Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

फुलांची बाजारपेठ बहरली

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

शारदीय नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला पूजेचे साहित्य आणि फुलांनी बाजारपेठ बहरली. पूजेसाठी आवश्यक साहित्यांची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. झेंडूच्या फुलांचा भाव प्रतिकिलो साठ रुपयांपर्यंत पोहचला. शहर आणि परिसरात ठिकठिकाणी खरेदीची लग बग सुरू होती.

महाद्वार रोड, ताराबाई रोड, जोतिबा रोड, मिरजकर तिकटी, कपिलतीर्थ मार्केट परिसर, बिंदू चौक,राजारामपुरी, गंगावेश अशा विविध भागात आणि मार्केट परिसरात फुलांचे हार आणि पुजेच्या साहित्यांचे स्टॉल उभारले होते. कोल्हापुरात गिरगाव, मुडशिंगी,कंदलगाव या आसपासच्या भागातून मोठ्या प्रमाणात फुलांची आवक होते. हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यातून फुले विक्रीसाठी येतात. पिवळया रंगाच्या फुलांचा भाव जास्त राहिला. भगव्या रंगाच्या फुलांचा दर काही ठिकाणी ४० रुपये तर काही ठिकाणी ६० रुपये होता.

सायंकाळी पाचनंतर बाजारपेठेतील लगबग वाढली. त्याचा परिणाम फुलांच्या दरावरही जाणवला. दिवसभरात झेंडूच्या फुलांचा भाव २० रुपयांनी वाढला. मंगळवारी सकाळपासूनच शहरातील प्रमुख मार्गावरून फुलांची विक्री सुरू होती. झेंडूच्या फुलांची साठ रुपये प्रतिकिलो या दराने विक्री झाली. गुलाबाच्या फुलांची आवक मोठ्या प्रमाणात झाली असून ३०० रुपये शेकडा दर होता. निशिगंधचा दर प्रतिकिलो २५० रुपयांहून अधिक होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘नवमतदारांनीमतदार नोंदणी करावी’

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'आगामी लोकसभा निवडणूक मतदानासाठी १ जानेवारी २०१९ पर्यंत १८ वर्षे पूर्ण होणाऱ्या जिल्ह्यातील युवक, युवतींनी ३१ ऑक्टोबरपूर्वी नाव नोंदणीसाठी विहीत नमुन्यात अर्ज भरून प्रशासनाकडे द्यावा किंवा निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरून ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण करावी', असे आवाहन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी मंगळवारी केले.

मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमातर्गंत शाहू स्मारक भवनात आयोजित जिल्ह्यातील सहकारी गृहनिर्माण संस्था, पतसंस्था पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.

जिल्हाधिकारी सुभेदार म्हणाले, 'निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार छायाचित्रासह मतदार यादी तयार केली जात आहे. नाव नोंदवण्यासाठीची सोय होण्यासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत मतदान केंद्रावर बीएलओ बसतील. ते नाव नोंदवण्यासह, दावे, हरकतीचे अर्ज स्वीकारतील. १८ ते १९ वयोगटातील नव मतदारांवर प्रशासनाने लक्ष केंद्रीत केले आहे. नव मतदार १ लाख ३२ हजार आहेत. त्यापैकी केवळ १० हजारजणांची नोंदणी झाली आहे. मतदार नोंदणी व्यापक करण्यासाठी गृहनिर्माण संस्थेचे पदाधिकारी, सदस्यांनी पुढाकार घ्यावा. याबरोबरच ८० वर्षावरील मतदारांची संख्या ५२ हजार असणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात ते १ लाख १० हजार आहेत. यामुळे मयत, दुबार नावे वगळण्यासंबंधी जागृती करावी.'

जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे म्हणाले, 'सहकारी गृहनिर्माण संस्था, पतसंस्थेतील पदाधिकाऱ्यांनी मतदार नोंदणी करण्यासाठी पुढाकार घ्यावा, यासाठी सहकार विभागातर्फे प्रयत्न केले जातील.'

'निवडणूक' च्या उपजिल्हाधिकारी स्नेहल भोसले यांनी मोहिमेची माहिती दिली. यावेळी बाबूराव कदम, नाना जरग, संजय पवार यांची भाषणे झाली. निवडणूक विभागाच्या शोभा कोळी, सोनाली कुलकर्णी आदी यावेळी उपस्थित होते. निवडणूक तहसीलदार सुचित्रा आमले यांनी आभार मानले.

--------------------------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निधन : कासुबाई काटकर

0
0

फोटो...

कासुबाई काटकर

कोल्हापूर : पोर्ले तर्फ बोरगाव येथील कासुबाई रामचंद्र काटकर (वय ८६) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता.१०) सकाळी नऊ वाजता आहे.

०००

सदाशिव गडकरी

कोल्हापूर : साबळेवाडी (ता. करवीर) येथील सदाशिव दौलू गडकरी (वय ५५) यांचे निधन झाले. कोल्हापूर महापालिका सेवक पतसंस्थेचे कर्मचारी अमर गडकरी यांचे ते चुलते होत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी व सून असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता.१०) आहे.

००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साहित्य खरेदीसाठी निविदा काढा

0
0

आमदार सतेज पाटील यांची सूचना

फोटो आहे

कोल्हापूर टाइम्स टीम

महापालिकेच्या दुधाळी येथील शुटिंग रेंजला आमदार सतेज पाटील यांनी भेट दिली. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून बांधण्यात आलेल्या शुटिंग रेंजची सोमवारी पाहणी केली. येथे आवश्यक असणाऱ्या साहित्यांसाठी त्वरित निविदा काढण्याची सूचना आमदार पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केली.

दुधाळी येथील शुटिंग रेंजमधून अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू घडले आहेत. रेंजचे विस्तारीकरण करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून मिळालेल्या निधीतून अद्ययावत शुटिंग रेंज उभा केली आहे. याची पाहणी करताना येथील आवश्यक साधन सामुग्रीची माहिती घेतली. शुटिंग रेंजसाठी लागणाऱ्या साहित्यांसाठी त्वरित निविदा काढण्याची सूचना केली. २५ मीटर रेंजसाठी संरक्षक भिंत व इतर सुविधांसाठी आवश्यक निधी आमदार फंडातून देण्यात येईल, त्यासाठी तातडीने प्रस्ताव तयार करण्याची सूचना उपशहर अभियंता एस. के. माने यांना दिल्या. यावेळी महापौर शोभा बोंद्रे, गटनेते शारगंधर देशमुख, नगरसेवक प्रतापसिंह जाधव, माजी नगरसेवक इंद्रजित बोंद्रे, प्रशिक्षक अजित पाटील व खेळाडू उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परस्पर व्हॉल्व सोडणाऱ्यांवर फौजदारी करा

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पाणीपुरवठ्याच्या नियोजनासाठी बोलवण्यात आलेल्या महापालिकेच्या सभेत अभुतपूर्व गोंधळ झाला. त्यानंतर विस्कळीत झालेला पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रत्येक पाच नगरसेवक आणि अधिकाऱ्यांची समिती नेमा. समितीने शहरातील पाण्याच्या टाक्यांचे सर्वेक्षण करून वेळापत्रक निश्चित करावे. सर्व टाक्या एकाचवेळी भरण्याचे नियोजन करा, अशी मागणी महापालिकेच्या मंगळवारी झालेल्या विशेष सभेत नगरसेवकांनी केली. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर शोभा बोंद्रे होत्या. पाणीप्रश्नावरुन प्रशासनाला नगरसेवकांनी चांगलेच धारेवर धरले. त्यामुळे पाणीप्रश्नाला सभेत चांगलेच बुडबुडे आले. पण, कोणत्याही नियोजनाविना सभा पार पडल्याने हे बुडबुडे हवेतच विरून गेले.

सभेच्याला सुरुवात होताच संभाजी जाधव यांनी 'शहराला किती एमएलडी पाणी सोडता?, टाक्या किती आहेत?' असे प्रश्न उपस्थित करत जलअभियंता कुलकर्णी यांनी स्पष्टीकरण देण्याची मागणी केली. त्यावेळी 'पाण्याचा प्रश्न माहीत असल्याने अधिकारीच स्पष्टीकरण देऊ देत. प्रश्न विचारण्याची आवश्यकता नाही. वेळेचा अपव्यव करू नका,' अशी मागणी रुपाराणी निकम यांनी केली. यावेळी एकाचवेळी सर्व नगरसेवक बोलण्याचा प्रयत्न करू लागले. काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख यांनी अधिकाऱ्यांना बैठक लवकर संपवायची असल्याचा आरोप करत प्रथम त्यांना बोलू देण्याची सदस्यांना विनंती केली.

जलअभियंता कुलकर्णी शहराला लागणारा पाणीपुरवठा व वितरणाची विस्तृत माहिती देण्याचा प्रयत्न करू लागले. कुलकर्णी यांच्या माहितीवर असमाधान व्यक्त करत सभागृह संतप्त झाले. 'जे नियोजन अस्तित्वात नाही, त्यावर चर्चा कसली? ऐन सणा सुदीदरम्यान नागरिक लोकप्रतिनिधींच्या घरात येऊन रोष व्यक्त करत आहेत. त्यामुळे तुमच्या छापील भाषणात आम्हाला रस नसून पाणीपुरवठा कधी सुरळीत होणार?' असा प्रश्न उपस्थित करत उपमहापौर महेश सावंत यांनी मोबाईलमधील अळ्यामिश्रीत पाणी सभाध्यक्षांना दाखवले. तसेच फोनकॉल रेकॉर्ड ऐकण्याची मागणी केली. शारंगधर देशमुख यांनी 'कुलकर्णींनी नियोजनाच्या माध्यमातून शहर फिरवून आणले. पण पाणी कमी दाबाने का येते? हे सांगितले नाही', असे म्हणताच सभागृहात हशा पिकला. पाणीप्रश्नावरुन सभागृहात गलका सुरू झाल्यानंतर एक-एक सदस्य सभागृहातून बाहेर पडू लागले.

माजी महापौर स्वाती यवलुजे यांनी, 'अधिकाऱ्यांवर पाणी फेकल्यानंतर आपल्याला राग येतो. पण अशा घटनांना आम्हाला रोज सामोरे जावे लागते. अधिकारी व नागरिकांमधील दुवा असलेल्या लोकप्रतिनिधींना महत्व दिले जात नाही. तीन वर्षांपासून जलवाहिनीच गळती काढण्यास सांगितले आहे. पण प्रशासन लक्ष देत नाही' असा आरोप केला. यावेळी सत्यजित कदम यांनी, 'नागरिकांना अधिकाऱ्यांचे मोबाइल क्रमांक देण्याबरोबर पाणी टंचाई विशेषत: महिलांशी संबंधीत असल्याने महिला अधिकाऱ्यांची नेमणूक करावी' अशी मागणी केली.

भूपाल शेटे यांनी पाणी वितरणातील त्रुटी निदर्शनास आणून दिल्या. जयश्री चव्हाण, विजय सूर्यवंशी, रिना कांबळे, प्रतीक्षा निल्ले, माधुरी लाड, वहिदा सौदागर, रिना कांबळे, स्मिता माने, कविता माने, सिमा कदम आदी सदस्यांनी प्रभागातील पाणी टंचाईवरून प्रशासनाला धारेवर धरले. सदस्यांच्या भावना ऐकल्यानंतर परस्पर व्हॉल्व सोडणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश आयुक्त डॉ. चौधरी यांनी दिले. सभागृहात चर्चेचे गुऱ्हाळ सुमारे चार तास सुरू होते. पण पाणीपुरवठ्याच्या ठोस नियोजनाशिवाय सभा संपल्याचे जाहीर करण्यात आले.

शहराला पाणीपुरवठा करा

सभेत प्रत्येक नगरसेवक आपल्या प्रभागातील समस्या मांडत होते. त्यामुळे अनेकवेळा गोंधळ उडाला. नगरसेविका पूजा नाईकनवरे यांनी पूर्ण शहरात सणासुदीच्या काळाला नियमित आणि मुबलक पाणीपुरवठा करण्याची मागणी केली. नाईकनवरे यांनी मांडलेल्या भूमिकेला सर्वच नगरसेवकांनी पाठिंबा दिला.

सभेत कमालीची स्टंटबाजी

दोन महिन्यांपासून शहरातील पाणी पुरवठ्याचा बट्ट्याबोळ उडाला ही वस्तूस्थिती आहे. विस्कळीत झालेल्या पाणीपुरवठ्यावर नियोजन करण्यासाठी सभा होती. दोन वर्षांपूर्वी झालेल्या विशेष सभेतही कोणत्याच उपाययोजना सुचविल्या गेल्या नाहीत. त्याच सभेची पुनरावृत्ती या सभेत झाली. सभेत उपाययोजना सुचवण्यापेक्षा घागर नाचवणे, अधिकाऱ्यांवर पाणी ओतणे, बोलण्यास मिळत नसल्याने घरी असल्याप्रमाणे राग व्यक्त करणे अशी सर्व प्रकारची स्टंटबाजी दिसली. यामध्ये सदस्य कमलाकर भोपळे व नियाज खान आघाडीवर होते. त्यामुळे सभा उपाययोजनांसाठी होती की आखाड्यातील प्रदर्शन होते, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

खान, भोपळे सभागृहाबाहेर

कुलकर्णी यांच्या अंगावर पाणी फेकणाऱ्या खान यांना सभागृहाबाहेर काढण्याची भूमिका डॉ. चौधरी घेत, दोघांना निलंबित करण्याची मागणी महापौर बोंद्रे यांच्याकडे केली. 'सभागृहात काहीही खपवून घेतले जाणार नाही. प्रसंगी गुन्हा दाखल करू शकतो,' असा इशाराच दिला. परिणामी महापौरांनी खान आणि भोपळे यांना सभागृहाबाहेर जाण्यास सांगितले. नंतर काही नगरसेवकांनी त्यांना हाताला धरून बाहेर नेले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मिरजकर तिकटी येथे पाण्यासाठी रास्ता रोको

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गेल्या तीन महिन्यांपासून मंगळवार पेठ, मिरजकर तिकटी व बाराईमाम परिसरात अपुऱ्या दाबाने पाणीपुरवठा होत आहे. मंगळवारी यासाठी विशेष सभा बोलवली असताना मिरजकर तिकटी येथे संतप्त नागरिकांनी रास्ता रोका आंदोलन केले. सुमारे अर्धातासाच्या आंदोलनामुळे येथील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. प्रशासनाने पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

शहरात गेल्या काही दिवसांपासून अपुऱ्या दाबाने पाणीपुरवठा होत आहे. ठिकठिकाणी याविरोधात आंदोलन केले जात आहे. शहरात अशी स्थिती असली, तरी गेल्या तीन महिन्यापासून विशेषत: मिरजकर तिकटी व बाराईमाम परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. याच्या निषेधार्थ गेल्या महिन्यात रास्ता रोको आंदोलन केले होते. त्यानंतरही पाणीपुरवठा सुरळीत न झाल्याने येथील नागरिकांनी पाणीपुरवठा विभागाशी संपर्क साधला. अनेकवेळा पत्रव्यवहार करुनही पाणीपुरवठा सुरळीत झालेला नव्हता. तसेच अधिकारीही उडवाउडवीचे उत्तरे देत असल्याने नागरिक संतप्त झाले होते. महापालिकेत पाणीपुरवठ्यासाठी विशेष सभा बोलवली असताना नागरिकांनी आंदोलन हाती घेतले. आंदोलनात विशेषत: महिलांना लक्षणीय सहभाग होता. त्यांनी हातात घागर घेवूनच रस्ता रोखून धरला, परिणामी येथील वाहतूक ठप्प झाली.

आंदोलनात निवास साळोखे, संदीप मोहिते, प्रशांत मंडलिक, सुशांत चव्हाण, अजित चव्हाण, सुहास सोरटे, प्रसाद सोरटे यांच्यासह महिला सहभागी झाल्या .

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महावितरणची आंतर परिमंडलीय नाट्यस्पर्धा सुरू

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

महावितरण पुणे प्रादेशिक विभागांतर्गत आंतरपरिमंडलीय नाट्यस्पर्धेचे उद्घाटन येथील केशवराव भोसले नाट्यगृहात सोमवारी सकाळी पार पडले. मुख्य अभियंते अनिल भोसले, सचिन तालेवार, सुनिल पावडे व महापारेषणचे प्रभारी मुख्य अभियंता ए.बी. दडमल यांच्या हस्ते नटराज पूजनाने नाट्यस्पर्धेची सुरुवात झाली.

पुणे परिमंडलाच्या वसंत कानेटकर लिखीत 'प्रेमात सगळंच माफ'या नाटकाने स्पर्धेला सुरूवात झाली. सुखाने चालू असलेल्या संसारात दहा वर्षांपूर्वी नवऱ्याचे आकस्मित आलेले विवाहबाह्य संबंध एका प्रसंगातून पुढे येतात. त्यामुळे पती-पत्नीच्या नात्यात दुरावा येतो, संघर्ष होतो. अशा प्रसंगातही पत्नी पतीला समजून घेत त्याला खंबीर साथ देते आणि 'प्रेमात सगळंच माफ'असतं हे दाखवून देते.

सायंकाळच्या सत्रात कोल्हापूर परिमंडलाचे शिवाजी देशमुख लिखीत तुफान विनोदी 'कार्टी नं १'हा नाट्यप्रयोग सादर करण्यात आला. महाविद्यालयीन जीवनात वसतिगृहात राहणारे मित्र एका गरीब कुटुंबातून आलेल्या, प्रसंगी उपासमार सहन करणाऱ्या आपल्या मित्राला आधार देत त्याच्या पाठीशी राहतात उभा राहतात असे चित्रण नाटकात पाहायला मिळते. काहीसे विनोदी वाटणारे नाटक मैत्रिचा चांगला संदेश देत भावनिक करते. यावेळी अधीक्षक अभियंते शैलेंद्र राठोर, संजय साळे, मनोज विश्वासे, प्रभारी सहमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी भरत पवार, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी शिरीष काटकर व सर्व कार्यकारी अभियंते, अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते. 

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षकांना नेशन बिल्डरअॅवॉर्डचे वितरण

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सीटीतर्फे नेशन बिल्डर अॅवॉर्डचे वितरण जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. अभिनव देशमुख, प्रसन्ना देशिंगकर यांच्याहस्ते झाले. विद्यार्थ्यांचा सर्वार्गिंण विकासाचे काम करणाऱ्यांना बजरंग कुलगुडे, सुखदेव पाटील, सुखदेव माने, फरझाना शिकलगार, सुरेखा धुत्रे यांना हा अॅवॉर्ड देण्यात आला.

अयोध्या हॉटेलमध्ये कार्यक्रम झाला. यावेळी डॉ. देशमुख म्हणाले, 'विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शिक्षकांचे महत्व मोठे आहे. चांगला नागरिक घडण्यासाठी आदर्श शिक्षकाची गरज असते. या पार्श्वभूमीवर शिक्षकांवरील जबाबदारी वाढली आहे.'

यावेळी स्त्री भ्रुणहत्या, रस्ते सुरक्षितता, बालिका अत्याचारावर प्रकाशझोत टाकणारे चित्रे सुरेश माने यांनी रेखाटले. चित्रांच्या प्रदर्शनाचे उदघाटन डॉ. देशमुख यांच्याहस्ते झाले. रोटरीचे अध्यक्ष अमित जाधव यांनी स्वागत केले. प्रमोद वाळवेकर, जान्हवी पाटील यांनी सूत्रसंचालन केले. स्वामी विवेकानंद संस्थेचे कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे, बाबासाहेब जांभळे, बाळासाहेब कडोलकर, अविनाश पाटील, राजू जोशी, मानसिंग पानसकर, आप्पासाहेब महाडिक, आर. डी. पाटील आदी उपस्थित होते. सोनल जोशी यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बंदी कागदावर, मांजा जिवावर

0
0

कारवाई नसल्याने विक्रते मोकाट; नागरिकांबरोबर पक्षही जखमी

कोल्हापूर टाइम्स टीम

पतंग उडवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या चीन आणि नायलॉनचा मांजा नागरिकांच्या जिवावर बेतत आहे. पक्ष्यांसह दुचाकीस्वार जखमी होत असून पुणे, नागपूर येथे गळा चिरल्याने दोघांचा बळी गेला. रविवारी कोल्हापुरातील एका युवतीचा चेहरा कापला. धारधार, घातक मांजावर बंदी असतानाही पोलिस, प्रदूषण नियंत्रण मंडळ, महानगरपालिका यापैकी कुणीही कारवाईसाठी पुढाकार घेतलेला नाही. त्यामुळे बंदी कागदावरच राहिल्याने मांजा जिवावर उठत आहे.

सप्टेंबरच्या अखेरीस आणि ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला पतंग उडवण्यासाठी बालचमू आघाडीवर असतात. शनिवार, रविवारी शहरातील मैदाने, जवळपासच्या खुल्या जागा, टेकड्यांवर गर्दी दिसत आहे. पूर्वी पतंग उडवण्यासाठी साध्या सुती दोऱ्याचा वापर केला जात होता. मात्र हा दोरा तुटत असल्याने आणि स्पर्धेत विरोधकांचा पतंग कापण्यासाठी आणि आपला पतंग सुरक्षित राहण्यासाठी चीनी, नायलॉनच्या मांजाचा वापर वाढला. नायलॉनच्या दोऱ्यावर डिंकाचा वापर करून काचेचा चुरा लावण्यात येतो. हा दोरा सहजासहजी तुटत नाही. हा दोरा दुचाकीस्वाराच्या गळ्याभोवती अडकल्यास गळा चिरण्याचा धोका असतो. तसेच एकादा पक्षी अकडल्यास त्याची सुटका सहजासहजी होत नाही. हा मांजा चिनी असून त्याच्यावर बंदी असूनही बाजारात सहज मिळत असल्याने त्याचा वापर वाढला आहे.

मांजात पक्षी अडकल्याने जखमी होऊन खाली कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे तर हवेत तरंगणारा मांजा दुचाकीवरून जाणाऱ्यांचा चेहरा, गळ्याभोवती गेल्याने अनेकजण जखमीही झाले आहेत. रविवारी दुचाकीवरून जाणाऱ्या ऐश्वर्या निंबाळकर या युवतीच्या चेहऱ्यावर मांजा कापल्याने तिला १२ टाके पडले. नाक आणि डोळ्याभोवती गंभीर जखमा झाल्या आहेत. गेल्या आठवड्यात वडणगे येथील गजेंद्र नरदेकर या तरुणालाही मांजा कापल्याने तोही जखमी झाला होता. तीन दिवसापूर्वी पिंपरीत डॉ. कृपाली निकम या २६ वर्षाच्या तरुणीचा दुचाकीवरून जातात मांजाने गळा चिरला. त्यात तिचा मृत्यू झाला. खेड्यांतही अशा घटना होत आहेत. एवढा गंभीर प्रकार घडूनही याबाबत प्रशासनाने काहीच कार्यवाही केलेली दिसत नाही. कारवाईचा मुद्दा ऐरणीवर आल्यानंतर तिन्ही विभाग एकमेकांकडे बोट दाखवत आहेत.

बंदीची जागृतता कमी

केंद्र सरकार आणि राष्ट्रीय हरित न्यायालयाने नायलॉन, चिनी मांजावर बंदी घातली आहे. तरीही शहरात आजपर्यंत एकाही मांजा विक्रेत्यावर मोठी कारवाई झालेली नाही. अनेक अधिकाऱ्यांना बंदी आहे, हेच माहीत नाही. हकनाक जीव घेणाऱ्या या मांजाबाबत इतकी उदासीनता आहे. पतंग उडवणे आनंदमय खेळ आहे. लहान मुलांसह, युवकही मोठ्या संख्येने हा खेळ खेळतात. पतंग उडवणाऱ्यांनीही आता आपण वापरलेला मांजा पक्षी आणि दुचाकी, पादचाऱ्यांना धोक्याचा ठरू नये, याची काळजी घेण्याची गरज आहे

हिंदुत्ववादी संघटनेकडून निवेदन

मांजाने गळा चिरल्याने पुणे, नागपूर येथे दोघांचा बळी गेला. त्यामुळे चीनी मांजा विक्रेत्यावर कडक कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन हिंदुत्ववादी संघटनेतर्फे निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना मंगळवारी देण्यात आले. यावेळी किशोर घाटगे, बंडा साळुंखे, मनोहर साटप, जयवंत निर्मळ, मधुकर नाझरे, राजेंद्र सूर्यवंशी, गजानन तोडकर, रेखा दुधाणे आदी उपस्थित होते.

पतंगासाठी वापरण्यात येत असलेला घातक चिनी मांजा विक्रेत्यांवर कारवाई करण्यासंबंधी महानगरपालिकेस पत्र दिले आहे. प्रत्यक्ष कारवाईवेळी पोलिसांचे सहकार्य राहील. प्रदूषण नियंत्रण मंडळ, महानगरपालिका प्रशासनाने कारवाईसाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे.

डॉ. प्रशांत अमृतकर, पोलिस उपअधीक्षक, शहर

चिनी मांजावर बंदी घालण्याच्या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना दिले. त्यावेळी अधिकाऱ्यांनी बंदीसंबंधीच सविस्तर माहिती नसल्याचे सांगितले. यावरून जागृतता कमी असल्याचे समोर येते. पोलिस, महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना संबंधित विक्रेत्यांवर कारवाईबरोबरच जागृतता करावी.

मधुकर नाझरे, सामाजिक कार्यकर्ते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुंफणच्या कथा स्पर्धेत ‘जावयाची वरात’ प्रथम

0
0

म. टा. वृत्तसेवा, कराड

मसूर (जि. सातारा) येथील गुंफण अकादमीच्या वतीने घेतलेल्या माजी खासदार श्रीमती प्रेमलाताई चव्हाण राज्यस्तरीय विनोदी कथा स्पर्धेत 'जावयाची वरात' या कथेने प्रथम क्रमांक पटकावला. यावेळी अकादमीचे अध्यक्ष डॉ. बसवेश्वर चेणगे व सचिव गजानन चेणगे उपस्थित होते.

स्पर्धेचा निकाल असा : प्रथम : जावयाची वरात (लेखक किरण लोखंडे, पुसेसावळी, ता. खटाव, जि. सातारा), द्वितीय : गण्याभाऊचा इंटरू (लेखक प्रा. किशोर बुरंगे, अमरावती), तृतीय : हंडा होता माझा बारीला (लेखक सुनील पावले, बुऱ्हाणनगर, अहमदनगर). अकादमीचे उपाध्यक्ष व ग्रामीण साहित्यिक बबन पोतदार यांनी निकाल जाहीर केला. परीक्षक म्हणून विकास धुळेकर व अंकुश पवार यांनी कामकाज पाहिले. स्पर्धेचे हे सोळावे वर्ष आहे. विजेत्यांना गुंफण अकादमीच्या यावर्षी होणाऱ्या साहित्य संमेलनात पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जलअभियंत्याला जलाभिषेक

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ऐन सणात सुरू असलेल्या अपुऱ्या पाणीपुरवठ्यावरुन महापालिकेची मंगळवारी झालेली सभेत प्रचंड गोंधळात पार पडली. पाणीप्रश्नावरुन आक्रमक होत नगरसेवक नियाज खान यांनी जलअभियंता सुरेश कुलकर्णी यांना जलाभिषेक घातला, तर अन्य नगरसेवकांनी अर्वाच्च शिविगाळ करत आयुक्तांसह अन्य अधिकाऱ्यांच्या दिशेने फाइल भिरका‌वल्या. नगरसेवकांच्या या पावित्र्यामुळे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी हेही आक्रमक झाले. त्यांनी सभागृहातून बाहेर जाण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनाही घेराओ घालत नगरसेवकांनी रोखले. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. यादरम्यान आयुक्त आणि नगरसेवकांमध्ये चांगलीच चकमक उडाली. महापौरांनी खान आणि कमलाकर भोपळे यांना सभागृहाबाहेर काढण्याचे आदेश दिले. त्यांना बाहेर काढण्यात आले. पाणीप्रश्नासारख्या संवेदनशील विषयावरुन बोलवलेल्या सभेत मात्र कोणताच निर्णय झाला नाही.

विस्कळीत पाणीपुरवठ्याबाबत नियोजन आणि उपाय सुचवण्यासाठी ही सभा बोलावली होती. अध्यक्षस्थानी महापौर शोभा बोंद्रे होत्या. बोंद्रे यांनी सुरुवातीला नगरसेविका बोलतील, असे स्पष्ट केले. पण, त्याकडे दुर्लक्ष करत प्रत्येकजण आपला मुद्या रेटू लागले. संभाजी जाधव यांनी प्रश्न विचारायला सुरुवात करताच कमलाकर भोपळे प्रेक्षागॅलरीत घागरीसह दाखल झाले. त्यांनी निषेधाचा फलकही फडकवला.

प्रवीण केसरकर अळ्यामिश्रीत पाण्याची बाटली दाखवत प्रशासनाला धारेवर धरु लागले. इतर नगरसेवकही आक्रमक झाले. त्यामुळे गोंधळ उडाला. या गोंधळातच शिवसेनेचे नगरसेवक खान पाण्याची बादली घेऊन दाखल झाले. त्यांनी थेट जलअभियंता कुलकर्णी यांच्या अंगावर बादली ओतली. खान यांच्या कृतीने आयुक्त संतापले. हा प्रकार चुकीचा आहे, म्हणत त्यांनी टेबलावर फाइल आदळली. महापौरांनी त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी चौधरींनी केली. पण महापौरांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने त्यांचा संताप अनावर झाला. अधिकाऱ्यांसह त्यांनी बाहेर जाण्याचा पवित्रा घेतला. सभागृहातून ते बाहेर पडू लागल्याने नगरसेवक आणखी संतापले. प्रा. जयंत पाटील यांनी त्यांच्या दिशेने फाइल भिरकावली. इतर अनेकांनीही फाइल भिरकावायला सुरूवात केली. पाच ते सहा फाइल्स त्यांच्या दिशेने आल्याने आयुक्त आणखी भडकले. व्यासपीठ सोडून ते खाली उतरले. त्यांना रोखण्यासाठी प्रा. पाटील त्यांच्याकडे धावले. त्यांच्या पाठोपाठ शारंगधर देशमुख, सत्यजित कदम, मुरलीधर जाधव हेही धावले. त्यांनी आयुक्तांना घेराओ घालत जाब विचारायला सुरूवात केली. यावेळी जोरदार खडाजंगी सुरू झाली. सभागृहात प्रचंड तणाव निर्माण झाला.

नगरसेवक आयुक्तांच्या अंगावर गेल्याने सुरक्षारक्षक त्यांच्या दिशेने धावले. तेव्हा नगरसेवक सत्यजित कदम यांनी मध्यस्थी करत शांत राहण्याची विनंती केली. पण, संतापलेल्या प्रा. पाटील यांनी त्यांनाही खडसावले. देशमुख, जाधव, अर्जुन माने, शेखर कुसाळे यांच्यासह अन्य सदस्य आयुक्त आणि पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना धारेवर धरू लागले. आयुक्तही आक्रमकपणे बाजू मांडत होते.

अग्निशमन दलाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आयुक्तांभोवती कडे केले. गोंधळातच आयुक्तांनी खान यांना सभागृहाबाहेर काढण्याची मागणी केली. आयुक्तांचा संताप पाहून खान आणि भोपळे सभागृहातून बाहेर पडले. प्रा. पाटील यांच्यासह अन्य सदस्यही महापौरांसमोर येऊन आयुक्तांच्या कृतीबाबत आक्रमक जाब विचारत होते. सुमारे पंधरा ते वीस मिनिटे हा गोंधळ सुरू होता. त्यामुळे कामकाज थांबले. खान आणि भोपळे यांना बाहेर काढल्यानंतर कामकाज सुरु झाले.

.. .. .. ..

सदस्यांची स्टंटबाजी निषेधार्हच आहे. पण, आयुक्तांचे टिचकी वाजवून अधिकाऱ्यांना बाहेर जायला सांगणे, हेही आक्षेपार्ह आहे. दोन महिन्यापासून शहरात पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. तो संतापच सभागृहात उमटला. त्याला सर्वस्वी आयुक्त जबाबदार आहेत.

प्रा. जयंत पाटील, नगरसेवक

.. .. ..

पाणीप्रश्नावर प्रशासन गंभीर आहे. म्हणूनच विशेष सभा बोलावली. मात्र थेट अधिकाऱ्यांना लक्ष्य करणे चुकीचे असून हा गुन्हा आहे. अधिकाऱ्यांची काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहे. वारंवार असे प्रकार घडत असतील तर काम करणे मुश्कील आहे. महापालिकेत अनेक पदे रिक्त असताना अधिकारी न आल्यास शहराचे प्रश्न आणखी बिकट बनतील.

डॉ. अभिजित चौधरी, आयुक्त

.. .. .. ..

स्टंटबाजी करणाऱ्या नगरसेवकांचा सभागृहात निषेध

नियाज खान, भोपळेंना सभागृहाबाहेर काढले

निष्फळ चर्चेमुळे अनेक सदस्यांचा सभात्याग

प्रा. पाटील, देशमुखांची दिलगिरी

.. .. . .. .. .. ३

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१४६ शिक्षकांना मुख्याध्यापकपदी पदोन्नती

0
0

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांतील १४६ शिक्षकांना समुपदेशाने मुख्याध्यापकपदी पदोन्नती देण्यात आली. मुख्याध्यापकपदासाठी पात्र असणारे ४९९ शिक्षक उपस्थित होते. एकास तीन या प्रमाणात मुलाखती झाल्या. यामध्ये अध्यापक, पदवीधर अध्यापक व विषय शिक्षकांचा समावेश होता. समुपदेशन प्रक्रियेदरम्यान १०१ शिक्षकांनी मुख्याध्यापकपदास नकार दिला. तर १४६ शिक्षकांनी मुख्याध्यापकपदाची पदोन्नती स्वीकारली. पदोन्नती मिळालेल्या शिक्षकांना गटशिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत पुढील कार्यवाही होणार आहे. शिक्षण समिती सभापती अंबरिश घाटगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ व गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाचगावात पाणी पाइपलाइनचे काम सुरू

0
0

खासदार संभाजीराजे यांच्या हस्ते उद्घाटन

कोल्हापूर टाइम्स टीम

'पायाभूत सुविधांसह वाचनालय, ग्रंथालय व व्यायामशाळांना निधी उपलब्ध करुन देऊ.'अशी ग्वाही खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिली.त्यांच्या खासदार निधीतून आरकेनगर भारतमाता कॉलनी चौक, गणपती मंदिर येथे पाइपलाइन कामाचा प्रारंभ करण्यात आला. पिण्याच्या पाण्याची पाइपलाइनसाठी दहा लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

खासदार संभाजीराजे म्हणाले, 'पाचगावमधील भारतमाता कॉलनीसह आसपासच्या उपनगरात पाण्याची टंचाई आहे. या ठिकाणी पाइपलाइनची आवश्यकता आहे. ग्रामपंचायत सदस्य सागर दळवी यांनी या भागातील पिण्याच्या पाण्याची समस्या निदर्शनास आणली होती. त्यानुसार या भागातील पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी दहा लाख रुपयांचा निधी मंजूर केला. त्या निधीतून आता पाइपलाइन टाकण्याच्या कामाला सुरुवात झाली. लवकरच हे काम पूर्ण होवून भागातील पिण्याच्या पाण्याची समस्या संपुष्टात येईल.'

सदस्य सागर दळवी यांनी 'पाचगावच्या पाणी प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी खासदार संभाजीराजे यांनी तेरा लाख रुपयांचा निधी दिला. वर्षभरात निधी उपलब्ध होवून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. पाइपलाइनमुळे पाणी प्रश्न सुटणार असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.'

याप्रसंगी पाचगावचे सरपंच संग्राम पाटील, उपसरपंच संग्राम पोवाळकर, सदस्य धनाजी सुर्वे, प्रवीण कुंभार, शीतल गवळी, युवराज गवळी, संदीप गाडगीळ, भिकाजी गाडगीळ, गुरुदत्त शिंदे, चंद्रकांत कांडेकरी आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Mental Health Day: ताणतणावात ‘नोकरदार’ आघाडीवर

0
0

Sachin.patil1@timesgroup.com

कोल्हापूर :

बदलती गतिमान जीवनशैली, वाढती जीवघेणी स्पर्धा आणि त्यात टिकून राहण्याचे आव्हान सर्वांसमोर आहे. यामुळे लहान मुले, तरुण ते ज्येष्ठांपर्यंत सर्वच वयोगटांतील लोक ताणतणावाला बळी पडत आहेत. दिवसेंदिवस मानसिक रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून, शहरातील सीपीआरमधील मानसोपचार विभागात गेल्या साडेतीन वर्षांत ५१ हजार ६७७ लोकांवर मानसिक रोगासंबंधी उपचार करण्यात आले आहेत. त्यातील ९७३ लोकांना अॅडमिट करून उपचार देण्यात आले. मानसिक आजारी रुग्णांत नोकरदारवर्ग व महिला आघाडीवर आहे.

कोण ठरतायत मानसिक रोगाचे बळी

सर्वच क्षेत्रांतील नोकरदार मानसिक रोगांना बळी पडत आहेत. अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या डॉक्टरांना तणावाला सामोरे जावे लागत आहे. इमर्जन्सी ऑपरेशन, क्लिनिकल प्रक्टिस, नातेवाइकांचा दबाव, प्रसंगी होणारी मारहाण यामुळे नोकरदार डॉक्टरवर्ग भीतीच्या छायेत आहे. तसेच सेल्स, मार्केटिंग, वितरण तसेच कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या नोकरदारांना ठाराविक टार्गेट्स वेळेत पूर्ण करण्याचे आव्हान असते. पोलिससही तणावात आहेत. चोवीस तास सतर्क राहणे, आरोग्याच्या तक्रारी, वरिष्ठांकडूनचे असहकार्य अशा बाबींना सामोरे जावे लागते. पत्रकारिता क्षेत्रात काम करणाऱ्यांनासुद्धा मानसिक आजारांना सामोरे जावे लागत आहे. ब्रेकिंगचा जमाना, डेडलाइन, वाढती जीवघेणी स्पर्धा यामुळे कमी वयात पत्रकारिता क्षेत्रात काम करणाऱ्यांना शारीरिक आजारांबरोबर मानसिक आजाराला सामोरे जावे लागत आहे. यामध्ये नोकरदार महिलांची संख्या वाढत असून, घर आणि नोकरी यात समन्वय साधताना त्यांना तणाव व नैराश्याला तोंड द्यावे लागते.

काय आहेत निराशेमागची कारणे?

नोकरदारांमध्ये निराशा येण्याची तसेच मानसिक आजारामागील नोकरीतील अनिश्चितता, सततची चिंता, अपुरा पगार, कामातील टार्गेट्स पूर्ण झाले नाहीतर कारवाईची चिंता, दडपण, वैयक्तिक राजकारणाचा बळी पडू अशी भीती, व्यसनाधीनता, जीवनशैलीतील बदल, स्पर्धेत टिकून राहण्यासाठी धावपळ अशी प्रमुख कारणे आहेत. जागतिकीकरणाच्या युगात नोकरीसाठी बाहेर पडणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. यामध्ये महिलाही आघाडीवर आहेत. तसेच मिटिंग, प्रेझेंटेशन, डेडलाइन यामुळे कामाच्या ठिकाणी अधिक तणाव वाढतो. या सर्व कारणांमुळे नोकरदारांचे मानसिक स्वास्थ्य धोक्यात आले आहे.

मानसिक आजाराची लक्षणे

मानसिक आजारांत उदास वाटणे, कामात मन न लागणे, कुठल्याही गोष्टीतील रस कमी, झोप न लागणे, भूक कमी होणे, शारीरिक तक्रारीत वाढ, एकाग्रता कमी, दमल्यासारखे वाटणे, मनात अपराधीपणाचा भाव निर्माण होणे, नकारात्मक किंवा आत्महत्येचे विचार येणे, कायम अस्वस्थता अशी लक्षणे साधारणत: आढळून येतात.

मानसिक रोगांवर उपचार शक्य

शारीरिक आजारांकडे लक्ष दिले जाते पण मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष केले जाते. आजाराची लक्षणे दिसताच तत्काळ उपचार घेतल्यास बरे होता येते. त्या जोडीला संतुलित आहार, व्यायाम, योगा, ध्यानधारणा, कुटुंबातील संवाद वाढवणे, आवडीचे छंद जोपासणे, सहली, पर्यटन, वाचन, मनोरंजन, आदी गोष्टीत रस दाखविल्यास मानसिक रोगांपासून मुक्त आयुष्य जगता येते.

''अलीकडे मानसिक आजारांवर उपचार घेण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. शारीरिक आजाराइतकेच मानसिक आजार धोकादायक असतात. नोकरदारवर्गात मानसिक समस्येच्या प्रमाणात वाढ होत असली तरी आधुनिक उपचार पद्धतीच्या सहाय्याने उपचार शक्य आहेत. सीपीआर मानसोपचार विभागात सर्व उपचार उपलब्ध आहेत.'' - डॉ. पवन खोत, विभागप्रमुख मानसोपचार विभाग सीपीआर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलींच्या तस्करीचा डाव ?

0
0

Balasaheb.Patil@timesgroup.com

Tweet:@balpatilMT

कोल्हापूर : चंदगड तालुक्यात एका गावातील दोन मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणात धक्कादायक बाबी समोर येत आहेत. पालकांच्या हतबलतेचा फायदा घेऊन आरोपींनी दोन्ही मुलींच्या तस्करीचा डाव रचला होता, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली. या प्रकरणातील मुख्य संशयित संदीप सावंत आणि त्याचा भाचा अजित पाटील (दुसरा संशयित) यांच्यावर १८ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल होऊनही तपास ठप्प असून यातील एक संशियत आणि सावंत याची पत्नी पसार झाल्याचे वृत्त आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दोन सख्ख्या बहिणींना दहशतीच्या बळावर पळवून नेऊन त्यांच्यावर अत्याचार केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यास गेलेल्या वडिलांनाच वाघनखे तस्करीच्या गुन्ह्यात अडकविण्याचा संतापजनक प्रकार चंदगडमध्ये उघडकीस आला होता. वाघनख्यांचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर सावंत याचे कारनाने चव्हाट्यावर आले. एकीकडे जंगली प्राण्याच्या शिकारी करून त्यांच्या अवशेषांची तस्करी करणाऱ्या सावंत याने त्यांच्या तस्करीचा डाव आखल्याचे समोर आले आहे. या दोन्ही मुलींना वाममार्गाला लावण्याचा प्लॅन सावंत याने आखला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली. या दोन्ही मुलींना पळवून नेऊन घरातच ठेऊन घेतलेल्या सावंत याने कोणालाही याची कानोकान खबर लागू दिली नाही. या मुलींना तो पहाटे शेतातील घरात नेऊन सोडायचा आणि रात्री उशिरा घरी आणायचा. दरम्यान दिवसभर तो गावात साळसूदपणे फिरत असल्याने तो मुलींच्या वडिलांचीच उलटतपासणी घेत जाब विचारायचा. अपहरणाच्या काळात या मुलींचे लैंगिक शोषण तर झालेच. शिवाय या मुलींना पाहण्यासाठी अनोळखी माणसे तेथे येत असल्याचे पुढे आले आहे. हे अनोळखी लोक कोण होते? असा प्रश्न निर्माण झाला असून विशेष म्हणजे हा सर्व प्रकार संशयित सावंत याच्या पत्नीच्या समोरच घडत होता, अशी माहिती मिळाली.

या प्रकरणातील वनविभागाच्या ताब्यात असलेला संशियत सावंत याच्या कारनाम्यांची माहिती उजेडात येत असून त्याने मुंबईहून गावी परतल्यानंतर जनावरे खरेदी-विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता. वनविभागाने त्याच्या अटकेनंतर टाकलेल्या छाप्यात वन्यप्राण्यांचे अवशेष घरात सापडल्यानंतर त्याच्या शिकारीच्या कथांची चर्चा सुरू झाली आहे. प्राण्यांचे कातडे, खूर आणि अन्य अवशेष सापडल्याने त्याचे वन्य प्राणी तस्करांशी जवळचे संबंध असल्याचे बोलले जाते. वनविभाग आणि पोलिसांच्या कार्यपद्धतीची माहिती असल्यानेच त्याने मुलींच्या वडिलांना अगदी नियोजनबद्धरित्या तस्करीच्या प्रकरणात अडकविले. मुलींवरील अत्याचारप्रकरणात पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जाण्याबाबत संबधित मुलीचे वडील आणि त्यांच्या नातेवाईकांत चर्चा सुरू होती. याची माहिती त्याला मिळत होती. त्यातूनच त्याने संबधित यंत्रणांना माहिती देऊन ठेवली होती.

१७ सप्टेंबर रोजी मुलींवरील अत्याचाराची तक्रार देण्यास गेलेल्या वडिलांना वनविभागाने ताब्यात घेतल्यानंतर दोन दिवसांनी या नियोजनबद्ध ट्रॅपची माहिती नातेवाईकांना मिळाली. मात्र, सावंत याच्या दहशतीपुढे हतबल मुलींच्या नातेवाइकांनी गप्प बसणे पसंत केले. मुंबईतील डॉग स्कॉडचा संदर्भ देऊन त्याने अनेक पोलिसांशी जवळीक साधली होती. तो पोलिसांचा खबऱ्या म्हणूनही काम करत होता. त्यातून अभय मिळवत त्याने गावात दहशत निर्माण केली. मात्र वनविभागाच्या सतर्कतेमुळे वाघनखे प्रकरणात तो सापडला.

'आमच्या बाजूने तपास केलाय'

या प्रकरणात पोलिसांचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. १८ सप्टेंबर रोजी लैंगिक अत्याचारप्रकरणी संदीप दादासाहेब सावंत आणि त्याचा भाचा अजित प्रभाकर पाटील याच्यावर गुन्हा दाखल झाला. सावंत याला वन्यप्राण्यांची शिकार आणि अवशेष तस्करीप्रकरणी वनविभागाने ताब्यात घेतले. त्यानंतर त्याची कोठडी वाढविण्यात आली. वनविभागाची कोठडी संपल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. 'सावंत वनविभागाच्या कोठडीत असल्याने आम्ही तपास कसा करणार?' असा उलटा सवाल पोलिस अधिकारी विचारत आहेत. शिवाय 'सावंतला ताब्यात घेतल्यावर आम्ही दुसरा संशियत अजित पाटीलचा शोध घेऊ' असे अजब उत्तर चंदगड पोलिस देत आहेत. 'आमच्या परीने आम्ही तपास केलाय. तरीही अजित सापडत नाही' असे पोलिसांचे म्हणणे आहे. मुलींच्या अहपरणात मदत करणारी सावंत याची पत्नीही गुन्हा दाखल झाल्यापासून गायब आहे. या मुलींचे लैंगिक शोषण झाल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी फक्त मुलींच्या प्राथमिक वैद्यकीय तपासणीची औपचारिकता पार पाडली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाणीपुरवठ्याचा खेळखंडोबा

0
0

Maruti.Patil@timesgroup.com

tweet: @MarutipatilMT

कोल्हापूर : जलवाहिनीला ठिकठिकाणी लागलेली गळती, अपुरे कर्मचारी, नियोजनातील त्रुटी आणि प्रशिक्षित कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे पाणीदार कोल्हापुरात पाणीपुरव‌ठ्याचा खेळखंडोबा झाला आहे. राधानगरी, काळम्मावाडी यांसारखी मोठी धरणे फुल्ल भरली असताना आणि शहराच्या तिन्ही बाजुंनी पंचगंगा नदी दुथडी भरून वहात असताना अधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्यातील समन्वयाअभावी शहरात ऐन सणासुदीच्या काळात तोंडचे पाणी पळाले आहे. विस्कळीत पाणीपुरवठ्यावर उपाय काढण्यासाठी विशेष सभाही बोलवली. मात्र सभेत नगरसेवकांनी ठोस उपाय सुचविण्यापेक्षा अधिकाऱ्यांवर पाणी ओतून आणि फायली फेकून स्टंटबाजी करण्यात धन्यता मानली. परिणामी पाण्याचा प्रश्न अधिक जटील बनला आहे.

बालिंगा, कसबा बावडा येथील केंद्रांतून उपसा करून जलशुद्धिकरण केंद्रांमार्फत शहराला पाणीपुरवठा केला जातो. शहराचा विस्तार आणि पाण्याची मागणी वाढल्यानंतर शिंगणापूर योजना कार्यन्वित करण्यात आली. योजनेद्वारे 'ई' वॉर्डातील नागरिकांना पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला. सुरुवातीची काही वर्षे योजनेतून पाणीपुरवठा सुरळीत झाला. पण नंतर पाण्याची पळवापळवी, लोकप्रतिनिधींचा हस्तक्षेप आणि अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणामुळे पाणी वितरणाचा पुरता बोजवारा उडाला आहे. अपुरे मनुष्यबळ हा प्रश्नही प्रशासनाला भेडसावत आहे.

शहराला दररोज १२० एमएलडी पाण्याची आवश्यकता असताना १४० एमएलडी पाण्याचा उपसा केला जातो. यात तब्बल ५० एमएलडी पाण्याची गळती आहे. हे पाणी गळतीवाटे वाहून वाया जाते. परिणामी आवश्यकतेपेक्षा शहराला ३० एमएलडी पाणी कमी मिळते. महापालिकेच्या स्थायी समितीपासून ते महासभेपर्यंत प्रत्येकवेळी गळती रोखण्यासाठी उपाययोजना सुरू असल्याचे सांगण्यात येते. पण गळती काढण्यास प्रशासनाला यश आलेले नाही. काही ठिकाणची गळती तात्पुरती काढली जाते. मोठ्या गळतीकडे दुर्लक्ष केले जाते. परिणामी अनेक भागांना कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. पाणी आले नाही किंवा अपुरा दाबाने असल्यास नागरिक संबंधीत भागातील लोकप्रतिनिधींशी संपर्क साधतात. त्यामुळे त्या-त्या भागातील नगरसेवक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर पाण्यासाठी दबाव टाकतात. परिणामी त्या भागांना पाणी मिळते. पण पुढील भागात पाणी टंचाई निर्माण होते. गेल्या दोन महिन्यापासून टंचाईचे दृष्टचक्र सुरू आहे. अशा परिस्थितीतून मार्ग काढण्यात, नियोजनात अधिकारीही सपशेल अपयशी ठरले आहेत. त्यामुळे पाणी वितरणाची यंत्रणाच कोलमडून गेली आहे.

शहरात पाणी वितरणाचे सुमारे ५५० किलोमीटर जलवाहिन्यांचे जाळे विणले गेले आहे. मात्र कोणती वाहिनी कधी टाकली?, त्याची दुरुस्ती कधी आवश्यक आहे याचा आराखडा पाणीपुरवठा विभागाकडे नाही. अनुभवी कर्मचाऱ्यांचीही वानवा आहे. परिणामी जलवाहिन्यांना वारंवार फुटून गळती निर्माण होते. कर्मचाऱ्यांचा बहुतांशी वेळ गळती काढण्यात खर्ची जात असल्याने पाणी वितरणाचा सातत्याने बट्ट्याबोळ उडत आहे. एकीकडे कर्मचारी गळती काढण्यात व्यस्त असताना दुसरीकडे पाणी सोडण्यासाठी कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून पाणीपुरवठा योजना हस्तांतरीत झाल्यानंतर पाणीपुरवठा विभागाकडे वर्ग एक ते चार संवर्गातील ५४३ अधिकारी-कर्मचारी होते. यामध्ये ६० हंगामी कर्मचाऱ्यांचा समावेश होता. सद्यस्थितीत विभागाकडे ३७८ कर्मचारी असून त्यापैकी १११ कर्मचारी हंगामी आहेत. हंगामी कर्मचाऱ्यांना नगरसेवकांचा आश्रय मिळत असल्याने यातील बहुतांश कर्मचारी त्यांच्याच तालावर नाचतात. कर्मचाऱ्यांकडे अनुभवाची कमतरता असताना अनेक जणांवर मूळ हुद्दा सोडून इतर कामे सोपवली गेली आहेत. परिणामी पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.

व्यवस्थापन खर्चामुळे पदभरतीची अडचण

महापालिका नियमानुसार एकूण अर्थसंकल्पाच्या ३५ टक्क्यांपेक्षा कमी रक्कम प्रशासकीय खर्च होणे अपेक्षीत आहे. सद्यस्थितीत महापालिकेचा ५७ टक्क्यांपेक्षा अधिक खर्च व्यवस्थापनावर होतो. नियमापेक्षा जास्त व्यवस्थापन खर्च झाल्यास नगरविकास विभाग पदभरतीला परवानगी देत नाही. महापालिकेत सध्या १०७० पदे रिक्त असून पदभरतीसाठी नगरविकास विभागाशी पत्रव्यवहार झाला आहे. मात्र भरती केल्यास पुन्हा व्यवस्थापन खर्च वाढणार असल्याने याला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. त्याचा सर्वाधिक फटका पाणीपुरवठा विभागाला बसला आहे.

वेतन आयोगामुळे व्यवस्थापन खर्चात वाढ होत आहे. तसेच महापालिकेच्या उत्पन्नाच्या स्त्रोतामध्ये वाढ झालेली नाही. निवृत्त कर्मचाऱ्यांची संख्या वाढत असल्याने केवळ अतिमहत्त्वाच्या पदावरील अधिकाऱ्यांची ठोक मानधनावर नियुक्ती केली जात आहे. एमजीपीकडूनही अधिकारी मिळणे अपेक्षित आहे. पण तसे अधिकारी मिळत नसल्याचा परिणाम पाणीपुरवठा विभागावर होत आहे.

- मंगेश शिंदे, उपायुक्त

अधिकाऱ्यांनी नियोजन केले. पण कर्मचारी त्याची अंमलबजावणी करत नाहीत. कर्मचारी बेजबाबदार काम करत असल्याने पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. गळती काढण्याकडे दुर्लक्ष होत असून उंचावरील टाक्या भरत नसल्याने जुन्या लाइनला पुरेसे पाणी मिळत नाही.

- स्वाती यवलुजे, नगरसेविका, माजी महापौर

शहराची लोकसंख्या पाहता पुरेशा पाणीपुरवठ्यासाठी थेट पाइपलाइन योजनेचे प्रयत्न सुरू आहेत. पण प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वितरण व्यवस्था विस्कळीत झाली आहे. हा प्रश्न एका भागापुरता मर्यादीत नाही. शहरात टंचाई असताना अधिकारी त्याकडे गांभीर्याने पहात नाहीत. त्यामुळे सभेत उद्रेक होतो. नागरिकांची आंदोलने होतात. स्थिती आणखीन चिघळण्यापेक्षा प्रशासनाने पाणीपुरवठ्याचे अधिक काटेकोर नियोजन करण्याची गरज आहे.

- संदीप मोहिते, नागाळापार्क

दृष्टीक्षेप पाणीपुरवठा

७०००००

शहराची लोकसंख्या

१२० एमएलडी

दररोज लागणारे पाणी

१४० एमएलडी

दररोजचा उपसा

५० एमएलडी

पाणी वितरण गळती

चार उपसा केंद्रांची क्षमता

३८ एमएलडी

बालिंगा

८ एमएलडी

कळंबा फ्लिटर हाऊस

६० एमएलडी

पुईखडी

३६.५ एमएलडी

कसबा बावडा

१९९२ सालातील मनुष्यबळ

४३३

कायम कर्मचारी

६०

हंगामी

५०

पवडी विभागाचे

५४३

एकूण कर्मचारी

३०००००

शहराची लोकसंख्या

२०१८ सालातील मनुष्यबळ

१ (प्रभारी)

जलअभियंता

० (रिक्त पदे ३)

उपजलअभियंता

८ (रिक्त पदे ११)

अभियंता

२१ (रिक्त पदे १३०)

वर्ग तीन

१६७ (रिक्त पदे ६५)

वर्ग चार

१११

हंगामी कर्मचारी

३७८

एकूण

७०००००

शहराची लोकसंख्या

000

(मूळ कॉपी)

पाणीपुरवठ्याचा खेळखंडोबा

वितरणाबरोबर रिक्त जागांचीही डोकेदुखी वाढली : लोकप्रतिनिधींच्या दबावाने प्रशासन हैराण

फोटो अमित देईल

Maruti.Patil

@timesgroup.com

tweet: @MarutipatilMT

कोल्हापूर :

जलवाहिनीला ठिकठिकाणी लागलेली गळती, अपुरे कर्मचारी, नियोजनातील त्रुटी आणि प्रशिक्षित कर्मचाऱ्यांचा अभावामुळे पाणीदार जिल्ह्यातील शहरात पाणीपुरव‌ठ्याचा पुरता खेळखंडोबा उडाला आहे. राधानगरी, काळम्मावाडी सारखी धरणे फुल्ल असताना आणि पंचगंगा नदी दुथडी भरुन असताना अधिकारी आणि लोकप्रतिनिधींमधील समन्वयाअभावी शहरातील लोकांचे ऐन सणासुदीच्या काळात तोंडचे पाणी पळाले आहे. विस्कळीत पाणीपुरवठ्या उपाय काढण्यासाठी विशेष सभाही बोलवली. सभेत ठोस उपाय सूचवण्यापेक्षा अधिकाऱ्यांवर पाणी आणि फाईली फेकून स्टंटबाजी करण्यात धन्यता मानली. परिणामी पाणीपुरवठा सुरळीत होण्याऐवजी आणखी जटील होण्याची शक्यता आहे.

बालिंगा, कसबा बावडा येथील उपसा करुन जलशुद्धिकरण केंद्रामार्फत शहराला पाणीपुरवठा केला जातो. शहराचा विस्तार आणि पाण्याची मागणी वाढल्यानंतर शिंगणापूर योजना कार्यन्वित केली. योजनेद्वारे 'ई' वॉर्डातील नागरिकांना पाणी देण्याचा निर्णय घेतला होता. योजनेला सुरुवात झाल्यानंतर काही वर्षे पाणीपुरवठा सुरळीत झाला, पण त्यानंतर पाण्याची पळवापळवी, लोकप्रतिनिधींचा हस्तक्षेप आणि अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणामुळे शहरातील पाणीपुरवठ्याचा पुरता बोजवारा उडाला आहे. यामध्ये भर आता अपुऱ्या कर्मचाऱ्यांचीही पडत आहे.

शहराला दैनंदिन १२० एमएलडी पाणीपुरवठ्याची आवश्यकता असताना १४० एमएलडी पाण्याचा उपसा केला जातो. यामधील तब्बल ५० एमएलडी पाणी गळतीवाटे गटारीतून वाहत आहे. परिणामी आवश्यकतेपेक्षा शहराला ३० एमएलडी पाणी कमी पडत आहे. महासभेपासून स्थायी समितीच्या प्रत्येक बैठकीत गळती रोखण्यासाठी उपाययोजना सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. पण अद्यापही गळती काढण्यास प्रशासनाला यश आलेले नाही. तात्पुरत्या स्वरुपाची गळती त्वरीत काढली जाते, पण मोठ्या गळतीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने अनेक भागांना कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. पाणी आले नाही, किंवा अपुरा दाबाने असल्यास नागरिक संबंधीत भागातील लोकप्रतिनिधींशी संपर्क साधतात. लोकप्रतिनिधी अधिकारी कर्मचाऱ्यांवर दबाव टाकतात. परिणामी त्या भागाला पाणी मिळते. पण त्यापुढील भागात पाण्याची समस्या निर्माण होते. गेल्या दोन महिन्यापासून शहरात असे दृष्टचक्र सुरु आहे. अशा परिस्थीतीतून मार्ग काढण्यास अधिकारीही सपशेल अपयशी ठरले आहेत. त्यामुळे संपूर्ण पाणीपुरवठ्याची यंत्रणाच कोलमडून गेली आहे.

शहरात सुमारे ५५० किमीचे जलवाहिन्याचे झाळे विणले आहे. कोणती वाहिनी कधी टाकली आहे, त्याची दुरुस्ती कधी करणे आवश्यक आहे, याबाबतचा आराखडा पाणीपुरवठा विभागाकडे नाही. तसेच अनुभवी कर्मचाऱ्यांचीही वाणवा आहे. परिणामी वारंवार जलवाहिन्यांना फुटून गळती निर्माण होत आहे. कर्मचाऱ्यांचा बहुतांशी वेळ गळती काढण्यात खर्ची जात असल्याने पाणीपुरवठ्याचा सातत्याने बट्ट्याबोळ उडत आहे. एकीकडे कर्मचारी गळती काढण्यात व्यस्त असताना दुसरीकडे पाणी सोडण्यासाठी कर्मचारी कमी पडत आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून पाणीपुरवठा योजना हस्तांतरीत झाल्यानंतर पाणीपुरवठा विभागाकडे वर्ग एक ते चार पदाचे ५४३ अधिकारी-कर्मचारी होते. यामध्ये ६० हंगामी कर्मचाऱ्यांचा समावेश होता. सद्य:स्थितीत विभागाकडे ३७८ कर्मचारी असून त्यापैकी १११ हंगामी कर्मचारी आहेत. हंगामी कर्मचाऱ्यांना लोकप्रतिनिधींचा आश्रय मिळत असल्याने असे कर्मचारी त्यांच्याच तालावर नाचत आहेत. एकीकडे कर्मचाऱ्यांकडे अनुभवाची कमतरता असताना अनेक कर्मचाऱ्यांना मुळ हुद्दा सोडून इतर कामे सोपवली आहेत. परिणामी शहराची पाणीपुरवठा अधिकच विस्कळीत होत आहे.

.....................

चौकट

व्यवस्थापन खर्चामुळे पदभरतीची अडचण

महापालिका नियमानुसार एकूण अर्थसंकल्पाच्या ३५ टक्क्यापेक्षा कमी रक्कम व्यवस्थापनावर खर्च होणे अपेक्षीत आहे. सद्य:स्थितीमध्ये महापालिकेचा ५७ टक्केपेक्षा अधिक खर्च व्यवस्थापनावर होत आहे. नियमापेक्षा जास्त व्यवस्थापन खर्च झाल्यास नगरविकास विभाग पदभरतीला परवानगी देत नाही. महापालिकेत सध्या १०७० पदे रिक्त असून पदभरतीसाठी नगरविकास विभागाला पत्रव्यवहार केला आहे. मात्र या पदाची भरती केल्यानंतर पुन्हा व्यवस्थापन खर्च वाढणार असल्याने पदभरतीला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. त्याचा सर्वाधीक फटका पाणीपुरवठा विभागाला बसला आहे.

..........................

चौकट

दृष्टीक्षेप पाणीपुरवठा

सुमारे सात लाख

शहराची एकूण लोकसंख्या

१२० एमएलडी

दैनंदिन लागणारे पाणी

१४० एमएलडी

दैनंदिन उपसा

५० एमएलडी

पाणी गळती

..........................

चार उपसा केंद्रांची क्षमता

३८ एमएलडी

बालिंगा

८ एमएलडी

कळंबा फ्लिटर हाऊस

६० एमएलडी

पुईखडी

३६.५ एमएलडी

कसबा बावडा

.......................

चौकट

१९९२ कर्मचारी संख्या (तीन लाख लोकसंख्येसाठी)

कायम कर्मचारी : ४३३

हंगामी : ६०

पवडी विभागाचे : ५०

एकूण : ५४३

................

२०१८ कर्मचारी संख्या (सात लाख लोकसंख्या)

जलअभियंता : १ (प्रभारी)

उपजलअभियंता : ० (रिक्त पदे ३)

अभियंता : ८ (रिक्त पदे ११)

वर्ग तीन : २१ (रिक्त पदे १३०)

वर्ग चार : १६७ (रिक्त पदे ६५)

हंगामी कर्मचारी : १११

एकूण : ३७८

.....................

कोट

वेतन आयोगामुळे व्यवस्थापन खर्चात वाढ होत आहे. तसेच महापालिकेच्या उत्पन्नाच्या स्त्रोतामध्ये वाढ झालेली नाही. निवृत्त कर्मचाऱ्यांची संख्या वाढत असल्याने केवळ अतिमहत्त्वाच्या पदावरील अधिकाऱ्यांची ठोक मानधनावर नियुक्ती केली जात आहे. तसेच एमजीपीकडून अधिकारी मिळणे अपेक्षीत आहे. पण तसे अधिकारी मिळत नसल्याचा परिणाम पाणीपुरवठा विभागावर होत आहे.

मंगेश शिंदे, उपायुक्त

...............

अधिकाऱ्यांकडे नियोजन आहे, पण त्याची अंमलबजावणी कर्मचारी करत नाहीत. बेजबाबदारपणे कर्मचारी काम करत असल्याने पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. गळती काढण्याकडे दुर्लक्ष होत असून उंचावरील टाक्या भरत नसताना जुन्या लाइनला पुरेसा पाणीपुरवठा होत नाही.

स्वाती यवलुजे, नगरसेविका

...........................

शहराची लोकसंख्या पाहता पुरेश्या पाणीपुरवठ्यासाठी थेट पाइपलाइन योजनेद्वारे प्रयत्न सुरु आहे. पण प्रशासनाच्या दुर्लक्षांमुळे वितरण व्यवस्था विस्कळीत झाली आहे. प्रश्न एका भागापुरता मर्यादीत नसून संपूर्ण शहराचा असताना अधिकारी व प्रशासन गांभीर्याने घेत नाही. त्याचा उद्रेक सभेत व आंदोलनाद्वारे उमटत आहे. स्थिती आणखी चिघळण्यापेक्षा प्रशासनाने पाणीपुरवठ्याचे अधिक काटेकोर नियोजन करण्याची गरज आहे.

संदीप मोहिते, नागाळापार्क

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हाधिकारी कार्यालयासमोरएनएसयूआयतर्फे निदर्शने

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

मोटार वाहन निरीक्षक पदावरील निवड रद्द झालेल्या ८३३ उमेदवारांना न्याय मिळावा, या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी कोल्हापूर जिल्हा नॅशनल स्टूडंटस युनियन ऑफ इंडियातर्फे (एनएसयूआय) बुधवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना देण्यात आले.

हलके मोटार वाहन, गिअरची मोटारसायकल चालवण्याचा परवाना असावा, कार्यशाळेतील कामाचा अनुभव दाखल असे निकष वाहन निरीक्षक पदासाठी आहे. या निकषात पात्र असणाऱ्या उमेदवारांनी वाहन निरीक्षक पदाची परीक्षा दिली. उत्तीर्ण होऊन निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांच्या पडताळणीची तारीख निश्चित केली. दरम्यान, उमेदवारांनी जुन्या अटींची पूर्तता केली नसल्याचे कारण देत उच्च न्यायालयाने त्यांची निवड रद्द ठरवली. त्याचा फटका राज्यातील ८३३ उमेदवारांना बसला. ते मानसिकदृष्या खचले आहेत. यामुळे राज्य सरकारने यामध्ये हस्तक्षेप करून केंद्र सरकारची परवानगी घ्यावी. स्वतंत्र आदेश काढून त्यांना रूजू करून घ्यावे. उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करावी. अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असे निवेदनात म्हटले आहे.

निदर्शनात पार्थ मुंडे, दिपक थोरात, निखिल कांबळे, अजिंक्य पाटील, सुशिल चव्हाण, अक्षय शेळके, वैभव पाटील आदी विद्यार्थी सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंतरपरिमंडलीय नाट्य स्पर्धेत ‘कार्टी नंबर १’ ठरली

0
0

कोल्हापूरची 'कार्टी नंबर १'सर्वोत्कृष्ट

आंतर परिमंडलीय नाट्यस्पर्धा, शेळके, जाधव, शिंदे, पाटील यांना पुरस्कार

कोल्हापूर टाइम्स टीम

महावितरण पुणे प्रादेशिक विभागांतर्गत आयोजित आंतरपरिमंडलीय नाट्य स्पर्धेत कोल्हापूर परिमंडलाचे 'कार्टी नंबर १'सर्वोत्कृष्ट ठरले. पुणे परिमंडलाच्या 'प्रेमात सगळंच माफ' नाटकाने व्दितीय क्रमांक पटकाविला. औरंगाबाद येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले.

महावितरणतर्फे आयोजित दोन दिवसीय नाट्यस्पर्धा कोल्हापुरातील नाट्यरसिकांसाठी मेजवानी ठरली. पुणे परिमंडलाने वसंत कानेटकर लिखित 'प्रेमात सगळंच माफ', बारामती परिमंडलाने अनिल सोनार लिखित 'वाट चुकलेला नवरा' व कोल्हापूर परिमंडलाने शिवाजी देशमुख लिखित 'कार्टी नंबर-१' नाटक सादर करुन प्रेक्षकांची मने जिंकली. वैयक्तिक पुरस्कारात उत्कृष्ट दिग्दर्शनाचा पहिला पुरस्कार पुण्याचे विवेक शेळके यांना तर कोल्हापूरचे राजेंद्र जाधव यांना व्दितीय क्रमांक मिळाला. उत्कृष्ट अभिनय महिला गटात पुण्याच्या मृदुला शिंदेने प्रथम व भक्ती पाटील दुसऱ्या क्रमांकांच्या पारितोषिक विजेत्या ठरल्या.

पुरुष गटात अभिनयाचा पहिला पुरस्कार दत्तात्रय चव्हाण (बारामती) व दुसरा क्रमांक मंगेश कांबळे (बारामती) विजेते ठरले. नेपथ्यमध्ये विनायक इदाते व भरत अभंग विजेते ठरले. योजना विभागात प्रशांत परळे(पुणे) तर अरविंद यादव व महावीर शेंडगे (बारामती)यांनी पारितोषिके पटकाविली. संगीत विभागात निलेश गव्हाणे (बारामती), संजय नाईकवाडे (पुणे) तर रंगभूषा व वेशभूषेमध्ये कोल्हापूरचे आनंदा सावळे, माधुरी गोसावी, अपर्णा महाडिक यांनी पारितोषिके पटकाविली.

मुख्य अभियंते अनिल भोसले (कोल्हापूर), सचिन तालेवार (पुणे), सुनिल पावडे (बारामती), प्रभारी सहमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी भरत पवार यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण झाले. याप्रसंगी परीक्षक डॉ. शशिकांत चौधरी, डॉ. राजश्री खटावकर व संतोष शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. शिरीष काटकर यांनी प्रास्ताविक केले. प्रसाद दिवाण यांनी आभार मानले. मुख्य अभियंता अनिल भोसले यांच्या नेतृत्वाखाली अधीक्षक अभियंता शैलेंद्र राठोर, संजय साळे, मनोज विश्वासे यांनी नाट्यस्पर्धेच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासदारकीसाठी शेट्टींची सोयीची भूमिका

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'सामान्य कार्यकर्त्यांनी रस्त्यावरचे आंदोलन करून राजू शेट्टी यांना खासदार केले. नंतर त्यांना कार्यकर्त्यांचा विसर पडला. खासदारकी वाचविण्यासाठी ते सोयीची भूमिका घेत राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाशी जवळीक करीत आहेत. त्यांना आलेली सत्तेची धुंदी २०१९ ला शेतकरीच उतरवतील,' असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील बंडखोर कार्यकर्ते शिवाजी माने यांनी बुधवारी केला.

'स्वाभिमानी'तून बाहेर पडून 'जय शिवराय किसान मोर्चा' संघटनेची दसऱ्याच्या निमित्ताने स्थापना करण्यात आली. याप्रसंगी शाहू स्मारक भवनात आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. ज्येष्ठ शेतकरी उत्तम पाटील अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर भात रोपाला पाणी घालून आणि संघटनेच्या डिजिटल फलकाचे अनावरण करून संघटनेची घोषणा केली.

माने म्हणाले, 'आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी संघटना वाढवली. प्रत्येक ऊस आंदोलनात लाठ्या-काठ्या खाल्या. त्यांना आमदार, खासदार केले. मात्र, ते नेहमी विशिष्ट जातीमधील लोकांनाच जवळ करीत राहिले. सामान्य कार्यकर्त्यांची कोंडी झाली. त्यामुळे बंडाचा निर्णय घेतला. खासदार शेट्टी प्रत्येक निवडणुकीत वेगवेगळी भूमिका घेतात. गेल्या लोकसभा निवडणुकीत सेना, भाजपला जवळ केले. आता खासदारकी वाचविण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीला जवळ करीत आहेत. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यावर टीका करून प्रसिद्धी मिळवली. सध्या ते त्यांच्या मांडीला मांडी लावून बसत आहेत.'

शेट्टी खासदारकीसाठी चळवळीशी प्रतारणा करीत असल्याचा आरोप करत ते म्हणाले, 'शाहूवाडी तालुक्यातील बांबवडे येथे भात परिषद घेऊन राईस मिल काढण्याचे आश्वासन दिले. प्रत्यक्षात त्यांनी शिरोळ तालुक्यातील निमशिरगाव येथे मिल सुरू केली. त्या मिलमध्ये संचालक म्हणून त्यांचेच नातेवाईक आहेत. त्यांच्या अशा भूमिकेला कंटाळूनच आम्ही बाहेर पडून नवी संघटना काढली. नव्या संघटनेच्या माध्यमातून सामान्य शेतकरी, मजुरांना न्याय मिळवून द्यायचा आहे. त्यासाठी संघर्ष करायचा आहे. ऊसदरासाठी सरकारशी भांडायचे आहे. त्यासाठी शेतकऱ्यांची साथ हवी.'

यावेळी संघटनेच्या संस्थापक अध्यक्षपदी माने यांची निवड झाल्याची घोषणा करण्यात आली. शामराव पाटील यांनी प्रास्ताविक केले. भीमराव पाटील, बाबासाहेब पाटील, ईश्वर कांबळे, नारायण थोरवत यांची भाषणे झाली. सदाशिव कुलकर्णी, अणागोंडा शिंदे, युवराज आडनाईक, धनाजी पाटील, शिवाजी शिंदे, शामराव पाटील आदी उपस्थित होते.

००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यायी पुलाच्या पिलर कामाला सुरुवात

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पंचगंगा नदीवरील पर्यायी पुलाचे काम जलदगतीने पूर्ण करण्यासाठी नियोजन सुरू आहे. येत्या चार दिवसात दोन्ही बाजूंनी भराव व इतर कामाला सुरुवात होईल. पुलाच्या अंतिम पिलर बांधणीच्या कामाला सुरुवात झाली आहे. त्यातंर्गत पिलर उभारणीसाठी काँक्रिट टाकले आहे.

बांधकामासाठी आवश्यक मटेरियल, सळ्या तोडणे, जुळणी ही कामे सुरू असल्याची माहिती ठेकेदार कंपनीचे प्रतिनिधी एन.डी.लाड यांनी दिली. पंचगंगा नदीवरील पर्यायी पुलाचे काम पुरातत्व विभागाच्या मालकीच्या जागेवरुन रखडले होते. दरम्यान, शिवाजी पुलाची जागा पुरातत्व विभागाच्या हद्दीत समाविष्ठ नसल्याचा अहवाल जून महिन्यात मिळाला.

मात्र पाऊस आणि नदी पात्रात पाण्याची पातळी यामुळे पिलर उभारणी व अन्य काम पूर्ण थांबली होती. चार महिन्यानंतर पुन्हा एकदा पुलाच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे. पुलासाठी पिलर उभारणी अत्यावश्यक असून त्यासाठी काँक्रिटीकरण केले आहे.

..................

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images