Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

नेत्यांना व्यासपीठावर स्थान मिळणार का?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळच्या सर्वसाधारण सभेत मल्टिस्टेटला विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. या सभेला सत्तारुढ गटाचे नेते, माजी आमदार महादेवराव महाडिक, पी. एन. पाटील, खासदार धनंजय महाडिक यांच्यासह विरोधी गटाचे प्रमुख, आमदार सतेज पाटील, हसन मुश्रीफ, चंद्रदीप नरके काही नेते उपस्थित राहण्याची घोषणा केली आहे. सर्वसाधारण सभेस उपस्थित नेत्यांना स्टेजवर स्थान मिळणार की सभासदांमध्ये बसावे लागणार याची उत्सुकता आहे.

गोकुळची सर्वसाधारण सभा रविवारी (ता. ३० सप्टेंबर) ताराबाई पार्कातील गोकुळच्या कार्यालयात होणार आहे. मल्टिस्टेटच्या निर्णयावरुन सभा वादळी होण्याची चिन्हे आहेत. मल्टिस्टेटचा निर्णय राजकीय कारणावरून घेतला असून या निर्णयामुळे जिल्ह्यातील दूध उत्पादक व दूध संस्थांच्या स्वाभिमानाला ठेच पोचणार आहे, असा टीका आमदार पाटील यांनी सुरु केली असून जिल्ह्यात दूध संस्थांमध्ये जनजागृती सुरू केली आहे. सत्ताधारी माजी आमदार महादेवराव महाडिक, पी. एन. पाटील यांनी संघाचे दूध संकलन २० लाख लिटरवर पोहोचविण्यासाठी मल्टिस्टेटचा निर्णय महत्त्वाचा आहे. हा दूध उत्पादकांच्या हिताचा निर्णय असून त्यामुळे उत्पादकांना फायदा होणार आहे, असा दावा केला आहे. तर विरोधकांनी त्यावर आरोपाच्या फैरी झाडल्या आहेत.

मल्टिस्टेटला विरोध करण्यासाठी सभेला आमदार पाटील, मुश्रीफ, नरके, माजी आमदार पवार यांनी उपस्थित राहण्याची घोषणा केली आहे. तर सत्ताधारी पक्षाकडून माजी आमदार महाडिक, पी. एन. पाटील यांनी मल्टिस्टेटला पाठिंबा देण्यासाठी सभेस उपस्थित राहणार आहेत. खासदार धनंजय महाडिकही मल्टिस्टेटच्या बाजूने पाठिंबा देण्यासाठी सभेला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. सभेला उपस्थित राहण्यासाठी नेते मंडळींना दूध संस्थांचा ठराव असणे बंधनकारक आहे. प्रत्येक नेत्यांनी ठरावाची व्यवस्थाही केली आहे. सभेवेळी व्यासपीठावर गोकुळचे अध्यक्ष विश्वासराव पाटील, कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर यांच्यासह संचालक उपस्थित राहतील. गेल्यावर्षीच्या सभेत व्यासपीठावर माजी आमदार महाडिक प्रमुख उपस्थित होते. गेल्यावेळच्या सभेत महाडिक यांनी अध्यक्ष विश्वासराव पाटील यांच्याऐवजी स्वत:च माइकचा ताबा घेऊन सर्वसाधारण सभेतील सर्व विषय मंजूरीची घोषणा केली होती.

मात्र, सर्वसाधारण सभेच्या व्यासपीठावर बसण्याचा अधिकार अध्यक्ष, कार्यकारी संचालकासह संचालकांचा असतो. आमदार, खासदार, माजी आमदार, माजी संचालक हे दूध संस्थाचे प्रतिनिधी म्हणून सभेला उपस्थित राहणार असले तरी त्यांनी सभासदांसाठीच्या राखीव जागेत बसण्याचा नियम आहे. मात्र सभेचे अध्यक्ष स्टेजवर कोणी बसायचे? हा निर्णय घेतात. खासदार, आमदार, माजी आमदार, माजी संचालकांना आमंत्रित करून व्यासपीठावर सन्मानाने बोलाविण्याचा निर्णय अध्यक्ष घेऊ शकतात. त्यामुळे सत्ताधारी आघाडीचे नेते व्यासपीठावर बसतील अशी शक्यता आहे. विरोधी आघाडीबाबत सभाध्यक्ष कोणता निर्णय घेतील याकडे दूध उत्पादकांचे लक्ष लागले आहे.

३६५९

सभेला उपस्थित राहणारे सभासद

१८

संचालक

कार्यकारी संचालक

आमदार

माजी आमदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जिल्ह्यात १५००० मतदारांची वाढ

$
0
0

मतदार नोंदणी मोहीम, ऑक्टोबरअखेर चालणार प्रक्रिया

Bhimgonda.Desai@timesgroup.com

Tweet : @bhimgondaMT

कोल्हापूर

येथील जिल्हा निवडणूक यंत्रणेतर्फे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी शुध्दीकरण मोहीम राबवली जात आहे. यात आतापर्यंत जिल्ह्यात १५ हजार ३५९ मतदारांची नव्याने भर पडली आहे. कोल्हापूर दक्षिण आणि शिरोळ विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदारांची वाढ झाली आहे. ऑक्टोबरअखेर मोहीम चालणार असल्याने यामध्ये आणखी भर पडणार आहे.

निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदार यादी शुध्दीकरणाचे काम केले जात आहे. दुसऱ्या टप्प्यातील ही मोहीम १ सप्टेंबरपासून सुरू आहे. ऑक्टोबरअखेरपर्यंतच्या मोहिमेत प्रामुख्याने १८ वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक मतदाराच्या नावाचा सामावेश यादीत करणे, दुबार, मयत मतदाराचे नाव वगळणे, नावात व इतर दुरूस्ती करण्याची प्रक्रिया व्यापकपणे केली जात आहे. निवडणूक प्रशासन जागृतीच्या माध्यमातून यादीत त्रुटी राहू नये, यासाठी प्रयत्न करीत आहे.

नविन मतदार नोंदणीसाठी कनिष्ठ, वरिष्ठ महाविद्यालयात मतदार जागृती क्लब कार्यरत आहेत. यामुळे इचलकरंजी वगळता सर्वच विधानसभा मतदारसंघात नव्याने मतदार नोंदणी चांगली राहिली. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात नव्याने केवळ ७३ पुरूष आणि ५९ महिला मतदारांची नोंद झाली आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील आतापर्यंतच्या मोहिमेत एकूण १५ हजार ३५९ मतदारांची नव्याने भर पडली आहे. त्यात महिला मतदारांची ८ हजार ३१४ इतकी मतदार संख्या आहे. यावरून पुढील निवडणुकीत महिला, युवक मतदारांची मते महत्वाची ठरणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. काही प्रमुख पक्षांचे कार्यकर्तेही मतदार नोंदणीच्या मोहिमेत सक्रिय आहेत. मतदार यादी परिपूर्ण होण्यासाठी विद्यमान आमदार, खासदार, वेगवेगळ्या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची व्यापक बैठक होणार आहे. मोहीम पूर्ण झाल्यानंतर अंतिम मतदारयादी प्रसिध्द करण्यात येणार आहे.

-----------

सर्वाधिक मतदार शिरोळ मतदारसंघात

मतदारसंघनिहाय वाढलेले मतदार, कंसात महिलांची संख्या अशी : कोल्हापूर दक्षिण : १२३१ (१३२७), कोल्हापूर उत्तर : ९६१ (८५४), चंदगड : ६३५ (८३८), राधानगरी : ७१४ (८८२), कागल : ४५३ (६७९), करवीर : ६१६ (८४५), शाहूवाडी : ५९१ (६४७), हातकणंगले : ४३८ (५२७), इचलकरंजी ५३ (७३), शिरोळ : १३३३ (१६५६).

-------------

ऑनलाईनही नोंदणी

इच्छुकांना घरबसल्याही इंटरनेटवरून www.nusp.in या वेबसाइटवर मतदार नोंदणी करता येते. याशिवाय निवडणूक कर्मचारी गाव पातळीवरही नविन नावाचा सामावेश करणे, मयत, दुबार नावे वगळण्यासाठी आवाहन करीत आहेत. दिव्यांगांची यादी उपलब्ध करून त्यांच्या घरापर्यंत जाऊन यादीत नाव सामावेश करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

--------------

जिल्ह्याची लोकसंख्या

३८,७६,००१

आतापर्यंत नोंदणी झालेले मतदार

२९,६५,३१४

---------------

कोट

'जिल्हा निवडणूक यंत्रणेतर्फे दुसऱ्या टप्प्यातील मतदार यादी शुध्दीकरणाचे काम व्यापकपणे केले जात आहे. ऑक्टोबरअखेर चालणारी ही मोहीम शेवटची असेल. अंतिम मतदार यादी डिसेंबरअखेरपर्यंत प्रसिध्द होणार आहे. त्यापूर्वीच ज्याचे नावे मतदार यादीत नाही, त्यांनी निवडणूक यंत्रणेशी संपर्क साधावा. नाव यादीत असल्याची खात्री करून घेणे आवश्यक आहे.

स्नेहल भोसले, उपजिल्हाधिकारी, निवडणूक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षणाधिकारी लोहार यांच्या चौकशीसाठी समिती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्या कामकाजाची चौकशी करण्यात येणार असून, त्यासाठी पाच सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली. शिक्षण समिती सभापती अंबरिश घाटगे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमली आहे. या समितीने तीन महिन्यांत चौकशी करुन स्थायी समितीला अहवाल सादर करायचा आहे.

शिक्षणाधिकारी लोहार यांच्या कारभारावरुन जिल्हा परिषदेची सर्वसाधारण गाजली होती. सदस्यांनी सर्वसाधारण सभेत त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. तसेच सक्तीच्या रजेवर पाठविण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली होती. जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी मंगळवारी चौकशी समितीची स्थापना केली. शिक्षण समिती सभापती अंबरिश घाटगे, सत्तारुढ आघाडीचे सदस्य अरुण इंगवले, प्रसाद खोबरे, विरोधी आघाडीचे सदस्य भगवान पाटील आणि सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ यांचा समितीत समावेश आहे.

शिक्षणाधिकारी लोहार यांच्यासह माध्यमिक विभागाच्या कार्यालयातील शिपायापासून अधिकाऱ्यांपर्यंत सगळ्यांची चौकशी होणार आहे. दरम्यान, चौकशी समितीत वर्णी लावण्यासाठी गेले दोन दिवस पडद्याआड खेळी झाल्या. मंगळवारी दिवसभरही याप्रकरणी हालचाली सुरू होत्या. परिणामी चौकशी समितीची स्थापण्याची प्रक्रिया सायंकाळपर्यंत सुरु होती

.. .. ..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महानगरपालिका आयुक्तांना नोटीस

$
0
0

पंचगंगा नदी प्रदूषणप्रश्नी सात दिवसात खुलासा करण्याचा आदेश

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरातील सांडपाणी जयंती नाल्यातून थेट पंचगंगा नदीत मिसळत आहे. या पाण्यावर प्रक्रिया करण्यात महानगरपालिका अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत प्रदूषण नियंत्रण मंडळाने मंगळवारी आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांना कारणे दाखवा नोटीस दिली. सात दिवसात खुलासा करण्याचा आदेशही देण्यात आला आहे.

शहरातील सर्वच नाल्यांतून सांडपाणी विनाप्रक्रिया पंचगंगेत जात आहे. सर्वाधिक सांडपाणी जयंती नाल्यातून जात आहे. नाल्यातील पाणी अडविण्यासाठी बरगे बसवण्यात आले आहेत. मात्र बरग्यावरून ओव्हरफ्लो होऊन सांडपाणी नदीत जात आहे. परिणामी नदी प्रदूषित होत असल्याची तक्रार प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केली. त्याची त्वरित दखल घेऊन 'प्रदूषण'च्या प्रशासनाने जाग्यावर जाऊन पाहणी केली. पाहणीतही अधिकाऱ्यांना जयंती नाल्यातून सांडपाणी विनाप्रक्रिया पंचगंगा नदीत मिसळत असल्याचे निदर्शनास आले. यामुळे 'प्रदूषण'चे प्रादेशिक अधिकारी नागेश लोहळकर यांनी आयुक्त डॉ. चौधरी यांना नोटीस काढली. अनेक वेळा संधी दिली, कारवाई केली तरी महानगरपालिकेस नदी प्रदूषण थांबवता आले नाही. प्रदूषण रोखण्यासाठी पुरेशा प्रमाणात यंत्रणा बसविण्यात आलेली नाही. यामुळे आपल्याविरूध्द कायदेशीर कारवाई का करण्यात येऊ नये, यासंबंधित खुलासा सात दिवसात करावा, असे नोटीसीमध्ये म्हटले आहे.

----------------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुश्रीफांचे राजकारण संपणार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कसबा बावडा

'जिल्हा बँकेतील विम्याचे काम स्वत:च्या मुलाला देऊन आमदार हसन मुश्रीफ यांनी कोट्यवधी मिळवले,' असा आरोप माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी पत्रकार बैठकीत केला.' गैबीशेजारी तुम्ही राहता म्हणून भाकित कराल ते सत्य होईल, असे नाही. तुम्ही तुमची कुंडली पाहून ठेवा. आगामी राजकारणातील पटलावर तुमचे नाव असणार नाही', असा इशाराही त्यांनी दिला.

जिल्हा बँकेचे टेंडर मिळाल्यानंतर हैदराबाद आणि दुबईला एका कंपनीने आयोजित केलेल्या सहलीत जिल्हा बँकेच्या संचालकांनी धिंगाणा घातल्याचा सनसनाटी आरोप महाडिक यांनी केला. दरम्यान, मुश्रीफ व आमदार सतेज पाटील यांचे गोकुळमध्ये योगदान काय, असा सवाल करत दोघांनी आपण पापाच्या किती डबऱ्यात आहोत हे पाहून मग महाडिक कुटुंबीयांना शाप द्यावा, असा पलटवारही केला.

मुश्रीफ व पाटील या दोन्ही नेत्यांचे गोकुळ दूध संघासाठी योगदान काय असा सवाल करत ते म्हणाले, 'या दोघांचे संचालक असताना त्यांच्या गाड्या चालत होत्या, मग आता गाड्या का नकोत? हा कुठला न्याय? दूध उत्पादकांचे साडेसहा कोटी देणे असणारा महालक्ष्मी संघ या दोघांनी चालवायला घेऊन दाखवावा. मुश्रीफ साहेब, तुम्ही आगामी निवडणुकीत पराभूत होणार, हे सर्वसामान्य माणसाचे भाकीत आहे. केडीसीसी बँकेचे टेंडर दिल्यावर त्या कंपनीने दुबईची सहल आयोजित केली होती. तेथील बारमध्ये काय झाले ते मी सांगू इच्छित नाही. हैदराबादमधील इब्राहिम नावाच्या माणसाला जिल्हा बँकेच्या एटीएमचे टेंडर दिले. त्याच्या पाहणीसाठी हैदराबादला गेल्यावर तेथील बारमध्ये काय धिंगाणा घातला, याचा तपशील देत नाही. मुलाला विम्याची एजन्सी घेऊन मुश्रीफांनी एमआयडीसीत दादागिरी करत अनेकांचे विमा उतरवले. त्यातून कोट्यवधी मिळण्याची व्यवस्था केली. त्यांच्याकडून सामान्य माणसाचे काय भले होणार?'

'मुश्रीफांच्या तोंडातून बाहेर पडणारा प्रत्येक शब्द विषारी फुत्कार आहे. ते खोटारडे आहेत. त्यांना बँकेचे पहिल्यांदा चेअरमन केले त्यावेळी महाडिकांनी सांगितलेल्या शब्दांत काना-मात्रा-वेलांटी बदलणार नाही, अडीच वर्षांनी 'पीएन' यांना चेअरमन करणार असे सांगितले. मात्र ते पार विसरून गेले', असे महाडिक यांनी स्पष्ट केले.

...........................

'त्या' दोघांना मारले

'जिल्हा बँकेत सात वर्षांपूर्वी झालेल्या अपहाराचे प्रकरण अद्याप संपलेले नाही. त्याला न्यायालयात स्थगिती आहे, म्हणून मुश्रीफांना जीवदान मिळाले आहे. या प्रकरणातील दोघांनी विष घेतले. त्यांचा त्यात मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू नव्हे, तर त्यांना मारण्यात आले. त्यांच्या घरातील लोकांनीच मला हे सांगितले. त्यामुळे गोरगरिबांचा शाप त्यांना नक्की लागणार,' असे महाडिक म्हणाले.

.............

एका व्यासपीठावर या ...

महाडिक यांनी गोकुळ मल्टिस्टेट करण्याबाबतची खुली चर्चा करण्यासाठी एका व्यासपीठावर येण्याचे आव्हान दोन्ही नेत्यांना दिले. या व्यासपीठावर फक्त तीन वक्ते म्हणजेच महाडिक, मुश्रीफ आणि सतेज पाटील असतील, अशी पुस्तीही जोडली. ते म्हणाले, 'कोल्हापूर, सांगली ते सोलापूरपर्यंत आणि सीमाभागातील म्हशीचे दूध भौगोलिक वातावरणामुळे चांगले आहे. गोकुळ सध्या मध्य प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकातून दोन लाख लिटर दूध घेतो. गोकुळला हक्काच्या दुधासाठी मल्टिस्टेट करणे आवश्यक आहे. अमूल गुजरातसह देशभरातून दूध संकलन करतो. मग गोकुळने का करू नये? गोकुळच्या म्हशीच्या दुधाला महाराष्ट्रसह अन्य राज्यात मागणी आहे. पण मागणीप्रमाणे पुरवठा करू शकत नाही. सध्या ७ ते ८ लाख दुधाची गरज आहे. भविष्यात ५० लाख लिटर दूध संकलन झाले पाहिजे.'

...............

महाडिकांचे 'गोकुळ' मध्ये ४० टँकर

विरोधकांनी, टँकरचे दहा वर्षांत ३१० कोटी रुपये भाडे दिले, असा आरोप केला आहे. याबाबत बोलताना महाडिक यांनी 'गोकुळ'मध्ये एकूण २०० टँकर आहेत. त्यातील महाडिक यांचे ४० टँकर आहेत, असे स्पष्ट केले.

......................

महाडिक म्हणाले...

माफी जनतेची मागू, 'त्यांची' नव्हे

दोन्ही नेत्यांनी जिल्ह्याला लुटले

महाडिक रडीचा डाव खेळत नाही.

दूध वाढवण्यासाठीच मल्टिस्टेटचा ठराव

डी. वाय. पाटील बँक फसवून ताब्यात घेतली

'दोघांनी' कुणाला कधी मोठे होऊ दिले नाही

.. .. .. ..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजकीय घटका भरल्याने महाडिकांचा तोल सुटला

$
0
0

आमदार सतेज पाटील यांचा पलटवार

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

' खोटं बोल पण रेटून बोल हा माजी आमदार महादेराव महाडिक यांचा स्वभाव आहे. स्वत:चा व्यवसाय वाचविण्यासाठी कोणाच्याही, कुठेही पाया पडण्याची आणि दिवसाला १०० वेळा शब्द बदलण्याची त्यांची निती कोल्हापूरकरांना माहित आहे. महाडिक यांची राजकीय जीवनातील घटका भरली असून याची त्यांना जाणीव झाल्यानेच त्यांचा तोल सुटला आहे', असा आरोप आमदार सतेज पाटील यांनी केला . आयआरबी, थेट पाईपलाईन, वॉटर पार्क तसेच शेती महामंडळ जमीन याबाबत माझ्यावर केलेले आरोप महाडिकांनी पुराव्यानिशी सिध्द करावेत, असे आव्हान आमदार पाटील यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकातून केले.

पत्रकात असे म्हटले आहे , कावळा नाक्यावर रॉकेल-पेट्रोलचा व्यवसाय करणारे महाडिक करोडपती कसे झाले हे जनेतला माहित आहे. गोकुळमधील लोणी व मलई लाटून गब्बर झालेल्या महाडिकानी गोकुळला स्वत:च्या व्यवसायाचे स्वरुप दिले. त्यांची प्रगती ही पेट्रोल भेसळ आणि गोकुळमधील मलईवर झाली आहे. गोकुळ हाच त्यांचा मुख्य व्यवसाय असल्यानेच त्यांचा जीव गोकुळमध्ये अडकला आहे. गोकुळ मल्टिस्टेट विरोधात केलेल्या लढ्याला दूध उत्पादकांचा मिळणारा प्रतिसाद पाहून महाडिक सैरभैर झाले आहेत. मल्टिस्टेटच्या विषयावरुन लोकांचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी महाडिक माझ्यावर बेताल आरोप करत आहेत. त्यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहे. गोकुळच्या सभेत मल्टिस्टेट बद्दल चर्चा करण्यासाठी सभेला आम्ही येत असून हिम्मत असेल तर महाडिकांनी आमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावीत. विरोधाला न जुमानता काहीही झाले तरी गोकुळ मल्टिस्टेट करणारच अशी हुकुमशाहीची भाषा ते बोलत आहेत. गोकुळच्या ३१० कोटींच्या टँकर भाड्याबद्दल पुराव्यानिशी बोललो असताना त्याचे उत्तर ते देत नाहीत. तसेच गोकुळमध्ये माझे ४० टँकर आहेत, याची कबुली महाडिक यांनी दिली आहे.

गोकुळमधील कोल्हापूर आईस फॅक्टरी कोणाची, पुण्यातील गोकुळची एजन्सी कोणाकडे आहे, पेट्रोलमधील नाफ्ता भेसळ प्रकरणातील राजन शिंदेशी महाडिकांचा काय संबंध आहे ? याचा खुलासा त्यांनी केलेला नाही. त्यांच्यावर शाहूपुरी पोलिस ठाण्यात अवैध धंद्यासंबधात गुन्हाही दाखल झालेला आहे. स्वत: एकही संस्था उभी न करणाऱ्या महाडिकांनी प्रत्येक ठिकाणी आयत्या बिळात नागोबा या म्हणीप्रमाणे आपले बस्तान बसविले आहे. गोकुळमध्ये दिवंगत आनंदराव पाटील चुयेकर यांचा तर राजाराम कारखान्यात भगवानराव पवार यांचा महाडिक यांनी घात केला आहे. महाडिकांनी १८ वर्षांच्या आमदारकीच्या काळात काय दिवे लावले? १८ वर्षात अधिवेशनात जिल्ह्याचा एकही प्रश्न विधानपरिषदेत न मांडणारा आणि अधिवेशनात केवळ सहीसाठी साडे चौदा टक्के हजेरी असणारा आमदार, असा लौकीक असणा­ऱ्या महाडिकांना मी केलेल्या विकासकामांवर बोलण्याचा काय अधिकार आहे?

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षकांचे थकीत वेतन तात्काळ देणार

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन देण्याची कार्यवाही तात्काळ करण्याचे आश्वासन राज्याचे शिक्षण संचालक गंगाधर म्हमाणे यांनी दिले. जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्यावतीने मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुरेश संकपाळ यांच्या हस्ते आणि दादासाहेब लाड यांच्या प्रमुख उपस्थितीत म्हमाणे यांचा सत्कार करण्यात आला. या सत्कार प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी म्हमाणे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. संच निश्चिती तात्काळ दुरुस्ती करुन मिळावी, विमुक्ती जाती, भटक्या जमाती आश्रमशाळांची संच निश्चिती करावी, माध्यमिक शाळांना शालेय पोषण आहार किचन शेड उपलब्ध व्हावीत, वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षणे तात्काळ व्हावीत, शाळा सिद्धि अ मानांकन अट रद्द करावी, शिक्षकांची नवीन नेमणूक करावी, अशा मागण्या करण्यात आल्या. संघाचे लोकल ऑडिटर मिलिंद पांगिरेकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी बी. डी. पाटील, प्रशांत पोवार, शिक्षण उप संचालक किरण लोहार, सिंधुदुर्ग शिक्षणाधिकारी महेश जोशी, शिक्षण उप निरीक्षक डी. एस. पोवार, उप शिक्षणाधिकारी बी.डी. टोणपे, प्रशासन अधिकारी किरण शिरोळकर, संचालक रविंद्र मोरे, एम. ए. अन्सारी, अनिता नवाळे, सेवानिवृत्त सदस्य शिवाजी माळकर, एम.के. आळवेकर, राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष आर. डी. कुंभार, एस. वाय. पाटील उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दादू चौगुले यांचे जल्लोषी स्वागत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

भारत सरकारतर्फे मेजर ध्यानचंद पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले महान भारत केसरी, रुस्तम-ए-हिंद आणि राष्ट्रकुल रौप्यपदक विजेते दादू चौगुले यांचे बुधवारी कोल्हापुरात जल्लोषी स्वागत करण्यात आले. यावेळी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, माजी आमदार पी. एन. पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. मंगळवारी राष्ट्रपती भवनात त्यांना मेजर ध्यानचंद पुरस्काराने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

पुरस्कार वितरणानंतर दादू चौगुले यांचे कोल्हापुरात आगमन होणार असल्याने क्रीडाप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण होते. सायंकाळी ढोल-ताशांच्या गजरात त्यांची निवासस्थानापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी तालीम संघाचे उपाध्यक्ष व महाराष्ट्र हाउसिंग फायनान्सचे अध्यक्ष व्ही. बी. पाटील, हिंदकेसरी विनोद चौगुले, महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर, कुस्ती संघटक पी. जी. पाटील, मधुकर भांडवले, पुत्र अमोल चौगुले, स्नुषा वैभवी चौगुले, अंजली चौगुले, सूर्यकांत चौगुले, बहीण नीनाबाई तोंदकर व मोतीबाग तालीमीतील कुस्तीगीर उपस्थित होते.

०००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पंचगंगा घाटावर स्वच्छता मोहीम

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

'नमामि पंचगंगे' उपक्रमांतर्गत राष्ट्रीय छात्र सेनेतील (एनसीसी) १८५ हून अधिक विद्यार्थ्यांनी पंचगंगा घाट परिसरात स्वच्छता मोहिम राबवली. यामध्ये शहरातील विविध शैक्षणिक संस्थेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या विद्यार्थ्यांना ए. एन. बसुगडे, अजित करांडे, डी. वाय. देसाई आदींनी मार्गदर्शन केले. महापालिकेच्या आरोग्य विभागाचे अरविंद कांबळे, पवडी विभागाचे उमेश माने यांचे सहकार्य लाभले. श्रमदान करणाऱ्या विद्यार्थ्यांना भाजप महानगरचे अध्यक्ष संदीप देसाई, माजी नगरसेवक आर. डी. पाटील यांच्या हस्ते अल्पोपहारचे वाटप केले. श्रमदान करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती 'नमामि पंचगंगे' उपक्रमाचे शशिन कुंभोजकर, महेश कामत यांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंचगंगेत मैलामिश्रित सांडपाणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरातील सर्व नाल्यांतील सांडपाणी आणि मैलामिश्रित पाणी थेट पंचगंगा नदीत मिसळत आहे. नदीकाठावरील गावांत दूषित पाणी विनाप्रक्रिया जात आहे. पाऊस कमी झाल्याने मिसळत असलेल्या सांडपाण्याने होणारे प्रदूषण तीव्रपणे समोर येत आहे. सर्व सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यास महापालिका, जिल्हा परिषद, इचलकरंजी नगरपालिका अपयशी ठरली आहे. कृती आराखडा, अधिकाऱ्यांचे दौरे, बैठकांवर अर्धा कोटींवर खर्च आणि प्रदूषण खुलेआम असे वास्तव चित्र आहे.

कोल्हापूर, इचलकरंजीतील सांडपाण्यामुळे पंचगंगा नदी सर्वाधिक प्रदूषित होते. शहरातील प्रमुख १२ नाल्यांतून सांडपाणी मिसळत आहे. याशिवाय गांधीनगर, उचगाव, विक्रमनगर, टेंबलाईवाडी, रूईकर कॉलनी, निंबाळकर मळा, ताराराणी चौक, मुक्त सैनिक वसाहत, जाधववाडी, कदमवाडी, भोसलेवाडी, आदी वसाहतींमधूनही सांडपाणी थेट मिसळते. नाल्याद्वारे मैलाही थेट नदीत येत आहे. सर्व सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिका प्रशासनाने कसबा बावड्यात ७६ एमएलडी क्षमतेचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारला. मात्र, विविध अडचणींमुळे हा प्रकल्प पूर्णक्षमतेने कार्यान्वित झालेला नाही. पंप नसल्याने बापट कॅँप पंपिंग स्टेशनचे काम रेंगाळले आहे.

प्रत्येक आढावा बैठकीत अधिकारी नवी तारीख देऊन वेळ मारून नेत आहेत. प्रकल्प मार्गी लावण्यासाठी नगरसेवक इतर लोकप्रतिनिधींनी बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप होत आहे. इचलकरंजीतील प्रोसेसिंग युनिटचे रसायनयुक्त पाणी आणि सांडपाणीही काळ्या ओढ्यातून नदीत मिसळत आहे. नदीकाठावरील ३८ गावांतील सांडपाणी विनाप्रक्रिया नदीत जात आहे. बंधारा टाकून सांडपाणी अडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, ते कुचकामी ठरत आहे. पाच वर्षांपूर्वी जिल्हा परिषद प्रशासनाने निरी संस्थेच्या माध्यमातून प्रदूषणकारी घटकांचा सर्व्हे, त्यावर कायमस्वरूपी, तात्पुरत्या उपाययोजनांचा आराखडा तयार करण्यासाठी साडेसतरा लाख खर्च झाले. केंद्र, राज्य सरकारकडून निधी न मिळाल्याने आराखड्यावर झालेला खर्च वाया गेल्याचा मुद्दा पंचायत राज समिती दौरा दरम्यान समोर आला. महानगरपालिका, इचलकरंजी नगरपालिकेनेही आराखडा, अधिकाऱ्यांच्या दौऱ्यावर लाखो रूपये खर्च केले. खर्चाचा आकडा अर्धा कोटींवर गेला आहे. त्या तुलनेत प्रदूषण किती कमी झाले, हा संशोधनाचा विषय आहे.

०००

तक्रार केल्याने नोटीस

उन्हाळ्यातील दोन महिने वगळता इतरवेळी जयंतीसह सर्वच नाल्यांतील सांडपाणी पंचगंगेत मिसळते. प्रदूषण नियंत्रण मंडळ याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करते. सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प पूर्णक्षमतेने सुरू आहेत, असे प्रशासन दावा करते. इचलकरंजी नगरपालिका प्रशासन हतबल आहे. पाठपुरावा, तक्रार केल्यानंतर 'प्रदूषण'चे प्रशासन कारवाईची नोटीस पाठवते. असाचा अनुभव जयंती नाला सांडपाणीप्रकरणी महापालिका आयुक्तांना काढलेल्या नोटिशीसंबंधी आहे.

००००

आयुक्त दौऱ्याआधी सतर्कता

स्थानिक स्वराज्य संस्था अपयशी ठरल्याने पंचगंगा प्रदूषण प्रश्न हायकोर्टात दाखल झाला. कोर्टाच्या अंतरिम आदेशाने प्रदूषण रोखण्यासाठी तात्पुरत्या आणि कायमस्वरूपी उपाययोजनांच्या पाठपुराव्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती कार्यरत आहे. या समितीचे अध्यक्ष आयुक्त दीपक म्हैसेकर आज, गुरुवारी कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. ते पंचगंगा प्रदूषणप्रश्नी आढावा घेणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रदूषण नियंत्रण मंडळ, महापालिका, जि. प. परिषद यंत्रणा सतर्क झाली आहे. प्रदूषण रोखण्यासाठी काहीतरी करीत आहोत, हे दाखविण्यासाठी धडपडताना दिसत आहे.

००००

पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासंबंधी प्रशासन गंभीर नाही. कृती आराखडा तयार करणे, अहवालावरील कागदोपत्री आणि अधिकाऱ्यांच्या दौऱ्यावर लाखो रुपये खर्च झाले आहेत. प्रत्यक्षात प्रदूषण रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कमी झाल्या आहेत. आयुक्त दौऱ्याआधी यंत्रणा सतर्क असल्याचा केवळ दिखावा करीत असते.

दिलीप देसाई, याचिकाकर्ते, पंचगंगा प्रदूषण खटला

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परतीच्या पावसाने शहराला झोडपले

$
0
0

झाडे, स्वागत कमानी, विद्युत तारा कोसळल्या, शहराचा निम्मा भाग अंधारात

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

परतीच्या पावसाने बुधवारी शहर आणि परिसराला अक्षरश: झोडपून काढले. सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास अचानक विजांच्या कडकडाटासह पावसाच्या मोठ्या सरी कोसळल्या. जोरदार पावसामुळे शहरातील विविध भागात झाडे, स्वागत कमानी कोसळून वाहतुकीची कोंडी झाली. शुगर मिल परिसरातील स्पीडरवर झाड कोसळल्याने कसबा बावड्यासह निम्मे शहर अंधारात बुडाले. जयभवानी गल्लीत एका घरावर व सार्वजनिक तरुण मंडळाच्या मंडपावर झाड कोसळले.

अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहचून घरातील व्यक्तींना अन्यत्र हलविले. शिवाय झाडही हटविले. शहर आणि भागात ठिकठिकाणी विद्युत वाहिन्या तुटल्याने पाचगाव, जरग नगर,आर.के. नगरसह अन्य परिसरातील विद्युत पुरवठा खंडीत झाला. लाइन बाजार कृषी विभाग येथे रस्त्यावर झाड पडल्याने वाहतूक खोळंबली. अग्निशमन दलाच्या जवानांनी कटरव्दारे झाडे तोडून रस्ता वाहतुकीला खुला केला. केशवराव भोसले नाट्यगृहालगतच्या खाऊ गल्लीत झाडाची फांदी कोसळली. जामदार क्लब येथे पावसाच्या पाण्यामुळे अंदाज न आल्याने चारचाकी वाहन खड्ड्यात अडकली. दसरा चौकात शॉर्ट सर्किटचा प्रकार घडला. शिरोलीमध्ये तार तुटल्याची माहिती आहे.

गणेश उत्सव कालावधीत शहरातील प्रमुख रस्त्यांवर स्वागत कमानी उभारल्या होत्या. पावसामुळे देखावे आणि गणेशमूर्ती प्रतिष्ठापनेसाठी उभारलेल्या मंडपांना नुकसान पोहचले. उत्सव होवून तीन दिवसांचा कालावधी उलटला तरी सार्वजनिक तरुण मंडळांनी कमानी आणि मंडप उतरविलेले नाहीत. पावसात त्या कमानी जमीनदोस्त झाल्या. शहरातील प्रमुख रस्त्यांवर आणि सखल भागात पाणी साचले. लक्ष्मीपुरी धान्य व्यापारी लाइन, शिवाजी उद्यमनगर, दसरा चौक परिसर, ट्रेझरी ऑफीस, जयंती पूल, जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्ता, शाहूपुरी पाच बंगला परिसर, परीख पूल, जनता बझार येथे रस्त्यावर पाणी आले. रस्त्यावर पाणी आल्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण झाली. शिवाय वाहतूकही मंदावली.

दरम्यान, हवामान खात्याने गुरुवारपासून सलग पाच दिवस जोरदार पावसाची शक्यता वर्तविली होती. गणेश उत्सव कालावधीत पावसाने तुरळक हजेरी लावली होती. त्यानंतर बुधवारी मध्यरात्री पावसाने पुन्हा हजेरी लावली. रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास पावसाच्या सरी कोसळल्या. दिवसभराच्या उकाड्यानंतर सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास विजांच्या कडकडाटास पावसाला पुन्हा सुरूवात झाली. अचानक सुरु झालेल्या पावसामुळे शहरातील प्रमुख बाजारपेठेतील व्यावसायिकांची धांदल उडाली. फेरीवाले, लहानसहान विक्रेत्यांना विविध प्रकारच्या वस्तू पावसापासून सुरक्षित ठेवण्यासाठी कसरत करावी लागली.

...............

बावड्यात २५ झाडे कोसळली

कसबा बावड्यात पावसाच्या दणक्याने २५ झाडे, चार विद्युत खांब कोसळले. तर गणेशोत्सवाच्या निमित्ताने उभ्या केलेल्या स्वागत कमानी जमीनदोस्त झाल्या. त्यामुळे वाहतुकीस अडथळा होवून मुख्य रस्त्यावर चारचाकी वाहनांची मोठी रांग लागली. स्थानिक कार्यकर्त्यांनी भर पावसात पडलेल्या कमानी रस्त्यावरून बाजूला केल्या. अनेक होर्डिंग्जचे बॅनर फाटून गेले. कमानी कोसळताना रस्त्यावरून जाणाऱ्या चारचाकी गाड्या थोडक्यात बचावल्या. लाईन बाजार येथील सेवा रुग्णालयाच्या दारातील मोठे झाड उन्मळून पडले, त्यामुळे विजेच्या तारा तुटल्या. महासैनिक दरबार हॉल तसेच उलपे मळा येथील मोठे वृक्ष कोसळले. दरम्यान, महावितरणचे कार्यकारी अभियंता सुनील माने, अतिरिक्त कार्यकारी अभियंता आबसाहेब मांडके, सुलतान शेळके यांनी कर्मचाऱ्यांसह विद्युत पुरवठा सुरळीत होण्यासाठी रात्री उशीरापर्यंत प्रयत्न केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सायलंट झोनमधील वाहतुकीकडे दुर्लक्ष

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

रंकाळा पदपथ उद्यानाशेजारील क्रशर चौक ते शानिली पॅलेस मार्ग अवजड वाहतुकीसाठी बंद आहे. पण या नियमाचे सर्रासपणे उल्लंघन करत मार्गावरून वाहतूक सुरू असल्याने एकप्रकारे सायलंट झोनमधील वाहतुकीला वाहतूक पोलिसांचे अभय मिळत आहे. परिणामी विरंगुळ्यासाठी येणाऱ्या नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. वर्दळीच्या रस्त्यावर घोड्याला झालेल्या अपघातानंतर येथील स्टॉलधारकांचा सर्व्हे करण्याच्या आयुक्तांनी इस्टेट विभागाला केलेल्या सूचना कागदावर राहिल्या आहेत.

रंकाळा टॉवर ते राजकपूर पुतळ्यापर्यंतच्या रस्त्याचे काम सुरू असताना हा मार्ग वाहतुकीसाठी बंद केला होता. ड्रेनेजलाइनच्या कामाला अनेक दिवस विलंब लागला. काम रेंगाळत गेल्यानंतर राधानगरीकडे जाणारी एसटी वाहतूक पदपथ उद्यानाशेजारील रस्त्यावरुन वळवण्यात आली. एसटीला प्रवेश दिल्यानंतर इतर अवजड वाहनांनी या मार्गावर घुसखोरी केली. त्यापूर्वी या मार्गावरुन अवजड वाहतूक होऊ नये, यासाठी इराणी खण येथे अडथळा निर्माण केला होता. पण एसटीला मार्ग करुन देताना हे अडथळे काढण्यात आले. परिणामी, सायलंट झोनमधून सर्वच प्रकारच्या वाहतुकीला सुरुवात झाली. रंकाळा टॉवर ते राजकपूर पुतळ्यापर्यंतच्या रस्त्याचे काम संपून तो मार्ग वाहतुकीस सुरू झाला. तरीही पदपथ उद्यानाशेजारील वाहतूक बंद करण्यास पोलिस, महापालिकेने दुर्लक्ष केले.

रंकाळा तलावावर स्थानिक नागरिकांसह पर्यटक दररोज हजेरी लावत असतात. पर्यटकांच्या दररोजच्या गर्दीमुळे तलावाला खाद्यपदार्थांच्या स्टॉलने वेढा दिला आहे. स्टॉलधारकांची गर्दी वाढत असताना लहान मुलांसाठी घोडेस्वारी, लहान मोटारी यांची गर्दी नित्याची असते. त्यामुळे सायंकाळी येथे वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होते. वाहतूक कोंडीतून पादचारी मार्ग काढत असतात. एक महिन्यापूर्वी अशा वाहतूक कोंडीमुळे घोड्याला ट्रकने धडक दिली होती. अपघातामध्ये घोड्याचा मृत्यू झाला. अशाच प्रकारची जीवितहानी होऊ नये, यासाठी काहींनी महापालिका यंत्रणेकडे धाव घेऊन स्टॉलधारक, खेळणी याची पाहणी करत मार्ग वाहतुकीला बंद करण्याची मागणी केली.

महापालिकेने तातडीने रंकाळा परिसरात वाढलेल्या स्टॉलधारकांची मोजणी करण्याच्या सूचना केल्या. पण या सुचनांची एक महिन्यानंतरही अंमलबजावणी झालेली नाही. महापालिका प्रशासनाप्रमाणे वाहतूक पोलिस विभागाने रंकाळा ते राज कपूर पुतळ्यांपर्यंतच्या मार्गाची पाहणी करुन सायलंट झोन मार्गावरील वाहतूक बंद करण्याचे जाहीर केले. पण, यानंतरही दोन्ही यंत्रणा सुस्तच राहिल्या. परिणामी सायलंट झोन मार्गावरून वाहतूक सुरू असल्याने येथील जैवविविधताही धोक्यात येऊ लागली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विवाहितेच्या आत्महत्याप्रकरणी पती, सासऱ्याला अटक

$
0
0

कोल्हापूर : विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी करवीर पोलिसांनी पती नितीन रंगराव पाटील, सासरा रंगराव लक्ष्मण पाटील, सासू मंगल पाटील (रा. अमृतनगर, पाचगाव, ता. करवीर) या तिघांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी तिघांनाही मंगळवारी अटक केली. माहेरहून दोन लाख रुपये आणण्यासाठी सासरच्या लोकांनी छळ केल्याने माधुरी नितीन पाटील हिने ११ सप्टेंबर रोजी आत्महत्या केली. गेले सहा महिने तिचा छळ सुरु होता. तिचे वडील सहदेव कृष्णा पाटील (रा. नवीन वसाहत, सांगाव, ता. शिराळा, जि. सांगली) यांनी फिर्याद दिली. त्यानंतर तिघांविरोधात गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा परिषदेच्या मालमत्तांचे ‘ऑडिट’

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

जिल्हा परिषदेच्या जिल्हाभर मालमत्ता आहेत. शाळेच्या इमारती, आरोग्य केंद्रे, पशुसंवर्धन दवाखाने, पाणी पुरवठा योजनांच्या इमारती व जागांचा समावेश आहे. पण नेमक्या किती मिळकती आहेत, एकूण जागा यासंबंधीची अधिकृत माहिती प्रशासनाकडे नाही. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने, जिल्हा परिषदेच्या मिळकती, मालमत्तांच्या माहिती संकलनास सुरूवात केली आहे. १७ ऑक्टोबरपर्यंत माहिती संकलनाचे काम पूर्ण करण्याचे आदेश आहेत.

जिल्हा परिषदेने या कामासाठी जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय समितीची स्थापना केली आहे. उपमुख्य कार्यकारी अधिकारीपासून गटविकास अधिकारी, विस्तार अधिकाऱ्यांपर्यंत जबाबदारी निश्चित केली आहे. तालुक्याचे नाव, मिळकतीचे ठिकाण, गट नंबर, जागेचे क्षेत्र, बांधकाम, मोकळया जागा, मालमत्तेची किंमत, जागा भाडेतत्वावर दिली आहे का, जागेच्या मालकीविषयीची नोंद अशा एकूण २२ प्रकारची माहिती संकलित करण्यात येणार आहे.

जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी सर्वसाधारण सभेत जिल्हा परिषदेच्या मालकीच्या इमारती व जागांची एकत्रित माहिती संकलित करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार प्रशासनाने माहिती संकलनाच्या कामाला सुरुवात केली आहे. जिल्हा परिषदेच्या मालकीच्या अखत्यारित प्राथमिक शाळांच्या इमारती, पशुसंवर्धन दवाखाने, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्राच्या इमारती, लघुपाटबंधारे विभागांतर्गत बंधारे, कृषी विभागाच्या जमिनी व इमारती, अंगणवाडी इमारती, पाणी पुरवठा योजना आदींचा समावेश आहे. मात्र काही ठिकाणी अतिक्रमण झाल्याच्या तक्रारी आहेत. काही ठिकाणी जागेच्या मालकी हक्काबाबतचे वाद निर्माण होत आहेत.

माहिती मिळणार ऑनलाइन

जिल्हा परिषदेच्या सर्व मिळकती, जागा, कार्यालये या संदर्भातील गावनिहाय माहिती संकलित होणार आहे. जिल्हा परिषदेशी संबंधित माहिती ऑनलाइनवर उपलब्ध करण्यात येणार आहे. प्रत्येक विभागासाठी कार्यरत इमारती, वस्तुस्थिती समजणार आहे. महत्वाचे म्हणजे, प्रशासन मिळकतींची माहिती गोळा करताना कुठे कुठे अतिक्रमण झाले हे तपासणार आहे. आणि ते अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही होणार आहे.

जिल्हा परिषदेच्या उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न सुरू आहेत. उत्पन्नाचे नवे स्रोत तपासले जात आहे. जिल्हा परिषदेच्या अनेक जागा, इमारती यापूर्वी भाडेतत्वावर दिल्या आहेत. भाडेकराराचे नूतनीकरण झालेले नाही. या मिळकती, भाडेतत्वावरील इमारतींची नेमकी माहिती उपलब्ध होताच नियमावली तपासून भाडेकरारात सुधारणा करता येईल. विविध प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी योग्य जागांची माहिती उपलब्ध होईल.

- शौमिका महाडिक, अध्यक्षा, जिल्हा परिषद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासगी शाळांबाबत स्वतंत्र बैठक

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

'राज्यातील खासगी प्राथमिक शाळांच्या प्रश्नाबाबत स्वतंत्र बैठक घेऊन सर्व मागण्या मार्गी लावल्या जातील' असे आश्वासन राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोळंखी यांनी दिले. खासगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीच्या शिष्टमंडळांना त्यांना पुणे येथे निवेदन दिले. शिष्टमंडळातील प्रतिनिधींनी थकीत वेतन, अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन, शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना दरमहा एक हजार रुपयांची शिष्यवृत्ती संदर्भात चर्चा केली. खासगी प्राथमिक शाळांनाही गणित व भाषा पेटी उपलब्ध करण्यासह अन्य मागण्यासाठी स्वतंत्र बैठक घेऊ अशी ग्वाही सोळंखी यांनी दिली. शिष्टमंडळात संघटनेचे राज्याध्यक्ष भरत रसाळे, उपाध्यक्ष सारंग पाटील, संतोष शिळमकर, जे.डी. मोराळे, रविंद्र येसादे, संजय परीट आदींचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


काळ्या यादीतील ठेकेदारास ‘अमृत’चे काम देण्यास मज्जाव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कसबा बावडा येथील पाण्याच्या टाकीचे काम अनेक वर्षांपासून बंद आहे. कामास दिरंगाई होत असल्याने, संबंधित ठेकेदाराचा काळ्या यादीत समावेश केला आहे. तरीही 'अमृत' योजनेतील काम या ठेकेदाराला देण्याचा कंपनीचा प्रयत्न महापालिका प्रशासन आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने हाणून पाडला. त्यामुळे दास ऑफशोअर कंपनीला अमृतमधील कामाचा निपटारा करण्यासाठी दुसरा ठेकेदार शोधावा लागणार आहे.

महापालिकेस अमृत योजनेंतर्गत राज्य सरकारकडून पाणीपुरवठ्याची जलवाहिनी बदलण्यासाठी १०६ कोटींचा निधी मिळाला आहे. शहरातील जलवाहिनी बदलण्यासाठी दास ऑफशोअर कंपनीला कंत्राट देण्यात आले. मात्र कंपनीने बँक गॅरंटी जमा करण्यास अनेक दिवसांचा विलंब लावला. परिणामी कामाला सुरुवात झालेली नव्हती. याबाबत महासभेत नगरसेवकांनी कंपनी काम करण्यास तयार नसल्यास दुसऱ्या कंपनीला काम देण्याची जोरदार मागणी केली. प्रशासनाने सातत्याने पाठपुरवा केल्यानंतर कंपनीने सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात दोन कोटी १२ लाखांची बँक गॅरंटी जमा केली.

बँक गॅरंटी जमा केल्यानंतर प्रशासनाने वर्क ऑर्डर काढली. सुमारे ४५० किमी जलवाहिनी टाकण्याचे काम विभागून देताना मूळ कंपनीने सब ठेकेदार नेमण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये बावडा येथील टाकीचे काम प्रलंबित ठेवणाऱ्या ठेकेदाराचा यामध्ये समावेश होता. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभाग आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकण विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती मिळाली. दोन्ही विभागांनी या ठेकेदारास काम देण्यास विरोध केला. त्यामुळे कंपनीला ठेकेदाराला काम देण्याचा निर्णय मागे घ्यावा लागला. परिणामी कामाचा जलद निपटारा करण्यासाठी कंपनीला दुसऱ्या ठेकेदारांचा शोध घ्यावा लागणार आहे.

........................

चौकट

१०६ कोटी

प्रशासकीय खर्च

४५० किमी

जलवाहिनीची लांबी

२४ महिने

कामाची मुदत

२.१२ कोटी

बँक गॅरंटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘वसुंधरा’ पुरस्कारांची घोषणा

$
0
0

मदने, डॉ. राऊत, डॉ. कदम, डॉ. कुलकर्णी, चेचर यांचा सन्मान

कोल्हापूर टाइम्स टीम

किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवानिमित्त पर्यावरण क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्ती, संस्थांना दरवर्षी वसुंधरा मित्र, सन्मान या पुरस्कारांनी गौरविण्यात येते. यंदा राजेंद्र मदने, पी. डी. राऊत, डॉ. एस. डी. कदम, डॉ. अनिल कुलकर्णी, बी. डी. चेचर, तुषार साळगावकर आदींसह मलबार नेचर क्लबला पुरस्कार जाहीर झाल्याची माहिती किर्लोस्कर ऑईल इंजिन्स लिमिटेडचे असोसिएट व्हाइस प्रेसिडेंट कृष्णा गावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. पी. डी. राऊत, 'सायबर'चे डॉ. एस. डी. कदम व डॉ. अनिल कुलकर्णी यांना 'वसुंधरा गौरव' पुरस्काराने सन्मानित केले जाईल. आंबोली येथील मलबार नेचर क्लब संस्था, राधानगरी येथील पर्यावरणवादी कार्यकर्ता तुषार साळगावकर आणि छायाचित्रकार बी. डी. चेचर यांना 'वसुंधरा मित्र' पुरस्कार प्रदान करण्यात येईल. तर अग्रणी नदी पुनरुज्जीवनासाठी काम करणाऱ्या राजेंद्र मदने यांना 'वसुंधरा सन्मान' पुरस्कार जाहीर झाला आहे.

व्हाइस प्रेसिडेंट कृष्णा गावडे म्हणाले, 'महोत्सवाचे यंदाचे नववे वर्षे आहे. 'प्रदूषण टाळा नदी वाचवा' या संकल्पनेवर एक ते चार ऑक्टोबर या कालावधीत वसुंधरा महोत्सव होत आहे. लेखक अनिल अवचट यांच्या हस्ते व किर्लोस्कर उद्योग समूहाचे संजीव निमकर, चंद्रहास रानडे, टी. विनोदकुमार यांच्या उपस्थितीत सोमवारी (ता. १ ऑक्टोबर) सायंकाळी पाच वाजता महोत्सवाचे उद्घाटन होईल. मंगळवारी (ता. २) सायंकाळी पाच वाजता कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते 'वसुंधरा गौरव' व 'वसुंधरा मित्र'पुरस्कार प्रदान करण्यात येतील. महोत्सवाच्या समारोपदिनी गुरुवारी (ता. ४ ) पर्यावरण चळवळीतील कार्यकर्ते उदय गायकवाड यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे. सर्व कार्यक्रम दसरा चौकातील शाहू स्मारक भवन येथे होणार आहेत.

महोत्सवासाठी २५ सप्टेंबरपासून रोज सकाळी ११ ते सायंकाळी सात या दरम्यान शाहू स्मारक भवन येथे तर निसर्ग मित्र संस्था साईक्स एक्स्टेंशन येथे दुपारी तीन ते सात या वेळेत नावनोंदणी करता येईल. पत्रकार परिषदेला राहुल पवार, पर्यावरणप्रेमी कार्यकर्ते उदय गायकवाड, अनिल चौगुले, प्राचार्य अजय दळवी, चित्रकार विजय टिपुगडे, भाऊ सूर्यवंशी, केदार मुनिश्वर उपस्थित होते.

युवासंवाद, हेरिटेज वॉक ते पोस्टर प्रदर्शन

महोत्सवामध्ये 'वस्त्रोद्योग व नदी प्रदूषण' व 'नदी प्रदूषण रोखण्यासाठी तंत्रज्ञान'या विषयावरील परिसंवाद, युवकांसाठी 'नदी प्रदूषणाची कारणे आणि उपाय' या विषयावर संवाद आयोजित केला आहे. 'प्रदूषण रोखा, नदी वाचवा'विषयावर पोस्टर स्पर्धा होणार आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी 'रिव्हर अँड फन'व पर्यावरणपूरक सजावट हा नाविन्यपूर्ण उपक्रम आकर्षण असणार आहे. छायाचित्र प्रदर्शन, तज्ज्ञांची व्याख्याने होतील. दुधाळी सांडपाणी प्रक्रिया केंद्र व कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहत येथे हेरिटेज वॉक होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हुपरीत अंबाबाई मंदिराच्यानगारखान्याचे लोकार्पण

$
0
0

म. टा. वृतसेवा, हातकणंगले

'समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो, या उदात्त भावनेतून उतराई होण्यासाठी राजेश सिल्व्हर परिवार नेहमीच प्रयत्न करत असून यापुढे जनतेची सेवा करत राहील,' असे प्रतिपादन चांदी उद्योजक राजेंद्र शेटे यांनी केले. हुपरी (ता. हातकणंगले) येथील ग्रामदैवत अंबाबाई देवस्थानच्या महादरवाजा नगारखान्याचे राजेश सिल्व्हर परिवाराकडून लोकार्पण करण्यात आले. अध्यक्षस्थानी श्रीमती निलावती शेटे होत्या.

हुपरीत अंबाबाई मंदिराच्या प्रांगणातील उत्तर बाजूस महादरवाजाच्या नगारखान्याचे भव्य बांधकाम करण्याचा मनोदय उद्योजक राजेश शेटे यांनी देवस्थान समितीचे यशवंतराव पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांसमोर व्यक्त केला होता. त्याला देवस्थान समितीने तत्काळ मान्यता दिली होती. त्यानंतर राजेश सिल्व्हर परिवाराकडून भव्य वास्तूच्या बांधकामास सुरुवात करून अल्पावधीतच पूर्ण केले. देवस्थान ट्रस्टच्यावतीने या महादरवाजा नगारखान्याचे पूजन ईश्वर महास्वामी यांच्या हस्ते करून निलावती शेटे यांना वास्तू योगदान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी निरंजन शेटे, अनुपम शेटे आदींसह देवस्थान सदस्य, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीईओ मित्तल यांच्याकडून सरूड गाव दत्तक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा शाहूवाडी

'भारतीय प्रशासकीय सेवेत दाखल झाल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पहिलीच नियुक्ती छत्रपती शाहू महाराजांच्या ऐतिहासिक भूमीत झाल्याने स्वतःला धन्य समजतो. या संधीतून ग्रामीण भागाला विकासाचा चेहरा प्राप्त करून देण्याचा माझा विशेष प्रयत्न राहील. यासाठी आजच सरूड हे गाव दत्तक घेतले आहे' अशी घोषणा कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी केली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सरूड (ता. शाहूवाडी) येथे गणेश मंडळांच्या भेटीसाठी आलेले अमन मित्तल हे फ्रेंड्स तरुण मंडळाच्या व्यासपीठावरून बोलत होते. पालघरचे सहाय्यक जिल्हाधिकारी अजित कुंभार यांची उपस्थित होते.

मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल म्हणाले, 'सरूड गावाबद्दल माझ्या मनात आदरयुक्त प्रेम आहे. प्रशासकीय सेवेसाठी अनेक रत्ने देणाऱ्या या सुसंस्कृत गावाला यशाची वेगळी परंपरा आहे. या विलक्षण ओढीतून सलग तीन वर्षे गणेशोत्सव काळात येथे येण्याची मला संधी मिळाली. पुढील गणेशोत्सवावेळी मी जेव्हा येथे येईन, त्यावेळी सरुड गाव विकासाचे रोड मॉडेल ठरलेले दिसेल.'

फ्रेंड्स तरुण मंडळाने मुले व महिलांच्या कलेला वाव देत राबविलेल्या विधायक उपक्रमांचे यावेळी मित्तल यांनी खास कौतुक केले.

सहाय्यक जिल्हाधिकारी अजित कुंभार म्हणाले, 'गुणवत्ता ठासून भरलेल्या तरुण पिढीला आज करिअरच्या अनेक वाटा खुणावत आहेत. योग्य मार्ग निवडून स्वतःला झोकून देऊन ध्येयाचा पाठलाग करा. तरुणांना या शर्यतीत पालकांनी शेवटच्या टप्प्यापर्यंत पाठबळ द्यावे. विशेषतः आज अनेक क्षेत्रात कार्यरत मुलींनी आव्हानात्मक भूमिकांना न्याय दिला आहे. यासाठी ग्रामीण मुलींनी आपली क्षमता ओळखून करिअरसाठी पुढे यायला हवे.'

यावेळी सरपंच राजकुंवर पाटील यांनी गावाच्या विकासाचा आराखडा ग्रामपंचायतीकडे तयार असल्याचे सांगून विकासासाठी सहकार्य करण्याची ग्वाही देणाऱ्या जिल्हा परिषद सीईओ अमन मित्तल यांचे विशेष आभार मानले. दरम्यान, मान्यवरांच्या हस्ते मूर्ती व प्रशस्तीपत्र देऊन गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. यावेळी अधिकाऱ्यांच्या हस्ते 'फ्रेंड्स'च्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. राहुल सातपुते यांनी स्वागत केले. ग्रा. पं. सदस्य भगवान नांगरे, राजेंद्र पाटील, शिवसेना महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष अलका भालेकर, आनंदराव लाड, राजाभाऊ लाड, तुषार दिवसे, भगवान कांबळे, सनी कांबळे, राजेंद्र सनगर, विनोद हजारे आदी उपस्थित होते. प्रा. डी.आर. पाटील यांनी आभार मानले.

सरुड पॅटर्न नावारूपाला

मूळचे दिल्लीचे असलेल्या आयएएस अमन मित्तल आणि आपल्या मैत्रीचा धागा पकडून सहाय्यक जिल्हाधिकारी अजित कुंभार (सरूड) यांनी, 'विविध स्पर्धा परीक्षेत दिल्ली पॅटर्नचा दबदबा कायम आहे. अलीकडच्या काळात या शाहुवाडीच्या मातीत वाढलेल्या तरुणाईने पर्यायाने सरुड पॅटर्नही नावारुपाला आणला. गाव देशपातळीवर पोहोचविले' असे गौरवोद्गार काढले.

फोटो ओळ

सरूड (ता.शाहूवाडी) येथे 'नवोदय'ची गुणवंत विद्यार्थिनी लोचन लाड हिचा सत्कार करताना सीईओ अमन मित्तल. सोबत अजित कुंभार, सरपंच राजकुवर पाटील व इतर.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रास्ता रोकोनंतर पाइपलाइन दुरुस्ती सुरू

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

अपुऱ्या आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने बुधवारी शहरात सलग दुसऱ्या दिवशी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. जाधव पार्क, शाहू कॉलनीतील संतप्त आंदोलकांनी रामानंदनगर ओढ्यावर सुमारे दोन रास्ता रोको आंदोलन केले. त्यानंतर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाची यंत्रणा तेथे दाखल झाली. हॉकी स्टेडियम परिसरात जेसीबीच्या सहाय्याने जलवाहिनीतील बिघाड शोधण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला.

शहरातील अनेक भागात अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. मंगळवारी शिवाजी पेठ येथील संतप्त महिलांनी रास्ता रोको करत पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. सुरळीत पाणीपुरवठ्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेतल्यानंतर बुधवारी पुन्हा जाधव पार्क येथील नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले. सलग दोन दिवस झालेल्या आंदोलनांमुळे पाणीपुरवठा विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल आहे.

गेल्या सहा महिन्यांपासून जाधव पार्क, शाहू कॉलनी परिसरातील नागरिकांना कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. याबाबत येथील नागरिकांनी पाणीपुरवठा विभाग, महापालिका प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला. पण, तरीही पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने नागरिक संतप्त बनले. गेल्या काही दिवसांपूर्वी येथील जलवाहिनीमध्ये पादत्राणे अडकल्याने पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला होता. जलवाहिनीतील बिघाड काढल्यानंतर काही दिवस पाणीपुरवठा सुरळीत झाला. पण, पुन्हा अपुऱ्या दाबाने पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी पुन्हा एकदा रास्ता रोको आंदोलन करून संताप व्यक्त केला. आंदोलनामुळे दोन्ही बाजुची वाहतूक ठप्प झाल्यानंतर पाणीपुरवठा विभागाचे जलअभियंता सुरेश कुलकर्णी तातडाने आंदोलनस्थळी दाखल झाले. मात्र नागरिक ऐकण्याच्या मन:स्थितीमध्ये नव्हते. शेवटी जलअभियंता कुलकर्णी यांनी जेसीबी मशिन मागविले. जेसीबीच्या सहाय्याने जलवाहीनीतील बदल शोधण्याचे काम सुरू होते.

आंदोलनात नगरसेवक सुनील पाटील यांच्यासह प्रमोद भोपळे, सुजीत पाटील, सतीश लोळगे, मंगल पाटील, नीलम मोरे, शीतल पाटील, रेखा खोराटे, मनीषा पाटील, रंजना पाटील, कमलेश पाटील, तानाजी पाटील आदी नागरिक सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>