Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

काम वेळेत पूर्ण न केल्यास रोज लाखाचा दंड

$
0
0
मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार जयंती नाला येथील पंपिंग स्टेशन सुरू करण्यात येणार आहे. हे काम वेळेत पूर्ण न केल्यास ठेकेदारास रोज एक लाख रूपये दंड करण्याचा इशारा आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी दिला.

अपघाताने सांगवडे सुन्न

$
0
0
दररोज शेतात कामाला गेल्यावरच घरची चूल पेटणाऱ्या रोजंदारीवर काम करणाऱ्या राजेंद्र शिर्के यांचा मुलगा आकाशने सहलीसाठी वडिलांकडे हट्ट धरला. पैसे नसल्याने घरातील जुन्या घागरी विकून गुरूवारी शेवटच्या दिवशी सहलीचे पैसे भरले.

रंकाळ्यात मुलीची आत्महत्या

$
0
0
रंकाळा तलावात उडी मारून कु. लक्ष्मी जयपाल सरजे (वय १४, रा. सुधाकर जोशीनगर) या मुलीने आत्महत्या केली. तांबट कमानीजवळ मुलीने तलावात उडी मारल्याची माहिती पोलिस कंट्रोलला अकरा वाजता कळवण्यात आल्यावर घटनास्थळी पोलिस दाखल झाले.

अन् अश्रूंचा बांध फुटला

$
0
0
चालती, बोलती, उनाडक्या केल्या तरी माया लावाविशी वाटणाऱ्या हसत्याखेळत्या पोरांचे निपचित पडलेले मृतदेह पाहून सहाही कुटुंबातील महिलांनी हंबरडा फोडल्यावर सांगवडेकर ग्रामस्थांच्या अश्रूंचा बांध फुटला.

दोन नव्या होस्टेलचा प्रस्ताव

$
0
0
शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेत तक्रार निवारण समितीच्या अध्यक्षपदी कुलगुरूंऐवजी कुलसचिवांची नियुक्ती करावी या परिनियम दुरुस्तीवर जोरदार चर्चा झाल्यानंतर ४० विरूद्द १६ मतांनी हा परिनियम मंजूर करण्यात आला. त्याबरोबरच २०१२ - १३ च्या वार्षिक लेखे, ताळेबंदपत्रक आणि लेखापरीक्षण अहवालाला प्रदीर्घ चर्चेनंतर मंजुरी देण्यात आली.

बँक दरोडा: फरारी आरोपीला अटक

$
0
0
कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांमध्ये पतसंस्था, एटीएम, ज्वेलर्समध्ये गॅस कटरच्या सहाय्याने लॉक तोडून चोरी करणाऱ्या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी चंद्रकांत उर्फ पिंटू एकनाथ कांबळे (वय २४, रा. काळम्मा बेळवळे, ता. कागल) मूरगुड कागल रस्त्यावर अटक केली. कांबळे हा गेले तीन महिने फरारी होता. त्याने खुनाच्या गुन्ह्यासह २३ गुन्ह्यांची कबुली दिली आहे.

लोकप्रतिनिधींनो, राजीनामे द्या

$
0
0
सर्वांनी टोल देणे बंद केले तर आपोआपच या आंदोलनाचा हेतू साध्य होईल. तत्वासाठी सुरु असलेल्या या आंदोलनात आता चारचाकी वाहनधारकांनी सहभागी व्हावे अन्यथा त्यांच्याबाबत वेगळा विचार करावा लागेल. कोणत्याही ‌वाहनधारकाने टोल देऊ नये, असे आवाहन शनिवारी टोलविरोधी कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या ठिय्या आंदोलनात करण्यात आले.

सरकारला नमवणारच

$
0
0
‘जनतेच्या भावनेची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी टोलवसुलीचा अध्यादेश रद्द करावा, अन्यथा जनता येत्या निवडणुकीत हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही. टोल रद्द होईपर्यंत आमचा लढा सुरूच राहणार असून, राज्यकर्त्यांना नमविल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही.

ई-चलन

$
0
0
कैक हजार वर्षांपूर्वी, शेतीचा शोध लागल्यावर जंगलात हिंडून शिकार करून आणि फळे गोळा करून राहणाऱ्या मनुष्यप्राण्याने वस्ती करून राहण्याचा निर्णय घेतला आणि विविध मानवी संस्कृती जन्माला येण्याची प्रक्रिया सुरु झाली. अतिरिक्त शेती उत्पादनाचा व्यापार एका संस्कृतीची इतर संस्कृतींशी सरमिसळ करण्यास मदत करू लागला.

कुणी जागा देता का जागा?

$
0
0
कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील निराधार महिलांचे एकमेव आश्रयस्थान असलेल्या शासकिय तेजस्विनी वसतिगृहाचा भाडेकरार संपून वर्ष झाले आहे. करार संपल्याने साहजिकच जागामालक इमारत मोकळी करुन देण्यासाठी तगादा लावत आहे.

सोळा लाभार्थ्यांना लाखाचे अनुदान

$
0
0
रमाई आवास योजनेतंर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील १६ पात्र लाभार्थ्यांना घराच्या बांधकामासाठी पहिल्या टप्प्यातील अनुदानाच्या एक लाख रुपयांच्या धनादेशाचे वाटप महापौर प्रतिभा नाईकनवरे यांच्या हस्ते करण्यात आले.

चमेली बोरांची आवक वाढली

$
0
0
सांगोला, पंढरपूर व अहमदाबाद येथून चमेली बोरांची मोठी आवक झाल्याने शहरातील आठवडी बाजार बोरांच्या स्टॉलनी फुलून गेले आहेत. कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये दररोज ५०० ते ६०० पोत्यांची आवक होत आहे. समितीमध्ये ही आवक साधारणतः जानेवारी अखेरपर्यंत कायम राहील. ५० किलोच्या एका पोत्याचा सौदा ७०० ते ८०० रुपयांना निघत असला तरी, किरकोळ विक्रीचा दर २० रुपये किलो आहे.

नेत्रपेढीचा कारभार ‘आंधळा’

$
0
0
‘नेत्रदान श्रेष्ठदान’ अशी जागृतीची मशाल पेटवणाऱ्या कोल्हापूर आयबँकेचा नेत्रदान संकल्पाला मूर्त रूप देण्याच्या प्रक्रियेबाबत मात्र आंधळा कारभार सुरू आहे. नेत्रपेढीच्या दफ्तरी ५० हजार नेत्रदात्यांची नोंद असली तरी ती कागदावरच राहण्याची चिन्हे आहेत.

जाळपोळ, दगडफेकीने प्रश्न चिघळतात

$
0
0
जाळपोळ, दगडफेकीने प्रश्न सुटण्याऐवजी ते अधिकच चिघळतात. त्याचा सर्वसामान्य जनतेला विनाकारण त्रास सोसावा लागतो. त्यामुळे रक्त न सांडता आंदोलन करा, कारण मारणाऱ्यांपेक्षा जगवणारा श्रेष्ठ असतो.

प्राणघातक हल्ला; संशयित फरार

$
0
0
पाटण तालुक्यातील पवनऊर्जा कंपनीची वाहने अडविल्याच्या कारणावरून दोघा संशयितांनी येथील ग्रामपंचायत सदस्य राजू घाडगे यांच्यावर खुनी हल्ला केल्याने खळबळजनक घटना म्हावशी पेठ येथे घडली.

दावणी रोगाचा द्राक्षबागांवर प्रादुर्भाव

$
0
0
मायणी अनफळे-गुंडेवाडी परिसरात पडलेल्या पावसाने द्राक्षबागायतदार अडचणीत आले आहेत. वादळी व ढगाळ वातावरणामुळे द्राक्षबागांवर मोठ्या प्रमाणावर दावणी रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे.

वातावरणातील बदलाचा स्ट्रॉबेरीला फटका

$
0
0
महाबळेश्वर तालुक्यातील शेतकरी वर्ग ढगाळ वातावरण, वातावरणातील बदल आणि पावसाने पुरता हतबल झाला आहे. वातावरणाचा फटका स्ट्रॉबेरीला बसल्याने शेतकरी उत्पादनाच्या नुकसानीने अडचणीत सापडला आहे. यावर्षी अवेळी पावसाने काही दिवसांपासून महाबळेश्वर तालुक्यात ढगाळ वातावरण आणि कोसळलेल्या पावसाने स्ट्रॉबेरीच्या फळांना जोरदार फटका बसला आहे.

सातारा गारठले

$
0
0
सातारा शहर आणि जिल्ह्यात मागील दोन दिवसांत तापमान झपाट्याने घसरले आहे. थंडीच्या कडाक्यात तसेच दाट धुक्यात वाढ झाली आहे. याचा मोठा परिणाम दैनंदिन जीवनावर झाल्यामुळे जनजीवनच थंडावले आहे.

‘टीईटी’ परीक्षेचा फार्स कशासाठी?

$
0
0
गुणवत्तेसाठी सरकारच्यावतीने शिक्षक भरतीसाठी ‘टीईटी’ची परीक्षा घेतली जात आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुका होणार असल्याने शिक्षक भरती होईल की नाही हे सांगता येणार नाही. मग ‘टीईटी’ परीक्षा घेण्याचा फार्स कशासाठी चालविला आहे. शिक्षकांनी गुणवत्ता पात्रतेचे प्रमाणपत्र घेऊन किती वाट पहायची, असा सवाल डी. एड., बी. एड. परीक्षार्थी उमेदवारांमधून उपस्थित केला जात आहे.

दहाव्या दिवशी बिले देऊ

$
0
0
कारखाना सुरु होण्यासंदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नांना पूर्ण विराम मिळाला असून गाळपास आलेल्या उसाची दहाव्या दिवशी सभासदांच्या खात्यावर बिले जमा करण्यात येतील तसेच तोडणी-ओढणीची बिलेही तत्काळ जमा करण्यात येतील असे आश्वासन उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण यांनी दिले.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images