Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

ग्रामसेवकासह ७ जणांवर फौजदारी

$
0
0
महाविद्यालयाच्या श्रमसंस्कार शिबिरात श्रमदानातून बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यावर १ लाख १७ हजार ९३४ रुपयांचा खर्च दाखवून त्या रक्कमेचा अपहार केल्याची घटना उजेडात आली आहे.

शोभा कुलकर्णींना कारणे दाखवा नोटीस

$
0
0
जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातील ५५ लाख २९ हजार रुपयांच्या अपहारप्रकरणी समाजकल्याण अधिकारी शोभा कुलकर्णी यांना शनिवारी ‘कारणे दाखवा’ची अंतिम नोटीस बजावण्यात आली.

निपाणीचा वन विभाग तस्करांचा कर्दनकाळ

$
0
0
निपाणी वन विभागाच्या चेक पोष्ट नाक्यावर रविवारी रात्री उशीरा झालेल्या कारवाईत सुमारे तीन कोटी रुपयांचे रक्तचंदन पकडण्यात आले. आंध्रप्रदेशहून पुण्याकडे जाणाऱ्या या रक्तचंदनाने अवघ्या सहा महिन्यांत २८ टनाचा आकडा पार केला आहे.

दुष्काळी भागासाठी ८१ TMC पाणी उपलब्ध

$
0
0
कृष्णा लवादाचा प्रश्न निकाली निघाल्याने ८१ टीएमसी पाणी उपलब्ध झाले आहे. आता दुष्काळी भागातील जनता व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून दुष्काळी भागाला पाणी देण्याचा आराखडा तयार करून कामाला गती देता येईल, असे प्रतिपादन जलसंपदामंत्री शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केले.

नगराध्यक्ष, अधिका-यांवर गुन्हा दाखल करा

$
0
0
जवाहरनगरमधील रस्त्याच्या पॅचवर्कसाठी टाकलेली खडी आणि दगडांच्या ढिगामुळे अपघात होऊन रमेश काशीनाथ लाखे यांचा मृत्यू झाल्याप्रकरणी नगराध्यक्षा सुमन पोवार, मुख्याधिकारी सुनील पवार, मक्तेदार रवी जाधव, आदींसह अन्य संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी करत विविध संघटनांच्यावतीने शिवाजीनगर पोल‌िस ठाण्यावर मोर्चा काढला.

इचलकरंजीत १३ रिक्षा जप्त

$
0
0
कोल्हापूर प्रादेशिक परिवहन विभाग व इचलकरंजी शहर वाहतूकच्या संयुक्त पथकाने भंगार व विनापरवाना रिक्षांविरुध्द धडक कारवाईची मोहिम सुरुच ठेवली आहे. सोमवारी केलेल्या कारवाईत १३ रिक्षा जप्त करण्यात आल्या. सलग झालेल्या या कारवाईमुळे रिक्षाचालकांची चांगलीच तारांबळ उडाली.

अल्पसंख्याक दर्जा द्या

$
0
0
लिंगायत धर्माला अल्पसंख्याक दर्जा द्यावा या प्रमुख मागणीसाठी लिंगायत धर्म महासभेच्यावतीने शिरोळ तहसील कार्यालयावर सोमवारी महामोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या संख्येने ना‌गरिक सहभागी झाले होते.

विवाहिता छळ : पतीसह तिघांवर गुन्हा

$
0
0
माहेरुन तीन तोळे सोन्याचे दागिने आणावेत यासाठी शारिरीक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह तिघांच्या विरोधात येथील गावभाग पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत मयुरी अरविंद माने (वय २४, सध्या रा. पलूस जि. सांगली) हिने तक्रार दाखल केली आहे.

गडहिंग्लज : ३२ जागांसाठी ९९ अर्ज

$
0
0
हनमंतवाडी, तनवडी, नांगनूर व अत्याळ या चार ग्रामपंचायतीच्या ३२ जागांसाठी एकूण ९९ अर्ज दाखल झाले. तहसीलदार हनमंत पाटील यांच्या देखरेखीखाली तहसील कार्यालय येथे छाननी प्रक्रिया पार पडली.

कामगार अधिका-यांना काळे फासण्याचा प्रयत्न

$
0
0
बांधकाम कामगारांना सरकारी अनुदान आणि सेवा पुस्तकापासून वंचित रहावे लागत असल्याच्या निषेधार्थ लालबावटा बांधकाम कामगार संघटनेच्यावतीने येथील सरकारी कामगार अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

टेम्पोच्या धडकेत बानगेचा तरुण ठार

$
0
0
पुणे- बंगळूर महामार्गावर आडी मल्लयानजीक टेम्पोने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील उमेश संभाजी पाटील ( वय २९, बानगे, ता. कागल) हा तरूण जागीच ठार झाला. रविवारी रात्री उशिरा तो गावी जात असताना अपघात झाला.

जंगलग्रस्तांचे सामूहिक पुनर्वसन

$
0
0
सामुहिक पुनर्वसनालाच सरकार प्राधान्य देणार असल्याने एखाद्या वाडी किंवा गावाची पूर्ण मानसिकता तयार झाल्याशिवाय त्यांचे पूनर्वसन होणार नाही असे स्पष्ट संकेत राज्याचे वनसचिव प्रवीणसिंह परदेशी यांनी दिले.

‘शिक्षण समृद्धी’ हिवाळी अधिवेशनात मांडणार

$
0
0
शिक्षण समृध्दी योजनेला शिक्षण मंत्रालयाची मान्यता असून मंत्रीमंडळाच्या अंतिम मान्यतेसाठी आवश्यक टिप्पणी तयार करून ती आगामी हिवाळी अधिवेशनात मंत्रीमंडळासमोर मांडण्याकरीता संघटना प्रतिनिधींसमवेत राज्याचे मुख्य सचिव जे. एस. सहारिया व संबंधीत वित्त व शिक्षण विभागांच्या प्रधान सचिवांसह बैठक घेण्याचे निर्देश राज्याचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी दिले.

प्रकल्पग्रस्तांचे बेमुदत धरणे

$
0
0
चांदोली अभयारण्यग्रस्त व वारणा धरणग्रस्तांच्या जमीन संपादन प्रक्रिया सुरू होत नाही तसेच गावठाणांमध्ये नागरी सुविधा मिळत नाहीत तोपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा पवित्रा धरणग्रस्तांनी घेतला आहे.

वाढीव पाणी बिलांची शिवाजी पेठेत होळी

$
0
0
महापालिकेकडून देण्यात येणाऱ्या पाणी बिलात सांडपाणी आणि ड्रेनेज करांचा समावेश केल्याच्या निषेधार्थ शिवाजी पेठेतील उभा मारूती चौकात नागरिकांकडून पाणी बिलांची होळी करण्यात आली.

‘शाहू वैद्यकीय’च्या होस्टेलचा प्रश्न ऐरणीवर

$
0
0
राजर्षी छत्रपती शाहू वैद्यकीय महाविद्यालयासाठी वाढविण्यात आलेल्या जागांमुळे विद्यार्थ्यांच्या निवासाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यासाठी अधिष्ठातांनी हॉस्टेल्सच्या दोन इमारती आणि प्रशस्त ग्रंथालयासाठी सुमारे २५ कोटी रुपयांच्या इमारत बांधणीचा प्रस्ताव तयार केला आहे.

परीक्षा भवनमध्ये आग; प्रशासनाची धावपळ

$
0
0
शिवाजी विद्यापीठातील परीक्षा भवन क्रमांक दोनमधील दुसऱ्या मजल्यावर रविवारी अचानक आग लागली. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या प्रकाराने प्रशासन आणि अधिकाऱ्यांची धावपळ उडाली. या आगीत दुसऱ्या मजल्यावरील कापडी पिशव्या भस्मसात झाल्या.

कचरा डेपोत मृतदेह सापडल्याने खळबळ

$
0
0
कसबा बावडा येथील महापालिकेच्या कचरा डेपोतील ढिगात सोमवारी सकाळी पुरुषाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. शवविच्छेदनानंतर अनोळखी पुरुषाचा खून नसून अपघाताची लक्षणे असल्याचे पोलिसांनी सांगितले.

भाताला १३१० रुपये दर

$
0
0
तालक्यातील शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून होणारी फसवणूक थांबविण्याच्या उद्देशाने सरकारमार्फत भात खरेदी केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. शेतकऱ्यांच्या भात पिक कवडीमोल भावाने व्यापारी वर्ग खरेदी करत आहे. याबाबत शेतकऱ्यांकडून अनेक तक्रारी येत होत्या. त्यामुळे सरकारच्या वतीने १३१० रुपयांच्या आधारभूत किंमतीने भात खरेदी केली जाणार असल्याचे तहसीलदार बी. आर. माळी यांनी सांगितले.

उद्यमनगरात खड्डेच खड्डे चोहीकडे

$
0
0
महापालिकेला सर्वाधिक उत्पन्न देणारा आणि जिल्ह्याच्या औद्योगिकीकरणाचा पाया असलेल्या उद्यमनगरातील रस्त्यांची स्थिती अतिशय खराब असून अन्य नागरी सुविधांचाही पुरता बोजवारा उडाला आहे.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images