Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

बारा शिक्षकाना ‘आदर्श’ पुरस्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कनिष्ठ महाविद्यालयीन इंग्लिश टीचर्स असोसिएशन कोल्हापूरतर्फे देण्यात येणाऱ्या 'उत्कृष्ट शिक्षक' व 'आदर्श शिक्षक' पुरस्कारांची घोषणा केली आहे. कराड येथील टिळक हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमधील शिक्षक सुरेश निवृत्ती पाटील यांना 'उत्कृष्ट शिक्षक' पुरस्कार जाहीर झाला आहे.

माजी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख यांच्या हस्ते मंगळवारी (ता.२) पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स येथे दुपारी तीन वाजता कार्यक्रम होईल. याप्रसंगी इंग्रजी विषयाच्या १२ शिक्षकांना 'आदर्श शिक्षक' पुरस्काराने सन्मानित केले जाईल.

यामध्ये अर्चना दळवी (तात्यासाहेब तेंडुलकर ज्युनिअर कॉलेज), संजय मोरे (म.ल.ग. ज्युनिअर कॉलेज), विजय डोणे (मेन राजाराम ज्युनिअर कॉलेज), उदय आतकिरे (महाराष्ट्र हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज), टी. एस. दुर्गी (डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज पेठवडगाव), रवींद्र कदम (एस. के. पाटील कॉलेज, कुरुंदवाड), आनंदा गणपती पाटील (शिवराज विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, मुरगूड), अरविंद सावंत (किसनराव मोरे ज्युनिअर कॉलेज, सरवडे), श्रीकृष्ण मोहिते (डॉ. पतंगराव कदम कॉलेज, सांगली), डॉ. बी. बी. पाटील (सांगली हायस्कूल व व्ही. एस. भाटे ज्युनिअर कॉलेज, सांगली), दशरथ जाधव (डी. पी. भोसले कॉलेज, कोरेगाव सातारा), प्रमोद राऊत (राजे भगवंतराव ज्युनिअर कॉलेज, औंध) यांचा समावेश आहे. कार्यक्रमाचे औचित्य साधून अकरावी व बारावी विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी भाषेतून वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे. कॉमर्स कॉलेज येथे सकाळी ११.३० वाजता स्पर्धेला सुरुवात होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


इचलकरंजीत शनिवारी कवी संमेलन

$
0
0

इचलकरंजी शनिवारी

हिंदी कवी सम्मेलन

इचलकरंजी : येथील साहित्य व कला क्षेत्रात कार्यरत असलेल्या मनोरंजन मंडळ, रोटरी क्लब सेंट्रल, दगडूलाल मर्दा फाउंडेशन, मारवाडी युवा मंच, इनरव्हिल क्लब, रोटरी क्लब टेक्स्टाइल सिटी आणि ह्यूमन वेल्फेअर चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थांच्यावतीने हिंदी दिनानिमित्त येथे शनिवारी (ता. ६ ऑक्टोबर) 'अखिल भारतीय हिंदी कवि संम्मेलन आणि मुशायरा' होणार आहे.

यावेळी कवी संमेलनात अनेक पुरस्कारांनी सन्मानित आंतराष्ट्रीय किर्तीचे प्रसिद्ध कवी मुन्नवर राणा यांचा सहभाग आहे. राणा यांच्याबरोबरच या संमेलनात प्रख्यात कवी घनश्याम अग्रवाल (अकोला), अतुल अजनबी (ग्वालियर), अदिल रशीद (दिल्ली), कपिल जैन (यवतमाळ), इरफान शहानुरी (इचलकरंजी) आणि चांदनी पांडे (कानपूर) यांचा समावेश असून संचलनासाठी नजर बिजनुरी (उत्तर प्रदेश) यांना निमंत्रित केले आहे. राणा यांच्या उपस्थितीमुळे संमेलनाबाबत श्रोत्यांमध्ये विशेष उत्सुकता आहे. कवी संमेलन शनिवारी सायंकाळी ६ वाजता श्रीमंत घोरपडे नाट्यगृहामध्ये होणार आहे. रसिकांनी निमंत्रित प्रवेशिकासाठी मनोरंजन मंडळ, दाते मळा येथे संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लायकरच्या जामिनावर गुरुवारी सुनावणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, इचलकरंजी

अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळ प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या नितीन लायकर याच्या जामीन अर्जावर ४ ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे. दरम्यान, खाजगी सावकारी प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी लायकर याला अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.

नितीन लायकरला जामिन अर्जावरील सुनावणीसाठी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. पण, सरकारी वकिल अनुपस्थित राहिले. तर पोलिसांनीही याप्रकरणी म्हणणे सादर न केल्याने सुनावणी होऊ शकली नसल्याने न्यायालयाने ४ ऑक्टोबर रोजी पुढील सुनावणी ठेवली आहे. तर खाजगी सावकारी प्रकरणी वाहनचालक सूरज संतोष सदलगे याने दिलेल्या फिर्यादीवरुन शिवाजीनगर पोलिसांनी लायकर याला अटक करुन न्यायालयासमोर हजर केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सदस्याचे निलंबन नाटकच ठरणार?

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर

विठुरायाच्या दर्शनाचा काळाबाजार मांडला जात असल्याचे उघड झाल्यानंतर मंदिर समितीने यात गुन्हा दाखल झालेला सदस्य सचिन अधटराव यावर एकमताने निलंबनाची कारवाई करीत सदस्यत्व रद्द करण्याचा अहवाल विधी व न्याय विभागाकडे पाठवून दिला होता. या घटनेला एक महिना होत असताना समोवारच्या बैठकीत समितीने चक्क या निलंबित सदस्याला बैठकीचा अजेंडा देऊन सन्मानाने बोलावले. त्यामुळे, सदस्यावरील कारवाई केवळ नाटक असल्याचेच समितीने दाखवून दिले आहे.

दर्शनातील काळाबाजाराचा विषय सदस्याच्या निलंबनामुळे शांत झाला होता. मात्र, समितीने निलंबित सदस्यालाच बैठकीला बोलावून केलेली कारवाई हे फक्त नाटक असल्याचे दाखवून दिले आहे. यावर निलंबित सदस्याने नुसते आपल्याला बैठकीला बोलावल्याने आल्याचे सांगितले नाही, तर बैठकीत विषय कसे मांडले हेही सांगितले.

दरम्यान, निलंबित केलेल्या सदस्याचा अहवाल शासनाकडे पाठवून दिला असून, अद्याप निलंबन होत नाही याची आम्ही वाट बघत आहोत, असे सांगत मंदिर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले यांनी निलंबनाचा चेंडू पुन्हा सरकारकडे टोलविला आहे.

वास्तविक निलंबनानंतर यातील आरोप असलेल्या सचिन आधटराव याने पत्रकार परिषद घेऊन इतर सदस्य कर्मचारी व अधिकार्यांवर गंभीर आरोप केले होते. त्याचा त्रास आपल्याला नको म्हणून आज पुन्हा या अधटरावला सन्मानाने निमंत्रित केले होते, असे बोलले जाते. काही दिवसांनी अधटरावचे निलंबन रद्द झाल्यास आश्चर्य वाटणार नाही, अशीही प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षक संघाचे आज धरणे

$
0
0

कोल्हापूर

कोल्हापूर महानगर माध्यमिक शिक्षक संघ आणि शिक्षक लोकशाही आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचाराविरोधात मंगळवारीधरणे आंदोलन करण्यात येणार आहेत. राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्यासमोर सकाळी ११ ते सायंकाळी पाच या वेळेत धरणे आंदोलन होणार असल्याची माहिती शिक्षक संघाचे अध्यक्ष राजेश वरक यांनी दिली .

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंबाबाई मंदिरात प्रवेशावर निर्बंध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी,कोल्हापूर

तोकडे कपडे परिधान करून अंबाबाई मंदिरात येणाऱ्या भाविकांना देवीच्या दर्शनास बंदी करण्यात येणार आहे. दर्शनावेळी पुरूषांसाठी शर्ट पँट, धोतर, लुंगी तर महिलांसाठी साडी, पंजाबी ड्रेस, लांब स्कर्ट असा पोषाख बंधनकारक करण्याचा निर्णय पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्यावतीने घेण्यात आला. नवरात्र उत्सवापासून निर्णयाची अमंलबजावणी करण्यात येणार आहे. समितीच्या अखत्यारितील साडेतीन हजार मंदिरांबाबतही हा निर्णय घेतल्याचेही देवस्थानचे अध्यक्ष महेश जाधव यांनी सोमवारी जाहीर केले.

या निर्णयाबाबत अधिक माहिती देताना जाधव म्हणाले, 'कोल्हापूर भेटीवर आलेले पर्यटक भाविक अंबाबाईच्या दर्शनासाठी येताना अनेकदा शॉर्ट पँट, स्लीव्हलेस टी शर्ट, बर्म्युडा अशा पेहरावात येतात. महिलांही केप्री, बर्म्युडा, मिनी स्कर्ट अशा पोषाखात मंदिरात येतात. यात पर्यटक भाविकांचे प्रमाण लक्षणीय आहे. तोकड्या कपड्यांत मंदिराच्या आवारात आल्यानंतर दर्शन घेऊन झाले की फोटोसेशन सुरू होते. फोटोसाठी निवडण्यात येणाऱ्या पोझ आणि त्यांचा पाश्चिमात्य पोषाख हे मंदिरातील मांगल्यपूर्ण वातावरणाशी विसंगत ठरते.'

ते म्हणाले, 'काही भाविक देवीच्या दारात मंत्रजप करत असतात. तर काही भाविक प्रसन्नता मिळावी म्हणून मंदिराच्या आवारात थांबतात. मात्र तोकड्या कपड्यांमध्ये येणाऱ्यांमुळे मंदिरातील प्रसन्न वातावरण व पावित्र्याला तडा जातो. त्यामुळे तोकडे कपडे परिधान करून येणाऱ्यांना प्रवेशद्वारातच रोखण्याच्या सूचना सुरक्षारक्षक व पोलिसांना देण्यात येणार आहेत.'

समितीचे सचिव विजय पोवार म्हणाले, 'समिती सदस्यांची सोमवारी बैठक झाली. बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला. सध्या नवरात्रकाळात केवळ अंबाबाई मंदिर व जोतिबा मंदिर येथे हा नियम लागू करण्यात येणार आहे. त्यानंतर देवस्थानच्या अखत्यारितील सर्व मंदिरांच्या आवारात हा नियम लागू करण्यात येणार आहे.'

यावेळी देवस्थान समितीचे कोषाध्यक्ष वैशाली क्षीरसागर, सदस्य शिवाजीराव जाधव, बी. एन. मुगळीकर, संगीत खाडे आदी उपस्थित होते.

तीव्र प्रतिक्रियेची शक्यता

चार वर्षांपूर्वी देवस्थानने अशा प्रकारे तोकड्या कपड्यांत येणाऱ्यांना प्रवेश बंदी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्याला भाविक व पर्यटकांमधून विरोध झाल्यामुळे निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली नाही. त्यामुळे आता घेण्यात आलेल्या या निर्णयाबाबत विरोधाचीच प्रतिक्रीया उमटण्याची शक्यता आहे.

मंदिरात पर्यटक भाविक तोकड्या कपड्यांत येतात, हे चुकीचे असून त्याबाबत विचार करावा अशा सूचना समितीकडे गेल्या काही दिवसांपासून येत होत्या. यानुसार सोमवारच्या बैठकीत चर्चा झाली. मंदिराचे पावित्र्य जपण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. भाविकांना या निर्णयाची सवय झाली की त्यांच्याकडून तोकड्या कपड्यांमध्ये अंबाबाई मंदिरात येण्याचे प्रमाण आपोआप थांबेल.

महेश जाधव, अध्यक्ष, देवस्थान समिती

देशभरातील अनेक मंदिरांमध्ये पेहरावाबाबत नियम आहेत. भाविकांकडूनही ते पाळले जातात. केरळमधील गुरूवायूर मंदिरात लुंगीशिवाय प्रवेश दिला जात नाही. जैन मंदिरांत भारतीय पोषाख बंधनकारक आहे. अमृतसर येथे महिलांना ओढणी डोक्यावरून घेऊनच दर्शनाची परवानगी दिली जाते. अंबाबाई मंदिरातही अशा प्रकारेच पेहरावाचे बंधन घालण्यात येणार आहे.

विजय पोवार, सचिव, देवस्थान समिती

अंबाबाई मंदिरातील भक्तांचा पेहराव ठरवण्याचा अधिकार देवस्थान समिती सदस्यांना नाही. वेशभूषा हा व्यक्तिगत प्रश्न आहे. पेहरावामुळे इतर भाविकांचे लक्ष विचलित होते, असे म्हणणे चुकीचे आहे. हा निर्णय समितीतील भाजपच्या कोत्या मनोवृत्तीचे लक्षण आहे.

डॉ. सुभाष देसाई, सदस्य, अंबाबाई मंदिर पुजारी हटाओ संघर्ष समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अंबाबाई’ परिसरातील दुकानात आग विझवण्याचे यंत्र सक्तीचे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'शारदीय नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांनी सतर्क रहावे. अंबाबाई मंदिर परिसरातील प्रत्येक दुकानात आग विझवण्याचे छोटे यंत्र असणे सक्तीचे करावे', अशा सूचना जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना सोमवारी दिल्या. शारदीय नवरात्र उत्सव पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक झाली.

जिल्हाधिकारी सुभेदार म्हणाले, 'नवरात्र उत्सवात आपत्ती व्यवस्थापन कक्ष २४ तास कार्यरत ठेवावे. अंबाबाई मंदिर परिसरातील विद्युत व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरे, अग्निशमन यंत्रणा, केएमटीची सुविधा, आरोग्य व्यवस्था, स्वच्छता, पाणीपुरवठा, वाहतूक, स्ट्रीट लाईट लावावेत. सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वय ठेवून उत्सव यशस्वीपणे पार पाडावा. पोलिस दलाच्या सूचनेनुसार आवश्यक त्या सर्व उपाययोजना उपलब्ध करून द्याव्यात. विद्युत व्यवस्थेची तपासणी करून घ्यावी तसेच मंदिर परिसरातील धोकादायक इमारतींना बॅरीकेड्स, जाळ्या लावाव्यात.'

ते पुढे म्हणाले,' उत्सव कालावधीत बिनतारी संदेश यंत्रणा गतिमान करण्याबरोबरच स्वयंसेवक तैनात करावेत. प्लॉस्टिक बंदी कायद्याची कडक अंमलबाजावणी करावी. वैद्यकीय पथक तैनात ठेवाव्यात. त्याचबरोबर शहरात आवश्यकतेनुसार मोबाइल टॉयलेट उपलब्ध करून द्यावेत. तसेच पंचगंगा घाट आणि रंकाळा परिसरात भाविक, पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आपत्कालीन यंत्रणा तैनात करावी.'

बैठकीस पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, प्रांताधिकारी सचिन इथापे, पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पीपाटील, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे प्रतिनिधी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

----------------

चौकट

१२ ठिकाणी पार्किंग व्यवस्था

'उत्सव कालावधीत मंदिर आवार तसेच परिसर स्वच्छ ठेवण्याची दक्षता घ्यावी. शहरात १२ ठिकाणी पार्किंगच्या जागा निश्चित केल्या असून त्या ठिकाणी विद्युत व्यवस्था तसेच स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी. पार्किंग ठिकाणांकडे जाण्यासाठी दिशादर्शक फलक लावावेत', अशा सूचनाही सुभेदार यांनी केल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपात्र सदस्यांना अखेर दिलासा

$
0
0

महापालिका लोगो

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांतील सदस्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ देणारा अध्यादेश सोमवारी (ता.१) काढला. नव्या अध्यादेशामुळे नगरसेवकपद अपात्रतेतून १९ नगरसेवकांची अखेर सुटका झाली. परिणामी या नगरसेवकांना महापालिकेच्या कामकाजात सहभागी होण्याचा मार्ग सुकर झाला.

महाराष्ट्र म्युनिसिपल कौन्सिल, नगरपंचायत व इंडस्ट्रियल टाउनशिप अॅक्ट १९६५ कलम ९ 'अ' नुसार निवडून आल्यानंतर सहा महिन्याच्या आत महापालिकेच्या नगरसेवकांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. कायद्यातील तरतुदीनुसार सुप्रीम कोर्टाने राज्यातील सुमारे नऊ हजार सदस्यांना अपात्र ठरवले होते. कोर्टाच्या निर्णयानुसार महापालिकेचे १९ नगरसेवक अपात्र ठरणार होते.

कोल्हापूरप्रमाणे राज्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांतील सदस्यांना याचा फटका बसणार असल्याने या कायद्यामध्ये बदल करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला होता. पूर्वलक्षी प्रभावाने वटहुकूम काढताना सहा महिन्याचा कालावधी एक वर्षापर्यंत वाढवण्याचा १८ सप्टेंबर रोजी घेतला होता. तसेच अध्यादेश निघाल्यापासून पंधरा दिवसाच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ दिली होती. या निर्णयाचा फायदा अपात्र ठरणाऱ्या १९ नगरसेवकांना होणार होता. पण मंत्रिमंडळात निर्णय होऊन पंधरा दिवसांचा कालावधी झाला तरी, कायद्यात रुपांतर करणारा अध्यादेश निघालेला नव्हता. परिणामी नगरसेवकांना अध्यादेश कधी निघणार याबाबत प्रतीक्षा लागली होती.

२३ ऑगस्ट रोजी कोर्टाने निर्णय दिल्यानंतर अपात्र ठरलेल्या नगरसेवकांनी स्थायी समितीच्या बैठकीला अनुपस्थिती लावली होती. पण महासभेस अशी अनुपस्थिती लावल्यास कायदेशीर अडचण निर्माण होणार असल्याने विविध कारणाने दोन महासभाच तहकूब केल्या होत्या. सभा तहकूब करण्यामागे अपात्र नगरसेवकांना अभय देण्याचा उद्देश स्पष्ट होत होता. त्यामुळे राज्य सरकार कधी अध्यादेश काढणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. सोमवारी अखेर राज्य सरकारने अध्यादेश काढल्याने नगरसेवकांची प्रतीक्षा संपुष्टात आली. महापालिका प्रशासनाला अध्यादेश प्राप्त झाला असल्याने अपात्र ठरलेल्या नगरसेवकांना पुन्हा कामकाजामध्ये सहभागी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

..............

चौकट

यांना मिळाला दिलासा

माजी महापौर हसीना फरास, स्वाती यवलुजे, अश्विनी रामाणे, माजी उपमहापौर शमा मुल्ला, माजी स्थायी समिती सभापती डॉ. संदीप नेजदार, नगरसेवक सुभाष बुचडे, कमलाकर भोपळे, अफजल पिरजादे, किरण शिराळे, सचिन पाटील, नियाज खान, संतोष गायकवाड, विजय खाडे, वृषाली कदम, अश्विनी बारामते, सविता घोरपडे, दीपा मगदूम, रिना कांबळे, मनीषा कुंभार.

......................

कोट

'अपात्र ठरलेल्या नगरसेवकांनी यापूर्वी जात वैधता प्रमाणपत्र सादर केले आहे. अध्यादेश निघाल्यापासून १५ दिवस प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत दिली आहे. या कालावधीत अपात्र ठरलेल्या नगरसेवकांनी प्रमाणपत्र सादर केल्यास प्रशासन स्वीकार करेल.

दिवाकर कारंडे, नगरसचिव

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


४ हजार २५७ व्हीव्हीपॅट यंत्रे दाखल

$
0
0

बंगळुरूमधून कडेकोट बंदोबस्तात कोल्हापुरात , लोकसभेसाठी पहिल्यांदाच होणार वापर

Bhimgonda.Desai@timesgroup.com

Tweet : @bhimgondaMT

कोल्हापूर

आगामी लोकसभा निवडणुकीत एव्हीएम मतदान यंत्राला जोडण्यासाठी ४ हजार २५७ व्हीव्हीपॅट यंत्रे (व्होटर व्हेरिफिएबल पेपर ऑडिट ट्रायल) जिल्हा निवडणूक यंत्रणेकडे सोमवारी दाखल झाली. बंगळुरू येथील भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीतून कडेकोट पोलिस बंदोबस्तात आणलेली ही यंत्रे करवीर तालुक्यातील केर्लीतील सरकारी गोडाऊनमध्ये ठेवण्यात आली आहेत. सर्व पक्षाच्या प्रतिनिधींना यंत्राचे प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे नियोजन प्रशासन करीत आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने दिलेल्या अनेक आश्वासनांची पूर्तता झालेली नाही. नोटाबंदी, जीएसटीचा फटका सर्वच घटकांना बसला. पेट्रोल, डिझेलचे भाव दररोज वाढत आहेत. समाजातील एकही घटक समाधानी नसताना भाजपला निवडणुकांत मिळणारे यश एव्हीएम मशीनमधील घोळामुळेच, असा आरोप विरोधी पक्षांकडून सातत्याने होत राहिले. उत्तराखंड, उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला चांगले यश मिळाल्यानंतर एव्हीएमच्या विश्वासार्हतेवर बहुजन समाज पक्षासह आम आदमी पक्ष, काँग्रेस, तृणमूल, राष्ट्रवादी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रश्नचिन्ह निर्माण केले.

त्याची दखल घेत केंद्र सरकारने एव्हीएम मशीनसोबत जोडण्यासाठी व्हीव्हीपॅट यंत्र खरेदीसाठी निधीची तरतूद केली. त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत प्रत्येक मतदान केंद्रावर एक व्हीव्हीपॅट यंत्र ठेवण्याचे नियोजन आहे. त्यासाठी लागणारी यंत्रे दाखल झाली आहेत. यामुळे यापुढील सार्वत्रिक निवडणुकांत या यंत्राचा वापर होणार असल्याचे निश्चित झाले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात ३ हजार ३२१ मतदान केंद्रे आहेत. या प्रत्येक केंद्रावर एक आणि राखीव अशी एकूण ४ हजार २५७ व्हीव्हीपॅट यंत्रे उपलब्ध झाली आहेत.

केंद्र सरकारच्या अधिपत्याखालील भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीने हे यंत्र तयार केले आहेत. पन्हाळ्याचे प्रांताधिकारी अजय पवार यांच्या नेतृत्वाखालील पोलिसांचे पथक यंत्रे आणण्यासाठी बंगळुरूला दोन दिवसापूर्वी गेले होते. सोमवारी सकाळी यंत्रांसह हे पथक परतले. सरकारी गोडाऊनमध्ये यंत्रे सील करून ठेवली आहेत. प्रत्येक यंत्रावरील बारकोड स्कॅन करून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे अधिकृतपणे नोंदणी करण्यात येणार आहे. त्यानंतर कंपनीचे तज्ज्ञ अभियंता यंत्राची तपासणी करतील. ही प्रक्रिया झाल्यानंतर जिल्ह्यातील सर्व पक्षांच्या प्रतिनिधींना आमंत्रित करून प्रात्यक्षिक दाखवण्यात येणार आहे.

-----------------------

कोट

'येत्या लोकसभा निवडणुकीत व्हीव्हीपॅट यंत्रावर मतदान होणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक मतदान केंद्रावर एक याप्रमाणे ४ हजार २५७ यंत्रे उपलब्ध झाली आहेत. त्याचे प्रात्यक्षिक राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना लवकरच दाखवण्यात येईल.

स्नेहल भोसले, उपजिल्हाधिकारी, निवडणूक

----------------

चौकट

मतदान पावती दिसणार, पण ...

एव्हीएम यंत्रालाच व्हीव्हीपॅट जोडण्यात येणार आहे. ते प्रिंटरप्रमाणे आहे. मतदान यंत्रावर बटन दाबल्यानंतर व्हीव्हीपॅटमध्ये कागदी पावती तयार होईल. त्यात संबंधित मतदाराने केलेल्या मतदानाचा तपशील म्हणजे ज्या उमेदवाराच्या चिन्हासमोर बटन दाबले, त्यांनाच मतदान झाल्याची खात्री करता येणार आहे. सात सेंकदापर्यंत ती पावती दिसेल. त्यानंतर ती आपोआप मतपेटीत पडेल. पावती मतदारास मिळणार नाही.

------

शंका आल्यास फेरमतमोजणी

आपण ज्या उमेदवाराला मतदान केले आहे, त्यास मतदान झाले नसेल किंवा मतच नोंदले नसेल तर व्हीव्हीपॅटमुळे त्वरित मतदान केंद्रातील अधिकाऱ्यांकडे पुराव्यानिशी तक्रार करणे सोपे होणार आहे. एव्हीएम यंत्रातील घोळामुळे एखाद्या उमेदवारास अधिक मते पडली आहेत, असे वाटल्यास विरोधकास या यंत्रावरील पावतींची मोजणी करण्यात येणार आहे. पावती आणि एव्हीएमवरील किती मते आहेत, हे मोजणीनंतर समोर येणार आहे. परिणामी विरोधकांची शंका दूर होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उसापासून थेट इथेनॉलनिर्मितीचे परवाने द्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'केंद्र सरकारच्या इथेनॉल धोरणामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. केंद्र सरकारच्या धोरणाचा पुरस्कार करुन २०१८-१९ च्या गळीत हंगामात उसापासून थेट इथेनॉल निर्मिती करण्यासाठी सक्षम औद्योगिक कंपन्यांना परवाने द्यावेत,' अशी मागणी जैवइंधन शेतकरी संघटनेचे संस्थापक शामराव देसाई यांनी पत्रकार परिषदेत केली.

देसाई म्हणाले, 'यूपीए सरकारच्या काळात पेट्रोलचे दर ७० ते ७५ रुपये लिटर असताना इथेनॉलचा दर २७ रुपये ठेवला. या धोरणामुळे शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती झाली नाही. भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर इथेनॉलचा दर पेट्रोल दराशी निगडीत ठेवण्याची मागणी संघटनेने केली. त्यानुसार केंद्र सरकारने इथेनॉल धोरण ठरवाताना त्याचा दर प्रतिलिटर ४८ रुपये ५० पैसे केला. तसेच सप्टेंबरमध्ये यामध्ये पुन्हा वाढ करुन ५९ रुपये १३ पैसे केला आहे.'

'उसाचा दहा ते १२ टक्के उतारा गृहीत धरल्यास एक टनाची किंमत २,२०० ते २,८०० रुपये होते. पण एक टन उसापासून इथेनॉलची निर्मिती केल्यास सध्याच्या दरानुसार ३,७७० ते ५,४२५ रुपये दर मिळेल. हा दर एफआरपीपेक्षा दुप्पट असेल. त्यामुळे केंद्र सरकारच्या नव्या धोरणानुसार इथेनॉल निर्मितीला चालना देण्याची आवश्यकता आहे. मात्र राज्यातील भाजप सरकार केंद्र सरकारच्या इथेनॉल निर्मिती धोरणाची व वाढवलेल्या किमतीची दखल घेत नाही. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी राज्य सरकारने सुरू होणाऱ्या गळीत हंगामात इथेनॉल निर्मितीसाठी सक्षम औद्योगिक कंपन्यांना परवानगी दिली पाहिजे,' अशी मागणी देसाई यांनी केली.

यावेळी राज्य महिला आघाडीच्या अध्यक्षा सुजाता देसाई उपस्थित होत्या.

.. .. .. ..

दारुबंदी याचिकेवर पुन्हा अर्ज

दारु दुकान बंद करण्यासाठी ५१ टक्के महिलांनी मतदान केले पाहिजे. दारु विक्री अवैध असताना मतदानाची अट कशासाठी? अशी विचारणा करणारी याचिका दाखल केली होती. कोर्टाने राज्य सरकारला चार महिन्यात म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र राज्य सरकारने काहीच हालचाल केली नाही. दरम्यानच्या काळात विधिमंडळात १८ आमदारांनी हा प्रश्न उपस्थित केला. संबंधित मंत्र्यांनी पावसाळी अधिवेशनात चर्चा करण्याचे आश्वासन दिले. पण चर्चा झाली नाही, परिणामी कोर्टात राज्य सरकार याबाबत गंभीर नसल्याचा अर्ज दाखल केला असल्याचे देसाई यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिनाळीत चेंबर ऑफ कॉमर्सची सभा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, चंदगड

शिनोळी (ता. चंदगड) येथील दी चंदगड तालुका चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजची सर्वसाधारण सभा ॲक्वा अलाइजच्या सभागृहात झाली. सभेमध्ये उद्योजकांच्या अडचणींवर विचारविनिमय करून सभेमध्ये ठराव मंजूर करण्यात आले.

चेंबरचे सचिव सतीश सावंत यांनी प्रास्ताविकामध्ये औद्योगिक वसाहतीची जडणघडण व सद्यस्थितीचा लेखाजोखा मांडला. संस्थेचा ताळेबंद वाचून दाखवून खर्चाला मंजुरी देण्यात आली. संस्थेचा ताळेबंद वाचून खर्चाला मंजुरी देण्यात आली. उपाध्यक्ष उदय घोरपडे, आर्लीकॅनचे साळुंखे, संजय हवालदार, मोना पाटील यांनी वाढीव घरपट्टीबाबत चिंता व्यक्त केली. ग्रामपंचायतीची वाढीव घरपट्टी रद्द करून ती पूर्ववत ठेवण्याचा ठराव सर्वानुमते संम्मत करण्यात आला.

उद्योजक भाऊ गडकरी यांनी ग्रामपंचायतीकडून कोणत्याच प्रकारच्या मुलभूत सुविधा मिळत नसल्याबद्दल आणि होणाऱ्या अडचणींबाबत ग्रामपंचायतीला जाब विचारण्याचे आवाहन केले. 'औद्योगिक वसाहतीतील कारखानदाराकडून इएसटी वसूल करण्यात येऊनसुद्धा ईएसटीची सुविधा उपलब्ध करण्यास केंद्र सरकार अपशी ठरले आहे' अशी खंत चेंबरचे अध्यक्ष प्रल्हाद जोशी यांनी अध्यक्षिय समारोपात व्यक्त केली. चेंबरचे खजिनदार बाळासाहेब पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. अर्जुन पाटील यांनी सूत्रसंचालन केले. राजू पाटील यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिरोळ येथील छाननीत २५ अर्ज अवैध

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

शिरोळ नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची सोमवारी छाननी करण्यात आली. या छाननीत नगराध्यक्षपदासाठीचा एक, तर नगरसेवक पदासाठीचे चोवीस उमेदवारी अर्ज अवैध ठरले. यामुळे आता नगराध्यक्ष पदासाठी दहा तर नगरसेवक पदाच्या सतरा जागांसाठी ११९ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. ३ ते ६ ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत, असे निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी सांगितले.

सकाळी अकरा वाजता तहसीलदारांच्या दालनामध्ये छाननीला सुरुवात झाली. भाजप, ताराराणी आघाडी, शाहू आघाडी, बहुजन विकास आघाडी या आघाडीचे उमेदवार कार्यकर्ते नेते मंडळींनी छाननीवेळी मोठी गर्दी केली होती. अपक्ष उमेदवार, सूचक मोठ्या संख्येने उपस्थित होते. काही उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज विरोधकांनी अपात्र ठरवू नये यासाठी वकिलांची फौज तैनात केली होती.

दरम्यान, कोणीही कोणाच्याही उमेदवारीस आक्षेप घ्यायचा नाही, असे आघाडी प्रमुखांमध्ये एकमत झाले होते. तथापी भाजपचे राहुल यादव यांनी तीन नगरसेवक पदाच्या उमेदवारांवर लेखी आक्षेप घेतला. त्यामुळे ताराराणी आघाडीचे प्रमुख व नगराध्यक्षपदाचे उमेदवार प्रमोद लडगे यांनी राहुल यादव यांना याविषयी विचारणा केली. एकमेकांच्या अर्जावर आक्षेप घ्यायचा नाही असे ठरले असताना का आक्षेप घेता? असा सवाल त्यांना केला. यावेळी अमरसिंह पाटील, पृथ्वीराज यादव, रणजितसिंह पाटील, प्रमोद लडगे, दरगू गावडे, शिवाजी माने गावडे, शिवाजी सांगळे आदी मान्यवर उपस्थित होते.

फोटो ओळ

प्रांताधिकारी समिर शिंगटे यांच्या उपस्थितीत छाननी करण्यात आली. यावेळी वकिलांची फौज उपस्थित राहिल्याने न्यायालयाचे स्वरूप आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्थायी’तून लोहारांना हाकलले

$
0
0

जिल्हा परिषद ... लोगो

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेने सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा आदेश देऊनही माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी किरण लोहार हे सोमवारी पुन्हा कार्यालयात व स्थायी समिती सभेत हजर राहिले. लोहारांच्या कार्यालयीन उपस्थितीला जिल्हा परिषद सदस्यांनी जोरदार हरकत घेतली. लोहार यांच्या हजेरीवरुन संतप्त बनलेल्या सदस्यांनी स्थायी समितीवर सभेवर बहिष्कार घालण्याचा इशारा दिल्यानंतर प्रशासन नरमले आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी स्थायी समितीतून शिक्षणाधिकारी लोहार यांना बाहेर पडण्याचा इशारा दिला.

शिक्षणाधिकारी लोहार यांच्या कामकाजाची चौकशी करण्यासाठी शिक्षण समिती सभापती अंबरिश घाटगे यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती नेमली आहे. तसेच चौकशी कालावधीत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा आदेशही जिल्हा परिषद अध्यक्षा शौमका महाडिक यांनी ११ सप्टेंबर रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत दिला होता. सोमवारी स्थायी समिती सभा होती. या सभेला हजर राहण्यासाठी लोहार हे सकाळीच कार्यालयात दाखल झाले. त्याची वार्ता सदस्यांना समजताच त्यांनी अध्यक्ष महाडिक व सीईओ मित्तल यांच्याकडे तक्रारी केल्या. सभा सुरू होण्यापूर्वी अध्यक्षांच्या दालनात सदस्यांची बैठक झाली.

बैठकीत 'स्थायी' सदस्य राहुल आवाडे, अरुण इंगवले, राजवर्धन निंबाळकर यांनी लोहार यांच्या उपस्थितीवरुन आक्षेप घेतला. चौकशी समिती नेमली असताना लोहार हे कार्यालयात हजर कसे काय राहू शकतात, अशी विचारणा केली. त्यावर अध्यक्षांनी चौकशी समिती नेमली आहे. लोहारांचे म्हणणे ऐकून घेऊ या, असे उत्तर दिले. मात्र सदस्यांनी लोहार हे कामकाजात सहभाग घेणार असतील तर स्थायी समितीच्या सभेवर बहिष्कार टाकू, असा इशारा दिला. तसेच त्यांना अद्याप सक्तीच्या रजेवर का पाठविले नाही, असा प्रश्न उपस्थित केला.

लोहारांवरील कारवाईवरुन सदस्य आक्रमक बनल्यामुळे प्रशासकीय पातळीवरही त्याचा खल झाला. सीईओ मित्तल, सामान्य प्रशासन विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवीकांत आडसूळ यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांत याप्रश्नी चर्चा झाली. सर्वसाधारण सभेने लोहारांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा आदेश दिला आहे, परत ते कामकाजात सहभागी झाले तर येत्या सर्वसाधारण सभेत वाद निर्माण होऊ शकतो या अनुषंगाने चर्चा झाली. अध्यक्षा महाडिक, बांधकाम समिती सभापती सर्जेराव पाटील, शिक्षण समिती सभापती अंबरिश घाटगे, महिला समिती सभापती वंदना मगदूम, समाजकल्याण समिती सभापती विशांत महापुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्थायी समिती सभेला सुरुवात झाली. लोहार बैठकीला हजर होते. त्यांच्या हजेरीवरुन सभेत संतप्त पडसाद उमटण्याची चिन्हे निर्माण झाली. सीईओ मित्तल यांनी लोहारांना तत्काळ सभा व कार्यालय सोडण्याचा इशारा दिला. त्यानंतर लोहार हे सभेतून बाहेर पडले.

......................

कोट

'सर्वसाधारण सभेने लोहार यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा आदेश दिला आहे. चौकशी समितीची स्थापना, सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा आदेश असूनही पुन्हा ते कार्यालयात हजर राहत असतील तर तो सभागृहाचा अवमान आहे. लोहारांच्या कामकाजाविषयी वेगवेगळ्या भागातून तक्रारी येत आहेत.

राहुल आवाडे, सदस्य, स्थायी समिती

................

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सरकारी कर्मचाऱ्यांवरीलहल्यासंबंधी उपाययोजना करा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांवरील हल्ले कमी करण्यासंबंधीच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी समितीची स्थापना करावी, अशी मागणी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेतर्फे जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्याकडे एका निवेदनाव्दारे करण्यात आली.

निवेदनात म्हटले आहे, हल्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचे मनोबल खचत आहे. यामुळे हल्याविरोधात प्रभावी उपाययोजना करण्यासाठी समिती स्थापन करून आढावा बैठक घ्यावी. त्याचा अहवाल सरकारकडे पाठवावा. यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करावी. समितीमध्ये पोलिस अधीक्षक कार्यालयातील एक प्रतिनिधी, सरकारी वकील, राजपत्रित अधिकारी संघटनेचे सरचिटणीस आदींचा सदस्य म्हणून सामावेश करावा. निवेदन देताना अनिल लवेकर, वसंत डावरे, संजीवनी दळवी, प्रशांत कांबळे, शंकर गुरव, विनायक लुगडे, आर. आर. पाटील, नलिनी मोहिते आदी उपस्थित हेाते.

-----------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पत्रलेखनातून लोकशाहीच्या हिताची बाजू मांडा’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

'भारतीय राज्यघटनेने प्रत्येकांना मत मांडण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. पण, त्यावर आता बंधने आणण्याचे जाणिवपूर्वक प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे पुढील काळ अधिक संघर्षाचा आहे. अशावेळी वृत्तपत्र पत्रलेखकांची भूमिका अधिक महत्वाची असून पत्रलेखनातून लोकशाहीच्या हिताची बाजू अधिक सक्षमपणे मांडावी,' असे मत प्राचार्य आनंद मेणसे (बेळगाव) यांनी मांडले.येथील वृत्तपत्र पत्रलेखक संघाच्या २१व्या वर्धापन दिनानिमित्त वृत्तपत्र पत्रलेखकांचा मेळावा व आचार्य शांतारामबापू गरुड पत्रलेखन पुरस्कार वितरण सोहळा समाजवादी प्रबोधिनीत झाला. यावेळी प्राचार्य मेणसे बोलत होते. अध्यक्षस्थानी कोल्हापूर आकाशवाणीचे केंद्र संचालक श्रीपाद कहाळेकर होते.

यावेळी शशिकांत खांडेकर (पट्टणकोडोली), खंडेराव हेरवाडे (शिरोळ), संजय जाधव (सांगली), मोहन खोत (रेंदाळ), बाळासाहेब निपाणे, इंद्रजीत नाझरे (इचलकरंजी), दादासाहेब वसगडेकर (कराड), शांताराम वाघ (पुणे), दिवाकर रेळेकर (सोलापूर) यांना आचार्य शांतारामबापू पत्रलेखन पुरस्कार देवून गौरविण्यात आले. या सर्व पुरस्कार प्राप्त पत्रलेखकांनी मनोगत व्यक्त केले.

सचिव मनोहर जोशी यांनी स्वागत केले. अध्यक्ष पांडुरंग पिसे यांनी प्रास्ताविक केले. शशांक बावचकर यांनी पुस्तके देवून पाहुण्यांचे स्वागत केले. प्रसाद कुलकर्णी यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. मंचावर उपाध्यक्षा सुनंदा चौगुले उपस्थीत होत्या. नारायण गुरबे यांनी आभार मानले.

फोटो : आचार्य शांतारामबापू गरूड पत्रलेखन पुरस्कार प्राप्त पत्रलेखकांसह प्राचार्य आनंद मेणसे, श्रीपाद कहाळेकर, पांडुरंग पिसे, प्रसाद कुलकर्णी आदी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिरोळमध्ये नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

$
0
0

लोगो - नगरपालिका निवडणूक वार्तापत्र

अजय जाधव, जयसिंगपूर

शिरोळ नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून निवडणुकीच्या निमित्ताने खासदार राजू शेट्टी, आमदार उल्हास पाटील तसेच गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष दिलीपराव पाटील व विद्यमान संचालक अनिल यादव एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. निवडणुकीत भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, स्वाभिमानी, शिवसेना या सर्वच पक्षांच्या दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजपविरोधात महाआघाडीची मोट बांधण्यात येणार होती. मात्र, जागा वाटपाचा तिढा न सुटल्याने आता भाजप, राजर्षी शाहू विकास आघाडी, बहुजन विकास आघाडी यांच्यात लढत होत आहे. त्यामुळे नगरपालिकेच्या पहिल्याच निवडणुकीत रणनीतीचा अवलंब करून झेंडा फडकविण्याचे आव्हान नेत्यांसमोर आहे. निवडणुकीसाठी पाच आघाड्यांनी दंड थोपटले आहेत. त्यामुळे रंगत वाढली आहे.

शिरोळच्या आजवरच्या राजकारणात नेहमीच पक्षापेक्षा गटा-तटाला महत्व दिले गेले. गेल्या ७३ वर्षाच्या २६ जणांना येथील सरपंचपदी संधी मिळाली. या काळात सत्तेसाठी जोरदार रस्सीखेच झाली. नागरिकांनी सत्तेचा घोडेबाजारही अनुभवला. मात्र गटातटाच्या राजकारणामुळे तालुक्याचे ठिकाण असुनही गावचा अपेक्षित विकास झाला नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी तसेच आमदार उल्हास पाटील यांचे हे गाव. गेल्या पाच वर्षात सातत्याने पाठपुरावा झाल्याने ६ फेब्रुवारी रोजी येथील ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपालिकेत झाले. आता पालिकेतील सत्तेची सूत्रे काबिज करण्यासाठी सर्वच गट-तट, पक्ष सरसावले आहेत.

शिरोळ ग्रामपंचायतीवर अनिल यादव यांचे वर्चस्व आहे. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष असणार्‍या यादव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. नंतर त्यांची गोकुळ दूध संघाच्या संचालकपदी वर्णी लागली. आता भाजपाचा झेंडा पालिकेवर फडकविण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. उपसरपंच पृथ्वीराज यादव हे नगराध्यक्षपदाचे उमेदवार. निवडणुकीसाठी यादव यांनी रणनीती आखली असली तरी भाजपाचा वारू रोखून त्यांना शह देण्यासाठी अनेक नेत्यांनी कंबर कसली आहे. त्यामुळे शिरोळमध्ये भाजपचे वर्चस्व सिद्ध करण्याचे आव्हान यादव यांच्यासमोर आहे.

भाजपला रोखण्यासाठी सर्वच गट-तट, पक्षाची मोट बांधली जाईल असे संकेत होते. मात्र स्थापनेपूर्वीच महाआघाडीत बिघाडी झाली. नगराध्यक्ष निवड थेट जनतेतून होणार आहे. त्यासाठी सर्वमान्य उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब व्हावे अशी अपेक्षा होती. नगराध्यक्षपदासाठी महा आघाडीतून अनेक नावे चर्चेत होती. मात्र आघाडी आकारास येण्यापूर्वीच आमदार पाटील यांना यातून डावलल्याचे वृत्त पसरले. यानंतर शिवसेनेने बहुजन विकास आघाडीशी युती केली. गोकुळचे माजी अध्यक्ष दिलीपराव पाटील हे बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आहेत. त्यांचे पुत्र रणजितसिंह पाटील हे नगराध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या आखाड्यात गोकुळचे माजी अध्यक्ष दिलीपराव पाटील व विद्यमान संचालक अनिल यादव आमने-सामने आहेत. नगराध्यक्षपदासाठी त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

नगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, स्वाभिमानीने एकत्र येऊन राजर्षी शाहू विकास आघाडीची घोषणा केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरोळ विधानसभा परिक्षेत्राचे अध्यक्ष अमरसिंह पाटील हे या आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत. भाजपला रोखण्यासाठी ही आघाडी झाली तरी शाहू आघाडीच्या हाती पालिकेच्या सत्तेची सूत्रे घेण्यासाठी या आघाडीचे नेते खासदार राजू शेट्टी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर, काँग्रेसचे नेते गणपतराव पाटील यांना प्रयत्न करावे लागणार आहेत. निवडणुकीच्या निमित्ताने खासदार शेट्टी व आमदार पाटील हे एकमेकांसमोर उभे ठाकल्याने प्रचारादरम्यान रंगत येणार आहे.

निवडणुकीसाठी भाजप, राजर्षी शाहू विकास आघाडी, बहुजन विकास आघाडीबरोबर प्रमोद लडगे यांची छत्रपती शिवाजी महाराज युवा आघाडी तसेच गैरकारभाराविरोधात सातत्याने आवाज उठविणार्‍या 'आंदोलन अंकुश' या सामाजिक संस्थेची संत गाडगेबाबा शहर सुधारणा आघाडी निवडणुकीच्या रिंगणात आहे. छत्रपती शिवाजी महाराज युवा विकास आघाडीने प्रमोद लडगे यांचे नाव नगराध्यक्षपदासाठी निश्‍चित केले आहे. २४ तारखेपासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाले तरी अर्ज माघारीनंतरच खरे चित्र स्पष्ट होईल. या निवडणुकीत तिरंगी लढत अटळ आहे.

आठ प्रभागांतून १७ सदस्य निवडणार

येथे नगराध्यक्ष निवड थेट जनतेतून होणार आहे. नगरसेवकपदाच्या १७पैकी केवळ तीन जागा खुल्या आहेत. पहिला नगराध्यक्ष व नगरसेवक होण्यासाठी इच्छुकांची संख्या मोठी आहे. नगराध्यक्षपदासाठी १४ तर नगरसेवक पदासाठी १६३ अर्ज दाखल झाले होते. या अर्जाच्या छाननीनंतर आता माघारीसाठी इच्छुकांची मनधरणी सुरू झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

श्रीपतरावदादा बँक सभासदांना ११ टक्के लाभांश देणार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कुडित्रे

'श्रीपतरावदादा बँकेचा एकूण व्यवसाय ३२०० कोटींवर पोहाचला आहे. ग्राहकांना कोअर बँकींगसह सर्व अत्याधुनिक सुविधा बॅंकेने उपलब्ध करून दिल्या आहेत. बँकेला गेल्यावर्षी १ कोटी ४१ लारव रुपये ढोबळ नफा झाला असून सभासदांना ११ टक्के लाभांश देणार आहे' अशी घोषणा बॅंकेचे संस्थापक अध्यक्ष व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांनी केली. श्रीपतरावदादा सहकारी बँक, राजीवजी सहकारी सूतगिरणी व निवृत्ती तालुका सहकारी खरेदी-विक्री संघांच्या फुलेवाडीतील अमृत कार्यालयात झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.

बँकेचे अध्यक्ष राजेश पाटील म्हणाले, 'बॅंकेने आतापर्यंत पारदर्शक व स्वच्छ कारभाराला प्राधान्य देत सभासदांचा विश्वास संपादन केला आहे. बँकेने लघुउद्योगापासून ते मोठ मोठ्या उद्योगापर्यंत विविध कर्जयोजना राबविल्या आहेत.'

मुख्य कार्यकारी अधिकारी एस. बी. दिंडे यांनी अहवालवाचन केले. राजीवजी सहकारी सूतगिरणीचे अध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य राहुल पाटील म्हणाले, 'कठीण काळातही सूतगिरणीने प्रगतीत सातत्य ठेवले आहे. गेल्यावर्षी सूतगिरणीला १ कोटी ९६ लाख रुपये नफा झाला आहे. राज्य शासनाने सूतगिरण्यांना प्रतियुनिट ३ रुपये दराने वीज देण्याच्या घोषणेची तत्काळ अंमलबजावणी करायला हवी.'

व्यवस्थापक एस. एस. तानुगडे यांनी अहवालवाचन केले. अध्यक्ष आप्पासाहेब माने यांनी निवृत्ती खरेदी विक्री संघाच्या कार्याचा आढावा केले. व्यवस्थापक सर्जेराव पाटील यांनी अहवाल वाचन केले. गोकुळचे संचालक पी. डी. धुंदरे, बाळासाहेब खाडे, उदय पाटील, सत्यजित पाटील,

सूतगिरणीचे उपाध्यक्ष पांडुरंग पाटील, बँकेचे उपाध्यक्ष गणपतराव पाटील, संघाचे उपाध्यक्ष बी. एच. पाटील, माजी उपसभापती मारुती पाटील, तुकाराम पाटील आदी उपस्थित होते.

फोटो

फुलेवाडी येथे श्रीपतरावदादा बँक, राजीवजी सूतगिरणी व निवृत्ती तालुका संघाच्या वार्षिक सभेत मार्गदर्शन करताना संस्थापक व कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार पी. एन. पाटील. यावेळी उपस्थित मान्यवर.

(छाया : संजय नकाते)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गदिमांसारखे व्यक्तिमत्व पुन्हा होणे दुर्लभ’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मराठी साहित्यातील अजरामर व्यक्तिमत्व, कवी ग. दि. माडगूळकर यांच्या व्यक्तिमत्वाचे अज्ञात पैलू, साहित्याच्या विविध प्रकारावरील त्यांचे प्रभुत्व, त्यांच्या सहवासात फुललेले क्षण अशा कितीतरी आठवणींना विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उजाळा दिला. निमित्त होते ग.दि.माडगूळकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित कार्यक्रमाचे. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगे होते.

यावेळी बोलताना नलगे म्हणाले, 'अद्वितीय शब्दप्रभुत्व असलेल्या गदिमांच्या अनेकविध व्यक्तिमत्वाचे पैलू जवळून पाहता आले. गीतरामायण सारखा दर्जेदार नजराणा त्यांनी महाराष्ट्राला दिला. कवीमनाचे व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा उल्लेख कायम करावा लागेल. साहित्याच्या विविध प्रकारात योगदान देऊनही त्यांना चित्रपट कवी म्हणून ओळखले जाते याबाबत त्यांना नेहमी खंत जाणवायची. मराठी साहित्यातील त्यांचे योगदान मोठे आहे.'

डॉ. श्रीकांत नरुले म्हणाले, 'गदिमांची काव्ये आजही हृदयाचा ठाव घेतात. त्यांच्या काव्यातील सहजसुलभता रसिकांच्या मनात घर करून राहते. त्यांनी चित्रपट कथा, संवाद, गीतलेखन अशा विविधांगी प्रकारात काम केले आहे. त्यांच्या काव्यातील सहजसोपे शब्द मोहिनी घालतात.'

ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी म्हणाले, 'गदिमांचे कार्य नव्या पिढीला समजणे महत्वाचे आहे. त्यांचे सामान्य माणसाशी असलेले नाते हृदयस्पर्शी होते. त्यांच्यासारखे व्यक्तिमत्व यापुढे होणे दुर्लभ आहे. त्यांना आयुष्यभर संघर्ष करावा लागला. मराठी गीतनिर्मितीच्या क्षेत्रात त्यांचे स्थान अजोड आहे. गदिमांच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त वर्षभर विविध उपक्रम घेतले जाणार आहेत. यामध्ये त्यांच्या आठवणी, साहित्याची ओळख करून दिली जाणार आहे.'

याप्रसंगी हेमसुवर्णा मिरजकर यांनी लावणी सादर केली. विश्वराज जोशी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी दिग्दर्शक यशवंत भालकर,महिला व बालकल्याण सभापती सुरेखा शहा, शरद चव्हाण, सतीश बिडकर, अर्जुन नलवडे, कवी बापू घराळ, निर्माते सुरेंद्र पन्हाळकर, मंगेश मंगेशकर आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हेरवाडला मारामारी

$
0
0

हेरवाडात काका, काकीवर खुरप्याने हल्ला

जयसिंगपूर : हेरवाड (ता. शिरोळ) येथे पुतण्याने खुरप्याने केलेल्या हल्ल्यात काका, काकीवर जखमी झाले. शेतातील शाळूचे पिक काढण्याच्या कारणावरून ही घटना घडली. दिलीपकुमार रामचंद्र शिरढोणे (वय ५५) व शोभा शिरढोणे अशी जखमींची नावे आहेत. या घटनेची नोंद कुरूंदवाड पोलिसांत झाली आहे. पोलिसांनी सांगितले की, शेतातील शाळूचे पिक काढण्यावरून सुहास भालचंद्र शिरढोणे व त्याचा भाऊ सुमंत यांनी खुरप्याने वार केले. यामध्ये काका, काकी जखमी झाले आहेत. याबाबत दिलीपकुमार शिरढोणे यांच्या फिर्यादीवरून कुरूंदवाड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हवालदार विजय घाटगे तपास करीत आहेत.

कृष्णा नदीपात्रात

मिरजेच्या तरुणाचा मृतदेह

जयसिंगपूर : गणेशवाडी (ता. शिरोळ) येथे कृष्णा नदीपात्रात घाटाच्या पायरीजवळ तरूणाचा मृतदेह आढळला. जितेंद्र बाळासाहेब माने (वय २७, रा. गोठण गल्ली, राममंदिरजवळ मिरज) असे मृताचे नाव आहे. या घटनेची नोंद कुरूंदवाड पोलिसात झाली आहे. पोलिसांनी सांगितले की, जितेंद्र हा रविवारी म्हैशाळ (ता. मिरज) येथे कृष्णा नदीपात्रात पोहण्यास गेला होता. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला होता. यानंतर जितेंद्रचा शोध घेण्यात आला मात्र तो सापडला नव्हता. सोमवारी दुपारी त्याचा मृतदेह गणेशवाडी येथे घाटाजवळ आढळला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सव्वा कोटी कागदपत्रांचे डिजिटल रेकॉर्ड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषदेच्या सर्व विभागातील अभिलेख स्कॅन करून ऑनलाइनवर उपलब्ध करण्यात येणार आहे. प्रशासनाने यासाठी स्वतंत्र डिजिटल रेकॉर्ड रुमची स्थापना केली आहे. प्रत्येक विभागातील मिळून तब्बल एक कोटी २४ लाख पानांच्या कागदपत्रे स्कॅन होणार आहेत.

जिल्हा परिषदेतील विविध विभागांची कागदपत्रे अत्यंत महत्वपूर्ण असल्यामुळे सामान्य प्रशासन विभागाने ही योजना हाती घेतली आहे. यामध्ये कागदपत्रांचे स्कॅन करुन ऑनलाइनवर कायमस्वरुपी जतन करण्याचा प्रशासनाचा उद्देश आहे. या कामासाठी जिल्हा परिषदेचे कर्मचारी व आवश्यकतेनुसार बाह्य यंत्रणेकडून मनुष्यबळ उपलब्ध करुन घेण्यात येईल असे प्रशासनाने म्हटले आहे. या योजनेच्या खर्चासाठी जिल्हा परिषदेच्या स्वनिधीमधून रकमेची तरतूद केली आहे. ऑनलाइन डिजिटलमुळे जिल्हा परिषदेशी संबंधित कागदपत्रे, रेकॉर्ड कायमस्वरुपी सुरक्षित राहू शकतात. शिवाय प्रत्येक विभागाची माहिती ऑनलाइनच्या माध्यमातून सहजपणे मिळू शकेल.

जिल्हा परिषदेकडील २,४९,७३५ फाइल्सचे जतन होणार आहे. प्रत्येक फाइलमध्ये सरासरी ५० पानांचा समावेश आहे. त्यानुसार तब्बल एक कोटी २५ लाख पानांचे डिजीटल रेकॉर्ड तयार होईल अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवीकांत आडसूळ यांनी दिली. डिजिटल रेकॉर्ड रुमचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्या हस्ते झाले. उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आर. पी. शिवदास यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

कायमस्वरुपी जतन

जिपमधील अभिलेख कक्षात सर्व विभागांचे अभिलेख, कागदपत्रांचे जतन केले आहे. जि.प.च्या स्थापनेपासून ते २०१६ पर्यंतचे रेकॉर्ड आहे. यापैकी काही रेकॉर्ड हे कायमस्वरुपी, काही तीस वर्षे कालावधीसाठी तर काही दहा वर्षे कालावधीसाठी जतन करण्याचे सरकारी आदेश होते. अभिलेख कक्षामध्ये एकूण १७ विभागाचे २,३९,७३५ अभिलेख आहेत. त्यामध्ये कायमचे ३९१६०, तीस वर्षासाठीचे १,३२,१२४ तर दहा वर्षासाठीचे ६५,९९० इतकी आहेत. तर आरोग्य, शिक्षण आणि अर्थ विभागाच्या मिळून २,४५१ फाइल्स अभिलेख कक्षामध्ये जतन केल्या आहेत. दुर्घटना, नैसर्गिक आपत्तीप्रसंगी कागदपत्रे नष्ट होण्याची शक्यता असते. खबरदारी म्हणून त्या कागदपत्रांचे स्कॅन करुन कायमस्वरुपी जतन केले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live


Latest Images