Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

भूकंप ‘गोकुळ’मध्ये, हादरे लोकसभेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गोकुळ मल्टिस्टेटच्या वादात माजी आमदार महादेवराव महाडिक अचानक आक्रमक झाले आहेत. त्यांनी आमदार हसन मुश्रीफ व सतेज पाटील यांच्यावर निशाणा साधल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. याचे पडसाद जिल्हा बँकेसह विधानसभा, लोकसभा निवडणुकीत उमटणार आहेत. यामुळे 'गोकुळ'च्या भूकंपाचे हादरे लोकसभेला बसण्याची चिन्हे स्पष्ट झाल्याने खासदार धनंजय महाडिक यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीत खासदार महाडिक यांची उमेदवारी निश्चित आहे. भाजपबरोबरचे स्नेहपूर्ण संबंध आणि मुश्रीफ यांच्याशी वाढलेल्या मतभेदांमुळे त्यांचा पक्ष आज तरी नक्की नाही. त्यांना राष्ट्रवादीची उमेदवारी देण्यासाठी पक्षाध्यक्ष शरद पवार उत्सुक आहेत; पण त्यासाठी मुश्रीफ मनापासून सोबत असणे आवश्यक आहे. त्यातून दोघांतील दुरावा कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी प्राथमिक बैठकाही झाल्या. दोन्ही काँग्रेसची आघाडी होणार आहे, त्यामुळे आमदार सतेज पाटील यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. अशावेळी दोन्ही पक्षांतील, नेत्यांमधील वाद वाढू नयेत यासाठी प्रयत्न सुरू असतानाच 'गोकुळ'च्या निमित्ताने ठिणगी पडली आहे.

मल्टिस्टेटचा ठराव होऊ नये यासाठी महाडिक यांच्या विरोधात आघाडी करण्यात आली आहे. यामध्ये मुश्रीफ व पाटील यांचा पुढाकार आहे. त्यांनी सोमवारी 'गोकुळ'च्या नेत्यांवर टोले मारले. त्याला तातडीने महाडिक यांनी प्रत्युत्तर देताना सनसनाटी आरोप केले. वैयक्तिक पातळीवर आरोप झाल्याने दोन्ही नेत्यांनी तातडीने प्रत्युत्तर दिले; पण या आरोपांमुळे हे नेते चांगलेच अस्वस्थ झाले. याचे पडसाद आगामी काही निवडणुकांत उमटण्याची चिन्हे आहेत.

दोन्ही काँग्रेसची आघाडी होणार हे नक्की आहे. त्यामुळे आघाडीची उमेदवारी घेताना खासदार महाडिक यांना मुश्रीफ व पाटील यांची मदत लागणार आहे. त्यांची मदत झाली तरच विजय सुकर होणार आहे, पण ते विरोधात असतील तर त्यांचा मार्ग अतिशय खडतर होणार आहे. चार वर्षांपूर्वी महाडिक गटाने शब्द न पाळल्याने आमदार पाटील यांना फटका बसला. लोकसभेला मदत केल्यानंतर विधानसभेला मदतीची त्यांची अपेक्षा होती, पण ती न झाल्याने यापुढे महाडिकांना त्यांची मदत मिळणे कठीण आहे. परिणामी महाडिक यांच्या उमेदवारीचा प्रश्न निर्माण झाला आहे. महादेवराव महाडिक यांनी दोन्ही नेत्यांवर थेट आरोप केल्याने त्याचा परिणाम खासदारांच्या उमेदवारीवर होण्याची शक्यता आहे. आरोप काकांनी केले असले तरी सोबत खासदारही असल्याने त्यांच्या अडचणी वाढणार आहेत.

मुश्रीफ सोबत असतील तर काही गोष्टी शक्य होतील; पण जिल्हा बँकेचे अध्यक्षपद काढून घेण्याच्या हालचाली झाल्या तर ते आणखी दुखावतील. तसे प्रयत्न अद्याप झाले नाहीत, पण महाडिक यांनी याबाबत विधान केल्याने मुश्रीफ संतप्त झाले. पाच वर्षे मीच अध्यक्ष राहणार असे सांगत त्यांनी थेट महाडिकांनाच आव्हान दिले आहे. हा सामना जरी मुश्रीफ व माजी आमदार महाडिक यांच्यात असला तरी त्याचे चटके मात्र खासदारांना बसणार आहेत. मल्टिस्टेटच्या लढाईत खासदार पडद्यामागून सूत्रे हलवत आहेत. त्यामुळे त्यांच्यावरही मुश्रीफांचा राग आहेच, हा राग ते लोकसभा निवडणुकीत काढू शकतात. महाडिक यांच्याऐवजी ही उमेदवारी प्रा. संजय मंडलिकांच्या गळ्यात कशी पडेल यासाठी ते प्रयत्न करतील यात शंका नाही. काँग्रेसने कोल्हापूर मतदारसंघावर हक्क सांगून महिना होत आला तरी राष्ट्रवादीचे हे नेते काहीच बोलत नाहीत, यावरून त्यांच्या मनात काय आहे याचा अंदाज येतो. यामुळे खासदारांची लोकसभेची वाट सध्या तरी खडतर होत आहे.

००००००

जिल्हा बँक संचालक नाराज

महादेवराव महाडिक यांनी जिल्हा बँकेतील संचालकांवरही काही आरोप केले. यामुळे ते नाराज झाले आहेत. यातील अनेकांची लोकसभा व विधानसभा निवडणुकीत महाडिक यांना मदत होत असते, पण त्यांच्यावरच आरोप झाल्याने त्यांच्या नाराजीचे पडसादही आगामी राजकारणात उमटण्याची चिन्हे आहेत. यामुळे काकांच्या आक्रमकतेमुळे पुतण्याची कोंडी होण्याची शक्यता आहे.

००००००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भाजपची कटपुटतलीसारखी दुटप्पी भूमिका

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

'पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासीयांशी धादांत खोटे बोलत आहेत. निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने भाजपने पाळलेली नाहीत. एकूणच मोदी आणि भाजप सरकार कटपुतलीसारखी दुटप्पी भूमिका बजावत आहे,' असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. फौजिया खान यांनी गुरुवारी केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संकल्पनेतून राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षातर्फे देशभरात 'संविधान बचाओ, देश बचाओ' मोहीम हाती घेण्यात आली आहे. तीन ऑक्टोबर रोजी पुणे मगरपट्टा येथील लक्ष्मी लॉन्स येथे पश्चिम महाराष्ट्राचा कार्यक्रम होणार आहे. या वेळी पक्षाचे शरद पवार मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाच्या तयारीच्या अनुषंगाने डॉ. फौजिया खान यांच्या उपस्थितीत सर्वत्र बैठका घेण्यात येत आहेत. सोलापुरात गुरुवारी सकाळी डफरीन चौकातील सारस्वत ब्राह्मण कार्यालयात सोलापूर शहर व जिल्हा ग्रामीणची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला फौजिया खान यांनी मार्गदर्शन केले. या वेळी आमदार विद्या चव्हाण, राज्य सचिव राजलक्ष्मी भोसले, राज्य सदस्य कल्पना पाटील, सहसचिव सोनाली देशमुख, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे-पाटील, शहराध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष संतोष पवार, जिल्हा कार्याध्यक्ष बळीराम साठे उपस्थित होते.

'देशात मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी वाढली आहे. लाखो युवक बेरोजगारीचा सामना करत असताना भाजप सरकार मात्र नोकऱ्या मिळवून दिल्याची खोटी आकडेवारी दाखवून तरुणांची दिशाभूल करत आहे. नौकऱ्या नसल्याने देशात अराजकता निर्माण झाली असून, नोटबंदीने तर देश अधिकच अडचणीत सापडला आहे. महिलांवरील अत्याचार दिवसेंदिवस वाढत असताना कोणतीही खबरदारी सरकारकडून घेतली जात नाही,' असे फौजिया खान म्हणाल्या.

आमदार विद्या चव्हाण यांनीही भाजप सरकारच्या खोट्या कामकाजाचा खरपूस समाचार घेतला. 'मनुवादी सरकार हटवून देश वाचवा,' असे आवाहन त्यांनी या वेळी केले.

बैठक संपल्यानंतर दुपारी सर्व मान्यवर, पदाधिकारी आणि महिला कार्यकर्ते चालत डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे जाऊन बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर डॉ. फौजिया खान यांच्या हस्ते मनुस्मृती आणि ईव्हीएम मशीनच्या प्रतिकृतीची दहन करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवभांडवलदारांकडून जाणीवपूर्वक नाटक संपविण्याचे प्रयत्न

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

'हल्लीच्या काळात प्रेक्षकांचा कल दृकश्राव्य माध्यमांकडे वाढला आहे. त्यामुळे नाटक मागे पडत चालले आहे. नवभांडवलदारांचीही नाटक मरावे हीच इच्छा आहे; मात्र असे असले तरी नाटक वैश्विक नसून स्थानिक असल्याने ते कदापिही मरणार नाही,' असे प्रतिपादन ज्येष्ठ नाटककार जयंत पवार यांनी केले.

प्रयोग मालाड मुंबई आणि अखिल भारतीय नाट्य परिषद उपनगरीय शाखा सोलापूरच्या वतीने पार पडलेल्या एकांकिका स्पर्धेसाठी आले असता, नेमचंद वाचनालयाच्या अ‍ॅम्फी थिएटरमध्ये झालेल्या प्रकट मुलाखतीत ते बोलत होते. कोल्हापुरातील नाट्यसमीक्षक प्रा. डॉ. रणधीर शिंदे आणि रजनीश जोशी यांनी ही प्रगट मुलाखत घेतली. पवार म्हणाले, 'नाटक मागे पडत आहे. तंत्राधिष्ठित गोष्टींकडे लोकांचा कल वाढल्याचा हा प्रभाव आहे. नाटकासारख्या जिवंत माध्यमांची मात्र यात गोची होत आहे. नवभांडवलदारांकडून जाणीवपूर्वक नाटक संपविण्याचे प्रयत्न सुरू आहेत; मात्र नाटकातील विषय स्थानिक असल्याने ते प्रेक्षकांना आपले वाटतात. नाटकासाठी बरेच वेगळेपण लागते. प्रेक्षकांतही एकाग्रता हवी असते. अलीकडच्या शॉर्ट फिल्मच्या जमान्यात नाटक मागे पडल्याची खंत असली तरी ते मरणार मात्र नाही.'

'त्यांचे' साहित्य माझ्या रक्तात डीएनएसारखे

भालचंद्र नेमाडे, भाऊ पाध्ये, नामदेव ढसाळ यांसारख्या लेखकांचे साहित्य आपण एवढे जिरवले की ते आपल्या रक्तात 'डीएनए'सारखे उतरले आहे. या सर्व लेखकांच्या मर्यादा आणि उंची मला माहीत आहे. वाचकांना लेखकांच्या मर्यादा कळाव्या लागतात. आपण नाटकाकडून कथालेखनाकडे वळलो. प्रत्यक्षात कथेतही नाटक असते आणि नाटकातही कथा असते. खरे तर साहित्यातील या सीमारेषा आता धुसर व्हायला हव्या. 'काय डेंजर वारा सुटलायं' मध्ये मी जागतिकीकरणाचा धोका मांडला. नाटक हे समूहाने करायचे असते, तर कथालेखन वाचकांशी बांधिल असते. नाट्य रंगमंचाच्या अवकाशात असते. ते ताण निर्माण करते. त्यातून कलावंतांचे कसब पणाला लागते, असे जयंत पवार म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीपीआरचे 'हृदय'अपडेट

$
0
0

तज्ज्ञ डॉक्टर करतात दररोज दहा शस्त्रक्रिया

लोगो : जागतिक हृदय दिन

Sachin.patil1@timesgroup.com

Tweet-sachinpMT

कोल्हापूर: अत्याधुनिक यंत्रसुविधा, सर्वसामन्यांना परवडणारे उपचार आणि तज्ज्ञ, उत्साही विभागप्रमुखाचे नेतृत्व यामुळे सीपीआरमधील हृदयरोग विभाग 'अपडेट' झाला आहे. हृदयरोग तज्ज्ञ, विभागप्रमुख डॉ. अक्षय बाफना यांच्या नेतृत्वाखाली आठ लोक हृदयरोग विभागात कार्यरत आहेत. हृदयावरील उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल होणाऱ्यांची संख्या शेकडोंनी वाढत आहे. दररोज किमान दहा रुग्णांवर हृदयाच्या यशस्वी शस्त्रक्रिया केल्या जातात.

बदलती जीवनशैली, आहारातील बदल, वाढते ताणतणाव यामुळे हृदयरोग तिशीच्या घरात पोहचला आहे. हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यूमुखी पडणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये वेळेत योग्य उपचार न मिळाल्याने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. सीपीआरमधील वारणा आणि तुलसी इमारतीत असणारा हृदयरोग विभाग सर्वसामन्यांसाठी आधारवड ठरत आहे. हृदयाबाबतच्या तक्रारी घेऊन कोल्हापूर जिल्ह्यासह सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून रुग्ण सीपीआरमध्ये येतात. दररोज किमान ३०० लोकांची तपासणी करण्यात येते. त्यानंतर आवश्यकतेनुसार उपचाराची दिशा ठरवली जाते. या रुग्णांमध्ये बेताची आर्थिक परिस्थिती असलेले रुग्ण अधिक असतात. हृदय विभागात डॉ. विधुर कर्णिक, डॉ. रणजित जाधव, डॉ. माजिद मुल्ला, डॉ. भूपेंद्र पाटील, अरुण पाटील, सिस्टर इनचार्ज विमल वड्डर, पद्मजा पांडे, मधुरा जावडेकर, रुपाली सुतार, चारुशीला राऊत, निर्मला मधाळे आदी स्टाफ कार्यरत आहे.

गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वी

अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे हृदयरोगावरील शस्त्रक्रिया यशस्वी होण्याचे प्रमाण अधिक आहे. गेल्या दोन वर्षात डेथ रेट घटला आहे. वारणा इमारतीत क्लिष्ट आणि गुंतागुंतीच्या अनेक शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्या आहेत. यामध्ये लहान बाळापासून ते ज्येष्ठांपर्यंत उपचार केले जातात. गेल्या काही दिवसांपूर्वी शरीराच्या बाहेर हृदय असलेली दुर्मिळ केस येथील डॉक्टरांनी हाताळली होती. तसेच धोकादायक सप्लीमेंट पावडरीमुळे २४ वर्षांच्या तरुणाच्या हृदयातील अडथळे दूर करून त्याला वाचवण्यात डॉक्टरांना यश आले.

या शस्त्रक्रिया होतात

सीपीआर हृदयरोग विभागात बिनटाक्याची अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, किडनीची अँजिओप्लास्टी, झडपेची बी.ए.व्ही, बी.पी.व्ही तर हृदयातील छिद्रासंबंधी एसडी, व्हीएसडी, पीडीए या शस्त्रक्रिया केल्या जातात. त्याचबरोबर हृदयात पेसमेकर बसवणे, हृदयातील पाणी काढणे असे उपचार केले जातात. तसेच गुंतागुंतीच्या समजल्या जाणाऱ्या ओपन हार्ट सर्जरी, झडपा बदलणे, बायपास, हृदयातील मोठी छिद्रे बंद करणे, गाठी काढणे अशा अवघड शस्त्रक्रिया देखील केल्या जातात.

दोन वर्षांत ओपन हार्ट सर्जरी : ४४०

गेल्या दोन वर्षातील हृदयावरील बिनटाक्याच्या शस्त्रक्रिया: २०४८

बिनटाक्याच्या शस्त्रक्रियेत यंदा वाढ : २२ टक्के

४० वर्षाच्या आतील रुग्ण : २१ टक्के

४० वर्षांवरील रुग्ण: ३२ टक्के

२० ते ३० वयोगटातील रुग्ण: ७ टक्के

सीपीआरमधील हृदयरोग विभागात आधुनिक तंत्राच्या सहाय्याने यशस्वी शस्त्रक्रिया केल्या जातात. शासनाच्या विविध योजनामुळे अनेकांना मोफत उपचार घेता येतात. हृदयरोग रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता त्यांना वेळेत उपचार मिळणे गरजेचे आहे. येणाऱ्या काळात सीपीआरमध्ये अधिकाधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देणार आहे.

डॉ. अक्षय बाफना, हृदयरोग विभागप्रमुख, सीपीआर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोलापुरात स्वच्छता रॅली

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

महानगरपालिका आरोग्य विभाग व घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने सोलापूर शहरात २७ ठिकाणी स्वच्छता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीची सुरुवात हुतात्मा चौकात चार पुतळ्यास व अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यास महापौर शोभा बनशेट्टी यांच्या हस्ते व महापालिका आयुक्त अविनाश ढाकणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या रॅलीमध्ये सोलापूर शहरातील विविध शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले होते.

परमवीर संस्कृती क्रीडा मंडळाच्या वतीने 'स्वच्छ सोलापूर, सुंदर सोलापूर' या पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर महापौर शोभा बनशेट्टी व महापालिका आयुक्त अविनाश ढाकणे यांनी झेंडा दाखवून रॅलीची सुरुवात केली. या वेळी गटनेते आनंद चंदनशिवे, नगरसेविका श्रीदेवी फुलारे, नगरसेवक भारत बडूरवाले, सहायक आयुक्त सुनील माने, प्रशासन अधिकारी सुधा साळुंखे, जनसंपर्क अधिकारी विजयकुमार कांबळे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पंचगंगा प्रदूषण’प्रश्नीदोन तज्ज्ञांची नियुक्ती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी तात्पुरत्या आणि कायमस्वरूपी उपाययोजनांवर देखरेख करण्यासाठी पुणे आणि इचलकरंजीतील दोन तज्ज्ञांच्या नियुक्तीला मंजूर दिली आहे. प्रदूषणकारी घटकांवरील कारवाईसह उपाययोजनांसंबंधीचा अहवाल ते मला देतील,' असे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत सांगितले. अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र आराखडा ७ कोटी रुपयांनी वाढला असून जोतिबा मंदिर विकास आराखड्यातील कामांची निविदा निधी मिळाल्यानंतर काढली जाईल असेही त्यांनी सांगितले.

विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर म्हणाले, 'हायकोर्टाच्या आदेशानुसार पंचगंगा प्रदूषण नियंत्रण, देखरेख समितीचा मी अध्यक्ष आहे. माझ्यातर्फे दोन तज्ज्ञांची निवड करण्याला मंजुरी दिली आहे. ते माझे प्रतिनिधी म्हणून काम करतील. नदीच्या प्रदूषणातील ८० टक्के वाटा कोल्हापूर आणि इचलकरंजी या शहरांचा आहे. या दोन शहरांतील स्थानिक स्वराज्य संस्थांना उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याप्रमाणे कोल्हापूर महानगरपालिकेने ५५ आणि १७ एमएलडीचे दोन सांडपाणी प्रकल्प कार्यान्वीत केले. इचलकरंजीत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या जागेची अडचण आहे. ती दूर करण्यासाठी जिल्हाधिकारी प्रयत्नशील आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळाने काही प्रदूषणकारी कारखान्यांना बंदचे आदेश दिले आहेत.'

विभागीय आयुक्त म्हैसेकर म्हणाले, 'अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील पहिल्या टप्यातील ८० कोटींच्या कामांना मंजूरी दिली आहे. मात्र कामाचे मूल्यांकन वाढल्याने तो आराखडा ८७ कोटींचा झाला. वाढीव रक्कम महानगरपालिका देणार आहे. जोतिबा मंदिर विकास आराखड्यातील कामांची निविदा निधी मिळाल्यानंतर काढली जाईल. विभागीय क्रीडा संकुलामधील जलतरण तलावातील त्रुटी दूर करण्यासाठी, त्रुटींच्या अभ्यासासाठी पवई आयआयटीला साडेतीन लाख रुपये शुल्क दिले आहेत. पाऊस थांबल्यानंतर याच्या प्रत्यक्ष कामाला सुरूवात होईल. पुणे विभागातील सोलापुरात पाऊस नसल्याने दुष्काळसदृश्य स्थिती आहे. परतीचा पाऊस नाही पडला तर तेथील काही तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केले जातील. कोल्हापूर जिल्ह्यात अतीपावसाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. तो अहवाल अद्याप आलेला नाही. विभागातील रखडलेल्या ६३ नायब तहसीलदारांच्या बढत्याचे काम पूर्ण झाले आहे. लवकरच पुढील कार्यवाही होईल.'

'नमामि'त प्रस्ताव नाही.

'नमामि' योजनेते चंद्रभागा नदीचा सामावेश आहे. त्या धर्तीवर पंचगंगा नदीचाही सामावेश करण्यासाठी प्रस्ताव करण्याची कार्यवाही सुरू आहे. मात्र अद्याप प्रस्ताव माझ्यापर्यंत आलेला नाही,' असे डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले. मतदारयादी शुद्धीकरण मोहिमेत बोगस मतदार किती सापडले? या प्रश्नाला मात्र त्यांनी बगल दिली.

मी सांगणार नाही

'यापुढील निवडणुकांत व्हीव्हीपॅट यंत्र वापरण्यासंबंधी आयोगाने काही आदेश दिले आहेत का? असे विचारल्यानंतर विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी 'याविषयी

मी काहीही सांगणार नाही. मला माहिती असले तरी मी सांगू शकत नाही. जिल्हाधिऱ्यांकडून यासंबंधीची माहिती घ्यावी, असे उत्तर डॉ. म्हैसेकर यांनी दिले.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोवर, रुबेलाबाबत जनजागृती

$
0
0

फोटो आहे

कोल्हापूर टाइम्स टीम

रुबेलाचा संसर्ग झाल्यास गर्भपात किंवा अंधत्व, बहिरेपणा, ह्रदयदोष यासारखे जन्मजात होऊ शकतात. समाजात जागृती केल्यानंतरच संसर्गजन्य रोगाचे उच्चाटन होणार आहे. जनजागृती मोहिमेमध्ये महापालिका शाळेतील मुख्याध्यापक व नोडल टिचरांनी सहभागी व्हावे असे, आवाहन मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटील यांनी केले.

राज्यसरकारच्या आदेशाप्रमाणे महापालिका आरोग्य विभागातर्फे गोवर व रुबेला लसीकरण मोहीम नोव्हेंबपासून राबवण्यात येणार आहे. मोहिमेमध्ये महापालिका कार्यक्षेत्रातील सर्व शाळांमधील शिक्षकांना सहभागी करून घेण्यात येणार आहे. अशा मुख्याध्यापक व नोडल टीचर यांच्यासाठी संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह येथे कार्यशाळा पार पडली.

डॉ. पाटील म्हणाले, ' केंद्र सरकारने २०२० पर्यंत गोवर आजाराचे निर्मूलन व रुबेला या आजारावर नियंत्रण ठेवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. महापालिकेच्‍या कार्यक्षेत्रामध्ये नऊ महिने ते १५ वर्ष वयोगटातील मुलांचे गोवर रुबेला एक इंजेक्‍शनद्वारे लसीकरण करण्यात येणार आहे. रुबेलाचा संसर्ग झाल्यास गर्भपात किंवा अंधत्व, बहिरेपणा यासारखे जन्‍मजात दोष होऊ शकतात. समाजात या मोहिमेचे जनजागृती करणे आवश्यक आहे. पहिल्या दोन आठवड्यात मोहीम शाळांमध्‍ये रा‍बविण्यात येणार असून मोहीम यशस्‍वी करणेसाठी सर्व शिक्षक व नोडल टीचर यांनी सहकार्य करावे.'

नोडल अधिकारी डॉ. अमोलकुमार माने यांनी स्‍लाईडशोद्वारे मुख्याध्यापक व नोडल टीचरांना मोहिमेबद्दल माहिती दिली. आरोग्‍य संघटनेचे डॉ. अभिमन्‍यू खरे यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी प्राथमिक शिक्षण समिती सभापती अशोक जाधव, उपायुक्‍त मंगेश शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.

या कार्यशाळेस आरोग्‍य संघटनेचे प्रमुख डॉ. खरे, प्रशासन अधिकारी एस. के. यादव, शैक्षणिक पर्यवेक्षक विजय माळी, बाळासो कांबळे, सर्व शिक्षक, नोडल टीचर व प्राथमिक नागरी आरोग्‍य केंद्रातील सर्व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. डॉ. रुपाली यादव यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिव्यांगासाठी अडीच कोटींची तरतूद

$
0
0

विविध योजनांसाठी अर्ज करण्याचे महापालिका प्रशासनाचे आवाहन

कोल्हापूर टाइम्स टीम

दिव्यांग, कुष्ठरोगी व गतिमंद यांना दरमहा मानधन, दिव्यांगांना व्यवसाय आणि शैक्षणिक मदत राज्य सरकारच्या फंडातून करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी महापालिकेने दोन कोटी ९४ लाख रुपयांची तरतूद केली आहे. योजनेच्या लाभासाठी महापालिकेने स्वतंत्र दिव्यांग कक्षाची स्थापना केली आहे. विहित नमुन्यात अर्ज करून योजनांचा लाभ घ्यावा असे, आवाहन आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी पत्रकार परिषदेद्वारे केले.

डॉ. चौधरी म्हणाले, 'राज्य सरकारच्या सूचनेनुसार दिव्यांग व्यक्तींना दिल्या जाणाऱ्या मदतीचा आराखड्यास महापालिकेने मंजुरी दिली आहे. आराखड्यातील तरतुदीनुसार महापालिकेच्या वार्षित अंदाजपत्रकाच्या जुन्या सूचनेनुसार तीन आणि नव्या आदेशानुसार पाच टक्के अनुदान उपलब्ध करून दिले आहे. उपलब्ध अनुदानाच्या माध्यमातून दिव्यांग कृती आराखड्यानुसार ११ योजनांना मान्यता दिलेली आहे. दिव्यांग व्यक्तींनी स्वयंरोजगार व उदरनिर्वाहासाठी प्रत्येकी २५ हजार रुपयांची मदत केली जाणार आहे. त्यासाठी ४२ लाखांची तरतूद केली आहे. एका वर्षात या योजनेचा एकदाच लाभ देण्यात येणार असून योजनेतील अनुदान थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होईल. योजनेतून जिल्हास्तरापासून आंतरराष्ट्रीयस्तरावर देदिप्यमान कामगिरी केलेल्या खेळाडूंना वैयक्तिक स्वरुपात बक्षीस दिले जाणार आहे. आंतर जिल्हास्तरावर यश मिळवणाऱ्या दहा दिव्यांग खेळाडूंना प्रत्येकी सहा हजार मानधन देण्यात येणार आहे. राज्यपातळीवरील दहा खेळाडूंना प्रत्येकी १२ तर राष्ट्रीयस्तरावर प्राविण्य मिळवलेल्या पाच खेळाडूंना वर्षासाठी तीस हजार रुपये देण्यात येणार आहेत. तर आंतरराष्ट्रीयस्तरावरील पाच खेळाडूंना प्रत्येकी ६० हजार रुपये बक्षीस स्वरुपात दिले जाणार आहेत.'

'दिव्यांग आधारभूत योजनेंतर्गत दहा लाख निधीतून फिजिओथेरपी सेंटर अद्ययावत केले जाणार आहे. टॅली, एमएससीआयटी, शिवणयंत्र आदी व्यवसायिक प्रशिक्षणासाठी सरकारमान्य संस्थेत प्रशिक्षणासाठी दहा लाखाची तरतूद केली आहे. पहिली ते बारावीच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना दरमहा पाचशे तर पदवीच्या शिक्षण घेणाऱ्यांना दरमहा दहा तर पदव्युत्तरसाठी दीड हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाईल. पाच लाख रुपये खर्चुन भास्करराव जाधव वाचनालयात ऑडियो लायब्ररी व ब्रेल पुस्तकांसाठी पाच लाखाची तरतूद केली असल्याचे आयुक्त डॉ. चौधरी यांनी सांगितले.'

पत्रकार परिषदेस उपायुक्त मंगेश शिंदे, मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटील उपस्थित होते.

...................

दृष्टिक्षेप

१४०

एकूण लाभार्थी

२५ हजार (प्रत्येकी)

स्वंयरोजगारासाठी निधी

६ लाख

राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील पदक विजेते बक्षीस

दहा लाख

व्यवसाय प्रशिक्षण

४० लाख

शालेय शिष्यवृत्ती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘तंत्रज्ञान आणि उत्कृष्ट सेवेमुळेच पार्श्वनाथची प्रगती’

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

'आधुनिक तंत्रज्ञान व उत्कृष्ट ग्राहक सेवेमुळे पार्श्वनाथ बँकेची प्रगती झाली आहे. बँकेने समाजात पाया भक्कम केला आहे असून ग्राहकांना अधिकाधिक सेवा पुरविण्यात बँक अग्रेसर आहे,' अअसे प्रतिपादन अध्यक्ष अभय गांधी यांनी केले. बँकेच्या २१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.

गांधी म्हणाले, 'पार्श्वनाथ बँक आर्थिकदृष्ट्या सक्षम असून प्रगतीचा आलेख उंचावत आहे. थकबाकीदार कर्जदारांनी थकबाकी त्वरित भरुन सहकार्य करावे.' मुख्य कार्यकारी अधिकारी तुळशीराम लटकन यांनी अहवाल वाचन केले. कामकाजामध्ये शिवाजीराव पाटील, आय. ए. पाटील,सुरेंद्र वखारिया, राजाराम चव्हाण यांनी सहभाग घेतला. सभेला बँकेचे माजी अध्यक्ष आशिष शहा, सचिन कोळी, श्रीकांत पाटील, बँकेचे उपाध्यक्ष विनोद मेहता, संचालक प्रफुल्ल दोशी, अनिल शहा, विनोद ओसवाल, दत्तात्रय थोरावडे, शशिकांत शिर्के, पुंडलिक कांबळे, उज्ज्वला पाटील, पूनम शहा, योजना शहा आदी उपस्थित होते. बँकेचे महाव्यवस्थापक जयसिंग पाटील यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मल्टिस्टेट’ म्हणजे काय?

$
0
0

एंट्रो...

जिल्हा दूध उत्पादक संघाची (गोकुळ) सर्वसाधारण सभा रविवारी (ता.३०) होणार असून, यावेळी मल्टिस्टेट (बहुराज्यीय सहकारी संस्थांचा कायदा २००२) ठराव मांडण्यात येणार आहे. या ठरावावर जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार आहे. मल्टिस्टेटबाबतच्या कायद्यातील तरतुदीवर बरीच चर्चा होणार असून, मल्टिस्टेट कार्यक्षेत्रातील दूध संस्थांबरोबर व्यक्तिगत संस्थांना सभासदत्व दिले जाणार आहे. त्यातून गोकुळच्या खासगीकरणाचा घाट घातला जात आहे, असा विरोधकांकडून आरोप होत आहे. मल्टिस्टेट म्हणजे काय, त्याचे कार्यक्षेत्र, नियम व अटी याबाबत...

०००

गोकुळ मल्टिस्टेटचे कार्यक्षेत्र

गोकुळ मल्टिस्टेटचे कार्यक्षेत्र संपूर्ण कोल्हापूर जिल्हा (परंतु वारणा प्लँटच्या नोंदणीवेळी ज्या ज्या गावांचा समावेश केला होता, त्यांना वगळून अशा गावांची नावे परिशिष्ट 'अ'मध्ये नमूद केली आहेत.) आहे. तसेच कनार्टकातील बेळगाव जिल्ह्यातील अथणी, चिकोडी, हुक्केरी तालुक्यांतील गावांचा समावेश असणार आहे.

००००

मल्टिस्टेट म्हणजे काय?

केंद्राने मल्टिस्टेट को-ऑपरेटीव्ह सोसायटी अॅक्ट २००२ मंजूर केला. या कायद्यान्वये केंद्र सरकारने नियुक्त केलेले 'केंद्रीय उपनिबंधकांचे दूध संस्थेवर नियंत्रण राहणार आहे. त्यानुसार मल्टिस्टेटचे कामकाज चालणार आहे.

००००

सभासदत्वाच्या अटी

एखादी व्यक्ती संघाने योग्य तऱ्हेने निवडलेली असावी. संघाच्या पोटनियमातील तरतुदीप्रमाणे सर्वसाधारण सभेने प्रतिनिधी म्हणून निवडलेली अथवा संस्थेच्या संचालक मंडळाने अशा व्यक्तीस योग्य तऱ्हेने संघाचे प्रतिनिधित्व करण्यास अधिकार दिलेल्या व्यक्तीची संस्था असेल तर त्या व्यक्तीच्या संस्थेला संघाचे सभासद देण्यात येईल. डेअरी, सहकारी संस्था, डेअरी उद्योगामध्ये कार्यरत असलेली संस्था या संघाचे सभासद होऊ शकतात. तसेच कोणतेही करार करण्यास सक्षम असलेली व्यक्ती, कोणतेही कॉर्पोरेशन, सरकारी कंपनी, व्यक्ती संस्थांना सभासद करुन घेण्याची तरतूद आहे.

०००००

मल्टिस्टेटचा उद्देश

प्राथमिक सहकारी दूध संस्थेकडून दूध खरेदी करून दूध उत्पादकांना दर देणे, तसेच दूध व्यवसाय वाढविण्यासाठी पूरक योजना कार्यान्वित करावी लागणार आहे. दूध व दुग्धजन्य पदार्थाचे आधुनिक पद्धतीने उत्पादन करून त्यांची साठवणूक करण्यासाठी प्रकल्प उभारावा लागणार आहे. दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीची व्यवस्था करणे आणि वर्षभर खात्रीशीर बाजारपेठ मिळवून देण्याची व्यवस्था करणे. तसेच संस्थांच्या सभासदांना याबाबतीत मार्गदर्शन करणे हे संघाचे उद्देश राहतील. सभासदांच्या हितास बाधा न आणता इतर जिल्ह्यांतून दूध खरेदी करणे, दूध संकलन करणे, एकत्रित करणे, पदार्थ तयार करणे व त्यांची विक्री आणि वितरण व्यवस्था करण्याचे बंधन राहणार आहे. संघाला भाडेपट्टीने अथवा मालमत्ता खरेदी करण्याची परवानगी मिळणार आहे. तसेच इमारती, यंत्रसामग्री, प्रकल्प आणि दुग्ध व्यवसायासाठी उपकरणे खरेदी करणे अथवा प्रकल्प उभारणी करावी लागणार आहे.

०००००

मल्टिस्टेटचे सभासदत्व

कोणतीही सामान्य डेअरी सहकारी संस्था किंवा इतर विविध उद्देशांची संस्था ज्याचा उद्देश बहुराज्य संस्थेचे किंवा डेअरी उद्योगामध्ये कार्यरत असलेली संस्था या संघाचे सभासद होऊ शकतील. कोणतीही संस्था या संघाचे सभासदत्व स्वीकारण्याआधी जी संस्था संघाकडे कमीत कमी ५० लिटर दूध दररोज तीन महिन्यांसाठी पुरवठा करेल. त्यानंतर त्या संस्थेचे सभासदत्व कायम ठेवण्यासाठी संघाकडे दररोज कमीत कमी ५० लिटर दूध याप्रमाणे वर्षातील २४० दिवस सरासरी दूधपुरवठा करणे आवश्यक राहील. अशा संस्थेचे नोंदणीकृत कार्यालय हे संघाच्या कार्यक्षेत्रामध्ये असणे आवश्यक राहील.

००००

सभासदांचे अधिकार व कर्तव्ये :

संघाच्या प्रत्येक संस्था सभासदांना संघाच्या व्यवहारामध्ये एक मत देण्याचा अधिकार राहील. संस्था सभासदांना त्यांचे सभासदत्व बहाल झाल्यानंतर सभासदांचे अधिकार त्यांना प्राप्त होतील. संघाच्या पोटनियमातील तरतुदीप्रमाणे सर्वसाधारण सभेची नोटीस स्वीकारण्याचे अधिकार राहतील. सभेत उपस्थित राहण्याचा व भाग घेण्याचा अधिकार राहील. कायदा, नियम व संघाच्या पोटनियमातील तरतुदीप्रमाणे संघाच्या निवडणुकीमध्ये भाग घेण्याचा अधिकार राहील.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीपीआरच्यावतीने महाअवयवदान रॅली

$
0
0

महा अवयवदान रॅली

कोल्हापूर टाइम्स टीम

स्वर्गात हवे स्थान, करा अवयवदान, महान दान अवयव दान अशा घोषणा देत छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाच्यावतीने महा अवयवदान जनजागृती रॅली शहरातून काढण्यात आली. जनजागृती फेरीचे उद्घाटन अधिष्ठाता डॉ. वसंत देशमुख यांनी झेंडा दाखवून केले. रॅलीत ३०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

सीपीआरमध्ये महा अवयवदान महोत्सव साजरा केला जात असून यामध्ये भित्तीचित्र स्पर्धा, व्याख्याने अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. रॅलीमध्ये जनजागृतीपर फलक लावण्यात आले होते. तसेच सायबर महाविद्यालयाच्या समाजकार्य विभागातील विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. यावेळी डी. वाय. पाटील मेडिकल व नर्सिंग कॉलेज, वेणूताई चव्हाण होमिओपॅथिक कॉलेज,एस. जे. पी, ई. एस होमिओपॅथी कॉलेज, सावित्रीबाई फुले नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यावेळी उपअधिष्ठाता डॉ. डी. ए. पावले, डॉ. सुदेश गंधम, डॉ. अपर्णा कुलकर्णी, समाजसेवा अधिक्षक शशिकांत राऊळ तसेच सीपीआरमधील विभागप्रमुख, निवासी डॉक्टर, प्राध्यापक, समाजसेवा अधीक्षक वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी, नर्सिंगचे प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बांधकाम विभागातील घोटाळ्याची चौकशी करा’

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

सार्वजिनक बांधकाम विभागातील आर्थिक घोटाळ्याची तातडीने चौकशी करुन दोषींना शिक्षा झाली पाहिजे. अन्यथा आंदोलन तीव्र करण्यासोबतच कोर्टात दाद मागावी लागेल, असा इशारा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांना त्यांनी निवेदन दिले.

बांधकाम विभागाला गेल्या चार वर्षांत मोठ्या प्रमाणात निधी मिळाला, पण रस्त्याची कामे कुठे दिसत नाहीत. हा निधी कुठे मुरला अशी विचारण्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. निविदा प्रक्रियेतही मोठा घोटाळा आहे. खड्डे भरण्यासाठीच्या निविदा दोन वर्षे मुदतीच्या आहेत. शिवाय कंत्राटदारावर एका वर्षासाठी देखभाल दुरुस्तीची जबाबदारी आहे याकडेही शिष्टमंडळाने अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. शिष्टमंडळात उपजिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, करवीर तालुकाप्रमुख विराज पाटील, शहरातील पदाधिकारी दुर्गेश लिंग्रस, शिवाजी जाधव, अवधूत साळोखे, विनोद खोत आदींचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अ‍ॅक्शन प्लॅन सादर करा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

राज्यातील अडचणीतून मार्गक्रमण करीत असलेल्या सूतगिरण्यांना ऊर्जितावस्था येण्यासाठी राज्य सरकारला अ‍ॅक्शन प्लॅन सादर करणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने सूतगिरण्यांनी तातडीने असा प्लॅन सादर करावा, असे आवाहन वस्त्रोद्योग संचालक डॉ. माधवी खोडे-चवरे यांनी केले.

इचलकरंजी येथील डीकेटीईमध्ये आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. बैठकीला सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील सहकारी सूतगिरण्यांचे अध्यक्ष, कार्यकारी संचालक उपस्थित होते. इंदिरा महिला सहकारी सूतगिरणीच्या अध्यक्षा किशोरी आवाडे यांनी स्वागत केले.

सहकारी तत्त्वावरील सूतगिरण्या गेल्या अनेक वर्षांपासून अडचणीत सापडल्या आहेत. सरकारने भागभांडवल तसेच उत्पादित सुताला मिळत नसलेला भाव, कापसाचे चढे दर, वीज दरातील वाढ अशी अनेक कारणे त्याला कारणीभूत आहेत. या सूतगिरण्यांना भेट देऊन वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी डॉ. खोडे-चवरे पाच दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी विविध सहकारी सूत गिरण्यांसह रेशीम उद्योग व यंत्रमाग सहकारी संस्थांना भेटी देऊन माहिती जाणून घेतली.

डॉ. खोडे-चवरे म्हणाल्या, 'शेतीखालोखाल रोजगार उपलब्ध करून देणारा वस्त्रोद्योग खरोखरच अडचणीत सापडला असून त्याची भीषणता तीव्र आहे. सहकारी सूतगिरण्यांच्या व्यवस्थापनाबरोबरच कामगारांशी थेट संवाद साधल्यानंतर त्यातील अडचणी खऱ्या अर्थाने समजावून घेण्यात आल्या. मुळातच कापसाचे उत्पादन व भावावर सूतगिरण्यांची चक्रे फिरत असतात. कापसाच्या दरातील चढ-उतार, या उद्योगात शिरकाव केलेले दलाल आणि सूत गिरण्यांकडे मुबलक कापूस खरेदीसाठी अपुरा निधी यामुळे गिरण्यांचे गणित कोलमडत आहे. या उद्योगाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी राज्य वस्त्रोद्योग महासंघाने पुढाकार घेऊन त्याचे नेतृत्व महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांनी करावे.'

डॉ. खोडे-चवरे यांनी अडचणीत आलेल्या सूतगिरण्यांनी अ‍ॅक्शन प्लॅन तयार करुन दिल्यास त्याचा राज्य सरकारकडे पाठपुरावा करून योग्य ती भरीव मदत मिळवून देण्याची ग्वाही दिली. त्या म्हणाल्या, सरकार लवकरच वीज व व्याज अनुदानात सवलत देणार आहे. त्याचा सूतगिरण्यांना फायदा होणार आहे. खासगी व सहकारी असा कोणताही भेद न करता सरकार सर्वांच्या पाठीशी उभे राहील.'

यावेळी देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार मागासवर्गीय सहकारी सूत गिरणीचे अध्यक्ष अशोकराव माने, इचलकरंजी को-ऑप. स्पिनिंग मिलचे अध्यक्ष मोहन भिडे, विटा येथील किरण तारळेकर, पश्चिम महाराष्ट्र सहकारी यंत्रमाग संस्था महासंघाचे अध्यक्ष सुनील तोडकर, इचलकरंजी गारमेंट क्लस्टरचे स्वप्निल आवाडे, आदींनी या व्यवसायातील अडचणी व समस्या मांडल्या.

००००

सरकारचा गलथानपणा

तळाशी (ता. राधानगरी) येथील यंत्रमाग सहकारी संस्थेचे मारुती जाधव गुरुजी यांनी वस्त्रोद्योग अडचणीत सापडण्यास सरकारचे धोरणच जबाबदार असल्याचा आरोप केला. हा उद्योग पूर्वपदावर येण्यासाठी काही कोटी रुपयांची आवश्यकता आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष करून केंद्र व राज्य सरकार बुलेट ट्रेन, समृद्धी महामार्ग यावर कोट्यवधी रुपये उधळत आहे. राज्यातील कापूस चीनला निर्यात करून तेथून तयार कपडे भारतात कमी किमतीत विकले जातात. त्याला सरकारचा गलथानपणाच जबाबदार असल्याची टीकाही त्यांनी केली.

००००

लवकरच वीज सवलत

राज्यातील वस्त्रोद्योग अखंडित चालण्यासाठी सरकारने वीज दरात सवलत देण्याच्या घोषणेची अंमलबजावणी प्रलंबित आहे. सहकारी सूतगिरण्यांना तीन रुपये, खासगी सूतगिरण्यांना दोन रुपये व यंत्रमाग उद्योगासाठी एक रुपये अशी ३७० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. ही फाइल वित्त विभागाकडे असून, नजीकच्या काही दिवसांत याला मंजुरी मिळेल, अशी माहिती राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांनी दिली.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जामीन अर्ज फेटाळला

$
0
0

इचलकरंजी : खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेले माजी नगरसेवक भीमराव अतिग्रे यांचा जिल्हा व सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला. अतिग्रे यांनी नगरपालिका हद्दीतील फडके यांच्या मालकीच्या क्षेत्राच्या जमिनीबाबत बनावट कागदपत्रे तयार करून बोगस गुंठेवारीने जमीन विक्री करून लाखो रुपये हडप केल्याची माहिती व कागदपत्रे माहिती अधिकाराखाली मिळविल्याचा राग मनात धरून अतिग्रेसह सहाजणांनी १४ ऑगस्ट २०१८ रोजी अतिग्रे यांच्या चिथावणीने आकाश आवळे याने कोयता जोरात फेकून खून करण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी जितेंद्र मस्करने सहाजणांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी अतिग्रे यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

न्यायालयाच्या आदेशावरुनमतदानाबाबत दोन्ही गटाचे दावे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ (गोकुळ) सभेत 'मल्टिस्टेट'च्या ठराव मंजुरीसाठी आवाजी की गुप्त पद्धतीने मतदान घ्यायचे याविषयी सहकार न्यायालयाने दिलेल्या निकालाबाबत गुरुवारी सत्ताधारी आणि विरोधी गटांनी परस्पर विरोधी दावे केले. त्यामुळे सभेतील कार्यवाहीबाबत गोंधळ उडण्याची शक्यता आहे.

गोकुळच्या सभेत मल्टिस्टेट विषयाबाबत गुप्त मतदान घ्यावे अशी याचिका गोकुळ बचाव कृती समितीने कोर्टात दाखल केली होती. या याचिकेवर सहकार न्यायालयाने निकाल दिला असून बचाव समितीच्या याचिका फेटाळल्या आहेत. मात्र या संदर्भात गोकुळ बचाव कृती समितीचे वकील अॅड. प्रबोध पाटील यांनी निकालाबाबत माहिती दिली. ते म्हणाले, 'सहकार कायद्यातील नियम ६०मधील तरतुदींचे पालन करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. कलम ६०(४) नुसार एकाद्या विषयावर एकमत न झालेस एखाद्या सभासदाने गुप्त मतदानाची मागणी केली तरी ते अध्यक्षांना बंधनकारक आहे. पण निर्णय गुप्त मतदान पद्धतीने अथवा हात वर करुन घ्यायचे हे अधिकार सभा अध्यक्षांना नियम ६०(५)नुसार दिले आहेत. गोकुळ सभासदांची संख्या ३६५९ इतकी असल्याने हात वरुन करुन निर्णय घेणे किचकट ठरणार आहे. तसेच निर्णय प्रक्रिया पारदर्शी होण्यासाठी एका सभासदाने केलेल्या मागणीनुसार गुप्त पद्धतीने मतदानाचा निर्णय घेणे हिताचे ठरणार आहे. नियम ६०(६) मध्ये गुप्त पद्धतीने मतदान घेण्याची तरतूद आहे. नियम ६०चे पालन करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे मल्टिस्टेट ठरावाबाबत गुप्त पद्धतीने मतदान घ्यावे लागणार आहे.'

दरम्यान, विरोधक कोर्टाच्या आदेशाबाबत दूध उत्पादकांत दिशाभूल व संभ्रम करण्याचा प्रयत्न करीत आहेत असा आरोप गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी 'मटा'शी बोलताना केला. तर 'गोकुळ'कडून या खटल्याचे काम पाहणारे अॅड. लुईस शहा म्हणाले, 'न्यायालयाने मल्टिस्टेटचा निर्णय घेण्याचा अधिकार सभेच्या अध्यक्षांचा असल्याचे स्पष्ट केले आहे. गुप्त पद्धतीने मतदान घेण्याची विरोधकांची मागणी कोर्टाने स्पष्टपणे नाकारला आहे. ठराव आवाजी मताने घ्यायचा की गुप्त मतदान पद्धतीने घ्यायचा हा अधिकार सभा अध्यक्षांचा आहे. त्यामुळे गुप्त मतदानाचा प्रश्नच उद्भवत नाही.'

०००

(मूळ कॉपी)

सहकार न्यायालयाच्या आदेशावरुन दोन्ही गटाचे दावे

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ (गोकुळ) सभेत मल्टिस्टेटच्या ठराव मंजुरीसाठी आवाजी की गुप्त मतदान पद्धतीने घेण्याच्या सहकार न्यायालयाने सत्ताधारी व विरोधकांनी दावे केले. त्यामुळे दूध उत्पादकांत गोंधळ उडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गोकुळ बचाव कृती समितीने कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सहकार न्यायालयाने निकाल दिला असून बचाव समितीच्या याचिका फेटाळल्या आहेत. या संदर्भात गोकुळ बचाव कृती समितीचे वकील अॅड प्रबोध पाटील यांनी निकालाबाबत माहिती दिली. ते म्हणाले, सहकार कायद्यातील नियम ६० मधील तरतुदीचे पालन करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. कलम ६०(४) नुसार एकाद्या विषयावर एकमत न झालेस एकाद्या सभासदाने गुप्त मतदानाची मागणी केली तरी ते अध्यक्षांना बंधनकारक राहणार आहे. पण निर्णय गुप्त मतदान पद्धतीने अथवा हात वर करुन घ्यायचे हे अधिकार सभा अध्यक्षांना नियम ६०(५) ने दिले आहेत. गोकुळ सभासदांची संख्या ३६५९ इतकी असल्याने हात वरुन करुन निर्णय घेणे किचकट ठरणार आहे. तसेच निर्णय प्रक्रिया पारदर्शी होण्यासाठी एका सभासदांने गुप्त मतदान पद्धतीने निर्णय घेणे हिताचे ठरणार आहे. गुप्त मतदान घेण्याचे नियम ६०(६) घेण्याची तरतूद आहे. नियम ६० चे पालन करण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याने गुप्त मतदान पद्धतीने घ्यावी लागणार आहे.

गोकुळकडून काम पाहणारे अॅड लुईस शहा म्हणाले, न्यायालयाने मल्टिस्टेटचा निर्णय घेण्याचा अधिकार सभेच्या अध्यक्षांचा असल्याचे स्पष्ट केले आहे. विरोधकांचा गुप्त पद्धतीने मतदान घेण्याचा आदेश कोर्टाने स्पष्टपणे नाकारला आहे. ठराव आवाजी मताने घ्यायचा की आवाजी मताने घ्यायचा हा अधिकार सभा अध्यक्षांचा आहे. गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील विरोधकांकडून कोर्टाच्या आदेशाबाबत दूध उत्पादकांच्यात दिशाभूल व संभ्रम करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


डायरी....

$
0
0

मेळावा : पॉवर टिलर्स मेकॅनिक्स कामगार संघातर्फे राज्यस्तरीय कामगार मेळावा, स्थळ : जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटी सभागृह साइक्स एक्स्टेंशन, वेळ : सकाळी १० वा.

अभियान : एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत राष्ट्रीय पोषण अभियानचे उद्घाटन, हस्ते : महिला बालकल्याण समिती सभापती वंदना मगदूम, स्थळ : अशोकानंद हॉल, परिते वेळ : दुपारी २ वा.

शिबिर : योगप्रवीण विठ्ठल तांदळे यांच्या मार्गदर्शनाखाली योगासन प्राणायम ध्यान शिबिर, स्थळ : प्रभातीर्थ अपार्टमेंट ताराबाई रोड तटाकडील तालीम मंडळ, वेळ : सायं. ६ वा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दीड वर्षात ५७३२ जणांना श्वानदंश

$
0
0

लोगो - रेबीज डे विशेष

sachin.patil1@timesgroup.com

Tweet@sachinpMT

कोल्हापूर : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात श्वानदंशाच्या प्रकारांत वाढ झाली आहे. जिल्ह्यासह शहरातील गल्ली, रस्त्यांवर आढळणाऱ्या भटक्या कुत्र्यांकडून नागरिकांना होणाऱ्या श्वानदंशाचे प्रमाण अधिक आहे. चालू वर्षात १५६० जणांना श्वानदंश झाल्याची नोंद छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयात(सीपीआर) झाली आहे. तर रेबीजची लागण झाल्याने पाच वर्षात १७ जणांना प्राण गमवावे लागले आहेत. रेबीजग्रस्त रुग्णांमध्ये कुत्रा चावल्याने बाधा झालेल्यांची संख्या ९५ टक्क्यांहून अधिक आहे. गेल्या पाच वर्षांत हे प्रमाण सातत्याने वाढत आहे.

शहर- जिल्ह्यात वाढत्या अस्वच्छतेमुळे भटक्या कुत्र्यांचे प्रमाण अधिक आहे. त्याला पायबंद घालण्यात प्रशासन कमी पडल्याने श्वानदंशाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच मांजर, घोडा, माकड, ससा या प्राण्यांपासून दंशाचे प्रमाणही अधिक आहे. वेळेत उपचार न घेतल्यास रेबीजसारख्या घातक व जीवघेण्या रोगाची लागण झाल्याने मृत्यूमुखी पडणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत असल्याचे आढळून आले आहे. श्वान किंवा इतर प्राण्यांचा दंश झाल्यानंतर त्याकडे दुर्लक्ष करण्याची प्रवृत्ती वाढत असल्याने जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. रेबीज हा रोग घातक असला तरी प्रतिबंधात्मक काळजी घेतल्यास त्यावर मात करणे सहज शक्य आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होते.

काय आहे रेबीज

कुत्रा, मांजर, माकड, घोडा, ससा यांसह इतर काही रेबीज विषाणूग्रस्त प्राण्यांनी दंश केल्यास त्यांच्या लाळेमधून विषाणू मानवाच्या शरीरात प्रवेश करतात. त्याचा मेंदूवर परिणाम होऊन मानवाच्या जीवाला धोका निर्माण होतो. जखम आणि मेंदूचे अंतर यावर त्याची तीव्रता अवलंबून असते. हात, पाय, चेहरा, डोक्याचा भाग याठिकाणी झालेला दंश अधिक धोकादायक मानला जातो. रेबीजची लागण झाल्यानंतर लक्षणे व्यक्तिपरत्वे तीव्रतेनुसार जाणवतात. साधारणपणे २० ते ३० दिवसांत लक्षणे जाणवतात. कधीकधी लक्षणांचा कालावधी वर्षापेक्षा अधिक वाढू शकतो.

लक्षणे

रेबिजग्रस्त रुग्णांत ताप, तीव्र डोकेदुखी, पायात कमजोरी, जखमेची खाज व आग होणे अशी प्राथमिक लक्षणे आढळतात. रेबीजमुळे पक्षाघात व हृदयावरदेखील विपरीत परिणाम होतो. तसेच उलट्या झाल्यासारखे वाटणे, विषाणू मेंदूपर्यंत पोहोचल्यास झटके येणे, निद्रानाश होणे, घशात त्रास, मानसिक आभास होणे, आवाजात बदल अशीही लक्षणे आढळतात.

श्वानदंश झाल्यास

कुत्रा किंवा कोणताही प्राणी चावल्यास जखम स्वच्छ पाण्याने साबणाचा वापर करून धुवावी. त्यामुळे लागण होण्याचा धोका कमी होतो. तसेच जखम झाकू नये ती उघडी ठेवावी. जखम हाताळून झाल्यास वेळोवेळी हात स्वच्छ धुवावेत. तसेच लगेच प्रतिबंधात्मक अँटीरेबीज लस व सिरम जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातून घ्यावी. लसीचे चार डोस पूर्ण करावेत. मध्येच उपचार बंद केल्यास जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. तसेच गावठी उपचार घेऊ नयेत. काहीवेळा जखमेवर चुना तंबाखू लावण्याचे प्रकार घडतात ते टाळावे.

कुत्रा पाळत असाल तर

घरी कुत्रा पाळला असल्यास त्याला दर सहा महिन्यांनी रेबीजची लस द्यावी. तसेच त्याला भटक्या कुत्र्यांच्या संपर्कात येऊ देऊ नये. गरज भासल्यास तत्काळ पशूवैद्यकीय तज्ज्ञांशी संपर्क करावा.

सीपीआरला लसीचा तुटवडा

श्वान व इतर प्राण्यांच्या दंशात वाढ झाल्याने दररोज जिल्ह्यातून तसेच जिल्ह्याबाहेरुनही लोक उपचारासाठी सीपीआरमध्ये येतात. गेल्या वर्षभरापासून लसींचा तुटवडा जाणवत आहे. हाफकिन या संस्थेकडून लशीचा पुरवठा केला जातो. खाजगी रुग्णालयांत लस महाग असल्याने नागरिक सीपीआरला प्राधान्य देत असतात.

श्वान किंवा इतर प्राण्यांचा दंश झाल्यास जखम तत्काळ स्वच्छ पाण्याने धुवावी. तसेच लगेच लसीकरण करून घ्यावे. अनेकदा चार डोस पूर्णपणे न घेतल्याने रेबीजची लागण झाल्याचे रुग्ण आढळले आहेत. गावठी, अघोरी उपचार न करता सरकारी रुग्णालयांत जाऊन लस घेण्यास प्राधान्य द्यावे.

- डॉ. मोहन राऊत, सीपीआर

आकडेवारी (सीपीआर)

सन श्वान दंश इतर प्राणी दंश

२०१५ २४९९ २४८

२०१६ ३१९५ २७३

२०१७ ४१७२ ४६१

२०१८ १५६० १४०

००००

(मूळ कॉपी)

sachin.patil1@timesgroup.com

Tweet@sachinpMT

कोल्हापूर : येथील छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयात(सीपीआर) गेल्या पाच वर्षात श्वानदंशात लक्षणीयरीत्या वाढ झाली आहे. जिल्ह्यासह शहरातील गल्ली, रस्त्यांवर आढळणाऱ्या भटक्या कुत्र्यांकडून नागरिकांना होणाऱ्या श्वानदंशाचे प्रमाण अधिक आहे. चालू वर्षात १५६० जणांना श्वानदंश झाल्याची नोंद सीपीआरमध्ये झाली आहे. तर रेबीजची लागण झाल्याने पाच वर्षात १७ जणांना प्राण गमवावे लागले आहेत. रेबीजग्रस्त रुग्णांमध्ये कुत्रा चावल्याने बाधा झालेल्यांची संख्या ९५ टक्क्यांहून अधिक आहे.

शहरातील वाढत्या अस्वच्छतेमुळे भटक्या कुत्र्यांचे प्रमाण अधिक आहे. त्याला पायबंद घालण्यात प्रशासन कमी पडल्याने श्वानदंशाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच मांजर, घोडा, माकड, ससा या प्राण्यांच्या दंशाचे प्रमाण अधिक आहे.वेळेत उपचार न घेतल्याने रेबीजसारख्या घातक व जीवघेण्या रोगाची लागण झाल्याने मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत असल्याचे आढळून आले आहे. श्वान किंवा इतर प्राण्यांचा दंश झाल्यानंतर त्याकडे दुर्लक्ष करण्याची प्रवृत्ती वाढत असल्याने जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. रेबीज हा रोग घातक असला तरी प्रतिबंधात्मक काळजी घेतल्यास त्यावर मात करणे सहज शक्य आहे.

काय आहे रेबीज

कुत्रा, मांजर, माकड, घोडा, ससा इतर काही रेबीज विषाणूग्रस्त प्राण्यांनी दंश केल्यास त्यांच्या लाळेमधून विषाणू मानवाच्या शरीरात प्रवेश करतात. त्याचा मेंदूवर परिणाम होऊन मानवाच्या जीवाला धोका निर्माण होतो. जखम आणि मेंदूचे अंतर यावर त्याची तीव्रता अवलंबून असते. हात, पाय, चेहरा, डोक्याचा भाग याठिकाणी झालेला दंश अधिक धोकादायक मानला जातो. रेबीजची लागण झाल्यानंतर लक्षणे व्यक्तिपरत्वे तसेच तीव्रतेनुसार जाणवतात. साधारणपणे २० ते ३० दिवसात लक्षणे जाणवतात. कधीकधी लक्षणाचा कालावधी वर्षापेक्षा अधिक वाढू शकतो.

लक्षणे

रेबिजग्रस्त रुग्णांत ताप, तीव्र डोकेदुखी, पायात कमजोरी, जखमेची खाज व आग होणे अशी प्राथमिक लक्षणे आढळतात. रेबीजमुळे पक्षाघात व हृदयावर देखील विपरीत परिणाम होतो. तसेच उलट्या झाल्यासारखे वाटणे, विषाणू मेंदूपर्यंत पोहोचल्यास झटके येणे, निद्रानाश होणे, घशात त्रास,मानसिक आभास होणे, आवाजात बदल अशीही लक्षणे आढळतात.

श्वानदंश झाल्यास

कुत्रा किंवा कोणताही प्राणी चावल्यास जखम स्वच्छ पाण्याने साबणाचा वापर करून धुवावी. त्यामुळे लागण होण्याचा धोका कमी होतो. तसेच जखम झाकू नये ती उघडी ठेवावी. जखम हाताळून झाल्यास वेळोवेळी हात स्वच्छ धुवावेत. तसेच लगेच प्रतिबंधात्मक अँटी रेबीज लस व सिरम जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातून घ्यावी. लसीचे चार डोस पूर्ण करावेत. मध्येच उपचार बंद केल्यास जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. तसेच गावठी उपचार घेऊ नयेत. काहीवेळा जखमेवर चुना तंबाखू लावण्याचे प्रकार घडतात ते टाळावे.

पाळीव कुत्रा पाळत असाल तर

घरी कुत्रा पाळला असल्यास त्याला दर सहा महिन्यांनी त्याला रेबीजची लस द्यावी. तसेच त्या कुत्र्याला भटक्या कुत्र्यांच्या संपर्कात येऊ देऊ नये. गरज भासल्यास तत्काळ पशुवैद्य तज्ञांशी संपर्क करावा.

सीपीआरला लसीचा तुटवडा

श्वान व इतर प्राण्यांच्या दंशात वाढ झाल्याने दररोज जिल्ह्यातून तसेच जिल्ह्याबाहेरूनही लोक उपचारासाठी सीपीआरमध्ये येतात. गेल्या वर्षभरापासून लसींचा तुटवडा जाणवत आहे. हाफकिन संस्थेकडून लसपुरवठा केला जातो. खाजगी रुग्णालयात लस महाग असल्याने नागरिक सीपीआरला प्राधान्य देत असतात.

0000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000

आकडेवारी (सीपीआर)

सन श्वान दंश इतर प्राणी दंश

२०१५ २४९९ २४८

२०१६ ३१९५ २७३

२०१७ ४१७२ ४६१

२०१८ १५६० १४०

00000000000000000000000000000000000000000000000000000000००००

कोट:

श्वान किंवा इतर प्राण्यांचा दंश झाल्यास तत्काळ जखम स्वच्छ पाण्याने धुवावी. तसेच लगेच लसीकरण करून घ्यावे. अनेकदा चार डोस पूर्णपणे न घेतल्याने रेबीजची लागण झाल्याचे रुग्ण आढळले आहेत. गावठी, अघोरी उपचार न करता सरकारी रुग्णालयात जाऊन लस घेण्यास प्राधान्य द्यावे.

डॉ. मोहन राऊत, सीपीआर

कोट फोटो

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सक्तीच्या रजेबाबत आज निर्णय

$
0
0

कोल्हापूर

जिल्हा परिषदेतील माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय गुरुवारी होण्याची शक्यता आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल हे बुधवारी कार्यालयीन कामासाठी पुण्याला गेले होते. त्यामुळे लोहार यांच्या कारवाईवरील प्रस्तावावर स्वाक्षरी होवू शकली नाही. शिवाय लोहार यांच्या चौकशीसाठी नेमलेल्या समिती सदस्यांनाही नियुक्तीची पत्रे गुरुवारीच उपलब्ध होण्याची चिन्हे आहेत. लोहार यांच्या चौकशीसाठी पाच सदस्यीय समिती नेमली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

PM नरेंद्र मोदींचे कार्पोरेट करप्शनः अॅड. आंबेडकर

$
0
0

सोलापूर

काँग्रेसवाले कोणतेही आढेवेढे न घेता सरळ-सरळ खायचे. परंतु, नरेंद्र मोदी हे आधी दुसऱ्याला खाऊ घालतात मग स्वतः खातात, आणि त्यानंतर माझे हात बरबटलेले नाहीत, असं सांगून आपण स्वच्छ व प्रामाणिक आहोत, असा डांगोरा पिटतात, त्यामुळे नरेंद्र मोदींचे कॉर्पोरेट करप्शन आहे, असा घणाघाती आरोप भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आज सोलापुरात केला. वंचित बहुजन आघाडीच्यावतीने सोलापुरातील इंदिरा गांधी स्टेडियमवर झालेल्या विराट महासभेत आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.

'गली गली मे शोर है, पंतप्रधान मोदी चोर है' हा २०१९ च्या निवडणुकीत नवीन नारा असणार आहे, असे सांगत लोकसभा निवडणुकीत मोदींवरील भ्रष्टाचाराचा आरोप लावून धरणार असल्याचे आंबेडकर यांनी सुतोवाच केले. मराठा आरक्षण मोर्चामुळे मराठा-ओबीसी , मराठा-शेडूल्ड काष्ट , मराठा-आदिवासी यांच्यात भांडणे लावण्यात आली. मागासलेला या शब्दाची जोपर्यंत व्याख्या केली जात नाही, सामाजिक, आर्थिक आणि मागासलेपणाची तपासणी होत नाही आणि त्यामध्ये ही व्याख्या येणार असेल तर मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यास मदत होईल. आरक्षणाचा प्रश्न सोडवायचा असेल तर सुप्रीम कोर्टाने टाकलेली ५० टक्क्यांची अट समाजाचे स्वास्थ्य, कायदा, सुव्यवस्था टिकविण्यासाठी ७० टक्य्यांवर घेऊन गेले पाहिजे आणि हे फक्त सुप्रीम कोर्टच करू शकते, असेही आंबेडकर यांनी सांगितले.

७१२ कोटींच्या राफेल विमानाचा करार २०१४ मध्ये फ्रान्समध्ये होतो आणि त्यानंतर त्याच विमानासाठी १६०० कोटींचा करार होतो. यावरून नरेंद्र मोदींनी रिलायन्स कंपनीला घास भरविल्याचे स्पष्ट होते. राफेल विमानाची देखभाल दुरुस्ती आणि ते वापरण्याच्या स्थितीत ठेवण्यासाठी दरवर्षी १ लाख कोटींचा खर्च होणार असून १ लाख कोटी अंबानी यांच्या डिफेन्स कंपनीला जाणार आहेत. मुळातच डिफेन्सचे बजेट अडीच ते तीन लाख कोटींचे असताना त्यातील एक लाख कोटी रिलायन्सला दिल्यानंतर शिल्लक काय राहणार? यावरूनच राफेल विमानाची देखभाल कोण करणार ? असा प्रश्नही प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सभा खेळीमेळीत

$
0
0

कोल्हापूर: जिल्हा बेकर्स ग्राहक सहकारी संस्थेची ५३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पार पडली. महमंद रहिमान शेख यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. मोतिराम होलाराम नरसिंगानी यांनी अहवाल वाचन केले. सभासदांना नऊ टक्के लाभांश जाहीर करण्यात आला. याप्रसंगी ६५ वर्षावरील व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. आनंदराव पायमल यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली. रामचंद्र बोडके यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images