Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

रस्त्यासाठी भू संपादनासशेतकऱ्यांचा विरोध

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

प्रस्तावित रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गासाठी लागणाऱ्या भूसंपादनास हातकणंगले, करवीर तालुक्यांतील बाधित शेतकऱ्यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत तीव्र विरोध केला. यावेळी उपजिल्हाधिकारी अविनाश हदगल प्रमुख उपस्थित होते.

नवा महामार्ग हातकणंगले, करवीर, पन्हाळा, शाहूवाडी तालुक्यांतून जाणार आहे. त्यासाठी जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर हातकणंगले, करवीर तालुक्यांतील शेतकऱ्यांनी जोरदार विरोध केला. त्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची बैठक बोलावण्यात आली होती.

बोरपाडळे, वारणा, शिये, वडगाव, चोकाकमार्गे रत्नागिरीहून आलेला रिंगरोड आहे, पुन्हा रष्ट्रीय महामार्गाची गरज काय? असा प्रश्न हातकणंगलेचे माजी सभापती राजेश पाटील यांच्यासह शेतकऱ्यांनी उपस्थित केला. कोल्हापूर-सांगली रस्त्यासाठी जमिनी दिल्या. आता पुन्हा आम्हीच का जमिनी द्यायच्या, अशीही त्यांनी विचारणा केली. कोणत्याही परिस्थितीत नव्या महामार्गासाठी जमीन देणार नाही, मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना विरोध करण्यावर ठाम असल्याचेही शेतकऱ्यांनी सांगितले.

यावेळी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे प्रकल्प संचालक बी. एस. साळोखे, वारणा सहकारी बँकेचे संचालक सुभाष पुरंदर-पाटील, अनिल पुजारी, रंगराव गायकवाड, अॅड. प्रशांत पाटील, धीरज पाटील, अॅड. सुनील पाटील, विजय चौगुले यांनी चर्चेत सहभाग घेतला.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कागल ग्रामसेवकांचे आंदोलन मागे

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कागल पंचायत समिती सदस्य रमेश तोडकर यांनी व्हनाळी येथील ग्रामसेवक अजित जगताप यांना धमकावल्याच्या प्रकरणामुळे निर्माण झालेला वाद बुधवारी जिल्हा परिषदेपर्यंत पोहोचला. पंचायत समिती पदाधिकारी सदस्यांनी व ग्रामसेवक संघटनेच्या प्रतिनिधींनी स्वतंत्रपणे जि.प.च्या अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या. दरम्यान, सीईओ अमन मित्तल यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर ग्रामसेवकांनी बुधवारपासून पुकारलेले काम बंद आंदोलन मागे घेतले. १७ ऑक्टोबर रोजी कागल येथे संयुक्त बैठक होणार आहे.

रमाई आवास योजनेतून लाभार्थ्यांचे घर मंजूर करण्यावरून सदस्य तोडकर यांनी ग्रामसेवक जगताप यांना धमकी दिल्याची संघटनेची तक्रार आहे. कागलच्या सभापती राजश्री माने, उपसभापती विजय भोसले, सदस्य रमेश तोडकर, विश्वास कुराडे, कमल पाटील, जोती मुसळे, राजेंद्र सुतार, राहूल मगदूम आदींनी जिल्हा परिषदेत येऊन सीईओ मित्तल यांना निवेदन केले. ग्रामसेवकांवर कसलाही दबाव टाकले नाही. कामकाजात हस्तक्षेप केला नाही. योजना लाभार्थ्यापर्यंत पोहचल्या पाहिजेत अशी भूमिका असल्याचे सांगितले.

ग्रामसेवक संघटनेचे एन. के. कुंभार, साताप्पा मोहिते, काकासाहेब पाटील,साताप्पा कांबळे, आर.के. पाटील, आर.ए. मगदूम, श्रीकांत कोळी आदींच्या शिष्टमंडळाने सायंकाळी सहाच्या सुमारास मित्तल यांची भेट घेतली. याप्रसंगी मित्तल यांनी १७ ऑक्टोबरला कागल येथे पंचायत समिती सदस्य व ग्रामसेवकांची बैठक घेऊ आणि प्रश्न निकाली काढू. यामुळे ग्रामसेवकांनी आंदोलन मागे घ्यावे असे आवाहन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेसर ध्रुव मोहिते यश

0
0

कोल्हापूर : दिल्ली येथील बुद्ध इंटरनॅशनल सर्किटवर झालेल्या फोक्सवगन अॅमिओ चषक मोटार स्पर्धेत कोल्हापूरच्या ध्रुव मोहितेने पहिल्या शर्यतीत सातवा क्रमांक मिळवत विजेतपदाकडे झेप घेतली. मोसमातील अखेरच्या शर्यतीत त्याने दुसऱ्या क्रमांकावर झेप घेत फोक्सवॅगन चषकावर नाव कोरले. अशा स्पर्धेत विजेतेपद मिळवणारा तो पहिला मराठी खेळाडू ठरला आहे. स्पर्धा चार फेरीत दहा रेसमध्ये पार पडली. स्पर्धेत मिळवलेल्या गुणानुसार त्याला विजेता घोषित करण्यात आले. ध्रुवला फोक्सवॅगन रेसिंगचे प्रमुख शिरीष विस्सा, आर. एम. मोहिते, मोहिते अकादमीचे अध्यक्ष शिवाजीराव मोहिते यांचे मार्गदर्शन लाभले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विनापरवाना जळाऊ लाकडाचा ट्रक पकडला

0
0

फोटो...

म. टा. वृत्तसेवा, राधानगरी

राधानगरी येथून गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीकडे चोरट्या, विनापरवाना लाकडाची वाहतूक करत असलेला ट्रक पेंडाखळे विभागाचे वनपाल विनायक पाटील यांनी पकडला. ट्रकमध्ये सुमारे सव्वातीन लाखांचे जळाऊ लाकूड होते. भोगावती (ता. करवीर) येथे बुधवारी पहाटे साडेचारच्या सुमारास कारवाई करण्यात आली.

याबाबत मिळालेली माहिती अशी : राधानगरीहून गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहत, इचलकरंजीकडे चोरट्या, विनापरवाना जळाऊ लाकडाची वाहतूक होत असल्याची माहिती पेंडाखळे विभागाचे वनपाल विनायक पाटील यांना मिळाली. त्यांनी बुधवारी पहाटे भोगावती येथे सापळा लावून २८ घनमीटर जळाऊ लाकूड घेऊन जाणारा ट्रक (एम एच- ए- ९८६६) अडवून परवान्याची मागणी केली असता ट्रकचालक नागेश रेडेकर याने परवाना नसल्याचे सांगितले. कारवाईनंतर करवीरचे वनरक्षक रवी मोरे, राधानगरीचे वनपाल आर. एस. तिवडे यांनी तत्काळ भेट देऊन घटनेचा पंचनामा केला.

००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवमानप्रकरणी आयुक्तांचे महापौरांना पत्र

0
0

खान, भोपळे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'महापालिकेच्या विशेष सभेत नगरसेवक नियाज खान व कमलाकर भोपळे यांनी सभागृहाचा अवमान केला आहे, भविष्यात सभागृहात असे प्रकार घडू नयेत यासाठी दोन्ही सदस्यांवर करवाई करावी, या मागणीचे विनंती पत्र महापौर शोभा बोंद्रे यांना दिले आहे', अशी माहिती आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली. पत्राद्वारे सभागृहात आचासंहिता ठरवण्याची मागणीही केली आहे.

आयुक्त डॉ. चौधरी म्हणाले, 'महापालिकेच्या महासभेत यापूर्वी बॅनरबाजी, तिरडी व पाण्याची बाटली आणणे असे प्रकार तीन ते चार वेळा घडले. महासभेमध्ये असे प्रकार खपूनही गेले. पण मंगळवारी झालेल्या सभेत नियाज खान यांनी जलअभियंता सुरेश कुलकर्णी यांच्यावर पाणी फेकले. तर कमलाकर भोपळे घागर घेवूनच आले. दोन्ही सदस्यांकडून सभेत बसून सभागृहाचा अवमान केला असून सभा कामकाज नियमावलीचा भंग केला आहे. शहराचे प्रश्न मांडण्याचे अधिकार सदस्यांना असले, तरी सभेच्या नियमांचे अनुकरण करणेही सदस्यांकडून अपेक्षित आहे. दोन्ही सदस्यांनी नियमावलीचा भंग केला असून सदस्यांना नियम भंग केल्यास पिठासन अधिकारी म्हणून कारवाई करण्याचा अधिकार महापौरांना आहेत. परिणामी दोन्ही सदस्यांवर कारवाई करण्यासाठी पत्रव्यवहार केला आहे.'

'थेट सभागृहात सदस्य अधिकाऱ्यांशी असे वर्तन करत असतील, तर प्रत्यक्ष जाग्यावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना काम करणे मुश्कील होईल. सभेत सदस्यांकडून अवमान होत असताना, महापौरांचा प्रशासनाला पाठिंबा मिळाला. सर्वच गटनेत्यांनी घटनेचा तीव्र निषेध केला. सभागृहात घटना घडल्यानंतर पोलिस प्रशासनानेही पाठिंबा दर्शवला आहे. पण अशा स्वरुपाच्या घटना घडू नयेत याची सर्वांनी काळजी घेवून सभागृहाचा मान राखण्यासाठी कारवाईची मागणी केली आहे. सभागृहात कोणतेही साहित्य घेवून येण्यास मज्जाव करण्याचे अधिकार महापौरांना असल्याने त्यांच्या सुचनेनुसार सुरक्षारक्षक असे प्रकारचे साहित्य घेवून येण्यास मज्जाव करतील,' असेही आयुक्त डॉ. चौधरी यांनी सांगितले.

...................

चौकट

ज्येष्ठ सदस्यांना अभय

पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यासाठी बोलवलेल्या विशेष सभेत खान व भोपळे यांच्यासोबत काही ज्येष्ठ सदस्यांनी फाइल्स भिरकवल्या. याबाबत आयुक्तांनी तक्रार केलेली नसली, तरी त्यांनी ज्येष्ठ सदस्यांच्या कृतीबाबत नाराजी व्यक्त केली. सभागृहातील ज्येष्ठ सदस्यांच्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

................

कोट

'मंगळवारी झालेल्या सभेतील प्रकार निंदनीय असला, तरी येथील नागरिक चांगले आहेत. त्यामुळे एका प्रकारावरुन पोलिस संरक्षण घेण्याची आवश्यकता नाही. पण महापालिकेकडे असलेल्या सुरक्षारक्षकांना सभेत उपस्थित राहण्याची सूचना केली जाईल.

डॉ. अभिजीत चौधरी, आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कामचुकार कर्मचाऱ्यांना दणका

0
0

३२ आरोग्य कर्मचाऱ्यांवर कारवाई

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य व घनकचरा व्यवस्थापन विभागाकडील ३२ कामचुकार कर्मचाऱ्यांना प्रशासनाने दणका दिला आहे. विशेषत: सफाई व झाडू कर्मचाऱ्यांवर पगार कपात, दंडात्मक करवाईसह खातेनिहाय चौकशीचे आदेश आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी बुधवारी दिले. आयुक्तांच्या कारवाईमुळे कामचुकार कर्मचाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.

महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य व घनकचरा व्यवस्थापन विभागाकडील काही सफाई व झाडू कामगार कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता, वारंवार गैरहजर राहत आहेत. दीर्घ मुदतीत गैरहजर राहिल्यामुळे शहरातील आरोग्य व घनकचरा व्यवस्थापनसारख्या अत्यंत संवेदनशील कामकाजामध्ये व्यत्यय निर्माण झाला आहे. वारंवार गैरहजर राहून कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांच्या आदेशाचे जाणीवपूर्वक उल्लंघन केले आहे. या गंभीर वर्तनाबाबत मुंबई प्रांतिक महापालिका अधिनियम १९४९ मधील कलम ५६ '२' च्या तरतुदीचा आधार घेवून कामचुका कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

कायद्यातील तुरदीचा आधार घेत सामान्य प्रशासन तथा रचना व कार्यपद्धती विभागाने ३२ कर्मचाऱ्यांवर कारवाई केली आहे. यापैकी रमेश अजित येडाळे, चेतन प्रदीप नरवाळे, अरुण राजाराम कांबळे यांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. संजय काळे, राजेंद्र कांबळे, गणेश कांबळे, नामदेव कांबळे, सर्जेराव मिसाळ, महावीर दाभाडे, सागर कांबळे यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे. तर साऊताई कांबळे, लता गोयल, दगू लकडे, उषा करडे, विद्यानंद बुचडे, तानाजी बिरांजे, नितीन लाड, महेश धरणिया, चंद्रभागा खेत्रे, श्रीकांत तोरणे, जितेंद्र कांबळे, सचिन सागवेकर, अरुण थोरवडे, अनिल माने, अमोल साठे, मंगल तडाखे, सागर चावरे, कल्पना सासने, सुरेश लोखंडे, सदाशिव शिंदे यांच्या एक ते दोन वेतनवाढ रोखण्याचे आदेश आयुक्त डॉ. चौधरी यांनी दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शुक्रवारी, शनिवारी अपुरा पाणीपुरवठा

0
0

रिंगरोड येथील गळती काढण्याच्या कामाला उद्यापासून सुरुवात

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिका पाणीपुरवठा विभागाच्यावतीने साळोखेनगर रिंगरोड येथे शुक्रवार (ता. १२) पासून गळती काढण्याच्या कामाला सुरुवात होणार आहे. परिणामी शहरातील 'ए', 'बी', 'ई' वॉर्ड व इतर सलंग्न उपनगरे आणि ग्रामीण भागाचा शुक्रवार व शनिवारी दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. बंद काळात नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने व जपून वापर करावा असे, आवाहन पाणीपुरवठा विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून साळोखेनगर रिंगरोड परिसरातील डॉ. डी. वाय. पाटील मेडीकल कॉलेज जवळील ११०० मिमी व्यासाच्या मुख्य जलवाहिनीला गळती लागली आहे. गळती काढण्याच्या कामाला शुक्रवारपासून सुरुवात होणार आहे. दुरुस्तीवेळी मुख्य जलवाहिनीवरील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. दुरुस्तीचे काम दोन दिवस सुरु राहणार असल्याने त्याचा परिणाम पुढील भागावर होणार आहे.

ए व बी वॉर्डमधील साळोखेनगर, कणेरकर नगर, आपटेनगर, संभाजीनगर, कळंबा फिल्टर परिसर, जरगनगर, एल. आय. सी. कॉलनी, बालाजी पार्क, हॉकी स्टेडियम परिसर, सुभाषनगर, जवाहरनगर, नेहरुनगर, मंगळवार पेठ, मिरजकर तिकटी, शिवाजी पेठ, जुना वाशीनाका, नाळे कॉलनी. ई वॉर्डमधील राजारामपुरी विभागातंर्गत राजेंदनगर, वैभव टेकडी, सम्राटनगर, पायमल वसाहत, दौलतनगर, वाय. पी. पोवार नगर, शिवाजी उद्यमनगर, बागल चौक, शाहू मिल कॉलनी, मातंग वसाहत, संपूर्ण राजारामपुरी, काटकर माळ, माळी कॉलनी, टाकाळा, जामसांडेकर माळ झोपडपट्टी. तसेच ई वॉर्ड कावळा नाका विभागातंर्गत शिवाजी पार्क, पाच बंगला परिसर, साइक्स एक्स्टेन्शन, रुईकर कॉलनी, महाडीक माळ, मार्केट यार्ड, लोणार वसाहत. राजीव गांधी वसाहत आदी भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. बंद काळात या भागातील नागरिकांना पिण्याचे पाणी टँकरद्वारे पुरवण्यात येणार आहे. तसेच बंद काळात नागरिकांनी पाणी काटकसरीने व जपून वापरण्याचे आवाहन जलअभियंता सुरेश कुलकर्णी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निशिकांत सरनाईकांनी राजीनामा द्यावा

0
0

युनियनचे सचिव प्रमोद पाटील यांची पत्रकार बैठकीत मागणी

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'महापालिकेच्या म्युनिसिपल ट्रान्सपोर्ट वर्कर्स युनियनचे अध्यक्ष निशिकांत सरनाईक यांच्या कार्यपद्धतीवर कर्मचारी सभासद नाराज असून त्यांनी कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न सोडविण्या ऐवजी प्रलंबित ठेवले आहेत. तसेच गेल्या तीन वर्षांपासून युनियनचा हिशोब दिलेला नाही. सरनाईक यांनी युनियनचा स्वत: राजीनामा द्यावा अन्यथा सभा घेवून नवीन कार्यकारिणी जाहीर करु,' असा इशारा युनियनचे सचिव प्रमोद पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिला.

पाटील म्हणाले, 'अध्यक्ष सरनाईक यांचा दोन वर्षांपासून मनमानी कारभार चालू आहे. कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी ते प्रयत्न करत नाहीत. परिणामी त्यांच्या कार्यपद्धतीवर सदस्य नाराज आहेत. सरनाईक सेवानिवृत्त झाले असून तीन वर्षाचा हिशोब दिलेला नाही. त्यांच्या मनमानी कारभाराचा जाब विचारण्यासाठी शनिवार (ता.२०) पर्यंत सर्वसाधारण सभा घ्यावी, असे पत्र कर्मचाऱ्यांनी दिले आहे. जर त्यांनी सभा घेतली नाही, तर शनिवारी (ता. २७) सभा घेवून नवीन कार्यकारणी जाहीर करणार आहे.'

पत्रकार परिषदेस युनियनचे इर्शाद नायकवडी, मानसिंग जाधव, मनोज नार्वेकर, निजाम मुल्लानी, विजय भोसले, संभाजी शिंदे, मुकूंद सुर्यवंशी, अमर पाटील, संजय जाधव, रणजीत पाटील, सुरेश पाटील यांच्यासह केएमटी कर्मचारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भारनियमन रद्द करा, अन्यथा ठिय्या

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

भारनियमनामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. उत्पादन वाढीवर परिणाम होऊन शेतकरी उद्ध्वस्थ होण्याच्या मार्गावर आहे. महावितरणने चार दिवसांत योग्य ती कार्यवाही करून कृषिपंपांचे भारनियमन रद्द करावे, अन्यथा शेतकऱ्यांसहित महावितरणच्या दारात ठिय्या आंदोलन करू, अशा इशारा इरिगेशन फेडरेशनच्या प्रतिनिधींनी व आमदारांनी दिला.

आमदार सतेज पाटील, आमदार चंद्रदीप नरके, इरिगेशन फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना अल्टिमेटम दिला. भारनियमनसह अन्य प्रश्नावरुन अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. कृषिपंपाचे भारनियमन रद्द झाले नाही तर वीजे बिले भरणार नाही, असा इशारा दिला. ताराबाई पार्क परिसरातील महावितरणच्या कार्यालयात गुरुवारी जवळपास तासभर बैठक झाली. अधीक्षक अभियंता शैलेंद्र राठोर यांना धारेवर धरले. बैठकीत ट्रान्सफार्मर दुरुस्ती, वीज कनेक्शन खंडीत करण्यावरून तक्रारींचा पाढा वाचला.

भारनियमन हे तात्पुरत्या कालावधीसाठी असल्याचे उत्तर राठोर यांनी दिले. महावितरणचे मुख्य अभियंता अनिल भोसले यांनी भारनियमन कमी करण्यासंदर्भात मुख्य कार्यालयाला कळविल्या जातील. शिवाय महावितरणशी निगडीत तक्रारींची सोडवणूक करण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी विभागीय व उपविभागीय कार्यालयात बैठका घेण्यात येतील असे सांगितले.

आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्यात ९७ टक्के वीज बिलाचा भरणा होतो. मग भारनियमन करून शेतकऱ्यांवर अन्याय कशासाठी? प्रामाणिकपणाने वीज बिले भरणे हे चुकीचे आहे का? महावितरणचे कर्मचारी शेतकऱ्यांची उद्धटपणे वागतात. कृषिपंपाचे वीज बिल शेतकऱ्यांना वसूल करायला सांगतात, हा काय प्रकार आहे? असा खडा सवाल त्यांनी राठोर यांना केला.

आमदार चंद्रदीप नरके यांनी जिल्ह्यातील पश्चिम भागातील पिके धोक्यात आहेत. भारनियमन रद्द करा. ट्रान्सफार्मर जोडण्याची जबाबदारी महावितरणची असताना कर्मचारी, अधिकारी जबाबदारी का झटकतात? शेतकऱ्यांवर ट्रान्सफार्मर आणण्याची सक्ती कशासाठी? ट्रान्सफार्मर दुरुस्ती, कनेक्शन जोडणीसंदर्भात कर्मचाऱ्यांच्या कामकाजात सुधारणा आवश्यक आहे.' अशा तक्रारी केल्या. चर्चेत करवीर पंचायत समिती सभापती राजेंद्र सूर्यवंशी, बाबासाहेब पाटील-भुयेकर यांनी सहभाग घेतला. याप्रसंगी चंद्रकांत पाटील, आर. के. पाटील, सखाराम पाटील, आनंद नलवडे, रणजित जाधव, संजय चौगुले, शशिकांत खोत, मारुती पाटील आदी उपस्थित होते.

तर 'एन.डीं.'च्या नेतृत्वाखाली ठिय्या

'महावितरण, कृषिपंपांना मिळणाऱ्या आठ तासामध्ये कधीही भारनियमन करत आहे. त्यामुळे पाण्याचा फेर मिळत नाही. शेतकऱ्यांनी पाणी पाजलेल्या शेतालाच परत पाणी मिळत आहे. महावितरणने वस्तुस्थिती लक्षात घ्यावी, अन्यथा संघटनेचे नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यालाच्या दारात ठिय्या आंदोलन करु.'असा इशारा विक्रांत पाटील यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गायक शिक्षक मंचतर्फे उद्या सांस्कृतिक कार्यक्रम

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या गायक शिक्षक मंचतर्फे शनिवारी (ता.१३) मराठी, हिंदी गीतांच्या सादरीकरणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. शाहू स्मारक भवन येथे सायंकाळी पाच वाजता कार्यक्रमाला सुरुवात होईल. जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या गायन कलेला प्रोत्साहन मिळावे यासाठी 'गायक शिक्षक मंच' वॉट्सअॅप ग्रुपची स्थापना केली आहे. या ग्रुपच्या माध्यमातून मराठी, हिंदी गाण्यांचे कार्यक्रम सादर करण्यात येणार आहेत. राजेंद्र कोरे, कुमार पाटील, बाळ डेळेकर काम पाहत आहेत. रसिकांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाच लाख कुटुंबांना १ किलो साखर

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सरकारच्या अन्न, नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण विभागातर्फे प्राधान्य गटातील पात्र कुटुंबास या महिन्यात १ किलो साखर देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा लाभ जिल्ह्यातील शहरी भागातील ३ लाख ८७ हजार २३२ तर ग्रामीणमधील १ लाख ११ हजार ८६३ अशा एकूण ५ लाख १६ कुटुंबास लाभ होणार आहे.

यापूर्वी केवळ अंत्योदय शिधापत्रिकाधारकांनाच साखर मिळत होती. ग्रामीण भागात ४४ हजार तर शहरातील ५९ हजारांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांस प्राधान्य शिधापत्रिका आहे. यापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना अंत्योदय शिधापत्रिका आहे. दरम्यान, अन्न सुरक्षा कायद्यातर्गंत प्रत्येक अंत्योदय शिधापत्रिकाधारकास रास्त भाव दुकानातून दरमहा २ रुपये किलोने २० किलो गहू, ३ रुपयाने १५ किलो तांदूळ, १३ रूपये किलोने एक किलो साखर मिळते. प्राधान्य गटातील शिधापत्रिकेतील माणसी २ रूपयाने ५ किलो गहू, ३ रुपयाने २ किलो तांदूळ मिळते. या महिन्यात प्रती किलो २० रुपयांप्रमाणे साखरही देण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. राज्यासाठी वित्तविभागने ४१ कोटी ७५ लाखांची खर्चास मंजूरी दिली आहे. यामुळे नव्या नियमानुसार कारखानदारांच्या गोडाऊनमधून साखर खरेदी करून वाटप करण्यात येणार आहे. पहिल्या टप्यात या महिन्यात दिले जाणार आहे. पुढच्या महिन्यात मिळणार किंवा नाही, यासंबंधीची स्पष्टता आदेशात केलेली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘राफेलची संसदेत चर्चा व्हायला हव’

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'मध्यप्रदेश, राजस्थानसह पाच राज्यांत निवडणुकीची घोषणा झाली आहे. लोकसभा निवडणुकीचा बिगुल लवकरच वाजेल. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गेल्या २३ जानेवारीलाच स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे स्वबळावर लढण्याबाबतचा अंतिम निर्णय पक्षप्रमुखच घेतील,' असे शिवसेनेच्या उपनेत्या आमदार नीलम गोऱ्हे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

आमदार गोऱ्हे गुरुवारी कोल्हापूर दौऱ्यावर आल्या होत्या. त्यानंतर सरकारी विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत राफेल प्रश्नावरून राहुल गांधी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका सुरू केली आहे, याकडे त्यांचे लक्ष वेधले असता, आमदार गोऱ्हे म्हणाल्या, 'राफेल प्रश्नावर अनेकांच्या मनात शंका असल्याने त्याच्यावर स्पष्टीकरण दिलेच पाहिजे. ज्या फ्रेंच पत्रकाराने फ्रान्सच्या पंतप्रधानांची मुलाखत घेतली, त्यामध्ये कोणाचेही नाव घेतलेले नाही. पण राफेल विमानाची किंमत का व कशी वाढली, याची लोकांना माहिती हवी आहे. राफेल प्रश्नावर खुली चर्चा लोकसभेत झाली पाहिजे.'

सांगली जिल्ह्यातील कुरळप गावातील आश्रमशाळेत घडलेल्या अत्याचाराची माहिती त्यांनी जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांकडून घेतली. राज्यात ज्या ठिकाणी आश्रमशाळा आहेत तिथे महिला सुपरिटेंडची नियुक्ती करावी, अशी मागणी करताना त्यांनी केली.

गोऱ्हे म्हणाल्या, 'सध्या 'मी टू' मोहिमेतून अनेक वर्षांपूर्वी झालेल्या अन्यायाबाबत महिला बोलू लागल्या असल्या तरी कायदेशीर कारवाईसाठी पोलिसांकडे तक्रार करणे आवश्यक आहे. पण पोलिस ठाण्यात 'मी टू'बद्दल तेथील कर्मचारी व अधिकाऱ्यांना कोणत्या कायद्याखाली तक्रार घ्यायची ही समस्या असते.'

००००

पालकमंत्र्यांची आमदार गोऱ्हे यांची चर्चा

पत्रकार परिषदेपूर्वी त्यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी धावती भेट घेत १५ मिनिटे चर्चा केली. यावेळी दुष्काळाच्या प्रश्नावर चर्चा झाल्याचे आमदार गोऱ्हेंनी सांगितले. दुष्काळग्रस्त भागातील महिला व किशोरी युवतीबाबत आमदार गोऱ्हे यांनी काही सूचना मांडल्या. त्या म्हणाल्या, 'दुष्काळग्रस्त भागात अनेक वर्षे आपण काम करत आहोत. ऊसतोडणी महिला कामगारांसाठी पाळणाघराची सोय केली पाहिजे. ज्या गावातून ऊसतोडणी कामगार स्थलांतरित होतात, त्या गावातील महिला व १० ते १२ वयोगटातील किशोरी मुलींच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करावी लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘यशवंत’साठीचे वाढीव प्रस्ताव बारगळणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात येणाऱ्या 'यशवंत ग्राम' आणि 'यशवंत सरपंच' पुरस्कार प्रस्तावात पदाधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपावरून सदस्यांत नाराजी पसरली आहे. सदस्यांचा रोष पत्करण्यापेक्षा वाढीव प्रस्ताव मागविण्याचा निर्णय मागे घेतला जाण्याची चिन्हे आहेत. पदाधिकारी व अधिकाऱ्यांची शुक्रवारी (ता.१२) यासंदर्भात बैठक होणार आहे.

गावपातळीवर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामपंचायती व सरपंचांना जिल्हा परिषदेमार्फत पुरस्कार दिले जातात. प्रत्येक तालुक्यातील दोन गावांना 'यशवंत ग्रामपंचायत' पुरस्कार दिला जातो. तसेच पहिल्या क्रमाकांच्या गावाच्या सरपंचांना 'यशवंत सरपंच' पुरस्काराने सन्मानित केले जाते. तालुका पातळीवरून संबंधित गावांची शिफारस होते. यंदाच्या प्रस्तावात पदाधिकाऱ्यांना अपेक्षित गावांचा समावेश नसल्याचे निदर्शनास आले आणि या दोन्ही पुरस्कारांसाठी वाढीव प्रस्ताव मागविण्याची शक्कल काहींनी लढविली.

मंगळवारी जिल्हा परिषदेत पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जिल्हा समितीची बैठक झाली. त्यावेळी तालुका पातळीवरुन जादा प्रस्ताव मागविण्याची सूचना अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी केली. दरम्यान, वाढीव प्रस्ताव मागविण्याच्या सूचनेवरून निवड समिती सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. पुरस्कार निवडीच्या निकषात बदल करण्यामागील कारण काय, असा सवाल आता सदस्य करत आहेत. जिल्हा परिषदेत गेल्या काही महिन्यांपासून पदाधिकारी आणि सदस्यांत निधी वाटप व विकासकामांवरून कामावरून अंतर वाढत आहे.

'यशवंत'पुरस्कार योजनेच्या निकषात बदल करण्याच्या काही जणांच्या अट्टहासामुळे सदस्य आणि पदाधिकाऱ्यांत पुन्हा मतभेद वाढण्याची चिन्हे आहेत. यामुळे यंदा मागील वर्षीप्रमाणेच पुरस्कार योजना राबविण्याचा विचार सुरू आहे. पुरस्कारासाठी वाढीव प्रस्ताव मागविण्याचा निर्णय रेटला तर सदस्यांची नाराजी आणखी वाढू शकते हे पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आले. यामुळे पुरस्कारासाठी वाढीव प्रस्ताव मागविण्याचा निर्णय मागे घेतला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निधन : वैशाली सरवदे

0
0

वैशाली सरवदे

सांगली : दत्तनगर विश्रामबाग येथील वैशाली युवराज सरवदे (वय ४८) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. कवठेमहांकाळ पंचायत समितीमधील शाखा अभियंता युवराज गुंडा सरवदे यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी, सून असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शनिवारी (ता.१३) सकाळी नऊ वाजता सांगली येथील अमरधाम येथे आहे.

०००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणी पुरवठ्यासाठी कसबा बावड्यात रस्ता रोको

0
0

म. टा. वृत्तसेवा, कसबा बावडा

कसबा बावडा येथे कमी दाबाने व अपुरा आणि अनियमित पाणीपुरवठा होत आहे. याबाबत महापालिकेच्या निषेधार्थ राजश्री शाहू कॉलनी व परिसरातील नागरिकांनी महिलांनी संतप्त भावना व्यक्त करत डोक्यावर घागरी घेऊन दीड तासांहून अधिक वेळ रास्ता रोको केला. यावेळी नगरसेविका माधुरी लाड, नगरसेवक मोहन सालपे , माजी स्थायी सभापती डॉ संदीप नेजदार हे उपस्थित होते. यावेळी जलअभियंता सुरेश कुलकर्णी यांच्या आश्वासनांनंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

गेल्या दोन वर्षांपासून पिंजार गल्ली भागातील राजर्षी शाहू कॉलनी व परिसरात अपुरा व अनियमित पाणीपुरवठा होत आहे. गेल्या दोन दिवसापासून नळाला पाणीच आले नाही. त्याचबरोबर महापालिकेकडे पाण्याचे टँकरही अपुरे आहेत. ऐन सणात पाण्यासाठी दाही दिशा जावे लागल्यामुळे गुरुवारी महिलांनी पाण्याच्या रिकाम्या घागरी डोक्यावर घेत मुख्य रस्त्यावर ठिय्या मारून रास्ता अडवला. अचानक मुख्य रस्त्यावर आंदोलन झाल्याने दोनही बाजूस वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. स्थानिक नगरसेविका माधुरी लाड, नगरसेवक मोहन सालपे माजी स्थायी सभापती डॉ संदीप नेजदार हे आंदोलनस्थळी आले. त्यांनी जलअभियंता सुरेश कुलकर्णी व उप जलअभियंता राजेंद्र हुजरे यांना आंदोलनस्थळी बोलावून घेतले. त्यांना नेहमीच्या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी महिलांनी प्रश्नांचा भडिमार केला.

स्थानिक प्रतिनिधीनी आंदोलनकर्त्यांची बाजू घेऊन यावर ताबडतोब मार्ग काढण्याची मागणी केली. यावेळी पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांना बोलावून चर्चा करण्यात आल्या. त्यावेळी मुख्य लाइनला नवीन टी बसविण्याचे काम ताबडतोब करण्यात येईल. त्यामुळे पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे आश्वासन देण्यात आल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व सुमन खोत, सपना जाधव, आनंदी जांभळे, भारती जाधव, शीतल पाटील, निर्मला चव्हाण व मीरा सावंत आदींनी केले.

फोटो

कसबा बावडा येथील राजश्री शाहू कॉलनी व परिसरातील अपुऱ्या व अनियमित पाणीपुरवठ्याच्या निषेधार्थ संतप्त भावना व्यक्त करत महिलांनी डोक्यावर घागरी घेऊन महापालिकेच्या निषेधार्थ दीड तास रास्ता रोको केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पीएचडीच्या मौखिक परीक्षेचा नियमभंग

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

प्राध्यापकांतील गटतट, काहीजणांच्या 'हम करे सो कायदा' अशा वृत्तीने शिवाजी विद्यापीठाचा कॅम्पस गाजत असतो. यात आता पीएचडीच्या अंतिम मौखिक (व्हायवा) परीक्षेवळी नियमभंग झाल्याची तक्रार प्रशासनाकडे दाखल झाली आहे. विभागाला डावलून अन्यत्र मौखिक परीक्षा घेणे आणि विनापरवाना लेटरहेडचा वापर केल्याच्या तक्रारीनंतर प्रशासनाने गाइडसह दोघा प्राध्यापकांना नोटिसा काढल्या आहेत. मात्र, प्रशासनाकडून याप्रश्नी सखोल चौकशी करून कारवाईऐवजी प्रकरण मिटण्याच्या हालचाली सुरू आहेत, हे धक्कादायक आहे.

व्हायवा सादरीकरणप्रसंगी नियमांना फाटा देण्याच्या प्रकारावरून कॅम्पसमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे. विद्यापीठातील व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यापर्यंत या संदर्भात तक्रारी झाल्या आहेत. व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत व्हायवाचा प्रश्न गाजण्याची चिन्हे आहेत. विद्यापीठातील अॅग्रो केमिकल अँड पेस्ट मॅनेजमेंट विभागातील एका विद्यार्थिनीची ऑगस्ट महिन्यात पीएचडीसाठी अंतिम मौखिक परीक्षा झाली. विद्यापीठाच्या संकेतप्रमाणे संबंधित विद्यार्थिनी ज्या विभागात शिकते, त्या विभागात मौखिक परीक्षा होते. मात्र, या पद्धतीला फाटा देण्याचा प्रकार घडला.

'अॅग्रो केमिकल...'च्या विद्यार्थिनीची मौखिक परीक्षा पर्यावरणशास्त्र विभागात झाली. संबंधित विद्यार्थिनीचा गाइड हा रसायनशास्त्र विभागातील आहे. विद्यापीठाने मौखिक परीक्षेसाठी तीन जणांची कमिटी नेमली होती. त्यामध्ये गाइड, प्रमुख व्यक्ती आणि तज्ज्ञ परीक्षक असा समावेश असतो. त्या तिघांच्या उपस्थितीत 'अॅग्रो केमिकल...'मध्ये मौखिक परीक्षा होण्याऐवजी पर्यावरणशास्त्र विभागात झाली. मौखिक परीक्षा झाल्यानंतर तिघांच्या कमिटीने संबंधित विभागाच्या प्रमुखामार्फत प्रशासनाला शिफारसीसंदर्भात अहवाल द्यावयाचा असतो.

चौकशीऐवजी प्रशासन गप्प

या प्रकरणात 'अॅग्रो केमिकल...' विभागप्रमुखांना बाजूला सारून प्रशासनाला अहवाल सादर केला गेला. मात्र, त्यासाठी विभागाच्या लेटरपॅडचा वापर झाला. हा सारा प्रकार नियमबाह्य असल्याची तक्रार विभागप्रमुखांनी प्रशासनाकडे केला. त्यानंतर प्रशासनाची चक्रे फिरली आणि त्यांनी त्या गाइडसह विद्यापीठातील अन्य एका प्राध्यापकांना नोटीस काढली. त्यावर त्या प्राध्यापकांनी विभागातच मौखिक परीक्षा झाल्याचा खुलासा केला आहे. मात्र, प्रशासनाने या साऱ्या प्रकारावर कुठलीच कार्यवाही केली नाही. नियमांना फाटा देऊन पीएचडीचा व्हायवा घेणे, विनापरवाना लेटरहेडचा वापर अशा चुकीच्या गोष्टी घडूनही प्रशासन गप्प का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोहारांच्या चौकशीची रुपरेषा आज ठरणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषद प्रशासनाने कार्यमुक्त केलेल्या शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्या कामकाजाची चौकशी करण्यासाठी स्थापन झालेल्या चौकशी समितीची शुक्रवारी (ता. १२) बैठक होत आहे. बैठकीत लोहारांच्या चौकशीची रुपरेषा ठरणार आहे. दरम्यान लोहार यांच्या कामकाजाबद्दल जिल्हा परिषद प्रशासनाने लेखी स्वरुपात तक्रारी दाखल झाल्या आहेत.

शिक्षण समिती सभापती अंबरिश घाटगे हे पाच सदस्यीय चौकशी समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या दालनात शुक्रवारी दुपारी दोन वाजता सदस्यांची बैठक होणार आहे. चौकशी समितीत सदस्य अरुण इंगवले, प्रसाद खोबरे, भगवान पाटील आणि सचिव म्हणून उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ यांचा समावेश आहे. समितीने ९० दिवसात चौकशी अहवाल स्थायी समितीला सादर करावयाचा आहे.

दरम्यान लोहार यांच्याबद्दल जिल्हा परिषद सदस्यांकडे अनेकांनी तक्रारी सुपूर्द केल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत शिक्षक लोहार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवून चौकशीचा ठराव केला होता. दरम्यान तांत्रिक बाबी पुढे करत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याच्या कारवाईस विलंब होत असल्यामुळे सदस्य आक्रमक झाले. गेल्या आठवड्यात लोहारांना कार्यमुक्त करण्यात आले.

तर पद रद्दची शिफारस

लोहार यांनी चुकीच्या पध्दतीने शिक्षक मान्यता दिल्याच्या तक्रारी आहेत. शिक्षक मान्यतेत मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाली झाल्याचा आरोप सदस्यांनी सर्वसाधारण सभेत केला होता. चौकशी समितीत या साऱ्या प्रकरणांची शहानिशा होणार आहे. चौकशीत, पद मान्यता चुकीच्या पध्दतीने झाल्याचे स्पष्ट झाल्यावर संबंधित पदे रद्द करण्याची शिफारसही शिक्षण विभागाकडे केली जाण्याची शक्यता आहे. लोहार हे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभा व स्थायी समितीच्या बैठकीला गैरहजर असल्याची तक्रार आहे. लक्षतीर्थ वसाहत येथील एका शाळेसंदर्भात तक्रारीची चौकशी होणार आहे. इचलकरंजीतील ज्युनिअर कॉलेजच्या मुख्याध्यापकांच्या निलंबन व आत्मदहन प्रकरणी तक्रार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुचाकी चोरणारी टोळी गजाआड

0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

शहर व परिसरासह नजीकच्या कर्नाटक राज्यातून मोटारसायकली चोरणाऱ्या तिघांच्या आंतरराज्य टोळीला शिवाजीनगर पोलिसांनी गजाआड केले. त्यांच्याकडून एका चारचाकीसह सात दुचाकी मिळून पावणेचार लाखांचा मुद्देमाल जप्त केला. नागेश हणमंत शिंदे (वय २४, रा. गणेशनगर), रजत अशोक कांबळे (वय २३, रा. वसगडे, ता. करवीर) व बजरंग रामचंद्र चौधरी (वय ४८, रा. शेळके मळा) अशी त्यांची नावे आहेत, अशी माहिती अप्पर पोलिस अधीक्षक श्रीनिवास घाडगे यांनी दिली.

शहर व परिसरात वाहन चोरीचा तपास सुरू असताना पोलिस उपनिरीक्षक अनिल मोरे व पोलिस नाईक उदय पाटील यांना दोघे चोरीच्या मोटारसायकल विक्रीसाठी कलानगर परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार कलानगर येथील मैदानात सापळा रचून नागेश शिंदे व रजत कांबळे यांना पकडले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत दोन महिन्यांच्या कालावधीत इचलकरंजीसह कर्नाटकातील निपाणी येथून मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली. निपाणीतून चोरलेल्या एका मारुती कारसह पाच दुचाकी मोटारसायली इचलकरंजीतील एक अशा सहा मोटारसायकली हस्तगत केल्या. तसेच बजरंग चौधरीलाही अटक केली असून, त्याच्याडील अ‍ॅक्टिव्हा मिळून पावणेचार लाखांची वाहने जप्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्लास्टिक वस्तूंचा वापर सुरुच

0
0

कमी मायक्रॉनच्या पिशव्या, प्लास्टिक बाऊल, द्रोण, चमचे यांचा वापर खुलेआम

म.टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कॅरी बॅग्ज आणि थर्माकोल बंदीला यश आले असले तरी बंदी असलेल्या कमी मायक्रॉनच्या पिशव्या, प्लास्टिक बाऊल, द्रोण, चमचे यांचा खुलेआम वापर सुरुच आहे. महानगरपालिकेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या दुकानातून बंदी असलेल्या प्लास्टिक वस्तूंची विक्री सुरु आहे. तसेच बहुतांशी सरकारी कार्यालये, पोलिस ठाण्यात पाण्यासाठी लहान बाटल्यांचा सर्रास वापर सुरु आहे.

मार्च २०१८ रोजी राज्यात प्लास्टिक बंदी घोषणा करण्यात आली. पण तयार असलेल्या प्लास्टिक वस्तूंची विल्हेवाट करण्यासाठी राज्य सरकारने तीन महिन्यांची मुदत व्यापारी व दुकानदारांना दिली. बंदी संपल्यावर महानगरपालिका, जिल्ह्यातील नगरपालिकांनी बंदी असलेल्या प्लास्टिक वस्तूंची विक्री केल्याबददल दंडात्मक कारवाई केली. बंदीमुळे जवळजवळ ९० टक्के कॅरी बॅग्जचे प्रमाण कमी झाले. प्लास्टिक कपऐवजी कागदी कपांचा वापर चहा विक्रेते व हॉटेल चालकांकडून सुरु झाला आहे ही सकारात्मक बाब बंदीनंतर घडली. पण अन्य ठिकाणी प्लास्टिकचा वापर सुरुच आहे.

किराणा दुकानदारांकडून अजूनही कमी मायक्रॉनच्या पिशव्यातून धान्य, कडधान्ये, मसाले व अन्य पदार्थांची विक्री सुरु आहे. शहरातल मटण मार्केट, मटण,चिकण, मासे विक्रेत्यांकडून कमी मायक्रॅानच्या पिशव्यांचा वापर सार्वत्रिक झाला आहे. महानगरपालिकेच्या हाकेच्या अंतरावर दुकानातून बंदी असलेल्या प्लास्टिक वस्तू व पिशव्यांची विक्री सुरु असताना दुर्लक्ष केले जात आहे. प्लास्टिक कोटेड पत्रावळ्या, द्रोण बाऊलची विक्री सुरु आहे. शहरातील बागा, मैदाने, पंचगंगा नदी घाट या परिसरात जेवणावळी करणाऱ्या मंडळीकडून वापर केलेल्या प्लास्टिक कोटेड पत्र्यावळ्या, द्रोण, बाऊल, ग्लासचा खच पडलेला पहायला मिळतो. स्मशानातही रक्षा विसर्जनाच्या ठिकाणी प्लास्टिक द्रोण आढळतात. आचारी मंडळी प्लास्टिक बाऊल व चमच्यांचा वापर करताना दिसतात. शहरातील मंडळाकडून आयोजित केलेल्या प्रसाद, महाप्रसाद वाटपात प्लास्टिक कोटेड पत्र्यावळा व द्रोणाचा वापर केला जात आहे.

प्लास्टिक बंदीवर कारवाई करण्याचे अधिकार कायद्याने महानगरपालिका,नगरपालिका, ग्रामपंचायत, महसूल, पोलिस, अन्न व औषध प्रशासन, वन विभागासह सर्व विभागांना दिले आहेत. महानगरपालिका व नगरपालिकांकडून कारवाई केली जात आहे. पण ग्रामपंचायतीसह अन्य विभागाकडून प्लास्टिक बंदीवर कोणतीही कारवाई केल्याचे दिसत नाही. प्रादेशिक प्रदूषण नियंत्रण मंडळही कारवाईबाबत सुस्त आहे. सर्वच सरकारी कार्यालयांनी प्लास्टिक बंदीचा बडगा उचलला तर प्लास्टिक बंदी सत्यात उतरु शकेल. जिल्हाधिकारी कार्यालयाने पाण्याच्या प्लास्टिकच्या बाटल्या बंद करुन स्टीलचे तांबे व फुलपात्र वापरण्यास सुरुवात केली आहे. पण अन्य सरकारी कार्यालयात मात्र पाण्यासाठी प्लास्टिकच्या बाटल्या वापरून प्लास्टिक बंदी धाब्यावर बसवली जात आहे. ५०० मिली लीटरपेक्षा कमी मिली मीटरच्या बाटल्यातून पाणी, ज्यूस, शितपेयांना बंदी असली तरी छोट्या पाण्याच्या बाटल्या व ज्यूस, शितपेयांची विक्री सुरु आहे.

'महानगरपालिकेकडून बंदी असलेल्या प्लास्टिक वस्तू वापरणाऱ्या दुकानांवर दंडात्मक कारवाई सुरु आहे. दंडात्मक कारवाईनंतर यापुढे फौजदारी कारवाई करुन थेट कोर्टात खटले दाखल करण्यात येतील.

विजय पाटील, आरोग्य निरीक्षक

बंदी असलेल्या वस्तू

प्लास्टिक पिशव्या (हँडल असलेल्या, नसलेल्या), थर्माकॉल, डिस्पोजेबल ताट, कप्स, प्लेटेस्, ग्लास, काटे, वाटी, चमचे, भांडे, हॉटेलमध्ये अन्नपदार्थ पॅकेजिंगसाठी वापरली जाणारी भांडी, वाटी, स्ट्रॉ, नॉन वोवन पॉलिप्रॉलीलेन बॅग्ज, द्रव प्रदार्थ साठवण्यासाठी प्लास्टिक पाऊच, कप, सर्व प्रकारचे अन्नपदार्थ, धान्य, प्लास्टिक, प्लास्टिक वेष्टन.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२२ पासून कार्यशाळा

0
0

कोल्हापूर : अखिल भारतीय किसान सभेची राज्यस्तरीय कार्यशाळा २२ आणि २३ ऑक्टोबरला होणार आहे. कार्यशाळेत शेती, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा होणार आहे. यांच्या प्रश्नासाठी पुढील आंदोलनाची दिशा निश्चित करण्यात येईल. कार्यशाळेच्या तयारीसाठी मंगळवारी शेकापच्या कार्यालयात आयोजित बैठकीत कार्यशाळेस सहभागी मान्यवर, शेतकऱ्यांचे स्वागत करण्यासाठी माजी आमदार संपतबापू पवार-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली. यावेळी सुभाष निकम, प्राचार्य ए. बी. पाटील, डॉ. सुभाष जाधव, प्रा. आबासाहेब चौगुले, विजय धनवडे, शंकर काटाळे, बाबुराव तारळी, विनायक डंके आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images