूचना त्यांनी केली.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष नाविद मुश्रीफ यांचे यावेळी भाषण झाले. राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष रोहित पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी माजी खासदार निवेदिता माने, बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, प्रताप माने, अनिल साळोखे, शहराध्यक्ष आर. के. पोवार, महिला आघाडीच्या संगीता खाडे, जहिदा मुजावर, महेंद्र चव्हाण, कल्पेश चौगुले आदी उपस्थित होते.

...........

'पंपावरील फलक हटवा, उचकी थांबेल'

युवक प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील, आमदार मुश्रीफ यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली. कोते-पाटील म्हणाले, 'नोटबंदी, जीएसटीमुळे उद्योग व्यवसायवर परिणाम झाला आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे बेरोजगारी वाढली आहे. ' आमदार मुश्रीफ म्हणाले, 'भाजप सरकारने देशाची व राज्याची घडी बिघडवल्याचा आरोप त्यांनी केला. इंधन दरवाढीमुळे लोकांची सतत ओरड सुरू असल्यामुळे पंतप्रधान मोदी यांच्या उचक्या थांबेनात, अशी स्थिती आहे. उपचार करुनही पंतप्रधानांच्या उचक्या थांबत नाहीत हे लक्षात आल्यानंतर वैद्यांनी भाजप नेत्यांना पंपावरील त्यांचा फोटो हटवा, तरच उचक्याही थांबतील असा सल्ला दिला आहे.'अशा शब्दांत मुश्रीफ यांनी टीकास्त्र सोडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतीकडे उद्योग म्हणून पाहा

$
0
0

फोटो जोडला आहे...

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'सध्याच्या जागतिकीकरणाच्या युगात पारंपरिक शेतीतील चुकीच्या पद्धतीत सुधारणा करून नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब करायला हवा. शेती हे उदरनिर्वाहाचे साधन न समजता शेतकऱ्यांनी त्याकडे उद्योग म्हणून पाहायला हवे,' असे आवाहन शेतकरीमित्र उदयसिंह पाटील यांनी केले.

जागतिक जाहिरात दिनानिमित्त प्रसारमाध्यमे आणि जाहिरात क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. दक्षिण व पश्चिम महाराष्ट्रात जाहिरात क्षेत्रात अग्रेसर असलेल्या आसमा आणि राज्यस्तरीय फेम संस्थांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

यावेळी 'टाइम्स ऑफ इंडिया'चे कोल्हापूरचे मुख्य प्रतिनिधी विवेक वाघमोडे, राजेंद्र मांडवकर, निखिल पंडितराव, विवेक चौगुले, विजय शिंदे, अवधूत सुर्वे, विजय कुंभार, कृष्णात जमदाडे, अरुण दीक्षित, नाना पालकर यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. प्रशस्तिपत्र, घुंगूर काठी, घोंगडे, सेंद्रिय गुळाची ढेप असे पुरस्काराचे स्वरूप होते.

मीडियाने शेतीविषयक बातम्या व संशोधनाला व्यापक प्रसिद्धी देण्याची सूचना करत शेतकरीमित्र उदयसिंह पाटील म्हणाले, 'जागतिक स्तरावर 'फॅमिली फार्मिंग' संकल्पना २०१४ मध्ये सुरू झाली. जगात त्याला व्यापक स्वरूप प्राप्त होण्यासाठी पावले उचलली जात आहेत. भारतात ही संकल्पना रुजविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शेती करणाऱ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याने शेतीकडे उद्योग म्हणून पाहावे. उत्पादनवाढीसाठी नवतंत्राचा वापर करायला हवा. शेतीतील कालबाह्य पद्धतीऐवजी नवीन संशोधनाचा वापर करून उत्पादनवाढीसाठी प्रयत्न करावेत. त्यासाठी वृत्तपत्रांनी शेतीविषयक बातम्यांना स्थान द्यायला हवे.'

ज्येष्ठ पत्रकार नाना पालकर यांनी 'आसमा'च्या उपक्रमाबद्दल आभार व्यक्त केले. 'आसमा'चे अध्यक्ष राजीव परुळेकर यांनी स्वागत केले. उपाध्यक्ष महादेव शिंदे यांनी आभार मानले. यावेळी कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष विजय पाटील, सुनील बासराणी, कौस्तुभ नाबर, संदीप खमीतकर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शहरातील पाच मैदाने सुसज्ज करणार’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'खेळांना उत्तेजन देण्यासाठी पायाभूत सुविधांची गरज असते. कोल्हापूर शहरातील खेळाडूंमध्ये गुणवत्ता ठासून भरली आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यश मिळवणाऱ्या खेळाडूंना चांगल्या मैदानाची गरज आहे. त्यासाठी डिसेंबरअखेर शहरातील पाच मैदाने सुसज्ज केली जातील,' अशी घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.

हॉटेल सयाजी येथे फुटबॉल क्लब कोल्हापूर सिटी या संघाच्या लोगो अनावरण समारंभात ते बोलत होते. यावेळी पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख, कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनचे अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती, गोकुळचे संचालक अरुण नरके प्रमुख उपस्थित होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले, 'जिल्ह्यातील कुस्ती, फुटबॉल, नेमबाजी, जलतरण, बुद्धिबळ या क्रीडा प्रकारातील खेळाडू राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवत आहेत. खेळाडूंना पायाभूत सुविधा पुरवल्या जातील. पण त्यांची कारकीर्द आर्थिक अडचणीमुळे थांबली जाऊ यासाठी सर्व क्रीडा प्रकारांसाठी निधी उभारण्यासाठी गरज आहे. त्यासाठी क्रीडाक्षेत्रातील संस्था, ज्येष्ठ खेळाडू, संघटकांनी पुढाकार घ्यावा. तसेच शाहू स्टेडियमवर आंतररराष्ट्रीय संघातील प्रदर्शनीय फुटबॉल सामना आयोजित करण्यासाठी केएसएने पुढाकार घ्यावा.'

पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख म्हणाले, 'फुटबॉल व कुस्ती या खेळांनी कोल्हापूरला नाव मिळवून दिले आहे. ही परंपरा कायम राहण्यासाठी पोलिस दलाकडून मैदाने, प्रशिक्षकांची मदत केली जाईल. कोल्हापूर पोलिसांचा फुटबॉल संघ उत्कृष्ट करण्यासाठी प्रयत्न केले जातील.' केएसएचे अध्यक्ष मालोजीराजे यांनी फुटबॉलच्या विकासासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व संस्था, संघांना केएसएकडून सहकार्य व मदत केली जाईल, असे आश्वासन दिले.

फुटबॉल क्लब ऑफ कोल्हापूर सिटीचे अध्यक्ष उद्योगपती चंद्रकांत जाधव म्हणाले, 'कोल्हापूरच्या फुटबॉल खेळाडूंना राष्ट्रीयस्तरावर खेळण्याची संधी मिळावी यासाठी फुटबॉल क्लब कोल्हापूर सिटीची स्थापना केली आहे. अखिल भारतीय फुटबॉल संघटनेने क्लबला वन स्टार मानांकन दिले आहे. ज्युनिअर संघ करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. क्लबला आर्थिक मदत देण्यासाठी सहकार्य करावे.'

यावेळी गृह पोलिस उपअधीक्षक सतीश माने, जिल्हा क्रीडाधिकारी चंद्रकांत साखरे, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांच्यासह शहरातील सर्व फुटबॉल संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. नगरसेवक संभाजी जाधव यांनी आभार मानले.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘विश्वा’चे काम काढून घेतले

$
0
0

बापट कँप, लाईन बाजार पंपिंग स्टेशनसाठी दोन कोटी ५६ लाखाची निविदा प्रसिद्ध

फाइल फोटो आहे

कोल्हापूर : कसबा बावडा व दुधाळी येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) पूर्ण क्षमतेने सुरू न ठेवल्याबद्दल विश्वा इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडून महापालिकेने लाइन बजार व बापट कँप येथील पंपिंग स्टेशनचे काम काढून घेतले आहे. दोन्ही ठिकाणी पंपिंग स्टेशन कार्यन्वित करण्यासाठी शुक्रवारी दोन कोटी ५६ लाख खर्चाची निविदा प्रसिद्ध केली आहे.

शहरातील सांडपाणी थेट पंचगंगा नदीमध्ये मिसळत असल्याने दिवसेंदिवस प्रदूषणामध्ये वाढ होत आहे. प्रदूषण रोखण्यासाठी शहराची २०३४ ची लोकसंख्या गृहीत धरून कसबा बावडा व दुधाळी येथे सांडपाणी प्रकल्प सुरू केला. कसबा बावडा येथे ७६ एमएलडी सांडपाणी प्रकल्प 'बांधा वापरा आणि हस्तांतर करा' या तत्वावर विश्वा इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट कंपनीला देण्यात आले. प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्यासाठी जयंती नाल्यातून ५५ एमएलडी तर लाइन बाजार पाच व बापट कँप येथून १५ एमएलडी सांडपाणी उपसा करण्यात येणार होते. यापैकी केवळ जयंती नाल्यातून सांडपाणी उपसा केला जात असून दोन्ही ठिकाणांहून अद्याप उपसा करण्यास सुरुवात झालेली नाही. याबाबत कंपनीशी अनेकवेळा पत्रव्यवहार केला. पण सांडपाणी उपसा करण्यास कंपनीने पूर्णत: दुर्लक्ष केले. संपूर्ण प्रकल्प २०१३ पर्यंत कार्यन्वित करण्याची अंतिम मुदत असताना कंपनी यामध्ये अपयशी ठरली. प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यन्वित झाला नसल्याने सांडपाणी थेट नदीत मिसळून प्रदूषणामध्ये वाढ होत होती. नदी प्रदूषणास महापालिकेला जबाबदार धरत अनेकवेळा राष्ट्रीय हरित लवाद व प्रदूषण नियंत्रम मंडळाच्या कारवाईला सामोरे जावे लागले होते. पुणे येथे झालेल्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या बैठकीत स्वत: आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी डिसेंबरपासून महापालिकेच्यावतीने दोन्ही पंपिंग स्टेशन कार्यन्वित होतील, असे स्पष्ट केले होते. त्यानंतरही महापालिकेने चार महिने कंपनीची प्रतीक्षा केली, पण कंपनीकडून प्रतिसाद न मिळाल्याने महापालिकेने पंपिंग स्टेशनचे काम काढून घेण्याचा निर्णय घेत दोन कोटी ५६ लाखाची नवी निविदा प्रसिद्ध केली. निविदा दाखल करण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत निश्चित केली आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

हरित लवादाचे ताशेरे

शहरातील नाल्यांमुळे पंचगंगा नदीच्या प्रदूषणात वाढ होत आहे. नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी राष्ट्रीय हरित लवादाकडून वारंवार सूचना दिल्या जात आहेत. त्याबाबत सुनावणीही घेतली जात आहे. महापालिका एसटीपी प्रकल्पाचे काम सुरू असल्याचे वारंवार स्पष्ट करत आली आहे. पण जुलै महिन्यात झालेल्या सुनावणीवेळी लवादाने महापालिकेच्या कार्यपद्धतीवर जोरदार ताशेरे ओढले होते. हरित लवादाने खडे बोल सुनावल्यानंतर महापालिकेने कंपनीला दंडही केला. लवादासमोर डिसेंबरपर्यंत दोन्ही पपिंग स्टेशन सुरू करणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार निविदा प्रक्रिया राबवण्यात सुरुवात झाली आहे.

दंडात्मक कारवाई

कसबा बावडा व दुधाळी येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) वेळेत पूर्ण न केल्याबद्दल व पूर्ण क्षमतेने सुरू नसल्याने महापालिकेने दोन्ही कंपन्यांना सव्वा कोटीचा दंड केला होता. कसबा बावडा प्रकल्पाच्या 'विश्वा' कंपनीला प्रतिदिन २५ हजार प्रमाणे ८० लाख तर दुधाळी एसटीपी प्रकल्पाचे काम करणाऱ्या लक्ष्मी सिव्हिल इंजिनीअरिंग कंपनीला ३५ लाख असा एक कोटी १५ लाखाचा दंड ठोठवला आहे. तसेच 'विश्वा' कंपनीला बावडा प्रकल्पाचे 'काम का काढून घेऊ नये' अशी कारणे दाखवा नोटीस बजावली होती. 'विश्वा' कंपनीचा दंड त्यांच्या बिलातून वसूल केला जात असून पंपिंग स्टेशनचे काम काढून घेतले, असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

१२० एमएलडी

शहरातील एकूण पाणीपुरवठा

८३ एमएलडी

सांडपाणी तयार होते

७६ एमएलडी

कसबा बावडा प्रकल्प क्षमता

१७ एमएलडी

दुधाळी एसटीपी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घडामोडींना येणार वेग

$
0
0

विविध पक्षांच्या नेत्यांसह सरसंघचालक आठवड्यात दौऱ्यावर

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह रयत क्रांती संघटनेची होणारी ऊस परिषद, मुख्यमंत्र्यासह अनेक मंत्र्यांची उपस्थिती, उस दराच्या घोषणेबरोबरच लोकसभेची संभाव्य चाचपणी आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सरसंघचालक मोहन भागवत यांच्या कोल्हापूर दौऱ्यामुळे पुढील आठवड्यात राजकीय हालचालींना वेग येण्याची चिन्हे आहेत.

येत्या बुधवारी कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या (ता. २४) रयत क्रांती संघटनेच्या वतीने कोडोलीत ऊस परिषद होणार आहे. खोत यांनी परिषदेची जय्यत तयारी केली आहे. संघटनेचा पहिला वर्धापन दिन असल्याने मेळावाही होणार आहे. या परिषदेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकारमंत्री सुभाष देशमुख, दुग्धविकासमंत्री महादेव जानकर, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे उपस्थित राहणार आहेत. ऊस दराबाबत या परिषदेत मुख्यमंत्री घोषणा करण्याची शक्यता आहे. मंत्री खोत हे हातकणंगले लोकसभा मतदार संघातून भाजपच्या चिन्हावर लढण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे हवा तयार करण्यासाठी त्यांचे या परिषदेच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्र्यांकडून उमेदवारीचे संकेत मिळतील अशी त्यांना अपेक्षा आहे.

खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी संघटनेची २७ ऑक्टोबरला जयसिंगपूर येथे ऊस परिषद आहे. तिसऱ्यांदा लोकसभेला सामोरे जाताना होणारी ही परिषद भव्य व्हावी, यासाठी त्यांचे नियोजन सुरू आहे. ऊस दरासाठी रयतने मांडलेल्या प्रस्तावावर खासदार शेट्टी काय भूमिका घेतात, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. दोन्ही परिषदांची तुलना होणार असल्याने उत्सुकता वाढली आहे.

२७ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या एल्गार मेळाव्यासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या तोफा धडाडणार आहेत. २३ ऑक्टोबर रोजी काँग्रेस पक्षाच्यावतीने कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले आहे. त्यासाठी प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण येणार आहेत. तसेच २५ व २६ ऑक्टोबर रोजी युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे हे जिल्ह्यात येणार आहेत. देवल क्लब येथे खेळाडू आणि कॉमर्स कॉलेजमध्ये युवकांशी ते संवाद साधणार आहेत. या पार्श्वभूमीवर येत्या आठवड्यात बहुतेक सर्वच पक्षाचे नेते जिल्ह्यात येणार असल्याने राजकीय घडामोडींना वेग येणार आहे.

सरसंघचालक येणार कणेरी मठावर

कणेरी मठावर होणाऱ्या कृषी प्रदर्शनासाठी सरसंघचालक भागवत कोल्हापुरात येणार आहेत. २२ ते २५ ऑक्टोबर ला हा कार्यक्रम होणार असून भागवत यांच्या दौऱ्याला राजकीय महत्त्व आहे. लोकसभेला ऐनवेळी चांगला उमेदवार मिळावा, यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहे. यासाठी मठावरील काडसिद्धेश्वर महाराजांच्या आशीर्वाद मिळण्याची गरज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कृषी भवन’ला गती येणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांसह सर्व शेती संबंधित कार्यालये एकाच छताखाली आणण्यासाठी कृषी भवन बांधण्याला मंत्रिमंडळाच्या बैठकीत तत्त्वत: मान्यता मिळाली. शेंडा पार्कातील पावणे तीन एकर जागा देण्याची तयारी कृषी विद्यापीठाने दर्शविल्याने भवनच्या प्रस्तावाला गती मिळाली. यामुळे ३० कोटींचा आराखडा तयार करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत. प्रत्यक्ष कामाला निधी मिळाल्यानंतर सुरुवात होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

केंद्र आणि राज्य सरकारच्या कृषी योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रशासन गतिमान असणे अपेक्षित आहे. मात्र, आता अधिकारी, कर्मचाऱ्यांना कामकाज करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी विभागाची स्वमालकीची इमारत नाही. शहरात विविध ठिकाणी भाड्याच्या इमारतीत असलेली सर्व कार्यालये एकाच इमारतीत असावीत, यासाठी तीन वर्षांपूर्वी शेंडा पार्क येथील जागेत कृषी भवन बांधण्याचा प्रस्ताव तयार करून सरकारकडे पाठविला.

सुरुवातीला शेंडा पार्कची जागा देण्यास कृषी विद्यापीठाने नकार दिला होता. परिणामी भवनचा पाठविण्यात आलेला प्रस्ताव लालफितीत अडकला. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे कृषी मंत्रिपद असल्याने भवनचा प्रस्ताव पुन्हा पुढे आला. दोन दिवसांपूर्वी मंत्रालयातील बैठकीत कृषी विद्यापीठातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्यावेळी शेंडा पार्क येथेच भवन बांधण्याला तत्त्वत: मान्यता देण्यात आली. विद्यापीठ प्रशासनाने पावणेतीन एकर जागा देण्यास सकारात्मक प्रतिसाद दिला. जागेची अडचण दूर झाल्याने इमारतीचा आराखडा १५ दिवसांत देण्याची सूचना मंत्री पाटील यांनी दिली.

दरम्यान, भाड्याच्या इमारतीत असलेले जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, विभागीय कृषी सहसंचालक, आत्मा प्रकल्प संचालक, करवीर तालुका कृषी अधिकारी, विभागीय कृषी अधिकारी, मृदा सर्वेक्षण, चाचणी, रासायनिक खते पृथ:करण, कीटकनाशके पृथ:करण प्रयोगशाळा, भांडारगृह, अभ्यागत व अभिलेखकक्ष, शेतकरी प्रशिक्षण आणि वसतिगृह, ग्रंथालय, थेट शेतमाल विक्री केंद्राचा समावेश प्रस्तावित भवनमध्ये असणार आहे. भवनच्या इमारतीचा आराखडा बांधकाम विभागाकडून प्राप्त झाल्यानंतर जागेसंबंधी रितसर सरकारी आदेश काढण्यात येणार आहे. त्यानंतर प्रशासकीय, तांत्रिक मान्यता घ्यावी लागणार आहे. ही सर्व प्रक्रिया झाल्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनात निधीची तरतूद करावी लागणार आहे.

००००

शेंडा पार्क येथे कृषी भवन बांधण्याला मंत्रिमंडळ बैठकीत तत्त्वत: मान्यता मिळाली. यासाठी कृषी विद्यापीठ प्रशासनाने पावणे तीन एकर जागा देण्यास मान्यता दिली आहे. निधी उपलब्ध झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.

ज्ञानदेव वाकुरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गोकुळ’च्या दूध वितरकांचा संपाचा इशारा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वाढीव कमिशनसह अन्य मागण्यासाठी शहरातील गोकुळच्या दूध वितरकांनी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. रविवारी (ता. २१) दुपारी दीड वाजता वितरक दसरा चौकात निदर्शने करणार असून त्यानंतर बेमुदत संपावर जाणार आहेत, त्यामुळे सोमवारी दूध वितरण ठप्प राहण्याची शक्यता आहे. दरम्यान संपाच्या पार्श्वभूमीवर गोकुळने पर्यायी व्यवस्थेची तयारी सुरू केली आहे.

जिल्हा दूध उत्पादक संघाकडून (गोकुळ) कडून शहरातील दूध वितरकांना प्रतिलिटर एक रुपये ९० पैसे कमिशन दिले जाते. अन्य दूध संघाकडून अडीच ते तीन रुपये कमिशन दिले जाते. शहरातील २३१ मुख्य वितरकाकडून 'गोकुळ'चे दीड लाख लिटर दूधाचे वितरण केले जाते. दूध वेळेत पोहोच व्हावे यासाठी मुख्य वितरकांनीही उपवितरक नेमल्याने कमिशनचा फायदा कमी होत आहे. त्यामुळे कमिशन वाढवून द्यावे, अशी मागणी दोन महिन्यापूर्वी शहरातील वितरकांनी गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील यांच्याकडे केली होती. पण मल्टिस्टेटच्या ठरावाची धांदल सुरू असल्याने सर्वसाधारण सभा झाल्यावर कमिशनबाबत चर्चा करण्याचे आश्वासन दिले होते. सर्वसाधारण सभा होऊन २० दिवसांनंतरही गोकुळ प्रशासनाकडून कमिशन वाढीसाठी पावले उचलली जात नसल्याने वितरकांनी संपाचा इशारा दिला आहे.

रविवारी शहरात दूध वितरण केले जाणार असून दुपारी दीड वाजता शहरातील वितरक दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याजवळ गोकुळ प्रशासनविरोधात निदर्शने करणार आहेत. त्यानंतर बेमुदत संपाला सुरुवात होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्राथमिक शिक्षणाधिकारीपदी उबाळे रुजू

$
0
0

कोल्हापूर: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतील पुणे सहायक आयुक्त आशा उबाळे मंगळवारी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणधिकारीपदी रुजू झाल्या. उबाळे यांना सुमारे २६ वर्षे अध्यापनाचा तर पाच वर्षे प्रशासकीय क्षेत्राचा अनुभव आहे. त्यांनी यापूर्वी पुणे येथे एससीईआरटी विभागात कार्यक्रम अधिकारी म्हणून काम केले आहे. तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत प्रशासनाधिकारी म्हणून काम केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images