Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

बाप राबला आणि पोरगा आयएएस झाला

0
0
फक्त अक्षरओळख असल्यापुरतंच शिक्षण असलेल्या एका बापानं पोराला आयएएस करण्यासाठी पायाला किती पानं बांधावी, रात्रीचाही दिवस करावा, अनंत अडचणी आणि परिस्थितीच्या माऱ्याचा सामना करत, पैसा नावाच्या राक्षसाशी झुंज द्यावी यालाही सीमा असते.

मुलाच्या किडनीमुळे वडलांचा पुनर्जन्म

0
0
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर चांगल्या-वाईट गोष्टींची ज्यांनी पदोपदी जाणीव करून दिली, त्या वडीलांना स्वत:ची किडनी देवून महागाव (ता. गडहिंग्लज) येथील एका मुलाने रविवारी साजऱ्या होणाऱ्या फादर्स डेला खरा आयाम दिला आहे.

मूल होत नसल्याने अपहरणाची कबुली

0
0
पाच दिवसांचे बाळ चोरल्याप्रकरणी एका दाम्प्त्यासह तिघांना राजारामपुरी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडे सापडलेल्या पाच दिवसांच्या बाळाला आई श्वेता प्रभाकर गवळी यांच्याकडे सुखरुप देण्यात आले.

अकरावी हा सीईटीचा पाया

0
0
‘अकरावीचे वर्ष रेस्ट इअरचे वर्ष नाही. अकरावी आणि बारावी सामायिक प्रवेश परीक्षांचा मूळ पाया आहे. त्याकडे दुर्लक्ष करु नका. टक्केवारी चांगली मिळाली म्हणून सायन्सचा पर्याय निवडू नका. सायन्समधील उपशाखांची माहिती घ्या.

आयुष्याला मिळाला टर्निंग पॉइंट

0
0
अकरावीसाठी कोणते कॉलेज निवडावे, करिअर कोठे होईल, कोणता ग्रुप निवडावा लागेल, अकरावी-बारावीचा बदललेला अभ्यासक्रम, बारावीनंतरच्या सामायिक प्रवेश परीक्षा, त्यासाठी लागणारी पुस्तके, संदर्भ ग्रंथ आणि यशाचा कानमंत्रच विद्यार्थ्यांना ‘महाराष्ट्र टाइम्स’ आणि ‘एडनेक्सा’ यांनी ‘अकरावी सायन्सला जाताना’ या विषयावरील आयोजित केलेल्या मोफत सेमिनारमध्ये मिळाला.

पिकनिकचा अतिउत्साह नडला

0
0
पिकनिकचा अतिउत्साह पुण्यातील तीन जणांच्या जीवावर बेतला. कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावरील आंब्याजवळ तळवडे येथील धोकादायक वळणावर स्कॉर्पिओ ओढ्यात कोसळून तिघे एका तरुणीसह तिघे मृत्युमुखी पडले.

खराब रस्त्यांवर मुरूम टाकण्याची मागणी

0
0
नागाळा पार्कातील नागोबाच्या मंदिराच्या मागे असलेल्या विविध कॉलनीत रस्ते खराब झाले असून पावसामुळे रस्त्यावर चिखल साचलेला आहे. महपालिकेने येथे मुरुम टाकून तात्पुरत्या स्वरुपात पॅचवर्क करण्याचे नियोजन करावे, अशी मागणी येथील नागरिकांतून होत आहे.

आरटीओ कार्यालयासमोर वाहतुकीची कोंडी

0
0
येथील आरटीओ कार्यालयासमोरील रस्त्यावर वाहन पार्किंग बेशिस्त असल्याने या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होते. विशेषत: येथे सकाळच्यावेळी दुचाकी वाहनांच्या नंतर रिक्षा पार्क केलेल्या असतात, त्यामुळे सकाळी येथे मोठी वाहतूक कोंडी होत असते.

आंबेडकरी विचारांचा प्रगल्भ साहित्यिक

0
0
कवी, समीक्षक आणि कादंबरीकार प्रा. डॉ. धम्मपाल रत्नाकर यांचा आज (१७ जून) प्रथम स्मृतिदिन. दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा आणि डॉ. रत्नाकर यांचे नाते अतूट असे होते. म्हणूनच ‘दमसा’ने त्यांच्या स्मृत्यर्थ राज्यस्तरीय ‘रत्नाकर काव्य पुरस्कार’ जाहीर केला आहे.

उद्यमनगरातील रस्त्यांवर पावसामुळे चिखल

0
0
उद्यमनगर येथे रस्त्यांची स्थिती अतिशय खराब आहे, त्यात पावसामुळे येथील बऱ्याच रस्त्यांवर चिखल होत असल्याची स्थिती आहे. उद्यमनगर ही कोल्हापुरातील पहिली औद्योगिक वसाहत आहे.

सांडपाणी निच-याचा प्रश्न भोई गल्लीत गंभीर

0
0
येथील भोई गल्ली तालिम मंडळाच्या समोर चॅनलचे काम योग्य पद्धतीने न झाल्याने पावसात सांडपाणी येथील घरात घुसत आहे, तसेच सांडपाण्याच्या निचऱ्याचा प्रश्नदेखील गंभीर झालेला आहे.

सायकल ट्रेकिंगची क्रेझ वाढतेय!

0
0
जंगल आणि दऱ्या-खोऱ्यातून भटकंती करणाऱ्यांची संख्या आपल्याकडे काही कमी नाही. आता तर सायकलवरून ट्रेकिंगची क्रेझही चांगलीच रुळत आहे.

आचारसंहितेचा भंगप्रकरणी गुन्हे दाखल

0
0
‘इच्छुक उमेदवारांच्या शक्तीप्रदर्शनाच्यावेळी विनापरवाना वापरलेल्या अज्ञात वाहनांविरुद्ध महापालिका निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत. यापुढेही ते केले जातील,’ असे मुख्य निवडणूक अधिकारी व महापालिका आयुक्त संजय देगावकर यांनी सांगितले.

मिरजेत होणार तीन लाख वृक्षलागवड

0
0
पर्यावरण संतुलन राखण्यासाठी वृक्षलागवड खूप महत्त्वाची आहे. यासाठी तालुक्यातील गावांमध्ये तीन लाखांहून अधिक वृक्षलागवड करण्यात येणार आहे, अशी माहिती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी उत्तम वाघमोडे यांनी सांगितले.

ठोसेघर धबधबा कोसळू लागला

0
0
सातारा शहर व परिसरातील पश्चिम भागात पावसाने जोर धरल्याने रविवारचा सुट्टीचा दिवस तर सातारकरांनी घरात बसूनच काढला. वाढती बोचरी थंडी व गार वारे यामुळे रविवार आठवडा बाजारचा दिवस असूनही ग्रामीण भागातून येणाऱ्या लोकांची पावसाने मोठी कोंडी केली.

नियोजन मंडळाच्या उपाध्यक्षपदी रामराजे

0
0
राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या सातारा जिल्ह्यातून नुकत्याच झालेल्या राष्ट्रवादी पक्षाच्या नूतन मंत्रीमंडळात पालकमंत्री रामराजे नाईक निंबाळकरांना डच्चू देण्यात आला.

‘सह्याद्री प्रोजेक्ट’ मधील कुटुंबांनी जंगल सोडले

0
0
सह्याद्री प्रोजेक्ट टायगरच्या कोअर एरियामध्ये बेकायदेशीररित्या राहणाऱ्या १२ ते १५ कुटुंबानी जंगल सोडले आहे. वनखात्याच्या कारवाईच्या भूमिकेनंतर ग्रामस्थांनी त्यांच्या जनावरांसह जंगल सोडले आहे.

टाउन हॉलनजीक एकाचा खून

0
0
टाउन हॉलन परिसरातील राजेबगस्वार दर्ग्यानजीक एका युवकाचा खून झाल्याचे रविवारी सकाळी उघडीस आले. अमर वसंत म्हाकवेकर (२८ रा. राजेबगस्वार) असे खून झालेल्याचे नाव आहे.

राधानगरी परिसरात मुसळधार पाऊस

0
0
राधानगरी परिसरात रविवारीही जोरदार पाऊस झाला. तालुक्यात सरासरी ६८ मि मी.पाऊस झाला असून राधानगरी धरण क्षेत्रात ७८ मि.मी पावसाची नोंद झाली. तर काळम्मावाडी क्षेत्रात ४७ मिमी.व तुळशी क्षेत्रात १७ मिमी पाऊस पडला.

पोषण आहार शिजविण्याची सक्ती नको

0
0
अंगणवाडी सेविकांना पोषण आहार शिजविण्याबाबत सक्ती करू नये, सेविकांचे मानधन दर महिन्याच्या १० तारखेला मिळावे आणि नियमबाह्य कामांची सक्ती करू नये तसेच पेन्शन योजना लागू करावी, या मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने शनिवारी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आला.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images