Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

प्रलंबित कामासाठी महापालिकेची निविदा प्रसिद्ध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गेल्या वर्षापासून रखडलेल्या शहरातील विविध कामांसाठी महापालिकेने निविदा प्रसिद्ध केली आहे. महापालिकेच्या संकेतस्थळावरील प्रसिद्ध या निविदांमध्ये कामामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडील कामांचा यामध्ये समावेश आहे. सुमारे पाच ते दहा लाखांच्या कामांसाठी दुसऱ्यांना निविदा प्रसिद्ध केली, असून मंगळवार (ता. २३) पर्यंत मान्यताप्राप्त ठेकेदारांना निविदा दाखल करता येणार आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने रस्ते डांबरीकरण, आर. सी. सी. चॅनेल, पॅसेज काँक्रिटीकरण, भाजी मंडई बांधणे, टाकाळा येथे अॅम्पिथिएटर बांधणे, गटर, क्रॉसड्रेन आणि प्राथमिक आरोग्य केंद्राची दुरुस्ती आदी कामांचा समावेश आहे. या सर्व एकत्र कामासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. या सर्व कामासाठी यापूर्वी निविदा प्रसिद्ध केली होती. पण निविदाधारकांनी प्रतिसाद न दिल्याने पुन्हा निविदा काढण्यात आली आहे. सुमारे २० लाख रुपये खर्चून टाकाळा येथे बांधण्यात येणाऱ्या अॅम्पिथिएटर या प्रमुख कामाचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाण्यापुरवठ्यावरून उद्या खडाजंगी?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरातील विस्कळीत झालेल्या पाणीपुरवठा नियोजनासाठी महापालिकेची विशेष सभा मंगळवारी (ता. ९) दुपारी १२ वाजता होणार आहे. यापूर्वीही सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी विशेष सभा घेतली होती, पण सभेनंतर पाणीपुरवठा विभागाने कोणतेच नियोजन केले नसल्याने, पुन्हा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. वर्षभरानंतर अशी विशेष सभा होत असून, सभेत पाणीपुरवठा विभागाने तयार केलेल्या दिवसाआड पाणीपुरवठ्याचा प्रस्ताव सादर होण्याची शक्यता आहे. असा प्रस्ताव जर महासभेसमोर आल्यास सभा वादळी होण्याची शक्यता आहे.

बालिंगा उपसा केंद्रातील ट्रान्स्फॉर्मरमध्ये झालेला बिघाड, ठिकठिकाणी सुरू असलेली गळती आणि अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. गणेशोत्सवापासून सुरू झालेल्या अपुऱ्या पाणीपुरवठ्यावर पाणीपुरवठा विभागाला मार्ग काढता आलेला नाही. परिणामी नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. नागरिकांच्या रोषाला लोकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांना सामोरे जावे लागत आहे.

स्थायी समितीच्या प्रत्येक बैठकीसह महासभेत पाणीपुरवठा विभागाला लक्ष्य केले जात आहे, पण अद्यापही नियमित पाणीपुरवठ्याचा प्रश्न निकालात निघालेला नाही. यातून मार्ग काढण्यासाठी पाणीपुरवठा विभागाने दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. पण प्रस्ताव सभेपुढे येण्यापूर्वीच लोकप्रतिनिधींसह इतर संघटनांनी विरोध दर्शविण्यास सुरुवात झाली आहे. नागरिकांची सातत्याने होणारी आंदोलने आणि पाणीपुरवठ्याचा उडालेला बट्ट्याबोळ यावर उपाययोजनासाठी स्थायी समितीने विशेष सभा बोलावण्याची मागणी महापौर शोभा बोंद्रे यांच्याकडे केली होती. सदस्यांच्या मागणीनुसार मंगळवारी विशेष सभा होणार आहे. उपनगरांसह 'ई' वॉर्डमध्ये पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने सभेत पाणीपुरवठा विभागावर प्रश्नांची सरबत्ती होणार आहे. परिणामी सभा वादळी होण्याची शक्यता आहे.

अपुरा पाणीपुरवठ्यांमुळे अनेकठिकाणी परस्पर व्हॉल्व्ह सोडून पाणीपुरवठा केला जातो. परिणामी इतर भागात त्याचा परिणाम होता. याविरोधात पाणीपुरवठा विभागाकडे अनेकदा तक्रारी दाखल झाल्या आहेत. पण याकडे पाणीपुरवठा विभागाचे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्याचा फज्जा उडाला आहे. गळतीद्वारे दररोज तब्बल चार ते पाच लाख लिटर पाणी गटारीतून वाहून जात असताना गळती काढण्यास विभागाला अपयश आले असून, त्याचाही पाणीपुरवठ्यावर परिणाम होत आहे.

०००

यावर नियंत्रण कसे मिळवणार?

शहराला दैनंदिन १२० एमएलडी पाणीपुरवठ्याची आवश्यकता असताना १४० एमएलडी पाण्याचा उपसा केला जातो. म्हणजे गरजेपेक्षा २० एमएलडी पाणी जास्त उपसा केले जाते. यामधील तब्बल ५० एमएलडी पाणी गळतीवाटे गटारीतून वाहून जाते. परिणामी आवश्यकतेपेक्षा शहराला ३० एमएलडी पाणी कमी पडते. गळतीवाटे जाणाऱ्या पाण्यावर विभाग कसे नियंत्रण मिळवणार हाच कळीचा मुद्दा ठरण्याची शक्यता आहे.

००००

दृष्टिक्षेपात पाणीपुरवठा

५.६० लाख

शहराची एकूण लोकसंख्या

१२० एमएलडी

दैनंदिन लागणारे पाणी

१४० एमएलडी

दैनंदिन उपसा

५० एमएलडी

पाणी गळती

०००

उपसा केंद्रांची क्षमता

३८ एमएलडी

बालिंगा

८ एमएलडी

कळंबा फ्लिटर हाउस

६० एमएलडी

पुईखडी

३६.५ एमएलडी

कसबा बावडा

०००००००००००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इतिहासाच्या अभ्यासासाठी मोडी लिपीच पर्याय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'सत्याची कास धरून इतिहासाचा अभ्यास आवश्यक आहे. जुन्या काळातील वस्तुनिष्ठ अभ्यासासाठी मोडी लिपीशिवाय पर्याय नाही. उदयसिंह राजेयादव यांनी परिश्रमपूर्वक मोडी कागदपत्रांचा अभ्यास करून जे संशोधन केले आहे, ते अभ्यासकांसह सर्वच घटकांना उपयुक्त ठरेल,' असे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक पंढरीनाथ थावरे यांनी केले.

श्रीमंत उदयसिंह मानसिंगराव राजेयादव लिखित 'करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीची मोडी कागदपत्रे : खंड ४' या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ झाला. तावरे यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले. अध्यक्षस्थानी गुरुनाथ विश्वनाथ मुंगळे होते. राधाबाई मंगल कार्यालय येथे रविवारी सायंकाळी कार्यक्रम झाला. राष्ट्रीय इतिहास मोडी प्रबोधिनी आणि श्रीमंत राजेयादव चॅरिटेबल ट्रस्टतर्फे कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

थावरे म्हणाले, 'धर्मसत्ता व राजसत्तांनी जेव्हा हातात हात घालून काम केले, तेव्हा ते कार्य समाजाला मार्गदर्शन लाभल्याची असंख्य उदाहरणे आहेत. राजेयादव यांनी मोडी कागदपत्रांचा अभ्यास करून वस्तुनिष्ठ माहिती समोर आणलेली आहे.'

अध्यक्षस्थानावरून बोलताना मुंगळे म्हणाले, 'संशोधकाला सत्याचा ध्यास असला पाहिजे. त्याच्या ठायी संशोधनाविषयी प्रेम, तौलनिक अभ्यास, कालमापनीय व्यवहार आणि सत्याचा शोध घेण्याच्या प्रवृत्ती सजग असतात. राजेयादव यांनी चिंतनशील वृत्तीने मोडी कागदपत्रांचा अभ्यास करून आदिशक्तीचे अनोखे दर्शन घडविले आहे.' भागवताचार्य तुकाराम विप्र म्हणाले, 'सध्या मोडी लिपी संपुष्टात येण्याच्या मार्गावर असताना लेखकाने संशोधनाची कास धरली. मोडी कागदपत्रांचा अभ्यास, लेखन करत या लिपीला ऊर्जितावस्था मिळवून देण्यासाठी केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत.'

उदयसिंह राजेयादव म्हणाले, 'कागदपत्रांचा अभ्यास करताना अनेक गोष्टी समोर आल्या. करवीरनिवासिनीसाठी आदिलशाही काळात देणग्या दिल्याची माहिती आहे. पूर्वी सादिलवार कररचना होती. साठ गावांतून कर जमा व्हायचा. रथोत्सवाला १८४४ मध्ये सुरुवात झाल्याचे उल्लेख आढळतात. त्यासाठी स्वतंत्र कर आकारणी केली जायची.'

याप्रसंगी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष गुलाबराव घोरपडे, मंगला घोरपडे-देशमुख (गजेंद्रगड) आदी उपस्थित होते.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीपुरवठा सुरळीत कराअन्यथा घागर मोर्चा

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

यंदा भरपूर पाऊस पडल्याने जिल्ह्यातील तलाव, धरणे तुंडूब भरली आहेत. पाण्याची कमतरता नसताना महापालिका प्रशासन एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव तयार करत आहे. असा प्रस्तावानुसार पाणीपुरवठा सुरू केल्यास ताराराणी चौकात रास्ता रोको करून महापालिकेवर घागर मोर्चा काढण्याचा इशारा शहर झोपडपट्टी महासंघाच्या बैठकीत दिला. अध्यक्षस्थानी माजी नगरसेवक अशोक भंडारे होते.

बैठकीत बोलताना माजी नगरसेविका मायादेवी भंडारे म्हणाल्या, 'शहरात दररोज तीस ते चाळीस ठिकाणी लहान-मोठ्या पाणी गळती सुरू आहेत. एकूण पाणी उपशापैकी ५० टक्के पाणी रस्त्यावरून, गटारींतून वाहून जात आहे. मात्र याकडे दुर्लक्ष करुन प्रशासन एक दिवसा आड पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव तयार करत आहे. प्रशासनाने या प्रस्तावाची अंमलबजावणी केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.'

बैठकीस रमजान शेख, अकाराम पाटील, विश्वास आवळे, बाबासाहेब कांबळे, यल्लाप्पा गवळी, नागनाथ पाटील, नेमिनाथ यादव, चंद्रकांत माने, शांताबाई पाटील, शोभा माने आदी महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आर्थिक तंगीतून आजीनेच केला नातीचा खून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आजी आणि नात या नात्याची वेगळी परिभाषा असते. मात्र, केवळ आर्थिक परिस्थितीने चिमुकल्या बालिकेला जीव गमवावा लागण्याची हृदयद्रावक घटना यादवनगरातील कोटीतीर्थ वसाहतीतील नागरिकांच्या जीवाला चटका लावणारी ठरली. गरीबी, दारिद्र्य हे शब्दही ठाऊक नसलेल्या अवघ्या तीन महिन्यांच्या शफिनाच्या पोषणासाठी दूध पावडर आणि औषधासाठी पैसे नसल्याच्या कारणावरून आजी महोबतबी हिनेच तिचा गळा घोटला.

फॅब्रिकेशनचे काम करणाऱ्या शब्बीर मुल्ला यांचे यादवनगरातील कोटीतीर्थ परिसरातील महानगरपालिकेच्या चाळीतील राहणारे काही दिवसांपूर्वीच बनलेले चौकोनी कुटुंब. शब्बीर यांची पत्नी शहनाज, आई महोबतबी आणि अवघ्या तीन महिन्यांची नात शफिना. मात्र कुटुंबाची आर्थिक परिस्थिती पेलवत नसल्याने आजी महोबतबी मुल्ला हिने नात शफिनाचा गळा आ‌वळून खून केला.

शनिवारी (ता. ६ ऑक्टोबर) नेहमीप्रमाणे सकाळी वडील शब्बीर, आई शहनाज घरात होते. तीन महिन्यांची शफिना पाळण्यात खेळत होती. तिची आई शहनाज घरात पाणी भरण्याच्या गडबडीत होत्या. त्यांनी मुलीला दूध देण्यासाठी पावडरचा डबा काढून ठेवला होता. नळाला आलेले पाणी भरून घरात आलेली आई शहनाज या अंघोळीसाठी गेल्या. त्यावेळी आजी महोबतबी हिने पाळण्यात खेळत असलेल्या शफिनाला दुसऱ्या खोलीत नेले. या खोलीत तिने हाताने शफिनाचा गळा दाबला. अवघ्या काही सेकंदाच त्या चिमुरडीचा जीव गमावला. गळ्यावर उमटलेले हाताचे व्रण मिटविण्यासाठी तिने निळी शाई शफिनाच्या गळ्याला लावली. कोणालाही शंका येऊ नये म्हणून महोबतबीने शफिनाला पुन्हा पाळण्यात ठेवले. अंघोळ करून आल्यानंतर दूध देण्यासाठी

शहनाज या पाळण्याजवळ गेल्या. त्या वेळी तिची हालचाल थांबल्याचे त्यांना दिसले. त्यांच्या जीवाची घालमेल झाली. घाबरलेल्या शहनाज यांनी पती शब्बीर आणि सासू महोबतबी यांच्या कानावर हा प्रकार घातला. त्या वेळी आजी महोबतबी हिने शफिनाच्या गळ्याला खरचटल्याने शाई लावल्याचे सांगितले.

आजी महोबतबी आणि शब्बीर हे दोघेही शफिनाला घेऊन सीपीआरमध्ये आले. मात्र, उपचार सुरू करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी मुल्ला कुटुंबीयांना सांगितले. या वेळी शफिनाच्या गळ्यावर असलेल्या व्रणावरून डॉक्टरांना संशय आला. त्यांनी शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांना बोलावून घेतले. या प्रकाराची माहिती राजारामपुरी पोलिसांना दिली. त्या वेळी खुनाचा प्रकार उघडकीस आला. राजारामपुरी पोलिसांनी आजी, आई आणि पतीला पोलिस ठाण्यात बोलावून घेतले. त्यावेळी महोबतबी हिच्याकडे कसून चौकशी केल्यावर तिने घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. तिच्यावर खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला.

पाळणा अन दूध पावडरचा डबा

सातव्या महिन्यात जन्माला आल्यामुळे नाजूक प्रकृतीच्या शफिनाला आईचे दूध पचत नव्हते. त्यामुळे तिला दूध पावडर आणुन त्याचे दूध तयार केले जायचे. दररोज सकाळी आई शहनाज शफिनाला दूध देत होती. शनिवारी मुल्ला कुटुंब दवाखान्यातून परतल्यानंतर शफिनाचा मृत्यू झाल्याचे समजताच शहनाज यांना धक्का बसला. मुलगी सकाळपासून उपाशी आहे. तिला परत आल्यानंतर दूध द्यावे यासाठी त्या प्रतीक्षा करत होत्या. पण शफिना जीवंत घरी परतलीच नाही. घरातील पाळणा अन् दुधाच्या पावडरच्या डब्याकडे पाहून त्यांनी फोडलेला हंबरडा सर्वांना अस्वस्त करून गेला.

मुलगी झाली नकोशी

आर्थिक कारणासह नाजूक प्रकृतीची नात शफिना ही आजी महोबतबी यांना नकोशी झाली. त्यातून हा प्रकार घडल्याची चर्चा यादवनगर परिसरात आहे. यासंदर्भातही पोलिस तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विसंवादाची दरी भरून काढा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लहान मुलांना मोबाइलचे अविवेकी व्यसन जडले आहे. पालक आणि बालकांमध्ये तयार झालेली विसंवादाची दरी भरून काढल्यास मोबाइलपासून होणाऱ्या दु:ष्परिणामांपासून मुलांना वाचवता येईल अशी माहिती मार्गदर्शक कर्णजित गावडे यांनी दिली. 'महाराष्ट्र टाइम्स'चा कल्चर क्लब' व 'प्रोजेक्ट द्रोणा' या संस्थेमार्फत 'मोबाइल आणि मुले' या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते शाहू स्मारक भवन कॉन्फरन्स हॉलमध्ये बोलत होते.

कर्णजित गावडे म्हणाले, 'आजकाल मोबाइलचा अतिवापर वाढला असून लहान मुलेही मोबाइलमध्ये गुंतलेली दिसतात. मोबाइलवर तासानतास गेम खेळणे, पालकांकडे सतत मोबाइलसाठी आग्रह धरणे असे प्रकार दिसून येतात. त्याचा लहान मुलांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होतो. मोबाइलच्या आहारी जाणाऱ्या मुलांना बाहेर या विळख्यातून काढण्यासाठी पालकांनी महत्वाची भूमिका बजावली पाहिजे.'

कर्णजित गावडे म्हणाले, 'धावपळीच्या जगात बालक पालक संवाद कमी होत आहे. त्यामुळे मुले सतत मोबाईलमध्ये गुंतून राहतात. तसेच मोबाइल वापरताना त्यांना वेळेची मर्यादा राहत नाही. सोशल मीडियाची रचनादेखील मुलांना गुंतवून ठेवेल अशीच केलेली असते. त्यामुळे हळुहळू मुलांना मोबाइलचे व्यसन जडते आणि मुले त्याच्या कायमची आहारी जातात. मोबाइलच्या चुकीच्या वापरामुळे मुलांना नैराश्य, चिंता, अतिताण असे मानसिक विकार जडतात. या विकारांपासून मुलांना दूर ठेवण्यासाठी पालक आणि मुले यांच्यातील नाते निकोप ठेवणे गरजेचे आहे. पालक आणि मुले यांच्यातील नातेसंबंध दृढ झाल्यास मोबाईलच्या अतिरेकी विळख्यापासून मुलांना दूर ठेवता येईल.'

कार्यशाळेत स्लाईड शोद्वारे शास्त्रीय माहिती पालकांना देण्यात आली. यावेळी पाचवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. अर्चना आरबोळे यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोथंबीर, मेथीच्या दरात वाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पितृपक्षातील शेवटचा काळ असलेल्या सर्वपित्री अमावस्येच्या पार्श्वभूमीवर आज रविवारी बाजारपेठेत भाज्यांची मोठी खरेदी झाली. कडक उन्हाच्या तडाख्यामुळे कोथंबीर आणि मेथी पेंढीच्या दरात दहा रुपयांनी वाढ झाली. तसेच नवरात्रोत्सवाला बुधवारी प्रारंभ होत असल्याने फळांची आवक वाढली आहे.

सोमवारी (ता. ८ ऑक्टोबर) पितृ पंधरवड्यातील शेवटची सर्वपित्री अमावस्या महालय आहे. या दिवशी सर्वात जास्त नैवेद्य दाखविण्याचा विधी असल्याने आज लक्ष्मीपुरी, कपिलतीर्थ, ऋणमुक्तेश्वर या भाजी मंडयांत दोडका, चवळी, बटाटा, भेंडी, मेथी या भाज्यांची मोठी खरेदी झाली. कोथिंबिर पेंढीचा दर पाच ते दहा रुपयांवरून २० ते ३० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. मेथी पेंढीचा दर १५ ते २० रुपये इतका होता. मेथीला मोठी मागणी होती. वांग्याच्या दरात प्रतिकिलो पाच ते दहा रुपयांची वाढ झाली आहे. दोडका, वरणा, भेंडीचे दर स्थिर राहिले. दोडका, वरणा, भेंडीची २० ते ३० रुपये प्रतिकिलो दराने विक्री झाली. कोबीची मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने दर प्रतिगड्डा १० रुपये होता. फ्लॉवर प्रतिगड्डा १५ ते ३० रुपयांना विकला गेला.

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फळ मार्केटमध्ये तेजीचे वातावरण आहे. सफरचंद, संत्री, मोसंबी, सिताफळे, चिकू या फळांची आवक झाली. ६० ते २०० रुपये प्रतिकिलोने सफरचंदाची विक्री केली जात आहे. सिताफळची ५० ते १०० रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहे. चिकूचा दर ४० रुपये किलो आहे.

फळभाज्यांचे दर (प्रतिकिलो, रुपयांत)

वांगी ४० ते ६०

टोमॅटो १०

भेंडी ४०

ढबू मिरची ४० ते ६०

गवार ८०

दोडका ४०

कारली ५०

वरणा ४०

ओली मिरची ४०

बटाटा २५ ते ३०

लसूण ३०

घेवडा ४०

फ्लॉवर १५ ते ३० नग

कोबी १० नग

पालेभाजी दर (पेंढी, रुपयांत)

मेथी १५ ते २०

शेपू १०

कांदा पात १०

कोंथबीर २० ते ३०

फळांचे दर (प्रतिकिलो, रुपयांत)

सफरंचद ६० ते २००

डाळिंब ४० ते ८०

पेरू ५० ते ८०

सिताफळ ४० ते ८०

पपई २० ते ४० (नग)

केळी २० ते ६० (डझन)

जवारी केळी २० ते ७० (डझन)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पीबींच्या लेखनात जुन्या-नव्या विचारांची सांगड’

$
0
0

फोटो आहे...

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'विचारांना प्रयोगाची जोड देणारे लेखन कार्यकर्ता निर्माण करते. दिवंगत प्राचार्य पी. बी. पाटील यांचे लेखन जुन्या नव्या विचारांची सांगड घालून आव्हानांना सामोरे जाणारे आहे,' असे गौरवोद्गार उपजिल्हाधिकारी उत्तम पाटील यांनी काढले.

ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य पी. बी. पाटील लिखित 'समाज परिवर्तन' व 'नवे गाव आंदोलन' पुस्तकांच्या चौथ्या आवृत्तीच्या प्रकाशनप्रसंगी ते शाहू स्मारक भवन येथे बोलत होते. वाचनकट्टा प्रकाशन संस्थेच्या वतीने प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ लेखक 'रातवा'कार चंद्रकुमार नलगे होते.

उपजिल्हाधिकारी पाटील म्हणाले, 'एक कर्ते विचारवंत म्हणून प्राचार्य पी. बी. पाटील यांचे समाजाच्या जडणघडणीत मोठे योगदान आहे. त्यांच्या विचारांचा आवाका मोठा असून, त्याच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. लिखाणातून परिवर्तन होते यावर त्यांचा विश्वास होता. त्यांनी आयुष्यभर लेखणीच्या माध्यमातून शेताच्या बांधावर विचार पोहोचविण्याचे काम केले. सशक्त कार्यकर्ता निर्माण व्हावा ही त्यांच्या लेखनामागची तळमळ होती. सर्वसामान्य कार्यकर्त्याला केंद्रस्थानी मानून त्यांनी माणूस उभारणीचे काम केले आहे. समाजपरिवर्तनासाठी राज्यघटनेची ध्येयधोरणे अभ्यासून कार्यकर्त्यांनी पुढे यावे. शिक्षण आणि आर्थिक विकासासाठी समाजात प्रभावी जनजागृती होणे गरजेचे आहे. निसर्गाची हानी करून कोणतेही काम होता कामा नये. परिवर्तन आणि नवे गाव आंदोलन ही पुस्तके समाज उभारणीच्या कामात महत्त्वाचे योगदान देतील.'

गीता पाटील म्हणाल्या, 'समाज परिवर्तन' व 'नवे गाव आंदोलन' पुस्तकांच्या चौथ्या आवृत्तीचे प्रकाशन करवीर नगरीत होत असल्याचा आनंद वाटतो. या पुस्तकांत बहुजन समाजाच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या गोष्टी मांडल्या आहेत. श्रमशक्तीतून ग्रामविकास साधण्याचे काम यापुढे करावे लागणार आहे. महिला सक्षमीकरणासाठी 'नवे गाव आंदोलन' महत्त्वाचे ठरेल.'

यावेळी प्रा. महेश थोरवे, शिवाजी पाटील, शशिकांत सुतार, सुमय्या मंगळूरकर यांचा सत्कार करण्यात आला. शाहीर दिलीप सावंत यांनी प्राचार्य पी. बी. पाटील लिखित लावणी सादर केली. अध्यक्षीय भाषण चंद्रकुमार नलगे यांनी केले. एस. डी. पाटील यांनी स्वागत केले. युवराज कदम यांनी प्रास्ताविक केले. वनिता कदम यांनी आभार मानले.

०००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सख्ख्या बहिणींवर लैंगिक अत्याचार

$
0
0

चंदगड तालुक्यातील घटना; आरोपी मोकाट, पोलिसांसमोर आव्हान

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गरीब कुटुंबाच्या हतबलतेचा फायदा घेऊन दोन अल्पवयीन सख्ख्या बहिणींना पळवून नेत त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकणातील एक आरोपी दुसऱ्या प्रकरणात सध्या वनविभागाच्या ताब्यात आहे. तर दुसरा मोकाट आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल असूनही पोलिसांनी त्यांना अभय दिले आहे. या प्रकरणातील गावगुंडाच्या दहशतीने भयग्रस्त पालकांनी दोन्ही मुलींना घरात आधार देण्यास नकार दिल्याने त्यांना जिल्हा परिवीक्षा व अनुरक्षण संघटनेच्या ताब्यात देण्यात आले आहे. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या आणि अनेक गुन्ह्यांची कडी असणाऱ्या या प्रकरणाचा छडा लावण्याचे आव्हान जिल्हा पोलिसप्रमुखांसमोर आहे.

चंदगड तालुक्यातील एका व्यक्तीला वाघनख्या तस्करीप्रकरणी वनविभागाने ताब्यात घेतल्यानंतर 'महाराष्ट्र टाइम्स'कडे निनावी फोनद्वारे ही माहिती कळवण्यात आली. वाघनखे तस्करी प्रकरणातील घटनेमागे लैंगिक अत्याचाराची आणि एका असहाय कुटुंबाच्या शोषणाची मालिकाच दडली असल्याची दुर्दैवी बाब समोर आली आहे. संबंधित सर्व घटकांशी शहानिशा केल्यानंतर हे धक्कादायक वास्तव समोर आले.

वाघनख्या तस्करी करण्याच्या संशयावरून एका व्यक्तीला चंदगड येथे वनविभागाने अटक केल्यानंतर चौकशीत संदीप दादासाहेब सावंत हाच यामागे सूत्रधार असल्याचे समोर आले. त्याचवेळी त्याआधी पंधरा दिवसांपूर्वी बेपत्ता असलेल्या या दोन बहिणींना सावंतची चौकशी सुरू झाल्यानंतर चंदगड पोलिसांत हजर करण्यात आले. त्यानंतर या प्रकरणावर प्रकाश पडला. पण पोलिसांच्या अनास्थेमुळे मुलींचे अपहरण करून अत्याचार करणारे दोन्ही आरोपी मोकाट असल्यासारखी स्थिती आहे. उपलब्ध माहितीनुसार, वाघनख्या तस्करी प्रकरणात अटक केलेल्या संशयिताच्या दोन्ही मुली सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घरातून गायब झाल्या. वडिलांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता त्या मुली गावातील गावगुंड सावंत (या प्रकरणातील आरोपी) याने पळवून नेल्याचे लक्षात आले. हा गावगुंड मोठा शेतकरी असून काही वर्षांपूर्वी मुंबईहून परतला आहे.

मुलींचे वडील अल्पभूधारक असून ते सावंतच्या शेतात मजूर होते. गरीबीतही दोन्ही मुली एका ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावी, बारावीत शिकत होत्या. या मुलींचे क्लास माझी पत्नी घेईल असे सांगून सावंतने मुलींना घरी बोलवण्यास सुरुवात केली. दरम्यान, सावंत याचा खानापूर (ता. बेळगाव) येथील भाचा (दुसरा आरोपी) अजित प्रभाकर पाटील याने एका मुलीला फूस लावली तर सावंत याने दुसऱ्या मुलीवरही अत्याचार केले. या दोन्ही मुलींनी आपल्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचा जबाब दिला आहे.

...............

पोलिसांची संशयास्पद भूमिका

मुली बेपत्ता प्रकरणात त्यांचे वडील पोलिसांत जाणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर सावंत याने त्यांच्या गाडीत कथित वाघनख्या ठेवल्या आणि पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी वनविभागाला याबाबत माहिती दिली आणि त्याच्या गाडीची तपासणी केली असता नख्या मिळाल्याने त्याला ताब्यात घेतले. या धक्क्याने पाटील कुटुंबावरील दहशत अधिकच वाढली. वडिलांना वनविभागाने ताब्यात घेतल्यानंतर त्याच दिवशी मुली घरी आल्या. याप्रकरणी पोलिसांत दोघा मामा-भाच्यांवर (सावंत आणि पाटील) पोस्कोनुसार गुन्हा दाखल झाला आहे. सावंत हा वाघनख्या तस्करी प्रकरणात वनविभागाच्या ताब्यात असून त्याची कोठडी संपूनही पोलिसांनी कोणतीच कार्यवाही केलेली नाही. दुसरा प्रमुख आरोपी अजित पाटील अजूनही मोकाट आहे.

....................

उद्याच्या अंकात :

हतबलतेचा फायदा घेत साऱ्या कुटुंबाचेच शोषण !

(क्रमश:)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुर्गादर्शन आरक्षण पास विक्री सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्या परिवहन उपक्रमांतर्गत शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त चालविल्या जाणाऱ्या दुर्गादर्शन बससेवेच्या आरक्षण पास विक्रीस रविवारपासून सुरुवात झाली. अर्चना शिंदे या पहिल्या प्रवासी महिला ठरल्या. तर अक्षय लोखंडे यांनी सामूहिक बुकिंग केले. शहर वाहतूक निरीक्षक अनिल गुजर यांच्या हस्ते आरक्षण पास देण्यात आला.

नवरात्रोत्सवाच्या कालावधीत दहा ते १८ ऑक्टोबरपर्यंत शहर आणि परिसरातील दुर्गादर्शनासाठी महापालिकेच्या परिवहन उपक्रमातंर्गत केएमटीची विशेष बससेवा देण्यात येणार आहे. प्रत्येक अर्धा किंवा एक तासाला शाहू मैदान येथून विशेष केएमटी बस मार्गस्थ होणार आहे. सुमारे साडेचार तासानंतर बस पुन्हा शाहू मैदान येथे दाखल होईल. बससेवेचा लाभ घेण्यासाठी वैयक्तिक प्रवासाबरोबर सामूहिक आरक्षणाची सुविधा देण्यात आली आहे. आरक्षण सुविधेला रविवारपासून सुरुवात झाली. शहर वाहतूक पोलिस निरीक्षक गुजर यांच्या हस्ते पहिल्या प्रवासी अर्चना शिंदे यांना आरक्षण पास देण्यात आला. तर सामूहिक बुकिंगचा पास अक्षय लोखंडे यांना सुपूर्द करण्यात आला.

जास्तीत जास्त प्रवाशांनी विशेष बससेवेचा लाभ घेण्यासाठी आरक्षण सुविधा सुरू करण्यात आली आहे. शाहू मैदान नियंत्रण केंद्र येथे सकाळी नऊ ते सायंकाळी सातपर्यंत पास देण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी ०२३१-२६४४५६६ क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केएमटी प्रशासनाने केले आहे.

पास विक्री समारंभास वर्क्स मॅनेजर प्रतापराव भोसले, वाहतूक निरीक्षक आर. एस. धुपकर, बी. बी. चंदन, श्रीकांत अंगापूरकर, शिवाजी पाटील, एस. पी. सरनाईक, पी. बी. जाधव यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. दुर्गादर्शन बससेवेचे प्रमुख सुनील जाधव यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गीतगायन’ची अंतिम फेरी २४ नोव्हेंबरला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ख्यातमान गायक, संगीतकार सुधीर फडके यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधताना गायन समाज देवल क्लबने राज्यस्तरीय गीत गायन स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेची अंतिम फेरी २४ व २५ नोव्हेंबर रोजी होणार आहे, अशी माहिती क्लबचे अध्यक्ष व्ही. बी. पाटील आणि श्रीकांत डिग्रजकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सुधीर फडके यांना 'बाबूजी' या नावाने ओळखले जाते. बाबूजींचा जन्मशताब्दी सोहळा २५ जुलैपासून सुरू झाला आहे. कोल्हापूर हे बाबूजींचे जन्मगाव असून, गायनाचार्य पंडित वामनराव पाध्ये यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेतले. १९४६ पासून त्यांनी ८४ मराठी २२ हिंदी चित्रपटासह अन्य भाषांत ८७७ गाणी संगीतबद्ध केली आहेत. १४४ मराठी, नऊ हिंदी चित्रपटात त्यांनी ५११ गाणी गायिली आहेत. त्यांचे गीतरामायण घरोघरी पोहोचले होते. संगीतामध्ये अद्वितीय कामगिरी करणाऱ्या सुधीर फडके यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधताना देवल क्लबने बाबूजींनी गायलेल्या किंवा स्वरबद्ध केलेल्या गाण्यांच्या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धा दोन फेऱ्यांमध्ये होणार आहे. पहिली प्राथमिक फेरी २१ ते २३ नोव्हेंबरअखेर होणार आहे. राज्यभरातील ३५० स्पर्धक सहभागी होण्याची शक्यता आहे. अंतिम फेरीसाठी ५० स्पर्धकांची निवड होणार आहे. स्पर्धकांना बाबूजींनी गायलेली मराठी व हिंदी चित्रपटगीते, भावगीते, भक्तिगीते, राष्ट्रभक्तीपरगीते, सादर करता येतील. स्पर्धा १५ ते ३० वयोगट आणि ३० ते ४५ वयोगटासाठी स्त्री व पुरुष या दोन्ही गटासाठी होणार आहे. स्पर्धेसाठी २५० रुपये प्रवेशशुल्क राहणार आहे. स्पर्धकांना ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने स्पर्धेत प्रवेश घेता येईल. स्पर्धकांना www.devalclub.org या वेबसाईटवर अर्ज भरता येतील.

दोन्ही गटांतील विजेत्यांना अनुक्रमे २१ हजार, १५ हजार व १० हजार रुपये रोख बक्षीस देण्यात येणार आहे. तसेच दोन्ही गटांतील तिघांना प्रत्येकी रोख पाच हजार रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. इच्छुकांनी श्रीकांत डिग्रजकर (९८२२०९४८१४), डॉ. भाग्यश्री मुळ्ये (९८६०६०८१६६) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे. पत्रकार परिषदेला अरुण डोंगरे, चारुदत्त जोशी, राजेंद्र पित्रे, सुबोध गद्रे, उमा नामजोशी उपस्थित होत्या.

०००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यंत्रमाग कामगाराची आत्महत्या

$
0
0

इचलकरंजी : येथील चावरे गल्लीत यंत्रमाग कामगाराने राहत्या घरी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. जितेंद्र विजय कोळी (वय ३५) असे त्याचे नाव आहे. याबाबत गावभाग पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. कर्जास कंटाळून आत्महत्या केल्याची चर्चा परिसरात सुरू होती. येथील चावरे गल्लीत राहणारा जितेंद्र कोळी यंत्रमागावर काम करत होता. त्याने राहत्या घरी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. नातेवाइकांशी संपर्क साधून माहिती दिली. याबाबत गावभाग पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.

००००

सशस्त्र हल्ल्यात तिघे जखमी

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

घर गहाणवटीच्या कारणावरून येथील लिगाडे मळा परिसरात झालेल्या सशस्त्र हल्ल्यात तिघेजण जखमी झाले. रशिदा शब्बीर शेख (वय ५०), इशरद शब्बीर शेख (वय २३) व शब्बीर शेख (वय ५५) अशी जखमींची नावे आहेत.

याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला असून सुरेश सुतार, अवधूत सुरेश सुतार व मारुती सुतार यांना अटक करण्यात आली आहे, तर मंगल सुरेश सुतार फरार आहे. दरम्यान, मारुती सुतार याच्यावर विनयभंगाचा आणखीन एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

येथील जवाहरनगर परिसरात राहणारे शब्बीर शेख यांचे घर मारुती सुतार यांनी गहाणवट घेतले आहे. शेख व सुतार एकाच ठिकाणी राहतात. त्यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद आहे. त्यातच या ठिकाणी असलेल्या मोहिते नामक दुसऱ्या कुळाला आपल्याशी वाद घालण्यासाठी शेख यांच्याकडून शिकवले जात असल्याचा समज सुतार यांचा झाला होता. याच कारणावरून सकाळी साडेआठच्या सुमारास त्यांच्यातील वाद पुन्हा उफाळला. मारुती सुतार यांच्यासह सुरेश सुतार, अवधूत सुरेश सुतार व मंगल सुतार यांनी शब्बीर शेख यांच्या घरात घुसून मारहाण केली. यावेळी मारुती सुतार यांनी घर खाली करायला लावतो काय, जिवंत सोडत नाही असे म्हणत इशरत शेख यांच्यावर खुरप्याने हल्ला केला. तसेच हा वाद सोडवण्यासाठी आलेल्या शब्बीर शेख यांच्या डोकीत व डाव्या हातावरही खुरप्याने वार केला, तर अवधूत सुतार याने लोखंडी पाइपने मारहाण केल्याने रशिदा शेख जखमी झाल्या. जखमींवर आयजीएम रुग्णालयात उपचार करण्यात आले.

दरम्यान, संशयित मारुती सुतारने दारूच्या नशेत शनिवारी सायंकाळी युवतीचा विनयभंगही केला. याप्रकरणी त्याच्यावर संबंधित युवतीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उच्च दाबाने नियमित पाणीपुरवठा करा

$
0
0

फोटो आहे

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'शहरात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यावर उपाय म्हणून दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव तयार करण्यास सुरुवात झाली आहे. पण असा प्रस्ताव न करता दररोज नियमित दोन तास उच्चदाबाने पाणीपुरवठा करावा,' अशी मागणी भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या शिष्टमंडळाने अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

निवेदनात म्हटले आहे, 'शहरात कृत्रिम पाणीटंचाई दाखवून दिवसाआड पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात येत आहे. शहरात पाणी सोडण्याच्या वेळा वेगवेगळ्या आहेत. त्या अयोग्य असून, पाण्याचा दाब कमी असल्याने इमारतींच्या पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर पाणी पोहोचत नाही. सकाळच्या सत्रात केवळ ३० ते ४५ मिनिटेच पाणी सोडले जात असल्याने विशेषत: महिलांची तारांबळ उडते. परिणामी सर्वांना पाणी समान मिळण्यासाठी दिवसाआड पाण्याचे नियोजन न करता दररोज दोन तास उच्चदाबाने पाणीपुरवठा करावा.'

'सणासुदीच्या काळात शहारामध्ये तात्पुरत्या स्वरूपात सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारली जातात. मात्र, इतरवेळी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृहे उभा करावीत. तसेच शहरात अनेक ठिकाणी खाऊगल्ली आहेत. त्याचबरोबर शाळा, कॉलेजसमोर सर्रास खाद्यपदार्थांची विक्री होते. संबंधित ठिकाणी विक्री होणारे खाद्यपदार्थ व वापरले जाणारे पाणी आणि स्वच्छतेबाबत जागरूकता दिसत नाही. याची तपासणी करणारी महापालिकेची अशी कोणतीही यंत्रणा नसल्याने आरोग्यचा प्रश्न निर्माण झाला असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.'

शिष्टमंडळात अॅड. उज्ज्वला कदम, वैशाली खाडे, वैशाली सूर्यवंशी, शीतल पोवाळकर, राजश्री सावंत, मीना पाटील, रेखा पोवाळकर, गीता कदम, कल्पना कदम, माधवी हरेल, मालूबाई सावंत, उज्ज्वला पाटील, आदींचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आर्थिक तंगीतून आजीनेच केला नातीचा खून

$
0
0

कोटीतीर्थ वसाहत येथील धक्कादायक घटना

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

नातीचे औषध आणण्यासाठी पैसे नाहीत, कुटुंबाच्या उत्पन्नात घरखर्चही भागत नाही, नातीसाठी लागणारा दूध पावडरचा खर्चही परवडत नाही, अशी प्रतिकूल आर्थिक परिस्थिती आणि सुनेसोबत सततचा होणारा वाद, या कारणातून आजीनेच अवघ्या तीन महिन्याच्या नातीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना शनिवारी शहरात घडली. शफिना शब्बीर मुल्ला असे या दुर्देवी नातीचे नाव आहे. या प्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी संशयित आजी महोबतबी आदम मुल्ला (वय ४५, रा. यादवनगर, कोटीतीर्थ वसाहत, महानगरपालिका चाळ) हिला अटक केली आहे. या घटनेने यादवनगरमधील कोटीतीर्थ वसाहत हादरून गेली.

याबाबत अधिक माहिती अशी, यादवनगर कोटीतीर्थ वसाहत येथील एच बिल्डींगमधील पहिल्या मजल्यावर शब्बीर आदम मुल्ला, पत्नी शहनाज (वय २४) व आई महोबतबी यांच्यासोबत राहतात. त्यांना सरकारी योजनेतंर्गत दोन खोल्यांचे घर मिळाले आहे. शब्बीर हा फुलेवाडीत फॅब्रिकेशनचे काम करतो. त्याची आई धुणीभांड्याचे काम करते. शब्बीरचा मे २०१७ मध्ये बिलेतबागेवाडी (ता. हुक्केरी, कर्नाटक) येथील शहनाज (वय २०) यांच्याशी विवाह झाला. त्यांना तीन महिन्यापूर्वी 'शफिना' नावाची मुलगी झाली. ती जन्मापासूनच अशक्त होती. काही दिवसानंतर शब्बीरने पत्नी व मुलगीला बिलेतबागेवाडीतून कोल्हापूरला आणले. येथे सीपीआरमध्ये मुलीवर उपचार सुरू केले. तब्बल दोन महिने शफिनावर उपचार सुरू होते. आईचे दूध पचत नसल्याने डॉक्टरांनी तिला दूध पावडर देण्याचा सल्ला दिला. त्यानंतर काही दिवसांत तिच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर तिला घरी आणण्यात आले. दोन महिने मुलीच्या उपचारासाठी घरी थांबावे लागल्याने शब्बीरचे कामही बंद झाले. घरचा सर्व खर्च पेलण्याची जबाबदारी आजी महोबतबी यांच्यावर पडली. सून शहनाजही कुटुंबाला काहीही मदत करत नव्हती. त्याचा राग मनात धरून महोबतबी हिचा सुनेसोबत सातत्याने वाद होत होता. दरम्यान, शफिना पुन्हा आजारी पडल्याने तिच्यासाठी लागणारा दूध पावडरचा आणि औषधाचा खर्च पेलत नव्हता. या आर्थिक परिस्थितीला कंटाळून शनिवारी सकाळी महोबतबीने नातीचा गळा आवळून खून केला. या प्रकरणी तिला अटक केली असून सोमवारी (ता. ८) कोर्टासमोर हजर केले जाणार आहे.

................

काही सेकंदात जीवनाचा शेवट

नातीचा गळा दाबण्यापूर्वी सासू आणि सुनेचा वाद झाला होता. तुला फुकटचे जेवायला घालून काय उपयोग? असेही महोबतबीने सुनेला फटकारले होते. शनिवारी सकाळी नणंदेच्या मुलासोबत शफिना खेळत होती. त्या वेळी आजीने तिला बोलावून घेतले. कोणालाही कळायच्या आत तिने गळा दाबला अन् काही सेकंदातच तिच्या जीवनाचा शेवट झाला. आजारी असल्याने नातीचा मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी आजीने भासविले. मात्र पोस्टमार्टेममध्ये तिचा घातपात झाल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी शहनाज यांनी राजारामपुरी पोलिसांत फिर्याद दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंढरपूरमध्ये साकारतेय दुसरे रुक्मिणी मंदिर

$
0
0

पंढरपूर :

न्यायालयीन लढाईनंतर बडवे व उत्पातांनी विठ्ठल मंदिरावरील आधिकार गमावल्याची बाब ताजी असतानाच उत्पात समाजाने स्वतंत्रपणे रुक्मिणी माता मंदिराची उभारणी केली असून येत्या घटस्थापनेला या मंदिरात रुक्मिणी मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे.

उत्पातांनी पंढरपुरात उभारलेल्या प्रती रुक्मिणी मंदिरात विठ्ठल मंदिराप्रमाणे सर्व विधी होणार आहेत. मात्र, सर्वसामान्य विठ्ठलभक्तांची पावले या मंदिराकडे वळणार का?, या मंदिरातही विठ्ठल मंदिराप्रमाणे भाविकांची गर्दी होणार का?, या प्रश्नांची उत्तरे येणारा काळच देणार आहे.

विठ्ठल मंदिर शासनाच्या ताब्यात गेल्यानंतर येथे पगारी पूजारी नेमण्यात आले आहेत. या पूजेमध्ये पारंपरिक पद्धतीने विधी व नित्योपचार होत नसल्याचे उत्पात समाजाचे म्हणणे आहे. यातच तीन वर्षांपूर्वी मंदिरावरचा ताबा गेल्यानंतर उत्पात समाजाला मंदिरात येऊन पारंपरिक कुळाचार करायलाही प्रतिबंध करण्यात आला आहे. त्यानंतर समाजाने त्यांच्या वसिष्ठ आश्रम येथील मठामध्येच रूक्मिणीचे छोटेसे मंदिर बनविण्याचे काम सुरु केले. यात गाभारा बनवून घटस्थापनेच्या दिवशी रुक्मिणी मातेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे, असे उत्पात समाजाकडून सांगण्यात आले.

हा आमचा देव्हारा: उत्पात

हे मंदिर उत्पात समाजाचा देव्हारा असून येथे मूर्तीवर शेकडो वर्षांपासून चालत आलेले देवीचे दैनंदिन नित्योपचार व विधी केले जातील. हे मंदिर सर्वांसाठी खुले असून यास प्रती मंदिर समजू नये. शहरात उत्पात समाजाची १२० घरे असून त्यांना आता या मंदिरात आपले कुळाचार करता येतील, असे उदय व ऋषिकेश उत्पात यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चीनी मांजाने युवतीला इजा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पतंगासाठी वापरलेल्या चीनी मांजाने येथील देवकर पाणंदमध्ये ऐश्वर्या उदयसिंग निंबाळकर (रा. शुक्रवार पेठ) या कॉलेज युवतीच्या चेहऱ्याला गंभीर इजा झाली. रविवारी सायंकाळी चार वाजता ही घटना घडली.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, दिवाळी जवळ आल्याने लहान मुले हवेत पतंग उडवत आहेत. यासाठी मोठ्या प्रमाणात चीनी मांजाचा वापर केला जात आहे. पतंगांच्या काटाकाटीच्या स्पर्धाही सुरू आहे. ऐश्वर्या ही शुक्रवार पेठेतून दुचाकीवरून सानेगुरूजी वसाहतीमधील नातेवाईकांकडे जात असताना तिला हवेत तरंगणारा चीनी मांजाचा धारदार दोरा दिसला नाही. धारदार मांजाने नाक व तोंडाखाली जोरदार कापले गेले. त्यामुळे नाकावर हाडापर्यंत खोल जखम झाली. तिच्यावर खासगी दवाखान्यात उपचार करण्यात आले. उपचारासाठी दहा हजार रूपये खर्च आला असून सामान्य कुटुंबातील ऐश्वर्याला काहीही दोष नसताना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला. यामुळे चीनी मांजावर बंदीची अंमलबजावणी काटेकोरपणे करावी, अशी मागणी होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीस जणांवर गुन्हा

$
0
0

गर्भवती महिलेला मारहाणप्रकरणी

टोल नाक्यावरील २० कर्मचाऱ्यांवर गुन्हा

म. टा. वृतसेवा, हातकणंगले

पुणे-बंगळुरू महामार्गावरील किणी (ता. हातकणंगले) येथील टोल नाक्यावर टोल भरण्याच्या वादातून बूथवरील कर्मचाऱ्यांनी कारमधील पुरुषांसह गर्भवती महिलेला बेदम मारहाण करुन लुटल्याप्रकरणी सुमारे २० कर्मचाऱ्यांविरोधात पेठवडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत विशाल शंकर भिसे (रा. मुंबई) यांनी फिर्याद दाखल केली. दोन ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता ही घटना घडली. या प्रकरणात एक लाख साठ हजार रुपये किंमतीची आठ तोळे सोन्याची चेन लंपास करण्यासह महिलांचा विनयभंगाचा प्रयत्न झाल्याचा आरोप होता.

याबाबत अधिक माहिती अशी की, नेरुळ (नवी मुंबई) येथील अशोक अर्जुन पवार हे गावी पेठ नाका येथे धार्मिक कार्यासाठी आले होते. त्यानंतर किणीतील नातेवाईकांना भेटून परत जाताना टोल नाक्यावर त्यांनी वडील माजी सैनिक अर्जुन पवार यांचे ओळखपत्र दाखविले. ते चालणार नाही असे कर्मचाऱ्यांनी सांगत कार सोडण्यास नकार दिला. त्यांनी डेबिट कार्ड स्वाइप करण्यासाठी दिले. कर्मचाऱ्यांनी गाडी बाजूला घेण्याचा सल्ला दिला. यामुळे वादाची ठिणगी पडत कर्मचाऱ्यांनी कारवर लाथा मारुन दरवाज्याचे हँडल तोडून काढले व कारच्या चालकास बेदम मारहाण करत कारमधील अन्य पुरुषांसह महिला प्रिया सचिन पवार (वय ३३) या गर्भवती महिलेंसह गौरी विशाल भिसे (वय २३) यांना मारहाण करुन अश्चिल शिवीगाळ करून त्यांचा विनयभंग केला. विशाल शंकर भिसे, सचिन अर्जुन पवार यांना बेदम मारहाण करण्यात आली. त्याबरोबर सचिन पवार यांच्या गळ्यातील आठ तोळ्यांची सुमारे एक लाख साठ हजार रुपये किमतींची चेन लंपास केल्याची फिर्याद २ ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा वडगाव पोलिस ठाण्यात दाखल करण्यात येत होती. यावेळी काहींनी मध्यस्थी केल्यामुळे प्रकरण मिटवण्यात आले होते. दरम्यान सोमवारी विशाल भिसे यांनी पेठवडगाव पोलिस ठाण्यात येऊन फिर्याद दाखल केल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. पोलिस निरीक्षक प्रदीप काळे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोंगीभजन स्पर्धा

$
0
0

कोल्हापूर

शिवाजी चौक तरुण मंडळातर्फे दुर्गामातेची प्रतिष्ठापना बुधवारी करण्यात येणार आहे. नवरात्रोत्सवानिमित्त मंडळातर्फे १० ते १७ ऑक्टोबर या कालावधीत सोंगी भजन स्पर्धेचे आयोजन केले आहे. मूर्तीची प्रतिष्ठापना व सोंगी भजन स्पर्धेचे उद्घाटन उद्योगपती बसवराज आजरी व आशिष आंगडी यांच्या हस्ते होणार आहे. मंडळातर्फे गेली ३८ वर्षे सोंगी भजन स्पर्धा घेण्यात येतात.या स्पर्धेसाठी संजीवनी तोरो या परीक्षक आहेत. सोंगी भजन स्पर्धेत गडमुडशिंगीमधील श्री त्रिमूर्ती संगीत सोंगी भजनी मंडळ, दुर्गुळवाडीमधील श्री विठ्ठलपंथी संगीत सोंगी भजनी मंडळ, साकेतील माऊली संगीत सोंगी भजनी मंडळ, आरडेवाडीतील विठ्ठलपंथी संगीत सोंगी भजनी मंडळ, शिवाजी पेठेतील वटवृक्ष स्वामी समर्थ संगीत सोंगी भजनी मंडळ, कुर्ली येथील नटराज संगीत सोंगी भजनी मंडळ आणि कंदलगावमधील सद्गुरु संगीत सोंगी भजनी मंडळ सहभागी होणार आहेत. अशी माहिती नवरात्र उत्सव सोंगी भजन स्पर्धेचे अध्यक्ष पोपट मुसळे यांनी दिली .

..........

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जैव वैद्यकीय कचऱ्यावर उचलला जात नसल्याची तक्रार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कसबा बावडा येथील जैव वैद्यकीय कचऱ्यावर महापालिकेने प्रक्रिया करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, शहरातील अनेक हॉस्पिटल्समधून महापालिकेच्यावतीने कचरा संकलित करण्यात येत नसल्याची तक्रारी दाखल केल्या आहेत. परिणामी शहरातील जैव वैद्यकीय कचऱ्याचा प्रश्न जटील बनला आहे. महापालिकेने मात्र दैनंदिन कचरा संकलन केले जात असून यासाठी टोल फ्री क्रमांकही उपलब्ध करून दिला असल्याचा दावा केला आहे.

केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ अंतर्गत जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन व हाताळण्याचे निर्देश दिले आहेत. निर्देशानुसार महापालिकेचा आरोग्य विभाग रुग्णालये, सुश्रूषा केंद्र, दवाखाना, पशूवैद्यकीय संस्था, ब्लड बँक येथून नियमित जैव वैद्यकीय कचरा संकलित करत आहे. दररोज सुमारे ९०० किलो वैद्यकीय कचरा संकलन करून त्यावर शास्त्रीय प्रक्रिया केली जात होती. प्रक्रियेसाठी नेचर इन नीड कंपनीला ठेका दिला होता. कंपनीकडून कचऱ्याची योग्यरित्या विल्हेवाट लागत नसल्याच्या तक्रारी अनेकवेळा झाल्या. तसेच कंपनीने ६० हजारांच्या भुईभाड्यासह ५३ लाखांची रॉयल्टी जमा केलेली नव्हती. परिणामी महापालिकेने प्रकल्प सील करत जून महिन्यापासून स्वत: प्रक्रिया करण्यास सुरुवात केली.

पण, गेल्या काही महिन्यांपासून हॉस्पिटल्समधून दैनंदिन कचरा संकलन केला जात नसल्याच्या तक्रारी महापालिकेला प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे जैव वैद्यकीय कचऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महापालिकेने मात्र कचरा संकलन करण्याबाबत यंत्रणा सक्षण आणि सजग असल्याचा दावा केला आहे. महापालिका प्रत्येक हॉस्पिटलमधील जैव वैद्यकीय कचरा संकलन केले जात असून त्यासाठी टोल फ्री क्रमांक दिला आहे. या क्रमांकावर संपर्क साधल्यास एक तासाच्या आत हॉस्पिटलमधील कचरा संकलन केला जात असल्याचे मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आजऱ्यात मुलाला चारचाकीने उडवले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, आजरा

आजरा शहरातील आमराई गल्लीत एका ओम्नी कारने (एमएच ०७, क्यू ५३५) चार वर्षांच्या कोवळ्या बालकाला चिरडण्याची घटना सायंकाळी घडली. घरासमोरच कुटुंबीयांसमोर घडलेल्या या दुर्दैवी अपघातात त्या बालकाचा जागीच मृत्यू झाला. अलमीजान मकसूद बेपारी (वय ४, रा . आमराई गल्ली, आजरा) असे त्याचे नाव आहे. जीवाला चटका लावणाऱ्या या घटनेने आजरा शहर परिसर सुन्न झाला. याबाबत रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.

आजरा शहरातील आमराई गल्लीमध्ये मकसूद बेपारी राहतात. त्यांना तीन मुलींनंतर अलमीजान हा मुलगा झाला. सायंकाळी चारच्या सुमारास गल्लीत घरासमोरील दुकानातून तो आईस्क्रिम आणण्यास गेला होता. आईस्क्रिम घेऊन परतताना समोरून आलेल्या चारचाकी वाहनाने त्याला चिरडले. यामध्ये त्याचा घरासमोर जाग्यावरच मृत्यू झाला. त्याला तातडीने येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले होते. पण काहीही उपयोग झाला नाही. मुलाच्या अपघाताची माहिती समजताच बेपारी यांना चक्कर आली आणि ते जमिनीवर कोसळले. ओम्नी कारमधील मोहसीन व त्याचे वडील अमीन मुल्ला हेही बेशुद्ध पडले. तिघांनाही गडहिंग्लज येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, कार कोण चालवीत होते, याबाबत माहिती मिळाली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images