Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

लोहार दोन्हीकडून कार्यमुक्त

$
0
0

शिक्षण आयुक्तांची कारवाई; नवीन अधिकाऱ्यांकडे कार्यभार

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गेल्या अनेक दिवसांपासून जिल्हा परिषदेत गाजत असलेल्या माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्यावरील कारवाई प्रकरणाला शनिवारी पूर्णविराम मिळाला. लोहार यांच्याकडून जि. प.च्या माध्यमिक शिक्षणाधिकारीपदासह शिक्षण उपसंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभारही काढून घेण्याचे आदेश शिक्षण आयुक्तांनी दिले. लोहार यांच्यापूर्वी माध्यमिक शिक्षणाधिकारी पदावर कार्यरत असलेल्या ज्योत्स्ना शिंदे यांची भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर चौकशी करून त्यांना चार महिने सक्तीच्या रजेवर पाठविले होते. त्यानंतर आलेल्या लोहार यांचीही कारकीर्द वादग्रस्त ठरली.

लोहार यांच्यावर कारवाई केल्यानंतर सहायक शिक्षण संचालक सुभाष चौगुले यांच्याकडे शिक्षण उपसंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार दिला आहे. तर माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारीपदाचा अतिरिक्त कार्यभार उपशिक्षणाधिकारी निरंतर कासार यांच्याकडे सोपविला आहे. माध्यमिक शिक्षणाधिकारी लोहार यांच्या कामकाजावरुन गेली दीड महिने जिल्हा परिषदेत वादंग सुरू होते. जिल्हा परिषद सदस्यांनी सर्वसाधारण सभेत लोहार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवून चौकशी करण्याचा ठराव सर्वसाधारण सभेत झाला होता. लोहार यांची चौकशी करण्यासाठी शिक्षण समिती सभापती अंबरिश घाटगे यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती नेमली आहे. त्यामध्ये सदस्य अरुण इंगवले, प्रसाद खोबरे, भगवान पाटील यांचा समावेश आहे.

११ सप्टेंबर रोजीच्या सर्वसाधारण सभेत ठराव झाला असला तरी त्याआधारे लोहार यांना सक्तीच्या रजेवर पाठविता येत नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे होते. यामुळे संतप्त झालेल्या सदस्यांनी शुक्रवारी मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांची भेट घेऊन लोहारांवरील कारवाईचा पुनुरुच्चार करत आग्रह धरला. सीईओसोबत झालेल्या चर्चेअंती लोहारांवर कारवाई करण्याबाबत आश्वासन दिले. सदस्यांची आक्रमक भूमिका पाहून मित्तल यांनी लोहार यांच्या संदर्भातील आक्षेप, सर्वसाधारण सभेचा ठराव यासंदर्भात पुणे येथील शिक्षण आयुक्त कार्यालयाला माहिती दिली. शिक्षण आयुक्तांनी त्याची तत्काळ दखल घेत लोहारांना कार्यमुक्त करण्याबाबतचा आदेश काढला. शिक्षण आयुक्तांच्या कारवाईमुळे लोहार यांच्याकडील शिक्षणाधिकारीपद व शिक्षण उपसंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभारही काढून घेतला.

सुभाष चौगुलेंकडे 'शिक्षण उपसंचालक'चा अतिरिक्त कार्यभार

सहायक शिक्षण संचालक सुभाष चौगुले यांच्याकडे शिक्षण उपसंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविला आहे. चौगुले हे मूळचे कागल तालुक्यातील मळगे खुर्द येथील आहेत. त्यांनी यापूर्वी सिंधुदुर्ग येथे शिक्षणाधिकारी म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर कोल्हापूर जिल्हा परिषदेतही प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी म्हणून काम केले आहे. ३१ मे रोजी त्यांची सहायक शिक्षण संचालकपदी नियुक्ती झाली. दरम्यान माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारीपदाचा जादा कार्यभार उपशिक्षणाधिकारी निरंतर कासार यांच्याकडे सोपविला.

प्राथमिक शिक्षणाधिकारीपदी आशा उबाळे

गेले चार महिने रिक्त असलेल्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारीपदी श्रीमती आशा उबाळे यांची नियुक्ती झाली आहे. उबाळे या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे कार्यालयातील सहायक आयुक्तपदी कार्यरत होत्या. मे महिन्यापासून प्राथमिक शिक्षणाधिकारीपद रिक्त होते. सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ यांच्याकडे 'प्राथमिक शिक्षणाधिकारी'पदाचा जादा कार्यभार होता. पंचायत राज समितीच्या दौऱ्यावेळी आडसूळ यांनी 'प्राथमिक'विभागाची धुरा सांभाळली होती. चार महिन्यानंतर प्राथमिक विभागाला पूर्ण वेळ अधिकारी मिळाला आहे.

नियुक्ती नाही तर पगार नाही

लोहार यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी जि.प.मध्ये वातावरण तापले असताना लोहार बिनधास्त होते. ते आपल्या कार्यालयात आले असता कधी सदस्यांनी तर कधी प्रशासनाने त्यांना मनाई केली होती. त्यांच्याकडे शिक्षण उपसंचालक पदाचा कार्यभार असल्याने ते हत्तीमहाल रोडवरील कार्यालयात बसत होते. त्यामुळे जि. प.चे सदस्य हतबलतेतून आक्रमक होत होते. त्यामुळे सर्वसाधारण सभेतील ठरावाचा मुद्दा उचलून धरत कारवाई करण्यास भाग पाडले. आता लोहार यांना दोन्ही पदांवरून कार्यमुक्त केल्याने त्यांना शिक्षण संचालक किंवा शिक्षण आयुक्तांकडे अन्यत्र नियुक्तीसाठी विनंती करावी लागणार आहे. दरम्यानच्या काळात त्यांना नियुक्ती मिळाली नाही तर त्यांच्या वेतनात कपात होऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सीईओ आले पायी

$
0
0

फोटो आहेत...

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषदेमार्फत शनिवारी आयोजित 'नो व्हेईकल डे'ला काही अधिकाऱ्यांनी प्रतिसाद दिला. तर काहींनी नेहमीप्रमाणे मोटारीतून कार्यालयात येत उपक्रमाला हरताळ फासला. मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल हे पायी जिल्हा परिषदेत दाखल झाले. तर सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ यांनी सायकलवरून जिल्हा परिषद गाठली.

सीईओ मित्तल हे जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक आटोपल्यानंतर चारचाकी वाहनातून येण्याऐवजी चालत जिल्हा परिषदेत आले. प्रशासनातील हे दोन प्रमुख अधिकारी 'नो व्हेईकल डे'उपक्रमास प्रतिसाद देत असताना इतर अधिकाऱ्यांनी मात्र त्यास हरताळ फासला. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह इतर विभागातील अधिकारी, विभागप्रमुख वाहने घेऊन जिल्हा परिषदेत आले. या अधिकाऱ्यांनी कागलकर हाऊस परिसरात वाहने लावली होती. दरम्यान येथून पुढे दर महिन्याच्या विशिष्ट तारखेला 'नो व्हेईकल डे'साजरा करण्याचे प्रशासनाने ठरविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन्ही पदांवरुन किरण लोहार मुक्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्यावर शिक्षण आयुक्त कार्यालयाने शनिवारी कारवाई केली. लोहारांना शिक्षणाधिकारीपदासह शिक्षण उपसंचालकपदातूनही कार्यमुक्त करण्यात आले. लोहार यांच्यावरील कारवाईसाठी जिल्हा परिषद सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती.

जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या विशेषत: लोहार यांच्या कार्यपद्धतीवर सदस्यांनी जोरदार आक्षेप घेतले असून, त्यांच्यावर सदस्यांनी भ्रष्टाचाराचे आरोपही केले होते. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेने लोहार यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा ठराव केला होता. मात्र प्रशासनाकडून लोहारांवरील कारवाईत चालढकल होत असल्यामुळे सदस्य आक्रमक झाले होते. शुक्रवारी मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी लोहार यांच्या संदर्भातील सदस्यांच्या तक्रारी, सभेतील ठरावाची माहिती शिक्षण आयुक्तांना कळविली होती.

शिक्षण आयुक्त कार्यालयाने तत्काळ लोहार यांना कार्यमुक्त केले. लोहार यांच्याकडे माध्यमिक विभागाचा शिक्षणाधिकारीपदाचा पूर्णवेळ कार्यभार होता. तर त्यांच्याकडे शिक्षण उपसंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविला होता. शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या कारवाईमुळे लोहार हे दोन्ही पदावरुन कार्यमुक्त झाले. दरम्यान, सहायक शिक्षण संचालक सुभाष चौगुले यांच्याकडे शिक्षण उपसंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवला आहे. तर उपशिक्षणाधिकारी निरंतर कासार यांच्याकडे माध्यमिक शिक्षणाधिकारीपदाचा जादा कार्यभार देण्यात आला आहे.

.. .. ३

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंबाबाई मंदिरात ५५ सीसीटीव्ही कॅमेरे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

नवरात्रोत्सवामध्ये अंबाबाई मंदिरात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्यावतीने सुरक्षिततेच्यादृष्टीने मंदिर परिसरात ५५ कॅमेरे बसवले आहेत. या सर्व कॅमेऱ्यांची आज शनिवारी चाचणी घेण्यात आली. उत्सव काळात सीसीटीव्ही कंट्रोल रुममधून गर्दीवर नजर ठेवली जाणार आहे. महिला भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन दर्शन मंडप सरलष्कर भवानीपासून भवानी मंडपापर्यंत वाढवला आहे.

गेले आठवडाभर मंदिरात नवरात्र उत्सवासाठी तयारी सुरू आहे. मुख्य अंबाबाई मंदिराची स्वच्छता करण्यात आली असून आज परिसरातील अतिबेलश्वर मंदिरापासून स्वच्छतेस सुरुवात झाली. ओवऱ्यातील सर्व मंदिराची स्वच्छता रविवारपर्यंत (ता. ७) पूर्ण होण्याची शक्यता आहे. मंदिरातील वायरिंगची तपासणी केली असून वीजपुरवठा खंडित झाल्यास चार जनरेटरची सोय केली आहे.

मंदिराच्या आवारातील सर्व ५५ सीसीटीव्हीची चाचणी पूर्ण झाली आहे. देवस्थान कार्यालयाजवळील सीसीटीव्ही कंट्रोल रुममधून नजर ठेवली जाणार आहे. सीसीटीव्ही वॉचमुळे मंदिर परिसरातील चोऱ्यांचे प्रमाण कमी झाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. तसेच महाद्वार, घाटी, पूर्व, दक्षिण दरवाजावर डोअर मेटर डिटेक्टर उभारण्यात येणार आहे. महाद्वारात दोन मेटल डिटेक्टर ठेवण्यात येणार आहेत. तसेच भाविकांची तपासणी करण्यासाठी दहा हॅन्ड मेटल डिटेक्टर सज्ज ठेवण्यात आले आहेत. तसेच मंदिर परिसरात १५ वॉकी टॉकीची सोय करण्यात येणार आहे.

देवीच्या नित्यालंकारांची स्वच्छता

देवीच्या सोन्याच्या नित्यालंकाराची शनिवारी स्वच्छता करण्यात आली. मंदिरातील खजिन्याचे मानकरी महेश खांडेकर, सराफ धोंडीराम कवठेकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता करण्यात आली. देवीचे मंगळसूत्र, ठुशी, बोरमाळ, बाजूबंद, अदिलशाही मोहऱ्याची माळ, मानदंड, कुंडले, कोल्हापूर साज, किरिट, कुंडल, लप्पा, रुद्राक्ष माळ, श्रीयंत्र हार, सात पदरी कंठी, १६ पदरी चंद्रहार, चंद्रहार, कंठीहार, ठुशी, चिंचपेटी, मोरपक्षी, चाफेकळीची माळ, तोडे, पादुकाची या सोन्यांच्या दागिन्यांची स्वच्छता करण्यात आली. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव, व्यवस्थापक धनाजी जाधव आदी उपस्थित होते.

अन्नछत्राची वेळ दोन तासांनी वाढवली

नवरात्र उत्सवासाठी महालक्ष्मी अन्नछत्र सज्ज झाले असून उत्सव काळात रोज आठ ते दहा हजार परगावच्या भाविकांसाठी भोजनाची सोय केली आहे. तसेच अन्नछत्राची दोन तास वेळ वाढवण्यात आली असून सकाळी ११ ते दुपारी चार वाजेपर्यंत अन्नछत्र सुरू राहणार आहे. भाविकांना मसाले भात, आमटी, भाजी,खीर, मसाले ताक प्रसाद म्हणून दिले जाणार आहे. तसेच भाविकांसाठी महालक्ष्मी धर्मशाळाही २४ तास सज्ज ठेवण्यात आले आहेत. धर्मशाळेत ११४ खोल्या आहेत. भाविकांनी मोफत अन्नछत्राचा लाभ घ्यावा,असे आवाहन अन्नछत्र सेवा ट्रस्टचे अध्यक्ष राजू मेवेकरी यांनी केले.

चित्पावन संघाच्यावतीने जागर सोहळा

कोल्हापूर चित्पावन संघाच्यावतीने मंगळवारी १६ ऑक्टोबर रोजी महालक्ष्मी अष्टमी जागर सोहळा खरी कॉर्नर येथील लक्ष्मी मंगल कार्यालयात येथे होणार आहे, असे पत्रक कार्यवाह द. गो. कानिटकर यांनी प्रसिद्धिस दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘देसाईंशी नाव जोडून प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांच्या इशाऱ्याला आणि आंदोलनाला आम्ही कधीच पाठिंबा दिलेला नसून त्याबाबतचे वृत्त चुकीचे आहे. देसाई यांच्याशी आमचे नाव जोडणे ही आमची प्रतिमा मलिन करण्याच्या षङयंत्राचा भाग आहे, असा आरोप इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत आणि प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी केला आहे. तसेच आम्ही कोणत्याही धमक्यांना घाबरत नाही, असा इशारा दिला आहे.

शिवाजी पेठ येथे शिवाजी मंदिर येथे झालेल्या बैठकीत तृप्ती देसाई यांना पाठिंबा देणाऱ्या डॉ. सुभाष देसाई, इंद्रजित सावंत, दिलीप देसाई यांना शिवाजी पेठ हिसका दाखवेल, असा इशारा दिला होता. याबाबत सावंत आणि देसाई यांनी एका पत्रकाद्वारे खुलासा केला आहे. पत्रकात असे म्हटले आहे की, 'पुजाऱ्यांना अंबाबाईच्या मूर्तीस लावलेले एमसील, लोखंडी पट्ट्या, नाग चिन्ह घालवणे, अंबाबाईच्या स्वरुपात बदल करणे, गैरव्यवहार करणाऱ्या प्रवृत्ती मंदिरातून जाव्यात आणि देवीचे पावित्र्य आणि महात्म टिकावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आम्ही आंदोलन करत सरकारला झुकवून पुजारी हटवण्यासाठी कायदा करण्यास भाग पाडले. मोरेवाडी येथील ६० कोटी रुपये किमंतीची अंबाबाई मंदिराची जमीन पुन्हा देवस्थानच्या नावावर नावे केली आहे. या सर्वांचा राग धरुन आमच्या विरोधात षङयंत्र रचले जात असून अशा कारस्थानाला जनतेने बळी पडू नये. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने असलेल्या शिवाजी पेठेचा आम्हालाही अभिमान आहे. आमचे अनेक नातेवाइक व हितचिंतक शिवाजी पेठेत आहेत. शिवाजी पेठेतील सुज्ञ बांधव अंबाबाईचे पावित्र व महात्म राखण्यात आमच्या सोबत राहतील,' अशी अपेक्षा पत्रकात व्यक्त केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतदान केंद्रावर आज विशेष मोहीम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा निवडणूक शाखेच्यावतीने मतदान नोंदणीसाठी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जिल्ह्यात गतीने सुरू असून ऑक्टोबर महिन्यातील चारही रविवारी जिल्ह्यातील प्रत्येक मतदान केंद्रावर विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (ता. ७) जिल्ह्यातील प्रत्येक मतदान केंद्रात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) दावे व हरकती स्वीकारण्यास उपस्थित राहणार आहेत.

मतदान केंद्रस्तरीय अधिकारी ३१ ऑक्टोबरपर्यंत मतदारांच्या घरोघरी भेटी मतदार नोंदणी करणार आहेत. १८ ते १९ वयोगटातील युवा मतदारांची नोंदणी व्हावी, यासाठी जिल्हाधिकारी आणि शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्यांची मंगळवारी (ता. ९) दुपारी तीन वाजता विद्यापीठातील मानव्यशास्त्र सभागृहात बैठक आयोजित केलेली आहे. तसेच गृहनिर्माण संस्थेच्या अध्यक्षासमवेत मंगळवारी (९) सकाळी साडेदहा वाजता राजर्षी शाहू स्मारक भवन कोल्हापूर येथे बैठक आयोजित केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पूररेषेच्या आत बांधकामावर बंदी

$
0
0

Gurubal.Mali@timesgroup.com

gurubalmaliMT

कोल्हापूर : पंचवीस वर्षात ज्या-ज्या भागात महापुराचे पाणी पोहोचले होते त्या परिसरात बांधकामांना परवानगी न देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जलसंपदा विभागाने घेतलेल्या या निर्णयाची अंमलबजावणी लवकरच नगरविकास खात्याकडून होण्याची शक्यता आहे. शहरातील व्हीनस कॉर्नर, नवीन राजवाडा, सिद्धार्थनगर, नागाळा पार्क, कदमवाडी, भोसलेवाडी, गांधीनगरसह विविध भागातील बांधकामावर निर्बंध येणार असल्याने बांधकाम व्यावसायिकांसह अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

पुराचा संभाव्य धोका टाळण्यासाठी जलसंपदा विभागाने पूररेषेच्या आत कोणतीही बांधकामे होऊ नयेत, यासाठी काही नवे नियम केले आहेत. यासाठी निळी पूररेषा आणि लाल पूररेषेचा आधार घेण्यात आला आहे. पंचवीस ते शंभर वर्षांत आलेल्या महत्तम महापुराचा आधार घेत या बांधकामावर बंदी घालण्यात आली आहे. पंचवीस वर्षात जेथे पुराचे पाणी पोहोचले आहे त्याला निळी पूररेषा तर शंभर वर्षांत जेथे पुराचे पाणी पोहोचले त्याला लाल पूररेषा संबोधण्यात येते. यापूर्वी लाल पूररेषेपर्यंतच्या बांधकामांना काही अटींवर परवानगी देण्यात आली. यामुळे रेडझोन परिसरात बांधकामे सुरू झाली. मात्र आता रेडझोनसह निळी पूररेषेपर्यंत बांधकाम करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

कोल्हापुरात गेल्या पंचवीस वर्षांत १९९५ व २००५ साली दोन वेळा पंचगंगेला महापूर आला होता. पंचगंगेचे पाणी सुतारमळा, दांडगाईवाडी, पंचगंगा तालीम, टाउन हॉल, जिल्हाधिकारी कार्यालय, नवीन राजवाडा, कसबा बावडा, कदमवाडी, भोसलेवाडी, बापट कॅम्प या भागात पाणी शिरले होते. तेव्हा पूररेषा आखण्यात आली. या रेषेच्या आत काही अटींवर बांधकामे झाली. पण, जलसंपदा विभागाच्या नव्या निर्णयाने या परिसरात कोणत्याही प्रकारची बांधकामे करता येणार नाहीत. जलसंपदा विभागाचा हा निर्णय सध्या आयआयटी-पवईकडे अभ्यासासाठी पाठवला आहे. त्यांचा अहवाल येताच त्याची नगरविकास खात्याकडून अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

पूररेषेच्या आत भरपूर जागा शिल्लक आहे. तेथे बांधकामाचे नियोजन सुरू असतानाच सरकारने हा दणका दिला आहे. यामुळे बांधकाम व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. कारण या भागातच या व्यावसायिकांचे अनेक नियोजित प्रकल्प आहेत. त्यामुळे यातून मार्ग काढण्यासाठी काहींची धडपड सुरू झाली आहे. दरम्यान, भाजपचे भव्य कार्यालयही या भागात बांधण्याचे नियोजन आहे, त्यालाही या नव्या आदेशाने खो बसण्याची शक्यता आहे.

.....

\Bया कामांना सूट\B

तीर्थक्षेत्र विकासासाठी नदीवर पूल

पुलाच्या दोन्ही बाजूने पोहोच रस्ते

उद्याने व जॉगिंग ट्रॅक

नदीवर पूर संरक्षक भिंत

भूमिगत गॅस पाइप, वीजवाहिनी, ड्रेनेज पाइप

खेळाची मैदाने, हलकी पिके

पाण्याची पाइपलाइन

.. .. ..

मध्यवर्ती भागावरच भार

नदीकाठावर काही सार्वजनिक हिताच्या दृष्टीने बांधकामे करणे आवश्यक असेल तर जलसंपदा विभागाची 'ना हरकत' घ्यायची आवश्यकता नसेल. पण पर्यावरण, स्थानिक स्वराज्य संस्था किंवा इतर सरकारी कार्यालयांची मान्यता स्वतंत्रपणे घ्यावी लागणार आहे. दरम्यान, हद्दवाढीला ब्रेक लागल्याने शहरातच बांधकामे वाढत असताना या नव्या निर्णयाने पुन्हा मध्यवर्ती भागातच इमारतींची गर्दी वाढणार आहे.

.. ..

पूररेषेच्या आत बांधकाम न करण्याबाबत जलसंपदा विभागाने निर्णय घेतला आहे. महापालिकेकडे अद्याप याबाबत कोणताही आदेश आला नाही. तो आल्यानंतर त्याची कार्यवाही करणे अपरिहार्य होईल.

नारायण भोसले, उपशहरअभियंता

.. .. ..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘उद्योजकांना सुविधा देण्यास प्राधान्य’

$
0
0

फोटो आहे..

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'उद्योगक्षेत्रात ८० टक्के रोजगार स्थानिक भूमिपुत्रांना मिळावेत ही राज्य सरकारची भूमिका आहे. औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी उद्योजकांना आवश्यक सुविधा देण्यास सरकारने प्राधान्य दिले आहे,' असे प्रतिपादन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले. उद्योग विभागातर्फे शनिवारी येथे 'बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळावा' झाला. त्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन झाले. येथील न्यू हायस्कूलच्या पटांगणावर झालेल्या मेळाव्यात २२९७ युवक-युवती नोकरीसाठी पात्र ठरले.

मंत्री देसाई म्हणाले, 'उद्योगक्षेत्रात गेल्या साडेचार वर्षांत सुधारणा केल्या आहेत. उद्योजकांना यापूर्वी ७५ परवानग्या आवश्यक होत्या. सरकारने, उद्योगांना पायाभूत सुविधा व सवलती देण्यास प्राधान्य देताना परवानग्यांची संख्या १५ वर आणली. मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मितीसाठी उद्योगांना बळ देण्याची भूमिका सरकारने घेतली आहे. बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यावर भर आहे. मेळाव्याच्या माध्यमातून मुलाखतीला येणाऱ्या प्रत्येकाला नोकरी मिळावी अशी सरकारची भूमिका आहे.'

पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, 'तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याबरोबर कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यास प्राधान्य दिले. सर्व जिल्ह्यांत कौशल्य प्रशिक्षणास प्राधान्य दिले आहे. कौशल्य विकासाला अधिक व्यापकता देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून एक कोटी रुपयांची तरतूद केली जाईल. तसेच सरकारने नवउद्योजकांना भागभांडवलासाठी दोन कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्याचे ठरविले आहे. तरुणांच्या कौशल्य विकासाला आणि प्रशिक्षणाला चालना देण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला १०० कोटींचा निधी दिला आहे. दहा लाखांपर्यंत कर्ज घेणाऱ्या तरुणाच्या कर्जाची हमीसह त्यांचे व्याजही सरकार भरणार आहे. तसेच सामूहिक उद्योग करणाऱ्यांसाठी ५० लाखांपर्यंतचे कर्ज देण्यात येणार आहे.'

याप्रसंगी आमदार राजेश क्षीरसागर यांचे भाषण झाले. जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सतीश शेळके यांनी स्वागत केले. सहसंचालक व्ही. एल. राजाळे यांनी प्रास्ताविक केले. मेळाव्यास आमदार चंद्रदीप नरके, आमदार डॉ. सुजित मिणचेकर, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, जि.प.चे सीईओ अमन मित्तल, योगेश कुलकर्णी, नितीन वाडेकर, कौशल्य विभागाचे सहायक संचालक जे. बी. करीम, जिल्हा अग्रणी प्रबंधक राहुल माने, आदी उपस्थित होते.

०००००

२२९७ जण नोकरीसाठी पात्र

पुणे, नवी मुंबई, नाशिक येथील मेळाव्यापेक्षा कोल्हापुरातील रोजगार मेळाव्याला जादा प्रतिसाद लाभला. मेळाव्यासाठी ७५६० जणांनी ऑनलाइन, तर ४५०० जणांनी ऑफलाइन पद्धतीने मिळून १२ हजार ६० युवक-युवतींनी नोंदणी केली होती. मेळाव्यात ७७ कंपन्यांनी सहभाग घेतला. मेळाव्याला ४२२१ उमेदवार हजर राहिले. शैक्षणिक पात्रता, मुलाखत प्रक्रियेनंतर २२९७ युवक-युवती नोकरीसाठी पात्र ठरले आहेत.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सोलापूरमधून माळढोक पक्षी गायब, वर्षभर दर्शन नाही

$
0
0

सूर्यकांत आसबे, सोलापूर

द ग्रेट इंडियन बस्टार्ड अर्थातच माळढोक पक्षी. साधारण चार ते साडेचार फूट उंचीचा आणि सोलापूरजवळच्या उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज अभयारण्यातील गवताळ माळरानावर आढळणारा एक गावठी राजहंसच जणू. मागील वर्षभरात या दुर्मिळ माळढोक पक्षाचे दर्शन तर झालेलेच नाही. मात्र या माळढोकमुळे सामान्य शेतकऱ्यांचे जगणेच मुश्किल झाल्याचेही पहायला मिळत आहे.

नान्नज अभयारण्य, जिथे पक्षी आणि अभयारण्य दोन्ही केवळ कागदावर आणि बोर्डावर शिल्लक राहिले असल्याचे दिसून येत आहे. राजहंस हा पक्षी आपण कधी पाहिला नाही मात्र सोलापूरच्या मार्डी आणि नान्नज गावच्या माळरानावर डोलदारपणे वावरणाऱ्या या पक्षाचे नाव आहे माळढोक. म्हणजेच द ग्रेट इंडियन बस्टार्ड ! विशेष म्हणजे हा माळढोक केवळ भारतातच आढळतो. माळढोक हा भारतातील उडणारा सर्वात जड पक्षी आहे. यातील नराचे वजन १५ किलोपर्यंत तर मादीचे वजन ९ किलोपर्यंत असते. माळढोकाला गवताळ माळराने खूप आवडतात. कारण ते त्याचे नैसर्गिक वसतीस्थान आहे. खुल्या माळरानावर निरभ्र आकाशाखाली तो मुक्तपणे वावरतो. असे असले तरी दाट झाडीच्या भागात माळढोक राहत नाही. कारण आत्मरक्षणासाठी त्याला सभोवताली चारही दिशांना खूप दूरपर्यंतचे दिसावे लागते. माळढोकची अशी अनेक वैशिष्ट्ये असली तरी मागील वर्षभरापासून या अभयारण्यात माळढोकचे दर्शन कोणालाही झालेले नाही. त्याची प्रजाती जवळपास नष्ट झाली आहे असेच एकूण परिस्थितीवरून दिसून येते.

२००८ सालामध्ये वन्यजीव विभागाने १९७२ च्या कायद्यान्वये जमिनीच्या खरेदी-विक्री व्यवहारांवर बंदी घालण्याचे आदेश परिपत्रकाद्वारे काढले. वर्षभर येथील व्यवहार बंद राहिले. मात्र २००९ मध्ये लोकसभा-विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यावरील निर्बंध पुन्हा उठवले. मात्र पुन्हा दोन-तीन वर्षांनी ऑगस्ट २०१२ ते मार्च २०१६ पर्यंत कडक निर्बंध घातले. सामान्यांना वेठीस धरण्याचा हा खेळ आजतागायत सुरुच आहे.वन्यजीव प्रेमींच्या भावना महत्वाच्या असल्यातरी वास्तवाशी फारकत घेऊन चालणार नाही. त्यामुळे बोटावर मोजण्याइतपत माणसांच्या भूतदयेसाठी हजारो किंबहुना लाखो माणसांतील क्रूरतेचे भूत जागृत करणे कितपत परवडणारे आहे ? अभयारण्य ठेवावे मात्र त्यावरील शिथीलता नक्कीच उठवायला हव्यात अशी मागणी शेतकरीवर्गांसह या भागातील नागरिकांमधून होत आहे.

२०१६ साली जिल्ह्यातील माळढोक अभयारण्याच्या १२२९ एकर क्षेत्रापैकी सर्व खासगी क्षेत्र वगळून केवळ ३६६.६६ चौरस किलोमीटर क्षेत्र निश्चितीच्या अधिसूचनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वाक्षरी केली. त्यामुळे लोकांना काहीसा दिलासा मिळाला तरीसुद्धा टांगती तलवार मात्र कायम आहे. फडणवीस सरकारने अभयारण्याचे क्षेत्रफळ कमी केल्यानंतर सांगितलेले आश्वासन प्रत्यक्षात पहायला मिळत नाही. कारण माळढोक अभयारण्याच्या जाचक अटींमुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांचे माळरान पुर्वीही धोक्यात होते आणि आजही धोक्यात आहेत. माळढोक अभयारण्यामुळे नान्नज गावातील लोकांना वीज वितरण, शेतीसाठी लागणारी आधुनिक यंत्र, विहिर खोदाई, फळबागांची लागवड आदींवर आजही बंधने असल्याचे ग्रामस्थ पोटतिडकीने सांगतात. केवळ एका पक्षासाठी एवढा मोठा अठ्ठाहास कितपत योग्य आहे ? अभयारण्य नको अशी भूमिका कोणाचीही नाही, मात्र तेथील नियम शिथील होणे गरजेचे आहे. आज भारतात गिधाड आढळत नाही, भारतीय चित्ताही नामशेष झाला. त्यामुळे वन्य विभागाचे अधिकारी नक्की करतात तरी काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.

प्रशासनाची अनास्था आणि जाचक अटी कारणीभूत

शासकीय उदासिनतेसोबतच वाढत जाणारी सिमेंटची जंगले, रासायनिक खतांचा वाढता प्रादुर्भाव आणि प्रशासकीय अनास्था हे माळढोकच्या दुर्लभ दर्शनाला जबाबदार असल्याचे मत मानद वन्यजीव रक्षक प्रा. डॉ. निनाद शहा यांनी व्यक्त केले. शासनाने किंवा वन विभागाने आसपासच्या नागरिकांना घातलेल्या जाचक अटीमुळे संख्या घटली असावी , असा आरोप पक्षीमित्र आणि अभ्यासक मुकुंद शेटे यांनी केला आहे.

माळढोक पक्षासाठी जमीन खरेदी विक्रीवर बंदी घालण्यात आली. परिणामी युती सरकारच्या काळापासूनची शिरपूर उपसा सिंचन योजना रखडली. विकासकामे ठप्प झाली. जमिनीची खरेदी विक्री अद्यापही बंदच आहे. विकास कामे ठप्प झाली आहेत. आजच्या पिढीला माळढोकबद्दल सहानुभूती आहे, मात्र त्यांच्या अडचणीचाही विचार करावा लागेल. जमीन विक्री होत नसल्यामुळे लग्न कार्य आडली असून शिक्षणहीथांबले आहे. नान्नज ते मार्डी दरम्यानचा रस्ता वनविभागाच्या अडचणीमुळे रखडला आहे.
अविनाश मार्तंडे - ( मार्डी गावचे सरपंच )

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अयोद्ध्या पार्क पार्किंगमधून पाच हजार रुपये शुल्क जमा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अयोद्ध्या पार्क येथील केएमटी पार्किंगमधून रविवारी सुमारे पाच हजाराचे शुल्क वाहनधारकांकडून जमा केले. गेल्या पाच वर्षापासून ठेकेदारांमार्फत पार्किंग शुल्क वसूल केले जात होते. ठेक्याची मुदत संपल्यानंतर शनिवारपासून केएमटीच्यावतीने पार्किंग शुल्क वसूल करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

अयोद्ध्या पार्क येथील पार्किंगचा ठेका खासगी ठेकेदाराला पाच वर्षाच्या मुदतीने दिला होता. ठेक्याची मुदत गुरुवारी संपल्यानंतर पार्किंगसाठी नव्याने निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. याबाबत शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीमध्ये डीपी रोड खुला करण्याबरोबरच पार्किंग बंदिस्त करण्याची मागणी केली होती. बैठकीनंतर स्थायी समिती सभापती आशिष ढवळे व सदस्य सत्यजित कदम यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली होती. शनिवारपासून केएमटीने पार्किंग शुल्क जमा करण्यास सुरुवात केली होती. रविवारी पार्किंग शुल्क वसुलीसाठी केएमटी प्रशासनाने चार कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. त्यांच्याकडून रविवारी सायंकाळी सातपर्यंत वाहनधारकांकडून सुमारे पाच हजार रुपये पार्किंग शुल्क जमा केले. येथील डीपी रोड खुला करण्यासाठी नगररचना विभागाचा अभिप्राय मागवला असल्याचे महापालिकेच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॉ. पडवळे यांचा आज गौरव सोहळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते कॉ. महादेव बाबूराव ऊर्फ एम. बी. पडवळे यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत सोमवारी (ता.७) गौरव सोहळा होणार आहे. राजर्षी शाहू स्मारक भवन येथील मिनी कार्यालयात सायंकाळी पाच वाजता माजी आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते सत्कार होणार आहे. यावेळी पत्रकार विजय चोरमारे यांचे व्याख्यान होणार आहे. अध्यक्षस्थानी प्राचार्य टी. एस. पाटील उपस्थित राहणार आहेत.

टेलरिंगचा व्यवसाय करणारे पडवळे तरुणपणी डाव्या चळवळीत ओढले गेले. खादी भवन, जुने देवल क्लब परिसरात त्यांचे टेलरिंगचे दुकान आहे. १९५६ च्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांनी दिवंगत कॉ. गोविंद पानसरे, माजी नगरसेवक र. अ. जानवेकर, हिंदुराव गोंधळी, माजी नगरसेवक के. आर. अकोळकर यांच्यासमवेत पुणे येथील विराट मोर्चात सहभाग घेतला होता. आजही महागाई, बेरोजगारी, कामगारांच्या प्रश्नांवरील आंदोलनात ते अग्रेसर असतात. कोल्हापुरात महागाईविरोधी झालेल्या आंदोलनात त्यांचा सहभाग होता. महागाईविरोधी आंदोलनात हुतात्मा झालेल्या कार्यकर्त्यांविरोधात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे वक्तव्य केल्यानंतर त्यांची १९६७ मध्ये बिंदू चौकातील सभा उधळून लावण्याचा पडवळे यांनी प्रयत्न केला. पी. बी. पोवार, बाळ पोतदार यांनी यावेळी आंदोलनाचे नेतृत्व केले. आणीबाणी आंदोलनातही पडवळे यांचा सहभाग होता. इंदिरा गांधींविरोधात काढलेल्या प्रतीकात्मक फाशी आंदोलनात त्यांना पोलिस कोठडीची हवा खावी लागली. गेल्या दहा वर्षांतील टोल बंद आंदोलन, यज्ञविरोधी आंदोलन, पर्यायी शिवाजी पूल आंदोलनात त्यांचा सहभाग होता. डाव्या चळवळीतील हाडाचा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. धर्मनिरपेक्ष विचारावर श्रद्धा ठेवणारे पडवळे वृत्तपत्रात वाचकांच्या पत्रव्यवहाराच्या माध्यमातून परखड मते व्यक्त करतात.

त्यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त सोमवारी होणाऱ्या कार्यक्रमात अॅड. अशोकराव साळोखे, जागर फाउंडेशनचे प्रा. बी. जी. मांगले, अॅड. गुलाबराव घोरपडे उपस्थित राहणार आहेत.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डायरी....

$
0
0

प्रवचन : भक्त सेवा मंडळतर्फे नाणीजधामचे नरेंद्र महाराज यांच्या प्रवचनाचा कार्यक्रम, स्थळ : विनोद चौगुलेनगर, कळंबा वेळ : सकाळी १० वा.

उद्घाटन : महावितरण पुणे प्रादेशिक विभागांतर्गत दोनदिवसीय आंतरपरिमंडलीय नाट्यस्पर्धेचा उद्घाटन समारंभ, स्थळ : संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह, वेळ : सकाळी १० वा.

गौरव समारंभ : गौरव समितीतर्फे कॉम्रेड एम. बी. पडवळे यांच्या कार्याचा गौरव व सत्कार समारंभ, हस्ते : माजी मंत्री प्रकाश आवाडे, स्थळ : शाहू स्मारक भवन मिनी हॉल, वेळ : सायंकाळी ५ वा.

शिबिर : योगप्रवीण विठ्ठल तांदळे यांच्या मार्गदर्शनाखाली योगासन प्राणायम ध्यान शिबिर, स्थळ : प्रभातीर्थ अपार्टमेंट ताराबाई रोड, वेळ : सायंकाळी ५ वा.

०००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्लेटलेट डोनेशनसाठी धडपडतेय तरुणाई

$
0
0

Sachin.patil1@timesgroup.com

Tweet@sachinpMT

कोल्हापूर : तरुणाई बिघडतेय अशी एका बाजूला तक्रार होत असताना दुसरीकडे सामाजिक कार्यात तरुणांचा सहभाग वाढतो आहे. कोल्हापुरात फ्रेंड्स अॅकॅडमीच्या माध्यमातून तरुणांनी दुर्मिळ प्लेटलेट्स डोनेशनसाठी जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. डोनर तयार करण्यासाठी तरुणांना 'ब्लड बँके'ची सफर घडवून या माध्यमातून ३००० लोकांनी प्लेटलेट्स तपासणी केली असून त्यातून त्यांना ५० दाते मिळाले आहेत.

मानवी शरीरात दीड ते साडेचार लाख एवढ्या प्लेटलेट्स आढळतात. प्लेटलेटची संख्या वाढल्यास रक्ताची गुठळी होऊन रक्तप्रवाहाला अडथळा निर्माण होण्याची शक्यता असते. यातुनच हृदयरोग, स्ट्रोक यांसारखे आजार होतात. हातापायांच्या रक्तवाहिन्यांमध्ये रक्तप्रवाहास अडथळा निर्माण झाल्यास तो भाग बधीर होऊन निकामी होण्याची शक्यता जास्त असते. प्लेटलेट्सची संख्या कमी झाल्यासदेखील रक्तस्त्राव अधिक प्रमाणात होतो, कारण त्याला रोखण्यासाठी पुरेशा प्रमाणात प्लेटलेट उपलब्ध नसतात. रक्दात्याकडून मिळालेल्या एक युनिट रक्ताचे विघटन केल्यास त्यातील एक अष्टमांश भाग प्लेटलेट्सचा असतो. प्लेटलेट्स साठविण्याचा कालवधी फक्त पाच दिवसांचा असल्याने प्लेटलेट डोनर महत्वपूर्ण ठरतात.

सध्या शहरात डेंगी आणि स्वाइन फ्लूची साथ सुरू आहे. अशा रुग्णांच्या शरीरातील पेशी कमी झाल्याने त्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो. डॉक्टरांनी रक्तातील प्लेटलेट्स कमी झाल्या आहेत, असे सांगताच रुग्णांच्या नातेवाईकांना धावपळ करावी लागते. प्लेटलेट्स देणारा डोनर शोधण्यासह बदली प्लेटलेट डोनर देताना नातेवाईकांची दमछाक होते. यामागे प्लेटलेट दात्यांची संख्या कमी असणे, हे प्रमुख कारण आहे. याशिवाय कॅन्सरवरील केमोथेरपी उपचार करताना प्लेटलेट्सची संख्या झपाट्याने कमी होत असते. रक्तदानाबाबत गेल्या काही वर्षांत जनजागृती झाली. मात्र प्लेटलेट्स दान करता येतात याबाबत पुरेशी माहिती सर्वांपर्यंत पोहोचलेली नाही. त्यामुळे याची माहिती सर्वांना मिळावी यासाठी तरुणाईने पुढाकार घेतला आहे. या उपक्रमात प्रकाश घुंगुरकर, यशश्री थोडके, सचिन पत्रे, विजयकुमार पाटील, शुभम थावरे आदींचा सहभाग आहे.

ब्लड बँक टुरिझमचे आयोजन

प्लेटलेट्सची माहिती सर्वांना व्हावी यासाठी फ्रेंड्स अॅकॅडमीच्या माध्यमातून ब्लड बँक सहलीचे आयोजन केले जाते. या माध्यमातून ५० जणांची मोफत सहल काढली जाते. यात ब्लड बँकेत नेऊन ब्लड बँकेचे काम, प्लेटलेट्सची शास्त्रीय माहिती तसेच प्लेटलेट्स डोनेशनसाठी प्रबोधन केले जाते. आतापर्यंत या उपक्रमाद्वारे ४२ सहलींच्या माध्यमातून ३००० जणांची तपासणी करण्यात आली आहे.

कोण होऊ शकतो डोनर?

प्लेटलेट्स दान करणाऱ्या व्यक्तीच्या रक्तातील प्लेटलेट काऊंट चांगला असणे आवश्यक असते. किमान ३०० लोकांना तपासल्यानंतर एक व्यक्ती तशी आढळते. प्लेटलेट दाता होण्यासाठी वजन ५५ किलो व रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण १२.५ असावे लागते. हाताच्या नसा जाड असाव्या लागतात. महिन्यातून दोन वेळा प्लेटलेट्स दान करता येते. प्लेटलेट्स साठवणूक केवळ पाच दिवस करता येते. त्यामुळे प्लेटलेट दात्यांचे ग्रुप्स मदतगार ठरतात.

वर्षभरात देशात ७० हजाराहून अधिक सिंगल डोनर प्लेटलेट्सची गरज असते. मात्र, केवळ १९ हजारच्या आसपास रजिस्टर्ड प्लेटलेट्स डोनर उपलब्ध आहेत. कोल्हापुरात प्लेटलेट डोनर कँम्पेनचे विश्वजित काशीद यांनी १४० वेळा प्लेटलेट्स डोनेशन केले आहे. या मोहिमेत सहभागी होण्यासाठी ८८८८८७२४८० किंवा ९११२३७३८३९ या क्रमांकावर संपर्क साधावा.

प्लेटलेट वेळेत न मिळाल्याने अनेकांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे तरुणांनी प्लेटलेट्स डोनर म्हणून पुढे येणे गरजेचे आहे. प्लेटलेट्स डोनर दुर्मिळ असल्याने त्याकामी तरुणांनी पुढाकार घेतल्यास अनेक रुग्णांना जीवनदान देता येईल.

- त्रेविणीकुमार कोरे, अध्यक्ष, फ्रेंड्स अॅकॅडमी

माझा मुलगा जयेशला डेंगीची लागण झाल्यानंतर त्याच्या रक्तातील प्लेटलेट्सची संख्या २० हजारांपर्यंत खाली घसरली होती. यावेळी रक्तदाता शोधण्यासाठी धावपळ करावी लागली. वेळेत रक्तदाता भेटल्याने त्याला धोक्यातून बाहेर काढता आले. रक्तदानाबरोबर प्लेटलेट्स दान करता येतात. यासाठी समाजातील सर्वांनी पुढे यायला पाहिजे. प्लेटलेट्स ही दुर्मिळ गोष्ट असल्याने त्याबाबत अधिक जनजागृती झाल्यास अनेकांचा जीव वाचवता येईल.

- उमेशचंद्र मोरे

सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण

000

(मूळ कॉपी)

प्लेटलेट्स डोनेशनसाठी धडपडतेय तरुणाई

Sachin.patil1@timesgroup.com

Tweet-sachinpMT

तरुणाई बिघडतेय अशी एका बाजूला तक्रार होत असताना सामाजिक कार्यात तरुणांचा सहभाग वाढतो आहे. कोल्हापुरातील तरुण फ्रेंड्स अॅकडमीच्या माध्यमातून दुर्मिळ असणाऱ्या प्लेटलेट्स डोनेशनसाठी जनजागृती मोहीम राबवत आहेत. ब्लड बँक टुरिझमच्या माध्यमातून ३००० लोकांनी प्लेटलेट्स तपासणी केली असून त्यातून ५० दाते मिळाले आहेत.

सध्या शहरात डेंगी आणि स्वाइन फ्लूची साथ सुरु आहे. अशा रुग्णांच्या शरीरातील पेशी कमी झाल्याने त्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो. डॉक्टरांनी रक्तातील प्लेटलेट्स कमी झाल्या आहेत असे सांगताच रुग्णांच्या नातेवाईकांना धावपळ करावी लागते. तसेच बदली प्लेटलेट्स दाता देताना नातेवाईकांची दमछाक होते. यामागे प्लेटलेट्स दात्यांची संख्या कमी असणे हे प्रमुख कारण आहे. तसेच कॅन्सरवरील केमोथेरपी उपचार करताना प्लेटलेट्सची संख्या झपाट्याने कमी होत असते. रक्तदानाबाबत गेल्या काही वर्षात जनजागृती झाली पण प्लेटलेट्स दान करता येतात याबाबत पुरेशी माहिती समाजापर्यंत पोहचू शकलेली नाही. यासाठी शहरातील तरुणाईने पुढाकार घेतला आहे. या उपक्रमात प्रकाश घुंगुरकर, यशश्री थोडके, सचिन पत्रे, विजयकुमार पाटील, शुभम थावरे परिश्रम घेत आहेत.

ब्लड बँक टुरिझमचे आयोजन

फ्रेंड्स अॅकडमीच्या माध्यमातून प्लेटलेट्सबाबत माहिती व्हावी यासाठी ब्लड बँक सहलीचे आयोजन केले जाते. या माध्यमातून ५० जणांची मोफत सहल काढली जाते. यात ब्लड बँकेचे काम, प्लेटलेट्सची शास्त्रीय माहिती तसेच प्लेटलेट्स डोनेशनसाठी प्रबोधन केले जाते. या उपक्रमाद्वारे ४२ सहलीच्या माध्यमातून ३ हजार जणांची तपासणी करण्यात आली आहे.

थोडेसे प्लेटलेट्सविषयी

मानवी शरीरात दीड ते साडेचार लाख एवढ्या संख्येत प्लेटलेट्स आढळतात. प्लेटलेट्सची संख्या वाढल्यास रक्ताची गुठळी होऊन रक्तप्रवाहाला अडथळा निर्माण होण्याची शक्यता असते. यातूनच हृदयरोग, स्ट्रोक सारखे आजार होतात. हातापायांच्या रक्तवाहिन्यांमध्ये रक्तप्रवाहास अडथळा निर्माण झाल्यास तो भाग बधीर होऊन निकामी होण्याची शक्यता जास्त असते. तसेच प्लेटलेट्सची संख्या कमी झाल्यास देखील रक्तस्त्राव अधिक प्रमाणात होतो, कारण त्याला रोखण्यासाठी पुरेश्या प्रमाणात प्लेटलेट्स उपलब्ध नसतात. रक्दात्याकडून मिळालेल्या एक युनिट रक्ताचे विघटन केल्यास त्यातील एक अष्टमांश भाग प्लेटलेट्स असतो. प्लेटलेट्स साठवण्याचा कालवधी फक्त पाच दिवसाचा असल्याने प्लेटलेट्स दाते महत्वपूर्ण ठरतात.

कोण होऊ शकतो प्लेटलेट्स दाता

प्लेटलेट्स दान करणाऱ्या व्यक्तीच्या रक्तातील प्लेटलेट्स काऊट चांगला असणे आवश्यक असते. किमान ३०० लोकांना तपासल्यानंतर एक व्यक्ती आढळतो. प्लेटलेट्स दाता होण्यासाठी वजन ५५ किलो व रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण १२.५ असावे तसेच हाताच्या नसा जाड असाव्या लागतात. प्लेटलेट दान महिन्यातून दोन वेळा करता येते. प्लेटलेट साठवणूक केवळ पाच दिवस होत असल्याने प्लेटलेट दात्यांचे ग्रुप मदतगार ठरतात.

बुलेट:

वर्षभरात देशात ७० हजाराहून अधिक सिंगल डोनर प्लेटलेट्सची गरज

केवळ १९ हजारच्या आसपास रजिस्टर प्लेटलेट्स डोनर उपलब्ध

प्लेटलेट्स डोनर कँपेनचे विश्वजित काशीद यांनी १४० वेळा प्लेटलेट्स डोनेशन केले आहे.

मोहिमेत सहभागी होण्यासाठी संपर्क-८८८८८७२४८०,९११२३७३८३९

कोट:::

प्लेटलेट्स डोनर म्हणून तरुणांनी पुढे येणे गरजेचे आहे. प्लेटलेट्स वेळेत न मिळाल्याने अनेकांना जीव गमवावा लागला आहे. प्लेटलेट्स डोनर दुर्मिळ असल्याने त्याकामी तरुणांनी पुढाकार घेतल्यास अनेक रुग्णांना जीवनदान देता येईल.

त्रेवीनीकुमार मोरे,अध्यक्ष फ्रेंड्स अॅकडमी

माझा मुलगा जयेशला डेंगीची लागण झाल्यानंतर त्याच्या रक्तातील प्लेटलेट्सची संख्या २० हजाराहून खाली घसरली होती. यावेळी रक्तदाता शोधण्यासाठी धावपळ करावी लागली. अखेरीस रक्तदाता भेटल्याने त्याला धोक्यातून बाहेर काढता आले. रक्तदानाबरोबर प्लेटलेट्स दान करता येतात यासाठी समाजातील सर्वांनी पुढे यायला पाहिजे. प्लेटलेट्स ही दुर्मिळ गोष्ट असल्याने त्याबाबत अधिक जनजागृती झाल्यास अनेकांचा जीव वाचवता येईल.

उमेशचंद्र मोरे, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण.

कोट व इतर एक फोटो

प्लेटलेट्स डोनर कँपेनचे विश्वजित काशीद यांनी १४० वेळा प्लेटलेट्स डोनेशन केले आहे.

मोहिमेत सहभागी होण्यासाठी संपर्क-८८८८८७२४८०,९११२३७३८३९

कोट:::

प्लेटलेट्स डोनर म्हणून तरुणांनी पुढे येणे गरजेचे आहे. प्लेटलेट्स वेळेत न मिळाल्याने अनेकांना जीव गमवावा लागला आहे. प्लेटलेट्स डोनर दुर्मिळ असल्याने त्याकामी तरुणांनी पुढाकार घेतल्यास अनेक रुग्णांना जीवनदान देता येईल.

त्रेवीनीकुमार मोरे,अध्यक्ष फ्रेंड्स अॅकडमी

माझा मुलगा जयेशला डेंगीची लागण झाल्यानंतर त्याच्या रक्तातील प्लेटलेट्सची संख्या २० हजाराहून खाली घसरली होती. यावेळी रक्तदाता शोधण्यासाठी धावपळ करावी लागली. अखेरीस रक्तदाता भेटल्याने त्याला धोक्यातून बाहेर काढता आले. रक्तदानाबरोबर प्लेटलेट्स दान करता येतात यासाठी समाजातील सर्वांनी पुढे यायला पाहिजे. प्लेटलेट्स ही दुर्मिळ गोष्ट असल्याने त्याबाबत अधिक जनजागृती झाल्यास अनेकांचा जीव वाचवता येईल.

उमेशचंद्र मोरे, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण.

कोट व इतर एक फोटो

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खुनी जगतापला पोलिस कोठडी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीसह सासू, मेहुणा आणि मेहुणी अशा चौघांची हत्या करणाऱ्या प्रदीप जगताप याला सात दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली. रविवारी जयसिंगपूर येथील न्यायालयात संशयिताला हजर करण्यात आले.

शनिवारी पहाटे संशयित जगतापने पत्नी रुपाली हिच्यावर चारित्र्याचा संशय घेऊन यड्राव (ता. शिरोळ) येथे पत्नी रुपाली, सासू छाया, मेहुणा रोहित आणि मेहुणी सोनाली अशा चौघांवर लाकडी माऱ्याने हल्ला करून सर्वांना ठार मारले होते. घटनेनंतर संशयित प्रदीप जगताप फरार झाला होता. पोलिसांच्या विविध पथकांनी शोध घेत त्याला सांगलीवाडी येथे बहिणीच्या घरातून ताब्यात घेतले होते. सध्या तो शहापूर पोलिसांच्या ताब्यात आहे. एकाच कुटुंबातील चौघांची हत्या झाल्याचा घटनेने राज्यात खळबळ उडाली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

९५७ दूध संस्थांचे दोन्हीकडे ठराव

$
0
0

मल्टिस्टेटच्या वादात दोन्ही दरडींवर हात

कोल्हापूर टाइम्स टीम

जिल्हा दूध उत्पादक संघ (गोकुळ)चे एकूण सभासद ३६५९ असून दूध संघ मल्टिस्टेट करावा, यासाठी सत्ताधाऱ्यांनी २७७९ सभासदांचे ठराव असल्याचा तर विरोधकांनी मल्टिस्टेट करु नये यासाठी १८३७ ठराव असल्याचा दावा केला आहे. सत्ताधारी आणि विरोधकांच्या ठरावांची बेरीज केली असता ४६१६ ठराव होतात. त्यामुळे ९५७ सभासदांनी सत्ताधारी व विरोधकांकडे ठराव देत दोन्ही दरडीवर हात ठेवल्याचे चित्र समोर येऊ लागले आहे. जर मल्टिस्टेटचे प्रकरण हायकोर्टात गेल्यास ठरावाची छाननी होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

गोकुळ मल्टिस्टेट करण्यासाठी सर्वसाधारण सभेत विषयपत्रिकेवर १२ क्रमांकाचा ठराव ठेवण्यात आला होता. मल्टिस्टेटच्या ठरावावरुन जिल्ह्याचे राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. एका बाजूला गोकुळ मल्टिस्टेट व्हावा यासाठी माजी आमदार महादेवराव महाडिक, पी. एन. पाटील, खासदार धनंजय महाडिक, संचालक मंडळाने किल्ला लढवला तर दुसरीकडे मल्टिस्टेटच्या विरोधात आमदार सतेज पाटील, हसन मुश्रीफ, चंद्रदीप नरके यांच्यासह सर्वपक्षीय आघाडीने रान उठवले. मल्टिस्टेट करण्यासाठी दोन्ही गटांनी सभासद आपल्यास बाजूने असल्याचा दावा केला होता. सत्ताधारी गटाने २७७९ ठराव असल्याचा दावा सभेपूर्वी केला होता तर विरोधकांनी दोन हजार सभासदांचे ठराव असल्याचा दावा केला होता. पण सर्वसाधारण सभेत अवघ्या तीन मिनिटात सभा गुंडाळण्यात आली.

सभा बेकायदेशीर असून मल्टिस्टेटच्या विरोधात हायकोर्टात जाण्याचा इशारा विरोधी गोकुळ बचाव कृती समितीने दिला असल्याने दोन्ही गटांनी न्यायालयीन लढाई लढण्यासाठी कागदपत्रे जमवण्यास सुरुवात केली आहे. सत्ताधारी संचालक मंडळाने सुपरवायझरना ठराव गोळा करण्यासाठी सूचना केल्या आहेत. सर्वसाधारण सभेत बहुमताने मल्टिस्टेटचा ठराव मंजूर झाला असताना संचालक मंडळ ठराव का गोळा करत आहे, असा सवाल विरोधकांकडून विचारला जात आहे. मल्टिस्टेटला बहुतांशी दूध संस्थाचा विरोध होता हे सर्वसाधारण सभेत दिसून आले होते. सभेत विरोध करण्यासाठी आलेले दूध संस्थांचे प्रतिनिधी आमदार नरके यांना पुढे जाण्यासाठी वाट करुन देत होते. तसेच ठराव वाचण्याच्यावेळी सत्ताधाऱ्यांकडून उपस्थित असलेल्या सभासदांनी डोक्यावरील टोप्या खिशात ठेऊन नामंजूरचा घोष केला होता, असा दावा विरोधकांकडून केला जात आहे. त्यामुळे कोर्टात आपली बाजू भक्कम होण्यासाठी सत्ताधारी व विरोधकांनी ठराव गोळा करण्यासाठी कंबर कसली आहे.

सत्ताधाऱ्यांकडे २७७९ सभासदांचे ठराव असल्याचा दावा केला जात आहे. तर विरोधी गटाकडून १८२७ ठराव असल्याचा सांगण्यात आले. सत्ताधाऱ्यांकडून अध्यक्ष व सचिवांचे सह्या असलेले कोरे लेटरपॅड सुपरवायझरांनी गोळा केले आहेत. तर दुसरीकडे काही दूध संस्थांनी सत्ताधारी व विरोधकांकडे ठराव दिले आहेत. अंदाजे साडेनऊशे ठराव दोन्ही गटाकडून दिले जात आहे. त्यामुळे ठरावावरुन संदिग्धता निर्माण झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्वप्नांना कष्टाची जोड द्या...

$
0
0

फोटो आहे...

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'उद्योग, व्यवसायासाठी फार मोठ्या भांडवलाची आवश्यकता नाही. लहान सहान व्यवसायात मोठ्या व्यापार उद्योगाची बीजे रुजलेली असतात. नावीन्यता, कल्पकता आणि मार्केटिंग फंडा या त्रिसूत्रीचा अवलंब केल्यास मराठी माणूसही यशस्वी उद्योजक बनू शकतो,' असा बिझनेस मंत्राच रविवारी मराठा समाजातील तरुणांना मिळाला.

मराठा उद्योजक लॉबी, कोल्हापूर जिल्हातर्फे राज्यव्यापी मराठा उद्योजक मेळावा आयोजित केला होता. मार्केट यार्ड येथील शाहू सांस्कृतिक मंदिर येथे आयोजित मेळाव्यात दिवसभरात उद्योग व्यवसायातील मान्यवरांनी मार्गदर्शन केले. अनेक वक्त्यांनी 'नवोदित तरुणांना व्यवसायात यश मिळवण्यासाठी आणि टिकून राहण्यासाठी कष्ट आणि त्यागाची तयारी ठेवा' असा मौलिक सल्ला दिला. मेळाव्याचे उद्घाटन खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते झाले. मराठा उद्योजक लॉबीचे संस्थापक अध्यक्ष विनोद बढे मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते.

खासदार संभाजीराजे म्हणाले, 'मराठी माणूससुद्धा उद्योग व्यवसायात यशस्वी होऊ शकतो. चिकाटी, कष्टाची वृत्ती आणि सचोटीने व्यवहार केल्यास व्यवसायात हमखास यश मिळाल्याची अनेक उदाहरणे आहेत. राजर्षी शाहू महाराज यांनी व्यापार, उद्योगाला प्रोत्साहित करणारी धोरणे राबवून त्याकाळात उद्यमशीलतेचा संदेश दिला होता. त्यांच्या विचारकार्याचा आदर्श डोळयासमोर ठेवून कार्य केल्यास प्रत्येक क्षेत्रात माणूस गगनभरारी घेऊ शकतो.'

उद्योजक विनय निकम म्हणाले, 'माझ्या करिअरची सुरुवात शेतीतून झाली. ऊस, द्राक्ष उत्पादन असे वेगवेगळे प्रयोग केले. युरोपमध्ये द्राक्ष निर्यात केली. व्यापार व्यवसाय करायला आणि उद्योजक बनायला भरभक्कम पैसा हवाच असे नव्हे. तर आपल्यात आत्मविश्वास आवश्यक आहे.' मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंत मुळीक म्हणाले, 'मराठा तरुणांनी आता बदलत्या काळाची पावले ओळखून व्यापार, व्यवसायाची कौशल्ये अंगिकृत करावीत. केवळ ग्राहक म्हणून न राहता उत्पादक बनले पाहिजे.'

याप्रसंगी मराठा लॉबीचे प्रदेशाध्यक्ष सुदर्शन झिजुंर्डे (नाशिक), उद्योजक उत्तम जाधव (कोल्हापूर), सुप्रिया जगदाळे (पुणे), सुनीता जाधव (सांगली) यांनी मार्गदर्शन केले. संस्थापक अध्यक्ष बढे यांनी स्वागत केले. संदीप पाटील यांनी सूत्रसंचालन केले. मेळाव्याचे आयोजन स्वप्नील पाटील, अशोक झांबरे, निवास पाटील, राजेश शिंदे, संदीप पाटील आदींनी केले.

०००००

चंद्रकांत जाधवांनी दिला उद्योगशीलतेचा मंत्र

कोल्हापूरचे उद्योजक चंद्रकांत जाधव यांनी उपस्थित तरुणांना व्यापार व्यवसायाच्या अनुषंगाने मौलिक सल्ला दिला. एका कुटुंबातील सर्वजण शेतीवर अवलंबून राहू नका. घर सोडा, वेगवेगळ्या क्षेत्रांत कार्यरत व्हा. नोकरीचे रुपांतर व्यवसायात करता आले पाहिजे. उद्योग व्यवसायासाठी आवश्यक भांडवलासाठी सरकारी योजनांचा लाभ घ्या. विविध योजनांवर ३५ ते ५२ टक्क्यांपर्यंत सबसिडी आहे. ग्राहकांच्या आवडीनिवडी ओळखून दर्जेदार उत्पादनांची निर्मिती करा. उद्योग, व्यवसायासाठी कष्ट, त्यागाची आवश्यकता आहे. अडचणीतून मार्ग काढण्याचे कौशल्य अंगिकृत करा, नक्कीच यशस्वी व्हाल,' असा सल्ला जाधव यांनी दिला.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संपातील प्राध्यापकांवर कारवाईचे आदेश

$
0
0

उच्च शिक्षण विभागाने मागविली प्राध्यापकांची रोजची माहिती, तीनही जिल्ह्यातील कॉलेजिअसना पत्रे

Appasaheb.mali@timesgroup.com

Tweet:Appasaheb_MT

कोल्हापूर

काम बंद आंदोलन पुकारलेल्या प्राध्यापकांची माहिती संकलित करण्यास राज्य सरकारच्या उच्च शिक्षण विभागाने सुरुवात केली आहे. शिक्षण संचालनालयाने प्राध्यापकांच्या काम बंद आंदोलनामुळे परीक्षा व मूल्यमापन कामकाजात अडथळे निर्माण होत असतील तर संबंधितावर प्राचार्यांनीच कारवाई कराव्यात अशा सूचना केल्या आहेत. पुणे विभागाच्या शिक्षण संचालकांनी विद्यापीठ व शिक्षण सहसंचालकांना यासंदर्भात रितसर कळविले आहे. दुसरीकडे प्राध्यापकांवर कारवाईशी कॉलेजचा काय संबंध, असा पवित्रा प्राचार्य व व्यवस्थापनाने घेतला आहे.

कोल्हापूर विभागीय शिक्षण सहसंचालकांनी, शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली, आणि सातारा जिल्ह्यातील कॉलेजिअसना पत्रे पाठवून आंदोलनातील सहभागी प्राध्यापकांची माहिती कळविण्याच्या सूचना केल्या आहेत. आंदोलनात सहभागी प्राध्यापकांची नियमित माहिती सादर करण्याच्या सूचना आहेत. कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात मिळून सुमारे २५०० प्राध्यापक आंदोलनात सहभागी आहेत. दरम्यान, उच्च शिक्षण विभागाच्या कारवाईच्या इशाऱ्यानंतरही प्राध्यापक संघटना आंदोलनावर ठाम आहे. प्राध्यापकांनी परीक्षा कामकाजावर बहिष्कार टाकलेला नाही, नियमित अध्यापनाचे काम बंद केले आहे. याचा अर्थ परीक्षा विषयक कामकाजात व्यत्यय आणला असा होत नाही.यामुळे प्राध्यापकांचे काम बंद आंदोलन चालूच राहिल, असा पवित्रा प्राध्यापक संघटनांनी घेतला आहे. प्राध्यापकांच्या विविध मागण्यांसाठी २५ सप्टेंबरपासून काम बंद आंदोलन सुरू आहे. महाराष्ट्र राज्य प्राध्यापक महासंघाच्या नेतृत्वाखाली राज्यभर आंदोलन सुरू आहे. दरम्यान, काम बंद आंदोलनात सहभागी प्राध्यापकांच्या वेतनात कपात होण्याचे संकेत मिळत आहेत. सप्टेंबर महिन्याचा पगार अद्याप झालेला नाही. दोन दिवसात यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे.

...................

शिक्षण संचालकांच्या सूचना

महाराष्ट्र सार्वजनिक अधिनियम २०१६ कलम ४८ (४) मधील तरतुदीनुसार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. भविष्यात त्यांना कोणत्याही अडचणी उदभणार नाहीत यासाठी विद्यापीठे, कॉलेजिअस व शैक्षणिक संस्थांमधील शैक्षणिक कामकाज सुरळीत चालू राहणे आवश्यक आहे. त्यासाठी पुरेशी उपाययोजना संबंधित संस्थांनी करावयाची आहे. तसेच अधिनियमातील कलम ४८ (५)नुसार शिक्षकांच्या सामूहिक रजा आंदोलनामुळे परीक्षा व मूल्यमापनात अडचणी निर्माण होत असतील तर शिक्षणसंस्थांनी नियमाप्रमाणे कार्यवाही करावी. यासंदर्भात विद्यापीठाच्या कुलसचिवांनी व शिक्षण सहसंचालकांनी आपल्या स्तरावर प्राचार्यांना सूचना कराव्यात, असे उच्च शिक्षण संचालनालय पुणेचे शिक्षण संचालक धनराज माने यांनी विद्यापीठ व शिक्षण सहसंचालक कार्यालयांना कळविले आहे.

............

कोट

'काम बंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोण कामावर हजर आहेत, कोण गैरहजर आणि कोणकोण संपात सहभागी आहेत यासंदर्भातील माहिती संकलित करण्याचे आदेश आहेत. त्यानुसार विद्यापीठ कार्यक्षेत्रातील कॉलेजिअसकडून माहिती मागविली आहे.

अजय साळी, शिक्षण सहसंचालक, कोल्हापूर विभाग

.................

'प्राध्यापकांनी परीक्षेचे कामकाज नाकारलेले नाही. रोजचे अध्यापनाचे काम बंद केले आहे. परीक्षेविषयक कामकाजाचे कसलेही उल्लघंन केले नसल्यामुळे त्यानुसार कारवाईचा प्रश्नच उरत नाही. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन चालूच राहील.

प्रा.आर.जी. कोरबू, कार्यकारिणी सदस्य, सुटा

....................

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोहारांच्या चौकशीला येणार गती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कार्यमुक्त केलेल्या शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्या कामकाजाच्या चौकशीला आता गती येणार आहे. चौकशी समिती सदस्यांना सोमवारी नियुक्तीची पत्रे प्राप्त होणार आहेत.

चौकशीचे आदेश देऊन तीन आठवडे उलटले आहेत. जिल्हा परिषद सदस्यांनी शिक्षक मान्यता, नेमणुकीवरुन लोहारांवर आरोप केले होते. शिवाय त्यांच्या विरोधात तक्रारी प्राप्त होत आहेत. लोहारांची जिल्हा परिषदेतील कारकीर्द वादग्रस्त ठरली आहे. त्यांच्या कामकाज पध्दतीवरही सदस्यांनी आक्षेप नोंदविले आहेत. दरम्यान जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारीपदाचा अतिरिक्त कार्यभार उपशिक्षणाधिकारी बी. एन. कासार यांच्याकडे सोपविला आहे. प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी आशा उबाळे या सोमवारी पदभार स्वीकारणार असल्याचे वृत्त आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पाच कोटींचा निधी सारथीला द्या’

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

पुणे येथील छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेला (सारथी) सरकारच्या वित्त विभागाने पाच कोटींचा निधी देण्याचा आदेश नुकताच दिला. कोल्हापुरातील मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी पुण्यात जाऊन आंदोलन केल्याने हा निधी मिळाला. या संस्थेला कमीत कमी एक हजार कोटी द्यावेत, अशी मूळ मागणी आहे. त्यातील पहिल्या टप्यात पाच कोटी निधी दिल्याने कामकाजाला सुरूवात होण्याचा मार्ग खुला झाला.

मराठा समाजाला आरक्षण द्यावे, यासह विविध मागण्यांसाठी ऑगस्ट महिन्यात दसरा चौकात आंदोलन झाले. त्या दरम्यान झालेल्या बैठकीत सारथीला पाच कोटी देण्याचे आश्वासन मंत्रिमंडळाच्या उपसमितीने दिले होते. मात्र प्रत्यक्षात निधी मिळाला नाही. यामुळे समाजाचे नेते वसंतराव मुळीक, इंद्रजित सावंत, दिलीप देसाई आदींनी पुण्यात जाऊन सारथीच्या कार्यालयास भेट दिली. तेथे केवळ अहवाल देण्याचे काम सुरू असल्याचे निदर्शनास आल्यानंतर आंदोलन केले. त्यानंतर पाच कोटी निधी देण्याचा आदेश काढण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘डेंगी, स्वाइन फ्लूवर प्रतिबंधात्मक उपाय करा’

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

'डेंगी व स्वाइन फ्ल्यू आजारावर मात करण्यासाठी जनतेने दक्षता बाळगून प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. तापमान बदलामुळे स्वाइन फ्लू व डेंगीचा प्रसार होत असून या आजाराला घाबरून न जाता लोकांनी काळजी घ्यावी,' असे आवाहन आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महाराणी ताराबाई सभागृहात साथीच्या आजारापासून होणारा रोगाबाबत त्यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

आरोग्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, 'डेंगी व स्वाइन फ्लू आजाराबाबत नागरिकांनी घाबरुन न जाता, वेळेवर औषधोपचार घेतल्यास निश्चितपणे धोका टाळता येऊ शकते. सरकार या दोन्ही

आजाराबाबत लवकरच सुधारित मार्गदर्शन सूचना व वैद्यकीय आचारसंहिता जाहीर करणार आहे.' डॉ. सावंत यांनी वैद्यकीय अधिकारी आणि खासगी डॉक्टरांनी रुग्णांवर तात्काळ उपचार करावेत, असे आदेशही यावेळी दिले. जिल्ह्याधिकाऱ्यांनी त्यांना मिळालेल्या अधिकारानुसार रिक्त पदे भरण्याची कार्यवाही करावी, अशी सूचनाही केली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी आभार मानले. यावेळी डॉ. सुजित मिणचेकर, प्रकाश आबिटकर, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमन मित्तल, महापालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एम. पी. पाटील आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images